०७ नोव्हेंबर २०२२

पोलीस भरती सराव प्रश्नसंच विषय अंकगणित


*१) २७० नंतर पुढील येणाऱ्या १० व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती ?*
अ. १५ 
ब. १७
क. १९
ड. २१

*२) पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ?*
अ. ०:२२५ 
ब. २२.५
क. ६.२५
ड. ६२.५ 

*३) १४.३१, १६.४, १३.१३, १२.२४ या संख्येचे मध्यमान किती येईल ?*
अ. ४१ वर्ष 
ब. ३३ वर्ष 
क. १२५ वर्ष 
ड. ४५ वर्ष

*४) रमेश जवळ ३२ रुपये आहेत. हरिषजवळ रघूच्या चौपट व रमेशपेक्षा ४ रुपये कमी आहेत तर तिघांजवळ मिळून किती रुपये आहेत ?*
अ. ६६
ब. ६७
क. ६९
ड. ६८   

*५) सहा संख्याची सरासरी ६४.५ आहे. सातवी संख्या ९६ असल्यास सर्व संख्याची सरासरी किती ?*
अ. ६६.५
ब. ६८
क. ६८.५
ड. ६९

*६) बस भाडे शेकडा २० ने वाढविला. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा १० ने वाढविला. तर मुळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ?*
अ. ३५ टक्के 
ब. ३० टक्के 
क. ३१ टक्के 
ड. ३२ टक्के

*७) एका परीक्षेमध्ये ७०० पैकी ४५५ विध्यार्थी नापास झाले. तर किती टक्के विध्यार्थी पास झाले ?*
अ. ३५
ब. ४०
क. ६५
ड. ६०

*८) संख्येचे १५ टक्के ३० आहे, तर त्या संख्येची तिप्पट किती ?*   
अ. २००
ब. २५०
क. ४००
ड. ६००

*९)  दर ५ वर्षांनी दुप्पट होणाऱ्या योजनेत अ गुंतवणूक करतो जर त्याने सन १९९०, १९९५ व २००० मध्ये रु. ५००० गुंतवणूक केली तर त्याला २००५ साली किती रक्कम मिळेल ?*
अ. रु. ४०००० 
ब. रु. ६००००
क. रु. ९००००
ड. रु. ७००००

*१०) मगनसेठने ३० रु. दराने १८ खेळणी आणली. ती सर्व खेळणी त्यांनी ५६० रुपयांस विकली. तर या व्यवहारात किती नफा झाला ?*
अ. ३०
ब. ४०
क. २०
ड. ५०

---------------------------------------------------- 

उत्तरे : १)  ब  २) क  ३) ब  ४) ब  ५) ड  ६) ड  ७) अ  ८) ड  ९) ड  १०) क

----------------------------------------------------

पोलीस भरती - प्रश्नसंच
      विषय - बुध्दीमत्ता
----------------------------------

१) एका घनाची बाजू ८ सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ?
अ. ६४ चौ. से. मी. 
ब.  ५१२ घ. से. मी. 
क.  ६४  घ. से. मी. 
ड.  ४८ घ. से. मी. 

२) ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज ९०अंश असते त्या कोनांना परस्परांचे ----- आहेत असे म्हणतात ?
अ. पूरक कोन 
ब. विरुद्ध कोन
क. सरळ कोन
ड. कोटीकोन

३) १४ से. मी. लांबी व ८ से. मी. रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती ?
अ. ११२ चौ. से. मी. 
ब. १०० चौ. से. मी.  
क. १२१ चौ. से. मी.   
ड. १११ चौ. से. मी. 

४)    AZ, BY, CX, ?
अ. DW
ब. EV
क. EF
ड. JO

५) ---- हे प्राथमिक किंवा मूळ रंग होत ?
अ. निळा, हिरवा, लाल
ब. निळा, पिवळा, पांढरा  
क. पांढरा, काळा, लाल 
ड. हिरवा, पांढरा, केशरी

६) खालीलपैकी दिलेले शब्दकोशामध्ये (डिक्शनरी) कोणत्या क्रमाने येतील ?
१ Internet २) Income ३) India ४) Import .....
अ. २३१४
ब.  ४२३१
क.  १२३४
ड.  ४३२१

७) ८, ९, १३, २२, ३८, ६३ ?
अ. ८९
ब.  १०९
क.  ९९
ड.  ७९

८) घड्याळीतील तास काटा व मिनिटकाटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो ?
अ. सहा वाजता  
ब. बारा वाजता 
क. साडेतीन वाजता  
ड. नऊ वाजता

९) खालील पर्यायामध्ये काही नवे दिली आहेत. त्यातील विसंगत नावे ओळखा ?  
अ. इंद्रकुमार गुजराल
ब. लालबहादूर शास्त्री 
क. एच. डी. देवेगौडा 
ड. डॉ. राजेंद्र प्रसाद

१०) खालील गटात न बसणारा शब्द कोणता ?
अ. उप जिल्हाधिकारी
ब.  पोलीस उपअधीक्षक
क. विक्रीकर अधिकारी 
ड.  जिल्हापरिषद अध्यक्ष

--------------------------------

उत्तरे : १) ब.  २) ड.  ३)अ. ४) अ.   ५) अ. ६)  ब.  ४२३१  ७) क ९९  ८) ड.  ९)  ड. १०) ड.
--------------------------------

पोलीस भरती - सराव  प्रश्नसंच
      विषय - अंकगणित
----------------------------------
*१) १ ते १७ या संख्याची बेरीज किती ?*
अ ) १४४ ब ) १६२ क ) १७१ ड ) १५३

*२)मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या व लहानात लहान ४ अंकी संख्या यातील फरक किती ?*
अ ) ९०,०००  ब ) ९८, ९९९  क) ९,००० ड ) ९०,००१
*३)  राहुल शंभर पायऱ्या चढून एका मंदिरात जातो . वर जाताना त्याने प्रत्येक  पायरीवर  तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले सोबत न्यावी लागतील ?*
अ ) ४,५००  ब ) ५,००० क ) ५०५० ड ) ५,५००

*४) १०.५ + १.०५ + १०५ = ?*
अ ) ११६.५५ ब ) ३१५ क ) ११७ ड ) ११६.५

*५) अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला ८ ने भागल्यास बाकी ४ उरते , १२ ने भागल्यास बाकी ८ उरते व १५ ने भागल्यावर बाकी ११ उरते ?*

अ ) ११६ ब  ) ५६  क ) १७६ ड ) २३६

*६) खालील दिलेल्या कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात जास्त आहे ?*
अ ) २     ब )  ५     क ) ९      ड ) १५
     ---          ---          ---           ---
      ७           ८           १२           १८
*७) एका नावेत सरासरी ३० Kg वजनाची मुले बसली आहेत . नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन ३१ Kg आहे . तर नावाड्याचे वजन किती ?*
अ ) ६१ ब ) ६२ क ) ५९ ड ) ५१

*८) एका वस्तूची किंमत २५% ने कमी झाल्याने ती वस्तू आता २७० रुपयास मिळते तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?*
अ ) ३६० ब ) ४८० क ) ५४० ड ) ४००

*९) एकाच प्रकारचे २५ टेबल काही रकमेस विकल्यामुळे ४०% नफा झाला , तर प्रत्येक टेबलवर शेकडा नफा किती ?*
अ ) २०% ब ) ४०% क ) ५/६ % ड ) सांगता येत नाही

*१०) साडेचार किलो ग्रॅम बेसनाच्या दीडशे ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील ?*
अ ) २५ ब ) ३० क ) ३५ ड ) २०

उत्तर : १- ड  २- ब ३- क ४-अ  ५- अ  ६-ड  ७-अ  ८- अ  ९- ब  १०-ब

चिंतामण विनायक वैद्य


भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य (जन्म : कल्याण, १८ ऑक्टोबर, इ.स. १८६१ - कल्याण, २० एप्रिल, इ.स. १९३८) हे संस्कृत भाषेतील विद्वान होत. ते एक थोर ज्ञानोपासक, महाभारत-रामायणाचे संशोधक - मीमांसक व चतुरस्र ग्रंथकार होते. यांनी अनेक माहितीप्रचुर पुस्तके लिहिली. संस्कृत भाषेच्या व्यासंगामुळे त्यांनी रामायण-महाभारतासारख्या पौराणिक इतिहासाच्या अनेक अपरिचित भागांवर प्रकाश टाकला.

चिंतामणराव वैद्यांचे वडील विनायकराव हे कल्याणला वकिली करीत. चिंतामणरावांचे शिक्षण कल्याण तसेच मुंबईच्या एल्‍फिन्स्टन स्कूल व एल्‍फिन्स्टन कॉलेजात झाले. इ.स. १८८२त एम.ए. आणि १८८४मध्ये एल्‌एल.बी. झाल्यानंतर त्यांनी काही काळ कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे मुनसफ म्हणून व नंतर ठाण्याच्या कोर्टात वकील म्हणून काम केले. त्यानंतर ते उज्जैन येथे न्यायाधीश पदावर रुजू झाले. पुढे १८९५मध्ये ग्वाल्हेर संस्थानच्या सरन्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. सेवानिवृत्तीनंतर ते १९०५ सालापासून लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून काम करू लागले. राष्ट्रीय शिक्षणाचे काम त्यांनी आस्थेने व निष्ठेने केले. कोलकाता, सुरत आदी काँग्रेस अधिवेशनांना ते टिळकांबरोबर गेले. टिळकांच्या पश्चात वैद्यांनी महात्मा गांधीजींचा मार्ग अनुसरला. वेगवेगळ्या समित्यांवर काम करणे, अहवाल लिहिणे ही कामे त्यांनी गांधींच्या मार्गदर्शनाखाली केली.

कार्य
संपादन करा
वैद्य हे पुणे येथे टिळक महाविद्यालयात व्याख्याते होते

लेखन
संपादन करा
चि.वि. वैद्यांनी १८८९ ते १९३४ या काळात सुमारे ५०,००० पृष्ठे इतके लेखन इंग्रजी-मराठीत केले. त्यांचे स्फुटलेखन केसरी, विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन आदी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. यांपैकी फारच थोडे लेखन ग्रंथरूपात आले. त्यांचे एकूण २९ ग्रंथ प्रकाशित झाले, पैकी ९ ग्रंथ इंग्रजीत आणि २० मराठीत होते.

रामायण-महाभारतावरील लेखन
संपादन करा
चिं.वि. वैद्यांच्या ’महाभारत ए क्रिटिसिझम या इंग्रजी ग्रंथावर लोकमान्य टिळकांनी केसरीतून सलग आठ अग्रलेख लिहून परीक्षण केले व ग्रंथांची मौलिकता दाखविली. त्यानंतर टिळकांनी आणखी एक अग्रलेख लिहून रिडल ऑफ रामायण या ग्रंथाचे परीक्षण केले. रामायण व महाभारत ही कल्पित काव्ये नसून ते इतिहासाचे ग्रंथ आहेत, या आपल्या विश्वासाला वैद्यांकडून व्यासंगपूर्ण समप्रमाण पुष्टी मिळाल्याबद्दल लोकमान्यांनी आपल्या अग्रलेखात (६ जुलै१९०६) समाधान व्यक्त केले आहे. वैद्यांनी महाभारताच्या संदर्भात एपिक इंडिया व श्रीकृष्ण चरित्र हे ग्रंथ लिहिले.

हिंदू आणि अन्य धार्मिक कल्पनांविषयीचे लेखन
संपादन करा
मानवधर्मसार व हिंदू धर्माची तत्त्वे या दोन पुस्तिकांतून वैद्यांचे हिंदुधर्मविषयक विचार व्यक्त झाले आहेत. त्यांच्या या पुस्तकांतून ईश्वर, सैतान, स्वर्ग आणि नरक, ग्रंथप्रामाण्य, चमत्कार, मूर्तिपूजा, आश्रमव्यवस्था इ. विषयांसंबंधी चिकित्सा केलेली आहे.

चिंतामणराव वैद्यांचे इतिहासविषक लेखन
संपादन करा
वैद्यांनी प्राचीन व मध्ययुगीन भारतीय इतिहासावर विविधांगी व प्रचंड संशोधन करून ग्रंथलेखन केले. त्यांपैकी ‘हिस्टरी ऑफ मिडिव्हल हिंदु इंडिया’ या ग्रंथाचे तीन खंड त्यांनी प्रथम इंग्रजीत लिहिले. आणि त्यानंतर त्याचा तीन-खंडी मराठी अनुवाद ‘मध्ययुगीन भारत’ या नावाने प्रसिद्ध केला. याशिवाय ‘गझनीच्या महमूदाच्या स्वाऱ्या’ आणि ‘शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा स्वराज’ हे त्यांचे दोन अन्य इतिहासविषक ग्रंथ होत.

प्रकाशित साहित्य
संपादन करा
अबलोन्नतिलेखमाला (१९०६)
एपिक इंडिया (१९०७)
ए हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचर (१९२६)
गझनीच्या महमूदाच्या स्वाऱ्या (१९२६)
चिं.वि. वैद्यांचे ऐतिहासिक निबंध (१९३१)
दुर्दैवी रंगू (कादंबरी, १९१४)
मध्ययुगीन भारत (तीन खंड, १९२५)
महाभारत ए क्रिटिसिझम (१९०४)
महाभारत कथासार
महाभारताचा उपसंहार (१९१८)
महाभारताचे खंड - सभापर्व, विराटपर्व, उद्योगपर्व (१९३३-३५)
मानवधर्मसार - संक्षिप्त मनुस्मृति (१९०९)
रामायण कथासार
रिडल ऑफ रामायण (१९०६)
शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा स्वराज (१९३१)
श्रीकृष्ण चरित्र (१९१६)
संयोगिता (नाटक, १९३४)
संस्कृत वाङमयाचा इतिहास - मूळ संस्कृत वैदिक ग्रंथांचा इतिहास
संस्कृत वाङ्‌मयाचा त्रोटक इतिहास (१९२२)
संक्षिप्त महाभारत (१९०५)
हिंदू धर्माची तत्त्वे (१९३१)
हिस्टरी ऑफ मीडिएव्हल हिंदू इंडिया (इंग्लिश) (History of Mediaeval Hindu India, ३ खंड, १९२१, १९२४ व १९२६)
चिं.वि. वैद्यांचे झालेले सन्मान आणि त्यांनी भूषविलेली पदे
संपादन करा
महाभारताचा तर्कशुद्ध सखोल प्रगाढ अभ्यास करून, महाभारताची सर्वंकष मीमांसा करणारा आद्य भाष्यकार म्हणून लोकमान्यांनी चिं.वि. वैद्यांना `भारताचार्य' ही पदवी दिली.
१९०८ साली पुणे येथे भरलेल्या सहाव्या मराठी साहित्य (ग्रंथकार) संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
भारत इतिहास संशोधन मंडळाचे सुरुवातीपासून (१९१०) आजीव सदस्य व पुढे अध्यक्ष (१९२६–३६) झाले.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरुपद त्यांनी भूषविले (१९२२–३४) व पुढे ते त्याचे कुलपती (१९३४–३८) झाले.
वैदिक संशोधन मंडळाच्या स्थापनेत ना. श्री. सोनटक्के यांना त्यांनी बहुमोल सहकार्य केले.
टिळक विद्यापीठ आणि वैदिक संशोधन संस्थेत ते शिकवीत असत.

ज्ञानाची भूक शमविण्यासाठी पोटाची भूक मारून टाकली. विद्यार्थी जीवनातील बाबासाहेबांचा हा महान आदर्श आहे.

इंग्लंडमध्ये विद्यार्जन करताना आपणाला कोणत्या परिस्थितीत दिवस काढावे लागले व किती कष्ट सोसावे लागले याबद्दलच्या स्वतःच्या आठवणी सांगताना बाबासाहेब त्या जितक्या उत्साहाने व खुमासदारपणे एकावेळी सांगतात तितक्याच उत्साहाने व खुमासदारपणे दुसऱ्यावेळी त्याच आठवणी सांगत असतात. एकच गोष्ट अनेकवेळा सांगितली तरी ती सांगण्याच्या त्यांच्या पध्दतीत यत्किंचितही बदल होत नाही. सांगण्याची तऱ्हा प्रत्येकवेळी सारखीच असते. त्यांच्या तोंडून अशा गोष्टी अनेक वेळा ऐकणाऱ्याला त्यांच्या या सांगण्याच्या एकाच पध्दतीची गंमत व कुतूहल वाटते.


इंग्लडमध्ये ते शिकत असताना तेथील ब्रिटिश म्युझियममध्ये वाचण्यासाठी ते जात असत. त्या लायब्ररीचा एक असा दंडक अाहे की, लायब्ररीत कुणी खाद्यपदार्थ आणून खाता कामा नये. बाबासाहेब सकाळी एक कप चहा व एक टोस्ट खाऊन त्या लायब्ररीत ८ वाजता जात असत. ते संध्याकाळी ८ वाजता लायब्ररी बंद होईपर्यंत सतत वाचीत बसत. लायब्ररी बंद झाली की मग घरी जात. दुपारी जेवण वगैरे करण्यास बाहेर हाॅटेलात जाण्याची त्यांची ऐपत नव्हती.


कारण हाॅटेलात जेवणे म्हणजे अतिखर्चाचे. तेवढ्या पैशांची त्यांच्याजवळ तरतूद असण्याची काहीच शक्यता नव्हती. दुपारी भूक लागेल म्हणून ते घरुन येतानाच सँडविचचे दोन तुकडे कागदात गुंडाळून खिशात घालून आणीत. लायब्ररीमधल्या माणसाची नजर चुकवून ते सँडविच दुपारच्या वेळी तेथेच खात व वाचन चालू ठेवीत. असे काही दिवस लोटल्यावर एकदा त्यांना अशाप्रकारे दुपारी सँडविच खाताना लायब्ररी अटेन्डन्टने पाहिले. तो तडक त्यांच्याकडे घाईघाईने आला व त्याने हटकले (विचारले), “हे काय करीत आहात तुम्ही?” बाबासाहेबांना त्या माणसाला काय उत्तर द्यावे हे सुचेना. ते किंचित गोंधळले. पण त्यांनी आपली खरी परिस्थिती सांगितली. ते म्हणाले,


“मी शिष्यवृत्ती घेऊन येथे शिकण्यासाठी आलो असल्यामुळे दुपारी हाॅटेलात जाऊन जेवण घेण्याइतके पैसे माझ्याजवळ पैसे नसतात. त्यामुळे मी घरूनच दोन सँडविच आणून त्यावर दुपारची वेळ निभावून नेतो.” त्यांचे हे स्पष्टीकरण ऐकून त्या अधिकाऱ्याला जरी त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली तरी त्यांना तशाप्रकारे लायब्ररीत सँडविच खाण्याची तो परवानगी देऊ शकत नव्हता. त्यांनी बाबासाहेबांना चक्क सांगितले.


“छे छे, येथे कोणताही खाद्यपदार्थ आणता कामा नये. येथे एक तुकडा जर नकळत जमिनीवर पडून राहिला तर रात्री शेकडो उंदीर धावून येतील आणि या लायब्ररीतील हजारो पुस्तकांचा फडशा उडवतील. म्हणून येथे तुम्ही उद्यापासून कसल्याही प्रकारचा खाद्यपदार्थ आणता कामा नये. नाहीतर मी तुमच्याविरुध्द मुख्य लायब्ररीयनकडे तक्रार करून तुम्हांला येथे येण्याचे बंद करीन.”


बाबासाहेबांनी त्याला सांगितले, “उद्यापासून मी काहीही आणणार नाही.” आणि त्या दिवसापासून बाबासाहेबांनी दुपारी खाण्याकरिता काहीही सोबत आणण्याचे बंद केले. दुपारी काहीही न खाता ते आपले वाचन सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सतत लायब्ररीत बसून करू लागले. 
केवढा तरी कष्टाळू व निश्चयी स्वभाव! त्यांनी ज्ञानाची भूक शमविण्यासाठी पोटाची भूक मारून टाकली. विद्यार्थी जीवनातील बाबासाहेबांचा हा महान आदर्श आहे.


महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

👉मूळ आडनाव – गोऱ्हे

👉जन्म – 11 एप्रिल 1827

👉मृत्यू – 28 नोव्हेंबर 1890

👉1869 – स्वतः कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.

👉1852 – पुणे, विश्रामबाग वाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.

👉21 मे 1888 – वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.

👉युक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक.

✅महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन परिचय

👉आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फूले यांना ओळखले जाते.

👉फुले यांचे घराने मूळचे सातार्‍यापासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.

✅महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण:-

👉फुले यांच्या काळात ब्राम्हनेत्तर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता.

👉गोविंदरावांणी इ. स. 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले. परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयांना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे म्हणणे होते. अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838 हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

👉चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कालावधिपर्यंत महात्मा फुलेंचे शिक्षण थांबले. इ. स. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा गोविंदरावांनी स्कॉटिश कमिशनर यांच्या ईग्रजी शाळेत घातले.

✅विवाह:-

👉महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.

✅संस्थात्मक योगदान:-

👉3 ऑगस्ट 1848– पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.

👉4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.

👉1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.

👉1855 – प्रौढांसाठी रात्र शाळा.

👉1863 – बालहत्या प्रतिबंधक गृह.

👉1877 – दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प.

👉10 सप्टेंबर 1853 – महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था.

👉24 सप्टेंबर 1873 – सत्यशोधक समाजाची स्थापना.

👉व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना.

👉1880 – म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.

✅महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :

👉1855 – ‘तृतीय रत्न‘ नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).

👉1868 – ‘ब्राम्हणांचे कसब‘

👉1873 – ‘गुलामगिरी‘ हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केला.

👉1873 – अस्पृश्यता निवारणाचा पहिला कायदा.

👉1 जानेवारी 1877 – ‘दीनबंधू‘ मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.

👉1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळले.

👉1883 – शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.

👉1885 – इशारा सत्सार “The Essense Of Truth” सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. या ग्रंथास विश्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.

👉अस्पृश्यांची कैफियत.

👉शिवाजी महाराजांचा पोवाडा.

✅महात्मा ज्योतिबा फुले यांची वैशिष्ट्ये:-

👉थॉमस पेनच्या “The Rights Of Man” या पुस्तकाचा प्रभाव.

👉1864 – पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.

👉1868 – अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.

👉1879 – रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला.

👉2 मार्च 1882 – हंटर कमिशन पुढे साक्ष.

👉ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.

👉उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.

👉सत्यशोधक समाजाचे ब्रीद – ‘सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी‘

👉सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला..

पोलीस भरती या पेपर मध्ये वारंवार विचारण्यात येणारे महत्त्वाचे प्रश्न

Q1) महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?

-- 1 मे रोजी

Q2) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

-- महात्मा फुले (24 सप्टेंबर 1873 पुणे)

Q3) "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हे वाक्य कोणी म्हंटले?

-- बाळ गंगाधर टिळक

Q4) भारतातील कोणत्या नदीस दक्षिणेची गंगा म्हटले जाते?

-- गोदावरी

Q5) 'ड' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता आजार संभवतो?

-- मुडदूस

Q6) मुंबई मेट्रो ची सुरवात कधी झाली?

-- 8 जून 2014 रोजी

Q7) राष्ट्रीय स्तरावतील N.G.S च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते?

-- S.R.P.F

Q8) महाराष्ट्र च्या विधानपरिषदतील सदस्यसंख्या किती आहे?

-- 78

Q9) भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष पद कोणी भूषविले?

-- डॉ. राजेंद्र प्रसाद ( भारताचे पहिले राष्ट्रपती )

Q10) 'वंदे मातरम' हे गीत ....... यांच्या

'आनंदमठ' या कादंबरीतून घेण्यात आले?

-- बकीमचंद्र चॅटर्जी

Q11) ग्रामगीता कोणी लिहली?

-- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

Q12) महाराष्ट्रातील सर्वात नवीन जिल्हा कोणता?

-- पालघर ( 1 ऑगस्ट 2014 )

Q13) भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

-- डॉ बाबासाहेब आंबेडकर

Q14) चंद्रावर पाऊल ठेवणार पहिला मानव कोण?

-- निल आर्मस्ट्राँग

15) ' गलगंड ' हा कोणत्या ग्रंथातील बिघाडामुळे होतो?

-- थायरॉईड

Q16) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात?

-- दादासाहेब फाळके

17) भारताने अंतराळात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता?

-- आर्यभट्ट ( 19 एप्रिल 1975 )

18) कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त सर्व रक्त गटाच्या व्यक्तींना चालते?

-- ओ

Q19) भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी एकूण किती कालावधी लागला आहे?

-- 2 वर्ष 11 महिने 18 दिवस

Q20) सतिबंदी कायदा कोणी केला?

-- लॉर्ड विल्यम बेंटिंक ( 1829 ).

भारताचे संयुक्त लष्करी युद्ध सराव

◾️ भारताचे संयुक्त लष्करी युद्ध सराव

🔰 इंद्र : इंडिया - रशिया
🔰 कोंकण : इंडिया - ब्रिटन
🔰 इंद्रधनुष्य : इंडिया - ब्रिटन
🔰 अजेय वॉरीयर : इंडिया - ब्रिटन
🔰 हरिमाऊ शक्ति : इंडिया - मलेशिया
🔰 गरुड शक्ति : इंडिया - इंडोनेशिया
🔰 समुद्र शक्ति : इंडिया - इंडोनेशिया
🔰 इकुवेरीन : इंडिया - मालदीव
🔰 अल नागाह : इंडिया - ओमान
🔰 इस्टर्न ब्रिज : इंडिया - ओमान
🔰 नसीम-अल-बहार : इंडिया - ओमान
🔰 धर्मा गार्डीयन : इंडिया - जपान
🔰 सहयोग काजीन : इंडिया - जपान
🔰 शिन्यू मैत्री : इंडिया - जपान
🔰 जिमेक्स : इंडिया - जपान
🔰 प्रबळ दोस्त्याक : इंडिया - कझाकस्तान
🔰 नोमँडिक एलिफंट : इंडिया - मंगोलिया
🔰 बोल्ड कुरुक्षेत्र : इंडिया - सिंगापूर
🔰 खंजर : इंडिया - किरगिस्तान
🔰 डीझर्ट इगल : इंडिया - युएई
🔰 फोर्स : आशियान
🔰 इमबेक्स : इंडिया - म्यानमार
🔰 सिम्बैक्स : इंडिया - सिंगापूर
🔰 विंबैक्स : इंडिया - वियतनाम
🔰 सियाम इंडिया : इंडिया - थायलँड .

यशाचा राजमार्ग प्रश्न संच

*१)_____ही ब्राझीलची नवी राजधानी आहे?*

*१)रिओ दि जानेरो*
*२) ब्राझिलिया*✅✅
*३)उरुग्वे*
*४) मिसरा*

*२)पहिली वसुंधरा परिषद ब्राझीलची तत्कालीन राजधानी रिओ दी जानेरो येथे इ.स.  मध्ये भरली होती?*

*१)१९९१*
*२)१९९२*✅✅
*३)१९९३*
*४)१९९४*

*३)क्षेत्रफळाच्या दृष्टीने ब्राझीलचा जगात__क्रमांक लागतो?*

*१)पहिला*
*२)दुसरा*
*३)तिसरा*
*४)चौथा*
*५)पाचवा*✅✅

*४)_______हा ब्राझीलचा लोकप्रिय उत्सव आहे?*

*१)एरूवाक पूनम*
*२)ओणम*
*३) कार्निवल*✅✅
*४) डी बिग फेअर*

*५)अमेरिकेच्या संयुक्त संस्थानां नंतर केळी व संत्री उत्पादनात ब्राझीलचा _क्रमांक लागतो?*

*१)पहिला*
*२)दुसरा*✅✅
*३)तिसरा*
*४)चौथा*

*६)____हे ब्राझीलमधील सर्वात उंच शिखर आहे?*

*१)माउंट एव्हरेस्ट*
*२)माउंट अबू*
*३)पिको दी नेब्लीना*✅✅
*४) पिक ऑफ ब्राझिल*

*७) ट्रान्स अॅमेझॉलियन महामार्ग  हा _व ब्राझिल या दोन देशातील शहरांना जोडणारा महामार्ग आहे?*

*१) कुवैत*
*२)पेरू*✅✅
*३)लिबिया*
*४) मोरिशस*

*८)अरेबिक भाषेत इजिप्तला____ म्हणतात?*

*१) मिस्र*✅✅
*२) इजीपस*
*३)नैलिया*
*४)जिस्म*

*९)______हे इजिप्त मधील सर्वात उंच शिखर आहे?*

*१)माउंट कॅटरिन*✅✅
*२)माउंट आझमी*
*३)माउंट एव्हरेस्ट*
*४)माउंट इजिप्त*

*१०)उन्हाळ्यात नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशात __हे उष्ण व कोरडे वारे वाहतात?*

*१) तायफ्युन*
*२)खमसीन*✅✅
*३) काळभैरव
*४) खराळ*.



🔴महर्षी कर्व्यांना 3 जून 1916 रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कुणाकडून मिळाली ? 

अमेरिकन वुमेन्स युनिव्हर्सिटी 
मास्को वुमेन्स युनिव्हर्सिटी 
जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी ✅
फ्रान्स वुमेन्स युनिव्हर्सिट

_____________
🟠 पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?

तात्या टोपे ✅
राणी लक्ष्मीबाई 
शिवाजी महाराज 
नानासाहेब पेशवे
_____________
🟡 प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला?

सन १९०२ 
सन १९०३
सन १९०४✅
सन १९०५

_____________
🟢 वसंदादा पाटील यांनी वैयक्तिक सत्याग्रह कुठं केला?

1) सांगली ✅
2) कराड
3) सातारा
4) कोल्हाप

_____________✍

🟣 इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?

लोकमान्य टिळक 
महात्मा गांधी
गोपाळ हरी देशमुख ✅
न्यायमूर्ती रानडे

_____________

महत्वाचे काही प्रश्न

प्र. अलीकडेच सेंट्रल बँकिंग कमिशन 2022 मध्ये 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
उत्तर :- मारिओ मार्सेल

प्र. भारतीय नौदलाच्या कोणत्या जहाजाला अलीकडेच राष्ट्रपती कलर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर :- INS वालसुरा

प्र. इंडियन सायकियाट्रिक सोसायटीची नॅशनल कॉन्फरन्स नुकतीच कोणत्या शहरात सुरू झाली आहे?
उत्तर :- विशाखापट्टणम

प्र. अलीकडेच 7 व्या स्मार्ट सिटीज इंडिया एक्स्पो कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला आहे?
उत्तर :- नवी दिल्ली

प्र. अलीकडेच FIFA विश्वचषक कतार 2022 चे प्रायोजकत्व करणारी पहिली भारतीय कंपनी कोण बनली आहे?
उत्तर :- भायजू

प्र. नुकतेच 'द लिटल बुक ऑफ जॉय' हे मुलांचे पुस्तक कोणी लिहिले आहे?
उत्तर :- दलाई लामा आणि डेसमंड टुटू

प्र. अलीकडेच NITI आयोगाने जारी केलेल्या निर्यात तयारी निर्देशांक 2021 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तर :- गुजरात

प्र. नुकत्याच संपलेल्या इबरड्रोला स्पॅनिश पॅरा-बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय 2022 मध्ये दोन रौप्य आणि एक कांस्य पदक कोणी जिंकले आहे?
उत्तर :- प्रमोद भगत

प्र. अलीकडेच कोणत्या शहरात जागतिक औषध केंद्र स्थापन करण्यासाठी WHO ने भारतासोबत करार केला?

उत्तर :- जामनगर

प्र. अलीकडेच, "सैफ अंडर-18 महिला चॅम्पियनशिप 2022" या फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?

उत्तर :- भारत

प्र. नुकतेच निओ बँक अ‍ॅव्हेल फायनान्सचे संपादन कोणी जाहीर केले आहे?

उत्तर :- ओला

प्र. अलीकडेच AAI ने स्वदेशी हवाई वाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी कोणाशी करार केला आहे?

उत्तर :- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

प्र. अलीकडे २६ मार्च २०२२ रोजी कोणत्या देशाने ५१ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला?

उत्तर :- बांगलादेश

प्र. अलीकडेच संरक्षण मंत्रालयात सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर :- लेफ्टनंट जनरल विनोद जी खंदारे

प्र. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच संरक्षण दल हेल्प डेस्क सुरू केला?

उत्तर :- उत्तराखंड

प्र. अलीकडेच केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना' किती काळासाठी वाढवली आहे?

उत्तर :- सप्टेंबर २०२२

प्र. अलीकडेच भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?

उत्तर :- हिमंता बिस्वा सरमा

प्र. अलीकडे संरक्षण मंत्रालयाने किती नवीन सैनिक शाळांना मान्यता दिली आहे?

उत्तर :- २१

प्र. अलीकडेच, नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टॉल्टनबर्ग यांचा कार्यकाळ किती काळासाठी वाढवण्यात आला आहे?

उत्तर :- १ वर्ष

प्र. अलीकडेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) चे महासंचालक म्हणून नियुक्त झालेले पहिले आफ्रिकन कोण बनले आहे?

उत्तर :- गिल्बर्ट होंगबो

प्र. नुकताच संडे स्ट्रीट इनिशिएटिव्ह कोणाकडून सुरू करण्यात आला?

उत्तर :- मुंबई पोलीस

----------------------------------------

०६ नोव्हेंबर २०२२

पोलीस भरती माहिती


भारत के जिन 8 राज्यों से कर्क रेखा गुजरती है याद करने का ट्रिक

TRICK - मित्र पर गमछा झार 

1. मि => मिजोरम

2. त्र => त्रिपुरा

3. प => पश्चिम बंगाल

4. र => राजस्थान

5. ग => गुजरात

6. म => मध्य प्रदेश

7. छ => छत्तीसगढ़

8. झार => झारखंड

क्षेत्रफल की दृष्टि से सबसे बड़े देश

🔳TRICK = रुक चीन अब आ भारत

    1. रु👉        रूस

    2.क👉          कनाडा

    3.चीन👉       चीन

    4.अ👉        अमेरिका

    5.ब👉         ब्राजील

    6.आ👉      ऑस्ट्रेलिया 

   7.भारत👉    🇮🇳भारत🇮🇳

राज्य एवं उनके प्रमुख लोक नृत्य   ═══════════════════

❀ मध्य प्रदेश   ➭  पंडवानी, गणगौर नृत्य

❀ असम  ➭ बिहू

❀ उत्तरप्रदेश  ➭ नौटंकी

❀ गुजरात  ➭ गरबा

❀ कर्नाटक ➭  यक्षगान

❀ पंजाब   ➭  भांगड़ा, गिद्दा

❀ राजस्थान ➭   कालबेलिया, घुमर,
तेरहताली, भवाई नृत्य

❀ महाराष्ट्र ➭   तमाशा, लावणी

❀ उत्तराखंड ➭  कजरी, छौलिया

❀ जम्मू-कश्मीर  ➭  कूद दंडीनाच, रुऊफ

❀ हिमाचल प्रदेश ➭   छपेली,दांगी, थाली

❀ बिहार  ➭ छऊ, विदेशिया, जाट- जतिन

❀ केरल ➭ कथकली, मोहिनीअट्टम

❀ नागालैंड  ➭ लीम, छोंग

❀ पश्चिमबंगाल  ➭ जात्रा,ढाली, छाऊ

❀ गोवा ➭ मंदी, ढकनी

❀ आन्ध्रप्रदेश ➭   कुचीपुडी

❀ झारखंड  ➭ विदेशिया, छऊ

❀ उड़ीसा ➭ ओडिसी, धुमरा

❀ छत्तीसगढ़  ➭  पंथी नृत्य

_______________________

‘झीलों का शहर’ उपनाम से जानाजाने वाला शहर

– भोपाल

मध्य प्रदेश का एकमात्र हिल स्टेशन जिसे सतपुड़ा की रानी कहा जाता है

– पचमढ़ी

मध्य प्रदेश राज्य का सबसे बड़ा अभयारण्य –

नौरोदेही

मध्य प्रदेश राज्य का सबसे छोटा अभयारण्य –

राला मण्डल

मध्य प्रदेश राज्य का सबसे छोटा राष्ट्रीय उद्यान –

वन बिहार

मध्य प्रदेश का हीरा, डायस्फोर, पाइरोफिलाइट तथा तांबा, अयस्क के उत्पादन में देश में स्थान –

प्रथम

मध्य प्रदेश में वन क्षेत्र का प्रतिशत –

31%

मध्य प्रदेश राज्य में सर्वाधिक आरक्षित वन –

उज्जैन

पोलीस भरती परीक्षेत यावर एक प्रश्न हमखास विचारला जातो


 हरित क्रांती           ➖   अन्नधान्य उत्पादनात वाढ.
拏 धवल / श्वेत क्रांती  ➖   दुग्ध उत्पादनात वाढ.
 निल / निळी क्रांती ➖   मत्स्य उत्पादनात वाढ.
戀 गुलाबी क्रांती         ➖   झिंगे / कोळंबी उत्पादनात वाढ.
讀 रजत / चंदेरी क्रांती ➖  अंडी उत्पादनात वाढ.
樂 पीत क्रांती             ➖   तेलबिया उत्पादनात वाढ.
 करडी क्रांती          ➖   खत उत्पादनात वाढ.
 अमृत क्रांती          ➖   नदी जोड प्रकल्प.
凜 गोल क्रांती            ➖   बटाटा उत्पादनात वाढ.
 सोनेरी क्रांती         ➖   ताग उत्पादनात वाढ.
 कृष्ण क्रांती           ➖   खनिज तेल उत्पादनात वाढ.
 लाल क्रांती            ➖  मेंढीपालन/ टोमॅटो उत्पादनात
 ई क्रांती                ➖  माहिती तंत्रज्ञान वापरात वाढ.
復 चंदेरी तंतू क्रांती     ➖  कापूस उत्पादनात वाढ
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पोलीस भरतीसाठी महत्वाचे प्रश्न - उत्तरे

महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर - कळसुबाई (1646 मी.) ता - अकोले, जि- अहमदनगर.

महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

महाराष्ट्राची राजधानी - मुंबई
      उपराजधानी  - नागपूर.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36.

 महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे.

 महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा - नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे

विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, ता - पन्हाळा.

 महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जि - वर्धा.

 महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि - अहमदनगर.

भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

 महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

  नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

 संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.

पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

 महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.

नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

 ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प - तुर्भे या ठिकाणी आहे.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.

  रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...