नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
२७ जुलै २०२०
तुम्हाला माहिती आहे का :- थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ
० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)
० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर
० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)
० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)
० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)
० महात्मा फुले- पुणे
० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)
० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)
० गोपाळ हरी देशमुख- पुणे
० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)
० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)
० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)
० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-
शिरढोण (रायगड)
० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)
०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)
० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)
० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)
० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)
० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)
० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)
० साने गुरुजी- पालघर (रायगड)
० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)
० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)
० संत ज्ञानेश्वर- आपेगाव
०संत एकनाथ- पैठण
० समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)
० संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती)
चालू घडामोडी
• सीमा रस्ते संस्था (BRO) ने................हा पूल पूर्णपणे बदलण्यासाठी ‘प्रोजेक्ट अरुणक’ आरंभ केला
- डापोरीजो पूल (अरुणाचल प्रदेशातल्या अप्पर सुबानसिरी जिल्ह्यात).
• केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने EPF ग्राहकांकडून तीन महिन्यांपर्यंत मूलभूत वेतन आणि महागाई भत्तेच्या रकमेपर्यंत किंवा EPF खात्यात सदस्याच्या जमा असलेल्या रकमेच्या ____पर्यंत, जे कमी असेल, आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी दिली
- 75 टक्के.
• पहिल्यांदाच, भारतीय स्टेट बँकेने (SBI)................. इतक्या रकमेचे ग्रीन बॉन्ड उभारले आहेत जे SBIच्या लंडन शाखेत सिंगापूर SGX वर सूचीबद्ध केले जातील
- 100 दशलक्ष डॉलर.
• नवी दिल्लीच्या AIIMS संस्थेतर्फे स्थापन करण्यात आलेले टेलीमेडिसिन केंद्र, ज्याद्वारे तज्ञ डॉक्टर देशभरातल्या तज्ञांशी संपर्क साधतील
- CoNTeC (कोविड-10 राष्ट्रीय दूर-सल्लामसलत केंद्र).
• 1971 साली पाकिस्तानशी झालेल्या युद्धाच्या वेळी बांगलादेशाच्या मुक्तिसाठी चालविण्यात आलेल्या हवाई मोहिमांमध्ये नेतृत्व करणारे निवृत्त एअर वाइस-मार्शल........... यांचे 29 मार्च रोजी निधन झाले
– चंदन सिंग राठौड.
• .................या राज्य विधानसभेने 30 मार्च 2020 रोजी 2020-21 या आर्थिक वर्षात राज्य सरकारला त्याच्या एकत्रित निधीतून 1.55 लक्ष कोटी रुपये खर्च करण्याचे विनियोजन विधेयक एकमताने मंजूर केले
- ओडिशा.
• ..............या भारतीय संस्थेने विलगीकरण केलेल्या लोकांचा मागोवा घेण्यासाठी ‘कोरोनटाईन’ (CORONTINE) नावाचे एक व्यासपीठ तयार केले
- भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई.
• सीमा रस्ते संस्था (BRO) ने................हा पूल पूर्णपणे बदलण्यासाठी ‘प्रोजेक्ट अरुणक’ आरंभ केला
- डापोरीजो पूल (अरुणाचल प्रदेशातल्या अप्पर सुबानसिरी जिल्ह्यात).
• केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाने EPF ग्राहकांकडून तीन महिन्यांपर्यंत मूलभूत वेतन आणि महागाई भत्तेच्या रकमेपर्यंत किंवा EPF खात्यात सदस्याच्या जमा असलेल्या रकमेच्या ____पर्यंत, जे कमी असेल, आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी दिली
- 75 टक्के.
• पहिल्यांदाच, भारतीय स्टेट बँकेने (SBI)................. इतक्या रकमेचे ग्रीन बॉन्ड उभारले आहेत जे SBIच्या लंडन शाखेत सिंगापूर SGX वर सूचीबद्ध केले जातील
- 100 दशलक्ष डॉलर.
• नवी दिल्लीच्या AIIMS संस्थेतर्फे स्थापन करण्यात आलेले टेलीमेडिसिन केंद्र, ज्याद्वारे तज्ञ डॉक्टर देशभरातल्या तज्ञांशी संपर्क साधतील
- CoNTeC (कोविड-10 राष्ट्रीय दूर-सल्लामसलत केंद्र).
• 1971 साली पाकिस्तानशी झालेल्या युद्धाच्या वेळी बांगलादेशाच्या मुक्तिसाठी चालविण्यात आलेल्या हवाई मोहिमांमध्ये नेतृत्व करणारे निवृत्त एअर वाइस-मार्शल........... यांचे 29 मार्च रोजी निधन झाले
– चंदन सिंग राठौड.
• .................या राज्य विधानसभेने 30 मार्च 2020 रोजी 2020-21 या आर्थिक वर्षात राज्य सरकारला त्याच्या एकत्रित निधीतून 1.55 लक्ष कोटी रुपये खर्च करण्याचे विनियोजन विधेयक एकमताने मंजूर केले
- ओडिशा.
• ..............या भारतीय संस्थेने विलगीकरण केलेल्या लोकांचा मागोवा घेण्यासाठी ‘कोरोनटाईन’ (CORONTINE) नावाचे एक व्यासपीठ तयार केले
- भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई.
Q1) ____ या समस्येला तोंड देण्यासाठी भारत आणि इस्रायल या देशांनी एक करार केला.
उत्तर :- सायबर गुन्हे
Q2)कोणाच्या हस्ते दिल्लीत पाचव्या ‘उड्डयन आणि संरक्षण निर्मिती तंत्रज्ञान’ परिषदेचे उद्घाटन झाले?
उत्तर:- श्रीपाद येसो नाईक
Q3) कोचीन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने _ याची बांधणी करण्यासाठी नॉर्वेच्या ॲस्को मेरीटाईम या कंपनीसोबत करार केला.
उत्तर :- विजेवर चालणारे जहाज
Q4) कोणत्या योजनेला ‘वंदे भारत’ मोहिमेचे नवे रूप म्हणून ओळखले जाते?
उत्तर:- एअर बबल
Q5) 'FIFA विश्व चषक 2022’ ही स्पर्धा _ देशात खेळवली जाणार आहे.
उत्तर:- कतार
Q6) कोणत्या व्यक्तीच्या हस्ते खाद्यान्नावरील प्रक्रियेच्या संदर्भातल्या ‘डिजिटल भारत-इटली व्यवसाय अभियान’चे उद्घाटन झाले?
उत्तर:- हरसिमरत कौर बादल
Q7) कोणती व्यक्ती सुरिनाम देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवडली गेली?
उत्तर:-चंद्रिकापरसाद 'चान' संतोखी
Q8) _ यांनी "द तंगम्स" या शीर्षकाच्या पुस्तकाचे अनावरण केले.
उत्तर:- पेमा खंडू
Q9) कोणत्या वनाला ‘वन्यजीव अभयारण्य’चा दर्जा प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर:- पोबा
Q10) _ ही कंपनी “अंजी खाड पूल” हा भारतातील पहिला तारांच्या सहाय्याने उभारलेला रेल्वे पूल बांधणार आहे.
उत्तर:- के. आर. सी. एल.
भारतात शिका’ कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतात पहिल्यांदाच ‘Ind-SAT’ परीक्षेचे आयोजन
🧩‘भारतात शिका’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिनांक 22 जुलै 2020 रोजी पहिल्यांदाच भारतीय शैक्षणिक मूल्यांकन (Ind-SAT) परीक्षा घेतली.
◾️ठळक बाबी....
🧩राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे (NTA) प्रक्षेपित आंतरजाल पद्धतीने घेतलेल्या या परीक्षेत नेपाळ, इथिओपिया, बांग्लादेश, भुटान, युगांडा, टांझानिया, रवांडा, श्रीलंका, केनिया, झांबिया, इंडोनेशिया आणि मॉरीशस या देशांमधून सुमारे पाच हजार उमेदवार सहभागी झाले होते.
🧩मंत्रालयाच्या अंतर्गत EdCIL (भारत) मर्यादित या सार्वजनिक उपक्रमाने आणि SII या अंमलबजावणी संस्थेनी या परीक्षेसाठी नोंदणी आणि इतर बाबींची पूर्तता केली.
🧩Ind-SAT परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे ‘भारतात शिका’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाणार आहे.
🧩भारतातल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी परदेशी उमेदवारांना शिष्यवृत्ती प्रदान करण्याच्या उद्देशाने आशियाई तसेच आफ्रिकी देशांमध्ये Ind-SAT परीक्षेचे आयोजन करण्याच्या प्रस्ताव वित्तमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पिय भाषणात मांडला होता. यावर्षी प्रायोगिक तत्वावर 12 देशांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. भविष्यात इतरही देशांमध्ये ही परीक्षा आयोजित केली जाणार आहे.
◾️‘भारतात शिका’ कार्यक्रमाविषयी...
🧩‘भारतात शिका’ हा मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा कार्यक्रम असून त्याच्या अंतर्गत परदेशी विद्यार्थी भारतातल्या निवडक अशा 116 उच्च शिक्षण संस्थांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी येतात.
🧩इयत्ता बारावी वा शालांत परीक्षेतल्या गुणांच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड केली जाते. गुणानुक्रमे पहिल्या 2000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते तर इतर काही विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कामध्ये सवलत दिली जाते. या कार्यक्रमाच्या पहिल्या वर्षात, 2018-19 साली सुमारे 780 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर दुसऱ्या वर्षी ही संख्या 3200 वर पोहोचली.
🧩‘भारतात शिका’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत निवडक भारतीय विद्यापिठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी परदेशातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी तसेच शिष्यवृत्ती प्रदान करण्यासाठी Ind-SAT ही परीक्षा घेतली जाते. भारतात शिकण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता मापण्याच्या उद्देशाने या परिक्षेची रचना करण्यात आली आहे.
मुकेश अंबानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती
➡️उद्योजक मुकेश अंबानी यांच्यासाठी मात्र 2020 हे वर्ष खूपच चांगलं ठरताना दिसतंय. लॉकडाउनमध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये अनेक बड्या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली.
त्यांच्या रिलायन्स जिओच्या व्यवसायातही वाढ झाली, आणि आता मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे.
➡️अब्जाधीश मुकेश अंबानी आता जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
प्रसिद्ध बिजनेस मॅगझीन फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार मुकेश अंबानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
➡️रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन असलेल्या मुकेश अंबानी यांनी फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये अमेरिकी गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांना मागे टाकत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे.फोर्ब्सच्या यादीनुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती 75 अब्ज डॉलर झाली आहे.
पूर्व लडाखमधून सैन्य पूर्णपणे मागे घेण्यास भारत-चीनची मान्यता.
⭐️पूर्व लडाखमधील वादग्रस्त ठिकाणांहून सैन्य लवकरात लवकर आणि पूर्णपणे माघारी घेण्याचे शुक्रवारी भारत आणि चीनने मान्य केले. द्विपक्षीय संबंधांमध्ये र्सवकष सुधारणा होण्यासाठी सीमेवरील भागात शांतता प्रस्थापित होणे गरजेचे आहे, या बाबतही दोन्ही देशांचे मतैक्य झाले.
⭐️भारत आणि चीन यांच्यात नव्याने ऑनलाइन राजनैतिक चर्चा झाली त्यामध्ये लडाखमधील स्थितीचा आढावा घेण्यात आला. कमांडर स्तरावर १४ जुलै रोजी झालेल्या चर्चेनंतर सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया अपेक्षेनुसार होत नसल्याचे लक्षात आल्याच्या पार्श्वभूमीवर नव्याने चर्चा करण्यात आली.
⭐️दोन्ही देशांचे सैन्य पूर्णपणे मागे घेण्याबाबतची रणनीती ठरविण्यासाठी चर्चेची आणखी एक फेरी लवकरच आयोजित करण्याचे शुक्रवारी झालेल्या चर्चेत दोन्ही देशांनी मान्य केले, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यात ५ जुलै रोजी दूरध्वनीवरून तणाव कमी करण्यासंदर्भात जवळपास अडीच तास चर्चा झाली. त्यानंतर ६ जुलैपासून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. कमांडरांच्या बैठकीत जो समझोता झाला त्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे दोन्ही देशांनी शुक्रवारी झालेल्या चर्चेत मान्य केले.
रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन रद्द- डोनाल्ड ट्रम्प.
📌रिपब्लिकन पक्षाचे जॅक्सनव्हिल येथे होणारे अधिवेशन करोना विषाणूच्या प्रसारामुळे रद्द करण्यात आले आहे, हे अधिवेशन पुढील महिन्यात होऊन त्यात डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली जाणार होती.तर 24-27 ऑगस्ट दरम्यान हे अधिवेशन होणार होते. आता हे अधिवेशन पूर्ण स्वरूपात होणार नाही.
📌व्हाइट हाऊसच्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी सांगितले की, फ्लोरिडामध्ये करोनाचा प्रसार जास्त असल्याने जॅक्सनव्हिल येथील अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या अधिवेशनासाठी ही योग्य वेळ नाही कारण फ्लोरिडात करोनाचा प्रसार जास्त आहे.
फ्लोरिडामध्ये करोनाचा प्रसार झाला असून त्या राज्यात 3,89,868 रुग्ण आहेत. कॅरोलिना व न्यूयॉर्क पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
भारतात 30 वर्षीय स्वयंसेवकाला दिला कोरोनाचा पहिला डोस.
💥भारतात विकसित करण्यात आलेल्या COVAXIN या लसीच्या मानवी चाचणीस एम्स रुग्णालयात सुरुवात करण्यात आली आहे. 30 वर्षीय स्वयंसेवकाला या स्वदेशी लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
💥इंडिया टुडेने एम्स रुग्णालयातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, स्वयंसेवकाला दोन तास रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
💥भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी COVAXIN ही करोना विषाणूवरील लस तयार केली आहे.
💥स्वयंसेवकाला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर नंतर घरी पाठवण्यात येणार आहे.
💥यानंतर पुढील सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवलं जाईल. COVAXIN लसीचा हा पहिलाच डोस आहे.डोस देण्याआधी करण्यात आलेल्या स्क्रिनिंग आणि टेस्टमध्ये संबंधित 30 वर्षीय व्यक्ती पात्र ठरली होती.
"तोमान": इराण देशाचे नवे राष्ट्रीय चलन...▪️
▪️ इराण देशाने त्यांचे अधिकृत राष्ट्रीय चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने ‘इराणी रियाल’ हे चलन बदलून त्याऐवजी ‘इराणी तोमान’ हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. बदललेल्या चलनानुसार एका तोमानचे मूल्य हे 10 हजार रियाल एवढे असणार आहे.
▪️ 4 मे 2020 रोजी इराणच्या संसदेमध्ये यासंदर्भातला विधेयक मंजूर करण्यात आला आणि राष्ट्रीय चलनामधून चार शून्य हटवण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली. केंद्रीय बँक असणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इराणला चलन बदलण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे.
▪️संयुक्त राज्ये अमेरिका देशाने इराणबरोबरचा अणुकरार रद्द करण्याबरोबरच इराणवर अनेक आर्थिक निर्बंधही लादले. याच कारणामुळे इराणच्या चलनाचे मूल्य 60 टक्क्यांपर्यंत घसरले आणि रियाल डॉलरच्या तुलनेत एक लक्ष 56 हजार इतका घसरला आहे. इराणी चलनाची किंमत घसरल्याने महागाई वाढली. हीच घसरण रोखण्यासाठीची उपाययोजना म्हणून इरणने चलन बदलण्याचा निर्णय घेतला.
▪️इराण हा मध्यपूर्वेतला एक देश आहे. तेहरान ही राजधानी आहे आणि रियाल हे अधिकृत चलन आहे.
व्यक्ती विशेष : सर जॉन हॉटन
- संयुक्त राष्ट्रांचा हवामान विज्ञान सल्लागार गट हा खास हवामान बदलांच्या अभ्यासांसाठीच नेमण्यात आला. अलीकडेच त्यांच्या सूचना अमेरिकेने अव्हेरल्या हे खरे; पण या सल्लागार गटाला २००७ मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता. या गटाचे सदस्य असलेले जॉन हॉटन हे वेल्सचे हवामान भौतिकशास्त्रज्ञ.
- विज्ञान, धोरणनिश्चिती व धार्मिक समुदाय यांच्यात समन्वय घडवून आणण्याचे काम केले. हॉटन यांच्या निधनाने हवामान बदलांच्या समस्यांवर संशोधन करणारा एक ख्यातनाम वैज्ञानिक आपण गमावला आहे. त्यांचा मृत्यू हा करोनाशी संबंधित गुंतागुतीने झाला. संयुक्त राष्ट्रांचा हवामान बदल सल्लागार गट (आयपीसीसी) १९८८ मध्ये स्थापन झाला. या गटाचे तीन पहिले अहवाल हॉटन यांच्या मुख्य संपादकत्वाखाली सादर करण्यात आले होते.
- १९९० मध्ये या गटाचा पहिला अहवाल प्रसिद्ध झाला तेव्हाच धोक्याची घंटा वाजवली गेली. त्यानंतर दोन वर्षांनी रिओची वसुंधरा परिषद झाली.
त्या वेळी सर्वच देशांनी ही समस्या मान्य केली होती. दुसरा अहवाल १९९५ मध्ये आला. त्यानंतर क्योटो करार झाला. तिसरा अहवाल २००२ मध्ये सादर केला गेला. त्यात सागरी पातळी वाढण्याचे संकेत देण्यात आले.
- २००७ मध्ये या सल्लागार गटाला नोबेल मिळाले तेव्हाही हॉटन त्याचे सदस्य होते. हॉटन हे मूळ साउथ वेल्सचे, ब्रिटनच्या हवामान कार्यालयात ते १९८३ ते १९९१ या काळात महासंचालक होते. त्यांनीच ‘हॅडली सेंटर फॉर क्लायमेट सायन्स अँड सव्र्हिसेस’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. हवामान विज्ञानातील ती एक नावाजलेली संस्था आहे. १९६० पासून त्यांनी हवामान बदलांवर संशोधन सुरू केले.
- अणुयुद्धानंतरच्या हवामान बदलांचा त्यांनी अभ्यास केला. त्यात नासाच्या निम्बस उपग्रहांचा वापर करण्यात आला होता.
- वातावरणात कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण वाढत असल्याबाबत त्यांनी १९८० मध्येच लक्ष वेधले होते. हॉटन यांचा जन्म वेल्समध्ये १९३१ मध्ये झाला.
वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांना ऑक्सफर्डची शिष्यवृत्ती मिळाली. तेथे त्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास केला. तेथेच ते वातावरणीय भौतिकशास्त्राचे प्राध्यापक झाले. रॉयल सोसायटीचे ते फेलो होते.
- राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी त्यांना उमरावपदाने सन्मानित केले होते. रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्णपदक व ‘जपान प्राइझ’ हे सन्मान त्यांना मिळाले.
‘ग्लोबल वॉर्मिग- द कम्प्लीट ब्रीफिंग’ (१९८४) या त्यांच्या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या निघाल्या. विज्ञान व धर्म या विषयांवरही त्यांनी लेखन केले. ‘इन द आय ऑफ द स्टॉर्म’ हे आठवणीपर पुस्तक त्यांनी लिहिले होते.
---------------------------------------------------
वाक्यप्रचार व अर्थ
🌷हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे
🌷 गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे
🌷अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे
🌷पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे
🌷वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे
🌷कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे
🌷नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे
🌷दत्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे
🌷जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे
🌷चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे
🌷सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे
🌷रामराम ठोकणे - निरोप घेणे
🌷आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे
🌷कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे
🌷उमाळा येणे - तीव्र इछा होणे
🌷 वर्ज्य करणे - टाकणे
🌷 काडीमोड करणे - संबंध तोडणे
🌷 अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे
🌷 अगतिक होणे - उपाय न चालणे
🌷कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे
🌷आभाळ फाटणे - मोठे संकट येणे
🌷 इडापिडा टळणे - संकट जाणे
🌷उतराई होणे - उपकार फेडणे
🌷अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे
🌷 लकडा लावणे - सारखी घाई करणे
🌷परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे
🌷 ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे
🌷कागाळी करणे - तक्रार करणे
🌷 खांदा देणे - मदत करणे
🌷 खोबरे करणे - नाश करणे
🌷गय करणे - क्षमा करणे
🌷 न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे
🌷जीव मुठीत घेणे - फार घाबरणे
🌷जीव ओतणे - मन लावून काम करणे
🌷सुपारी देणे - आमंत्रण देणे
🌷 तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे
🌷 डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे
🌷 नामोहरम होणे - पराभूत होणे
🌷 पदर पसरणे - याचना करणे
🌷 पाणउतारा करणे - अपमान करणे
🌷 वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे
🌷हात तोकडे पडणे - मदत करण्यास क्षमता कमी पडणे
🌷 हिरमुसले होणे - नाराज होणे
🌷 पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे
🌷 विटून जाणे - त्रासणे
🌷 डोके सुन्न होणे - काही न सुचणे
🌷 फडशा पाडणे - संपवणे
🌷गोरेमोरे होणे - लाज वाटणे
🌷आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे
🌷धिंडवडे निघणे - फजिती होणे
🌷 आटापिटा करणे - खूप कष्ट करणे
🌷माया पातळ होणे - प्रेम कमी होणे
🌷वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे
🌷हातपाय गाळणे - धीर सोडणे
🌷 कागदी घोडे नाचवणे - कृतिशील
काम न करता कागदी पराक्रम गाजविणे
🌷गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे
🌷झाकड पडणे - अंधार पडणे
🌷पोटात आग पडणे - खूप भूक लागणे
🌷टोपी उडवणे - टवाळी करणे
🌷पाणी पाजणे - पराभव करणे
🌷वहिवाट असणे - रीत असणे
🌷छी थू होणे - नाचक्की होणे
🌷प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे
🌷दंडेली करणे - जबरदस्ती करणे
🌷दिवा विझणे - मरण येणे
🌷मूठमाती देणे - शेवट करणे
🌷 सुगावा लागणे - अंदाज लागणे
🌷प्रतारणा करणे - फसवणूक करणे
🌷डोक्यावर घेणे - कौतुक करणे
🌷कानाशी लागणे - चहाडी करणे
🌷किटाळ करणे - आरोप होणे
🌷देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे
🌷हातावर तुरी देणे - फसविणे
🌷बेगमी करणे - साठा करणे
🌷सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे
🌷पोटात तुटणे - वाईट वाटणे
🌷नख लावणे - नाश करणे
🌷डोळो निवणे - समाधान होणे
एकमान पद्धत
(अ) एकमान पद्धत
नमूना पहिला –
उदा. 84 रुपयांना 6 पेन मिळतात;तर दीड डझन पेनांची किंमत किती?
252 रु.
336 रु.
168 रु.
420 रु.
उत्तर : 252 रु.
स्पष्टीकरण :-
दीड डझन = 18 पेन आणि 6 ची 3 पट = 18:: 84 ची 3 पट = 84×3 = 252
नमूना दूसरा –
उदा. प्रत्येक विधार्थ्याला 8 वह्या वाटल्या; तर दीड ग्रोस वह्या किती मुलांना वाटता येतील?
16
24
27
36
उत्तर : 27
स्पष्टीकरण :-
एक ग्रोस = 144 किंवा 12 डझन :: दीड ग्रोस = 18 डझन18×12/8 = 27 किंवा एक ग्रोस वह्या 144/8 = 18 मुलांना:: 1 ½ = 18 च्या दिडपट = 27 मुलांना
नमूना तिसरा –
उदा. एका संख्येचा 1/13 भाग = 13, तर ती संख्या कोणती?
26
121
84
169
उत्तर : 169
क्लृप्ती :-
एक भाग ‘क्ष’ मानू.उदाहरणानुसार 1/13 क्ष = 13:: क्ष = 13×13 = 132 = 169 अपूर्णांक व्यस्त करुन गुणणे.
नमूना चौथा –
उदा. 60 चा 2/5 =?
12
24
18
30
उत्तर : 24
क्लृप्ती :-
60 चा 2/5 = 60×2/5 = 12×2 = 24 किंवा1/5 = 2/10 आणि 2/5 = 4/10, 60 चा = 1/10 आणि 60 चा 4/10 = 6×4
नमूना पाचवा –
उदा. 80 चा 3/5 हा 60 च्या ¾ पेक्षा कितीने मोठा आहे?
5
3
2
8
उत्तर : 3
क्लृप्ती :-
80 चा 3/5 = 80×3/5 = 48, 60 चा ¾ = 60×3/4 = 45,उदाहरणानुसार 48-45 = 3
नमूना सहावा-
उदा. 400 चा 3/8 हा कोणत्या संख्येचा 5/8 आहे?
200
180
210
240
उत्तर : 240
स्पष्टीकरण :-
400 चा 3/8 = 400×3/8 = 50×3 = 150 आणि क्ष चा 5/8 = 150:: क्ष = 150×8/5 = 240 किंवा5 भाग = 400:: 3 भाग = 400 × 3/5 = 240 किंवा400×3/8×8/5 = 240
नमूना सातवा –
उदा. 350 लीटर पाणी मावणार्या टाकीचा 2/7 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल ?
3.15 ली.
200 ली.
250 ली.
245 ली.
उत्तर : 250 ली.
स्पष्टीकरण :-
350 चा 2/7 = 50×2 = 100 उदाहरणानुसार 350-100 = 250 लीटर
नमूना आठवा –
उदा. रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, ¼ भागात भुईमुग लावला व उरलेल्या 25 एकारांत ज्वारी लावली, तर रामरावांचे एकूण किती एकर शेत आहे?
50
60
120
75
उत्तर : 60
स्पष्टीकरण :-
1/3+1/4=4/12+3/12=7/12;1-7/12=12/12-7/12=5/12=25 एकर,:: एकूण शेत = 5/12 चा व्यस्त 12/5 ने 25 ला गुणणे,यानुसार 12/5×25=60
Latest post
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
खालील विधाने विचारात घ्या? अ पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...
-
1️⃣ व्यक्तिमत्व व वर्तन (Personality & Behavior) 1. Brave – Courageous (शूर) 2. Honest – Truthful (प्रामाणिक) 3. Happy – Joyful (आनंद...
-
601) अनधिकृत व्यक्तीला समजू नये म्हणून डेटाचे व्यवस्थापन करण्याचा हा एक मार्ग आहे? 👉 अनक्रीप्शन 602) पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी ब...
-
◾️जायकवाडी : नाथसागर (छत्रपती संभाजीनगर) ◾️पानशेत : तानाजी सागर (पुणे) ◾️गोसिखुर्द : इंदिरा सागर (भंडारा) ◾️वरसगाव : वीर बाजी पासलकर (पुणे ज...