०६ जून २०२०

Practice Question Set.


1. डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही?
1. भ्रम आणि निराश
2. अंधश्रद्धा विनाशाय
3. मती भानामती
4. पुरोगामी विचार
🅾उत्तर : पुरोगामी विचार

2. जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर 'Tianhe-2' हा ------ या देशाने बनविला आहे.
1. अमेरिका
2. चीन
3. जपान
4. जर्मनी
🅾उत्तर : चीन

3. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही?
1. मराठी
2. सिंधी
3. मारवाडी
4. संथाली
🅾उत्तर : मारवाडी

4. एका पेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत?
1. श्री. शंकरराव चव्हाण
2. श्री. यशवंतराव चव्हाण
3. श्री. वसंतराव पाटील
4. श्री. शरदचंद्र पवार
🅾उत्तर : श्री. यशवंतराव चव्हाण

5. ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?
1. ठाणे
2. अंदमान
3. मंडाले
4. एडन
🅾उत्तर : एडन

6. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
1. नीळ
2. भात फक्त
3. गहू फक्त
4. भात व गहू
🅾उत्तर : भात व गहू

7. ------ वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.
1. पृथ्वीच्या ध्रुवावर
2. पृथ्वीच्या विषुववृत्तावर
3. पृथ्वीच्या अंतर्भागामध्ये
4. पृथ्वीच्या पृष्ठभागावर
🅾उत्तर : पृथ्वीच्या ध्रुवावर

8. स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे?
1. लोखंड व कार्बन
2. लोखंड, क्रोमीअम व निकेल
3. लोखंड, क्रोमीअम व कोबाल्ट
4. लोखंड, टिन व कार्बन
🅾उत्तर : लोखंड, क्रोमीअम व निकेल

9. 'डेटॉल' मधील हा मुख्यघटक असतो -
1. बायथायनॉल
2. टिंक्चर आयोडीन
3. बोरिक अॅसिड
4. क्लोरोझायलेनॉल
🅾उत्तर : क्लोरोझायलेनॉल

10. ------ ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते.
1. लालोत्पादक ग्रंथी
2. यकृत
3. स्वादुपिंड
4. जठरग्रंथी
🅾उत्तर : यकृत

11. मानवी शरीरात जवळजवळ ------ किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात.
1. 10,000
2. 98,000
3. 97,000
4. 98,500
🅾उत्तर : 97,000

12. विंचू हा ------ प्राणी आहे.
1. अंडी देणारा
2. पिलांना जन्म देणारा
3. वरीलपैकी दोन्ही
4. यापैकी कोणतेही नाही
🅾उत्तर : पिलांना जन्म देणारा

13. खालीलपैकी खगोलशास्त्रीय वस्तूंचा त्यांच्या आकारमानाप्रमाणे योग्य चढताक्रम कोणता?
1. सूर्य, सूर्यमाला, पृथ्वी, विश्व, आकाशगंगा
2. विश्व, आकाशगंगा, सूर्यमाला, पृथ्वी, सूर्य
3. सूर्यमाला, पृथ्वी, सूर्य, विश्व, आकाशगंगा
4. वरील एकही नाही
🅾उत्तर : वरील एकही नाही

14. घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण
1. जास्त विद्युतभार मिळवण्यासाठी
2. जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी
3. ही जोडणी सोपी आहे
4. वरीलपैकी कोणतेही नाही
🅾उत्तर : जास्त विद्युतधारा मिळवण्यासाठी

15. मालाने 5 खुर्च्या व 2 टेबल 1625 ला खरेदी केले. रेशमाने 2 खुर्च्या व 1 टेबल 750 ला खरेदी केले. तर एका खुर्चीची व एका टेबलाची किंमत अनुक्रमे ------ आहे.
1. 100, 525
2. 125, 450
3. 100, 500
4. 125, 500
🅾उत्तर : 125, 500

16. 7,11,15,19, ------ ही अंकगणिती श्रेणी आहे. तिच्या 60 पर्यंतच्या पदांची बेरीज ----- आहे.
1. 750
2. 7500
3. 7700
4. 770
🅾उत्तर : 7500

17. एका आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. जर त्याची परिमिती 34 सेंमी असेल, तर त्या भ्रमणध्वनी संचाची लांबी ----- आहे.
1. 13 सेंमी
2. 7 सेंमी
3. 10 सेंमी
4. 8 सेंमी
🅾उत्तर : 10 सेंमी

18. खालील क्रमिकेचे n वे पद 68 आहे, तर n ची किंमत किती?
5,8,11,14, -----.
1. 21
2. 23
3. 24
4. 22
🅾उत्तर : 21

19. तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 126 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील प्रमाणात येतील?
1. 4
2. 3
3. 5
4. 8
🅾उत्तर : 4

20. 1,3,4 या अंकांपासून तयार होणार्या सर्व तीन-अंकी संख्यांची बेरीज किती?
1. 1776
2. 1876
3. 1666
4. 1676
🅾उत्तर : 1776

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
🅾बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
🅾तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
🅾मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
🅾औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
🅾रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
🅾जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
🅾लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
🅾१२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
🅾दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
🅾मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
🅾निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
🅾नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
🅾Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
🅾औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
🅾पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
🅾आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
🅾मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
🅾मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
🅾राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
🅾दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
🅾प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
🅾शुक्र

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

०५ जून २०२०

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?
अ) कलम ३५२
ब) कलम ३५६
क) कलम ३६०
ड) कलम ३६२

🅾 उत्तर............ क) कलम ३६०

२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?
अ) युद्ध
ब) परकीय आक्रमण
क) अंतर्गत अशांतता
ड) वरीलसर्व

🅾उत्तर......... क) अंतर्गत अशांतता

३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?
अ) दोन महिने
ब) तीन महिने
क) चार महिने
ड) सहा महिने

🅾 उत्तर....... क) चार महिने 

४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?
अ) चंडीगड
ब) लक्षद्वीप
क) दिल्ली
ड) महाराष्ट्र

🅾उत्तर..... क) दिल्ली 

५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?
अ) उच्च न्यायालय
ब) सर्वोच्य न्यायालय
क) दोन्ही
ड) यापैकी नाही

🅾उत्तर........ अ) उच्च न्यायालय

६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?
अ) कलम १३
ब) कलम ३२
क) कलम २२६
ड) यापैकी नाही

🅾 उत्तर....... क) कलम २२६ 

७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?
अ) राजमन्नार आयोग
ब) सच्चर आयोग
क) सरकारिया आयोग
ड) व्ही. के. सिंग

🅾उत्तर....... क) सरकारिया आयोग

८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?
अ) कलम २८०
ब) कलम २८२
क) कलम २७५
ड) कलम २८४

🅾उत्तर....... अ) कलम २८०

९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?
अ) कलम २६१
ब) कलम २६२
क) कलम २६३
ड) कलम २६४

🅾 उत्तर....... ब) कलम २६२

१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?
अ) कलम ३२४
ब) कलम ३२५
क) कलम ३२६
ड) कलम ३२७

🅾उत्तर........ अ) कलम ३२४

११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?
अ) संथानाम समिती
ब) वांछू व गोस्वामी समिती
क) तारकुंडे समिती
ड) गोपालकृष्णन समिती

🅾उत्तर....... अ) संथानाम समिती

१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
अ) पाच वर्षे
ब) सहा वर्षे
क) तीन वर्षे
ड) दोन वर्षे

🅾 उत्तर........ अ) पाच वर्षे 

१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?
अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश
क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश
ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश

🅾 उत्तर...... पर्याय (ड)

१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?
अ) केंद्र सरकार
ब) राज्य सरकार
क) जिल्हाधिकारी
ड) निवडणूक आयोग

🅾उत्तर....... ड) निवडणूक आयोग

१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?
अ) केंद्र
ब) राज्य
क) दोन्ही
ड) यापैकी नाही

🅾उत्तर.......... ब) राज्य 

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

केंद्रीय पीक संशोधन केंद्र.


👇👇👇👇👇👇👇👇👇

१)केंद्रीय ऊस संशोधन केंद्र.
      🅾लखनौ (उत्तरप्रदेश)

२)केंद्रीय गहू संशोधन केंद्र.
       🅾कर्नाल (हरियाणा)

३)केंद्रीय आवळा संशोधन केंद्र
       🅾फैजाबाद (उत्तरप्रदेश)

४)केंद्रीय नारळ संशोधन केंद
       🅾कासरगोड (केरळ)

५)केंद्रीय केळी संशोधन केंद्
      🅾कळांडूथोराई (तामिळनाडू)

६)केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र
      🅾सांगोला, सोलापूर

७)केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र
      🅾मांजरी (पुणे)

८)केंद्रीय दूध संशोधन केंद्र
      🅾कर्नाल (हरियाणा)

९)केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र
      🅾सिमला

१०)केंद्रीय संत्री संशोधन केंद्र
      🅾नागपूर

११)केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र
      🅾अंबिकानगर (गुजरात)

१२)केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र
      🅾झाशी (मध्‍यप्रदेश)

१३)केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र
      🅾पुणे

१४)केंद्रीय काजू संशोधन केंद्र
      🅾पहूर

१५)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
      🅾बराकपूर (पश्चिम बंगाल)

१६)केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र
      🅾राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)

१७)केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र
      🅾नागपूर

१८)केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र
      🅾इंदोर (मध्‍यप्रदेश)

१९)केंद्रीय कापूस संशोधन केंद्र
      🅾नागपूर

२०)केंद्रीय ज्‍वारी संशोधन केंद्र
      🅾राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)

२१)केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र
      🅾सोलन

२२)केंद्रीय उंट संशोधन केंद्र
      🅾जोरबीट (राजस्‍थान)

२३)केंद्रीय ताग संशोधन केंद्र
      🅾बराकपूर (पश्चिम बंगाल)

२४)केंद्रीय लाख संशोधन केंद्र
      🅾रांची (झारखंड)

२५)केंद्रीय फळ संशोधन केंद्र
      🅾गणेशखिंड (पुणे)

२६)मसाला पीक संशोधन केंद्र
     🅾केरल

२७)इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमीअॅरिड ट्रॉपिक्‍स
     🅾हैदराबाद (आंध्रप्रदेश)

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

शिखांची पाच तख्ते आहेत.

१) अकाल तख्त (अमृतसर)

२) तख्त श्री हरिमंदिरसाहेब (पटणा साहेब)

३) तख्त श्री केशगढसाहेब (आनंदपूर)

४) तख्त श्री दमदमासाहेब (तळवंडी साबो)

५) तख्त सचखंड श्री हुजूरसाहेब (नांदेड).

🧩यांपैकी अकाल तख्त हे सर्वांत श्रेष्ठ मानले जाते.

🅾खालसा पंथासाठी कुठलाही हुकूमनामा जारी करण्यापूर्वी पाच तख्तांचे जथेदार एकत्र बसून विचार-विनिमय करतात.

🅾 कुठल्याही एका जथेदाराला हुकूमनामा जारी करण्याचा अधिकार नाही.

🅾गुरुद्वाराचे प्रशासकीय कामकाज शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीद्वारा करण्यात येते.

🅾पाच तख्तांचे जथेदार या समितीचे पदसिद्ध सदस्य असतात. तसेच दिल्लीच्या गुरुद्वाराचे प्रशासकीय काम दिल्ली गुरुद्वारा प्रबंधक समिती बघते.

🅾शिरोमणी अकाली दल राजकीय बाबींत निर्णय घेते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

०४ जून २०२०

भारतातील सर्वात लांब.


🧩भारतातील सर्वात लांब नदी -
🅾 गंगा नदी (2,510 किमी.)

🧩भारतातील सर्वात लांब धरण -
🅾हिराकुंड धरण (महानदीवर, ओरिसा)

🧩भारतातील सर्वात लांब बोगदा -
🅾जवाहर बोगदा

🧩भारतातील सर्वात लांब लेणी -
🅾 अजिंठा

🧩भारतातील सर्वात लांब रेल्वेमार्ग-
🅾जम्मूतावी ते कन्याकुमारी

🧩भारतातील सर्वात लांब रेल्वेपुल -
🅾सोन नदीवरील पूल

🧩भारतातील सर्वात लांब रस्ता -
🅾पूलगांधी सेत

🧩भारतातील सर्वात लांब विधुत रेल्वे मार्ग-
🅾दिल्ली ते कलकत्ता

🧩भारतातील सर्वात लांब पूल -
🅾 हावडा ब्री

🧩भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पुल 
🅾 सी-लिंक, मुंबई (वरळी-बांद्रा)

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती.


🅾 पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो.

🅾 गटविकास अधिकार्‍याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.

🅾 गटविकास अधिकारी हा वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो.

🅾 गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो.

🅾गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो.

🅾 गटविकास अधिकार्‍यावर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचे असते.

🅾 गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.

🅾पंचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो.

🅾 पंचायत समितीस मिळणार्‍या अनुदानातील रकमा काढण्याचे व त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.

🅾 पंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्‍यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.

🅾पंचायत समितीचा खर्च गटविकास अधिकार्‍याच्या संमतीने करावा लागतो.

🅾पंचायत समितीचा अहवाल गटविकास अधिकारी सी.ई.ओ.कडे पाठवीत असतो.

🅾 पंचायत समितीच्या कार्याची यशस्वीता गटविकास अधिकार्‍यावर अवलंबून असते.

🅾 गटविकास अधिकार्‍याला शिक्षा करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तास असतो.

🅾पंचायत समिती व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.

🅾 राज्यशासन व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Question bank

१) खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?
अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी
ब)  श्री. दिनशॉ वाच्छा
क) श्री. विल्यम वेडेरबर्न
ड) वरील सर्व.🅾

२) खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?
अ) कांग्रेस सेवा दल
ब)  युक्रांद🅾
क) एन एस यू आय
ड) आय एन टी यू सी

३) कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?
अ) पक्षाध्यक्ष
ब) पक्ष उपाध्यक्ष
क) कांग्रेस कार्यकारी समिती 🅾
ड) यापैकी नाही

४) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.
२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.
३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.

अ) फक्त १ व ३
ब) फक्त १ व २
क) फक्त २ व ३
ड) वरील सर्व 🅾

५) कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ? 
१) विचारसरणीत  भिन्नता 
२) आंदोलन मार्गातील भिन्नता 
३) मागण्यात  भिन्नता 
४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद 

अ) १, ३ व ४
ब) २, ३ व ४
क) १, २ व ३🅾
ड) १, २ व ४

६)  खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?
   
अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.
ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे 
क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे 
ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे🅾

७) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?

अ) सी. राजगोपालाचारी  
ब) आचार्य कृपलानी 
क) महात्मा गांधी 🅾
ड) जयप्रकाश नारायण 

८) खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?
अ) मनरेगा
ब) किसान विकास पत्र
क) सुकन्या समृद्धी🅾
ड) अन्न सुरक्षा

९) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?
अ) ४४ 🅾
ब) ४८
क) ५२
ड) ६१

१०) खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?
अ) पी. चिदंबरम
ब) पी.व्ही. नरसिंहाराव
क) इंदिरा गांधी
ड) पृथ्वीराज चव्हाण 🅾

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

Question bank

1. पहिल्या पंचवार्षिक योजनेत ------ ला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले.
1. व्यापार
2. शेती
3. औद्योगिकरण
4. गुंतवणूक
🅾उत्तर : शेती

2. धवलक्रांति ----- शी संबंधित आहे.
1. शेती व्यवसाय
2. मत्स्य व्यवसाय
3. दुग्ध व्यवसाय
4. कुकुटपालन व्यवसाय
🅾उत्तर : दुग्ध व्यवसाय

3. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो?
1. महाबळेश्वर
2. पंचगणी
3. लोणावळा
4. आंबोली
🅾उत्तर : आंबोली

4. ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?
1. तहसीलदार
2. उपजिल्हाधिकारी
3. जिल्हाधिकारी
4. महसूल आयुक्त
🅾उत्तर : महसूल आयुक्त

5. सप्टेंबर 2011 मध्ये रशियात झालेल्या बुद्धिबळ वर्ल्डकप स्पर्धेच विजेता कोण?
1. पीटर सविड्लर
2. अलेक्झांडर ग्रीशुक
3. व्हॅसिली इव्हानचूक
4. विश्वनाथ आनंद
🅾उत्तर : पीटर सविड्लर

6. मुअम्मर गद्दाफी हा कोणत्या देशाचा हुकूमशहा होता?
1. सौदी अरेबिया
2. अफगाणिस्तान
3. लिबिया
4. इराक
🅾उत्तर : लिबिया

7. केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने ठरविल्यानुसार ------ वर्गापर्यंतच्या मुलांना 'मोफत व सक्तीचे शिक्षण' देण्यात येणार आहे.
1. दहावी
2. आठवी
3. बारावी
4. स्नातकीय
🅾उत्तर : दहावी

8. 2011 मधील अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला?
1. गगन नारंग
2. रामपाल
3. राजेंद्र सिंह
4. जहीरखान
🅾उत्तर : जहीरखान

9. खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?
1. ब्रिटन
2. रशिया
3. भारत
4. दक्षिण आफ्रिका
🅾उत्तर : ब्रिटन

10. मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून ------ हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.
1. हल्दिया
2. न्हावा-शेवा
3. कांडला
4. मार्मागोवा
🅾उत्तर : न्हावा-शेवा

11. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ----- येथे आहे.
1. जिनिव्हा
2. पॅरिस
3. न्यूयॉर्क
4. रोम
🅾उत्तर : जिनिव्हा

12. ------ येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.
1. महाड
2. औरंगाबाद
3. नाशिक
4. मुंबई
🅾उत्तर : नाशिक

13. भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) ----- तासांनी पुढे आहे.
1. अडीच
2. तीन
3. साडे चार
4. साडे पाच
🅾उत्तर : साडे पाच

14. ------ यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणतात.
1. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
2. लोकहितवादी
3. महात्मा फुले
4. न्या. महादेव गोविंद रानडे
🅾उत्तर : महात्मा फुले

15. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?
1. द्राक्ष
2. मका
3. उस
4. डिझेल
🅾उत्तर : उस

16. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?
1. नीळ
2. भात फक्त
3. गहू फक्त
4. भात व गहू
🅾उत्तर : भात व गहू

17. 'श्रीपती शेषाद्री प्रकरण' ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.
1. जगन्नाथ शंकर सेठ
2. बाळशास्त्री जांभेकर
3. भाऊ दाजी लाड
4. छत्रपती शाहू महाराज
🅾उत्तर : बाळशास्त्री जांभेकर

18. पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?
1. अमेरिका आणि मेक्सिको
2. अमेरिका आणि कॅनडा
3. ब्राझिल आणि अर्जेटीना
4. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
🅾उत्तर : अमेरिका आणि कॅनडा

19. खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?
1. ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे
2. अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात
3. या विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.
4. वरील कोणतीही नाही
🅾उत्तर : वरील कोणतीही नाही

20. -----% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.
1. 79
2. 59
3. 49
4. 39
🅾उत्तर : 49

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

०३ जून २०२०

मुंबईत सहसा चक्रीवादळ का येत नाही माहिती आहे?


तामिळनाडू केरळ आणि समुद्र किनाऱ्यावरील राज्यांना चक्रीवादळाचा तडाखा नेहमी बसतो. मग प्रश्न पडतो महाराष्ट्रालाही किनारपट्टी लाभली आहे. मग अशी वादळं मुंबईत किंवा कोकणात का येत नाहीत?
पर्यावरणतज्ज्ञ अभिजीत घोरपडे सांगतात की समुद्रावर सतत वादळं येत राहतात. तापमान, दाब, वाऱ्याच्या वेगावरून चक्रीवादळ तयार होणार की नाही, हे ठरतं. पण प्रत्येक वादळ चक्रीवादळात रूपांतर होणारच, असं नसतं.

घोरपडे सांगतात, "आपल्याकडे चक्रीवादळ तयार होण्यासाठी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण व्हावा लागतो. समुद्रातल्या तापमानवाढीमुळं समुद्राकडून जमिनीकडे वाहणाऱ्या वाऱ्याची गती अधिक असते."

समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्यासाठी तापमानातील वाढ हा घटक सर्वाधिक कारणीभूत असतो. सागरात जेव्हा तापमानात वाढ होते तेव्हा तिथं कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेले असतो. त्याचदरम्यान वाऱ्याचा वेगही वाढतो.

कमी दाबाचा पट्टा, उच्च तापमान आणि जोरानं वाहणारं वारं, असं त्रिकूट मिळून मग चक्रीवादळाला जन्म देतं.

पण सगळीच वादळं बंगालच्या उपसागरात तयार होत नाहीत. बहुतेक चक्रीवादळं पॅसिफिक महासागरात तयार होतात आणि विषुववृत्तीय वाऱ्यांबरोबर वाहत भारत आणि श्रीलंकेच्या पूर्व किनारपट्टीवर धडक देतात.
भारताला पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी लाभली असली तरी चक्रीवादळं फक्त ओडीशा, आंध्रप्रदेश, तामिळनाडूतच येतात.

फक्त पूर्व किनाऱ्यावरील राज्यांनाच हे वादळं का धडकतात? गोवा, कर्नाटक किंवा महाराष्ट्राला का कधी अशी धोक्याची सूचना देण्यात येत नाही?

*पश्चिम किनारपट्टीवर का नाही?*
चक्रीवादळं तयार होण्यासाठी काही ठराविक परिस्थितीची आणि भौगोलिक रचनेची गरज असते.
मुंबई किंवा महाराष्ट्राला पश्चिम किनारपट्टी लाभली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊ शकतो. पण विषुववृत्तीय वारं पूर्वेकडून पश्चिमेकडं, म्हणजेच मुंबईकडून समुद्राकडं वाहतं. त्यामुळं आलेलं चक्रीवादळ पुढं सरकून गुजरातच्या किनारपट्टीवर आदळतं.
"याचं कारण उत्तर गोलार्धातील वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असतात. त्यामुळं अरबी समुद्रात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाली तरी अशी वादळ मुंबईपासून दूर जातात,".
म्हणून कधीतरी गुजरातच्या किनारपट्टीवर अशी चक्रीवादळं धडकतात.

म्हणजेच बंगालच्या उपसागरात आलेली वादळं भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आदळतात तर अरबी समुद्रातील चक्रीवादळं गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर आदळतात.
वादळाच्या तीव्रतेनुसार त्यांची विभागणी केली जाते. जगातील बहुतेक चक्रीवादळं पूर्व किनारपट्ट्यांवर येत राहतात.
आणि जगाच्या ज्या भागात ते निर्माण होतात, त्यावरून त्यांची नावं आणि प्रकार ठरतात.

उत्तर अटलांटिक आणि इशान्य पॅसिफिक महासागरात आलेल्या चक्रीवादळाला 'हरिकेन' म्हणतात तर उत्तर पश्चिम किंवा वायव्य पॅसिफीक महासागरात येणाऱ्या चक्रीवादळाला 'टायफून' म्हणतात. आणखी एक प्रकार म्हणजे 'सायक्लोन' जे दक्षिण पॅसिफिक आणि भारतीय महासागरात येतात.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...