१९ एप्रिल २०२४

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..


-----------------======----------------------
शिखर               उंची(मी)             स्थान
---------------------------------------------------
1)एव्हरेस्ट/      8848.86 मी     नेपाळ/
सागमाथा                                चीन
(जगातील सर्वात उंच शिखर )
-------------------------------------------------
2) के 2              8611 मी           भारत
(भारतातील सर्वात उंच शिखर )
---------------------------------------------------
3)कांचनगंगा      8586 मी      नेपाळ /
                                           भारत   
---------------------------------------------------
4) ल्होत्से           8516 मी      नेपाळ/
                                           चीन
--------------------------------------------------
5) मकालू           8485 मी      नेपाळ/
                                           चीन
---------------------------------------------------
6) चो ओयू         8188 मी     नेपाळ/
                                           चीन
---------------------------------------------------
7) धवलगिरी      8167 मी     नेपाळ
---------------------------------------------------
8) मनसलू         8163 मी      नेपाळ
---------------------------------------------------
9) नंगा पर्वत      8126 मी    पाकिस्तान
---------------------------------------------------      
10)अन्नपूर्णा -1   8091 मी    नेपाळ
---------------------------------------------------
11)गाशरब्रुम-1/ 8068मी  पाकिस्तान /
     हिडन पीक                     चीन
--------------------------------------------------
12) ब्रॉड पिक    8047 मी  पाकिस्तान/
                                          चीन
--------------------------------------------------
13)गाशरब्रुम-2   8035मी   पाकिस्तान/
                                             चीन
---------------------------------------------------
14)शीशपंगमा   8027 मी      चीन

जनसांख्यिकीय संक्रमण सिद्धांत

👉प्रतिपादन-- डब्ल्यू एम थामसन
👉मांडला-- फ्रेक नाॅटेस्टीन 1945

👉नुसार, आर्थिक विकासाच्या वेगवेगळ्या स्तरात जन्म-मृत्यूच्या प्रवृत्ती वेगवेगळ्या असतात, त्यामुळे लोकसंख्या वृद्धि दरही वेगवेगळा असतो.

👉मते,
सामान्यतः प्रत्येक अर्थव्यवस्थांची लोकसंख्या वृद्धि 5 अवस्थांमधून जाते.

👉प्रथम-- जन्म किंवा मृत्युदर दोन्ही उच्च असतात. उदाहरणार्थ 1921 पूर्वीचा भारत

👉द्वितीय-- लोकसंख्या विस्फोट
ही अवस्था आर्थिक विकास बाधक असते. 1921 ते 1991 भारतातील अवस्था.

👉तृतीय--आर्थिक विकासाचा वेग तीव्र होतो; तसेच कुटुंब नियोजन मुळे जन्मदर व मृत्युदर दोन्ही घटतात.
या अवस्थेत देश विकसित अवस्थेत पोहोचतो

👉चतुर्थ-- सुख सुविधांच्या वाढीने प्रजोत्पादनाची इच्छा कमी होते, त्यामुळे जन्मदर व मृत्युदर दोन्ही उतरून एका निश्चित पातळीवर स्थिर होतात. यात लोकसंख्येत निव्वळ वृद्धि नगण्य ठरते. उदाहरणार्थ- युरोपातील विकसित देश

👉पंचम-- जन्मदर मृत्युदरापेक्षा कमी होतो, याने लोकसंख्येचा आकार घटतो व वृद्धांची संख्या वाढते. या अवस्थेत स्त्रिया घराच्या बाहेर पडून उत्पादक कार्य करतात त्यांचा दृष्टिकोन बदलतो उदाहरणार्थ- फ्रान्स

🇮🇳भारत हा सध्या तृतीय अवस्थेतून जात आहे.

१८ एप्रिल २०२४

जागतिक वारसा दिन : 18 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 18 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळांचा दिवस (International Day For Mounments And Sites) म्हणून साजरा केला जातो. याला ''जागतिक वारसा दिवस'' म्हणूनही ओळखले जाते.

◆ 2024 ची थीम :-'विविधता शोधा आणि अनुभवा.' (''Discover and Experience Diversity.'')

◆ 2023 ची थीम :- 'वारसा बदल' ("Heritage Changes")

➢ उद्देश :- मानवी वारसा जतन करणे आणि संबंधित संस्थांच्या सर्व प्रयत्नांना मान्यता देणे.

➢ या दिनाचा इतिहास :-

युनेस्कोने 1982 मध्ये झालेल्या सभेत 18 एप्रिल हा जागतिक वारसा स्थळ दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव आयसीओएसओएसने (ICOMOS) दिला होता. त्यामुळे युनेस्कोने 18 एप्रिल हा दिन जागतिक वारसा स्थळ दिन म्हणून साजरा करण्यास 1983 मध्ये सहमती दर्शवली होती. त्यामुळे 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा स्थळ दिन म्हणून साजरा केल्या जातो.

➢ युनेस्को जागतिक वारसा स्थळे 2024 :-

सध्या जगभरात एकूण 1199 जागतिक वारसा स्थळे असून, त्यापैकी 933 सांस्कृतिक स्थळे, 227 नैसर्गिक स्थळे आणि 39 मिश्र स्थळे आहेत. आणि 56 वारसा स्थळांचा धोक्याच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

➢ युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा प्राप्त सर्वाधिक स्थळे 2024 :-

• इटली - 59
• चीन - 57
• जर्मनी व फ्रान्स - प्रत्येकी - 52
• स्पेन - 50
• भारत - 42

➢ भारतातील जागतिक वारसा स्थळे 2024 :-

जागतिक वारसा स्थळांच्या संख्येमध्ये भारत जगात सहाव्या स्थानी असून, भारतात सध्या 42 जागतिक वारसा स्थळे आहेत. यापैकी 34 सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक स्थळे, तर 1 संमिश्र स्थळ आहे.

➢ महाराष्ट्रतील जागतिक वारसा स्थळे 2024 :-

➢ भारतातील सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे महाराष्ट्रमध्ये असून यात,

(1) अजिंठा लेणी - (छत्रपती संभाजीनगर)
(2) वेरूळ लेणी - (छत्रपती संभाजीनगर)
(3) घारापुरी लेणी किंवा एलिफंटा लेणी - (मुंबई)
(4) छत्रपती शिवाजी टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) - (मुंबई)
(5) पश्चिम घाट (कासचे पठार) - (सातारा)
(6) व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स - (मुंबई)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

18 एप्रिल 2024 चालू घडामोडी


प्रश्न – WEF च्या 2024 च्या वर्गात अलीकडेच कोणाला यंग ग्लोबल लीडर म्हणून नाव देण्यात आले?
उत्तर - अद्वैत नायर

प्रश्न – जागतिक आवाज दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – १६ एप्रिल

प्रश्न – अलीकडेच कोणत्या देशाच्या दीपेंद्र सिंगने एका षटकात 6 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे?
उत्तर - नेपाळ

प्रश्न – अलीकडे कोणत्या संघाने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे?
उत्तर - सनरायझर्स हैदराबाद

प्रश्न – स्पेस इंडियाने अलीकडेच ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - संजना संघी

प्रश्न – चेन्नई व्हेल विद्यापीठात नुकतीच मानद डॉक्टरेट पदवी कोणाला प्रदान करण्यात आली?
उत्तर - रामचरण

प्रश्न – केंद्र सरकारच्या ग्रीन क्रेडिट योजनेच्या अंमलबजावणीत अलीकडे कोण आघाडीवर आहे?
उत्तर - मध्य प्रदेश

प्रश्न – नुकतीच IMD चे MD म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - क्रिस्टालिना जॉर्जिएवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

....𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....

◾️2024 विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द इयर रिपोर्ट प्रकाशित

◾️रिपोर्ट नुसार जगातील सर्वाधिक आघाडीचे क्रिकेटपटू
⭐️पुरुष : पॅट कमिन्स (Australia)
⭐️महिला  : नॅट सायव्हर-ब्रंट  ( England)
⭐️ T20 Cricketer of the year 2024:- हैली मैथयुस (WI)
⭐️ Test cricketer of the year 22024: टैविस हेड (Australia)

◾️विस्डेन हे एक वर्षाला प्रकाशित होणारे मॅगझीन आहे
याला "क्रिकेट चे बायबल" असे पण म्हणले जाते

◾️जागतिक हिमोफिलिया दिवस 2024
⭐️हिमोफिलिया हा एक अनुवांशिक रक्तस्त्राव विकार आहे ज्यामध्ये रक्त योग्यरित्या गुठळ्या होत नाही, ज्यामुळे रक्तस्त्राव लवकर थांबत नाही
⭐️2024 थीम : Equitable access for all: recognizing all bleeding disorders"

◾️प्रसिद्ध कर्नाटक संगीतकार केजी जयन (89) यांचे त्रिपुनिथुरा येथे निधन झाले.
⭐️2019 मध्ये, पद्मश्री, देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.

◾️इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या वर्षाच्या अखेरीस सूर्याचा अभ्यास करण्यासाठी प्रोबा-3 लाँच करणार
⭐️प्रक्षेपण सप्टेंबरसाठी लक्ष्य केले गेले आहे
⭐️ इस्रोच्या PSLV-XL रॉकेटचा वापर करून श्रीहरिकोटा येथून नेले जाईल

◾️शेख अहमद अब्दुल्ला यांची कुवेतचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती
⭐️यापूर्वी त्यांनी अर्थ, आरोग्य, तेल आणि माहिती यासारख्या महत्त्वाच्या मंत्रिपदांवर काम केले आहे.
⭐️माजी पंतप्रधान शेख मोहम्मद यांच्या राजीनाम्यानंतर यांची नियुक्ती

◾️भारताने एक स्वदेशी बुलेट ट्रेन विकसित करण्यास सुरुवात केली आहे जी 250 किलोमीटर प्रति तास (किमी) वेग ओलांडेल,
⭐️भारताने मुंबई-अहमदाबाद मार्गावर तैनात करण्याची योजना आखली आहे, ती 320 किमी प्रतितास वेगाने पोहोचू शकते.

◾️Operation True Promise
⭐️ऑपरेशन चे नाव
⭐️इराणने ऑपरेशन अंतर्गत इस्रायलवर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे सोडली

चालू घडामोडी :- 17 एप्रिल 2024

◆ सर्वात बिझी टॉप-10 विमानतळामध्ये पहिल्या स्थानी ॲटलांटा हर्ट्सफिल्ड जॅक्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ(अमेरिका) आहे.

◆ दरवर्षी 17 एप्रिल रोजी जगभरात जागतिक हिमोफिलिया दिन साजरा केला जातो.

◆ एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल (ACI) वर्ल्ड, 'इंदिरा गांधी इंटरनॅशनल (IGI) एअरपोर्ट' ने जारी केलेल्या यादीनुसार, दिल्ली हे जगातील दहावे सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे.

◆ 'संजना संघी' ची स्पेस इंडियाने ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ इस्रायली गणितज्ञ आणि संगणक शास्त्रज्ञ अवि विग्डरसन यांना 2023 च्या असोसिएशन फॉर कॉम्प्युटिंग मशिनरी (ACM) एएम ट्युरिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ पलक गुलियाने ISSF अंतिम ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.

◆ इंग्लंडचा महान फिरकी गोलंदाज आणि ICC हॉल ऑफ फेम इंडस्ट्री डेरेक अंडरवुड यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले.

◆ केंद्र सरकारच्या ‘ग्रीन क्रेडिट प्रोग्राम’च्या अंमलबजावणीत मध्य प्रदेश राज्य अव्वल स्थानावर आहे.

◆ BharatPe ने 'नलिन नेगी' यांची नवीन CEO म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ जागतिक केळी दिवस[17 एप्रिल 2024] दरवर्षी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी साजरा करण्यात येतो.

◆ क्रिकेटपटू जोस बटलर हा आयपीएल मध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत दुसऱ्या तर विराट कोहली पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.

◆ IPL मध्ये एका सामन्यात शतक, विकेट आणि झेल घेणारा पहिला क्रिकेट पटू सुनिल नरेन ठरला आहे.

◆ जस्ट अ मर्सिनरी?: नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे पुस्तक RBI च्या डी. सुब्बाराव या माजी गव्हर्नर ने लिहिले आहे.

◆ Wisden क्रिकेटर ऑफ दी इयर 2024 साठी leading क्रिकेटर ऑफ दी इयर मेन "पॅट कमिन्स" ठरला आहे.

◆ Wisden क्रिकेटर ऑफ दी इयर 2024 मध्ये ॲशली गार्डनर या महिला क्रिकेट पटुचा समावेश झाला आहे.

◆ टी 20 क्रिकेट मध्ये 6 चेंडूवर 6 सिक्स मारणारा दीपेंद्र सिंह ऐरी हा जगतील तिसरा फलंदाज ठरला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

१७ एप्रिल २०२४

हिमालया मधील महत्त्वाच्या खिंडी..


# अ) जम्मू आणि काश्मीर  ::

       1) बारा लाचा 

       2) बनिहल खिंड

       3) झोजी - ला 

       4) पीर पंजाल खिंड 

------------------------------------------------

# ब) अरुणाचल प्रदेश ::

        1) बोमदी - ला 

        2) दिहांग खिंड 

        3) दिफू खिंड 

        4) लिखापानी खिंड 

---------------------------------------------------

# क) उत्तराखंड :: 

       1) लिपु लेख खिंड 

       2) मना खिंड 

       3) मंगशा धारा खिंड 

       4) मुलिंग ला 

       5) निती खिंड 

       6) तराईल खिंड 

       7) माऱ्हि ला 

       8) तिम - जून - ला 

       9) शलसल खिंड 

     10) बालचा धुरा खिंड 

     11) कुंग्रीन बिंगरी 

     12) लांपिया खिंड 

---------------------------------------------------

# ड) हिमाचल प्रदेश :: 

        1)बुरझिल खिंड 

        2)देबसा खिंड

        3)रोहतांग खिंड 

        4)शिप्की - ला 

---------------------------------------------------

# इ) सिक्कीम :: 

        1)जेलप - ला 

        2) नथु - ला 


सघराज्याची वैशिष्ट्ये



🔹* भारतीय संघराज्याची ही अमेरिकन संघराज्याप्रमाणे केंद्राकर्षी नव्हे तर त्यामुळे यास युनियन शब्द वापरला आहे.


* प्रबळ केंद्रशासन - अधीकार विभागामध्ये केंद्र शासनाला पूर्णतः माप देण्यात आले, केंद्र सूचीतील अधिकार ९९ विषय शिवाय उर्वरित अधिकार केंद्राला बहाल करण्यात आले आहे. तसेच समवर्ती सूचीतील ५२ विषय यावर केंद्र कायदे करू शकते.


* केंद्र आणि राज्य यासाठी एकच संविधान अमेरिकेप्रमाणे प्रत्येक राज्याला स्वतंत्र संविधान नाही.


* भारतीय घटनेनुसार एकेरी नागरिकत्व.


* घटक राज्याच्या अस्तित्वाच्या हमीचा अभाव. कारण संसद साध्या बहुमताद्वारे एखाद्या घटक राज्याची सीमा बदलू शकते.


* आणीबाणीविषयक तरतुदी [ कलम ३५२, कलम ३५६, कलम ३६० ]


* राज्यपाल हे पद घटक राज्यांना घटनात्मक प्रमुख असलेला राज्यपाल केंद्रामार्फत नियुक्त केला जातो. आणि त्याची राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पदावर राहतो. म्हणजे त्याची नियुक्ती बडतर्फी संदर्भात केंद्रालाच सर्वाधिकार देण्यात आले.


* एकात्म न्याय व्यवस्था


* राज्यसभा म्हणजे घटक राज्याचे प्रतिनिधित्व होय या सभागृहात घटकराज्यांचा समान प्रतिनिधित्व देण्यात आलेले आहे.


* एकात्म स्वरूपाची लेखापरीक्षण व्यवस्था.


* एकात्म स्वरूपाचा लेखापरीक्षण व्यवस्था.


* एकात्म स्वरूपाचा निर्वाचन निवडणूक आयोग.


* राज्य विधेयकावर राष्ट्रपतींना असणारा अधिकार


* डॉ आंबेडकरांनी घटना परिषदेत चर्चा करताना ' भारतीय संविधान द्विदल शासन निर्माण करते ' त्यामुळे ते संघराज्यात्मक स्वरूपाचे आहे असे मत मांडले.


महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय



क्र.:-घटना दुरूस्ती:-वर्ष:-घटना दुरूस्तीचा विषय


1.:-1 ली घटना दुरूस्ती:-1951:-नवव्या परिशिष्टामध्ये जमीन सुधारण्याचा विषय समाविष्ट करण्यात आला.


2.:-5 वी घटना दुरूस्ती:-1955:-राज्यांची सीमा, नावे, आणि क्षेत्रफळ यात बदल करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला.


3.:-15 वी घटना दुरूस्ती:-1963:-उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्यात आले.


4.:-26 घटना दुरूस्ती:-1971:-संस्थानीकांचे तनखे बंद करण्यात आले.


5.:-31 वी घटना दुरूस्ती:-1973:-लोकसभेचा सभासदांची संख्या 545 करण्यात आली.


6.:-36 वी घटना दुरूस्ती:-1975:-सिक्कीमला घटक राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला


7.:-42 वी घटना दुरूस्ती:-1976;-मूलभूत कर्तव्यांचा समावेश, लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाल पाच वर्षांचा करण्यात आला. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. घटनेच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष व समाजवाद या दोन शब्दांचा समावेश करण्यात आला.


8.:-44 वी घटना दुरूस्ती:-1978:-संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कातून वगळण्यात आला.


9.:-52 वी घटना दुरूस्ती:-1985:-पक्षांतर बंधी कायदा आणि 10 व्या परिशिष्टाची निर्मिती


10.:-56 वी घटना दुरूस्ती:-1987:-गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.


11.:-61 वी घटना दुरूस्ती:-1989:-मतदारांची वयोमर्यादा 21 वरून 18 करण्यात आली.


12.:-71 वी घटना दुरूस्ती:-1992:-नेपाळी, कोकणी व मणिपुरी भाषांना घटनात्मक दर्जा देण्यात आला.


13.:-73 वी घटना दुरूस्ती:-1993:-पंचायत राज, घटनात्मक दर्जा व अकरावी सूची


14.:-74 वी घटना दुरूस्ती:-1993:-नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, घटनात्मक दर्जा व बारावी सूची


15.:-79 वी घटना दुरूस्ती:-1999:-अनुसूचीत जाती-जमातीच्या राखीव जागांमध्ये कालावधीत वाढ 2010 पर्यंत


16.:-85 वी घटना दुरूस्ती:-2001:-सरकारी नोकर्‍यांमध्ये अनुसूचीत जाती-जमातींना बढतीमध्ये आरक्षण


17.:-86 वी घटना दुरूस्ती:-2002:-6 ते 14 वयोगटांतील मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण


18.:-89 वी घटना दुरूस्ती:-2003:-अनुसूचीत जाती जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना


19.:-91 वी घटना दुरूस्ती:-2003:-केंद्रीय मंत्रिमंडळ आणि घटक मंत्रिमंडळात एकूण सभासदांच्या 15% मंत्र्यांची संख्या निर्धारित करण्यात आली.


20.:-97 वी घटना दुरूस्ती:- -:-सहकारचा विकास


21.:-108 वी घटना दुरूस्ती;- -:-महिलाना लोकसभा व विधानसभेमध्ये 33% आरक्षण


22.:-109 वी घटना दुरूस्ती:- -:-मागासवर्गीयांची राजकारणातील आणि शासकीय नोकर्‍यांमधील आरक्षणाची मुदत 10 वर्षानी वाढवण्यात आली.


23.:-110 वी घटना दुरूस्ती:- -:-महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था/ पंचायत राजमध्ये 50% आरक्षण


24.:-113 वी घटना दुरूस्ती:- -:-ओडिशा राज्यातील नावातील बदल


25.:-115 वी घटना दुरूस्ती:-2011:-जिएसटी कराच्या संदर्भात

स्वतंत्र भारताची राज्यघटना

🔅लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट च्या स्वरुपात १९२८ मध्ये घटनेबाबतच्या शिफारशी देण्यात आल्या होत्या. गोलमेज परिषदेतही घटना निर्मितीबाबत कॉंग्रेसने आग्रह धरला. ३० मार्च १९४२ रोजी क्रिप्स योजना जाहीर झाली. त्यानुसार महायुध्द समाप्तीनंतर भारतासाठी एक घटना परिषद नेमण्याचे आश्र्वासन देण्यात आले व १९४६ च्या कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली.


🔅 तरिमंत्री योजनेनुसार १० लाख लोकांमागे एक अशा प्रमाणात प्रतिनिधींची निवड करण्यात येऊन घटना परिषदेची निर्मिती झाली. या परिषदेमध्ये सर्वसामान्य २१० मुस्लीम ७८ शीख ४ इतर ४ अशा २९६ प्रतिनिधींची निवड करण्यात आली. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा निवडले गेले. त्यांच्या अध्याक्षतेखाली अध्यक्षपदी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड झाली घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणुन डॉ. एच. सी. मुखर्जी यांची तर समितीचे सल्लागार म्हणून डॉ. बी. एन. राव यांची निवड झाली. याचबरोबर सा समितीमध्ये प्रमुख सदस्य म्हणुन पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, डॉ. राधाकृष्णन, के.एम. मुन्शी डॉ. जयकर इत्यादींचा सहभाग होता.


🔅 घटना परिषदेमार्फत २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसूदा समितीची निवड झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मसूदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर बी. एन. राव, एस, एन. मुखर्जी, इ. मसुदा समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले घटनेच्या मसुद्यामध्ये ३१५ कलमे व ७ परिशिष्टे आहेत. घटना समितीने भारताच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती केली. तर गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या भारत भाग्य विधाता, या गीताला राष्ट्रगीताचा मान देण्यात आला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी नवीन राज्यघटनेला मंजूरी देण्यात आली. राज्यघटना निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे.


🔅 महणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. २६ जानेवारी १९५० पासून नवीन राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु झाला. म्हणून हा दिवस सर्व देशभर साजरा केला जातो. भारताचे संविधान हा राज्यघटनेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. घटनेची ध्येये आणि उद्दिष्टे यात प्रतिबिंब्ंिात झाली आहेत. भारताचे संविधान खालीलप्रमाणे.


🔶 भारताचे संविधान


🔅 आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्र्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता:

निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्र्वासन देणारी बंधूता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन,

आमच्या संविधान सभेस आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.



💠 भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे :-



(१) लिखित घटना


भारताची राज्यघटना लिखित स्वरुपाची आहे. इंग्लंडच्या घटनेप्रमाणे ती अलिखित नाही. राज्यकारभाराबाबतचे नियम, कोणाचे काय अधिकार व कर्तव्य याबाबतची माहिती राज्यघटनेत देण्यात आयली आहे. घटना लिखित असली तरी काही अलिखित परंपरा पाळल्या जातात. उदा. एकच व्यक्ती तीन वेळा भारताचा राष्ट्रपती होऊ शकत नाही.



(२) जगातील सर्वात मोठी विस्तृत राज्यघटना


भारतीय राज्यघटना व्यापक व विस्तारित स्वरुपाची आहे. घटनेमध्ये ३९५ कलमे, ९ परिशिष्टे आहेत, केंद्र व प्रांत यांचे स्वरूप व अधिकार, न्यायव्यवस्थेचे अधिकार, निवडणूक आयोगाचे अधिकार, याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. यामुळे भारतीय राज्यघटना जगातील इतर देशांच्या तुलनेत विस्तृत स्वरूपाची आहे.



(३) लोकांचे सार्वभौमत्व


घटनेनुसार जनता सार्वभैाम आहे. जनतेच्या हाती खरी सज्ञ्ल्त्;ाा आहे. कारण जनता आपल्या प्रतिनिधीमार्फ़त राज्यकारभार चालविते राष्ट्रप्रमुखाची (राष्ट्रपती) निवड जनता आपल्या प्रतिनिधीकरवी करते. निवडणुकीच्या माध्यमातुन जनता आपणास आवश्यक असा बदल घडवून आणू शकते. २६ जानेवारी १९५० पासून घटनेनुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणुन साजरा केला जातो.


(४) संसदीय लोकशाही


स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी लोकशाही शासनपध्दतीची मागणी केली होती. घटनाकारांनी इंग्लंडचा आदर्श समोर ठेवून संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. लोसभा व राज्यसभेची निर्मिती करण्यात आली. लोकसभेतील सदस्य पक्ष आपले मंत्रिमंडळ (कार्यकारीमंडळ) बनवतो. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार आहे. लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती, मिळून भारतीय संसद निर्माण झाल्याचे दिसून येते.


(५) संघराज्यात्मक स्वरूप


भारतीय घटनेने संघराज्यात्मक शासनपध्दतीचा स्वीकार केला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात सत्तेचे विभाजन करण्यात आले. आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांना आपआपले अधिकार देण्यात आले आहेत. मात्र आणीबाणीच्या वेळी भारतीय संघराज्याचे स्वरूप एकात्म झाल्याचे दिसून येते.



(६) घटना अंशत परिवर्तनीय व अंशत परिदृढ


लिखित व अलिखित याप्रमाणेच परिवर्तनीय व परिदृढ असे घटनेचे प्रकार आहेत. इंग्लंडची राज्यघटना अतिशय लवचीक तर अमेरिकेची राज्यघटना अतिशय ताठर स्वरूपाची आहे. भारतीय राज्यघटना इंग्लंइतकी लवचीक नाही व अमेरिकेइतकी ताठरही नाही. भारतीय घटनादुरुस्तीची पध्दत कलम ३६८ मध्ये देण्यात आलेली आहे. एखाद्या साधारण मुद्यावर संसदेच्या साध्या बहुमताने घटनेत दुरुस्ती करण्यात येते मात्र राष्ट्रपतीची निवडणूक पध्दत केंद्र व प्रांत यांचे अधिकार, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इ. महत्वपूर्ण बाबीविषयी घटनेत दुरुस्ती करताना संसदेच्या २/३ सदस्यांची अनुमती निम्म्याहून अधिक घटक राज्याच्या विधिमंडळाची अनुमती आवश्यक असते. त्यामुळे भारतीय घटना अंशत, परिवर्तनीय व अंशत परिदृढ अशा स्वरुपाची बनविण्यात आली आहे.


(७) मूलभूत हक्क


भारतीय राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर भर देण्यात आला आहे. कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत हक्क्ांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य समता शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्य संपत्तीचा हक्क, पिळवणुकिविरुध्द हक्क इ. महत्वपूर्ण हक्क व्यक्तीला देण्यात आलेले आहेत. हक्काबरोबरच व्यक्तीला काही कर्तव्यही पार पाडावी लागतात. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. घटनेत व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा समावेश हे घटनेचे महत्वाचे वैशिष्टे आहे.


(८) धर्मनिरपेक्ष राज्य


भारत हे धर्मातील राष्ट्र संबोधण्यात आले आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माला राजाश्रय न देता सर्व धर्माना समान लेखण्यात आले आहे. प्रत्येकाला आपआपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याचा, आचरण ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सर्व धर्मीयांना समान लेखण्यात आले. असून धर्म, जात पंथ, याद्वारे भेदभाव न करता सर्वाना समान संधी देण्यात आली आहे.



(९) एकेरी नागरिकत्व


अमेरिकन व स्वित्झर्लंड या देशामध्ये केंद्र व प्रांत यांचे दुहेरी नागरिकत्व देण्यात आलेले आहे. भारतात संघराज्यात्मक पध्दतीचा स्वीकार केलेला असूनही केंद्राचे व घटक राज्याचे असे वेगळे नागरिकत्व व्यक्तीस देण्यात आलेले नाही. प्रत्येक भारतीय यास संघराज्याचे नागरिकत्व देण्यात आलेल आहे. राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे यासाठी एकेरी नागरिकत्वाची पध्दत स्वीकारण्यात आली .


(१०) एकच घटना


ज्याप्रमाणे एकेरी नागरिकत्वाच पुरस्कार करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणेच देशातील सर्व नागरिकांसाठी एकाच घटनेची तरतूद करण्यात आली आहे. घटक राज्यांना स्वतंत्र अशी घटना बनविण्याचा अधिकार नाही. घटक राज्यांना संघराज्याबाहेर फुटून निघण्याचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे



(११) राज्यघटना हीच सर्वश्रेष्ठ


देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे त्या देशाची राज्यघटना होय. राज्यघटनेच्या सर्वश्रेष्ठत्वाला आव्हान देता येत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश, मंत्री यांना राज्यघटनेची एकनिष्ठ राहण्याबाबत शपथ घ्यावी लागते.


(१२) जनकल्याणकारी राज्याची निर्मिती


भारताचा राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फ़त चालतो. भारताचा राष्ट्रपती हा इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंश परंपरेनुसार नसतो, तर अप्रत्यक्ष निवडणूक पध्दतीने निवडण्यात येतो. जनता आपणास हवे असणारे सरकार निर्माण करू शकते व हे सरकार जनकल्याणासाठी बांधील असते.


(१३) मार्गदर्शक तत्वे


व्यक्तीला मूलभूत हक्कांना कायदेशीर मान्यता असते. मूलभूत हक्कांची शासनाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून पायमल्ली झाल्यास संबंधिताला न्यायालयात दाद मागता येते. मात्र मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत हे धोरण लागू पडत नाही. मार्गदर्शक तत्वे व्यक्तीला कल्याणासाठी असली तरी ती सरकारने पाळलीच पाहिजेत असे सरकारवर बंधन नसते. मार्गदर्शक तत्वे ही नावाप्रमाणे मार्ग दाखविण्यासाठी उपयुक्त ठरतात. भारतीय घटनेतील काही निवडक मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे


(१) जीवनावश्यक गोष्टी सर्वाना मिळाव्यात 

(२) राज्यातील सर्वासाठी एकच मुलकी कायदा असावा 

(३) राज्यातील सर्व स्त्री -पुरुषांना समान वेतन असावे. 

(४) १४ वर्षाखालील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण असावे 

(५) संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये 

(६) देशातील साधनसंपज्ञ्ल्त्;ा्ीचे समाजहिताच्या दृष्टीने वाटप व्हावे. 

(७) दारुबंदी व इतर उपायांनी लोकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे.



(१४) स्वतंत्र न्यायालय व्यवस्था


लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयांना स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. भारतास एकेरी न्यायव्यवस्था आहे. सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, जिल्हा, कोर्ट व इतर दुय्यम न्यायालये यांची एक साखळी निर्माण करण्यात आली आहे. न्याय व्यवस्थेवर राजकीय सत्तेचा दबाब येऊ नये यासाठी विधिमंडळ व कार्यकारीमंडळ यांच्या पासून न्यायमंडळाची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे. न्यायाधीशांची नेमणूक बदली, बढती, पगार, या सर्व गोष्टींना संरक्षण देऊन न्यायाधीशांकडून कार्यक्षम व निपक्षपाती न्यायाची अपेक्षा करण्यात आली आहे.



(१५) राष्ट्रपती व त्यांचे आणीबाणीचे अधिकार


भारताचा राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे. त्यांची निवड संसद सदस्य व विधानसभा सदस्यांकडून क्रमदेय निवड पध्दतीने होत असते. सर्व महत्वपूर्ण गोष्टी राष्ट्रपतींच्या नावे होत असल्या तरी प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या हाती सज्ञ्ल्त्;ाा केंदि्रत झाली आहे. भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक अंमलबजावणीविषयक आर्थिक बाबीविषयी घटक राज्याविषयक, न्यायविषयक व संकटकाल विषयक अशा सहा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. भारतीय राष्ट्रपतीला मिळालेला संकटकाल विषयक अधिकार अत्यंत महत्वाचा आह


(१६) हिंदी भाषेस राष्ट्रभाषेचा दर्जा


भारतीय राज्यघटनेत भाषाविषयक धोरण स्पष्ट करण्यात आले आहे. अनुच्छेद ३४३ मध्ये स्पष्ट घोषणा करण्यात आली आहे की, भारत या संघराजयाची अधिकृत भाषा देवनागरीतील हिंदी ही राहील. प्रादेशिक राज्यकारभार ज्या त्या प्रादेशिक भाषेमधून चालविण्याबाबत घटनेत स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्रजी एक जादा भाषा म्हणून राहील. आंतराष्ट्रीय व्यवहार व हिंदी समजू न शकणार्या राज्यांना केद्र सरकारशी व्यवहार करण्यासाठी इंग्रजीचा वापर करता येईल.


(१७) प्रौढ मताधिकार


भारतीय लोकशाहीने प्रौढ मतदार पध्दतीचा स्वीकार केलेला आहे. १८ वर्षावरील सर्व स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार देण्यात आलेला. आहे निवडणूक मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. लोकसंख्या व विस्ताराच्या दृष्टीने भारतासारख्या विशाल देशात प्रौढ मताताधिराने लोकशाहीचा प्रयोग राबविण्यात येत आहे. सनदी नोकरांच्या निवडीसाठी पब्लिक सर्व्हिस कमिशन (लोकसेवा अयोग मंडळ) ची स्थापना करण्यात आली आह

मार्गदर्शक तत्वांची उपयुक्ततता :

📌डॉ. आंबेडकर - राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. घटनेचे आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये. ही तत्वे अमलात न आणणाऱ्या सरकारला न्यायालयांमध्ये नसला तरी जनतेच्या दरबारात जाब द्यावाच लागेल.


📌B.N. राव - राज्यसंस्थेच्या प्राधिकारांसाठी नैतिक तत्वे, त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.


.📌N.M. सिंघवी - घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतूदी.


📌M.C. छगला (माजी सरन्यायाधीश) - मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वी वरील स्वर्ग बनेल. त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.


📌M.C. सेटलवाड - न्यायालयास उपयुक्त beacon-light व प्रस्ताविकेचे विस्तारण करणारी तत्वे. 


📌गरॅनव्हिल ऑस्टिन - मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीद्वारे देशातील सामाजिक क्रांती ची उद्दिष्टे साध्य होतील.


📌ईवोर जेनिंग्ज - Pious aspiration.


📌अनंत नारायण - अ-वादयोग्य आणि अमूर्त.


📌 गलॅडहिल - "इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधायक सूचना.'


📌K.V.राव - “या मागील खरा हेतू भारताला पोलिस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनविण्याचा आहे."


🎯मार्गदर्शक तत्वांवरील टिका :


📌K.T. शहा - Pious Superfluities, बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक.


📌नसिरोद्दीन - नववर्षाचा निश्चय जो 2 जानेवारीला मोडला जातो.


📌T.T. कृष्णमाचारी - भावनांची खरी केराची टोपली.


📌K.C. व्हेअर - कंटाळवाणा नैतिक उपदेश, जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचन मानावयाचे ठरले तरीही

त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकिर्ती प्राप्त होईल.


📌K. संथानम - या तत्वांनी केंद्र विरुद्ध राज्य, राष्ट्रपती विरुद्ध पंतप्रधान, राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा घटनात्मक संघर्ष निर्माण केला.

"अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) )"



🅾️2018 साली लोकसभेत सद्याच्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव "तेलगू देसम पार्टीने" (TDP) मांडला होता. प्रस्ताव मात्र संमत झाला नसल्याने सरकार स्थिर आहे यावर्षी  होणाऱ्या परीक्षासाठी अविश्वास प्रस्तावाबाबत घटनात्मक आणि सभागृहात काय तरतुदी  आहेत त्याचा आढावा.....


🅾️कलम 75 सांगते की, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. त्यामुळे लोकसभेत बहुमत असे पर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहते. मंत्रीमंडळावर अविश्वासाचा प्रस्ताव मांडून लोकसभा त्याला सत्तेवरून हटवू शकते.


1) राज्यघटनेत कुठेही विशेष अशी अविश्वास प्रस्तावाची तरतूद नाही.


2) अविश्वास प्रस्ताव हा फक्त लोकसभेत मांडता येतो. राज्यसभेत नाही.


3) अविश्वास प्रस्तावाची तरतूद लोकसभेच्या कार्यपद्धती मध्ये आहे.


4) लोकसभेचा कोणताही खासदार (सत्ताधारी अथवा विरोधी) हा लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडू शकतो.


5) प्रस्ताव मांडण्यासाठी कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 वाजता लोकसभा सचिवांकडे नोटीस देणे बंधनकारक आहे.


6) प्रस्ताव मांडताना 50 लोकसभा सदस्यांचे समर्थन बंधनकारक आहे.


7) वरील सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की लोकसभा अध्यक्ष प्रस्तावावर चर्चा व मतदान कधी होणार हे सांगतात.


८) सभागृहात जर हा प्रस्ताव मंजूर झाला. त्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो.


9) प्रस्तावावर मतदान हे आवाजी किंवा मतविभागणी करून होते.


10) अविश्वास प्रस्ताव मांडताना करणे देण्याची गरज नसते.


11) अविश्वास प्रस्ताव फक्त मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो.

तलाठी व ग्रामसेवक भरती साठी


1) खालीलपैकी सदीश राशी कोणती ? 

1) वस्तुमान 

2) दाब

3) घनता 

4) बल 🏆


2) ---------याने गुरूत्वाकर्षणाचा सिध्दांत मांडला ? 

1) न्यूटन 🏆

2) गँलिलिओ 

3) विल्यम हार्वे 

4) नेपियर 


3) " गोवर " हा रोग कशामुळे होतो  ? 

1) जिवाणू 

2) विषाणू 🏆

3) कवक 

4) डास 


4) उत्क्रांती वादाचा सिध्दांत कोणी मांडला  ? 

1) मेंडेल 

2) डार्विन 🏆

3) आईनस्टाईन 

4) राँबर्ट काँक 


5) खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही ? 

1) कर्करोग 🏆

2) क्षयरोग 

3) इन्फ्यएंझा 

4) कोणतेही नाही 


6) इ.स.1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते ? 

1) लाँर्ड रिपन 

2) लाँर्ड डलहौसी 

3) लाँर्ड कँनिंग 🏆

4) लाँर्ड हार्डिंग 


7) संपूर्ण देशात एकाचवेळी जनगणना -------------पासून सुरू करण्यात आली  ? 

1) 1871

2) 1901

3) 1891

4) 1881🏆


8) सती बंदीची चळवळी मध्ये ----------यांनी मुख्य भूमिका बजावली. 

1) महात्मा गांधी 

2) बाबासाहेब आंबेडकर 

3) राममोहन राँय 🏆

4) वेगळे उत्तर 


9) भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणास संबोधले जाते ? 

1) लाँर्ड रिपन 🏆

2) लाँर्ड मेयो 

3) लाँर्ड लिटन 

4) लाँर्ड कर्झन 


10) " A nation in making " ह्या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखक कोण  ? 

1) अँलम आँक्टोव्हिअम ह्यूम 

2) मदनमोहन मालवीय 

3) पंडिता मोतीलाल नेहरू 

4) सुरेंद्रनाथ बँनर्जी 🏆


11) राज्यात मगर प्रजनन केंद्र कोठे आहे  ? 

1) नागझिरा 

2) नवेगांव 

3) ताडोबा 🏆

4) पेंच 


12) केंद्रीय कापूस  संशोधन केंद्र ----------येथे आहे. 

1) नवी दिल्लीत 

2) पुणे 

3) नागपूर 🏆

4) सुरत 


13) मंध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र ------येथे आहे ? 

1) सिमला 🏆

2) महाबळेश्वर 

3) नवीन दिल्ली 

4) लुधियाना 


14) दंतेवाड़ा हा नक्षलग्रस्त जिल्हा ----------राज्यात आहे  ? 

1) महाराष्ट्रात 

2) ओरिसा

3) छत्तीसगढ़ 🏆

4) उत्तरप्रदेश 


15) खालीलपैकी ------------ ही मध्यप्रदेशची राजधानी आहे ? 

1) भोपाळ🏆 

2) इंदौर 

3) जयपूर 

4) रांची 


16) केंद्र सरकारच्या महारत्न कंपन्यांची संख्या किती  ? 

1) चार 

2) पाच 

3) सहा 

4) सात 🏆


17) भारतीय हरितक्रांतीचे शिल्पकार कोणास म्हणले जाते ? 

1) जगदीशचंद्र भोस 

2) राजा रामण्णा 

3) डाँ.  स्वामीनाथन 🏆

4) जयंत नारळीकर 


18) " लोकांची योजना " चे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ? 

1) बी. आर. आंबेडकर 

2) एम. एन. राँय 🏆

3) पंडीत नेहरू 

4) श्रीमान नारायण 


19) रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण कधी करण्यात आले  ? 

1) 1-1-1948 

2) 1-1-1949🏆

3) 1-1-1950

4) 1-1-1952 


20) हरितक्रांती मुख्यत्वे कोणत्या पिकांच्या बाबतीत यशस्वी ठरली  ? 

1) गहू व ज्वारी 

2) तांदूळ व गहू 🏆

3) गहू व कापूस 

4) तांदूळ व ज्वारी 


21) भारताच्या घटना समितीचे प्रमुख ----------हे होते  ? 

1) जवाहरलाल नेहरू 

2) डाँ.आंबेडकर 

3) सरदार पटेल 

4) डाँ.राजेंद्रप्रसाद 🏆


22) अर्धविषयक विधेयक विधान परिषदेत प्रथमता मांडता येत नाही. हे विधान -------------

1) बरोबर आहे 🏆

2) चूक आहे 

3) अंशतः बरोबर आहे 

4) गैरलागू आहे 


23) घटनेच्या आठव्या परिशिष्टातील अधिकृत भाषाची संख्या आता किती आहे    ? 

1) 18

2) 20

3) 22🏆

4) 24


24) देशातील कायद्याची निर्मीती करणारी सर्वोच्च संस्था कोणती  ? 

1) सर्वोच्च न्यायालय 

2) संसद 🏆

3) कार्यकारी मंडळ

4) केंद्रीय लोकसेवा आयोग 


25) घटनेतील कलम 51 अ नुसार मतदानाचा हक्क बजावणे हे भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य ठरते, विधान --------------

1) संपूर्णत:चूकीचे आहे 🏆

2)पूर्णत:बरोबर आहे 

3) वस्तुस्थितीशी सुसंगत आहे 

4) अंशतः बरोबर आहे 



26) महाराष्ट्रात ग्रामपंचायत सदस्यांसाठी आवश्यक किमान वयोमर्यादा ------------ वर्षे आहे ? 

1) 18

2) 25

3) 20

4) 21🏆


27) जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून खालीलपैकी कोण काम पाहत असतो  ? 

1) निवडणूक आयुक्त 

2) विभागीय आयुक्त 

3) जिल्हाधिकारी 🏆

4) प्रांताधिकारी 


28) स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक कोण घेतो ? 

1) राज्य शासन 

2) केंद्र शासन 

3) राज्य निवडणूक आयोग 🏆

4) केंद्रीय निवडणूक आयोग 


29) ---------- घटनादुरूस्ती पंचायतराज घटनात्मक दर्जा मिळाला आहे ? 

1) 73 व्या 🏆

2) 70 व्या 

3) 100 व्या

4) 75 व्या 


30) 3001 ते 4500 या लोकसंख्यासाठी ग्रामपंचायत सदस्य संख्या ------------ एवढी असते  ? 

1) 11

2) 13🏆

3) 15

4) 17



पोलीस भरती विशेष.... परश्न मंजुषा



Q.1..... बँक राष्ट्रीयीकरण दिवस म्हणून ओळखला जातो.

1 १९ जुलै √√√√

2 ३१ आॅक्टोबर

3  २३ एप्रिल

4 १ व ३


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.2 NRHM ची सुरुवात .......या वर्षी करण्यात आली.

1  २००७

2  २००४

3  २००५√√√√√√

4  २०१३


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.3  भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण महत्त्वाचे नाही 

1  कामगारांची वाढती संख्या

2  अयोग्य तंत्रज्ञान 

3  प्रभावी मागणीची      

कमतरता 

4  कामगारांसाठी संरक्षित कायदा√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.4...... मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यात आली?

1  १९४८-४९

2  १९३१-३२√√√√

3  १९११-१२

4  १८६७-६८


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.5  खालीलपैकी कोणती घटना पंचवार्षिक योजना चालु असताना घडली नाही?

1   चलन निश्चलीकरन 

2   रुपयाचे अवमूल्यन√√√√

3   १ व २  दोन्ही घडले 

4  १ व २ दोन्ही घडले नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.6  रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदीन वापराचे साधन कोणते?

1   बँकदर

2  रोख राखीव प्रमाण

3  वैधानिक रोखता प्रमाण

4  रेपो आणि रेव्हर्स रेपो व्यवहार√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.7  खाद्याबाबतच्या आवडी व अग्रक्रम स्थिर असताना उत्पन्न वाढत असताना अन्नावरील प्रत्यक्ष खर्च जरी वाढत असला तरी उत्पन्नापैकी अन्नावर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी होते हे सांगणारा नियम म्हणजे......... होय.

1  "से" चा बाजार विषयक नियम

2  उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम

3  एंजल चा नियम√√√√√

4  फिलिप्स वक्ररेषा


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.8  १८६७ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न.... तर दरडोई उत्पन्न..... इतके होते.

1  २० कोटी व ३४० रुपये वार्षिक

2  २४० कोटी व २० रुपये वार्षिक

3  ३४० कोटी व २० रुपये वार्षिक √√√√√√

4  ३४० कोटी वार्षिक व २०  रुपये मासिक


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.9 पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी....... मध्ये वाढ झाली नाही?

1  अन्नधान्य उत्पादन

2  राष्ट्रीय उत्पन्न 

3  दरडोई उत्पन्न

4  किमतीचा निर्देशांक√√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.10  भारत निर्माण योजनेमध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?

अ. ग्रामीण शिक्षण

ब. ग्रामीण आरोग्य

क. ग्रामीण पाणीपुरवठा

ड. ग्रामीण रस्ते

1   अ आणि ब  √√√√√

2   ब आणि क

3   क आणि ड

4  अ आणि ड


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.11  खालीलपैकी कोणते घटक १९६६-१९६९ दरम्यान भारतातील नियोजन खंडित होण्यास कारणीभूत होते? 

1  चीन -भारत युध्द

2  भारत पाकिस्तान संघर्ष 

3  आर्थिक मंदी

4  राजकीय अस्थिरता √√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.12  तीव्र मंदी दूर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली तेजीची/ चलन वाढची परिस्थिती म्हणजे ....... होय.

1  मुद्रा अवपात

2  मुद्रा संस्फीती√√√√√

3  स्टगफ्लेशन

4  स्टगनेशन


📖📖📖📖📖📖📖📖📖


[Q.13  भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो?

1  यु एस ए √√√√√√  

2  यु के  

3  चीन   

4  सिंगापूर


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.14 १९६९ च्या १४ बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता?

अ इंदिरा गांधी 

ब  मोरारजी देसाई

क जयप्रकाश नारायण

ड  रिझर्व्ह बँक 

1  अ आणि क 

2  ब आणि  ड√√√√√√

3  ब आणि  क

4  क आणि ड


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.15  तिसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी...... मध्ये घट झाली नाही.

1  अन्नधान्य उत्पादन

2  राष्ट्रीय उत्पन्न

3  परकीय चलन साठा

4  किमतीचा निर्देशांक√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.16  भारतात मध्यवर्ती   बँकेची शिफारस कोणी केली नव्हती? 

1   हिल्टन यंग आयोग

2   चेंबर्लिन आयोग

3   फौलर समिती

4   मॅकलेगन समित✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.17  ........ ही कंपनी 'मोती' या नावाने युरिया उत्पादन करते.

1  राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली.

2  मद्रास फर्टिलायझर ली.

3  हिंदुस्थान फर्टिलायझर ली.√√√√√√√

4  वरील सर्व


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.18 राष्ट्रसभेकडून कोणत्या वर्षी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती?

1  १९४६

2  १९३८√√√√√

3  १९२९

4  १९२५


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.19 सरकारच्या तुटीच्या अर्थभरणाचा खालीलपैकी कोणता स्रोत नाही?

1  रिझर्व्ह बँकेकडून व व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे

2  नवीन चलन निर्मिती

3  स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे

4  जमा झालेले महसूल√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.20 प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते..... अंदाजपत्रक होय.

1  रोख

2  बहुआयामी

3  शून्याधारीत√√√√√

4  यापैकी नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.21 सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत कोणी मांडला?

1 प्रो पिकॉक व प्रो वाईजमन√√√√√√

2 प्रो पिगु

3 डॉ मार्शल

4 वरील पैकी नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.22 अप्रत्यक्ष करांचा समाजावर... परिणाम होत?

1  पुरोगामी

2  न्याय्य 

3  प्रतिगामी√√√√√√

4  प्रमाणशीर


📖📖📖📖📖📖📖📖

राज्यसेवा पुर्व मधील Economy चे प्रश्न Solve करत असताना आपला Approach काय असावा?


राज्यसेवा पुर्व साठी Economy चे साधारणता 15 प्रश्न विचारले जातात. त्यातील 12-13 प्रश्न आपण Read करत असलेल्या regular Sources मधून येत असतात. राहिलेले 2-3 प्रश्न Out of Box च असतात. पण जे Basic Books मधून येतात त्या प्रश्नांना कस Deal करता येईल याविषयी आपण बघूयात.


🔴 Topicwise आपण याविषयी माहिती घेऊ.


❇️ गरिबी व बेरोजगारी -


यामध्ये दारिद्र्य आणि बेरोजगारीचे प्रकार Conceptually माहिती हवेत. त्यानंतर दारिद्र्याच्या समित्याच्या Facts पाठ करून टाका. बेरोजगारी मोजण्याच्या पद्धती चांगल्या करून ठेवा. राज्यसेवेला प्रश्न जास्त deep ला जातं नाही. So या Basic गोष्टीच चांगल्या करा.यापुढे जर प्रश्न आला तर तुम्ही केलेल्या Basic गोष्टींवरती Cover होईल.


❇️ लोकसंख्या-


यामध्ये Pyq हा सर्वात महत्वाचा Factor आहे. तुम्ही Pyq जरी तोंडपाठ केले तरी लोकसंख्येचे तुमचे 60-70% प्रश्न Cover होतात. यामध्ये Factual Angle नेच तयारी करा. उगीचच जास्त Analysis करण्यात काही अर्थ नाही.अलीकडे आयोग लोकसंख्या या घटकावर Deep level ला प्रश्न विचारत आहे. E.g. राज्यसेवा पुर्व 2020 औरंगाबाद घनतेचा प्रश्न.


❇️ 3.शाश्वत विकास -


या घटकावर आयोग Mdg, Sdg,1972 च्या Stockholm परिषदेपासून ते SDG पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यांचा अभ्यास करावा लागेल. या घटकावर आयोगाने 2019 च्या पुर्व ला SDG आणि MDG च्या Main Targets मधील Subtargets वरती प्रश्न विचारले होते. तेवढी depth आपल्याला गाठावी लागेल.8 MDG आणि 17 SDG काही Tricks करून लक्षात ठेवा. सोबतच त्यामधील Subtargets सुद्धा.


❇️ 4 सामाजिक क्षेत्र सुधारणा -


यामध्ये महिला, बालक, वृद्ध, अपंग, सामाजिकदृष्ट्या Weaker Sections वरच्या योजना चांगल्या कराव्या  लागतील.तसेच अन्न, वस्त्र, निवारा, पाणीपुरवठा यासंबधीच्या 2014 च्या पुढील योजनानावर आयोग प्रकर्षाने प्रश्न विचारताना दिसत आहे. देसले सर भाग -2 मधून हा घटक चांगला करून घ्या.योजना अभ्यासताना ती कधी सुरु झाली, तिचे उद्देश काय होते, तिचे लक्ष गट आणि कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते या गोष्टी करून ठेवा. पुर्व मध्ये 3-4 प्रश्न योजना, धोरणे यावरती विचारले जातात.


❇️ 5. समावेशन -


यामध्ये प्रादेशिक, वित्तीय व वैश्विक समावेशन असे घटक येतात. यामधील आर्थिक समावेशनावरती आयोग दरवर्षी प्रश्न विचारतो आहे. त्यामध्ये जनधन योजना,Pप्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, अटल पेन्शन योजना  चांगल्या करून ठेवा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे.


❇️ 6. नियोजन व जमीन सुधारणा -


यामध्ये पहिल्या ते बाराव्या पंचवार्षिक योजनांचा एक चांगला Overview आपल्याकडे असावा. त्यासोबत जमीनसुधारणा या घटकाच्या basic Facts बघून घ्या. त्यावरतीच आयोग सारखं प्रश्न विचारतो आहे. त्या राज्यसेवा Mains Hrd च्या कोणत्याही book मध्ये HR या Topic मध्ये तुम्हाला भेटून जातील.


🛑 आणखी एक आणि तितकाच महत्वाचा मुद्दा म्हणजे Out of Box questions च करायचं काय? तर त्यासाठी मला असं वाटत की काही Logic लागलं तर ठीक नाहीतर आपण असे प्रश्न Skip करू शकतो.


एकंदरीत वरती सांगितल्याप्रमाणे प्रत्येक Topic आणि Subtopic चा प्रश्नांचा Trend लक्षात घेतला तर राज्यसेवा पुर्व मध्ये Economy या विषयात 12-13 प्रश्न आपले बरोबर येऊ शकतात.


Economy Revision करताना खालील घटक प्रधान्यक्रमाने करा.

 नमस्कार,

Combine पुर्व साठी अजून जवळपास 75 दिवसांचा वेळ शिल्लक आहे.. इथून पुढच्या economy च्या revision प्लॅन विषयी चर्चा करूयात.

बघा आता Economy साठी इथून पुढे नक्कीच Roadmap कसा असायला पाहिजे याविषयी थोडं बघूयात.


1.आता Revision करताना खालील घटक प्रधान्यक्रमाने करा.

फायदा होईल.


1. सार्वजनिक वित्त

2. करसंरचना

3. गरिबी व बेरोजगारी

4. शासकीय योजना

5. बँकिंग व RBI

6. कृषी उद्योग सेवा

7. परकीय व्यापार व व्यवहारतोल

8. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

9. पंचवार्षिक योजना

10.लोकसंख्या 

11.राष्ट्रीय उत्पन्न

12.LPG

13. किंमती व चलनवाढ

14. मूलभूत संकल्पना      


2. आता Pyq solving सोबत basic बुक्स वाचण्यावरती लक्ष द्या.


जास्त Focus हा Content / Facts वरती दया. त्या चांगल्या Revise करून घ्या.


3.आता Basic books (कोळंबे / देसले जे वाचले असेल ते ) ची चांगली revision करून घ्या. कारण आत्ता जर Facts revise झाल्या नाहीत तर Exam मध्ये Confusion जास्त होते.  


4.आयोगाच्या Trend शी Touch मध्ये राहण्यासाठी 2020,2021,2022 चे Pyq दररोज बघत चला.

हे सर्वच विषयांना लागू होते.  


5. आणि कुठल्याच विषयाला Overestimate किंवा Underestimate करू नका Exam मध्ये Paper कसा येईल त्यानुसार प्रत्येक विषयाचे Marks ठरत असतात.

So आत्ता Revision वरती Focus करा.


सर्वांना शुभेच्छा!💐💐


The Achievers Mentorship.


Aniket Thorat.

STI 2019

ASO 2019

भारतातील बेरोजगारी चे मोजमाप

✍मोजमाप करण्यासाठी तीन प्रमुख स्त्रोत आहेत.

1)दशवार्षिक जनगणनेचे अहवाल

2) राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेचे अहवाल

3) रोजगार व प्रशिक्षण संचालनालय यांच्याकडील नोंदणीची आकडेवारी                       

✍यापैकी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संघटनेची आकडेवारी महत्त्वाची मानली जाते. यासाठी पंचवार्षिक सर्वेक्षणे केली जातात. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्था रोजगार व बेरोजगारीचे आकडे जमा करण्यासाठी तीन प्रमुख पद्धतींचा वापर करते.

🌹1)  नित्य प्रमुख व दुय्यम दर्जा –
                        नित्य प्रमुख दर्जा या संकल्पनेत एका वर्षांमध्ये व्यक्ती अधिक काळासाठी आर्थिक कृतीशी संबंधित असतो. त्यामध्ये 365 दिवसांमध्ये मोठ्या कालावधीसाठी जे व्यक्ती आर्थिक कामात गुंतलेले असतात. ते नित्य प्रमुख दर्जावर रोजगारात असल्याचे समजले जाते.
                या 365 दिवसांमध्ये एखादी दुय्यम आर्थिक कृती त्या व्यक्तींनी केली तर तीस दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी ही दुय्यम आर्थिक कृती केलेली असेल तर तो दुय्यम दर्जावरही रोजगारात असल्याचे मानले जाते. या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करून नित्य प्रमुख व दुय्यम दर्जाच्या ठरवला जातो. भारतातील बेरोजगारी

🌹2)  चालू आठवडी दर्जा –
                        सात दिवसांच्या कालावधीमधील एका व्यक्तीच्या आर्थिक कृतींचा समावेश चालू आठवडी किंवा साप्ताहिक दर्जा यामध्ये होतो. सात दिवसांच्या कालावधीमध्ये एका दिवसात किमान एक तास काम करणाऱ्या व्यक्तीस रोजगारी समजले जाते.

🌹3)  चालू दैनिक दर्जा –
                    चालू दैनिक दर्जाच्या या पद्धतीमध्ये व्यक्ती दररोज आर्थिक कृतीमध्ये किमान चार तास काम करणे आवश्यक असते. याच्या आधारावर ती चालू दैनिक दर्जा काढला जातो.

Basic Concepts of Economics :

🛑दारिद्र्य 🛑

जीवनाच्या मुलभूत किमान गरजा भागविता येण्याची अक्षमता म्हणजे दारिद्र्य होय.

दारिद्र्य एक सापेक्ष संकल्पना आहे.



🔶कामगार 

उच्च किंवा निम्न अशा कोणत्याही स्तरावरील आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेल्या व त्याद्वारे राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणा-या सर्व व्यक्तींना कामगार म्हटले जाते.




🛑बेरोजगारी🛑

 रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल.  रोजगार मिळविण्यासाठी उत्सुक असलेली व्यक्ती त्यासाठी शारिरीक व मानसिकदृष्ट्या समर्थ असावी.



🔶बेरोजगारीचे प्रकार

१) खुली बेरोजगारी :- 

काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल तर त्याला खुली बेरोजगारी असे म्हणतात.


२) हंगामी बेरोजगारी :-

शेतीच्या नांगरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी सोडून वर्षाच्या इतर काळात भासणारी बेरोजगारी.


३) अदृश्य / प्रच्छन्न बेरोजगारी :-

आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करुन एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असल्यास..


४) कमी प्रतीची बेरोजगारी :-

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा / शिक्षणाच्या दर्जेपेक्षा कमी प्रतीच्या रोजगारावर समाधान मानावे लागते.


५) सुशिक्षीत बेरोजगारी :- 

जेव्हा सुशिक्षीत लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात.


६)चक्रीय बेरोजगारी :-

विकसीत भांडवलशाही देशांमधील व्यापारी चक्राच्या मंदीच्या परिस्थितीत ही बेरोजगारी दिसून येते.


७) घर्षणात्मक बेरोजगारी :-

 विकसीत देशांना जेव्हा नवीन उद्योग जुन्या उद्योगांना आपल्या व्यवसायातून बाहेर पडण्यास भाग पाडतात व कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतिक्षेत असतात तेव्हा ही बेरोजगारी निर्माण होते.

• असा तात्पुरता कालावधी जेव्हा कामगार ऐच्छिकरित्या बेरोजगार असतो तेव्हा त्या परिस्थितीला घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात. (येथे घर्षण जुन्या व नव्या उद्योगामध्ये निर्माण झालेले असतात.)


2030 सालासाठी शाश्वत विकास ध्येये (SDGs)


●ध्येय 1: दारिद्र्याचे संपूर्ण उच्चाटन


●ध्येय 2: शून्य उपासमार (उपासमार थांबवणे, अन्न सुरक्षा आणि सुधारित पोषक आहार साध्य करणे आणि शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे)


●ध्येय 3: सर्वांसाठी निरोगी आरोग्य आणि सर्व वयोगटातील सर्वांसाठी कल्याणाचा प्रचार करणे


●ध्येय 4: सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण (सर्वसमावेशक आणि न्याय गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्वांसाठी आजीवन शिक्षण संधींचा प्रचार करणे)


●ध्येय 5: स्त्री-पुरुष समानता (लैंगिक समानता प्राप्त करणे आणि सर्व महिला व मुलींना सशक्त करणे)


●ध्येय 6: सर्वांसाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छता


●ध्येय 7: सर्वांसाठी स्वस्त, विश्वासार्ह, शाश्वत आणि स्वच्छ ऊर्जा


●ध्येय 8: सर्वांसाठी सभ्य काम आणि आर्थिक वाढ (सतत, सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक वाढ, पूर्णकाळ आणि उत्पादनक्षम रोजगार तसेच सभ्य कामांना प्रोत्साहन देणे)


●ध्येय 9: उद्योग, नवकल्पना आणि पायाभूत सुविधा (लवचिक अश्या पायाभूत संरचना तयार करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरणास आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे)


●ध्येय 10: असमानता कमी करणे (देशांच्या आतमधील आणि देशांदरम्यान असलेली असमानता कमी करणे)


●ध्येय 11: शाश्वत शहरे आणि मानवी वस्ती


●ध्येय 12: शाश्वत उपभोग आणि उत्पादन


●ध्येय 13: हवामानविषयक कार्य (हवामानातील बदल आणि त्यांचे परिणाम टाळण्यासाठी त्वरित कारवाई करणे)


●ध्येय 14: जलजीवन (शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र आणि सागरी स्त्रोतांचे संवर्धन आणि सातत्यपूर्ण वापर)


●ध्येय 15: थल जीवन (जमिनीवर पर्यावरणविषयक व्यवस्थेच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन देणे आणि त्यांचे रक्षण आणि पुनर्संचयन करणे, वनांचे शाश्वत व्यवस्थापन करणे, वाळवंटीकरणाशी लढा देणे तसेच भूमी नापीक होण्यास थांबविणे आणि परिस्थितीला उलट करणे आणि जैवविविधतेची हानी थांबविणे.


●ध्येय 16: शांती, न्याय आणि बळकट संस्था (सर्वांसाठी न्यायपूर्ण व्यवस्था तयार करणे, शाश्वत विकासासाठी शांतीपूर्ण आणि सर्वसमावेशक मानवी समाजांना प्रोत्साहन देणे, सर्व सर्व स्तरांवर प्रभावी, जबाबदार आणि सर्वसमावेशक संस्था तयार करणे.


●ध्येय 17: ध्येयांसाठी भागीदारी (शाश्वत विकासासाठी वैश्विक भागीदारीची अंमलबजावणी आणि पुनरुत्थान करण्यास उद्देशांना भक्कम करणे.


🔷 UNESCAP बाबत 🔷


🅾️‘आशिया व प्रशांत क्षेत्रासाठीचा संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक व सामाजिक आयोग’ (UN Economic and Social Commission for Asia and the Pacific -UNESCAP) हे आशिया व प्रशांत क्षेत्राच्या विकासासाठी तयार करण्यात आलेली संयुक्त राष्ट्रसंघाची एक क्षेत्रीय शाखा आहे. त्याची स्थापना सन 1947 मध्ये केली गेली आणि त्याचे मुख्यालय बँकॉक (थायलँड) येथे आहे.

गिफेन वस्तू (Giffen Goods)




🔰 हलक्या, निकृष्ट आणि कनिष्ठ दर्जाच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू. गिफेन वस्तूंबाबतची संकल्पना ब्रिटिश संख्याशास्त्रज्ञ सर रॉबर्ट गिफेन यांनी प्रथम मांडली.

🔰 गिफेन वस्तू या संकल्पनेत एखाद्या वस्तूची किंमत घटल्यास उपभोक्ता त्या वस्तूच्या मागणीत वाढ करण्याऐवजी घट करतो; याउलट, त्या वस्तूची किंमत वाढल्यास मागणीत घट करण्याऐवजी वाढ करतो, यालाच गिफेनचा विरोधाभास असे म्हणतात.

🔰 उदा., केकच्या तुलनेत ब्रेड; गव्हाच्या तुलनेत ज्वारी व बाजरी; शुद्ध तुपाच्या तुलनेत वनस्पती तूप; नामांकित (Branded) कपड्यांच्या तुलनेत जाडेभरडे कपडे; नामांकित चप्पल, बूट यांच्या तुलनेत साध्या चप्पल, बूट; शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या तुलनेत बेन्टेक्सचे दागिने इत्यादी. गिफेन वस्तू ही संकल्पना वस्तूच्या भौतिक गुणवत्तेपेक्षा उत्पन्नाशी निगडीत आहे.

🔰 उदा., बाजारात पाव स्वस्त झाल्यावर गरीब लोक त्याची मागणी वाढवण्याऐवजी कमी करून वाचणारा पैसा दुसऱ्या पर्यायी वस्तूंवर (उदा., केक इत्यादी) खर्च करतात.

🔰 गिफेन वस्तू या संकल्पनेमुळे मागणीच्या सिद्धांताची बाजू भक्कम झाल्याचे दिसते. निकृष्ट दर्जाच्या वस्तू किंवा गुणवत्ताधारक वस्तू या बाबी उपभोक्ताच्या उत्पन्नानुसार ठरतात. या वस्तूंच्या किमतींचे त्यांच्या मागणीवर धनात्मक व ऋणात्मक हे दोन्ही परिणाम दिसून येतात.

🔰 गिफेन वस्तूंचा उपभोक्ता वर्ग त्या त्या देशातील दारिद्र्य, गरिबी यांची वास्तव स्थिती दर्शवितो. शासनाला विकसननीती तसेच कल्याणकारी नीती बनविताना अथवा राबविताना या संकल्पनेचा मार्गदर्शक म्हणून उपयोग होतो.

🔰 गिफेन वस्तूंच्या बाबतीत उपभोक्त्याच्या उत्पन्नाचा उपभोगावरील परिणाम आकृतीच्या साह्याने स्पष्ट करता येतो. यासाठी उपभोक्त्याची उत्पन्नरेषा अथवा अंदाजपत्रकीय रेषा, समवृत्ती-वक्र आणि उपभोक्त्याचा उपभोग-वक्र या सैद्धांतिक साधनांचा उपयोग करता येतो.

सहस्त्रक विकास लक्ष्य (millennium development goals)



(1) अति दारिद्र्य व भुकेची निर्मूलन करणे

Eradicate extreme poverty and hunger


(2) सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे

achieve universal primary education


(3) जेंडर संबंधित प्रोत्साहन देणे व महिलांचे सबलीकरण करणे

promote gender equality and empower women


(4) बाल मर्त्यातेचे प्रमाण कमी करणे

reduce child mortality


(5) माता आरोग्यात सुधारणा घडवून आणणे

improve maternal health


(6) एच आय व्ही/एड्स मलेरिया व इतर रोगांशी सामना करणे

combat HIV/AIDS malaria and other diseases


(7) पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे

ensure environmental sustainability


(8) विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण करणे

develop a global partnership for development,

रक्ताभिसरण संस्था

           
"हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोहोचवण्याच्या आणि तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस रक्ताभिसरण संस्था म्हणतात".

रक्ताभिसरण संस्था हृदय(Heart), रक्त(Blood), रक्तवाहिन्या(Blood Vessels) या पासून बनलेली आहे.

शोध : विल्यम हार्वे 1628  मध्ये
( फादर ऑफ अँजिओलॉजी, विल्यम हार्वे यांना सर्क्युलेटर असे म्हणतात)

शरीरातील महत्त्वाचा घटक हृदय.

       *प्रकार *
1)खुली रक्ताभिसरण संस्था .
2)बंद रक्ताभिसरण संस्था.
1) खुली रक्ताभिसरण संस्था:
रक्तवाहिन्या नसतात.
" मॉलुस्का" आणि "आर्थोपोडा" या गटातील सजीव  यात येतात. शुद्ध व अशुद्ध रक्त एकमेकात मिसळते .
अपवाद ऑक्टोपस ऑक्टोपस व स्क्विड  हे प्राणी बंद रक्ताभिसरण संस्था याच्यामध्ये येतो.
2)बंद रक्ताभिसरण संस्था:
यात रक्तवाहिन्या असतात .
शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकमेकात मिसळत नाही.
या संस्थेत उभयचर ,पृष्ठवंशीय ,सरपटणारे प्राणी येतात.

             *मानवी रक्त*
मानवी शरीरात रक्तवाहिन्या ची लांबी 97000 किलोमीटर आहे.
रक्तवाहिन्या(Blood Vessels): 3 प्रकार
1)धमनी(Arteries):
हृदयाकडून  शरीरांच्या सर्व भागांना ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा .
अपवाद- हृदयाकडून फुप्फुसाकडून  ऑक्सिजन विरहीत रक्त वाहून नेणारी एक अपवादात्मक धमणी असते जिला फुप्फुसभिगा /फुप्फुस धमणी (Pulmonary Arteryअसे म्हणतात
शरीराच्या खोलवर भागात असतात .
धमन्यांमध्ये झडपा नसतात .
धमन्या कमी लवचिक असतात.
  रक्तदाब जास्त असतो धमणी मध्ये सुमारे  सरासरी रक्तदाब 100mmHg असतो.

2)शिरा(Veins):
  शरीराच्या सर्व कविवा कडून ऑक्सिजन विरहीत रक्त हृदयाकडे पोचवतात.
अपवाद- फुप्फुसाभिगा शिरा(Pulmonary Vein) पुरुषाकडून हृदयाकडे ऑक्सिजनयुक्त  रक्त वहन करते.
शिरा जास्त लवचिक/ स्थितिस्थापक असतात.
शिरांमध्ये झडपा असतात.
शिरांमधील रक्तदाब दमण यांच्या मानाने खूप कमी म्हणजे 2mmHg असतो.

3) केशवाहिन्या(Capillaries)
केशवाहिन्या एकत्र येऊन शिरा तयार होतात केशवाहिन्या च्या धमनीका आणि शिरा यांना जोडतात.
केशवाहिन्याचा शरीरातील पेशी प्रत्यक्ष संबंध असतो म्हणजे केशवाहिन्या आणि पेशी यांच्या दरम्यान सतत ऑक्सिजन, कार्बनडाय-ऑक्साइड ,पोषकद्रव्ये ,हार्मोनस ,टाकाऊ पदार्थ यांची देवाण-घेवाण चालू असते.

       *रक्तदाबनुसार *
शिरांमधील रक्तदाब कमी असतो .
केशवाहिनी मधील रक्तदाब हा शिरा पेक्षा जास्त असतो व धमनी पेक्षा कमी असतो.
धमणी मध्ये सर्वाधिक रक्तदाब असतो.

        *जाडीनुसार*
केशवाहिन्या ह्या कमी जाडीच्या व आतून पोकळी जास्त असते . शीरा ह्या केशवाहिनी पेक्षा जाड असतात व धमणी पेक्षा कमी जाड असतात .
धमनी सर्वात जास्त जाड असते व आतून पोकळी कमी असते.

         *रक्त(Blood)*
खारट चव.
दोन घटकांनी बनलेले आहे

 
1】रक्तद्रव(Plasma):
  रंग-फिकट पिवळा रंग किंवा रंगहीन
सर्व रक्तापैकी 55% रक्तद्रव यापैकी 90%पाणी+7%प्रथिने+3% असेंद्रिय घटक
【7%प्रथिने
1-ग्लोब्ल्यूलिन: प्रतिद्रव्य (ऍन्टीबॉडी) तयार करते, प्रतिकार शक्ती नियंत्रित करते.
2-अलब्यूमिन: शरीरातील पाण्याचे नियंत्रण ठेवते.
3-प्रोथॉम्बिंन: रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत.
4-फायब्रीनोजन: रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत.】


2】रक्तपेशी(Corpuscle):
तीन प्रकार


1]RBC(Red Blood Cell)/लाल/तांबड्या/लोहित पेशी:
केंद्रकविरहित( अपवाद- उंट)
संख्या: A) पुरुष 52 लाख/mm^3 of Blood
          B) स्त्री 47 लाख/mm^3 of Blood
           RBC:WBC=  7:1 प्रमाण
आकार: गोल द्विअंतर्वक
निर्मिती: अस्थीमज्जा(Bone marrow)
आयुष्य: 125 -127 दिवस.
नाश: यकृतात (liver)
कार्य: RBCs मध्ये हिमोग्लोबिन असते.
हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन व कार्बन डायॉक्साईडचे अल्पप्रमाणात वहन करते.
हिमोग्लोबिन मुळे रक्ताला लाल रंग येतो.
त्वचेला deep cherry red रंग carboxy haemoglobin मुळे येतो.
संबंधित रोग: १) ॲनिमिया रोग हिमोग्लोबिन च्या कमतरतेमुळे.
                   २) थॅलॅसेमिया रोग.


2]WBC(White Blood Cell)/श्वेत/पांढऱ्या/सैनिकी पेशी:
केंद्रक असते.
संख्या: 9 ते 10 हजार/mm^3 of Blood
निर्मिती: अस्थीमज्जा(bone marrow)
आकार:आकारहीन /अमिबसदृश्य
आयुष्य: 15 दिवस.
नाश: यकृतामध्ये
कार्य: शरीराला रोगप्रतिकारशक्ती मिळवून देणे म्हणून त्यांना सैनिकी पेशी म्हणतात.
संसर्ग झाल्यावर यांची संख्या वाढते.
संबधित रोग: १)रक्ताचा कॅन्सर (Leucamia) WBC वाढल्यावर
                २)एड्स -HIV T4 Lymphocytes वर हल्ला करतो.


3) रक्तबिंबिका /रक्तपट्टीका (platelets):
द्विबहिर्वक्र आकार .
रंगहीन
या फक्त सस्तन प्राण्यांमध्ये आढळतात.
केंद्र नसते .
अतिशय लहान असतात.
संख्या:2.5 ते 4 लाख/mm^3 of Blood
निर्मिती:अस्थीमज्जा(bone marrow)
कार्य: रक्त गोठण्याची क्रिया सुरू होण्यासाठी.
(डेंगू मलेरिया टाइफाइड इत्यादी रोगांमध्ये रक्तपट्टीकांचे प्रमाण कमी होते.)

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...