११ जून २०२२

मुख्यमंत्र्यांच्या Chief minister in India नियुक्तीबाबत राज्यपालांना असलेले स्वेच्छाधिन अधिकार

मुख्यमंत्र्यांच्या Chief minister in India नियुक्तीबाबत राज्यपालांना असलेले स्वेच्छाधिन अधिकार


१)विधानसभेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तर राज्यपाल विधानसभेतील सर्वात मोठ्या पक्षाच्या किंवा युतीच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून शपथ देतात. एक महिन्याच्या आत त्यांना विधानसभेचा विश्वास ठराव घेण्याचे सांगितले जाते. हा ठराव जिंकला तर मुख्यमंत्री म्हणून कायम राहतात.

एखाद्या व्यक्तीस मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यापूर्वी त्यांनी विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करावेच अशी तरतूद घटनेमध्ये करण्यात आलेली नाही.

२) मुख्यमंत्र्यांचा पदावर असतानाच अचानक मृत्यू झाला आणि उत्तराधिकारी नसला अशावेळी राज्यपाल मुख्यमंत्र्याची नियुक्ती करू शकतात.

विधानसभा किंवा विधान परिषद यांचा सदस्य नसलेल्या व्यक्तीला सुद्धा मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती देता येते मात्र त्याने पुढील सहा महिन्याच्या आत कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व मिळवणे गरजेचे असते.

शपथ

मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झालेल्या व्यक्तीला राज्यपाल पद व गोपनीयतेची शपथ देतात. ही शपथ मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर राज्याचा मंत्री म्हणून शपथ दिली जाते याचा नमुना तिसऱ्या सूचीमध्ये देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री पदाच्या शपथे मध्ये पुढील बाबींचा समावेश असतो.

a.संविधानाबद्दल खरी निष्ठा व श्रद्धा बाळगणे.
b.सार्वभौमत्व एकात्मता उन्नत राखणे.
c.कार्य निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडणे.
d.सर्व लोकांना निर्भयपणे निस्पृह पणे ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देणे.
पदावधी

मुख्यमंत्रीपदाचा कालावधी राज्यघटनेने निश्चित केलेला नाही. राज्यपालाची मर्जी असे पर्यंत मुख्यमंत्री आपले पद धारण करतात. मात्र राज्यपाल मुख्यमंत्री केव्हाही पदावरून दूर करू शकत नाहीत जोपर्यंत विधानसभेचे बहुमताचे समर्थन मुख्यमंत्र्यांना प्राप्त असते तोपर्यंत राज्यपाल त्यांना पदावरून दूर करू शकत नाहीत.जर मुख्यमंत्र्याने विधानसभेचे समर्थन गमावले तर त्यांना राजीनामा द्यावा लागतो किंवा राज्यपाल त्यांना पदावरून दूर करतात.

पगार व भत्ते

मुख्यमंत्र्यांचे पगार व भत्ते विधानमंडळ कायद्याद्वारे निश्चित केले जातात मुख्यमंत्र्याला राज्य विधान मंडळाच्या सदस्य इतकाच पगार भत्ता प्राप्त होतो याशिवाय खर्च पत्ता, मोफत निवास, प्रवास भत्ता, वैद्यकीय भत्ता इत्यादी सुविधा प्राप्त होतात.

अधिकार व कार्ये

मंत्रिमंडळातील इतर मंत्री राज्यपाल यांच्याकडून नियुक्ती केले जातात मात्र त्यांना सल्ला देण्याचे काम मुख्यमंत्री करतात.
मंत्र्यांच्या मध्ये खाते वाटप करणे व त्यात बदल करणे.
एखाद्या मंत्र्याला राजीनामा देण्यास सांगणे व राजीनामा न दिल्यास मंत्री व पदावरून दूर करण्याचा सल्ला राज्यपालांना देणे.
मंत्रिमंडळाच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवणे. शासनाच्या धोरणामधे समन्वय राखणे.
राजीनामा देऊन मंत्रिमंडळाचा पाडाव घडवून आणू शकतात. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो.
राज्यपालांच्या संदर्भातील कार्ये

१)राज्यपालांच्या संदर्भातील मुख्यमंत्र्यांची कार्ये कलम 167 मध्ये सांगण्यात आलेली आहेत.

राज्याच्या कारभाराच्या प्रशासनाशी संबंधित मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय व विधी विधानाचे सर्व प्रस्ताव राज्यपालांना कळविणे.

राज्याच्या कारभाराच्या प्रशासना संबंधी राज्यपाल मागतील ती माहिती पुरविणे.

एखाद्या बाबीवर एखाद्या मंत्र्यांनी निर्णय घेतला मात्र मंत्रिमंडळाने विचार केला नाही अशी बाब राज्यपालांनी आवश्यकता दर्शवल्यास मंत्रिमंडळाच्या विचारार्थ सादर करणे.

२)राज्याचा महाधिवक्ता, राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य, राज्य निवडणूक आयुक्त, राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या निवडी बाबत सल्ला देणे.

मुख्यमंत्र्यांचे विधानमंडळाच्या संदर्भातील कामे Chief minister in India

विधान मंडळाची अधिवेशने बोलणे स्थगित करणे याबाबत मुख्यमंत्री राज्यपालांना सल्ला देतात.
मुख्यमंत्री विधानसभा विसर्जित करण्याचा सल्ला राज्यपालांना देऊ शकतात.
मुख्यमंत्री विधानसभेत सरकारी धोरणांची घोषणा करतात सभेत चालणारे चर्चेत हस्तक्षेप करून शासनाची बाजू त्यांना मांडता येते.
इतर कार्ये Chief minister in India

राज्य नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष
विभागीय परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून एका वेळी एका वर्षाच्या कालावधीसाठी कार्य करतात.
आंतरराज्य परिषद राष्ट्रीय विकास परिषद यांचे सदस्य मुख्यमंत्री असतात.
राज्य शासनाचे प्रमुख प्रवक्ता म्हणून कार्य करतात.

भारतीय राज्यघटना: (कलम ३६-५१)राज्याचे मार्गदर्शक तत्वे , राज्याचे मार्गदर्शक तत्वे (कलम 36 ते 51 ) भाग 4 : – राज्याचे मार्गदर्शक तत्वे (कलम 36 ते 51 )आणि गांधी तत्वे

भारतीय राज्यघटना:  (कलम ३६-५१):

राज्याचे मार्गदर्शक तत्वे

1 भाग 4 : – राज्याचे मार्गदर्शक तत्वे  (कलम 36 ते 51 )

भाग 4 : – राज्याचे मार्गदर्शक तत्वे  (कलम 36 ते 51 )

आणि गांधी तत्वे

राज्याचे मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंडकडून घेतले. राज्याने कसे वागावे हे यामध्ये सांगितलेले आहे. आयर्लंडने हे स्पेन कडून घेतले आहे.

मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात व्यक्तीला न्यायालयात दाद मागता येत नाही.

मार्गदर्शक तत्वे आयर्लंड या देशाकडून घेण्यात आलेले आहे व हे भारतीय संविधानाच्या भाग ४ मध्ये कलम 36 ते 51 मध्ये देण्यात आलेले आहे.

हे तत्व सामाजिक न्याय घटनेशी निगडित आहे व कार्यपालिकेत कार्य करण्यासाठी हे तत्व मार्गदर्शन देतात.

कलम 36 :-

यात राज्याची व्याख्या करण्यात आलेली आहे व ही तीच व्याख्या आहे जी कलम 12 मध्ये देण्यात आलेली आहे.
यामध्ये कल्याणकारी राज्याची निर्मिती चा उल्लेख केला आहे. आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करणे, प्रास्ताविकेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुतेचे आदर्श साध्य करणे.

कलम 37:- मार्गदर्शक तत्वांना न्यायालयीन कक्षाच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. जर मार्गदर्शक तत्व मिळाले नाही तर तुम्ही कोर्टमधे जाऊ शकत नाही.

कलम 38: – कल्याणकारी राज्याची व्याख्या

ज्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय दिला जाईल व यात वाढ करण्याचे प्रयत्न केले जातील.

कलम 39 -1 :- राज्य (सरकार) सर्व व्यक्तींना जीवनउपयोगी किंवा जीवनाकरिता सर्व साधन उपलब्ध करून देईल.

कलम 39 -2: – राज्य समान कार्यासाठी समान वेतन देईल.

कलम 39 -3:- राज्य आर्थिक शोषणाच्या विरुद्ध अधिकार करून देईल.

कलम 39 -4:- यानुसार पालक अल्पवयीन व्यक्ती यांचे शोषणाचे संरक्षण करेल. व त्यांना स्वतंत्र आयुष्य जगण्याचे संधी उपलब्ध करून देईल. तसेच आरोग्य सुविधाकरिता कार्य योजना लागू करेल. (पोलिओ, अंगणवाडी)

कलम 39 -5:- समान न्याय व निःशुल्क न्यायव्यवस्था

कलम 39 -6:- यानुसार आर्थिक व्यवस्था राज्य निर्माण करेल म्हणजे खूप गरीब आणि खूप श्रीमंत होणार नाही म्हणजे समाजवादी न्यायव्यवस्था निर्माण करायची आहे.

कलम 40:- गांधीवादी तत्व (73वी घ. दु. 1992)

राज्य पंचायत राज निर्माण करण्याचे प्रयन्त करेल. पहिली ग्रामपंचायत 2 Oct 1959 रोजी नागौर जिल्हा राजस्थान मध्ये स्थापन करण्यात आली.

कलम 41:- शिक्षण रोजगार (कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ठ बाबींचा सार्वजनिक सहाय्याचा अधिकार )

राज्य हे आपले आर्थिक क्षमतेच्या मर्यादित राहून कामाचा, शिक्षणाचा आणि बेकारी, आजार व विकलांगतेच्या स्थितीत सार्वजनिक साहाय्य हक्क उपलब्ध करून देणार.

बरेचश्या राज्यात या अंतर्गतच बेरोजगारी भत्ता, निराधार योजना, जीवनदायी योजना, ज्येष्ठ नागरिक योजना इत्यादी लागू केले आहे.

कलम 42:- Maternity Leave

कामाची परिस्थिती आणि मातृत्व साहाय्य याबाबतीत न्याय्य आणि सहृदयी व्यवस्था.
राज्य महिलांच्या प्रसूतीच्या वेळी विविध आरोग्य सुविधा निर्माण करून देईल.

उदा:- जसे की आर्थिक साहाय्य्य, वैद्यकीय साहाय्य्य

कलम 43:- कामगारांना निर्वाह वेतन

राज्य सर्व कामगारांना योग्य रीतीने निर्वाह वेतन देण्याची परिस्थिती निर्माण करेल.

कलम 43A:- 42 वी घ. दु. 1976 अनुसार संविधानात टाकण्यात आली. उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग

कलम 43B:- राज्य सहकारी सोसायटींकरिता प्रोत्साहन देण्यास प्रयन्तशील असेल. 97 वी घ. दु. 2011 अनुसार यांचा समावेश करण्यात आला.

कलम 44:- आचारसंहिता (Uniform Civil Code) लागू करण्याचा प्रयत्न राज्यांनी नेहमी करावा. नागरिकांना एकरूप नागरी संहिता. वैयक्तिक कायदे एकत्र करून सर्व नागरिकांना समान वागणूक प्रस्थापित करणे. संपूर्ण भारतीय राज्यक्षेत्रात सर्व नागरिकांना एकरूप नागरी संहिता प्राप्त करून देण्यासाठी राज्यसंस्था प्रयन्तशील राहील.

कलम 45:- 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व त्यांच्या शिक्षणाची तरतूद.
राज्य ६ वर्षाखालील बालकांचे संगोपन व त्यांच्या शिक्षणाची तरतूद करेल.

पूर्वीच्या कलम ४५ ची तरतूद खालीलप्रमाणे होती.
राज्यसंस्था घटनेचा अंमल सुरु झाल्यापासून १० वर्षाच्या आत १४ वर्षाखालील बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी प्रयन्तशील राहील. हे एकच असे कलम आहे ज्याला कालमर्यादा दिली होती.

कलम 46:- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन सरकार करेल.
राज्यसंस्था दुर्बल घटकांचे विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे विशेष काळजीपूर्वक हितसंवर्धन करेल.
राज्यसंस्था त्यांचे सामाजिक अन्याय व इतर सर्व प्रकारच्या शोषणापासून संरंक्षण करेल.

कलम 47:- पोषणमान व राहणीमान उंचावणे, दारूबंदी आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्त्यव्य असेल.
नागरिकांचे पोषणमान, राहणीमान तसेच सार्वजनिक आरोग्य सुधारणे. ह्या गोष्टी राज्यसंस्थेच्या प्राथमिक कर्तव्यांपैकी एक असल्याचे मानले जाईल.
विशेषतः मादक पेय तसेच आरोग्यास घातक असलेले अंमली पेये यांच्यावर बंदी आणण्यासाठी राज्यसंस्था प्रयन्तशील राहील.

अपवाद : औषधी तयार करण्यास वापरली जाणारी पेये.

कलम 48:- कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन (गौहत्या)

याअंतर्गतच गाई व वासरे व इतर जनावरे यांच्या जातीचे जतन व सुधारणा करने व त्यांच्या कत्तलला मनाई करणे याकरिता उपाययोजना करेल.

कलम 48 (A) :- राज्य पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यांचा विकास त्याचबरोबर वने, नैसर्गिक संसाधने जशे नद्या, तलाव, समुद्र व त्यामधील असणारे जीव यांचे संरक्षण करेल व त्यांच्या वाढीसाठी योग्य प्रणाल्या विकसित करेल.

टीप :- ही कलम 42 वी घ. दु. 1976 मध्ये संविधानात टाकण्यात आली.

कलम 49:- राष्ट्रीय महत्वाचे संस्थाने, वास्तू, स्मारक यांचे संरंक्षण राज्य करेल. संसदीय कायद्याअंतर्गत राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे म्हणून घोषित केले कलात्मक व ऐतिहासिक महत्वाची असणारे स्मारके, ठिकाणे व वस्तूंची लूट, विद्रुपीकरण, नाश, स्थानांतरण, विल्हेवाट आणि निर्यातीपासून संरक्षण करण्याची राज्यसंस्थेची जबाबदारी असेल .

कलम 50:- राज्य न्यायपालिका आणि कार्यपालिका यांचे पृथ्थकरण करेल.
लोकसेवामध्ये न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळी ठेवण्याकरिता राज्यसंस्था प्रयन्तशील राहील.
मात्र सध्या राज्यसंस्थेअंतर्गत कार्यकारी दंडाधिकारी, कलेक्टर, प्रांत तहसीलदार, यांचा समावेश होतो.

कलम 51:- राज्य आंतरराष्ट्रीय शांतता आणि संरक्षण करण्याचा प्रयन्त करेल.

राज्यसंस्था खालील बाबींसाठी प्रोत्साहन देईल.
अ. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन
ब. राष्ट्रराष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखणे
क. एकमेकांमध्ये व्यवहार करतांना आंतरराष्ट्रीय कायदा व तहांचा आदर करणे. (आंतर राष्ट्रीय दायित्व ) (Trade Related Intellectual Proper Rights)
ड. आंतरराष्ट्रीय तंटे लवादाच्या माध्यमातून सोडवणे.

नेत्ररोग (Eye Disease):-


१) रंग आंधळेपणा (Colour Blindness):
◆ अनुवांशिक व बरा न होणारा रोग सर्व रंग दिसतात. मात्र, त्यातील फरक जाणवून येत नाही.
◆ विशेषतः लाल व हिरवा रंगातील फरक समजून येत नाही .
◆ फक्त पुरुषांनाच होतो.
========================

२) मोतीबिंदू (Cataract):
◆ डोळ्यातील प्रथिनांच्या रंगातील बदलामुळे नेत्रभिंग धूसर किंवा अस्पष्ट बनतो, कमी प्रकाशात चांगले तर जास्त प्रकाशात कमी दिसते.
उपाय: भिंगारोपण, बहिरवर्क भिंगाचे रोपण केले जाते.
◆ मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर कधी कधी नवीन बसविलेल्या भिंगाच्या मागे पुन्हा मोतीबिंदू तयार होते. यासाठी काही महिने ते काही वर्षे असा कालावधी असू शकतो. YAG लेसर वापरून हा द्वितीयक मोतीबिंदू काढता येतो.
========================

३) काचबिंदू (Glaucoma):
◆ हि व्यथा वयाच्या ४० ते ५० वर्षाच्या दरम्यान होते.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.
◆ नेत्रजलाच्या निचऱ्यामध्ये बिघाड झाल्यास ते डोळ्यात साठू लागते. त्यामुळे डोळ्याच्या आतील दाब (अंतर्दाब) वाजवीपेक्षा जास्त वाढतो व डोळा टणक बनतो. त्यामुळे बुबुळ घासले गेल्याने काचेसारखे चकचकीत होते. म्हणून त्याला काचबिंदू असे म्हणतात.
◆ काचबिंदूची परिणीती आंधळेपणात होऊ शकते.
◆ डोळ्याचा अंतर्दाब टोनोमीटरच्या साहाय्याने मोजला जातो.
========================

४) शुष्कता (Xerophtalmia/xerosis):
◆ व्हिटॅमिन ए च्या अभावामुळे होतो. डोळे कोरडे पडून पुढे रातांधळेपणा होऊ शकतो.
========================

५) डोळे येणे (Conjuctivitis):
◆ विषाणूच्या संसर्गामुळे होणारा रोग. डोळे लाल होऊन खूप दुखू लागतात व चिकट पाणी येते.
========================

६) खुपरी (Trachoma):
◆ संसर्गजन्य रोग, घाणेरडया वस्तीत, दूषित हवेत, दूर व धुळीत राहणाऱ्यांना होतो.
◆ प्रथम पापण्यांचा आतील भाग खरखरीत होतो व नंतर त्यावर साबुदाणाच्या आकाराचे उंचवटे येतात.डोळ्याच्या उघटझापीमुळे ते बुबुळावर घासले गेल्याने बुबुळावर फुले पडतात. त्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.

७) रांजणवाडी (Meibomian Cyst):
◆ पापण्यांच्या केसांच्या मुळाशी असलेल्या सूक्ष्मस्रावक ग्रंथींमधून नेहमी एक प्रकारचा चिकट द्रव बाहेर पडत असतो.
◆ या ग्रंथी धूलिकण, केसातील कोंडा इत्यादी कारणांमुळे बंद झाल्यास द्रव बाहेर न पडल्याने सुजतात. त्यालाच रांजणवाडी असे म्हणतात.
◆ मानवी डोळ्यातील दृष्टिपटल अनेक प्रकाश -संवेदी (Lightsensitive) पेशींनी बनलेले असते. या पेशी दोन प्रकार / आकाराच्या असतात. (दंडाकार व शंकाकार.)
◆ प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदूस प्रकाशाच्या तेजस्वितेची/ अंधुकतेची माहिती पुरवितात.
◆ दंडाकार पेशी अंधुक प्रकाशाससुद्धा प्रतिसाद देतात परंतु शंकाकार पेशींना अंधुक संवेदना नसतात. या पेशी फक्त तेजस्वी प्रकाशातच प्रतिसाद देतात. यामुळे रंगाची संवेदना किंवा जाण फक्त तेजस्वी प्रकाशातच होते.
◆ कान हे ऐकण्याचे इंद्रिय आहे. मात्र, त्याबरोबरच शरीराचा तोल सांभाळण्याचे महत्वाचे कार्य कानामार्फत केले जाते.
◆ त्वचा हे स्पर्शाचे इंद्रिय असून शरीराचे तापमान नियंत्रित करणे हे त्याचे महत्वाचे कार्य आहे. त्वचेच्या वरील थरामधून मेलॅनिन नावाचा द्रव स्त्रवत असतो, जो अतिनील किरणांना अपारदर्शी असतो. त्यामुळे त्वचेचा कँसर होण्याचे टळते.
◆ जिभेला पाच प्रक्रारच्या चवी कळतात. गोड, खारट, आंबट, कडू व तुरट.
◆ तिखट ही खरी चव नसून तो केवळ प्रतिसाद असतो.
◆ जिभेच्या शेंडयावर गोड चवीचे आकलन होते. तर, जिभेच्या सर्वात आतील भागावर कडू चवीचे आकलन होत असते.जिभेचे व नाकाचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी जस्त या खनिजक्षाराची आवश्यकता असते.
◆ मानवी शरीर कमी केसाळ असल्याने त्वचेतून उष्णतेचा ऱ्हास जलद होतो.
◆ मानवाचे वासाचे ज्ञान कुत्रा, मांजर, हरीण यांच्या तुलनेने फारच कमी आहे. तसेच नाकातील चेतांची टोके बराच काळ एकाच वासाची संवेदना ग्रहण करीत राहिल्यास त्या विशिष्ट वासासाठी ती बधिर होतात.
◆ मानवी डोळ्यांना विधुतचुंबकीय किरणांचा फारच थोडा भाग दिसू शकतो. मानव अतिनील किरण बघू शकत नाही. मात्र फलमाशी सारखे कीटक ते बघू शकतात.
◆ पीट वायपर जातीचा साप इन्फ्रारेड किरण बघू शकतो, म्हणूनच तो गडद अंधारातही उंदरासारखे भक्ष्य टिपू शकतो.
◆ मानवी डोळ्यातील दृष्टिपटलात फारच कमी दंडपेशी असल्याने त्याची रात्रीची दृष्टी कमकुवत आहे. मांजर, हरीण, घुबड यांसारख्या अनेक प्राण्याच्या डोळ्यात मात्र मोठया प्रमाणात दंडपेशी असल्याने त्यांची रात्रीची दृष्टी चांगली असते.
◆ ससा, घोडा, गुरे ही आवाजाच्या दिशेने त्यांचा बाह्यकर्ण वळवू शकतात, मात्र मानव आपला बाह्यकर्ण हलवू शकत नसल्याने त्याला कमी ध्वनिलहरी संकलित करता येतात.

जाणून घ्या :- सामान्य ज्ञान

📌 भारतीय सर्व्हेक्षण विभाग (SOI)
- स्थापना: वर्ष 1767;
- मुख्यालय: देहरादून.

📌 भारतीय शेतकरी खत सहकारी मर्यादित (IFFCO)
- स्थापना: 3 नोव्हेंबर 1967;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

📌 MTNL (महानगर टेलीफोन निगम लिमिटेड)
- स्थापना: 01 एप्रिल 1986;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

📌 BSNL (भारत संचार निगम लिमिटेड)
- स्थापना: 15 सप्टेंबर 2000;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

📌 WWF (वर्ल्ड वाइड फंड)
- स्थापना: 29 एप्रिल 1961;
- मुख्यालय: ग्लॅंड, स्वित्झर्लंड.

📌 अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF)
- स्थापना: 23 जून 1937;
- मुख्यालय: दिल्ली.

📌 भारतीय क्रिडा प्राधिकरण (SAI)
- स्थापना: वर्ष 1984;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

📌 आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन महासंघ (IWF)
- स्थापना: वर्ष 1905;
- मुख्यालय: बुडापेस्ट, हंगेरी.

📌 राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT)
- स्थापना: 01 सप्टेंबर 1961;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

📌 अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE)
- स्थापना: वर्ष 1945;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

📌 राष्ट्रीय महिला आयोगाची
- स्थापना - 31 जानेवारी 1992.

📌 इंडियन एनर्जी एक्सचेंज (IEX)
- स्थापना: 28 जून 2008;
- मुख्यालय: नवी दिल्ली.

लक्षात ठेवा

1) ग्लुकोजचा द्रवणांक ...... इतका आहे.

1) 150⁰c✅✅

2) - 150⁰c

3)-218⁰c

4)218.4⁰c


2) अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डोमिश्रण हे .... आणि  .... पासून तयार करतात.

1) लाईम आणि सल्फर

2) लाईम आणि सोडियम

3) काॅपर सल्फेट आणि लाईम✅✅

4)काॅपर सल्फेट आणि वेटेबल सल्फर


3) ब्रास हा मिश्र खालीलपैकी कोणत्या घटकानी बनलेला असतो ?

1) काॅपर 80% + झिंक 10% + टिन 10%

2) काॅपर 80% + झिंक 20 %✅✅

3) काॅपर 80% + टीन 20 %

4) काॅपर 90 % + टीन 10 %




4)प्रकाशकीय तंतू हा खालीलपैकी कोणत्या तत्त्वावर आधारित आहे ?
अ. प्रकाशाच्या परावर्तनाचे तत्वावर 
ब. प्रकाशाच्या अपवर्तनाचे तत्वावर
क. प्रकाशाच्या पूर्ण आंतरिक परावर्तनाचे तत्वावर
ड. प्रकाशाच्या अपस्करण तत्वावरपर्यायी उत्तरे 

1) अ, ब आणि क
2) फक्त क 
3) ब आणि ड ✅✅
4) फक्त ड



5)कॅल्शियमची पाण्याबरोबर अभिक्रिया होताना .... वायूचे बुडबुडे धातूच्या पृष्ठभागावर जमा झाल्यामुळे कॅल्शियम पाण्यावर तरंगते.  

1) हायड्रोजन✅✅

2) ऑक्सिजन

3) कार्बन डायाॅक्साइड

4) अमोनिया



6) विद्युत दिव्यामध्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय वायूंचे मिश्रण भरलेले असते, कारण :

1) टंगस्टन धातूच्या कुंडलाचे ऑक्सिडेशन होऊ देत नाहीत.✅✅

2) टंगस्टन धातूच्या कुंडलाचा द्रवणांक वाढवितात.    

3)निष्क्रिय वायू विपूल व स्वस्त असतात.

4) प्रकाशाची तीव्रता वाढविण्यास मदत करतात.



7) खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्यास  ' फूल्स  गोल्ड ' ( मुर्खांचे सोने ) असे म्हणतात.

1)  हेमाटाईट

2) मॅग्नाटाईट

3) सायडेरेईट

4) पायराईट ✅✅


8) C7H5NO3S हे खालीलपैकी कोणाचे रासायनिक सूत्र आहे.

1) सेल्यूलोज

2) सुक्रोज

3) सॅकॅरिन ✅✅

4) ग्लुटेन



9) सल्फर ट्रायऑक्साईडच्या उत्पादनासाठी...... चा उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात .

1) व्हॅनॅडिअम पेंटाॅक्साईड ✅✅

2) मॅगेनीज डायऑक्साईड

3) कॅल्शियम कार्बोनेट

4) सिल्व्हर नायट्रेट  




10) पृथ्वीवरील महासागर व किनारी परिसंस्था यांनी खेचून घेतलेला ..... हा वायू ' ब्लू कार्बन ' या नावाने ओळखला जातो.

1) नायट्रोजन

2) ऑक्सिजन

3) कार्बन डायऑक्साईड✅✅

4) हायड्रोजन






Environment GK In Hindi

Environment GK In Hindi

1.पौधे के किस भाग से दालचीनी प्राप्त की जाती है?
[A] पत्ती
[B] बीज
[C] छाल
[D] कली

Correct Answer: C [छाल]
Notes:
दालचीनी का प्रयोग मसाला और दवा के रूप में किया जाता है। यह छाल से प्राप्त की जाती है।

2.निम्नलिखित में से कौन सी पृथ्वी के वातावरण में पाए जाने वाली ग्रीन हाउस गैस नहीं है?
[A] कार्बन डाई ऑक्साइड
[B] मीथेन
[C] जलवाष्प
[D] नाइट्रोजन ऑक्साइड

Correct Answer: D [नाइट्रोजन ऑक्साइड ]
Notes:
प्रमुख ग्रीन हाउस गैस जलवाष्प, कार्बन डाई ऑक्साइड, मेथेन, नाइट्रस ऑक्साइड और ओजोन हैं| नाइट्रोजन ऑक्साइड प्रत्यक्ष रूप से ग्रीन हाउस गैस नहीं है लेकिन ओजोन के नरमन में सहायता करती है|
3.चिम्मिनी वन्यजीव अभ्यारण्य किस प्रदेश में है?
[A] केरल
[B] तमिलनाडु
[C] कर्नाटक
[D] आन्ध्र प्रदेश

Correct Answer: A [केरल ]
Notes:
चिम्मिनी वन्यजीव अभ्यारण्य केरल में है| यह थ्रिस्सुर जिले में है और पश्चिमी घाटों पर है| यहाँ पक्षिओं का एक बहुत अच्छा निवास स्थान है|

4.पम्पदुम शोला राष्ट्रीय उद्यान कहाँ है?
[A] उत्तराखंड
[B] केरल
[C] छत्तीसगढ़
[D] राजस्थान

Correct Answer: B [केरल ]
Notes:
पम्पदुम शोला राष्ट्रीय उद्यान केरल में है| यह केरल के मरायुर शहर के पास है| यह भारत के छोटे राष्ट्रीय उद्यानों में से एक है| यह 1.32 वर्ग किलोमीटर में फैला हुआ है|

5.केवलदेव राष्ट्रीय उद्यान किस प्रदेश में है?
[A] राजस्थान
[B] उत्तर प्रदेश
[C] मध्य प्रदेश
[D] महाराष्ट्र

Correct Answer: A [राजस्थान ]
Notes:
केवलदेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान में है| यह भरतपुर अभ्यारण्य के नाम से जाना जाता है|  इसमें हजारों की संख्या में दुर्लभ और विलुप्त जाति के पक्षी पाए जाते हैं, जैसे साईबेरिया से आये सारस, जो यहाँ सर्दियों के मौसम में आते हैं। यहाँ 230 से अधिक प्रजाति के पक्षी पाए जाते हैं|

6.कासु ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान किस प्रदेश में है?
[A] केरल
[B] तेलंगाना
[C] त्रिपुरा
[D] तमिलनाडु

Correct Answer: B [तेलंगाना ]
Notes:
कासु ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान तेलंगाना में है| यह तेलंगाना के जुबली पर्वत में है| इसका क्षेत्रफल 390 एकड़ में है और यहाँ 600 तरह के पेड़, 140 तरह के पक्षी पाए जाते हैं| इसके अलावा यहाँ तितलियों और कीड़े मकोड़े की भी 30 से अधिक प्रजातियाँ पायी जाती हैं|

7.कालेसर राष्ट्रीय उद्यान किस प्रदेश में है?
[A] हरयाणा
[B] उत्तर प्रदेश
[C] पंजाब
[D] इनमें से कोई नहीं

Correct Answer: A [हरयाणा ]
Notes:
कालेसर राष्ट्रीय उद्यान हरयाणा के यमुनानगर जिले में है|  यह तेरह हजार एकड़ के क्षेत्रफल में फैला हुआ है| यहाँ तेंदुए, जंगली बिल्ली, भारतीय सियार, चीतल, सांबर बहुतायात में पाए जाते हैं|


8.भिन्दवास वन्य जीव अभ्यारण्य किस प्रदेश में है?
[A] पंजाब
[B] हरयाणा
[C] हिमाचल प्रदेश
[D] उत्तर प्रदेश

Correct Answer: B [हरयाणा ]
Notes:
भिन्दवास वन्य जीव अभ्यारण्य हरयाणा  का एक प्रमुख वन्य जीव अभ्यारण्य में है| यह हरयाणा के झज्झर जिले मने है और 411.35 हेक्टेयर में फैला हुआ है|

9.कतर्निया घाट वन्यजीव अभ्यारण्य किस प्रदेश में है?
[A] उत्तर प्रदेश
[B] मध्य प्रदेश
[C] कर्नाटक
[D] बिहार

Correct Answer: A [उत्तर प्रदेश ]
Notes:
कतर्निया घात वन्यजीव अभ्यारण्य उत्तर प्रदेश के बहराइच जिले में है| यहाँ घड़ियाल, गेंडा, गंगा की डोल्फिन बहुतायात में पाए जाते हैं| यह घडियालों का प्रमुख क्षेत्र है|

10.इंदिरा गांधी वन्यजीव अभ्यारण्य किस प्रदेश में है?
[A] तमिलनाडु
[B] कर्नाटक
[C] केरल
[D] तेलंगाना

Correct Answer: A [तमिलनाडु]
Notes:
इंदिरा गांधी वन्यजीव अभ्यारण्य अनामलाई टाइगर रिज़र्व का पुराना नाम है। यह तमिलनाडु की अनामलाई पहाड़ियों में स्थित है। यह कोयम्बटूर और तिरुप्पुर जिले में है। यह सुनहरे हिरन, तेंदुए, जंगली हिरण, भौंकने वाले हिरण, साधारण लंगूर आदि का क्षेत्र है। यहां पश्चिमी घाट की 15 से 16 पक्षी प्रजातियाँ पाई जाती हैं। इसके अलावा पक्षियों की 250 से अधिक प्रजातियाँ पाई जाती हैं।

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...