१९ ऑक्टोबर २०२१

गुणसूत्राच्या अपसामान्यतेमुळे निर्माण होणारे विकृती

1. डाऊन्स सिंड्रोम (मंगोलिकता)
- 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात
- 21 व्या गुणसूत्राची त्रिसमसूत्री अवस्था

2. टर्नर सिंड्रोम (टर्नर संलक्षण)
- कमी गुणसूत्रामुळे
- स्त्रीयांमध्ये आढळतो

3. क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम (क्लाईनफेल्टर्स संलक्षण)
- जास्त गुणसूत्रामुळे
- पुरूषांमध्ये आढळतो

● एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे रोग / एकजनुकीय विकृती

1. वर्णकहीनता (Albinism)
- मेलॅनिन या रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे

2. दात्रपेशी पांडूरोग (सिकलसेल अॅनिमिया)
- गर्भधारणेच्या वेळी जनुकीय बदलांमुळे हा आजार होतो.
- आनुवांशिक आजार

नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत

दोन कृत्रिम ऊर्जास्त्रोत असे दोन प्रकार पडतात तसेच ऊर्जास्त्रोतांचा निर्माणा नुसार दोन गट पडतात

1 पुनर्निर्मितीक्षम ऊर्जास्त्रोत

ज्या ऊर्जा स्रोतांपासून पुन्हा पुन्हा ऊर्जा मिळवता येते अशा उर्जा स्त्रोतांना  पुनर्निर्मितीक्षम ऊर्जास्रोत असे म्हणतात.

उदाहरण 1 सौर ऊर्जा

2 पवन ऊर्जा

3 लाटांपासून ऊर्जा

4 भू-औष्णिक ऊर्जा

5 जैविक ऊर्जा

या उर्जास्त्रोतांना अपारंपारिक ऊर्जास्त्रोत असे म्हणतात

या प्रकारांमध्ये सौर ऊर्जा पवन ऊर्जा भोजने kurja इत्यादींचा समावेश होतो

पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा स्त्रोतांचे फायदे

1 या प्रकारच्या ऊर्जा स्त्रोतांपासून ऊर्जा अखंड मिळत राहणार आहे

2 या प्रकारची ऊर्जा प्राप्त करण्यासाठी कोणताही मोबदला अथवा गुंतवणूक करावी लागत नाही 3 प्रकारच्या ऊर्जेचा वापर केल्यामुळे प्रदूषण होत नाही

दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Dew Point & Humidity)

◆ तलाव, नदया आणि सागर यांच्यातील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात पाण्याचे बाष्प असते.

◆ वातावरणात असणार्‍या पाण्याच्या वाफेचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. वातावरणामध्ये असणार्‍या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूप समजण्यास मदत होते.

◆ जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा हवेत असलेली पाण्याची वाफ संतृप्त (Staturated) होते. त्यामुळे बाष्पाचे लहान थेंब बनतात.

◆ ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास 'दवबिंदू तापमान' म्हणतात. हवेमध्ये असणार्‍या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असते.

◆ हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यालाच 'आर्द्रता' म्हणतात.

◆ ज्या राशीच्या सहाय्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे शेकडा प्रमाण मोजले जाते तिला निरपेक्ष आर्दता (Absolute Humidity) असे म्हणतात.

◆ एकक आकारामानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास 'निरपेक्ष आर्द्रता' असे म्हणतात.

◆ सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही Kg/m3मध्ये मोजतात.

◆ हवा संतृप्त होण्यासाठी लागणार्‍या बाष्पाचे प्रमाण तापमानावर अवलंबून आहे.

◆ हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प सामावले असेल तर ती हवा 'असंतृप्त' आहे असे म्हटतात.

◆ जर हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्यात बाष्पाच्या प्रमाणापेक्षा हवेतील बाष्प खूपच कमी असेल तर ती हवा कोरडी असल्याचे आपणास जाणवते.

◆ याउलट हवेतील बाष्पाचे प्रमाण ती हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्याव बाष्पाच्या प्रमाण सापेक्ष संतृप्त हवेपेक्षा किंचित कमी असेल तर हवा दमट आहे असे जाणवते.

◆ हवेच्या दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्र्तेच्या रूपात मोजतात.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ हवेमध्ये ठराविक आकारमानात प्रत्यक्ष समाविष्ट असलेल्या बाष्पाचे वस्तुमान व तेच आकारमान त्याच तापमानास संतृप्त करण्यासाठी आवश्यक असणार्याआ पाण्याचे वस्तुमान याच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता असे म्हणतात.

◆ सापेक्ष आर्द्रता शेकडेवारीत सांगतात.

◆ दवबिंदू तापमानास हवेची सापेक्ष आर्द्रता 100% असते.

◆ जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल टीआर हवा दमट असल्याचे जाणवते. 60% पेक्षा कमी असेल तर हवा कोरडी असल्याचे जाणवते.

◆ थंड जमीन तिच्या सान्निध्यात येणारी हवा दवबिंदू तापमानापेक्षा कमी तापमानापर्यंत थंड करते. जेव्हा हवेतील बाष्पाचे संघनन (condensation) होते तेव्हा धुके (Fog) तयार होते.

◆ जेव्हा गरम हवा थंड जमीन किंवा समुद्रावरून वाहते तेव्हा सुद्धा धुके तयार होते. सागरी धुके (Sea Fog) यामुळे तयार होते.

◆ उंचावरून जाणार्‍या विमानाच्या मागे पांढरी तेजोरेखा(त्राईल) दिसते. विमान उडत असताना इंजीनापासून निघणार्‍या वाफेचे संघनन होऊन ढग तयार होतात.

◆ जर सभोवतालच्या वातावरणातील हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर तेजोरेखा लांबच लांब दिसते.

◆ जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर लहान तेजोरेखा तयार होते किंवा तयार सुद्धा होत नाही.

विज्ञान - शोध व संशोधक


01) विमान – राईट बंधू

02) डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल

03) रडार - टेलर व यंग

04) रेडिओ - जी. मार्कोनी

05) वाफेचे इंजिन - जेम्स वॅट

06) थर्मामीटर - गॅलिलीयो

07) हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

08) विजेचा दिवा - एडिसन

09) रेफ्रीजरेटर - पार्किन्स

10) वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस

11) सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

12) सायकल - मॅकमिलन

13) डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल

14) रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी

15) टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल

16) ग्रामोफोन - एडिसन

Join : @Targetsarkarijobin

17) टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड

18) पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग

19) उत्क्रांतिवाद - डार्विन

20) भूमिती - युक्लीड

21) देवीची लस - जेन्नर

22) अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस

23) अँटी रेबीज -लुई पाश्चर

24) इलेक्ट्रोन – थॉमसन

25) हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश

26) न्यूट्रोन – चॅडविक

27) आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर

28) विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे

29) कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल

30) गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

महाराष्ट्र पोलीस भरती IMP मराठी व्याकरण

अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा - अष्टावधानी

अनेक केळ्यांचा समूह - घड

अनेक गुरांचा समूह - कळप

अनेक फळांचा समूह - घोस

अनेक फुलांचा समूह - गुच्छ

अनेक माणसांचा समूह - जमाव

अंग चोरून काम करणारा - अंगचोर

अस्वलाचा खेळ करणारा - दरवेशी

ईश्वर आहे असे मानणारा - आस्तिक

उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह - धबधबा

ऐकायला येत नाही असा - बहिरा

ऐकायला व बोलायला येत नाही असा - मूकबधीर

कथा सांगणारा - कथेकरी

कधीही जिंकला न जाणारा - अजिंक्य

कपडे धुण्याचे काम करणारा - धोबी

कपडे शिवण्याचे काम करणारा - शिंपी

कष्ट करून जगणारा - श्रमजीवी

कमी आयुष्य असणारा - अल्पायुषी

कर्तव्य तत्परतेने पार पडणारा - कर्तव्यदक्ष
कापड विणणारा - विणकर

कादंबरी लिहिणारा लेखक - कादंबरीकार

कविता करणारी - कवयित्री

किल्ल्याच्या सभोवतालची भिंत - तट

केवळ स्वतःचाच फायदा करू पाहणारा - स्वार्थी

केलेले उपकार जाणणारा - कृतज्ञ

केलेले उपकार विसरणारा - कृतघ्न

कैदी ठेवण्याची जागा - तुरुंग

कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्ट बदल - क्रांती

खूप दानधर्म करणारा - दानशूर

खूप आयुष्य असणारा - दीर्घायुषी

खूप पाऊस पडणे - अतिवृष्टी

गुरे राखणारा - गुराखी

घरदार नष्ट झाले आहे असा - निर्वासित

घरापुढील मोकळी जागा - अंगण

घरे बांधणारा - गवंडी

चार रस्ते एकत्र येतात ती जागा - चौक

चांदण्या रात्रीचा पंधरवडा - शुक्लपक्ष

चित्रे काढणारा - चित्रकार

जमिनीवर राहणारे प्राणी - भूचर

जादूचे खेळ करून दाखवणारा - जादूगार

जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे भासणे - आभास

जेथे वस्तू विकल्या जातात ती जागा - दुकान

ज्याचे वर्णन करणे शक्य नाही ते - अवर्णनीय

ज्याचे कधी विस्मरण होत नाही ते - अविस्मरणीय

ज्याला एकही शत्रू नाही असा - अजातशत्रू

ज्याला आईवडील नाहीत असा - अनाथ, पोरका

ज्याला मरण नाही असा - अमर

ज्याला कधी म्हातारपण येत नाही असा - वजर

ठरावीक काळाच्या अंतराने प्रकाशित होणारे - नियतकालिक

एकत्र येतात ती जागा - तिठा

झाडांची निगा राखणारा - माळी

तिथी (दिवस, वेळ) न ठरवता (अचानक) आलेला - अतिथी

दगडावर कोरलेले लेख - शिलालेख

दगडावर मूर्ती घडवणारा - शिल्पकार

दररोज प्रसिद्ध होणारे - दैनिक

दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे - साप्ताहिक

दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे - पाक्षिक

दर महिन्याला प्रसिद्ध होणारे - मासिक

दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे - त्रैमासिक

दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे - षण्मासिक

दर वर्षाला प्रसिद्ध होणारे - वार्षिक

दारावरील पहारेकरी - द्वारपाल, दरवान

दुष्काळात सापडलेले - दुष्काळग्रस्त

दुसर्यावर अवलंबून असणारा - परावलंबी

दुसर्यावर उपकार करणारा - परोपकारी

दूरदर्शनवर, आकाशवाणीवर बातम्या
सांगणारा - वृत्तनिवेदक

देशाची सेवा करणारा - देशसेवक

देवापुढे सतत जळणारा दिवा - नंदादीप

दोन किंवा अनेक नद्या एकत्र येतात ते ठिकाण - संगम

धान्य साठवण्याची जागा - कोठार

नदीची सुरवात होते ती जागा - उगम

नाटकांत किंवा चित्रपटांत काम करणारा - अभिनेता

नेहमी घरात बसून राहणारा - घरकोंबडा
पाऊस अजिबात न पडणे - अवर्षण

पायात चपला वा बूट न घालता चालणारा - अनवाणी

पायापासून डोक्यापर्यंत - आपादमस्तक
पालन करणारा - पालक

पायी चालणारा - पादचारी

पुरामुळे नुकसान झालेला - पूरग्रस्त

पूर्वी कधी घडले नाही असे - अभूतपूर्व, अपूर्व

फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण - सदावर्त, अन्नछत्र

बसगाड्या थांबण्याची जागा - बसस्थानक

बातमी आणून देणारा/देणारी - वार्ताहर

बोलता येत नाही असा - मुका

भाषण ऐकणारा - श्रोता

भाषण करणारा - वक्ता

माकडाचा खेळ करणारा - मदारी

मातीची भांडी करणारा - कुंभार

अलंकार

अलंकार म्हणजे दागीणे होय

कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार. मराठीत आलेले बहुतेक अलंकार संस्कृतमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत, तीच मराठीतही.

शब्दालंकार

अर्थालंकार

यमक

कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा शब्दालंकार होतो.

उदा :

🔷जाणावा तो ज्ञानी
पूर्ण समाधानी
निःसंदेह मनी
सर्वकाळ

🔷पहिला पाऊस पडला
सुगंध सर्वत्र दरवळला

पुष्ययमक

सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो.

दामयमक

🔹आला वसंत कविकोकिल हाही आला
आलापितो सुचवितो अरुणोदयाला

🔹पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

🔹तल्लिले मधि तल्लीन न हो कल्लोलिनी! कवी कवण तरी?
जय संजीवनी जननी पयोदे श्रीगोदे! भवताप हरी

श्लेष

एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.

उदा :

🌿सूर्य उगवला झाडीत...
झाडूवाली रस्ता झाडीत...
शिपाइ गोळ्या झाडीत...
अन् वाघहि तंगड्या झाडीत...

🌿राम गणेश गडकरीकृत हे एक "झाडीत" या शब्दावरील श्लेषाचे उदाहरण

अर्थश्लेष

वाक्यात दोन अर्थ असणाऱ्या शब्दाबद्दल दुसऱ्या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.

उदा :

🔹तू मलिन, कुटिल, नीरस जडहि पुनर्भवपणेहि कच साच

सभंग श्लेष

उदा :

🔹श्रीकृष्ण नवरा मी नवरी
शिशुपाल नवरा मी न-वरी

🔹कुस्करू नका ही सुमने
जरी वास नसे तिळ यांस, तरी तुम्हांस अर्पिली सु-मने

🔹ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले
औषध नलगे मजला,औषध नल-गे मजला, परिसुनि माता 'बरे' म्हणूनी डोले

Online Test Series

१८ ऑक्टोबर २०२१

महात्मा गांधी NREGA योजनेसाठी ‘हवामान लवचिकता माहिती प्रणाली आणि नियोजन’ (CRISP-M) टूल विकसित.


🔰महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA) अंतर्गत ‘हवामान लवचिकता माहिती प्रणाली आणि नियोजन (CRISP-M / Climate Resilience Information System and Planning) टूलचे अनावरण केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री श्री गिरिराज सिंह यांनी 13 ऑक्टोबर 2021 रोजी केले.


🔴ठळक बाबी..


🔰महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA) अंतर्गत भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आधारित पाणलोट नियोजनामध्ये हवामान माहिती एकत्रित करण्यासाठी हे डिजिटल साधन विकसित करण्यात आले आहे.ते ब्रिटन देशाच्या मदतीने विकसित करण्यात आले आहे.


🔰ह साधन सात राज्यांमध्ये वापरले जाईल जिथे ब्रिटन सरकारचे फॉरेन कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिस (FCDO) आणि भारताचे ग्रामीण विकास मंत्रालय संयुक्तपणे हवामान लवचिकतेच्या दिशेने काम करीत आहेत. 


🔰बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि राजस्थान ही ती राज्ये आहेत.


🔰CRISP-M मनरेगा योजनेच्या GIS आधारित नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये हवामानविषयक माहिती जोडण्यास मदत करेल. त्यामुळे ग्रामीण समुदायासाठी हवामान बदलांसंबंधीच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी नवीन शक्यता खुल्या होतील.

बंगालमध्ये र्लॉड क्लाईव्ह पुरस्कृत दुहेरी राज्यव्यवस्था -

🔸बंगालच्या नबाबने फेब्रुवारी 1765 मध्ये निजामतीचे (लष्करी, फौजदारी, न्यायनिवाडा) अधिकार कंपनीकडे दिले.

🔹16 ऑगस्ट 1765 मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार, ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले.

🔸त्यामुळे कंपनीच्या हाती निजामती आणि दिवाणीचे आकार केंदि्रत झाले. पंरतू प्रत्यक्षात सुपूर्ण राजकीय सज्ञ्ल्त्;ाा कंपनीने स्वत:कडे घेतली नाही कारण ब्रिटिश संसदेचे कंपनीवरील नियंत्रण व हस्तक्षेपाची आणि अंतर्गत बाहय शत्रु यांची कंपनीला भीती वाटत होती.

🔸भारतीय शासनपध्दतीची माहिती असणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नव्हता, म्हणून र्लॉड क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली कंपनीने दिवाणी करवसुली व न्यायदान अधिकार नबाबाकडे ठेवला व्यापार सैन्य, परराष्ट्र, व्यवहार आणि खजिना इ. महत्वाची कार्ये कंपनीने स्वत:कडे ठेवली अशा प्रकारे नबाब आणि कंपनी यांच्यात सज्ञ्ल्त्;ाा विभागली गेली म्हणूनच तिला दुहेरी राज्यव्यस्था असे म्हणतात.

🔹या कार्यासाठी बंगालच्या नबाबला 53 लाख रुपयांची पेन्शन देण्यात आली. 1765-1772 या काळात बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात होती.

🔹या व्यवस्थेमुळे गोंधळ व भाषांतरांवरूनरष्टाचार निर्माण झाल्याने 1772 मध्ये वॉरन हेस्टिंग्जने बंद केली.

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे.

🧩अमरावती जिल्हा:

🅾ऊर्ध्व वर्धा धरण

🧩अहमदनगर जिल्हा :

🅾 आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)

🧩औरंगाबाद जिल्हा :

🅾 गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे

🧩 उस्मानाबाद जिल्हा :

🅾तेरणा धरण

🧩कोल्हापूर जिल्हा :

🅾 रंकाळा तलाव

🧩गडचिरोली जिल्हा :

🅾दिना

🧩 गोंदिया जिल्हा :

🅾इटियाडोह

🧩चंद्रपूर जिल्हा :

🅾पेंच आसोलामेंढा

🧩जळगाव जिल्हा :

🅾अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा,पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)

🧩ठाणे जिल्हा :

🅾भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे

🧩धुळे जिल्हा :

🅾अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव

🧩नंदुरबार जिल्हा :

🅾यशवंत तलाव,

🧩 नागपूर जिल्हा :

🅾उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.

🧩नांदेड जिल्हा :

🅾 इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण

🧩 नाशिक जिल्हा :

🅾अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण

🧩 परभणी जिल्हा :

🅾कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णासिद्धेश्वर, येलदरी धरण

🧩 पुणे जिल्हा :

🅾आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेटधरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगावधरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)

🧩 बुलढाणा जिल्हा :

🅾खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी

🧩बीड जिल्हा :

🅾माजलगाव धरण,मांजरा धरण

🧩भंडारा जिल्हा :

🅾इंदिरासागरप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूरप्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्दप्रकलप

🧩मुंबई जिल्हा :

🅾मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी

🧩यवतमाळ जिल्हा:

🅾पूस ,अरुणावती ,बेंबळा

🧩वर्धा जिल्हा :

🅾ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकालीजलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोरप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प (एकूण १४)

🧩 सातारा जिल्हा :

🅾उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)

🧩सिंधुदुर्ग जिल्हा :

🅾तिलारी धरण,देवधर धरण

🧩सोलापूर जिल्हा :

🅾आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणीतलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)

🧩हिंगोली जिल्हा :

🅾येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार

🌿1. व्दिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.

 

🌿2. भूशीर - व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.

 

🌿3. खंडांतर्गत समुद्र - मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.

🌿4. बेट - एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.

 

🌿5. समुद्रधुनी - काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.

 

🌿6. संयोगभूमी - दोन खंडांना जो डणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.

 

. 🌿आखात - उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.

 

🌿8. खाडी - आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.

 

🌿9. समुद्र किंवा सागर - महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.

उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र

 

🌿10. उपसागर - खार्‍या पाण्याच्या ज्या जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर

🔹भारतातील प्रमुख आदिवासीजमाती


जमात                  राज्य
अबोर                  अरुणाचल प्रदेश
आपातनी             अरुणाचल प्रदेश
आओ                  नागाल्यांड
अंगामी                 नागाल्यांड
कोल                   छत्तीसगढ
कोटा                   तामिळनाडू
मुंडा                    झारखंड
कोलाम                आंध्र प्रदेश
छुतीया                आसाम
चेंचू                     आंध्र प्रदेश
गारो                    मेघालय, आसाम, नागाल्यांड
बैगा                     छत्तीसगढ,झारखंड
भिल्ल                    राजस्थान, छत्तीसगढ
बदगा                   निलगिरी पर्वत तामिळनाडू
भोट                    हिमाचल प्रदेश
लेपचा                  सिक्कीम
वारली                  महाराष्ट्र
चकमा                  त्रिपुरा
गड्डी                     हिमाचल प्रदेश
जयंती                  मेघालय
बोदो                    आसाम
खासी                  आसाम, मेघालय, नागाल्यांड
गोंड                     महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ
लुशिया                 त्रिपुरा
मोपला                  केरळ
भुतिया                  उत्तरांचल
जारवा                   छोटे अंदमान
कुकी                    मणिपूर
कुरुख                  झारखंड, ओरीसा
अका,मिश्मी,         अरुणाचल प्रदेश
डाफला                अरुणाचल प्रदेश
कोरबा                 छत्तीसगड, महारष्ट्र
हो                       छोटा नागपूर
मुरीया                  बस्तर छोटा नागपूर
संथाल                  वीरभूम,झारखंड
गुज्जर                  हिमाचल प्रदेश
खोंड                     ओरिसा
मिकिर                  आसाम
उरली                  केरळ
मीना                    राजस्थान
ओरेओन              पश्चिम बंगाल, झारखंड
तोडा                    निलगिरी पर्वत तामिळनाडू

RBI ची कार्ये

🟣 परंपरागत कार्ये

१) चलननिर्मितीची मक्तेदारी
२) सरकारची बँक
३) बँकांची बँक
४) अंतिम ऋणदाता / अंतिम त्राता
५) निरसन गृह
६) पतनियंत्रण/किंमत स्थैर्य
७) परकीय चलन साठ्याचा सांभाळ
८) विनिमय दर स्थैर्य राखणे
९) अर्थविषयक आकडेवारी प्रसिद्ध करणे

🟠 पर्यवेक्षणात्मक कार्य

1) बँकांना परवाना देणे
२) शाखा परवाना पद्धती
३) बँकांची तपासणी
४) बँकांच्या कार्यपद्धतीचे नियंत्रण
५) बँकांच्या व्यवस्थापनावरील नियंत्रण
६) बँकांच्या विलीनीकरणवर नियंत्रण
७) वित्तीय पर्यवेक्षण मंडळ
तसेच, पर्यवेक्षण विभागाची स्थापना

  🟢 प्रवर्तनात्मक कार्ये

१) व्यापारी बँकव्यवसायाचे प्रवर्तन
२) सहकारी बँकव्यवसायाचे प्रवर्तन
३) कृषी व ग्रामीण पतपुरवठ्याचे प्रवर्तन
४) औद्योगिक वित्तपुरवठ्याचे प्रवर्तन
५)निर्यात वित्तपुरवठ्याचे प्रवर्तन

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...