२१ जुलै २०२२

महत्वाच्या चालू घडामोडी

१] अलीकडेच कोणत्या स्टार अष्टपैलू क्रिकेटपटूंनी एक दिवसीय सामन्यातून निवृत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे?

उत्तर - बेन स्टोक


२] खालीलपैकी कोणत्या दिवशी नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो?

उत्तर - 18 जुलै


३] अलीकडेच भारताने कोविड-19 लसीकरणाचा टप्पा.... कोटी इतका केला आहे?

उत्तर - २००कोटी


४] अलीकडेच कोणाची IMF च्या वॉल ऑफ माजी चीप इकॉनॉमिस्ट वैशिष्ट्यकृत म्हणून नियुक्ती झाली?

उत्तर - गीता गोपीनाथ


५] अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी... या जिल्ह्यातून बुदेलखंड एक्सप्रेसवे चे उद्घाटन केले आहे?

उत्तर - जलोन


६] अलीकडेच कोणाला क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात आला?

उत्तर - रुंदाताई करात


७] सतत विकास निर्देशांक SDG 2022 खालीलपैकी कोणत्या संस्थेने जाहीर केला?

उत्तर - संयुक्त राष्ट्र


८] AS- ४०० मिसाईल डिफेन्स सिस्टम भारत कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहेत?

उत्तर - रशिया


९] कोणते शहर SCO ची पहिली सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानी असेल?

उत्तर - वाराणसी

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)


आंबोली (सिंधुदुर्ग)


खंडाळा (पुणे)


लोणावळा (पुणे)


भिमाशंकर (पुणे)


चिखलदरा-गाविलगड (अमरावती)


जव्हार (पालघर)


तोरणमाळ (नंदुरबार)


पन्हाळा (कोल्हापूर)


महाबळेश्वर (सातारा)


पाचगणी (सातारा)


कोयनानगर (सातारा)


माथेरान (रायगड)


मोखाडा(ठाणे)


सूर्यामाळ (ठाणे)


म्हैसमाळ (औरंगाबाद)


येडशी (उस्मानाबाद)


रामटेक (नागपूर)


भारतातील 10 सर्वोच्च पर्वत शिखरे .


⛰. कंचनजंगा : 8586 मीटर

पूर्व हिमालयात सिक्कीम, ईशान्य भारत आणि पूर्व नेपाळ यांच्या सीमेवर स्थित आहे.


⛰. नंदा देवी : 7816 मीटर

उत्तराखंडच्या चमोली गढवाल जिल्ह्यात स्थित आहे. 


⛰. Kamet : 7756 मीटर

उत्तराखंड, उत्तर भारत, चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशाच्या सीमेजवळ. 


⛰. Saltoro Kangri : 7742 मीटर

सियाचीन ग्लेशियरच्या नैऋत्य बाजूस आग्नेय काराकोरममध्ये स्थित आहे. 


⛰. सासेर कांगरी : 7672 मीटर

लडाख, भारतातील सर्वात उत्तरेकडील केंद्रशासित प्रदेश येथे स्थित आहे 


⛰. मामोस्टॉन्ग कांगरी : 7516 मीटर

सियाचीन ग्लेशियरच्या पूर्व-दक्षिणपूर्वेस 30 किमी अंतरावर आहे.


⛰. रिमो I : 7385 मीटर

लडाखच्या सियाचीन भागात आहे. 


⛰. हरदेओल : 7151 मीटर

उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातील मिलम व्हॅलीच्या उत्तरेकडील टोकावर स्थित आहे. 


⛰. चौकांबा : 7138 मीटर

उत्तराखंडमधील बद्रीनाथ या पवित्र शहराच्या पश्चिमेस स्थित आहे. 


⛰. त्रिसूल : 7120 मीटर 

बागेश्वर, उत्तराखंड येथे स्थित आहे. 

महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे


🏝जायकवाडी         नाथसागर

 🏝पानशेत              तानाजी सागर

🏝भडारदरा          ऑर्थर लेक/विल्सन डॅम  

🏝गोसिखुर्द           इंदिरा सागर 

🏝वरसगाव               वीर बाजी पासलकर

🏝तोतलाडोह            मेघदूत जलाशय

🏝भाटघर                  येसाजी कंक

🏝मळा                      ज्ञानेश्वर सागर 

🏝माजरा                   निजाम सागर

🏝कोयना                   शिवाजी सागर

🏝राधानगरी                लक्ष्मी सागर

🏝तानसा                     जगन्नाथ शंकरशेठ

🏝तापी प्रकल्प            मुक्ताई सागर

🏝माणिक डोह            शहाजी सागर

🏝चांदोली                   वसंत सागर

🏝उजनी                     यशवंत सागर

🏝दधगंगा                  राजर्षी शाहू सागर

🏝विष्णुपुरी             शंकर सागर

🏝वतरणा                 मोडक सागर

भूगोल महाराष्ट्रातील डोंगर रांगा

📚 सपर्धा परीक्षेचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासणे अगत्याचे ठरते. आज महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर आणि त्यांचा जिल्हा यांविषयी माहिती घेऊयात.


👉 डोंगराचे नाव : जिल्हा


▪️ सातमाळा : नाशिक

▪️ वणी : नाशिक

▪️ निर्मल : नांदेड

▪️ चिकोडी : कोल्हापूर

▪️ पन्हाळा : कोल्हापूर

▪️ चांदूरगड : चंद्रपूर

▪️ मांधरादेव : सातारा

▪️ महादेव : सातारा

▪️ मालिकार्जुन : सांगली

▪️ अजिंठा: औरंगाबाद

▪️ कळसूबाई : अहमदनगर

▪️ भामरागड : गडचिरोली

▪️ गाविलगड : बुलढाणा, अकोला

▪️ बालाघाट : बीड

▪️ तोरणमाळ : नंदुरबार

महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे


👤. वल्लभभाई पटेल : सरदार


👤. लालबहादूर शास्त्री : मॅन ऑफ पीस


👤. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : मिसाईल मॅन


👤. नाना पाटील : क्रांतिसिंह


👤. वि.दा. सावरकर : स्वातंत्र्यवीर


👤. डॉ. भिमराव रामजी आंबेडकर : बाबासाहेब


👤. गोपाळ हरी देशमुख : लोकहितवादी


👤. लता मंगेशकर : स्वरसम्राज्ञी


👤. दादाभाई नौरोजी : भारताचे पितामह


👤. शांताराम राजाराम वणकुद्रे : व्ही. शांताराम


👤. नारायण श्रीपाद राजहंस : बालगंधर्व


👤. मंसूर अलीखान : पतौडी टायगर


👤. लक्ष्मणशास्त्री बाळाजी : जोशी तर्क तीर्थ


👤. सी.आर. दास : देशबंधू


👤. सरदार पटेल : पोलादी पुरुष


👤. दिलीप वेंगसकर : कर्नल


👤. सुनील गावस्कर : सनी, लिट्ल मास्टर


👤. पी.टी. उषा : भारताची सुवर्णकन्या, स्प्रीटक्चीन


👤. नरसिंह चिंतामण केळकर : साहित्यसम्राट


👤. आचार्य रजनीश : ओशो

महत्वाचे समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था :-

⭕️नाना शंकरशेठ:- 

➡️ बॉम्बे नेटिव्ह एज्यूकेशन सोसायटी - 1823 मुंबई , 

➡️ बॉम्बे असोसिएशन:- 1852 


⭕️ नया. म. गो. रानडे:-

➡️ विधवा विवाहोत्तेजक मंडळ (१८६५)

➡️ डक्कन सभा :- 1896 , पुणे



⭕️ रमाबाई रानडे :- 

➡️ आर्य महिला समाज :-  1882(पंडिता रमाबाई, काशिताई कानिटकर)

➡️ हिंदू लेडिज सोशल क्लब :- 1894, मुंबई 

➡️ सवा सदन :-1908 ,मुंबई

➡️ भारत महिला परिषद :- 1904 ,मुंबई


⭕️महर्षी वि. रा. शिंदे :-  

➡️ डिप्रेस्ड क्लासेस मिशन (१९०६),

➡️ राष्ट्रीय मराठा संघ.

➡️ अहिल्याश्रम.

 ➡️ तरुण मराठा संघ.


⭕️ जनाक्का शिंदे :-

➡️ निराश्रित सेवासदन



⭕️ कर्मवीर भाऊराव पाटील :-

➡️ रयत शिक्षण संस्था, काले (१९१९), 


⭕️ वि. दा. सावरकर : -

➡️ मित्रमेळा(1900).

➡️ अभिनव भारत(1904).


⭕️ महात्मा गांधी:- 

➡️ हरिजन सेवक संघ (१९३२) .


⭕️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर:-

➡️ बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४).

➡️ मजुर पक्ष (१९३६).

➡️ अ.भा. समता सैनिक दल (१९२७)


⭕️नाम. गो. कृ. गोखले :-

➡️ भारत सेवक समाज (१९०५)


⭕️ गणेश वासुदेव जोशी(सार्वजनिक काका) :- 

➡️ सार्वजनिक सभा (पुणे), 

➡️ दशी व्यापारोत्तजक मंडळ (पुणे)



⭕️ सरस्वतीबाई जोशी:- 

➡️ सत्री-विचारवंती संस्था, पुणे


⭕️ पडिता रमाबाई:-

 ➡️ कपासदन 

➡️ शारदा सदन (मुंबई), 

➡️ मक्तीसदन (1896, केडगाव), 

➡️ आर्य महिला समाज, पुणे



😜😜चहा पिताना discuss करा 100% हेच कामाला येणार आहे उगाच कोणाला तरी discuss करण्या पेक्षा हे वाचा फायदा guaranteed🔥✌️


राज्य वित्त आयोग


♦️सथापना- राज्यपालाकडून दर 5 वर्षानी..


♦️सथापन- संविधान अनुच्छेद 243I नुसार.


♦️पचायतीकरिता कार्ये- अनुच्छेद 2431 नुसार.


♦️नगरपालिका करिता कार्ये- अनुच्छेद 243Y नुसार.


♦️कार्ये- राज्य व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात उत्पन्नाचे वाटप व अनुदान याची तत्त्वे ठरवणे.


आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना.


राज्यपालाने सोपवलेली कामे.


♦️महाराष्ट्रात स्थापना- 23 एप्रिल 1994.


♦️रचना- एक अध्यक्ष व 4 सदस्य.


आयुष्मान भारत अभियान

 


◆ सुरुवात : 2018 -19 


◆ उद्देश : प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक स्तरावरील आरोग्य सेवांचा विकास करणे. 


◆ या योजनेत 2 उपयोजनांचा समावेश आहे.


1) आरोग्य तंदुरुस्ती केंद्र :


◆ सुरुवात : 14 एप्रिल 2018, बिजापूर (छत्तीसगढ) 


◆ 2022 पर्यंत दीड लाख उपकेंद्रांची रूपांतर आरोग्य तंदुरुस्ती केंद्रांमध्ये केले जाणार आहे.


1) PM जनधन आरोग्य योजना : 


◆ सुरुवात : 23 सप्टेंबर 2018, रांची (झारखंड) 


◆ लाभार्थी : 10.74 कोटी कुटुंब 


◆ लाभार्थी ओळख : SECC 2011 


◆ कुटुंब सदस्य संख्या : मर्यादा नाही 


◆ विमा लाभ : पाच लाख रु. प्रतिकुटुंब प्रतिवर्ष

०६ जुलै २०२२

टी. राजा कुमार यांची फायनान्शियल एक्शन टास्क फोर्सच्या (FATF) अध्यक्षपदी नियुक्ती.

➡️ टी. राजा सिंगापूरमधील FATF मिशनचे नेते आहेत.  


➡️ सथापना : फायनान्शिअल अक्शन टास्क फोर्स (FATF) FATF ही पॅरिसमधील G7 शिखर परिषदेदरम्यान 1989 मध्ये स्थापन करण्यात आलेली एक आंतरशासकीय संस्था आहे. 


➡️ मख्य कार्य : हे देशाच्या मनी लाँडरिंग विरोधी आणि दहशतवाद विरोधी वित्तपुरवठा पायाभूत सुविधांची ताकद मोजते. मनी लाँड्रिंग, दहशतवादी वित्तपुरवठा आणि इतर संबंधित धोक्यांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीच्या अखंडतेसाठी मानके सेट करणे आणि कायदेशीर, नियामक आणि ऑपरेशनल उपायांच्या प्रभावी अंमलबजावणीला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे. 


➡️  तयाचे सचिवालय:  पॅरिसमधील आर्थिक सहकार आणि विकास संघटनेच्या (OECD) मुख्यालयात आहे. 


➡️ सदस्य संख्या :FATF मध्ये सध्या 39 सदस्य आहेत.  भारत हा FATF चा सदस्य आहे.

०५ जुलै २०२२

तलाठी प्रश्नसंच

 (०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ आॅगस्ट.


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६ सप्टेंबर


विषय = इतिहास आणि भूगोल प्रश्नसंच

प्रश्न १) दलित पँथरची स्थापना केव्हा झाली?
१) ९ जुलै १९७२           २) ९ जुलै १९७०
३) ११ डिसेंबर १९७३    ४) ११ एप्रिल १९७०

प्रश्न २) बाल हत्या प्रतिबंधकगृहाच्या स्थापनेचा उत्तर सांगा?
१) मुलींच्या हत्येविरोधात जनजागृती करणे
२) अविवाहित स्त्रिया व विधवा यांना आधार देणे
३) भारतातील महिला शिक्षणाचा प्रसार करणे   
४) भ्रूण हत्त्या व बालहत्या प्रथा रोखणे

प्रश्न ३) अ) विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना लोकहितवादी यांनी केली.
ब) लोकहितवादी हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते
१) अ योग्य            २) अ, ब योग्य
३) फक्त ब योग्य     ४) दोन्ही चूक

प्रश्न ४) खालीलपैकी कोणत्या प्रदूषणामुळे मानसिक संतुलन बिघडते ?
१) जलप्रदूषण           २) ध्वनी प्रदुषण
३) मृदा प्रदूषण          ४) हवा प्रदूषण

प्रश्न ५) पृथ्वीबद्दल खालीलपैकी अचूक विधाने ओळखा?
अ)  पृथ्वीचा विषुवृत्तीय व्यास १२७५६ किलोमीटर आहे.
ब) पृथ्वीची ध्रुवीय व्यासाची लांबी १२७१४ किमी आहे.
१)  फक्त अ               २) फक्त ब
३) दोन्ही बरोबर         ४) यापैकी नाही
===========================
उत्तरे :- प्रश्न १ -१, प्रश्न २- २, प्रश्न ३ -३, प्रश्न ४- २, प्रश्न ५ -३.
===========================

प्रश्न १) गोपाळ बाबा वलंगकर यांनी कोणती संस्था स्थापन केली?
१) आर्यन दोष परिहार समाज (१८९०) दापोली
२) ब्राह्मो समाज (१९२८) मुंबई
३) सत्यशोधक समाज (१८७३) कोल्हापूर        ४) आर्य समाज (१८७५) ठाणे

प्रश्न २) किसन फागुजी बनसोड यांच्या विषयी अयोग्य पर्याय ओळखा?
१) त्यांचा जन्म नागपूर जिल्ह्यात झाला     
२) त्यांनी आर्थिक प्रगतीसाठी सन्मान बोधक निराप्रीतसमाज समाज स्थापन केली.
३) त्यांनी प्रथम अपृश्यता निवारण परिषद मुंबई येथे भरवली.      
४) त्यांनी चोखामेळा सुधारणा मंडळ व वाचनालयाची स्थापना केली.

प्रश्न ३) स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना आंबेडकरांनी केव्हा केली?
१) १५ ऑगस्ट १९३६     २) १५ ऑगस्ट १९३७
३) २५ ऑगस्ट १९३३     ४) ३६ जाने. १९३०

प्रश्न ४) भारतातील पूर्वेकडील पर्यटन स्थळे कोणती आहेत?
अ) इटानगर.        ब) काजिरंगा
क) तवांग.            ड) इफाळ
१) अ,ब, क           २) ब, क, ड
३) अ, क, ड          ४) वरील सर्व

प्रश्न ५) प्रदूषणामुळे पुढील कोणत्या घटकाची गुणवत्ता कमी होते?
अ) खडक               ब) हवा
क) मृदा                  ड) पाणी

१)  अ, ब, क        २) ब, क
३) अ, ब               ४) वरील सर्व
===========================
उत्तरे :- प्रश्न १ -१, प्रश्न २- ३, प्रश्न ३ -१, प्रश्न ४- ४, प्रश्न ५ -३.
===========================

प्रश्न १) गांधींजींच्या प्रारंभीच्या जीवन कार्यकाळात कोणत्या आंदोलनाचा समावेश होता?
अ) चंपारण्य सत्याग्रह.   
ब) खेडा सत्याग्रह
क) मुळशी सत्याग्रह.     
ड) अहमदाबाद आंदोलन
१) अ,ब, ड.         २) अ, क, ड
३) फक्त अ व ब    ४) अ, ब, क, ड

प्रश्न २) ब्रिटिशांनी भारतात....युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली?
१) बक्सार          २) वादीवांस
३) प्लासी.           ४) श्रीरंगपट्टनम

प्रश्न ३) पहिले फॅक्टरी कमीशन......यांच्या अध्यक्षतेखाली नेमले होते.
१) मोरारजी गोकुळदास
२) दिनशा पेटीट
३) अबुर्थ नॉट
४) अलम ह्युम

प्रश्न ४) जगनाथपूरी हे भव्यमंदिर.....राज्यात आहे?
१) छत्तीसगड             २) ओरिसा
३) झारखंड               ४) बिहार

प्रश्न ५) सात बेटांच्या दरम्यान असलेल्या समुद्र बुजवून कोणत्या शहराची भूमी तयार केली आहे?
१) सुरत              २) कन्याकुमारी
३) मुंबई               ४) विशाखाट्टणम
===========================
उत्तरे :- प्रश्न १ -१, प्रश्न २- ३, प्रश्न ३ -३, प्रश्न ४- २, प्रश्न ५ -३.
==========================

प्रश्न १) खालीलपैकी कोणाला क्रांती कार्याचे जनक म्हणतात?
१) विष्णुबुवा ब्रह्मचारी          
२) वासुदेव बळवंत फडके
३) चाफेकर बंधू          
४) अनंत कान्हेरे

प्रश्न २) जपानमध्ये बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण खालीलपैकी कोणी घेतले?
१) के डी कुलकर्णी        
२) दादासाहेब खापर्डे
३) काकासाहेब खाडिलकर   
४) गोविंद पोतदार

प्रश्न ३) पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे?
१) स्वामी दयानंद         २) लोकमान्य टिळक
३) महात्मा फुले         ४) सेनापती बापट

प्रश्न ४) तेलंगणातील वरंगळ येथे खालील पैकी कोणते उद्योग आढळतात
अ) कापड उद्योग.          ब) साखर उद्योग
क) लोह,पोलाद उद्योग.   ड) सिमेंट उद्योग
१) अ आणि ड         २) क आणि ड
३) अ, ब, क             ४) फक्त अ

प्रश्न ५) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तेलशुद्धीकरण उद्योग नाहीत?
१) हाजिर          २) तुर्भे
३) चंद्रपूर          ४) बैरोनी
===========================
उत्तरे :- प्रश्न १ -२, प्रश्न २- ४, प्रश्न ३ -४, प्रश्न ४- ४, प्रश्न ५ -३.
===========================

प्रश्न १) बाल विवाह रोखण्यासाठी संमती वयाचे विधेयक मांडणारे समाजसुधारक कोण आहेत?

१) बेहरामजी मलबारी         
२) गो. ग.आगरकर
३) वासुदेव गणेश जोशी       
४) विष्णुशास्त्री पंडित

प्रश्न २)  बेहरामजी मलबारी हे या समाजाचे होते.
 
१) सिंधी                   २) पारशी
३) मारवाडी              ४) मुस्लिम

प्रश्न ३)  भारतीय शेतकऱ्यांची दैन्यस्थितीचे वर्णन शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात कोणी केले?

१) न्यायमूर्ती रानडे      २) जगन्नाथ शंकशेठ
३) लोकहितवादी        ४) म.ज्योतिबा फुले

प्रश्न ४) पश्चिम घटामध्ये उगम पावून अरबी समुद्रास मिळणाऱ्या नद्या कोणत्या?
अ) उल्हास, सावित्री, वाशिष्ठी
ब) तेरेखेल, मांडवी, पेरियार

१) फक्त अ                २) फक्त ब
३) अ व ब                 ४) यापैकी नाही

प्रश्न ५) माजुली हे नदी पात्रातील जगातील सर्वात मोठे बेटे..... नदी पात्रत आहे?
१) कोसी                 २) गंडक
३) ब्रह्मपुत्रा              ४) गंगा
===========================
उत्तरे :- प्रश्न १ -१, प्रश्न २- २, प्रश्न ३ -४, प्रश्न ४- ३, प्रश्न ५ -३.
=======================
════════════════════

प्रश्न १) टिपू सुलतान व इंग्रज यांच्यात झालेला कोणत्या लढाईमध्ये टिपू सुलतान धारातीर्थी पडला?

१) श्रीरंगपट्टनम १८९९   
२) विरंगपट्टनम १७९७
३) श्रीरंगपट्टनम १७९९
४) श्रीरंगपट्टनम १७९०

प्रश्न २) बिहारमधील कोणाचा उठाव दडपण्यासाठी इंग्रजांना अनेक वर्षे लष्करी मोहिमा राबव्यावा लागल्या?
१) जमीनदारांचा उठाव    २) शेतकऱ्यांचा उठाव
३) भिल्लांचा उठाव         ४) संथाळांचा उठाव

प्रश्न ३) 'कर्नाटक युद्ध' कोणत्या युरोपीय देशांमध्ये झाले?

१) इंग्रज-फ्रेंच              २) इंग्रज-पोर्तुगीज
३) फ्रेंस - डच              ४) डच - इंग्रज

प्रश्न ४) पृथ्वी गोलाकार आहे याबाबतची योग्य निरीक्षणे ओळखा?
अ) कृत्रीम उपग्रह व अवकाश यान यांनी घेतलेले छायाचित्र    
ब) समुद्र मार्गाचा प्रवास
क) चंद्रग्रहणाचा वेळ अर्ध्या किंवा चतकोर वर्तुळासारखी सावली दिसते
१) अ, ब, क              २) अ,ब
३) अ, क                  ४) ब, क

प्रश्न ५) विषुववृत्तीय व्यास व ध्रुवीय व्यास यातील फरक किती किमी चा आहे.?

१) ४२                  २) ३६
३) ५६                  ४) १२
===========================
उत्तरे :- प्रश्न १ -३, प्रश्न २- ४, प्रश्न ३ -१, प्रश्न ४- १, प्रश्न ५ -१.
===========================

अंकगणित प्रश्नसंच

◾️उदा.

एका परिक्षेत 30% विधार्थी गणितात नापास झाले. 20% विधार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विधार्थी दोन्ही विषयांत नापास झाले, तर दोन विषयांच्या घेतलेल्या या परिक्षेत किती टक्के विधार्थी उत्तीर्ण झाले?

1. 40%

2. 30%

3. 70%

4. 60%

उत्तर : 60%

क्लृप्ती :-

परिक्षेत नापास झालेल्यांची टक्केवारी = (गणितात नापास) + (इंग्रजीत नापास) - (दोन्हीविषयांत नापास)

केवळ गणितात नापास विधार्थी %=30-10=20% 30% + 20% - 10 = 40%

इंग्रजीत नापास विधार्थी %=20-10=10%

दोन्ही विषयात मिळून नापास %=10% गणित नापास → (30%)

:: परिक्षेत नापास विधार्थ्यांची टक्केवारी = 40% इंग्रजी नापास → (10%)

:: उत्तीर्ण विधार्थ्यांची टक्केवारी = 60% दोन्ही विषयात नापास → (20%)

◾️उदा.

150 चा शेकडा 60 काढून येणार्‍या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली?

1. 96

2. 54

3. 90

4. 30

उत्तर : 96

स्पष्टीकरण :

150 चे 60% = 90 90 चे 60% = 54

:: 150-54 = 96

◾️उदा.

एका परिक्षेत 70% विधार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 65% विधार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 25% विधार्थी दोन्ही विषयांत अनुत्तीर्ण झाले. जर 3000 विधार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील, तर त्या परीक्षेस एकूण किती विधार्थी बसले होते?

1. 7500

2. 5000

3. 6000

4. 8000

उत्तर : 5000

स्पष्टीकरण :-

इंग्रजी गणित दोन्ही विषयांत अनुत्तीर्ण परिक्षेत एकूण अनुत्तीर्ण विधार्थी %=

उत्तीर्ण 70% 65% 25% 30+35-25 = 40%

अनुउत्तीर्ण 30% 35%

:: परिक्षेत एकूण अनुउत्तीर्ण विधार्थी = 40%

:: उत्तीर्ण विधार्थी = 100-40 = 60%

:: 60% विधार्थी = 3000

:: एकूण विधार्थी = 3000×100/60 = 5000

◾️उदा.

एका गावाची लोकसंख्या 12,000 आहे. ती दरवर्षी 10% ने वाढते, तर 3 वर्षांनंतर ती किती होईल ?

1] 15,297

2] 15,792

3] 15,972

4] 15,927

उत्तर : 15,972

वर्ष (n) मुद्दल (P) दर (R) व्याज (I) रास (A)

1}  12,000 10% 1200 13,200

2} 13,200 10% 1320 14,500

3}  14,500 10% 1452 15,972 15,927

सूत्र :-

A=P×(1+r/100)n :: A=12,000×(11/10)3

= 12,000×1331/1000=1331×12=15,972
नमूना अकरावा –

◾️उदा.

एका गावची लोकसंख्या 3,630 आहे, ती दर 10 वर्षानी 10% ने वाढते; तर 20 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती असावी?

1] 2,500

2] 3,000

3] 3,300

4] 2,904

उत्तर : 3,000

क्लृप्ती :-

P= A/(1×r/100)n ∷ P= 3630/((11/10)2 )=(3630/11)/10×11/10

∷ 3,630×10/11×10/11=3,000
नमूना बारावा -

◾️उदा.

एका खोलीचे भाडे शे. 20 ने वाढविले. पुन्हा काही महिन्यांनंतर शे. 25 ने वाढविले, तर मूळ भाडयात शेकडा वाढ किती झाली?

1]  20%

2]  45

3] 25%

4] 50%

उत्तर : 50%

स्पष्टीकरण :-

मूळ भाडे 100 मानू 20% वाढ = 120 वर पुन्हा 25% वाढ = 120 ×25/100=30

मूळ भाडयातील वाढ = 20+30 = 50%
नमूना तेरावा –

◾️उदा.

एका पुस्तकाची किंमत शे. 20 ने कमी केल्यास त्याचा खप 25% ने वाढला. तर पूर्वीच्या उत्पन्नात शे. कितीने फरक पडला?

1]  20% कमी

2]  25% जास्त

3]  25% कमी

4] फरक नाही

उत्तर : फरक नाही

स्पष्टीकरण :

100 प्रतींची 100 रु. किंमत मानू 100-20=80रु. 100 प्रती = 80 रु.

तर 125 प्रती = 125/100×80/1=100 आताचे उत्पन्न – पूर्वीचे उत्पन्न = फरक

= 100-100 = 0

◾️उदा.

साखरेची किंमत शे. 60 वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही?

1]  37.5%

2] 60%

3] 40%

4] 20%

उत्तर : 37.5%

सूत्र :

(100×टक्के )/(100+60 )=(100×60 )/(100+60 )=(100×60 )/160=6000/160=37.5%

◾️उदा.

3/5% हे दशांश अपूर्णांकात कसे लिहाल?

1] 0.6

2] 0.006

3] 0.06

4] 60.0

उत्तर : 0.006

स्पष्टीकरण :

प्रथम व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा व नंतर 100 ने भागा.

अथवा

दोन स्थळांनंतर डावीकडे दशांश चिन्ह धा. 3/5%=0.6/100=0.006

◾️उदा.

7/12 चे 6%=किती ?

1]  0.35

2]  0.035

3] 3.5

4]  0.0035

उत्तर : 0.035

पोलीस भरती प्रश्नसंच

1) संविधान दिन कधी साजरा केला जातो?

उत्तर : 26 नोव्हेंबर

2) “मिलन 2020” नावाचा बहुपक्षीय नौदल सराव कुठे होणार आहे?

उत्तर : विशाखापट्टनम

3) उत्तरप्रदेश राज्य सरकारने कोणत्या रोगासाठी लसीकरण मोहीम राबवविण्यास सुरुवात केली?

उत्तर : फायलेरिया

4) कोणत्या राज्याने भ्रष्टाचाराच्या तक्रारींसाठी 14400 हा मदत क्रमांक सेवेत चालू केला आहे?

उत्तर : आंध्रप्रदेश

5) राष्ट्रीय प्रतिकांचा गैरवापर केल्यास किती दंड ठोठावला जाऊ शकतो?

उत्तर : रु. 500

6) ‘मुत्सद्देगिरी निर्देशांक 2019’ याच्या यादीत भारताचा क्रमांक कोणता आहे?

उत्तर : 12 वा

7) कोणत्या राज्यात रॉकेट लॉन्चिंग पॅड उभारण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे?

उत्तर : तामिळनाडू

8) ‘युवाह’ नावाचा युवा कौशल्य उपक्रम कोणाच्या वतीने राबवण्यास सुरूवात झाली?

उत्तर : संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF)

9) NuGen मोबिलिटी शिखर परिषदेचे उद्घाटन कुठे झाले?

उत्तर : हरयाणा

10) कोणत्या पत्रकाराने या वर्षीचा ‘CPJ आंतरराष्ट्रीय पत्र स्वातंत्र्य पुरस्कार’ जिंकला?

उत्तर : नेहा दिक्षित

स्पर्धा परीक्षा उपयोगी पुस्तके


1) मराठी व्याकरण- १) मो. रा. वाळिंबे 

                                २) बाळासाहेब शिंदे


2) इंग्रजी व्याकरण-  १) बाळासाहेब शिंदे

                               २) एम जे शेख


3) अंकगणित -      १) नितीन महाले

                             २)पंढरीनाथ राणे


4) बुद्धीमत्ता चाचणी- १)जी. किरण

                                 २) सतिष वसे


5) इतिहास -            १) ग्रोव्हर, बेल्हेकर

                                २) जयसिंग पवार


6) भूगोल -               १)ए. बी. सवदी

                                  २) खतीब


7) अर्थशास्त्र -       १) रंजन कोळंबे

                              २)किरण देसले 


8) राज्यव्यवस्था  -    १) रंजन कोळंबे

                                  २) किशोर लवटे


9) सामान्य विज्ञान-   १) सचिन भस्के

                                 २) रंजन कोळंबे


10) PSI /STI /ASST- पूर्व परीक्षा गाईड  

                              १) एकनाथ पाटील

                              २) प्रकाश गायकवाड


वरील पुस्तकांपैकी प्रत्येक विषयाचे किमान एक तरी पुस्तक आपल्या कडे असावे.


    तर लागा तयारीला... All The Best



स्पर्धा परीक्षेतील अपयशाला कसे सामोरे जावे ?

   मित्रांनो, आपण पाहत असतो की जे लोक यशस्वी झालेले आहेत त्यानांच सर्व मान -सन्मान, प्रसिद्धी, समाजात Status या  गोष्टी भेटत असतात.

 पण जे अपयशी होतात किंवा लवकर यश येत नाही त्यांचं काय? नक्की त्यांचं चुकत कुठं? ते मागे का राहतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधन्याचा आपण प्रयत्न करू        

          आपण स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचे साधारणतः दोन गट करू शकतो.

 1. जुने ( 4-5) वर्षांपासून तयारी करणारे विद्यार्थी..                                    

 2. नवीन ( साधारणता 1 वर्षापासून तयारी करणारे विद्यार्थी)      


     दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांच नंतर बघू पण पहिल्या गटातील जे विद्यार्थी आहेत त्यांचं नक्की काय चुकत ते पाहू.                     


   1) अभ्यासाविषयी आलेली मरगळ /       साचलेपणा.. 

4-5 वर्षांपासून अभ्यास करत असल्यामुळे अभ्यासात थोडीशी मरगळ किंवा Saturation आलेले असते. त्यामुळे अभ्यास होत नाही. पण मित्रांनो मग ऐन परीक्षेच्या वेळी मग अभ्यास होत नाही आणि परीक्षा नापास होतात. पण ज्यावेळी अभ्यासात Saturation यायला लागत तिथूनच खरी तुमच्या अभ्यासाची सुरुवात व्हायला पाहिजेत.

 Never Give up चा approach इथं जास्त काम करू शकतो. So consistent राहायला पाहिजे..         


 2. अभ्यास करून आलेला Overconfidence/ Attitude..


    जुन्या मुलांमध्ये याच प्रमाण खूप जास्त आहे. मला सर्व येतंय,मी कोणाला कशाला काय विचारत बसू,माझा खूप अभ्यास झालाय , आता फक्त Exam होऊ दे मग बघतोच असा दृष्टिकोन या मुलांचा असतो तशी नवीन मुले Humble असतात. 

आवश्यक व्यक्तींकडून मार्गदर्शन घेऊन ती अभ्यास करतात आणि उत्तीर्णही होतात. त्यामुळेच नवीन मुले उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हळूहळू वाढत चालले आहे..      


3. अभ्यासाची अयोग्य दिशा. -


सुरुवातीपासूनच कोणाकडून मार्गदर्शन न घेतल्यामुळे किंवा योग्य अभ्यास्पद्धती माहित नसल्यामुळे दरवर्षी परीक्षेत त्याच - त्या चुका होतात. आणि निकाल मग यायचा तोच येतो. मग Regret करत बसतात की आपण हे तेव्हाच असं करायला पाहिजे होत, योग्य मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होत इ. अशी वेळ येऊन द्यायची नसेल तर सुरुवातीपासूनच सावध असणं आवश्यक आहे. 


जुन्या विद्यार्थ्यांकडून अजूनही अशा चुका होत असतील तर वेळीच सावध व्हा आणि योग्य मार्गावर येण्याचा प्रयत्न करा. जिथून मिळेल तिथून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा.मग पुढचा व्यक्ति तुमच्यापेक्षा भले लहान का असेना.त्याचा सन्मान करा. त्याच्याकडून नवीन काहीतरी शिका.    

 तर जुन्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा गोष्टी घडत असतील तर त्यांनी नक्की विचार करा..                                                       आता प्रश्न राहिला नवीन विद्यार्थ्यांचा जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी सुरुवातीपासूनच योग्य मार्गावर राहिले, योग्य Direction ने, योग्य व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला तर त्यांच्या वरील चुका होणार नाहीत आणि त्यांचा यशापर्यंतचा प्रवास सुलभ आणि लवकर होईल.. 

                       

   तरी दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी याचा विचार करावा आणि आपला योग्य मार्ग निवडवा अन्यथा शेवट वेगळा सांगायला नकॊ. 


  धन्यवाद 🙏


पॉलिटी या विषयाची शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये कशी तयारी कराल??

⭕️ पॉलिटी या विषयाला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये पंधरा प्रश्न विचारले जातात पैकी किमान बारा प्रश्न हे कोअर पॉलिटी वर असतात तर एखादा दुसरा प्रश्न हा पंचायत राज या घटका वरून पडतो. 2018 पर्यंत चे पेपर पाहता आयोगाचा ट्रेंड सोपा वाटतो परंतु 2019 आणि 2020 मधील पूर्व परीक्षांमध्ये आयोगाने लांबलचक व अवघड प्रश्न विचारल्यावर भर दिलेला आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रश्नांचा दर्जा मध्यम कठीण आणि वेळखाऊ असेल अशी मनाची तयारी आपण करून ठेवायला हवी.



⭕️ सपूर्ण पॉलिटी आता इथून पुढे उजळणी करणे शक्य नाही त्यामुळे नेमक्या घटकांचा अभ्यास आपण करायला हवा. उदाहरणार्थ संसद राष्ट्रपती निवडणूक आयोग राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय आणीबाणी केंद्र-राज्य संबंध या घटकांवर आयोग सातत्याने प्रश्न विचारत आहे. त्यामुळे हे घटक आपण पुन्हा पुन्हा मूळ पुस्तकातुन वाचणे फायदेशीर ठरेल.



⭕️ इतर काही घटक जसे की दुय्यम न्यायालये, लोकपाल, भारताचे महालेखापाल व महा नियंत्रक, महाधिवक्ता व महान्यायवादी अशा निवडक घटकांचे महत्त्व जरी अनन्यसाधारण असले तरी त्यांचे पाठांतर करणे तुलनेने सोपे असते. त्यामुळे या घटकांना शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये वेळ न देता तो वेळ मागे उल्लेख केलेल्या घटकांसाठी वापरता येईल. 



⭕️ याव्यतिरिक्त महत्वाची कलमे, table of precedence , घटनादुरुस्त्या यासारख्या गोष्टी देखील विसरून चालणार नाहीत. कमी वेळेत आणि कमी कष्टात आपल्याला गुण मिळवून देण्यासाठी हे घटक अत्यंत किफायतशीर ठरतात. त्यामुळे परिक्षेला जाण्याच्या आदल्या दिवशी या घटकांवर नजर फिरविणे अनिवार्य आहे.



⭕️ पचायत राज या घटकावर ती एक ते तीन प्रश्न पडू शकतात. त्यामुळे इतक्या थोड्या गुणांसाठी भरपूर वेळ खर्ची पाडणे बिलकुल अपेक्षित नाही. तुम्ही आज पर्यंत तयार केलेल्या नोट्स अथवा बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही नोट्स वापरून तुम्ही हे दोन तीन गुण सहज मिळू शकतात. किशोर लवटे सरांच्या पंचायतराज पुस्तकाच्या मागे शॉर्ट नोट्स दिलेल्या आहेत त्याचादेखील तुम्ही वापर करू शकता. 



❇️ पॉलिटी हा पूर्व परीक्षांमधील सर्वाधिक आउटपुट देणारा विषय आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये या विषयांमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये वीसपेक्षा कमी गुण मिळणे अपेक्षित नाही. आयोगाच्या पूर्वीच्या प्रश्नांचा जोरदार अभ्यास आणि लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून केलेले वाचन यांच्या जोरावर 12 ते 15 प्रश्न आपण बरोबर सोडवू शकतो. त्यामुळे या विषयाकडे व्यवस्थित लक्ष देऊन याचे नियोजन करावे.


धन्यवाद..

🔴 PSI पूर्व परीक्षेसाठी 50 गुणांची गोळाबेरीज कशी कराल?

 ⭕ PSI पुर्व परीक्षा पास होणं तुलनेने सोपं असत कारण PSI च्या जागा STI- ASO पेक्षा जास्त असतात, बऱ्याच लोकांना PSI पदाची ची आवड नसते (विशेषतः मुलींना )तसेच PSI साठी लागणाऱ्या Physical आणि Medical Standards मुळे बरेच विद्यार्थी अपात्र ठरतात.

                                

⭕ Actually PSI चा Cutoff हा दरवर्षी around 45 असतो पण 50 हा Safe Score समजला जातो. 


♦️ माझ्या आत्तापर्यंतच्या निरक्षण आणि अनुभवावारून PSI साठी इच्छुक असणाऱ्या बऱ्याच  Candidates चा Score हा 40-45 दरम्यान असतो.हे विद्यार्थी बऱ्यापैकी Serious असतात अभ्यासदेखील करत असतात पण त्यांच्या चुका त्यांना नकळत समजत नाहीत.


♦️ तर आपण या चुका काही प्रमाणात जाणून घ्यायचा प्रयत्न करूया.

     

1.Revision चे महत्व माहिती असूनही ते न केल्यामुळे  ऐन परीक्षेच्या वेळी सोपे -सोपे प्रश्न विद्यार्थी न आठवल्यामुळे चुकतात व Finally Score कमी येतो.


2. सोबतच प्रत्येक विषयामधला महत्वाचा घटक कुठला व कमी महत्वाचा घटक कुठला हे ओळखन्यामध्ये बरेच विद्यार्थी अपयशी ठरतात त्यामुळे अभ्यास करण्यात Unnecessary वेळ वाया जातो.


3. Unnecessary Attempt-


75-85 Attempt करून देखील तुमची Psi prelims निघू शकते त्यामुळे 100 प्रश्नांचा नाद करणे जमत नसेल तर Accuracy वर फोकस ठेवावा. 

                   

4. बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला असूनदेखील परीक्षेच्या अंतिम 15-20 दिवसात ते विद्यार्थी परीक्षा सोडून देतात . परीक्षेच्या काळात लागणार आत्मविश्वास आणि Temperament जो Manage करतो तोच परीक्षा पास होतो. त्यामुळे परीक्षेविषयी असणाऱ्या भीतीवर (अपयशाची )आत्त्तापासूनच काम करणे गरजेचे आहे.


5. 50-60% काठावर Score असलेल्या मुलांची पुर्व परीक्षा ही गणित बुद्धिमत्ता व विज्ञान या दोन विषयात कमी गुण मिळाल्यामुळे  जाते. त्यामुळे या 2 विषयांची जशी जमेल तशी जास्त तयारी करावी ( Class लावले तरी चालतील )


तर आपण 50 गुण मिळवण्याच्या साध्या आणि सोप्या 2 Strategy पाहू.


✔️  1. 7*7 Strategy-  


  पुर्व परीक्षेतील 7 ही विषयांना Average 7 गुण मिळवले तर आपण सहज 50 स्कोर करू शकतो.त्यामुळे पुर्व परीक्षेला सर्व विषयांना समान Weightage आणि Time दिला तर तुमची पुर्व परीक्षा आरामात निघू शकते.     

  पण एखाद्या विषयाला 7 पेक्षा कमी गुण आले तर ते दुसऱ्या विषयातून Cover व्हायला पाहिजेत.

तुमचा एखादा विषय weak असेल तरी पण चालेल पण एक पेक्षा जास्त weak नको.. कारण लिमिट पेक्षा जास्त marks cover होत नाहीत.. त्यामुळे योग्य विषयावर आपला वेळ आणि अभ्यासाची energy इन्व्हेस्ट करून आपण अपेक्षित score करू शकतो..


✔️ 2. Focused आणि Selective Strategy- 


 यामध्ये तुम्हाला Score करण्यास Easy असणारे 4-5 विषय निवडायचे आणि बाकी 2-3 विषयांची Average तयारी करायची.उदा. मी History, Geography, Polity, Ecomony आणि Current affairs या विषयांवर Focus करील आणि बाकी Science आणि Mathematics याला कमी वेळ देईल. तसेच  Time management साठी परीक्षेच्या किमान 1 महिना अगोदर किमान 15-20 सराव papers 50-55 मिनटात वेळ लावून सोडवण्याचा प्रयत्न करावा.


 ही Strategy थोडीशी धोकादायक असली तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना लागू पडते. त्यामुळे आपल्याला आपल्या प्रांतात खेळता येते आणि प्रॉपर study केला तर आरामात 50 score करता येतो.


❇️ तर अशा प्रकारे आपण पुर्व मध्ये गुण मिळवण्याच्या Strategy आणि अभ्यास्पद्धतीविषयी पुढेही बोलत राहू. 


०१ जुलै २०२२

नवनियुक्त मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेचा परिचय


▪️ शपथग्रहण सोहळा - ३० जून २०२२
▪️ पूर्ण नाव - एकनाथ संभाजी शिंदे
▪️ जन्म - ९ फेब्रुवारी १९६४
▪️ मुळगाव - दरे ( महाबळेश्वर, जि. सातारा)
▪️ शिक्षण - बी. ए. (मराठी & राजकारण)
▪️ विधानसभा मतदारसंघ - कोपरी-पांचपाखाडी
▪️ पत्नीचे नाव - लता एकनाथ शिंदे
▪️ मुलाचे नाव - श्रीकांत एकनाथ शिंदे
▪️ गुरू - आनंद दिघे
▪️ राजकिय पक्ष - शिवसेना
▪️ पालकमंत्री - ठाणे जिल्हा व गडचिरोली
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔸 १९८४ - शिवसेना शाखाप्रमुख म्हणून नियुक्त
🔸 १९८६ - बेल्लारी तुरुंगात ३० दिवस कारावास
🔸 १९९७ -  ठाणे महानगरालिकेचे नगरसेवक
🔸 २००४ ते २०१९  सलग चारदा आमदार म्हणून विजयी
🔸 २०१४ - एका महिन्यासाठी विरोधी पक्षनेते म्हणून कार्य
🔸 २०१५ ते २०१९  - सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री
🔸 २०१९ - सात ते आठ महिने आरोग्य मंत्री म्हणून पदावर.
🔸 २०१९ ते २०२२ - नगरविकास विभागाचे मंत्रीपद

घटकराज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यातील तुलना


(1) घटकराज्याचे केंद्रासोबतचे संबंध हे संघराज्यीय स्वरूपाचे आहेत.
▪️केंद्रशासित प्रदेशाचे केंद्राशी असलेले संबंध एकात्म स्वरूपाचे आहेत.

(2) घटकराज्य आणि केंद्र यांच्यामध्ये अधिकारांचे वाटप झालेले आहे.
📌याउलट, केंद्रशासित प्रदेशांवर थेट केंद्राचे नियंत्रण आणि प्रशासन असते.

(3) घटकराज्यांना स्वायत्तता असते.
▪️केंद्रशासित प्रदेशांना स्वायत्तता नसते..

(4) घटकराज्यांच्या प्रशासकीय संरचनेत एकसारखेपणा आढळतो.
📌केंद्रशासित प्रदेशांची प्रशासकीय रचना भिन्न स्वरूपाची आहे.

(5) घटकराज्याच्या कार्यकारी प्रमुखाला राज्यपाल म्हणतात.
▪️केंद्रशासित प्रदेशांचा कार्यकारी प्रमुख विविध पदनामांनी ओळखला जातो. उदा. प्रशासक किंवा ले. गव्हर्नर किंवा मुख्य प्रशासक. इ.

नागरिकत्व

🎯राज्यघटनेनुसार 26 जानेवारी 1950 रोजी पुढील चार प्रकारच्या वर्गवारीतील लोक भारताचे नागरिक असतील असे नमूद केले होते.

🔴  'अधिवासा' द्वारे नागरिक
(Citizens by Domicile)
▪️कलम 5

🔴 'स्थलांतरा' द्वारे नागरिक
(Citizens by Migration)
▪️कलम 6.

🔴 'पुनर्वास्तव्या'द्वारे नागरिक (Citizens by Resettlement),
▪️कलम 7.

🔴 'नोंदणी'द्वारे नागरिक (Citizens by Registration)
▪️ कलम 8

🎯 26 जानेवारी 1950 नंतर नागरिकत्व बद्दल तरतूदी करण्याचा अधिकार घटनेने कलम 11 अन्वये संसदेला देण्यात दिलेला आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...