२९ डिसेंबर २०२२

29 डिसेंबर चालू घडामोडी


Q.1) लष्कराचे इंजीनिअर-इन-चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

✅ अरविंद वालिया


Q.2) प्रति कृषी कुटुंब सरासरी मासिक उत्पन्नामध्ये देशभरात कोणते राज्य अव्वल आहे?

✅ मेघालय


Q.3) ऑस्ट्रेलियाचा पुरूष कसोटीपटूचा वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार आता कोणाच्या स्मरणार्थ दिला जाणार आहे?

✅ दिवंगत शेन वॉर्न


Q.4) __हे विज्ञानावरील G20 वर्किंग ग्रुपचे सचिवालय म्हणून घोषित करण्यात आले.

✅ IISc बेंगळुरू


Q.5) प्रथम केआर गौरी अम्मा राष्ट्रीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?

✅ अलेडा ग्वेरा


Q.6) “फोर्क्स इन द रोड: माय डेज अँट आरबीआय अँड बियॉन्ड” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

✅ सी. रंगराजन


Q.7) उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील ‘मुंदेरा बाजार’ नगरपरिषदेचे नाव बदलून काय केले जाणार आहे?

✅ चौरी-चौरा


Q.8) इंडियन बँकेने नुकतेच कोणत्या राज्यात ‘MSME प्रेरणा’ कार्यक्रम सुरू केला?

✅ राजस्थान


Q.9) BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2022 कोणाला निवडण्यात आले आहे?

✅ ब्लेथ मिड


Q.1) महाराष्ट्राचे संसदीय हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात चालू आहे?

✅ नागपूर


Q.2) मेंदू खाणाऱ्या अमिबा संसर्गाची पहिली घटना कोठे नोंदवली गेली?

✅ दक्षिण कोरिया


Q.3) नुकतेच पियुष गोयल यांनी ग्राहकांसाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे?

✅ राईट टू रिपेअर


Q.4) रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ अनिल कुमार लाहोटी


Q.5) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

✅ संतोष कुमार यादव


Q.6) निखत जरीन आणि लोव्हलिना बोरगोहेन यांनी एलिट राष्ट्रीय महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले?

✅ सुवर्णपदक


Q.7) जगातील सर्वोत्कृष्ट पाककृतींच्या यादीत भारतातील पाककृती कितव्या क्रमांकावर आहे?

✅ पाचव्या


Q.8) भारतीय सायकलपटू स्वस्ती सिंगला कितवा एकलव्य पुरस्कार मिळाला आहे?

✅ 30 वा


Q.9) जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक 2022 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?

✅ 68 वा


Q.10) IPL 2023 लिलावात सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे?

✅ सॅम कुरन

सराव प्रश्न उत्तरे

Question : 1

कोणत्या संस्थेच्यावतीने भारत आणि रशिया यांच्यामधील संशोधन व विकास तंत्रज्ञान कार्यक्रमासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला?

(A) विज्ञान व तंत्रज्ञान विभाग✅✅

(B) जैवतंत्रज्ञान विभाग

(C) गृह मंत्रालय

(D) परराष्ट्र कल्याण मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Question : 2

कोणत्या मंत्रालयाने ‘नॅशनल ट्रान्झिट पास सिस्टम (NTPS)’ याचे अनावरण केले?

(A) गृह मंत्रालय

(B) पर्यावरण, वन आणि हवामानातले बदल मंत्रालय✅✅

(C) वाणिज्य व उद्योग मंत्रालय

(D) परराष्ट्र कल्याण मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Question : 3

कोणत्या राज्यात नवी अत्याधुनिक ‘मध परीक्षण प्रयोगशाळा’ आहे?

(A) गुजरात✅✅

(B) राजस्थान

(C) उत्तरप्रदेश

(D) मध्यप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Question : 4

कोणते आठव्या कलमान्वये उद्योगपतींच्या नेतृत्वात एक कंपनी तयार करणारे पहिले राज्य ठरले?

(A) महाराष्ट्र

(B) केरळ

(C) तेलंगणा

(D) कर्नाटक✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Question : 5

‘युनायटेड स्टेट्स स्पेस फोर्स’चे बोधवाक्य काय आहे?

(A) सेम्पर फोर्टिस

(B) डी ओप्रेसो लिबर

(C) सेम्पर सुप्रा ✅✅

(D) यापैकी नाही


1) कॉर्नवॉलिसने  प्रत्येक  जिल्याचे  आकारानुसार   लहान  विभाग करून प्रत्येक  विभागावर  कोणते   हिंदुस्थानी  अधिकारी  नेमले. ( राज्यसेवा  मुख्य  2012 )

A) मुलकी  पाटील 

B) दरोगा  ✍️

C) जिल्हाधिकारी 

D) तलाठी   


2) भारतासंदर्भात  वसाहत  राज्याची  मागणी  म्हणजे  चांदोबाची  मागणी असा  उल्लेख  कोणी  केला.  ( STI  पूर्व 2014 ) 

A) भारतमंत्री - मोर्ले ✍️

B) व्हॉईसरॉय - मिंटो 

C) भारतमंत्री - मॉन्टेग्यु 

D) व्हॉईसरॉय - चेम्सफोर्ड 


3) त्यांनी  प्रशासनाचे  भारतीयाकरण  केले त्यांनी  अफगाण  युद्धाचा  शेवट  केला.  त्यांनी  आर्म्स  ऍक्ट  रद्द  केला ते  कोण  होते. ( राज्यसेवा  मुख्य  2016 ) 

A)लॉर्ड  लिटन 

B) लॉर्ड  रिपन ✍️

C) लॉर्ड  हेस्टिंग्स 

D) लॉर्ड  इल्बर्ट


4) वृत्तपत्रांच्या  स्वातंत्र्यावर  गदा  आणणारा  भारतीय  भाषा  वृत्तपत्र  कायदा  ( 1878 )कोणी मंजूर  केला. ( राज्यसेवा मुख  2012 ) 

A) लॉर्ड  रिपन  

B) लॉर्ड  लिटन ✍️

C)लॉर्ड  कर्झन 

D) लॉर्ड  डफरीन 


5) हिंदू  लोक  हिंदुस्तानात  जगतील  परंतु  आम्हाला  हिंदुस्थानावर  जगायचे  आहे.  असे  वक्तव्य  कोणाचे. ( PSI  पूर्व  2012 ) 

A) भारतमंत्री  लॉर्ड कर्झन  

B) भारतमंत्री  मॉन्टेग्यु  

C) भारतमंत्री  बर्कंडेह  ✍️

D) भारतमंत्री  माऊंटबॅटन

_________________________

1) खालील विधाने विचारात घ्या :

(a) राज्य मानवी हक्क आयोग केवळ राज्यसूचीतील विषयाबाबतच्या मानवी हक्क उल्लंघनांची चौकशी करू शकतो.

(b) राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक आणि पदच्युती राज्यपाल करतो.

पर्यायी उत्तरे :

 A. विधान (a) बरोबर (b) चुकीचे आहे.

 B. विधान (b) बरोबर (a) चुकीचे आहे.

 C. दोन्ही विधाने बरोबर आहेत.

 D. दोन्ही विधाने चुकीची आहेत.✍️

____________________________


2) खालीलपैकी कोणती यंत्रणा ही बिगर घटनात्मक स्वरूपाची आहे?

 A. भाषिक अल्पसंख्यांकासाठी विशेष अधिकारी 

 B.  राज्याचा महाधिवक्ता

 C. राज्य लोकसेवा आयोग

 D. राज्य मानवी हक्क आयोग.✍️

____________________________

3) खालीलपैकी कोणी लोकसभेचे सभापतीपद भूषविलेले नाही ? 

 A. के.एस. हेगडे

 B. हुकुम सिंह

 C. कृष्णकांत✍️

 D. गुरदयालसिंग धिल्लन.

____________________________

4) अचूक जोड़ी कोणती ?

 A. कलम 79 - लोकसभेची रचना

 B. कलम 84 - संसद सदस्यत्वाची पात्रता✍️

 C. कलम 99 - संसद सचिवालय 

 D. कलम 85 - सदस्यांची अपात्रता.

____________________________

5) भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठीच्या निर्वाचक गणांमध्ये (इलेक्टोरल कॉलेज)

_____ समावेश होतो.

 A. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा 

 B. संसदेतील निवडून आलेल्या सदस्यांचा आणि राज्यांच्या विधान सभांमधील निवडून आलेल्या सदस्यांचा

 C. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सर्व सदस्यांचा✍️

 D. संसद आणि राज्यांच्या विधान सभांमधील सर्व सदस्यांचा.

____________________________

6) भारतीय राज्यघटनेतील ___ सार्वजनिक स्वरूपात फाशी देण्याविरुद्ध अधिकार प्रदान करते.

 A. कलम 20 

 B. कलम 21✍️

 C. कलम 22

 D. कलम 31.


____________________________

7) राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने जानेवारी 2014 पर्यंत भारतातील ____ समुदायांना अल्पसंख्यांक समुदाय म्हणून सूचित केले होते.

 A. पाच

 B. सहा✍️

 C. सात

 D. आठ. 


____________________________


8) खालीलपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहेत ?

(a) राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे त्या सभागृहाचे सदस्य नसतात.

(b) उपाध्यक्ष जेव्हा सभागृहाचे कामकाज चालवतात तेव्हा ते पहिल्या फेरीत मतदान करू शकतात.

पर्यायी उत्तरे :

A. केवळ (a) योग्य आहे

 B. केवळ (b) योग्य आहे

 C. (a) आणि (b) दोन्ही योग्य आहेत

 D. (a) आणि (b) दोन्ही अयोग्य आहेत.✍️

____________________________


9) राज्यसभेचे अध्यक्ष ___ पेक्षा अधिक संख्या नसलेल्या उपाध्यक्षांच्या पॅनेलचे नामांकन करतात

 A. दोन

 B. पाच 

 C. सहा✍️

 D. चार.

____________________________


10) खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या परिशिष्टाचे अचूक वर्णन करते?

 A. या परिशिष्टात राज्यघटनेत समाविष्ट भाषांची यादी समाविष्ट आहे.

 B. या परिशिष्टात केंद्र आणि राज्यामधील अधिकारांचे वाटप याची यादी समाविष्ट आहे

 C. या परिशिष्टात राज्यसभेतील जागांची वाटणी समाविष्ट आहे.✍️

 D. या परिशिष्टात आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतूदींचा समावेश आहे.

२८ डिसेंबर २०२२

हिवताप/ मलेरिया (Malaria)


💉 रोगकारक: हा रोग प्लाझमोडियम व्हायरस नावाच्या आदिजीवांमुळे होतो.


🎯परिणाम: रक्ताभिसरण संस्थेवर परिणाम होतो.


🎯प्रसार: हिवतापाचा प्रसार ऍनाफिलस डासाची मादी चावल्यामुळे होतो.


🎯लक्षणे: ठराविक कालखंडाने येणारा ताप, थंडी वाजणे, यकृत व प्लिहा मोठ्या होणे, ऍनिमियाची कमी अधिक तीव्रता इत्यादी.



🔬 हिवतापाच्या अवस्था

 (Stages Of Malaria):


1) शीत अवस्था (Cold Stage): या अवस्थेत थंडी वाजते आणि शरीराचे तापमान वाढतेल. ही  अवस्था 2-4 तास आढळते.


2) उष्ण अवस्था (Hot Stage): या अवस्थेत शरीराचे तापमान 41 अंश पर्यंत वाढते तसेच प्रचंड डोकेदुखी आढळते. ही अवस्था 2-6 तास आढळते.


3) घाम अवस्था (Sweat Stage): या अवस्थेत ताप कमी होऊन प्रचंड घाम येतो. ही  अवस्था 15-20 मिनिट आढळते.


💉 लस: अर्टिमिसिलीन – कॉम्बिनेशन थेरपी (ACT), क्लोरोक्वाईन, मेफ्लोक्वाईन, डॉक्झीसायक्लिन, प्रायमाक्विन


🔬 जागतिक आरोग्य संघटनेने गरोदर स्त्रियांसाठी क्विनाईन आणि क्लिंडामायसिन ही  औषधे सुचविली आहे.

२७ डिसेंबर २०२२

गोपाल गणेश आगरकर



🔳 जन्म : 14 जुलै 1856, जन्मस्थळ:- टेंभू, ता:- कऱ्हाड, जिल्हा:- सातारा

🔳 मत्यू : 17 जून 1895, पुणे

 1 जानेवारी 1880 – चिपळूणकर, टिळक व अगरकर ‘न्यू इंग्लिश स्कूल ’ची स्थापना केली.

▪️ 1884 – डेक्कन एजुकेशन सोसायटी ची स्थापना.

▪️ बद्धीप्रामान्यवाद, वैज्ञानिक द्रुष्टिकोण, एहिक जीवनाची स्मृधता यावर भर.

 संस्थात्मिक योगदान :

 1881 – लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीचे संपदकत्व .

▪️ 15 आक्टोंबर 1888 – ‘सुधारक ’ साप्ताहिक.

▪️ गलामांचे राष्ट्र या पुस्तकात हिन्दी लोकांचा आळशी वृत्तीची टीका.

▪️ सत्रियांनी जकिते घातलीच पाहिजेत याविषयावर निबंध.

▪️ अकोल्यातल्या वर्हाड समाचार या वर्तमान पत्रातून लेखन.

▪️ शक्सपिअरच्या हॅल्मेट या नाटकाचे विकारविलासित या नावाने मराठी रूपांतर.

▪️ ‘डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस‘ हे पुस्तक.

▪️ हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधात ब्रिटीशांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका.

 वैशिष्ट्ये :

▪️ इष्ट असेल ते बोलणार……

▪️ राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्यला अधिक महत्व.

▪️ हर्बर्ट स्पेन्सरच्या सोशॉलॉजी व एथिक्स आणि जॉन मिलच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव.

▪️ बध्दिप्रामाण्यवाद व व्यक्तीस्वातंत्र्य या दोन तत्वांना महत्व.

▪️ ऐहिक जीवन समृद्ध करावे, पारलौकिक जीवनाचा विचार करणे व्यर्थ, असे मत.

▪️ जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा पहावी लागलेले समाजसुधारक.

विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)



१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर -- नायट्रोजन



1) जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी यावर्षी ……….जन्मली.

 A. १९७५

 B. १९८२

 C. १९७८✅

 D. १९८०


2) अन्ननलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते.

 A. १०

 B. २०

 C. १५

 D. २५✅


3 ) कुरुक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

 A. हरियाना

 B. जम्मू-काश्मिर

 C. पंजाब

 D. राजस्थान✅


4) एच.आय.व्ही. काय आहे  ?

 A. वरीलपैकी सर्व

 B. एड्स ची चाचणी 

 C. विषाणू  ✅

 D. असाध्य रोग


5) ‘सुपरसॅनिक’ म्हणजे काय ?

 A. प्रकाशापेक्षा कमी वेगवान       

 B. ध्वनीपेक्षा कमी   

 C. ध्वनीपेक्षा अधिक वेगवान✅

 D. प्रकाशापेक्षाही अधिक वेगवान


6) तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?

 A. निकाल्स

 B. निकोटीन✅

 C. कार्बोनेट

 D. फॉस्फेट


7) रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती ?

 A. तुळस✅

 B. सिंकोना

 C. अडूसळा

 D. सदाफुली


8) संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते.

 A. ड✅

 B. क

 C. ई

 D. अ



9) प्रौढ माणसाच्या १०० मि.लि. रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण ……….. आहे .

 A. ८ ग्रॅम 

 B. १० ग्रॅम 

 C. १४ ग्रॅम✅

 D. १८ ग्रॅम


10) बीसीजी व्हक्सीन ही खालील पद्धतीने देतात.

 A. Infra muscular✅

 B. Sub cutuneous

 C. Intradermal

 D. Inravenous


11) शरीराच्या सर्व भागांतील रक्त ह्दयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना ……….. म्हणतात.

 A. केशवाहिनी   

 B. रक्तकेशिका 

 C. शिरा (नीला)✅

 D. रोहिणी (धमन्या)


12) गंडमाळ / गॉयटर म्हणजे ………… च्या ग्रंथिना आलेली सूज होय .

 A. वृषण 

 B. थॉयराईड     ✅

 C. अॅड्रेनल

 D. थायमस


13) रक्तवाहिन्यांचे जाळे असलेले रंगीत पटलास …………म्हणतात.

 A. दृष्टीपटल 

 B. रंजीत पटल      ✅

 C. श्वेत पटल

 D. पार पटल


महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे


१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?

उत्तर -- सावित्रीबाई फुले 

---------------------------------------------------

२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

---------------------------------------------------

३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?

उत्तर -- आनंदीबाई जोशी 

---------------------------------------------------

४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?

उत्तर -- लता मंगेशकर 

--------------------------------------------------

५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

---------------------------------------------------

६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

--------------------------------------------------

७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?

उत्तर -- कल्पना चावला

--------------------------------------------------

८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

--------------------------------------------------

९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- बचेंद्री पाल 

--------------------------------------------------


१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?

उत्तर -- मीरा कुमार 

--------------------------------------------------

११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?

उत्तर -- किरण बेदी 

-------------------------------------------------

१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 

--------------------------------------------------

१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?

उत्तर -- प्रेमा माथूर

--------------------------------------------------

१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- पी. टी. उषा 

--------------------------------------------------


१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- नेमबाजी 

--------------------------------------------------

१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?

उत्तर -- सुश्मिता सेन 

--------------------------------------------------

१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?

उत्तर -- मदर तेरेसा

--------------------------------------------------

१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बॅडमिंटन

-------------------------------------------------

१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

उत्तर -- लाॅन टेनिस 

-------------------------------------------------

२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर -- बाॅक्सिंग 

---------------------------------------------------


२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- तिरंदाजी 

---------------------------------------------------

२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- जलतरण

---------------------------------------------------

२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बुध्दिबळ 

---------------------------------------------------

२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- वेट लिफ्टिंग 

---------------------------------------------------

२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?

उत्तर -- अनुताई वाघ 

__________________________

भारतीय न्यायालयीन प्रणाली

त्यांच्या अधीन असलेल्या जिल्हा न्यायालयांसह उच्च न्यायालय हे राज्य दिवाणी कोर्टाचे प्रमुख आहेत. उच्च न्यायालये केवळ आर्थिक वंचितपणामुळे किंवा क्षेत्रीय कार्यक्षेत्रांच्या कारणामुळेच उच्च न्यायालय अधीनस्थ न्यायालय सक्षम नसतात (कायद्याने अधिकृत नसतात) अशा प्रकरणांमध्ये नागरी आणि फौजदारी कार्यक्षेत्र वापरतात. उच्च न्यायालये विशिष्ट प्रकरणांमध्ये मूलभूत अधिकारदेखील ठेवतात, जी विशेषत: राज्य किंवा फेडरल कायद्यात नियुक्त केली जातात, जसे की - कंपनी कायद्याची प्रकरणे केवळ उच्च न्यायालयात दाखल केली जाऊ शकतात. तथापि, उच्च न्यायालयांची कामे प्रामुख्याने खालच्या न्यायालयांच्या अपील आणि रिट याचिका अंतर्गत आहेत, भारतीय घटनेच्या कलम २२४. रिट याचिका देखील उच्च न्यायालयाचा मूळ अधिकारक्षेत्र आहे. प्रत्येक राज्य न्यायालयीन जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहे, जिथे 'जिल्हा व सत्र न्यायाधीश' असतात. दिवाणी खटल्याची सुनावणी घेतल्यावर त्याला जिल्हा न्यायाधीश मानले जाते आणि जेव्हा तो फौजदारी खटल्याची सुनावणी घेतो तेव्हा सत्र न्यायाधीश मानले जाते. हायकोर्टाच्या न्यायमूर्ती नंतर त्याच्याकडे सर्वोच्च न्यायिक अधिकार आहेत. त्याखालील विविध नागरी हक्कांची न्यायालये आहेत, जी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावांनी परिचित आहेत.

🟤 भारतात कोर्टाचा इतिहास 🟤

भारतीय न्यायालयांची सध्याची व्यवस्था कोणत्याही विशिष्ट परंपराशी संबंधित नाही. मोगल काळात दोन प्रमुख न्यायालये नमूद केली जातात: सदर दिवाणी न्यायालय आणि सदर निजाम-ए-अदालत, जेथे अनुक्रमे व्यावहारिकता आणि फौजदारी खटल्यांची सुनावणी होते. 1857 च्या अयशस्वी स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रजी न्याय-प्रशासन-प्रणालीच्या आधारे विविध न्यायालये तयार केली गेली. इंग्लंडमधील प्रिव्हि कौन्सिल ही भारतीय सर्वोच्च न्यायालय होती. 1947  मध्ये हा देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर भारतीय राज्यघटनेअंतर्गत पूर्णतः प्रबळ गणराज्य स्थापन झाले. सर्वोच्च न्यायालय (सर्वोच्च न्यायालय) भारताचे सर्वोच्च न्यायालय बनले.

🟤सर्वोच्च न्यायालय🟤

            सर्वोच्च न्यायालय हे अनेक कार्यक्षेत्रांमधील कायदेशीर न्यायालयांच्या पदानुक्रमातील सर्वोच्च न्यायालय आहे. अशा न्यायालयांसाठी शेवटचा उपाय , सर्वोच्च न्यायालय आणि उच्च (किंवा अंतिम) अपील कोर्टासारखे वाक्य देखील बोलले जाते . सर्वत्र सुप्रीम कोर्टाचे निर्णय इतर कोर्टाच्या पुढील पुनरावलोकनास अधीन नसतात. सर्वोच्च न्यायालये सहसा मुख्यत: अपील न्यायालये म्हणून काम करतात किंवा लोअर किंवा इंटरमिजिएट स्तरावरील अपील न्यायालयांच्या निर्णयावरून अपील ऐकतात.

🟤उच्च न्यायालय🟤

भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद - २१4 मध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक राज्यात उच्च न्यायालय असेल, दोन किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांसाठी एकच न्यायालय असू शकेल . भारतात सध्या 25 उच्च न्यायालयाने आहेत, एकूण आंध्र प्रदेश ते अमरावती उच्च न्यायालयाने ओळख निर्माण केली 25 देश. 1 जानेवारी 2019 रोजी या उच्च न्यायालयांचे कार्यक्षेत्र राज्य-विशिष्ट किंवा राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा गट आहे. उदाहरणार्थ, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने , पंजाब आणि हरियाणा राज्य केंद्रशासित प्रदेश चंदीगड आपल्या अधिकार स्थळे आहेत. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 214, अध्याय 5 भाग 6 अंतर्गत उच्च न्यायालये स्थापन केली आहेत.

न्यायालयीन व्यवस्थेचा एक भाग म्हणून, उच्च न्यायालये राज्य विधिमंडळ आणि अधिकारी यांची संस्था स्वतंत्र आहेत.

🟤जिल्हा न्यायालय (भारत )🟤

  भारत येथे जिल्हा पातळीवर न्याय केली न्यायालयाने जिल्हा न्यायालय म्हणतात. ही न्यायालये जिल्हा किंवा अनेक जिल्ह्यांतील लोकांसाठी आहेत, जी लोकसंख्या आणि खटल्यांच्या संख्येच्या आधारे ठरविली जाते. हे न्यायालय त्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्य करतात. जिल्हा कोर्टाने दिलेल्या निर्णयांना संबंधित उच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. अनुच्छेद 21 कोणत्याही व्यक्तीस त्याची कारणे न देता अटक करता येणार नाही. अटक केलेल्या व्यक्तीला न्यायालयीन सल्लामसलत करण्यास परवानगी दिली जाईल आणि 24 तासांच्या आत तो जवळच्या दंडाधिका .-यांसमोर सादर करावा लागेल.

🟤 न्यायाधीशांची नियुक्ती 🟤

मुख्य न्यायाधीश आणि संबंधित राज्यपाल यांच्याशी सल्लामसलत करून उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती भारतीय राष्ट्रपती करतात . शिवाय, हायकोर्टाचे अध्यक्ष राष्ट्रपतींचा सल्ला घेतल्याशिवाय बदलीच्या अधिकाराचा उपयोग करू शकतात.

२६ डिसेंबर २०२२

गोलमेज परिषद


पहिली गोलमेज परिषद (१९३०-३१)⚜

इंग्लंड मध्ये पंतप्रधान रामसे मॅकडोनाल्ड च्या अध्यक्षतेखाली पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर १९३० मध्ये भरवण्यात आली आली. पहिल्या गोलमेज परिषदेला एकंदर ८९ प्रतींनिधी जमले होते. ८९ सदस्या पैकी १६ सदस्य हिंदुस्थानातील राजकीय संघटनांचे होते. राष्ट्रसभेने पहिल्या गोलमेज परिषदेवर पूर्ण बहिष्कार टाकला होता.

सरकारच्या विरोधात सविनय कायदेभंगाची चळवळ चालू ठेवली होती. यामुळे व्हाईसरॉय ने महात्मा गांधीस व इतर नेत्यास तरुंगातून मुक्त केले.

५ मार्च १९३१ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व इंग्लंडवरुन आलेल्या आयर्विन यांच्यात अनेक करार झाले; त्या करारास गांधी-आयर्विन करार म्हणून संबोधले जाते.

गांधी आयर्विन करारा बरोबरच सविनय कायदेभंग चळवळीचा शेवट झाला. त्याच बरोबर हिंदुस्थानातील नेत्यांनी दुसर्‍या गोलमेज परिषदेस हजर राहण्यास संमती दर्शवली.

दुसरी गोलमेज परिषद⚜

७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ ही परिषद गांधीजीच्या 'राजपूताना' ह्या जहाजमध्ये महादेव देसाई, मदनमोहन मालवीय, देवदास गांधी, घनश्यामदास, रेम्जे मैकडोनाल्ड, डॉ.बी.आर.आंबेडकर ह्या आवाजात पूर्ण झाली. गांधी करारानंतर लॉर्ड आयर्विन यांनी आपले व्हाईसरॉयचे पद सोडून मायदेशी परतले. त्यांच्या जागी लॉर्ड विलिंग्डन हे व्हाईसरॉय झाले.

ते प्रतिगामी व नोकरशाही वृत्ती असलेले व्हाईसरॉय होते.

पुढे राष्ट्रसभेने सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराची येथे अधिवेशन घेतले. या अधिवेशनात काही करार मंजूर करून महात्मा गांधी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडला गेले. या परिषदेमध्ये हिंदुस्तानला लगेच वसाहतीचे राज्य द्यावे अशी मागणी महात्मा गांधी यांनी केली.

परंतु महात्मा गांधी हे केवळ राष्ट्रसभेचे नेते आहेत ते संपूर्ण हिंदुस्तानाच्या वतीने बोलू शकत नाहीत अशी आठवण इतरांनी करून दिली. भारतातील अनेक धर्म व जाती आहेत व त्यांचे प्रतिनिधी गोलमेज परिषदेला उपस्थित होते.

गांधीजींनी केवळ राष्ट्रसभेचे नेतृत्व करावे असे इतरांचे म्हणणे होते. या गोलमेज परिषदेत गांधीजींचे समाधान झाले नाही त्यामुळे निराश अवस्थेत ते आपल्या मायदेशी परतले व भारतात येताच परत सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली, परंतु ब्रिटीशांनी या वेळेस गांधीजींना अटक करून तुरुंगात टाकले.

दुसरी गोलमेज परिषद

७ सप्टेंबर १९३१ ते १ डिसेंबर १९३१ ही परिषद गांधीजीच्या 'राजपूताना' ह्या जहाजमध्ये महादेव देसाई, मदनमोहन मालवीय, देवदास गांधी, घनश्यामदास, रेम्जे मैकडोनाल्ड, डॉ.बी.आर.आंबेडकर ह्या आवाजात पूर्ण झाली. गांधी करारानंतर लॉर्ड आयर्विन यांनी आपले व्हाईसरॉयचे पद सोडून मायदेशी परतले. त्यांच्या जागी लॉर्ड विलिंग्डन हे व्हाईसरॉय झाले.

ते प्रतिगामी व नोकरशाही वृत्ती असलेले व्हाईसरॉय होते.

पुढे राष्ट्रसभेने सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराची येथे अधिवेशन घेतले. या अधिवेशनात काही करार मंजूर करून महात्मा गांधी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इंग्लंडला गेले. या परिषदेमध्ये हिंदुस्तानला लगेच वसाहतीचे राज्य द्यावे अशी मागणी महात्मा गांधी यांनी केली.

परंतु महात्मा गांधी हे केवळ राष्ट्रसभेचे नेते आहेत ते संपूर्ण हिंदुस्तानाच्या वतीने बोलू शकत नाहीत अशी आठवण इतरांनी करून दिली. भारतातील अनेक धर्म व जाती आहेत व त्यांचे प्रतिनिधी गोलमेज परिषदेला उपस्थित होते.

गांधीजींनी केवळ राष्ट्रसभेचे नेतृत्व करावे असे इतरांचे म्हणणे होते. या गोलमेज परिषदेत गांधीजींचे समाधान झाले नाही त्यामुळे निराश अवस्थेत ते आपल्या मायदेशी परतले व भारतात येताच परत सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली, परंतु ब्रिटीशांनी या वेळेस गांधीजींना अटक करून तुरुंगात टाकले.

🍃🍃🍃🍃🍀🍀🌸🌸🍃🍃🍃🍃🍃🍀🍀

राज्यसेवा परीक्षा-प्रश्न सराव



1) पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?

 1) बोस – आईनस्टाईन कंडनसेट             2) फर्मआयोनिक कंडनसेट

3) एरिक – कॅटरले कंडनसेट      

4) कार्नेल टर्मस् कंडनसेट

उत्तर :- 1


2) धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?


   अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.

   ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे)

   क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.


   1) फक्त अ   

   2) फक्त ब 

   3) फक्त क    

   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


3) खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात.


   अ) एडीनीन – A  ब) गुआनीन – G    क) थायमिन – T    ड) साइटोसीन – C


   1) अ, ब    

   2) अ, ब, क  

   3) ब, क, ड   

   4) अ, ब, क, ड

उत्तर :- 2


4) वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?


   1) चाल   

   2) घनता 

   3) जडत्व   

   4) त्वरण

उत्तर :- 4



5) खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता.


   1) मिथेन    2) क्लोरीन    3) फ्लोरीन    4) आयोडीन

उत्तर :- 1


6) अ) ज्या भौतिक राशी व्यक्त करताना परिमाण आणि दिशा दोघांची आवश्यकता असते त्या राशींना आदिश राशी असे म्हणतात.

     ब) ज्या भौतिक राशी व्यक्त करताना फक्त दिशेची आवश्यकता असते त्या भौतिक राशींना सदिश राशी असे म्हणतात.

          वरीलपैकी सत्य विधान / विधाने कोणते ?


   1) फक्त अ   

   2) फक्त ब    

   3) अ, ब दोन्ही    

   4) एकही नाही

उत्तर :- 4


7) धातूबद्दल खालील विधानांचा विचार करा.


   अ) धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन देऊन धन आयन प्राप्त करतात.

   ब) धातू मूलद्रव्य इलेक्ट्रॉन घेऊन ऋण आयन प्राप्त करतात.

   क) आधुनिक आवर्तसारणीत धातू मूलद्रव्य डाव्या बाजूला व मध्यभागी आहेत.

   ड) टेक्नेशिअम हा सर्वांत पहिला कृत्रिम मूलद्रव्य आहे.


   1) अ, क, ड बरोबर 

   2) अ, क बरोबर    

   3) ब, क बरोबर  

   4) अ, ब, क, ड बरोबर

उत्तर :- 1


8) खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.


   अ) हिपॅरीन  - रक्त शरीरात गोठू नये म्हणून असणारे रसायन आहे.

   ब) हिस्टामाइन  - सूल आल्यानंतर तिथे स्त्रवणारे रसायन आहे.


   1) अ योग्य    

   2) ब योग्य   

   3) दोन्ही योग्य    

   4) दोन्ही अयोग्य

उत्तर :- 3


9) खालील विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा.


   अ) एक किलोग्रॅम म्हणजे पॅरीस येथील आंतरराष्ट्रीय मोजमाप कार्यालयातील 90% प्लॅटीनम, 10% इरिडीयम या मिश्रधातूचा 39

        मि.मी. उंची व व्यास असणा-या ठोकळयाचे वजन होय.

   ब) एक किलोग्रॅम म्हणजे 4° c तापमानात सामान्य वायूदाबाला 1 लिटर पाण्याचे वजन होय.


   1) अ, ब दोन्ही  

   2) फक्त अ   

   3) फक्त ब 

   4) एकही नाही

उत्तर :- 1


10) खालील विधानांचा विचार करा.

   अ) चांदीपेक्षा सोन्याची तन्यता जास्त आहे.    

  ब) चांदीपासून 8,000 फूट लांबीचा तार काढता येतो.

   क) चांदीनंतर तांबे दुसरा आणि सोने तिसरा विजेचा सर्वोत्तम वाहक आहे.

   ड) चांदी हा मानवासाठी विषारी नाही आणि आपण जेवण डेकोरंटमध्ये चांदीचा वापर करू शकतो.


   1) ब, क, ड बरोबर अ चूक    

   2) अ, ब, क, ड बरोबर

   3) अ, ब, ड बरोबर      

   4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 1

परिशिष्ट/अनुसूची/ Schedule


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1) परिशिष्ट I 

राज्य व केंद्र शासित प्रदेश


2) परिशिष्ट II

 वेतन आणि मानधन (राष्ट्रपती, राज्यपाल,लोकसभेचा सभापती व उपसभापती, राज्यसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्यातील विधानसभांचे सभापती व उपसभापती, राज्यातील विधानपरिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक)


3)परिशिष्ट III

 पद ग्रहण शपथा (केंद्रीय मंत्री, संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार, संसद सदस्य, सर्वोच्च नायालयाचे न्यायाधीश, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक, राज्यातील मंत्री, विधिमंडळांच्या निवडणुकीतील उमेदवार, राज्य विधिमंडळ सदस्य, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश)


4) परिशिष्ट 4

 राज्यसभा जागांचे राज्ये आणि संघराज्य प्रदेशात विवरण


5) परिशिष्ट V

 भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती


6)परिशिष्ट VI

 आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोराम या राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती संबंधित तरतुदी


7)परिशिष्ट VII 

केंद्र आणि राज्य सरकार मधील सूची (केंद्र सूची – ९८ विषय सुरुवातीला ९७ विषय होते. राज्यसूची – ५९ विषय सुरुवातीला ६६ विषय होते. समवर्ती सूची ५२ विषय सुरुवातीला ४७ विषय होते.


8) परिशिष्ट VIII

 भाषा घटनेने मान्यता दिलेल्या भाषांची संख्या पूर्वी १४ इतकी होती सध्या या परिशिष्टात २२ भाषा आहेत.


9) परिशिष्ट IX  

कायद्यांचे अंमलीकरण. हे परिशिष्ट पहिली घटनादुरुस्ती अधिनियम, १९५१ अन्वये समाविष्ट करण्यात आले.


10)परिशिष्ट X

 पक्षांतर केल्यामुळे संसद व राज्य विधानसभांचे सदस्यत्व रद्द करण्याविषयीच्या तरतुदी यात आहेत. सन १९८५ च्या ५२ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये याचा समावेश करण्यात आला. हे परिशिष्ट पक्षांतर विरोधी कायदा म्हणूनच ओळखले जाते.


11)परिशिष्ट XI  

पंचायत राज चे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात २९ विषय आहेत. हे परिशिष्ट सन १९९२ मधील ७३ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले.


12)परिशिष्ट XII

  हे परिशिष्ट सन १९९२ मधील ७४ व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये समाविष्ट करण्यात आले. नगरपालिकांचे अधिकार व जबाबदाऱ्या यात आहेत. यात १८ विषय आहेत.

२५ डिसेंबर २०२२

राज्यसेवा परीक्षा जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत


    सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.


🟣1. सत्व – अ  


शास्त्रीय नांव – रेटीनॉल  

उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा

स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस


🟣2. सत्व – ब1


शास्त्रीय नांव – थायमिन  

उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – बेरीबेरी

स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,


🟣3. सत्व – ब2


शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  

उपयोग – चयापचय क्रियेकरिता

अभावी होणारे आजार – पेलाग्रा

स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे


🟣4. सत्व – ब3


शास्त्रीय नांव – नायसीन

उपयोग – त्वचा व केस

अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे

स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी


🟣5. सत्व – ब6  


शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  

उपयोग – रक्त संवर्धनाकरिता

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत व पालेभाज्या


🟣6. सत्व – ब10  


शास्त्रीय नांव – फॉलीक  

उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत


🟣7. सत्व – क  


शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  

उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि


🟣8. सत्व – ड  


शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  

उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे


🟣9. सत्व – इ  


शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल

उपयोग – योग्य प्रजननासाठी  

अभावी होणारे आजार – वांझपणा

स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या


🟣10. सत्व – के 

 

शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  

उपयोग – रक्त गोठण्यास मदत

अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही

स्त्रोत – पालेभाज्या व कोबी

परश्न मंजुषा


Q.1..... बँक राष्ट्रीयीकरण दिवस म्हणून ओळखला जातो.
1 १९ जुलै √√√√
2 ३१ आॅक्टोबर
3  २३ एप्रिल
4 १ व ३

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.2 NRHM ची सुरुवात .......या वर्षी करण्यात आली.
1  २००७
2  २००४
3  २००५√√√√√√
4  २०१३

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.3  भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण महत्त्वाचे नाही
1  कामगारांची वाढती संख्या
2  अयोग्य तंत्रज्ञान
3  प्रभावी मागणीची     
कमतरता
4  कामगारांसाठी संरक्षित कायदा√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.4...... मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यात आली?
1  १९४८-४९
2  १९३१-३२√√√√
3  १९११-१२
4  १८६७-६८

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.5  खालीलपैकी कोणती घटना पंचवार्षिक योजना चालु असताना घडली नाही?
1   चलन निश्चलीकरन
2   रुपयाचे अवमूल्यन√√√√
3   १ व २  दोन्ही घडले
4  १ व २ दोन्ही घडले नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.6  रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदीन वापराचे साधन कोणते?
1   बँकदर
2  रोख राखीव प्रमाण
3  वैधानिक रोखता प्रमाण
4  रेपो आणि रेव्हर्स रेपो व्यवहार√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.7  खाद्याबाबतच्या आवडी व अग्रक्रम स्थिर असताना उत्पन्न वाढत असताना अन्नावरील प्रत्यक्ष खर्च जरी वाढत असला तरी उत्पन्नापैकी अन्नावर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी होते हे सांगणारा नियम म्हणजे......... होय.
1  "से" चा बाजार विषयक नियम
2  उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम
3  एंजल चा नियम√√√√√
4  फिलिप्स वक्ररेषा

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.8  १८६७ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न.... तर दरडोई उत्पन्न..... इतके होते.
1  २० कोटी व ३४० रुपये वार्षिक
2  २४० कोटी व २० रुपये वार्षिक
3  ३४० कोटी व २० रुपये वार्षिक √√√√√√
4  ३४० कोटी वार्षिक व २०  रुपये मासिक

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.9 पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी....... मध्ये वाढ झाली नाही?
1  अन्नधान्य उत्पादन
2  राष्ट्रीय उत्पन्न
3  दरडोई उत्पन्न
4  किमतीचा निर्देशांक√√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.10  भारत निर्माण योजनेमध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?
अ. ग्रामीण शिक्षण
ब. ग्रामीण आरोग्य
क. ग्रामीण पाणीपुरवठा
ड. ग्रामीण रस्ते
1   अ आणि ब  √√√√√
2   ब आणि क
3   क आणि ड
4  अ आणि ड

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.11  खालीलपैकी कोणते घटक १९६६-१९६९ दरम्यान भारतातील नियोजन खंडित होण्यास कारणीभूत होते?
1  चीन -भारत युध्द
2  भारत पाकिस्तान संघर्ष
3  आर्थिक मंदी
4  राजकीय अस्थिरता √√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.12  तीव्र मंदी दूर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली तेजीची/ चलन वाढची परिस्थिती म्हणजे ....... होय.
1  मुद्रा अवपात
2  मुद्रा संस्फीती√√√√√
3  स्टगफ्लेशन
4  स्टगनेशन

📖📖📖📖📖📖📖📖📖

[Q.13  भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो?
1  यु एस ए √√√√√√ 
2  यु के 
3  चीन 
4  सिंगापूर

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.14 १९६९ च्या १४ बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता?
अ इंदिरा गांधी
ब  मोरारजी देसाई
क जयप्रकाश नारायण
ड  रिझर्व्ह बँक
1  अ आणि क
2  ब आणि  ड√√√√√√
3  ब आणि  क
4  क आणि ड

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.15  तिसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी...... मध्ये घट झाली नाही.
1  अन्नधान्य उत्पादन
2  राष्ट्रीय उत्पन्न
3  परकीय चलन साठा
4  किमतीचा निर्देशांक√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.16  भारतात मध्यवर्ती   बँकेची शिफारस कोणी केली नव्हती?
1   हिल्टन यंग आयोग
2   चेंबर्लिन आयोग
3   फौलर समिती
4   मॅकलेगन समित✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.17  ........ ही कंपनी 'मोती' या नावाने युरिया उत्पादन करते.
1  राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली.
2  मद्रास फर्टिलायझर ली.
3  हिंदुस्थान फर्टिलायझर ली.√√√√√√√
4  वरील सर्व

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.18 राष्ट्रसभेकडून कोणत्या वर्षी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती?
1  १९४६
2  १९३८√√√√√
3  १९२९
4  १९२५

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.19 सरकारच्या तुटीच्या अर्थभरणाचा खालीलपैकी कोणता स्रोत नाही?
1  रिझर्व्ह बँकेकडून व व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे
2  नवीन चलन निर्मिती
3  स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे
4  जमा झालेले महसूल√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.20 प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते..... अंदाजपत्रक होय.
1  रोख
2  बहुआयामी
3  शून्याधारीत√√√√√
4  यापैकी नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.21 सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत कोणी मांडला?
1 प्रो पिकॉक व प्रो वाईजमन√√√√√√
2 प्रो पिगु
3 डॉ मार्शल
4 वरील पैकी नाही

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.22 अप्रत्यक्ष करांचा समाजावर... परिणाम होत?
1  पुरोगामी
2  न्याय्य
3  प्रतिगामी√√√√√√
4  प्रमाणशीर

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.23 GST विधेयकाला मान्यता देणारे राष्ट्रीय लोकशाही आघाडी रहित (non NDA) पहिले राज्य..... हे होते.
1  बिहार√√√√
2  केरळ
3  तामिळनाडू
4  तेलंगणा

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.24  रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भरतात नोटा कोणामार्फत छापल्या जात असे?
1  इंपिरियल बँक
2  बँक ऑफ बंगाल
3  बँक ऑफ मद्रास
4  ब्रिटिश भारत सरकार√√√√√

📖📖📖📖📖📖📖📖📖

Q.25  ....... हे केंद्र सरकारचे सर्वोच्च लेखा प्राधिकारी आहेत.
1  CAG
2. CGA√√√√√
3.  वित्त सचिव
4   अर्थमंत्री

सराव प्रश्नसंच


1) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम ३६०

ड) कलम ३६२

=======================

 उत्तर............ क) कलम ३६० 

=======================

२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता

ड) वरीलसर्व

==========================

 उत्तर......... क) अंतर्गत अशांतता 

==========================

३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने

ड) सहा महिने

=====================

 उत्तर....... क) चार महिने  

=====================

४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली

ड) महाराष्ट्र

=====================

 उत्तर..... क) दिल्ली  

=====================

५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 

========================

 उत्तर........ अ) उच्च न्यायालय 

========================

६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६

ड) यापैकी नाही

=====================

 उत्तर....... क) कलम २२६  

=====================

७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग

ड) व्ही. के. सिंग

==========================

 उत्तर....... क) सरकारिया आयोग 

==========================

८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४

=====================

 उत्तर....... अ) कलम २८० 

=====================

९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२

क) कलम २६३

ड) कलम २६४

=====================

 उत्तर....... ब) कलम २६२ 

=====================

१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७

=====================

 उत्तर........ अ) कलम ३२४ 

=====================

११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती 

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 

========================

 उत्तर....... अ) संथानाम समिती 

========================

१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे

=====================

 उत्तर........ अ) पाच वर्षे  

=====================

१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश

=====================

 उत्तर...... पर्याय (ड) 

=====================

१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग

========================

 उत्तर....... ड) निवडणूक आयोग 

========================

१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य

क) दोन्ही

ड) यापैकी नाही

=====================

 उत्तर.......... ब) राज्य  

=====================

विधानसभा


विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती

घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत

विधानसभेची रचना

170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.

राखीव जागा

घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचीत जातींसाठी 29 तर अनुसूचीत जमातीसाठी 25 राखीव जागा आहेत.

निवडणूक

प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.

उमेदवारांची पात्रता

1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.
सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.

गणसंख्या : 1/10
अधिवेशन :
दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.

सभापती व उपसभापती

विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

सभापतीचे कार्य आणि अधिकार

1. विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला संमती देणे.
2. विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.
3. सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.
4. जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.

जनरल माहिती

1. धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.
2. धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.
3. धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.
4. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.
5. घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.
6. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.
7. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.
8. स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.


ग्रामपंचायत



ग्रामसभा ही एक ग्राम किंवा पंचायत निवडणार्‍या खेड्यांच्या गटांच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेल्या व्यक्तींची एक संघटना आहे.


एक गतिशील व प्रबुद्ध ग्रामसभा पंचायतीच्या राजांच्या यशाच्या केंद्रस्थानी आहे.


राज्य सरकारांना असे आवाहन करण्यात आले आहे: -


पंचायत (अनुसूचित क्षेत्रासाठी विस्तार) अधिनियम 1996 मध्ये नमूद केलेल्या तरतुदीनुसार ग्रामसभेला अधिकार प्रदान करा.


प्रजासत्ताक दिन, कामगार दिन, स्वातंत्र्यदिन आणि गांधी जयंतीनिमित्त देशभरात ग्रामसभा सभा आयोजित करण्यासाठी पंचायती राज कायद्यात अनिवार्य तरतुदींचा समावेश.


पंचायती राज कायद्यात विशेषत: ग्रामसभा सभा, सर्वसाधारण सभा व विशेष सभा आणि कोरमची पूर्तता न झाल्यामुळे सभा घेण्याबाबतच्या कोरमसंबंधी तरतूद जोडणे.


ग्रामसभेच्या सदस्यांना त्यांचे हक्क व अधिकारांची जाणीव करून देणे यासाठी की लोकसहभागाची खात्री करुन घ्यावी आणि विशेषत: उपेक्षित गट जसे की महिला आणि अनुसूचित जाती / जमातीमधील लोक यात सहभागी होऊ शकतात.


ग्रामसभेसाठी कार्यपद्धती तयार करणे ज्याद्वारे ते ग्रामविकास मंत्रालयाच्या लाभार्थीभिमुख विकास कार्यक्रमांचे प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करतात आणि आर्थिक गैरव्यवस्थेची वसुली किंवा शिक्षेचा कायदेशीर हक्क मिळवू शकतात.


ग्रामसभेच्या बैठकीसंदर्भात व्यापक प्रचारासाठी कृती योजना तयार करणे.


ग्रामसभा सभा आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे / कार्यपद्धती तयार करणे.


नैसर्गिक स्रोतांबाबत ग्रामसभेच्या अधिकाराविषयी जागरूकता निर्माण करणे, भूमी अभिलेखांवर नियंत्रण ठेवणे व समस्या सोडवणे.


Rd 73 व्या घटनादुरुस्ती कायद्यात ग्रामीण पातळीवर स्वराज्य संस्था म्हणून सक्षम अशा मजबूत पंचायतींची कल्पना केली गेली आहे, जी खालील गोष्टी करण्यास सक्षम आहेत:


गावपातळीवर सार्वजनिक विकास कामे व त्यांची देखभाल नियोजन व पूर्ण करणे.


गाव पातळीवर लोकांचे कल्याण सुनिश्चित करून त्यात आरोग्य, शिक्षण, समुदाय बंधुत्व, सामाजिक न्याय विशेषत: लिंग आणि जाती-आधारित भेदभाव, संघर्ष सोडवणे, मुलांचे खासकरुन मुलींचे कल्याण असे विषय असतील.


Rd 73 व्या घटनादुरुस्तीमध्ये जनसंवाद म्हणून तळागाळातील सशक्त ग्रामसभेची कल्पना आहे, ज्यास ग्रामपंचायत जबाबदार असावी.

--------------------------------------------------

२४ डिसेंबर २०२२

FIFA विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022               महत्वाचे प्रश्न उत्तरे


Q.1 FIFA फुटबॉल विश्वचषक  2022 विजेता संघ कोणता?
उत्तर अर्जेंटिना

Q.2 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 आयोजन कोणत्या तारखेस करण्यात आले होते?
उत्तर 20 नोव्हेंबर, 18 Dec 2022

Q.3 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 मध्ये किती संघाने सहभाग घेतला होता?
उत्तर 32

Q.4 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 एकूण किती मॅच खेळवण्यात आले?
उत्तर 64

Q.5 फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 पहिली मॅच कोणत्या तारखेस खेळवण्यात आली?
उत्तर 20 नोव्हेंबर

Q.6 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 चा शुभंकर काय होता?
उत्तर La'eeb

Q.7 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 विजेता संघ कोणता?
उत्तर अर्जेंटिना

Q.8 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 उपविजेता संघ कोणता?
उत्तर फ्रान्स

Q.9 याआधी अर्जेंटिना या देशाने फिफा फुटबॉल विश्वचषक केव्हा जिंकला होता?
उत्तर 1986

Q.10 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 गोल्डन बॉलचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर लियोनेल मेसी.

Q.11 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 गोल्डन बूट चा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर किलियन मबापे

Q.12 फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022  तिसऱ्या क्रमांकावर ती कोणता देश आहे?
उत्तर क्रोशिया

Q.13 2018 मध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकला होता?
उत्तर फ्रान्स

Q.14 2026 मध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोठे आयोजित केला जाणार आहे?
(1) अमेरिका
(2) मेक्सिको
(3) कॅनडा
(4) वरील सर्व.

Q.15 पहिल्या फिफा विश्व कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केव्हा करण्यात आले?
उत्तर 1930

२३ डिसेंबर २०२२

23 डिसेंबर चालू घडामोडी


Q.1) नुकतेच कोणत्या राज्य सरकारने ओरुनोडोई 2.0 योजना सुरू केली आहे?

✅ आसाम


Q.2) नुकतेच कोणत्या देशात ओमिक्रॉन ड्रायव्हिंग वाढीचा BF.7 नवीन कोविड प्रकार आढळला?

✅ चीन


Q.3) AERB चे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

✅ दिनेश कुमार शुक्ला


Q.4) प्यूमा इंडियाने ब्रँड अँम्बेसेडर म्हणून कोणाची निवड केली आहे?

✅ अनुष्का शर्मा


Q.5) 2 डिसेंबर 2022 पर्यंत नोट चलनात (NiC) वार्षिक 7.98 टक्क्यांनी वाढून किती लाख कोटी रुपये झाली आहे?

✅ 31.92 लाख कोटी


Q.6) भारतीय राष्ट्रीय ब्लाइंड क्रिकेट संघाने सलग कित्व्यांदा ब्लाइंड T20 विश्वचषक जिंकला आहे?

✅ तिसऱ्यांदा


Q.7) राष्ट्रीय गणित दिवस  कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

✅ 22 डिसेंबर


Q.8) नुकतेच गमका प्रतिपादक एचआर केशव मूर्ती यांचे निधन झाले, त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

✅ पद्मश्री


Q.9) NAAC द्वारे A श्रेणी मिळवणारे भारतातील एकमेव विद्यापीठ कोणते ठरले आहे?

✅ गुरु नानक देव विद्यापीठ

२२ डिसेंबर २०२२

भारतात पण नव्या कोरोना व्हायरस चे आगमन....काळजी घ्यावी लागेल

चीनमधील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे.चीनमध्ये सर्वच रुग्णालय तुडूंब भरले असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.त्यात महिला,मुलांचा आक्रोश,जमिनीवर मृतदेहांची रास पडली आहे.त्यामुळे भारतासह संपूर्ण जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोनाच्या व्हेरिएंटच्या BF.7 या सब व्हेरिएंटने चीनमध्ये हाहाकार माजवला असून, भारतातही या सब व्हेरिएंट तीन रूग्ण आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.
     भारतात नवीन कोरोना व्हायरसच्या BF.7 चे दोन रूग्ण समोर आले आहे.त्यात गुजरातमध्ये दोन तर एक रूग्ण ओडिशातून समोर आला आहे. याआगोदर यूएस,यूके आणि बेल्जियम,जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या युरोपियन देशांसह इतर अनेक देशांमध्ये या कोरोना व्हायरसचे व्हेरिएंटचे रूग्ण आधीच आढळून आले आहेत.
   जागतिक लेवलवर वाढत असलेल्या नव्या कोरोना व्हायरस मुळे बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोविड आढावा बैठकीत कोविड रूग्णांमध्ये आतापर्यंत वाढ झालेली नसली तरी,नव्या व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.या बैठकीनंतर नीती आयोगाचे सदस्य डॉ.व्हीके पॉल यांनी नागरिकांना कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.
    चीनमधून येणाऱ्यांची चौकशी..
चीनमधील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता भारत सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. आरोग्य मंत्रालयाने चीनमधून येणाऱ्यांची विमानतळावर तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.मंत्रालयाने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.विमानतळांवर आजपासून कोरोना चाचणी करण्यात येत आहे.जगभरातील काही देशांमध्ये वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता आजपासून भारतात दाखल होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आजपासून विमानतळांवर रॅन्डम कोरोना चाचाणी केली जाणार आहे,अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
काळजी घ्या....सुरक्षित रहा...!!
--------------------------------------
जन हितार्थ जारी:

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...