०६ मे २०२२

भारतात युरोपिअन वसाहतीची सुरुवात दुसरे कर्नाटक युध्द (1748-1754)

Mpsc History
भारतात युरोपिअन वसाहतीची सुरुवात :

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

दुसरे कर्नाटक युध्द (1748-1754) :-

कर्नाटकच्या पहिल्या युध्दामुळे डुप्लेची राजकीय महत्वाकांक्षा अधिक वाढली.
भारतीय राजांमध्ये सुरु असलेल्या संघर्षात भाग घेउन फ्रेंचांचा राजकीय प्रभाव वाढविण्याचा त्याने निणर्य घेतला.
या स्थितीचे वर्णन करताना मॅलेसन म्हणतो, महत्वाकंाक्षा जागृत होऊ लागल्या, परस्पर द्वेष वाढू लागले. युरोपियनांना शांततेशी काहीच देणे घेणे नव्हते कारण आकांक्षा पूर्तीसाठी संधी दार ठोठावत होती.
ही संधी हैद्राबाद व कर्नाटकच्या निर्वादास्पद वारसांमूळे प्राप्त झाली.
हैद्राबादचा निजाम उल मुल्क आसफजाह याचा मे 1748 मध्ये मृत्यू झाला त्यांच्यानंतर त्याचा मुलगा नासिरजंग हैद्राबादच्या गादीवर बसला. परंतु त्याला निजाम उल मुल्काचा नातू मुझॅफ्फरजंगने आव्हान दिले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

याच वेळी कर्नाटकचा नबाब अन्वरुद्दीन आणि त्याचा मेहुण चंदासाहेब यांच्यात संघर्ष निर्माण झाला.
या संघर्षपूर्ण राजकीय स्थितीचा लाभ घेत मुझफ्फरजंगने दक्षिणेचा सुभेदार आणि चंदासाहेंबास कर्नाटकचा सुभेदार बनविण्यासाठी त्यांना समर्थन देण्याचे डुप्लेंने ठरवले स्वाभाविकच इंग्रजांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अनुक्रमे नासिरजंग व अन्वरुद्दीन यांचा पक्ष उचलून धरला.
एकुण डुप्लेला खूप यश मिळाले. मुझफ्फरजंग चंदासाहेब व फ्रेंच सैन्याचे ऑगस्ट 1949 मध्ये अंबूर येथे अन्वरुद्दीनचा पराभव करुन त्यास ठार मारले. तसेच डिसेंबर 1750 मध्ये झालेलया एका संघर्षात नासिरजंगसुध्दा मारला गेला. मुझफ्फरजंग दक्षिणेचा सुभेदार बनला व आपल्या समर्थकांना त्याने फार मोठी बक्षिसे दिली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील मोगल प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून डुप्लेंची नियुक्ती करण्यात आली. 
चंदासाहेब कर्नाटकचा नबाब बनला. 1751 डुप्ले या वेळी आपल्या यशाच्या व राजकीय शक्तीच्या शिखरावर होता.
परंतु लवकरच फ्रेंचांसमोर नविन आव्हान उभे राहिले, अन्वरूद्दीनचा मुलगा मुहम्मद अलीने त्रिचनापल्लीला आश्रय घेतला होता.
त्यामुळे चंदासाहेब व फ्रेंच सैन्याने त्रिचनापल्लीच्या किल्ल्यास वेढा घातला त्याला शह देण्यासाठी इंग्रजांचा प्रतिनिधी रॉर्बट क्लाईव्ह याने फक्त 210 सैनिकांसह कर्नाटकची राजधानी असलेले अकराट जिंकून घेतले.
राजधानी अकराट जिंकून घेण्यासाठी चंदासाहेबाने 4000 सैनिक पाठविले, परतु क्लाईव्हने अकराटचे योग्य पध्दतीने संरक्षण केले. त्यामुळे फ्रेंचांना अकराट जिंकता आले नाही. हा फ्रेंचांच्या प्रतिष्ठेला जोरदार धक्का बसला.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

जून 1752 मध्ये त्रिचनापल्लीला वेढा घातलेल्या फ्रेंच इंग्रजांसमोर शरणागती पत्करली. याच सुमारास चंदासाहेब तंजावरच्या राजाकडून मारला गेला. त्रिपनापल्लीला झालेल्या फ्रेंचांच्या पराभवामुळे डुप्लेचे महत्व कमी झाले.
1754 मध्ये गॉडेव्हयूला डुूप्लेंचा उत्तराधिकारी नियुक्त करून भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आली फ्रेंचांनी इंग्रजांशी पाँडेचरीचा तह करुन हे युध्द समाप्त केले.
जमिनीवर लढल्या गेलेल्या युध्दांत इंग्रजांचे वर्चस्व राहिले. इंग्रजांनी मुहम्मदअली यास कर्नाटकाच्या नबाब पदी बसवले असे असले तरी हैद्राबाद राज्यात अजूनही फ्रेंचंाची परिस्थिती चांगली होती.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मुझफ्फरजंग एका लहानशा संघर्षात मारला गेल्यावर हैद्राबादच्या गादीवर बसलेल्या सलाबतजंगाकडून फ्रेंचांनी बराच प्रदेश जहागीरी म्हणून पदरात पाडून घेतला.
30 लक्ष रु वार्षिक उत्पन्नाचा भू भाग फ्रेंच कंपनीला देण्यात आला. थोडक्यात दुसर्‍या कर्नाटक फ्रेंचांची पिछेहाट झाली तर इंग्रजांची परिस्थिती अधिक दृढ झाली.

_____________

भारतात युरोपिअन वसाहतीची सुरुवात पहिले कर्नाटक युध्द (1746-1748)

Mpsc History
भारतात युरोपिअन वसाहतीची सुरुवात :

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

युरोपियन कंपन्यांची सत्तास्पर्धा :-

ब्रिटिश ईस्ट कंपनीतर्फे भारतात आलेल्या व्यापार्‍यांचा उद्देश व्यापार करणे आणि त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवणे हा होता.
पण भारतातही होणार्‍या व्यापारात इंग्रजांना पोर्तृगीज, डच, फ्रेंच, अशा विविध युरोपियन व्यापार्‍यांशी स्पर्धा करावी लागली.
त्या वेळी भारतात कार्यरत असणार्‍या डच ईस्ट इडिया कंपनीकडून व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीकडून जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यामुळे ब्रिटिश कंपनीच्या व्यापारावर व नफ्यावर मर्यादा आली.
त्याला पर्याय व सर्वोत्तम मार्ग म्हणजे भारतीय व्यापार क्षेत्रातून या स्पर्धेत कंपन्यांना समाप्त करणे होय.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतात व्यापार करण्याच्या निमित्ताने आलेल्या पोर्तुगीजांनी व्यापाराबरोबर राज्यविस्ताराचे व धर्मप्रसाराचे धोरण स्वीकारले म्हणून त्यांच्या सत्तेचा विस्तार भारतात फारसा होऊ शकला नाही.
याच सुमारास युरोपात इंग्लडने हॉलंडचा पराभव केल्यामुळे भारतातील डच, व्यापारी निष्प्रभ झाले. प्लासीच्या युध्दांत इंग्रजांना विजय मिळाला.
सिराजउद्दिला याच्या जागी इंग्रजांच्या मदतीने मीर जाफर हा बंगालचा नबाब झाला.
दिवसेदिवस इंग्रजांचे वर्चस्व वाढत गेल्यामुळे तो भयभीत होऊ लागला होता, या वेळी बंगालमध्ये इंग्रजांप्रमाणेच डच लोकही व्यापार करीत होते.

इंग्रजांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्या व्यापाराला धक्का बसल्याने ते इंग्रजांचा द्वेष करीत होते. मीर जाफरने त्यांना इंग्रजांविरुध्द भकडावले.
त्याचा परिणाम असा झाली की इ.स. 1759 मध्ये डचांनी इंग्रजांमध्ये निकराचा संघर्ष होऊन त्यात इंग्लंडला विजय मिळाला.
डच व इंग्रज यांच्यात तह होऊन डचांनी इंग्रजांवर चढाई न करण्याचे सैन्य न पाठवण्याचे व वखारींची तटबंदी न करण्याची हमी दिली.
यांनतर बंगालमध्ये डचांनी पुन्हा डोके वर काढण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. इंग्रजांना आता भारतातील फ्रेंच हेच प्रभावी विरोध करणारे प्रतिस्पर्धी होते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

भारतातील इंग्रज -फ्रेंच संघर्ष :-

व्यापार करता-करता इंग्रज व फ्रेंच कंपन्या भारतीय राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होत्या, या दोन्ही कंपन्यांचा मुख्य उद्देश व्यापारातून जास्तीत जास्त फायदा करुन घेणे हा होता.
भारतातील व्यापारातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी इंग्लंड व फ्रान्स यांच्यात जणू स्पर्धाच लागली होती. पण त्यातूनच त्यांच्यात भारतात सज्ञ्ल्त्;ाा मिळविण्यासाठी जो प्रयत्न करण्यात आला त्यातून त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला.
17 व्या आणि 18 व्या शतकात इंग्लड व फ्रान्स परस्परांचे कट्टर शत्रू होते, त्यामुळें त्यांच्यात युध्द सुरु झाले की जगाच्या कोणत्याही भागात त्यांच्या कंपन्या एकत्र कार्यरत असल्या म्हणजे त्यांच्यातही युध्द सुरु असे.

ऑस्ट्रियाच्या वारसा युध्दापासून भारतात इंग्रज फ्रेच संघर्ष सुरु झाला. फ्रेंचचे भारतातील मुख्य केंद्र पॉडेचरी असून मछलीपट्टम, कारिकल, माहेृ सुरत व चंद्रनगर ही उपकेंद्रे होती.
इंग्रजांनी आपले वर्चस्व मद्रास, मुंबई, व कलकत्ता या विभागावर आणि आजूबाजूच्या परिसरात प्रस्थापित केले होते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

पहिले कर्नाटक युध्द (1746-1748) :-

युरोपात ऑस्ट्रियाच्या वारसा युध्दाचा प्रारंभ झाल्यांवर त्याचाच झालेला विस्तार म्हणजे कर्नाटकाचे पाहिले युध्द होय.
आपल्या मूळ देशांच्या आदेशाविरुध्द भारतातील इंग्रज व फ्रेंचांनी 1746 मध्ये संघर्ष सुरु केला. बारनेटच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमाराने फ्रेंचांची काही जहाजे पकडली त्यामुळे पॉंडेचरीचा फ्रेंच गव्हर्नर डुप्ले याने मॉरिशसचा फ्रेंच गव्हर्नर ला बोर्डोकडे मदत मागितली.
डुप्लेच्या मदतीला 3000 सैन्यासह ला बोर्डो मद्रासजवळ असलेल्या कोरोमंडळ तटाकडे निघाला. मार्गात त्याने इंग्रजाच्या आरमाराचा पराभव केला.
फ्रेंचांनी जल व स्थल अश दोन ठिकाणी मद्रासला घेरले. या युध्दात मद्रासच्या इंग्रजांचा 21 सष्टेंबर 1746 रोजी पराभव कला फ्रेंचांनी मद्रास जिंकून घेतले.

या प्रसंगी जे इंग्रजयुध्दकैदी पकडण्यात आले त्यात रॉर्बट क्लाईव्हही होता.
मद्रासच्या इंग्रजांपासून खंडणी घ्यावी असे ला बोर्डेनिचे मत होते. पण डुप्लेला ते मान्य नव्हते.
शेवटी एका मोठया रकमेच्या मोबदल्यात ला बोडॅनि मद्रास पुन्हा जिंकून घेतले. पण पाँडेचरीपासून फक्त 18 मैल दक्षिणेला असलेला सेंट डेविडचा किल्ला त्यास जिंकता आला नाही.
अर्थात इंग्रजांनी पाॅंडेचरी जिंकून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न असफल ठरला.
कर्नाटकच्या पहिल्या युध्दातील सेंट टोमेची लढाई महत्वाची समजली जाते. ही लढाई कर्नाटकचा नबाब अन्वरुद्दीन याच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्य आणि फ्रेंच सैन्य यांच्यात झाली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मद्रास फ्रेंचांनी घेतल्यापासून हा संघर्ष सुरु झाला आपल्या प्रदेशात दोन्ही परकिय कंपन्या लढत असलेल्या पाहून हा संघर्ष बंद करण्याची व प्रदेशांची शांतता भंग न करण्याची आज्ञा नवाबाने दिली.
त्यावर डुप्लेने आपले आश्र्वासन न पाळल्याने आपली मागणी पूर्ण करण्यासाठी नबाबने सैन्य पाठविले.
या तुकडीचे नेतृत्व कॅ पॅराडइज याच्याकडे होते. आणि महफूजखानच्या नेतृत्वाखालील 10,000 भारतीय सैनिकांना अडयार नदीजवळ सेंट टोमे येथे पराभूत केले.
या विजयामुळे असंघटिक व अप्रशिक्षित भारतीय सैन्याच्या तुलनेत प्रशिक्षित परकिय सैन्याचे श्रेष्ठत्व दिसून आले.

परंतु एक्स-ला शापेलच्या युरोपातील युध्द बंद होताच 1748 पहिल्या कर्नाटक युध्दाचीही समाप्ती झाली. मद्रास इंग्रजांना पुन्हा परत मिळाले.
या युध्दात फ्रेंचांचे श्रेष्ठत्व दिसून आले. डुप्लेची कूटनीती प्रदर्शित झाली. इंग्रजांना पॉंडेचरी जिंकून घेता आले नसले तरी त्यांना आरमाराचे महत्व लक्षात आले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

संस्था आणि संस्थापक

Mpsc History
संस्था आणि संस्थापक :

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

◆ १८२८:- राजाराम मोहन राय – ब्राह्मो समाज

◆ १८६५:- देवेंद्र नाथ टागोर – आदी ब्राह्मो समाज

◆ १८६५ :- केशवचंद्र सेन -भारतीय ब्राह्मो समाज

◆ १८६७ :- आत्माराम पांडुरंग तर्खडकर – पार्थना समाज

◆ १८७२ :- आनंद मोहन बोस – सार्वजनिक समाज

◆ १८७३ :- महात्मा फुले – सत्यशोधक समाज

◆ १८७५ :- स्वामी दयानंद सरस्वती – आर्य समाज

◆ १८८० :- केशव चंद्र सेन – नावविधान समाज

◆ १८८९ :- पंडिता रमाबाई – आर्य महिला समाज

◆ १९०५ :- गोपाळ कृष्ण गोखले – भारत सेवक समाज

◆ १९११ :- शाहू महाराज – सत्यशोधक समाज कोल्हापूर

◆ १९१८ :- शाहू महाराज – आर्य समाज शाखा कोल्हापूर

◆ १९२३ :- विठ्ठल रामजी शिंदे – तरुण ब्राह्मो समाज

◆ १९५५ :- पंजाबराव देशमुख – भारत कृषक समाज.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सोसायटी

● १७८४ :- विलियम जोन्स – बंगाल अशियाटिक सोसायटी

● १७८९ :- विलियम जोन्स – असियटीक सोसायटी

● १८२२ :- जगनाथ शंकर सेठ – बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी

● १८३८ :- जगन्नाथ शंकर सेठ – ग्रँट मेडिकल कॉलेज

● १८५२ :- भाऊ दाजी लाड – ग्रँट मेडिकल सोसायटी

● १८६२ :- सर सय्यद अहमद खान – सायंन्तफिक सोसायटी

● १८६३ :- नवाब अब्दुल लतीफ – मोहमदम लिटररी

● १८६४ :- सर सय्यद अहमद खान – ट्र्न्स्लशन सोसायटी

● १८६५ :- दादाभाई नवरोजी – लंडन इडीयन सोसायटी

● १८७५ :- मँडम ब्लावाट्सक्यी कर्नल अल्कोटा – थेओसोफिकल सोसायटी

● १९०१ :- शाहू महाराज – मराठा एजुकेशन सोसायटी

● १९०५ :- श्यामजी क्रष्णा व्रमा -इंडियन होमरुल सोसायटी

● १९०६ :- शाहू महाराज – किंग एड्वर्ड मोहमदन एजुकेशन सोसायटी

● १९४५ :- बाबासाहेब आंबेडकर – पीपल्स एजुकेशन सोसायटी.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

वि.दा. सावरकर विषयी माहिती :

Mpsc History
वि.दा. सावरकर .

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

वि.दा. सावरकर यांचा जन्म 1883 मध्ये भगूर (जि. नाशिक) येथे झाला.
प्रभाव – इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी
विचार – ब्रिटिशविरोधासाठी शस्त्राशिवाय पर्याय नाही.
1900 रोजी पुण्यात ‘मित्रमेळा संघटना’ स्थापना केली.
1904 रोजी मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ संघटनेत.
‘शिवाजी स्कॉलरशिप’ मिळवून 1906 ला इंग्लंडला शिक्षणासाठी गेले.
वि.दा. सावरकरांच्या अनूपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधु गणेश सावरकरांनी चालवले.
सावरकरांनी अभिनव भारततर्फे पांडुरंग महादेव बापटला (सेनापती बापट) बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

सावरकरांनी अभिनव भारततर्फे पांडुरंग महादेव बापटला (सेनापती बापट) बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले.
1908 – सावरकरांच्या घरावर धाड गणेश सावरकरांवर जॅक्सनने खटला चालवला. त्यास ‘नाशिक खटला’ असे म्हणतात.
अनंत कान्हेरेने 1909 मध्ये न्या. जॅक्सनची हत्या केली.
न्या. जॅक्सनच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून सावरकरांना 1911 मध्ये 50 वर्षांच्या काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा दिली गेली.
1924 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे व राजकरणात सहभागी न होणे या अटीवर सावरकराची मुक्तता करण्यात आली.
वि.दा. सावरकरांनी ‘भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने’, हिंदू पदपादशाही, ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुत्व’ ‘1857 चे भारतीय स्वातंत्र्य युद्ध’ इत्यादीचे लिखान केले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

यशाचा राजमार्ग प्रश्न संच

प्र. अलीकडेच भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर :- पद्मविभूषण

प्र. अलीकडेच 19 व्या आशियाई 100 यूपी बिलियर्ड्स चॅम्पियनशिप 2022 मध्ये आठवे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर :- पंकज अडवाणी

प्र. धर्मजीवन गाथा पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे?
उत्तर :- नरेंद्र मोदी

प्र. स्पोर्टस्टार एसेस अवॉर्ड्स 2022 मध्ये नुकताच प्रतिष्ठित 'स्पोर्टस्टार ऑफ द इयर (मेन)' पुरस्कार कोणी जिंकला आहे?
उत्तर :- नीरज चोप्रा

प्र. स्पोर्टस्टार एसेस अवॉर्ड्स 2022 मध्ये नुकताच प्रतिष्ठित 'स्पोर्टस्टार ऑफ द इयर (महिला)' पुरस्कार कोणी जिंकला आहे?
उत्तर :- मीराबाई चानू

प्र. अलीकडे कोणत्या राज्याची विधानसभा देशातील पहिली पेपरलेस विधानसभा बनली आहे?
उत्तर :- नागालँड विधानसभा

प्र. नुकताच जागतिक जल दिन 2022 कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- २२ मार्च

प्र. अलीकडेच कोणत्या देशात NATO ने "कोल्ड रिस्पॉन्स 2022" हा मोठ्या प्रमाणावर लष्करी सराव आयोजित केला आहे?
उत्तर :- नॉर्वे

---------------------------------

प्र. अलीकडेच प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2022 जिंकणारा पहिला आफ्रिकन कोण बनला आहे?
उत्तर :- फ्रान्सिस कॅरी

प्र. अलीकडे बहरीन इंटरनॅशनल सर्किटमध्ये फॉर्म्युला वन बहरीन ग्रां प्री 2022 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर :- चार्ल्स लेक्लेर्क

प्र. अलीकडेच भारताचे संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी भारतीय तटरक्षक दलाचे कोणते जहाज कार्यान्वित केले आहे?
उत्तर :- ICGS सक्षम

प्र. अलीकडे इंडियन सुपर लीग 2022 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर :- हैदराबाद एफसी

प्र. अलीकडे कोणत्या राज्यात 'डोल उत्सव' किंवा 'डोल जत्रा' साजरी केली जाते?
उत्तर :- पश्चिम बंगाल

प्र. कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान सौमेलो बौबे मैगा यांचे नुकतेच निधन झाले आहे?
उत्तर :- माली

प्र. नुकताच जागतिक हवामान दिन 2022 कधी साजरा करण्यात आला?
उत्तर :- २३ मार्च

प्र. अलीकडेच पुष्कर सिंग धामी यांनी कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली?
उत्तर :- उत्तराखंड

---------------------------------------

मानवी शरीर प्राथमिक माहिती


1 मानवी डोके वजन: - 1400 ग्रॅम असते.


2 सामान्य रक्तदाब: - 120/80 मि. मी.


3 शरीरातील सर्वात मोठे स्नायू: - न्यूरॉन


4 रक्तामध्ये एकूण रक्त: - 5 ते 6 लिटर


5 सर्वात लहान हाड: - स्थिती (कान हाड)


6 सर्वात मोठी हाड: -फिमर / थाई बोन


7 लाल रक्तपेशींचे आयुष्यः - 120 दिवस.


8 पांढरे रक्त पेशी: 5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी


9. पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्यः - 2 ते 5 दिवस.


10 रक्तातील प्लेटलेटचे माउंटः -2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर


11. सामान्य हृदयगती: - 72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट


12. पल्स दर (नाडीचा दर): - 72 प्रति मिनिट.


13 सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: - थायरॉईड ग्रंथी.


14 सर्वात मोठे स्नायू - ग्लुटियस मायक्मीस


15 एकूण सेल प्रकारांची संख्या - 63 9


16 प्रौढांमध्ये दातांची संख्या - 32


17 मुलांमध्ये दातांची संख्या - 20 दात ते दुध.


18. सर्वात पातळ त्वचा - पापणी

परीक्षेची संधी थोडक्यात हुकली आहे. आशा लोकांसाठी एक छोटीशी गोष्ट शेअर करत आहे.


----------------------------------------------

टीचरने शिट्टी वाजवली तशी चिमुकल्या पावलांचा ५० मुलामुलींचा गट शाळेच्या मैदानावर धावू लागला. 

एकच लक्ष. 

पलिकडच्या टोकाला टच करुन लवकर परत यायचं. 


पहिल्या तिघांना बक्षिस. 

पहिल्या तीनसाठी सगळ्यांची चढाओढ.


 बघायला सगळ्यांचे आईबाबा म्हणुन उत्साह जरा  जास्तच होता. 


पावले परत फिरली. 

गर्दीतुन बघ्यांचे "पळ पळ" म्हणून  आवाज वाढू लागले. 

पहिल्या तिघांनी हात वर करत आनंदाने पालकांकडे पाहिलं.


 चौथे, पाचवे काठावर बक्षिस हुकले म्हणुन नाराज झालेले. काही पालकही नाराज झालेले.


आणि नंतरचे आता बक्षिस मिळणार नाही, आता कशाला पळा म्हणत चालू लागले.

त्यांच्यासोबत दमलेले, मनापासुन शर्यतीत नसणारे सगळेच. 


५ व्या आलेल्या मुलीने नाराजीनेच बाबाकडे धाव घेतली.


 बाबानेच आनंदाने पळत पुढे जाऊन तिला उचलून घेतले आणि म्हणाला, 

" वेल डन बच्चा. चल कुठले आइस्क्रिम खाणार?". 


" पण बाबा माझा नंबर कुठे आलाय ?" मुलीनं आश्चर्याने विचारलं.


" आलाय की. पहिला नंबर आलाय तुझा बेटा. "


" कसा काय बाबा. ५ वा आला ना ?"  मुलगी गोंधळलेली.


"अगं, तुझ्या मागे कितीजण होते ?"


थोडीशी आकडेमोड करत ती म्हणाली ,

" ४५ जण"


" म्हणजे उरलेल्या ४५ जणात तू पहिली आलीस. म्हणून तुला आइस्क्रिम."


" आणि पुढचे चार जण ?"

 गोंधळ वाढला तिचा.


" त्यांच्याशी आपली शर्यत नव्हतीच यावेळी".


"का ?".


" कारण त्यांनी जास्त तयारी केलेली. आता आपण

परत चांगली तयारी करायची. मग पुढल्यावेळी तु

४८ जणात पहिली येणार. त्यानंतर ५० जणात."


"असं असतंय बाबा ?".


" होय बेटा असंच असतंय ".


"मग पुढल्यावेळी शेवटी एकदम मोठी उडी मारुन पहिली येते की ?".  आता मुलीला उत्साह आलेला.


" एवढी घाई कशाला बेटा ? पाय मजबूत होऊ देत की. आणि आपण आपल्यापुढे जायचं. दुस-यांच्या नाही".


तिला फार काही समजलं नाही पण विश्वासानं म्हणाली, " तुम्ही म्हणाल तसं ".


"आता आइस्क्रिम सांगा की हो ". - बाबा.


मग मात्र नवीन आनंद गवसावा तशी, मुलगी ४५ जणात पहिली आल्याच्या आनंदात बाबाच्या खांद्यावर हसत मान ठेऊन जोरात ओरडली,

" मला बटरस्कॉच आइस्क्रिम पाहिजे".


मित्रहो या गोष्टीतून आपणास शिकण्यासारखं बरंच काही आहे. तुम्ही थोडक्यात हुकला याचा अर्थ असा नाही की तुमचा अभ्यास कमी होता, फक्त त्या लोकांचा अभ्यास आपल्यापेक्षा थोडा जास्त होता, जो आपणासही करण्यासाठी येत्या काळात भरपूर वेळ आपल्याकडे आहे. 


एक गोष्ट बऱ्याच अधिकाऱ्यांकडून तुम्ही ऐकली असेल, "जोपर्यंत तुम्ही त्या पदाच्या लायक बनत नाही, तोवर पोस्ट मिळणार नाही" त्यामुळे दुःख/अपयश थोडं बाजूला ठेऊन पुन्हा जोमाने अभ्यासाला लागणे फार गरजेचे आहे. स्वतःमध्ये त्या क्षमता आणणे फार गरजेचे आहे. आत्मपरीक्षण करून कुठे चूक झाली पाहणे, आणि त्या चुका पुन्हा होणार नाहीत याची खबरदारी घेणेही तितकेच आवश्यक आहे.


आगामी काळात आपणास अभ्यासासाठी भरपूर वेळ उपलब्ध आहे, तेंव्हा पुन्हा एकदा अगदी अगदी सुरवातीपासून सगळं व्यवस्थित जुळवून आणण्याची संधी आपल्याकडे आहे.


अभ्यासासाठी शुभेच्छा...!

महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न



1. भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे ?


⭕️ Ans- ऑपरेशन गंगा


2. मॉस्को वुशू स्टार चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीयाने सुवर्णपदक जिंकले आहे?


⭕️ Ans- सादिया तारिक


3. नुकतेच बोल्टजमान पदक मिळालेले पहिले भारतीय कोण बनले आहे?

⭕️ Ans- दीपक धर


4. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय IP निर्देशांक 2022 मध्ये भारत कोणत्या स्थानी आहे?

⭕️ Ans- ४३ वा


5. नुकतीच भारतीय मंदिर वास्तुकलाची आंतरराष्ट्रीय परिषद देवायतनम कुठे आयोजित केले जाते?

⭕️ Ans- कर्नाटक


6. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

⭕️ Ans- अभिषेक सिंग


7. वनस्पती आधारित C-19 लसीचा प्रमाणित वापर करणारा पहिला देश कोणता आहे?

⭕️ Ans - • कॅनडा


8. नुकतेच म्यूजियम ऑफ द फ्यूचर कोठे उघडले आहे?

⭕️Ans दुबई


 9. भारत जपान 3रा संयुक्त सराव EX धर्म गार्जियन 2022 कुठे होणार आहे ?

⭕️ Ans- बेलगाम


10. वंदे भारतमसाठी सिग्नेचर ट्यून कोण रिलीज केली आहे?

⭕️ Ans मीनाक्षी लेखी


📕पर. अलीकडेच अंतर्गत प्रकरणांच्या तपासासाठी सीबीआयकडून संमती काढून घेणारे देशातील 9 वे राज्य कोण बनले आहे?

उत्तर :- मेघालय


📕पर. अलीकडेच सहा क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे?

उत्तर :- मिताली राज


📕पर. HANSA-NG ने भारतातील सर्वात प्रगत फ्लाइंग ट्रेनरच्या चाचण्या कोठे पूर्ण केल्या?

उत्तर :- पुडुचेरी


📕पर. CISF ने आपला 53 वा स्थापना दिवस कधी साजरा केला?

उत्तर :- ०६ मार्च


📕पर. अलीकडे कोणत्या अंतराळ संस्थेने युरोपा क्लिपर अंतराळयान विकसित करण्यास सुरुवात केली आहे?

उत्तर :- नासा


📕पर. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची अलीकडेच चाचणी कोणी केली?

उत्तर :- INS चेन्नई


📕पर. भारतातील पहिले स्मार्ट मॅनेज्ड ईव्ही चार्जिंग स्टेशन कोठे सुरू झाले आहे?

उत्तर :- नवी दिल्ली


📕पर. अलीकडेच, भारत आणि कोणत्या देशाच्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला?

उत्तर :- नेदरलँड

महाराष्ट्रातील पंचायतराज



👉 आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.


◆ कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

  - स्थानिक स्वराज्य संस्था


◆ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?

  -  2 ऑक्टोबर 1953


◆ बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?

  - 16 जानेवारी 1957


◆ बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?

  - वसंतराव नाईक समिती


◆ वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?

  - 27 जून 1960


◆  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?

  - महसूल मंत्री


◆ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?

  - 226


◆ वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?

  - जिल्हा परिषद


◆ पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?

  - तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)


◆ महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?

   - 1  मे 1962


◆ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?

  -  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966


◆ महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?

  -  7 ते 17


◆ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?

  - जिल्हाधिकारी


◆ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?

  - जिल्हाधिकारी


◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?

  - 5 वर्षे


◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?

  - पहिल्या सभेपासून


◆ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?

  - तहसीलदार


◆ सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?

  - विभागीय आयुक्त


◆ उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - सरपंच


◆ सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - पंचायत समिती सभापती


◆ पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

  - दोन तृतीयांश (2/3)


◆ महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

  - तीन चतुर्थांश (3/4)


◆ पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - पंचायत समिती सभापती


◆ पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - जिल्हा परिषद अध्यक्ष


◆ जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - संबंधित विषय समिती सभापती


◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - जिल्हा परिषद अध्यक्ष


◆ जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - विभागीय आयुक्त


◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?

  -  ग्रामसेवक


◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?

   - जिल्हा परिषदेचा


◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?

  - जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून


◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?

  - ग्रामसेवक


◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?

   -  शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)


◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

  -  राज्यशासनाला


◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?

   -  विस्तार अधिकारी


◆ गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?

  - ग्रामविकास खाते


  ◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

  - जिल्ह्याचे पालकमंत्री


◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

  -  जिल्हाधिकारी


◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?

  -  दहा (स्थायी+9 विषय समित्या)


◆ जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?

  - स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा


◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?

  -  जिल्हा परिषद अध्यक्ष


◆  महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?

  -  वसंतराव नाईक


74 वी घटनादुरूस्ती



कलम - 243 P - व्याख्या. 


कलम - 243 Q - नगरपालिकांचे घटक व स्तर. 


कलम - 243 R - नगरपालिकांची रचना. 


कलम - 243 S -  वार्ड समित्यांची रचना आणि मांडणी. 


कलम - 243 T -  अनुसूचीत जात जमाती साठी राखीव जागा.  


कलम - 243 U - नगरपालिकांचा कालावधी. 


कलम - 243 V - सदस्यांची अपात्रता. 


कलम - 243 W - नगरपालिकाचा हक्क  व जबाबदर्‍या. 


कलम - 243 X - कर बसवण्याचे आधिकार व वित्तव्यवस्था. 


कलम - 243 Y - वित्त आयोगाचा आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रस्थापना .  


कलम - 243 Z - नगरपालिकेच्या हिशेबांचे लेखापरीक्षण.  


कलम - 243 ZA - नगरपालिकांच्या निवडणुका  


 कलम - 243 ZB - केंद्रशासित प्रदेशांना नगरपालिका कायदा . 


 कलम - 243 ZC - विशिष्ट प्रदेशांना नगरपालिका कायदा लागू न करणे. 


 कलम - 243 ZD - जिल्हा नियोजनासाठी समिति. 


 कलम - 243 ZE  -  मेट्रोपोलीटन विकासासाठी समिति. 


 कलम - 243 ZF - नगरपालिका सबंधित विद्यमान कायदा व तरतुदी चालू  ठेवण्यासाठी. 


 कलम - 243 ZG - नगरपालिका निवडणूकात कोर्टाच्या हस्तक्षेपास मनाई.

1 मे 1960 नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे



★ नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती 


◆ सिंधुदुर्ग : रत्नागिरी : 1 मे 1981

◆ जालना : औरंगाबाद : 1 मे 1981

◆ लातूर : उस्मानाबाद : 16 ऑगस्ट 1982

◆ गडचिरोली : चंद्रपुर : 26 ऑगस्ट 1982

◆ मुंबई उपनगर : मुंबई शहर : 1990

◆ वाशीम : अकोला : 1 जुलै 1998 

◆ नंदुरबार : धुळे : 1 जुलै 1998

◆ हिंगोली : परभणी : 1 मे 1999

◆  गोंदिया : भंडारा : 1 मे 1999

◆ पालघर : ठाणे : 1 ऑगस्ट 2014


नकाराधिकार (Veto Power)



आधुनिक राष्ट्रांमध्ये राष्ट्राध्यक्षांना प्राप्त असलेल्या नकाराधिकार यांचे चार प्रकार पडतात...

1) पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार

2) गुणात्मक नकाराधिकार

3) निलंबनात्मक नकाराधिकार

4) पॉकेट नकराधिकर


1) पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार-

याचा अर्थ संसदेने संमत केलेल्या विधेयकाला संमती पूर्णपणे रोखून धरणे असा होतो.


2) गुणात्मक नकाराधिकार-

याचा अर्थ राष्ट्राध्यक्षांनी संसदेकडे पुनर विचारार्थ पाठवलेल्या विधेयकास संसदेने पूर्वीपेक्षा अधिक बहुमताने पारित केल्यास राष्ट्राध्यक्षांना त्यासंबंधी द्यावीच लागेल.


3) निलंबनात्मक नकाराधिकार-

याचा अर्थ राष्ट्राध्यक्षांनी संसदेकडे पुनर्विचार पाठवलेल्या विधेयकास संशोधने पुन्हा साध्या बहुमताने पारित केले तरी राष्ट्राध्यक्षांना त्यास संमती द्यावी लागेल.


4) पॉकेट नकाराधिकार-

याचा अर्थ संसदेने पारित केलेल्या विधेयकावर कोणताही निर्णय न घेता ते तसेच पडून देणे.


👉🏻 वरील चार प्रकारांपैकी भारतीय राष्ट्रपतींना गुणात्मक नकाराधिकार उपलब्ध नाही.

(अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांना मात्र प्राप्त आहे)

भारतातील राज्ये आणि स्थापना दिवस


📌 मध्यप्रदेश - १ नोव्हेंबर १९५६


📌 अरुणाचल प्रदेश - २० फेब्रुवारी १९८७


📌 आसाम - २ डिसेंबर १९२८


📌 बिहार - २२ मार्च १९१२


📌 दिल्ली - १ नोव्हेंबर १९५६ 


📌 छत्तीसगढ - १ नोव्हेंबर २०००


📌 गोवा - ३० मे १९८७


📌 गजरात - १ मे १९६०


📌 हरियाणा - १ नोव्हेंबर १९६६


📌 हिमाचल प्रदेश - १५ एप्रिल १९४८


📌 झारखंड - १५ नोव्हेंबर २०००


📌 कर्नाटक - १ नोव्हेंबर १९५६


📌 करळ - १ नोव्हेंबर १९५६


📌 महाराष्ट्र - १ मे १९६०


📌 मणिपूर - २१ जानेवारी १९७२


📌 मघालय - २१ जानेवारी १९७२ 


📌 मिझोरम - २० फेब्रुवारी १९८७


📌 नागालँड - १ डिसेंबर १९६३


📌 ओडिशा - १ एप्रिल १९३६


📌 पजाब - १ नोव्हेंबर १९६६


📌 राजस्थान - ३० मार्च १९४९


📌 सिक्कीम - १६ मे १९७५ 


📌 तमिळनाडू - १ नोव्हेंबर १९५६


📌 तलंगणा - २ जून २०१४ 


📌 तरिपुरा - २१ जानेवारी १९७२


📌 उत्तर प्रदेश - २४ जानेवारी १९५०


📌 उत्तराखंड - ९ नोव्हेंबर २०००


📌 पश्चिम बंगाल - २० जून १९४७


📌 पदुच्चेरी - १ नोव्हेंबर १९५४ 


📌 अदमान-निकोबार - १ नोव्हेंबर १९५६ 


📌 आध्र प्रदेश - १ नोव्हेंबर १९५६


भारताची स्वर कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जीवन चरित्रावर एक नजर


*_🎙️भारतरत्न लता मंगेशकर स्वर कोकिळा भारताच्याच नाही तर अखिल विश्वातील सर्वात सुप्रसिध्द आणि अनमोल अश्या गायिका आहेत. त्यांच्या आवाजाची किमया केवळ भारतियांवरच नव्हें तर विदेशातील नागरिकांवर देखील आजतागायत पसरलेली आपल्याला दिसते…_


▪️पर्ण नाव : लता दिनानाथ मंगेशकर

▪️जन्म :28 सप्टेंबर 1939 इन्दौर

▪️वडिलांचे नाव :पंडित दिनानाथ मंगेशकर

▪️आईचे नाव :वंती मंगेशकर

▪️बहिणी :आशा भोंसले, उशा मंगेशकर, मीना मंगेशकर

▪️भाऊ : हृदयनाथ मंगेशकर

▪️विवाह:अविवाहित

▪️राष्ट्रीयत्व :भारतिय

▪️वयवसाय :प्लेबॅक सिंगर, म्युझिक कंपोजर


📸`किती हसाल' या १९४२ सालच्या चित्रपटातले `नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी' हे सदाशिव नेवरेकरांनी संगीतबद्ध केलेले मराठी गीत गाऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

वसंत जोगळेकरांच्याच १९४६ सालच्या `आप की सेवा में' या हिंदी चित्रपटात संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या `पा लागू कर जोरी' हे पहिले गीत दीदींनी गायले.


 📸`मधुमती' या चित्रपटासाठी स्वरबद्ध केलेल्या *`आजा रे परदेसी'* या गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअर पारितोषिक मिळाले. 


🎙️लताजींना गायनासाठी 1958, 1960, 1965, आणि 1969 ला फिल्म फेयर अवाॅर्ड प्राप्त झाले आहेत. *‘गिनीज बुक आॅफ वल्र्ड रेकाॅर्डस्’* तर्फे देखील त्यांचा विशेश सन्मान करण्यात आला आहे.


▪️मध्यप्रदेश सरकार तर्फे त्यांच्या नावे प्रत्येक वर्षी 1 लाखाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. 1989 ला लतादिदींना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.


👉तयांना मिळालेले विशेष,प्रमुख बहुमान


🎖️फिल्मफेअर पुरस्कार

(1958, 1962, 1965, 1969, 1993 आणि 1994)


🎖️राष्ट्रीय पुरस्कार

 (1972, 1975 आणि 1990)


🎖️महाराष्ट्र शासन पुरस्कार

(1966 आणि 1967)

१९६९ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


🎖️1989 मध्ये त्यांना चित्रपट जगतातील सर्वोच्च सन्मान ‘दादा साहेब फाळके पुरस्कार’ देण्यात आला.


🎖️1993 मध्ये त्यांना फिल्मफेअरचा ‘लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’ देण्यात आला.


🎖️1996 मध्ये त्यांना स्क्रीनच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


🎖️1997 मध्ये त्यांना ‘राजीव गांधी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.


🎖️1999 मध्ये पद्मविभूषण N.T.R. आणि झी सिनेच्या ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ने सन्मानित.


🎖️2000 साली I.I.A. F. (IIFA) च्या ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ने सन्मानित.


🎖️2001 मध्ये त्यांना स्टारडस्टचा ‘जीवनगौरव पुरस्कार’, नूरजहाँ पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

2001 मध्ये, भारत सरकारने तुमच्या कामगिरीचा गौरव करताना तुम्हाला देशातील सर्वोच्च पुरस्कार *“भारतरत्न”* देऊन गौरविले.


🏆महाराष्ट्र शासनाने त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरव म्हणून त्यांच्या नावे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दिला जातो.



लता मंगेशकर सुरांची राणी, भारत देशातील खास रत्नापैकी एक आहे.  लता दीदी देश विदेशात सर्व ठिकाणी त्यांच्या सुरांमुळे  ज्ञात  आहेत.  लता दीदी यांचे नाव गिनीज बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील प्रविष्ट केले आहे,  लता दीदींनी जवळपास 30 हजार गाणे 20 भाषां मध्ये  1948-87 पर्यंत गायले आहे,  आता तोच आकडा  ४० हजार पर्यंत पोहचला आहे.


साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्य



● सदानंद मोरे : तुकारामदर्शन (1998)


● रंगनाथ पठारे : ताम्रपट (1999 )


● ना.धो.महानोर : पानझड (2000 )


● राजन गवस : तणकट (2001)


● त्र्यंबक विनायक सरदेशमुख : डांगोरा एका नगरीचा (2003)


● महेश एलकुंचवार : युगांत (2002)


● सदानंद देशमुख : बारोमास (2004)


● अरुण कोल्हटकर : भिजकी वही (2005)


● आशा बगे : भुमी (2006)


● वसंत आबाजी डहाके : चित्रलिपी (2009)


● सरोज देशपांडे : अशी काळवेळ (2010 )


● अशोक केळकर : रुजुवात  (2010)

Online Test Series

आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 – 18)

⚔ आप्पासाहेब भोसल्यांचा उठाव (1817 – 18)
▪️गौड जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने उठाव केला
▪️बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला.
▪️शीख राजा रनजीसिंहचे लढण्यासाठी मन वळविण्यासाठी प्रयत्न केला.
▪️शेवटी इंग्रजांकडून पराभव पत्कारला.

⚔ हटकरांचा उठाव – मराठवाड्यात
▪️नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात 1800 – 1820 या काळात.
▪️नेता – नौसोजी नाईक
▪️प्रमुख ठाणे – नोव्हा
▪️ब्रिटीशांनी उठाव मोडून काढला.  

⚔ खानदेशातील भिल्लाचा उठाव
▪️भिल्लाची खानदेशात लूटमार.याला यशवंतराव होळकरची फूस होती.
▪️नेते – काजरसिंग, भीमा नाईक, भागोजि नाईक, नेवश्य नाईक, कलुबाबा, दौलत नाईक, तंट्या भिल्ल
▪️भिल्लणा वठणीवर आणण्यासाठी लॉर्ड एलफिन्स्टनने प्रयत्न केले.

⚔ खानदेशातील भिल्लाचा उठावाचे उपाय:
▪️1825 मध्ये भिल्लाकरिता जमिनी देणे, वसाहती निर्माण करणे.
▪️भिल्लाणा पोलिस दलात नोकर्‍या दिल्या.  
▪️बंडखोर भिल्लाणा वठणीवर आणण्यासाठी इतर भिल्लाचा वापर केला.

⚔ काजरसिंग नाईकचा उठाव:
▪️1875 च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले.
▪️पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता.
▪️ब्रिटीशांचा 7 लाखाचा खजिना लुटला.

❣❣❣❣❣

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...