०२ मार्च २०२२

स्टेट बँक ऑफ़ इंडिया मधे सहकारी बँकांचे विलीनीकरण


🅾केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये त्याच्या सहकारी बँकांचे विलीनीकरण करण्यासाठी मंजूरी दिलेली आहे. याशिवाय, नव्याने स्थापन झालेल्या भारतीय महिला बँक ला सुद्धा SBI मध्ये विलीन केले जाईल.

🅾SBI च्या सहा सहकारी बँका आहेत, त्यामध्ये..

🅾स्टेट बँक ऑफ हैदराबाद,

🅾स्टेट बॅंक ऑफ बिकानेर अँड जयपूर,

🅾स्टेट बँक ऑफ पटियाला,

🅾स्टेट बँक ऑफ म्हैसूर,

🅾स्टेट बँक ऑफ त्रावणकोर,

🅾स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर
या आहेत..

🧩SBI विलिनीकरणाचे फायदे..

🅾विलीनीकरण झाल्यानंतर, बँकिंग क्षेत्रात अग्रेसर SBI हे जगातील टॉप-50 बँकांच्या यादीमध्ये प्रविष्ट होणार.संसाधने जमवण्यासाठी एकल कोषागार असणार आणि मोठ्या प्रमाणात कुशल संसाधनांच्या पायाचे योग्य वितरण केले जाणार.

🅾SBI मध्ये अवलंबले जाणारे नवीन तंत्रज्ञान हे सहकारी बँकेच्या सर्व ग्राहकांना समानरूपाने उपलब्ध होणार.त्याच्या उपकंपन्या सोबत SBI भागभांडवल बाजारात प्रचंड कमाई करू शकणार. अशा प्रकारे तो फायदा सर्व भागभांडवल धारकांना देखील होणार.

🅾विलीनि‍करणानंतर SBI ची एकूण मालमत्ता रु. 37 लाख कोटी  (37 ट्रिलियन रुपयांवर) पोहोचणार.यामुळे SBI चे 50 कोटी पेक्षा अधिक ग्राहक होणार, आणि  22,500 शाखा आणि 58,000 ATM उपलब्ध होणार.

🧩SBI विलिनीकरणाचे तोटे..

🅾या विलीनि‍करणानंतर , बँकेच्या प्रशासनाला कर्मचारी एकत्रीकरण आणि शाखा सुसूत्रीकरण संबंधित काही गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. अनेक कर्मचारी सहकारी संघ या विलीनि‍करणाच्या विरोधात आहेत.

🧩SBI च्या विलीनीकरणाआधी:-

🅾SBI मध्ये पूर्वीचे विलीनीकरण निरोगी असल्याचे सिद्ध झाले आहे. 2008 मध्ये, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आणि 2010 मध्ये, स्टेट बँक ऑफ इंदोर चे विलीनीकरण करण्यात आले होते. विलीनीकरण होण्याच्या आधी SBI च्या 7 सहकारी बँका होत्या.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार

महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमाण विदर्भ, कोकण व सह्याद्री डोंगररांगात जंगले आढळून येतात. मराठवाड्यात हे प्रमाण खूपच कमी आहे.

महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार:

१. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती

२. उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वनस्पती

३. उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती

४. आर्द्र-पानझडी वनस्पती

५. शुष्क पानझडी वनस्पती

६. रूक्ष काटेरी वनस्पती

७. खाजण वनस्पती

◾️उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग भागात सावंतवाडी परिसरात ही सदाहरित वने पाहायला मिळतात. ज्या प्रदेशात २०० सें. मी. पेक्षा जास्त पाऊस पडते त्या भागात उष्ण कटिबंधीय सदाहरित वने असतात.साचा:ए बी सवडी या प्रदेशातील आर्द्रतेचे जास्त प्रमाण व जमिनीमध्ये हुयमसचे प्रमाण जास्त असल्याने या वृक्षांची उंची ४५ ते ६० मी. दरम्यान असते. सदाहरित वृक्षांचे नागचंपा, पांढरा सीडार, फणस, कावसी, जांभूळ अशी उदाहरणे आहेत.

आर्थिक महत्त्व- या वनाचा आर्थिकदृष्ट्या मर्यादित प्रमाणात उपयोग होतो. त्याचे कारण या वनस्पतीपासून तयार होणारे लाकूड अतिशय कठीण असल्याने ते टिंबर म्हणून वापरण्यास योग्य असत नाही.

उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने

वार्षिक पर्जन्य २०० से मी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात निमसदाहरित अरण्ये आढळतात. सदाहरित वने पश्चिम किनारपट्टीवर कोकणामध्ये त्यांचा एक सलग पट्टा पाहायला मिळतो. सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात काही वनस्पती व आंबोली, लोणावळा, इगतपुरीच्या परिसरात निमसदाहरित वने आढळतात. हे वृक्ष सदाहरित अरण्यापेक्षा जास्त उंचीचे असते. निमसदाहरित अरण्यात किंडल, रानफणस, नाना, कदम, शिसम, बिबळा हे वृक्ष आढळतात.

◾️उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने

महाराष्ट्रात हि अरण्ये प्रामुख्याने २५० से मी पर्जन्य पडणाऱ्या भागात आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान  आणि भीमाशंकरच्या परिसरात उपउष्ण सदाहरित अरण्ये आहेत. पावसाचे भरपूर प्रमाण, तुलनात्मक दृष्ट्या मध्यम स्वरूपाचे तापमान दीर्घकाळ पाऊस आणि आद्रता सर्व घटकामुळे सदाहरित वृक्ष आढळतात. सदाहरित अरण्यात जांभळा, आंबा, हिरडा, बेहडा, कारवी हे वृक्ष आढळतात. हिरडा या झाडाचे वृक्ष टणक आहेत.थंड हवेच्या ठिकाणी अशी वने आढळतात.

◾️उष्ण कटिबंधीय आद्र पानझडी अरण्ये

सातपुडा पर्वत आणि अजिंठा डोंगररांगात वृक्ष पानझडी अरण्ये आढळतात. वार्षिक पर्जन्य ८० ते १२९ से मी अरण्यात हि अरण्ये कमी प्रमाणात आढळून येतात. उष्ण कटिबंधीय वृक्ष, धावडा, शिसम, तेंदू, पळस, लेडी, हेडी, बबेल, खैर, अंजन इ. या अरण्यातील वनस्पतीचा उपयोग हा टीबर म्हणून व्यापारी दृष्टीने केला जातो. खैर वनस्पतीचा उपयोग कात करण्यासाठी केला जातो.

◾️उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने

ही वने प्रामुख्याने विदर्भाच्या पश्चिम भागात वर्धा-वैनगंगा नद्यांच्या खोर्‍यात आढळतात. वार्षिक पर्जन्य 80 ते 120 से. मी. दरम्यान ही वने आढळतात. या वृक्षांची उंची 25 ते 30 सें.मी.असते. ही वृक्ष आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची असतात. यामध्ये सागवान, खैर, तेंदू, बैल, बीजसाल, कुसुम, तीवस, रोहन, सावन, चारोळी, इ.

◾️उष्ण कटिबंधीय काटेरी वने

दख्खनच्या पठारावर मध्य महाराष्ट्रात नद्यांच्या खोऱ्यात लागवडीच्या परिसरात असणाऱ्या डोंगरावर आणि कमी उंचीच्या पठारावर काटेरी वने आढळतात. संपूर्ण महाराष्ट्रात काटेरी वने आढळतात. वार्षिक पर्जन्य ८० से मी पेक्षा कमी असणाऱ्या प्रदेशात हि वने आढळतात. बाभूळ, खैर, हिवर हे वृक्ष आढळतात. तारवड सारख्या झुडुपचा उपयोग केला जातो.महाराष्ट्रात खूप ठिकाणी काटेरी झुडपे आढळून येतात.

सदाहरित वने

महाराष्ट्रात सदाहरित वने तुरळक प्रमाणात आढळतात. विपुल पर्जन्याच्या प्रदेशात पठारी अथवा दऱ्याखोऱ्यात हिरवीगार वने आढळतात. या भागात ३०० ते ६०० से.मी पर्जन्य असते. या प्रकारची वने महाबळेश्वर, खंडाळा, माथेरान,भीमाशंकर, अंबोली अशा ठिकाणी आढळतात. पठारावर जरी वृक्षांची उंची कमी असली तरी दऱ्याखोऱ्यातून हेच वृक्ष भरपूर उंच झालेले दिसतात. या वनांत खालील सदाहरितवृक्ष मुख्यत्वेकरुन आढळतात. जांभूळ, पिशा, पारजांब, हिरडा, अंजर, आंबगा, लालदेवदार, वगैरे, झुडपांमध्ये फांगडा, रामेठा, बामणी, दिंडा, सुरंगी, फापटी वगैरेआढळतात. विकसित झालेल्या उंच वृक्षांच्या जंगलात ओंबळ गारबी,पळसवेल, वाटोळी,वगैरे अजस्त्र वेली आढळतात.

आद्र पानझडी वने

घाटमाथ्यावरुन खाली उतरल्यानंतर सदापर्णी वनांच्या खालील बाजूस डोंगरउतारावर, व सपाट भागावर या प्रकारची वने आढळतात. पर्जन्यमान 150 ते 200सेंमी निचऱ्याची जमीन, उष्णतामान यांमुळे सागवान वृक्ष असलेली पानझडी वृक्षांची जंगले या भागात आढळतात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडोऱ्याची उंची 30 - 35 मी.पर्यंत असू शकते व्यापारी दृष्टया अशा वनांचे महत्त्व फार आहे. वृक्षांमध्ये सागवान वत्याच्याबरोबरच शिसम, सावर, बीजा, हळदू कळंब, ऐन बोंडारा, शिरीष अर्जुनसादडा, धावडाइ. उपयुक्त वृक्ष सापडतात.

शुष्क पानझडी वने

शुष्क पानझडी वृक्षांचे प्रमाण सर्वात जास्त असते.उन्हाळयामध्ये तर अशा वनामध्ये सर्वच वृक्षांचे पर्णहीन खराटे दृष्टीस पडतात. अशारानात सागवान वृक्षही आढळतात. असाणा, तिवस,सावर, चारोळी, आवळा, बेहडा, शेंदरी, चेरा, पळस, बारतोंडी, धामण, टेंबुणीर वगैरे वृक्ष सापडतात. बाकीच्या झाडोऱ्यात बोर, बाभूळ, कुडा, आपटा,तांबरट वगैरे मध्यम आकारांचे वृक्ष अथवा झुडपे आढळतात. इमारती लाकडाच्या दृष्टीनेया प्रकारच्या वनांना कमी महत्त्व असले, तरी भरपूर जळाळु लाकडाचा पुरवठा करणारीजंगले म्हणून ही राने उपयुक्त मानली जातात. अशा रानातील वृक्षांची वाढ अतिशय हळू असल्याने जर अनिर्बंध लाकूडतोड सुरु झाली तर सर्व प्रदेश वैराण होण्यासवेळ लागत नाही. अशा वनात दुय्यम उत्पन्न देणाऱ्या वनस्पती म्हणजे तेंदू, गवते,औषधी वनस्पती, इ. लावून अशा जंगलाचे महत्त्व वाढविता येईल.

झुडपी व काटेरी वने

पठारी प्रदेशातील 80 सें.मी. पेक्षा कमी पावसाच्या प्रदेशात वनस्पती अगदी विरळ आहेत. या भागातील कमी व नापीक जमीन ही अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. नगर, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांच्या पूर्व भागात सोलापूर, मराठवाडाव पश्चिम विदर्भात अशा प्रकारच्या वनस्पती आढळतात. काटेरी खुज्या वनस्पती वत्यांच्याबरोबर गवताळ माळराने असे दृश्य सर्वत्र दिसते. बाभूळ, बोर, खैर, निंब हे वृक्ष आणि तरवड, टाकळा, निवडुंग इत्यादी झुडपे व अनेक प्रकारची गवते त्या भागात मात्र पानझडी जातीचे वृक्ष आढळतात

जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती

खनिज संपत्ती:-उत्पादन करणारे देश

कोळसा दगडी(उत्पादन):-चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन.

कोळसा दगडी(वापर करणारे):-चीन, अमेरिका, भारत, रशिया.

अभ्रक:-भारत, द.आफ्रिका, घाना.

क्रोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.

जस्त:-अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.

टिन:-मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम.

टंगस्टन:-चीन, द.कोरिया, रशिया.

तांबे:-अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.

तेल, खनिज:-रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.

निकेल:-कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.

बॉक्साईट:-ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.

सोने:-द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.

युरेनियम:-द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.

पारा:-इटली, स्पेन, अमेरिका.

मंगल (मॅगनीज):-रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.

लोहखनिज(साठे):-अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.

लोहखनिज (उत्पादन):-रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.

शिसे:-ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया...

महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा – गोंदिया

प्रमुख तलाव –

 ताडोबा, घोडझरी, असोलामेंढा (चंद्रपुर),

नवेगांव, बोदलकसा, चोरखमारा (गोंदिया),

रामसागर (नागपूर),

लोणार (बुलढाणा),

अंबाझरी (नागपूर),

आंध्रलेक (पुणे),

धामापूर (रत्नागिरी),

मुंबईस पाणीपुरवठा करणारे तलाव – भातसा, ताणसा, वैतरणा, पवई विहार (मुंबई)

अंबाझरी –    नागपुर

रामसागर –    नागपूर

नवेगाव –    गोंदिया

बोदलकसा –    गोंदिया

ताडोबा –    चंद्रपूर

असेलमेंढा –    चंद्रपूर

सिंदेवाही –    चंद्रपूर

लक्ष्मी –    कोल्हापूर

चोरखमारा –    गोंदिया

खळबंद –    गोंदिया

चुलबंद –    गोंदिया

शिवनी –    भंडारा

लोणार –    बुलढाणा

विसापूर –    नगर

रंकाळा –    कोल्हापूर

पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार.

🧩व्दिपकल्प - 

🅾एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.

🧩 भूशीर - 

🅾व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.

🧩खंडांतर्गत समुद्र -

🅾 मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.

🧩 बेट - 

🅾एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.

🧩 समुद्रधुनी -

🅾 काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.

 🧩संयोगभूमी - 

🅾दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.

 🧩आखात - 

🅾उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.

🧩खाडी - 

🅾आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.

🧩 समुद्र किंवा सागर - 

🅾महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.
उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र.

🧩 उपसागर - 

🅾खार्‍या पाण्याच्या ज्या  जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर 

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

कंपनीच्या राज्यसत्तेत गाजलेले बंगालचे गव्हर्नर जनरल.


🅾भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन

🅾 लॉर्ड क्लाईव्ह(1756 ते 1772) :-
भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याची महत्वपूर्ण कामगिरी लॉर्ड क्लाईव्हने केली. लॉर्ड क्लाईव्हच्या काळातील घटना.

🅾प्लासिचे युद्ध :- जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला.

🅾बक्सरची लढाई :- बंगालचा नवाब मीरकासीम, आयोद्धेच नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सर येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला.

🅾अलाहाबादचा तह :- बक्सरच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली.

🅾सर वॉरन हेस्टिंग(सन 1772 ते 1773) :-
सर वॉरन हेस्टिंगने बंगाल प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थेची स्थापना केली.

🅾भारतातील पहिले वृत्तपत्र *बंगाल गॅझेट* (1781) याच काळात सुरू झाले.

🅾लॉर्ड कॉर्नवॉलीस(1786 ते 1793) :-
लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात.

🅾लॉर्ड वेलस्ली (1798 ते 1805) :-
लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला.

🅾तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली.

🅾सन 1802 मध्ये दुसर्‍या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्विकार केला.

🅾मार्क्विस ऑफ हेंस्टीग्ज (सन 1813 ते 1823) :-मार्क्विस ऑफ हेस्टिंगने नेपाळवर स्वारी करून हिमालयातील तराईचा विस्तृत प्रदेश, कुमाऊम गढवाल व सिक्किम प्रांत, सिमला, नैनीताल व मसूरी सारखी थंड हवेची ठिकाणे जिंकून कंपनीच्या साभ्राज्यात सामील केली.

🅾जून 1818 मध्ये एलफिन्स्टनच्या सेनेने कोरेगावाच्या लढाईत बाजीराव पेशव्याच्या सेनेचा निर्णायक पराभव करून पेशवेशाही खालसा केली.

🅾लॉर्ड विल्यम बेंटीक (1823 ते 1833) :-लॉर्ड विल्यम बेंटिकने सन 1829 मध्ये सती प्रथा बंद कायदा पास केला.

🅾भारतीय लोकांच्या शिक्षणाकरिता इंग्रजी भाषा ही शिक्षणाचे माध्यम राहील असे जाहीर केले.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

ब्रिटिशकालीन आदिवासी उठाव व ठिकाणे

1. फकीर उठाव
◆ नेतृत्व:- मजनुशाह
◆ स्थान:- बंगाल
◆ 1776-77
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
2. रंगपूर उठाव
◆ नेतृत्व:- धीरज नारायण
◆ स्थान:- बंगाल
◆ 1783
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
3. पागलपंथी उठाव
◆  नेतृत्व:- टिपू शाह
◆  स्थान:- बंगाल
◆  1813-31
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
4. पाईका उठाव
◆ नेतृत्व:- बक्षी जगबंधु विद्याधर
◆ स्थान:- उडिशा
◆ 1817-25
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
5. फैरेजी उठाव
◆ नेतृत्व:- दादू मिया
◆ स्थान:- बंगाल
◆ 1820-58
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
6. अहोम उठाव
◆ नेतृत्व:- गोमूधर कुवर
◆ स्थान:- आसाम
◆ 1828-33
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
7. खासी उठाव
◆  नेतृत्व:- तिरथ सिंग
◆  स्थान:- मेघालय
◆ 1830-33
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
8. कुका उठाव
◆ नेतृत्व:- भगवत जवाहरमल/रामसिह कुका
◆ स्थान:- पंजाब
◆ 1840-72
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
9. मणिपूर उठाव
◆ नेतृत्व:- राणी गैडील्यु
◆ स्थान:- मणिपूर
◆ 1920-35
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

डॉ. रामकृष्ण विठ्ठल लाड ऊर्फ भाऊ दाजी लाड

 (इ.स. १८२४ - मे ३१, इ.स. १८७४)

हे मराठी इतिहास-अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात डॉक्टर होते. 

▫️  लाडांचा जन्म १८२२ साली तत्कालीन पोर्तुगीज गोव्यात मांजरे गावी, एका सामान्य सारस्वत कुटुंबात झाला. लाडांचे वडील मातीच्या मूर्ती घडवणारे मूर्तिकार होते.

▫️  बालपणी लहानग्या रामकृष्णाची बुद्धिबळातील चमक पाहून एका इंग्रज गृहस्थांनी रामकृष्णाच्या वडिलांना त्याला इंग्रजी शाळेत पाठवण्यासाठी राजी केले. इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी लाड मुंबईतल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात दाखल झाले. शालेय अभ्यासातही चमक दाखवत त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या. या काळातच लाडांचे वडील वारले.

▫️ वडिलांपश्चात त्यांनी आपल्या आईची व धाकटा भाऊ नारायण यांची जबाबदारी वाहिली. नारायण दाजी लाड देखील शिकून पुढे डॉक्टर बनले.

▫️  शालेय शिक्षणानंतर लाडांना एल्फिन्स्टन विद्यालयातच शिकवण्याची नोकरी मिळाली. या काळात त्यांनी प्राचीन संस्कृत वाङ्मय अभ्यासले व संस्कृत साहित्यिकांच्या जीवनकाळाबद्दल, कालनिश्चितीबद्दल, तसेच गुप्तकालीन इतिहासाबद्दल त्यांनी मोलाचे संशोधन केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील ग्रॅंट मेडिकल कॉलेजात प्रवेश घेतला.

▫️ १८५० साली वैद्यकीचा अभ्यासक्रम पुरा करणाऱ्या पदवीधरांच्या पहिल्या तुकडीत ते होते.

▫️ १८५१ साली त्यांनी मुंबईत डॉक्टरकी आरंभली. वैद्यकीय पेशास अनुसरत त्यांनी वैद्यकीतही संशोधन केले.

▫️ महारोगावरील औषधाचा त्यांनी लावलेला शोध, हे त्यांचे वैद्यकशास्त्रातील मोठे योगदान आहे.

▫️   त्यांच्या कामामुळे मुंबईतील एतद्देशीय व इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका इत्यादी परदेशांतील वैज्ञानिक सोसायट्यांनी त्यांना मानद सभासदत्व बहाल केले. सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

▫️ विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षणव अंधश्रद्धा निर्मूलन यांविषयीच्या उपक्रमांना त्यांनी पाठबळ पुरवले. मुंबईतील प्रशासकीय, राजकीय सुधारणांमध्येही त्यांनी स्वारस्याने भाग घेतला. 

▫️ १८६९ व १८७१ सालीं अशा दोन वेळा ते मुंबईच्या नगरपालपदासाठी निवडले गेले.

▫️ मे ३१, १८७४ रोजी लाड यांचे निधन झाले.

प्रश्नसंच.

🅾रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी विवेकानंद

🅾आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती

🅾प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर--------- आत्माराम पांडुरंग

🅾सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर----------महात्मा फुले

🅾दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर

🅾इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?उत्तर----------- न्या. रानडे

🅾मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ----------- दादोबा पांडुरंग

🅾निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे

🅾महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
उत्तर ------------- लोकमान्य टिळक

🅾आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------- पंडिता रमाबाई

🅾हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर-------------- महात्मा गांधी

🅾भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले

🅾गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर -------------- विनोबा भावे

🅾सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- रमाबाई रानडे

🅾एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर-------------- न्या. रानडे

🅾परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर------------- दादोबा पांडुरंग

🅾दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🅾सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- ग. वा. जोशी

🅾शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर------------ गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)

🅾 ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर------------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

निवडणूक आयोगाचे अधिकार

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कलम 424(1) मधील कार्यकारीद्वारे निवडणूक आयोगाच्या अधिकारावर नियंत्रण ठेवले जाऊ शकत नाही.याचे अधिकार केवळ निवडणुकांशी संबंधित घटनात्मक उपाययोजना आणि संसदेने बनविलेल्या कायद्याद्वारेच संचालित केले जातात. निवडणुका देखरेख, थेट, नियंत्रण आणि आयोजन करण्याची शक्ती संसद कायदा ज्या देशात असेल तेथे स्वतंत्र व निष्पक्ष निवडणुका घेण्याचेदेखील सूचित केले गेले आहे संबंध गप्प नाही करण्यासाठी असावे निवडणूक आयोगाने अमर्याद शक्ती, तथापि, नैसर्गिक न्याय, कायदा आणि शक्ती वापर नियम आहे
n निवडणूक विधीमंडळ नाही Ullg करू शकता ँ बांधले पद्धत किंवा स्वयंसेवी काम न्यायालयीन पुनरावलोकनास पात्र असे निर्णय घेऊ शकतात
निवडणूक आयोगाचे अधिकार निवडणूक कायद्याच्या पूरक असतात आणि प्रभावी आणि कायदेशीर प्रक्रियेद्वारे बनविलेल्या कायद्याविरुध्द त्यांचा उपयोग करता येणार नाही,
हे आयोग निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणूकीचे वाटप करण्याचे थेट निर्देश आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याचे अधिकार ठरवू शकते . ठेवते
म्हणतो की, तो निवडणूक कार्यक्रम Nirdhari फक्त न्यायासनासमोर आहे की, त्याच्या शक्ती सर्वोच्च न्यायालयात अर्थ लावणे निवडणूक केवळ कार्य करण्यासाठी
कायदा 1951 कलम 14,15 अध्यक्ष लोकप्रतिनिधी, निवडणूक सूचना जारी राज्यपाल अधिकार याद्वारे आयोगाच्या सल्ला नुसार समस्या करण्यासाठी अधिकृत आहे.

🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...