११ एप्रिल २०२४

मध्ययुगीन भारताचा इतिहास


✺ गुलाम वंशाची स्थापना कोणी केली?
► कुतुबुद्दीन ऐबक

✺ कुतुबमिनारचा पाया कोणी घातला?
► कुतुबुद्दीन ऐबक

✺ अडीच दिवस लागलेली झोपडी कोणी बांधली?
► कुतुबुद्दीन ऐबक

✺ नालंदा विद्यापीठ कोणी नष्ट केले?
► बख्तियार खिलजी

✺ दिल्ली सल्तनतचा खरा संस्थापक कोण मानला जातो?
► इल्तुतमिश

✺ मोर सिंहासन कोणी बांधले?
► शहाजहान

✺ मयूर सिंहासन तयार करणाऱ्या कलाकाराचे नाव काय होते?
► बादलखान

✺ शाहजहानचे बालपणीचे नाव काय होते?
► खुर्रम

✺ शाहजहानच्या बेगमचे नाव काय होते?► मुमताज

✺ शाहजहानच्या आईचे नाव काय होते?
► ताज बीबी बिल्कीस माकानी

✺ मुमताज महल या नावाने प्रसिद्ध होण्यापूर्वी शाहजहानच्या बेगमला कोणत्या नावाने संबोधले जात होते?
► अर्जुमंदबानो

✺ जहांगीरचा धाकटा मुलगा शहरयार याचे लग्न कोणासोबत झाले होते?
► तिच्या पहिल्या पतीपासून नूरजहानला जन्मलेल्या मुलीपासून.

✺ शहाजहानने कोणाच्या मदतीने गादी मिळवली?
► असफ खान

✺ शहाजहानच्या काळात कोणते ठिकाण मुघलांच्या हातातून गेले?
► कंदहार

✺ शाहजहानने आग्रा येथून राजधानी कोठे हलवली?
► शाहजहानाबाद (जुनी दिल्ली)

✺ लाल किल्ला आणि किला-ए-मुबारक कोणी बांधले?
► शहाजहान

✺ शाहजहानने पत्नी मुमताज महलची कबर कुठे बांधली?
► आग्रा

✺ मुमताज महलची कबर कोणत्या नावाने ओळखली जाते?
► ताजमहाल

✺ ताजमहाल बांधण्यासाठी किती वेळ लागला?► 20 वर्षे

✺ ताजमहालचे बांधकाम कधी सुरू झाले?
► १६३२ मध्ये

✺ ताजमहालचे शिल्पकार कोण होते?
► उस्ताद ईशा खान आणि उस्ताद अहमद लाहौरी.

✺ ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवरी कोठून आणले होते?
► मकराना (राजस्थान)

✺ आग्राची मोती मशीद कोणी बांधली?
► शहाजहान

✺ शहाजहानच्या काळात आलेल्या फ्रेंच माणसाचे नाव काय होते?
► फ्रान्सिस बर्नियर आणि टॅव्हर्नियर

✺ शहाजहानच्या दरबारात कोणते संस्कृत विद्वान उपस्थित होते?
► कबींद्र आचार्य सरस्वती आणि जगन्नाथ पंडित

✺ कवी जगन्नाथ पंडित यांनी कशाची रचना केली?
► रसगंगाधर आणि गंगालहरी

✺ उपनिषदांचे फारसीमध्ये भाषांतर कोणी केले?
► दारा शिकोह

✺ उपनिषदांचे पर्शियन भाषांतर कोणत्या नावाने केले गेले?
► सर-ए-अकबर!

✺ लोह आणि रक्ताचे धोरण कोणी पाळले?
► बलबन

✺ तुघलक वंशाचा संस्थापक कोण होता?
► घियासुद्दीन तुघलक

शेकडेवारी

1) "कोणत्याही संख्येचे दिलेले टक्के काढताना प्रथम 1% (टक्का) अथवा 10% काढा. त्यानंतर पट पद्धतीने दिलेले टक्के तोंडी काढता येतात.

उदा. 500 चे 10% = 50 (10 टक्के काढताना एक शून्य कमी करा.)
125 चे 10% = 12.5 अथवा एकक स्थानी शून्य नसल्यास एका स्थळानंतर डावीकडे दशांश चिन्ह द्या.

500 चे 30% = 150     
500 चे 10% = 50   
30% = 10%×3
= 50×3 = 150
500 चे 8% = 40 (संख्येच्या 1%काढताना शेवटचे दोन शून्य कमी करा अथवा शून्य नसल्यास डावीकडे दोन दशांश स्थळांवर दशांश चिन्ह धा.)
500 ची 1% = 5
:: 500 चे 8% = 40

2) दिलेल्या संख्येचे 12.5% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/8 ने गुणा.

उदा. 368 चे 12.5% = ?
368×12.5/100
= 368×1/8= 46

3) दिलेल्या संख्येचे 20% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 1/5 (0.2) ने गुणा.

उदा. 465 चे 20% = 93   
 
465×20/100
= 465×1/5 ने गुणा = 93

4) दिलेल्या संख्येचे 25% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¼ (0.25) ने गुणा.

उदा. 232 चे 25% = 58
232×25/100
= 232×1/4= 58

5) दिलेल्या संख्येचे 37 1/2% (37.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 3/8 ने गुणा.

उदा. 672 चे 37.5% = 252   
 
672×37.5/100
= 672×3/8
= 252

6) दिलेल्या संख्येचे 50% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ½ (0.5) ने गुणा.

उदा. 70 चे 50% = 35   
 
70×50/100
= 70×1/2
= 35

7) दिलेल्या संख्येचे 62 ½% (62.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 5/8 ने गुणा.

उदा. 400 चे 62.5% = 250  
   
400×62.5/100
= 400×5/8
= 250

8) दिलेल्या संख्येचे 75% काढावयाचे असल्यास, त्या संख्येला ¾ ने गुणा.

उदा. 188 चे 75% = 141  
   
188×3/4
= 141

9) दिलेल्या संख्येचे 87 ½% (87.5) काढावयाचे असल्यास, त्या संख्येला 7/8 ने गुणा.

उदा. 888 चे 87.5% = 777  
   
888 × 87.5/100
= 888×7/8
= 777

10) दिलेल्या संख्येचे त्या संख्येएवढेच टक्के काढावयाचे असल्यास, त्या संख्येचा वर्ग काढून डावीकडे दोन दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह द्या.

उदा. 25 चे 25% = 6.25
25 × 25/100
= 625/100
= 6.25"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रश्नसंच

🟣1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश

🟣2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम)

🟣3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश

🟣4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ

🟣5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई'

🟣6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)'

🟣7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ

🟣8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक)

🟣9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ

🟣10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ)

🟣11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात)

🟣12. ♿ दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र

🟣13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी)

🟣14.⚡ 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ

🟣15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू

🟣16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता

🟣17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड)

🟣18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान

🟣19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू)

🟣20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र)

🟣21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर'  - सांची (मध्य प्रदेश)

चालू घडामोडी :- 10 एप्रिल 2024

◆ महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील 'मिरज' या शहरात बनवलेल्या सतार आणि तानपुरा यांना भौगोलिक संकेत (GI) टॅग देण्यात आला आहे.

◆ एअर इंडियाच्या वैश्विक विमानतळ परिचालन प्रमुखपदी जयराज षण्मुगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ अमेरिकन सोसायटी फॉर कॅटरॅक्ट आणि रिक्रॅक्टिव्ह सर्जरीच्या (ASCRS) वार्षिक सभेत डॉ. अग्रवाल आय हॉस्पिटलच्या रिसर्च टीमला बेस्ट सायंटिफिक पोस्टर अवॉर्ड 2024' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

◆ सुमित नागल, मास्टर्स 1000 सामना जिंकणारा पहिला पुरुष भारतीय एकेरी खेळाडू ठरला आहे.

◆ कॅनडातील टोरंटो येथे सुरू असलेल्या 2024 च्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत विदित गुजराथीने जागतिक क्रमवारीत तिसन्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या हिकारू नाकामुराचा पराभव केला.

◆ सॅम पित्रोदा यांच्या 'द आयडिया ऑफ डेमोक्रसी' या नव्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.

◆ नवी दिल्ली येथे 'परिवर्तन चिंतन' त्रिसेवा परिषद होणार आहे.

◆ धरमशाला येथे पार पडलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या सौम्या स्वामिनाथन आणि तेजस्विनी सागर यांनी सुवर्ण पदक जिंकले आहे.

◆ मनोज पांडा यांची 16 व्या वित्त आयोगाच्या सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांनी "निरंजन राजाध्यक्ष" यांची जागा घेतली आहे.

◆ टेनिस एकेरी स्पर्धेच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला नोव्हाक जोकोविच हा खेळाडू सर्वात वयस्कर पुरूष टेनिसपटू ठरला आहे.

◆ टेनिस पटू नोव्हाक जोकोविच यांच्या नावावर सध्या 24 ग्रँडस्लॅम जेतेपद आहेत.

◆ 10 एप्रिल हा दिवस "सॅम्युअल हॅनेमल" यांच्या सन्मानार्थ जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

◆ होमिओपॅथीचे संस्थापक सॅम्युअल हॅनेमल  यांच्या सन्मानार्थ 10 एप्रिल जागतिक होमिओपॅथिक दिवस साजरा करण्यात येतो. ते "फाल्कन" या देशाचे रहिवाशी होते.

◆ माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धा "फ्रान्स" या देशात आयोजित केली जाते.

◆ इग्ला-एस हवाई संरक्षण प्रणाली भारताने रशिया या देशाकडून खरेदी केली आहे.

◆ ZIG नावाचे नवीन चलन "झिबॉम्बे" या देशाने लाँच केले आहे.

◆ भारताच्या वरीष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी "हरेंद्र सिंग" यांची निवड करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

काही वैशिष्ट्ये असलेल्या जिल्ह्यांची नावे


◆ आदिवासींचा जिल्हा -- नंदूरबार✅


◆ महाराष्ट्रातील कापसाचे शेत -- जळगाव✅


◆ महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा-- यवतमाळ✅


◆ संत्र्याचा जिल्हा -- नागपूर✅


◆ महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ -- अमरावती✅


◆ जंगलांचा जिल्हा -- गडचिरोली✅


◆ महाराष्ट्रातील केळीच्या बागा -- जळगाव✅


◆ साखर कारखान्यांचा जिल्हा -- अहमदनगर✅


◆ महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार --  सोलापूर✅


◆ भारताचे प्रवेशद्वार -- मुंबई✅


◆ भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई✅


◆ महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा       --  मुंबई शहर✅


◆ महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार -- रायगड✅


◆ महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा -- रायगड✅


◆ मुंबईची परसबाग -- नाशिक✅


◆ महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा -- रत्नागिरी✅


◆ मुंबईचा गवळीवाडा -- नाशिक✅


◆ द्राक्षांचा जिल्हा --  नाशिक✅

पश्चिमी वारे (Westerlies) (ग्रहीय वारे)




◼️ दोन्ही गोलार्धात मध्य अक्षांशीय जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून (25° ते 35° उ. व द.) दोन्ही गोलार्धात 60° अक्षवृत्ताजवळील कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात.


◻️वैशिष्ट्ये : पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असल्याने या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात.


◼️पृथ्वीच्या परिवलनामुळे पश्चिमी वारे दक्षिण गोलार्धात वायव्येकडून आग्नेयेकडे, तर उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात.


◻️म्हणजेच पूर्वीय वाऱ्यांच्या विरुद्ध दिशेत पश्चिमी वारे वाहतात.


◼️अश्व अक्षांश (Horse Latitude) : दोन्ही गोलार्धात 25° ते 35° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यानचा जास्त दाबाचा पट्टा शांत असतो, त्यास अश्व अक्षांश म्हणतात.


◻️गर्जणारे चाळीस (Roaring Forties) : वायव्य प्रतिव्यापारी वारे. दक्षिण गोलार्धात जलभाग (पाणी) सर्वाधिक तर भूभाग सर्वांत कमी आढळतो. कमी भूभागामुळे पश्चिमी वाऱ्यांना वाहताना कमी अडथळा उत्पन्न होतो, म्हणून 40° दक्षिण अक्षवृनापलीकडे पश्चिमी वारे घोंगावत-रोरावत व वेगाने वाहतात, म्हणून त्यांना 'गर्जणारे चाळीस' असे म्हणतात.

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

◾️भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीने सलग सातव्यांदा Repo Rate 6.5% कायम ठेवला


◾️भारत हा जगातील सर्वात मोठा रेमिटन्स प्राप्त करणारा देश बनला आहे 

⭐️रेमिटन्स म्हणजे परदेशातून पाठवलेले पैसे

⭐️2023 मध्ये

🔥भारत ($125 अब्ज)

🔥मेक्सिको ($67 अब्ज)

🔥चीन ($50 अब्ज)

🔥फिलिपिन्स ($40 अब्ज)


◾️ ग्रीन जीडीपी सध्या चर्चेतील विषय आहे

⭐️ आपल्या जीडीपी मधून पर्यावरणाचे हानी वजा केल्यानंतर येणारा आकडा म्हणजे ग्रीन GDP

⭐️चीनने 2006 मध्ये ग्रीन जीडीपीच्या आकडेवारी जाहीर केली होती त्याच्यानंतर पुन्हा जाहीर केले नाही

⭐️भारताने ग्रीन जीडीपी मोजण्यासाठी 2013 मध्ये पार्थ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली होती

⭐️ग्रीन जीडीपीला विरोध होतो कारण विकसनशील देशांना अडथळा देण्यासाठी विकसित देश Green GDP काढयला सांगतात हे एक कारण आहे


◾️लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानासाठी शाईचा महापुरवठा करण्यासाठी कर्नाटकच्या बंगलोर मधील "मैसूर पेटंट्स व व्हार्निश" कंपनीला काम देण्यात आलेले आहेत

⭐️हीच कंपनी जगभरातील 25 देशांना मतदानासाठी शाईचा पुरवठा करतो

⭐️कर्नाटक सरकार ही काम 1962 सालापासून करत आहे


◾️एअर क्वालिटी इंडेक्स रिपोर्ट फिनोलॉजी नुसार हवेच्या प्रदूषणात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो


⭐️पहिला : बांगलादेश 

⭐️दुसरा : पाकिस्तान 

⭐️तिसरा : भारत 

⭐️चौथा : तजाकिस्तान 

⭐️भारताच्या हवेची सरासरी गुणवत्ता 147 इतकी आहे


◾️भाग्यश्री फंड डबल महाराष्ट्र केसरी

⭐️वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद महिला कुस्ती स्पर्धेत अहमदनगरची भाग्यश्री फंड ही विजेती ठरली

⭐️भाग्यश्री फंड हिने दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी बहुमान पटकाविला 

⭐️भाग्यश्री ही अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी आहे


◾️पंतप्रधान सूर्यघर योजना

⭐️सुरुवात 13 फेब्रुवारी 2024 रोजी

⭐️या योजनेतून देशातील एक कोटी कुटुंबांना महिन्याला 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवण्याचा सरकारचा उद्देश आहे

⭐️केंद्र सरकारकडून 78 हजार रुपये अनुदान मिळणार आहे

⭐️योजनेला राज्य सर्वाधिक प्रतिसाद नागपूर जिल्ह्यात मिळाला


◾️आतापर्यंत च्या लोकसभा निवडणुकीत 1984 काँग्रेसच्या 404 जागा निवडणूक आल्या होत्या

⭐️राजीव गांधी देशाचे पंतप्रधान बनले

⭐️इंदिरा गांधी हत्येच्या नंतर

⭐️याच निवडणुकीत भाजपा ला 2 जागा भेटल्या होत्या


◾️झारखंड मधील नक्षलग्रस्त जिल्हा सिंह भूम मध्ये पहिल्यांदाच म्हणजे दशकांच्या नंतर मतदान होणार आहे

मतदान साहित्य हेलिकॉप्टरमधून आणले जाणार आहे

⭐️ मतदानासाठी एकूण 118 मतदान केंद्रांची उभारणी केली आहे


◾️ऑपरेशन ॲनाकोंडा हे झारखंड मधील नक्षलवाद कमी करण्याचे संबंधित आहे


◾️इक्वेडोरच्या पर्यावरणवादी मूळनिवासी नेमोन्ते नेन्किमो यांना 'टाइम अर्थ' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

⭐️2020 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण अभियानात प्रेरणादायी कार्याबद्दल 'चौम्पयन्स आफ द अर्थ' या सन्मानाने गौरविण्यात आले.

त्या स्वयंसेवी संस्था 'सेईबो अलायन्स' आणि 'अॅमेझॉन फ्रंटलाइन्स'च्या संस्थापक आहेत


◾️जागतिक बँक समूहाने भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन यांची आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

⭐️जागतिक बँकेचे मुख्यालय: वॉशिंग्टन, डीसी, युनायटेड स्टेट्स

⭐️जागतिक बँकेची स्थापना: जुलै 1944, ब्रेटन वुड्स, न्यू हॅम्पशायर, युनायटेड स्टेट्स

⭐️जागतिक बँकेचे अध्यक्ष : अजय बंगा


◾️प्रधानमंत्री मुद्रा योजनेला 9 वर्षे पूर्ण 

⭐️8 एप्रिल 2015 ला योजनेची सुरवात ( नवी दिल्ली)

⭐️या योजनेंतर्गत बिगर-कॉर्पोरेट आणि बिगर कृषी, लघु/सूक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा दिली जाते.


◾️8 एप्रिल 2024 रोजी नवी दिल्ली येथे 'परिवर्तन चिंतन ' नावाची पहिली त्रि-सेवा सशस्त्र दल नियोजन परिषद आयोजित करण्यात आली होती.

⭐️लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रमुखांची बैठक

⭐️या बैठकीला 

◾️भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज पांडे

◾️ भारतीय वायुसेनेचे एअर मार्शल विवेक राम चौधरी आणि 

◾️भारतीय नौदलाचे ॲडमिरल आर. हरी कुमार

हे उपस्थित होते





१० एप्रिल २०२४

आधी सुरू केलेल्या महत्त्वाच्या योजना


✔️स्टार्स योजना  - 28 फेब्रुवारी 2019

✔️अटल आहार योजना -  7 मार्च 2019

✔️प्रधानमंत्री जन आरोग्य योजना - 23 सप्टेंबर 2018

✔️अमृत योजना  - 2015

✔️प्रधानमंत्री उज्वला योजना -  1 मे 2016

✔️सौभाग्य योजना -  25 सप्टेंबर 2017

✔️प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना - 15 फेब्रुवारी 2019

✔️राष्ट्रीय पोषण अभियान -  8 मार्च 2019

✔️वन धन योजना - 14 एप्रिल 2018

✔️उजाला योजना -  जानेवारी 2015

✔️प्रधानमंत्री जनधन योजना -  28 ऑगस्ट 2014

✔️राष्ट्रीय वयोश्री योजना - 1 एप्रिल 2017

✔️संपदा योजना - 26 एप्रिल 2017

✔️प्रधानमंत्री वय वंदना योजना - 21 जुलै 2017

✔️संकल्प योजना -  2017

✔️स्पार्क योजना - 25 सप्टेंबर 2018

✔️मानधन योजना -  12 सप्टेंबर 2019

✔️सुमन सुरक्षित मातृत्व योजना - 10 ऑक्टोंबर 2019

✔️पी एम किसान सन्माननिधी -  24 फेब्रुवारी 2019

✔️अटल आहार योजना - 28 फेब्रुवारी 2019


🔸अल्पसंख्याकांसाठी योजना - 

✔️शादी शगुन पोर्टल

✔️नई रोशनी योजना

✔️उस्ताद योजना


अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान


सुरुवात :-

राज्यात अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियानाची (अमृत) अंमलबजावणी सन 2015-16 पासून करण्यात आहे.



उद्देश :-


शहरांतील पाणी पुरवठा व मलनिःसारणाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे.


प्रत्येक कुटुंबास खात्रीशीर पाणीपुरवठयासाठी नळ जोडणी आणि सांडपाणी व्यवस्था यांचो सुनिश्चिती करणे हे अभियानाचे एक उद्दिष्ट आहे.


या अभियाना अंतर्गत राज्यातील 44 शहरे समाविष्ट असून त्यात नागरी भागातील 76 टक्के जनतेचा समावेश आहे.


अमृत 2.0 अभियान 2021-22 ते 2025 - 26 या कालावधीमध्ये राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबविण्यात येणार आहे.


अमृत 2.0 अभियानाची प्रमुख उद्दिष्टे :-


सर्व शहरातील घरांना नळजोडणी देऊन पाणी पुरवठ्याच्या बाबतीत 100 टक्के स्वयंपूर्ण करणे, जलस्रोत: पुनरुज्जीवन व शहरातील मोकळ्या जागेमध्ये उद्याने व हरितक्षेत्र विकसित करणे

44 अमृत शहरांमध्ये 100 टक्के मल प्रक्रिया व मलनि:स्सारण जोडणी देणे.

देश पिवळ्या क्रांतीच्या दिशेने

🇮🇳 भारतात पिवळ्या क्रांतीची पायाभरणी 1986 मध्ये झाली होती. 

👤 सॅम पित्रोदा पिवळ्या क्रांतीचे प्रणेते होते. 

🌼 तेलबियांची फुले प्रामुख्याने पिवळी असल्यामुळे याला पिवळी क्रांती म्हटले गेले.


🌏🌾 कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती 👇

◾️हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

◾️धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

◾️श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

◾️नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

◾️पिवळी क्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

◾️लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

◾️तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

◾️गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

◾️सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

◾️रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

◾️गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

पोलीस भरती टेस्ट सिरीज

1] शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?
1) 369
2) 547
3) 639 ✅
4) 912

2] धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?
1) सोडियम क्लोरेट ✅
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन

3] जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर
1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅

4] रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?
1) तीन ✅
2) दोन
3) चार
4) सहा

5] मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?
1)  अ 
2) ब ✅
3) ड
4) ई

6] खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?
1)  सायकल 
2) रेल्वे
3) जहाज
4) वरिल सर्व ✅

7] 2352 डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?
1)  23.52                                       
2) 235.2
3) 230.52
4) 2.352 ✅

8] त्वरण म्हणजे ---------------- मधील बदलाचा दर होय .
1) वेग ✅
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन 

9] होकायंत्रात -------------चुंबक वापरतात.
1)  निकेल 
2) रबर
3) रबर
4) सूची✅

10] हॅड्रोजन आणि ----------- या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?
1)  ऑक्सीजन ✅
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम

पंचायत राज ग्रामप्रशासन


निवडणूक खर्च मर्यादा 


पंचायत समिती सदस्य 

जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्या 


💬 71 ते 75 निवडणूक विभाग 

     असलेला जिल्हा 

➖ खर्च मर्यादा - 4,00,000


💬 61 ते 70 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,50,000


💬 50 ते 60 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,00,000


जिल्हा परिषद सदस्य


💬 71 ते 75 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 4,00,000


💬 61 ते 70 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,50,000


💬 50 ते 60 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,00,000


▪️गावात दिवाबत्तीची सोय करणे ही जबाबदारी ग्रामपंचायतची असते 


▪️अशोक मेहता समितीने पंचायत समिती या घटकास गौण स्थान दिले आहे. 


▪️महाराष्ट्रात संत गाडगेबाबा ग्राम पुरस्कार अभियान 2000 मध्ये सुरू झाली. 


▪️निर्मल ग्राम पुरस्कार केंद्र शासनाकडून दिला जातो. 


▪️110 वी घटनादुरुस्ती विधेयक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आहे.


▪️भारतात सर्वाधिक कटक मंडळे मध्यप्रदेश राज्यात आहेत. 

16 वा केंद्रीय वित्त आयोग


🕒कालावधी - 2026 ते 2031


✅अध्यक्ष :-  श्री. अरविंद पनगारिया  

✅सचिव :- रित्विक रंजन पांडेय 


💌4 सदस्य 


✅1. (निरंजन राजाध्यक्ष )  मनोज पांडा

✅2. अजय नारायण झा

✅3. एनी जॉर्ज

✅4. सौम्य क्रांती घोष



केंद्राने 16 व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून मनोज पांडा यांची नियुक्ती केली


🔸मनोज पांडा, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथचे माजी संचालक, 16 व्या वित्त आयोगावर नियुक्त.


🔹पांडा यांनी निरंजन राजाध्यक्ष यांची जागा घेतली, ज्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि धोरण विश्लेषणात कौशल्य आणले.


🔸CESS हैदराबाद आणि IGIDR मुंबई येथील पार्श्वभूमीसह, पांडाच्या समावेशाचा उद्देश आयोगाच्या आर्थिक मूल्यमापनांना समृद्ध करणे आहे.


🔹16 व्या एफसीचे अध्यक्ष: डॉ. अरविंद पनागरिया


आजच्या दिवशी पोस्ट थोडी बरी नाही ठरणार पण तरीही लिहीत आहे...

MPSC vs विद्यार्थी




मागच्या वर्षी जानेवारी (२०२३) मध्ये फॉर्म्स भरून झाले,

३० एप्रिल २०२३ ला पूर्व परीक्षा पार पडली...




ऑक्टोबर २०२३ च्या जवळपास पूर्व चा निकाल लागला,

१७ डिसेंबर २०२३ ला मुख्य परीक्षा पार पडली,

मार्च २०२४मध्ये अंतिम उत्तर पत्रिका आली,




आता २०२४ चा एप्रिल आला , काही दिवसात ३० एप्रिल २०२४ उजाडेल म्हणजे पूर्व परीक्षा देऊनच १ वर्ष पूर्ण होणार,




मग पुन्हा टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क साठी स्कील टेस्ट बाकी आहेत,

४-५ महिने किमान त्याच्यात जातीलच,

तिथून पुढे कधी नियुक्त्या कधी निकाल अन कधी काय....




काही सुधारणा व्हाव्यात असं कोणालाच वाटत नाही का ??




२ वर्ष जर एक परीक्षेत जात आहे ,

तर मग आयुष्याचा किती भाग एकूण परीक्षांमध्ये जात असेल ??? (जर आयुष्य ६० वर्ष पकडल तरी आयुष्याचा किमान १०% भाग तयारी मध्ये जात आहे पदवी घेतल्या नंतर, २२-२३ वर्ष आधीच गेले आहेत मग आपला एकूण ३५-४०% भाग वाया जात नाहीये का ?)




माननीय आयोगाने थोडी गती वाढवावी असं त्यांनाही वाटल पाहिजे...

कारण या काळात आर्थिक , मानसिक , शारीरिक सर्वच नुकसान विद्यार्थ्यांचं होत राहतं,

मग कितीक जण तर परीक्षांचा निकाल पाहायला पण जशे फॉर्म भरताना होते तसे राहत नाहीत...




तसाही आपल्या देशात सामान्यांचा विचार करणारे आता जन्माला येत नाहीयेत,

पण एक विचार काहीही बदल घडवू शकतो...




एका परीक्षेला १ वर्षाच्या आत मार्गी लावलेलं खूप बरं राहील...(हे पण कमी नाहीये)




बँकिंग च्या परीक्षांचे निकाल ३ महिन्यात जिकडे तिकडे होतात,




आता २१००० पोरं निकालाच्या प्रतिक्षेत आहे (क्लर्क),

७००० जण क्लर्क होतील,

बाकीचे १४००० जण पुन्हा पुढच्या २ वर्ष बरबादी कडे वाटचाल करतील...




मग याच्यात त्या भोळ्या विद्यार्थ्यांचा दोष आहे की दुसऱ्या कोणाचा ???







१४० कोटी जनता आहे त्यात जर ८३% तरुण जनता बेरोजगार असेल,

तर भारत चीन ला कधीही मागे टाकू शकत नाही ( स्वप्नात पण नाही),

सर्व दोष जनतेचा नसतो , काही दोष सिस्टीम मध्ये असतो... आणि तो बऱ्याच काळानंतर कळतो,




तरुण पिढ्या आयुष्याचा मौल्यवान काळ वाया घालवत आहे, कारण नोकऱ्याच नाही,




आमच्याकडे डॉक्टर , इंजिनियर पासून पी एच डी पर्यंत सध्या सगळेच बेरोजगार आहेत...

यामध्ये दोष त्या सर्व जनतेचा आहे का ?

चालू घडामोडी :- 09 एप्रिल 2024

◆ इंटिग्रेटेड मॅट्रेस उत्पादक स्लीपफ्रेश मॅट्रेसने बॉलीवूड सुपरस्टार विद्या बालनची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ मुंबई इंडियन्स T20 मध्ये सर्वाधिक विजय मिळविणारा पहिला संघ ठरला.

◆ अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशन आणि यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी यांच्या मदतीने जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार करण्यात आला आहे.

◆ ATP मास्टर्स स्पर्धेच्या मुख्यमधील पहिल्या फेरीत विजय मिळवणारा "सुमित नागल" हा भारताचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.

◆ मार्च महिन्याचा ICC player of month Female Award इंग्लंडची फलंदाज "माइया बौचियर" यांना मिळाला आहे.

◆ मार्च महिन्याचा ICC player of month Male Award श्रीलंकेच्या "कामिंदू मेंडिसने" यांना मिळाला आहे.

◆ The idea of democracy हे पुस्तक "सॅम पित्रोदा" यांनी लिहिले आहे.

◆ कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेत महिला गटात विजेतेपद मिळवणारी अनुपमा उपाध्यय भारत या देशाची खेळाडू आहे.

◆ श्रीनिवास पालिया यांची "विप्रो" उद्योग समूहाच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ पीटर पेलेग्रिनी यांची "स्लोवाकिया" या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे.

◆ भारतीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक होण्यासाठी "सुविधा" पोर्टल सूरू केले आहे.

◆ इकॉनोमिक इंटेलिजेंस युनिट ने प्रसिद्ध केलेल्या 2024 साठी व्यवसाय पर्यावरण क्रमवारी मध्ये भारत 51व्या क्रमांकावर आहे.

◆ इकॉनोमिक इंटेलिजेंस युनिट ने प्रसिद्ध केलेल्या 2024 साठी व्यवसाय पर्यावरण क्रमवारी मध्ये सिंगापूर हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

◆ Economic business ranking 2024 "Economics inteligens unit" कडून प्रसिध्द करण्यात आली आहे.

◆ UNO द्वारे जैव विविधता संमेलनाच्या सचिवालयाच्या कार्यकारी सचिवपदी एस्ट्रीड शोमेकर यांची निवड करण्यात आली आहे.

ऑपरेशन 'नन्हे फरिश्ते' अंतर्गत 1064 जणांची सुटका.

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयातून 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्‍थानके, फलाटावरील 1064 मुलांची सुटका करण्‍यात आली आहे.

RPF च्या इतर उल्लेखनीय ऑपरेशन्स👇👇
1] मेरी सहेली पथके :- रेल्वेतील महिला प्रवाशांना, विशेषतः एकट्या प्रवास करणाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने मेरी सहेली पथके तैनात करण्यात आली आहेत.

2] ऑपरेशन मातृशक्ती :- ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत, महिला आरपीएफ जवानांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रसूती झालेल्या गर्भवती महिलांना मदत केली.

3] मिशन जीवन रक्षा :- मिशन जीवन रक्षा अंतर्गत, आरपीएफ जवानांनी रेल्वेचा अपघात किंवा रेल्वे-खाली आत्महत्त्या करण्यापासून अनेक जणांचे प्राण वाचवले.

4] ऑपरेशन महिला सुरक्षा :- महिला आणि मुलींना मानवी तस्करी करणाऱ्या सिंडिकेटच्या जाळ्यात अडकण्यापासून 150 जणांना रेल्वे संरक्षण दलाने (RPF) ऑपरेशन महिला सुरक्षा अंतर्गत वाचवले होते.

5] ‘मेरी सहेली' नावाचा कार्यक्रमही रेल्वेकडून राबविण्यात येत आहे.

०९ एप्रिल २०२४

चालू घडामोडी :- 08 एप्रिल 2024

◆ वेदांताची BALCO ही ASI कामगिरी मानक V3 प्रमाणपत्र प्राप्त करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.

◆ कुवेतने आपली पहिली निवडणूक अमीर शेख मेशाल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली आहे.

◆ अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याची भाग्यश्री फंड हिने दुसऱ्यांदा वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद महिला महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत 'महाराष्ट्र केसरी 2023-24' चा बहुमान पटकविला.

◆ उपमहाराष्ट्र केसरी 2023-24 पिंपरी चिंचवडची प्रगती गायकवाड ठरली आहे.

◆ संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार 2050 पर्यंत आशियाई देशांतील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 948 दशलक्ष वर पोहचणार आहे.

◆ भारताच्या 140 कोटी लोकसंख्या पैकी 69.2% लोकसंख्येची मतदार म्हणून नोंदणी आहे.

◆ देशात मतदार नोंदणीचे सर्वाधिक प्रमाण तेलंगणा(86.6%) राज्यात आहे.

◆ भारतात मतदार नोंदणी मध्ये महाराष्ट्र राज्य 8व्या क्रमांकावर आहे.

◆ देशात सर्वात कमी मतदार नोंदणीचे प्रमाण बिहार राज्यात(59.6%) आहे.

◆ आयपीएल मध्ये 100 झेल घेणारा रोहित शर्मा हा तिसरा क्षेत्ररक्षक खेळाडू ठरला आहे.

◆ वरिष्ठ महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा "छत्रपती संभाजीनगर" येथे आयोजित करण्यात आली होती.

◆ महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील "मिरज" शहरात बनवलेल्या सतार आणि तानपुरा वाद्यांना GI टॅग प्राप्त झाला आहे.

◆ सागरी क्षेत्रांतील योगदानाबद्दल दिला जाणारा सागर सन्मान वरुन पुरस्कार "धिरेंद्रकुमार संन्याल" यांना प्रदान करण्यात आला आहे.

◆ जागतिक आरोग्य दिवस 7 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.

◆ जागतिक आरोग्य दिवस 2024 ची थीम "My health, My right" ही आहे.

◆ नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया च्या चेअरमन पदी "मीनेश शहा" यांची निवड झाली आहे.

◆ पॅरिस ऑलिंपिक ज्युरी मध्ये समावेश होणारी पहिली भारतीय महिला 'बिल्कीस मीर" ठरली आहे.

◆ भारतीय तटरक्षक दलाने तामिळनाडू राज्यात तटरक्षक दलाच्या जलीय केंद्राचे उद्घाटन केले आहे.

◆ अमेरिकेनं सर्जन असोसिएशन ने मानद फेलोशिपने डॉ. रघुराम पिल्लरी सेट्टी यांना सन्मानित करण्यात आले आहे.

◆ डॉ. रघुराम पिल्लरी सेट्टी हे अमेरिकन सर्जन असोसिएशन ची मानद फेलोशिप मिळणारे दक्षिण आशियातील तिसरे सर्जन ठरले आहेत.

◆ प्रधानमंत्री मुद्रा योजनेला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत.

◆ भारत सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना 8 एप्रिल 2015 रोजी सुरु केली होती.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

पोलीस भरतीचा फॉर्म भरणे अगोदर कोणत्या जिल्ह्याला किती फॉर्म आलेत हे नक्की पाहून घ्या.


08 एप्रिल दुपारी 3 पर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेत ही माहिती टाकली आहे सर्वांनी ही माहिती पाहून फॉर्म भरावा.

👇👇👇👇👇👇👇👇👇

C.P मुंबई - 1,80,000

नवी मुंबई- 9041

ठाणे शहर पोलीस- 20,987

C.P मीरा-भाईंदर वसई विरार- 7987

S.P ठाणे ग्रामीण- 7097

S.P सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस-5950

S.P रत्नागिरी पोलीस-7547

एस पी रायगड जिल्हा पोलीस- 9970


C.P पिंपरी चिंचवड -9680

पुणे ग्रामीण -19,741

सातारा जिल्हा पोलीस-8841

सांगली जिल्हा पोलीस-4417

सोलापूर ग्रामीण पोलीस-4012

सोलापूर शहर 4154


एस पी बुलढाणा जिल्हा पोलीस- 6012

एस पी अकोला जिल्हा पोलीस-9012

अमरावती ग्रामीण पोलीस-7123

एस पी यवतमाळ जिल्हा पोलीस-4979

S.P वाशिम जिल्हा पोलीस- 5415


C.P नागपूर शहर- 7412

एस पी नागपूर ग्रामीण-5187

भंडारा जिल्हा पोलीस-3898

चंद्रपूर जिल्हा पोलीस-3912

वर्धा जिल्हा पोलीस-3381

गोंदिया जिल्हा पोलीस-3496


C.P छत्रपती संभाजीनगर पोलीस- 5947

S.P छत्रपती संभाजीनगर पोलीस- 4978

नांदेड जिल्हा पोलीस-4987

धाराशिव जिल्हा पोलीस-4874

बीड जिल्हा पोलीस-3912

जालना जिल्हा पोलीस-3521

परभणी जिल्हा पोलीस-3031

लातूर जिल्हा पोलीस-2964


SRPF गट 1 पुणे-8000

गट 4 नागपूर-14000

गट -10 - 8000

गट -12-11000

गट -2- 13000

गट -3- 14000


ठाणे ग्रामीण ड्रायव्हर पोलीस 3140

पुणे ग्रामीण पोलीस ड्रायव्हर-3158

पुणे शहर पोलीस ड्रायव्हर-6000

मुंबई ड्रायव्हर -50000

कोल्हापूर ड्रायव्हर-2500

लातूर ड्रायव्हर -2500

C.P पुणे रेल्वे ड्रायव्हर - 784

C.P ठाणे रेल्वे ड्रायव्हर- 689

S.P सातारा ड्रायव्हर- 1380

C.P मुंबई रेल्वे ड्रायव्हर- 890

S.P धाराशिव ड्रायव्हर-1254

S.P बीड ड्रायव्हर-1124

S.P जालना ड्रायव्हर- 1074

०८ एप्रिल २०२४

मराठी व्याकरण


 

           शब्दाच्या जाती 

 

1)नाम - 

जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात. 

उदाहरण - घर, आकाश, गोड 

 

2)सर्वनाम- 

 जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. 

उदाहरण - मी, तू, आम्ही 

 

3) विशेषण- 

 जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. 

उदाहरण - गोड, उंच 

 

4)क्रियापद-  

जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात. 

उदाहरण - बसणे, पळणे 

 

5)क्रियाविशेषण-  

जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात. 

उदाहरण - इथे, उद्या 

 

6) शब्दयोगी अव्यय-  

जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी 

 

 

7) उभयान्वयी अव्यय- 

 जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरण - व, आणि, किंवा 

 

8) केवलप्रयोगी अव्यय- 

 जे शब्द आपल्या मनातील वृत्तीकिंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरण - अरेरे, अबब

मागासवर्गीय आयोग

 सध्या मागासवर्गीय आयोग Current मध्ये आहेत.... येणाऱ्या Exams मध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहेत....✅✅


🔴भारताच्या राष्ट्रपतींच्या मान्यतेने भारतीय राज्यघटनेच्या कलम 340 अंतर्गत 

राष्ट्रपती आदेशाद्वारे, "सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीची चौकशी" करण्यासाठी आवश्यकतेनुसार योग्य वाटतील अशा व्यक्तींचा नेतृत्वाखाली आयोग नियुक्त करू शकतात.


📌आतापर्यंतचे मागासवर्गीय आयोग :-


📍1st मागासवर्गीय आयोग :-


➡️स्थापना:- 29 January 1953

➡️अंतिम अहवाल:- 30 मार्च 1955 रोजी सादर

➡️अध्यक्ष : काकासाहेब कालेलकर

➡️कार्य:- सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या परिस्थितीचा व पार्श्वभूमीचा अभ्यास करणे व 'शैक्षणिकदृष्ट्या मागास' म्हणून लोकांची निवड करण्याचे निकष ठरवले.

➡️अहवाल:- ज्यामध्ये असे म्हटले होते की भारतात 2399 मागास गट आहेत. त्यापैकी 837 'सर्वात मागास' आहेत आणि मागासलेपणाचा प्रमुख पुरावा म्हणून जातीचा उल्लेख केला. 


⚠️तथापि, केंद्र सरकारने, जातविहीन समाज निर्माण करण्याच्यादृष्टीने, शिफारसी नाकारल्या.


📍2nd मागासवर्गीय आयोग :-


➡️स्थापना:- 1 जानेवारी 1979

➡️अंतिम अहवाल:- 31 डिसेंबर 1980

➡️अध्यक्ष:- B.P. मंडल (बिहारचे CM)

➡️मुख्य उद्देश:- भारतातील सामाजिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांची ओळख करून देणे आणि जातीय असमानता आणि भेदभाव दूर करण्यासाठी आरक्षणाचा विचार करणे हे मंडल आयोगाचे मुख्य उद्देश होते .

➡️वैशिष्ट्ये:- मागासलेपणा निश्चित करण्यासाठी अकरा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक निर्देशक वापरले

➡️शिफारसी:- ओबीसीना सरकारी नोकरीत आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतर्गत नोकऱ्यांमध्ये 27 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली.



📍3rd इतर मागासवर्गीय आयोग :-


➡️स्थापना:- 2 ऑक्टोबर 2017

➡️अहवाल: 31 जुलै 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर

➡️रचना :- चार सदस्यीय आयोग)

➡️अध्यक्ष:- दिल्ली H.C च्या माजी मुख्य न्या. जी.राहिणी

➡️सदस्य:-3

🔴1. जे.के. बजाज (चेन्नईच्या सेंटर फॉर पॉलिसी स्टडीजचे संचालक)

🔴2. गौरी बसू (भारतीय मानवशास्त्रीय सर्वेक्षण संचालक, कोलकाता)

🔴3. विवेक जोशी (रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त) 


➡️समितीचे सचिव:- यू. वेंकटश्वरालू

➡️या आयोगाला आत्तापर्यंत 14 वेळा मुदत वाढ देण्यात आली होती.

➡️उद्देश : ओबीसींमधील अधिक मागासलेल्यांना आरक्षणाच्या फायद्यांचा लाभ घेता यावा यासाठी आणि आरक्षणाच्या लाभांचे अधिक न्याय्य वितरणाचे सुनिश्चितीकरण आणि ओबीसींमध्ये उप-वर्गीकरण करता येईल असे निकष आणि मापदंड ठरवणे.

चालू घडामोडी प्रश्नसंच



प्रश्न – अलीकडील पुरातत्व उत्खननात 52000 वर्षे जुनी हडप्पा वसाहत कोठे सापडली?

उत्तर - गुजरात


प्रश्न – हवाई संरक्षण पोस्चर वाढवण्यासाठी लष्कराने अलीकडे कोणती प्रणाली समाविष्ट केली आहे?

उत्तर - आकाशीर


प्रश्न – अलीकडेच SCO सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केले?

उत्तर - अजित डोवाल


प्रश्न – अलीकडेच, भारताने अणुऊर्जा क्षमता १ लाख मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य केव्हा ठेवले आहे?

उत्तर - 2047


प्रश्न – अलीकडेच DRDO ने कोणत्या राज्यात चाचणी केंद्रासाठी प्रकल्प सुरू केला आहे?

उत्तर - पश्चिम बंगाल


प्रश्न – कोणत्या देशाने नुकताच ऐतिहासिक अणु कायदा संमत केला आहे?

उत्तर - इस्रायल


प्रश्न – नुकताच राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा करण्यात आला?

उत्तर – ५ एप्रिल


प्रश्न – मुख्यमंत्री महिला सन्मान योजना नुकतीच कोठे सुरू होणार आहे?

उत्तर - दिल्ली


प्रश्न – अलीकडेच जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषदेचे आयोजन कोण करणार आहे?

उत्तर - मसदर


प्रश्न – पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नुकतीच भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य कोण बनली आहे?

उत्तर - बिल्किस मीर


प्रश्न.1) केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुक २०२४ साठी कोणाची युथ आयकॉन म्हणून निवड केली आहे?

उत्तर - आयुष्यमान खुराणा


प्रश्न.2) FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार कोण भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळ पटू ठरला आहे?

उत्तर - अर्जुन एरिगैसी


प्रश्न.3) FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार कोणता बुद्धिबळ खेळाडू जगात प्रथम क्रमांकावर आहे?

उत्तर - मॅग्नसन कार्लसन


प्रश्न.4) चंदीगड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या रूद्र पांडे याने कोणते पदक जिंकले आहे?

उत्तर - सुवर्ण 


प्रश्न.5) जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनल मध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश झाला आहे?

उत्तर - राकेश मोहन


प्रश्न.6) हिंदू पद्धतीने विवाह पार पाडण्यासाठी कन्यादानाची आवश्यकता नाही असा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे?

उत्तर - अलाहाबाद


प्रश्न.7) WEF यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ २०२४ मध्ये किती भारतीयांचा समावेश झाला आहे?

उत्तर - 5 


प्रश्न.8) १५ वा CIDC विश्वकर्मा पुरस्कार २०२४ कोणत्या उद्योग समूहाला देण्यात आला आहे?

उत्तर - SJVN Ltd


प्रश्न.9) आशियाई ॲथलेटिक कमिटीच्या सदस्य पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

उत्तर - शायनी विल्सन


प्रश्न.10) आंतरराष्ट्रिय क्रिडा दीन कधी साजरा करण्यात येतो?

उत्तर - 6 एप्रिल

सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे

Q : कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी ____ हे अभिरंजक वापरले जाते? 

(अ) सॅफ्रनिन 

(ब) आयोडीन ✅

(क) इसॉसिन  

(ड) मिथेलिन ब्लू 


Q :__________ झाडाला कणखर आणि टणक बनवते? 

(अ) स्थूलकोन 

(ब) मूल ऊती 

(क) दृढकोण ऊती ✅

(ड) वायू ऊती 


Q : मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ पोरिफेरा या संघातील प्राण्यांची खालीलपैकी प्रमुख लक्षणे कोणती? 

(अ) खाऱ्या पाण्यात राहणारे 

(ब) शरीरावर शुकिकांचे आवरण असते 

(क) प्रचलन न करणारे 

(ड) वरील सर्व बरोबर  ✅


Q : अँनिलिडा सृष्टीतील खालीलपैकी प्राणी कोणते? 

(अ) गांडूळ  

(ब) लीच (जळू)

(क) नेरीस 

(ड) वरील सर्व ✅



Q : खालील वर्णनावरून मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ ओळखा: 

(1) सर्वात मोठा प्राणी संघ (2) एकलिंगी प्राणी, लैंगिक प्रजनन करतात (3) डोके, वक्ष व उदार असे शरीराचे तीन भाग असतात. 

(अ) मोलुस्का 

(ब) आर्थोपोडा ✅

(क) एकायनोडर्माटा 

(ड) सीलेंटेराटा 



Q : एकायनोडर्माटा पाणी संघातील खालीलपैकी प्राणी कोणते? 

(अ) तारामासा 

(ब) सी- ककुंबर 

(क) सी-अर्चिन 

(ड) ऑफिऑथ्रिक्स 

(इ) वरील सर्व ✅


Q : एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजांचा आहे? 

(अ) लोहखनिज 

(ब) मॅंगनीज 

(क) कोळसा ✅

(ड) यापैकी नाही 



Q : बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे _ मिळविण्यासाठी केला जातो? 

(अ) लोह

(ब) मॅंगनीज 

(क) तांबे 

(ड) अँल्युमिनियम ✅



Q : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बांद्रामधून जपानला खालीलपैकी कोणत्या धातूची निर्यात होते? 

(अ) लोहखनिज ✅

(ब) मॅंगनीज 

(क) तांबे 

(ड) बॉक्साईट 



Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो? 

(अ) सिलिका  

(ब) मॅंगनीज 

(क) लोहखनिज ✅

(ड) बॉक्साईट 


Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा / प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळतो? 

(अ) मॅंगनीज  

(ब) लोहखनिज✅

(क) सिलिका 

(ड) बॉक्साईट 


उत्तर : कन्फयुजन आहे, कारण जांभा खडकात लोहखनिज आणि बॉक्साईट आढळते. 

प्राण्यांतील लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction in Animals):


🌿काही प्राण्यांमध्ये नार आणि माधुरी ग्रंथी एकत्र असतात त्यांना उभयलिंगी प्राणी (Hermaphrodites) असे म्हणतात. उदा. लिव्हरफ्ल्यूक, हायड्रा, गांडूळ

🌿काही प्राण्यांमध्ये नार आणि मढी ग्रंथी भिन्न सजीवांमध्ये असतात त्यांना एकलिंगी प्राणी (Unisexual Animals) असे म्हणतात.

उदा. मानव, गुरे, कुत्रा, बेडूक, मासे, सॅप, पक्षी, पाल


🌿पराण्यांमधील प्रजनन प्रक्रियेसाठी ते अंडी घालतात किंवा पिल्लांना जन्म देतात या आधारे त्यांचे वर्गीकरण तीन गटात केले जाते.

🌷१) अंडज प्राणी (Oviparous) : जे प्राणी अंडी घालतात त्यांना अंडज प्राणी असे म्हणतात

उदा. बेडूक, कीटक, टोड, गोगलगाय, ऑकटोप्स, मासे, साप, पाल, पक्षी, (प्लॅटिपस आणि इकिडना सस्तनी प्राणी )


🌷२) जरायुज प्राणी (Viviparous): जे प्राणी पिल्लांना जन्म देतात त्यांना जरायुज प्राणी असे म्हणतात.

उदा. मन, विंचू, झुरळ, देवमासा, शार्कमासा, समुद्री साप


🌷३) अंडजरायुज प्राणी (Oviviviparous): जे प्राणी फलित अंडी विकसित करतात आणि मादीच्या शरीरातून भ्रूण बाहेर सोडले जाते त्यांना अंडजरायुज प्राणी असे म्हणतात.

उदा. गप्पी मासे (Gambusia Fish), काही कीटक

यावर प्रश्न अपेक्षित आहे..


📊अनावृत्तबीजी वनस्पती (Gymnosperms)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

📌अनावृत्तबीजी गटातील वनस्पती बहुदा सदाहरित, बहुवार्षिक व काष्ठमय असतात. 

📌या वनस्पतींच्या खोडांना फांदया नसतात. 


➡️पानांचा मुकुट तयार झालेला असतो. 

📌या वनस्पतींची नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रांवर येतात. 

📌यांच्या बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणजेच यांना फळे येत नाहीत, म्हणूनच यांना अनावृत्तबीजी म्हणतात. Gymnosperms म्हणजे Gymnos - न झाकलेले/अनावृत्त, Sperm - बीज.


✅उदा. सायकस, पिसिया (ख्रिसमस ट्री), थुजा (मोरपंखी), पायनस (देवदार) इत्यादी.



☄️☄️आवृत्तबीजी वनस्पती (Angiosperms)☄️☄️

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

💸या वनस्पतींना येणारी फुले हे त्यांचे प्रजननाचे अवयव आहेत. 

💸फुलांचे रूपांतर फळांत होते व फळांच्या आत बिया तयार होतात. 

💸या बियांवर आवरण असते. 

💸Angiosperms = Angios - Cover म्हणजे आवरण, sperm - बी. 

💸ज्यांच्या बियांचे सहजपणे दोन भाग सुटे होतात, त्यांना द्विबीजपत्री वनस्पती म्हणतात.

💸तर ज्यांच्या बियांचे दोन भाग होत नाहीत, त्यांना एकबीजपत्री वनस्पती असे म्हणतात.


➡️उदा...

📌द्विबीजपत्री - घेवडा, शेंगदाणा, चिंच, आंबा 

📌एकबीजपत्री - गहू, मका, ज्वारी


महाराष्ट्रातील वनांचे प्रकार

 

📌उष्ण कटिबंधीय सदाहरित अरण्ये:-


-250 ते 300 सें.मी. पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात ही अरण्ये प्रामुख्याने आढळतात.

-सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर, पश्चिम उतारावर आणि विशेषत: दक्षिण कोकणात अशाप्रकारची जंगले आढळतात. 

-रानआंबा ,जांभूळ हे मोठे वृक्ष, रानकेळी, कारवी, नेचे इत्यादी झुडपे आणि वेत यांची ही बरीच गर्दी या जंगलांमध्ये आढळते. 

-या जंगलातील लाकूड कठीण असल्याने आथिर्कदृष्टया तितकेसे महत्त्व नाही.



📌उष्ण कटिबंधीय अर्धसदाहरित अरण्ये:-


-150 ते 200 सें.मी. पाउस असलेल्या प्रदेशात या प्रकारची जंगले आढळतात. -उष्णकटिबंधीयसदाहरित अरण्ये व पानझडी वृक्षांची अरण्ये यांमधील जोडभागात ही अरण्येआहेत. 

-ही तुटक स्वरूपात सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर पायथ्याकडील भागात व खंडाळयासारख्या ठिकाणी घाटमाथ्याकडील भागात आढळतात.

-या प्रकारच्या अरण्यात सदाहरित व पानझडी या दोन्ही प्रकारचे वृक्ष आढळतात. 

-किंडाळ, शेवरी, आइन, हेदू, कदंब व काही प्रमाणावर बांबू या जंगलामध्ये प्रामुख्याने आहेत. यातील काही जाती आथिर्कदृष्टया महत्त्वाच्या आहेत.



📌पानझडी वृक्षांची अरण्य:-


-पश्चिम घाटाच्या पूर्वेस 100 ते 150 सें.मी. पावसाच्या प्रदेशात ही जंगले आढळतात. 

-कोरडया हवेच्या काळात बाष्पाचे प्रमाण टिकविण्यासाठी या प्रकारची झाडे आपली पाने गाळतात. 

-या प्रकारच्या अरण्यांचे पावसाच्या प्रमाणानुसार आर्द्रपानझडी अरण्ये व शुष्क व पानझडी अरण्ये असे दोन प्रकार पडतात. 

-गोंदिया, चंद्रपूर व भंडाराजिल्हे, सह्याद्री पूर्व उतार, महादेव,हरिश्चंद्र व सातमाळरांगा, धुळे जिल्ह्यातील सातपुडा पर्वतभाग आणि ठाणे जिल्ह्याचा डोंगराळ प्रदेश या भागात ही जंगले आहेत.

-साग, आईन, हिरडा, कुसुम, शेवरी, आवळा, शिरीष, पळस, खैर, शिसव, अंजन इत्यादी जातीचे वृक्ष या जंगलांमध्ये दिसतात. आथिर्कदृष्टया या जंगलांना फार महत्त्व आहे.



📌उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटया वनस्पतीची अरण्ये:-


-पठारी प्रदेशातील 80 सें.मी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात वनस्पती अगदी विरळआहेत. 

-या भागातील कमी व नापीक जमीन ही अशा प्रकारच्या वनस्पती उगण्याचे कारण आाहे. 

-नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या पूर्व भागात सोलापूर, मराठवाडा व पश्चिम विदर्भात अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. 

 -बाभूळ, बोर, खैर, निंब हेवृक्ष आणि तरवड, टाकळा, निवडुंग इत्यादी झुडपे व अनेक प्रकारची गवते त्या भागात मात्र पानझडी जातीचे वृक्ष आढळतात.



📌मग्रॅुव्ह प्रकारची अरण्ये:-


-किनारपट्टीलगत समुद्रकाठच्या दलदलीच्या प्रदेशात व खाऱ्याजमिनीत 'मॅंग्रुव्ह'(खारफुटी) प्रकारची जंगले आढळतात. 

-यामध्ये चिपी, मारांडी झुडपे व तिस वृक्ष इत्यादी फक्त खाऱ्या जमिनीत वाढणाऱ्या जातीच आढळतात.



📌जगलाखाली असलेल्या एकूण प्रदेशापैकी 80 पेक्षा अक्षिक जास्त प्रदेश वनखात्याच्या ताब्यात आहे. 

यातील जवळजवळ 65 ते 70 जंगले राखीव व सुरक्षित आहेत. 


-महाराष्ट्रातील जंगले चंद्रपूर, भंडारा,गोंदिया, अमरावती, यवतमाळ, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे,दक्षिण रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात केंद्रीत झाली आहेत. विदर्भात सर्वात कमी म्हणजे 4.5 जमीन जंगलाखाली आहे.


📌सदाहरित वने:-


-महाराष्ट्रात हा प्रकार फारच तुरळक आढळतो. साधारणत: 1,200 ते 1,400 मी.उंचीवरील विपुल पर्जन्यमानाच्या प्रदेशात जेथे स्थानिक भू-भागाला संरक्षण आहे अशा दुर्गम पठारी अथवा दऱ्याखोऱ्यातून सदाकाळ हिरवीगार असलेली वने आढळतात. 

-या भागात पर्जन्यमान 360 ते 600 सेंमी. असते, या प्रकारची वने महाबळेश्वर, खंडाळा, माथेरान,भीमाशंकर, अंबोली अशा ठिकाणी आढळतात. 

-पठारावर जरी वृक्षांची उंची कमी असली तरी दऱ्याखोऱ्यातून हेच वृक्ष भरपूर उंच झालेले दिसतात. 

-या वनांत खालील सदाहरित वृक्ष मुख्यत्वेकरुन आढळतात. जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंजर, आंबगा, लालदेवदार, वगैरे, झुडपांमध्ये फांगडा, रामेठा, बामणी, दिंडा, सुरंगी, फापटी वगैरे आढळतात. 

-विकसित झालेल्या उंच वृक्षांच्या जंगलात ओंबळ गारबी, पळसवेल, वाटोळी,वगैरे अजस्त्र वेली आढळतात.



📌निमसदापर्णी वने :-


-सदाहरीत वनांच्या खालच्या बाजूस जेथे पर्जन्यमान 200 ते 360 सेंमी. आहे आणि उष्णतामान थोडेसे जास्त असलेल्या कोकणचा प्रदेश, घाटमाथ्याच्या नजिकचा प्रदेश येथे साधारणत: हिरवीगार राहणारी अरण्ये असतात. 

-या जंगलात उंच वृक्ष नेहमी पानझडी असतात. मात्र मध्यम आकाराच्या वृक्षांच्या जातींमध्ये सदाहरित वृक्षांचा भरणा अधिक असतो. 

-उंच वृक्षांमध्ये किंजळ, नाणा, ऐन, बेहडा, सावर, हिन्हई, जांबत वगैरे तर मध्यम झाडोरा आढळतो. 

-सदाहरित वनांप्रमाणेच आर्थिकदृष्टया हया वनांपासून फारसे उत्पन्न मिळत नाही. परंतु सहयाद्रीच्या उतारांवरील जमिनीची धूप थांबविण्याच्यादृष्टीने या वनांचे महत्व फार आहे.


आर्द्र पानझडी वने :---


--घाटमाथ्यावरुन खाली उतरल्यानंतर सदापर्णी वनांच्या खालील बाजूस डोंगरउतारावर, काही वेळा सपाटीवर सुध्दा या प्रकारची वने आढळतात.

-पर्जन्यमान 150 ते 200सेंमी निचऱ्याची जमीन, उष्णतामान यांमुळे सागवान वृक्ष असलेली पानझडी वृक्षांची जंगले या भागात आढळतात. 

-जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडोऱ्याची उंची 30 - 35 मी.पर्यंत असू शकते

-व्यापारी दृष्टया अशा वनांचे महत्व फार आहे. 

-वनव्यवस्थापनाच्या दृष्टीने अशा किंमती वनांची खास देखभाल केली जाते. 

-उंच वृक्षांमध्ये सागवान व त्याच्याबरोबरच शिसम, सावर, बीजा, हळदू कळंब, ऐन बोंडारा, शिरीष, अर्जुन सादडा,धावडा इ. उपयुक्त वृक्ष सापडतात.

-सागवान इमारती लाकडाचे इतर जातीच्या इमारतीमालांपेक्षा कित्येक पटीनी जास्त उत्पन्न असल्याने वनव्यवस्थापनामध्ये त्याच्याकडे जास्त लक्ष पुरविले जाते, अशा वनात नेहमी पाणी असणाऱ्या ओढयांच्या काठी साधारणत: बाबूंची बेटे आढळतात.



📌शष्क पानझडी वृक्षवने :---


-या प्रकारच्या वनराजीत पानझडी वृक्षांचे प्रमाण सर्वात जास्त असते.

-उन्हाळयामध्ये तर अशा वनामध्ये सर्वच वृक्षांचे पर्णहीन खराटे दृष्टीस पडतात.

-अशा रानात सागवान वृक्षही आढळतात. असाणा, तिवस,सावर, चारोळी, आवळा, बेहडा, शेंदरी, चेरा, पळस, बारतोंडी, धामण,टेंबुर्णी वगैरे वृक्ष सापडतात. बाकीच्या झाडोऱ्यात बोर, बाभूळ, कुडा, आपटा,तांबरट वगैरे मध्यम आकारांचे वृक्ष अथवा झुडपे आढळतात. 

-इमारती लाकडाच्या दृष्टीने या प्रकारच्या वनांना कमी महत्व असले, तरी भरपूर जळाळु लाकडाचा पुरवठा करणारी जंगले म्हणून ही राने उपयुक्त मानली जातात. 


📌खाडीकाठची खाजण वने :--


-कोकण प्रदेशातील काही खाडयांच्या आसपास पाणथळ अथवा गाळ असलेल्या भूभागात खाजण किंवा खारपुरीची जंगले आढळतात. 

-भरतीच्या वेळी जमीन खाऱ्यापाण्याखाली असते अशा रानातील वृक्षांची उंची 4 ते 6 मी. असते. 

-पाणथळ जमिनीमुळे वृक्षांच्या आसपास जमिनीतून बाहेर आलेली श्वसन मुळे दिसतात. 

-अशा वनराजीपासून जळाऊ लाकूड चांगले मिळते. या भागात वाढणाऱ्या वनस्पतींपासून टॅनीन मिळत असल्याने कातडी कमावणे, मासेमारीची जाळी धुणे यांकरिता त्यांचा उपयोग केला जातो.  


Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...