०५ जुलै २०२०

फ्रान्सच्या पंतप्रधानांचा राजीनामा

पॅरिस : फ्रान्सचे पंतप्रधान एदुआर्द फिलीप यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. हा फेरबदल अपेक्षित मानला जात होता.

अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्यांच्या उर्वरित दोन वर्षांच्या कारकीर्दीत नवा अध्याय सुरू करण्याचे ठरवले असून फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान करण्याचे ठरवले आहे. सध्या करोनामुळे फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा धक्का बसला आहे.

स्थानिक वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीत मॅक्रॉन यांनी म्हटले आहे की, देशाची फेरउभारणी करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्यासाठी नवा मार्ग वापरावा लागेल. रविवारच्या पालिका निवडणुकीपूर्वी तसेच  करोना काळात मॅक्रॉन यांच्यावर टीका झाली होती. त्यामुळे मतदानापूर्वीच त्यांनी खांदेपालटाचे संकेत दिले होते.

मॅक्रॉन यांच्या पक्षाला निवडणुकीत अनेक मोठय़ा शहरात पराभवाचा फटका बसला आहे. ग्रीन पार्टीने त्यात आघाडी  घेतली.  मार्च व एप्रिलमध्ये करोनाची साथ शिखरावस्थेत होती त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली.

फुलपाखरांचे मराठी नामकरण!

अतिशय देखणा, रंगीबेरंगी आणि आबालवृद्धांना अगदी क्षणात आपलेसे करणारा कीटक म्हणजे फुलपाखरू! आपल्या सौंदर्याची भुरळ सर्व मानवजातीला घालणारी फुलपाखरे जैवसाखळीतील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहेत.

२२ जून २०१५ या दिवशी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने अत्यंत सुंदर आणि आकाराने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ‘ब्लू मॉरमॉन’ (निलवंत; सोबतचे फुलपाखराचे चित्र पाहा) या फुलपाखराला ‘राज्य फुलपाखरा’चा दर्जा प्रदान केला. राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले!

फुलपाखरे दिसायला मोहक असली तरी त्यांना देण्यात आलेली इंग्रजी भाषेतील नावे सामान्यजनांच्या आकलनापलीकडे असतात. त्यांना फुलपाखरांविषयी आपलेपणा वाटावा, आत्मीयता वाटावी म्हणून ‘महाराष्ट्र जैवविविधता मंडळा’मार्फत फुलपाखरांचे मराठी नामकरण करण्यात आले आहे.

फुलपाखरांच्या सवयी, खाद्य वनस्पती, रंग, आकार, नक्षी आणि इंग्रजी नावाचे भाषांतर हे तपशील फुलपाखरांना मराठी नावे देताना विचारात घेतले गेले आहेत. सदर नावे आपल्या संस्कृतीशी निगडित, आपल्या मातीतील वाटावीत तसेच उच्चारण्यास, लक्षात ठेवण्यास सोपी असावीत यावरही कटाक्ष ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या एकूण २७४ प्रजातींबरोबरच त्यांच्या सहा कुळांनादेखील मराठमोळी नावे दिलेली आहेत.

उदाहरणार्थ, मुक्तपणे विहरणाऱ्या ‘वाँडरर’ या फुलपाखराला ‘विमुक्ता’, तर ‘प्लमजूडी’ नावाच्या फुलपाखराला ‘पिंगा’ ही नावे त्यांच्या सवयींना अनुसरून तर, ‘ग्रासज्वेल’ या फुलपाखराला ‘रत्नमाला’, ‘जेझबेल’ला ‘हळदीकुंकू’ ही नावे त्यांच्या दिसण्यावरून, ‘यामफ्लाय’ या फुलपाखराला ‘यामिनी’, ‘टायगर’ या गुजरातच्या राज्य फुलपाखराला ‘रुईकर’ ही नावे त्यांच्या खाद्य वनस्पतीवरून दिलेली आहेत.

‘ग्रास डेमॉन’ला ‘तृणासूर’, तर ‘रेडस्पॉट’ला ‘आरक्त बिंदू’ ही नावे भाषांतर म्हणून दिलेली आहेत. ‘लीफब्लू’ला ‘अनिता’, तर ‘क्यूपीड’ला ‘पांडव’ ही नावे त्यांच्या शास्त्रीय नावांवरून देण्यात आलेली आहेत. ‘कुंचलपाद (निम्फॅलिएड)’, ‘चपळ (हेस्पेरायडे)’, ‘निल (लायकेनिडे)’, ‘पितश्वेत (पायरिडे)’, ‘पुच्छ (पॅपिलिऑन्डे)’, ‘मुग्धपंखी (रिओडिनिडे)’ अशा सहा कुळांतील फुलपाखरांच्या मराठी नावांची सूची ‘महाराष्ट्रातील फुलपाखरांची मराठमोळी नावे’ या सचित्र माहितीपुस्तिकेत वाचायला मिळतील. अशा प्रकारे फुलपाखरांना मातृभाषेत नावे देणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य (केरळ पहिले) आहे.

पोलीस भरती प्रश्नसंच

▪️ कोणत्या देशाने प्रथम आभासी हवामान संवादाची बैठक आयोजित केली?
उत्तर : जर्मनी

▪️ कोणत्या देशात ‘पीच ब्लॅक’ नावाचा शस्त्रास्त्राचा सराव आयोजित केला जातो?
उत्तर : ऑस्ट्रेलिया

▪️ कोणती संस्था ‘ओपन बजेट सर्वे’ आयोजित करते?
उत्तर : इंटरनॅशनल बजेट पार्टनर्शिप

▪️ कोणत्या व्यक्तीची इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीचे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली?
उत्तर : श्रीकांत माधव वैद्य

▪️ कोणत्या व्यक्तीची संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे पुढचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी पदावर नेमणूक झाली?
उत्तर : टी. एस. तिरुमूर्ती

▪️ ‘सयाजीराव गायकवाड III: महाराजा ऑफ बडोदा’ या शीर्षकाखाली ऐतिहासिक चरित्रकथा कुणी लिहिली?
उत्तर : उमा बालसुब्रमण्यम

▪️ कोणत्या देशापुढे भारताने 150 दशलक्ष डॉलर एवढे मूल्य असलेले करन्सी स्वॅप करण्याचा प्रस्ताव मांडला आहे?
उत्तर : मालदीव

▪️ कोणत्या राज्यात ‘जीवन अमृत योजना’ लागू करण्यात आली आहे?
उत्तर : मध्यप्रदेश

▪️कोणत्या राज्य सरकारने ‘डोअरस्टेप अंगणवाडी’ नावाने एका उपक्रमाचा आरंभ केला?
उत्तर : गुजरात

▪️ HUDCO या संस्थेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
उत्तर : शिव दास मीना

▪️ कोणत्या ठिकाणी 2021 साली पुरुषांची जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत?
उत्तर : बेलग्रेड, सायबेरिया

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘आयुर रक्षा क्लिनिक’ कार्यरत केले?
उत्तर : केरळ

▪️ कोणत्या संरक्षण संस्थेनी ‘समुद्र सेतू’ मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे?
उत्तर : भारतीय नौदल

▪️ निधन झालेले रोनाल्ड व्हिव्हियन स्मिथ कोणत्या क्षेत्राशी जुळलेले होते?
उत्तर : इतिहास कार्य

▪️ प्रथमच कोणता देश आर्क्टिक प्रदेशातल्या वातावरणावर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रह प्रक्षेपित करणार आहे?
उत्तर : रशिया

▪️ कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन साजरा केला जातो?
उत्तर : 4 मे

▪️ कोणत्या मंत्रालयाने “अ रे ऑफ जीनीयस” हा लघुपट प्रदर्शित केला?
उत्तर : सांस्कृतिक मंत्रालय

▪️ कोणत्या मंत्रालयाने “प्रोफ. बी. बी. लाल - इंडिया रिडिसकव्हर्ड” हे शीर्षक असलेले ई-पुस्तक प्रकाशित केले?
उत्तर : सांस्कृतिक मंत्रालय

▪️ कोणत्या संस्थेनी ‘ईकोवसेन्स’ (eCovSens) नावाचे उपकरण विकसित केले?
उत्तर : राष्ट्रीय पशू जैवतंत्रज्ञान संस्था

▪️ कोणत्या संस्थेनी UV ब्लास्टर नावाचे एक निर्जंतुकीकरण टॉवर विकसित केले?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था

▪️ कोणत्या मंत्रालयाने 49 वनोपज उत्पादनांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली?
उत्तर : आदिवासी कल्याण मंत्रालय

▪️ कोणत्या व्यक्तीची येस बँकेच्या मुख्य जोखीम अधिकारी पदावर नेमणूक झाली?
उत्तर : नीरज धवन

▪️ जेमिनी रॉय कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर : चित्रकला

▪️ कोणत्या काश्मिरी उत्पादनाला GI टॅग प्राप्त झाले?
उत्तर : केसर

▪️ 2020 साली वसंत ऋतूतला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
उत्तर : 2 मे

▪️ कोणते राज्य नागरिकांना मोफत आणि रोखविरहित विमा हप्ता प्रदान करणारे पहिले राज्य ठरले?
उत्तर : महाराष्ट्र

▪️ कोणत्या भारतीय संस्थेनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी सिम्युलेशन कोड विकसित केले?
उत्तर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम

▪️ कोण इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इंस्टीट्यूट फॉर सेमी-अरीड ट्रॉपीक्स या संस्थेचे नवे महासंचालक आहेत?
उत्तर : जॅकलिन डी’अरोस हगेस

▪️ NASA संस्थेच्या मंगळ हेलिकॉप्टरचे नाव काय आहे?
उत्तर : इंजेन्यूटी

▪️ कोणती दूरदर्शन मालिका जागतिक स्तरावर सर्वाधिक बघितला जाणारा कार्यक्रम ठरला?
उत्तर : रामायण

अर्थव्यवस्था

    अर्थव्यवस्था ही उत्पादन, वितरण आणि वापरण्याची एक सामाजिक प्रणाली आहे. हे एखाद्या विशिष्ट देशात किंवा प्रदेशातील अर्थशास्त्राचे चालणारे चित्र आहे. हे चित्र एका विशिष्ट कालावधीचे आहे. उदाहरणार्थ, जर आपण 'समकालीन भारतीय अर्थव्यवस्था' म्हटले तर याचा अर्थ होतो. सध्याच्या भारतातील सर्व आर्थिक उपक्रमांचे वर्णन. अर्थशास्त्र अर्थशास्त्रातील संकल्पना आणि तत्त्वे यांचे व्यावहारिक कार्य.

इतिहास

अर्थशास्त्रामधून एखादी वस्तू वस्तूंचा विनिमय करण्यायोग्य पद्धतीने वापर करते जेव्हा जेव्हा एखादा तह खंडित होतो तेव्हा तो शब्द आणि अर्थ या दोन शब्दांमध्ये एकत्र जोडला जातो. अर्थ म्हणजे चलन होय की संपत्ती आणि सुव्यवस्था म्हणजे प्रस्थापित कार्यपद्धती. या शब्दाचा प्रारंभिक उल्लेख कौटिल्य लिखित अर्थशास्त्र पुस्तकात सापडतो . अर्थव्यवस्थेचा प्राचीन इतिहास सुमेर राजवंशच्या काळापासून ज्ञात आहे जेव्हा त्यांनी वस्तू-आधारित विनिमय प्रणाली वापरली होती. मध्ययुगीन काळात बहुतेक व्यापार हा सामाजिक गटांत झाला. आधुनिक युगात बहुतेक व्यापार युरोपमधील देश वेगवेगळ्या देशांचे गुलाम म्हणून करीत असत. अर्थव्यवस्थेच्या ताबडतोब कम्युनिझम आणि कॅपिटलिझम या दोन विचारसरणी उदयास आल्या.

व्याख्या

अर्थशास्त्र एक शास्त्र आहे, जे मानवी वर्तनाचा अभ्यास, त्याच्या गरजा (इच्छा) आणि उपलब्ध स्त्रोतांचा पर्यायी वापर यांच्यातील संबंधांचा अभ्यास करते. अर्थशास्त्राची सामग्री त्याच्या परिभाषाद्वारे दर्शविली जाते. अर्थशास्त्र ही सामाजिक विज्ञानाची शाखा आहे ज्या अंतर्गत वस्तू आणि सेवांचे उत्पादन, वितरण, देवाणघेवाण आणि वापर यांचा अभ्यास केला जातो. अर्थशास्त्र हा शब्द संस्कृत शब्द अर्थ (संपत्ती) आणि शास्त्राच्या करारापासून आला आहे, ज्याचा शाब्दिक अर्थ 'संपत्तीचा अभ्यास' आहे. अर्थशास्त्र म्हणजे अक्षरशः संपत्तीचे शास्त्र, म्हणजेच संपत्तीच्या अभ्यासाच्या शास्त्राला अर्थशास्त्र असे म्हणतात.

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अ‍ॅडम स्मिथ यांनी 1976 मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकात (अ‍ॅन्क्वायरी इन द नेचर अ‍ॅन्ड द वेल्स ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स) अर्थशास्त्राला पैशाचे शास्त्र मानले.

मध्ये प्रकाशित झालेल्या प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकात डॉ. मार्शल यांनी अर्थशास्त्राच्या कल्याणाची व्याख्या देऊन ते लोकप्रिय केले.

प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ लॉर्ड रॉबिन्स यांनी 1932मध्ये प्रकाशित केलेल्या "अ‍ॅन निबंध ऑन द नेचर अँड सिग्नॅपिन्सन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स" या पुस्तकात अर्थशास्त्राला दुर्मिळतेचे तत्व मानले आहे. मानवी मते अमर्यादित असून त्या पूर्ण करण्याचे साधन मर्यादित आहेत असे त्यांचे मत आहे.

आधुनिक अर्थशास्त्रज्ञ सॅमुलसन ( सॅम्युल्सन ) अर्थशास्त्र विज्ञान विकास म्हणतात (विज्ञान ऑफ ग्रोथ).

आधुनिक अर्थशास्त्रज्ञ कपिल आर्य यांनी आपल्या "अर्थमहा" या पुस्तकात अर्थशास्त्राला आनंदाचे साधन मानले .

अर्थशास्त्राचे महत्त्व

अर्थशास्त्राला सैद्धांतिक आणि व्यावहारिक महत्त्व आहे.

सैद्धांतिक महत्त्व

ज्ञानासाठी

ज्ञान वाढवा

तत्त्वे वाढवा

तर्कशास्त्र वाढवा

विश्लेषण शक्ती वाढवा

इतर शास्त्रांशी नातेसंबंधाचे ज्ञान

व्यावहारिक महत्त्व

उत्पादकांना फायदे,

कामगारांना लाभ,

ग्राहकांना फायदा,

व्यापा to्यांना लाभ,

सरकारला फायदा,

समाज सुधारकांना लाभ,

राजकारण्यांना लाभ,

व्यवस्थापकांना फायदे,

विद्यार्थ्यांना फायदा,

देशाच्या उन्नतीसाठी फायदे,

मुख्य संकल्पना

मूल्य

अर्थशास्त्रात मूल्य ही संकल्पना मध्यवर्ती आहे. हे मोजण्याचे एक मार्ग म्हणजे वस्तूची बाजारभाव. अ‍ॅडम स्मिथ यांनी श्रमला मुख्य स्त्रोत म्हणून परिभाषित केले. कार्ल मार्क्ससह अनेक अर्थशास्त्रज्ञांनी "लेबर ऑफ थ्री ऑफ व्हॅल्यू" ला चालना दिली आहे. या सिद्धांतानुसार एखाद्या सेवेचे किंवा वस्तूचे मूल्य त्याच्या उत्पादनात वापरल्या जाणार्‍या मजुरीइतकेच असते. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की त्याचे मूल्य वस्तूंच्या किंमती निश्चित करते. किंमतीचे हे कामगार सिद्धांत "उत्पादन किंमतीच्या सिद्धांताशी" जोडले गेले आहेत.

मराठी व्याकरण - भाषेतील रस

रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.

साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.

मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.

साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.

१) स्थायीभाव - रती

रसनिर्मिती – शृंगार

हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन

उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.

२) स्थायीभाव – उत्साह

रसनिर्मिती - वीर

हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात

उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’

३) स्थायीभाव –शोक

रसनिर्मिती – करुण

हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात

उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!

४) स्थायीभाव – क्रोध

रसनिर्मिती – रौद्र

हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन

उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.

५) स्थायीभाव – हास

रसनिर्मिती – हास्य

हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.

उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.

६) स्थायीभाव – भय

रसनिर्मिती- भयानक

हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.

उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.

७) स्थायीभाव – जुगुप्सा

रसनिर्मिती – बीभत्स

हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.

उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.

८) स्थायीभाव – विस्मय

रसनिर्मिती- अदभुत

हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात

उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

९) स्थायीभाव – शम (शांती)

रसनिर्मिती – शांत

हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.

उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !

०४ जुलै २०२०

पूर्व परीक्षा संदर्भात

पूर्व परीक्षेचा अभ्यास कधी पासून , कसा करावा असे बरेच प्रश्न विचारले जातात, या संदर्भातील माझा अॅप्रोच मी शेअर करत आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा ह्या दोन्ही साठी MCQ solving skill . चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळे  अभ्यास ची method  मेन्स ची जी आहे  ती राहू दिली तरी काही प्रॉब्लेम नाही. परंतु प्रश्न हा उभा राहतो की,  मेन्स चा अभ्यासक्रम विस्तृतपणे उपलब्ध आहे,त्यामुळे कशे आणि किती वाचायचे याची कल्पना येते, परंतु प्रेलिम ला हेच लक्षात येत नाही( सामान्य अध्ययन चा बाबतीत तरी घडते).कारण आयोगाने देखील अभ्यासक्रम एका घटकासाठी एका ओळीत मांडला आहे. त्यामुळे किती खोलात जायचे, किती wide  , . त्या काळात अभ्यास करायचा ,याची आयडिया येत नाही.त्यामुळे gs ल बऱ्याचदा स्कोअर खूप कमी येतो.तर काय करावे आणि काय करू नये

१)  पुस्तके -
२-३ टॉपर ची booklist scan. करा .
त्यानंतर स्वतः ची booklist तयार करा. standard books. असतील तर एकच source  राहू द्यात.
e.g राज्यशास्त्र - कोळंबे किंवा लक्ष्मीकांत एकच वाचला तरी sufficient आहे.

2) योग्य नियोजन -
दोन पेपर आहेत आपल्याला. दोन्हीला संतुलित करता आले पाहिजे. असे होते की , GS . मध्ये विषय एवढे जास्त असल्याने , CSAT  कडे, आपले दुर्लक्ष होते. अपुऱ्या तयारी मुळे ,पेपर पण अवघड जातो, आणि पूर्व ला अपेक्षित marks. येत नाही. त्यामुळे दोन्ही पेपर व्यवस्थित कसे  cover  होतील हे पहिले पाहिजे. त्यादृष्टीने नियोजन केले पाहिजे.

3)  मागील वर्षाच्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण -
बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की विश्लेषण का करावे , आणि करावे तर कसे करावे
A) . का करावे
विश्लेषण मुळे प्रश्नांचा रोख कसा आहे,कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायचे , काठिण्य पातळी किती आहे ह्या सर्व बाबींची समज येते. तसेच अभ्यासाला दिशा मिळते
B)  विश्लेषण कसे करायचे
a) प्रश्न  हा कोणत्या विषयाशी संबंधित आहे हे ओळखता आला पाहिजे
b) त्यांनतर त्या विषयातील कोणत्या घटकाशी related  आहे.
c) त्याविषयावर to प्रश्न ,कसे विचारले आहेत
म्हणजे
factual , conceptual ,  किँवा statement based आहेत हे वर्गीकरण करणे
अश्या काही गोष्टी यात येतात

4) minimum books with maximum revision
पुस्तके जेवढी वाढवाल तेवढी उजळणी करताना समस्या येईल. त्यामुळे कमी पुस्तके निवडून जास्त वेळा चाळलेली better.  साधारण 1 reading नंतर 3-4 वेळा revision होतील अश्या दृष्टीने प्रयत्न करा. जेवढ्या जास्त revision तेवढं जास्त लक्षात राहते, विषयावरील  पकड  आणखी घट्ट होते.

5) सराव MCQ based. परिक्षा आहे,त्यामुळे ह्या प्रश्न कसे टाकलेत ,हा जो जाणतो तो यशस्वी होतो.  हे कौशल्य जास्तीत जास्त प्रश्न डोळ्या खालून गेल्यावर विकसित होते. त्यामुळे जास्तीत जास्त Quality प्रश्न सोडवण्याची सवय ठेवा.
त्यासाठी प्रश्न संच किंवा / आणि टेस्ट सीरिज चे प्रश्न सोडवू शकता.

6) टेस्ट सीरिज लावावी का नाही

ज्यांना time mgmt जमत नाही, अभ्यासात discipline राहत नाही त्यांनी अवश्य लावा. त्यामुळे हे issue tar solve होतातच , शिवाय स्पर्धेत आपण कुठे आहोत हे पण कळते
परंतु लावलीच पाहिजे तरच success   मिळते असे नाही. काही जणांना,टेस्ट चे paper किंवा मिळालेल्या मार्क्स मुळे टेन्शन वाढते,अश्यानी घरी आणून solve केले तरी चालेल.
टेस्ट पेपर चा फायदा करून घायचा असेल तर, मार्क्स किती मिळाले व रंक किती आली यापेक्षा , आपल्या कुठे चुका झाल्या , का झाल्या ह्या भागावर भर द्या.चुकलेले प्रश्न मार्क करून ठेवा, पेपर ची उजळणी करताना त्या कडे विशेष लक्ष द्या.

तयारी आपण केलेली असते ,खूप कष्ट घेतलेले असते,परंतु सर्वात महत्वाचे असते D - day  ची temperament, attitude. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास करणे , exam दिवशी सुधा तो दृष्टिकोन maintain ठेवणे, याचा तुम्हाला  यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा असेल. शेवटी relative performance matters. त्यामुळे एक्झाम मध्ये कठीण प्रश्न आले म्हणून depress hou नका किंवा खूप सोपे वाटले म्हणून excite होऊ नका. 2 तास sincere ठेवा, यश तुमचेच असेल.

बँक व स्थापना

🏦 RBI:-1 एप्रिल 1935

🏦 IFCI:-1948

🏦 SBI:-1 जुलै 1955

🏦 LIC:-सप्टेंबर 1956

🏦 UTI:-1 फेब्रुवारी 1964

🏦 IDBI:-जुलै 1964

🏦 GIC:-नोव्हेंबर 1972

🏦 RRB:-2 ऑक्टोबर 1975

🏦 EXIM:-1 जानेवारी 1982

🏦 NABARD:-12 जुलै 1982

🏦 NHB:-जुलै 1988

🏦 SIDBI:-1990
____________________________________

ब्रिटीश राजवटीचे आर्थिक दुष्परिणाम

◾️1. १७ व्या शतकात मुगल काळात भारत जगात सर्वात जास्त औद्योगिक उत्पादन करणारा देश होता.

◾️2. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज काळात भारतातील लोकांना कच्च्या मालांपासून पक्का माल तयार करण्याची बंदी करण्यात आली.

◾️3. ब्रिटिशांनी आपल्या सत्तेच्या जोरावर, प्रसंगी शास्त्राचा धाक दाखवून स्थानिक लोकांना उद्योग धंदे करू न देता, ब्रिटीश व्यापारास प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्याकाळी जगातील सर्वात श्रीमंत देश असलेला भारत जगातील सर्वात दरिद्री देश इंग्रजांनी बनविला.

◾️4. स्थानिक व्यापारावर ब्रिटिशांनी प्रतिबंधात्मक कायदे केले. बंगालमधील जे कुशल विणकर आपल्या बोटांनी उत्तम प्रकारचे तलम रेशमी कापड तयार करीत त्यांची बोटे तोडून टाकण्यापर्यंत इंग्रजांची मजल गेली. कंपनीने भारतात येणाऱ्या ब्रिटीश मालावर अडीच टक्के आयात कर ठेवला. त्यामुळे भारतातील उद्योगधंदे बसले व ब्रिटीश माल कमालीचा स्वस्त झाला.

◾️5. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीमुळे एक नवा श्रीमंत भांडवलदार वर्ग निर्माण झाला. हा वर्ग १८१३ साली कंपनीची व्यापारी मक्तेदारी मोडून टाकण्यात यशस्वी झाला. भारत सरकारला मुक्त व्यापार धोरण स्वीकारावे लागले. त्यामुळे ब्रिटीश माल भारतात मुक्तपणे येऊ लागला. १८१३ साली ब्रिटीश सुती कापडाची आयात १ लाख १० हजार पौंडाची होती, ती १८५६ साली ६ कोटी ३० लाखांची झाली.

◾️6. ब्रिटिशांनी भारताची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक केली. या संपत्तीच्या लुटीचे विश्लेषण करण्यासाठी दादाभाई नौरोजींनी इस्ट इंडिया असोसिएशनच्या लंडन येथील बैठकीत २ मे १८६७ रोजी आपला Englands Debt to India हा निबंध सादर केला. त्या वेळी Drain of Wealth हा शब्दप्रयोग उपयोगात आणला.

◾️7. न्या. रानडे यांनीही असाच संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत मांडला. दादाभाई नौरोजी यांनी Poverty And Un-British Rule in India (1867), The Wants and means of India (1870), The Commerce of India (1871) या लेखांत ब्रिटीशांच्या संपत्तीच्या अपहरणाच्या सिद्धांताचे तपशीलवार विवेचन केले आहे. संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने १८९६ साली कलकत्ता अधिवेशनात अधिकृतपाने स्वीकारला.

◾️8. ब्रिटिशांनी भारतीय औद्योगीकरणास बंदी घातली. परंतु भारताला फार काळ किंवा कायमपणे औद्योगिकरणापासून दूर ठेवणे इंग्रजांनाही शक्य नव्हते. त्यानुसार भारतात प्रथम नीळ, चहा, व कॉफी यांची औद्योगिक पातळीवर लागवड सुरु झाली.

◾️9. भारतात रेल्वेमार्गाची बांधणी झाल्यानंतर १९ व्या शतकाच्या मध्यास आधुनिक यंत्रसामग्री रेल्वे वाहतुकीद्वारे देशाच्या अंतर्भागात प्रस्थापित करणे शक्य झाले. त्यामुळे सुती कापडगिरण्या, ज्यूट, कोळसा इत्यादी उद्योग सुरु झाले. १९ व्या शतकाच्या अखेरीस भारताचे थोडे औद्योगीकरण आणि आधुनिकीकरण झाले.

◾️10. ब्रिटीश जमीन महसूल व्यवस्थेमुळे गावातील समाजातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक एकोपा नष्ट झाला. जमीनदार वर्ग सर्व गावचा मालक झाला. गावातील बलुतेदार, कारागीर व मजूर यांचे परंपरेने चालत आलेले आर्थिक व सामाजिक अधिकार नष्ट झाले.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...