११ नोव्हेंबर २०२०

प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल


🛑 असमपृष्ठरज्जू प्राणी 🛑


🔶प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.


🔶पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा


🔶 सिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन


🔶 प्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म


🔶 नेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म


🔶 अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस


🔶 आथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळी


🔶 मोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगाय


🔶 इकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर


🔶हेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस

काकोरी कट (Kakori conspiracy)



🔰9 ऑगस्ट 1925🔰


🔰लखनौ ते सहारनपूर दरम्यान काकोरी


🔰सहभाग:- चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, मन्मथनाथ गुप्ता, अशफाक उल्लाखान, राजेंद्रनाथ लाहिडी, रोशनलाल इत्यादी क्रांतिकारक अग्रणी होते. (एकून 10 जणांचा समावेश) 


🔰बरिटिशांच्याविरुद्ध सशस्त्र लढा देण्याच्या हेतूने काकोरी (उत्तर प्रदेश) येथे घडवून आणलेला प्रसिद्ध क्रांतिकारी कट.


🔰सरकारी पोस्ट कार्यालयांमध्ये जमा झालेला पैसा रेल्वे मार्गाने जाणार असल्याची माहिती क्रांतिकारकांना मिळाली


🔰लखनौ ते सहारनपूर मार्गावर लखनौपासून आठ मैल अंतरावर असलेल्या काकोरी या गावाजवळ सशस्त्र क्रांतिकारकांनी रेल्वे थांबवून त्यातील खजिना लुटावा अशी योजना आखली.


🔰 9 ऑगस्ट 1925 रोजी क्रांतिकारक सरकारी खजिना घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यात जाऊन बसले. रेल्वे आडवळणी अशा काकोरी स्थानकाजवळ येताच त्यांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली


🔰रामप्रसाद बिस्मिल यांनी चैन खेचुन रेल्वे थांबवली


🔰कवळ दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही नियोजित लूट यशस्वी केली. या घटनेलाच ‘काकोरी कट’ असे म्हणतात.


🔰या कटात जवळपास 8000 रुपये लुटले


🔰काकोरी खटल्याचे कामकाज एप्रिल १९२७ पर्यंत चालले.


🔰यामधील रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाखान, रोशनलाल व राजेंद्रनाथ लाहिडी यांना फाशी दिली


🔰कारस्थानांमध्ये सहभागी असलेले चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांना गुंगारा देऊन भूमिगत राहिले.


🔰सशस्त्र क्रांती करण्याच्या उद्देशाने चंद्रशेखर आझाद यांनी ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशनʼ या जुन्या संस्थेचे ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोशिएशनʼ असे नामकरण करून क्रांतिकार्य चालू ठेवले.

वाचा :- महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने



1) गाडगे महाराज - अमरावती


2) समर्थ रामदास- सज्जनगड


3) संत एकनाथ - पैठण


4) गजानन महाराज - शेगाव


5) संत ज्ञानेश्वर - आळंदी


6) संत गोरोबा कुंभार - ढोकी


7) संत चोखा मेळा - पंढरपूर


8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी


9) संत तुकडोजी  - मोझरी


10) संत तुकाराम - देहू


11) साईबाबा - शिर्डी


12) जनार्दन स्वामी - कोपरगाव 


13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर


14) दामाजी पंत - मंगळवेढा


15) श्रीधरस्वामी - पंढरपूर


16) गुरुगोविंदसिंह - नांदेड


17) रामदासस्वामी - जांब


18) सोपानदेव - आपेगाव


19) गोविंदप्रभू - रिधपुर


20) जनाबाई - गंगाखेड


21) निवृत्तीनाथ - आपेगाव

भारतीय क्षेपणास्त्रे




1. बराक 8 - भारत-इस्त्रायलच्या संयुक्त विध्यमाने, 70 किमी क्षमता, जमिनीवरून हवेत मारा.


2. निर्भय - 1000 किमी पल्ला, डिआरडिओ तर्फे विकसित.


3. पिनाका अग्निबाण प्रणाली 6 - अग्निबाण प्रक्षेपकांव्दारे 12 रॉकेटस 44 सेकंदांत प्रक्षेपित, 40 किमी पल्ला.


4. आकाश - एकामागोमाग एक तीन क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता, हवाई दलात तैनात. (जमिनीवरून हवेत मारा करणारे)


5. अस्त्र-सुखोई 30 - विमानांवर तैनात, स्वदेशी बनावटीचे, पल्ला 60 किलोमीटर (हवेतून हवेत मारा करणारे.)


6. पृथ्वी संरक्षण प्रणाली - हवामानाच्या थरांबाहेर 120 किलोमीटरवर शत्रूच्या क्षेपस्त्रांना उद्ध्वस्त करण्याची क्षमता. (जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे)


7. ब्राम्होस - पल्ला 300 किमी, गती 2.8 माक, आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, अण्वस्त्रवहन क्षमता.


8. त्रिशूल - जमिनीवरून हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्राविरोधी क्षेपणास्त्र.


9. नाग - रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र.


10. सूर्या - आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र.


11. सागरिका - पाण्याखालून मारा करणारे क्षेपणास्त्र. पाणबुडीवरून जमिनीवर मारा करणारे.


12. शौर्य - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.


13. धनुष - जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.

अमेरिकेने टाकलेला 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' म्हणजे नेमके काय?

 


अमेरिकेने अफगाणिस्तानातील नंगरहार प्रांतात आयसिसला लक्ष्य करताना जीबीयू-४३/बी मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्ट (एमओएबी) नावाचा बॉम्ब टाकला. या बॉम्बला 'मदर ऑफ ऑल बॉम्ब' असेही म्हटले जाते. अफगाणिस्तानातील आयसिसच्या तळांना लक्ष्य करत अमेरिकेने सर्वाधिक मोठा बॉम्ब हल्ला केला आहे. या कारवाईनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याचे अभिनंदन केले.


मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्टचा वापर शत्रूवर मानसिक दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने केला जातो. गुरुवारी अमेरिकेने या बॉम्बचा वापर करण्याआधी कोणत्याही देशाने या बॉम्बचा वापर केला नव्हता. त्यामुळे मॅसिव्ह ऑर्डनन्स एअर ब्लास्टचा वापर करणारा अमेरिका हा पहिला देश ठरला आहे. अनेक वृत्तांनुसार, अफगाणिस्तानातील नंगरहारमध्ये या बॉम्बच्या वापरानंतर तब्बल ३०० मीटरचा खड्डा पडला आहे.


मदर ऑफ ऑल बॉम्ब नावाने ओळखल्या जाणाऱ्या बॉम्बला जाळीदार पंख असतात. बॉम्ब आकाशातून टाकण्यात आल्यानंतर पंख बॉम्बच्या वजनाला नियंत्रित करतात. हा बॉम्ब इतका मोठा असतो की तो फक्त विमानाच्या माध्यमातूनच टाकला जाऊ शकतो. या बॉम्बला पॅलेटवर ठेवले जाते. यानंतर पॅराशूटच्या मदतीने बॉम्बला विमानाबाहेर टाकले जाते. पॅराशूटच्या मदतीने पॅलेटला खेचण्यात आल्यानंतर पॅलेट बॉम्बपासून वेगळे करण्यात येते आणि त्यानंतर बॉम्ब टार्गेटवर टाकला जातो. यानंतर बॉम्ब लक्ष्याच्या दिशेने वेगाने जातो. उपग्रहाच्या माध्यमातून या बॉम्बचे नियंत्रण केले जाते.


जमिनीपासून सहा फूट अंतरावर बॉम्बचा स्फोट घडवण्यात येतो. बॉम्ब स्फोटाची तीव्रता जास्तीत जास्त राखण्यासाठी जमिनीपासून काही अंतरावर असतानाच स्फोट घडवला जातो. मोठे लक्ष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आणि जमिनीवरील सैन्याला, शस्त्रास्त्र साठ्याला उद्ध्वस्त करण्यासाठी मदर ऑफ ऑल बॉम्बचा वापर केला जातो. या स्फोटाची तीव्रता ११ टिएनटी बॉम्बच्या स्फोटांएवढी असते. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणूबॉम्बमध्ये १५ टन टिएनटी स्फोटके होती.


२००३ मध्ये इराक युद्धादरम्यान अमेरिकेने एमओएबी बॉम्बची चाचणी घेतली होती. मात्र अद्यापपर्यंत अमेरिकेसह कोणत्याही देशाने या बॉम्बचा वापर केला नव्हता. अमेरिकेने मदर ऑफ ऑप बॉम्बची निर्मिती केल्यावर रशियाने त्यापेक्षा चारपट अधिक संहारक बॉम्बची निर्मिती करत त्याला फादर ऑफ ऑल बॉम्ब असे नाव दिले. मदर ऑफ ऑप बॉम्ब ३० फूट लांब आणि ४० इंच रुंद असतो. या बॉम्बचे वजन ९ हजार ५०० किलो असते. या बॉम्बचे वजन हिरोशिमामध्ये टाकण्यात आलेल्या बॉम्बपेक्षा जास्त होते.


मदर ऑफ ऑल बॉम्ब अतिशय विध्वंसक असतो. या बॉम्बच्या स्फोटानंतर सर्व दिशांना साधारणत: एका मैलापर्यंत नुकसान होते. मात्र अणूबॉम्ब नसल्याने यामुळे कोणताही किरणोत्सार होत नाही. या स्फोटानंतरच्या अवघ्या काही सेकंदांनतर आसपासच्या भागातील ऑक्सिजन संपतो. त्यामुळे परिसरातील लोकांचा श्वास गुदमरतो. स्फोटाच्या आवाजानंतर एक प्रकाशाचा किरण निघतो आणि एक विध्वंसक लाट एका मैलापर्यंत जाऊन तिच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक वस्तूचे जबरदस्त नुकसान करते. यामुळे बहुतांश लोकांचा मृत्यू होता. अनेकांच्या कानांमधून रक्तस्राव सुरु होतो. परिसरातील झाडे उन्मळून पडतात आणि इमारती कोसळतात.


जिभेचा रंग काय सांगतो ?



अनेकदा आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. कधी तुम्ही हा विचार केला आहे का की तुमची जीभ पाहुण डॉक्टरला आजाराचं निदान कसं होत असेल. पण आम्ही तुम्हाला आज ही गोष्ट सांगणार आहोत की का डॉक्टर जीभ बघतो.

जीभचा रंग हा तुमच्या शरिराच्या स्थितीचा अंदाज सांगतो. पाहा काय आहे जीभेच्या रंगामागचं खरं कारण.


 काय सांगते तुमची जीभ.


१. गुलाबी रंग - गुलाबी रंगाची जीभेवर जर कोणत्याही प्रकारचे डाग नसतील तर तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित आहात.


२. तुमच्या जीभेवर जर सफेद रंगाचा थर असेल तर तुमच्या पचन क्रिया व्यवस्थित नाही. तुमच्यात अशक्तपणा आहे. काही वेळेस हे वायरल इंफेक्शनचा ही प्रकार असू शकतो.


३. पिवळा रंग - पिवळा रंग सांगतो की तुम्हाला सर्दी, वायरल इंफेक्शन किंवा तुमच्या शरिरात हिट वाढली आहे. काही वेळेस हा पचन न होण्याच्या समस्येचंही संकेत देतो.


४. लाल रंग - लाल रंगाची जीभ ताप, रक्तात उष्णता वाढणे किंवा अंतर्गत जखम आणि इंफेक्शनचं संकेत देते.


५. कोरडी जीभ - जीभ कोरडी पडणे आणि पिवळी पडणे म्हणजे काविळ, अशक्तपणा, कमी झोप, आतड्यांना सूज थकवा याचे संकेत देते.


६. निळा रंग - शरिरात विटामिन बी-2 ची कमतरता आणि महिलांना दुखणे याचा संकेत देते. कोणत्याही औषधाच्या साईड इफेक्टमुळे देखील जीभ निळी पडते.


७. जीभेचा सर्वात पुढचा भाग लाल होणं हा मानसिक समस्येचं संकेत देतो.


८. जीभेछ्च्यावर अनेकदा सफेद डाग तयार होतात हे इंफेक्शन आणि अधिक घाम येण्याचे संकेत असतात.

महत्वाच्या संज्ञा




*काचेचा रंग - वापरावयाची धातूसंयुगे*


 लाल - क्युप्रस ऑक्साइड


निळा - कोबाल्ट ऑक्साइड


हिरवा - क्रोमीअम ऑक्साइड किंवा फेरस ऑक्साइड


जांभळा - मॅगनीज डाय ऑक्साइड


पिवळा - अॅटीमनी सल्फाइड


दुधी - टिन ऑक्साइड किंवा कॅल्शिअम सल्फेट 


*समीश्रे - घटक*


 पितळ - तांबे+जस्त


ब्रांझ - तांबे+कथिल


अल्युमिनीअम ब्रांझ - तांबे+अॅल्युमिनीअम


जर्मन सिल्व्हर - तांबे+जस्त+निकेल


गनमेटल - तांबे+जस्त+कथिल


ड्युरॅल्युमिनीअम - तांबे+अॅल्युमिनीअम+मॅग्नेशियम


मॅग्नेलियम - मॅग्नेशियम+अॅल्युमिनीअम


स्टेनलेस स्टील - क्रोमियम+लोखंड+कार्बन


नायक्रोम -    लोह+निकेल+क्रोमियम+मॅगेनीज 


*व्यावहारिक नाव - शास्त्रीय नाव*


 मार्श गॅस - मिथेन             


 खाण्याचा - सोडीयम बाय कार्बोनेट


धुण्याचा सोडा - सोडीयम कार्बोनेट


मीठ - सोडीयम क्लोराइड


व्हाईट व्हिट्रीऑल - झिंक सल्फेट


ब्ल्यु व्हिट्रीऑल - कॉपर सल्फेट


ग्रीन व्हिट्रीऑल - फेरस सल्फेट


जलकाच -    सोडीयम सिलिकेट


फॉस्जीन - कार्बोनिल क्लोराइड


जिप्सम सॉल्ट - मॅग्नेशियम सल्फेट


ग्लोबर्स सॉल्ट - सोडीयम सल्फेट


बेकिंग सोडा - सोडीयम बाय कार्बोनेट


फेरस अमोनियम सल्फेट - मोहर सॉल्ट


ल्युनर कॉस्टीक - सिल्व्हर नायट्रेट


संगमवर - कॅल्शियम कार्बोनेट


मोरचूद - कॉपर सल्फेट


रडार




रेडिओ डिटेकशन अँड रेजिंग


💎```हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे याच्या दृष्टीक्षेपात येणाऱ्या,हलणाऱ्या व स्तब्ध वस्तूंची नोंद घेऊ शकते डोळ्याला न दिसणाऱ्या वस्तूंची दिशा ,अंतर,उंची आणि वेग यांची माहिती करून घेण्याची क्षमता या उपकरणात आहे.```


💎```रडार चा मूळ उद्देश वस्तूंचे अस्तिस्त्व नोंदणे

आपल्या डोळ्यांना वस्तू दिसण्याचे कारण प्रकाशाच्या लहरी वस्तूवर पडतात आणि तेथून त्या आपल्या डोळ्यांच्या दिशेने  परावर्तित होतात .आपल्या डोळ्यामध्ये प्रतिबिंबित होतात.```


💎```रडार शक्तिशाली रेडिओ ट्रांसमीटर (प्रक्षेपक यंत्र)वापरून रेडिओ लहरींचे प्रक्षेपण करून वस्तू प्रकाशमान करतो```


💎```संवेदनाक्षम रेडिओ receiver परावर्तित लहरींचा शोध घेतो अशा परावर्तित लहरींना प्रतिध्वनी म्हणतात

या लहरी दूरध्वनी यंत्राच्या श्रावकामार्फत इलेक्टरोनिकसच्या साहाय्याने पडद्यावर प्रदर्शित केल्या जातात```


💎```या प्रकाशाचे ठिपके किंवा प्रत्यक्ष वस्तूंचे प्रतिबिंब्या स्वरूपात दिसते```


💎```दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हे यंत्र सैन्याच्या वापरासाठी ,विमान,व युद्धनौका यांचा शोध घेण्यासाठी होते

आता हे यंत्र विमान व नौकांच्या मार्गदर्शनासाठी,वादळे किंवा आकाशातील इतर गोंधळ तसेच ग्रह उपग्रह यांच्या अभ्यासासाठी वापरले जाते```


धवनी:



'ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना'.

ध्वनीचे स्वरूप :'ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते'.


ध्वनीची निर्मिती आघाताने, छेडल्याने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तु हालल्याने अशा अनेक कारणाने होवू शकते.


प्रत्येक उदाहरणात कंपन ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.


कंपन : वस्तूची जलद गतीने पुढे-मागे होणारी हालचाल म्हणजे कंपन होय.


उदा. तंतुवाद्यातील तारेची कंपने




ध्वनी हे तरंगाच्या स्वरुपात प्रसारित होतो.


वस्तु विक्षोभित होते आणि कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होतो.


ध्वनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो त्याला माध्यम म्हणतात. ते घन, द्रव किंवा वायु असू शकते.


ध्वनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही.


प्रत्येक्षात कंपित वस्तूपासून ऐकणार्‍यापर्यंत कण प्रवास करीत नाहीत.

ध्वनी तरंगाची वैशिष्ट्ये :


जेव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो.


संपीडने : कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग म्हणजे संपीडने होय.


संपीडनांपाशी घनता तसेच दाब उच्च असतो.


विरलने : कमी दाबाचे असे भाग की जेथे कण विखुरलेले असतात त्याला विरलने म्हणतात.


विरलनापाशी घनता तसेच दाब कमी असतो.


दोन लगतच्या संपीडनातील किंवा दोन लगतच्या विरलनातील अंतरास तरंगलांबी म्हणतात.


त्याचे SI पद्धतीत एकक मीटर तर तरंगलांबी ग्रीक अक्षर लॅम्डा ने दर्शवतात.


वारंवारता :


घनतेचे उच्चतम किंमतीपासून कमीत कमी किंमतीपर्यंत आणि पुन्हा उच्चतम किंमतीपर्यंत होणारा बदल एक आंदोलन घडवितो.


एकक कालावधीत होणारी आंदोलनाची संख्या म्हणजे तरंगाची वारंवारता होय.


ध्वनी तरंगाची वारंवारता ग्रीक अक्षर न्यू ने दर्शवितात.


त्याचे SI पद्धतीत एकक हर्टझ असून ते Hz ने दर्शवितात.


(note- हर्टंझ (1857-1894) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. सर्वप्रथम त्यांनी बिनतारी संदेशवहनाचे प्रसारण व तरंगांची स्वीकृत केली. )

तरंगकाल :


लगतची दोन संपीडणे किंवा विरलने यांना ठराविक बिंदु पार करून जाण्यास लागणारा वेळ म्हणजे 'तरंगकाल' होय.


माध्यमाच्या घनतेमध्ये एक संपूर्ण आंदोलन होण्यास लागणारा वेळ हा ध्वनी लहरीचा तरंगकाल असतो.


तो 'T'ने दर्शविला जातो.


SI पद्धतीत तरंगकालाचे एकक सेकंद आहे.


u=1/t



ध्वनीचा वेग :


तरंगावरील संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदुने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय.


वेग=अंतर/काल


एका तरंगकालात कापलेले अंतर,


वेग= तरंगलांबी/तरंगकाल


वेग= वारंवारता*तरंगलांबी


मानवी श्रवण मर्यादा :


मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा सुमारे 20 हर्टझ ते 20,000 हर्टझ आहे.


पाच वर्षाच्या आतील मुले आणि कुत्र्यांसारखे काही प्राणी 25000 हर्टझ पर्यंत ध्वनी एकू शकतात.



श्रव्यातील ध्वनी :


20000 हर्टझ पेक्षा अधिक वारंवारता असणार्‍या ध्वनीला श्रव्यातील ध्वनी असे म्हणतात.


निसर्गात डॉल्फिन्स, वटवाघुळे, उंदीर वगैरे तो निर्माण करू शकतात.


उपयोग :


जहाजावरून जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातील ध्वनी उपयोगी ठरते.

ध्वनीचे परिवर्तन :


ध्वनी तरंगांचे घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते.


ध्वनीच्या परावर्तनासाठी फक्त मोठ्या आकाराचा खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते.


प्रतिध्वनी :


मूल ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनी होय.


अंतर= वेग*काल


निनाद :


एखाद्या ठिकाणाहून ध्वनी तरंगांचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन, ध्वनीतरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो.त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होतो त्यालाच निनाद म्हणतात.



सोनार (SONAR):


Sound Navigation And Ranging याचे लघुरूप म्हणजे SONAR होय.


पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्यातील ध्वनी तरंगाच्या उपयोग करून SONAR मोजते.

संगणकाविषयी माहिती भाग :



DOT म्हणजे - डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन

  

SSA म्हणजे - सर्व शिक्षा अभियान

  

SARI म्हणजे - सस्टेनेबल अॅक्सेस इन रूरल इंडिया

  

CIC म्हणजे - कॉम्युनिटी इन्फ्रोर्मेशन सेंटर

  

CIC ची सुरुवात झाली - 17 ऑगस्ट 2002

  

ई-वेस्ट म्हणजे - इलेक्ट्रॉनिक कचरा

  

सॉफ्टवेअर चोरी रोखण्यासाठीचा कायदा - इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अॅक्ट

  

नॅशनल अॅरोलॅटिक लॅब - बंगळुरू

  

सी-डॅक चे मुख्यालय - पुणे

  

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी - मुंबई

  

'अनुराग' ही संगणकविषयक संस्था - हैदराबाद

  

संगणकाच्या चौथ्या पिढीचा कालावधी - 1970-80

  

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली हिरवी रेषा संकेत आहे - व्याकरणातील चुका

  

मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लिहिताना अक्षरांखाली लाल रेषा संकेत आहे - स्पेलिंग मिस्टेक

  

रिसायकल बिन या चित्राने दर्शवितात - डस्ट बिन

  

नेटस्केप नेव्हीगेटर प्रकार आहे - ब्राऊझरचा

  

डॉसची आज्ञावली या भाषेत असते - अमेरिकन

  

बारकोड रिडर्सना म्हणतात - हॅन्डहेल्ड स्कॅनर

  

ई-मेल म्हणजे - इलेक्ट्रॉनिक मेलिंग

Greenhouse effect हरितगृह परिणाम


हरितगृह परिणाम:-


   सूर्याकडून पृथ्‍वीकडे येणारी ऊर्जा लघू प्रारणांच्‍या (Short Waves) रूपाने येते. पृथ्‍वीकडून उत्‍सर्जित होणारी ऊर्जा दीर्घ प्रारणांच्‍या (Lonh waves) रूपाने आढळते. वातावरणातील जलबाष्‍प, कार्बन डाय ऑक्‍साईड हे घटक सूर्याकडून पृथ्‍वीकडे येणार्‍या प्रारणांसाठी पारदर्शक आहेत. परंतु पृथ्‍वीकडून अवकाशात उत्‍सर्जित होणारी दीर्घ प्रारणे मात्र हे घटक अडवतात. वातावरणाच्‍या अध:स्‍तरात अडलेल्‍या दीर्घ प्रारणांमुळे वातावरणाचे तापमान वाढते. यालाच हरितगृह परिणाम असे म्‍हणतात.




हरितगृह परिणामामुळेच पृथ्‍वीचे वातावरण उबदार बनले आहे. त्‍यामुळेच पृथ्‍वीवर सजीव सृष्‍टीचे अस्तित्‍व आढळते. म्‍हणजेच हरितगृह परिणाम आवश्‍यक व 

उपकारक आहे. या परिणामाचा उपयोग शेतीमध्‍ये केला जातो. काही पिकांना दमट हवामानाची गरज असते. ते निर्माण करण्‍यासाठी प्‍लास्टिकचा कागद वापरून हरितगृह निर्माण केले जाते.


  प्‍लास्टिक कागदामुळे पृथ्‍वीकडून अवकाशात जाणारी दीर्घ प्रारणे अडवली जातात. त्‍यामुळे हरितगृहामधील तापमान वाढते. वाढलेल्‍या तापमानामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढते. थंड हवामानाच्‍या प्रदेशात प्‍लास्टिक कागदाऐवजी काचेचा उपयोग केला जातो. या रचनेला ग्‍लास हाऊस असे म्‍हणतात. या ग्‍लास हाऊसमध्‍ये अत्‍यंत कमी तापमान असणार्‍या प्रदेशातही पिके घेता येतात.


हरितगृह परिणामात वाढ:-

मानवाच्‍या विविध क्रियांमुळे वातावरणातील हरितगृह घटकांचे प्रमाण वाढले आहे. जलबाष्‍प, कार्बन डाय ऑक्‍साइड यांच्‍याप्रमाणेच कार्बन मोनोक्‍साइड, सल्‍फर डाय ऑक्‍साइड, सल्‍फर ट्राय ऑक्‍साइड, मिथेन, नायट्रोजन डाय ऑक्‍साइड, क्‍लोरोफ्‍ल्‍युरो कार्बन्स हेदेखील हरितगृह वायू आहेत. त्‍यांचे वातावरणातील प्रमाण लक्षणीयरि‍त्‍या वाढले आहे. त्‍यामुळे वातावरणाचे तापमान वाढत आहे. यालाच ‘जागतिक तापमानवाढ'  असे म्हणतात. ही जागतिक तापमानवाढच मानवनिर्मित हवामान बदलाचे मुख्‍य कारण आहे.



हवामान बदलाचे परिणाम अल्‍पकालीन व दीर्घकालीन स्‍वरूपाचे आढळतात:-



सागर जल पातळीत वाढ

महासागरांचे आम्‍लीकरण

मासेमारीवर परिणाम

प्रवालींचा नाश व विरंजन

हिमरेषांच्‍या उंचीत वाढ

तापमान, पाऊस, कार्बन डाय ऑक्‍साइडचे प्रमाण या घटकांचा शेतीवर मोठा प्रभाव पडतो.

सामान्य विज्ञान इयत्ता 10 वी :



1 Joule = 107 अर्ग

 

फटक्यामध्ये रासायनिक ऊर्जा साठविलेली असते.

 

ऊर्जा अक्षय्यतेचा नियम सांगतो की, ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्ठही करता येत नाही. केवळ तिचे एका प्रकारातून दुसर्यार प्रकारात रूपांतर करता येते.

 

कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती होय. तसेच एकक कालात केलेले कार्य म्हणजे शक्ती होय.

 

SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.

 

१ वॅट = १ ज्युल/से = 1 N – m/s तसेच 1 HP = 746 वॅट

 

माध्यमातून प्रक्षोभाचा जो आकृतीबंध प्रवास घडतो त्या आकृतिबंधास ‘तरंग’ असे म्हणतात.

 

यांत्रिक तरंग दोन प्रकारचे असतात. १) अनुतरंग (longitudinal wave), २) अवतरंग (transverse wave)

 

ध्वनीचा कोरड्या हवेतील वेग 00से तापमानाला 332 मी/से. आहे.

 

ज्या ध्वनी तरंगाची वारंवारता २० Hz पेक्षा कमी किंवा २०,००० Hz पेक्षा जास्त असते असे ध्वनी माणसाला ऐकू येत नाहीत. त्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतात.

 

प्रकाशाचा वेग 3 x 108 m/s आणि ध्वनीचा वेग ३४० m/s आहे.

 

ध्वनीलहरींचे परावर्तन होऊन 1/10 सेकंदानंतर त्या आपल्या कानावर पडल्यास मूळ आवाज पुन्हा ऐकू येतो. हाच प्रतिध्वनी होय.

 

प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किमान १७ मी. अंतर असणे आवश्यक आहे.

 

वटवाघूळ उच्च वारंवारतेचा ध्वनी निर्माण करतात. या ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी असे म्हणतात.

 

प्रतिध्वनीचे तत्व SONAR पद्धतीत वापरतात.

 

SONAR- Sound Navigation And Ranging System

 

पाण्यामध्ये ध्वनीचा वेग १४१० m/s आहे तर समुद्राच्या पाण्यात हाच वेग १५५० m/s आहे. लोखंडामध्ये ध्वनीचा वेग सुमारे ५१०० m/s आहे.

 

ध्वनीच्या तीव्रतेचे एकक डेसिबल (decibel) हे आहे. लघुरूपात डेसिबल हे dB असे लिहितात.

 

नकोसा वाटणारा ध्वनी म्हणजे कुरव होय.

 

पाण्याचे तापमान ४°से. पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्टपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखविते.


सर्वसामान्य मानवी डोळा त्यावर ताण न देता वस्तु स्पष्ट पाहण्याचे किमान अंतर म्हणजे २५ सेंमी होय.

 

निकटदृष्टीता फक्त जवळच्या वस्तु स्पष्ट दिसतात. अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन या दृष्टीदोषाचे निराकरण करता येते.

 

दूरदृष्टीता – नेत्रगोल उभट होण्याने निर्माण होतो. लांबच्या वस्तु नीटपणे दिसू शकतात. बहिर्वक भिंगाचा चष्मा वापरुन हा दोष दूर करता येतो.

 

अबिंदुकता – एकाच प्रतलातील क्षितीज समांतर रेषा व क्षितीज लंब रेषा यांच्या प्रतिमा वेगवेगळ्या प्रतलात तयार होतात. या दोषाला अबिंदुकता असे म्हणतात. दंडगोल भिंगाचा चष्मा वापरुन दूर करतात.

 

वृद्ध दृष्टीता – निकट बिंदूचे डोळ्यापासूनचे अंतर वयाबरोबर वाढते. निकटबिंदूच्या डोळ्यापासून मागे सरण्याला वृद्धदृष्टीता असे म्हणतात.

 

बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरुन वृद्धदृष्टीता दूर करता येते.

 

जेव्हा अबिंदुकता आणि निकटदृष्टीता किंवा दूरदृष्टीता असे दोन दोष असतील तेव्हा त्यांना घालविण्यासाठी तीन अंक दिलेले असतात.

 

साध्या सूक्ष्मदर्शकाला विशालक असेही म्हणतात. रत्नाची पारख करण्यासाठी व त्यातील दोष शोधण्यासाठी जव्हेरी याचा उपयोग करतात.

 

संयुक्त सूक्ष्मदर्शक हा नेत्रिका व पदार्थभिंग अशा दोन बहिवक्र भिंगाचा बनलेला असतो.

 

अपवर्तन होताना पांढर्या  प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात अपस्करण होऊन पांढर्या. वस्तूंच्या रंगीत प्रतिमा तयार होतात. त्याला वर्णीय विपयन असे म्हणतात.

 

वस्तु दूर केल्यानंतरही १/१६ सेकंदापर्यंत प्रतिमेची दृष्टीपटलावरील ठसा तसाच राहतो. दृष्टिपटलावरील संवेदना टिकणे या परिणामाला दृष्टीसातत्य असे म्हणतात.

 

दंडाकार पेशी प्रकाशाच्या तीव्रतेस प्रतिसाद देतात आणि मेंदुस प्रकाशाच्या तेजस्वितेची किंवा अंधुकतेची माहिती पुरवितात.

शक्ती

 


कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण म्हणजे 'शक्ती' होय.


कार्य करण्याच्या दरास 'शक्ती' म्हणतात.


केलेले कार्य समान असले तरी त्यांनी वापरलेली शक्ती वेगवेगळी असे शकते.


गच्चीवरील पाण्याची टाकी एक माणूस दिवसभरत बादलीच्या सहाय्याने भरू शकतो, तर तेच काम करण्यासाठी मोटारीला 5 मिनिटे लागू शकतात.


शक्ती (P) = कार्य/काल = w/t


शक्तीचे एकक=>


SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे.


1 वॅट = 1 ज्युल/सेकंद


1 किलोवॅट = 1000 वॅट


औधोगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती Horse Power या एककाचा वापर प्रचलित आहे.


1 अश्वशक्ती = 746 वॅट


व्यावहारिक उपयोगासाठी शक्तीचे एकक किलोवॅट तास हे आहे.


1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 J प्रति सेकंद या प्रमाणे केलेले कार्य.


1 Kwhr = 1 Kw × 1 hr


= 1000w × 3600 s


= 3.6 × 106 Joules


घरगुती वापर, औधोगिक, व्यावहारीक उपयोगासाठी हे एकक वापरतात.

___________________________________

बल



निसर्गात आढलाणाऱ्या आणि परस्परांपासून भिन्न असणाऱ्या सर्व बलांचे 4 मुख्य गटात वर्गीकरण करता येते.


गुरुत्व बल


विधुत चुंबकीय बल


केंद्रकीय बल


क्षीण बल


गुरुत्वबल (Gravitational Force)=>


सफरचंद खालीच का पडले ? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.


न्यूटनच्या म्हणण्यानुसार विश्वातील प्रत्येक वस्तु दुसर्या  वस्तूला स्वत:कडे ओढते. या प्रकारे प्रयुक्त आकर्षणबलास 'गुरुत्वबल' असे म्हणतात.


हे बल परस्परांकडे आकर्षित होणार्‍या दोन वस्तूंच्या वस्तुमानावर अवलंबून असते. ओढणार्‍या वस्तूंचे वस्तूमान जास्त असेल तर बलाचे परिमाणही जास्त असते.


एखाधा वस्तूवर समान अंतरावर पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते. कारण चंद्राचे वस्तुमान पृथ्वीच्या वस्तुमानापेक्षा कमी असते.


गुरुत्वबल दोन वस्तूंमधील अंतरावरदेखील अवलंबून असते. जर दोन वस्तूंमधील अंतर कमी असेल तर त्यांच्यातील गुरुत्वबल जास्त असते.


न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम असे सांगतो की विश्वातील कोणत्याही दोन वस्तु कोठेही असल्या तरी त्यांच्या परस्परांना आकर्षित करणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणकाराशी समानुपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते.


F=G m1 m2 /r2  G = विश्वगुरुत्व स्थिरांक


SI पद्धतीत G = 6.67 × 10-11 Nm2/kg2


CGS पद्धतीत G = 6.67 × 10-8 dyne.cm2/g2


पृथ्वीचे गुरुत्व त्वरण=>


एखादी वस्तु विशिष्ट उंचीवरून हवेतून खाली सोडली तर ती सरळ खाली येते. खाली येताना वेग वाढतो. याचा अर्थ त्याच्यात त्वरण निर्माण होते. यालाच 'गुरुत्व त्वरण' असे म्हणतात.

उष्णता



उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार असून कोणत्याही प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर करुन ती मिळविता येते.


थंडीच्या दिवसात आपण हातावर हात घासतो. या प्रकियेत यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते.


जेव्हा आपण गिझरचे बटण चालू करतो तेव्हा विधुत ऊर्जेचे रूपांतर उष्णता उर्जेत होते. या उलट जेव्हा पाणी तापविले जाते तेव्हा पाण्याचे रूपांतर वाफेत होते.


वाफेच्या इंजिनामध्ये वाफेचे रूपांतर यांत्रिक उर्जेत होते व वाफेच्या इंजिनाच्या सहाय्याने रेल्वे धावते.


पाण्याचे असंगत आचरण=>


सामान्यपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापविल्यास त्याचे प्रसरण होते व थंड केल्यास त्याचे आकुंचन होते.


परंतु पाण्याचे तापमान 4℃ पेक्षा कमी झाले असता पाणी वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक आचरण दाखवते.


0℃ तापमानाचे पाणी तापविले असता सुरूवातीस 4℃ तापमान होईलपर्यंत त्याचे प्रसरणाऐवजी आकुंचन होते.


4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्युनतम होते आणि 4℃ च्या पुढे तापमान गेल्यास पाण्याचे आकारमान वाढत जाते.


पाण्याचे 0℃पासून 4℃ पर्यंत पाण्याचे तापमान वाढविल्यास त्याचे आकारमान वाढण्याऐवजी कमी होते.


4℃ या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम (Minimum) असते. म्हणून पाण्याची घनता 4℃ ला उच्चतम (Maximum) असते.


पाण्याचे असंगत आचरण होपच्या उपकरणाच्या सहाय्याने दाखविता येते.


बर्फ पाण्यावर तरंगते याचाच अर्थ त्याची घनता 0℃ तापमानाच्या पाण्यापेक्षा कमी आहे असा होतो.


थंड प्रदेशामध्ये हिवाळ्यात वातावरणाचे तापमान 0℃  पेक्षाही कमी होऊ शकते. तापमान कमी होत जाते तसतसे तळी आणि तलावातील पाणी आकुंचन पावू लागते. त्याची घनता वाढते. ते तळाकडे जाऊ लागते. ही क्रिया संपूर्ण पाण्याचे तापमान 4℃होईपर्यंत चालू राहते.


तापमान 4℃ पेक्षा कमी होऊ लागल्यानंतर ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावू लागते.

सामान्य विज्ञान इयत्ता 8 वी शॉर्ट नोट्स :



सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित आठ ग्रह फिरतात.


 चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

 प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे ५० मिनिटे उशिरा होतो.

 चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास २७.३ दिवस लागतात.

 एका अमावस्येपासुन दुसर्‍या आमवस्येपर्यंतचा काळ २९.५ दिवसांचा असतो.


 एकूण ८८ तारकासमूह मानले जातात. त्यातील ३७ तारकासमूह उत्तर खगोलीय तर ५१ तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.


 प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी २७ नक्षत्रांची कल्पना केली आहे.


 प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.


 बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त ८८ दिवस तर नेपच्यूनचा सुमारे १४६ वर्षे इतका मोठा असतो.

  बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.

 पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला पहाटतारा म्हणतात.


 पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना अंतर्ग्रह, तर कक्षेबाहेरील ग्रहांना बाह्यग्रह म्हणतात.

 मंगळ हा पहिला बाह्यग्रह आहे.


  सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु

 गुरूला एकूण ६३ उपग्रह आहेत.

 शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.


 शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.


 धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.

 हॅले हा धूमकेतू ७६ वर्षानी दिसतो. आता २०६० मध्ये दिसेल.


 भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट १९ एप्रिल १९७५ रोजी सोडण्यात आला.

 त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - १, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.

 ‘इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत २१ उपग्रह सोडण्यात आले.


 GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.

टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.


 आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार १९७५ पासून अंमलात आला आहे. 


जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या १९९२ च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.


  ५ मार्च १८७२ रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.


 चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.


 मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.


 इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अनुतील मूलकण आहेत.

 अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.

  प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.

 अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.

 अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.

  मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.

 मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला संयुजा म्हणतात.


 विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.

 जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.

 स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.

 पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.


 साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.

 संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ

 संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ.


 पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.


 रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.


 WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र  काढली आहेत. (Directly Observed Treatment)

 मनुष्यप्राणी ‘व्हीब्रिओ कॉलरा’ या कॉलर्‍याचा जिवाणू वाहक आहे.


 लसीकरण – बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.

 त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.

Online Test Series

०८ नोव्हेंबर २०२०

वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक (MPSC)



राष्ट्रीय विकासात बँकांची भूमिका


बँक या शब्दाची उत्पत्ती बँको (Banco) या इटालियन तसेच जर्मन शब्द (Banck) या शब्दापासून झाली आहे. बँकिंग कंपनी (नियमन कायदा) १९४९ अन्वये बँक म्हणजे अशी संस्था होय. जी अग्रीमे देण्यासाठी अगर गुंतवणूकीसाठी व चेक्स, ड्राफ्टस, ऑर्डर, अगर इतर प्रकारे मागणी करताच परत देण्याच्या अटीवर ठेवी स्विकारते.


भारतात सावकार, सराफ, पेढीवाले या स्वरुपात बँक वयवसाय फार पुरातन काळापासून प्रचलित आहे.


आधुनिक बॅक व्यवसाय: – अशा प्रकारचा बँक व्यवसाय भारतात १७७० मध्ये आलेक्झांडर आणि कंपनीद्वारे स्थापन झालेल्या बँक ऑफ हिंदुस्थानच्या स्थापनेने झाला.


व्याख्या: – जी संस्था कर्ज देण्यासाठी अथवा भंडवल गुंतवणूकीसाठी लोकांकडून त्यांनी मागताक्षणी परत देण्याच्या किंवा चेक, ड्राफ्ट, ऑर्डर अथवा इतर प्रकारे परत देण्याच्या अटीवर ठेवी स्वीकारते ती संस्था म्हणजे बँक होय.


धनादेश:– भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियमानुसार धनादेश म्हणजे मागणी केल्यावर व देय असलेली, निश्चित अशा बँकेवर काढलेली हुंडी होय.


धनादेशाचे प्रकार:–


१. साधा धनादेश:– जो धनादेश रेखांकित केलेला नसतो त्यास साधा धनादेश म्हणतात. साध्यास धनादेशाचे  अ) वाहक धनादेश आणि  २) आदेश धनादेश असे दोन प्रकार पडतात.


अ) वाहक धनादेश:– वाहक धनादेश म्हणजे धनदेश बॅंकेत सादर करणा-या कोणत्याही व्यक्तीस त्याचे पैसे त्वरीत मिळू शकतात. त्यामुळे हा धनादेश धोकादायक आहे.


आ)वाहक धनादेश (Bearer Cheqye):– वाहक धनादेश म्हणजे धनादेश बँकेत सादर करणा-या कोणत्याही व्यक्तीस त्याचे पैसे त्वरीत मिळू शकतात. त्यामुळे हा धनादेश धोकादायक आहे. 


इ) आदेश धनादेश:– या प्रकारच्या धनादेशाचे पैसे ज्याचे धनादेशावर नाव लिहिलेले आहे त्या व्यक्तिलाच मिळतात. जर त्या व्यक्तीने धनादेश दुस-या व्यक्तीला दिला तर त्या व्यक्तीला धनादेशाच्या मागच्या बाजूस दुस-या व्यक्तीचे नाव लिहून स्वतःची सही करावी लागते यास पृष्ठांकन असे म्हणतात. हा धनादेश सुरक्षित प्रकारचा आहे.


२. रेखांकित धनादेश:– या धनादेशाचे पैसे धनादेश बँकेत सादर करताच त्वरीत मिळत नाही तर, ज्या व्यक्तीचे धनादेशावर नाव आहे त्या व्यक्तीच्या खात्यात ते पैसे जमा होतात. हा धनादेशाचा सुरक्षित प्रकार आहे. त्यामुळे हा धनादेश गहाळ झाला तर त्याचे पैसे कोणाच्या खात्यावर जमा झाले ते समजू शकते. या धनादेशाच्या रेखांकनाचे पुढील प्रकार पाडतात.


अ) सर्वसाधारण रेखांकन:- जेव्हा धनादेशावर डाव्या बाजूस दोन तिरप्या रेषा काढून त्यामध्ये ऍन्ड कं. असे लिहिले जाते त्या रेखांकनास सर्वसाधारण रेखांकन असे म्हटले जाते. या धनादेशाचे पैसे रोख न मिळता त्या व्यक्तीच्या खात्यावर जमा होतात. या धनादेशाचे पैसे व्यक्तीचे खाते ज्या बँकेत असेल त्या बँकेमार्फत मिळू शकतात.


आ) विशिष्ट रेखांकन:– जेव्हा धनादेशावर डाव्या बाजूस दोन तिरप्या रेषा काढून त्यामध्ये विशिष्ट बँकेचे अथवा विशिष्ट शाखेचे नाव लिहिलेले असते त्या रेखांकनास विशिष्ट रेखांकन असे म्हणतात या धनादेशाचे पैसे त्यावर ज्या बँकेचे अथवा शाखेचे नाव लिहिले आहे त्या शाखे मार्फतच मिळू शकतात.


इ) चलन क्षमता नष्ट करणारे रेखांकन: – या प्रकारच्या धनादेशावर दोन समांतर रेषामध्ये अहस्तांतरणीय (Not Negotiable) असे लिहिलेले असते.


रेखांकन: – भारतातील चलनक्षम दस्तऐवज कायद्यातील कलम १२३ अन्वये धनादेशावर दोन समांतर तिरप्या रेषा काढण्याच्या आणि त्यात अँन्ड कंपनी किंवा इतर शब्द लिहिण्याच्या प्रक्रियेस रेखांकन असे म्हणतात.


वैशिष्ट्ये:  –


१.     धनादेशाच्या डाव्या बाजूकडील कोप-यात तिरप्या दोन समांतर रेषा काढणे. 


२.     दोन समांतर रेषांच्या मध्ये अँन्ड कंपनी किंवा इतर शब्द लिहिणे.


३.     दोन समांतर रेषांमध्ये अपरक्राम्य हा शब्द लिहिणे किंवा न लिहिणे.


रेखांकनाचे महत्व:  –


१.     धनादेशाचे प्रदान अनाधिकृत व्यक्तीला होत नाही.


२.     धनादेशाचे प्रदान सुरक्षित पणे केले जाते.


३.     धनादेशाचे प्रदान कोणाला मिळाले याचा शोध सहजपणे घेता येतो.


४.     धनादेशाचा वापर सुरक्षितपणे करता येतो.


रेखांकन कोण करु शकते:  –


१. धनादेशाचा आदेशक: - बँक ग्राहक किंवा खातेदार आपली देणी फेडण्यासाठी धनादेशाचा वापर करीत असतो. तेव्हा धनादेश काढतांनाच आदेशक या नात्याने त्याला धनादेशावर रेखांकन करता येते. तसेच आदेशकाला धनादेशावर सर्वसाधारण, विशेष किंवा मर्यादित रेखांकन करता येते.


२. धनादेशाचा धारक: – धनादेशाचा धारक त्यावर पुढील प्रकारे रेखांकन करु शकतो.


अ) धनादेशावर रेखांकन नसल्यास त्यावर सर्वसाधारण किंवा विशेष रेखांकन धारकाला करता येते.


आ)  धनादेशावर सर्वसाधारण रेखांकन असल्यास त्यावर विशेष रेखांकन करता येते.


इ)     सर्वसाधारण किंवा विशेष रेखांकन असल्यास त्यावर अपरक्राम्य हा शब्द लिहीता येतो.


ई)     धनादेशावर विशेष रेखांकन असल्यावर एखाद्या बँकेचे नाव लिहून धनादेशाचे पुनर्रेखांकन करता येते.


धानादेश रेखांकन मुक्त करणे: - धनादेशावरील रेखांकन रद्द करण्याच्या प्रक्रियेस धनादेश रेखांकन मुक्त करणे म्हणतात. धनादेश रेखांकन मुक्त केल्यास त्या धनादेशाचे प्रदान बँकेत सादर करताच धारकास करणे म्हणतात. धनादेश रेखांकन मुक्त केल्यास त्या धनादेशाचे प्रदान बँकेत सादर करताच धरकास रोख रक्कम मिळविता येते. परंतु धनादेश रेखांकन मुक्त करण्याचा अधिकार केवळ धनादेशाच्या आदेशकालाच आहे. धनादेशाच्या आदेशकाने रेखांकनाच्या ठिकाणी रेखांकन रद्द असे लिहिल्यास आणि स्वतःची सही केल्यास रेखांकन रद्द होते.


भारतीय बँकिंग क्षेत्राचा विकास


भारतात बुध्द काळात श्रेष्ठी म्हणजे तत्कालीन बँकाच होय.


कौटिल्याने सुद्धा व्याज दराचा उल्लेख केला आहे.


मोगल काळात धातू चलन बँक व्यवसाय भरभराटीस आला परंतु शास्त्रीय पध्दत नव्हती.


अठराव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीने स्वतःचा बँकिंग व्यवसाय सुरु केला. कंपनी मुंबई आणि कोलकाता येथे एजन्सी हाउसची स्थापना केली. परंतु त्यांना स्वतःचे भांडवल नव्हते.


भारतातील प्रथम बँक युरोपीयन बँकिंग पध्दतीवर आधारीत विदेशी भांडवलाच्या आधारे अँलेक्झांडर अँन्ड कंपनीद्वारे १७७० मध्ये कोलकाता येथे बँक ऑफ हिंदुस्थानची स्थापना करण्यात आली.


१७८८ मध्ये बेंगॉल बँक व जनरल बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.


खाजगी भागधारकांनी एकत्र येवून १८०६ मध्ये बँक ऑफ बेंगॉल, १८४० मध्ये बँक ऑफ मुंबई, १८४३ मध्ये बँक ऑफ मद्रास या तीन इलाखा बँकांची स्थापना करण्यात आली.


१८६५ साली अलाहाबाद बँक


१८८१ अलायन्स बँक ऑफ शिमला


१९०१ पिपल्स बँक ऑफ इंडिया


भारतीय लोकांनी संचलित केलेली प्रथम बँक म्हणजे १८८१ मध्ये स्थापन झालेली अवध कमर्शियल बँक होय.


१८९४ मध्ये स्थापन झालेली पंजाब नॅशनल बँक ही पुर्णरुपाने प्रथम भारतीय बँक होय. सध्या अस्तित्वात असलेली सर्वात जुनी बँक पंजाब नॅशनल बँकच होय.


१९ व्या शतकाच्या तुलनेने २० शतकात प्रामुख्याने १९०६ नंतर भारतीय बँकाचा


१९१७ मध्ये उद्योजकांना उद्योगासाठी वित्तीय मदत करण्यासाठी टाटा औद्योगिक बँकेची स्थापना करण्यात आली.


शेड्यूल्ड व्यापारी बँक (अनुसूचीत बँक):- ज्या बँकांचा सामावेश आरबीआयच्या कायद्याच्या दुस-यावर सूचीत केला जातो व व्यापारी बँकांच्या मुदती ठेवी ५ लाखाच्या वर 


वरील माहिती ज्ञानसागर अंतर्गत वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक (MPSC) यात विस्तृतपणे दिलेली आहे.

अपारंपारिक ऊर्जा धोरण जाहीर :



धोरण जाहीर - 25 जाने. 2016उद्देश - अपारंपारिक ऊर्जा निर्मितीला चालना देणे तरतूद पाच वर्षात 2 हजार 682 कोटी रुपये. 


हे आहेत धोरण -


200 मेगावॅट वीज निर्मिती करू शकणारे सौर विद्युत संच बसविण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत शासकीय इमारतीपर 100% अनुदानावर 1 ते 50 किलोवॅट क्षमतेच्या संचाच्या माध्यमातून दरवर्षी 30 मेगावॅट याप्रमाणे पुढील पाच वर्षात एकूण 150 मेगावॅट विजेच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

  खासगी संस्थेच्या इमारतीवर 20 टक्के अनुदानाच्या योजनेतून 5 ते 20 किलोवॅट इतक्या क्षमतेच्या संचाच्या माध्यमातून दरवर्षी 10 मेगावॅट याप्रमाणे एकूण 50 मेगावॅट इतक्या विजेच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 


एकात्मिक ऊर्जा विकास योजना :


राज्यमंत्रीमंडळाची मंजूरी - 19 जाने. 2016 


योजनेचा उद्देश -


शहरी भागातील वीज वितरण प्रणालीच्या विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्याच्या दृष्टीकोनातून पायाभूत सुविधांची वाढ करणे. 


उद्दिष्टे -


शहरी भागातील वीज ग्राहकांच्या चोवीस तास वीजपुरवठा करणे.वीज प्रणालीचे सक्षमीकरण आधुनिकरण करणे.वीज गळती रोखण्यासाठी ग्राहक तसेच फिडर पातळीपर्यंत वीजमीटर बसविणे.

राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय



अलाहाबाद बैंक - कोलकाता


• बैंक ऑफ इंडिया - मुंबई


• बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे


• केनरा बैंक - बैंगलोर


• सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई


• कॉरपोरेशन बैंक - मंगलौर


• देना बैंक - मुंबई


• इंडियन बैंक - चेन्नई


• इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई


• ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली


• पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली


• पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली


• सिंडिकेट बैंक - मणिपाल


• यूको बैंक - कोलकाता


• यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई


• यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता


• विजया बैंक - बैंगलोर


• आंध्रा बैंक - हैदराबाद


• बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई

गरामोद्याव्दारे भारत उदय अभियान :



अभियान - 14 ते 24 एप्रिल 2016


अभियानाचा उद्देश - 

सामाजिक सलोखा व अभिसरण वृद्धिंगत करणे, पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करणे, शेतकर्‍यांच्या विकास करणे आणि गरिबांचे जीवनमान उंचावणे.

 महू (मध्यप्रदेश) येथील कालीपटनम येथे नरेंद्रमोदींनी डॉ. आंबेडकरांच्या स्मारकावर पुष्पांजली वाहिली (14 एप्रिल 2016) डॉ. आंबेडकरांच्या जन्मस्थळी भेट देणारे मोदी हे भारताचे-पहिले पंतप्रधान होय. येथील सभेमध्ये त्यांनी 'ग्रामोदय से भारत उदय' या मोहिमेचा प्रारंभ केला.


उदय योजना


केंद्र सरकारची योजना आहे, ऑगस्ट 2015 देशात लागू करण्यात आली.


🔹उज्वल डिस्कोम इन्शुरन्स योजना (UDAY - उदय)


योजनेचा उद्देश - 

देशभरातील वीज वितरण कंपन्यांच्या(डिस्कोम) आर्थिक पुनरुज्जीवनसाठी ही योजना सुरू करण्यात आली.

 योजनेत सहभागी राज्य - आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, राजस्थान, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेश.


🔹कॉमन सर्व्हिस सेंटर


देशातील अडीच लाख ग्रामपंचायतीत या सेंटव्दारे बँकिंग सेवा पुरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.(14 एप्रिल 2016)

 कॉमन सर्व्हिस सेंटर्समध्ये कोणत्याही सरकारी बँकेबरोबर बँकेचा खातेधारक आर्थिक देवघेवीचे व्यवहार करू शकेल.

 ग्रामीण नागरिकांना केवळ हाताचे ठसे देऊन या सेंटरव्दारे बँकेतले पैसे काढता येतील.

 किमान व्यवहार 100 रूपयांचा करावा लागणार, कोणत्याही खातेधारकाला एकाचवेळी 10 हजार रुपयापेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही.

 या महत्वाकांक्षी योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिनेश त्यागी हे आहेत.

 देशात सध्या 1 लाख 60 हजार कॉमन सर्व्हिस सेंटर्स आहेत.


कॅम्पा विधेयक


कॉम्पन्सेटरी अफॉरस्टेशन फंड मॅनेजमेंट अँड प्लॅनिंग अॅथोरिटी हे विधेयक लोकसभेत 20 एप्रिल 2016 रोजी मांडण्यात आले. वनीकरण वाढीला प्रोत्साहन देणे आणि आर्थिक मदत यासाठी हे विधेयक मांडण्यात आले. वणीकरणासाठी 42 हजार कोटी निधी उभारण्यात आला आहे.

मुद्रा बँक योजना



1.भारताची ओळख ‘तरुणांचा देश’ अशी आहे. देशामध्ये होतकरु, बुद्धिमान आणि जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे लाखो तरुण आहेत. त्यांना रोजगार मिळावा यासाठी केंद्र सरकारने ‘स्कील इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ सारख्या योजनांची सुरूवात करण्यात आली आहे.


2.अनेकांना कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्यामुळे एखादा लहान उद्योग/ व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी अनंत अडचणी येतात. मुख्य अडचण ही भांडवलाची असते. ती दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘मुद्रा बँक योजना’ आणली आहे.


3.कोणताही उद्योग, व्यापार आणि व्यवसाय उभारावयाचा असेल तर कमी व्याजदरामध्ये पतपुरवठा ही मुलभूत गरज आहे.


4.या सर्वांचा विचार करुन अशा तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातून उद्योजक निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बँक योजना (Micro Units Development and Refinance Agency) 8 एप्रिल 2015 रोजी कार्यान्वित केली.


5.योजनेसाठी 20 हजार कोटींचा निधी निश्चित करण्यात आला आहे तर तीन हजार कोटींचा क्रेडीट गॅरंटी निधी नव्या उद्योजकांना प्रोत्साहित करणारा ठरणार आहे.


6.या योजनेनुसार कुठल्याही प्रकारची तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु, बेरोजगार यांना कर्ज पुरवठा करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनाअंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते.


7.बेरोजगारांना कर्ज पुरवठा करुन त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित केले जाते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या तरुणांना योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे.


8.योजनेंतर्गत कर्ज मिळण्यासाठी तीन गटातील वर्गीकरण :


शिशु गट

   

10,000 ते रु. 50,000

किशोर गट


50,000ते 5 लक्ष

तरुण गट


5 लक्ष ते 10 लक्ष


9.योजनेअंतर्गत संबंधित व्यक्तींना जिल्हा सहकारी बँका, राष्ट्रीय बॅंका, प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगर बँक वित्तीय संस्था इत्यादीमार्फत कर्ज देणे अपेक्षित आहे.


10.यामध्ये सुतार, गवंडीकाम, कुंभार, शिंपी, धोबी, भाजीपाला व फळविक्रेते व्यावसायिक इ. लहान स्वरुपाचे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनादेखील कर्ज देण्याची तरतुद आहे. कर्जाचा व्याजदर केंद्र शासन वेळोवेळी ठरवेल त्याप्रमाणे राहणार आहे.

सकन्या समृद्धी योजना २०१६


* १ हजार रुपयाच्या किमान रकमेसह सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडता येते.


* हे खाते मुलीच्या जन्मापासून केवळ १० वर्षापर्यंतच उघडता येते. एका वर्षामध्ये या खात्यात किमान हजार रुपये किंवा अधिकाधिक १.५० लाख जमा करता येतात.


* एक पालक आपल्या केवळ दोन मुलीकरता हे खाते उघडू शकतो, आणि दोघींच्या खात्यात एक वर्षात १.५० लाख यापेक्षा अधिक रक्कम भरता येणार नाही.


* मात्र दुसऱ्यांदा जुळ्या मुली झाल्यास तिसऱ्या मुलीकरता हे खाते उघडले जाऊ शकते. मुलगी २१ वर्षे झाल्यावर हे खाते परिपक्व होते.


* तथापी १८ वर्षानंतर आवशक्यता असल्यास ५०% रक्कम काढता येईल, ही योजना मुलीच्या शिक्षणाचा खर्च आणि लग्नाचा खर्च घेऊन तयार करण्यात आली.


* या योजनेसाठी मुलीचे खाते काढताना मुलीचा जन्माचा दाखला, ओळखपत्र, निवासी पत्र, इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.


* खात्याच्या परिपक्वतेनंतर जमा झालेली रक्कम संबंधित मुलीच्या मालकीची होते. भारतात हे खाते कुठेही काढता येते.


* वयाच्या १० वर्षानंतर मुलगी स्वतः आपले खाते हाताळू शकते. किमान एक हजार रुपये दरवर्षी न भरू शकल्यास त्या वर्षासाठी ५० रुपये दंड आकाराला जाईल, मात्र दंडाच्या रकमेसह १४ वर्षापर्यंत कधीही हे खाते पुन्हा सुरु करण्याची तरतूद आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सुविधा / योजना


 ♦️ महाराष्ट्र शासनाने केंद्रीय लोकसेवा अयोगाच्या विद्यार्थ्यांसाठी ₹ 23.40 कोठी शिष्यवृतिची तरतुद केली आहे .


🔶 या तरतुदिंतर्गत  विद्यार्थ्यासाठी राज्याच्या उच्च व  तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने दिल्लीत क्षमता विकास कार्यक्रमाचे आयोजन केले जाते ..!


♦️ मलाखतीसाठी दिल्लीत आलेल्या विद्यार्थ्याना महाराष्ट्र सदनात किमान सात दिवस किफायतीशिर दरात राहन्याची परवानगी दिली जाते ..!


🔶  कद्रीय लोकसेवा आयोग याचे प्रशिक्षण घेत असताना ₹ 10000 / महीन्याला निर्वाह भत्ता दिला जातो .!


♦️ शिष्यवृति योजना तिन टप्यात  दिली जाते .

पूर्व / मुख्य / मुलाखत 


🔶 UPSC पूर्व तयारी  करण्यासाठी इछुक असणार्या  100 विद्यार्थ्यांची निवड शासनाच्या मुंबई येथील 

SIAC या प्रशिक्षण  केंद्रा सोबतच कोल्हापूर / नाशिक /  औरंगाबाद  / अमरावती / येथे ही प्रशिक्ष ण केंद्रे उभारन्यात आली आहे ..!


♦️ विद्या वेतन ₹ 2000

 दर महिना प्रवेशीत सर्व विद्यार्थ्याना वरील सर्व सेवासुविधेसाठी कोणतेहि शुल्क आकारले जात नाही ...!


🔶  UPSC मुख्य परीक्षेत बसलेल्या व मुलाखत परीक्षेकरिता निवड झालेल्या उमेदवारांकरिता राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था  विनामुल्य

मुलाखत प्रशीक्षण कार्येक्रमाचे आयोजन करते ..

पराथमिक कृषि सहकारी पतसंस्था :



(Primary Agricultural Credit Co-Operatives) 


प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था सहकारी त्रि-स्तरीय रचनेच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भागात कार्य करतात. 


🎯सथापना -


गावातील 10 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन या सहकारी पतसंस्थेची स्थापना करू शकतात.

  गरीब शेतकर्‍यांनाही संस्थेला सभासद होता यावे यासाठी सदस्यत्व शुल्क/प्रवेश शुक्ल नाममात्र ठेवले जाते.तसेच या संस्था अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर (Unlimited liability) स्थापना केल्या जातात. म्हणजेच, ती संस्था अपयशी ठरल्यास तिची देणी (Liabilities) देण्याची पूर्ण जबाबदारी सदस्यांवर असते. 


🎯कार्ये -


ही संस्था प्रत्यक्ष ग्रामीण जनतेच्या संपर्कात येते. त्यांच्या ठेवी स्वीकारते व त्यांना कर्जे देते. कर्जे मुख्यत: अल्प मुदतीचे व मुख्यत: कृषीसाठी दिले जाते. मात्र सावकाराच्या तावडीत सापडू नये म्हणून खावटी कर्जे सुद्धा दिली जातात.ही संस्था ग्रामीण जनता व दुसर्‍या बाजुला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात दुव्याचे काम करते. 


🎯भांडवल उभारणी -


स्व-स्वामित्व निधी - सदस्यत्व फी, भागभांडवल व राखीव निधी.ठेवी - सदस्य तसेच, बिगर सदस्यां कडून मिळविलेल्या.कर्जे - जिल्हा मध्येवर्ती सहकारी बँकेकडून मिळालेली. 


🎯विस्तार -


भारतात मार्च 2010 मध्ये विविध राज्यांमध्ये मिळून सुमारे 95,633 प्राथमिक कृषि सह. संस्था कार्य करीत होत्या. त्यांची एकूण सदस्य संख्या त्यावेळी सुमारे 1.32 कोटीपेक्षा जास्त असून त्यांनी 26,245 कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या होत्या. 


🎯महाराष्ट्रातील विस्तार -


31 मार्च 2010 रोजी महाराष्ट्रात 21,392 प्राथमिक कृषि सह.पतसंस्था होत्या आणि त्यांची सभासद संख्या 149 लाख होती. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका :

🎯सवरूप -


जि.म.स. बँक ही सहकारी संरचनेच्या मधल्या टप्प्यावर कार्य करते. ती जिल्ह्यातील सर्व प्राथमिक सहकारी संस्थांचा संघ (federation) असते व जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते.प्रकार - जि.म.स. बँकेचे दोन प्रकार आहेत - शुद्ध सहकारी संघ (Co-Op. Banking Union) :- या प्रकारात जि.म.स. बँकेचे सदस्यत्व फक्त प्राथमिक सहकारी संस्थांनाच देण्यात येते. हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओरिसा आणि केरळ या राज्यांमध्ये असा प्रकार आहे.मिश्र मध्य. सहकारी बँका (Mixed Central Co-Op-erative Banks) :- या प्रकारच्या बँकेचे सदस्यत्व सहकारी संस्था तसेच, व्यक्तींना सुद्धा खुले असते. इतर सर्व राज्यातील जि.म.स. बँका या प्रकारच्या आहेत. 


🎯कार्ये -


जिल्हा मध्य. सह. बँकेचे प्राथमिक कार्य जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना कर्जपुरावठा करणे हे आहे. मात्र काही कर्जे व्यक्तींना सुद्धा दिली जाऊ शकतात.नियमांनुसार, या बँका व्यापारी कारणांसाठी (Commercial Purposes) कर्जपुरवठा करीत नाही. मात्र सध्या (फेब्रुवारी 2010) 372 जि.म.सह. बँकांपैकी 75 बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे.या बँका शहरी भागातून ठेवी गोळा करून त्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचे कार्य करतात. 


🎯भांडवल उभारणी -


स्वस्वामित्व निधी - यात सहकारी संस्थांनी पुरविलेले भागभांडवल व राखीव निधीचा समावेश होतो.ठेवी - सहकारी संस्था तसेच व्यक्तींच्या.कर्जे - शिखर बँक, इतर बँका यांकडून मिळालेली.प्राथमिक सह. संस्थांनी जिल्हा म.स. बँकेमध्ये ठेवलेला आपल्याकडील अतिरिक्त निधी. 


🎯विस्तार -


भारतात मार्च 2010 मध्ये 370 जि.म.स. बँका होत्या. त्यांच्या एकूण ठेवी त्यावेळी 1,27,600 कोटी रुपये इतक्या होत्या.महाराष्ट्रात मार्च 2010 अखेर 31 जि.म.स. बँका होत्या. त्यांचे सभासद एकूण 1,48,360 इतके होत्या, तर ठेवी 44,278 कोटी रुपये इतक्या होत्या.

निरांचल प्रकल्प:

 




१) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविल्या जाणा-या "निरांचल" प्रकल्पाला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने ०७ ऑक्टोबर २०१५ रोजी मान्यता दिली. 

.

२) ह्या प्रकल्पाचा एकूण खर्च २१४२.३० कोटी रुपये असून हा प्रकल्प महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि तेलंगाना ह्या ९ राज्यात राबविण्यात येणार आहे.


३) ह्या प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ५०% खर्च शासन तर ५० % जागतिक बँकेकडून मिळणा-या कर्जातून होणार आहे. 

.

४) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील पाणलोट क्षेत्राची महत्वाची उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी, प्रत्येक शेतीला सिंचन सुविधा पुरविण्यासाठी "निरांचल" प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. 

.

५) ह्या प्रकल्पामुळे पर्जन्यावर आधारित कृषी उत्पादकतेत आणि दुग्ध उत्पादनात वाढ होणार आहे.

प्रकल्पाची उद्दिष्ट्ये

६) भारतातल्या पाणलोट आणि पावसावर आधारित कृषी व्यवस्थापनाच्या पद्धतीत संस्थात्मक बदल घडविणे. 

.

७) पाणलोट उपक्रमाच्या खात्रीसाठी आणि पावसावर आधारित व्यवस्थापन पद्धतीवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करता यावे म्हणून यंत्रणा उभारणे. 

.

८) पाणलोट आधारित दृष्टीकोनाच्या माध्यमातून समता, उपजीविका, आणि उत्पन्न यात सुधारणा घडविण्यासाठी सहाय्य करणे. 

.

९) सर्वसमावेशकता आणि स्थानिक सहभाग ह्यावर भर देणे. 

.

१०) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या सर्व घटकासाठी विशेषतः पाणलोट क्षेत्राला तांत्रिक सहाय्य पुरविणे.



जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक २०१५



१) World Economic Forum (WEF) ह्या संस्थेनुसार प्रसिद्ध केलेल्या जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकानुसार भारताने जगातील १४० देशांच्या यादीत ५५ वे स्थान पटकावले आहे. like emoticon


२) २०१४ मध्ये भारत ७१ व्या क्रमांकावर होता.


३) भारतातील आर्थिक वाढ, संस्थांच्या स्पर्धात्मकतेत सुधारणा, पायाभूत सुविधामध्ये सुधारणा, ह्या कारणामुळे भारत ५५ व्या स्थानावर आहे.


४) या अहवालानुसार प्रथम पाच देश 


१) स्वित्झर्लंड 

२) सिंगापूर

३) युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका 

४) जर्मनी 

५) नेदरलँड्स


विकसनशील देशांचे स्थान

५) चीन (२८) वा, दक्षिण आफ्रिका (४९) वा आणि भारत (५५) वा



ग्रामीण भारत (जणगणना २०११ नुसार)



१) देशातील खेड्यांची संख्या : ६४०८६७ 

२) देशातील ग्रामीण लोकसंख्या : ८३.३० कोटी

.

३) देशातील लोकसंख्येचे देशातील एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण : ६८.८४ % 

.

४) ग्रामीण भागातील साक्षरता प्रमाण : ६८.९० % 

.

५) २००१ ते २०११ ह्या कालावधीत ग्रामीण लोकसंख्येत झालेली घट : -५.९ % 

.

६) ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर : ९४७ (१००० पुरुषामागे) 

.

७) ग्रामीण लोकसंख्येबाबत आघाडीची राज्ये : उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल 

.

८) ग्रामीण लोकसंख्येबाबत मागे पडलेली राज्ये : सिक्कीम, मिझोराम, गोवा 

.

९) ग्रामीण लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण : 

.

अ) हिमाचल प्रदेश (८९.९६ %) 

.

ब) बिहार (८८.७० %) 

.

क) आसाम (८५.९२ %) 

.

१०) ग्रामीण लोकसंख्येचे सर्वात कमी प्रमाण : 

.

अ) गोवा (३७.८३ %) 

.

ब) मिझोराम (४८.४९ %) 

.

क) तामिळनाडू (५१.५५ %) 

.

११) महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्या : ६.१ कोटी 

.

१२) २००१ ते २०११ ह्या कालावधीत ग्रामीण लोकसंख्येत झालेली घट : -४.९१ % 

.

१३) महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी असलेले प्रमाण : ५७.५७ % 

.

१४) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील साक्षरता प्रमाण : ८३.३९ % 

.

१५) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर : ९४८ (१००० पुरुषामागे)

राष्ट्रीय डिजिटल साक्षरता मिशन


National Digital Literacy Mission

💠🔵💠🔵💠🔵💠🔵💠🔵💠


🔷🔶सरुवात - 21 ऑगस्ट 2014🔶🔷

  

⏩या अभियानाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड मध्ये झाली.

  

⏩उद्देश ⏪


इंटरनेटने सर्व ग्रामपंचायतींना एकत्र जोडून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा या अभियानाचा उद्देश आहे.

  

⏩ठळक वैशिष्ट्ये⏪

  

📶या योजनेसाठी भारत ब्रॉडबॅंड नेटवर्क लि. ची निर्मिती केली असून नॅशनल ऑप्टिक फायबर मिशनची निर्मिती केली जाणार आहे.

  

➡️यामध्ये 


📶अरेन (राजस्थान), 


📶नाओगॅग (त्रिपुरा) 


📶परवड (आंध्रप्रदेश) 


📶या तीन सेंटरचा समावेश करण्यात आला आहे.

परधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना


    🔥🔥सरुवात - 1 जून 2015🔥🔥

  

💧कवळ 330 रुपये भरून एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक विमा योजना आहे.

  

💧कोणत्याही कारणाने मृत्यू आल्यास विमा संरक्षण मिळणार आहे.

  

💧ही योजना एलआयसी किंवा इतर जीवन विमा कंपन्यांमार्फत देऊ केली जाईल.

  

💧बका व सार्वजनिक क्षेत्रातील इन्शुरन्स कंपन्या यांच्या सहयोगाने या योजनेचे परिचालन केले जाईल.

  

💧18 ते 50 वर्षे वयोगटातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतात. 


🌠सहभाग कालावधी -


💧या योजनेत विमा संरक्षण हे 1 जून ते 31 मे या कलावधीत एक वर्षासाठी राहील.

  

💧दरवर्षी 31 मे किंवा त्यापूर्वी कधीही प्रिमीयम भरता येईल.

  

💧तयाची वाढीव मुदत ही 31 ऑगस्ट 2015 ही पहिल्या वर्षासाठीच राहील.

  

💧योजनेत सहभागी होण्यासाठीचा काळ सुरूवातीला 3 महिन्यापर्यंत (31 नोव्हेंबर 2015) वाढवू शकते. 


🌠उद्दिष्टे -


💧विमाधारकाचा कुठल्याही कारणाने 55 वर्षाच्या आत मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास 2 लाख रुपयांची विमा भरपाई मिळेल.

  

💧सयुक्त नावाने बचतखाते असलेल्या कुटुंबातील सदस्यांनाही योजनेत सहभाग घेता येईल.

  

💧विमाधारकाने दोन ठिकाणी विमा भरला असेल तर कोणत्याही एका ठिकाणचाच लाभ मिळेल व प्रिमीयम परत मिळणार नाही. 


🌠विमा भरपाई -


🔥अटी - मिळणारी विमा रक्कम विमा धारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास - मिळणारी विमा रक्कम 2 लाख रु.

डिजिटल इंडिया



  ⛔️♻️सरुवात - 1 जुलै 2015♻️⛔️

  

📛भारताचे डिजिटली साक्षमीकरण झालेल्या समाजात रूपांतर करण्यासाठी आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्था आणि इतर योजनांना सामावून घेण्यासाठी या योजनेची सुरुवात.

  

📛एका कार्यक्रमाअंतर्गत अनेक प्रकारच्या अर्थव्यवस्था बनवणे आणि संपूर्ण सरकारला एकसूत्री पद्धतीने आणि समन्वय राखून काम करायला लावून नागरिकांना सुशासन देणे हा डिजिटल इंडियाचा उद्देश आहे.

  

📛इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी विभागाच्या वतीने केंद्र सरकारची विविध मंत्रालये, विभाग आणि राज्य सरकारे यांच्या समन्वयाने हा कार्यक्रम राबवला जात आहे.

  

📛डिजिटल इंडियाच्या देखरेख समितीचे स्वत: पंतप्रधान अध्यक्ष असून अतिशय काटेकोरपणे या कार्यक्रमातील विविध उपक्रमांवर लक्ष ठेवले जात आहे.

  

📛सध्या अस्तित्वात असलेल्या आणि सुरू असलेल्या ई-गव्हर्नस योजनांमध्ये डिजिटल इंडियाच्या सिद्धांतांना अनुसरून सुधारणा केली आहे.

  

📛इलेक्ट्रॉनिक सेवा, उत्पादने, निर्मिती व रोजगार संधी या क्षेत्रांमध्ये समावेशक विकास हे देखील डिजिटल इंडिया कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

  

📛तीन प्रमुख क्षेत्रांवर यामध्ये भर देण्यात आला आहे. प्रत्येक नागरिकाला वापराचे साधन म्हणून डिजिटल पायाभूत सुविधाप्रशासन आणि सेवांची मागणीनुसार उपलब्धतानागरिकांचे डिजिटल सक्षमीकरण वरील दृष्टिकोन समोर ठेवून ब्रॉड बॅंड महामार्ग, मोबाईल संपर्क व्यवस्थेची सार्वत्रिक उपलब्धता, सार्वजनिक इंटरनेट उपलब्धता कार्यक्रम, ई-गव्हर्नन्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सरकारमध्ये सुधारणा, ई-क्रांती सेवांची इलेक्ट्रॉनिक डिलिव्हरी, सर्वांना माहिती देणे, शून्य आयात आणि सुगीच्या जलद कार्यक्रमासाठी माहिती तंत्रज्ञान उपलब्ध करणे हा देखील डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा उद्देश आहे.

  

📛परत्यक्ष कागदपत्रांचा वापर कमी करणे आणि विविध संस्थामध्ये ई-कागदपत्रांचा वापर वाढवण्याचा डिजिटल लॉकर प्रणालीचा उद्देश आहे.

  

📛नोंदणीकृत संग्राहकांच्या माध्यमातून ई-कागदपत्रांची देवाणघेवाण केली जाणार आहे. जेणेकरून ऑनलाईन कागदपत्रांच्या वैधतेची खातरजमा होऊ शकेल.

  

📛'माय जीओव्ही डॉट इन'(mygov.in)ची अंमलबजावणी नागरिकांच्या प्रशासनातील सहभाग वाढवण्यासाठी केली जात आहे.

  

📛तयासाठी परस्परांमध्ये चर्चा, कृती आणि प्रसार असा दृष्टीकोन ठेवला आहे. माय जीओव्ही च्या मोबाईल अॅपमुळे ही वैशिष्ट्ये नागरिकांना मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत.

  

📛सवच्छ भारत मोहिमेचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन मोबाईल अॅपचा वापर करता येणार आहे.

  

📛ई-साईन चौकटीमुळे नागरिकांना आधारच्या आधिप्रमाणनाचा वापर करून कागदपत्रांवर डिजिटल सह्या करता येतील.

  

📛ई-हॉस्पिटल अॅप्लीकेशन अंतर्गत ओआरएस ऑनलाईन नोंदणी प्रणाली सुरू केली असून त्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी, अपॉईंटमेंट घेणे, फी देणे, वैधकीय निदान अहवाल मागवणे, रक्ताच्या उपलब्धतेची चौकशी करणे या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

  

📛भारत सरकारकडून दिल्या जाणार्‍या विविध शिष्यवृत्तींसाठी नोंदणी करण्यापासून शिष्यवृत्ती मिळवण्यापर्यंतच्या प्रक्रियेतले पडताळणी, मंजूरी आणि वितरण असे टप्पे रद्द करण्यासाठी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल उपयुक्त ठरेल.

  

📛दशातील विविध दस्तावेजांचे डिजिटललायझेशन करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाने पुढाकार घेतला असून नागरिकांना सेवा कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध होणार आहेत.

  

📛भारत नेट (Bharat net) या अतिशय वेगवान डिजिटल महामार्ग प्रणालीव्दारे देशातील 2.5 लाख ग्रामपंचायती जोडल्या जाणार आहेत.

  

📛ऑप्टिकल फायबरचा वापर करून जोडलेले हे जगातील सर्वात मोठे ग्रामीण ब्रॉडब्रॅंड जाळे ठरणार आहे.

  

📛बीएसएनएलने 30 वर्ष जुन्या एक्सचेंजच्या जागी CNG म्हणजे नेक्स्ट जनरेशन नेटवर्क आणले असून त्यामुळे व्हाईस, डेटा, मल्टिमीडिया, व्हिडिओ आणि इतर सेवा उपलब्ध होणार आहेत.

  

🎯दशभरात मोठ्या प्रमाणावर वाय-फाय, हॉट स्पॉट्स (wifi, hostspots) आणि ऑनलाईन खाते उपलब्ध केले जाणार आहेत.

सर्वांसाठी घर योजना


🔹Mission Housing for All



   🔵🔶सरुवात - 25 जून 2015🔶🔵

  

🔶या योजनेंतर्गत प्रत्येक नागरी कुटुंबास घर घेण्यासाठी सक्षम केल्या जाते.

  

🔶नकत्याच जाहीर झालेल्या अहवालानुसार भारतात 2022 पर्यंत शहरी भागात सुमारे 3 कोटी 41 लाख घरांची कमतरता जाणवणार आहे.

  

🔶या योजनेचे उद्दिष्ट नागरी वस्तीत, नागरी गरिबांसाठी दोन कोटी घरांची निर्मिती सन 2022 पर्यंत व प्रत्येक घरासाठी 1 ते 2.5 लाख केंद्रीय सहाय्य केले जाणार आहे.

  

🔶जयांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये आहे, अशांची गणना आता आर्थिक दुर्बल गटात होईल, तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 ते 6 लाख रुपये आहे असे अल्प गटात मोडतील. अशा बदलांमुळे अनेक लोकांना घर घेता येईल. 


🔵नागरी वस्तीसाठी तीन टप्प्यात राबवली जाईल -


🔶झोपडपट्टीतील रहिवाशांचे सी चांगल्या घरात पुनर्वसनअल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी परवडतील अशी घरे त्याकरता सुलभ कर्ज व अनुदान योजनाखाजगी क्षेत्राबरोबर सामान्यांना परवडणारी घरे निर्माण करणे झोपडपट्टी पुननिर्माण योजनेअंतर्गत प्रत्येक घरामागे केंद्र सरकार 1 लाख रुपये अनुदान देईल.

  

🔶ही योजना सुरूवातीला 1 लाखाहून जास्त लोकसंख्या असणार्‍या 500-अ वर्गात बसणार्‍या शहरात त्याचप्रमाणे 4041 नगरपालिका, महानगर पालिका, कॅम्पस इत्यादि क्षेत्रात राबवली जाईल.

  

🔵ही घरे घरातील स्त्रीच्या नावे किंवा नवरा-बायकोच्या संयुक्त नावावर असतील.

  

🔶या योजनेअंतर्गत जे कर्ज दिले जाईल त्याचा व्याज दर 6.5% असेल व कर्ज परतफेडीचा कालावधी 15 वर्षाचा असेल.

अटल पेन्शन योजना


   🔷🔶सरुवात - 1 जून 2015🔶🔷

  

🏧असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतकरी, शेतमजुर, दारिद्र्यरेषेखालील लोकांना वृद्धापकाळातील आयुष्य सुखकर आणि समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना.

  

🏧राष्ट्रीय पेन्शन पद्धतीव्दारे संचलित ही योजना आहे. शिवाय पेन्शन निधी विनियम आणि विकास प्राधिकरणाव्दारे नियमित केले जाते.

  

🏧पन्शनधारकाला वयाच्या 60 व्या वर्षापासून पेन्शन मिळणार आहे. ही योजना कायम चालू राहील, मात्र पाच वर्षांनंतर सरकार कोणतीही रक्कम भरणार नाही.

  

🏧या योजनेत 18 ते 40 वर्षाची कोणीतीही व्यक्ति सामील होऊ शकते.

  

🏧ही योजना सर्व बचत बँक खातेदारांसाठी खुली आहे. वर्गणी ही पेन्शनधारकाच्या वयानुसार राहणार आहे.

  

🏧वर्गणीदाराने कमीतकमी 20 वर्षे योजनेत पैसे भरले पाहिजेत.

  

🏧या योजनेतून 60 वर्षाच्या आत बाहेर पडता येणार नाही, (अपवादात्मक परिस्थितीत वर्गणीदाराचा आकस्मिक किंवा आजाराने मृत्यू झाल्यास.) 


🔰योजनेचे फायदे🔰


🏧ज वर्गणीदार 18 ते 40 या वयोगटात वर्गणी भरत आहेत, त्यांच्या वर्गणीच्या प्रमाणात कायमस्वरूपी एक हजार ते पाच हजार प्रतिमाह पेन्शन मिळेल.

  

🏧या योजनेत केंद्र सरकार कमीत-कमी एक हजार किंवा वार्षिक वर्गणीच्या 50% रक्कम जमा करणार आहे.

  

🏧ही रक्कम सरकार 2015-16 ते 2019-20 या आर्थिक वर्षासाठी खात्यावर जमा करेल.

  

🏧सरकार ही रक्कम फक्त अशा वर्गणीदारांना देईल, जे इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत सामील नाहीत.

  

🏧वर्गणीदाराला त्याच्या वर्गणीच्या प्रमाणात 1000, 2000, 3000, 4000, 5000 रुपयांची पेन्शन कायमस्वरूपी वयाच्या 60 वर्षापासून मिळेल.

  

🏧अटल पेन्शन योजनेतील वर्गणीदाराच्या वारसांनाही लाभ मिळणार आहे.

  

🔹1000 रु, पेन्शनसाठी 1.7 लाख जमा राशी, 

🔸2000 रु. पेन्शनसाठी 3.4 लाख रुपये, 

🔹3000 रु. पेन्शनसाठी 5.1 लाख रुपये, 

🔸4000 रु. पेन्शनसाठी 6.8 लाख रुपये 

🔹आणि 5000 रु. पेन्शनसाठी 8.5 लाख रुपयांची जमा राशी वारसांना मिळणार आहे.   

Online Test Series

०७ नोव्हेंबर २०२०

प्राचीन भारताचा इतिहास :



▪️सिंधू संस्कृती


1) समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.


2) सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.


3) १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.


4) नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.


5) १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.


6) रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.


7) प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.


8) गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.


9) सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.


10) सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.


11) भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.


12) अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.


13) सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.


14) हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.


15) सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.


16) हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.


17) राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.


18) माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.

गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी (१८४८-५६)


१८४८ मध्ये लॉर्ड हार्डिगच्या जागी डलहौसी गव्हर्नर जनरल बनला. डलहौसीने आपल्या आठ वर्षांच्या कारकीर्दीत भारतात इंग्रज प्रशासनाचा पाया मजबूत केला. त्याच्या कार्यकाळात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी..


डलहौसी हा त्याच्या व्यपगत सिद्धान्तासाठी (Doctrine of Lapse) ओळखला जातो.

डलहौसीने संस्थानांना दत्तकपुत्र घेण्यास अनुमती दिली, पण दत्तकपुत्र हा गादीचा वारस मानण्यास त्याने नकार दिला. त्याचप्रमाणे द्वितीय आणि तृतीय प्रकारच्या संस्थानाला दत्तकपुत्र वारसा नेमण्यास मान्यता नाकारली.


डलहौसीने या सिद्धान्तानुसार सातारा (१८४८), संबलपूर व जैतपूर (१८४९), बगाढ (१८५०), उदयपूर (१८५२), झाशी (१८५३) व नागपूर (१८५४) खालसा केले.

लॉर्ड डलहौसीकृत सुधारणांचा एकमेव उद्देश सत्ता केंद्रीकरण हा होता.

लॉर्ड डलहौसीच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्याचा पश्चिम भागात विस्तार झाला.

लॉर्ड डलहौसीने सैन्यात तीन रेजिमेंटची भर घातली.

१८५३ मध्ये ठाणे ते मुंबई दरम्यान रेल्वे सुरू झाली.

भारतात टपाल तिकिटांचा वापर लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू झाला. त्याच्या काळात भारतात रेल्वेचे जाळे ठेके पद्धतीने बांधण्यात आले.

लॉर्ड डलहौसीला भारतात ‘विद्युत तारेचा प्रारंभकर्ता’ असे म्हणतात.

लॉर्ड डलहौसीने व्यापारासाठी सर्व बंदरे खुली करून कर रद्द केला.

१८५४मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना केली.

१८५४चा वुडचा खलिता : त्यानुसार प्राथमिक शिक्षणापासून विश्वविद्यालयीन शिक्षणापर्यंत एक शिक्षण योजना बनविण्यात आली. यानुसार प्रत्येक प्रांतात स्वतंत्र शिक्षण असावे अशी शिफारस करण्यात आली.

त्याच्या कार्यकालात १८५६ साली विधवा विवाहासंदर्भात ‘विधवा पुनर्विवाह कायदा संमत झाला. त्यासाठी त्याला ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मदत केली.


१८५७ चा उठाव आणि डलहौसी : 


स्मिथच्या मतानुसार, १८५७ च्या उठावाला डलहौसीच जबाबदार होता. त्याने कोणत्याही कारणावरून, भारतीय राज्यांना ब्रिटिश प्रशासनात विलीन केले. यामुळे राजांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्याची परिणती १८५७ च्या उठावात झाली.


लॉर्ड कॅनिंग (१८५६ ते १८६२) : 


कॅनिंग हा ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल व ब्रिटिश संसदेद्वारा नियुक्त पहिला व्हॉईसरॉय होता. १८५८चा उठाव कॅनिंगच्या काळात झाला. उठाव मोडून काढण्याचे महत्त्वाचे काम त्याने केले. कॅनिंगने १८६१ साली पोलीस खात्यात सुधारणा केल्या. पोलीस विभागपदी इन्स्पेक्टर जनरल (कॅ), जिल्हा पोलीस प्रमुखपदी पोलीस अधीक्षक (रढ), तालुका प्रमुखपदी डेप्युटी इन्स्पेक्टर इत्यादी नेमणुका केल्या. कॅनिंगने मेकॉलेद्वारा तयार केलेली (१८३७ भारतीय दंडविधान) संहिता १८६० मध्ये लागू केली. १८६२ पासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली. कॅनिंगने मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे उच्च न्यायालयाच्या शाखा स्थापन केल्या. याच काळात १८६१ चा भारतीय विधिमंडळ कायदा (इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट) संमत झाला तसेच ‘इंडियन सिव्हिल सव्‍‌र्हिसेस’ परीक्षा सुरू झाल्या. इ.स. १८५७ मध्ये मुंबई, मद्रास, कलकत्ता (कलकत्ता- २४ जानेवारी) विश्वविद्यालयांची स्थापना करण्यात आली. राणीचा जाहीरनामा लॉर्ड कॅनिंगने १ नोव्हेंबर १८५८ रोजी अलाहाबादच्या दरबारात वाचून दाखवला. १८५९ मध्ये भारतमंत्री म्हणून चार्ल्स वुड आला. वुडच्या सहाय्याने कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षण खात्याची स्थापना केली. १८६१ च्या दुष्काळ परिस्थितीच्या चौकशीसाठी कर्नल स्मिथच्या अध्यक्षतेखाली हिंदुस्थानच्या इतिहासातील पहिला चौकशी आयोग कॅनिंगने नेमला.

पडित जवाहरलाल नेहरू



◾️भारताचे पहिले पंतप्रधान, विज्ञानवादी


👉🏻 जन्मदिन - १४ नोव्हेंबर १८८९*


🔵 बालदिवस


जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते.


● संक्षिप्त चरित्र


● वैयक्तिक आयुष्य


श्री जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मिरी पंडितांच्या घरी नोव्हेंबर १४, इ.स. १८८९ रोजी झाला. फेब्रुवारी ७, इ.स. १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी करण्यात आला. इ.स. १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शीनी हे कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांचे पिता मोतीलाल नेहरू यांचे फेब्रुवारी ६, इ.स. १९३१ रोजी व पत्नी श्रीमती कमला नेहरू यांचे फेब्रुवारी २८, इ.स. १९३६ रोजी निधन झाले.


● राजकीय आयुष्य


पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवणीद्वारे घेतले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरीता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. विज्ञार्थी दशेत असताना सुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रूची होती. आयर्लंड मधील सिन फेन मुव्हमेंट मध्ये त्यांनी विशेष रस घेतला. त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसुकच स्वातंत्र्य चळवळीत खेचले गेले.


१९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर काँग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरुल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरीत झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.


सप्टेंबर १९२३ मध्ये पं. नेहरू अखिल भारतीय काँग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठीहल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय काँग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरु केली. १९२९ साली पं. नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य गेच ध्येय्य निश्चित केले गेले. १९३० ते १९३५ दरम्यान मीठाचा आणि अन्य सत्याग्रहांमुळे त्यांना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ फेब्रुवारी, १९३५ रोजी त्यांनी अल्मोरा जेलमध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, स्पेन आणि चीन येथे जाऊन आले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकाळी पण शेवटची ठरली. एकंदर पं. नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते दक्षिण पूर्व आशियाला जाऊन आले. त्यानंतर ६ जुलै, १९४६ रोजी त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.

सग्रामानंतरचा मराठवाडा...



1950 नंतर जन्माला आलेल्या नव्या पिढीला मराठवाडा मुक्तिसंग्राम म्हणजे काय?हे नव्या पिढीला‘मराठवाडा जन्मा’ची कथा सांगितली पाहिजे.....


आज 17 सप्टेंबर...हैद्रराबाद मुक्तिदिनानिमित्त..


‘‘निधडी छाती नि:स्पृह बाणा

लववी ना मान अशा आमच्या मराठवाड्याचा आम्हास अभिमान’’


असंख्य हुमात्म्यांच्या बलिदानातून,अनेकांच्या

त्यागातून सरसेनानी स्वामी रामानंद

तीर्थ,माणिकचंद पहाडे,गोविंदभाई श्रॉफ,विजयेेद्र काबरा यांसारख्या समर्थ नेत्यांच्या निकरांच्या लढ्यातून निर्माण झालेला हा एक कोटी लोकसंख्येचा मराठवाडा 17 सष्टेंबर रोजी सनई- चौघड्यांच्या मंगल निनादात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत हैद्रराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा करत आहोत.


ज्यांनी त्या काळात रझाकारांचा बेछूट

गोळीबार अनुभवला,अनन्वित छळ सोसला,निझाम नामक कसायाने सर्व तऱ्हेची दडपशाही केलेली पाहिली त्यांनी नव्या पिढीला‘मराठवाडा जन्मा’ची कथा सांगितली पाहिजे.मराठवाड्यातील

आबालवृद्ध निर्भयपणे या लढ्यात सामील झाले होते.रझाकाराच्या लाठ्या कमी पडल्या;पण हुतात्म्यांची वाण पडली नाही.पोलिसांच्या लाठ्या मोडल्या; पण मराठवाड्यातील माणसांचे कणे मोडले नाहीत.असा हा दिव्य लढा होता.17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबादच्या निझाम

संस्थानाच्या तावडीतून मराठवाड्याची सुटका झाली.त्या लढ्याची नुसती आठवण झाली तर अंगावर रोमांच उभे राहतात.मात्र,दुर्दैव असे की,या लढणा-

या सेनानींनी मराठवाडा मुक्त झाल्यानंतर सारे विसरून न लढणाऱ्या मराठी बांधवांच्या हाती सत्ता दिली.


मराठवाड्याने या देशाला हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करणारी माणसे दिली.एवढेच नव्हे,तर मराठवाड्याच्या या कसदार भूमीने या राज्याचे,देशाचे वैचारिक नेतृत्वही केले.गोविंदभाई श्रॉफ,विजयेंद्र काबरा,रफिक झकेरिया,अनंतराव भालेराव,आ.कृ.वाघमारे,शंकरराव चव्हाण,बापूसाहेब काळदाते अशा अनेक विचारवंतांनी समाजसुधारणेच्या संदर्भात व शिक्षण क्षेत्रातील मूलभूत धोरणांविषयी विचार केला.


मराठवाडा मुक्तिसंग्रामानंतर मराठवाड्यातील अनेक स्त्रिया शिकून

शिक्षिका,परिचारिका,डॉक्टर,लेखिका नावारूपाल आलेल्या दिसून येतात.जागतिक मराठी साहित्य

संमेलनाचे अध्यक्षपद डॉ.गंगाधर पानतावणे यांनी भूषवले.हैद्रराबाद

मुक्तिसंग्रामानंतर समताधिष्ठित,मूल्याधिष्ठित समाजव्यवस्था याचा जाणीवपूर्वक स्वीकारच केला गेला नाही.समाजमनावरील पडलेल्या खुणा बुजविण्यासाठी रचनात्मक नवनिर्माणशील व तरुण पिढीने समाजविधायक कार्याला स्वत:पासून सुरुवात करणे आवश्यक आहे.तीच या हैद्रराबाद मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना खरी मानवंदना  ठरेल.


राशबिहारी बोस:

 (२५ मे १८८६ — २१ जानेवारी १९४५). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक देशभक्त. फ्रेंच चंद्रनगरच्या परंतु सिमल्याला एकटे राहून सरकारी छापखान्यात नोकरी करणाऱ्या विनोदबिहारींचा हा मुलगा. त्यांच्या जन्मतिथीविषयी तसेच जन्म स्थानाविषयी एकवाक्यता नाही. बहुतेक तज्ञांच्या मते त्यांचा जन्म आजोळी सुबलदाह (बरद्वान) येथे झाला; पण आई लगेच गेली.  सावत्र आई व आजोबा कालिचरण यांनी संगोपन केले. चंद्रनगरला किंवा आजोळी कोणत्याच शाळेत हा आडदंड मुलगा स्थिर झाला नाही. उलट विद्यार्थिदशेतच चंद्रनगरच्या तरुण क्रांतिकारी गटाशी त्याने सूत जमविले होते. श्रीष घोष व अमरेंद्र चतर्जी यांनी त्याला क्रांतिदीक्षा दिली होती. मुलगा शिकत नाही म्हणून वडिलांनी त्याला पुढे सिमल्याला आणले. घरीच इंग्रजी व टंकलेखन शिकविले. दोन्हीत चांगली प्रगती झाल्यावर आपल्याच छापखान्यात चिकटवून दिले. स्वतंत्र वृत्ती व क्रांतीकडे ओढा असल्यामुळे घर सोडून दूर डेहराडूनला जंगल खात्यात राशबिहारींनी नोकरी धरली. १९०८ पासून १९१३ पर्यंत वारंवार रजा घेत असूनसुद्धा कशीबशी नोकरी टिकली. त्या वेळी बंगालच्या अनेक शहरांतून त्याचप्रमाणे बनारस, दिल्ली, लाहोर इ. शहरांतून क्रांतिगट कार्यरत होते.

प्रत्येक गटात एक तरी बंगाली असायचाच. त्यामुळे राशबिहारींना या सर्वांशी संबंध ठेवणे सुलभ गेले. १९१२ च्या मध्यास त्यांनी बंगाल-चंद्रनगरला जाऊन बाँब व बाँब साहित्य आणि अनेक तरुण क्रांतिकारक जमविले. बसंतकुमारला आपल्या घरी बरेच महिने ठेवून पूर्ण संधा दिली. बंगाली व पंजाबी क्रांतिकारी नेत्यांच्या सल्ल्याने व्हाइसरॉयवर बाँब टाकण्याची योजना आखली. बंसतकुमार तयार झाल्यावर त्यास लाहोरला धाडले. २२ डिसेंबरला लॉर्ड चार्ल्स हार्डिंग मोठ्या मिरवणुकीने दिल्ली येथे प्रवेश करून तेथे भारताची राजधानी सुरू करणार होते. आदल्या दिवशी राशबिहारी डेहराडूनहून व बसंतकुमार लाहोरहून दिल्लीला आले. एका क्रांतिकारक मित्राकडे दोघेही उतरले. दुसऱ्या दिवशी हत्तीच्या अंबारीत दिमाखाने बसलेल्या व्हाइसरॉयसाहेबांवर बसंतने बाँब फेकला. हार्डिंगना गंभीर इजा झाली. शरीररक्षक ठार झाला. राशबिहारी बरोबर होतेच. दोघेही नंतर लाहोर-डेहराडूनला परतले. पुढे राशबिहारींनी पुरविलेल्या बाँबच्या साहाय्याने व बसंतकुमारच्या मदतीने लाहोर गटाने धमाल उडवून दिली; पण शेवटी बिंग फुटले. दिल्ली कटाच्या खटल्यात बसंतकुमारसह चौघांना फाशी देण्यात आले. राशबिहारींवर वॉरंट होते; पण ते बनारसला गेले. तेथल्या अनुशीलन गटाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपविण्यात आले.

गदर चळवळ १९१४ च्या महायुद्धानंतर सुरू झाली. गदर क्रांतिकारकांच्या हालचाली सॅन फ्रॅन्सिस्कोपासून पंजाबपर्यंत पसरल्या होत्या. विष्णुपंत पिंगळे बनारस गटाचे साह्य घेण्यासाठी राशबिहारींना बनारसलाच भेटले. ज्या पंजाबमध्ये मुख्य उठाव योजिला होता, तेथेच समर्थ नेतृत्वाची उणीव होती. पिंगळ्यांच्या विनंतीवरून राशबिहारींनी पंजाबच्या गदर उठावाची योजना तयार करण्याचे मान्य केले. थोड्याच अवधीत त्यांनी सुसूत्रता आणली. क्रांतिकारकांचा विश्वास संपादन केला; पण एका घरभेद्यानेच संकल्पित उठावाची खडान् खडा माहिती पुरविल्यामुळे आदल्या दिवशीच धरपकडी झाल्या. या वेळीही राशबिहारी पोलिसांचे हाती लागले नाहीत. निरनिराळ्या खटल्यांतून ते फरारी आरोपी म्हणून जाहीर करण्यात आले होते. हजारो रुपयांची इनामे घोषित झाली होती.

अनेक भाषांवर प्रभुत्व, गुप्ततेच्या नियमांचे काटेकोर पालन, चाणाक्षपणा, हजरबाबीपणा आणि बेमालूम वेषांतरे करण्याची हातोटी, यांमुळे ते पुढे काही महिने पंजाब, बनारस, चंद्रनगर येथे राहू शकले. शेवटी जून १९१५ मध्ये ते जपानला पवननाथ टागोरांच्या पारपत्राच्या मदतीने निसटले. तेथेही युद्ध संपेपर्यंत त्यांनी क्रांतिकार्य चालू ठेवले होते. जपानी सरकारने त्यांना पकडण्याचे व ब्रिटिशांच्या हवाली करण्याचे हुकूम काढले. तेव्हा ते तेथेही अज्ञातवासात गेले. पुढे शोभा व जपानी युवतीशी विवाह केल्यामुळे काही वर्षांनी म्हणजे १९२३ साली त्यांना जपानी नागरिकत्व मिळाले. पुढील १८-१९ वर्षे त्यांनी लेखन-भाषणाद्वारे हिंदी स्वांतत्र्याच्या प्रश्नावर जपानी जनतेमध्ये जाणीव निर्माण करण्याचा अखंड प्रयत्न केला. जपानी जीवनाशीही ते समरस झाले होते.

पूर्व आशियातील हिंदी लोकांची १९४२ च्या मार्चमध्ये भव्य परिषद घेऊन त्यांनी हिंद स्वराज्य लीग स्थापन केली. हिंदी युद्धकैदी व इतर नागरिकांमधून आझाद हिंद फौज उभी करण्याचे कामीही त्यांनी हातभार लावला. जुलैमध्ये लीगचे दुसरे अधिवेशन बँकॉकला भरले. त्यात आझाद हिंद सेनेला जपानी सेनेच्या समान दर्जा मिळावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच राशबिहारींच्या नेतृत्वाखालच्या अस्थायी सरकारचे व आझाद हिंद फौजेचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी जपानला यावे असे जाहीर आवाहन नेताजी सुभाषचंद्र बोस यांना करण्यात आले. वर्षभराने नेताजींकडे दोन्ही संघटना सुपूर्द करून मोठ्या आनंदाने राशबिहारींनी प्रमुख सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांचा तरुण मुलगा महासिदे जपानी फौजेत होता. त्याला ब्रिटिश सेनेशी झालेल्या लढाईत वीरमरण आले. दुसरे महायुद्ध चालू असतानाच त्यांनी देह ठेवला. त्यांची पत्नी शोभा व मुलगी टेटूकी पुढे जपानमध्येच स्थायिक झाल्या.

गोपाळ कृष्ण गोखले

(९ मे १८६६–१९ फेब्रुवारी १९१५). आधुनिक भारताचे एक महान नेते आणि नेमस्त पक्षाचे अध्वर्यु. त्यांचा जन्म कात्‌लुक (रत्नागिरी जिल्हा) येथील एका सामान्य कुटुंबात झाला. अत्यंत गरिबीत गोखले यांचे पहिले दिवस गेले. अठराव्या वर्षी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीचा मार्ग व स्वीकारता स्वार्थत्यागपूर्वक देशसेवा करण्याचे व्रत घेतले. विसाव्या वर्षी ते फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक झाले आणि त्यांनी सुधारक पत्राचे सहकारी संपादक म्हणून काम सुरू केले. ते सार्वजनिक सभेचे चिटणीस (१८८७) व सभेच्या त्रैमासिकाचे संपादक झाले आणि पुढे १८९१ मध्ये ते परिषदेचे चिटणीस तसेच राष्ट्रसभेचे चिटणीस झाले. वेल्बी आयोगासारख्या महत्त्वाच्या आयोगापुढील प्रमुख साक्षीदार म्हणून त्यांनी एकतिसाव्या वर्षी साक्ष दिली. प्रांतिक विधिमंडळात प्रवेश केल्यानंतर चार वर्षांतच ते केंद्रीय विधिमंडळात निवडून गेले. १९०५ साली ते वाराणसी येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते. येथे १९०६ मध्ये त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. महात्मा गांधीनीही पुढे भारत सेवक समाजाचे अध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

लोकमान्य टिळक व गोखले यांचे सार्वजनिक जीवन एकाच वेळी सुरू झाले व तेही एकाच व्यासपीठावरून. क्रॉफर्ड प्रकरणातील मामलेदारांवरील अन्यायाला गोखले यांनी सार्वजनिक सभेचे चिटणीस गोपाळ कृष्ण गोखलेगोपाळ कृष्ण गोखले या नात्याने वाचा फोडली व टिळकांनी हे प्रकरण धसास लावले. १८८९ मध्ये मुंबईत काँग्रेसचे अधिवेशन भरले, तेव्हा दोघांनीही एकाच उपसूचनेवर भाषण केले. पण यानंतर दोघांचा मार्ग वेगळा झाला. टिळक जहाल राजकारणाकडे वळले. गोखले यांनी लोकशिक्षणाच्या द्वारे समाजजागृती करण्याचा व राजकीय सुधारणांसाठी सतत प्रयत्न करून ज्या सवलती मिळतील, त्या राबविण्याचा मार्ग स्वीकारला. गोखले यांचे नाव सर्वत्र प्रथम गाजले ते वेल्बी आयोगापुढील त्यांच्या साक्षीने. हिंदुस्थानात राज्यकारभाराचा खर्च कसा वाढत आहे व त्यामुळे करवाढ कशी डोईजड होत आहे; हे त्यांनी सप्रमाण दाखवून राजकीय सुधारणांची आवश्यकता प्रतिपादन केली. गोखले यांच्या या अभ्यासपूर्व साक्षीचा बराच प्रभाव पडला. न्यायमूर्ती रानडे यांचे शिष्यत्व पत्करून त्यांच्याकडे त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादींचा जो अभ्यास केला, त्याचा उपयोग त्यांना या साक्षीच्या वेळीच नव्हे, तर नंतरच्याही जीवनात झाला. ‘अभ्यासेचि प्रकटावे’ या समर्थांच्या उक्तीचे मूर्तिमंत रूप म्हणजे नामदार गोखले.

सार्वजनिक जीवनाला गोखले यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक व नंतर प्राचार्यपदापासून सुरुवात केली. पण त्यांच्या कर्तृत्वाला ते श्रेय अपुरे होते. १९०२ मध्ये गोखले मध्यवर्ती कायदेमंडळावर निवडून गेल्यावर त्यांनी अर्थसंकल्पांवर जे भाषण केले, त्यामुळे त्यांचे कर्तृत्व न नेतृत्व देशमान्य झाले. त्या विधिमंडळात त्यांनी अर्थसंकल्पावर बारा भाषण केली. त्यांतून तत्कालीन भारताच्या राजकीय, आर्थिक, शैक्षणिक वगैरे प्रश्नांचा उत्कृष्ट ऊहापोह त्यांनी केला. भारताची शेती, शेतकऱ्यांच्या अडचणी, आयातनिर्यात, करभार, उद्योग, रुपयाचे पौंडाशी नाते, लष्करावरील खर्च असे अनेक विषय त्यांनी व्यासंगपूर्वक हाताळले. उपहास वा घणाघाती घाव हा त्यांच्या भाषणाचा विशेष नव्हे, तर प्रतिपक्षाचे मत समर्पक युक्तिवाद करून वळविण्यावर त्यांचा कटाक्ष असे. गोखले बोलू लागले, की आपल्यापुढे गुलाब पुष्पांचा सडा पडल्यासारखा वाटे, असे सी. वाय्. चिंतामणी यांनी म्हटले आहे. १९०६ सालच्या अर्थसंकल्पावरील गोखले यांचे भाषण ऐकल्यावर, असे भाषण इंग्लंडच्या पार्लमेंटमध्येही क्वचितच ऐकावयास मिळते, असा अभिप्राय व्हाइसरॉय लॉर्ड मिंटो यांनी दिला. इंग्लंडमधील नेशन या त्या वेळच्या नामवंत पत्राचे संपादक मॅसिंगहॅम यांनी गोखले हे तेव्हाचे पंतप्रधान अ‍ॅस्क्विथ यांच्या पेक्षाही श्रेष्ठ असल्याचे मत दिले होते.

आपल्या समाज स्वायत्ततेचा उपयोग घेण्यास लायक बनवायचा, तर निःस्वार्थ अशा समाज सेवकांची एक संख्या तयार केली पाहिजे, असे गोखले यांना वाटत होते. समाजाचे अंतर्बाह्य स्वरूप बदलल्याखेरीज तो स्वातंत्र्याला पात्र होणार नाही, ही रानडे यांची धारणा होती आणि त्याच उद्देशाने त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली (१९०५).

वंगभंगामुळे जो प्रक्षोभ माजला, त्यामुळे गोखले व तत्सम नेत्यांच्या सनदशीर राजकारणाला मोठा धक्का बसला. पण गोखले यांनी राजकीय सुधारणा मिळविण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांचे मत वळविण्याच्या आपल्या प्रयत्नांत कसूर केली नाही. मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा (१९१९) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कायद्याच्या जडणघडणीत गोखले यांचा फार मोठा हात होता. इंग्लंडमध्ये वास्तव्य करून या कामी त्यांनी बरीच शिष्टाई केली होती. सनदशीर राजकारणाचे गोखले प्रवर्तक खरे; पण अखेरच्या काळात कायदेभंगाच्या चळवळीसही त्यांचा विशिष्ट मर्यादेपर्यंत पाठिंबा होता. म. गांधींनी त्यांना गुरू मानले होते. राजकारणातील त्यांच्या कार्याव्यतिरिक्त एक थोर समाजसुधारक म्हणूनही गोखल्यांचे नाव प्रसिद्ध आहे. भारत सेवक समाजाच्या कार्याबरोबर अस्पृश्यता व जातिव्यवस्था यांचे निर्मूलन व्हावे, म्हणून ते नेहमी प्रयत्नशील होते. स्त्रीस्वातंत्र्याचा तसेच त्यांच्या शिक्षणाचा त्यांनी हिरिरीने पुरस्कार केला आणि तत्संबंधीचे आपले विचार वृत्तपत्रकार या नात्याने सुधारक, सार्वजनिक सभा, राष्ट्रसभा समाचार इ. वृत्तपत्रांतून स्पष्ट मांडले. सर्व स्तरांतील लोकांना शिक्षण घेणे सुलभ जावे, म्हणून प्राथमिक शिक्षण मोफत असावे, असे ते म्हणत. याकरिता त्यांनी प्रयत्नही केले.

हायलँड या लेखकाने गोखले यांची तुलना इटलीतील काव्हूरशी केली आहे. काव्हूरप्रमाणेच शक्य कोटीतील काय आहे, प्रस्थापित यंत्रणेतील दोष कसे दूर करता येतील, याचा विचार करून त्या दिशेने प्रयत्न करण्याची त्यांची वृत्ती होती. दोघेही सनदशीर राजकारणावर भिस्त ठेवणारे होते. या राजकारणाची जहालांकडून अतिशय निर्भर्त्सना झाली. पण गोखले यांचे कर्तृत्व, देशसेवा, स्वार्थत्याग, अभ्यास यांबद्दल सरकारप्रमाणेच लोकपक्षाचे नेतेही आदर बाळगीत. लोकमान्यांनी गोखल्यांवरील मृत्युलेखात त्यांच्या या गुणांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. लोकपक्ष व सरकार या दोघांकडून मान्यता मिळणारा असा पुरुष विरळाच सापडतो.

स्वामी विवेकानंद

 स्वामी विवेकानंदांचे मुळचे नाव नरेंद्र. रामकृष्ण परमहंससारख्या तपस्वींनी, श्रेष्ठ गुरूंनी त्यांना "विवेकानंद" नाव दिले. लहानपणापासूनच नरेंद्र तल्लख बुद्धीचा, संवेदनाक्षम व विचारी ! काहीसा एक्कल कोंडा पण तेजस्वी!  भारतीय संस्कृती, धर्म, रीती भाती इ.चा सखोल अभ्यास केला. वाचनाची प्रचंड आवड, उत्कृष्ट वक्ता! त्याच्या शब्दांनी परकीयांना मोहून टाकले. प्राथमिक गरजांची पूर्ती करणारे शिक्षण स्वामींना अभिप्रेत होते. भारतातील अध्य्त्म आणि पाश्चात्यांचे विज्ञान एकत्र असल्याच भारत जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र ठरेल. त्यासाठी परदेशात जाऊन विद्यार्थाने शिकावे व शिकवावे असे त्यांचे विचार होते.

नव-नवीन विचार रोज आत्मसात करावेत. मानोंनिग्रह हवा. त्यासाठी मन-साक्षरता जरुरी, मुलांना योग्य स्वातंत्र्य देणे गरजेचे, वृत्तीमध्ये सतत बदल व्हावे तरच देशाची उन्नती होईल. असे त्यांचे मत होते. प्रत्येक स्त्री मधे पुरुषतत्वे असतात. तसेच प्रत्येक  पुरुषात स्त्री तत्वे असतात. त्यामुळे स्त्री-पुरुष समानता मानने गरजेचे असे ते म्हणत! वृत्तीने संन्यस्त होते, पण सर्व विषयांचा सखोल अभ्यास होता. विचार परखड, वाणी शुद्ध, स्पष्ट, अनेक भाषा अवगत होत्या. कलकत्त्या जवळ हुबळी नदीच्या काठी बेल्लूर मठाची स्थापना केली. कट्टर हिंदुवादी होते. मानवतावादाचा, तत्वाचा प्रसार करू मार्गदर्शन केले.

स्वामी विवेकानंद जयंती हा दिवस युवक दिन म्हणून साजरा करतात. युवकात सर्व प्रकारचे बल असते.  तारुण्यात प्रवेश करताना युवा पिढीला अनेक आव्हानांना, स्पर्धेला सामोरे जावे लागते. युवा पिढी इंटरनेट व मोबाईल च्या जाळ्यात अडकत आहे. यंत्राचे आपण गुलाम होण्यापेक्षा यंत्राच्या सहाय्याने आपल्यातील बल वाढवणे, बुद्धीला चालना देणे यासाठी यंत्राचा वापर करावा. अति वापरणे बुद्धीला गंज चढतो. shortcuts वर वर चांगले, पण चिकाटी धरून अंतरापर्यंत जाऊन शिक्षण घेण्याचे बळ  मिळवणे जरुरी. नाविन्याची ओढ, उमेद व जोम आहे. पण योग्य दिशेचा अभाव प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याचे बळ अंगी कारावे. आयत्या वाढलेल्या तटावर कोणीही ताव मारेल, पण ताट उपलब्ध करण्याचे बळ (क्षमता) हवी.

भाषा-सदृश्य व प्रवाही हवी. सतत शिकत राहण्याची क्षमता वृत्ती अंगी बाणणे जरुरी. सकारात्मक दृष्टी हवी. विवेकानंदाप्रमाणे पराकोटीचे उच्च विचार करण्याची तयारी करणे. उच्च विचार करण्याची सवय लागली की आचरण शुद्ध होते

जागतिकीकरणामुळे जग जवळ आले. work satisfaction नाही, संधी नाही, असे नकारात्मक विचार न आणता सकारात्मक विचारांचे बळ अंगीकारावे. Selfhelp, self study हे तत्व चिरंतन आहे. सतत कोणाच्या तरी खांद्यावर आपले ओझे न टाकता आपलेच खांदे मजबूत करणे महत्वाचे! संयम, शांतता हे गुण योगोभ्यासाने अंगी बांधतात. पालकांनी बालकाचे आत्मिक बळ वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. सतत अपेक्षांचे, इच्छांचे ओझे पाल्यांवर घालु नये. जीवनातल्या बदलत्या परिस्थितीनुसार बदलने जरुरी याची जाणीव करून देणे गरजेचे! स्पर्धेचा घोडा बनू नये किंवा जे मागेल ते ते पुरवणे असेही अति लाड करू नयेत. उंच भरारी सर्वच जन मारू शकत नाहीत, पण दुबळेपणा झटकून जमिनीवर घट्ट पाय रोऊन जमीन (धरणीमाता) सुवर्णमय बनवण्याचे बळ बालकांच्यात निर्माण करणे, त्यांना सुखी करणे महत्वाचे! हीच स्वामीजींना भावपूर्वक श्रद्धांजली.

डॉ. झाकिर हुसेन


(८ फ्रेब्रुवारी १८९७ – ३ मे १९६९ ). भारताचे तिसरे राष्ट्रपती व एक ख्यातनाम शिक्षणतज्ञ. त्यांचा जन्म अफ्रिडी अफगाण मुसलमान कुटुंबात हैदराबाद (सिंध) येथे झाला. त्यांचे वडील वकील होते; पण झाकिर हुसेन नऊ वर्षांचे होते, तेव्हा ते वारले. त्यामुळे शिक्षणासाठी त्यांस अनेक ठिकाणी हिंडावे लागले. इटावा, अलीगढ आणि बर्लिन या ठिकाणी शिक्षण घेऊन अखेर त्यांनी अर्थशास्त्र विषयात पीएच्.डी. ही पदवी मिळविली. ही पदवी मिळविण्यापूर्वी ते १९२० मध्ये ⇨जामिआ मिल्लिया इस्लामिया या शिक्षणसंस्थेकडे आकर्षित झाले होते. जर्मनीहून भारतात परत येताच, त्यांनी आपले सर्व जीवन या संस्थेस समर्पित केले. १९२५ मध्ये ही संस्था दिल्लीस हलविण्यात आली व तिचे झाकिर हुसेन १९२६ मध्ये कुलगुरू झाले. त्यांनी जवळजवळ बावीस वर्षे (१९२६–४८) या संस्थेचे कार्य केले व तिला एका अभिनव शिक्षणसंस्थेचे स्वरूप दिले. शैक्षणिक वाटचालीतील त्यांची स्फूर्तिस्थाने दोन होती : म. गांधी व जर्मन शिक्षणशास्त्रज्ञ केर्शेनस्टाइनर. विद्यापीठात बौद्धिक स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्य पुरेपुर असावे आणि व्यासंगी विद्वानांचे ते सभास्थान व्हावे; कारण अशा वातावरणात विद्यार्थ्यांचे नीतिधैर्य विकास पावते अशी त्यांची धारणा होती. त्यांनी स्वयंशिक्षणावर भर देऊन नव्या शैक्षणिक कल्पना जामिआ मिल्लियामध्ये रुजविल्या. ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू झाले (१९४८–५६). १९५६ साली ते राज्यसभेवर निवडून आले. पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले (१९६२). १९६७ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले.

अनेक शैक्षणिक समित्यांवर त्यांनी काम केले. त्यांपैकी यूनेस्को, विद्यापीठ अनुदान आयोग, मध्यवर्ती माध्यमिक मंडळ, विद्यापीठीय शैक्षणिक आयोग ह्या काही महत्त्वाच्या संस्था होत. त्यांना अनेक परदेशीय आणि भारतीय विद्यापीठांनी डी. लिट्. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले. भारत सरकारने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा यथोचित गौरव पद्मविभूषण (१९५४) आणि सर्वोच्च असा भारतरत्न (१९६३) हा पुरस्कार देऊन केला. महात्मा गांधींचे ते प्रथमपासून निष्ठावान अनुयायी होते. महात्माजींनी त्यांना मूलोद्योग शिक्षण समितीचे १९३७ मध्ये अध्यक्ष केले. आयुष्यभर त्यांनी या शिक्षणपद्धतीचा पुरस्कार केला.

त्यांनी शिक्षण, अर्थशास्त्र वगैरे विषयांचे आपले विचार अनेक व्याख्यानांद्वारे मांडले. त्यांपैकी काही व्याख्याने द डायनॅमिक युनिव्हर्सिटी या नावाने प्रसिद्ध झाली आहेत. जर्मन भाषेमध्ये त्यांनी म.गांधींचे चरित्र लिहिले, तसेच प्लेटोच्या रिपब्लिकचे उर्दूत भाषांतर केले. लहान मुलांकरिता काही गोष्टीही त्यांनी लिहिल्या.

स्फटिकांचा आणि चित्रविचित्र खड्यांचा संग्रह करणे, हा त्यांचा आवडता छंद होता. ते ग्रंथप्रेमी होते व त्यांचे ग्रंथालय नव्या नव्या ग्रंथांनी नेहमी भरलेले असे. राष्ट्रपती असतानाच नवी दिल्ली येथे ते हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. एक नेमस्त, चारित्र्यवान व शिक्षणतज्ञ असा राष्ट्रीय मुस्लिम नेता म्हणून त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे.

रामकृष्ण परमहंस

 

(१८ फेब्रुवारी १८३६–१५ ऑगस्ट १८८६). एकोणिसाव्या शतकात बंगालमध्ये होऊन गेलेले एक जगविख्यात सत्पुरुष. मूळ नाव गदाधर, वडील क्षुदिराम चतर्जी, आई चंद्रामणीदेवी. गदाधरांचा जन्म कलकत्त्यापासून सु. १०० किमी. दूर असलेल्या कामारपुकुर या खेड्यात व शालेय शिक्षण गावातील धर्मदास लाहा यांच्या शाळेत केवळ एकदोन इयत्ता इतकेच झाले. अगदी लहानपणापासून ईश्वरभक्ती व साधुबैरागी यांकडे त्यांची ओढ होती.काळ्याभोर ढगांच्या पृष्ठभूमीवरून आकाशातून उडत चाललेली पांढऱ्या शुभ्र बगळ्यांची रांग पाहून गदाधरांचे भान नष्ट झाले. भक्तिपर गाणी ऐकताना, शिवाची भूमिका नाटकात करीत असतानाही तसाच भावावेश होई. ईश्वराशी मन असे तन्मय होण्याची जन्मसिद्ध प्रवृत्ती त्यांच्या ठायी होती व ती सतत टिकून राहिली. १८४३ मध्ये त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला.

गदाधरांची नवव्या वर्षी मुंज झाली. आधी शब्द दिला होता म्हणून मुंजीच्या वेळी पहिली भिक्षा त्यांनी धानी लोहारणीकडून घेतली. हे परंपरेहून वेगळे पाऊल होते.उदरनिर्वाहासाठी पाठशाळा चालवणारा थोरला भाऊ राजकुमार याने १८५२ मध्ये गदाधरांना कलकत्त्यास आणले. शाळेत शिकण्याचा विषय काढला, तर गदाधरांनी म्हटले, ‘मला भातभाकरीची विद्या नको, ईश्वरदर्शन होईल अशी विद्या हवी’. कलकत्त्यापासून सु. ६ किमी. वरील दक्षिणेश्वर या खेड्यात गंगेच्या तीरावर १८५५ मध्ये राणी रासमणीने उभारलेल्या कालीमातेच्या मंदिरात रामकुमार पुजारी झाला. शुद्राची सेवा ब्राह्मणाने करू नये, या कारणासाठी प्रथम नकार दिलेल्या गदाधरांनी राणी रासमणीचे जावई व मंदिराचे व्यवस्थापक मथुरानाश विश्वास यांच्या आग्रहावरून वर्षभराने ते पुजारीपण स्वीकारले. १८५६ मध्ये रामकुमारचा मृत्यु झाला.

यानंतर गदाधरांची ईश्वरभक्ती उत्कट होत चालली. मंदिराजवळच्या पंचवटीतील वडाच्या झाडाखाली ते रात्री जात. धोतर सोडून ठेवीत, ब्राह्मणत्त्वाचे चिन्ह असे यज्ञोपवीत काढून ठेवीत आणि ध्यानधारणा करीत. उत्कटता वाढत चालली. रात्र व दिवस यांचे भान नष्ट होत गेले. ‘आई, दर्शन दे’ असा आक्रोश सुरू झाला. अशा वेळी तहानभुकेची वा अंगावरच्या वस्त्राचीही शुद्ध त्यांना राहत नसे.भाचा हृदय हा दोन घास गदाधरांना भरवी. अखेर एके दिवशी आवेगाच्या भरात गाभाऱ्यातील कालीमातेचे खड्‌ग घेतले व ते मानेवर चालवणार, एवढ्यात जगन्मातेचे दर्शन त्यांना झाले. या वेळी त्यांचे वय पंचवीस होते. यानंतरचे त्यांचे सारे दैनंदिन जीवन ईश्वरानुभवाच्या प्रकाशात उजळून निघाले. गदाधरांस रामकृष्ण हे नाव कोणी व केव्हा दिले हे ठरवता येत नाही. रामकृष्ण विवाहित होते. १८५९ मध्ये वयाच्या तेविसाव्या वर्षी जयरामवाटी येथील रामचंद्र मुखोपाध्याय यांची सहा वर्षांची कन्या सारदामणी हिच्याशी त्यांचा विवाह झाला. पण लौकिक अर्थाने त्यांनी वैवाहिक जीवन स्वीकारले नाही. वयाच्या अठराव्या वर्षी दक्षिणेश्वरला आलेल्या सारदादेवींची त्यांनी जगन्माता या नात्याने केलेली षोडशी पूजा, हा रामकृष्णांच्या आध्यात्मिक साधनेतील अखेरचा टप्पा. सारदादेवींना रामकृष्णांनी आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णपणे सहभागी करून घेतले आणि त्याही सर्वार्थांनी त्यांच्या सहधर्मिणी झाल्या. रामकृष्णांच्या खालोखाल त्यांच्या अनुयायीवर्गात सारदामाता यांचे स्थान मान्यता पावले आहे.

कालीमातेची रीतसर पूजा करू लागण्याच्या आधीचा एक धार्मिक विधी म्हणून रामकृष्णांनी कलकत्त्यातील केनाराम भट्टाचार्य यांच्याकडून दीक्षा घेतली होती. ते साधनाकालापूर्वीचे त्यांचे दीक्षागुरू. त्यानंतरचे त्यांचे गुरू दोन. १८६१ मध्ये दक्षिणेश्वरला आलेल्या भैरवी ब्राह्मणी या चाळिशीतील संन्यासिनीने दोन अडीच वर्षांच्या अवधीत रामकृष्णांकडून तंत्रमार्गानुसार सर्व प्रकारच्या साधना करून घेतल्या. रामकृष्ण हे ईश्वराचा अवतार आहेत, असे शास्त्रीपंडितांच्या सभेत भैरवी ब्राह्मणीने प्रथम म्हटले. सुमारे सहा वर्षे रामकृष्णांच्या सहवासात राहून ती काशीला गेली. १८६४ मध्ये तोतापुरी हा संन्यासी दक्षिणेश्वरला आला. त्याने रामकृष्णांकडून वेदान्ताची साधना करून घेतली. त्या आधी त्यांना संन्यास दीक्षा दिली. तीन दिवसांनी समाधी लागली. ती तीन दिवस राहिली. हा निराकाराचा साक्षात्कार. दहा महिने राहून तोतापुरी गेल्यावर रामकृष्ण अद्वैतानुभवाच्या अवस्थेत सतत सहा महिने होते. त्यानंतर त्यांना आदेश मिळाला. ‘भावमुखी राहा’. १८६६ मध्ये गोविंद राय यांच्यामुळे इस्लाम धर्मानुसार त्यांची साधना झाली, तर शंभुचरण मल्लिक यांच्यामुळे बायबलचा परिचय झाला. येशू ख्रिस्तीने दर्शन दिले आणि आपल्या शरीरात प्रवेश केला, असे रामकृष्णांनी म्हटले आहे. या सर्व अनुभवांतून, सारे धर्म हे एका परमेश्वराकडे जाण्याचे मार्ग आहेत, हे रामकृष्णांचे मत बनले. १८६८ मध्ये त्यांनी मधुरबाबूंबरोबर काशीवृंदावनची यात्रा केली.

कलकत्त्यातील सुशिक्षितांना रामकृष्णांची माहिती ब्राह्मो समाजाचे नेते  केशवचंद्र सेन यांनी रामकृष्णांवर लिहिलेल्या लेखामुळे प्रथम झाली. दक्षिणेश्वरला दर्शनासाठी लोक येऊ लागले. रामकृष्णांचे भक्तगणांशी तासनतास चालणारे संवाद  महेंद्रनाथ गुप्त यांनी ‘एम्.’ या टोपणनावाने श्रीरामकृष्ण कथामृत – ५ खंड, १८९७ – १९३२ (म. भा. श्री रामकृष्ण वचनामृत – १९५१) या ग्रंथात संकलित केले. अखेरच्या चार वर्षातील हे संवाद आहेत. त्यांवरून त्यांची शिकवणूक कळते. या ग्रंथाचे इंग्रजी रूपांतर स्वामी निखिलानंदांनी द गॉस्पेल ऑफ श्रीरामकृष्ण (१९४४) या नावाने केले. या ग्रंथाची तुलना बायबलशी केली गेली. रामकृष्णांचा उपदेश अधिकारानुसार असे.कामिनीकांचनाच्या मोहात मर्यादेबाहेर गुंतू नये, आपली किमान कौटुंबिक कर्तव्ये पार पाडावीत, ईश्वरदर्शन हे जीवनाचे ध्येय मानावे व त्यासाठी पतिपत्नींनी मिळून प्रयत्न करावा, असा उपदेश ते प्रापंचिकांना करीत. कामिनीकांचनाचा सर्वथा त्याग, संन्यासव्रताचा स्वीकार व आध्यात्मिक जीवनाचा आदर्श हा उपदेश त्यांनी अगदी निवडक करूण शिष्यांना केला. कलियुगात सत्यपालन हीच तपश्चर्या, माया टाळावी पण दया टाकू नये, शिवभावाने जीवांची सेवा करावी, निर्विकल्प समाधीपेक्षा सारे विश्व हे परमेश्वराचे रूप हा अनुभाव श्रेष्ठ होय, ज्ञान वा भक्ती किंवा साकार वा निराकार यांतील आपल्याला रुचेल व पचेल ते घ्यावे, अशी त्यांची काही प्रमुख विचारसूत्रे आहेत.

रामकृष्णांनी एकही ग्रंथ वाचला नव्हात, काही पुराणे-प्रवचने ऐकली होती. आध्यात्मिक साधनेतून घेतलेला साक्षात अनुभव हा त्यांच्या विचारांचा एकमेव आधार होता. सारे बोलणे प्रचीतीचे होते. त्यामुळे स्वामी दयानंद, बंकिमचंद्र चतर्जी, पं. ईश्वरचंद्र विद्यासागर किंवा केशवचंद्र सेन अशा नामवंत व्यक्तीही त्यांच्या आध्यात्मिक धारणेच्या दर्शनाने प्रभावित झाल्या. बलराम बसू, डॉ. रामचंद्र दत्त, साधू नागमहाशय, महेंद्रनाथ गुप्त, गिरीशचंद्र घोष, सुरेंद्रनाथ मित्र हे त्यांचे प्रमुख गृहस्थाश्रमी शिष्य होते. काही स्त्रियाही त्यांच्या शिष्यवर्गात होत्या. दहा बारा तरुण अंतरंगशिष्य हे सारे संन्यासी होते. त्यांतील अग्रणी म्हणजे स्वामी  विवेकानंद. त्यांनी स्थापन केलेल्या  रामकृष्ण मिशन या संस्थेच्या देशविदेशांतील शंभरावरील शाखांच्या द्वारा रामकृष्णांचा आध्यात्मिक संदेश आज जगात सर्वदूर पसरलेला आहे. रामकृष्ण अखेरचे सात-आठ महिने घशाच्या कर्करोगाने आजारी होते. कलकत्त्यामधील काशीपूरच्या उद्यानगृहात त्यांनी महासमाधी घेतली.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्


सर्वपल्ली राधाकृष्णन् : (५ सप्टेंबर १८८८ – १६ एप्रिल १९७५). भारताचे दुसरे राष्ट्रपती (१९६२ – ६७) आणि पाश्चात्य जगाला भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख करून देणारे थोर तत्त्वचिंतक. त्यांच्या इंडियन फिलॉसॉफी या द्विखंडात्मक ग्रंथात भारतीय तत्त्वज्ञान इंग्रजीत सुंदर शैलीत मांडले आहे. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशातील तिरुत्तनी या गावी झाला व उच्च शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजमध्ये झाले. नंतर मद्रासचे प्रेसिडेन्सी कॉलेज (१९०९ – १६). म्हैसूर विद्यापीठ (१९१६ –२१), ‘राजे पंचम जॉर्ज अध्यासन’, कलकत्ता विद्यापीठ (१९२९ ३१) या ठिकाणी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.त्याच वेळी ते ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचे प्राध्यापक (१९२९) व नंतर वॉल्टेअर येथील आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू (१९३१ –३५), लंडन येथे ‘पौरस्त्य धर्म आणि नीतिशास्त्र’ यांचे प्राध्यापक (स्फाल्डिंग प्रोफेसर). बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू (१९३९ ४८) होते. १९३१ ते ३९ पर्यंत ते राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी होते. १९४९ ते १९५२ पर्यंत भारताचे रशियातील राजदूत म्हणून त्यांनी काम पाहिले. त्या वेळी आपली नेहमीची प्रथा मोडून स्टालिनने त्यांना मुद्दाम बोलावून त्यांची भेट घेतली.

अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेचे (१९२७) आणि अखिल भारतीय शिक्षण परिषदेचे (१९३०) अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. ऑक्सफर्ड येथील ऑप्टन व्याख्यानमाला तसेच हिबर्ट व्याख्यानमाला गुंफण्याचा बहुमानही त्यांना लाभला. १९५४ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन गौरविले. १९५२ ते १९६७ पर्यंत प्रथम भारताचे उपराष्ट्रपती व नंतर राष्ट्रपती होऊन ते निवृत्त झाले. निवृत्तिकालात ते मद्रास येथे जाऊन राहिले.तेथेच थोड्या विमनस्क अवस्थेत त्यांचे निधन झाले.

त्यांनी तत्त्वचिंतनात स्वतःची अशी कोणतीच भर घातली नाही अशी टीका पुष्कळदा केली जाते. ती खरीही आहे आणि खोटीही आहे. खरी अशाकरता, की आपल्या लिखाणात शंकराचार्याच्या केवलाद्वैत मताचीच थोडी फेरमांडणी करून त्यांनी जी मांडणी केली ती आधुनिक काळाला साजेल अशी केली. नित्य परिवर्तनशील परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर शाश्वत मूल्यांचे पुनर्संस्करण केले. शांकर तत्त्वज्ञानाच्या आधारावर प्रवृत्तीपर जीवन जगता येईल असे त्यांनी दाखवून दिले. सगुण ब्रह्म अथवा ईश्वर हा निर्गुण परब्रह्माचा खालच्या पातळीवरील आविष्कार आहे असे न म्हणता, भक्ताशी असलेल्या त्याच्या संबंधाच्या अपेक्षेने ग्रहण केल्यावर जो ईश्वर म्हणून भासतो त्याचेच संबंध – निरपेक्ष रीतीने ग्रहण केल्यावर तो परब्रह्म म्हणून उरतो असे त्यांचे प्रतिपादन आहे. राधाकृष्णन् यांनी मायावाद स्वीकारला; जग ईश्वरावर अवलंबून आहे, स्वप्रतिष्ठित नाही आणि अशाश्वत आहे असा त्यांनी त्याचा अर्थ केला. हिंदू धर्मास काही अर्वाचीन रूप मिळाले आहे असे मानल्यास त्याचे श्रेय स्वामी विवेकानंद, डॉ. भगवानदास, म. गांधी इत्यादींच्या प्रमाणे राधाकृष्णन् यांनाही आहे.

सर्व धर्मांतील मूलभूत सत्य एकच आहे आणि ही वृत्ती हिंदू धर्माने विशेषकरून जोपासली आहे. असे राधाकृष्णन् यांनी सांगितले. कोणत्याही धर्माच्या शिकवणुकी या तत्त्वज्ञानाचा अभ्यासविषय आहेत; देवशास्त्राच्या (थिऑलॉजीच्या) नाहीत असे त्यांचे म्हणणे होते. असे ते म्हणू शकले याचे कारण ज्ञानमीमांसेत प्रत्यक्ष व अनुमान यांच्याप्रमाणेच अंतःप्रज्ञ (इंट्यूइशन) हेही सत्यज्ञान मिळविण्याचे एक साधन आहे असे त्यांनी मानलेले आहे. धर्मग्रंथांचे प्रामाण्य त्यांत ग्रथित असलेल्या ऋषींच्या गूढानुभूतींवर आहे, त्या ग्रंथाच्या ईश्वरकर्तृत्वावर नाही, अशी त्यांची भूमिका आहे. ही दृष्टी पतकरली म्हणजे धर्माची चिकित्सा करता येते आणि प्रस्थापित धर्ममतांचा समन्वयही करता येतो.

बुद्धाने अनात्मवाद सांगितला; पण राधाकृष्णन् यांच्या मताप्रमाणे तो अनात्मवाद आणि वेदान्ताचा आत्मवाद अथवा ब्रह्मवाद यांच्यात विरोध नाही.बुद्धाने नाकारला तो ‘मी’ आणि ‘माझे’ अशी वृत्ती निर्माण करणारा जीवात्मा होय. जीवात्मा हा अहंकाराचा परिणाम होय. अहंकाराचा लोप झाला म्हणजे निर्वाणरूपी परम शांतीचा अनुभव येतो. वेदान्तही अहंकाराचे विसर्जन करावयास सांगतो. अहंकार नष्ट झाल्यावर जो शुद्ध चैतन्याचा अनुभव येतो, त्यास वेदान्तात आत्म्याचा अनुभव म्हणतात.

खरे म्हटले तर धर्म एकच असतो. संप्रदाय अनेक असतात. याचा अर्थ असा नव्हे, की कोणताही संप्रदाय व त्याच्या विशिष्ट परंपरा नाहीशा केल्या पाहिजेत. इतकेच केले पाहिजे, की संप्रदायांनी आपापली आग्रही वृत्ती सोडली पाहिजे.

द रेन ऑफ रिलिजन इन कंटेंपररी फिलॉसॉफी या १९२० मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात त्यांच्या मनाचा कल रामानुजांच्या विशिष्टाद्वैत मताकडे– म्हणजे सगुणोपासनेकडे- झुकलेला दिसतो. पुढे १९२३ (पहिला भाग) व १९२७ (दुसरा भाग) या साली प्रसिद्ध झालेल्या इंडियन फिलॉसॉफी या ग्रंथात शंकराचार्याचे केवलाद्वैत मत त्यांनी शिरोधार्य मानलेले दिसते. पण १९२९ साली प्रसिद्ध झालेल्या अॅन आयडियालिस्ट व्ह्यू ऑफ लाइफ या ग्रंथात त्यांचे जीवनविषयक समग्र तत्त्वज्ञान साररूपाने आले आहे असे म्हणता येईल. यात असे म्हटले आहे, की देहपातापूर्वीही व्यक्तीला ईश्वराशी सायुज्यता मिळू शकेल; पण अंतिम मोक्ष अथवा ब्रह्म-निर्वाण हे सर्व जीव मुक्त झाल्याशिवाय एका व्यक्तिला प्राप्त होणार नाही. म्हणून सायुज्य मुक्ती प्राप्त झालेले महामानव हे इतर जीवांच्या उद्धारासाठी प्रयत्नशील राहतात. हे मत महायान पंथातील बौद्ध मतासारखे बोधिसत्व संकल्पनेसारखे आहे. त्यांनी उपनिषदे वप्रिन्सिपल उपनिषद्स (१९५३), ब्रह्मसूत्रे (द ब्रह्मसूत्राज – १९६०) व भगवद्‌गीता (द भगवद्‌गीता – १९४८) या वेदान्ताच्या ⇨ प्रस्थानत्रयीवर भाष्यस्वरूप ग्रंथ लिहिल्यामुळे प्राचीन अर्थाने त्यांना ‘आचार्य’ ही उपाधी लावता येईल. यांशिवाय द फिलॉसॉफी ऑफ रविंद्रनाथ टागोर (१९१८), द हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ (१९२६), ईस्ट अँड वेस्ट इन रिलिजन (१९३३), ईस्टर्न रिलिजन्स अँड वेस्टर्न थॉट (१९३९), द धम्मपद (१९५०), द रिकव्हरी ऑफ फेथ (१९५५) इ. त्यांची ग्रंथरचना आहे.

धर्म व तत्त्वज्ञान यांप्रमाणे शिक्षण हाही त्यांच्या परिशीलनाचा विषय होता. शिक्षणाने व्यक्तीला आत्मभान झाले पाहिजे आणि आपल्या विचाराची दिशा ठरविता आली पाहिजे, असे त्यांचे मत होते. स्वतंत्र भारताच्या पहिल्या शिक्षण आयोगाचे (१९४८) ते अध्यक्ष होते. त्यांच्या शैक्षणिक कार्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी व ह्या आदर्श शिक्षकाच्या सन्मानार्थ भारतात सर्वत्र त्यांचा जन्मदिन (५ सप्टेंबर) हा ‘शिक्षकदिन’ म्हणून साजरा केला जाते.

आज ज्याला विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान म्हणतात त्याच्याशी आपल्या विचारांचा सांधा जमवून घेण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. त्याचप्रमाणे आजच्या अस्तित्ववादाविषयीही त्यांनी फारसा आदर दाखविला नाही. त्यांच्या मते, उपनिषदांतील तत्त्वज्ञान हेच खरे अस्तित्ववादी आहे. कारण, त्याची सुरूवात आत्म्याच्या अस्तित्वापासून होते. जडवादात अंतःप्रज्ञेला अथवा गूढानुभूतीला स्थान नसल्यामुळे आध्यात्मिक मर्मदृष्टीला तो पारखा होतो.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...