१३ फेब्रुवारी २०२२

वाचा :- महत्त्वाचे प्रश्न उत्तरे

🔴महर्षी कर्व्यांना 3 जून 1916 रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कुणाकडून मिळाली ? 
अमेरिकन वुमेन्स युनिव्हर्सिटी 
मास्को वुमेन्स युनिव्हर्सिटी 
जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी ✅
फ्रान्स वुमेन्स युनिव्हर्सिट

_
🟠 पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?
तात्या टोपे ✅
राणी लक्ष्मीबाई 
शिवाजी महाराज 
नानासाहेब पेशवे
_
🟡 प्राचीन स्मारक कायदा केव्हा पास करण्यात आला?
सन १९०२ 
सन १९०३
सन १९०४✅
सन १९०५

_
🟢 वसंदादा पाटील यांनी वैयक्तिक सत्याग्रह कुठं केला?
1) सांगली ✅
2) कराड
3) सातारा
4) कोल्हाप

_✍

🟣 इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?
लोकमान्य टिळक 
महात्मा गांधी
गोपाळ हरी देशमुख ✅
न्यायमूर्ती रानडे

बुलडाणा जिल्हाच्या राजु केंद्रे यांचा फोर्ब्स मासिकाच्या ‘प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या’ यादीत समावेश

🏵बुलडाणा जिल्हाच्या पिंप्री खंदारे या गावातले शिक्षण क्षेत्रातले कार्यकर्ते राजु केंद्रे यांचा फोर्ब्स या मासिकानं, सामाजिक कार्य उद्यमशीलता या वर्गवारीत, भारतातल्या तीस वर्षांखालच्या ‘प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्वांच्या’ यादीत समावेश केला आहे.

📝 २८ वर्ष वयाचे राजू केंद्रे हे एकलव्य फाउंडेशन या उच्च शिक्षणाशी संबंधित संस्थेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या संस्थेच्या माध्यमातून गरजू आणि वंचित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेतांना येणाऱ्या अडचणी दूर करायचा प्रयत्न केला जातो. राजु केंद्रे यांनी टाटा इन्सिट्यूटमधून ग्रामीण विकास या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ग्रामपरिवर्तन चळवळीच्या माध्यमातून आपल्याच मूळगावी राहून सामाजिक काम सुरु केलं.

✅महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गतही केंद्र यांनी पारधी समाजाच्या विकासासाठीचे उपक्रम राबवले आहेत. सध्या ते लंडन इथं उच्चशिक्षण घेत आहेत. याअंतर्गत ते 'भारतातलं उच्च शिक्षण आणि असमानता' या विषयावर संशोधन करत आहेत. यासाठी त्यांना ब्रिटिन सरकारच्या वतीनं चेवनिंग स्कॉलरशिप दिली आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांची गृह अलगीकरणातून मुक्तता; १४ फेब्रुवारीपासून नवी नियमावली.

🔰जोखमीच्या देशांतून आलेल्या प्रवाशांना आता करोना चाचणी करणे अनिवार्य नाही. प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांनी ७२ तास आधी करोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र अपलोड करणे आता आवश्यक नाही. प्रवासी केवळ लसीकरणाच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवू शकतात.

आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सात दिवस गृहअलगीकरणात राहण्याची आवश्यकता नाही. १४ दिवस त्यांच्या आरोग्याची देखरेख ते स्वत:च करतील.

🔰प्रवास केल्यानंतर आठ दिवसांनी करोना चाचणी करणे अनिवार्य नाही आणि चाचणीचा अहवाल सरकारी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक नाही. त्याऐवजी लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र अपलोड करू शकता.

🔰विमानातील दोन टक्के प्रवाशांची विमानतळावर करोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यांचे नमुने घेतल्यानंतर त्यांना विमानतळाबाहेर पडण्यास परवानगी देण्यात येणार असून त्यांना चाचणीचा अहवाल येण्याची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. ८२ देशांतील संपूर्ण लसीकरण झालेल्या प्रवाशांना ‘अलगीकरण मुक्त’ प्रवेश देण्यासाठी हे नियम लागू आहेत.

हिजाब संदर्भात पाकचे भारतीय राजदूताला पाचारण.

🔰पाकिस्तानने भारताच्या प्रभारी राजदूताला पाचारण करून, कर्नाटकमध्ये मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यावर घातलेल्या बंदीबाबत आपली गंभीर चिंता कळवली.

🔰भारतात मुस्लिमांविरुद्धची कथित धार्मिक असहिष्णुता, नकारात्मक साचेबंद चित्रण आणि भेदभाव याबाबत पाकिस्तानला वाटणारी अतीव चिंता भारतीय राजदूतांना कळवण्यात आली, असे परराष्ट्र कार्यालयाने बुधवारी उशिरा रात्री एका निवेदनात सांगितले.

🔰कर्नाटकमध्ये महिलांचा छळ करणाऱ्या सूत्रधारांना भारतीय सरकारने वठणीवर आणावे आणि मुस्लीम महिलांची सुरक्षा व सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी पुरेसे उपाय योजावेत, यावर भर देण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मुस्लीम मुलींना शिक्षणापासून वंचित करणे हे मूलभूत मानवी अधिकारांचे गंभीर उल्लंघन असल्याचे सांगून पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी कर्नाटकातील हिजाब वादावर भाष्य केल्यानंतर परराष्ट्र कार्यालयाने हे निवेदन जारी केले.

पहिल्या टप्प्यात ६० टक्के मतदान; उत्तर प्रदेश : अनेक केंद्रांवर मतदान यंत्रांत बिघाड; गोंधळाचे वातावरण.

🔰उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी ६० टक्के मतदान झाल़े. काही केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाल़े  मात्र, किरकोळ अपवादवगळता मतदान शांततेत पार पडल़े

🔰उत्तर प्रदेशातील ११ जिल्ह्यांतील ५८ जागांसाठी गुरुवारी मतदान झाल़े  सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७़ ७९ टक्के मतदानाची नोंद झाली़.  ६ वाजेपर्यंत ६०़ ५१ टक्के मतदान नोंदवण्यात आल़े.  मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजता संपली़.  मात्र, त्याआधीच रांगेत असलेल्यांना वाढीव वेळ देऊन मतदानाची परवानगी देण्यात आली, असे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी बी़ डी़ राम तिवारी यांनी सांगितल़े.  त्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी वाढण्याची शक्यता आह़े.

🔰काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये  बिघाड निर्माण झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या़. त्यानुसार संबंधित मतदान यंत्रे बदलण्यात आली आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली, असे तिवारी  यांनी स्पष्ट केल़े  कैराना मतदारसंघांमधील दुंदूखेडा येथे काही मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला़. याबाबत तेथील निवडणूक अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे तिवारी यांनी सांगितल़े

मराठी भाषेसंदर्भात सुप्रिया सुळेंची लोकसभेत मोदी सरकारकडे मोठी मागणी; म्हणाल्या, “येत्या २७ फेब्रुवारीला.

🔰मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मराठी भाषिक प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकारसह साहित्य अकादमीकडे सुद्धा याबाबत पाठपुरावा सुरू आहे. आमच्या मागणीचा विचार करून येत्या २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन आहे. त्यामुळे याच दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केली.

🔰मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाविकास आघाडी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. साहित्य अकादमीकडेही याबाबत सात वर्षांपूर्वीच शिफारस करण्यात आली आहे, असे त्यांनी लक्षात आणून दिले. काही वर्षांपुर्वी तत्कालिन केंद्रीय मंत्र्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले होते.

क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धा - लुकाकूच्या गोलमुळे चेल्सी अंतिम फेरीत.

🔰आघाडीपटू रोमेलू लुकाकूने केलेल्या गोलच्या बळावर चेल्सीने अल हिलाल संघावर १-० अशी मात करत क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

🔰युरोपीय संघांनी या आंतरखंडीय स्पर्धेवर वर्चस्व गाजवले असून मागील १४ पैकी १३ अंतिम सामन्यांत बाजी मारली आहे. अंतिम फेरीत पराभूत होणारा चेल्सी हा एकमेव संघ आहे. २०१२ मध्ये त्यांच्यावर ब्राझीलमधील संघ कोरिन्थिन्सने मात केली होती. यंदा मात्र चेल्सीला ही स्पर्धा जिंकण्याची पुन्हा संधी मिळणार आहे. शनिवारी रंगणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे ब्राझीलमधील संघ पाल्मेरेसचे आव्हान असेल.

🔰तत्पूर्वी, बुधवारी रात्री उशिराने झालेल्या लढतीत अल हिलालने चेल्सीला चांगली झुंज दिली. अल हिलालने भक्कम बचाव करतानाच आक्रमणात गोलच्या काही संधी निर्माण केल्या. मात्र, चेल्सीचा गोलरक्षक केपा अरिझाबलागाने अप्रतिम खेळ करत त्यांना गोल करण्यापासून रोखले. दुसरीकडे ३२व्या मिनिटाला काय हावेत्झच्या पासवर लुकाकूने गोल करत चेल्सीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. अखेर हाच गोल त्यांच्या विजयात निर्णायक ठरला.

तीन वर्षांत २५ हजार आत्महत्या; २०१८ ते २० या कालावधीत कर्जबाजारीपणा, बेरोजगारीचा परिणाम

🔰एकीकडे भविष्यातील विकासाचे चित्र सरकारकडून रंगवून सांगितले जात असताना करोनापूर्व आणि उत्तर काळात आर्थिक अडचणींनी सामान्य नागरिकांचे जिणे किती अवघड झाले होते, याचे चित्रच समोर आलेल्या आत्महत्यांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले.

🔰देशात २०१८ ते २० या तीन वर्षांत बेरोजगारीमुळे ९ हजार १४० तर, कर्जबाजारीपणामुळे १६ हजार ९१ अशा २५ हजार लोकांनी आत्महत्या केल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) दिलेल्या आकडेवारीच्या आधारे केंद्राने आत्महत्यांसंदर्भातील माहिती वरिष्ठ सभागृहात मांडली.

🔰केंद्र सरकार राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवत असून त्याद्वारे देशातील ६९२  जिल्ह्यांमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाला साह्य करत आहे. मानसिक आरोग्य सुधारणा कार्यक्रम व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून आत्महत्या रोखण्याचा केंद्र प्रयत्न करत असल्याचे राय यांनी  सांगितले.

१२ फेब्रुवारी २०२२

देशहितासाठी शेती कायदे मागे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पष्टीकरण


🔰शेती कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणण्यात आले, मात्र लोकांच्या हितासाठी ते मागे घेण्यात आले, असे उत्तर प्रदेश विधानसभेसाठी गुरुवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आदल्या दिवशी, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


🔰आपण नेहमीच शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम केले असून, त्यांनीही आपल्याला पाठिंबा दिला आहे असे मोदी म्हणाले. पाचही राज्यांमध्ये भाजप विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपने नेहमीच स्थैर्यासह काम केले असून, लोकांकडून पक्षाला ‘अँटी- इन्कमबन्सी’ ऐवजी ‘प्रो- इन्कम्बन्सी’चे वातावरण लाभले आहे, असेही त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.


🔰 ‘घराणेशाहीच्या राजकारणावर’ कडाडून हल्ला चढवताना, हा ‘मोठा धोका’ आणि ‘लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू’ असल्याचे मोदी म्हणाले. उत्तर प्रदेशातील ‘बनावट समाजवादी’ या कोटीबाबत स्पष्टीकरण देताना, या पक्षांना केवळ ‘परिवारवादाची’ काळजी असल्याचे त्यांनी सांगितले.


🔰 सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी अमान्य केला. ते म्हणाले की, निवडणुका असल्या तरी या यंत्रणा त्यांच्या निकषांनुसार काम करत असतात. या यंत्रणा भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कारवाई करून राष्ट्रीय संपत्तीची वसुली करत असल्याने सरकारचे कौतुक करायला हवे.


११ फेब्रुवारी २०२२

संयुक्त पूर्व परीक्षा 2021

🔴👆पुढील 1085 पदांकरीता भरतीप्रक्रिया आयोजित   करण्यात येईल:-

सहायक कक्ष अधिकारी-100 पदे
राज्यकर निरीक्षक-609 पदे
पोलीस उपनिरीक्षक-376 पदे

📌📌ही पदे होणाऱ्या 26 फेब्रुवारी च्या परीक्षेसाठीची आहेत याची सर्वांनी नोंद घ्या.

०९ फेब्रुवारी २०२२

फेसबुकच्या शेअर्सची ऐतिहासिक घसरण, मार्क झुकरबर्गला बसला ३१ अब्ज डॉलर्सचा फटका


🔰आत्तापर्यंत जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या १० मध्ये असणारा फेसबुकचा प्रमुख मार्क झुकरबर्ग २०१५नंतर पहिल्यांदाच पहिल्या दहामधून बाहेर पडला आहे. आणि याला कारणीभूत ठरली आहे फेसबुकच्या युजर्सची घटणारी संख्या! बुधवारी फेसबुककडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार फेसबुकच्या युजर्सच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.

🔰गेल्या तिमाहीपेक्षा या तिमाहीमध्ये ही घट मोठी असून हा आकडा गेल्या १७ वर्षांतला सर्वाधिक आहे. त्याचा परिणाम थेट फेसबुकच्या शेअर्सवर झाला असून खुद्द मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत तब्बल ३१ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.

🔰बुधवारी ही आकडेवारी जाहीर झाल्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच फेसबुकची पालक कंपनी असलेल्या मेटाचे शेअर्स घसरू लागले होते. पहिल्या तासाभरातच फेसबुकच्या शेअर्सच्या किंमती २० ते २२ टक्क्यांनी घटल्या होत्या. त्यापाठोपाठ संध्याकाळपर्यंत हे शेअर्स मोठ्या प्रमाणावर खाली आले. याचा फटका मार्क झुकरबर्गसोबतच मेटाच्या इतर प्रमुख सदस्यांना देखील बसला आहे.

ऑलिम्पिकच्या मांडवाआडून चीन-रशिया खलबते


🔰रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे शुक्रवारी बीजिंग येथे आगमन झाले. हिवाळी ऑलिम्पिक सामन्यांच्या उद्घाटन समारंभास हजर राहण्याबरोबरच चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग यांच्याशी चर्चा करणे हा त्यांच्या भेटीचा उद्देश आहे. अमेरिका आणि त्याच्या मित्रपक्षांना शह देण्यासाठी एकजूट दाखविण्याचाही या भेटीचा हेतू असल्याचे मानले जाते.

🔰सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणाव वाढत असून त्याची परिणिती युद्धात होऊ शकते. अशावेळी चीन रशियासोबत उभा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर पुतिन बीजिंगच्या दौऱ्यावर आले आहेत.

🔰बीजिंगमधील या ऑलिम्पिक सोहळय़ासाठी आपला प्रतिनिधी पाठवायचा नाही, असा निर्णय अमेरिका, ब्रिटन आदी मित्रराष्ट्रांनी घेतला आहे. चीनमध्ये मानवी अधिकारांचे उल्लंघन होत असून तेथील युघेर आदी मुस्लीम समुदायांना योग्य वागणूक दिली जात नसल्याचा आरोप या देशांनी केला आहे. अशा स्थितीत पुतीन हेच या सोहळय़ातील प्रमुख पाहुणे आहेत.

सू ची यांच्याविरुद्ध अकरावा खटला


🔰म्यानमारमध्ये वर्षभरापूर्वी निवडणुकीनंतर लष्कराने सत्ता ताब्यात घेत पदच्युत केलेल्या नेत्या आँग सान सू ची यांच्याविरुद्ध पोलिसांनी भ्रष्टाचाराचा अकरावा खटला दाखल केला आहे. शासकीय वृत्तसेवेने ही बातमी दिली आहे.  दी ग्लोबल न्यू लाईट ऑफ म्यानमार या वृत्तपत्रातील बातमीनुसार, सू ची यांच्यावर भ्रष्टाचारविरोधी कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई केली जात आहे. त्यांच्यावर लाचबाजीचा आरोपही आहे. त्यासाठी त्यांना जास्तीत जास्त १५ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

🔰गेल्या वर्षी १ फेब्रुवारीला लष्कराने सू ची यांना ताब्यात घेतल्यापासून त्यांच्यावर अनेक आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांना पुन्हा सक्रिय राजकारणात परतता येऊ नये याच उद्देशाने हे खटले दाखल केले जात आहेत, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. देशात २०२३ मध्ये निवडणूक घेण्याचे आश्वासन लष्कराने दिले आहे. 

🔰याआधी बेकायदा वॉकीटॉकी बाळगल्याप्रकरणी तसेच करोनानिर्बंधांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली सू ची यांना सहा वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. गोपनीयता कायद्याखालीही त्यांच्यावर खटला सुरू असून त्यात जास्तीत जास्त १४ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

टेस्ला’च्या आयातीत अडचण ; इलेक्ट्रिक वाहनासाठी करसवलतीची मागणी भारताने फेटाळली

🔰इलेक्ट्रिक कार आयात करण्यासाठी कर सवलत देण्याची अमेरिकी उद्योगपती इलोन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची मागणी भारताने फेटाळली आहे. ती फेटाळताना, अंशत: बांधलेली वाहने आयात करण्याबाबत आणि त्यांची उर्वरित जोडणी भारतात करण्यासाठी कमी कर आकारणीचा नियम आधीपासून लागू असल्याचे कारण देण्यात आले आहे.

🔰केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष विवेक जोहरी म्हणाले, ‘‘आयात शुल्कात पुन्हा बदल करणे आवश्यक आहे की किंवा काय हे आम्ही तपासले, परंतु देशात सध्या काही वाहननिर्मिती सुरू आहे आणि काही गुंतवणूकही सध्याच्याच कररचनेनुसार आली आहे. त्यामुळे कर किंवा शुल्क आकारणी हा टेस्लापुढील अडथळा नाही, हे स्पष्टच आहे.’’ केंद्र सरकारने मागणी केल्यानंतरही ‘टेस्ला’ने स्थानिक पातळीवर उत्पादनासाठी आणि भारतातून खरेदीसाठी अद्याप आपली योजना सादर केलेली नाही, असेही जोहरी यांनी स्पष्ट केले.

🔰भारत सरकारने मस्क यांच्या ‘टेस्ला’ कंपनीला स्थानिक पातळीवर इलेक्ट्रिक वाहननिर्मितीस प्रोत्साहन देण्याचा विचार आहे. परंतु मस्क यांची अशी इच्छा आहे की आयात केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांवर भारताने १०० टक्के करसवलत द्यावी, जेणेकरून कंपनीला स्पर्धात्मक किमतीत इतरत्र निर्मिती केलेल्या वाहनांची प्रथम विक्री करता येईल. परंतु देशात जोडणीसाठी आयात होणाऱ्या भागांवर सध्या १५ ते ३० टक्क्यांदरम्यान आयात शुल्क आकारण्यात येत आहे.

०६ फेब्रुवारी २०२२

सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे

Q : कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी ____ हे अभिरंजक वापरले जाते?
(अ) सॅफ्रनिन
(ब) आयोडीन ✅
(क) इसॉसिन 
(ड) मिथेलिन ब्लू

Q :__________ झाडाला कणखर आणि टणक बनवते?
(अ) स्थूलकोन
(ब) मूल ऊती
(क) दृढकोण ऊती ✅
(ड) वायू ऊती

Q : मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ पोरिफेरा या संघातील प्राण्यांची खालीलपैकी प्रमुख लक्षणे कोणती?
(अ) खाऱ्या पाण्यात राहणारे
(ब) शरीरावर शुकिकांचे आवरण असते
(क) प्रचलन न करणारे
(ड) वरील सर्व बरोबर  ✅

Q : अँनिलिडा सृष्टीतील खालीलपैकी प्राणी कोणते?
(अ) गांडूळ 
(ब) लीच (जळू)
(क) नेरीस
(ड) वरील सर्व ✅

Q : खालील वर्णनावरून मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ ओळखा:
(1) सर्वात मोठा प्राणी संघ (2) एकलिंगी प्राणी, लैंगिक प्रजनन करतात (3) डोके, वक्ष व उदार असे शरीराचे तीन भाग असतात.
(अ) मोलुस्का
(ब) आर्थोपोडा ✅
(क) एकायनोडर्माटा
(ड) सीलेंटेराटा

Q : एकायनोडर्माटा पाणी संघातील खालीलपैकी प्राणी कोणते?
(अ) तारामासा
(ब) सी- ककुंबर
(क) सी-अर्चिन
(ड) ऑफिऑथ्रिक्स
(इ) वरील सर्व ✅

Q : एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजांचा आहे?
(अ) लोहखनिज
(ब) मॅंगनीज
(क) कोळसा ✅
(ड) यापैकी नाही

Q : बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे _ मिळविण्यासाठी केला जातो?
(अ) लोह
(ब) मॅंगनीज
(क) तांबे
(ड) अँल्युमिनियम ✅

Q : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बांद्रामधून जपानला खालीलपैकी कोणत्या धातूची निर्यात होते?
(अ) लोहखनिज ✅
(ब) मॅंगनीज
(क) तांबे
(ड) बॉक्साईट

Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो?
(अ) सिलिका 
(ब) मॅंगनीज
(क) लोहखनिज ✅
(ड) बॉक्साईट

Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा / प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळतो?
(अ) मॅंगनीज 
(ब) लोहखनिज✅
(क) सिलिका
(ड) बॉक्साईट

लता मंगेशकर यांच्याबद्दल परीक्षाभिमुख माहिती..

➡️ जन्म - 29 सप्टेंबर 1929
➡️ मृत्यु - 6 फेब्रुवारी 2022

भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज (६ फेब्रुवारी) मुंबईत निधन झाले💐

भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे.  प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

🔷 लता दीदींना मिळालेले पुरस्कार :-
🔹फिल्मफेअर पुरस्कार (1958, 1962, 1965, 1969, 1993 आणि 1994)
◆ राष्ट्रीय पुरस्कार (1972, 1975 आणि 1990)
🔸महाराष्ट्र शासन पुरस्कार (1966 आणि 1967)
🔹1969 - पद्मभूषण
🔸1974 - जगातील सर्वाधिक गाण्यांचा गिनीज बुक रेकॉर्ड
🔹1989 - दादासाहेब फाळके पुरस्कार
🔸1993 - फिल्मफेअर लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड
🔹1996 - स्क्रीन जीवनगौरव पुरस्कार
🔸1997 - राजीव गांधी पुरस्कार
🔹1999 - पद्मविभूषण
◆ 1999 - NTR बक्षीस
🔸1999 - झी सिनेचा जीवनगौरव पुरस्कार
🔹2000 - I.I.A. एफ. चे जीवनगौरव पुरस्कार
🔸2001 - स्टारडस्ट जीवनगौरव पुरस्कार
🔹2001 - भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार "भारतरत्न"
🔸2001 - नूरजहाँ पुरस्कार
🔹2001 - महाराष्ट्र भूषण
➡️ लता मंगेशकर यांंच्या जीवनावर आणि कार्यावर लिहिलेली पुस्तके

➡️लता (इसाक मुजावर)

➡️लता : संगीत क्षेत्रातील चंद्रमा (सांज शकुन प्रकाशन)

➡️लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण करणारे ’स्वरयोगिनी’ नावाचे पुस्तक मधुवंती सप्रे यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायिलेल्या चित्रपटगीतांची यादी आहे.

➡️The Voice of a Nation (मूळ लेखिका पद्मा सचदेव; मराठी अनुवाद : 'अक्षय गाणे' जयश्री देसाई)

➡️ऐसा कहाँ से लाऊँ (हिंदी- पद्मा सचदेव)

➡️लतादीदी आणि माझ्या कविता (सुचित्रा कातरकर)

➡️लतादीदी : अजीब दर्शन हैं यह (मूळ लेखक : हरीश भिमाणी-हिंदी); (मराठी अनुवाद : 'लतादीदी' अशोक जैन.)

➡️Lata in her own voice (नसरीन मुन्नी कबीर)

➡️लता मंगेशकर (चरित्र)- राजू भारतन

➡️लता मंगेशकर गंधार स्वरयात्रा (१९४५- १९८९) - संपादन : विश्वास नेरूरकर

➡️गाये लता, गाये लता- डॉ.मंगेश बिच्छू. प्रकाशक- पल्लवी प्रकाशन

➡️हे रत्‍न भारताचे - लता मंगेशकर (लेखक : रेखा चवरे)

➡️मोगरा फुलला (संपादक : रेखा चवरे)

➡️संगीतक्षेत्रातील चंद्रमा (प्रसाद महाडकर, विवेक वैद्य)

➡️सप्तसुरांच्या पलीकडे : लता मंगेशकर (हरीश भिमाणी)

➡️लता मंगेशकर - संगीत लेणे (मोरया प्रकाशन)

➡️ लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे. सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते

राज्यपाल अध्यादेश केव्हा जारी करू शकतात ?.

▪️अध्यादेश जारी करण्यासाठी परिस्थिती उद्भवली असल्याची राज्यपालांची खात्री पटल्यास, त्या परिस्थितीनुसार आवश्यक वाटतील असे अध्यादेश राज्यपालांना प्रख्यापित (जारी) करता येतात.

🎯राज्यपालांच्या अध्यादेश जारी करण्याच्या अधिकारावरील मर्यादा.

▪️परंतु, ज्या अध्यादेशातील तरतुदींसारख्याच तरतुदी,

📌अंतर्भूत असणारे कोणतेही विधेयक विधानमंडळात मांडण्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वमंजुरी आवश्यक असेल; किंवा

📌अंतर्भूत असणारे कोणतेही विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे राज्यपालाला आवश्यक वाटले असेल; किंवा

📌अंतर्भूत असणारा राज्य विधानमंडळाचा एखादा अधिनियम, राष्ट्रपतीच्या विचारार्थ ठेवला जाऊन त्याला राष्ट्रपतीची अनुमती मिळाली नसल्यामुळे तो अधिनियम अविधिग्राह्य झाला असेल,

📌असा कोणताही अध्यादेश, राज्यपाल, राष्ट्रपतीकडून संमती मिळाल्याशिवाय प्रख्यापित (जारी) करू शकणार नाही.
━━━━━━━━━━━━━

लता मंगेशकर यांंच्या जीवनावर आणि कार्यावर लिहिलेली पुस्तके



लता (इसाक मुजावर)


लता : संगीत क्षेत्रातील चंद्रमा (सांज शकुन प्रकाशन)


लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण करणारे ’स्वरयोगिनी’ नावाचे पुस्तक मधुवंती सप्रे यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायिलेल्या चित्रपटगीतांची यादी आहे.


The Voice of a Nation (मूळ लेखिका पद्मा सचदेव; मराठी अनुवाद : 'अक्षय गाणे' जयश्री देसाई)


ऐसा कहाँ से लाऊँ (हिंदी- पद्मा सचदेव)


लतादीदी आणि माझ्या कविता (सुचित्रा कातरकर)


लतादीदी : अजीब दर्शन हैं यह (मूळ लेखक : हरीश भिमाणी-हिंदी); (मराठी अनुवाद : 'लतादीदी' अशोक जैन.)


In search of Lata Mangeshkar. (इंग्रजी - हरीश भिमाणी)


Lata in her own voice (नसरीन मुन्नी कबीर)


लता मंगेशकर (चरित्र)- राजू भारतन


लता मंगेशकर गंधार स्वरयात्रा (१९४५- १९८९) - संपादन : विश्वास नेरूरकर


गाये लता, गाये लता- डॉ.मंगेश बिच्छू. प्रकाशक- पल्लवी प्रकाशन


हे रत्‍न भारताचे - लता मंगेशकर (लेखक : रेखा चवरे)


मोगरा फुलला (संपादक : रेखा चवरे)


संगीतक्षेत्रातील चंद्रमा (प्रसाद महाडकर, विवेक वैद्य)


सप्तसुरांच्या पलीकडे : लता मंगेशकर (हरीश भिमाणी)


लता मंगेशकर - संगीत लेणे (मोरया प्रकाशन)

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...