२१ एप्रिल २०२२

राज्यघटना निर्मिती


1)भारतीय राज्यघटनेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?
एन् एम् राॅय(1934)

2)कोणत्या रिपोर्ट मध्ये भारतीय राज्यघटनेचा आराखडा तयार करण्यात आला होता?
नेहरू रिपोर्ट

3)भारतामध्ये घटना समितीची (संविधान सभा) स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशी नुसार करण्यात आली?
कॅबिनेट मिशन(त्रिमंत्री योजना)

4)त्रिमंत्री योजनेत(कॅबिनेट मिशन) किती सदस्य होते?
1)स्ट्रफर्ड क्रिप्स 2)ए व्ही अलेक्झांडर 3)पॅथिक लाॅरेन्स

5)कॅबिनेट मिशन भारतात कधी आले?
24 मार्च 1946

6)त्रिमंत्री योजना कधी जाहीर करण्यात आली?
16 मे 1946

7)घटना समितीमध्ये सदस्यांची संख्या किती निश्चित करण्यात आली होती?
389

8)घटना समितीसाठी निवडणुका कधी घेण्यात आल्या?
जुलै -आॅगस्ट 1946

9)घटना समितीच्या 389पैकी किती जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या?
296

10)घटना समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला व किती मिळाल्या?
काँग्रेस 208

11)भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीची  सदस्य संख्या किती झाली?
299

12)घटना समितीमध्ये संस्थानिकांचे किती प्रतिनिधी होते?
70

13)घटना समितीवर सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांतातुन निवडुन आले होते?
संयुक्त प्रांत(55)

14)घटना समितीचा एक सदस्य किती लोकसंख्येमागे निवडला गेला?
10 लाख

15)घटना समितीमध्ये किती महिला होत्या?
15

16)घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे  भरले होते?
दिल्ली (कौन्सिल चेंबरच्या पुस्तकालयाच्या भवनात)

17)घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी भरले होते?
9ते23 डिसेंबर 1946

18)घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला किती सदस्य हजर होते?
211

19)घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते?
सच्चिदानंद सिन्हा

20)घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष कोण होते?
ए के अँथनी

21)घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची व कधी निवड करण्यात आली?
राजेंद्र प्रसाद (11 डिसेंबर 1946)

22)घटना समितीचे सल्लागार कोण होते?
बी एन राव

23)घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते?
हरेंद्र मुखर्जी

24)घटना समितीचे सचिव कोण होते?
व्हि आर अय्यंगार

25)भारतीय घटना समितीची एकुण किती अधिवेशन झाले.
11

श्रीमती इंदिरा गांधी

श्रीमती इंदिरा गांधी

January 24, 1966 - March 24, 1977 | Congress

श्रीमती इंदिरा गांधी

पंडित जवाहरलाल नेहरू यांची कन्या श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता. त्यांनी इकोले नौवेल्ले, बेक्स (स्विझरलैंड), इकोले इंटरनेशनेल, जिनेवा, पुणे व मुंबई स्थित प्युपल्स ओन स्कूल, बैडमिंटन स्कूल, ब्रिस्टल, विश्व भारती, शांति निकेतन आणि समरविले कॉलेज, ऑक्सफोर्ड सारख्या प्रमुख संस्थांमधून शिक्षण प्राप्त केले होते. त्यांना जगभरातील सर्वोच्च विद्यापीठांमधून डॉक्टरेटच्या उपाधीने गौरविण्यात आले होते. प्रभावी शैक्षणिक पार्श्वभूमी असल्याने त्यांना कोलंबिया विश्वविद्यालयाकडून विशेष योग्यता प्रमाणपत्र देण्यात आले होते. श्रीमती इंदिरा गांधी सुरुवातीपासूनच स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय होत्या. बालपणी त्यांनी ‘बाल चरखा संघ’ स्थापन केला आणि असहकार चळवळी दरम्यान कॉंग्रेस पक्षाच्या मदतीकरिता 1930 मध्ये लहान मुलांच्या साथीने ‘वानर सेना’ देखील उभी केली होती. सप्टेंबर 1942 साली त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. 1947 साली श्रीमती इंदिरा गांधी यांनी महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील दंगलग्रस्त भागात काम केले.
26 मार्च 1942 रोजी श्रीमती इंदिरा गांधींनी फिरोज गांधी यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले होती. 1955 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी कॉंग्रेस कार्यकारी समिती व केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्य झाल्या. 1958 मध्ये त्यांना कॉंग्रेसच्या केंद्रीय संसदीय मंडळाच्या सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. त्या ‘एआयसीसी’च्या राष्ट्रीय एकता परिषदेच्या अध्यक्ष व 1956 मध्ये अखिल भारतीय युवा कॉंग्रेस तसेच ‘एआयसीसी’ महिला विभागाच्या अध्यक्ष बनल्या. 1959 ते 1960 या वर्षात त्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस च्या अध्यक्ष होत्या. जानेवारी 1978 मध्ये त्यांनी पुन्हा हे पद स्वीकारले.

1964 ते 1966 दरम्यान त्या माहिती व प्रसारण मंत्री होत्या. त्यानंतर जानेवारी 1966 ते मार्च 1977 पर्यंत त्या पंतप्रधान होत्या. त्याबरोबरच त्यांना सप्टेंबर 1967 पासून मार्च 1977 पर्यंत अणु उर्जा मंत्री होत्या. त्यांनी 5 सप्टेंबर 1967 ते 14 फेब्रुवारी 1969 पर्यंत परराष्ट्र मंत्रालयाचा अतिरिक्त भार सांभाळला. 14 जानेवारी 1980 मध्ये त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या.

श्रीमती इंदिरा गांधीं, कमला नेहरू स्मृती रुग्णालय; गांधी स्मारक निधी व कस्तुरबा गांधी स्मृती न्यास सारख्या संस्थांशी जोडलेल्या होत्या. त्या स्वराज भवन न्यासाच्या अध्यक्ष होत्या. 1955 मध्ये त्या बाल सहयोग, बाल भवन मंडळ व बालकांच्या राष्ट्रीय संग्रहालयाशी संबंधित राहिल्या. श्रीमती इंदिरा गांधीं यांनी अलाहाबादमध्ये कमला नेहरू विद्यालयाची स्थापना केली होती. त्या 1966-77 मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व ईशान्य विद्यापीठासारख्या काही मोठा संस्थानांशी संलग्न राहिल्या. त्यांनी दिल्ली विद्यापीठ न्यायालय, 1960-64 मध्ये युनेस्कोच्या भारतीय प्रतिनिधीमंडळ व कार्यकारी मंडळ तसेच 1962 ला राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सदस्य म्हणून काम केले. त्या संगीत नाटक अकादमी, राष्ट्रीय एकता परिषद, हिमालयन पर्वतारोहण संस्था, दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, नेहरू स्मारक संग्रहालय, पुस्तकालय समाज व जवाहरलाल नेहरू स्मृती निधी यांच्याशी जोडलेल्या राहिल्या.

ऑगस्ट 1964 ते फेब्रुवारी 1967 पर्यंत श्रीमती इंदिरा गांधीं राज्यसभेच्या सदस्य होत्या. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या सत्रात त्या लोकसभा सदस्य होत्या. जानेवारी 1980 मध्ये त्या रायबरेली (उत्तरप्रदेश) व मेडक (आंध्रप्रदेश) येथून सातव्या लोकसभेवर निवडून गेल्या. रायबरेलीची जागा सोडून त्यांनी मेडकच्या जागेची निवड केली. त्यांना 1967-77 मध्ये आणि पुन्हा जानेवारी 1980 मध्ये कॉंग्रेस संसदीय मंडळ नेता म्हणून निवडले गेले.
विविध विषयात रुची ठेवणाऱ्या श्रीमती इंदिरा गांधीं आयुष्याला एका निरंतर प्रकीयेच्या रुपात पाहत असत. ज्यामध्ये काम आणि आवड हे त्याचे वेगवेगळे पैलू आहेत ज्यांना कोणत्याही प्रकारे विभिन्न करता येत नाही किंवा त्यांचे वेगवेगळ्या श्रेणीत वर्गीकरण करता येणार नाही.
त्यांनी आपल्या जीवनात अनेक क्षेत्रात लौकिक प्राप्त केला. त्यांना 1972मध्ये भारतरत्न पुरस्कार, 1972 मध्ये बांगलादेश मुक्तीकरिता मेक्सिकन अकादमी पुरस्कार, 1973मध्ये एफएओ चे दुसरे वार्षिक पदक व 1976 मध्ये नागरी प्रचारिणी सभेकडून साहित्य वाचस्पती (हिंदी) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. 1953 साली श्रीमती इंदिरा गांधीं यांना अमेरिकेच्या ‘मदर’ पुरस्काराने, मुसद्देगिरीतील उत्कृष्ट कार्याबद्दल इटलीने ‘इसाबेला डी’इस्टे’ पुरस्कार व येल विद्यापीठाने हाउलंड मेमोरियल पुरस्कार देऊन गौरविले. फ्रांस जनमत संस्थेच्या सर्वेक्षणानुसार त्या 1967 व 1968 मध्ये फ्रान्सच्या जनतेमधल्या सर्वात लोकप्रिय महिला होत्या. 1971 मध्ये अमेरिकेच्या विशेष गैलप जनमत सर्वेक्षणानुसार त्या जगातील सर्वात लोकप्रिय महिला होत्या. प्राण्यांच्या संरक्षणासाठी 1971 मध्ये अर्जेंटिना सोसायटीकडून त्यांना मानद उपाधी देण्यात आली होती.
त्यांच्या प्रमुख प्रकाशनांमध्ये ‘द इयर्स ऑफ चॉलेंज-(1966-69), ‘द इयर्स ऑफ इंडेवर (1969-72), ‘इंडिया’ (लंडन) 1975, ‘इंडे'(लॉसेन) 1979 आणि लेख तसेच भाषणांचे विविध संग्रह समाविष्ट आहेत. त्यांनी व्यापक रूपाने देश-परदेशात प्रवास केला. श्रीमती इंदिरा गांधीं यांनी अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, ब्रम्हदेश, चीन, नेपाल आणि श्रीलंका सारख्या शेजारील देशांचाही दौरा केला. त्यांनी फ्रांस, जर्मन लोकशाही प्रजासत्ताक, जर्मनी संघ प्रजासत्ताक, गुयाना, हंगेरी, इराण, इराक व इटली अशा देशांचाही दौरा केला. श्रीमती इंदिरा गांधीं अल्जीरिया, आर्जेन्टिना, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, ब्राझील, बल्गेरिया, कॅनडा, चिली,चेकोस्लोवाकिया,बोलिविया आणि इजिप्त सारख्या अनेक देशांचा दौरा केला. त्या इंडोनेशिया, ,जपान, जमैका, केनिया, मलेशिया, मॉरिशस, मेक्सिको, नेदरलंड, न्यूजीलंड, नायजेरिया, ओमान, पोलंड, रोमानिया, सिंगापुर, स्वित्झर्लंड, सिरीया, स्वीडन, टांझानिया, थाईलंड, त्रिनिदाद तसेच टोबैगो, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, अमेरीका, रशिया संघ, उरुग्वे, वेनेजुएला, यूगोस्लाविया, झांबिया आणि जिम्बाब्वे सारख्या कित्येक यूरोपीय-अमेरीकी आणि आशियाई देशांच्या दौऱ्यावर त्या गेल्या. त्यांनी संयुक्त राष्ट्र मुख्यालयामध्ये देखील आपल्या उपस्थितीने छाप पाडली.

श्री. राजीव गांधी

श्री. राजीव गांधी

October 31, 1984 - December 2, 1989 | Congress

श्री. राजीव गांधी

वयाच्या 40व्या वर्षी पंतप्रधान बनलेले श्री. राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते आणि कदाचित जगातील अशा तरुण राजकीय नेत्यांपैकी एक होते ज्यांनी सरकारचे नेतृत्व केले. त्यांच्या मातोश्री श्रीमती इंदिरा गांधी 1966 मध्ये जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या होत्या, तेव्हा त्या 48 वर्षांच्या होत्या तर त्यांचे आजोबा पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले त्यावेळी ते 58 वर्षांचे होते जेव्हा त्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

देशात पिढी बदलाचे अग्रदूत श्री. राजीव गांधी यांना इतिहासातील सर्वाधिक जनादेश मिळाला होता. आपल्या मातोश्रींच्या हत्येच्या दुखातून सावरल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणुका घेण्याचे आदेश दिले. त्या निवडणुकीत कॉंग्रेसला मागील सात निवडणुकांच्या तुलनेत लोकप्रिय मते अधिक प्रमाणात मिळाली. पक्षाने 508 जागांपैकी 401 जागा मिळवून एक विक्रम केला.

70 कोटी भारतीयांचा नेता म्हणून अशी शानदार सुरुवात कोणत्याही परिस्थितीत उल्लेखनीय मानली जाते. हे याकरिता देखील अद्भुत आहे की श्री. राजीव गांधी अशा राजकीय कुटुंबाशी संबंधित होते ज्यांच्या चार पिढ्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारताची सेवा केली. तरीदेखील श्री. राजीव गांधी राजकारणात प्रवेश करण्यास इच्छुक नव्हते व त्यांनी राजकारणात उशिरा आगमन केले.
श्री. राजीव गांधी यांचा जन्म 20 ऑगस्ट 1944 ला मुंबई येथे झाला. ते केवळ तीन वर्षांचे होते जेव्हा भारत स्वतंत्र झाला आणि त्यांचे आजोबा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. श्री. राजीव गांधी यांचे आई-वडिल लखनऊ येथून नवी दिल्ली येथे स्थायिक झाले. त्यांचे वडिल फिरोज गांधी खासदार बनले व एक निर्भय तसेच मेहनती खासदार म्हणून ख्याती प्राप्त केली.

श्री. राजीव गांधींनी आपले बालपण आपल्या आजोबांसोबत तीन मूर्ती हाउसमध्ये घालवले, ते काही काळासाठी देहरादूनच्या वेल्हम शाळेत गेले. परंतु लवकरच त्यांना हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या निवासी दून शाळेत भरती करण्यात आले. तेथे त्यांचे कित्येक मित्र बनले. ज्यांच्यासोबत त्यांची आयुष्यभराची मैत्री झाली. नंतर त्यांचे छोटे भाऊ संजय गांधी यांनाही त्याच शाळेत पाठवण्यात आले. जेथे दोघे एकत्र राहिले.
शालेय शिक्षणानंतर श्री. राजीव गांधी केंब्रिजच्या ट्रिनिटी महाविद्यालयात गेले. पण लवकरच त्यांनी लंडन स्थित इम्पिरियल महाविद्यालयात प्रवेश घेतला. या महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरींगचा अभ्यास केला.

हे तर स्पष्ट होते की राजकारणात करीअर करण्यामध्ये त्यांना रस नव्हता. त्यांच्या वर्गमित्रांनुसार श्री. राजीव गांधी यांच्याकडे तत्वज्ञान, राजकारण किंवा इतिहासाशी संबंधित पुस्तके नसत. तर विज्ञान व इंजिनीअरींगची बरीच पुस्तके असत. शिवाय संगीतामध्ये त्यांना विशेष रुची होती. आधुनिक संगीतासोबतच त्यांना पाश्चिमात्य व हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आवडत असे. त्यांना छायाचित्रण व रेडिओ ऐकण्याचाही छंद होता.
विमान उड्डाण आकाशात उडणे ही त्यांची सर्वात मोठी आवड होती. त्यामुळेच हे अपेक्षितच होते की इंग्लंडहून घरी परतताना त्यांनी दिल्ली फ्लाइंग क्लबची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि व्यावसायिक वैमानिकाचे अनुज्ञप्ती पत्र मिळवले. लगेचच ते इंडिअन एयरलाईन्सचे देशांतर्गत सेवेचे वैमानिक बनले.
केम्ब्रिजमध्ये त्यांची भेट इटालियन विद्यार्थिनी सोनिया मैनोशी झाली, ज्या तेथे इंग्रजी विषयाचा अभ्यास करत होत्या. या द्वयींनी 1968 मध्ये दिल्ली येथे विवाह केला. हे दोघेही राहुल व प्रियांका या आपल्या दोन मुलांसहित इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी राहत असत. आजूबाजूला राजकीय हालचालींचा गोंधळ असताना देखील ते आपले खाजगी जीवन जगत होते.

परंतु 1980 मध्ये एका विमान अपघातात त्यांच्या भावाचा संजय गांधींच्या मृत्यूने सर्व परिस्थिती बदलून टाकली. श्री. राजीव गांधी यांच्यावर राजकारणात प्रवेश करण्याबाबत आणि आपल्या आईला राजकीय कामात मदत करण्यासाठी दबाव पडू लागला. त्यांनतर अनेक बाह्य व अंतर्गत आव्हाने देखील समोर आली. आधी त्यांनी या दबावांना विरोध केला. परंतु नंतर त्यांनी केलेल्या तर्काशी श्री. राजीव गांधी सहमत झाले. त्यांनी आपल्या भावाच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या उत्तरप्रदेशच्या अमेठी येथून पोटनिवडणूक जिंकली.

नोव्हेंबर 1982 मध्ये भारताने आशियायी क्रीडा स्पर्धेचे यजमानपद घेतले होते. यावेळी क्रीडासंकुल उभे करणे व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात अनेक वर्षांपूर्वी दिलेल्या वचनांची पूर्ती करण्यात आली होती. श्री. राजीव गांधी यांना ही जबाबदारी देण्यात आली होती की सर्व कामे वेळेत पूर्ण होतील व कोणत्याही अडचणींशिवाय क्रीडास्पर्धांचे आयोजन केले जाईल. श्री. राजीव गांधी यांनी दक्षतेने व सहज समन्वयाद्वारे हे आव्हानात्मक काम पूर्ण केले. सोबतच कॉंग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी त्याच तन्मयतेने काम करत पक्ष संघटनेला व्यवस्थित आणि सक्रिय केले. पुढे त्यांच्यासमोर याहून अधिक कठीण परिस्थिती येणार होती, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा होणार होती.

31 ऑक्टोबर 1984 रोजी आपल्या आईच्या क्रूर हत्येनंतर अत्यंत दु:खद परिस्थितीत ते कॉंग्रेसचे अध्यक्ष व देशाचे पंतप्रधान बनले होते. परंतु वैयक्तिक पातळीवर इतके दु:खी असूनही संतुलन, मर्यादा आणि संयमाने त्यांनी राष्ट्रीय जबाबदारी उत्तमरीत्या पार पडली.
महिन्याभराच्या मोठ्या निवडणूक प्रचार कार्यक्रमादरम्यान श्री. राजीव गांधी यांनी पृथ्वी परिघाच्या दीडपट अंतराची यात्रा करत देशातील जवळपास सर्व भागात जाऊन 250 पेक्षा जास्त सभा घेतल्या आणि लाखो लोकांना प्रत्यक्ष भेटले.

स्वभावाने गंभीर परंतु आधुनिक विचार व अदभूत निर्णयक्षमता असलेले श्री. राजीव गांधी भारताला जगातील उच्च तंत्रज्ञानाने परिपूर्ण करू इच्छित होते. ते सतत म्हणत की भारत एकसंघ ठेवण्याव्यतिरिक्त 21 व्या शतकातील भारत निर्माण करणे, हेही त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

श्री. पी. व्ही. नरसिंह राव

श्री. पी. व्ही. नरसिंह राव

June 21, 1991- May 16, 1996 | Congress (I)
श्री. पी. व्ही. नरसिंह राव

पी. रंगराव यांचे सुपूत्र असलेले पी.व्ही.नरसिंह राव यांचा जन्म 28 जून 1921 रोजी करीमनगर येथे झाला. उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले. श्री. पी.व्ही. नरसिंह राव यांना तीन मुलगे आणि पाच मुली आहेत.
शेतकरी आणि वकील असूनही त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि काही महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली. आंध्र प्रदेश सरकारमध्ये त्यांनी 1962-64 या काळात कायदा आणि माहिती मंत्री, 1964-67 या काळात कायदा आणि धर्मादाय मंत्री, 1967 मध्ये आरोग्य आणि वैद्यकीय मंत्री 1968-71 या काळात शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. 1971-73 या काळात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 1975-76 दरम्यान ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस होते. 1968-74 या काळात आंध्र प्रदेशच्या तेलगु अकादमीचे ते अध्यक्ष होते. 1972 पासून ते दक्षिण भारत हिंदी प्रचार सभाचे उपाध्यक्ष होते. 1957-77 या काळात ते आंध्र प्रदेश विधानसभेचे सदस्य तर 1977-84 दरम्यान लोकसभेचे सदस्य होते. डिसेंबर 1984 मध्ये ते रामटेकमधून आठव्या लोकसभेवर निवडून गेले. 1978-79 मध्ये सार्वजनिक लेखा समितीचे अध्यक्ष म्हणून ते लंडन विद्यापीठाच्या आशियाई आणि आफ्रिकी अभ्यास विभागाने आयोजित केलेल्या दक्षिण आशियावरील परिषदेला उपस्थित होते. राव यांनी भारतीय विद्या भवनाच्या आंध्र केंद्राचे अध्यक्षपदही भूषवले.

14 जानेवारी 1980 ते 18 जुलै 1984 दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री, 19 जुलै 1984 ते 31 डिसेंबर 1984 दरम्यान गृहमंत्री, 31 डिसेंबर 1984 ते 25 सप्टेंबर 1985 दरम्यान संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. 25 सप्टेंबर 1985 मध्ये त्यांनी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. राव यांना संगीत, चित्रपट, नाटक आदी विविध क्षेत्रात स्वारस्य होते. भारतीय तत्त्वज्ञान आणि संस्कृती, काल्पनिक आणि राजकीय लेखन, विविध भाषा शिकणे, तेलगु आणि हिंदी भाषेत कविता करणे आणि एकूणच साहित्याबाबत त्यांना विशेष रुची होती. प्रकाशन क्षेत्रातही त्यांनी अतुलनीय कामगिरी केली. ज्ञानपीठने प्रकाशित केलेल्या विश्वनाथ सत्यनारायण यांच्या प्रसिध्द “वेयि पडगलु” या तेलगू कादंबरीचा “सहस्त्रफन” हा हिंदी अनुवाद तसेच केंद्रीय साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या “पण लक्षात कोण घेतो” या हरि नारायण आपटे यांच्या प्रसिध्द कादंबरीचे “अबला जीवितम्” हा तेलगू अनुवाद त्यांनी यशस्वीपणे प्रकाशित केला. मराठीतील अनेक उत्तम साहित्याचा त्यांनी तेलगू भाषेत तसंच तेलगू साहित्याचा हिंदी भाषेत अनुवाद केला. याशिवाय टोपण नावाने त्यांनी विविध मासिकांमध्ये अनेक लेख प्रकाशित केले. त्यांनी अमेरिका आणि पश्चिम जर्मनीच्या विद्यापीठांमध्ये राजकीय घडामोडींवर व्याख्यान दिले आहे. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी इंग्लंड, पश्चिम जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली आणि इजिप्त या देशांचा दौरा केला.

परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी क्षेत्रात आपला अनुभव पणाला लावला. जानेवारी 1980 मध्ये नवी दिल्लीत पार पडलेल्या संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटनेच्या तिसऱ्या परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. तसेच मार्च 1980 मध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या जी-77 बैठकीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.
1982 आणि 1983 ही दोन वर्षे भारतासाठी आणि परराष्ट्र धोरणासाठी महत्त्वाची ठरली. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर सातव्या परिषदेचे आयोजन करण्याची जबाबदारी अलिप्त राष्ट्रांनी भारताला सोपवली. अलिप्त राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद नरसिंह राव यांनी भूषवले.
पॅलेस्तानी मुक्ती संघटना बरखास्त करण्यासाठी पश्चिम आशियातील देशांना भेटी दिलेल्या विशेष अलिप्त चळवळीचे नेतृत्व राव यांनी केले.
परराष्ट्र व्य वहार मंत्री म्हणून नरसिंह राव यांनी अमेरिका, पाकिस्तान, बांग्लादेश, इराण, व्हिएतनाम, टांझानिया, गयाना आदींच्या संयुक्त आयोगांचे अध्यक्षपद भूषवले.
19 जुलै 1984 मध्ये त्यांनी गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. 5 नोव्हेंबर 1984 रोजी त्यांना नियोजन मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. 31 डिसेंबर 1984 ते 25 सप्टेंबर 1985 दरम्यान त्यांची संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

श्री. मोरारजी देसाई

श्री. मोरारजी देसाई

March 24, 1977 - July 28, 1979 | Janata Party

श्री. मोरारजी देसाई

श्री.मोरारजी देसाई यांचा जन्म 29 फेब्रुवारी 1896 रोजी भादेली गावात झाला. हे गाव आता गुजरातमधील बुलसर जिल्हयात आहे. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते आणि अत्यंत कडक शिस्तीचे होते. लहानपणापासूनच, छोटया मोरारजींनी वडिलांकडून कोणत्याही परिस्थितीत कठोर मेहनत आणि सचोटी ही मूल्ये आत्मसात केली. सेंट बुसर हायस्कूलमधून त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तत्कालीन मुंबई प्रांतातील विल्सन सिव्हिल सर्व्हिसमधून त्यांनी पदवी घेतली आणि उपजिल्हाधिकारी म्हणून 12 वर्षे काम केले.

1930 मध्ये महात्मा गांधींनी सुरु केलेल्या स्वातंत्र्य लढयादरम्यान देसाई यांचा ब्रिटीश न्यायव्यवस्थेवरील विश्वास उडाला. त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि स्वातंत्र्य लढयात उडी घेतली. हा निर्णय अतिशय कठीण होता, मात्र देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न येतो, तेव्हा कौटुंबिक समस्या दुय्यम स्थानी येतात असा विचार त्यांनी केला.
स्वातंत्र्य लढयादरम्यान, देसाई यांनी तीन वेळा तुरुंगवास भोगला. 1931 मध्ये ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य बनले आणि 1937 पर्यंत गुजरात प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव होते.

1937 मध्ये पहिलया काँग्रेस सरकारने कार्यभार स्वीकारल्यानंतर देसाई हे तत्त्कालीन मुंबई प्रांतात बी.जी. खेर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालयात महसूल, कृषी, वन आणि सहकारी मंत्री होते. जागतिक युध्दात भारताच्या परवानगीशिवाय सहभागाचा काँग्रेस मंत्रालयानी निषेध केला.
महात्मा गांधी यांनी सुरु केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहात देसाई यांना ताब्यात घेण्यात आले आणि ऑक्टोबर 1941 मध्ये सोडून देण्यात आले. ऑगस्ट 1942 मध्ये भारत छोडो चळवळीच्या वेळी पुन्हा त्यांना ताब्यात घेण्यात आले. 1945 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. 1946 मध्ये राज्य विधानसभेच्या निवडणुकानंरत, ते मुंबईत गृह आणि महसूल मंत्री झाले. या काळात त्यांनी जमीन महसुलात अनेक सुधारणा केल्या. पोलिस प्रशासनात त्यांनी जनता आणि पोलिस यांच्यातील दरी दूर केली, आणि जनतेच्या गरजांप्रती पोलिस प्रशासन अधिक सजग केले. 1952 मध्ये ते मुंबईचे मुख्यमंत्री बनले.

त्यांच्या मते, जोपर्यंत गावे आणि शहरांमध्ये राहणारे गरीब लोक सामान्य जीवन जगण्यासाठी सक्षम होत नाहीत, तोपर्यंत समाजवादाबाबत बोलण्यात काही अर्थ नाही. देसाई यांनी शेतकरी आणि भाडेकरुंच्या समस्या सुधारण्याच्या हेतूने प्रगतीशील कायदा बनवला आणि आपला विचार कार्यान्वित करण्यासाठी ठोस पाऊल उचलले. यामध्ये देसाई यांचे सरकार अन्य राज्यांपेक्षा खूप पुढे होते. याशिवाय, त्यांनी प्रामाणिकपणे कायदयाची अंमलबजावणी केली आणि मुंबईतील त्यांच्या प्रशासनाची सर्वांनी प्रशंसा केली.
राज्यांची पुनर्स्थापना केल्यांनतर, 14 नोव्हेंबर 1956 रोजी देसाई वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले. नंतर 22 मार्च 1958 रोजी त्यांनी अर्थ खात्याचा कार्यभार स्वीकारला.

आर्थिक नियोजन आणि वित्तीय प्रशासनाबाबतचे ज्ञान त्यांनी कृतीमध्ये उतरवले. संरक्षण आणि विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी महसूल वाढवला, अनाठायी खर्चात कपात केली आणि प्रशासनावरील सरकारी खर्चात काटकसरीला प्रोत्साहन दिले. आर्थिक शिस्तीची अंमलबजावणी करुन त्यांनी वित्तीय तूट कमी केली. समाजातील उच्चभ्रू वर्गाकडून होणाऱ्या वारेमाप खर्चावर नियंत्रण आणले. 1963 मध्ये कामराज योजनेअंतर्गत त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. पंडित नेहरुनंतर पंतप्रधान झालेल्या लालबहादूर शास्त्री यांनी प्रशासकीय यंत्रणेची पुनर्रचना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष बनण्यासाठी देसाई यांचे मन वळवले. या कामात सार्वजनिक क्षेत्रातील प्रदीर्घ आणि वैविध्यपूर्ण अनुभवाची त्यांना मदत झाली.

1967 मध्ये इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात देसाई यांनी उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. जुलै 1969 मध्ये, गांधी यांनी त्यांच्याकडून अर्थखाते काढून घेतले. देसाई यांच्या एक गोष्ट लक्षात आली की पंतप्रधानांना आपल्या सहकाऱ्यांची खाती बदलण्याचा विशेषाधिकार आहे. मात्र इंदिरा गांधी यांनी याबाबत त्यांच्याशी सल्लामसलत करण्याचे साधे सौजन्यही न दाखवल्यामुळे त्यांच्या आत्मसन्माला ठेच पोहोचली. त्यामुळे त्यांनी विचार केला की भारताच्या उपपंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. 1969 मध्ये काँग्रेस पक्षाचे विभाजन झाले, मात्र देसाई काँग्रेस संघटनेसोबत राहिले. पुढेही ते पक्षात प्रमुख भूमिका पार पाडत राहिले. 1971 मध्ये ते पुन्हा संसदेवर निवडून गेले. 1975 मध्ये बरखास्त करण्यात आलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या प्रश्नावर त्यांनी आमरण उपोषण सुरु केले. त्यांच्या उपोषणामुळे जून 1975 मध्ये निवडणुका पार पडल्या. चार विरोधी पक्ष आणि एक अपक्ष यांच्या पाठिंब्यावर स्थापन झालेल्या जनता दल पक्षाला विधानसभेत स्पष्ट बहुमत मिळाले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने गांधी यांची लोकसभेवर निवड निरर्थक असलयाचे जाहीर केल्यानंतर देसाई यांच्या मनात आले की, लोकशाहीची तत्त्वे ध्यानात घेऊन गांधी यांनी राजीनामा दयायला हवा.

आणीबाणी घोषित झाल्यानंतर, 26 जून 1975 रोजी देसाई यांना अटक करुन ताब्यात घेण्यात आले. त्यांना एकांत कारावासात ठेवण्यता आले आणि लोकसभा निवडणुका घेण्याच्या निर्णयापूर्वी 18 जानेवारी 1977 रोजी सोडून देण्यात आले. त्यांनी देशभरात संपूर्ण ताकदीनिशी प्रचार केला आणि मार्च 1977 मध्ये सहाव्या लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनता दलाला मिळालेल्या अभूतपूर्व यशात त्यांची महत्त्वूपूर्ण भूमिका होती. गुजरातमधील सुरत मतदारसंघातून देसाई लोकसभेसाठी निवडून गेले होते. नंतर त्यांची सर्वसंमतीने संसदेतील जनता दलाचे नेते म्हणून निवड झाली आणि 24 मार्च 1977 मध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली.

1911 मध्ये देसाई आणि गुजराबेन यांचा विवाह झाला. त्यांच्या पाच मुलांपैकी एक मुलगी आणि एक मुलगा हयात आहेत.
पंतप्रधान म्हणून देसाई यांची इच्छा होती की, भारतातील जनतेला इतके निडर बनवायचे की देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्तीने जरी काही चूक केली तर त्या व्यक्तीच्या निदर्शनात ती चूक आणून दिली जावी. त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितले की, “कुणीही मग तो पंतप्रधान असला तरी देशाच्या कायदयापेक्षा कुणीही श्रेष्ठ नाही.”
त्यांच्यासाठी सत्य ही एक संधी नसून विश्वासाचे एक अंग होते. त्यांनी क्वचितच आपल्या तत्त्वांना परिस्थितीच्या दबावापुढे मुरड घातली. अत्यंत कठीण परिस्थितीतही ते कटिबध्दतेने पुढे जात राहिले. ते स्वत: मानायचे की, “सर्वांनी सत्य आणि विश्वासाच्या जोरावर आयुष्यात मार्गक्रमण करायला हवे.”

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...