०५ ऑगस्ट २०२३

प्रश्न मंजुषा


 प्र.१ हवामान बदल कमी करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याच्या उद्देशाने राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाचे नाव बदलून 'पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय' ठेवण्याच्या प्रस्तावाला कोणत्या राज्याने नुकतेच मान्यता दिली?


1.महाराष्ट्र ✔️

2.उत्तर प्रदेश

3.गुजरात

4.मध्य प्रदेश


 प्र.२ हवामान, पाऊस, पूर यावर वास्तविक-वेळ माहिती आणि सतर्कतेसाठी कोणत्या राज्याने मेघासंदेश अॅप व वरुणमित्र वेब पोर्टल सुरू केले?


१.मध्य प्रदेश

२.कर्नाटक ✔️

३.ओडिशा  ‌‌

४. पश्चिम बंगाल



 प्र३. संरक्षण मंत्रालयाने "मेक इन इंडिया" उपक्रमाला चालना देण्यासाठी स्थानिक पुरवठादारांकडून किती वस्तू खरेदी करण्यास मान्यता दिली?


१.12

२.16 

३.26 ✔️

४. 22




प्र.४ नेव्हीमध्ये महिला अधिकार्‍यांना सेवानिवृत्तीसाठी किती महिन्यांत कायमस्वरूपी कमिशन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत?


१.8 महिने

२.3 महिने ✔️

३.6 महिने

४.12 महिने



 प्र.५ ड्रायव्हिंग लायसन्स अॅपला नाव द्या, जे सरकारने नुकतेच सादर केले आहे?


१.जी-यात्रा

२.सारथी ✔️

३.स्पॉटिफाई

४.मी-परिवाहन


 प्र.६ जपानच्या मदतीने पूर्ण केलेला पैठण (जयकवाडी) जलविद्युत प्रकल्प नदीवर आहे ?


१. गंगा

२. कावेरी

३.नर्मदा

४.गोदावरी ✔️



प्र.७  रेडक्लिफ लाइन ही एक सीमा आहे ?


१.भारत आणि पाकिस्तान ✔️

२.भारत आणि चीन

३.भारत आणि म्यानमार

४.भारत आणि अफगाणिस्तान



 प्र.८. त्रिपिताक ही पवित्र पुस्तके आहेत ?


१.बौद्ध ✔️

२.हिंदू

३.जैन

४.वरीलपैकी नहीं



 प्र.९ तुलसीदास, रामचरितमानस यांचे लेखक खालील पैकी कोणत्या शासकाचे समकालीन होते?


१.अकबर ✔️

२.हुमायूं

३.शाहजहां

४. शेरशाह सुरी




 प्र. १० हसणारा गॅस म्हणजे काय?


१. नायट्रस ऑक्साईड ✔️

२.कार्बन मोनॉक्साईड

३.सल्फर डाय ऑक्साईड ४.हायड्रोजन पेरोक्साइड






 प्र.११ सिनेमाच्या विकासातल्या सेवांसाठी सर्वोच्च पुरस्कार कोणाच्या नावावर दिला जातो?


१.राज कपूर

२.दादा साहेब ✔️

३.मीना कुमारी

४.अमिताभ बच्चन



स्पष्टीकरण:- 1969 या वर्षीपासून या पुरस्काराला सुरुवात झाली आहे. पहिलं पुरस्कार देवकी राणी यांना देण्यात आले आहे



 प्र.१२जगातील पहिला बायनरी अंक संगणक कोणी बनविला: झेड 1 ...?


१.कोनराड झुसे ✔️

२.केन थॉम्पसन

३.लन ट्यूरिंग

४.जॉर्ज बुले




 प्र.१३ खालीलपैकी कोणती जागा चिकनकारी कार्यासाठी प्रसिद्ध आहे, जी भरतकामाची पारंपारिक कला आहे?


१.लखनौ ✔️

२.हैदराबाद

३.जयपूर

४.म्हैसूर




 प्र.१४ पुढीलपैकी कोणता इंग्रजी चित्रपट हिंदीमध्ये डब केला गेला?


१.अलादीन ✔️

२.युनिव्हर्सल सोल्जर

३.वेग

४.लोह माणूस



Q.15  जागतिक यकृत दिन २०१९ ची  थिम काय होती ?


➡️ Love Your Liver and Live Longer

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात.

पर्याय :- 

👇👇👇👇👇👇👇👇

1. डोंगरी वारे 

2. दारिय वारे ✅

3. स्थानिक वारे

4. या पैकी नाही 


2⃣ पथ्वीवर चंद्राचे आकर्षक हे.......

पर्याय :- 

👇👇👇👇👇👇👇

1. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणा इतके असते.

2. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा जास्त असते.✅

3. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा कमी असते.

4. या पैकी नाही 


3⃣ चकीचे विधान ओळखा.

1. हवेचे आकारमान तिच्यावरील वायू दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते.

2. तापमान वाढविले असता हवेचे आकारमान वाढते.

3. हवेवरील दाब वाढविल्यास ती प्रसरण पावते.

पर्याय:- 

👇👇👇👇👇👇

1. फक्त 1

2. फक्त 2

3. फक्त 3 ✅

4. सर्व बरोबर


4⃣ गलिलिओ या शास्त्रज्ञाने तापमापकाचा शोध कोणत्या साली लावला.

पर्याय:- 

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1. 1607✅

2. 1707

3. 1807

4. 1907


5⃣ महाराष्ट्रचा सुमारे 30% भाग हा कोणत्या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे?

पर्याय:- 

👇👇👇👇👇👇

1. स्लेट

2. बेसाल्ट✅

3. टाईमस्टोन 

4. कार्टज


6⃣ गरुशिखर कोणत्या पर्वत रांगेत आहेत.

पर्याय 

👇👇👇👇👇👇👇

1. छोटा नागपूर 

2. अरवली ✅

3. माळवा 

4. विंध्य


7⃣ खालील विधानाचा विचार करा.

1. गोदावरीने महाराष्ट्र चे 49% खोरे व्यापले आहे.

2. कृष्णा नदीने महाराष्ट्र चे 25% खोरे व्यापले आहे.

3. कोकणातील नद्यांनी महाराष्ट्र चे 29% क्षेत्र व्यापले आहे.

पर्याय :- 

👇👇👇👇👇👇👇👇

1. फक्त 1 व 2 

2. फक्त 2 व 3

3. फक्त 1 व 3 ✅

4. फक्त 3


8⃣ राज्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा .

पर्याय :- 

👇👇👇👇👇👇👇👇

1. तापी - गोदावरी - सीन - भीमा - कृष्णा✅

2. गोदावरी - तापी - सीना - कृष्णा -  भीमा 

3. सीना - तापी - गोदावरी - भीमा कृष्णा

4. गोदावरी - कृष्णा - भीमा - तापी सीना


9⃣ कष्णा नादिवरती खालील पैकी कोणते धरण आहे? 

पर्याय :- 

👇👇👇👇👇👇👇

1. कोयना 

2. धोम ✅

3. चांदोली 

4. राधानगरी


1⃣0⃣ खालील पैकी कोणते शहर पर्जन्यछायेच्या प्रदेशात आहे? 

पर्याय :- 

1. अहमदनगर

2. पुणे 

3. सातारा 

4. वरील सर्व✅


1⃣जनागड चा नवाब याने पाळलेल्या ८०० कुत्र्यापैकी नवाब मोहमद महाबत खानजी यांची विशेष आवडती कुत्रीचे नाव काय होते ?

पर्याय:-

👇👇👇👇

1) जोमिनिका

२) नुस्तरी

३)रोमानिका 

४)रोशन आरा✅✅

 

2⃣ 'शाळा व कॉलेजपेक्षा कारखाने भारताच्या राष्ट्रनिर्माण कार्यास जास्त हातभार लावू शकतील' हे विधान खालीलपैकी कोणाचे आहे?

पर्याय:-

👇👇👇

1)न्या. रानडे ✅✅

2)आचार्य प्रफुल्लचंद्र रे

3)दादाभाई नौरोजी

4)महात्मा फुले



3⃣खरिस्त पूर्व ३२३ मध्ये बॉबीलोन येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि .............आणि........यांनी लोकांना परकीय आक्रमका विरूद्ध भडकावले?

पर्याय:-

👇👇👇

1) चंद्रगुप्त, चाणक्य✅✅

2)अशोक, बिंदुसार

3) चंद्रगुप्त, बिंबसार

4)अशोक रधागुप्त


4⃣तया व्यक्तच नाव सांगा,जिने स्वतः च्याच मृत्यूशिलेसाठी पुढीप्रमाणे स्मृतीलेख लिहून ठेवला होता:

"इथे- एक - असा चिरनिद्रा घेत आहे ज्यान माणसालाच नव्हे तर देवालाही सोडलं नव्हतं?

पर्याय:-

👇👇👇

1) आर के लक्ष्मण

2) बी के एस अयंगार

3)पू.ल. देशपांडे

4) खुशवंत सिंग✅✅



5⃣जलै १९४७ पर्यंत काही संस्थानचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता त्यात पुढील संस्थाने होती?

a) बडोदा

b) त्रावणकोर

c) बिकानेर

d) भोपाळ

पर्याय:-

👇👇👇

१)वरील सर्व

२)a,c

३)b,c

४)b,d ✅✅


6⃣इग्रजी सत्ते विरूद्ध  महात्मा गांधी नेतृत्वाखलील अहिंसक आंदोलनापैकी

जनमानसाला गतिशिल करणारी सगळ्यात प्रभावी चळवळ तुमच्या मते कोणती?

पर्याय:-

👇👇👇

१)चले जाव

२) स्वदेशी वापर व परदेशी मालावर बहिष्कार चळवळ

३)सविनय कायदेभंग चळवळ✅✅

४) उपोषण


7⃣खालीलपैकी कोणत्या बौध्द ग्रंथात सोळा महाजन पदाचा उल्लेख आढळतो?

पर्याय:-

👇👇👇

1) अंगुत्तर निकाय✅✅

2) प्रज्ञापरमितासूत्र

3) नीतिशास्त्र

4) दिर्घ निकाय


♻️♻️विभाग अर्थशास्त्र♻️♻️


8⃣Lamitye हा लष्करी सराव भारत व कोणत्या देशादरम्यान नुकताच पार पडला?

पर्याय:-

👇👇👇

1)मालदीव

2)मॉरिशस

3)सेशेल्स✅✅

4)सिंगापूर


9⃣ई-टॅक्सी सेवा सुरु करणारे भारतातील पहिले शहर कोणते? 

पर्याय:-

👇👇👇

1) बेंगळूरु

2) नागपूर✅✅

3) बडोदा

4) मुंबई


🔟खालीलपैकी योग्य विधाने निवडा.

अ) भारताने तिसरे अवमूल्यन जुलै 1993 ला केले.

ब) तिसरे अवमूल्यन झाले त्यावेळी तत्कालीन वित्तमंत्री पी.व्ही. नरसिंहराव होते.

पर्याय:-

👇👇👇

1) अ योग्य

2) ब योग्य 

3) अ, ब योग्य 

4) अ, ब अयोग्य✅✅



१. श्रीनगर, लेह व जम्मू एकमेकांना जोडल्या गेल्यास जवळपास कशी आकृती निघेल? 
१) समभूज त्रिकोण 
२) काटकोन त्रिकोण 
३) सरळ रेषा 
४) वरीलपैकी कोणतीही नाही 

उत्तर 2

2 कृषी दुष्काळाचा कोणती  कोणती महत्त्वपूर्ण कारणे आहेत?
अ) अपूरे पर्जन्यमान
ब) पावसाचा दिर्घ खंड (पावसाळ्यात)
क) वातावरणातील व हवामानविषयक दुष्काळ
 पर्यायी उत्तरे
१) अ आणि ब फक्त २) ब आणि क फक्त
३) अ आणि क फक्त ४) अ, ब आणि क
  
उत्तेर 1

प्र. ३. असा कोणता देश आहे की ज्यात कोणतेही खनिज आढळत
नाही? 
१) फ्रांस २)स्विझरलँड३) स्वीडन ४) पेरु 

उत्तर 2

प्र. ४. कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली? 
 १) १९८० २) १९८५ ३) १९९० ४) १९९५

उत्तर  3

प्र5 Which beach in Asia is the first one to get Blue Flag certification?
a. Kovalam beach
b. Marari beach
c. Anjuna beach
d. Chandrabhaga beach
उत्तर 【d】

प्र 6 योग्य क्रम लावा. (मुलभूत कर्तव्य)
अ) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे
'ब) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे ।
क) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे 
ड) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे.
पर्यायी उत्तरे ।
१) अ, ब, क,ड । २) अ, ड, क, ब
३) अ, ब, ड, क ४) अ, ड, ब, क

उत्तर 2

प्र.7 मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर  मलभूत कर्तव्ये .......च्या अपेक्षा आहेत
१) मंत्रीमंडळ
२) जनता 
३) प्रतिनिधी 
४) सर्वोच्च न्यायालय 

उत्तर 2

प्र 8 खालील बाबींचा विचार करा .
अ) भारतीय राज्यघटनेनुसार भारताच्या राष्ट्रपतींना
मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो.
ब) राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा
मंत्रीमंडळाकडे पाठवू शकतात परंतु पुनर्विचारानंतर
मंत्रीमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक
नाही.
१) अ व ब दोन्ही बरोबर आहे
२) अ बरोबर व ब चुक आहे
३) ब बरोबर व अ चुक आहे
४) अ व ब दोन्ही चुक आहे.

उत्तर 2


प्र.9जेव्हा.......... अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद
बरखास्त होते. 
१) सामान्य लोकात २) राज्य सभेत
३) लोकसभेत ४) संसदेत

उत्तर  3

 प्र 10 भारताच्या संचित निधीतून देयके (Payments) देण्यासाठी.....द्वारे अधिकृत केले जाते. 
१) वित्त विधेयक २) विनियोजन अधिनियम
३) वित्तीय अधिनियम ४) संचित निधी अधिनियम

उत्तर 2

प्र 11 A, B, C, D, E, F आणि G एका कुटुंबाचे सदस्य आहेत. ज्यामध्ये चार वयस्कर असून तीन बालक आहेत, त्यापैकी दोन F आणि G मुली आहेत. A आणि D हे भाऊ असून A डॉक्टर आहे. E एक इजिनियर असून दोन भावांपैकी एका सोबत विवाहबद्ध असून E ला दोन अपत्ये आहेत. B, D सोबत विवाहित आहे; आणि G त्यांचे अपत्य आहे. तर C कोण आहे? 
(1) A चा मुलगा
(2) E ची मुलगी
(3) F चे वडील
(4) G चा भाऊ

उत्तर A चा मुलगा

प्र 12 'अ' शहरापासून 'ब' शहराला जाण्यासाठी बसचे चार मार्ग आहेत. 'ब' शहरापासून 'क' शहराला जाण्यासाठी बसचे सहा मार्ग आहेत. 'अ' शहरापासून 'क' शहराला जाण्यासाठी किती मार्ग
आहेत? 
 (1) 24 (2) 12 (3) 10 (4) 8
उत्तर 1

प्र 13   210, 177, 144, 111,.. .....                         (1) 89 
(2) 77 
(3) 110
(4) 78
 
उत्तर  4

प्र 14 खालील मालिकेत गाळलेल्या जागी को
संख्या येतील
AC 10, EG 18, IS 32, MP 58,----------

(1) PQ 108
(2) QS 108
(3) RS 104 
(4) ST 106
उत्तर (2) QS 108.

प्र 15 विधाने 
(1) काही गाजर वांगे आहेत.
(2) काही वांगे सफरचंद आहेत.
(3) सर्व सफरचंद केळी आहेत.
निष्कर्ष
(I) काही सफरचंद गाजर आहेत
(II) काही केळी वांगे आहेत.
(III) काही केळी गाजर आहेत.

(1) फक्त निष्कर्ष I सत्य.
(2) फक्त निष्कर्ष llसत्य,
(3) फक्त निष्कर्ष IIlसत्य
(4) फक्त निष्कर्ष II किंवा III सत्य

पर्याय क्र. (2) फक्त निष्कर्ष II सत्य.


1)  भारतातील कोणत्या राज्यात लग्नाचे वेळेचे सरासरी वय सर्वाधिक आहे.

पर्याय :- 
1) जम्मू काश्मीर✔️
2) केरळ
3) महाराष्ट्र
4) अरुणाचल प्रदेश 

2) भारतात उर्जासमस्या कशामुळे निर्माण झाली आहे ?

अ) कोळशाची कमतरता
 ब)  तेलाची मागणी पुरवठा असतोल 
क) पाणीटंचाई
ड) वीजशक्ती ची कमतरता

पर्याय :- 
1) अ ब क 
2) ब क ड
3) अ ब ड ✔️
4) वरील सर्व

3) तेराव्या वृत्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर उत्पादनातील किती टक्के वाटा राज्यांना मिळणार आहे?

पर्याय :- 
1)35%
2)33%
3)34%
4)32%☑️

4) खालील पैकी कशाचा समावेश अन्न सुरक्षा मिशन मध्ये करण्यात आला आहे?

अ) तांदूळ
ब) तेलबिया 
क)कडधान्य
ड) गहू 

पर्याय :- 
1) अ ब क
2) अ ब ड☑️
3) ड अ क
4) क ब ड 

5) खालील पत निर्मिती करते?
अ) RBI
ब) व्यापारी बँका
क) केंद्र सरकार
ड) अर्थ मंत्रालय 

पर्याय :- 
1) फक्त अ
2) फक्त ब✔️
3) अ ब क 
4) वरील सर्व

6) खालील पैकी कोणत्या पद्धतीने भारतातील उत्पन्न मोजले जाते?

पर्याय :- 
1) उत्पादन खर्च 
2) उत्पक पद्धती 
3) खर्च पद्धती 
4) उत्पादन व उत्पादन पध्दती✔️

7) 2009 पासून चलनात आणलेल्या 100 रु च्या नाण्यांचे वजन व व्यास किती आहे?

पर्याय :- 
1) 7 ग्रॅम 24 मिलीलिटर
2) 8 ग्रॅम 28 मिलीलिटर ✔️
3) 9 ग्रॅम 26 मिलीलिटर 
4) या पैकी नाही

8) भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते ?

पर्याय :- 
1) विशाखापट्टणम 
2) पॅरा हिप
3) मुंबई ✔️
4) तुतीकोरीन

9) मुक्त व्यापार म्हणजे काय ?
1) आयात - निर्यातीवर निर्बंध नसणे ✔️
2) आयात निर्यातीवर कर नसणे
3) निर्यात प्रोत्साहन
4) आयात निर्यातीस प्रोत्साहन देणे 

10) खालील संस्थेच्या त्यांच्या स्थापनेनुसार उतरता क्रम लावा?
1) NABARD
2)RBI
3)IDBI
4)IFCS

पर्याय :- 
1) 3,2,4,1
2) 2,4,3,1✔️
3) 2,1,4,3
4) 1,2,3,4

1) आयात - निर्यात पास - बुक योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली  ? 

1) पाचवी 
2) तिसरी 
3) सातवीं ✅
4) यापैकी नाही

2) 1857 च्या उठावाचे तात्कालिक कारण होते ----

1) गाईची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा वापर ✅

2) अनेक संस्थाने खालसा करणे 

3) ख्रिश्चन धर्मप्रसार करणे 

4) पदव्या, वतने आणि पेन्शन्स रद्द करणे

3) ------- हा मासा सर्वसाधारणपणे तळ्याच्या तळाला राहतो. 


1) रोहू 

2) कटला 

3) मृगल ✅

4) तिलापिया

4) महाराष्ट्रात --------- लाख चौ. हे क्षेत्र निमखार्या पाण्यातील मच्छीमारीसाठी योग्य आहे ?

1) 0.19✅

2) 0.50

3) 0.75

4) 0.90

5) महाराष्ट्र सुपारी या फळाचे संशोधन केंद्र --------- येथे आहे . 

1) भाट्ये, रत्नागिरी 

2) वेंगुर्ला, सिधुदूर्ग 

3) श्रीवर्धन, रायगड ✅

4) गणेशखिंड,पुणे

6) शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो ? 

1) समाज सेवा 

2) शैक्षणिक गुणवत्ता 

3) शास्त्रीय संशोधन ✅

4) साहित्य

7) सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ? 

1) 29✅

2) 27

3) 31

4) 25

8) जर O + H + P = 39 
M + A + N = 28
तर M + C + H + I + N + E = ? 

1) 43 

2) 53✅

3) 64

4) 54

9) " टू द लास्ट बुलेट " या पुस्तकाच्या लेखिका कोण? 

1) श्रीमंती किरण बेदी 

2) श्रीमती कविता करकरे 

3) श्रीमती स्मिता साळसकर 

4) श्रीमती विनिता कामटे व विनिता देशमुख ✅

10) खालीलपैकी कोण वित्तआयोगाची नियुक्ती करतो? 

1) राष्ट्रपती ✅

2) वित्तमंत्री 

3) पंतप्रधान 

4) गृहमंत्री

11) --------- is getting blurred.  I cannot see. Fill in the blank with the suitable option. 

1) Everything ✅

2) something 

3) Nothing 

4) ANYTHING

12) क्रमाने येणाऱ्या दोन धन विषयक संख्यांचा गुणाकार 255 असेल तर संख्या कोणत्या ? 

1) 15,17✅

2) 16,17

3) 19,16

4) 18,15

13) 11 ते 30 या संख्यांमध्ये विषम संख्याची बेरीज किती ? 

1) 250

2) 300

3) 200✅

4) 325

14) 7663 या संख्येतील 6 ह्या संख्याच्या स्थानिक किंमतीतील फरक किती ? 

1) 660

2) 540✅

3) 630

4) 450

15) 0.004 x 0.5 = ? 

1) 0.00020

2) 0.0020✅

3) 0.0200

4) 0.2000

16) choose from the given option which best expresses the opposite meaning of the word 

AFFLUENCE 


1) Influence 

2) poverty ✅

3) Indifference 

4) Riches 

🥨 सपष्टीकरण - AFFLUENCE चा अर्थ श्रीमंती होय ; म्हणून त्याच्या विरूद्धार्थी Poverty हा होय. 

17) " अवतीभोवती शोध घेऊन तो लवकर परतला ".  - या वाक्यातील कर्ता कोण ? 

1) शोध 

2) लवकर 

3) तो ✅

4) परतला 

🥨 सपष्टीकरण - क्रिया करणारा कर्ता असतो - तो

18) वाक्याचा प्रकार ओळखा. - काल फार पाऊस पडला.

1) विधानार्थी - होकारार्थी ✅

2) नकारार्थी 

3) उद्गारवाचक

4) प्रश्नार्थक 

🥨 सपष्टीकरण - कोणतेही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी असते.

19)भारताने कोणत्या देशाची संसद निर्माण करण्यात मदत केली ?
1) अफगाणिस्तान   ✅
2) इराण
3) श्रीलंका
4) बांग्लादेश

20) रवींद्रनाथ टागोरांनी _______ च्या राष्ट्रगानाची पण रचना केली.
1) पाकिस्तान
2) बर्मा
3) भूतान
4) बांग्लादेश   ✅

०१ ऑगस्ट २०२३

1935 चा कायदा.

▪️ त्यात 321 कलम, 14 भाग व 10 परिशिष्ट होती.

▪️अखिल भारतीय संघराज्य स्थापन करण्याची तरतूद होती पण अस्तित्वात आले नाही कारण संस्थानिकांना संघराज्यात सामील होणे ऐच्छिक होते ते सामील न झाल्याने संघराज्य या कायद्यानुसार कधीच अस्तित्वात आले नाही.

▪️ तीन सूची होत्या: संघ सूची, प्रांतिक सूची, समवर्ती सूची.

▪️ या कायद्यानुसार शेषाधिकार गव्हर्नर जनरल कडे होते 1919 च्या कायद्यानुसार मात्र केंद्र सरकारला होते.

 ▪️1919 च्या कायद्यानुसार  प्रांतिक स्तरावर dyarchy व्यवस्था निर्माण करण्यात आली होती ती आता केंद्र पातळीवर निर्माण करण्यात आली.

▪️ प्रांतिक स्तरावर 1935 च्या कायद्यानुसार प्रांतिक स्वायत्तता लागू करण्यात आली ते 1937 ते 1939 पर्यंत होती.

▪️ संघराज्य कायदेमंडळ द्विग्रहीच ठेवण्यात आलं जे की 1919 च्या कायद्यामध्ये प्रथमतः निर्माण करण्यात आले होते.

▪️ सहा प्रांतात द्विगृही कायदेमंडळ निर्माण करण्यात आलं: बंगाल, बॉम्बे, मद्रास, संयुक्त प्रांत, बिहार, आसाम.

 ▪️ फेडरल कोर्टाची स्थापना  1 आक्टोंबर 1937 रोजी 1935 च्या कायद्यानुसारच करण्यात आली पुढे 26 जानेवारी 1950 ला सुप्रीम कोर्टात त्याचे रूपांतरण झाले.

 ▪️फेडरल रेल्वे ऑथोरिटी निर्माण करण्यात आली.

 ▪️केंद्राकडून राज्यांना निर्देशाची कल्पनाही याच कायद्यानुसार घेण्यात आली.

 ▪️केंद्र व राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध 1935 च्या कायद्यातून घेण्यात आलेले आहेत.

▪️ आणीबाणी विषयक तरतुदी

 ▪️Advocate General हे पद गव्हर्नर जनरलच्या मदतीसाठी स्थापन.

 ▪️रिझर्व बँक स्थापनेची तरतूद होती पण स्थापना RBI ACT 1934 नुसार 1935 ला RBI ची स्थापना झाली. 

▪️या कायद्याने भारत मंत्र्याची इंडिया कौन्सिल रद्द करण्यात आली.

 ▪️या कायद्यावरील मत :

 पंडित नेहरू. : एक प्रबळ ब्रेक्स असलेले मात्र इंजिनच नसलेले मशीन असे म्हणाले.

 बॅरिस्टर जिना म्हणाले: संपूर्णपणे कुजलेला मूलभूतरित्या आयोग्य आणि पूर्णपणे अस्विकाराह्य असे ते म्हणाले.

 श्री राजगोपालचारी म्हणाले: द्विशासनापेक्षा खराब कायदा होता.

 पंडित मदन मोहन मालवी म्हणाले: हा नवीन कायदा आपल्यावर लादला जात आहे तो वर्करणी काहीसा लोकशाहीवादी वाटत असला तरी आतून पूर्णपणे पोकळ आहे.

           

३१ जुलै २०२३

बल व बलाचे वर्गीकरण

· निसर्गात आढलाणाऱ्या आणि परस्परांपासून भिन्न असणाऱ्या सर्व बलांचे 4 मुख्य गटात वर्गीकरण करता येते.

1. गुरुत्व बाल

2. विधुत चुंबकीय बाल

3. केंद्रकीय बल

4. क्षीण बल

गुरुत्वबल (Gravitational Force) :

· सफरचंद खालीच का पडले ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.

· न्यूटनच्या म्हणण्यानुसार विश्वातील प्रत्येक वस्तु दुसर्या वस्तूला स्वत:कडे ओढते. या प्रकारे प्रयुक्त आकर्षणबलास 'गुरुत्वबल' असे म्हणतात.

· हे बल परस्परांकडे आकर्षित होणार्‍या दोन वस्तूंच्या वस्तुमानावर अवलंबून असते. ओढणार्‍या वस्तूंचे वस्तूमान जास्त असेल तर बलाचे परिमाणही जास्त असते.

· एखाधा वस्तूवर समान अंतरावर पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते. कारण चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा कमी असते.

· गुरुत्वबल दोन वस्तूंमधील अंतरावरदेखील अवलंबून असते. जर दोन वस्तूंमधील अंतर कमी असेल तर त्यांच्यातील गुरुत्वबल जास्त असते.

· न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम असे सांगतो की विश्वातील कोणत्याही दोन वस्तु कोठेही असल्या तरी त्यांच्या परस्परांना आकर्षित करणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणकाराशी समानुपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते.

· F=G m1 m2 /r2 G = विश्वगुरुत्व स्थिरांक

· SI पद्धतीत G = 6.67 × 10-11 Nm2/kg2

· CGS पद्धतीत G = 6.67 × 10-8 dyne.cm2/g2

पृथ्वीचे गुरुत्व त्वरण -

· एखादी वस्तु विशिष्ट उंचीवरून हवेतून खाली सोडली तर ती सरळ खाली येते. खाली येताना वेग वाढतो. याचा अर्थ त्याच्यात त्वरण निर्माण होते. यालाच 'गुरुत्व त्वरण' असे म्हणतात.

· पिसा येथील झुलत्या मनोर्यातवरून एकाच वेळी वेगवेगळ्या वस्तूमानाचे दगड गॅलिलियोने खाली सोडले व असा निष्कर्ष काढला की गुरुत्व त्वरण हे वस्तूच्या वस्तुमानवर अवलंबून नसते.

· गुरुत्वत्वरण हे फक्त पृथ्वीच्या वस्तुमानावर व वस्तूच्या उंचीवर अवलंबून आहे, पण वस्तूच्या व्स्तुमानावर नाही.

· गुरुत्व त्वरण g = 9.8 m/s2 (सरासरी)

· पृथ्वीच्या त्रिज्या ध्रुवांजवळ कमी आहे. तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे.

· g चे मूल्य ध्रुवावर_ 9.83m/s2 आहे.

· g चे मूल्य विषुववृत्तावर_ 9.78m/s2 आहे.

वस्तुमान (Mass)-

· कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असणारा द्रव्यसंचय होय. वस्तुमान हो अदिश राशि असून SI एकक kg आहे.

· वस्तुमान सगळीकडे सारखेच आहे. ते कधीही बदलत नाही. वस्तुमान कधीही शून्य होत नाही.

· जितके वस्तुमान जास्त, तितके जडत्वही जास्त असते. दुकानामधील तराजू फक्त वस्तुमानांची तुलना करू शकतो.

वजन (Weight-

· एखाधा वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने ओढते त्याला वस्तूचे वजन म्हणतात.

· वस्तूचे वजन हे वस्तूवर कार्यरत असणारे पृथ्वीचे गुरुत्वबल होय.

· वजन ही सदिश राशी आहे. (w=mg)

·

· g ची किंमत सगळीकडे सारखी नाही. त्यामुळे वजनसुद्धा सगळीकडे सारखे नाही.

· वस्तूचे वजन ध्रुवावर जास्तीत जास्त तर विषुवृत्तावर सर्वात कमी राहील.

· गुरुत्व बलाच्या प्रभावापासून मुक्त अवकाशयानात अंतराळवीरांना वजनरहित अवस्थेचा प्रत्यय येतो. तो वजनदार वस्तु सहज उचलू शकतो. कारण तेथे प्रत्येक वस्तूचे वजन w शून्य असते.

मुक्तपतन-

· झाडाचे वाळलेले पान, पिकलेले फळ हे केवळ गुरुत्वाकर्षणामुळे खाली येतात. त्याला आपण मुक्तपतन असे म्हणतो.

· मुक्तपतनाच्या वेळी हवा या वस्तूला विरोध करते. कारण वस्तूचे आणि हवेचे घर्षण होते. खर्यात अर्थाने मुक्त पतन हे फक्त निर्वातातच शक्य आहे.

विद्युत चुंबकीय बल (Electromagnetic Force) :

· सामान्य पदार्थातील अणूंना व रेणूंना एकत्रित ठेवणार्याप बलास 'विद्युत चुंबकीय बल' असे म्हणतात.

· विधूतचुंबकीय बल गुरुत्वबलापेक्षा अनेक पटींनी मोठे आहे. उदा. हायड्रोजनच्या अनुमधील इलेक्ट्रॉन व प्रोटॉनमधील विधुत चुंबकीय बल जवळजवळ 10-7N असते.

इलेक्ट्रॉन व प्रोटॉन यांच्यावर प्रयुक्त गुरुत्वबल क्रमश: जवळपास 10-41N आणि 10-34N एवढे असते.

· विधुतचुंबकीय बलामुळेच नुकत्याच वापरलेल्या कंगव्याने कागदाचे बारीक कपटे ओढले जातात.

· लोखंडी खिळ्यावर लोहचुंबकामुळे प्रयुक्त झालेले बल हा विधुतचुंबकीय बलाचा प्रकार आहे.

· आपण निसर्गातील जी बहुतांश बले अनुभवतो, ती विधुत चुंबकीय बलेच असतात.

· धनप्रभारीत आणि ऋणप्रभारीत असे दोन प्रकारचे कण विधूतचुंबकीय बलात भाग घेतात.

· स्थिर विधुतकण गतीमान असतील तरच चुंबकीयबल प्रयुक्त होते. विधुतचुंबकीय बल आकर्षणबल किंवा प्रतिकर्षणबल असे शकते.

· अनुमधील इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन यांच्यातील परस्पर आकर्षणाला कारणीभूत बल हे विधूतचुंबकीय बलच असते. त्यामुळे अणूंचे अस्तित्व टिकून असते.

· गुरुत्वबल आणि विधुतचुंबकीय बल ही दोन्ही बले दोन वस्तु बऱ्याच अंतरावर असतानासुद्धा कार्यरत असतात. या दोन्ही बलांना दीर्घमर्यादा क्षेत्र असलेली किंवा लांब पल्ल्याची बले असे म्हणतात.

केंद्रकीय बल (Nuclear Force) :

· अणूचे जवळजवळ सर्व वस्तूमान केंद्रकात साठवलेले असते.

· अणूच्या केंद्रकात असणाऱ्या वेगवेगळ्या कणांवर कार्यरत गुरुत्व किंवा विधुत चुंबकीय या दोन बलाव्यतिरिक्त वेगळे बल केंद्रकात कार्यरत असते. या बलाला केंद्रकीय बल असे म्हणतात.

· या बलाची व्याप्ती केंद्रकापुरतीच मर्यादित असते. केंद्रकीय बल केंद्रकातील कणांना एकत्र ठेवते.

· केंद्रकीय बल अगदी लहान मर्यादा क्षेत्र असणारे बल आहे.

· दोन कनांमधील अंतर 10-15m पेक्षा कमी असल्यासच केंद्रकीय बल क्रिया करते.

· केंद्रकीय बलाचे परिमाण विधुत चुंबकीय बलाच्या 100 पट असते.

क्षीण बल (Weak Force) :

· इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्यात होणार्याअ अन्योन्यक्रियामध्ये प्रयुक्त होणारे बल हे चौथ्या प्रकारचे आहे. याला क्षीण बल म्हणतात.

· हे बल अत्यंत लहान मर्यादा क्षेत्र असलेले बल आहे.

· निसर्गात सापडणार्‍या किरणोत्सर्गी पदार्थांमध्ये हे बल प्रथम आढळले.

ज्वालामुखी


पृथ्वीच्या पृष्ठभागी जमिनीला भेग अथवा नळीसारखे भोक पडून त्याद्वारे जमिनीखालच्या खोलवर भागातील तप्त शिलारस (मॅग्मा) बाहेर येऊन पृष्ठभागावर वाहणे, तसेच स्फोटक वायुलोट आणि राखेसदृश्य असे खडकांचे लहानमोठे कण बाहेर फेकले जाणे, या क्रियेला ज्वालामुखी क्रिया म्हणतात.


 सर्वसामान्य ज्वालामुखी क्रियेत मध्यवर्ती नळीच्या वाटे तप्त शिलारस बाहेर येऊन नळीभोवती लाव्हा आणि राख यांची रास साचते व शंकूच्या आकाराचा उंचवटा तयार होत जातो, त्याला ज्वालामुखी हे नाव देतात.


ज्वालामुखी हे जळणारे पर्वत आहेत असा पूर्वी समज होता. ज्वालामुखीतून बाहेर उफाळणारे तप्त वायूचे लोट, धुरासारखे दिसणारे खडकांच्या सूक्ष्म कणांचे फवारे आणि उसळून सांडणारा तप्त शिलारस या सर्वांवरून ही एक पेटलेली निसर्गाची भट्टी आहे, असे वाटणे साहजिक होते. त्यामुळेच ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या खडकांच्या लहानमोठ्या कणांनाही ‘राख’, ‘अंगार’ (निखारे) अशीच नावे दिली गेली आहेत. पण भौतिक किंवा रासायनिक दृष्ट्या ज्वाला ‘ज्वलन’ म्हणता येईल अशी कोणतीही क्रिया ज्वालामुखी क्रियेत घडून येत नसते. क्वचित बाहेर पडणाऱ्या वायूंपैकी गंधकाची वाफ किंवा हायड्रोजन यांचे ज्वलन होते, पण ते एकूण क्रियेच्या मानाने अगदी नगण्य असते.


जमिनीवर येण्यापूर्वी भूपृष्ठाखाली काही खोलीवर असणाऱ्या तप्त द्रवाला शिलारस म्हणतात. शिलारस म्हणजे केवळ खडक वितळून तयार होणारा रस नव्हे. त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनेक वायू विरघळलेल्या अवस्थेत असतात. काही कारणाने या शिलारसावर असलेल्या खडकात भेगेसारखे दुर्बल प्रतल किंवा मार्ग सापडला की, दाबाखाली असणारा असा शिलारस पृष्ठभागाकडे येऊ लागतो.


 तो जसजसा पृष्ठभागाकडे घुसत जातो तसतसा वरच्या खडकांचा भार कमी होऊन शिलारसातील वायूंचा दाब वाढू लागतो. शेवटी सोडावॉटरच्या बाटलीचे बूच उडावे तसा वरचा टोपण खडक उडवून देऊन शिलारस उसळून जमिनीवर सांडतो.


शिलारस पृष्ठभागावर आला की, त्यात विरघळलेले बहुतेक वायू कमी-अधिक स्फोटकपणे किंवा शांतपणे बाहेर पडू लागतात. ज्या शिलारसातून बहुतेक वायू निघून गेले आहेत अशा द्रवाला लाव्हा म्हणतात.


मध्यवर्ती निर्गम द्वाराभोवती लाव्हा व राख यांची रास साचून तयार झालेल्या शंकूच्या आकाराच्या डोंगराचे तोंड ज्वालामुखी उद्रेकातील स्फोटाने उडून गेल्यामुळे किंवा खालचा शिलारस निघून जाऊन खाली पोकळी झाल्यामुळे बाजूच्या कडांचा आधार जाऊन त्या आत कोसळल्याने शंकूच्या माथ्याशी बशीसारखा खोलगट भाग तयार होतो, त्याला ‘कुंड’ म्हणतात. 


अशाप्रकारे सर्वसामान्य केंद्रीय उद्रेकात शंकू-कुंड रचनेचे ज्वालामुखी तयार होतात. काही उद्रेकांत मध्यवर्ती नळीच्या ऐवजी जमिनीत अरुंद व लांब भेग पडून तीतून लाव्हा बाहेर पडून आसपासच्या प्रदेशात थरांच्या रूपाने पसरतो. 


ही क्रिया बराच काळ चालू राहून आसपासच्या प्रदेशातील लहान मोठ्या दऱ्या भरून जातात व लाव्हा थरांचा पठारी प्रदेश निर्माण होतो. अशा ज्वालामुखी क्रियेला ‘भेगी उद्रेक’ म्हणतात.


केंद्रीय उद्रेकात लाव्हा नेहमीच मधल्या नळीतून बाहेर न येता कित्येकदा वर येताना खालच्या पातळीवरच बाजूने एखाद्या आडव्या भेगेतून तो बाहेर येऊन मुख्य शंकूच्या उताराच्या बाजूवर उपद्वारातून त्याचा उद्रेक होतो व तेथे उपशंकू तयार होतो.

 इटलीतील एटना या ज्वालामुखीच्या बाजूवर अशी २०० हून अधिक उपद्वारे व उपशंकू तयार झालेली आहेत.


ज्वालामुखीनिर्मितीची कारणे :


 ज्वालामुखी क्रियेचे सर्वांत प्रमुख अंग म्हणजे निर्गम द्वारातून तप्त शिलारस व वायू बाहेर पडणे हे असते. पूर्वी एकेकाळी असा समज होता की, पृथ्वीच्या पृष्ठभागी असणाऱ्या घन कवचाखाली सर्व जागी द्रव स्थितीतील शिलारस भरलेला असावा आणि वेळोवेळी ज्वालामुखींच्या वाटेने तो जमिनीवर येत असावा. 


परंतु भूकंपीय तरंगांच्या अभ्यासातून मिळालेल्या पृथ्वीच्या अंतरंगासंबंधीच्या माहितीवरून असे सिद्ध झाले आहे की, पृथ्वीचा बाहेरचा किमान २,९०० किमी. जाडीचा भाग पूर्णतया घन स्थितीत असला पाहिजे. म्हणजेच कवचाच्या खाली कोठेही मोठ्या प्रमाणात कायम स्वरूपाचा शिलारसाचा साठा असणे शक्य नाही. 


मात्र स्थानिक क्षेत्रात लहान कोठ्यांच्या (कप्प्यांच्या) स्वरूपात वेळोवेळी शिलारसाची निर्मिती होत असावी आणि असा तयार झालेला शिलारस कवचाच्या उथळ भागात येऊन त्याच्यापासून अंतर्वेशी अग्निज खडकांच्या राशी तयार होत असाव्यात, तसेच काही भाग ज्वालामुखी क्रियेने भूपृष्ठावर येत असावा अशी कल्पना आहे [⟶ अग्निज खडक].


शिलारस नेमका कोणत्या जागी, किती खोलीवर, केव्हा आणि कसा निर्माण होतो यांचे पुरेसे ज्ञान अद्याप झालेले नाही. भूपृष्ठीय परिस्थितीत सर्वसामान्य अग्निज खडकांचा वितळबिंदू १,०००° ते १,५००° से. असतो. भूपृष्ठापासून जसजसे खोल जावे तसतसे दर ३२ मी. खोलीला १° से.या प्रमाणात तापमान वाढत जाते. खोलीनुसार तापमान वाढण्याचे हे प्रमाण असेच राहिले, तर सु. ३० किमी. खोलीवर खडक वितळण्याइतके तापमान वाढलेले असेल.


 परंतु खोलीनुसार वरच्या खडकांच्या वजनामुळे दाबही वाढत जातो आणि वाढत्या दाबाप्रमाणे खडक वितळण्याचा बिंदूही वाढतो. त्यामुळे ३२ किमी. खोलीवर खडक वितळण्याइतके तापमान असूनही वाढत्या दाबामुळे तेथील खडक न वितळता घन राहतात.


 जर अशा जागी काही कारणाने खडकांवरील दाब तात्पुरता कमी झाला किंवा तापमानात बरीच वाढ झाली, तर तेवढ्या क्षेत्रातील खडक वितळून त्यांचा शिलारस होणे शक्य आहे.

ज्वालामुखी उद्रेकांचे प्रकार:

 ज्वालामुखीच्या उद्रेकांचे भेगी आणि केंद्रीय असे दोन ठळक प्रकार पडतात. भेगी उद्रेकात पृष्ठभागी पडलेल्या लांब भेगांतून अत्यंत तरल आणि सुवाही बेसाल्ट लाव्ह्याचे पूर पृष्ठावरून वाहत जाऊन जमिनीला समांतर थरात पसरतात. या प्रकारच्या उद्रेकाचे उत्तम उदाहरण आइसलँडमधील १७८३ सालचा उद्रेक होय. त्यावरून अशा उद्रेकांना आइसलँडी उद्रेक म्हणतात.

केंद्रीय उद्रेकामध्ये एखाद्या नळीसारख्या मध्यवर्ती निर्गम द्वारातून लाव्हा व अग्निदलिक पदार्थ बाहेर पडून ते द्वाराभोवती साचतात. लाव्ह्याचे रासायनिक संघटन व तापमान, विशेषतः लाव्ह्यात असणाऱ्या वायूंचे प्रमाण व दाब यांनुसार केंद्रीय उद्रेकाचे अनेक प्रकार होतात. त्यांतील महत्त्वाच्या प्रकारांचे वर्णन येथे दिले आहे.

1. हवाई प्रकार :
 यामध्ये मध्यवर्ती निर्गम द्वारातून अत्यंत सुवाही अशा लाव्ह्याचे निस्सारण होत असते. लाव्ह्यातील वायू शांतपणे बाहेर पडतात. क्वचित प्रसंगी कुंडात असलेल्या लाव्ह्याच्या पृष्ठावरून वेगाने बाहेर पडणाऱ्या वायूंच्या धक्क्यामुळे तप्त लाव्ह्याचे फवारे उडतात व ते वाऱ्याच्या झोतात सापडून लाव्ह्याच्या थेंबांचे तारेसारखे लांब काचतंतू तयार होतात. त्यांना ‘पेली’ या पॉलिनेशियन अग्निदेवतेवरून ‘पेलीचे केस’ असे म्हणतात. 
हवाई प्रकारच्या उद्रेकांमुळे विस्तिर्ण आकारमानाचे ढाल ज्वालामुखी तयार होतात.

हवाई उद्रेकाचा एक दुय्यम प्रकार लाव्हा तलाव हा आहे. ढाल ज्वालामुखीच्या कटाहात अत्यंत तप्त व तरल लाव्हा असतो. तलावाच्या मध्यातून वर येणारा तप्त लाव्हा चोहोबाजूंना काठाकडे वाहत जातो आणि काठाशी पुन्हा आत बुडून हे अभिसरणाचे चक्र चालू राहते. अशा प्रकारे काठाबाहेर लाव्हा न सांडता कटाहात दीर्घकाल एखाद्या तलावाप्रमाणे द्रव लाव्हा राहतो. 

कीलाउआ ज्वालामुखीतील हालेमाऊ माऊ नावाच्या कुंडामध्ये १८२३ पासून १९२४ पर्यंतच्या काळात असा लाव्हा तलाव तयार झालेला होता.

2. स्ट्राँबोली प्रकार :
 लाव्ह्याचा दाटपणा जसजसा वाढत जातो आणि त्याचा सुवाहीपणा कमी होतो, तसतसा लाव्ह्यातील वायू बाहेर पडण्यास होणारा अडथळा वाढत जातो व उद्रेकाचे स्वरूप अधिकाधिक स्फोटक होत जाते. हवाई लाव्ह्यापेक्षा काहीसा कमी सुवाही लाव्हा कुंडात उघडा पडला म्हणजे त्याच्या पृष्ठभागावरील थर घट्ट होतो आणि त्याच्याखाली अडकून पडलेले वायू साचत राहून मधून मधून धक्क्याने सौम्य स्फोटांच्या रूपाने निसटत राहतात. 

हे स्फोट ठराविक कालावधीने, तालबद्धतेने किंवा सातत्याने होत असतात. स्फोटामुळे लाव्ह्याचे लहान मोठे थेंब व गोळे हवेत फेकले जाऊन त्यांचे बाँब, लॅपिली, अंगार इ. पदार्थ होतात. अधिक जोराच्या स्फोटात तप्त लाव्ह्याचे कारंजे वर उडून त्याचा प्रकाशमान फवारा दिसतो. 
सिसिली बेटाच्या उत्तरेस असलेल्या लिपारी समूहातील ज्वालामुखींपैकी स्टाँबोली या ज्वालामुखीत अशी क्रिया दिसत असल्यामुळे या प्रकाराला त्याचे नाव मिळाले आहे. मॅक्सिकोतील पारीकूटीन हा ज्वालामुखीही स्ट्राँबोली प्रकारचा होता.

3. व्हल्कॅनी प्रकार : 
लिपारी समूहातील व्हल्कॅनो नावाच्या ज्वालामुखीवरून हे नाव दिले आहे. या प्रकांरातील लाव्हा बराच दाट असून कुंडात तो थिजून त्याचा घट्ट खडक होतो. थिजलेल्या कवचाखाली असलेल्या लाव्ह्यात बराच काळ वायू साचत राहून अखेर त्याचा दाब इतका वाढतो की, वरच्या कवचाच्या ठिकऱ्या उडवून फार मोठ्या प्रमाणात स्फोटक उद्रेक होतो. घनीभूत लाव्ह्याच्या कवचाचे लहान मोठे तुकडे आणि वायू यांचा प्रचंड लोट आकाशात खूपच उंच उसळून त्याचा फूलकोबीसारखा माथ्याशी विस्तारणारा ढग बनतो. हा ढग काळा दिसतो. 

दीर्घकाल निद्रिस्त असलेल्या ज्वालामुखीतून जेव्हा पुन्हा नव्याने उद्रेकाची सुरुवात होते तेव्हाचा उद्रेक व्हल्कॅनी प्रकाराने होतो. या उद्रेकाने नळीच्या तोंडाशी असलेला अडथळा उडवून देऊन नळी मोकळी करण्याचे कार्य होते.
4. व्हीस्यूव्हिअसी प्रकार : 

हा व्हल्कॅनी प्रकाराचाच पण अधिक उग्र स्फोटक आविष्कार आहे. दीर्घकालापर्यंत बाह्यतः निद्रिस्त असलेल्या ज्वालामुखीत नळीच्या खाली असणाऱ्या शिलारसातील वायूंचे प्रमाण व दाब वाढत वाढत इतके वाढते की, शेवटी नळीचे तोंड उडवले जाऊन अत्यंत उग्र स्फोटक रीत्या खालचा तप्त शिलारस बाहेर भिरकावला जातो.

 शिलारसावरील दाब एकदम कमी झाल्यामुळे त्यातील वायू मुक्त होऊन शिलारसाचे रूपांतर फेसाळ लोटात होते. हा लोट आकाशात खूप उंचीपर्यंत चढून त्याचा माथा विस्तारतो. फुलकोबीसारख्या आकाराचा हा विस्तारणाचा ढग तळपत्या शिलारसाच्या सूक्ष्म थेंबांमुळे प्रकाशमान झालेला असतो.

 व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखीच्या १९०६ सालच्या स्फोटक उद्रेकात वायूचा स्तंभ १० किमी. उंचीपर्यंत उसळला होता व सतत २० तासांपर्यंत वायूचा लोट बाहेर येत होता.या वायूच्या लोटामुळे ४५० मी. व्यासाचे नळीसारखे भोक पोखरले गेले.

5. प्लिनी प्रकार :
 हा व्हीस्यूव्हिअसी प्रकाराचा पण अत्यंत उग्र स्वरूपाचा स्फोटक उद्रेक आहे. या प्रकारात वर उसळणारा वायूचा लोट कित्येक किमी. उंच चढून विस्तारतो, त्यामुळे आसपासच्या विस्तृत प्रदेशात राखेचा वर्षाव होतो. 
व्हीस्यूव्हिअसच्या इ. स. ७९ सालच्या उग्र स्फोटक उद्रेकाचे वर्णन धाकटे प्लिनी यांनी लिहून ठेवले आहे, त्यावरून हे नाव दिले आहे. या उद्रेकात पाँपेई व हर्क्यूलॅनियम ही दोन मोठी शहरे नष्ट झाली व याच उद्रेकाचे जवळून निरीक्षण करण्याच्या प्रयत्नात थोरले प्लिनी (धाकट्या प्लिनींचे चुलते) यांचा अंत झाला.

6.पेली प्रकार : 
या उद्रेकात लाव्ह्याचा दाटपणा आणि वायूंची स्फोटकता यांची परमावधी होते. नळीच्या वरच्या भागात थिजून घट्ट झालेल्या लाव्ह्याचे टोपण इतके जाड झालेले असते की, खालच्या बाजूस लाव्ह्यात साचत असलेल्या वायूला ते उडवून देणे अशक्य होते.

 वरच्या बाजूने सुटकेचा मार्ग न उरल्याने वायूने भारलेला शिलारस नळीच्या बाजूला भेग पाडून तेथून बाहेर वाट काढतो व उतारावरून तप्त शिलारसाचे लोढें खाली वाहू लागतात. शिलारस बाहेर पडताच त्यातील वायू मुक्त होऊन त्याचा फेसाळ प्रवाह बनतो. 
या प्रवाहाच्या खालच्या बाजूने बाहेर पडणाऱ्या वायूंचा वंगणासारखा उपयोग होऊन घर्षणरहित झालेल्या उतारावरून शिलारसाचे अतितप्त फेसाळ लोंढे प्रचंड वेगाने खाली धाव घेतात. 

क्वचित प्रसंगी त्यांचा वेग ताशी १६० किमी.पर्यंत जातो. उतारावरून वेगाने धाव घेणारे हे लोंढे काळे वा तळपते (प्रकाशमान) असतात. त्यांना ‘न्ये आर्दांत’ असे फ्रेंच नाव आहे. मार्टिनिक बेटावरील माँ पले या ज्वालामुखीचा १९०२ मध्ये अशा प्रकारचा उद्रेक होऊन त्यात पायथ्याचे ३० हजार वस्तीचे सेंट पिअरे हे शहर काही क्षणांत बेचिराख झाले.

ज्वालामुखी क्रियेचे परिणाम :

 ज्वालामुखींच्या उद्रेकाने माणसांचे अतोनात नुकसान होते. राखेने व वायूने पिके नष्ट होतात. वेली व झाडे करपतात. क्वचित संपूर्ण शहरेही लाव्हा रसाने व राखेने बुडून जातात. 
असे असूनही ज्वालामुखी उद्रेकाची टांगती तलवार डोक्यावर बाळगून अशा प्रदेशात माणूस वस्ती करण्यास का उद्युक्त होतो, याचे आश्चर्य ज्वालामुखी प्रदेशापासून दूर राहणाऱ्यांना नेहमीच वाटत आलेले आहे. 
पण ज्वालामुखीचे कार्य केवळ विध्वंसक असते असे नव्हे, तर भूवैज्ञानिक दृष्ट्या ज्वालामुखी क्रियेमुळे भूकवचाच्या खडकात नवीन भर पडत असल्यामुळे हे कार्य रचनात्मक समजले जाते. 

चक्री वादळे, भूकंप , प्रचंड पूर इ. नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान ज्वालामुखी उद्रेकाने होणाऱ्या नुकसानीपेक्षा कितीतरी जास्त असते. इ.स. ७९ ची पाँपेईवर किंवा १९०२ मध्ये सेंट पिअरेवर कोसळलेली आपत्ती ही विरळा घडणारी घटना आहे.

 महायुद्धामुळे किंवा प्रतिवर्षी रस्त्यांवर होणाऱ्या मोटार वाहनांच्या अपघातांमुळे होणाऱ्या मानवी हत्येची  बरोबरी ज्वालामुखी करू शकत नाहीत. ज्वालामुखी उद्रेकाच्या धोक्याबरोबरच ज्वालामुखी प्रदेशातील सुपीक जमिनीचे आकर्षण माणसाला असते. लाव्ह्याचे अपक्षयजन्य (वातावरणीय प्रक्रियांनी तयार झालेले) पदार्थ वनस्पतींना आवश्यक अशा पोषक द्रव्यांनी परिपूर्ण  असतात.

ज्वालामुखीचे प्रकार:

ज्वालामुखींचे वर्गीकरण त्यांच्या  विस्फोटक स्थितीनुसार आणि पृष्ठभागावर विकसित केलेल्या लेयरच्या आधारे  केले जाते.

1.शील्ड ज्वालामुखी

लाव्हा दूरपर्यंत वाहतो म्हणून शिल्ड ज्वालामुखी जगातील सर्वात मोठे ज्वालामुखी आहेत. 
 ते मोठ्या उंचीवर तसेच जास्त अंतरावर आढळतात. 
शिल्ड volcano कमी उतार असलेले आणि जवळजवळ पूर्णतः गोठलेले लावापासून बनलेले आहेत. हे ज्वालामुखी बहुतेक बेसाल्टपासून बनलेले असतात, एक प्रकारचा लावा जो उकळतो तेव्हा अतिशय द्रव असतो.

 ते सर्वसाधारणपणे कमी स्फोटक असतात, परंतु जर पाणी उकळत असेल तर ते विस्फोटक बनू शकतात. येणारा नविन लाव्हा फव्वाराच्या स्वरूपात येतो आणि वरच्या शंकूकार दिशेने उत्सर्जित होतो.

2.सिंडर कोन ज्वालामुखी

हे अतिवृद्ध इग्निअस खडक आणि आकारात लहान असतात. हे स्कोरिया म्हणूनही ओळखले जाते. 
त्यात लहानलहान, दाणेदार सिंडर्स आणि जवळजवळ लावा नसलेली ओलकॅनो असतात. त्यांच्याकडे वरच्या बाजूला एक लहान क्रेटर असते आणि खूप जास्त  बाजूचा उतार असतो.
3. संयुक्त(composite) ज्वालामुखी

संयुक्त ज्वालामुखी मध्यम आकाराच्या बाजूचा आकारात असतात.कधीकधी, त्यांच्या शिखरांमध्ये त्यांच्याकडे लहान craters आहेत.

त्यांना स्ट्रेटो असेही म्हणतात कारण त्यामध्ये वाळूच्या थरांच्या मिश्रित घनदाट लावा प्रवाहांचे स्तर असतात. बेसाल्टापेक्षा थंड आणि अधिक ऍक्टिव्ह लावाच्या विस्फोटाने संयुक्त ज्वालामुखींचे वर्णन केले जाते. हे ज्वालामुखी बहुतेकदा  विस्फोट होऊन तयार होतात.

 पायरोक्लास्टिक पदार्थ आणि राख मोठ्या प्रमाणावर लावासह ग्राउंडमध्ये त्यांचा मार्ग शोधतात. ही सामग्री व्हेंट ओपनिंगच्या परिसरात जमा होते आणि लेयरची निर्मिती करते आणि त्यामुळे त्याला संयुक्त ज्वालामुखी पर्वत म्हणून ओळखतात.

4.कॅल्डेरा

पृथ्वीवरील ज्वालामुखीचे सर्वात मोठे स्फोटक कॅल्डेरा आहे. ते सामान्यतः इतके विस्फोटक असतात की जेव्हा ते उडतात तेव्हा ते कोणत्याही उंच संरचनेऐवजी स्वत: वर पडतात.

त्यांचे स्फोट हे दर्शवितात की त्याचा मेग्मा चेंबर मोठा आणि जवळच्याच भागामध्ये दिसून येतो.  कॅल्डेरा इतका वेगळा असतो की मोठ्या प्रमाणावरील विस्फोट झाल्यानंतर  मोठा उद्रेक होऊन लाव्हा बाहेर पडतो आणि क्रेटर एक लहान, जास्त वाळूचा ज्वालामुखीय खोलगट भाग असतो जो फवाऱ्यावाटे बाहेर पडतो.

ज्वालामुखीय लँडफॉर्म

ज्वालामुखीय विस्फोटक द्रव्यातुन सोडल्या जाणार्या लाव्हाचे रुपांतर अग्निज खडकात होते. 
लाव्हा थंड होण्याच्या स्थानावरून अग्निज खडकांना वर्गीकृत केले आहे:

ज्वालामुखीय अग्निजन्य खडक- यांना extruisve अग्निज खडक म्हणून देखील ओळखले जातात. रॉक कूलिंग पृथ्वीच्या पृष्ठभागावर होते. उदा. बेसाल्ट, अँथ्रेसाईट इ.

प्लुटोनिक अग्निजन्य खडक - या खडकांना Intrusive अग्निज खडक म्हणून देखील ओळखले जाते. खडकाचे शीतकरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर नसून क्रस्टमध्ये होते.
 उदा. ग्रॅनाइट, गॅबरो, डायओराइट इत्यादी. प्लुटोनिक अग्निज खडक त्यांच्या स्वरुपात खालील प्रकारांमध्ये विभागली जातात.

बाथोलिथ: मोठ्या डोमच्या आकाराच्या स्वरूपात खोल भागात असून चुंबकीय पदार्थांचे एक मोठे स्थान आहे. हे ग्रॅनिटिक भाग आहे.

लॅकोलिथ्स: मोठ्या डोमच्या आकारात intrusive भागाचा पातळी खाली आणि पाईप सारखी  असते. पृथ्वीच्या खाली ,संयुक्त ज्वालामुखी सारखी संरचना आहे.

लापोलिथ: ते आकारात saucer(उथळ बशी) आकाराचे आहेत, आकाशाकडे concave आहेत.

फॅकोलिथ्स: नागमोडी वळणात  पदार्थांचे  स्त्रोत  खाली निश्चित करण्यासाठी एक विशिष्ट नळीच्या आकाराचे आहे.

शीट: ते  आग्निज खडकांच्या क्षितिज समांतर भागाजवळ आहेत. पातळ स्तराना शीट म्हटले जाते आणि जाड आडव्या डिपॉझिटला सिल्स असे म्हणतात.

डाईक्स: जेव्हा लाव्हा क्रॅकमधून बाहेर येतात तेव्हा ते ग्राउंडला जवळजवळ लंबरुप बनवतात आणि डाईक्स नावाच्या संरचनेसारख्या उभ्या भेगामध्ये बनतात.

ज्वालामुखींचे वितरण

जगभरातील ज्वालामुखींचे वितरण खाली दिल्याप्रमाणे तीन बेल्टमध्ये आढळतात:

सर्कम पॅसिफिक बेल्ट

मिड-वर्ल्ड माउंटन बेल्ट

आफ्रिकन रिफ्ट व्हॅली बेल्ट

ज्वालामुखी तीव्र फोल्डिंग आणि फौल्टिंगच्या प्रदेशांशी संबंधित आहेत. ते किनार्यावरील पर्वत, बेटांवर आणि महासागराच्या मध्यभागी असतात. महाद्वीपमधील आंतरिक भाग ज्वालामुखी पासूनसामान्यतः मुक्त असतात. 

बहुतेक सक्रिय ज्वालामुखी प्रशांत(पॅसिफिक) महासागरिय प्रदेशात आढळतात.



द्रव्याचे वर्गीकरण (Classification of Matter's)

   भौतिक                    रासायनिक
        👇                        👇
  1) स्थायू.            ‌      1) मूलद्रव्य
  2) द्रव.             ‌ ‌       2) संयुगे
  3) वायु.                    3) मिश्रण
  4) आयनायू plasma
  5) Bose Einstein
      Condensate BEC

1)  स्थायू.(Solid)

◆ यांना निश्चित आकार व आकारमान असते.

◆ स्थायू पदार्थांचे आकारमान हे बाह्य बलाने बदलत नाही म्हणून असंपिड्य  असतात.

◆ स्थायू हे अधिक दृढ असतात.

◆ स्थायू मधील कण हे अतिशय जवळजवळ असतात, म्हणजेच त्यांच्या दोन कणा मधील अंतर खूपच कमी असते.

◆ यांच्यामध्ये सर्वाधिक आकर्षण (Stong Intraction) असते.

◆ स्थायू हे लवचिक असतात (elastic).

◆ काही स्थायूंना बाह्यबल लावल्यास ते कायमचे स्वतःचा आकार बदलतात या गुणधर्माला अकार्यता (प्लास्टिसिटी) म्हणतात.

◆ म्हणजेच अकार्यता,स्थितिस्थापकता, दृढता, असंपीड्यता हे स्थायू चे प्रमुख गुणधर्म आहेत.

★ स्थायू चे प्रमुख दोन प्रकार

1) अस्फटिकी स्थायू ( amorphous solid ):-

◆ अनियमित आकाराचे कण मिळून हे स्थायू तयार होतात, यांनाच आभासी स्थायू म्हणतात.

उदा . काच रबर प्लास्टिक
    
2) स्फटिकी स्थायू ( crystalline solid ):-

◆ यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्फटिकी कणे असतात, यामधील कणाची मांडणी ही नियमित असते.

उदा. मिठ, हिरा, ग्राफाईट इ.
============================

2) द्रव (Liquid):-

◆ द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते परंतु निश्चित आकार नसतो.

◆ यात अंतररेणूय आकर्षित बल (Inter Molecular force of attraction) स्थायू पेक्षा कमी व वायू पेक्षा जास्त असते.

◆ यामध्ये दोन रेणू तील परस्परांत स्थायु पेक्षा जास्त व वायू पेक्षा कमी असते.

◆ द्रव्य कमी संपिड्य असतात
============================

3) वायु (Gases):-

◆वायूला निश्चित आकार व आकारमान  नसते.

◆ वायू मधील दोन रेणू मधील परस्पर अंतर हे सर्वाधिक असते.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ परंतु दोन रेणू मधील आकर्षित बल सर्वात कमी असते.

◆ वायू सर्वात जास्त संपिड्य (Compressible) असतात.
============================

4). आयनायू (plasma )

◆ पदार्थांची ही अवस्था अतिशय जास्त तापमान व अतिशय जास्त ऊर्जेला अस्तित्वात असते.

◆ ही अवस्था आयनयुक्त वायूच्या स्वरूपात असते.

◆ निऑन बल्प यामध्ये निऑन वायू असतो.

◆ Fluorescent bulb - यामध्ये हेलियम वायू असतो.

◆ सूर्य आणि तारे हे याचा अवस्थेमुळे चमकतात.
============================

5) बोस आईन्स्टाईन कंडेनसेट ( BEC )

◆ 1920 मध्ये भारतीय भौतिक तज्ञ एस एन बोस यांनी या पाचव्या अवस्थेतीची संकल्पना मांडली.

◆ या संकल्पनेवर आधारित अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी द्रव्याची पाचवी अवस्था म्हणजेच BEC शोधून काढली.

◆ खूपच कमी घनता असलेल्या वायूला थंड करुन की अवस्था प्राप्त होते.
============================

◆ बाॅइल्सचा नियम :- दाब आकारमान संबंध नियम
   
◆ तापमान स्थिर असताना दिलेल्या वायूचा दाब हा नेहमी त्याच्या आकारमानाच्या व्यस्तानुपाती असतो
  
        p1V1 = p2V2
============================

Charles low. -  तापमान आकारमान संबंध नियम

◆ दाब स्थिर असताना दिलेल्या वायूच्या आकारमान हे नेहमी त्याच्या तापमानाच्या समानुपाती असते.

  V directly proportional to T
  
   V1 / T1 =  V2 / T2
============================

★ गे लुस्सेकस  चा नियम:- दाब -  तापमान संबंध

◆ आकारमान स्थिर असताना दिलेल्या वायूचा दाब हा नेहमी त्याच्या तापमानाशी समानुपाती असतो.

  P directly proportional to T

p1/T1.= p2 / T2
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

महाराष्‍ट्राचा-वाहतूक व दळणवळण रस्ते




👉 रस्त्यांचे वर्गीकरण करणारी रस्त्यांबाबतची योजना – नागपूर योजना (१९४१-६९)

👉 राज्यात महाराष्ट्राच्या आर्थिक पहाणी नुसार २,४०,०४० किमी. लांबीचे रस्ते असून त्यापैकी मार्च – २०१० पर्यंत

👉 राष्ट्रीय महामार्ग – ४३७६ किमी

👉 राज्य महामार्ग – ३४,१०२ किमी

👉 परमुख जिल्हा रस्ते – ४९,९०१ किमी

👉 इतर जिल्हा रस्ते – ४६,१०२ किमी

👉 गरामीण रस्ते – १,०४,८४४


 

👉 दशाच्या एकूण राष्ट्रीय महामार्गांपैकी महाराष्ट्रात – ४३७६ किमी (मार्च २०१० अन्वये) लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत.


👉 राज्यातील सर्वात मोठा महामार्ग – क्र. ६ (धुळे-कोलकाता)


👉 राज्यातील सर्वात लहान महामार्ग – क्र. ४ ब (नाव्हाशेवा-पळस्पे-२७ किमी)


👉 राज्यात सुरु होऊन राज्यातच संपणारे महामार्ग – 

👉 १) पुणे-नाशिक – क्र. ५० 

👉 २) महामार्ग क्र. ४ व 

👉 ३) रत्नागिरी-कोल्हापूर क्र. २०४ 

👉 ४) सोलापुर-धुळे क्र. २११


👉 राज्यांची रस्त्यांची घनता (१०० चौ कि.मी. मार्गे) – ८७ कि.मी.


👉 रस्त्याच्या घनेतत महाराष्ट्राचा क्रमांक – ४ तर 

👉 पणे जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत.

रस्ते बांधणीला चालना देण्यासाठी १९९६ साली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली.

या महामंडळाने बांधा वापरा व हस्तांतरित करा हे तत्व अवलंबिले आहे.


👉 मबई-पुणे द्रुतगती महामार्ग एम.एस.आर.डी.सी. नेच बांधला आहे.

एम.एस.आर.डी.सी. चे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ५० उड्डान पुल व२९ रेल्वे मार्गावरील उड्डान पूल बांधण्याचे काम चालू आहे.

👉 भारतील सर्वाधिक लांबीचे रस्ते महाराष्ट्रात आहेत. 


वनस्पतीचे वर्गीकरण.

उपसृष्टी : 1 अबीजपत्री - अपुष्प वनस्पती


विभाग - 1 : थॅलोफायटा

· शरीर साधे , मऊ ,तंतुमय 

· मूळ , खोड , पान, नसते.

· पाण्यात आढळतात .

· स्वयंपोषी असतात.

· लैगिक जननांग - युग्माकधानी


वर्ग - 1 : शैवाल

· वाढ पाण्यात , ओलसर ठिकाणी 

· उदा. शैवाल, स्पायरोगायारा, करा 

· प्रकाश स्वयंपोषी 


वर्ग - 2 : कवक

· परपोशी पोषण पद्धती 

· इतरांच्या शरीरात, शरीरावर किंवा मृतोपाजीवी असतात. 

· शरीर तंतुजालरूपी असते.

· तंतुरूपी कवकाना बुरशी म्हणतात.

· उदा. पेनिसिलीयम , म्युकर

· जननांगे मोठी आणि छत्रिसारखी असणाऱ्यांना 'छत्रकवके' म्हणतात.

· उदा . अगॅरिकस 

· एकपेशीय कवकाना 'किन्व' म्हणतात .

· उदा . सॅकरोमायसिस


शैवाक -

· शैवाल व कवक एकत्र वाढ 

· परस्परपूरक सहजीवन 

· उदा . उस्निया (दगडफूल)


जीवाणू -

· एकपेशीय आदिकेंद्रकी सजीव. 

· निरनिराळ्या पोषण पद्धती. 

· प्रजजन साध्या स्वरूपाचे. 


विभाग -२ : ब्रायोफायटा

· निम्नस्तरीय, बहुपेशीय, स्वयंपोषी, सावलीत राहण्याऱ्या उभयचर वनस्पती आहेत.

· बीजाणू निर्मितीचे प्रजनन करतात.

· शरीर चपटे , रीबिनसारखे व मऊ. 

· मुळासारखे दिसणारे मुलाभ असतात.

· उदा. मॉस, रिक्सिया , मार्केंशिया , अॅन्थॉसिरॉस, फ्युनारीया 


विभाग -3 : टेरीडोफायटा

· पाणी व खनिज वहनासाठी सुस्पष्ट संवहनी संस्था असते.

· मूळ, खोड, पाने असतात.

· सहसा लहान पर्णिका असतात.

· सावलीत व दमट वातावरणात वाढतात. 

· अलैंगिक प्रजनन बीजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन युग्मक निर्मितीद्वारे होते.


· 3 उपवर्गात विभाजन होते.


वर्ग -1 : लायाकोपोडीनी

· या वनस्पती नेच्यासारख्या असतात.

· उदा. लायाकोपोडीयम, सीलॅजीनेला 


वर्ग -2 : इक्वीसेटीनी

· नेच्यासारख्याच असतात.

· बिजानुधानीच्या समूहास शंकू म्हणतात.

· उदा. इक्वीसेटम 


वर्ग -3 : फिलीसिनी

· वनस्पतीचा सर्वात मोठा वर्ग आहे.

· या वनस्पतींना 'नेचे' म्हणतात.

· बिजानुधानीपुंज पानावर तयार होतात.

· उदा. नेफ्रोलीपीस, अॅडीएन्टम, किलॅन्थेस, टेरिस


उपसृष्टी : 2 बिजपत्री - सपुष्प वनस्पती


विभाग -1 : अनावृत्तबीजी वनस्पती

· यांना उच्चकुलीन वनस्पती असे म्हणतात. 

· या वनस्पतीच्या बिजांवर आवरण नसते. त्यांची मोठया आकाराची बीजे बृहद्बीजाणू पत्रांवर तयार होतात.

· काही वृक्ष मोठे व पुरातन असतात.

· उदा . सायकस, सूचीपर्णी (पायनस), देवदार (सेडस)

· सदाहरित, बहुवार्षिक 

· खोडाला फांद्या नसतात.

· नर व मादी फुले वेगवेगळया बिजानुपत्रावर येतात.

· फळे येत नाहीत.


विभाग -2 : आवृत्तबिजी वनस्पती


· या वनस्पतीची बीजे संरक्षक आवरणात असतात.

· फुले हीच प्रजननांगे असतात.

· अतिसूक्ष्म जलीय वनस्पती वुल्फिया टे प्रचंड आकाराच्या ऑस्ट्रेलीयन अकॅशिया किंवा युकॅलिप्टस् यांचा समावेश होतो.

· 2 वर्गात विभागणी होते.


वर्ग -1 व्दिबिजपत्री वनस्पती

· बियांच्या भ्रुनात दोन बिजपत्रे असतात.

· मूळ हे सोटमूळ प्रकारचे असते.

· पानाचा शिराविण्यास जालीकीय असतो.

· उदा. सुर्यफुल, सदाफुली, जास्वंद, लिंबू ,पेरू, आंबा, वाटणा, वाल, हरभरा, टोमॅटो, मिरची, वांगी ,कोथिंबीर, कापूस,तुळस 


वर्ग -2 एकबिजपत्री वनस्पती :

· बियांच्या भृणात फक्त एकच बिजपत्र असते.

· मुले तंतुसारखी , अपस्थानिक मुळे 

· पानांचा शिराविण्यास समांतर असतो.

· फुल त्रीभागी.

· उदा. गहू, तांदूळ, मका, ज्वारी, ऊस, गवत, बांबू , कांदा,लसून, कर्दळी, केली, पाम, ऑर्कीड


सार्वजनिक खर्चांचे वर्गीकरण :

निरनिराळ्या अर्थशास्‍त्रज्ञांनी भिन्न भिन्न आधारावर सार्वजनिक खर्चांचे वर्गीकरण केलेले आहे. 

सार्वजनिक खर्चांचे काही महत्‍त्‍वपूर्ण प्रकार आता बघुयात ..

 

अ) महसुली खर्च : 

महसुली खर्च हा सर्वसाधारणपणे शासकीय खात्‍यांवर आणि विविध सेवांवर केला जातो. हा खर्च  नियमितपणे उद्भवतो. 

उदा :-  

शासनाचा प्रशासकीय खर्च, 

शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार व भत्‍ते, निवृत्‍ती वेतन, वैद्यकीय सेवा आणि सार्वजनिक आरोग्‍यांचा खर्च इत्‍यादी.

 

ब) भांडवली खर्च : 

भांडवली खर्च म्‍हणजे देशाच्या वृदध् ी व  विकासासाठी नव्याने केला जाणारा खर्च होय. 

उदा :-

विविध विकास प्रकल्‍पांतील मोठ्या गुंतवणूका, शासकीय कर्जाची परतफेड, राज्‍य शासन व शासकीय कंपन्यांना 

दिलेले कर्ज इत्‍यादी भांडवली खर्चाची उदाहरणे आहेत. 

 

क) विकासात्‍मक खर्च :

विकासात्‍मक खर्च हा उत्‍पादक 

स्‍वरूपाचा असतो. ज्‍या खर्चामुळे रोजगार निर्मिती,उत्‍पादन वाढ, किंमतस्‍थेैर्य इत्‍यादी बदल घडून वाढ होते. त्‍याला 

विकासात्‍मक खर्च असे म्‍हणतात. 

उदा :-  

आरोग्‍य शिक्षण, औद्योगिक विकास, सामाजिक कल्‍याण, संशोधन आणि विकास यांवरील खर्च इत्‍यादी.

 

 ड) विकासेतर खर्च : 

शासनाच्या ज्‍या खर्चामुळे देशात कोणताही प्रत्‍यक्ष उत्‍पादक परिणाम होत नाही, त्‍याला विकासेतर किंवा बिगर विकास खर्च असे म्‍हणतात. 

उदा :- 

प्रशासकीय खर्च, युद्ध खर्च इत्‍यादी हे खर्च  अनुत्‍पादक स्‍वरुपाचे असतात.


Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...