२९ एप्रिल २०२४

चालू घडामोडी :- 28 एप्रिल 2024

◆ ‘जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिन’ दरवर्षी 28 एप्रिल रोजी साजरा केला जातो.

◆ केंद्र सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहारीन, मॉरिशस आणि श्रीलंका येथे 99 हजार मेट्रिक टनांहून अधिक कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.

◆ तिरंदाजी विश्वचषक 2024 मध्ये भारताच्या ज्योती सुरेखा वेनम, अदिती गोपीचंद स्वामी आणि प्रणित कौर यांनी महिलांच्या अंतिम फेरीत इटलीचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे.

◆ केंब्रिज शिक्षक पुरस्कारासाठी केरळमधील 'जीना जस्टस' यांची निवड झाली आहे.

◆ भारताची पॅरा नेमबाज 'मोना अग्रवाल' हिने जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

◆ श्रीलंकेच्या 'मट्टाला राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळा'च्या व्यवस्थापनाची जबाबदारी रशियन कंपनीसोबत संयुक्तपणे एका भारतीय कंपनीकडे सोपवण्यात आली आहे.

◆ दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे जागतिक शैक्षणिक आणि प्रशिक्षण प्रदर्शन ‘गेटेक्स 2024’ आयोजित करण्यात आले आहे.

◆ वरिष्ठ IRS अधिकारी अनुराग चंद्रा यांची रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभागात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ पॉवरलिफ्टर 'गौरव शर्मा' याला अमेरिकन युनिव्हर्सिटी फॉर स्पोर्ट्स एक्सलन्सने मानद डॉक्टरेट दिली आहे.

◆ अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याची माचो स्पोर्ट्सने ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ क्लेफिन टेक्नॉलॉजीज आणि जना बँकेने त्यांच्या Omnichannel Digital Banking Solution साठी IBSi डिजिटल बँकिंग पुरस्कार 2024 जिंकला आहे.

◆ TRAI ने ऑक्टोबर-डिसेंबर 2023 च्या तिमाहीसाठी "भारतीय दूरसंचार सेवा परफॉर्मन्स इंडिकेटर रिपोर्ट" जारी केला.

◆ अर्जुन बाबुताने ऑलिंपिक निवड चाचणी (OST) T1 मध्ये पुरुषांच्या 10M एअर रायफलमध्ये 254.0 गुणांसह विश्वविक्रम प्रस्थापित केला.[दिव्यांश सिंग पनवारचा विश्वविक्रम मागे टाकला]

◆ इंग्लंडमध्ये 2016 च्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पॉवरलिफ्टर गौरव शर्मा ने दोन सुवर्णपदके जिंकली होती.

◆ IAF ने राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पहिला शोध समारंभ आयोजित केला आहे.

◆ नरसिंग यादवची WFI च्या सात सदस्यीय ऍथलीट्स पॅनेलच्या अध्यक्षपदी निवड झाली.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

२८ एप्रिल २०२४

साहित्य अकादमी पुरस्कार :- माहिती


◾️ साहित्य अकादमी ची स्थापना " 12 मार्च 1954 " रोजी झाली
◾️ मुख्यालय " नवी दिल्लीला " आहे
◾️ साहित्य अकादमी चे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते
◾️ भारतातील 24 भाषांच्या साठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो
◾️ भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टातील एकूण 22 भाषा आणि इंग्रजी व राज्यस्थानी अशा दोन भाषा या सर्व मिळून एकूण 24 भाषांच्या साठी हा पुरस्कार दिला जातो

‼️ काही महत्वाच्या गोष्टी ‼️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️ मराठी साठी प्रथम साहित्य अकादमी पुरस्कार लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळाला
◾️2023 साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक हे आहेत
◾️ कृष्णात खोत यांच्या रिंगण या कादंबरीला मराठी भाषे करता साहित्य अकादमी पुरस्कार 2023 जाहीर झाला

‼️ रिंगाण - कृष्णात खोत यांच्याविषयी ‼️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️ मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत'
त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या
🔥गावठाण’ (२००५),
🔥‘रौंदाळा’ (२००८),
🔥‘झड-झिंबड’ (२०१२),
🔥‘धूळमाती’ (२०१४),
🔥‘रिंगाण’ (२०१८
🔥'गरल्याविन भुई’ हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत
◾️रिंगाण ही कादंबरी प्रकल्पासाठी घरादारावर पाणी सोडून उठवलेल्या माणसांची परवड हा ‘रिंगाण’ कादंबरीचा एक धागा आहे
◾️ पुरस्काराचे वितरण 12 मार्च 2024 ला होणार आहे
➖➖➖➖➖➖➖➖

राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे..

🔴सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अजय माणिकराव खानविलकर यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी लोकपालच्या अध्यक्षपदी नियुक्ती.

➡️लोकपाल :-
🔴1st - न्या. पिनाकी चंद्र घोष
🔴2nd - न्या. ए. एम. खानविलकर

➡️वैधानिक संस्था✅
➡️लोकपाल ही संकल्पना - स्वीडन 1st देश १८०९✅
🔴फिनलॅड -1919
🔴डेन्मार्क -1955
🔴नॉर्वे - 1962
🔴न्यूझीलंड -1962- (1st Commonwealth Country)
🔴ब्रिटन-1967

🟢भारतात माजी कायदा मंत्री अशोक कुमार सेन हे 1960 च्या दशकाच्या सुरुवातीला संसदेत घटनात्मक लोकपालची संकल्पना मांडणारे पहिले भारतीय ठरले .

🟢डॉ. एल.एम. सिंघवी यांनी 1963 मध्ये लोकपाल आणि लोकायुक्त हे शब्द प्रथम वापरले.

🟢संसदेत 1st लोकपाल विधेयक -1968 (शांती भूषण यांनी)

🟢अण्णा हजारे उपोषण -15 एप्रिल 2011

🔴लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013

➡️राष्ट्रपतींकडून संमती - 1 जानेवारी 2014
➡️लागू - 16 जानेवारी 2014 

🔴लोकपाल आणि लोकायुक्त (सुधारणा) कायदा 2016

🔴लोकपाल ही बहु-सदस्यीय संस्था आहे, ज्यामध्ये एक अध्यक्ष आणि जास्तीत जास्त 8 सदस्य असतात.
(निम्मे न्यायिक सदस्य असतील आणि किमान 50% सदस्य SC/ST/OBC/अल्पसंख्याक आणि महिला असतील.)

🔴अध्यक्ष/सदस्य म्हणून पदग्रहण करण्याच्या दिवसी कमीत कमी वय - 45 वर्षे असले पाहिजे.

🔴अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाच्या 70 वर्षापर्यंत असतो.

🔴लोकपालच्या अधिकारक्षेत्रात पंतप्रधान, मंत्री, संसद सदस्य, गट A, B, C आणि D अधिकारी आणि केंद्र सरकारचे अधिकारी यांचा समावेश होतो.

🔴लोकपालच्या चौकशी शाखेला दिवाणी न्यायालयाचे अधिकार देण्यात आले आहेत.

➡️लोकायुक्त :-

🔴1st लोकायुक्त कायदा - ओडिसा -1970
🔴1st लोकायुक्त संस्था स्थापन - महाराष्ट्र - 1971
🔴सर्वात Strong लोकायुक्त संस्था - कर्नाटक

भारतातील काही समाजसुधारक व पदव्या

​​

▪️ सरदार : वल्लभभाई पटेल

▪️ महर्षी : धोंडे केशव कर्वे / विठ्ठल रामजी शिंदे

▪️ राष्ट्रसंत : तुकडोजी महाराज

▪️ हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक : पंजाबराव देशमुख

▪️ धन्वंतरी : डॉ. भाऊदाजी लाड

▪️ राजर्षी : शाहू महाराज

▪️ वस्तीगृहाचे अद्यजनक : शाहू महाराज

▪️ असंतोषाचे जनक : लोकमान्य टिळक

▪️ जहाल राजकारणी : लोकमान्य टिळक

▪️ मराठी भाषेचे शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर

▪️ आधुनिक गद्याचे जनक : विष्णुशास्त्री चिपळूणकर

▪️ निबंधकार : विष्णुशास्त्री चिपळूणकर

▪️ मराठी भाषेचे शिल्पकार : विष्णुशास्त्री चिपळूणकर

▪️ मराठीतील जॉन्सन : विष्णुशास्त्री चिपळूणकर

▪️ क्रांतीसिंह : नाना पाटील

▪️ सेनापती : पांडुरंग महादेव बापट

▪️ सार्वजनिक काका : गणेश वासुदेव जोशी

▪️ मराठी भाषेतील पाणिनी :
      दादोबा पांडुरंग तर्खडकर

▪️ महाराष्ट्रातील पहिले धर्मसुधारक :
      दादोबा पांडुरंग तर्खडकर

▪️ महाराष्ट्रातील मार्टिन ल्युथरकिंग :
      महात्मा ज्योतीबा फुले ‌.

चालू घडामोडी :- 27 एप्रिल 2024

◆ भारतात दरवर्षी 27 एप्रिल रोजी ‘राष्ट्रीय कृमी दिन’ साजरा केला जातो.

◆ ‘सायमन हॅरिस टीडी’ हे आयर्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत.

◆ ICC ने टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू 'युवराज सिंग'ची आगामी T20 विश्वचषक 2024 चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ ‘नरसिंग यादव’ यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) ऍथलीट्स आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

◆ ‘G7 शिखर परिषद 2024’ इटलीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

◆ अमिताभ चौधरी यांची ॲक्सिस बँकेच्या एमडी आणि सीईओपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ भारतीय हवाई दलाने अंदमान आणि निकोबार बेटांवर 'क्रिस्टल मेझ-2' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे.

◆ ASSOCHAM द्वारे आयोजित 2री ग्लोबल आयपी लीडरशिप समिट 'नवी दिल्ली' येथे होणार आहे.

◆ आगामी T20 विश्वचषक 2024 च्या आधी युगांडाने 'अभय शर्मा' यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ सौदीची तेल कंपनी आरामको आगामी फिफा विश्वचषकाची प्रायोजक बनली आहे.

◆ स्वच्छ ऊर्जेचा अवलंब करण्यात कर्नाटक आणि गुजरात ही राज्ये अव्वल स्थानावर आहेत.

◆ म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत देशात महाराष्ट्र हे राज्य प्रथम स्थानावर आहे.

◆ थॉमस चसक पुरुष बॅडमिंटन स्पर्धा 2024 चीन या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत.

◆ टी-20 क्रिकेट च्या इतिहासात आयपीएल मधील 'पंजाब king’s' या संघाने सर्वात मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.

◆ 33वी बर्ड अँड नेचर फेस्टिवल छायाचित्र स्पर्धा पॅरिस येथे आयोजित करण्यात आली होती.

◆ पॅरिस येथे आयोजित बर्ड अँड नेचर फेस्टिवल छायाचित्र स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या "बैजू पाटील" यांना फायर विंग्स या छायाचित्राला पहिले पारितोषिक मिळाले आहे.

◆ भारताचा औषध उद्योग आकाराच्या दृष्टीने जगातील तिसरा सर्वात मोठा उद्योग आहे.

◆ टेस्ला ही कंपनी ऑप्टिमस नावाचा ह्यूमनाईड रोबोट तयार करत आहे.

◆ प्रबोओ सुबियांतो यांची नुकतीच इंडोनेशिया देशाच्या राष्ट्रपती पदी घोषणा करण्यात आली आहे.

◆ 2024 मध्ये इटली मध्ये होणारे G7 देशाचे 50वे संमेलन असणार आहे.

◆ सस्टेनेबल फाईनेंस फॉर टायगर लॅण्डस्केप कॉन्फरन्स 2024 भूतान येथे आयोजित करण्यात आली आहे.

◆ हरियाणा राज्याच्या निवडणुक आयोगाने वोटर इन- क्यू हे ॲप लाँच केले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

२७ एप्रिल २०२४

चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस जगभरात साजरा केला जातो.

◆ बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ Fintech कंपनी 'BharatPe' ने देशातील पहिले ऑल-इन-वन-पेमेंट डिव्हाइस लाँच केले आहे.

◆ भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने कोटक महिंद्रा बँकेचे नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर बंदी घातली आहे.

◆ दीपांशू शर्माने आशियाई अंडर 20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 70.29 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले आहे.

◆ ऑस्ट्रेलियन फर्म कंपेअर द मार्केट एयूने जारी केलेल्या अभ्यासानुसार, जगातील दुसरा सर्वात स्वस्त पासपोर्ट 'भारत'ने बनवला आहे.

◆ भारतीय टेनिसपटू युकी भंवरी आणि तिचा फ्रेंच जोडीदार अल्बानो ऑलिवेट्टी यांनी 2024 BMW ओपन टेनिस स्पर्धेचे दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

◆ 5G नेटवर्कची कार्यक्षमता वाढवण्यासाठी C-DOT ने IIT जोधपूरसोबत करार केला आहे.

◆ चीनमधील शांघाय येथे ‘तिरंदाजी विश्वचषक 2024’ चे आयोजन करण्यात येणार आहे.

◆ JEE मेन्स परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकवाणारा नीलकृष्णा गजरे हा महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील रहिवाशी आहे.

◆ हिमाचल प्रदेश राज्यात देशातील पहिल्या 1500MW क्षमतेच्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

◆ 26 वी जागतिक ऊर्जा काँग्रेस ची मंत्रीस्तरीय परीषद नेदरलँड या देशात आयोजित करण्यात आली होती.

◆ अमेरिका देशाचे नागरिकत्व मिळवणारा भारत जगातील दुसऱ्या सर्वात मोठा देश ठरला आहे.

◆ अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारा पहिला सर्वात मोठा देश मेक्सिको ठरला आहे.

◆ अमेरिकेचे व्हायजर-1 हे  अंतराळात सर्वात दूर गेलेले पाहिले मानवनिर्मित अंतराळयान आहे.

◆ Heavenly island of Goa हे पुस्तक श्रीधरन पिल्लई यांनी लिहिले आहे.

◆ 77 व्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये "Sunflowers were the first once to know" या भारतीय चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

◆ फ्रान्स देशात 15 ते 24 मे 2024 या कालावधीत 77 वा कान्स चित्रपट महोत्सव पार पडणार आहे.

◆ एशियन अंडर-20 एथेलेटिक्स चॅम्पियनशिप चे आयोजन दुबई येथे करण्यात आले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

२५ एप्रिल २०२४

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती
2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा
3) खानापूरचे पठार – सांगली
4) पाचगणीचे पठार – सातारा
5) औंधचे पठार – सातारा
6) सासवडचे पठार – पुणे
7)  मालेगावचे पठार – नाशिक
8)  अहमदनगरचे पठार – नगर
9)  तोरणमाळचे पठार – नंदुरबार
10) तळेगावचे पठार – वर्धा
11) खानापूरचे पठार – सांगली
12) पाचगणीचे पठार सातारा
13) सासवडचे पठार – पुणे
14) मालेगावचे पठार – नाशिक
15) अहमदनगरचे पठार – नगर
16) तोरणमाळचे पठार – नंदुरबार
तळेगावचे पठार – वर्धा
17) गाविलगडचे पठार – अमरावती
18) बुलढाण्याचे पठार – बुलढाणा
19) यवतमाळचे पठार – यवतमाळ
20) कान्हूरचे पठार – अहमदनगर
21) कास पठार – सातारा
22) मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद
23) काठी धडगाव पठार – नंदुरबार
24) जतचे पठार – सांगली
25) आर्वी पठार – वर्धा, नागपुर
26) चिखलदरा पठार – अमरावती

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड

📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर

📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी

📒 भारताचे महालेखापाल - गिरीशचंद्र मर्मु

📘 नियंत्रक व लेखापरीक्षक -  एस. एस. दुबे

📓 भारताचे निवडणूक आयुक्त - राजीव कुमार

📔 केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त - एस हिरालाल समरिया

📓 लोकसभा सभापती - ओम बिर्ला

📙 राज्यसभा सभापती - जगदीप धनखड

📕 भारताचे वित्तमंत्री - निर्मला सीतारमण

📒 भारताचे परराष्ट्रमंत्री - एस. एस. जयशंकर

📘 केंद्रीय दक्षता आयोग आयुक्त - ए. एस. राजीव

📕 केंद्रीय लोकसेवा आयोग अध्यक्ष - मनोज सोनी

📗 राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष - अरूणकुमार मिश्रा

📕 राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष - रेखा शर्मा

📘 रिझर्व बँक गव्हर्नर - शक्तीकांत दास

📓 निती आयोग अध्यक्ष - नरेंद्र मोदी

📒 निती आयोग उपाध्यक्ष - सुमन बेरी

📘 पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष - एन.के.सिंग

📔 सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष - अरविंद पंगारिया

📕 सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष - अशोककुमार माथूर

📙 स्टेट बँक ऑफ इंडिया अध्यक्ष - दिनेश कुमार खरा

📓 सेबी च्या अध्यक्षा - माधवी पुरी बुच

📔 नाबार्ड बँक अध्यक्ष - के. व्ही. शाजी

📓 LIC चे अध्यक्ष - सिद्धार्थ मोहंती

📙 केंद्रीय सक्तवसुली संचालनालय - राहुल नवीन

चालू घडामोडी :- 24 एप्रिल 2024

◆ 'राष्ट्रीय पंचायती राज दिन' दरवर्षी 24 एप्रिल रोजी भारतात साजरा केला जातो.

◆ ‘प्राध्यापक नईमा खातून’ या अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू ठरल्या आहेत.

◆ नोव्हाक जोकोविचला लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2024 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला आहे.

◆ नेपाळची राजधानी काठमांडू येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष्य पर्यटन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ भारताच्या गीता सबरवाल यांची इंडोनेशियातील UNO च्या स्थानिक समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ भारतीय स्क्वॉशपटू सौरव घोषालने व्यावसायिक स्क्वॉशमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

◆ प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसतर्फे 'मानवतावादी सन्मान' देऊन गौरविण्यात आले आहे.

◆ गोव्याचे राज्यपाल पी. एस.  श्रीधरन पिल्लई यांनी ‘हेवनली आयलंड्स ऑफ गोवा’ हे पुस्तक लिहिले आहे.

◆ मॅक्स वर्स्टॅपेनने शांघाय ग्रँड प्रिक्सचे विजेतेपद पटकावले आहे.

◆ श्रीजा अकुला ही भारताची प्रथम क्रमांकाची टेबल टेनिस पटू ठरली आहे.

◆ भारताची टेबल टेनिस पटू श्रीजा अकुला ही जागतिक टेबल टेनिस क्रमवारीत 38व्या स्थानावर पोहचली आहे.

◆ टेनिस पटू नोवाक जोकोविच हा पाचव्यांदा लॉरियस पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.

◆ क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेचा लॉरियस पुरस्कार मिळवणारी एताना बोनमती(स्पेन) ही पहिली फुटबॉल पटू ठरली आहे.

◆ सौरभ घोषाल याने नुकतेच निवृत्ती जाहीर केली. तो स्क्वॉश या खेळाशी संबंधित आहे.

◆ क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या लॉरियस पुरस्कार 2024 मध्ये वर्षांतील सर्वोत्तम संघ पुरस्कार स्पेन या देशाच्या महिला फुटबॉल संघाला जाहीर झाला आहे.

◆ जागतिक लसीकरण आठवडा 24 ते 30 एप्रिल दरम्यान साजरा करण्यात येतो.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

२४ एप्रिल २०२४

सहकार

  


11th सहकार  :- Click Here


12th सहकार  :- Click Here

अर्थशास्त्र

   


11th अर्थशास्त्र  :- Click Here


12th अर्थशास्त्र  :- Click Here

पर्यावरण

 


11th पर्यावरण :- Click Here 


12th पर्यावरण :- Click Here 

शिक्षणशास्त्र

 


 


11th शिक्षणशास्त्र  :- Click Here


12th शिक्षणशास्त्र  :- Click Here

राज्यशास्त्र

 


11th Polity :- Click Here


12th Polity :- Click Here

Science

  


6th Science :- Click Here


7th Science :- Click Here


8th Science :- Click Here


9th Science :- Click Here


10th Science 1  :- Click Here


10th Science 2  :- Click Here


11th अन्न व तंत्रज्ञान :- Click Here


11th Physics :- Click Here


11th Biology :- Click Here


11th Chemistry :- Click Here


12th Physics :- Click Here


12th Biology :- Click Here


12th Chemistry :- Click Here

भूगोल

 

5th  भूगोल :- Click Here


6th भूगोल :- Click Here


7th भूगोल :- Click Here


8th भूगोल :- Click Here


9th भूगोल :- Click Here


10th भूगोल :- Click Here


11th भूगोल:- Click Here


12th भूगोल  :- Click Here



इतिहास

 


6th History+Polity :- Click Here


7th History+Polity :- Click Here


8th History+Polity :- Click Here


9th History+Polity :- Click Here


10th History+Polity :- Click Here


11th History  :- Click Here


12th History  :- Click Here



चालू घडामोडी :- 23 एप्रिल 2024

◆ युनायटेड स्टेट्स 2023 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश बनला आहे.

◆ केरळमध्ये सर्वात मोठा मंदिर उत्सव ‘थ्रिसूर पूरम 2024’ साजरा करण्यात आला.

◆ फ्रेंच ऑटोमेकर सिट्रोएनने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची सिट्रोएन इंडियाचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ भारतीय वंशाचे प्राध्यापक कौशिक राजशेखर यांना जपानच्या अभियांत्रिकी अकादमीने आंतरराष्ट्रीय फेलोशिप प्रदान केली आहे.

◆ भारतीय दूध ब्रँड नंदिनी आगामी T20 विश्वचषक स्पर्धेतील स्कॉटलंड आणि आयर्लंड संघाची प्रायोजक बनली आहे.

◆ कुवेतमध्ये पहिल्यांदाच हिंदी रेडिओचे प्रसारण सुरू झाले आहे.

◆ ब्राझीलच्या घनदाट जंगलात वाघाची नवीन प्रजाती (क्लाउडेड टायगर कॅट) सापडली आहे.

◆ कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा ग्रँडमास्टर "डी. गुकेश" ठरला आहे

◆ कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा डी. गुकेश हा दुसरा भारतीय बुद्धीबळ पटू ठरला आहे.

◆ कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा कॅनडा या देशात आयोजित करण्यात आली होती.

◆ कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा मध्ये महिला गटात चीन देशाच्या टॅन झोंगिने विजेतेपद पटकावले आहे.

◆ कॅंडिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणाऱ्या डी. गुकेश ची विश्विजेतेपदा साठी चीन देशाच्या डिंग लिरेन शी होणार आहे.

◆ नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड या कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त झाला असून कंपनीची  स्थापना 1974 साली झाली आहे.

◆ जागतिक पुस्तक दिवस 23 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.

◆ जागतिक पुस्तक दिन 2024 ची थीम "read your way" ही आहे.

◆ संरक्षण खर्चाच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे.

◆ संरक्षण खर्चाच्या बाबतीत जगात अमेरिका हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

◆ नेपाळमध्ये पहिली इंद्रधनुष्य पर्यटन परिषद आयोजित करण्यात आली आहे.

◆ प्रज्ञा मिश्रा यांची OpenAI ची भारतातील पहिली कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

२३ एप्रिल २०२४

भारतातील आर्थिक नियोजनाचा इतिहास--हा घटक राज्यसेवा व संयुक्त परीक्षा दोन्हींसाठी सामायिक आहे


🌸 विश्वेश्वरय्या योजना--1934 

म्हैसूर राज्याचे दिवाना एम विश्वेश्वरय्या यांनी सर्वप्रथम भारतीय नियोजनाची योजना मांडली.

👉 "The planned economy of India" या पुस्तकात. 

👉त्यांनी 'नियोजन करा किंवा नष्ट व्हा' असा संदेश दिला.  

👉भर--औद्योगीकरण


🌸 FICCI योजना--1934 

अध्यक्ष-एन आर सरकार 

👉मुक्त अर्थव्यवस्थेला विरोध 

👉एका राष्ट्रीय नियोजन आयोगाची गरज व्यक्त केली. 

👉केन्स वादी विचारसरणीचा अवलंब


🌸 काँग्रेस योजना 1938

राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना 

अध्यक्ष-- पंडित जवाहरलाल नेहरू 

सदस्य --15  / उपसमित्या --29


🌸 मुंबई योजना 1944

👉8 प्रमुख उद्योगपतींनी "A plan of economic development for  India" हा कृती आराखडा जाहीर.

👉भर--तीव्र औद्योगीकरण, जमीन सुधारणा, लघुउद्योग, व्यापार,विकास 


🌸 गांधी योजना-- 1944 

मांडली-श्री नारायण अग्रवाल 

👉आर्थिक विकेंद्रीकरण हे मुख्य वैशिष्ट्य 

 👉भर--ग्रामीण विकास, कुटीर व लघु उद्योग आणि कृषी 


🌸 जनता योजना-- 1945 

मांडली-- मानवेंद्रनाथ रॉय 

👉भर--कृषी व उद्योग

👉मुंबई योजनेला प्रत्युत्तर 


🌸 सर्वोदय योजना-- 1950 

मांडली-- जयप्रकाश नारायण 

👉उद्दिष्ट-- अहिंसक पद्धतीने शोषण विरहित समाज निर्माण करणे.

 👉भर- कृषीक्षेत्र,लघुउद्योग, स्वयंपूर्णता जमीन सुधारणा, आर्थिक विकेंद्रीकरण 

 👉महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या विचारसरणीवर आधारित.


22 एप्रिल 2024 Questions


🔖 प्रश्न.1) भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची निवड झाली आहे?

उत्तर - दिनेश कुमार त्रिपाठी


🔖 प्रश्न.2) NSG चे नवीन DG म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर - नलिन प्रभात 


🔖 प्रश्न.3) भारताने अलीकडेच ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांची पहिली खेप कोणत्या देशाला सुपूर्द केली ?

उत्तर – फिलीपिन्स


🔖 प्रश्न.4) स्कायट्रॅक्स अवॉर्ड्सद्वारे कोणत्या विमानतळाला "जगातील सर्वोत्तम विमानतळ" म्हणून ओळखले जाते ?

उत्तर – हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळ


🔖 प्रश्न.5) ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे चर्चेत आलेला माऊंट रुआंग पर्वत कोणत्या देशात आहे ?

उत्तर – इंडोनेशिया


🔖 प्रश्न.6) आकाशगंगेत सर्वात मोठा स्टेलर कृष्णविवर सापडला असुन त्याचे नाव काय आहे ?

उत्तर – BH ३ 


🔖 प्रश्न.7)  १३ व्या युरोपियन मुलींच्या गणितीय ऑलिम्पियाडचे आयोजन कोठे करण्यात आले होते ?

उत्तर – जॉर्जिया 


🔖 प्रश्न.8) कोणत्या देशाने पहिल्यांदा अवकाशात युद्ध सराव मिशन विक्ट्स हेज ची घोषणा केली ?

उत्तर – अमेरिका


🔖 प्रश्न.9)  फ्रेंच भाषा दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर – २० एप्रिल


🔖 प्रश्न.10) इंडिया:the road to Renaissance A vision and agenda हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

उत्तर – भिमेश्वर चल्ला

हिमालया मधील महत्त्वाच्या खिंडी..

✅ अ) जम्मू आणि काश्मीर  ::

       1) बारा लाचा 

       2) बनिहल खिंड

       3) झोजी - ला 

       4) पीर पंजाल खिंड 

------------------------------------------------

✅ ब) अरुणाचल प्रदेश ::

        1) बोमदी - ला 

        2) दिहांग खिंड 

        3) दिफू खिंड 

        4) लिखापानी खिंड 

---------------------------------------------------

✅क) उत्तराखंड :: 

       1) लिपु लेख खिंड 

       2) मना खिंड 

       3) मंगशा धारा खिंड 

       4) मुलिंग ला 

       5) निती खिंड 

       6) तराईल खिंड 

       7) माऱ्हि ला 

       8) तिम - जून - ला 

       9) शलसल खिंड 

     10) बालचा धुरा खिंड 

     11) कुंग्रीन बिंगरी 

     12) लांपिया खिंड 

---------------------------------------------------

✅ड) हिमाचल प्रदेश :: 

        1)बुरझिल खिंड 

        2)देबसा खिंड

        3)रोहतांग खिंड 

        4)शिप्की - ला 

---------------------------------------------------

✅इ) सिक्कीम :: 

        1)जेलप - ला 

        2) नथु - ला 

चालू घडामोडी :- 22 एप्रिल 2024

◆ केकी मिस्ती यांची HDFC लाइफ इन्शुरन्स बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ 6 वर्षांच्या तक्षवी वाघानीने 25 मीटरपेक्षा कमी अंतरावर 16 सेमी इतक्या कमी लिंबो स्केटिंगमध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.

◆ केंटो मोमोटाने(जपान) वयाच्या 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली.

◆ सुरिंदर एस जोधका, विकास कुमार यांची आदिसेशिया पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

◆ नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने नेव्हिगेशन प्रणालीचे मूल्यांकन करण्यासाठी "डॉपलर अतिशय उच्च-वारंवारता ओम्नी श्रेणी (DVOR) कॅलिब्रेशन फ्लाइट" चे उद्घाटन केले.

◆ जगभरात दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस पृथ्वी दिवस किंवा 'जागतिक वसुंधरा दिन' म्हणून साजरा केला जातो.

◆ जागतिक वसुंधरा दिन 2024 ची थीम “प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक” ही आहे.

◆ बलराज पन्वर रोईंग या खेळात पॅरिस ऑलिंपिकची पात्रता मिळवणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

◆ चार दिवसांचा आठवडा करणारा सिंगापूर आशिया खंडातील पहिला देश.

◆ दिनेश कार्तिक हा आयपीएल मध्ये 250 सामने खेळणारा तिसरा क्रिकेट पटू ठरला आहे.

◆ प्लॅस्टिक मुळे होणाऱ्या प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी कॅनडा या देशाच्या ओटावा येथे 23 ते 29 एप्रिल दरम्यान विशेष परिषदेचे आयोजन केले आहे.

◆ Inteligens ब्युरो IB च्या विशेष निर्देशक पदी सपना तिवारी यांनी निवड झाली आहे.

◆ अंतरीक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल पी. सुब्बाराव यांना आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला आहे.

◆ आर्टेमिस करारात सामील होणारा स्वीडन हा 38वा देश ठरला आहे.

◆ AI सक्षम लॉर्ज लँग्वेज मॉडेल Liama-3 हे Meta या कंपनीने लाँच केले आहे.

◆ मोहम्मद सालेम यांच्या छायाचित्राला वर्ड प्रेस ऑफ द इयर 2024 पुरस्कार मिळाला आहे.

◆ दीपिका सोरेंग हिला असुंता लाक्रा पुरस्कार मिळाला आहे. ती हॉकी खेळाशी संबंधित आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...