३१ मे २०२०

राजा राममोहन रॉय

★ जन्म
२२ मे १७७२
राधानगर, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत

★ मृत्यू २७ सप्टेंबर १८३३ (६३ वर्ष)
इंग्लंड, ब्रिस्टॉल

★मृत्यूचे कारण :-मेंदूज्वर

★ पर्शियन लिपीत व अरेबिक भाषेत त्यांनी 'वेदान्त' ग्रंथ नावाचे पहिले पुस्तक लिहिले.

★ १८१५ मध्ये कलकत्ता येथे परतल्यावर त्यांनी 'वेदान्त' ग्रंथाचे बंगाली भाषेत भाषांतर केले.

★ मुगल सम्राटचे राजदूत म्हणून ते इंग्लंडला गेले होते.

★ मुगल सम्राट दुसरा अकबर याने राममोहन राॅय यांना राजा ही उपाधी बहाल केली.  

★ त्यांनी सर्वप्रथम "ब्रह्मपत्रिका"नावाचे वृत्तपत्र सुरू केले

★ समाजाला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी २० ऑगस्ट १८२८ साली ब्राम्हो समाजाची स्थापना केली. 

★ त्यांनी ४ डिसेंबर १८२१ रोजी संवाद कौमुदी हे बंगाली भाषेतील तर

★ १२ एप्रिल १८२२ रोजी "मिरात_उल_ अखबार" हे पर्शियन वृतपत्र सुरू केले.

★ त्यांनी १८२८ साली प्रेसिडेन्सी कॉलेज सुरू केले.

★ लॉर्ड विल्यम बेंटिक या भारताच्या गव्हर्नर जनरलच्या साहाय्याने ४ डिसेंबर १८२९ मध्ये भारतातील सतीची प्रथा कायद्याने बंद करवली.

★ याकामी जगन्नाथ शंकर शेठ यांची साथ मिळाली

★ भारतीय पत्रकारितेचे अर्ध्वयु' म्हणूनही इतिहासात त्यांची नोंद आहे. 

★ १९३३ साली मेदुचा ताप या आजारपणामुळे राजा राममोहन रॉय यांचे निधन झाले.

महत्त्वाचे सामान्य ज्ञान


---------------------------------–----------------------
▪ ARCI या संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या ‘फ्युल सेल्स’ तंत्रज्ञानाचे नाव काय आहे?
उत्तर : पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन फ्युल सेल्स

▪ शास्त्रज्ञांनी कोणत्या बाह्य ग्रहाला ‘सुपर-अर्थ’ म्हणून संबोधले?
उत्तर : K2-18b

▪ कोणत्या दिवशी जागतिक वन्यजीवन दिन पाळला गेला?
उत्तर : 3 मार्च

▪ ‘मुख्यमंत्री दाल भात योजना’ कोणत्या राज्याची अनुदानित भोजन योजना आहे?
उत्तर : झारखंड

▪ कोणत्या व्यक्तीची भारताचे नवे वित्त सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली?
उत्तर : अजय भूषण पांडे

▪ राष्ट्रीय ललित कला अकादमीचा 61 वा वार्षिक पुरस्कार किती कलाकारांना देण्यात आला?
उत्तर : 15

▪ पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने कोणत्या तलावाला ‘सजीव घटक’ म्हणून घोषित केले?
उत्तर : सुखना तलाव

▪ 1 मार्च 2020 रोजी निधन पावलेले रिचर्ड जॉन पईस कोणत्या क्षेत्राशी जुळलेले होते?
उत्तर : साहित्य

▪ कोणत्या दिवशी भारतात ‘राष्ट्रीय प्रथिने दिन’ पाळण्यात आला?
उत्तर : 27 फेब्रुवारी

▪ ताज्या FIH जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष हॉकी संघाचा क्रमांक काय आहे?
उत्तर : 4 था
 

प्रशासकीय प्रमुख:-


...............................................................
• भारताचे केंद्रीय कॅबीनेट सचिव:- राजीव गौबा (३० ऑगस्ट २०१९)

• भारताचे गृह सचिव:- अजय कुमार भल्ला ( २२ ऑगस्ट २०१९)

• भारताचे वित्त सचिव:- अजय भूषण पांडे (३ मार्च २०२० पासून)

• भारताचे संरक्षण सचिव:- अजय कुमार (२३ ऑगस्ट २०१९)

• भारताचे परराष्ट्र सचिव:- हर्षवर्धन शृंगला (२९ जानेवारी २०२० पासून)

• राष्ट्रातींचे सचिव:- कपिल देव त्रिपाठी

• पंतप्रधानांचे मुख्य सचिव:- डॉ. प्रमोद कुमार मिश्रा (११ सप्टेंबर २०१९ पासून)

• भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे सचिव:- राम सेवक शर्मा

• केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण अध्यक्ष:- एल. नरसिम्हा रेड्डी

नक्की वाचा :- स्पर्धा परीक्षेची तयारी करताना...

हल्ली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे एक आव्हान बनले आहे. लॉकडाऊनच्या काळात मानसिकदृष्ट्या सक्षम असण्याबरोबरच सुयोग्य नियोजन तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मदत करतील. त्यासाठी खालील पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता.    

1. वेळापत्रक बनवा : अभ्यासाचा Syllabus, जेवण्याचे आणि झोपण्याचे नित्यक्रमानुसारच वेळापत्रक बनवावे. त्या पद्धतीने गोष्टी करण्याचा प्रयत्न करा.

2 नोट्स तयार करा : तयारी करताना जो विषय जास्त अवघड वाटतो त्या विषयाचे पुस्तक आधी घ्यावे आणि त्याचे नोट्स तयार करून घ्या. म्हणजे ऐन परीक्षेच्या वेळीस गोंधळ होणार नाही.

3. शिस्त पाळा : आपण जे ठरवलंय ते त्याचा पद्धतीने होत आहे कि नाही? हे वेळोवेळी तपासून पाहण्याची सवय लावा. याने नक्कीच फायदा होईल.

4. प्रलोभनांना बळी नको : सोशल मीडिया (फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर) तसेच वेळ घेणार्‍या प्रलोभन पासून दूर रहा. याने तुमचा वेळ वाचेल.

5. मॉर्क टेस्ट सोडवून बघा : मागील वर्षाचे टेस्ट पेपर्स सोडवून बघा. मॉर्क टेस्ट दिल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची क्षमता वाढते. ऑफलाईन टेस्ट सिरीजचा पर्याय निवडा. यामुळे सेंटरमध्ये असल्यासारखे वाटेल व परीक्षेची भीती नाहीशी होईल.

३० मे २०२०

२१ जून


🅾उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस.

🅾पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस १३ तास १३ मिनिटांचा असतो. त्यामुळे २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. २१ जूनपासून उत्तरायन संपून दक्षिणायन सुरु होते.

🅾या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते. पृथ्वी अक्षवृत्त साडे तेवीस डिग्रीच्या झुकावाने ११ हजार किमी प्रती तासाच्या गतीने पश्चिमेकडून पूर्व दिशेला फिरते. यासोबतच पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी तासाच्या वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातील २१ जून जसा मोठा दिवस असतो तसाच वर्षातला लहान दिवस २२ डिसेंबर असतो.

🅾दिवस व रात्रीचा कालावधी कमी-जास्त होणे आपण नेहमीच अनुभवित असतो. पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कलला असल्याने हे घडत असते. याचाच परिणाम म्हणूनही सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायनसुद्धा आपल्याला अनुभवता येते. कोणत्याही वस्तूच्या पडणार्‍या सावलीचे निरीक्षण केल्यास सूर्याचे दक्षिणायन व उत्तरायण आपल्यासुद्धा लक्षात येऊ शकते. पृथ्वीवरील ऋतुसुद्धा पृथ्वीच्या अक्षाच्या कलत्या स्थितीमुळेच निर्माण होतात.

🅾आकाशात वैषुविक आणि आयनिक वृत्तांचे दोन काल्पनिक छेदनबिंदू आहेत. त्यापैकी एका बिंदूत २१ मार्च रोजी सूर्य प्रवेश करतो (याला वसंत संपात बिंदू म्हणतात) तर त्याच्याविरुद्ध बिंदूत २२ सप्टेंबर रोजी सूर्य प्रवेश करतो (याला शरद संपात बिंदू म्हणतात.) या दोन्ही दिवशी रात्रीचा आणि दिवसाचा कालावधी हा सारखाच असतो. इतर दिवशी मात्र दिनमान आणि रात्रमान हे कधीच सारखे नसते.

🅾२१ मार्चनंतर सूर्याचा प्रवास उत्तरेकडे सुरू होतो. याला उत्तरायण असे म्हणतात. यावेळी जसाजसा सूर्य उत्तरेकडे सरकतो. तसतसा दिवसाचा कालावधी वाढत जातो व रात्र कमी होऊ लागते. सूर्याचा हा उत्तरेकडचा प्रवास २१ जूनपर्यंत चालतो. या दिवशी सूर्य विषुववृत्ताच्या जास्तीत जास्त उत्तरेकडे असतो. अर्थात म्हणूनच या दिवशी दिवसाचा कालावधी अधिकाअधिक असतो व रात्र सर्वाधिक कमी कालावधीची असते. सूर्याच्या या अती उत्तरेकडील बिंदूला विष्टंभ म्हणजेच समर सोल्स्टाईस असे म्हणतात. या बिंदूपाशी सूर्य थोडासा थबकल्यासारखा भासतो व नंतर त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि येथून दिनमान कमी कमी होऊ लागते व रात्रमान वाढत जाते.

🅾२२ सप्टेंबर रोजी सूर्य शरद संपात बिंदूपाशी पोहोचतो. त्या दिवशी दिनमान व रात्रमान सारखेच असते. २२ सप्टेंबरनंतर सूर्य विषुववृत्त ओलांडून दक्षिणेकडे सरकू लागतो आणि दक्षिणायनास प्रारंभ होतो. आता मात्र दिनमान कमी होऊन रात्रमान वाढत जाते. २२ डिसेंबर रोजी सूर्य जास्तीत जास्त दक्षिणेकडे असतो. या बिंदूला विंटर सोल्स्टाईस असे म्हणतात. या बिंदूत सूर्य असतानाच दिवस हा वर्षातील सर्वात लहान दिवस व रात्र ही सर्वात मोठी असते.

🦋 🦋 🦋 🦋🦋 🦋🦋 🦋🦋 🦋

सर्व सामान्य विज्ञान

💠💠सामान्य विज्ञान (इयत्ता 5 वी).💠💠

🅾शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना आंतरिंद्रिये म्हणतात.

 🅾मेंदू, फुफ्फुसे, हृदय, इ. आंतरिंद्रियांची उदाहरणे आहेत.

🅾 अन्नाचे पचन अन्न नलिकेमध्ये होते.

🅾 अन्न पचनास मदत करणार्‍या रसास पाचकरस असे म्हणतात.

 🅾तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अधिक असते.

 🅾डाळी, मांस, दूध यामध्ये प्रथिने अधिक असतात.

🅾 भुईमुंग, करडई यांसारख्या तेलबियात स्निग्धाचे प्रमाण अधिक असते.

 🅾पालेभाज्यांपासून क्षार व जीवनसत्वे मिळतात.

 🅾मोड येताना धान्यातील जीवनसत्वाचे प्रमाण वाढते.

 🅾आंबवल्यामुळे अन्नपदार्थातील जीवनसत्वात वाढ होऊन पौष्टिकता वाढते.

🅾 ओ.आर.एस म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन. याचा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी होतो.

 🅾पोटॅशिअम परमॅगनेटच्या द्रावणाने जखम धुतात आणि त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात.

 🅾खडकापासून मातीचा 2.5 सेमी पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे 800 ते 1000 वर्ष लागतात.

 🅾डोंगर उतारावर घातलेल्या बांध्ंणा ताली किंवा ओटे म्हणतात.

 🅾पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात हे मत कणाद महर्षींनी मांडले.

🅾 कणाद महर्षींचा जन्म इसवी सनापूर्वी 6 व्या शतकात प्रभास क्षेत्र म्हणजेच गुजराथ राज्यातील सोरटी सोमनाथ जवळच्या प्रभासपट्टम येथे झाला.

 🅾पदार्थाच्या सूक्ष्मतिसूक्ष्म कणाला महर्षीनी 'पीलव' म्हटले आहे.

🅾 उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणार्‍या पदार्थांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात.
 उष्णता वाहून नेण्याची क्षमता नसणार्‍या पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात.

 🅾लोखंडाप्रमाणेच कोबाल्ट व निकेल हे धातूही चुंबकाकडे आकर्षिले जातात.

 🅾पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणार्‍या बदलांना परिवर्तनीय बदल असे म्हणतात.

 🅾बाष्पीभवन, सांद्रीभवन, विरघळणे, उत्कलन आणि विलयन हे भौतिक बदलाचे प्रकार आहेत.

🅾 लोखंडी पत्रे, नळ इ. वस्तूवर जस्ताचा पातळ लेप लावतात.

🅾 तांब्या-पितळेच्या भांड्यांना काथिलाचा लेप देऊन कल्हई करतात.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋


💠💠सामान्य विज्ञान (इयत्ता 6 वी).💠💠

🅾अमिबा, पॅरामेशिअम, क्लोरेला, यीस्ट या सजीवांचे शरीर एक पेशीचे बनलेले असते.

 🅾चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता असे म्हणतात.

🅾प्राणी : जीवनकाळ

🅾घरमाशी - 1 ते 4 महिने
🅾कुत्रा - 16 ते 18 वर्ष
🅾शहामृग - 50 वर्ष
🅾हत्ती - 70 ते 90 वर्ष

🅾वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय कॅरोलेस लिनियस या शास्त्रज्ञाकडे जाते.

🅾 बुरशी, भूछत्र, स्पायरोगायरा, नेचे व कवक यांना फुले येत नाहीत.

 🅾वड, उंबर, बोगनवेल या सपुष्प वनस्पती आहेत.

 🅾व्दिवार्षिक वनस्पती - मुळा, गाजर, बीट.वार्षिक वनस्पती - सूर्यफूल, झेंडू, ज्वारी, बाजरी, मका.

🅾 जलचर प्राणी - मासा, जेलीफिश, ऑक्टोपस

🅾 उभयचर प्राणी - बेडूक, कासव, सुसर

🅾 वडाच्या खोडावरील पारंब्या या वडाची मुळे आहेत. कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डन मध्ये सुमारे 250 वर्षाचे वडाचे झाड आहे.

 🅾पेर आणि पान यांच्या दुबेळक्यात कोंबासारखा भाग दिसतो त्याला मुकूल म्हणतात. मूळाच्या टोकाशी मूलटोपी असते.

 🅾जायांग स्त्रीकेशराचा बनलेला असतो.

 🅾वस्तुमान, अंतर, तापमान, काळ अशा प्रकारात ज्यांचे मापन करायचे असते, त्यांना राशी असे म्हणतात.

 🅾MKS आणि CGS या प्रचलित मापन पद्धती आहेत.

 🅾गोलंदाजीच्या वेगाचे मापन रडार प्रणालीव्दारे केले जाते.

 🅾स्थिर वस्तूला हलविण्यासाठी बलाची आवश्यकता असते.

 🅾मॅगलेव्ह ट्रेन ही चुंबकाचा वापर करून चालणारी रेल्वे ताशी 500 ते 580 किमी वेगाने धावते.

 🅾घर्षणबल गतीच्या विरोधात कार्य करते. घर्षनामुळे वीज निर्माण होणार्‍या बलाला स्थितीक विद्युत बल असे म्हणतात.

 🅾एका दिशेने जाणार्‍या गतीला रेषीय गती असे म्हणतात.

🅾 ज्या गतीची दिशा सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात.

 🅾आधाराभोवती हालणार्‍या आणि न वाकणार्‍या दांड्याला तरफ म्हणतात. हे साधे यंत्र आहे.

 🅾कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.

🅾 पदार्थाच्या ताणामुळे / स्थितीमुळे साठवल्या गेलेल्या उर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात.

 🅾गतीज ऊर्जेचा वापर करून डायनॅमोमध्ये विद्युतनिर्मिती होते.

🅾 पारंपारिक ऊर्जा स्त्रोत - कोळसा, डिझेल, पेट्रोल

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

सामान्य विज्ञान इयत्ता 8 वी शॉर्ट नोट्स.

🅾सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित आठ ग्रह फिरतात.

 🅾चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.
 प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे ५० मिनिटे उशिरा होतो.
 
🅾चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास २७.३ दिवस लागतात.
 एका अमावस्येपासुन दुसर्‍या आमवस्येपर्यंतचा काळ २९.५ दिवसांचा असतो.

🅾 एकूण ८८ तारकासमूह मानले जातात. त्यातील ३७ तारकासमूह उत्तर खगोलीय तर ५१ तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.

 🅾प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी २७ नक्षत्रांची कल्पना केली आहे.

 🅾प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

 🅾बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त ८८ दिवस तर नेपच्यूनचा सुमारे १४६ वर्षे इतका मोठा असतो.
  
🅾बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे.पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला पहाटतारा म्हणतात.

 🅾पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना अंतर्ग्रह, तर कक्षेबाहेरील ग्रहांना बाह्यग्रह म्हणतात. मंगळ हा पहिला बाह्यग्रह आहे.

  🅾सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरुगुरूला एकूण ६३ उपग्रह आहेत.
 शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

 🅾शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

🅾 धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.हॅले हा धूमकेतू ७६ वर्षानी दिसतो. आता २०६० मध्ये दिसेल.

 🅾भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट १९ एप्रिल १९७५ रोजी सोडण्यात आला.
 त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - १, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत. ‘इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत २१ उपग्रह सोडण्यात आले.

 🅾GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

 🅾आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार १९७५ पासून अंमलात आला आहे.

🅾जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या १९९२ च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.

 🅾 ५ मार्च १८७२ रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.

🅾 चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित होतात.

 🅾मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणोत्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट आहे.

 🅾इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अनुतील मूलकण आहेत.
 
🅾अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.
  
🅾प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.
 
🅾अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.
 
🅾अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.
 
🅾 मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.
 
🅾मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला संयुजा म्हणतात.

 🅾विषाणूंभोवती प्रथिनांचे आवरण असते.
 जीवणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.

🅾 स्टॅफिलोकोकस जीवाणू खधापदार्थावर वाढताना एण्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनले आहे.

 🅾साथीचे रोग- कॉलरा, विषमज्वर, इन्फ्लुएंझा, हगवण, डोळे येणे, इ.
 संसर्गजन्य रोग – क्षय, इन्फ्लुएंझा, इ
 संपर्कजन्य रोग – खरूज, इसब, गजकर्ण, इ.

 🅾पिसळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावल्यामुळे रेंबीज होतो.

🅾 रोबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जिवाणू शोधून काढले.

 🅾WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्र  काढली आहेत. (Directly Observed Treatment) मनुष्यप्राणी ‘व्हीब्रिओ कॉलरा’ या कॉलर्‍याचा जिवाणू वाहक आहे.

🅾 लसीकरण – बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, व्दिगुणी, धनुर्वात, कविळ-ब.त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.   

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

आरोग्यशास्ञ


🅾 हत्तीरोगाचा रक्त नमुना कधी घेतात - राञी

🅾 लाल रक्तपेशी तयार होण्याकरीता कोणता घटक आवश्यक असतो - फॉलिक अँसिड

🅾 जन्मताच ह्रदयात दोष असणार्या मुलांना ब्लू बेबी म्हणतात

🅾 करडई तेलातील - लिनोलिक हे मेदाम्ल रक्तात्ल कोलेस्टेरॉलची माञा कमी राखते

🅾 सोयाबिन मध्ये - ४०% प्रथिन असतात

🅾 पुरुषांमधिल कुटूंबनियोजन शस्ञक्रियेस - व्हँसेक्टॉमि म्हणतात

🅾 स्ञियांमधिल कुटूंबनियाेजन शस्ञक्रियेस - ट्युबोक्टोमी म्हणतात

🅾 आयुर्वेदाची निर्मिती अथर्ववेदा पासुन झाली आहे

🅾 शरीराच्या एकुन वजनाच्या सुमारे २\३ भाग स्नायुंनी बनलेला असतो

🅾 ह्रदयास ऑक्सिजन चे प्रमाण कमि पडल्यास - हायपरटेंशन हा आजार होतो

🅾ह्रदयाचा एक ठोका पडन्यास - ०.८ सेतंद लागतात

🅾 शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि आरबीसीचे प्रमाण मोजण्यासाठी - फॉस्फरस ३२ वापरतात.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

जगातील १५ सर्वात उष्ण ठिकाणांमध्ये भारतातील १० शहरं; महाराष्ट्रातील दोन शहरांत लाहीलाही

- गेल्या काही वर्षांत ऋतुचक्र पूर्णपणे पालटले आहे. यावर्षीही वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन वर्षभरच सुरू आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होऊनही तापमानात वाढ होत नव्हती. मात्र, मागील दोन आठवडय़ापासून सूर्यनारायण चांगलाच कोपला आहे.

- हवामान निरीक्षण संकेतस्थळ अल डोरादोनुसार, गेल्या २४ तासांतील जगातील सर्वाधिक उष्ण १५ ठिकाणांमध्ये भारताच्या तब्बल दहा शहराचा समावेश आहे. जगातील सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील दोन शहराचा समावेश आहे. तसेच भारतासह पाकिस्तानमधीलही उष्ण ठिकाणाचा यामध्ये सहभाग आहे.

- उत्तर व मध्य भारत सध्या उष्णतेच्या तीव्र लाटेत होरपळत असून, काही ठिकाणी तापमान ४७ अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेले आहे.‘वायव्य भारत, मध्य भारत आणि पूर्व भारताचे लगतचे भाग यांवर उत्तर-पश्चिम दिशेने वाहणाऱ्या कोरडय़ा वाऱ्यांमुळे सध्याची उष्णतेच्या लाटेची परिस्थिती येत्या २४ तासांमध्ये कायम राहण्याची मोठी शक्यता आहे.

-  राजस्थानमधील चूरू देशातील सर्वाधिक उष्ण ठिकाण असल्याची नोंद बुधवारी झाली आहे. चुरू राजस्थानची राजधानी जयपूरपासून अवघ्या २० किमी अंतरावर आहे. मंगळवारी चुरूचे तापमान ५० डिग्री सेल्सिअस होतं. चुरूला थार रेगिस्तानचं प्रवेशद्वारही म्हटले जातेय. पाकिस्तानच्या जेकबाबाद आणि भारताच्या चुरूचं तापमान जमिनीवरील सर्वात उष्ण ठिकाण म्हणून मंगळवारी नोंद झाली.

- बीकानेर, गंगानगर आणि पिलानी राजस्थानमधील अन्य तीन शहरं आहेत. ज्यांचा जगातील सर्वाधिक १५ उष्ण ठिकाणामध्ये सहभाग आहे.
जगातील सर्वात उष्ण शहरांमध्ये उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी दोन शहरांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशमधील बांदा आणि हरियाणातील हिसारमध्ये मंगळवारी ४८ डिग्री सेस्लियस तापमानाची नोंद झाली.

- सर्वात उष्ण शहरांच्या यादीत ४७.६ डिग्री सेल्सअस तापमानासह राजधानी दिल्ली, ४७.४ डिग्री सेल्सिअससह बीकानेर, ४७ डिग्री सेल्सिअसह गंगानगर, ४७ डिग्री सेल्सिअससह झांसी, ४९.९ डिग्री सेल्सियससह पिलानी, ४६.८ डिग्री सेल्सिअससह नागुपूरमधील सोनगांव आणि ४६.५ डिग्री सेल्सिअस तापमानासह अकोला यांचा क्रमांक लागला आहे.

- चुरूमध्ये गेल्या दहा वर्षांत मे महिन्यात दुसऱ्यांदा सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. याआधी १९ मे २०१६ रोजी चुरूचे तापमान ५०.२ डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं होतं. २२ मे २०२० पासून चुरूमध्ये तापमानाची स्थिती पाहिली जात आहे. २२ मे रोजी येथील तापमान ४६.६ डिग्री सेल्सिअर नोंदवलं होतं.

-  त्यानंतर प्रत्येकदिवशी तापमान वाढत राहिले २३ मे रोजी ४६.६ डिग्री सेल्सिअस, २४ मे रोजी ४७.४ डिग्री सेल्सिअस आणि २५ मे रोजी ४७.५ डिग्री सेल्सिअस तापमान होतं.

- विकासाच्या गर्तेत सर्वच शहरांमध्ये हिरवे जंगल कमी होऊन सिमेंटच्या जंगलात वाढ होत आहे. त्यामुळे तापमानवाढीसाठी हा घटक देखील तेवढाच कारणीभूत ठरत आहे. एरवी उन्हाळ्यात दिवसा रस्त्यावर वर्दळ कमी असते. मात्र, टाळेबंदीमुळे दीड महिन्याहून अधिक काळ नागरिक घरातच बंदिस्त होते. आता हळूहळू शहरातील व्यवहार सुरू होऊ लागल्याने उन्हाची तमा न बाळगता नागरिक रस्त्यावर दिसून येत आहेत.

-  पण वाढलेल्या तापमानामुळे पुन्हा घरातच राहावे लागत आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार येत्या ३० मे पर्यंत उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...