०६ सप्टेंबर २०२३

येणाऱ्या सर्व सरळसेवा भरतीसाठी इंग्रजी व्याकरण विषयातील काही प्राथमिक निरीक्षणे आणि तयारीचा रोडमॅप

 नमस्कार विद्यार्थी मित्रानो,

सध्या अनेक सरळसेवा परीक्षा नियोजित असून काही परीक्षा पूर्ण झाल्या आहे.या सर्व परीक्षांमध्ये अतिशय महत्वाचा असा इंग्रजी विषय..या विषयावर आज आपण बोलणार आहोत. मागील काही दिवसात TCS ने वनरक्षक आणि इतर विविध पदांसाठी परीक्षा घेतली .या सर्व पेपर चे विश्लेषण करून इंग्रजी विषयातील काही प्राथमिक निरीक्षणे मी आपल्यासमोर मांडत आहे..

♦️इंग्रजी व्याकरणातील एक एक उपघटक समजून घेऊया..

1) PARTS OF SPEECH : (शब्दांच्या जाती )
          मराठीप्रमाणेच इंग्रजी मध्ये या उपघटकाचे महत्त्व अधिक आहे .यामध्ये विशेषतः Noun या घटकावर जास्त भर द्यायला हवा.. 2 ते 3 प्रश्न यावर दिसून येतात. Common noun , collective noun यावर प्रश्न विचारले गेले आहे..बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातील noun टॉपिक व्यवस्थित अभ्यासायला हवा.यामध्ये  प्राण्यांचे आवाज , कळप त्यांचे पिल्ले ह्यावर प्रश्न दिसून येत आहे .त्यामुळे हे घटक व्यवस्थित अभ्यासायला हवे.

2)Active voice and passive voice
        यावर Tcs ने घेतलेल्या पेपर मध्ये 2  प्रश्न साधारणपणे दिसून येतात. हा घटक अभ्यासताना to be + v3 यावर लक्ष असायला हवे कारण elimination पद्धतीने आपण सहज उत्तरापर्यंत पोहचत असतो.

3)Tense : काळ
        मराठी व्याकरणापेक्षा इंग्रजी व्याकरणात काळाचे महत्व खूप जास्त आहे.यामध्ये साधारणता 2 प्रश्न दिसून येतात.या घटकातील core अभ्यासावर लक्ष द्यावे.विविध नियम तसेच अपवाद देखील व्यवस्थित करून ठेवावे .

4)Direct & Indirect Speech-
        यामध्ये TCS ने विद्यार्थ्यांना फसवण्याचं काम केलेले आहे .त्यामुळे इथे key word वर भर देणे क्रमप्राप्त ठरते .म्हणजे शेवटी जे शब्द बदलत असतात त्यावर लक्ष असू द्यावे .उदा .now - then , before - after

5)Types of Sentence-
    या उपघटकात वाक्यरूपांतराचे प्रश्न दिसून येतात. positive वाक्य negative करणे यासारखे सोप्पे प्रश्न दिसून येत आहे.

6)Spelling Mistake
        TCS ने यावर सर्व पेपर मध्ये भर दिलेला आहे.एका वाक्यात अनेक शब्द देऊन चुकीची spelling विचारली जाते .या घटकाच्या तयारीसाठी pal & suri या पुस्तकातील spelling error चा घटक व्यवस्थित  अभ्यासायला हवा.

7)Parajumbles-
         हा अतिशय किचकट व अवघड वाटणारा विषय आहे.वाक्यांचा अर्थपूर्ण क्रम लावणे यामध्ये अपेक्षित असते .यामध्ये दिलेल्या 4 वाक्यामध्ये कोणत्याही दोन वाक्यांचा क्रम जर समजून घेतला तर elimination करून उत्तरापर्यंत पोहचता येऊ शकते. पहिलेच वाक्य कोणते आहे हे शोधायचा अट्टहास करून वेळ वाया घालवू नये.

♦️Vocabulary-
      Mpsc च्या विविध परीक्षामधील vocab TCS च्या पेपर मध्ये दिसून येत आहे.त्यासाठी अगोदरचे सर्व pyq त्यांच्या पर्यायासह व्यवस्थित अभ्यासले पाहिजे.
Synonyms  व antonyms  या घटकांवर प्रत्येकी 2 प्रश्न दिसून येतात .यासाठी pyq वरती जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे.
याप्रमाणेच TCS ने Idiom phrases व one word substitution यावर देखील प्रश्न विचारत आहे .तो घटक देखील व्यवस्थित अभ्यासायला हवा.

♦️ Books -
1)बाळासाहेब शिंदे सर
किंवा तुम्ही वापरात असलेल्या कोणत्याही क्लास नोट्स

2) कोणताही एक प्रश्नसंच
   
      वरील सर्व विश्लेषण बघता TCS ने घेतलेले पेपर फार सोप्पे नाही आणि फार अवघड देखील नाही .दोन्हीचा मेळ इथे दिसून येतो. त्यामुळे प्रश्नांचे स्वरूप समजून अभ्यास केल्यास निश्चित तुम्ही सर्वजण यशस्वी व्हाल हीच अपेक्षा..

०४ सप्टेंबर २०२३

मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे

ग्रंथाचे नाव            लेखकांची नावे

1)  हिंदुत्व –           विनायक दामोदर सावरकर

2) बुदध द ग्रेट –       एम ए सलमीन

3) समीधा –           डाँ बी व्ही आठवले

4) मृत्यूंजय –          शिवाजी सावंत

5) छावा –            शिवाजी सावंत

6) श्यामची आई –      साने गुरूजी

7) श्रीमान योगी –     रणजित देसाई

8) स्वामी –        रणजित देसाई

9) पानिपत –      विश्वास पाटील

10) युगंधर –     शिवाजी सावंत

11) ययाती –     वि.स.खांडेकर

12) कोसला –    भालचंद्र नेमाडे

13) बटाटयाची चाळ-    पु ल देशपांडे

14) नटसम्राट –     वि.वा शिरवाडकर

15) शाळा –       मिलिंद बोकील

16) एक होता कार्व्हर –   विना गव्हाणकर

17) बलुत –     दया पवार

18) व्यक्ती आणि वल्ली –    पु.ल देशपांडे

19) राधेय –      रणजित देसाई

20) दुनियादारी -सुहास शिरवळकर

21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव

22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर

23) पार्टनर – व.पु काळे

24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर

25) राऊ – ना.सं ईनामदार

26) असा मी असामी – पु.ल देशपांडे

27) पावनखिंड – रणजित देसाई

28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर

29) गोलपिठा – नामदेव ठसाळ

30) रणांगन -विश्राम बेडेकर

31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी

32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे

33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे

34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक

35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल

36) झूंज – ना.सं ईनामदार

37) झोंबी – आनंद यादव

38) उपरा – लक्ष्मण माने

39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी

40) चेटकीण – नारायण धारप

41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे

42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर

43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर

44) विनोद गाथा – पी.के अत्रे

45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर

46) उचल्या – लक्षमण गायकवाड

47) हास्यतुषार -पी.के अत्रे

48) भुमी -आशा बागे

49) मारवा – आशा बागे

50) पैस – दुर्गा भागवत

51) त्रतुचक्र – दुर्गा भागवत

52) प्रेषित – जयंत नारळीकर

53) अजगर – सी.टी खानोलकर

54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव

55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर

56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर

57) महानायक – विश्वास पाटील

58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे

59) गुलामगिरी -महात्मा फुले

60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे

61) पाचोळा – रा.रं बोराडे

62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले

63) माझा प्रवास – विष्णुभट गोडसे

64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार

65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील

66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर

67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे

68) अमृतवेल – वि.स.खांडेकर

69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे

70) धग – उद्दव शेळके

71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात

72) हिंदु – भालचंद्र नेमाडे

73) फकिरा -अन्नाभाऊ साठे

74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा

75) अग्नीपंख – अब्दुल कलाम

76) मुसाफिर – अच्युत गोडबोले

77) पांगिरा -विश्वास पाटील

78) झाडाझडती – विश्वास पाटील

79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे

80)  मी माझा – चंद्रशेखर गोखले

81) मर्मभेद – शशी भागवत

82) फास्टर फेणे – भारा भागवत

83) सखी – व.पु काळे

84) राशीचक्र -शरद उपाध्ये

85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी

86) चौघी जणी – शांता शेळके

87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर

88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर

89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत

90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार

91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे

92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी

93) वीरधवल -नाथ माधव

94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर

95) पावनखिंड – रणजित देसाई

96) प्रकाशवाटा – बाबा आमटे

97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे

98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे

99) एकच प्याला – राम गणेश गडकरी

100) किमयागार – अच्युत गोडबोले

101) युगांत – ईरावती कर्वे

102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती

103) निळावंती – मारूती चितमपल्ली

104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर

105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी

106) पडघवली – गो नी दांडेकर

107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी

108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे

109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे

110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर

111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत

112) लज्जा – तस्लिमा नसरीन

113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे

114) ईलल्म -शंकर पाटील

115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात

116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर

━━━━━━━━━━━━━━━━

३० ऑगस्ट २०२३

चालू घडामोडी

1) महाराष्ट्र राज्यात क्रांती गाथा या भारतीय क्रांतिकारकांच्या दालनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले?
✅ पंतप्रधान नरेंद्र मोदी

2) जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 कोठे आयोजित केली जाणार आहे?
✅ डेन्मार्क

3) जागतिक नमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत इशा सिंह आणि शिवा नरवाल यांनी कोणते पदक जिंकले?
✅ सुवर्ण

4) डोप चाचणीत अपयशी ठरल्याने कोणत्या भारतीय खेळाडूवर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे?
✅ दुती चंदवर

5) अलीकडेच मोफत अन्न पॅकेट योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे?
✅ राजस्थान

6) भारत आणि कोणत्या देशात स्थानिक चलनात पहिला कच्चा तेलाचा व्यवहार अलीकडे झालेला आहे?
✅ UAE

7) कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी केंद्रिय मंत्री मंडळाने 32,500 कोटी रुपयांच्या किती रेल्वे प्रकल्पांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली?
✅ सात

8) महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणती नवीन योजना सुरू केली आहे?
✅  'लखपती दीदी’

9) नुकतेच जागतिक अँथलेटिक्स कार्यकारी मंडळावर कोणाची निवड झाली आहे?
✅ अदिले सुमारीवाला

10) भारतीय नौदलाच्या ताफ्यात नवीनतम INS विंध्यगिरी कोणी लाँच केली?
✅ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q.1) ब्रिक्स शिखर परिषद 2023 कोठे होणार आहे?
✅ - दक्षिण आफ्रिका 

Q.2) सिंगापूर मॅथ ऑलिम्पियाडमध्येराजा अनिरुद्ध श्रीराम या विद्यार्थ्याने कोणते पदक मिळवले आहे?
✅ – रौप्य

Q.3) भारतातील पहिली हायड्रोजनवर चालवणारी बस कोठे सूरू झाली आहे?
✅ - लडाख 

Q.4) UIDAI चे अर्धवेळ अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ - नीलकंठ मिश्रा

Q.5) दक्षिण पूर्व आशियातील सर्वात मोठ्या डिसॅलिनेशन प्रकल्पाची पायाभरणी कोठे करण्यात आली 
✅ –  तामिळनाडू 

Q.6) ‘डिजी यात्रा’ सुविधा मिळवणारे ईशान्येतील पहिले विमानतळ कोणते ठरले आहे?
✅ - गुवाहाटी विमानतळ

Q.7) निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
✅ - सचिन तेंडुलकर 

Q.8) जागतिक जल साप्ताह 2023 केव्हां साजरा केला जात आहे?
✅ - 20 ते 24 ऑगस्ट 

Q.9) 20 ते 31 ऑगस्ट या कालावधीत ओणम हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जाणार आहे?
✅ – केरळ 

Q.10) दरवर्षी कोणत्या दिवशी धर्म किंवा श्रद्धेवर आधारित हिंसाचाराच्या बळींचे स्मरण करणारा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो?
✅ - 22 ऑगस्ट

Q.1) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे?
✅ –  भारत 

Q.2) थायलंडच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
✅ - श्रेथा थाविसिन

Q.3) खेलो इंडिया महिला लीग आता काय म्हणून ओळखली जाईल?
✅ - “अस्मिता महिला लीग”

Q.4) FIDE विश्वचषक 2023 चा उपांत्य फेरीमध्ये पोहोचणारा आर प्रज्ञानंदा हा विश्वनाथ आनंद नंतर कितवा भारतीय ठरलेला आहे?
✅ -  पहिला

Q.5) कोणत्या राज्याला नैसर्गिक आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित करण्यात आले आहे?
✅ - हिमाचल प्रदेश

Q.6) भारत नवीन कार मूल्यांकन कार्यक्रम कोणाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे?
✅ – नितीन गडकरी

Q.7) कोणत्या देशाने त्यांच्या इतिहासात प्रथमच महिला विश्वचषक जिंकला आहे?
✅ – स्पेन

Q.8) जगातील सर्वात गंभीर पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय युवा युको-हिरो पुरस्कार 2023 मध्ये किती भारतीय तरुणांची नावे आहेत?
✅ – पाच 

Q.9) जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस कधी साजरा केला जातो?
✅ – 21 ऑगस्ट

Q.10) CSIR ने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अतूट समर्पणाला सन्मान म्हणून कोणती विशिष्ट कमळाची प्रजाती सादर केली?
✅ - 'नमोह 108’

Q.1) नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?
Ans - ग्रीस

Q.2)  69 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामधे सर्वात्कुष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?
Ans - एकदा काय झाल

Q.3)  भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने किती मीटर फाला फेकुन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला?
Ans - 88.77 मीटर

Q.4) नुकतेच सीमा देव यांचे निधन झाले आहे, त्या कोण होत्या?
Ans - अभिनेत्री

Q.5) 03 वर्षांसाठी इन्फोसिसचा राजदूत म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Ans - राफेल नदाल

Q.6) स्वच्छ वायु सर्वेक्षण-2023 मध्ये मध्य प्रदेशच्या IT हब इंदूरने क्रमांक मिळवला?
Ans - प्रथम

Q.7) NHA ने पहिले ABDM मायक्रोसाइट कोठे लाँच केले आहे?
Ans - मिझोरम

Q.8) दरवर्षी महिला समानता दिन केव्हां साजरा केला जातो?
Ans - 26 ऑगस्ट

Q.9) विंडहॅम रोटुंडा (ब्रे व्याट) यांचे वयाच्या 36 व्या वर्षी निधन झाल, ते कोण होते?
Ans - WWE कुस्तीपटू

२९ ऑगस्ट २०२३

थोडक्यात महत्वाचे सर्वांनी वाचून घ्या,लिहून काढा ,वाचलेले वाया जातं नाही.


🌀🙏

1) आजाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती?
👉 रास बिहारी बोस

2) राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते?
👉सर ए. ओ. ह्युम

3) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय  महिला अध्यक्ष कोण होती?
👉 सरोजिनी नायडू

4) राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
👉 व्योमेशचंद्र बॅनर्जी

5) काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात भरले होते?
👉 मुंबई

6) स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात?
👉 लॉर्ड रिपन

7) डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
👉 पंडित जवाहरलाल नेहरू

8) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
👉 रायगड

9) थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

10) शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे?
👉कागल

11) शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती?
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

12) मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती?
👉 महात्मा फुले

13) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे?
👉 महात्मा फुले

14) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणास म्हणतात?
👉 बाळशास्त्री जांभेकर

15) महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते?
👉 तुकडोजी महाराज

16) पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आहे?
👉 दर्पण

17) भारत रत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत?
👉 महर्षी धोंडो केशव कर्वे

18) भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली?
👉 26 जानेवारी 1950

19) लोकसभेची कमाल म्हणजे जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते?
👉 552

20) राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते?
👉 250

21) राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य निवडून येतात?
👉238

22) राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती कोण करतो?
👉 राष्ट्रपती

23) राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते?
👉 सहा वर्षे

24) राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो?
👉 उपराष्ट्रपती

25) महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात?
👉 48

26) महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात?
👉 19

27) भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?
👉 राष्ट्रपती

28) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?
👉 दिल्ली

29) भारतात सध्या किती उच्च न्यायालये आहेत?
👉 25

30) महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते?
👉 288

31) महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती असते?
👉 78

32) विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
👉 स्थायी / कायमस्वरूपी

33) भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे?
👉शेती

34) रोजगार हमी योजना राबवणारे पहिले राज्य कोणते?
👉 महाराष्ट्र

35) दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते?
👉 महाराष्ट्र

36) एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
👉वित्त सचिव

37) शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
👉 रिझर्व बँकेचे गव्हर्नर

38) ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेला होता?
👉 राजीव गांधी

39) महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना केव्हा झाली?
👉 1 मे 1962

40) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?
👉 ग्रामसेवक

41) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते?
👉 7 ते 17

42) जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील महत्त्वाचा दुवा कोणता?
👉 पंचायत समिती

43) जिल्हा परिषदेचे सर्वात महत्त्वाची समिती कोणती?
👉स्थायी समिती

44) गावात कोतवालाची नेमणूक कोण करते?
👉 तहसीलदार

45) सातबारा उतारा कोण देतो?
👉 तलाठी

46) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
👉 जिल्हाधिकारी

47) गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो?
👉 पोलिस पाटील

48) महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे?
👉 34

49) सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे?
👉 आठ

50) पृथ्वीला किती उपग्रह आहेत?
👉 एक

51) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
👉 गुरू

52) चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण?
👉 नील आर्मस्ट्रॉंग

53) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास काय म्हणतात?
👉 परिवलन

54) रिश्टर स्केल काय आहे?
👉 भूकंप मापक

55) दक्षिण गंगोत्री हे केंद्र कोणत्या महासागरामध्ये उभारलेले आहे?
👉 अंटार्टिका

56) अ जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो?
👉रातांधळेपणा

57) कुत्रा चावल्यानंतर वापरण्यात येणारी रेबीजची लस कोणी शोधून काढली आहे?
👉लुई पाश्चर

58) डेसीबल हे कशाचे एकक आहे?
👉 आवाजाची तीव्रता मोजण्याचे

59) मानवी शरीराचे सर्व सामान्य तापमान किती असते?
👉 37°c

60) सैनिक पेशी कोणत्या पेशींना म्हणतात?
👉 पांढऱ्या पेशी

61) उस्ताद बिस्मिल्ला खाँ हे कोणत्या वाद्याची संबंधित आहेत?
👉 शहनाई

62) बिहू हा लोक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
👉आसाम

63) संयुक्त राष्ट्रसंघ दिन केव्हा असतो?
👉 24 ऑक्टोबर

आजच्या चालु घडामोडी

🌑जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अमनप्रीत सिंग ने कोणते पदक जिंकले?

Ans- सुवर्ण

🌑 भारताच्या अमनप्रीत सिंग ने जागतिक नेमबाजी स्पर्धेत किती मीटर स्टॅ्डर्ड पिस्तूल प्राकारात सुवर्णपदक जिंकले?

Ans-२५

🌑 जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या महिला संघाने २५ मी. स्टॅडर्ड पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले?

Ans- कास्य

🌑 महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहरात झिका विषाणू चा पहिला रुग्ण आढळून आला आहे

Ans- मुंबई

🌑 महाराष्ट्र राज्यात झिका विषाणू चा पहिला रुग्ण जुलै २०२१ मध्ये पुणे जिल्यातील कोणत्या तालुक्यात आढळून आला होता?

Ans- पुरंदर

🌑 चंद्रावर यान पाठवणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे?

Ans- चौथा

🌑भारताच्या चांद्रयान मोहिमेतील चंद्रावर यशस्वी प्रक्षेपण झालेल्या लँडर चे नाव काय आहे?

Ans-विक्रम

🌑भारताच्या चांद्रयान मोहिमेतील विक्रम लँडर चे वजन किती किलो आहे?

Ans- १७४९.८६

🌑 भारताच्या चंद्रावर पोहचलेल्या विक्रम लँडर चे आयुर्मान पृथ्वीचे किती दिवस आहे?

Ans- १४

🌑भारताच्या चांद्रयान मोहिमेतील विक्रम लँडर ची ऊर्जा क्षमता किती आहे?

Ans- ७३८ वॅट

🌑 भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेचे प्रक्षेपण इस्रो च्या युट्युब वाहिनीवरून किती लाखा पेक्षा लोकांनी लाईव पाहुन जागतिक विक्रम केला आहे?

Ans- ८० लाख

🌑 सी. आर. राव यांचे नुकतेच निधन झाले.ते प्रसिद्ध भारतीय — होते?

Ans- सांख्यिकीतज्ञ

🌑 प्रसिद्ध भारतीय सांख्यिकीतज्ञ सी. आर. राव यांचे निधन कोठे झाले?

Ans- अमेरिका

🌑 भारतीय सांख्यिकीतज्ञ सी.आर.राव यांचे निधन झाले.त्यांना २०२३ मध्ये कोणता पुरस्कार मिळाला होता?

Ans- इंटरनॅशनल प्राईझ इन स्टॅटीस्टिक्स-२०२३

🌑ICC ने जाहीर केलेल्या एकदिवशीय क्रिकेट फलंदाजाच्या क्रमांवारीत भारतीय खेळाडू शुभमन गिल कितव्या स्थानावर पोहचला आहे?

Ans- चौथ्या

🌑 ICC ने जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेट फलंदाजी क्रमांवारीत भारतीय खेळाडू शुभमन गिल किती गुणासह चौथ्या स्थानी आहे?

Ans- ७४३

🌑 ICC ने जाहीर केलेल्या एकदिवशीय फलंदाजाच्या क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे?

Ans- बाबर आझम

🌑 महाराष्ट्र राज्यातील वर्सोवा-विरार सागरी सेतूला कोणत्या देशाकडून अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे?

Ans- जपान

🌑 देशातील पहिली हायड्रोजन बस कोठे धावणार आहे?

Ans- लेह

🌑भारताच्या चांद्रयान मोहीमेतील विक्रम लँडर ने एकूण किती किलोमीटर प्रवास केला आहे?

Ans-३,८४,४००

🌑 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना कोणत्या देशातील कोयासन विद्यापीठाणे मानद डॉक्टरेट पदवी देण्याची घोषणा केली.

Ans- जपान

🌑जपान देशातील कोयासन विद्यापीठाणे कोणाला मानद डॉक्टरेट पदवी देण्याची घोषणा केली आहे?

Ans- देवेंद्र फडवणीस

🌑जपान येथील कोयासन विद्यापिठाकडून मानद डॉक्टरेट पदवी मिळणारे देवेंद्र फडवणीस हे कितवे भारतीय आहेत?

Ans- पहिले

🌑जून २०२३ अखेर पर्यंत जगात सर्वाधिक सोन्याचा साठा कोणत्या देशात आहे?

Ans- अमेरिका

🌑 जगात सर्वाधिक सोन्याचा किती टन साठा अमेरिकेत आहे?

Ans-८१३३

🌑जून २०२३ अखेर पर्यंत भारतात एकूण किती टन सोन्याचा साठा आहे?

Ans- ७९७

🌑 वर्ल्ड ऑफ स्टॅटीस्टिक्स च्या आकडेवारी नुसार देशातील एकूण वाईन उत्पादनाच्या किती टक्के उत्पादन महाराष्ट्र राज्यात होते?

Ans- ९०%

🌑 महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याला देशाची वाईन कॅपिटल म्हणतात?

Ans- नाशिक

🌑 जगात वाईन उत्पादना मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

Ans- अमेरिका

🌑 अमेरिकेत जगाच्या एकूण किती टक्के वाईन उत्पादन होते?

Ans- ८.६७%

🌑 RBI ने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार देशात २०२३ वर्षांमध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक FDI चे प्रस्ताव आले आहेत?

Ans-उत्तरप्रदेश

🌑 RBI च्या आकडेवारी नुसार देशात २०२३ मध्ये कोणत्या राज्यात सर्वात कमी FDI चे प्रस्ताव आले आहेत?

Ans- आसाम

🌑 RBI च्या आकडेवारी नुसार २०२३ वर्षात महाराष्ट्रात किती FDI टक्के प्रस्ताव आले आहेत?

Ans-(D) ७.९%

🌑 RBI ने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार देशात सर्वाधिक FDI चे किती टक्के प्रस्ताव उत्तरप्रदेश राज्यात आले आहेत?

Ans- १६.२%

🌑 RBI नुसार २०२२ या वर्षा मध्ये सर्वाधिक FDI प्रस्ताव येण्यामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर होत

Ans- महाराष्ट्र

🌑लंडन येथील ग्लोबल डाटा कंपनीच्या अहवालानुसार २०२३ वर्षात भारतात कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहाराचे प्रमाण किती लाख कोटी रुपया पर्यंत पोहचू शकते?

Ans-२७.९

🌑 भारतातील कॅशलेस व्यवहराचे प्रमाण या वर्षी किती टक्क्यापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे?

Ans- २८.६%

🌑भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो कोणत्या देशाच्या सहकार्याने लुपेक्स ही मोहीम राबवणार आहे?

Ans-जपान

🌑 राजस्थान च्या करोली धोलपूर जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प हा देशातील कितवा व्याघ्र प्रकल्प असणार आहे?

Ans- ५४

🌑 केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली आहे?

Ans सचिन तेंडुलकर

🌑केंद्रीय निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकरची किती वर्षं करारावर नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली आहे?

Ans- ३

🌑 नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेत भाग घेण्यासाठी कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत?

Ans- दक्षिण आफ्रिका

🌑 दक्षिण आफ्रिका मध्ये कितवी ब्रिक्स परिषद पार पडत आहे?

Ans- १५

🌑वाहणाच्या रस्ता सुरक्षा मानकामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने देशातील स्वनिर्मित पहिला क्रॅश चाचणी उपक्रम भारत एन कॅप ची सुरवात कोणाच्या हस्ते झाली?

Ans- नितिन गडकरी

🌑 स्वदेशी वाहन सुरक्षा प्रणाली भारत एनकॅप उपक्रमात किती टनापर्यंत वजनाच्या मोटारीची क्रॅश चाचणी घेण्यात येणार आहे?

Ans- ३.५

🌑 स्वदेशी वाहन सुरक्षा प्रणाली भारत एनकॅप देशात कधी पासून लागू होणार आहे?

Ans-१ ऑक्टोबर २०२३

🌑 भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्यावरील आधारित कोणत्या माहिती पटाला हॉंगकॉंग चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे?

Ans- पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया

🌑 भारताचा आर्थिक विकासाचा वेग एप्रिल-जून तिमाहीत किती टक्के राहील असें ईक्रा या पतमानांकन संस्थेने जाहीर केले आहे?

Ans- ८.५%

🌑जागतिक स्तरावर भारताची वाहन बाजारपेठ कितवी सर्वात मोठी वाहन बाजार पेठ बनली आहे?

Ans- तिसरी

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...