०३ जून २०२२

महत्वपूर्ण माहिती ( राज्यसेवा पूर्व परिक्षा)

नोबेल पुरस्कार बद्दल माहिती ..

नोबेल पुरस्कार ची सुरवात हि स्वीडिश वैज्ञानिक आल्फेड नोबल यांनी नोबेल प्राईज देण्याची सुरवात केली..

● १९०१ मध्ये त्यांनी ,
Physics , chemistry , laterature , peace physiology or medicien इ.

(१९६९ ला अर्थशास्त्र चा पुरस्कार देण्यात सुरवात झाली)

★ पुरस्काराचे स्वरूप :- ९० लाख स्वाडीश क्रोनर (२०१९ च्या आकडेवारीनुसार) रु रोख आणि २४ कॅरेट गोल्ड मेडल.

★ नोबेल हा पुरस्कार हा १० डिसेंबर रोजी दिला जातो..
● आल्फ्रेड नोबेल यांच्या जयंती निमित्त दिला जातो..

★ पहिले भारतीय व्यक्ती ..
●● रवींद्रनाथ टागोर  (१९१३)
●● सी व्ही रमण (१९३०)
●● हर गोबिंद खुराणा ( १९६८)
●● मदर टेरेसा( १९७९)
●● सुब्रमण्यम चंद्रशेखर (१९८३)
●● अमर्त्य सेन (१९९८)
●● व्यंकटरामन रामकृष्ण ( २००९)
●● व्ही.एस.नायपॉल (२००१)
●● कैलास सत्यार्थी  (२०१४)
●● अभिजित बॅनर्जी (२०१९) (भारतीय वंशीय व्यक्ती सध्या अमेरिकेचे नागरिक आहे.)

टीप :-  १) नोबेल पुरस्कार आत पर्यंत 10 भारतीय व्यक्तींना मिळाला आहे.

२) सर्वात जास्त पुरस्कार अमेरिका या देशातील व्यक्तींना मिळाला आहे.

◆● महात्मा गांधी यांना १९३७, १९३८, १९३९, आणि १९७४ ला नोबेल साठी नोमिनेट केले होते..

★★ २०२० चे नोबेल पुरस्कार विजेते★★

1) रसायनशास्त्र :-  इमॅन्युएल चार्पेंटीर(फ्रांस) , जेनिफर ए.दौदना(अमेरिका)

2) भौतिकशास्त्र :- अँड्रिया एम.गेझ , रॉजर पेनरोस , रेइनहार्ड गेन्झेल

3) वैद्यकशास्त्र :- हार्वी जे.आल्टर(अमेरिका) ,मायकल ह्युटन(ब्रिटन) , चार्ल्स.एम राईस(अमेरिका)

4) अर्थशास्त्र :-  पॉल मिलग्रोम रॉबर्ट विल्सन

5) शांतता :- WFP - जागतिक अन्न कार्यक्रम (World Food Programme)

6) साहित्य :- लुईस ग्लक ( अमेरिका ).

मुस्लिम राजकारण व चळवळ ( थोडक्यात)

➡️ मुस्लिम राजकारण व चळवळ ( थोडक्यात)

◾️1905 बंगालची फाळणी

◾️1906 मुस्लिम लीग

◾️1909 स्वतंत्र मतदारसंघ

◾️1916 लखनौ करार (H+M) एकी

◾️1928 नेहरू अहवाल

◾️1928 जीनांचा दिल्ली प्रस्ताव

◾️1929 जीनांचा 14 कलमी योजना

◾️1930 सायमन अहवाल

◾️1937 प्रांत निवडणुका

◾️1940 पाकिस्तानचा प्रस्ताव ( द्विराष्ट्र सिद्धांत)

◾️1944 राजाजी योजना (पाकिस्तान ला समर्थन)

◾️1945 अपयशी सिमला परिषद

◾️1946 त्रिमंत्री योजना (अपयशी)

◾️1947 माऊंटबॅटन योजना

◾️1947 दोन स्वतंत्र्य देश.

वाहतूक व दळणवळण

वाहतूक व दळणवळण

१) कर्नल शेवांग रिनशेज पूल/लडाखचा सिंह
भारतातील सर्वाधिक उंचीवरील सर्व ऋतूकालीन पूल
आक्टो. २०१९ राजनाथसिंह हस्ते उद्घाटन
समुद्र सपाटीपासून १४०५० फूट उंचीवर
लडाखमध्ये श्योक नदीवर (दूरबूक व दौलत बेगओल्डी)

२) मैत्री ब्रिज
भारतीय लष्कराने केवळ ४० दिवसात तयार केलेला
सिंधू नदीवर (लेह) झुलता पुल

३) बोगीबिल पूल / अटल सेतू
देशातील सर्वात लांब रेल्वे – रस्ते पूल (४.९४ किमी)
ब्रहमपुत्रा नदीवर (आसाम- अरुणाचल प्रदेश जोडतो)
पुलाच्या खालच्या भागात दुहेरी रेल्वेमार्ग तर पुलाच्या वरच्या भागात ३ पदरी रस्ता

४) चेनानी – नाश्री बोगदा
देशातील सर्वाधिक लांबीचा (९.२ किमी) बोगदा
आक्टो २०१९ मध्ये या बोगदयास डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्यात आले.
JK मध्ये हा बोगदा रा.महामार्ग क्र. ४४ वर आहे.

५) कोलकत्ता पोर्ट ट्रस्ट
जाने २०२० मध्ये या बंदराला १५० वर्षे पूर्ण
या प्रसंगी त्याचे नामकरण श्यामाप्रसाद मुखर्जी
कांडला बंदर – प.दीनदयाल उपाध्याय पोर्ट ट्रस्ट
न्हावाशेवा बंदर - प.जवाहरलाल नेहरु बंदर (JNPT)

६) द.किनारपट्टी रेल्वे क्षेत्र (आंध्रप्रदेश)
भारताचा १८ वा रेल्वे विभाग
मुख्यालय - विशाखापट्टण
एकूण लांबी - ३४९० किमी

७) तेजस एक्सप्रेस
विलंब झाल्यास प्रवाशांना भरपाई देणारी रेल्वे
पहिली खाजगी रेल्वे (दिल्ली – लखनौ प्रवास)
१ ली सेमी – हाय स्पीड, पूर्ण वातानुकुलित रेल्वे

८) बुध्दीस्त सर्किट ट्रेन
भारत नेपाळ दरम्यान धावणार
गौतम बुध्दांच्या जीवनाशी निगडीत स्थळांना भेट देणारी

९) थार एक्सप्रेस व समझोता
थार - जोधपूर ते मुनाबाव दरम्यान (साप्ताहिक) एक्सप्रेस
समझोता - दिल्ली ते अटारी दरम्यान
भारत व पाक दरम्यान धावणाऱ्या या रेल्वे कलम ३७० हटवल्यानंतर रद्द करण्यात आल्या

१०) वंदे भारत एक्सप्रेस/ ट्रेन १८
स्वदेशी बनावटीची सर्वात वेगवान (१६०-१८० किमी)
पहिला प्रवास - दिल्ली ते वाराणसी
दुसरा प्रवास - (दिल्ली ते कटरा)
स्वतंत्र इंजिन नसणारी, १६ डब्यांची रेल्वेगाडी

११) समानता एक्सप्रेस
डॉ.बाबासाहेब व गौतम बुध्द यांच्याशी संबंधित
स्थळांना भेट देणारी ही रेल्वे
चैत्यभूमी, महू, बोधगया, सारनाथ, लुंबिनी, दीक्षाभूमी.

१२) स्पाइसजेट
१०० विमाने असणारी भारतातील चौथी कंपनी
एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगो नंतरची ४ थी कंपनी

१३) कर्तापुर – साहिब कॉरिडॉर
भारतातील डेरा बाबा नामक ते पाक मधील कर्तापूर साहिब गुरुव्दारा जोडणारा हा मार्ग
(९/११/१९ रोजी उद्घाटन).

महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा.

⭕️महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा⭕️

१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया

२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.

४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.

५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.

६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.

७) गोवा- सिंधुदुर्ग.

घटक काम काळ व वेग आणि आगगाडी किंवा रेल्वे साठी सुञ इतर भौमितिक सूत्रे

घटक - काम काळ व वेग

सुञ -
1) अंतर  =  वेग  × वेळ
                   अंतर 
2) वेग     = ----------
                    वेळ
                    अंतर
3) वेळ    = -----------
                     वेग

======================

✏आगगाडी किंवा रेल्वे साठी सुञ.✏

...आगगाडी किंवा रेल्वे साठी चे गणित सोडवण्यासाढी वेग हा km व वेळ ही तासात दिलेली असते. परंतु रेल्वे व आगगाडी एकमेकांना ओलांडून जाते हे उत्तर मीटर -सेकंद मध्ये असते म्हणून त्या साठी पुढील सुञ तयार होतात.


एक रेल्वे जिची लांबी X मीटर आहे. व वेग vKm/h आहे.एक विचेजा खांब ओलांडून जाण्यासाठी लाग वेळ....

           18        X  
वेळ  = ------ × --------
            5          v


एक रेल्वे X मीटर लांब व एक पुल Y मीटर लांब वेग v Km/h असेल तर पुल ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ....

             18      (  X + Y )
वेळ  =  ------ × -----------------
              5             v

दोन रेल्वे अनुक्रमे लांबी X मीटर व Y मीटर आहे . वेग अनुक्रमे v Km/h  व u Km/h आहे.
( v > u ) असेल .....

✏  एकाच दिशेने जात असातील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ....

             18       ( X + Y )
वेळ =  -------- × -----------------
             5           ( v - u )

✏✏ एक मेकाच्या विरूद्ध दिशेला जात असतील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ ....

           18       ( X + Y )
वेळ = ------- × ----------------
            5          ( v + u )

_________________________________

 इतर भौमितिक सूत्रे - 

1.    समांतर भूज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया×उंची 

2.    समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = 1/2×कर्णाचा गुणाकार 

3.    सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3)/2×(बाजू)2

4.    वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ = वर्तुळ कंसाची लांबी × r/2 किंवा θ/360×πr2

5.    वर्तुळ कंसाची लांबी (I) = θ/180×πr

6.    घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6×(बाजू)2

7.    दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2×πrh 

8.    अर्धगोलाच्या वर्कपृष्ठाचे क्षेत्रफळ = 3πr2

9.    अर्धगोलाचे घनफळ = 2/3πr3

10. त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √(s(s-a)(s-b)(s-c) )

11. शंकूचे घनफळ = 1/3 πr3h  

12. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4×(बाजू)2

13. दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr(r+h) 

14. अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ = 2πr2 

15. (S = 1/2 (a+b+c) = अर्ध परिमिती)  

16. वक्रपृष्ठ = πrl

17. शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 + π r (r+l) r= त्रिज्या, l= वर्तुळ कंसाची लांबी 

_______________________________

Trick

🔹🔹Trick

           💻१  ते  १०० संख्यांच्या बेरजा

(१)१ ते १० पर्यंत संख्यांची बेरीज -
      १+२+३+४+५+६+७+८+९+१०=५५

(२)११ ते २०पर्यंत संख्यांची बेरीज -
     ११+१२+१३+१४+१५+१६+१७+
     १८+१९+२० = १५५

(३) २१ ते ३० पर्यंत संख्यांची बेरीज -
      २१+२२+२३+२४+२५+२६+२७+
      २८+२९+३० = २५५

(४) ३१ ते ४० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ३१+३२+३३+३४+३५+३६+३७+
      ३८+३९+४० = ३५५

(५) ४१ ते ५० पर्यंत संख्यांची बेरीज -
     ४१+४२+४३+४४+४५+४६+४७+
     ४८+४९+५० = ४५५

(६) ५१ ते ६० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ५१+५२+५३+५४+५५+५६+५७+
      ५८+५९+६० = ५५५

(७) ६१ ते ७० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ६१+६२+६३+६४+६५+६६+६७+
      ६८+६९+७० = ६५५

(८) ७१ ते ८० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ७१+७२+७३+७४+७५+७६+७७+
      ७८+७९+८० = ७५५

(९) ८१ ते ९० पर्यंत संख्यांची बेरीज -
      ८१+८२+८३+८४+८५+८६+८७+
      ८८+८९+९० = ८५५

(१०) ९१ ते १०० पर्यंत संख्यांची बेरीज -
        ९१+९२+९३+९४+९५+९६+९७+
        ९८+९९+१०० = ९५५
    *****************************

          १ ते १० संख्यांची बेरीज =  ५५
        ११ ते २० संख्यांची बेरीज = १५५
        २१ ते ३० संख्यांची बेरीज = २५५
        ३१ ते ४० संख्यांची बेरीज = ३५५
        ४१ ते ५० संख्यांची बेरीज = ४५५
        ५१ ते ६० संख्यांची बेरीज = ५५५
        ६१ ते ७० संख्यांची बेरीज = ६५५
        ७१ ते ८० संख्यांची बेरीज = ७५५
        ८१ ते ९० संख्यांची बेरीज = ८५५
      ९१ ते १०० संख्यांची बेरीज =९५५
        १ ते १०० संख्यांची बेरीज = ५०५०

          

जिल्हा परिषद/आरोग्य विभाग/पोलीस भरती प्रश्नोत्तरे


(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.

(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.

(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.

(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.

(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.

(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.

(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.

(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १० जानेवारी.

(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- हाॅकी.

(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.

(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.

(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.

(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.

(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.

(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.

(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.

(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २३ मार्च.

(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस.

(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार.

(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.

(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.

(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- ७ एप्रिल.

(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कुस्ती.

(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
उत्तर- आरती शहा.

(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.

(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
उत्तर- प्रतिभा पाटील.

(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.

(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- क्रिकेट.

(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.

महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन.

◾️ मध्यवर्ती  ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत  संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 便 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी  संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू  संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️केळी  संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद  संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब   संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 暈 कांदा - लसून 龍 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)

◾️ मध्यवर्ती  ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

◾️ गवत  संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

◾️ नारळ 便 संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

◾️सुपारी  संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

◾️काजू  संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◾️केळी  संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

◾️ हळद  संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

◾️ राष्ट्रीय डाळिंब   संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

◾️ राष्ट्रीय 暈 कांदा - लसून 龍 संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)

________________________

पंचायत समिती सदस्यांचे कार्य व अधिकार

पंचायत समिती सदस्यांचे कार्य व अधिकार


पंचायत समिती सभेतील मुद्दे

पंचायत समिती सदस्यांचे कार्य

पंचायत समिती सदस्य म्हणून सभेत प्रश्न विचारण्याचा, माहिती घेण्याचा, ठराव व उपसूचना मांडण्याचा व मत देण्याचा, सदस्यांना मूलभूत अधिकार आहे. आपल्या मतदारसंघातील कामांवर लक्ष देणे, कामाचा दर्जा सांभाळला जात नसल्यास ती बाब संबंधित अधिका-यांच्या निदर्शनास आणणे व त्यांनतरही समाधानकारक परिणाम न झाल्यास त्यासंबंधी सभेत प्रश्न उपस्थित करणे हे पंचायत समिती सदस्याचे काम आहे. पंचायत समितीची कामे व विकास कार्यक्रमासंबंधी माहिती मिळविण्याचा सदस्यांचा अधिकार असून तो सभेत वापरता येतो. सभेत प्रश्नाची पूर्वसूचना देऊन लेखी प्रश्न विचारता येतात. प्रशासनाने उत्तरावर उपप्रश्न विचारुन सत्य उघडकीस आणता येते.


पंचायत समिती सभेतील मुद्दे

पंचायत समितीच्या मासिक सभेत प्रत्येक खात्याचा अहवाल सादर केला जातो; त्यावेळी समाधान न झाल्यास आपले मत सभेच्या निदर्शनास आणून सुधारणा करण्याच्या दृष्टीने सूचना करता येतात. : ग्रामपंचायतीसंबंधी पंचायत समितीची जबाबदारी असून आपल्या भागातील ग्रामपंचायतीच्या कार्यातील अडचण दूर करुन मार्गदर्शन करण्याचे काम पंचायत समिती सदस्यांना करता येते.

पंचायत समितीच्या सभेपुढे शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांकडून आलेले आदेश व परिपत्रकांची माहिती दिली पाहिजे अशी सूचना आहे. ही माहिती सदस्यांना आपल्या भागात कार्य करण्यास उपयुक्त असते. ग्रामविकासाच्या कार्यात शिक्षणाला खूप महत्व असून प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत प्रामुख्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीची जबाबदारी आहे. इमारत सुविधा, स्वच्छता, मुलांना पिण्याचे पाणी इत्यादी बाबतीत सदस्याने लक्ष दिल्यास त्यांचे चांगले परिणाम होतात. आश्रमशाळेत मुलांच्या आहाराची व राहण्याची व्यवस्था सरकारी नियमानुसार होते की नाही याकडेही लक्ष देता येते.





पंचायत समिती सदस्यांचे कार्य

जवाहर रोजगार योजना, एकात्मिक ग्रामीण विकास योजना पंचायत समितीद्वारे राबविल्या जातात. हे काम प्रामुख्याने कर्मचारी करतात. त्यात आपला वाटा नाही अशी सदस्यांची समजूत असते. योजनेची माहिती सदस्यांना मिळते की नाही, अर्ज मंजूर करण्यास योग्य कार्यवाही होते की नाही व लाभार्थीना त्याचा पूर्ण लाभ मिळतो की नाही या बाबीकडे सदस्यांनी लक्ष दिले पाहिजे.

पंचायत समिती क्षेत्रातील जिल्हा परिषद व शासनाची कामे यावर देखरेख ठेवून कामाची d सांभाळली जात नसेल किंवा भ्रष्टाचार होत असेल तर पंचायत समिती सदस्याला लक्ष घालता येते.

पंचायत समितीचे कार्य प्रामुख्याने विकास कामांची कार्यवाही व देखरेख ठेवण्याचे असून कामाचा दर्जा सुधारण्यास व भ्रष्टाचाराला आळा घालण्यास पंचायत समितीचा जागृत व कार्यतत्पर सदस्य महत्वाचे काम करु शकतो.

Helping Verbs(साहाय्यकारी क्रियापदे)



1.Can


होऊ शकते,मारू शकतो,जाऊ शकतो,बोलू शकतो,लिहु शकतो,खाऊ शकतो,तयार करू शकतो,बसू शकतो, आठवण ठेवू शकतो, वाचू शकतो, समजावु शकतो, करू शकतो, सांगू शकतो, बोलावू शकतो,/होऊ शकत नाही.


2.Could


सांगू शकला,होऊ शकले,अभ्यास करू शकला, येऊ शकला,जाऊ शकला,बोलू शकला,लिहु शकला, आठवन शकला, ठेवू शकला, मारू शकला, समजावु शकला, बोलावू शकला, करू शकला, खाऊ शकला /होऊ शकले नाही.


3.Should


झाले पाहिजे,एकायला पाहिजे,करायला पाहिजे, सांगायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, मारायला पाहिजे, शांत बसायला पाहिजे, अनुभव घ्यायला पाहिजे, झोपायला पाहिजे, यायला पाहिजे, बोलायला पाहिजे / नाही पाहिजे.


4.Must


झालेच पाहिजे,एकायलाच पाहिजे,करायलाच पाहिजे, सांगायलाच पाहिजे, अभ्यास करायलाच पाहिजे, मारायलाच पाहिजे, शांत बसायलाच पाहिजे, अनुभव घ्यायलाच पाहिजे, झोपायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे, बोलायलाच पाहिजे.


5.Would


होईलच,मारेनच,सांगेलच,बोलेनच, करेलच, लिहिलच, अभ्यास करेलच, रडेलच, विचारीनच, बनवेलच, येईलच.


6.May


यायच असेल तर ये, जायच असेल तर जा, कदाचित तो मारेल,कदाचित तो अभ्यास करेल,कदाचित पाऊस येईल, कदाचित शाळेत जाईल / कदाचित परवानगी घेण्यासाठी/देण्यासाठी.


7.Let


होऊ दे,अभ्यास करू दे, मारू दे, करू दे, देऊ दे, घेऊ दे, सांगू दे, विचारू दे, बोलू दे, एकूण घेऊ दे, समजावु दे, येऊ दे, जाऊ दे.


8.Let's


चला जाऊया,चला समजावुया,चला बोलूया,चला खेळूया,चला अभ्यास,चला करूया,चला गाणे गाऊया,चला मारूया,चला लिहुया,चला विचारूया,चला करूया.


9.Have/Has to


कराव लागत,बोलाव लागत, सांगाव लागत,समजावाव लागत,कराव लागत,विचाराव लागत, जाव लागत, काम लागत, कराव लागत, माराव लागत, सोडाव लागत, समजून घ्याव लागत, प्रेम कराव लागत / कराव लागत नाही.


10.Had to


कराव लागल, बोलाव लागल,सांगाव लागल,समजावाव लागल,विचाराव लागल,जाव लागल,काम कराव लागल,माराव लागल, सोडाव लागल,समजून घ्याव लागल,प्रेम कराव लागल/कराव लागल नाही.


11.Did have to


कराव लागत होत,बोलाव लागत होत,सांगाव लागत होत,समजावाव लागत होत,कराव लागत होत,विचाराव लागत होत, जाव लागत होत, काम लागत होत, कराव लागत होत, माराव लागत होत, सोडाव लागत होत, समजून घ्याव लागत होत, प्रेम कराव लागत होत/कराव लागत नाही.


12.will/shall have to


कराव लागेल,बोलाव लागेल, सांगाव लागेल,समजावाव लागेल,कराव लागेल,विचाराव लागेल, जाव लागेल, काम कराव लागेल, माराव लागेल, सोडाव लागेल, समजून घ्याव लागेल, प्रेम कराव लागेल /कराव लागणार नाही.


13.Should have


करायला ह्व होत, झाले पाहिजे होत,एकायला पाहिजे होत,करायला पाहिजे होत, सांगायला पाहिजे होत, अभ्यास करायला पाहिजे होत, मारायला पाहिजे होत, शांत बसायला पाहिजे होत, अनुभव घ्यायला पाहिजे होत, झोपायला पाहिजे होत, यायला पाहिजे होत, बोलायला पाहिजे होत / करायला नको होत.


14.Could have


(केल असत तर असत/ जाल नसत शक्यता होती),सांगू शकला असता, सांगू शकला असता,होऊ शकले असता,अभ्यास करू शकला असता, येऊ शकला असता,जाऊ शकला असता,बोलू शकला असता,लिहु शकला असता, आठवन शकला असता, ठेवू शकला असता, मारू शकला असता, समजावु शकला असता, बोलावू शकला असता, करू शकला असता, खाऊ शकला असता .


15.Must have


(भूतकाळात झालेच असेल) पाऊस आलाच असेल, तो भेटलाच असेल, तो मेलाच असेल, हरवलाच असेल, पास झालाच असेल, त्याने अभ्यास केलाच असेल.


16.Might have


कदाचित झाल असेल,कदाचित आलेला असेल, कदाचित गेलेला असेल, कदाचित मेलेला असेल, कदाचित पास झालेला असेल, कदाचित अभ्यास केलेला असेल,कदाचित समजवले असेल, कदाचित पाऊस पडला असेल .


17.Would have


झालच असत,पाऊस आलाच असता, तो भेटलाच असता,तो मेलाच असता,हरवलाच असता, पास झालाच असता, त्याने अभ्यास केलाच असता.

NPP (National People's Party)


⚠️ स्थापना - 6 जानेवारी 2013

⚠️ राष्ट्रिय पक्षाचा दर्जा - 7 जून 2019

⚠️ संस्थापक - पी. ए. संगमा

⚠️ पक्ष चिन्ह - पुस्तक

⚠️ मुख्यालय - इंफाळ (मणिपूर)

⚠️ सध्या पक्षाचे अध्यक्ष -  कॉनरॅड संगमा (सध्या मेघालयचे मुख्यमंत्री)

⚠️ लोकसभा & राज्यसभा दोन्हींमध्ये प्रत्येकी एक जागा आहे.

⚠️ 17 व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीनंतर नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) ला देशातील आठवा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळाला आहे.

⚠️ राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त करणारा तो ईशान्य भारतातील पहिला पक्ष आहे.

⚠️ NPP या पक्षाला अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय आणि मणिपूर या 4 राज्यांत राज्य पक्ष म्हणून दर्जा प्राप्त आहे.

⚠️ नुकत्याच झालेल्या अरुणाचल प्रदेश राज्यात विधानसभा निवडणुकीत पक्षाला राज्य पक्ष म्हणून दर्जा मिळवला.

⚠️किमान चार राज्यांत राज्य पक्ष झाल्याने NPP राष्ट्रीय पक्ष ठरला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
💈💈 राष्ट्रीय पक्ष दर्जा असणारे 8 पक्ष 💈💈
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

1⃣ काँग्रेस

2⃣ भाजप

3⃣ बहुजन समाज पक्ष

4⃣ भारतीय कम्युनिस्ट पक्ष

5⃣ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

6⃣ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

7⃣ अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस.

8⃣ नॅशनल पीपल्स पार्टी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

विधानपरिषद असणारे भारतीय राज्य

  ★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★

1⃣ आंध्रप्रदेश : एकुण सदस्य  58 (50 + 8)
2⃣ बिहार : एकुण सदस्य 75 (63 + 12)
3⃣ कर्नाटक : एकुण सदस्य 75 (64 + 11)
4⃣ महाराष्ट्र : एकुण सदस्य 78 (66 +‌ 12)
5⃣ तेलंगणा : एकुण सदस्य 40 (34 + 06)
6⃣ उत्तरप्रदेश : एकुण सदस्य 100 (90 + 10)

◆ विधानपरिषद सदस्याचा कार्यकाळ 6 वर्ष‌ असतो, सदस्य होण्यासाठी वय कमीतकमी 30

◆ विधानपरिषदेत 5/6 सदस्य निर्वाचित असतात तर 1/6 सदस्य राज्यपालाने नियुक्त.

◆ दर 2 वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त होतात, तेवढेच नव्याने त्यांच्या जागी निवडले जातात.

०२ जून २०२२

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.

◆ आयोजन : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

◆ महामंडाळाचे अध्यक्ष: कौतूकराव ठाले पाटील

◆ अनुदान : 50 लाख रूपये (शासनाकडून) - दरवर्षी

: 2017 पर्यंत 25 लाख रुपये

❇️ आतापर्यंत 5 महिलांनी अध्यक्षपद भुषविलेले आहे :-

◆ डॉ. अरुणा देरे - 2019✅
◆ विजया ध्यसा- 2001
◆ शांता शेलड़े- 1996
◆ दुर्गा भागवत - 1973
◆ कुसूमावती देशपांडे - 1961

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :-

◆ कालावधी :  3, 4 व 5 डिसेंबर 2021

◆ स्थळ : नाशिक

◆ अध्यक्ष : डॉ. जयंत नारळीकर ✅

◆ स्वागताध्यक्ष : छगन भुजबळ

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :-

◆ स्थळ : उदगीर ✅

◆ अध्यक्ष : भारत सासणे ✅

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :

◆ स्थळ : वर्धा ✅

◆ अध्यक्ष : पु. शि.रेगे ✅

सात बेटांचे शहर: मुंबई


🎯 महाराष्ट्रातील मुंबई हे शहर सात बेटांनी बनलेले आहे.

🎯 पूर्वी मुंबई येथे सात लहान-मोठ्या आकाराची बेटे अस्तित्वात होती.

🎯 या बेटांच्या मधील खाडी व खाजणात भराव घालून त्यांचे एकत्रीकरण करण्यात आले व आत्ताचे मुंबई नगर अस्तित्वात आले.

☑️ मुंबईची सात बेटे खालीलप्रमाणे

1) माहीम (Mahim)
2) वरळी (Worli)
3) परळ (Parel)
4) माझगाव (Mazgaon)
5) मुंबई (Bombay)
6) कुलाबा (Calaba)
7) छोटा कुलाबा (म्हातारीचे बेट - Old Woman's Island)

🎯 एकसंघ मुंबईची निर्मिती

☑️ या बेटांदरम्यानचा समुद्र फारच उथळ होता व ठिकठिकाणी खाजणे होती.

☑️ ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे. 

☑️ जेराल्ड इंजिनिअर (१६७०-७७) या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजविण्याचा व समुद्र हटविण्याचा कार्यक्रम हाती घेतला.

☑️ त्याच्यानंतर तो टप्पा-टप्प्याने राबविला जाऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली.

☑️ मुंबई बेटावर पूर्व व पश्चिम भागांत नैर्ऋत्य-ईशान्य दिशेत पसरलेले व एकमेकांस समांतर असलेले दोन कमी उंचीचे खडक आहेत.

☑️ त्यांपैकी बेटाच्या पश्चिम भागातील खडक मलबार पॉईंट पासून वरळी पर्यंत पसरला आहे.

☑️ या खडकाची मलबार हिल येथील समुद्र सपाटीपासून उंची ५५ मीटर असून तेच मुंबईतील सर्वोच्च ठिकाणी आहे.

☑️ दुसरा खडक बेटाच्या पूर्व भागात साधारण डोंगरीपासून शीवपर्यंत तुटकतुटक पसरलेला आहे.

☑️ या खडकामुळे व नरीमन पॉईंटच्या भूशिरामुळे त्याच्या पूर्व बाजूवर असलेल्या मुंबई बंदराचे खुल्या सागरापासून संरक्षण झालेले आहे.

☑️ या दोन्ही खडकांतर्गत मलबार, खंबाला, वरळी, पाली, गिल्बर्ट, शिवडी, ॲंटॉप इत्यादी लहानलहान टेकड्या आहेत.

☑️ या दोन्ही खडकांदरम्यानचा प्रदेश सपाट असून मलबार हिल व नरीमन पॉईंटच्या दरम्यान बॅक बे हा उथळ समुद्रभाग आहे.

०१ जून २०२२

राज्यसेवा पूर्व परीक्षा : 2022 .


◆ CSAT Qualified झाल्यामुळे आता GS ला जास्त महत्व प्राप्त झाले आहे. परंतु ज्यांचे CSAT अगोदरच व्यवस्थित नव्हते त्यांनी याकडे दुर्लक्ष करू नका.

◆  काही विद्यार्थ्यांच्या मते मागील काही परीक्षेत चालू घडामोडी ची काठिण्य पातळी वाढली आहे. तर माझ्या मते विद्यार्थी जे चालू घडामोडी साठी पुस्तक/मासिक वाचत असतात आणि त्यातून जर परीक्षेत प्रश्न नाही आले तर ते थेट प्रश्नांची काठिण्य पातळी वाढली असं म्हणतात. कारण त्या Q चा Source त्यांच्या जवळ नसतो. आणि मुख्यतः आपण विद्यार्थी मासिक/ News Paper खूप वाचतो परंतु आपल्याला जे गरजेचे आहे ते आपण करत नाहीत म्हणजे आपण कधी MCQ ची प्रॅक्टिसचं करत नाहीत. त्यामुळे तो विषय आपल्याला अवघड किंवा त्या विषयाची काठिण्य पातळी वाढली असे वाटते.

◆ आता आपण सर्व विद्यार्थीच आहोत , चालू घडामोडी चे प्रश्न वयक्तिक मला तरी कधी अवघड गेले नाहीत . 15 ते 16 प्रश्नांपैकी हमखास मला मागील परीक्षेत 12 ते 13 मार्क मिळत आले आहेत .माझा  इथे सांगण्याचा उद्देश एकच आहे तो म्हणजे आपण चालू घडामोडी कडे खूप दुर्लक्ष करत असतो. परीक्षा जवळ आली की 1 वर्षाचे 12 मासिक एकदाच गोळा करतोत आणि वाचत बसतोत. ही चुकीची पद्धत आहे.

◆ मागील काही आयोगाचे पेपर बघून आपल्याला असे दिसते की किमान आपण परीक्षेच्या अगोदरचे 2 वर्षाचे तरी चालू घडामोडी चांगले करावे म्हणजे आपल्याला  अपेक्षित मार्क मिळतील....

◆ 21 ऑगस्ट ला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी किमान आपण जानेवारी 2021 पासून चे चालू घडामोडी चांगले केलेच पाहिजे . [ त्या अगोदरचेही काही केले तर उत्तमच ] .

◆ या वर्षी 🔥GS ला किमान 120 चे टार्गेट 🔥ठवा आणि त्यानुसारच अभ्यास करा. अभ्यास हा व्यवस्थित प्लॅन/Schedule नेच करा , काहीही वाचून मार्क मिळत नाहीत.

💐 सर्वांना शुभेच्छा 💐

मुस्लिम धर्मीयांतील सुधारणा चळवळी

♦️अलीगढ चळवळ :- सर सय्यद अहमद खान .

♦️मोहमेडन लिटररी सोसायटी :- अब्दुल लतिफ.

♦️अहमदिया चळवळ :- मिर्झा गुलाम मुहम्मद.

♦️जामिया मिलिया इस्लामिया :- मुहम्मद अली.

♦️फरियादी चळवळ (1804) :- फरीदपूर (बंगाल) .

♦️वहाबी आंदोलन :- (1820-1820)

♦️तायुणी चळवळ (1839):- ढाका

♦️देवबंद चळवळ (1867) .

♦️टिटू मिर ची चळवळ .

31 मे 2022 चालू घडामोडी..!!


1). द्विपक्षीय नौदल सराव "बोंगोसागर" हा भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजित केला जातो?
उत्तर - बांगलादेश

२). अमर जवान ज्योतीची स्थापना कोणत्या युद्धानंतर झाली?
उत्तर - 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर

३). अलीकडे चर्चेत असलेले "मुंद्रा बंदर" कुठे आहे?
उत्तर - गुजरात

4). यूएन पिस्किपिंग मिशनमध्ये अलीकडे कोणत्या देशात भारतीय सैनिकांवर हल्ले झाले आहेत?
उत्तर - काँगो

५). जगातील पहिल्या नॅनो युरिया प्लांटचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर - गुजरात

६). अलीकडेच चर्चेत असलेले कांगेर व्हॅली नॅशनल पार्क कुठे आहे?
उत्तर - छत्तीसगड

७) नुकतेच अमगढ बिबट्या राखीव कोठे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर - राजस्थान

8). नुकताच महिला आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – २८ मे

प्र. जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक कोण बनले आहे?
उत्तर – टॅड्रोस एडहेनॉम

प्र. जोस रामोस होर्टा हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत?
उत्तर – पूर्वी तिमोर / पुर्वी तिमोर

प्र. जागतिक थायरॉईड दिवस २०२२ कधी साजरा केला जातो?
उत्तर – २५ मे / २५ मे

प्र. शिरूई लिली फेस्टिव्हल 2022 ची चौथी आवृत्ती कोणत्या राज्यात सुरू झाली आहे?
उत्तर – मणिपुर / मणिपूर

प्र. प्रतिष्ठित 'ऑनररी चाइल्ड राइट्स हिरो अवॉर्ड 2022' ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर – अशोक दयाल चंद (भारत) आणि जेम्स कोफी अन्नान (घाना)

Q. मे 2022 मध्ये, भारतातील 1 दशलक्ष सर्व महिला आशा कार्यकर्त्यांना …… द्वारे सन्मानित करण्यात आले आणि सन्मानित करण्यात आले.
उत्तर - WHO

प्र. दिल्ली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर – ज्ञानेश भारती / गायनेश भारती

Q. क्वाड लीडर्स समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशात पोहोचले?
उत्तर – पाक / जपान

प्र. जेट एअरवेजचे मुख्य डिजिटल अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - प्रभा शरण सिंह / प्रभा शरण सिंह

प्र. 'टॉम्ब ऑफ सॅन्ड' या अनुवादित हिंदी कादंबरीसाठी कोणत्या लेखकाला आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाले आहे?
उत्तर – गीतांजलि श्री / गीतांजली श्री

३१ मे २०२२

भूगोल महाराष्ट्रातील डोंगर रांगा



📚 सपर्धा परीक्षेचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासणे अगत्याचे ठरते. आज महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर आणि त्यांचा जिल्हा यांविषयी माहिती घेऊयात.


👉 डोंगराचे नाव : जिल्हा


▪️ सातमाळा : नाशिक

▪️ वणी : नाशिक

▪️ निर्मल : नांदेड

▪️ चिकोडी : कोल्हापूर

▪️ पन्हाळा : कोल्हापूर

▪️ चांदूरगड : चंद्रपूर

▪️ मांधरादेव : सातारा

▪️ महादेव : सातारा

▪️ मालिकार्जुन : सांगली

▪️ अजिंठा: औरंगाबाद

▪️ कळसूबाई : अहमदनगर

▪️ भामरागड : गडचिरोली

▪️ गाविलगड : बुलढाणा, अकोला

▪️ बालाघाट : बीड

▪️ तोरणमाळ : नंदुरबार

जागतिक व्यापार संघटना (WTO)

✔️ नाव : World  Trade Organization


◆ स्थापना: गॅट कराराच्या (General Agreement on  Tariffs and Trade: GATT) उरुग्वे राऊंडच्या मर्राकेश करारानुसार 1 जानेवारी 1995 रोजी WTO ची स्थापना करण्यात आली.


◆ मुख्यालय : जिनिव्हा (स्वित्झर्लंड)✅


◆ सदस्य : 164 (अफगाणिस्तान जुलै 2016 मध्ये 164 वा सदस्य देश बनला)


◆ निरीक्षक : 25 देश


◆ महासंचालक : एन्गोझी ओकोन्जो (आफ्रिकन-अमेरिकन)


 ध्येय : शक्य तितक्या सहजतेने, अंदाजाने आणि मुक्तपणे व्यापार वाहत राहण्याची खात्री करणे.


 ही एकमेव जागतिक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी देशांमधील व्यापाराच्या नियमांशी संबंधित आहे.

नीती आयोग



◆ NITI National Institution for Transforming India.


◆ स्थापना 1 जानेवारी 2015 (नियोजन आयोगाची जागा घेतली)


◆ मुख्यालय :- नवी दिल्ली

◆ अध्यक्ष :- पंतप्रधान (सध्या नरेंद्र मोदी) 

◆ उपाध्यक्ष सध्या :- राजीव कुमार


◆ पदसिद्ध सदस्य (4) :- अमित शहा (गृहमंत्री), राजनाथ सिंह (संरक्षण मंत्री), निर्मला सीतारमण (अर्थमंत्री), नरेंद्रसिंह तोमर (कृषिमंत्री) 


◆ पूर्ण कालीन सदस्य :- व्ही. के. सारस्वत, रमेश चंद, डॉ. विनोद पॉल 


◆ विशेष आमंत्रित सदस्य :-  नितीन गडकरी, पियुष गोएल, थावरचंद गेहलोत, राज इंद्रजीत सिंह.


◆ मुख्य कार्यकारी अधिकारी :- अमिताभ कांत

३० मे २०२२

नवीन शैक्षणिक धोरण २०२०ला मंजूरी :

२०२२-२०२३ पासून लागू होणार
NEW EDUCATION POLICY 2020 :

*केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं*
नामकरण आता
*"शिक्षण मंत्रालय"* असं होणार...

जाणून घेऊया :
*नवीन शिक्षण धोरण २०२०* यांना मंत्रिमंडळाने हिरवा झेंडा दाखवला आहे.
३४ वर्षांनंतर शिक्षण धोरण बदलले आहे. नवीन शिक्षण धोरणाची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :

— तीन ते १४ वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत. यापूर्वी हा वयोगट ६ ते १४ वर्षे होता...

— *५ वर्षे मूलभूत Fundamental :*
१. नर्सरी            @ ४ वर्षे
२. जूनियर केजी @ ५ वर्षे
३. एसआर केजी @ ६ वर्षे
४. इयत्ता पहिली @ ७ वर्षे
५. इयत्ता दुसरी   @ ८ वर्षे

— *३ वर्षांची प्रारंभिक शाळा Preparatory :*
६. इयत्ता तिसरी  @ ९ वर्षे
७. इयत्ता चौथी   @ १० वर्ष
८. इयत्ता पाचवी @ ११ वर्षे

— *३ वर्षांची माध्यमिक शाळा Middle :*
९.   इयत्ता सहावी @ १२ वर्षे
१०. इयत्ता सातवी @ १३ वर्ष
११. इयत्ता आठवी @ १४ वर्षे

*४ वर्ष माध्यमिक शाळा Secondary :*
१२. इयत्ता नववी     @१५ वर्षे
१३. इयत्ता दहावीची @ १६ वर्षे
१४. एफ.वाय.जे.सी‌. @ 17 वर्षे
१५. एस.वाय.जे.सी. @ १८ वर्षे

*ठळक वैशिष्ट्ये :*

— बोर्ड फक्त १२ वीच्या वर्गाला असेल.
महाविद्यालयीन पदवी ४ वर्षांची.
*दहावी मंडळ रद्द. SSC*
*एमफिल MPhil देखील बंद असेल.*

— *आता पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना केवळ मातृभाषा, स्थानिक भाषा आणि राष्ट्रीय भाषा शिकविली जाईल. उर्वरित विषय जरी तो इंग्रजी असला तरी एक विषय म्हणून शिकविला जाईल...*

— *बोर्ड परीक्षांचे महत्त्व कमी...*
आता *बोर्ड परीक्षा फक्त १२वी मध्ये द्यावी लागेल.* तर यापूर्वी दहावीची बोर्ड परीक्षा देणे बंधनकारक होते, ते आता होणार नाही.

— ९वी ते १२वीच्या सत्र परीक्षा असतील Semester Exam.
*शालेय शिक्षण ५ + ३ + ३ + ४ सूत्रांच्या (वरील सारणी पहा) अंतर्गत शिकवले जाईल...*

— महाविद्यालयीन पदवी ३ व ४ वर्षांची असेल. म्हणजेच,
*पदवीच्या पहिल्या वर्षात तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल,*
*दुसर्‍या वर्षी पदविका असेल*, तर
*तृतीय वर्षात डिग्री मिळेल.*

— जे संशोधनासाठी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तर जे विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असेल...

— विद्यार्थ्यांना यापुढे एमफिल MPhil करावे लागणार नाही. म्हणजेच, *रिसर्च करणाऱ्यांसाठी पदवी अधिक एक वर्षांचा मास्टर्स अभ्यासक्रम अशी चार वर्षांची पदवी* असेल. यानंतर ते थेट *पीएचडी PHD* करू शकतील.

— दरम्यान विद्यार्थी इतर कोर्स करू शकतील. *उच्च शिक्षणामध्ये Higher Education* २०३५ पर्यंत एकूण सकल पट नोंदणी Gross Enrolment Ratio २०३५ पर्यंत ५०% पोहोचवण्याचं उद्दिष्ट...
दुसरीकडे नवीन शिक्षण धोरणांतर्गत जर एखाद्या विद्यार्थ्याला कोर्सच्या मध्यभागी दुसरा कोर्स करायचा असेल तर तो मर्यादित काळासाठी पहिल्या कोर्समधून ब्रेक घेऊन दुसरा कोर्स करू शकतो...

— उच्च शिक्षणातही Higher Education अनेक सुधारणा केल्या आहेत. सुधारणांमध्ये
*श्रेणीबद्ध शैक्षणिक Graded Academic,* *प्रशासकीय  Administrative* आणि
*आर्थिक स्वायत्तता Financial Autonomy*
समाविष्ट आहे...
त्याशिवाय ई-कोर्सेस प्रादेशिक भाषांमध्येही सुरू केले जातील.
आभासी Vertual लॅब विकसित केल्या जातील.
राष्ट्रीय शैक्षणिक वैज्ञानिक मंच (NETF) सुरू होईल. देशात ४५ हजार महाविद्यालये असल्याचे स्पष्ट आहे...

*सर्व सरकारी Government,*
*खासगी Private* आणि
*मान्यताप्राप्त संस्थांसाठी*
*Deemed University*
समान नियम असतील...

— मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम: एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल. आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे होणारे ड्रॉपआऊट यामुळे कमी होतील. शिवाय ज्यांना एखादा विषय आवडीचा असेल तो विषय त्यांना शिकता येईल...

— बहुभाषिक शिक्षण - मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार...

— लॉ आणि मेडिकल शिक्षण वगळता उच्च शिक्षण एका छताखाली येणार...

— शिक्षणातील गुंतवणूक जीडीपीच्या ६% करणार, सध्या हे प्रमाण ४.४३% आहे...

— विद्यार्थ्यांचे प्रगती पुस्तक बदलणार. शिक्षकांसोबतच विद्यार्थीदेखील स्वत:चे मूल्यांकन करणार...

— सर्व महाविद्यालयांसाठी एकच सामायिक प्रवेश परीक्षा. एनटीए ही परीक्षा घेणार. मात्र ही परीक्षा ऐच्छिक असेल.‌..

या नियमानुसार नवीन शैक्षणिक सत्रे सुरू करता येतील. सर्व विद्यार्थी आणि पालकांनी हा संदेश काळजीपूर्वक वाचावा.

💐🇮🇳शिक्षण मंत्रालय भारत सरकार..जनहितार्थ जारी🇮🇳

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...