०८ एप्रिल २०२१

भारतीय सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेल्या महिला

♻️


📌 फातिमा बीबी 

👉 कार्यकाळ : १९८९ ते १९९२


📌 सजाता मनोहर 

👉 कार्यकाळ : १९९४ ते १९९९


📌 रमा पाल 

👉 कार्यकाळ : २००० ते २००६ 


📌 जञानसुधा मिश्रा 

👉 कार्यकाळ : २०१० ते २०१४


📌 रजना देसाई 

👉 कार्यकाळ : २०११ ते २०१४


📌 आर भानुमथी 

👉 कार्यकाळ : २०१४ ते २०२०


📌 इदु मल्होत्रा 

👉 कार्यकाळ : २०१८ ते २०२१


📌 इदिरा बॅनर्जी 

👉 कार्यकाळ : २०१८ ते २०२२ पर्यंत .

.

चालू घडामोडी- 2020


#1 : ग्लोबल हंगर इंडेक्स 2020 मध्ये भारताने कोणत्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे?

(अ) 74 वा

(ब) 94 वा✔️✔️

(क) 80 वा

(ड) 70 वा


#2  :आंतरराष्ट्रीय गरीबी उन्मूलन दिन कधी साजरा केला जातो?

(अ) 15 ऑक्टोबर✔️✔️

(ब) 14 ऑक्टोबर

(क) 18 ऑक्टोबर

(ड) 17 ऑक्टोबर✔️✔️


#3  :कोणत्या देशातील वेगवान गोलंदाज उमर गुलने 16 ऑक्टोबर 2020 रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली?

(अ) पाकिस्तान✔️✔️

(ब) अफगाणिस्तान

(क) दक्षिण आफ्रिका

(ड) ऑस्ट्रेलिया


#4 :भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची कितवी जयंती 15 ऑक्टोबर 2020 रोजी साजरी केली गेली?

(अ) 80 वी

(ब) 89 वी✔️✔️

(क) 99 वी

(ड) 78 वी




#5  : आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी 'थॅलेसीमिया बाल सेवा योजने'चा कोणता टप्पा सुरू केला?

(अ) 3 रा

(ब) 1 ला

(क) 5 वा

(ड) 2 रा✔️✔️


#6 : आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो?

(अ) 12 ऑक्टोबर

(ब) 14 ऑक्टोबर

(क) 13 ऑक्टोबर

(ड) 15 ऑक्टोबर✔️✔️


#7  : काला घोडा कला महोत्सव (The Kala Ghoda Arts Festival ) खालीलपैकी कोणत्या शहराशी संबंधित आहे?

(अ) दिल्ली

(ब) मुंबई✔️✔️

(क) हरियाणा

(ड) केरळ



#8 :कोणती भारतीय अकॅडमी नृत्य, नाटक आणि संगीत या कलांना प्रोत्साहित करत असते?

(अ) साहित्य अकादमी

(ब) ललित कला अकादमी

(क) नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा

(ड) संगीत अकादमी✔️✔️




#9  : हनुख, प्रकाशाचा उत्सव( Hanukkh, the festival of light) खालीलपैकी कोणत्या धर्माशी संबंधित आहे?

(अ) ज्यू✔️✔️

(ब) हिंदू

(क) ख्रिस्ती

(ड) जैन


#10 : पुंगी( Pungi) हा राज्याशी संबंधित एक नृत्य प्रकार आहे?

(अ) पंजाब

(ब) हिमाचल प्रदेश✔️✔️

(क) हरियाणा

(ड) दिल्ली


Q : केंद्र शासनाच्या ___ या मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे?

अ) महिला व बालविकास

ब) समाजकल्याण विभाग

क) अर्थ मंत्रालय

ड) गृह मंत्रालय

 Answer : महिला व बालविकास




Q : मातृ वंदना योजनेविषयी योग्य असलेले पर्याय निवडा?

अ) मातृ वंदना योजनेची राज्यात 8 डिसेंबर 2017 पासून अंमलबजावणी झाली आहे

ब) महाराष्ट्रात 21 नोव्हेंबर 2017 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत प्रधानमंत्री मातृ वंदना योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली.

क) या योजनेत केंद्र शासनाचा 60 टक्के तर राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग असणार आहे.

ड) राज्यात 1 जानेवारी 2017 रोजी अथवा त्यानंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील.

इ) वरील सर्व

 Answer : इ) वरील सर्व


Q : आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रमवारीत कोणत्या भारतीय खेळाडू पहिल्या व दुसर्‍या क्रमांकावर आहेत?

(अ) विराट कोहली आणि रोहित शर्मा

(ब) कपिल देव आणि एमएस धोनी

(क) एमएस धोनी आणि हार्दिक पांड्या

(ड) रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर


Anwser : A


Q : 126 व्या घटनादुरुस्तीने देशातील विधानसभांमध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमातीकरिता (ST) अनुक्रमे खालील प्रमाणे जागा राखीव आहेत?

अ) 614 , 554

ब) 514 , 554

क) 714 , 654

ड) 84 , 47

 Answer : A


Q : भारताचे पहिले सीडीएस (CDS) कोण आहेत?

A) नरेंद्र मोदी

B) राजनाथ सिंग

C) अमित शाह

D) बिपीन रावत

Answer : D


Q : कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतेच खेलो इंडिया यूथ गेम्स 2020 चा मशाल रिले लाँच केला?

A) ओडिशा

B) आसाम

C) मणिपूर

D) छत्तीसगड

 Answer : B


Q : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली?

A) अशोकराव चव्हाण

B) राज ठाकरे

C) उद्धव ठाकरे

D) अजित पवार

Answer : D


Q : फॅनफोन चक्रीवादळामुळे कोणत्या देशाची वित्त व जीवित हानी झाली आहे ?

A) जपान

B) इंडोनेशिया

C) फिलिपाइन्स

D) श्रीलंका

Answer : C


Q : अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला क्रिस्टिना कोच कोणत्या देशाची अंतराळवीर आहे?

A) अमेरिका

B) जपान

C) चीन

D) रशिया

 Answer : A


Q.टिळक पत्रकारिता पुरस्कार-२०१९ कोणाला जाहीर झाला?

A) कुंदन व्यास

B) सिद्धार्थ वरदराजन

C) पंढरीनाथ सावंत

D) संजय गुप्ता

Answer : D


१) संपुर्ण सौरऊर्जेवर चालणाऱ्या भारतातील पहिल्या गावाचा मान कोणाला मिळाला ?

अ) चारगाव ( महाराष्ट्र )

ब) पुरूलिया गाव ( पश्चिम बंगाल ) ✅✅

क) लेंट ( दिल्ली )

ड) दांडी ( गुजरात )


२) महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प २०२०-२१ वर्षांकरिता विधानसभेत कोणी मांडला ?

अ) अजित पवार ✅✅

ब) उद्धव ठाकरे

क) दीपक केसरकर

ड) सुभाष देसाई


३) महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प २०२०-२१ वर्षांकरिता विधानसभेत कधी मांडला गेला ?

अ) ५ मार्च २०२०

ब) ७ मार्च २०२०

क) ६ मार्च २०२० ✅✅

ड) यापैकी नाही


४) भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने कोणत्या ठिकाणी गिडी रडार प्रणालीची स्थापना केली ?

अ) महेंद्रगिरी

ब) तिरूपती ✅✅

क) श्रीहरिकोटा

ड) बद्रीनाथ


५) भारतीय नौदलात कोणती गस्ती नौका २८ फेब्रुवारी २०२० मध्ये सामील करण्यात आली ?

अ) INS विराट

ब) वरद ✅✅

क) निलगिरी

ड) सिंधुरक्षक

आयटक


◾️भारतातील सर्वांत जुनी कामगार संघटना आयटक

(ऑल इंडिया ट्रेड य़ुनियन कॉंग्रेस)ची


◾️ सथापना 31 ऑक्टोंबर 1920 साली झाली. 


◾️बरिटनच्या ट्रेड युनियन काँग्रेसच्या धर्तीवर स्थापन झालेल्या आयटकने ती उणीव भरून काढली


◾️पंजाबमधील नेते लाला लजपतराय हे आयटक चे पहिले अध्यक्ष होते.


 ◾️ही संघटना कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान देणार होती.


◾️ चित्तरंजन दास हे आईटक चे तिसरे आणि चवथे अध्यक्ष होते.


◾️आयटकचे प्रधान कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.


◾️आयटक ट्रेड युनियन रेकॉर्ड नावाचे पाक्षिक प्रसिद्ध करते.


◾️1930 मध्ये संबंध बिघडले


◾️1947 नंतर ह्या संघटनेत साम्यवाद्यांखेरीज दुसरे कोणीही उरले नाही


◾️दशातील मध्यवर्ती कामगार संघटनांमध्ये इंटकनंतर आयटकचा दुसरा क्रमांक लागतो.


◾️महत्वाच्या व्यक्ति:- लाला लजपतराय, पं नेहरु, सुभाषचंद्र बोस, एस एम जोशी, टिळक, एन एम राय, चित्तरंजन दास, सरोजिनी नायडू इ.


फॉरवर्ड ब्लाॕक पक्ष


◾️सभाषचंद्र बोस यांनी 1939 च्या त्रिपुरा कॉग्रेस अधिवेशनात अध्यक्षपदी विराजमान होवुनही गांधीजींसोबत झालेला सुप्त संघर्षामुळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर 3 मे 1939 रोजी  फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली .


◾️ फॉरवर्ड ब्लॉकच्या स्थापनेची घोषणा करताना कलकत्त्यामधे बोस म्हणाले की, 


◾️"जे कोण सामील होत आहेत, त्यांनी कधीही पाठ दाखवुन पळुन जाऊ नये आणि आणि आपले बोट कापुन रक्ताने त्यावर सही करुन तारणपत्र भरावे."


◾️या भावपुर्ण आव्हानाला प्रतिसाद देत "सतरा" तरुण मुलींनी पुढे येवुन तारण फॉर्मवर सह्या  केल्या.


➡️ पक्षाचे उद्दीष्ट -


◾️कॉंग्रेसमधील सर्व डाव्या पक्षांना एकत्रित करणे आणि कॉंग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्व विकसित करणे हे होते. 


🔹अध्यक्ष -उपाध्यक्ष


◾️बोस फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष आणि एस.एस. कवीशर त्याचे उपाध्यक्ष झाले.


◾️जनच्या शेवटी मुंबईत फॉरवर्ड ब्लॉक कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली  त्या परिषदेत फॉरवर्ड ब्लॉकची घटना आणि कार्यक्रम मंजूर झाला. 


◾️जलै 1930 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक समितीची घोषणा केली.


🔺तयात 

अध्यक्ष - सुभाषचंद्र बोस,

उपाध्यक्ष- एस.एस. कविशर 

सरचिटणीस- लाल शंकरलाल 

सचिव- पंडित बी त्रिपाठी आणि मुंबईचे खुर्शेद नरिमन .


◾️आध्र प्रदेश-अन्नपुर्ना

◾️मबई- सेनापती बापट, हरी विष्णू

◾️कामथ तामिळनाडू- पासमोन यू. मुथुरमलिंगम

◾️बिहारमधील - शील भद्र यागी हे प्रमुख सदस्य होते. 


➡️मुखपत्र-फार्वड ब्लॉक


➡️"नागपुर-पहिली परिषद "


◾️20-22 जून 1940 रोजी फॉरवर्ड ब्लॉकने नागपुरात पहिली अखिल भारतीय परिषद घेतली.


◾️परिषदेने फॉरवर्ड ब्लॉकला समाजवादी राजकीय पक्ष म्हणून घोषित केले आणि 22 जूनची तारीख ही फॉरवर्ड ब्लॉक पक्षाने स्थापनेची तारीख मानली. 


◾️बरिटीश राजवटीविरूद्ध संघर्षाचा आग्रह धरला आणि परिषदेने 'ऑल पावर टू द इंडियन पीपल' हा ठराव संमत केला. याच वेळी पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुभाषचंद्र बोस यांची निवड झाली आणि एच.व्ही. कामथ सरचिटणीस म्हणून निवडले गेले.


पुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा



रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (६८) यांनी सोमवारी एका कायद्यावर स्वाक्षरी केली असून त्यामुळे त्यांचा २०३६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


रशियात गेल्या वर्षी झालेल्या मतदानानुसार रशियामध्ये घटनादुरुस्तीवर औपचारिक शिक्कामोर्तब करण्यात आले, त्यानुसार पुतिन यांना आणखी दोन वेळा अध्यक्षपदाच्या शर्यतीत सहभागी होता येणार आहे. पुतिन गेल्या दोन दशकांपासून सत्तेवर आहेत. सध्याची अध्यक्षपदाची मुदत २०२४ मध्ये संपुष्टात येणार असून पुन्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत सहभागी व्हावयाचे की नाही याचा निर्णय नंतर घेण्यात येईल, असे पुतिन यांनी म्हटले आहे.


नियमित कामकाजावर लक्ष ठेवण्याऐवजी आपल्या सहकाऱ्यांना आपला वारसदार कोण, याकडे लक्ष देण्यापासून दूर ठेवण्यासाठी अध्यक्षपदाच्या मुदतीचा कालावधी वाढविणे गरजेचे होते, असे पुतिन यांनी म्हटले आहे. पुतिन यांनी स्वाक्षरी केलेला कायदा सोमवारी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

आबोली (हिरण्यकेशी): महाराष्ट्रातील पाचवे जैविक विविधता स्थळ घोषित


महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली (हिरण्यकेशी) येथील 2.11 हेक्टर एवढ्या क्षेत्रामध्ये “शिस्टुरा हिरण्यकेशी” (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्राला ‘जैविक विविधता वारसा स्थळ’चा दर्जा देण्यात आला आहे.


महाराष्ट्र सरकारच्या महसुल व वन विभागाकडून हा दर्जा देण्याविषयीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.


▪️ठळक बाबी


शिस्टुरा हिरण्यकेशी (देवाचा मासा) या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रजाती दुर्मिळ असून ती मौजे आंबोली (हिरण्यकेशी) या गावाच्या हिरण्यकेशी नदीच्या उगम स्थानाजवळ आढळून येते. या क्षेत्रात पुरातन असे हिरण्यकेशी (महादेव) मंदिर व कुंड आहे. कुंडातील व हिरण्यकेशी नदीच्या पात्रात शिस्टुरा हिरण्यकेशी प्रजातीच्या दुर्मिळ माशांचा अधिवास आहे.


शिस्टुरा हिरण्यकेशी हा एक रंगीबेरंगी लहान मासा आहे, जो भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असलेल्या पाण्यात वाढतो. ही दुर्मिळ माशांची प्रजाती मासेमारीमुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


शिस्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध डॉ. प्रविणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे, शंकर बालसुब्रमण्यम यांनी घेतला.


वन्यजीव संशोधकांनी ॲक्वा या आंतरराष्ट्रीय मासिकात या दुर्मिळ प्रजातीचा अभ्यास सादर केला आहे. या संशोधनामुळे सह्याद्री विशेषकरून आंबोली परिसरातील जैवविविधता आणि त्याचे महत्व वाढणार आहे जनसामान्यांमध्ये जैवविविधता संवर्धनाबाबत जनजागृती होणे, त्यातून देवाचा मासा या दुर्मिळ प्रजातीचे जतन आणि संवर्धन होण्यास आता मदत होणार असून अशाप्रकारे वारसाचा दर्जा मिळणारे हे देशातील पहिले क्षेत्र ठरले आहे.


यापूर्वी राज्य सरकारने गडचिरोलीतील ग्लोरी अल्लापल्ली, जळगावचे लांडोरखोरी, पुण्याचे गणेशखिंड, सिंधुदूर्गातील बांबर्डे येथील मायरिस्टीका स्वम्प्स या क्षेत्रांना जैविक विविधता वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहे.

सरन्यायाधीशपदी रमणा यांची नियुक्ती.


सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत वरिष्ठ न्यायाधीश असलेले नुथलापती वेंकट रमणा यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी मंगळवारी नेमणूक करण्यात आली आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार न्या. रमणा हे देशाचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून २४ एप्रिलला शपथ घेणार आहेत.


सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे निवृत्त होत असून ते निवृत्त होण्याच्या एक दिवस आधी रमणा यांचा शपथविधी होत आहे. रमणा हे २६ ऑगस्ट २०२२ मध्ये निवृत्त होणार आहेत.


अधिसूचनेत म्हटले आहे की, अनुच्छेद १२४ मधील दुसऱ्या कलमानुसार राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांतर्गत न्या. नुथलापती वेंकट रमणा यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी २४ एप्रिल २०२१ पासून नियुक्ती करण्यात येत आहे. पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. के. मिश्रा व कायदा मंत्रालयाचे सचिव बरुण मिश्रा यांनी राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले नियुक्तीपत्र रमणा यांना सकाळी दिले.


रमणा यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पोन्नावरम येथे २७ ऑगस्ट १९५७ रोजी झाला असून ते १० एप्रिल १९८३ रोजी वकिलीच्या क्षेत्रात आले. नंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात २७ जानेवारी २०२० रोजी कायम न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. काही काळ ते आंध्र उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश होते.


२ सप्टेंबर २०१३ रोजी ते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. तर १७ फेब्रुवारी २०१४ रोजी ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले.  रमणा यांनी अनेक महत्त्वाची प्रकरणे हाताळली असून अनुच्छेद ३७० च्या घटनात्मक वैधतेवर नेमलेल्या पाच सदस्यांच्या  घटनापीठात त्यांचा समावेश होता. त्या वेळी हे प्रकरण सात सदस्यांच्या न्यायपीठाकडे देण्यास घटनापीठाने नकार दिला होता.

सोशल सर्विस लीग (१९११) :



इ.स. १९११ मध्ये या संघटनेची स्थापना झाली. या लीगमध्ये जॉबरची मात्र काहीही भूमिका नव्हती. तिने व्यावसायिक पूर्णवेळ असे कार्यकर्ते निर्माण केले होते. संघटनेचे सर्वात प्रमुख पुढारी ना.म. जोशी हे होते. ते एक उदारमतवादी ब्राम्हण कामगार पुढारी होते. कामगार प्रतिनिधी म्हणून अनेक परिषदांवर त्यांची नेमणूक झाली होती. चौकशी समित्यांसमोरील त्यांच्या साक्षी बहुधा अतिशय सखोल, अभ्यासपूर्ण आणि परिणामकारक असत.


कामगारांनी निर्व्यसनी असावे, काटकसरीने राहावे अशी लीगची तळमळ असे. आरोग्य आणि शिक्षणाचा प्रचार आणि प्रसारही लीग करीत असे. लीगचे कार्यकर्ते वैचारिकदृष्ट्या रुढीप्रिय व सुधारणावादी होते आणि कामगारांची गान्हाणी मालक अथवा सरकार यांच्याकडे मांडणे असा त्यांचा प्रयत्न असे. संपाला ते सातत्याने विरोध करीत असत.

विष्णुशास्त्रा चिपळूणकर (१८५० - १८८२)


* जन्म : २० में १८५०

मृत्यू : १७ मार्च १८८२ पुणे 

महाराष्ट्र कार्यक्षेत्र : साहित्य, पत्रकारिता, शिक्षण, राजकारण


पूर्ण नाव : विष्णूशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर नाडिलांचे नाव : कृष्णशास्त्री हरिपंत चिपळूणकर (नामवंत लेखक होते)


पत्नी नाव : काशीबाई भाषा : मराठी


+ साहित्य प्रकार : निबंध


चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा


प्रसिद्ध साहित्य : निबंधमाला


महाविद्यालयान शिक्षण : 

पुना कॉलेज (डेक्कन कॉलेज) येथे. १८५७- प्राथमिक शिक्षण इन्फंड स्कूल पुणे येथे.

१८६१- पुना हायस्कूलमध्ये इयत्ता ४ थी पर्यंत इंग्रजीत शिक्षण.

१८६५- मॅट्रिकचे शिक्षण पुणे येथे पूर्ण.

१८६६- महाविद्यालयीन शिक्षण सुरुवात डेक्कन कॉलेज (पुना कॉलेज) पुणे येथे. 

१८६८- वडिलांनी सुरु केलेल्या शालापत्रक या मासिकाचेसंपादक म्हणून काम सुरु केले.

जानेवारी १८७१- बाबा गोखले यांच्या शुक्रवार पेठ, पुणे येथील शाळेत शिक्षकाची नोकरी स्वीकारली.

Filmfare Awards 2021


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


• सर्वोत्कृष्ट चित्रपट: थप्पड

• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक:  ओम राऊत  (चित्रपट:-'तान्हाजी: द अनसंग हीरो')

• सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): इरफान खान ( चित्रपट:- 'इंग्लिश मीडियम')

• सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला): तापसी पन्नू ( चित्रपट:-'थप्पड')

• सर्वोत्कृष्ट अभिनेता, सहायकअभिनेता (पुरुष): सैफ अली खान (चित्रपट- तान्हाजी: द अनसंग हीरो)

• सहाय्यक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला): फारुख जाफर - ( चित्रपट:-गुलाबो सीताभो)

• सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला: आलाया फर्निचरवाला - जवानी जानमन

•सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: राजेश कृष्णन (चित्रपट- लूटकेस)

• सर्वोत्कृष्ट संगीत: प्रीतम (चित्रपट:-लुडो)

• सर्वोत्कृष्ट गायक (पुरुष): राघव चैतन्य  (चित्रपट:-एक तुकडा धूप - चापट)

• सर्वोत्कृष्ट गायक (महिला): असीस कौर - (चित्रपट:-मलंग 


● समीक्षक पुरस्कार:-

---------------------------------------------------

• सर्वोत्कृष्ट चित्रपट: ऐब आले ऊ

• सर्वोत्कृष्ट अभिनेता : अमिताभ बच्चन -  ( चित्रपट:-गुलाबो सीताबो)

• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : तिलोटामा शोम (चित्रपट:- सर )


● फिल्मफेअर शॉर्ट फिल्म पुरस्कार:-

--------------------------------------------------

•सर्वोत्कृष्ट चित्रपट (पॉप्युलर चॉईस): देवी

• सर्वोत्कृष्ट चित्रपट (फिक्शन): अर्जुन

• सर्वोत्कृष्ट चित्रपट (नॉन-फिक्शन): बॅकयार्ड वाईल्ड लाईफ सेंचुरी

• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : प्रुती सावर्दकर 

• सर्वोत्कृष्ट अभिनेता : अर्णव अब्दगिरे


● विशेष पुरस्कार:-

---------------------------------------------------

• आरडी बर्मन पुरस्कार: गुलजार

• लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड: इरफान खान

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक (२०१० ते २०२०)



🏆 २०१० : अशोक केळकर 

✍️ रजुवात 


🏆 २०११ : माणिक गोडघाते "ग्रेस"

✍️ वाऱ्याने हलते रान


🏆 २०१२ : जयंत पवार 

✍️ फिनिक्सच्या राखेतून उठला मोर


🏆 २०१३ : सतीश काळसेकर

✍️ वाचणाऱ्याची रोजनिशी


🏆 २०१४ : जयंत नारळीकर 

✍️ चार नगरातले माझे विश्व


🏆 २०१५ : अरुण खोपकर

✍️ चलत्-चित्रव्यूह


🏆 २०१६ : आसाराम लोमटे

✍️ आलोक


🏆 २०१७ : श्रीकांत देशमुख

✍️ बोलावे ते आम्ही


🏆 २०१८ : म. सु. पाटील

✍️ सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध


🏆 २०१९ : अनुराधा पाटील

✍️ कदाचित अजूनही


🏆 २०२० : नंदा खरे

✍️ उद्या (कादंबरी) .

सन्यदलात नव्या शस्त्रास्त्रांचा समावेश.


🔰भारतीय सैन्यदलात नवी लढाऊ विमाने आणि शस्त्रास्त्रांचा समावेश करणे ही एक सातत्याने सुरु असलेली प्रक्रिया आहे. या प्रक्रीयेअंतर्गत सैन्यदलात समाविष्ट करण्यात आलेल्या काही महत्वाच्या 

शस्त्रास्त्रांची माहिती खालीलप्रमाणे :-

भारतीय लष्कर:

          (i) चिता हेलिकॉप्टर.

          (ii) अत्याधुनिक हलकी हेलिकॉप्टर्स (ALH) मार्क 0/I/II/III.

          (iii)  अत्याधुनिक हलकी हेलिकॉप्टर्स (शस्त्रास्त्र प्रणाली अंतर्भूत [WSI]).

          (iv)  20 मीमी टूरेट गन–ALH प्लॅटफॉर्म युक्त (WSI)

          (v)  70 मीमी टूरेट गन – ALH प्लॅटफॉर्म युक्त (WSI).

       

🔴भारतीय नौदल :


          (i)  डोर्नियर 228 लढावू विमान

          (ii)  अत्याधुनिक हलकी हेलिकॉप्टर्स (ALH MK III)

          (iii) चेतक हेलिकॉप्टर्स

          (iv)  P81 लढाऊ विमान


🔴भारतीय हवाई दल:


(i) राफेल लढाऊ विमाने

(ii) हलकी लढाऊ विमाने

(iii) C-17 आणि C-130 वाहतूक लढाऊ विमाने

(iv) चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टर्स

सैन्यदलात LCH आणि LUH श्रेणीची हेलीकॉप्टर्स समाविष्ट करुन “आत्मनिर्भर भारताला” प्रोत्साहन देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे.


🔰फब्रुवारी 2021 पर्यंत,सरकारने संरक्षण क्षेत्रात विविध उपकरणे आणि इतर वस्तूंच्या निर्मितीसाठी 523 औद्योगिक परवाने जारी केले आहेत.संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे




🏝 जायकवाडी           नाथसागर

🏝 पानशेत                तानाजी सागर

🏝 भडारदरा               ऑर्थर लेक/विल्सन डॅम  

🏝 गोसिखुर्द                इंदिरा सागर 

🏝 वरसगाव                वीर बाजी पासलकर

🏝 तोतलाडोह              मेघदूत जलाशय

🏝 भाटघर                   येसाजी कंक

🏝 मळा                      ज्ञानेश्वर सागर 

🏝 माजरा                    निजाम सागर

🏝 कोयना                    शिवाजी सागर

🏝 राधानगरी                लक्ष्मी सागर

🏝 तानसा                    जगन्नाथ शंकरशेठ

🏝 तापी प्रकल्प            मुक्ताई सागर

🏝 माणिक डोह            शहाजी सागर

🏝 चांदोली                   वसंत सागर

🏝 उजनी                     यशवंत सागर

🏝 दधगंगा                   राजर्षी शाहू सागर

🏝 विष्णुपुरी                 शंकर सागर

🏝 वतरणा                   मोडक सागर

भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी


●अशोक =  देवानाम प्रिय प्रियदस्स


●समुद्रगुप्त =  भारताचा नेपोलियन


●चंद्रगुप्त मौर्य  = सॅन्ड्रीकोटेस


●बिंदुसार = अमित्रोकोटेस


● कनिष्क = देवपुत्र


● गौतमीपुत्र सातकर्णी = त्रीसमुद्रतोयपितवाहन


● राजराजा = शिवपाद शिखर


● राजेंद्र प्रथम = गंगाईकोंडचोल


●चंद्रगुप्त द्वितीय = विक्रमादित्य


● कुमार गुप्त = महेंद्रादित्य


● चंद्रगुप्त प्रथम = महाराजाधिराज


● धनानंद = अग्रमिस


● नागार्जुन = भारताचा आईन्स्टाईन


● हर्षवर्धन = शिलादित्य 


● पुलकेशी द्वितीय = परमेश्वर 


● अश्वघोष = भारताचा कांत, वॉल्टेअर


● बलबन = उगलु खान


● मुहम्मद बिन तुघलक = जुना खान


● गियासुद्दीन तुघलक = गाजी मलिक


● जहांगीर = सलीम


● शेरशाह = शेरखान


● मलिक सरवर = मलिक उस शर्क


● जगत गोसाई = जोधाबाई


● शहाजहान = शहजादा


● औरंगजेब = जिंदा पिर


● बहादुर शहा प्रथम = मुअज्जम


● व्योमेशचंद्र बॅनर्जी = नखशिखांत इंग्रज


● उमाजी नाईक = आद्य क्रांतिकारक

 

● राजा रणजितसिंग = आधुनिक भारताचा नेपोलियन


● बाळाजी बाजीराव = नानासाहेब


● माधवराव नारायण = सवाई माधवराव


● जवाहरलाल नेहरू = चाचा  


● खानअब्दुल गफारखान = सरहद्द गांधी


● चित्तरंजन दास = देश बंधू


● सुभाष चंद्र बोस = नेताजी


● जयप्रकाश नारायण = लोकनायक


● अण्णाभाऊ साठे = लोकशाहीर


● सरोजिनी नायडू = गानकोकिळा


●के केप्पलन = दक्षिणेकडील गांधीजी


● वीरेशलिंगम पंतलु = दक्षिणेकडील राजा राम मोहन राय


● ई.व्ही.रामास्वामी = पेरियार


● वल्लभभाई पटेल = लोहपुरुष 


● छत्रपती शाहू महाराज = राजर्षी


भारतीय शहरांची टोपणनावे


१. गोल्डन (सुवर्ण) सिटी - अमृतसर

२. भारताचे मैनचेस्टर - अहमदाबाद

३. सात बेटांचे शहर - मुंबई

४. स्पेस सिटी - बँगलोर

५. भारताचे बगीचा (गार्डन) शहर - बँगलोर

६. भारताची सिलिकॉन वैली - बँगलोर

७. भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर - बँगलोर

८. अरबी समुद्राची राणी - कोचीन

९. गुलाबी शहर - जयपुर

१०. भारताचे प्रवेशद्वार - मुंबई

११. ट्विन सिटी - हैद्राबाद, सिकंदराबाद

१२. सणांचे शहर - मदुरई

१३. दख्खनची राणी - पुणे

१४. इमारतींचे शहर - कोलकाता

१५. दक्षिण गंगा - गोदावरी

१६. दक्षिणेकडील मैनचेस्टर - कोयम्बटूर

१७. सोयाबीनचा प्रदेश - मध्य प्रदेश

१८. नवाबांचे शहर - लखनऊ

१९. पूर्वेकडील वेनिस - कोचीन

२०. बंगालचे अश्रू - दामोदर नदी

२१. बिहारचे अश्रू - कोसी नदी

२२. निळा पर्वत - नीलगिरी

२३. पर्वतांची राणी - मसूरी (उत्तराखंड)

२४. पवित्र नदी - गंगा

२५. भारताचे हॉलीवुड - मुंबई

२६. किल्ल्यांचे शहर - कोलकाता

२७. पाच नद्यांचे राज्य - पंजाब

२८. तलावांचे शहर - श्रीनगर

२९. भारताचे पोलादी शहर - जमशेदपुर (टाटानगर)

३०. मंदिरांचे शहर - वाराणसी

३१. उत्तरेकडील मैनचेस्टर - कानपूर

३२. भारताचे स्वर्ग - जम्मू आणि काश्मीर

३३. मसाल्यांचे राज्य - केरळ

३४. भारताचे स्विट्ज़रलैंड - काश्मीर

३५. भारताचे बॉस्टन - अहमदाबाद

महत्वपूर्ण नारे (slogans)



1. जय जवान जय किसान

►- लाल बहादुर शास्त्री


2. मारो फिरंगी को

►- मंगल पांडे


3. जय जगत

►- विनोबा भावे


4. कर मत दो

►- सरदार बल्लभभाई पटले


5. संपूर्ण क्रांति

►- जयप्रकाश नारायण


6. विजय विश्व तिरंगा प्यारा

►- श्यामलाल गुप्ता पार्षद


7. वंदे मातरम्

►- बंकिमचंद्र चटर्जी


8. जय गण मन

►- रवींद्रनाथ टैगोर


9. सम्राज्यवाद का नाश हो

►- भगत सिंह


10 स्वराज्य हमारा जन्मसिद्ध अधिकार है

►- बाल गंगाधर तिलक



11.इंकलाब जिंदाबाद

►- भगत सिंह


12. दिल्ली चलो

►- सुभाषचंद्र बोस


13. करो या मरो

►- महात्मा गांधी


14. जय हिंद

►- सुभाषचंद्र बोस


15. पूर्ण स्वराज

►- जवाहरलाल नेहरू


16. हिंदी, हिंदू, हिंदुस्तान

►- भारतेंदू हरिशचंद्र


17. वेदों की ओर लौटो

►- दयानंद सरस्वती


18. आराम हराम है

►- जवाहरलाल नेहरू


19. हे राम

►- महात्मा गांधी


20. भारत छोड़ो

►- महात्मा गांधी


21. सरफरोशी की तम्मना अब हमारे दिल में है

►- रामप्रसाद बिस्मिल


22.सारे जहां से अच्छा हिंदोस्तां हमारा

►- इकबाल


23. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा

►- सुभाषचंद्र बोस


24. साइमन कमीशन वापस जाओ

►- लाला लाजपत राय


25. हू लिव्स इफ इंडिया डाइज

►- जवाहरलाल नेहरू

चद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी



◾️23 जुलै 1906 ते  27 फेब्रुवारी 1931


 ◾️ राम प्रसाद बिस्मिल च्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली.


◾️ तयांना भगत सिंग यांचे गुरू मानले जाते व ते HSRA चे प्रमुख होते.


◾️सघटना:- कीर्ति किसान पार्टी, नवजवान किसान सभा


◾️1921 मध्ये म. गांधींच्या असहकार आंदोलनात 15 व्या वर्षी चंद्रशेखरने सहभाग घेतला होता. 


◾️तयासाठी त्याला अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले


◾️सायमन कमिनला विरोधादरम्यान लाठीहल्यात लाला लजपतराय यांचे निधन


◾️बदला म्हणुन लाहोर चा SP जेम्स स्कॉट ला मारण्याचा कट रचला


◾️या कटात भगतसिंग, जय गोपाल, राजगुरु, आझात होते


◾️जम्स स्कॉट एेवजी सॉंडर्स हा

 अधिकारी मारला गेला


◾️वशांतर करुन राजकोट मार्गे इलाहाबाद येथे दाखल झाले


◾️27 फेब 1931 रोजी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्क येथे चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार झाला.

शेवटी स्वत:वर गोळी मारुन घेतली

१७ वी लोकसभा निवडणूक


🪑 एकुण जागा : ५४३ जागा


👥 एकुण उमेदवार : ८,०४९


👩‍🦰 एकुण महिला उमेदवार : ७१६


👩‍🦰 एकुण विजयी महिला : ७८ ( MH 8 )


👩‍🦰 महिला खासदारांचे प्रमाण : १४%


🤔 मतदान किती टप्प्यात : ०७


🤔 महाराष्ट्रात किती टप्प्यात : ०४


🪑 महाराष्ट्रात एकुण जागा : ४८


✅ मतदानाची टक्केवारी : ६७.१%


✌️ मतमोजणी : २३ मे २०१९ 


❌ मतदान झाले नाही : वेल्लोर , तमिळनाडू ( भ्रष्टाचार केल्यामुळे निवडणूक रद्द )


🌸 ततीयपंथी सदिच्छा दुत : गौरी सावंत


👤 लोकसभा सभापती : ओम बिर्ला


👩‍🦰 तरुण खासदार : चंद्रानी मुर्मु (२५)

👉🏻 मतदारसंघ : केंझर : बीजेडी


👨‍🦳 वयोवृद्ध खासदार : शफीकूर रहमान (८६)

👉🏻 मतदारसंघ : संभल : समाजवादी पक्ष


☝️ पहिल्यांदा निवडून येणारे : ३०० खासदार 


✌️ दसऱ्यांदा निवडून येणारे : १९७ खासदार


😎 सर्वाधिक वेळा निवडून येणारे : 


👩‍🦰 मनेका गांधी : ०८ वेळा 

👉🏻 मतदारसंघ : सुलतानपूर 


👤 सतोष गंगवार : ०८ वेळा

👉🏻 मतदारसंघ : बरेली


👤 सर्वाधिक मते : शंकर लालवाणी 

👉🏻 मते मिळाली : १० लाख ६८ हजार


👤 सर्वाधिक मतांनी निवडून : सी आर पाटील 

👉🏻 मतदारसंघ : नवसारी : ६ लाख ८९ हजार


👤 सर्वात कमी मतांनी निवडून : बी पी सरोज 

👉🏻 मतदारसंघ : मछलीशहर : १८१ मते .


2019-20 जगातील विविध निर्देशांक /अहवाल



१. मानव विकास निर्देशांक २०२०:-

🔸 परथम क्रमांक :- नॉर्वे

✅ भारतचा क्रमांक :- १३१


२. भ्रष्टाचार निर्देशांक २०१९:-

🔸 परथम क्रमांक :- न्युझीलंड  डेन्मार्क

✅ भारतचा क्रमांक :- ८० 


३. सर्वसमावेशक इंटरनेट अहवाल २०२० :-

🔸 परथम क्रमांक :-  स्विडन

✅ भारतचा क्रमांक :- ४६ 


४. जागतिक लोकशाही निर्देशांक २०१९:-

🔸 परथम क्रमांक :- नॉर्वे

✅ भारतचा क्रमांक :- ५१


५. जागतिक प्रतिभा स्पर्धात्मक निर्देशांक २०२० 

🔸 परथम क्रमांक :- स्वित्झर्लंड 

✅ भारतचा क्रमांक :- ७२ 


६. जागतिक लौगिंक असमानता निर्देशांक २०२० :-

🔸 परथम क्रमांक :- आईसलॅड

✅ भारतचा क्रमांक :- ११२


७. जागतिक स्पर्धात्मता निर्देशांक २०१९:-

🔸 परथम क्रमांक :- सिंगापूर

✅ भारतचा क्रमांक :- ६८


८. जागतिक उपासमार निर्देशांक २०२० :-

🔸 परथम क्रमांक :- १७ देश प्रथमस्थानी (शेवटचा देश :- छाद)

✅ भारतचा क्रमांक :- ९४


९. इझी ऑफ डोइंग २०२० :-

🔸 परथम क्रमांक :- न्युजीलंड

✅ भारतचा क्रमांक :- ६३


१०. मानवी भांडवल निर्देशांक२०२० :-

🔸 परथम क्रमांक :- सिंगापूर 

✅ भारतचा क्रमांक :- ११६


११. हेन्त्री पारपत्र निर्देशांक २०२० 

🔸 परथम क्रमांक :- न्युझीलंड

✅ भारतचा क्रमांक :- ८४


१२. SDG लौंगिक समानता निर्देशांक २०१९

🔸 परथम क्रमांक :- डेन्मार्क

✅ भारतचा क्रमांक :- ९५


१३. जागतिक उर्जा निर्देशांक २०२० 

🔸 परथम क्रमांक :- स्वीडन

✅ भारतचा क्रमांक :- ७४


१४. जागतिक नाविन्यता नवोन्मेष निर्देशांक २०२० 

🔸 परथम क्रमांक :- स्वित्झर्लंड

✅ भारतचा क्रमांक :-४८


१५. जागतिक आनंद अहवाल २०२० 

🔸 परथम क्रमांक :- फिनलंड 

✅ भारतचा क्रमांक :- १४४


१६. जागतिक शांतता निर्देशांक २०२० 

🔸 परथम क्रमांक :- आईसलॅड

✅ भारतचा क्रमांक :- १३९


१७. जागतिक स्वातंत्र निर्देशांक २०२०

🔸 परथम क्रमांक :- सिंगापूर

✅ भारतचा क्रमांक :- १२०


१८. आंतराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक २०२० :-

🔸 परथम क्रमांक :- अमेरिका 

✅ भारतचा क्रमांक :- ४० 


१९. शाश्वत विकास निर्देशांक २०२० 

🔸 परथम क्रमांक :- स्वीडन

✅ भारतचा क्रमांक :- ११७


२०. जागतिक प्रसारमाध्यम स्वातंत्र निर्देशांक २०२० 

🔸 परथम क्रमांक :- नॉर्वे

✅ भारतचा क्रमांक :- १४२


२१. उर्जा संक्रमण निर्देशांक २०२० 

🔸 परथम क्रमांक :- स्वीडन

✅ भारतचा क्रमांक :- ७४


२२. जागतिक प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मक निर्देशांक २०१९:-

🔸 परथम क्रमांक :-स्पेन

✅ भारतचा क्रमांक :- ३४


२३. सुरक्षित शहरे निर्देशांक २०१९:-

🔸 परथम क्रमांक :- टोकीयो

✅ भारतचा क्रमांक :- ६० शहरांत भारतातील मुंबई व नवी दिल्ली ही दोन शहरे


२४. जागतिक दहशतवाद निर्देशांक २०२० 

🔸 परथम क्रमांक :-अफगणिस्थान

✅ भारतचा क्रमांक :- ८


२५. हवामान बदल कामगिरी निर्देशांक २०२०:-

🔸 परथम क्रमांक :- पहिले ३ क्रमांक रिक्त ४ था स्वीडन

✅ भारतचा क्रमांक :- १० 


२६. हवामान कामगिरी निर्देशांक २०२०

🔸 परथम क्रमांक :- डेन्मार्क 

✅ भारतचा क्रमांक :- १६८

महत्त्वाच्या संकल्पना आहेत...


🛶(१) सागर म्हणजे काय ? 

---  जमिनीने पूर्णः किंवा अंशतः वेढलेल्या 

     खा-या पाण्याचा जलभाग म्हणजे सागर 

     किंवा समुद्र होय. 


🛶(२) महासागर म्हणजे काय  ?*

---  दोन खंडांदरम्यान पसरलेला खा-या 

     पाण्याचा विस्तीर्ण (मोठा) साठा म्हणजे 

     महासागर होय. 


🛶(३) उपसागर म्हणजे काय  ?*

---  सर्वसाधारणपणे जमिनीने तीन बाजूंनी 

     वेढला गेलेला सागराचा लहान भाग म्हणजे 

    उपसागर होय. उदा. बंगालचा उपसागर. 


🛶(४) आखात म्हणजे काय  ?*

---  जमिनीत घुसलेला सागराचा अरुंद भाग,

     म्हणजे आखात होय. 


🛶(५) सरोवर म्हणजे काय  ?*

---  भूपृष्ठावरील सखल भागात नैसर्गिकरीत्या 

    तयार झालेला जलाशय म्हणजे सरोवर 

    होय. 


🛶(६) जलावरण म्हणजे काय  ?*

---  पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेला भाग, 

     म्हणजे जलावरण होय. 


🛶(७) खाडी म्हणजे काय  ?*

---  समुद्राचे पाणी नदीच्या मुखातून जेथेपर्यंत 

     नदीत शिरते, त्या नदीच्या भागाला खाडी 

     म्हणतात. 


🛶(८) सागरी मैदान म्हणजे काय  ?*

---  सागरतळाचा सपाट व सखल भाग 

     म्हणजे सागरी मैदान होय. 


🛶(९) गर्ता म्हणजे काय  ?*

---  सागरातील अरुंद व अतिखोल भागास 

    गर्ता म्हणतात. 


🛶(१०) सागरी डोह म्हणजे काय  ?*

---  सागरतळावर काही ठिकाणी खोल,अरुंद 

      आणि तीव्र उतारांची सागरी भूरूपे

      आढळतात. त्यातील कमी खोलीच्या 

      अरुंद व तीव्र उतारांची सागरी भूरूपे 

      म्हणजे सागरी डोह होय.    

74 वी घटनादुरूस्ती


👉🏻 कलम - 243 P - व्याख्या. 


👉🏻 कलम - 243 Q - नगरपालिकांचे घटक व स्तर. 


👉🏻 कलम - 243 R - नगरपालिकांची रचना. 


👉🏻 कलम - 243 S -  वार्ड समित्यांची रचना आणि मांडणी. 


👉🏻 कलम - 243 T -  अनुसूचीत जात जमाती साठी राखीव जागा.  


👉🏻 कलम - 243 U - नगरपालिकांचा कालावधी. 


👉🏻 कलम - 243 V - सदस्यांची अपात्रता. 


👉🏻 कलम - 243 W - नगरपालिकाचा हक्क  व जबाबदर्‍या. 


👉🏻 कलम - 243 X - कर बसवण्याचे आधिकार व वित्तव्यवस्था. 


👉🏻 कलम - 243 Y - वित्त आयोगाचा आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रस्थापना .  


👉🏻 कलम - 243 Z - नगरपालिकेच्या हिशेबांचे लेखापरीक्षण.  


👉🏻 कलम - 243 ZA - नगरपालिकांच्या निवडणुका  


👉🏻 कलम - 243 ZB - केंद्रशासित प्रदेशांना नगरपालिका कायदा . 


👉🏻 कलम - 243 ZC - विशिष्ट प्रदेशांना नगरपालिका कायदा लागू न करणे. 


👉🏻 कलम - 243 ZD - जिल्हा नियोजनासाठी समिति. 


 👉🏻 कलम - 243 ZE  -  मेट्रोपोलीटन विकासासाठी समिति. 


👉🏻 कलम - 243 ZF - नगरपालिका सबंधित विद्यमान कायदा व तरतुदी चालू  ठेवण्यासाठी. 



👉🏻 कलम - 243 ZG - नगरपालिका निवडणूकात कोर्टाच्या हस्तक्षेपास मनाई.   


०६ एप्रिल २०२१

पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे

👉 महाराष्ट्राविषयी माहिती 


•  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.


•  महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


• महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.


• महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.


•  महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.


•  महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.


•  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


• महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


• विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


• महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


• महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


• महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


•  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


• महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


• महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


• महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


• महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


•  महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


•  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


•  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


• भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


•  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


• महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


• भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


•  महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


• पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


• गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


•  प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


• गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


•  जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


•  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


•  पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


•  महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


°  कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


•  कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


• विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.


•  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


•  महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


•  विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


•  संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.


• संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


• राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.


•  संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


•  ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


•  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


•  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


•  महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.


• पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


•  कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


•  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


• मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


•  यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


•  महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


•  नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


•  महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


•  शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


•  महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


•  शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


•  ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.


• तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.


• भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.


•  महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.


• रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

महाराष्ट्रातील प्रमुख शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम



कळसूबाई = 1646

साल्हेर = 1567

धोडप =1472

महाबळेश्वर = 1438

तारामती = 1431

हरिश्चंद्र = 1424

सप्तश्रृंगी = 1416

तोरणा = 1404

पुरंदर = 1387

मांगीतुंगी = 1331

अस्तंभा = 1325

राजगड = 1318

सिंहगड = 1312

मुल्हेर = 1306

त्रंबकेश्र्वर = 1304 

ब्रम्हगिरी = 1304

रतनगड = 1297

अंजनेरी = 1280

तौला = 1231

वैराट = 1177 

चिखलदरा = 1115

प्रतापगड = 1080

हनुमान = 1063

कुंभार्ली = 1050

फोंडा = 900

रायगड = 820

आतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे



💥 (Combine focus)


▪️कष्णा ( 1969) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश


▪️गोदावरी (1969):-  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रधेश, ओरीसा


▪️नर्मदा (1969) :- राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र


▪️रावी व बियास ( 1986) :- पंजाब, हरियाणा, राजस्थान


▪️कावेरी (1990) :- कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, पाँडेचरी


▪️कष्णा - 2 (2004 ) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश


▪️वसंधरा (2010) :- ओडीसा, आंध्रप्रदेश


▪️महादयी (2010):- गोवा, कर्नाटक, माहाराष्ट्र.


▪️महानदी (6 ऑगस्ट 2018 ) :- ओडीसा, छत्तीसगड.

शब्दसिद्धी व त्याचे प्रकार


शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच

'शब्दसिद्धी' असे म्हणतात.


⭕️शब्दांचे खालील प्रकार पडतात.


◾️ तत्सम शब्द


जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द ' असे म्हणतात.


💠उदा.

राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध.


🌀 तदभव शब्द


जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना 'तदभव शब्द' असे म्हणतात.


💠उदा.

घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय.


🌀दशी/देशीज शब्द


महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.


💠उदा.

झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर.


🌀 परभाषीय शब्द :


संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ' परभाषीय शब्द' असे म्हणतात.


🌀1) तुर्की शब्द


💠कालगी, बंदूक, कजाग


🌀2) इंग्रजी शब्द


💠टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी.


🌀 3) पोर्तुगीज शब्द

बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस.


🌀4) फारशी शब्द

💠रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना हप्ता.


🌀 5) अरबी शब्द

अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल.



🌀6) कानडी शब्द

हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे.


🌀7) गुजराती शब्द

सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट.


🌀8) हिन्दी शब्द

बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर, इमली.


🌀 9) तेलगू शब्द

ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी.


🌀10) तामिळ शब्द

चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा.


लिंगभाव समानता निर्देशांकात भारत १४० व्या क्रमांकावर.

🔰जागतिक आर्थिक मंचाच्या लिंगभाव समानता २०२१ अहवालात भारत १५६ देशात १४० क्रमांकावर राहिला असून भारताचे स्थान २८ क्रमांकांनी घसरले आहे. दक्षिण आशियात वाईट कामगिरी असलेला भारत हा तिसरा देश ठरला आहे. या अहवालानुसार लिंगभाव समानतेत भारताची टक्केवारी ६२.५ टक्के राहिली असून २०२० मध्ये भारत १५३ देशात ११२ व्या क्रमांकावर होता. आता तो १४० व्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

🔰आर्थिक सहभाग व संधी उपनिर्देशांकात भारताची घसरण झाली असून या वर्षी या काही पैलूत भारतातील लिंगभाव समानतेतील दरी ३ टक्क््यांनी वाढली असून ती ३२.६ टक्के आहे. राजकीय सक्षमीकरणात भारताला मोठा फटका बसला असून त्यात १३.५ टक्के नोंद आहे. २०१९ मध्ये भारताची टक्केवारी २३.१ होती ती २०२१ मध्ये ९.१ टक्के झाली आहे.

🔰कामगार- कर्मचारी यात महिलांचा घटता सहभाग हे याचे प्रमुख कारण ठरले असून हा सहभाग २४.८ टक्क््यांवरून २२.३ टक्के झाला आहे. याशिवाय व्यावसायिक व तंत्रज्ञानात्मक भूमिकात महिलांचा सहभाग कमी होऊन तो २९.२ टक्के राहिला आहे. वरिष्ठ व व्यवस्थापकीय पातळीवर महिलांचा सहभाग कमीच असून १४.६ टक्के वरिष्ठ पदांवर महिला आहेत. व्यवस्थापकीय पदांवर महिलांचे प्रमाण ८.९ टक्के आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे उत्पन्न भारतात एक पंचमांश आहे. त्यामुळे भारत खालच्या दहा देशात गेला आहे.

🔰महिलांविरोधातील भेदभाव जास्त असून आरोग्य व जीवन संघर्षात टिकून राहण्याच्या निर्देशांकात भारताने खराब कामगिरी केली आहे. भारत त्यामुळे यात घटक निर्देशांकात खालच्या पाच देशात आहे.

हॅट-ट्रिक घेणारे भारतीय गोलंदाज

🏏 एकदिवसीय

1️⃣ १९८७ : चेतन शर्मा
✅ विरुद्ध : न्युझीलंड

2️⃣ १९९१ : कपिल देव
✅ विरुद्ध : श्रीलंका

3️⃣ २०१७ : कुलदीप यादव
✅ विरुद्ध : ऑस्ट्रेलिया

4️⃣ २०१९ : मोहम्मद शमी
✅ विरुद्ध : अफगाणिस्तान

5️⃣ २०१९ : कुलदीप यादव
✅ विरुद्ध : वेस्ट इंडिज

🏏 कसोटी

1️⃣ २००१ : हरभजन सिंह
✅ विरुद्ध : ऑस्ट्रेलिया

2️⃣ २००६ : इरफान पठाण
✅ विरुद्ध : पाकिस्तान

3️⃣ २०१९ : जसप्रीत बुमराह
✅ विरुद्ध : वेस्ट इंडिज

🏏 टी-ट्वेटी आंतरराष्ट्रीय

1️⃣ २०१२ : एकता बिश्त  (पहिली महिला)
✅ विरुद्ध : श्रीलंका

2️⃣ २०१९ : दिपक चहर (पहिला पुरुष)
✅ विरुद्ध : बांग्लादेश .

राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्र्यांची घोषणा


🔶राज्यातील शालेय शिक्षण विभागाने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील करोना स्थिती पाहता, राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

🔶करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचे शालेय शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले. त्यानुसार इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आणि ऑनलाइन शिक्षणासाठी पुरेशा प्रमाणात साधनांची उपलब्धता नसल्याने, विद्यार्थ्यांना शिकण्यात अडचणी आल्या.

🔶शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात या अडचणी अधिक होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने, त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. इयत्ता पहिली ते आठवीचा निकाल सर्वंकष मूल्यमापन पद्धतीद्वारे जाहीर केला जातो. मात्र, यंदा जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका अशा सरकारी शाळांमध्ये दोन चाचण्या आणि दोन संकलित मूल्यमापन योग्य पद्धतीने होऊ शकले नाही, अशी माहिती शिक्षकांनी दिली आहे. शहरी भागातील अनुदानित शाळांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या असून, निकाल तयार केला आहे.

🔶मात्र, शैक्षणिक वर्ष संपत असून, आता गुणपत्रके तयार करून निकाल जाहीर करण्याची वेळ आली होती.त्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबण्यात यावी, याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन सूचना मिळाल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर केला. या सर्व पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुतीन यांची लोकप्रियता कायम; रशियामधील ‘सर्वात देखणा पुरुष’ होण्याचा मिळवला मान

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे देशातील सर्वात सुंदर पुरुष असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळेच रशियातील सर्वात देखणा पुरुष अशी नवी ओळख पुतीन यांना मिळाली आहे. हजारो जणांचा समावेश असणाऱ्या या सर्वेक्षणामध्ये ६८ वर्षीय अविवाहित पुतीन हे सर्वात सुंदर पुरुष ठरलेत.

सुपरजॉब डॉय आरयू नावाच्या वेबसाईट रशियन जनतेला देशातील कोणती व्यक्ती सर्वात सुंदर वाटते यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये अनेकांनी पुतीन यांच्या नावाची निवड केल्याचं पहायला मिळालं. सर्वेक्षणातील १८ टक्के पुरुषांनी तर १७ टक्के महिलांनी पुतीन यांची निवड केली. रशियन जनतेच्या मनात आजही पुतीन हेच देशातील सर्वात सुंदर व्यक्ती असल्याचं चित्र या सर्वेक्षणातून दिसून आल्याचं वेबसाईटने सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे.

मॉस्को टाइम्सने सुपरजॉबच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार या सर्वेक्षणामध्ये पुतीन यांच्या लोकप्रियतेसमोर सर्वच रशियन कलाकार, नेते आणि खेळाडून फिके पडल्याचं पहायला मिळालं. मासे पकडताना, घोड्यावर स्वार झालेले पुतीन यांचे अनेक फोटो वेळोवेळी समोर आलेत. या फोटोंमध्ये पुतीन हे शर्टलेसच दिसून येतात. एका मुलाखतीमध्ये पुतीन यांनी आपल्याला या शर्टलेस फोटोंबद्दल लज्जास्पद असं काही वाटतं नाही, असं एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. या फोटोंमध्ये पुतीन यांना एक शक्तीशाली व्यक्ती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला.

२२ मार्च ते एक एप्रिल दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणामध्ये प्रत्येकाला एका प्रश्नांची यादी देण्यात आली होती. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १९ टक्के पुरुषांनी स्वत:लाच रशियामधील सर्वात सुंदर पुरुष असल्याचं मत दिलं होतं. तर १८ टक्के महिलांनी रशियामध्ये सुंदर पुरुषच नाहीयत असं मत दिलं होतं.

भारतातील मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष

🔶 पक्ष : ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस
⏳ स्थापना : १ जानेवारी , १९९८

🔶 पक्ष : बहुजन समाज पार्टी
⏳ स्थापना : १४ एप्रिल , १९८४

🔶 पक्ष : भारतीय जनता पार्टी
⏳ स्थापना : ०६ एप्रिल , १९८०

🔶 पक्ष : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
⏳ स्थापना : २६ डिसेंबर , १९२५

🔶 पक्ष : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (म.)
⏳ स्थापना : ०७ नोव्हेंबर , १९६४

🔶 पक्ष : इंडियन नॅशनल काँग्रेस
⏳ स्थापना : २८ डिसेंबर , १८८५

🔶 पक्ष : नॅशनालिस्ट कॉंग्रेस पार्टी
⏳ स्थापना : १० जून , १९९९

🔶 पक्ष : नॅशनल पीपल्स पार्टी
⏳ स्थापना : ०६ जानेवारी , २०१३ ‌.

उत्तर प्रदेश: जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले राज्य


उत्तर प्रदेश लवकरच देशातील जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळांसह असे एक राज्य होईल.
राज्यात लवकरच पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहेत.

जेव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ एनसीआर प्रदेशात येत आहे, 2023 पर्यंत ते तयार होईल.

अयोध्या मधील आंतरराष्ट्रीय विमानतळ 2023 च्या सुरूवातीला सुरू होण्याची शक्यता आहे.

आगामी कुशीनगर विमानतळ हे यूपी मधील तिसरे परवानाधारक आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल.

महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत निर्बंध; अशी आहे नियमावली

🌼राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली कठोर करण्यात आली आहे. राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश आणि नियमावली उद्या सरकारकडून काढण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

🌼राज्य मंत्रिमंडळाने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ‘ब्रेक दि चेन’ असे संबोधण्यात येणार.

🌼हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून, लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील.

🌼आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करताना आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले.

भारतातील दुहेरी उत्परिवर्तनाचा विषाणू अमेरिकेतही

🔶भारतातील दुहेरी उत्परिवर्तनाचा विषाणू आता अमेरिकेतील एका रुग्णातही सापडला असून स्टॅनफर्ड हेल्थ केअरच्या दी क्लिनिकल व्हायरॉलॉजी लॅबमधील नमुन्यांच्या तपासणीत तो आढळून आला आहे. दुहेरी उत्परिवर्तन असलेला विषाणू भारतात पहिल्यांदा आढळून आला होता. त्यामुळे करोनाचा प्रसार जास्त वेगाने वाढत आहे.

🔶स्टॅनफर्ड रुग्णालयाच्या वेगवेगळ्या तपासणी केंद्रात सॅनफ्रान्सिस्को बे या भागात हा विषाणू सात रुग्णांत सापडला असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे पण त्याला अजून दुजोरा मिळालेला नाही. एका रुग्णात मात्र तो सापडला आहे.

🔶स्टॅनफर्ड हेल्थ केअर स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थेच्या प्रवक्त्या लिसा किम यांनी सांगितले की, अमेरिकेत भारतातील दुहेरी उत्पर्वितनाचा विषाणू पहिल्यांदाच सापडला आहे. भारतातील उत्परिवर्तित विषाणूत एल ४५२आर हे उत्परिवर्तन दिसून आले आहे, दुसरे उत्परिवर्तन इ ४८४ क्यू हे आहे. एकाच ठिकाणी अमायनो आम्लांमध्ये दोन उत्परिवर्तने झाली असून ती पहिल्यांदा दक्षिण आफ्रिका व नंतर ब्राझीलमध्ये दिसून आली होती.

🔶सध्या अमेरिकेत हा विषाणू सापडला आहे तो विमानाने आलेल्या एखाद्या प्रवाशातून पसरला असावा. डॉ. बेन पिन्स्की यांनी सांगितले की, हा विषाणू वेगाने पसरतो. लसीकरणामुळे सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यानंतर विषाणूचा धोका कमी होत जाईल. दरम्यान, ब्रिटनमध्ये सापडलेल्या बी ११७ उत्परिवर्तनाचा समावेश असलेल्या विषाणूचे ३० टक्के कोविड रुग्ण अमेरिकेत सापडले आहेत, असे ब्राउन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे अधिष्ठाता आशिष झा यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्वपरीक्षा रविवारी (ता. 11) होणार आहे.



सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्वपरीक्षा रविवारी (ता. 11) होणार आहे. राज्यभरातील चार लाख 23 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. कोरोनामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. परंतु, परीक्षा ठरलेल्या दिवशीच होईल, असे आयोगाच्या सहसचिवांनी स्पष्ट केले आहे. 

श्रीगोंदा येथील वैभव शितोळे हा पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन पुण्यातील सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. तर दुसरीकडे प्रीतम कांबळे हा विद्यार्थीही कोरोनाचा बळी ठरला. दोन विद्यार्थ्यांचा दोन दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह तर काही विद्यार्थी क्‍वारंटाइन आहेत. दुसरीकडे राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लागू केलेल्या कडक निर्बंधानुसार शनिवार, रविवारी कडक संचारबंदी असणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवली जाईल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोचता येणार नाही. कडक संचारबंदी असल्याने परजिल्ह्यातील मुलांना त्या ठिकाणी राहण्यासाठी अडचणी येणार आहेत. अशी परिस्थिती असतानाही परीक्षा घेतल्यास बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सर्व्हेदेखील केला असून त्यात 79 टक्‍के विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलावी, असा अभिप्राय नोंदविला आहे. 

दरम्यान, सरकारच्या निर्णयानुसार आयोगाने परीक्षेचे नियोजन केल्याचेही सहसचिवांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन नियोजित वेळेत परीक्षा होईल, असेही आयोगाचे सहसचिव सुनील आवताडे यांनी सांगितले. 

परीक्षेची स्थिती... 

गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा : 11 एप्रिल 


परीक्षेला बसणारे विद्यार्थी : 4.23 लाख 


परीक्षा केंद्रे : 1500 


ठळक बाबी... 

परीक्षेसाठी एका वर्गखोलीत असतील 24 विद्यार्थी 


विद्यार्थ्यांना परीक्षा देताना घालावे लागणार कोव्हिड केअर किट 


पेपर सुरू होण्यापूर्वी दीड तास अगोदर परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी राहावे उपस्थित 


थर्मल स्क्रीनिंग गनद्वारे घेतली जाईल विद्यार्थ्यांच्या तापमानाची नोंद 


पर्यवेक्षकांना कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक; लसीकरण करून घेण्याचेही आवाहन 




Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...