२७ डिसेंबर २०२३

26 डिसेंबर 2023 चालू घडामोडी

Q.1 अलीकडेच, ग्रामीण विकास मंत्रालयाने स्वयं-सहायता गटांची पोहोच वाढवण्यासाठी कोणाशी करार केला आहे?
उत्तर - जिओ मार्ट

Q.2 नुकताच टागोर साहित्य पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
उत्तर - सुकृता पॉल

Q.3 UNESCO ने नुकताच रामबाग गेट आणि रामपार्ट यांना कुठे पुरस्कार दिला आहे?
उत्तर - अमृतसर

Q.4 नुकत्याच जाहीर झालेल्या LEADS रँकिंगमध्ये कोण अव्वल आहे?
उत्तर - तामिळनाडू

Q.5 अलीकडेच प्रतिष्ठित FIH पुरस्कार कोणी जिंकले आहेत?
उत्तर - सविता पुनिया

Q.6 नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या स्किल्स रिपोर्ट 2024 नुसार, भारतात काम करण्यासाठी सर्वात पसंतीचे राज्य कोणते बनले आहे?
उत्तर - केरळ

Q.7 दोन दिवसीय आदिवासी केंद्रित कार्यक्रम इत्यादी व्याख्यानांचे उद्घाटन नुकतेच कोणी केले?
उत्तर - अर्जुन मुंडा

Q.8 अलीकडे T2 कोणत्या विमानतळाला जागतिक स्तरावर सर्वात सुंदर विमानतळ म्हणून ओळखले गेले आहे?
उत्तर - बेंगळुरू विमानतळ

Q.9 अलीकडील WHO अहवालानुसार, कोणत्या देशात 10 लाखांहून अधिक मुले कुपोषणाचा सामना करत आहेत?
उत्तर - अफगाणिस्तान

Q.10 VGGS 2024 प्री समिट सेमिनार ऑन केमिकल्स नुकताच कुठे आयोजित केला जाईल?
उत्तर - गुजरात

Q.11 भारतीय नौदलाने अलीकडे कोणत्या जलक्षेत्रात स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्र तैनात केले आहे?
उत्तर - एडनचे आखात

Q.12 अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप सुरू केले?
उत्तर - आंध्र प्रदेश

Q.13 जागतिक बँकेने अलीकडेच कोणत्या राज्यात $300 दशलक्ष कार्यक्रम मंजूर केला आहे?
उत्तर - तामिळनाडू

Q.14 अलीकडेच, 2024 मध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींना आमंत्रित करण्यात आले होते?
उत्तर - फ्रान्स

चालू घडामोडी :- 26 डिसेंबर 2023

◆ ओडिशातील सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्प हा भारतातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे जिथे देशातील सर्व काळे किंवा 'मेलेनिस्टिक' वाघ आहेत.[जगातील 75% वाघ भारतात]

◆ NTPC कांती ला "औद्योगिक पाणी वापर कार्यक्षमता" श्रेणी अंतर्गत FICCI जल पुरस्कार 2023 च्या 11 व्या आवृत्तीने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ तिबेटी अध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी बिहारमधील बोधगया येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय संघ मंच 2023 चे उद्घाटन केले.

◆ Razorpay आणि Cashfree ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून पेमेंट ॲग्रीगेटर (PAs) म्हणून काम करण्यासाठी अंतिम अधिकृतता प्राप्त झाली आहे.

◆ दुसऱ्या राज्यातील प्रमाणपत्र असल्याने एखाद्याला केंद्रीय विद्यालयात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) कोट्यातून प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

◆ सर्वाधिक बेरोजगारी असलेल्या दहा देशांत दक्षिण आफ्रिका पहिल्या क्रमांकांवर असून यामध्ये भारत सातव्या क्रमांकावर आहे.

◆ FDI बाबत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून कर्नाटक व गुजरात अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.

◆ जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून फडणवीसांना मानद डॉक्टरेट प्रदान केली असून संध्याकाळी मुंबई विद्यापीठाच्या दिक्षांत सभागृहात हा सोहळा पार पडला.

◆ जपानच्या कोयासन विद्यापीठाने 120 वर्षांच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ तानसेन संगीत समारोह दरवर्षी डिसेंबर महिन्यात ग्वाल्हेर येथे साजरा केला जातो.

◆ राष्ट्रपती द्रोपद्री मूर्मू यांच्या हस्ते क्रॉम्प्टन ग्रीव्हज या कंपनीला ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आला आहे.

◆ 85 व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद चिराग सेन याने पटकावले असून हि स्पर्धा गुवाहटी येथे पार पडली.

◆ वीर बाल दिवस 26 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येतो.

◆ 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ तंजावर, तामिळनाडू येथून होणार असून याचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल आहेत.

◆ BBC sport personality of the years 2023 साठी "मैरी ईअर्स" ची निवड करण्यात आली आहे.

◆ जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरलेल्या अबुधाबी शहराचा सुरक्षा निर्देशांक 88.8 आहे.

◆ जगातील सर्वात सुरक्षित 50 शहराच्या यादीत भारतातील कर्नाटक राज्यातील मंगळूरु शहराचा सामावेश आहे.

◆ जगभरातील सर्वात सुरक्षित 50 शहराच्या यादीत पहिल्या 5 पैकी युएई देशातील 4 शहराचा सामावेश आहे.

◆ ग्वाल्हेर या ठिकाणच्या तानसेन महोत्सवात 1600 तबला वादकानी एकाच वेळी तबला वादनाच्या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे.

◆ UN ने 2024 हे वर्ष उंटाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले तर 2023 आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून घोषित केलेले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

२६ डिसेंबर २०२३

तलाठी परीक्षा प्रश्न पत्रिका


१. खालीलपैकी कोणत्या शास्त्राला सामाजिक शास्त्र मानले जाते?

अ) पदार्थ विज्ञान ब) राज्यशास्त्र✅ क) प्राणी शास्त्र द) रसायनशास्त्र


२………………या भारतीय वेज्ञानिकाने वनस्पती संबंधी केलेल्या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाली.

वनस्पतींनाही संवेदना असतात, असे त्यांनी आपल्या संशोधनाद्वारे सिद्ध केले.

अ) प्रफुल्लचंद्र राय ब) सी.व्ही. रमन क) जगदीशचंद्र बोस✅ द) डॉ. सुब्रह्मण्यम भारती


३. रोगनिदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे यांस खालीलपैकी कोणती सज्ञा आहे?

अ) एलिझा टेस्ट ब) बायोप्सी✅ क) अन्जिओ ब्लास्ट द) वेस्टर्न ब्लॉक टेस्ट


४. धवलक्रांती जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा निर्देश करता येईल?

अ) डॉ. एम.एस. स्वामिनाथन ब) वर्गीस कुरियन✅

क) डॉ. रघुनाथ माशेलकर द) डॉ. राजा रामण्णा


५. जनागणना २०११ च्या प्राथमिक आकडेवारीनुसार भारतात व महाराष्ट्रात ०-६ वयोगटातील दर हजार मुलामागे मुलींचे प्रमाण अनुक्रमे …………..व …………….आहे.

अ) ९१४ व ८८३ ब) ९२७ व ९१३✅ क) ९४५ व ९४६ द) यापैकी नाही


६…………….रोजी ग्याट चे रुपांतर जागतिक व्यापार संघटने मध्ये केले गेले.

अ) १ जानेवारी १९९४ ब) १ एप्रिल १९९४ क) १ जानेवारी १९९५✅ द) १ एप्रिल १९९५


७. खालीलपैकी कोणता कर एखाद्या वस्तूंची किंमत वाढण्यास प्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरत नाही.

अ) विक्रीकर ब) आयात कर क) स्थानिक कर द) प्राप्तिकर✅


८. पंचायत समिती पातळीवर ( तालुका पातळीवर ) ग्रामीण विकास कार्याची जबाबदारी प्रमुख्याने पुढीलपैकी कोणावर असते?

अ) ग्रामसेवक ब) ग्रामविकास अधिकारी

क) गट विकास अधिकारी✅ द) जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी


९. महाराष्ट्र …………हे पद लोकायुक्तांच्या कार्यक्षेत्राबाहेर ठेवण्यात आले आहे.

अ) राज्यपाल ब) मुख्यमंत्री क) जिल्हाधिकारी✅ द) लोकायुक्त


१०. भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा …………तासांनी पुढे आहे.

अ) अडीच ब) साडेचार क) साडेपाच✅ द) साडेसात


११. खाली भारतातील काही राज्ये व त्यांच्या राजधान्या यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैके कोणती जोडी चुकीची आहे?

अ) नागालँड : कोहिमा ब) मेघालय : शिलॉंग

क) अरुणाचल प्रदेश : इटानगर द) त्रिपुरा : इम्फाळ✅


१२. पंतप्रधानाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय हे विधान………..

अ) संपूर्णत : बरोबर आहे✅ ब) संपूर्णत : चुकीचे आहे

क) अंशत : बरोबर आहे द) असंदिग्ध स्वरूपाचे आहे


१३. मंडोलेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी………….. हा ग्रंथ लिहिला

अ) अर्कीक होम इन द वेदाज ब) गीता रहस्य✅

क) ओरायन द) प्रतियोगिता सहकार


१४. ” जय जवान, जय किसान” हि घोषणा खालीलपैकी कोणी दिली होती?

अ) जवाहरलाल नेहरू ब) लालबहादूर शास्त्री✅

क) इंदिरा गांधी द) जयप्रकाश नारायण


१५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

अ) ते भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते.

ब) ते भारताच्या घटना समितीचे सचिव होते.

क) त्यांनी भारताच्या घटना समितीचा राजीनामा दिला.

द) ते भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते.✅


१६. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीतील…………या पाच कायम सदस्य राष्ट्रांना नकाराधिकार (VETO) वापरता येतो.

अ) अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन व फ्रांस✅

ब) अमेरिका, रशिया, तेवान, ब्रिटन व फ्रांस

क) अमेरिका, रशिया, जर्मनी, ब्रिटन व फ्रांस

द) अमेरिका, रशिया, चीन, इस्त्रायल व ब्रिटन


१७. सन २०११ सालासाठीचा म्यागसेस पुरस्कार बचत गटाच्या माध्यमातून कार्य करणा-या …….यांना जाहीर करण्यात आला?

अ) हरीश हांडे ब) प्रकाश आमटे क) किरण बेदी द) नीलिमा मिश्रा✅


१८. मुंबई क्रिकेट असोशिएशन चे अध्यक्ष ………..हे आहेत.

अ) शरद पवार✅ ब) शशांक मनोहर क) विलासराव देशमुख द) यापैकी नाही.


१९. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री……….आहेत.

अ) फौजिया खान ब) प्रकाश सोळंके क) राजेंद्र गावित द) वर्षा गायकवाड इ) दिवाकर रावते✅


२०. महाराष्ट्र शासनाने मानव विकास मिशनची व्याप्ती वाढवून नुकतेच त्यामध्ये …….जिल्हे व …..तालुक्यांचा समावेश केला आहे.

अ) २२ व १२५ ब) १२ व २५✅ क) सर्व जिल्हे व तालुके द) यापैकी नाही


२१. सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरतेचे प्रमाण वाढून…….. झालेले आहे.

अ) ८२.९ %✅ ब) ७६.९ % क) ८६.० % द) ६७ %


२२. भारताचा व्यापारशेष (Balance of trade) मुख्यत्वे या वस्तूच्या आयातीमुळे अनुकूल नाही.

अ) खाद्य तेल ब) सिमेंट क) अन्नधान्य द) खनिज तेल✅


२३. खेड्यातून महसूल गोळा करण्याचे काम कोणाकडून केले जाते?

अ) ग्रामसेवक ब) तलाठी✅ क) पोलीस पाटील द) सरपंच


1)) गडी *गावरानात* गुरे घेउन गेला आहे. अधोरेखित शब्द कोनत्या प्रकारात येतो?

१) सामासिक शब्द✔️

२) अभ्यस्त शब्द

३) तत्सम शब्द

४) तद्भव शब्द


2) पर्यायातील " तोळवा " या शब्दाचा समानार्थी नसलेले शब्द कोनता?

१) धष्टपुष्ट शरिर

२) तोष✔️

३) लंबक

४) तुळई


3) ' हेमाने दारापुढे सुंदर रांगौळी काढली. या वाक्यातील अव्यय प्रकार ओळखा?

१) शब्दयोगी अव्यय✔️

२) उभयान्वयी अव्यय

३) क्रियाविशेशन अव्यय

४) केवलप्रयोगी


4) पुढील वाक्याचा प्रयोग सांगा.

" पारीजातकाची योजना करनारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे."

१) कर्तरी प्रयोग✔️

२) कर्मनी प्रयोग

३) भावे प्रयोग

४) संकिर्ण प्रयोग


5) " भाकरी " हा शब्द मराठीत कोनत्या भाषेतुन आला आगे?

१) कानडी✔️

२) डच

३) पोर्तुगीज

४) अरबी


6) हल्ली *सज्जन मित्र* मिळने कठीन झाले आहे. अधोरेखित शब्दाचा विशेषन प्रकार ओळखा.

१) साधित विशेषन

२) नामसाधित विशेषन✔️

३) अविकारी विशेषन

४) परिनाम दर्शक विशेशन


7) ' घरी ' या शब्दाची विभक्ती कोनती?

१) षष्ठी

२) प्रथमा

३) द्वितिया

४)सप्तमी✔️


8) मुलांनी शिस्तित चालावे.प्रयोग ओळखा.

१) कर्मनी

२) अकर्मक कर्तरी

३) भावे✔️

४) सकर्मक कर्तरी


9) ' गजानन ' या शब्दाचा समास ओळखा.

१) तत्पुरुष

२) बहुव्रिही✔️

३) द्विगु

४) मध्यमपदलोपी


10) ' जो अभ्यास करील तो उत्तीर्ण होइल ' वाक्याचा प्रकार ओळखा.

१) केवल वाक्य

२) संयुक्त वाक्य

३) मिश्रवाक्य✔️

४) आज्ञार्थी वाक्य


11) 'लक्ष्मीकांत ' या शब्दाचा समास ओळखा.

१) बहुव्रिही✔️ 

२) कर्मधार्य

३) तत्पुरुष 

४) अव्ययीभाव


12) कपिलाषष्ठीचा योग येणे या वाक्याचा अर्थ ओळखा.

१) अत्यंत उत्सुक असने

२) जबाबदारी स्विकारने

३) दुर्मिळ संधी मिळने✔️

४) माघार घेने


13) कवितेचे रस किती आहेत?

१) चार

२) पाच

३) नऊ✔️

४) सात


14) " भाटी " शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्द कोनता.

१) भट

२) भाट

३) कुत्रा

४)बोका✔️


15) खालीलपैकी दंततालव्य वर्ण कोनता.

१) ज्

२) र

३) ग

४) म्


16) खालील संयुक्त वाक्य कोनत्या प्रकारचे आहे

" सगळे काही त्याला माहित आहे, पण लक्षात कोन घेतो?

१) न्युनत्वबोधक✔️

२) परिनामबोधक

३) विकल्पबोधक

४) समुच्तयबोधक


17) " र् " या व्यंजनाची जोडाक्षरे लिहन्याच्या किती पद्धती आहेत.

१) पाच 

२) चार✔️

३) एक

४) तिन


18) खालील शब्दातुन " कटक " या अर्थाचा शब्द कोनता?

१) युद्ध✔️

२) सैन्य

३) राजा

४) सेनापती


19) समानार्थी शब्द ओळखा. " *अभिनिवेश* "

१) जोम✔️

२) अभिनय

३) प्रवेश 

४) अभियान


20) ---- Yamuna is ---- tributary of the gangas.

1) The , A✔️

2) no article ,a

3) The , an

4) The, the


21) I met him ----- accident during my visit ------ Mumbai.

1) in , to

2) by ,to✔️

3) on,in

4) an,in


22) Use correct word in the sentence .

We ------ obey our parents.

1) should

2) will

3) can

4) must✔️


23) The meaning of beech--

1) sea shore

2) a tree✔️

3) an animal

4) a vegetable


24) choose the correct word from the following.

1) commutes

2) committee✔️

3) committing

4) committee


25) The important thing is ------ listen ------ them and change our ways.

1) to , to✔️

2) to, for

3) to, with

4) to, no article


26) Select the correct meaning of the word " error"

1) wrong

2) true

3) incorrect

4) mistake✔️


27) महाराष्ट्रात एकुण किती जिल्हा परिषदा आहेत?

१) ३६

२) ३४✔️

३) ३५

४) ३३


२८) वातावरनात ऑक्सीजन वायुचे प्रमान किती टक्के असते?

१) २३%

२) ४०%

३) ९८%

४) २१%✔️


२९)़मलेरिया आणि डास यांच्यातील संबंध कोन्या शास्त्रज्ञाने स्पष्ट केला?

१) लुई पाष्चर

२) रोनॉल्डरॉस✔️

३) बेनडेर

४) डिओडर श्वान


३०) मानवी नाडीचे प्रती मिनीट किती ठोके पजतात?

१) ७२✔️

२) ६०

३) ४०

४) ३०


३१) टंगस्टन धातू किती अंश तापमानास वितळतो?

१) २०००°

२) १०००°

३) ३०००°✔️

४) १५००°


३२) कोनत्या रोगाचा प्रसार पान्यामार्फत होतो?

१) काविळ

२) अतिसार

३) विषमज्वर

४) यापैकी सर्व✔️


३३) नॉनस्टीक भांड्यावर कशाचा थर असतो?

१)टेफ्लॉन✔️

२) जिप्सम

३) इथिलीन

४) फॉक्झिन


३४) मानवी शरीरात पान्याचे प्रमान किती असते?

१) ६५%✔️

२) ८०%

३) ६०%

४) ४०%


३५) मानवी़ शरिरातील सर्वात मोठी ग्रंथी कोनती?

१) यकृत✔️

२) किडनी 

३) फुफ्फुस

४) र्हदय


३६) भारताचे गवर्नर जनरल केंव्हापासुन व्हॉइसरॉ़य म्हनुन ओळखले जाउ लागले?

१) १८५५

२) १८५६

३) १८५७

४) १८५८✔️


३७) सत्यशौधक समाजाचे मुखपत्र कोनते?

१) सुधारक

२) केसरी

३)दिनबंधू✔️

४) प्रभाकर


३८) डॉ.आंबेडकरांनी मनुस्मृतिचे दहन कोठे केले?

१) नाशिक 

२) मुंबई

३) रत्नागिरी

४) महाड✔️


३९)पुन्याचा प्लेग कमिशनर रँड याची हत्या १८९७ मध्ये कोणी केली?

१) वासुदेव बळवंत फडके

२) अनंत कान्हेरे

३) दामोदर हरीचाफेकर✔️

४) सुरेंद्र बोस


४०) सह्याद्रीच्या पुर्वेकडील प्रदेश काय म्हनुन ओळखला जातो?

१) अति पर्जन्याचा प्रदेश

२) पर्जन्य छायेचा प्रदेश✔️


महाराष्ट्रातील पंचायत राज....!!



आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.


🌸1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

==> स्थानिक स्वराज्य संस्था


🌸2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?

==> 2 ऑक्टोबर 1953


🌸3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?

==> 16 जानेवारी 1957


🌸4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?

==> वसंतराव नाईक समिती


🌸5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?

==> 27 जून 1960


🌸6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?

==> महसूल मंत्री


🌸7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?

==>226


🌸8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?

==> जिल्हा परिषद


🌸9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?

==> तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)


🌸10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?

==>  1  मे 1962


🌸11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?

==> महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966


🌸12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?

==> 7 ते 17


🌸13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?

==>जिल्हाधिकारी


🌸14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?

==> जिल्हाधिकारी


🌸15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?

==> 5 वर्षे


🌸16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?

==> पहिल्या सभेपासून


🌸17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?

==> तहसीलदार


🌸18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?

==> विभागीय आयुक्त


🌸19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> सरपंच


🌸20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

=पंचायत समिती सभापती


🌸21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

==> दोन तृतीयांश (2/3)


🌸22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

==> तीन चतुर्थांश (3/4)


🌸23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> पंचायत समिती सभापती


🌸24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌸25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> संबंधित विषय समिती सभापती


🌸26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌸27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

==> विभागीय आयुक्त


🌸28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?

==> ग्रामसेवक


🌸29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?

==> जिल्हा परिषदेचा


🌸30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?

==> जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून


🌸31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?

==> ग्रामसेवक


🌸32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?

==> शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)


🌸33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

==> राज्यशासनाला


🌸34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?

==> विस्तार अधिकारी


🌸35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?

==> ग्रामविकास खाते


🌸36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

==> जिल्ह्याचे पालकमंत्री


🌸37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

==> जिल्हाधिकारी


🌸38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?

==> दहा (स्थायी+9 विषय समित्या)


🌸39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?

==> स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा


🌸40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?

==> जिल्हा परिषद अध्यक्ष


🌸41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?

==> वसंतराव नाईक

ग्रामसेवक / सचिव.


🧩निवड :

🅾जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.

🧩नेमणूक :

🅾 मुख्य कार्यकारी अधिकारी

🧩नजीकचे नियंत्रण :

🅾गट विकास अधिकारी

🧩कर्मचारी :

🅾ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा

🧩कामे :

1. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.

2. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे

3. कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.

4. ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.

5. व्हिलेज फंड सांभाळणे.

6. ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.

7. ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.

8. गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.

9. जन्म-मृत्यूची नोंद करणे.

🧩ग्रामपंचातीची कामे व विषय :

1. कृषी

2. समाज कल्याण

3. जलसिंचन

4. ग्राम संरक्षण

5. इमारत व दळणवळण

6. सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा

7. सामान्य प्रशासन

🧩ग्रामसभा :

🅾 मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे.

🧩बैठक :

🅾आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर)

🧩सभासद :

🅾गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.

🧩अध्यक्ष :

🅾सरपंच नसेल तर उपसरपंच

🧩ग्रामसेवकाची गणपूर्ती :

🅾एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

ग्रामीण प्रशासन प्रश्न व उत्तरे.



1)पंचायत समितीची पहिली बैठक कोण बोलवतो??

1)सभापती

2)विस्तार अधिकारी

3)राज्य शासन

4)जिल्हा अधिकारी✅


2)सरपंच समितीचा सचिव कोण असतो?

1)सरपंच

2)उपसरपंच

3)विस्तार अधिकारी

4)ग्रामसेवक ✅


3)वित्त आयोगाची मुदत किती वर्षाची असते??

1)3

2)4

3)5 ✅

4)6


4)महाराष्ट्रात जिल्हापरिषद केव्हा स्थापन करण्यात आली?

1)1958

2)1968

3)1962✅

4)1661


5)ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो???

1)सरपंच

2)गटविकास अधिकारी

3)ग्रामसेवक ✅

4)उपसरपंच


6)GST चे दर किती प्रकारचे असतात?

1)2

2)4

3)5 ✅

4)6


7)ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती सभासद संख्या असते??

1)5

2)11

3)9

4)7✅


8)राजा केळकर हे प्रसिद्ध संग्रहालय कोठे आहे??

1)नांदेड

2)पिंपरी

3)पुणे ✅

4)नाशिक


9)झिरो माईल  स्थान कोणत्या शहरात आहे??

1)मुंबई

2)पुणे

3)नागपूर✅

4)नाशिक


10) सातारा आणि सांगली ता दोन जिल्ह्यांत ------हे मसाल्याचे पीक जास्त होते???

1)मिरची

2)हळद ✅

3)धणे

4)लसुण


चालू घडामोडी :- 25 डिसेंबर 2023

◆ भारताचे माजी केंद्रीय कृषि मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त केंद्र सरकार 125 रुपयांचे नाणे काढणार आहे.

◆ इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत रेफ्रीची भूमिका बजावणारी रेबेका वेल्च ही पहिली महिला ठरली आहे.

◆ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षात देशात 140 खाजगी विद्यापीठाची स्थापना झाली असून गुजरात राज्यात सर्वाधिक 28 खाजगी विद्यापीठ आहेत.

◆ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यात एकूण 15 खाजगी विद्यापीठे आहेत.

◆ महाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

◆ चेन्नई बुद्धिबळ ग्रँडमास्टर्स स्पर्धा 2023 चे विजेतेपद डी. गुकेश याने पटकावले आहे.

◆ ओपेक या संघटनेतून अंगोला देश बाहेर पडला आहे.

◆ 2024 मध्ये तामिळनाडू मध्ये होणारी खलो इंडिया युथ स्पर्धा सहाव्या क्रमांकाची असणार आहे.

◆ कवयित्री सुकृता पॉल कुमार यांना 'मीठ आणि मिरपूड' साठी रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार जाहीर.

◆ वस्त्रोद्योग मंत्रालयाने जूट शेतकऱ्यांसाठी 'पाट-मित्रो ॲपचे अनावरण केले.

◆ प्रोफेसर मविता लाडगे यांना रसायनशास्त्र शिक्षणातील उत्कृष्टतेसाठी नायहोम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

◆ पूनम खेत्रपाल सिंग यांना 'नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल ने सन्मानित.

◆ 2022 आणि 2023 चे SASTRA - रामानुजन पुरस्कार बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाशी संलग्न असलेल्या युनकिंग तांग आणि रुईीझयांग झांग या गणितज्ञांना प्रदान करण्यात आले.

◆ नौदलाच्या 'इंफाळ' या स्टील्थ गाईडेड क्षेपणास्त्र विनाशिकेचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नेव्हल डॉकयार्ड येथे  मंगळवारी मुंबईमध्ये लोकार्पण सोहळा होणार आहे.

◆ इंफाळ ही स्वदेशी बनावटीची सर्वात मोठ्या विनाशिकेपैकी ही एक असून विशाखापट्टणम श्रेणीच्या विनाशिकेतील तिसरी आहे.

◆ इंफाळची बांधणी मुंबईच्या माझगाव डॉक लिमिटेड येथे झाली आहे.

◆ महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या दालनातील पाटीवर वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लिहिले आहे.

◆ मुलाला आपल्या आईचे आडनाव लावण्याचा अधिकार आहे, त्याबाबत त्या मुलाचे वडील सक्ती करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला आहे.

◆ 25 डिसेंबर हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन आहे. त्यांच्या देदीप्यमान नेतृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारतात हा दिवस 'सुशासन दिन' म्हणून पाळण्याचे ठरविण्यात आले.

◆ 2014 साली भारतीय जनता पक्षाद्वारे दरवर्षी भारतात 25 डिसेंबरला सुशासन दिवसाच्या रूपात साजरा करण्याची घोषणा केली गेली होती.

◆ 2023 सालचे साहित्य अकादमी पुरस्कार 9 कविता संग्रह, 6 कादंबऱ्या, 5 लघुकथा, 3 निबंध आणि 1साहित्यिक अभ्यासाला मिळाले आहेत.

२३ डिसेंबर २०२३

23 डिसेंबर 2023 चालू घडामोडी

Q.1) भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
✅ संजय सिंग
 
Q.2) 2023 चा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
✅ कृष्णात खोत
  
Q.3) नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला अर्जुन पुरस्कार 2023 जाहीर झालेला आहे?
✅ मोहम्मद शमी
  
Q.4) अलीकडेच भारतीय सशस्त्र दलांना कोणत्या देशाने “Golden Owl” देऊन सन्मानित केले?
✅ श्रीलंका

Q.5) रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीद्वारे निओहोम पुरस्कार-2023 कोणाला प्रदान करण्यात आला?
✅ सविता लाडेज
 
Q.6) अलीकडेच कोणाला भूतानच्या प्रतिष्ठित नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आले?
✅ डॉ. पूनम खेत्रपाल सिंग
 
Q.7) अलीकडेच कोणत्या राज्याने शालेय दप्तरांचे ओझे 50 टक्क्याने कमी करण्याची घोषणा केली आहे?
✅ कर्नाटक

Q.8) अलीकडेच वायुसेने अस्र शक्ती-2023 चा सराव कोणत्या राज्यात आयोजित केला होता?
✅ आंध्र प्रदेश
 
Q.9) संयुक्त राष्ट्रांनी 2024 हे वर्ष काय म्हणून घोषित केले आहे?
✅ कॅमेलीडर्सचे आंतरराष्ट्रीय वर्ष

Q.10) राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी केंव्हा साजरा करण्यात येत असतो?
✅ 22 डिसेंबर

लेक लाडली योजना


महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना अधिक्रमित करून 1 एप्रिल 2023 पासून लेक लाडकी या नावाने नवीन योजना सुरु केली आहे


योजनेचे उद्दिष्ट –


मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे.

मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मृत्यूदर कमी करणे, बालविवाह रोखणे, मुलींमधील कुपोषण कमी करणे.

शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे.


योजनेचा लाभ


या योजनेत मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत 6 हजार रुपये, सहावीत 7 हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये आणि लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये याप्रमाणे 1 लाख 1 हजार रुपयांची रक्कम देण्यात येई


अटी व शर्ती


गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना शासकीय योजनेचा लाभ मिळेल.

ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका आहे.

1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना योजनेचा लाभ मिळेल.

जर कोणाला मुलगा आणि मुलगी असेल तर फक्त मुलीलाच लाभ मिळेल.


दुसऱ्या प्रसुतीच्यावेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास व एक मुलगा, एक मुलगी किंवा दोन्ही मुली झाल्यास त्या मुलींना योजनेचा लाभ मिळू शकेल. 

त्यानंतर माता/ पित्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.

लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक

लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.



माझी कन्या भाग्यश्री योजना


सुरुवात - एप्रिल 2016 (महाराष्ट्र शासन)


उद्देश - मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी तसेच सुधारणा करण्यासाठी योजना सुरू करण्यात आली.

लाभ - या योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार मुलींच्या जन्मानंतर 50,000 रुपये दिले जात होते.


करोनाचा नवा JN.1 उपप्रकार


करोनाचा उपप्रकार असलेल्या BA.2.86 च्या जातीतील JN.1 हा नवा विषाणू केरळच्या काही भागांमध्ये पसरत आहे.


INSACOG (Indian SARS-CoV-2 Genomics Consortium) या प्रयोगशाळेने केरळमध्ये सध्या अमेरिका आणि चीनमध्ये पसरत असलेल्या करोनाचा JN.1 हा नवा उपप्रकार आढळून आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावर आयसीएमआरचे डीजी डॉ. राजीव बहल म्हणाले की, केरळमधील काराकुलम, तिरुवनंतपुरम येथे ८ डिसेंबर रोजी झालेल्या RT-PCR चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह नमुन्यात JN.1 हा विषाणूचा नवा उपप्रकार आढळून आला. त्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी काही नमुन्यांची RT-PCR चाचणीही पॉझिटिव्ह आली. रुग्णामध्ये इन्फ्लूएंझासारखी सौम्य लक्षणे होती. परंतु, काही दिवसांनी हे रुग्ण बरे झाले आहेत.


JN.1 हा विषाणू नेमका काय आहे?


करोनाचा JN.1 हा उपप्रकार BA.2.86 प्रकाराशी संबंधित आहे. सामान्यतः तो पिरोला म्हणून ओळखला जातो. करोनाचा हा नवा उपप्रकार आधीच्या उपप्रकारांच्या तुलनेत स्पाइक प्रोटीनमध्ये फक्त एक अतिरिक्त उत्परिवर्तन करत आहे. पिरोलाचे आधीच्या उपप्रकारांच्या तुलनेत स्पाइक प्रोटीनमध्ये ३९ पेक्षा जास्त उत्परिवर्तन होत आहे. यामुळे शास्त्रज्ञ त्यावर लक्ष ठेवून होते. Sars-CoV-2 च्या स्पाइक प्रोटीनवरील उत्परिवर्तने महत्त्वपूर्ण आहेत. कारण ते मानवी पेशींवरील रिसेप्टर्सला जोडतात आणि व्हायरसला त्यात प्रवेश करू देतात.


JN.1 मुळे रुग्णसंख्या वाढ होऊ शकते का?

पिरोला अधिक प्रभावीपणे प्रतिकारशक्तीला शह देत त्वरीत पसरू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात होती, मात्र, तसे झालेले नाही. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या मते, देशात उपलब्ध अद्ययावत लसींमुळे पिरोला संसर्ग प्रभावीपणे रोखता येऊ शकला. पण तरीही लोकांनी JN.1 पासूनही स्वत:चे संरक्षण केले पाहिजे.


JN.1 उपप्रकाराचे रुग्ण का वाढत आहेत?

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलेय की, GISAID या जागतिक डेटाबेसवर अपलोड केलेल्या Sars-CoV-2 अनुक्रमांपैकी पिरोला आणि त्यांच्या वंशजांचा वाटा १७ टक्के आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक रुग्ण डिसेंबरच्या सुरुवातीस JN.1 चे होते. जागतिक डेटाबेसवर JN.1 च्या किमान तीन हजार रुग्णांची माहिती अपलोड केली गेली होती. त्यातील बहुतेक रुग्ण अमेरिका, कॅनडा आणि युरोपीय देशांमधून आले होते. “BA.2.86 आणि JN.1 सारखी नवीन रूपे लक्ष वेधून घेत असताना, सध्या SARS-CoV-2 प्रकारांपैकी ९९ टक्के भाग हा XBB गटाचा भाग आहे, असेही US CDC ने म्हटले आहे.


JN.1 उपप्रकारापासून कसे कराल स्वतःचे संरक्षण?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की Sars-CoV-2 चे नवीन उपप्रकार येतच राहतील. श्वासोच्छवासाच्या विषाणूपासून संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रकरणांची संख्या वाढत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे बंद करा आणि जाणारच असल्यास मास्क घाला. हवेशीर जागेत राहिल्याने संसर्गाचा प्रसार कमी होतो. संसर्ग टाळण्यासाठी वारंवार हात धुवा आणि सामाजिक अंतर ठेवा.

जगातील सर्वात उंच 10 शिखर


(1)माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) - 8848 मीटर उंच.


(2)माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) - 8611 मीटर उंच.


(3)कांचनगंगा (भारत ) - 8586 मीटर उंच.


(4)ल्होत्से (नेपाळ) - 8516 मीटर उंच.


(5)मकालू (नेपाळ) - 8463 मीटर उंच 


(6)चो ओयू (नेपाळ) - 8201 मीटर उंच.


(7)धौलागिरी (नेपाळ) - 8167 मीटर उंच.


(8)मानसलू (पश्चिम नेपाळ) - 8163 मीटर उंच


(9)नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर) - 8125 मीटर उंच.


(10)अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ) - 8091 मीटर उंच.


(11)गशेरब्रु( हिमालय) - 8068 मीटर उंच.


(12)ब्रॉड पिक (बाल्टिस्तान) - 8051 मीटर उंच.


(13)गशेरब्रूम - 2 - (हिमालय) 8035 मीटर उंच


(14)शिशापंग्मा (तिबेट) - 8027 मीटर उंच

बॉक्साइट -


📌बॉक्साइटचे सर्वात जास्त उत्पादन झारखंड  राज्यात होते.


📌झारखंड नंतर छत्तीसगड राज्याचा दुसरा   क्रमांक लागतो .


📌 महाराष्ट्र, ओरिसा, मध्ये प्रदेश या राज्यातही  बॉक्साइटचे साठे आहेत.


📌अल्युमिनियमची निर्मिती बॉक्साइट पासून होते.


📌बॉक्साइटचा उपयोग प्रामुख्याने विमान व  जहाज बांधणी तसेच सिमेंट व लोहपोलाद

  कारखान्यात होतो.


📌महाराष्ट्रात बॉक्साइटचे २९ % साठे  आढळतात.


📌महाराष्ट्रात कोल्हापूर,सिंधुदुर्ग,रत्नागिरी,  सांगली, सातारा  इ. ठिकाणी साठे आढळतात.


सध्या महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत त्यातील कोणत्या जिल्यामधून कोणत्या जिल्यांची निर्मितीचा प्रस्ताव ?

 

👉 नाशिक जिल्यातून - मालेगाव आणि कळवण


👉 ठाणे जिल्यातून - मीरा-भाईंदर आणि कल्याण


👉 बुलडाणा जिल्यातून - खामगाव


👉 यवतमाळ जिल्यातून - पुसद


👉 अमरावती जिल्यातून - अचलपूर


👉 भंडारा जिल्यातून - साकोली


👉 चंद्रपूर जिल्यातून - चिमूर


👉 गडचिरोली जिल्यातून - अहेरी


👉 जळगाव जिल्यातून - भुसावळ


👉 लातूर जिल्यातून - उदगीर


👉 बीड जिल्यातून - अंबेजोगाई


👉 नांदेड जिल्यातून - किनवट


👉 सातारा जिल्यातून - माणदेश


👉 पुणे जिल्यातून - शिवनेरी


👉 पालघर जिल्यातून - जव्हार


👉 रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड


👉 रायगड जिल्यातून  - महाड


👉 अहमदनगर जिल्यातून - शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर

सामान्य ज्ञान


1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?

उत्तर-  सोलापूर


2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?

उत्तर- अहमदनगर


3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

उत्तर- 21 जून


4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?

उत्तर- 1761


5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?

उत्तर- 22 जुलै 1947


6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?

उत्तर-जेम्स वॅट


7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?

उत्तर- तेलंगणा


8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर- छत्रपती संभाजीनगर 


9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?

उत्तर- बहिणाबाई चौधरी


10) डेसीबल या एककाने  काय  मोजतात ?

उत्तर- ध्वनीची तीव्रता


1) देशाचे नवीन 12 वे मुख्य माहिती आयुक्त कोण बनले आहेत

उत्तर :- हिरालाल समरिया


2)37 व्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन कोणत्या राज्यात केले जाणार आहे?

उत्तर :- गोवा


3) केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या नवीन स्वायत्त संस्थेच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे?

उत्तर :- ’मेरा युवा भारत’


4) जागतिक भूक निर्देशांक 2023 भारताचे स्थान?

उत्तर :-111


5) नुकताच ‘आपत्ती जोखीम कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस’ कधी साजरा करण्यात आला?

उत्तर:- १३ ऑक्टोबर

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा


Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

✅ प्रो. मुकुंद थट्टाई


Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट्रबिंग द पीस अवार्ड’ने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ सलमान रश्दी


Q.3) विश्वचषकात सर्वाधिक षटके मारणारा खेळाडू कोण ठरला आहे?

✅ रोहित शर्मा


Q.4) 37 व्या इन्फंट्री कमांडर परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?

✅ मध्य प्रदेश


Q.5) भारतातील सर्वात मोठी शीत तेल उत्पादन सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे?

✅ गुजरात


Q.6) अलीकडेच कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘आईना डॅशबोर्ड फॉर सिटीज’ पोर्टल सुरू केले आहे?

✅ गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय


Q.7) अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील सिबकथोर्न फळाला जीआय टॅग देण्यात आला आहे?

✅ लडाख


Q.8) स्पर्मव्हेलसाठी जगातील पहिले सागरी संरक्षित क्षेत्र कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे?

✅ डोमिनिका


Q.9) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सागरी सुरक्षा कवच मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे?

✅ सिंधुदुर्ग


Q.10) आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस केव्हा साजरा केला जातो?

✅ 16 नोव्हेंबर


Q.11) एकदिवशीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50 शतक करणारा जगातील पहिला खेळाडू कोण ठरला आहे?

✅ विराट कोहली


Q.12) 21,500 फूट उंचीवरून उडी मारणारी जगातील पहिली महिला स्कायडायव्ह कोण ठरली आहे?

✅ शीतल महाजन


Q.13) केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींना व्याजारात किती टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे?

✅ 1%


Q.14) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातून प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाचा शुभारंभ केला आहे?

✅ झारखंड


Q.15) दिवाळीच्या दिवशी 22 लाखांहून अधिक मातीचे दिवे जाळण्याचा विश्वविक्रम कोणत्या शहराने केला आहे?

✅ अयोध्या


Q.16) तिन्ही सैन्यांच्या संयुक्त युद्धसराव ‘त्रिशक्ती प्रहार’ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे?

✅ राजस्थान


Q.17) 14 तासात 800 भूकंपानंतर कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केली आहे?

✅ आइसलँड


Q.18) पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर कोणत्या देशाला अलीकडेच नवीन बेट मिळाले आहे?

✅ जपान


Q.19) नुकतेच कोणत्या भारतीय खेळाडूचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे?

✅ वीरेंद्र सेहवाग


Q.20) राष्ट्रीय प्रेस दिवस कधी साजरा केला जातो?

✅ 16 नोव्हेंबर


प्रश्न – नुकताच गोवा मुक्ती दिन कधी साजरा करण्यात आला?

उत्तर – १९ डिसेंबर


प्रश्न – नुकतेच रमण सिंह यांची कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे?

उत्तर - छत्तीसगड


प्रश्न – कुशल कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी NSDC ने अलीकडेच कोणासोबत सामंजस्य करार केला आहे?

उत्तर - सौदी अरेबिया


प्रश्न – अलीकडे कृषी विपणन सुधारणांमध्ये कोणते राज्य अव्वल आहे?

उत्तर - आंध्र प्रदेश


प्रश्न – अलीकडेच ‘विजय हजारे ट्रॉफी’चे विजेतेपद प्रथमच कोणी जिंकले?

उत्तर - हरियाणा


प्रश्न – नुकत्याच आलेल्या IMF च्या अहवालानुसार, जागतिक विकासात भारताचे योगदान किती टक्के आहे?

उत्तर - 16%


प्रश्न – भारतीय सशस्त्र दलांना नुकताच ‘गोल्डन आऊल’ पुरस्काराने कोणत्या देशाने सन्मानित केले आहे?

उत्तर - श्रीलंका


प्रश्न – अलीकडे देशाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून कोणत्या राज्याची  उदयास आली आहे?

उत्तर - महाराष्ट्र


प्रश्न – आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू मिचेल स्टार्कला कोणत्या संघाने अलीकडेच विकत घेतले आहे?

उत्तर - कोलकाता नाईट रायडर्स


प्रश्न – नुकताच ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन’ कधी साजरा करण्यात आला?

उत्तर - 14 डिसेंबर


प्रश्न – 2023 मध्ये गुगलच्या टॉप ट्रेंडिंग ऍथलीट्सच्या यादीत एकमेव भारतीय क्रिकेटपटू कोण आहे?

उत्तर - शुभमन गिल


प्रश्न – अलीकडेच FDI प्राप्तकर्ता म्हणून देशात अव्वल कोण आहे?

उत्तर - महाराष्ट्र


प्रश्न – तामिळ कवी तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशात उद्घाटन करण्यात आले आहे?

उत्तर - फ्रान्स


प्रश्न – अलीकडेच PFRDA बोर्डाचे अर्धवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर - परम सेन


प्रश्न – नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मर्सरच्या 2023 गुणवत्ता जीवन निर्देशांकात कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले आहे?

उत्तर - हैदराबाद


प्रश्न – 2024 बुकर पारितोषिक निर्णायक पॅनेलमध्ये अलीकडे कोणत्या ब्रिटिश भारतीय संगीतकाराचा समावेश करण्यात आला आहे?

उत्तर - नितीन साहनी


प्रश्न – कोणते राज्य सरकार अलीकडे सर्व जिल्ह्यांमध्ये पीएम कॉलेज ऑफ एक्सलन्स स्थापन करणार आहे?

उत्तर - मध्य प्रदेश


प्रश्न – FIH हॉकी अवॉर्ड्स ज्युनियर वर्ल्ड कप 2023 नुकताच कोणत्या शहरात पार पडला?

उत्तर - क्वालालंपूर

मिस युनिव्हर्स

 ✅ ७२वी मिस युनिव्हर्स : शेनिस पॅलासिओस.


• निर्मिती - 28 जून 1952

• मुख्यालय - न्यूयॉर्क, यूएसए

• होस्ट - सॅन साल्वाडोर (जोस अॅडॉल्फो पिनेडा अरेना)


✅ मिस युनिव्हर्स 2023


- विजेता: शेनिस पॅलासिओस

- उपविजेता: अँटोनिया पोरझिल्डे (थायलंड)

- द्वितीय उपविजेता: मोराया विल्सन (ऑस्ट्रेलिया)


✅ भारतीय मिस युनिव्हर्स


- लारा दत्ता (2000)

- सुष्मिता सेन (1994)

- हरनाज कौर संधू (२०२१)


📌 इतर माहिती


- बोनी गॅब्रिएल (यूएसए) मिस युनिव्हर्स 2022

- टॉप 20 मध्ये भारतातील श्वेता शारदा

- स्पर्धेत 90 देश सहभागी झाले होते

- वार्षिक अर्थसंकल्प: 10 कोटी, सौंदर्य स्पर्धा संस्थेद्वारे आयोजित

साहित्य अकादमी पुरस्कार :- माहिती 🏆


◾️ साहित्य अकादमी ची स्थापना " 12 मार्च 1954 " रोजी झाली

◾️ मुख्यालय " नवी दिल्लीला " आहे

◾️ साहित्य अकादमी चे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते

◾️ भारतातील 24 भाषांच्या साठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो

◾️ भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टातील एकूण 22 भाषा आणि इंग्रजी व राज्यस्थानी अशा दोन भाषा या सर्व मिळून एकूण 24 भाषांच्या साठी हा पुरस्कार दिला जातो


 काही महत्वाच्या गोष्टी ‼️


◾️ मराठी साठी प्रथम साहित्य अकादमी पुरस्कार लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळाला

◾️2023 साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक हे आहेत

◾️ कृष्णात खोत यांच्या रिंगण या कादंबरीला मराठी भाषे करता साहित्य अकादमी पुरस्कार 2023 जाहीर झाला


❗️❗️ रिंगाण - कृष्णात खोत यांच्याविषयी ❗️❗️


◾️ मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत'

त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या

• गावठाण’ (२००५), 

• ‘रौंदाळा’ (२००८),

• ‘झड-झिंबड’ (२०१२), 

• ‘धूळमाती’ (२०१४),

• ‘रिंगाण’ (२०१८

• 'गरल्याविन भुई’ हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत

◾️रिंगाण ही कादंबरी प्रकल्पासाठी घरादारावर पाणी सोडून उठवलेल्या माणसांची परवड हा ‘रिंगाण’ कादंबरीचा एक धागा आहे

◾️ पुरस्काराचे वितरण 12 मार्च 2024 ला होणार आहे

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023


2023 चे विजेते


1. चिराग चंद्रशेखर शेट्टी आणि - बॅडमिंटन

2. रंकीरेड्डी सात्विक साई राज - बॅडमिंटन


दोन्ही क्रीडापटूंना त्यांच्या समान सांघिक कामगिरीसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 


सुरुवात – 1992


स्वरूप – 25 लाख रुपये 


जाहीर करणारे मंत्रालय - युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय


निकष - ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ खेळाडूला  मागील चार वर्षांच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो.


पुरस्काराचे पहिले मानकरी -  विश्वनाथ आनंद 


सर्वात तरुण मानकरी – अभिनव बिंद्रा


2021 पूर्वी या पुरस्काराचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे होते. 


2022 चे विजेते - शरथ कमल अचंता (टेबल टेनिस)


आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)


🔖 प्रश्न - देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रिय महामार्ग कोणत्या राज्यात आहेत अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली ?

ANS - महाराष्ट्र राज्यात 


🔖 प्रश्न - महाराष्ट्र राज्यात राष्ट्रिय महामार्गाची एकुण लांबी किती किलोमीटर आहे ?

ANS - १८,४५९ किलोमीटर 


🔖 प्रश्न - देशात सध्या किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रिय महामार्ग आहेत ?

ANS - १ लाख ४६ हजार १४५ किमी लांबीचे 


🔖 प्रश्न - इंदिरा गांधी अंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार –२०२३ कोणाला जाहीर झाला आहे ?

ANS - डॅनियल बरेनबोईम व अली अबू अव्वाद यांना 


🔖 प्रश्न - महाराष्ट्र राज्य सरकारने शासकीय भरती प्रक्रियेतील पेपर फुटी विरोधातील कायदा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली आहे ?

ANS - किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील


🔖 प्रश्न - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादी नुसार कोणते राज्य विदेशी गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे ?

ANS - महाराष्ट्र 


🔖 प्रश्न - कोणत्या वाहन उत्पादक कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारले ?

ANS - ऑडी कंपनीने - या कंपनीने मुंबई येथे देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारले


🔖 प्रश्न - महाराष्ट्र सरकारने राज्याचे नवीन अद्योगिक धोरण तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केली आहे ?

ANS - डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली


🔖 प्रश्न - देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोनत्या राज्यातील मुलुगू येथे स्थापन करण्यात येणार ?

ANS - तेलंगणा - या विद्यापीठचे नाव सम्माक्का सरक्का आदिवासी विद्यापीठ असे आहे.


🔖 प्रश्न - कोणत्या राज्याचा विधिमंडळाने लोकायुक्ताच्या कक्षेत मुख्यमंत्री व मंत्र्यांना आणणारा लोकायुक्त कायदा पारित केला ?

ANS - महाराष्ट्र


🔖 प्रश्न - महाराष्ट्र राज्याचा विधिमंडळाने पारित केलेल्या लोकायुक्त कायद्या मध्ये मुख्यमंत्र्याची चौकशी करण्यासाठी किती विधानसभा सदस्यांची परवानगी लागन्याची तरतुद आहे ?

ANS - दोनतृतियांश


🔖 प्रश्न - वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात भारताची आयात मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर च्या तुलनेत किती टक्क्यांनी घटली ?

ANS - ४.३३ टक्क्यांनी


🔖 प्रश्न - भारताच्या निर्यातीत नोव्हेंबर महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत किती टक्क्यांनी घट झाली ?

ANS - २.८ टक्क्यांनी 


🔖 प्रश्न - DRDO कडून कोणत्या राज्यामधील चीत्रदुर्ग येथे स्वदेशी हाय स्पीड मानवरहित हवाई वाहनाची चाचनी घेण्यात आली ?

ANS - कर्नाटक 


🔖 प्रश्न - आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्याचा डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत देशात कितवा क्रमांक आहे ?

ANS - तिसरा क्रमांक


🔖 प्रश्न - कोणत्या राज्याचा सरकारने अमली पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी अँटी नोर्कोटीक्स टास्क फोर्स स्थापन करण्याच्या निर्णय घेतला आहे ?

ANS - महाराष्ट्र


🔸१) युरोप व आफ्रिका ही खंडे आणि अमेरिका खंड यांदरम्यान .... हा महासागर पसरलेला आहे. 

- अटलांटिक


🔹२) उत्तर ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव ....

- रॉबर्ट पिअरे, अमेरिका


🔸३) दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला मानव .... 

- एल्ड अमुंडसेन, नॉर्वे


🔹४) इ. स. १४९२ मध्ये वेस्ट इंडीज बेटांचा शोध लावला ....

- ख्रिस्तोफर कोलंबस, इटली


🔸५) इ. स. १४९८ मध्ये .... याने केप ऑफ गुड होपला वळसा घालून भारताकडे येणारा जलमार्ग शोधून काढला.

- वास्को- द-गामा



प्रश्न – भारतातील सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट 'बॅराकुडा' नुकतीच कोठे लाँच करण्यात आली आहे?

उत्तर - केरळ


प्रश्न – नुकताच 2023 सालचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला मिळाला?

उत्तर – अली अब्बू आवाड आणि डॅनियल बेरेनबाईम


प्रश्न – अलीकडेच मिस इंडिया यूएसए 2023 चा खिताब कोणी जिंकला आहे?

उत्तर - रिजुल मैनी


प्रश्न – अलीकडेच ADB ने चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे?

उत्तर – ६.७%


प्रश्न – अलीकडेच बीसीसीआयने कोणत्या माजी क्रिकेटपटूची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे?

उत्तर - एमएस धोनी


प्रश्न – नुकताच सर्वात मोठ्या वाचनाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी मिळवला आहे?

उत्तर - पुणे


प्रश्न – कोणत्या बँकेने अलीकडेच जर्मन डेव्हलपमेंट बँकेसोबत सौर प्रकल्पासाठी क्रेडिट लाइनवर स्वाक्षरी केली आहे?

उत्तर – स्टेट बँक ऑफ इंडिया


प्रश्न – अलीकडेच पवन कुमार सेन यांची कोणत्या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर - अरुणाचल प्रदेश


प्रश्‍न – आंद्रे ब्रॅगर यांचे नुकतेच निधन झाले. ती कोण होती?

उत्तर - अभिनेता


🔸१) 'मराठी भाषेचे शिवाजी' म्हणविल्या जाणाऱ्या, परंतु सामाजिक सुधारणांच्या बाबतीत मात्र आपले प्रतिगामित्वच सिद्ध करणाऱ्या .... यांनी रानडे, फुले, आगरकर यांसारख्या कर्त्या समाजसुधारकांवर टीकेची झोड उठविली.

- विष्णुशास्त्री चिपळूणकर


🔹२) .... यांनी लिहिलेला 'अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन' हा संशोधनात्मक ग्रंथ प्रसिद्ध आहे.

- डॉ. रा. गो. भांडारकर 


🔸३) गांधीजींनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघातर्फे ११ फेब्रुवारी, १९३३ रोजी 'हरिजन' या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. 'हरिजन'चे पहिले संपादक म्हणून कोणाचा निर्देश कराल ? 

- आर. व्ही. शास्त्री


🔹४) स्त्रियांच्या उद्धारासाठी व उन्नतीसाठी पुण्यात 'आर्य महिला समाजा'ची स्थापना करणाऱ्या ..... या अनंतशास्त्री डोंगरे यांच्या कन्या होत.

- पंडिता रमाबाई


🔸५) 'अॅम्स्टरडॅम' येथे भरलेल्या जागतिक उदारधर्म परिषदेत 'हिंदुस्थानातील उदारधर्म' हा प्रबंध ..... यांनी वाचला.

- महर्षी वि. रा. शिंदे





एस. पी. गुप्ता कार्यदल-१९९९


▪️नियोजन आयोगाचे तत्कालीन सदस्य एस. पी. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली २० मे १९९९ ला लघुउद्योगांच्या विकासासाठी या अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली.


✍️शिफारसी  पुढीलप्रमाणे -


१) लघुउद्योगांची रचना ही त्रिस्तरीय म्हणजेच यामध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम अशी रचना असावी, तसेच लघुउद्योग क्षेत्राकरिता एकच वैश्विक कायदा असावा अशी शिफारस केली.


२) लघुउद्योगांना त्यांच्या उत्पादनामध्ये ५० लाख रुपयांपर्यंतच्या उत्पादनावरील उत्पादन शुल्कामध्ये सूट देण्यात येते. यामध्ये वाढ करून ती सूट मर्यादा एक कोटी रुपयांपर्यंत करण्यात यावी.


३) लघुउद्योगांचे तंत्रज्ञानावर्धन व आधुनिकीकरण करण्याकरिता ५००० कोटी रुपयांचा Technology upgradation And Modernisation Fund उभारण्यात यावा, तसेच ५०० कोटी रुपयांचा लघुउद्योग निर्माण निधी उभारण्यात यावा.


प्रमुख जमाती, त्यांची वस्ती, व्यवसाय व वैशिष्टे याबद्दल माहिती ‼️


♻️जमाती:-प्रदेश:-व्यवसाय:-वैशिष्ट्ये❗️


♻️लॅपलॅडर:-

▪️सूचीपर्णी अरण्याचा प्रदेश:-

▪️लाकूडतोडे व शिकार:-

▪️फासेपारधी


♻️एस्कीमो:-

▪️टंड्रा प्रदेश:-शिकार करणे:-

▪️कच्चे मांस खातात


♻️पिग्मी:-

▪️कांगो खोरे:-

▪️फळे, कंदमुळे गोळा करणे:-

▪️स्थलांतरित शेती


♻️रेड इंडियन:-

▪️उ.व.द.अमेरिका:-

▪️शिकार, मासेमारी:-

▪️फळे गोळा करणे


♻️झुलू:-

▪️सुदानी गवताळ प्रदेश:-

▪️शिकार करणे:-

▪️स्थलांतरित शेती


♻️बडाऊन(अरब):-

▪️सहारा वाळवंट:-

▪️ओअॅसिस शेती व व्यापार:-

▪️खगोलशास्त्रात प्रवीण आहे.


♻️ किरगीज:-

▪️आशियातील स्टेप/गवताळ प्रदेश:-

▪️पशूपालन:-

▪️युर्ट नावाच्या तंबूत राहतात/कुमीस नावाचे आवडते पेय


♻️ कोझक:-

▪️रशियातील गवताळ:-

▪️पशुपालन:-

▪️घोड्यावर बसण्यात पटाईत


♻️ गाऊची:-

▪️द.अमेरिकेतील/पंपासचा गवताळ प्रदेश:-

▪️पशुपालन:-

▪️मस्त व दांडग्या जनावरांना/वठणीवर आणण्यात वाकबगार


♻️ सॅमाइड:-

▪️सूचीपर्णी अरण्याचे प्रदेश:-

▪️फासेपारधी:

▪️लाकूडतोड व शेती करणे


♻️ ओस्टयाक:-

▪️सूचीपर्णी अरण्याचे प्रदेश:-

▪️फासेपारधी:-

▪️लाकूडतोड व शेती करणे


♻️ बुशमे:-

▪️नकलाहारी वाळवंट:-

▪️शिकार, फळे:-

▪️शिकार करण्यात पटाईत


♻️ ब्लॅक फेलोज:-

▪️ऑस्ट्रेलिया:-

▪️शिकार, फळे गोळा:-

▪️शिकारीचा माग काढण्यात पटाईत


♻️ मावरी:-

▪️न्यूझीलंड:-

▪️शेती व मासेमारी:-

▪️उत्तम योद्धे

चालू घडामोडी :- 22 डिसेंबर


◆ इस्रोच्या चांद्रयान-3 चंद्र मोहिमेला लीफ एरिक्सन चंद्र पुरस्कार मिळाला आहे.


◆ हरियाणातील कुरुक्षेत्र येथे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची सुरूवात झाली आहे.


◆ नोमा, ज्याला कॅन्क्रम ओरिस किंवा गँग्रेनस स्टोमाटायटीस असेही म्हणतात, अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगांच्या (NTDs) यादीमध्ये समाविष्ट केले गेले आहे.


◆ पूनम खेत्रपाल सिंग यांना भूतानच्या नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिटने सन्मानित करण्यात आले.


◆ गुवाहाटी येथे झालेल्या 75 व्या आंतरराज्य-आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्या. महिलांच्या सांघिक स्पर्धेत महाराष्ट्राने बाजी मारली आणि AAIने विजेतेपद पटकावले.


◆ लेफ्टनंट व्हाईस ॲडमिरल वेनॉय रॉय चौधरी यांना मरणोत्तर 'वीर चक्र' देऊन सन्मानित.


◆ ब्रम्हांडातील गुरुत्वाकर्षणाच्या लहरींचा अभ्यास करण्यासाठी जगातील तिसरी तर भारतातील पहिल्या लायगो वेधशाळेचे उद्घाटन 11 मे 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंगोली येथे होणार आहे.


◆ भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची निवड झाली आहे.


◆ साक्षी मलिक आणि विनेश फोगट या भारतीय कुस्तीपटूनीं कुस्ती मधून निवृत्ती जाहीर केली आहे.


◆ 14 वर्षा खालील राष्ट्रिय फुटबॉल स्पर्धा रांची होणार आहेत.


◆ 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी हैद्राबाद शहराला सर्वाधिक पसंती दिली आहे.


◆ 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटनामध्ये उत्तरप्रदेश राज्य प्रथम क्रमांकावर आहे.


◆ 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटना मध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे.


◆ 2023 मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी जगन्नाथ पूरी या तिर्थक्षेत्राला सर्वाधिक पसंती दिली आहे.


◆ पुणे पुस्तक महोत्सवा मध्ये 11 हजार 43 नागरिकांनी एकाच पुस्तकातील एकच परिछेद 30 सेकंदात वाचून चीन देशाचा विक्रम मोडला आहे.


◆ चालू आर्थिक वर्षाच्या जुलै सप्टेंबर तिमाहीत भारताचे एकुण कर्ज 205 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.


◆ भारताच्या एकूण कर्जामध्ये राज्य सरकारांचा हिस्सा 24.4 टक्के आहे.


◆ प्रेस आणि नियतकालिक नोंदनी विधेयक 2023 लोकसभेत मंजूर झाले आहे. ते 1867 वर्षाच्या प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स कायद्याची जागा घेणार आहे.


◆ प्रेस आणि नियतकालिक नोंदनी विधेयक 2023 लोकसभेत अनुराग ठाकूर यांनी मांडले.


◆ डॉ. प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले. ते साहित्य क्षेत्राशी संबंधित होते. 


◆ डॉ. प्रभाकर मांडे यांना भारत सरकारच्या वतीने पद्मश्री पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले होते.


◆ राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालानुसार देशात मुला- मुलीवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात 7.8 टक्के वाढ झाली आहे.


◆ राष्ट्रिय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवाला नुसार मुला मुलींवरील अत्याच्याराच्या गुन्ह्याची सर्वाधिक नोंद महाराष्ट्र या राज्यात झाली आहे.


◆ भारतीय दंड संहितेतील  511 कलमा एवजी आता नवीन कायद्यानुसार 358 कलमे झाली आहेत.


◆ डॉ. व्ही मोहिनी गिरी यांचे निधन झाले. त्या 1995-98 काळात भारताच्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या.


◆ भारतात 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणुन साजरा करतात येतो.


◆ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस देशात राष्ट्रीय गणित दिवस म्हणुन साजरा करतात येतो.


◆ प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युअल मॅक्रॉन राहणार उपस्थित.

२० डिसेंबर २०२३

चालू घडामोडी :- 20 डिसेंबर[Part 01] 2023

◆ मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार 'रिंगाण' कादंबरीला जाहीर झाला आहे.

◆ भारताने 'बॅराकुडा' लाँच केली, देशाची सर्वात वेगवान सौर इलेक्ट्रिक बोट.

◆ अंडर-19 क्रिकेट आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात बांगलादेश संघाने युएई चा पराभव केला आहे.

◆ झिंक फुटबॉल अकादमीने AIFF चे एलिट 3-स्टार रेटिंग मिळवले.

◆ अफगाण एनजीओला फिनलंडकडून आंतरराष्ट्रीय लैंगिक समानतेचा सन्मान मिळाला.

◆ PM मोदींनी वाराणसीच्या स्वरवद्ध महामंदिराचे अनावरण केले, जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र.

◆ भारतीय सशस्त्र दलाच्या अधिकाऱ्यांना DSCSC श्रीलंका येथे 'गोल्डन आऊल' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

◆ श्रीलंकेतील G20 शिखर परिषदेत डॉ. श्रीनिवास नाईक धारावथ यांना ग्लोबल आयकॉन पुरस्कार मिळाला.

◆ IIT कानपूरने तंत्रज्ञान विकासाला चालना देण्यासाठी भारतीय नौदलासोबत सहकार्य केले.

◆ NSDC आणि सौदी अरेबिया सरकारने भारतीय मजुरांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी हातमिळवणी केली.

◆ स्विफ्ट आपत्कालीन प्रतिसादासाठी NHAI ने ERS मोबाईल ॲप लाँच केले.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

चालू घडामोडी :- 20 डिसेंबर 2023

◆ नवीन शैक्षणिक धोरणात 'एआय'चा समावेश करणार अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

◆ नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र अपघातात तिसऱ्या क्रमांकावर आहे तर उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.

◆ ई-रक्तकोष पोर्टल :- ई-रक्तकोष पोर्टलच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील रक्त केंद्र आणि रक्ताची उपलब्धता याची माहिती या व्यासपीठावर मिळणार आहे.

◆ नोव्हेंबर 2022 मध्ये आधार अपडेटची मोहीम केंद्र सरकारच्या आदेशावरून जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाली.

◆ ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते सामाजिक उद्योजिका मधुलिका रामटेके यांना अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

◆ मधुलिका यांना राष्ट्रपतींनी 2021 मध्ये प्रतिष्ठित नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले आहे.

◆ छत्तीसगडमधील सामाजिक उद्योजिका असलेल्या रामटेके दोन दशकाहून अधिक काळ 'मॉ बमलेश्वरी बँक'च्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा राजमार्ग प्रशस्त करत आहेत.

◆ कोलकाता नाइट रायडर्सने तब्बा 24 कोटी 75 लाखात मिचेल स्टार्कला आपल्या संघात सामावून घेतले.

◆ हैदराबादने तब्बल 20 कोटी 50 लाखात पॅट कमिन्सला संघात सामावून घेतले आहे.

◆ "ऊर्जा संवर्धन सप्ताह 14 डिसेंबर[“राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस"] ते 20 डिसेंबर" दरम्यान साजरा होत आहे.

◆ 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये होत असलेल्या 2024 IPL लिलावादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला पंजाब किंग्जने 11.75 कोटी रु. मध्ये आपल्या संघात सामावून घेतले आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...