२४ जून २०२२

भारतातील महत्वाची सरोवरे


१) वूलर सरोवर = जम्मू - काश्मीर = भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर

२) दाल सरोवर = जम्मू - काश्मीर = श्रीनगर शहर या सरोवराच्या काठावर वसलेले आहे.

३) चिल्का सरोवर = ओडिशा = भारतातील सर्वात मोठे खा-या पाण्याचे सरोवर

४) लोणार सरोवर = महाराष्ट्र = उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव सरोवर

५) हुसेनसागर सरोवर = आंध्रप्रदेश = गौतम बुद्धाचा सर्वात मोठा पुतळा हुसेनसागर येथे आहे.

६) सांबर सरोवर = राजस्थान = भारतातील सर्वाधिक खा-या पाण्याचे सरोवर

काही व्यक्तींची भारताबाबत मते


♦️मॅरियट:-

◾️डुपले ने यशाची किल्ली मद्रास मध्ये शोधण्याचा निष्फळ प्रयत्न केले.क्लाइव्ह ने ही किल्ली बंगाल मध्ये यशस्वी शोधली.

♦️जॉर्ज बारलो:-

◾️कोणतेही भारतीय राज्य असे राहू नये जे इंग्रज सत्तेवर अवलंबून नाही.

♦️मॅलेसन:-

◾️प्लासीच्या लढाई इतकी इतिहास ला प्रभावित करणारी लढाई दुसरी कोणती झाली नसेल.

♦️जे आर सिली:-

◾️राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रदेश म्हणजे भारत.

♦️पी ई रोबर्ट्स:-

◾️लॉर्ड लिटन यास जितक्या कठोर टिकेस तोंड द्यावे लागले तितकी कठोर टीका आधुनिक काळातील कोणत्याही व्हॉइसरॉय वर झाली नाही.

♦️लॉर्ड कर्झन:-

◾️भारत म्हणजे आशिया खंडातील राजकीय स्तंभ होय.

भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे

🏔 जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग

🏔 गुजरात.................. सापुतारा

🏔प.बंगाल...............दार्जिलिंग

🏔 राजस्थान............... माउंट अबू

🏔 पंचमढी................. मध्यप्रदेश

🏔 हिमाचल प्रदेश......... धर्मशाला

🏔 हिमाचल प्रदेश......... डलहौसी

🏔 हिमाचल प्रदेश......... मनाली

🏔 उत्तराखंड............... अल्मोढा

🏔 उत्तराखंड............... मसुरी

🏔 केरळ..................... मन्नार

🏔 महाराष्ट्र.................. महाबळेश्वर

🏔 महाराष्ट्र.................. माथेरान

🏔 महाराष्ट्र.................. लोणावळा

🏔 तामिळनाडू............. उटी

🏔 तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल

🏔 तामिळनाडू............. कुन्नुर

🏔 कर्नाटक................. नंदाहिल्स

राष्ट्रपती निवडणूक

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पदाची मुदत २४ जुलै रोजी संपुष्टात येणार असून, जुलैच्या सुरुवातीला या पदासाठी निवडणूक होईल. सध्या सत्ताधारी भाजप आणि विरोधकांकडून चाचपणी सुरू झाली आहे. राज्यातील २८८ आमदारांना मतदानाचा अधिकार असतो. विधान परिषद आमदारांना मतदानाचा अधिकार नसतो. राज्यातील आमदारांच्या एका मताचे मूल्य हे १७५ असते. राज्यातील आमदारांची एकूण मते ही ५०,४०० एवढी आहेत. राज्यात सध्या महाविकास आघाडीचे बहुमत असल्याने महाविकास आघाडी पाठिंबा देईल त्या उमेदवाराला राज्यातून २८ हजारांच्या आसपास मते मि‌ळण्याची शक्यता आहे.

● राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एकूण मतदार किती?

- राष्ट्रपतीपदाकरिता खासदार आणि आमदार मतदान करतात.
- देशातील ७७६ खासदार (५४३ लोकसभा आणि २३३ राज्यसभा) आणि ४१२० आमदार अशा एकूण ४८९६ जणांना मतदानाचा अधिकार असतो.
- खासदारांच्या एका मताचे मूल्य हे ७०८ आहे. प्रत्येक राज्यातील १९७१च्या जनगणनेनुसार असलेल्या लोकसंख्येच्या आधारे आमदारांच्या मतांचे मूल्य हे वेगगेवळे असते.
- खासदारांची एकूण मते ही ५,४९,४०८ एवढी आहेत.
- आमदारांची एकूण मते ही ५,४९,४९५ एवढी होतात. या निवडणुकीत एकूण मतांचे मूल्य हे १०,९८,९०३ एवढे आहे.
- पाच लाखांपेक्षा अधिक मते मिळवणारा निवडून येतो.
- निवडून येण्यासाठी एकूण मताच्या 50% मते + 1 मत पडणे आवश्यक असते.

● अन्य महत्त्वाच्या राज्यांमधील आमदारांच्या एका मताचे मूल्य किती आहे?

- राज्यातील आमदारांच्या एका मताचे मूल्य हे १७५ असते.
- उत्तर प्रदेशमधील आमदारांच्या मताचे मूल्य हे सर्वाधिक २०८ आहे. याशिवाय तमिळ‌नाडू १७६, ओडिशा १४९, बिहार १७३, झारखंड १७६, बिहार १७३, आंध्र प्रदेश १५९, कर्नाटक १३१, गुजरात १४७ असे मतमूल्य असते.

● खासदारांच्या मतांचे मूल्य कमी होणार?

- लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचे मूल्य हे ७०८ आहे. हे मूल्य एकूण विधानसभा आमदारांची मते भागिले एकूण खासदारांची संख्या या आधारे निश्चित केले जाते.
- आमदारांची एकूण मते ही ५,४९,४९५ आहेत. या संख्येला लोकसभा व राज्यसभेचे एकूण खासदार ७७६ याने भागले जाते. त्यातून खासदारांच्या एका मताचे मूल्य ७०८ निश्चित करण्यात आले.
- जम्मू आणि कश्मीर हा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. जम्मू आणि कश्मीरमध्ये अद्याप विधानसभेची निवडणूक झालेली नाही. सध्या जम्मू आणि कश्मीरमध्ये आमदार नाहीत. यामुळे एकूण आमदारांच्या मतांची संख्या कमी होईल. त्याचा परिणाम खासदारांच्या मतांच्या मूल्यावर होणार आहे.
- खासदारांच्या मतांचे मूल्य हे ७०८ वरून घटून ७०० होण्याची शक्यता वर्तविली जाते.

● राज्यातील आमदारांच्या मतांचे मूल्य कसे ठरते?

- राज्यातील १९७१च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या व त्याला एकूण विधानसभा सदस्यांच्या संख्येने भागले जाते. त्यातून येणारी संख्या ही एका मतांचे मूल्य मानले जाते.
- १९७१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ५ कोटी चार लाख १२ हजार २३५ होती. या संख्येला २८८ ने भागले जाते. त्यातून एका मताचे मूल्य हे १७५ होते. एकूण २८८ आमदार गुणिले १७५ अशी पद्धतीने राज्यातील आमदारांची एकूण मते ही ५०,४०० होतात.

● राष्ट्रपतीच्या निवडणूकीत मतदार कोण असतात ?

- राष्ट्रपती एका निर्वाचन गणाकडून निवडला जातो.
- यामध्ये संसदेचे (राज्यसभा आणि लोकसभा) फक्त निवडून आलेले लोकप्रतिनिधी (खासदार) आणि राज्यांच्या फक्त विधानसभेतील निवडून आलेले लोकप्रतिनिधी आमदार मतदान करतात.
- याशिवाय दिल्ली आणि पाॅडेचेरीचे निवडून आलेले आमदारही निवडूनकीत मतदान करतात.
- एखादा खासदार किंवा आमदार अनुपस्थित होता त्यामुळे निर्वाचन गण अपूर्ण होता या कारणास्तव निवडणूकवर अक्षेप घेता येत नाही.

● संविधानिक तरतुदी

- कलम 52: भारताचा एक राष्ट्रपती असेल
- कलम 53: भारताच्या संघराज्याच्या कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असेल
- कलम 54: राष्ट्रपतीची निवडणूक
- कलम 55: निवडणुकीची पद्धत
- कलम 56: राष्ट्रपतींचा कार्यकाळ
- कलम 57: पुनर्निवडीसाठी पात्रता
- कलम 58: राष्ट्रपतीपदासाठी पात्रता

● राष्ट्रपतीच्या निवडणूकीसंबंधी वाद

- राष्ट्रपतीच्या निवडणुकीसंबंधी निर्माण झालेल्या शंका व तक्रारींचे निरसन केवळ सर्वोच्च न्यायालयातच केलं जातं.
- सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक वैध ठरवली तरी राष्ट्रपतींनी या आधी केलेल्या कोणत्याही कृती रद्द होत नाहीत व पुढेही अमलात राहतात.

काय आहे पक्षांतर बंदी ?

- भारतीय राजकारणात 1967 पर्यंत पक्षांतर बंदीच्या विरोधात कायद्यात कोणतीही तरतूद नव्हती.
- 1967 नंतर पक्षांतरबंदी कायद्याची आवश्यकता वाटू लागली. कारण 1967 मध्ये झालेल्या निवडणुकीत देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. पण त्यानंतर मोठय़ा प्रमाणावर पक्षांतरे सुरू झाली. सुमारे 125 पेक्षा जास्त खासदार आणि दोन हजारांच्या आसपास आमदारांनी पुढे 10 वर्षांमध्ये पक्षांतर केले. हरयाणामध्ये काही आमदारांनी तीन-तीन वेळा पक्षांतरे केली होती. यातूनच आयाराम-गयाराम संस्कृती रूढ झाली.
- हरयाणामध्ये भजनलाल यांनी मुख्यमंत्रीपदावर असताना मंत्रिमंडळासह पक्षांतर केले होते. पक्षांतरे वाढू लागल्याने पक्षांतरबंदी कायद्याची आवश्यकता भासू लागली.

Que: पक्षांतरबंदी कायदा केव्हा लागू झाला?
- राजीव गांधी पंतप्रधान असताना घटना दुरुस्ती करण्यात आली. ती 52वी घटना दुरुस्ती होती. 1985 पासून देशात पक्षांतरबंदी कायदा लागू करण्यात आला.
- एकूण सदस्यसंख्येच्या एकतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केल्यास ते पक्षांतर होत नाही, अशी मूळ कायद्यात तरतूद करण्यात आली होती.

Que: सदस्य अपात्र कसा ठरतो ?
- लोकसभा किंवा विधिमंडळ सदस्य पक्षादेशाचे (व्हिप) पालन न केल्यास अपात्र ठरू शकतात. अन्य पक्षात प्रवेश करणे किंवा पक्षादेश डालवून मतदान केल्यास सदस्य अपात्र ठरू शकतो. याशिवाय अन्य पक्षांना मदत करणे किंवा त्यांच्या बैठकांना हजेरी लावल्यासही सदस्य अपात्र ठरू शकतो.
- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्याशी फारकत घेऊन भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर शरद यादव यांनी त्याला विरोध केला होता. नितीशकुमार यांना विरोध दर्शवित त्यांनी वेगळ्या व्यासपीठावर पक्षाच्या विरोधात भाषणे केली होती. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. या मुद्दय़ावर त्यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले.

Que: पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करण्यात आली
- पक्षांतरबंदी कायद्याच्या तरतुदीतील पळवाटांचा अनेकांनी फायदा घेतला होता. मूळ कायद्यात एकतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केल्यास ते वैध मानले जायचे.
- 2003 मध्ये करण्यात आलेल्या घटना दुरुस्तीनुसार एकूण सदस्यसंख्येच्या दोनतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केले तरच सदस्यत्व कायम राहू शकते.

Que: कायद्याचा उद्देश साध्य झाला का
- सदस्यांच्या पक्षांतरांवर बरीच बंधने आली. पण गट करून अन्य पक्षांमध्ये प्रवेश करण्यावर काहीच नियंत्रण ठेवता आलेले नाही. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. गोवा आणि कर्नाटक ही ताजी उदाहरणे आहेत.
- कायद्यातील पळवाटा दूर करून सदस्यांच्या पक्षांतरांना आळा बसेल या पद्धतीने कायद्यात सुधारणा करण्यावर लोकसभेचे माजी सचिव पी डी टी आचार्य यांनी भर दिला. संदर्भ लोकसत्ता

𝗣𝗮𝘆𝘁𝗺 𝗣𝗮𝘆𝗺𝗲𝗻𝘁 𝗕𝗮𝗻𝗸 ला RBI तर्फे शेड्युल्ड बँकेचा दर्जा

🔰 𝗣𝗮𝘆𝘁𝗺 𝗣𝗮𝘆𝗺𝗲𝗻𝘁 𝗕𝗮𝗻𝗸 ला भारतीय रिझर्व्ह बँकेने शेड्युल्ड बँकेचा दर्जा दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये पेटीएम बँकेचा समावेश करण्यात आला आहे.

🔰 या मंजुरीमुळे 𝗣𝗮𝘆𝘁𝗺 𝗣𝗮𝘆𝗺𝗲𝗻𝘁 𝗕𝗮𝗻𝗸 ला अधिक वित्तीय सेवा आणि उत्पादने आणण्यास मदत होईल.

🔰 𝗣𝗮𝘆𝘁𝗺 𝗣𝗮𝘆𝗺𝗲𝗻𝘁 𝗕𝗮𝗻𝗸 एकूण 3.33 कोटी पेटीएम वॉलेटला सेवा पुरविते. ग्राहकांना 87,000 हून अधिक ऑनलाइन व्यापाऱ्यांकडे आणि 2.11 कोटी इन-स्टोअर व्यापार्यांकडे पेमेंट करण्यास सक्षम करते.

✳️ 𝗦𝗰𝗵𝗲𝗱𝘂𝗹𝗲 𝗕𝗮𝗻𝗸 दर्जा मिळाल्यामुळे:

🔰 बँक नवीन व्यवसाय संधी शोधू शकते, ज्यामध्ये सरकार आणि इतर मोठ्या कॉर्पोरेशनने प्रस्तावांसाठी जारी केलेल्या विनंत्या, प्राथमिक लिलाव, निश्चित दर आणि परिवर्तनीय दर रेपो आणि रिव्हर्स रेपोमध्ये सहभाग समाविष्ट आहे.

✅ मुख्यालय : नोएडा, उत्तर प्रदेश

👤  संस्थापक आणि CEO : विजय शेखर शर्मा

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

जागतिक व्यापार संघटना (WTO)


✔️ नाव : World  Trade Organization

◆ स्थापना: गॅट कराराच्या (General Agreement on  Tariffs and Trade: GATT) उरुग्वे राऊंडच्या मर्राकेश करारानुसार 1 जानेवारी 1995 रोजी WTO ची स्थापना करण्यात आली.

◆ मुख्यालय : जिनिव्हा (स्वित्झर्लंड)✅

◆ सदस्य : 164 (अफगाणिस्तान जुलै 2016 मध्ये 164 वा सदस्य देश बनला)

◆ निरीक्षक : 25 देश

◆ महासंचालक : एन्गोझी ओकोन्जो (आफ्रिकन-अमेरिकन)

ध्येय : शक्य तितक्या सहजतेने, अंदाजाने आणि मुक्तपणे व्यापार वाहत राहण्याची खात्री करणे.

ही एकमेव जागतिक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी देशांमधील व्यापाराच्या नियमांशी संबंधित आहे.

२३ जून २०२२

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022



एकूण पदे:- 800

(1) सहायक कक्ष अधिकारी:- 42 पदे 

(2) राज्यकर निरीक्षक :-77 पदे

(3) पोलीस उपनिरीक्षक:-603 पदे

(4) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक:-78 पदे


शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट: मूळ जाहिरात बघावी.

Fee:

  • अमागास  – रु. 394/-
  • मागासवर्गीय – रु. 294/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन


पूर्व परीक्षेचा दिनांक:- 8 ऑक्टोबर 2022 

अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:-15 जुलै 2022


प्रस्तुत भरतीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

२२ जून २०२२

अग्निपथ लष्करी योजना काय आहे ?



◆ 14 जून 2022 रोजी, सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने अग्निपथ योजनेला मंजुरी दिली , जी भारतीय तरुणांना भारतीय सशस्त्र दलात सेवा करण्यास सक्षम करते. 


◆ केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, 'अग्निपथ' योजनेच्या माध्यमातून तरुणांना सशस्त्र दलात सेवा करण्याची संधी निर्माण करण्यासाठी सर्व उपयुक्त प्रयत्न केले जातील. 


◆ ही योजना तरुणांना नवीन तंत्रज्ञान प्रशिक्षित करण्यास आणि शिकण्यास आणि त्यांच्या आरोग्याची पातळी सुधारण्यास मदत करेल. 


◆ रोजगाराच्या वाढत्या संधींमुळे तरुणांना विविध क्षेत्रात नवीन कौशल्ये शिकायला मिळतील. 


❇️ अग्निपथ योजनेंतर्गत सशस्त्र दलाचा भाग असणारे 'अग्निवीर', असेही ते म्हणाले.


◆ 4 वर्षांच्या सेवेनंतर चांगले वेतन पॅकेज आणि एक्झिट रिटायरमेंट पॅकेज दिले जाईल.


 ❇️ अग्निपथ योजना : पात्रता ❇️


◆ या योजनेंतर्गत, पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात आणि भारतीय सशस्त्र दलात सेवा देण्यासाठी उमेदवार 17.5 ते 21 वयोगटातील असणे आवश्यक आहे.


संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू’ हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे ?

   1) उपमा    2) उत्प्रेक्षा    3) रूपक      4) अपन्हुती

उत्तर :- 2

2) अभ्यस्त शब्द ओळखा.

   1) तुरट    2) आंबट चिंबट    3) खारट      4) कडवट

उत्तर :- 2

3) स्वातंत्र्य युध्दाच्याकाळात देशभक्तांनी भोगलेल्या तुरुंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती. या विधानातील

    अग्निपरीक्षा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो ?

   1) लक्ष्यार्थ    2) वाच्यार्थ    3) वाक्यार्थ    4) शब्दार्थ

उत्तर :- 1

4) पुढीलपैकी न जुळणारा शब्द ओळखा.
   1) दैत्य    2) दानव      3) राक्षस      4) देव

उत्तर :- 4

5) ‘दुष्काळ’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

   1) नापीक    2) सुकाळ    3) अवर्षण    4) कोरडा

उत्तर :- 2

6) योग्य पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करा. – ‘नांव सोनूबाई हाती .................... वाळा.’

   1) सोन्याचा    2) चांदीचा    3) कथलाचा    4) पितळेचा

उत्तर :- 1

7) दिलेल्या स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार शोधा.

    ‘भिम्याला कुस्तीत चारीमुंडया चीत केल्यापासून त्याचा ...............’

   1) इंगा जिरविणे    2) उधाण येणे    3) ऊर दडपणे    4) उघडा पडणे

उत्तर :- 1

8) निराश्रित मुलांना आश्रय देणारी अशी एक संस्था ..................

   1) धर्मालय    2) अनाथालय    3) देवालय    4) वृध्दाश्रम

उत्तर :- 2

9) खालील शुध्द स्वरूपात लिहिलेला शब्द ओळखा.

   1) दैवदूर्विलास    2) दैवदूर्वीलास    3) दैवदूरविलास    4) दैवदुर्विलास

उत्तर :- 4

10) खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता ?
   1) त्   2) थ्    3) द्      4) ण्

उत्तर :- 4

ग्रंथी (Glands) आणि ज्ञान-विज्ञान


🎇 मानवी शरीरात जे रासायनिक नियंत्रण🧪 ठेवण्याचे काम होते ते काम ग्रंथीच्या मार्फत होते

🎇 ग्रंथी या दोन प्रकारच्या असतात

1)अंतः स्रावी ग्रंथी (Endocrine Gland)
2)बाह्यस्रावी ग्रंथी (Exocrine Gland)

🎇अंतः स्रावी ग्रंथी
या संप्रेरके(Harmon's)स्रावतत

🎇बाह्यस्रावी ग्रंथी
या विकारे(Enzymes)स्रावतत

🎇अंतः स्रावी ग्रंथी यांना कोणतेही कोणतीही नलिका नसते ते आपला स्राव थेट रक्तात सोडतात(Ductless Gland)

🎇 बाह्यस्रावी ग्रंथी यांना मात्र नलिका असतात



ज्ञान-विज्ञान

______ संस्थेमधील भारतीय शास्त्रज्ञांनी दृश्यमान प्रकाश शोषून कार्बन डायऑक्साइडचे मिथेनमध्ये रूपांतर करण्यासाठी स्वस्त धातू-मुक्त उत्प्रेरक विकसित केले - जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अॅडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च, बंगळुरू.

________ येथील डॉ. सन्यासीनायडू बोड्डू यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शास्त्रज्ञांनी नॅनो-पदार्थापासून अत्यंत स्थिर आणि अविषारी सुरक्षा शाई विकसित केली आहे, जी त्याच्या अद्वितीय रासायनिक गुणधर्मांमुळे उत्स्फूर्तपणे प्रकाश उत्सर्जित करते आणि ज्याचा उपयोग बनावट नोटा तसेच मानक वस्तूंच्या सुरक्षिततेसाठी केला जाऊ शकतो - इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी (मोहाली).

खगोलशास्त्राच्या इतिहासात प्रथमच, आकाशगंगेच्या बाहेर दुसर्‍या आकाशगंगेतील ग्रहाचे अस्तित्व _____ याने शोधून काढले आहे, जो M-51-ULS-1 ताऱ्याभोवती फिरणारा शनीच्या आकाराचा एक ग्रह आहे – NASA संस्थेची ‘चंद्र’ अंतराळ दुर्बीण.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सामान्य ज्ञान

डंपा व्याघ्र प्रकल्प - मिझोरम.

भद्रा व्याघ्र प्रकल्प - कर्नाटक.

पेंच व्याघ्र प्रकल्प - महाराष्ट्र.

पक्के व्याघ्र प्रकल्प - अरुणाचल प्रदेश.

नामेरी व्याघ्र प्रकल्प - आसाम.

सातपुडा व्याघ्र प्रकल्प - मध्यप्रदेश.

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती

🔰 आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती.. 🔰

🔶 मानवी डोक्याचे वजन ?
→   १४०० ग्रॅम.
 
🔶 सामान्य रक्तदाब ?
→   १२०/८० मि. मी. पा-याची उंची.

🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?
→   न्यूरॉन.

🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?
→   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
→   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.

🔶 शरिरातील एकूण रक्त ?
→   ५ ते ६ लीटर.
 
🔶 सर्वात लहान हाड ?
→   स्टेटस ( कानाचे हाड )

🔶 सर्वात मोठे हाड ?
→   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )

🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→   १२० दिवस.

🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ?
→   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.

🔶 पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→   २ ते ५ दिवस.

🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?
→   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.

🔶 हिमोग्लोबिनचे प्रमाण ?
→   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
→   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.

🔶 ह्रदयाचे सामान्य ठोके ?
→   ७२ ते ७५ प्रति मिनिट.

🔶 नाडी दर (पल्स रेट) ?
→   ७२ प्रतिमिनिट.

🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?
→   थायरॉईड ग्रंथी.

🔶 सर्वात मोठा स्नायू ?
→   ग्लुटियस म्याक्सीमस.

🔶 एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?
→   ६३९.

🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?
→   मोनोसाईटस - ३ ते ८%.
→   बेसोफिल्स - ०.५%.
→   लिम्फोसाईटस - २० ते २५%.
→   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.

🔶 शरीराचे तापमान ?
→   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.

🔶 प्रौढांमधील दातांची संख्या ?
→   ३२.

🔶 लहान मुलांमधील दातांची संख्या ?
→   २० दूधाचे दात.

🔶 सर्वात पातळ त्वचा ?
→   पापणी (कंजक्टायव्हा).

_______________________________________________________________

“डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या”

🔸 डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते.

🔸 २९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.

🔸 पुढील १० समित्यांचे ते सदस्य होते -

१) ध्वज समिती
२) मुलभूत हक्क उपसमिती
३) अल्पसंख्यांक उपसमिती
४) संघ राज्य घटना समिती
५) घटना सुधारणा उपसमिती
६) नागरिकत्व तदर्थ समिती
७) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती
८) सल्लागार समिती
९) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या       समस्येवरील उपसमिती
१०) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)

🔸 जुलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता.

🔸 देशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.

🔸 मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.

मार्गदर्शक तत्वांची उपयुक्ततता


📌डॉ. आंबेडकर - राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. घटनेचे आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये. ही तत्वे अमलात न आणणाऱ्या सरकारला न्यायालयांमध्ये नसला तरी जनतेच्या दरबारात जाब द्यावाच लागेल.

📌B.N. राव - राज्यसंस्थेच्या प्राधिकारांसाठी नैतिक तत्वे, त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.

.📌N.M. सिंघवी - घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतूदी.

📌M.C. छगला (माजी सरन्यायाधीश) - मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वी वरील स्वर्ग बनेल. त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.

📌M.C. सेटलवाड - न्यायालयास उपयुक्त beacon-light व प्रस्ताविकेचे विस्तारण करणारी तत्वे.

📌ग्रॅनव्हिल ऑस्टिन - मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीद्वारे देशातील सामाजिक क्रांती ची उद्दिष्टे साध्य होतील.

📌ईवोर जेनिंग्ज - Pious aspiration.

📌अनंत नारायण - अ-वादयोग्य आणि अमूर्त.

📌 ग्लॅडहिल - "इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधायक सूचना.'

📌K.V.राव - “या मागील खरा हेतू भारताला पोलिस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनविण्याचा आहे."

🎯मार्गदर्शक तत्वांवरील टिका :

📌K.T. शहा - Pious Superfluities, बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक.

📌नसिरोद्दीन - नववर्षाचा निश्चय जो 2 जानेवारीला मोडला जातो.

📌T.T. कृष्णमाचारी - भावनांची खरी केराची टोपली.

📌K.C. व्हेअर - कंटाळवाणा नैतिक उपदेश, जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचन मानावयाचे ठरले तरीही
त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकिर्ती प्राप्त होईल.

📌K. संथानम - या तत्वांनी केंद्र विरुद्ध राज्य, राष्ट्रपती विरुद्ध पंतप्रधान, राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा घटनात्मक संघर्ष निर्माण केला.

भारताचे संयुक्त लष्करी युद्ध सराव

✅ भारताचे संयुक्त लष्करी युद्ध सराव ...(भाग-1)

 ऑस्ट्र-हिंद : इंडिया - ऑस्ट्रेलिया
 LAMITIYE : इंडिया - सेशल्स
 औसीइंडेक्स : इंडिया - ऑस्ट्रेलिया
 सिटमँक्स : सिंगापूर , थायलँड व इंडिया
 स्लिनेक्स : इंडिया - श्रीलंका
 मित्र शक्ति : इंडिया - श्रीलंका
 मैत्री : इंडिया : थायलँड
 युद्ध अभ्यास : इंडिया - अमेरिका
 टाईगर ट्रंफ : इंडिया - अमेरिका
 वज्र प्रहार : इंडिया - अमेरिका
 मलबार : इंडिया , जपान व अमेरिका
 शक्ति : इंडिया - फ्रान्स
 गरुड : इंडिया - फ्रान्स
 वरुण : इंडिया - फ्रान्स
 सुर्य कीरण : इंडिया - नेपाळ
 सम्प्रिंती : इंडिया - बांग्लादेश
 कॉर्पैट : इंडिया - बांग्लादेश
 जायर-अल-बहर : इंडिया - कतार
 दस्तलिक : इंडिया - उझबेकिस्तान
 हँड इन हँड : इंडिया - चीन
 हिम विजय : भारत - चीन
 चांग-थांग : भारत - चीन
 इंद्र : इंडिया - रशिया
 कोंकण : इंडिया - ब्रिटन
 इंद्रधनुष्य : इंडिया - ब्रिटन
 अजेय वॉरीयर : इंडिया - ब्रिटन
 इस्टर्न ब्रिज : इंडिया - ओमान .

✅ भारताचे संयुक्त लष्करी युद्ध सराव (भाग-2)

 इंद्र : इंडिया - रशिया
 कोंकण : इंडिया - ब्रिटन
 इंद्रधनुष्य : इंडिया - ब्रिटन
 अजेय वॉरीयर : इंडिया - ब्रिटन
 हरिमाऊ शक्ति : इंडिया - मलेशिया
 गरुड शक्ति : इंडिया - इंडोनेशिया
 समुद्र शक्ति : इंडिया - इंडोनेशिया
 इकुवेरीन : इंडिया - मालदीव
 अल नागाह : इंडिया - ओमान
 इस्टर्न ब्रिज : इंडिया - ओमान
 नसीम-अल-बहार : इंडिया - ओमान
 धर्मा गार्डीयन : इंडिया - जपान
 सहयोग काजीन : इंडिया - जपान
 शिन्यू मैत्री : इंडिया - जपान
 जिमेक्स : इंडिया - जपान
 प्रबळ दोस्त्याक : इंडिया - कझाकस्तान
 नोमँडिक एलिफंट : इंडिया - मंगोलिया
 बोल्ड कुरुक्षेत्र : इंडिया - सिंगापूर
 खंजर : इंडिया - किरगिस्तान
 डीझर्ट इगल : इंडिया - युएई
 फोर्स : आशियान
 इमबेक्स : इंडिया - म्यानमार
 सिम्बैक्स : इंडिया - सिंगापूर
 विंबैक्स : इंडिया - वियतनाम
 सियाम इंडिया : इंडिया - थायलँड .

मुस्लिम लीग’ ची स्थापना

मुस्लिम लीग’ ची स्थापना.

   ठिकाण :- ढाका

   संस्थापक अध्यक्ष :- सलीम उल्ला

   मुख्यालय :- लखनऊ

   उद्देश :- ब्रिटिश साम्राज्याप्रती मुस्लिमांमध्ये सहानुभूती निर्माण करुन मुस्लिम गटास काँग्रेसपासून दूर ठेवणे.

  मुस्लिम लीगची स्थापना ‘All Indian Mohammadan Educational Conference’ च्या 20 व्या वार्षिक सभेच्या शेवटच्या दिवशी करण्यात आली.

 ही सभा ढाका येथे 27 ते 30 डिसेंबर 1906 दरम्यान घेण्यात आली होती.

  पुढच्या वर्षीच मोहम्मद अली गोहर यांनी कराची येथे मुस्लिम लीगची घटना (ग्रीन बुक) लिहिली.

मुस्लिम लीगचे अध्यक्ष  ---------------

1907 अहमजी पीरभॉय

1908-1912 आगाखान

1912-1918 सर मुहम्मद अली

1919-1930 मुहम्मद अली जिना

1931 सर मुहम्मद शफी

1931-1932 सर मुहम्मद झफररुल्ला खान

1932-1933 मिया अब्दुल अझीझ

1933-1934 हफिज हिदायत हुसेन

1934-1947 महम्मद अली जिना.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विषयी काही महत्त्वाची माहिती


◾️ काँग्रेस चे पहिले अध्यक्ष
    - व्योमेश चंद्र बॅनर्जी ( 1985 )

◾️ काँग्रेस च्या पहिल्या महिला अध्यक्षा
    - अॅनी बेझंट ( 1917 )

◾️ काँगेस चे पहिले मुस्लिम अध्यक्ष
    - बद्रुद्दिन तैयबजी( 1887 )

◾️ काँग्रेस चे पहिले पारशी अध्यक्ष
    - दादाभाई नौरोजी ( 1886)

◾️ काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष
    - पी. आनंद चार्लू ( 1891 )

◾️ काँगेस च्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा- सरोजिनी नायडू ( 1925 )

◾️ काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष
    - सर नारायण गणेश चंदावरकर ( 1900)

◾️ काँग्रसचे सर्वात जास्त काळ राहिलेले अध्यक्ष - मौलाना आझाद ( 1940 - 1946)

◾️ ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन
    - फैजपूर ( 1936 )

◾️ काँग्रेसचे एकदाही अध्यक्षपद न मिळालेली महत्त्वाची व्यक्ती
    - बाल गंगाधर टिळक.
_______________________________
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे?
उत्तर : भारत

2. कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?
उत्तर : चीन

3. अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता?
उत्तर : निक्सन

4. नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते?
उत्तर : माद्री

5. मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात?
उत्तर : मजलीस

6. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासीक नाव आहे?
उत्तर : ओडिसा

7. तुर्की या देशाची राजधानी कोणती?
उत्तर : अंकारा

8. भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे?
उत्तर : खरगपूर

9. डायनामाईटचा आविष्कार कोणी केला?
उत्तर : अल्फ्रेड नोबेल

10. भारत व पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे?
उत्तर : रेडक्लिफ रेष

11. केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली?
उत्तर : बाळ गंगाधर टिळक

12. पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला होता?
उत्तर : 14 नोव्हेंबर

13. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : पुणे

14. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
उत्तर : नागपूर

15. पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात कोठे आढळतात?
उत्तर : विदर्भ

16. कोकण भागात…...या प्रकारची मृदा आढळते
उत्तर : जांभी

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...