२७ मे २०२०

नदी काठ शहरे


🅾कोकणातील शहरे

🍀भोगावती:-पेन

🍀भतसाई:-शहापूर

🍀उल्हास:-कर्जत

🍀सावित्री:-पोलादपूर

🍀घोडनदी:-माणगाव

🍀अंबा:-पाली

🍀पाताळगंगा:-खालापूर

🍀कुंडलिका:-रोहा

🍀वासीष्टी:-चिपळूण

🍀जोग:-दापोली

महाराष्ट्रातील प्रमुख जलाशय व धरणे :
जलाशय/नदी स्थळ/जिल्हा

●जायकवाडी – बाथसागर (गोदावरी) औरंगाबाद
●भंडारदरा – (प्रवरा) अहमदनगर
●गंगापूर – (गोदावरी) नाशिक
●राधानगरी – (भोगावती) कोल्हापूर
●कोयना शिवाजी सागर – (कोयना) ●हेळवाक (सातारा)
●उजनी – (भीमा) सोलापूर
●तोतलाडोह – मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर
●यशवंत धरण – (बोर) वर्धा
●मोडकसागर – (वैतरणा) ठाणे
●खडकवासला – (मुठा) पुणे
●येलदरी – (पूर्णा) परभणी
●बाभळी प्रकल्प – (गोदावरी) नांदेड

चालू घडामोडी प्रश्नसंच

1] कोणता राज्य वा केंद्रशासित प्रदेश ‘सुकून - कोविड-19 बीट द स्ट्रेस’ नावाने एक उपक्रम राबवित आहे?

(A) दिल्ली
(B) मध्यप्रदेश
(C) जम्मू व काश्मीर✅✅
(D) अंदमान निकोबार बेट

कोणत्या व्यक्तीची भारतीय पोलाद संघाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली?

(A) दिलीप उम्मेन✅✅
(B) टी.व्ही. नरेंद्रन
(C) भास्कर चटर्जी
(D) रतन जिंदल

रेल्वेच्या कोणत्या विभागामध्ये ‘रेल-बॉट’ हे रोबोटिक उपकरण विकसित करण्यात आले?

(A) दक्षिण-पश्चिम रेल्वे विभाग
(B) मध्य रेल्वे विभाग
(C) दक्षिण-पूर्व रेल्वे विभाग
(D) दक्षिण-मध्य रेल्वे विभाग✅✅

परीक्षांच्या तयारीसाठी उमेदवारांना मदत व्हावी यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) यांनी तयार केलेल्या नवीन मोबाइल अ‍ॅप नाव काय आहे?

(A) नॅशनल टेस्ट अॅसेसमेंट
(B) नॅशनल टेस्ट अभ्यास✅✅
(C) परीक्षा अभ्यास
(D) यापैकी नाही

कोणत्या व्यक्तीची जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली आहे?

(A) डॉ. हर्ष वर्धन✅✅
(B) लेमोगांग क्वापे
(C) एडमा ट्रॉओर
(D) हिरोकी नाकातानी

सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना

👉 सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897, बंगाल प्रांतात झाला.

👇 सुभाषबाबू 1920 मध्ये आय.सी.आय. 
परीक्षा उत्तीर्ण झाले.सुभाषबाबू 1938 हरीपुर व 1939 त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष होते.

👉  नेताजींनी 1940 मध्ये ‘फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.

👉  डिसेंबर 1940 मध्ये सुभाष बाबूंना नजरकैदेत ठेवण्यात आले.

👉  जानेवारी 1941 मध्ये सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या कैदेतून पलायन केले व पेशावर मास्कोमार्गे त्यांनी जर्मनी गाठली.

👉  नजर कैदेतून सुटल्यावर नेताजींनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते.

👉  नेताजींनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे ‘स्वतंत्र हिंदूस्थानचे हंगामी सरकार’ स्थापन केले.

👉 सिंगापूर येथे रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती.
त्याचे सेनापतीपद (नेतृत्व) नेताजीकडे आले.

👉 आझाद हिंद सेनेच्या गांधी ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड अशा ब्रिगेड होत्या.

👉  सुभाष ब्रिगेडचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल शाहनवाज खान यांच्याकडे सोपविण्यात आले होते.

🖌 आझाद हिंद सेनेने बंगालच्या उपसागरातील ‘अंदमान व निकोबार’ ही बेटे जिंकून घेतली व त्यांचे नामकरण अनुक्रमे ‘शहीद व स्वराज्य’ असे केले.

🇮🇳 आझाद हिंद सेनेने 18 मार्च 1944 रोजी भारतभूमीवर प्रवेश केला व माऊडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला.

✈️ 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात तैपेई विमानतळाजवळ नेताजींचे निधन झाल्याचे मानण्यात येते.

जगातील सर्वात मोठे

* खंड - आशिया

* विस्तारित देश - रशिया

* लोकसंख्येचा देश - चीन

* द्विपसमूह - इंडोनेशिया

* त्रिभूज प्रदेश - सुंदरबन [ गंगा नदीच्या मुखाजवळ ]

* वाळवंट - सहारा

* महासागर - पॅसिफिक

* द्विपकल्प - अरेबिया

* बेट - ग्रीनलँड

* खंडद्वीप - ऑस्ट्रेलिया

* समुद्र - दक्षिण चिनी समुद्र

* उपसागर - हडसनचा उपसागर

* आखात - मेक्सिकोचे आखात

* नदी व खोरे - अमेझॉनचे खोरे

* पर्वतराजी - हिमालय

* मैदानी प्रदेश - पश्चिम सायबेरिया

* गोड्या पाण्याचे सरोवर - सुपीरिअर

* ज्वालामुखी - मौना लोआ, हवाई बेटे.

* समुद्रभरती - फुंडीचे आखात

* खाऱ्या पाण्याचे सरोवर - कास्पियन समुद्र

* नदी मुख - ऑब नदीचे मुख

* वाळूचे बेट - फ्रेझर आयर्लंड

* लॅगुन - लॅगोआ डॉस पॅटॉस, ब्राझील

* अरण्य - सूचिपर्णी वृक्षांचे अरण्य, रशिया

* सिमेंट क्रॉंक्रीटचे धरण - कोलंबिया नदीवरील ग्रॅन्ड कुली, अमेरिका

* बंदर - न्यूयॉर्क

* विस्तारित शहर - लंडन

* दिवस - २१ जून

महाराष्ट्र जिल्हे निर्मिती

- 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

- 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),

- 26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)

- 1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)

- 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)

- अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)

- 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)

- भंडारा  – गोंदिया (35 वा जिल्हा)

- 1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)

भारतातील महत्वाचे धबधबे

- जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.

- हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी

- धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी

- चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी

- शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी

- गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी

- चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी

- अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी

चारधाम प्रकल्पाच्या अंतर्गत चंबा बोगद्याचे उद्घाटन.


🔰दिनांक 26 मे 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स मोडच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि MSME मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चारधाम प्रकल्पाच्या अंतर्गत चंबा बोगद्याचे उदघाटन करण्यात आले.

🦋ठळक बाबी...

🔰सीमा रस्ते संघटनेनी (BRO) ऋषिकेश-धारासू रस्ते महामार्गावरील (NH-94 ) व्यस्त चंबा शहराच्या खाली 440 मीटर लांबीचा बोगदा खणून हा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला.

🔰उत्तराखंडमधील या ऋषिकेश-धारसू-गंगोत्री रस्त्याची सामाजिक-आर्थिक आणि धार्मिक दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा बोगदा खुला झाल्यामुळे चंबा शहरातून होणारी वाहतुकीची कोंडी कमी होणार आणि अंतर एक किलोमीटरने कमी होणार तसेच पूर्वीच्या  तीस मिनिटांच्या तुलनेत दहा मिनिटे प्रवासास लागतील.

🔰प्रतिष्ठित चारधाम प्रकल्पातला BRO हा प्रमुख हितधारक असून या बोगद्याचे काम ‘शिवालिक’ चमूने पूर्ण केले आहे. अत्याधुनिक ऑस्ट्रियाई तंत्रज्ञानाचा वापर बांधकामादरम्यान करण्यात आला.

🦋पार्श्वभूमी...

🔰प्रतिष्ठित चारधाम प्रकल्पांतर्गत सुमारे 889 किलोमीटर लांबीच्या अंदाजे 12,000  कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पासाठी पवित्र गंगोत्री आणि बद्रीनाथ मंदिराकडे जाणारा 250 कि.मी. राष्ट्रीय महामार्ग BRO बांधत आहे.

एका वर्षांत दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक.


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🧩ऑस्ट्रेलियात या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा प्रस्तावित ट्वेन्टी-२० विश्वचषक लांबणीवर टाकण्यात येणार की नाही याबाबतचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे.

🧩मात्र पुढील वर्षी भारतातही ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक नियोजित आहे. या स्थितीत एकाच वर्षांत सहा महिन्यांच्या अंतराने दोन वेळा ट्वेन्टी-२० विश्वचषक कसा खेळवायचा हा मुख्य प्रश्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर (आयसीसी) आहे. याबाबत अर्थातच ‘आयसीसी’च्या सदस्यांचे एकमत होत नाही.

🧩‘आयसीसी’च्या आर्थिक आणि व्यापार विभागाच्या समितीची व्हिडीयोद्वारे झालेल्या बैठकीत ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी त्यासाठी उपस्थित होते. जर या वर्षी ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेन्टी-२० विश्वचषक पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवला तर सहाच महिन्यांच्या अंतराने भारतात ट्वेन्टी-२० विश्वचषक अशक्य आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले.

चीनने तयार केलं पहिलं मानवरहित हेलिकॉप्टर.


❇️कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देश एकीकडे आणि चीन एकीकडे असं चित्र बघायला मिळत आहे. अशातच चीनने त्यांचं पहिलं मानवरहित हेलिकॉप्टर (Unmanned Helicopter) तयार केलं आहे.

❇️तर हे हेलिकॉप्टर खासकरून पठारी भागांमध्ये गुप्तहेरी करेल.तसेच हे अत्याधुनिक मानवरहित हेलिकॉप्टर भारताशी जुळलेल्या सर्व सीमांवर तैनात केले जाणार आहेत. जेणेकरून चीन आकाशातूनही सीमांवर लक्ष देऊ शकेल.

❇️या मानवरहित हेलिकॉप्टरचं नाव AR500C आहे. हे चीनची सरकारी कंपनी एविएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायनाने तया केलं आहे. कंपनीने पूर्व चीनच्या जियांसी प्रांतातील पोयांगमध्ये पहिल्यांदा याची ट्रायल घेतली. ही ट्रायल यशस्वी ठरली.

❇️तर यात शस्त्रास्त्रे लावली गेली तर हे हेलिकॉप्टर हल्लाही करू शकतं. कार्गो डिलीव्हरी करू शकतो. तसेच शत्रूच्या टार्गेटची ओळख पटवण्यातही हे सक्षम आहे. तसेच हे हेलिकॉप्टर परमाणू आणि रासयनिक लिकेजची देखील माहिती देतं.

❇️हे हेलिकॉप्टर जास्तीत जास्त 6700 मीटर म्हणजे 21981 फूट उंचीपर्यत उड्डाण घेऊ शकतं. याची जास्तीत जास्त गति 170 किलोमीटर प्रतिसात  आहे. तर याचं वजन 500 किलोग्रॅम आहे.

❇️AVIC टेक्नॉलॉजी डिरेक्टर आणि हे हेलिकॉप्टर तयार करणारे सायंटिस्ट फॅंग योगंहोंग यांनी सांगितले की, हे मानवरहित हेलिकॉप्टर पूर्णपणे डिजिटल आहे. हे आपोआप टेकऑफ आणि लॅंडिंग करू शकतं.

❇️तर हे चीनचं पहिलं हेलिकॉप्टर पठारी परिसरांवर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलं आहे.फॅग योंगहोंग यांनी सांगितले की, आम्ही या हेलिकॉप्टरची यशस्वी चाचणी केली. यात चीनमधील सर्वात अत्याधुनिक आणि शक्तीशाली इंजिन लावण्यात आलं आहे.

हिंदी महासागरातील विशाल टेक्टॉनिक प्लेट होताहेत विभक्त.


🦋हिंदी महासागराखालील विशाल टेक्टॉनिक प्लेट फुटणार असल्याची धक्कादायक माहिती नव्या अभ्यासातून समोर आली आहे.तर ही प्लेट येत्या काळात आपोआप दोन भागांत विभागली जाणार आहे. या प्लेटला भारत-ऑस्ट्रेलिया-मकर टेक्टोनिक प्लेट म्हणून ओळखले जाते.

🦋तसेच ही प्लेट अगदी हळूहळू विभक्त होत आहे, म्हणजेच एका वर्षात ही प्लेट 0.06 इंच (1.7 मिलीमीटर)ने विभक्त होत आहे.

🦋लाइव्ह सायन्सच्या अहवालानुसार, या अभ्यासाचे संशोधक ओरेली कोडुरियर यांनी सांगितले की, ही एक अशी रचना नाही जी वेगवान वाटचाल करत आहे.
तसेच ही प्लेट हळूहळू विभक्त होत असल्याचं प्रारंभी संशोधकांना समजलं नव्हतं, परंतु नंतर त्याचा सुगावा लागला. हिंदी महासागरामध्ये एका दोन भयंकर भूकंप झाल्यानंतर पाण्याखाली काही हालचाल झाल्याचंही संशोधकांनी सांगितलं आहे.

🦋11 एप्रिल 2012ला हिंदी महासागरातील इंडोनेशियाजवळ 8.6 आणि 8.2 अशा तीव्रतेचे दोन भूकंप झाले. हे भूकंप टेक्टोनिकल प्लेटच्या आसपास नव्हते, परंतु या प्लेटच्या मध्यभागी असलेल्या एका वेगळ्या ठिकाणावर त्यांचं केंद्रबिंदू दाखवलं होतं.

🦋तर या भूकंपानंतर संशोधकांना असे वाटले की. पाण्याखाली काही हालचाल आहे. ऑरेली कोडुरियर म्हणाले की, “हे एक कोड्यासारखे आहे, कारण ते एकसारख्या प्लेट नसून तीन एकत्रित आहेत, ज्या जोडलेल्या आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार या प्लेट्स विभक्त होण्यासाठी कोट्यवधी वर्षे लागतील.

२६ मे २०२०

चंद्रासंबंधीची माहिती.

🅾चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

🅾चंद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे.

🅾चंद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे.

🅾चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति पृथ्वीच्या सहापटीने कमी आहे.

🅾चंद्रास सूर्यापासून मिळणार्‍या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तीत करतो. यामुळे चंद्राचा प्रकाश आपणास शितल वाटतो.

🅾चंद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनीटे उशिरा उगावतो.

🅾चंद्राचा हा कालावधी अमवश्या ते पौर्णिमा असा मनाला जातो. हा कालावधी 29 दिवस आहे. याला चंद्रमास असे म्हणतात.

🅾चंद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो.

🅾चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परीभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन अविष्कार पाहावयास मिळतात.

🅾चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आकर्षण आणि प्रतीकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते.

🅾पोर्णिमेला आणि अमावश्येला चंद्र, सूर्य व पृथ्वी एकाच रेषेत येते. या दिवशी चंद्र व सूर्य यांच्या एकति गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर सर्वात मोठी भरती येते. याला उधानाची भरती म्हणतात.

🅾अष्टमिला चंद्र आणि सूर्य पृथ्वीला काटकोन करतात या दिवशी येणार्‍या भरतीला भांगेची भरती असे म्हणतात.

🅾चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

🅾चंद्र पृथ्वीपासून 3,82,144 किलोमीटर अंतरावर आहे.

🅾चंद्राचा व्यास 3,478 किलोमीटर आहे.

🅾चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति पृथ्वीच्या सहापटीने कमी आहे.

🅾चंद्रास सूर्यापासून मिळणार्‍या उष्णतेच्या फक्त 7% भाग परावर्तीत करतो. यामुळे चंद्राचा प्रकाश आपणास शितल वाटतो.

🅾चंद्र व पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमन गतीमुळे चंद्र दररोज 50 मिनीटे उशिरा उगावतो.

🅾चंद्राचा हा कालावधी अमवश्या ते पौर्णिमा असा मनाला जातो. हा कालावधी 29 दिवस आहे. याला चंद्रमास असे म्हणतात.

🅾चंद्राचा 59% भाग पृथ्वीवरून दिसतो.

🅾चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परीभ्रमणामुळे पृथ्वीवर चंद्रग्रहण व सूर्यग्रहण हे दोन अविष्कार पाहावयास मिळतात.

🅾चंद्र, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील आकर्षण आणि प्रतीकर्षण बलामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती व ओहोटी येते.

🅾पोर्णिमेला आणि अमावश्येला चंद्र, सूर्य व पृथ्वी एकाच रेषेत येते. या दिवशी चंद्र व सूर्य यांच्या एकति गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीवर सर्वात मोठी भरती येते. याला उधानाची भरती म्हणतात.

🅾अष्टमिला चंद्र आणि सूर्य पृथ्वीला काटकोन करतात या दिवशी येणार्‍या भरतीला भांगेची भरती असे म्हणतात.

मुकेश अंबानी २०३३ पर्यंत होणार भारतातील पहिले ट्रिलिअनर पण त्यापूर्वी…

- रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे २०३३ पर्यंत ट्रिलिअनर बनतील. परंतु त्यापूर्वी २०२६ मध्ये अॅमेझॉनचे संस्थापन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस हे ट्रिलिअनर बनणार असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. कंपॅरिझननं केलेल्या एका सर्वेक्षणातील अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

- बेझोस यांचं सध्याचं वय ५६ वर्षे आहे. तर फोर्ब्सनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडे आता १४२.८ अब्ज डॉलर्सचं नेट वर्थ आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. कंपॅरिझनच्या अहवालानुसार ते २०२६ पर्यंत ट्रिलिअनर बनतील. तसंच २०२६ पर्यंत त्यांचं नेटवर्थ १ हजार अब्ज डॉलर्स पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यावेळी त्यांचं वय हे ६२ वर्षे असेल.

-  अहवालानुसार बेझोस यांच्या नेट वर्थमध्ये गेल्या ५ वर्षांमध्ये ३४ टक्क्यांची वाढ झाली आहे. तसंच त्यांच्यानंतर चीनच्या एवरग्रँडचे प्रमुख शु जियाइन हे २०२७ पर्यंत तर अलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा हे २०३० पर्यंत ट्रिलिअनर बनणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- दरम्यान, कंपॅरिझनच्या अहवालानुसार रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे २०३३ मध्ये ट्रिलिअनर बनतील. त्यांच्याकडे सध्या ४९.२ अब्ज डॉलर्सची नेट वर्थ आहे. कंपॅरिझनने न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजवर लिस्टेड सर्वाधिक व्हॅल्यू असलेल्या २५ कंपन्यांचं विश्लेषण केलं आहे. यासोबतच त्यांनी फोर्ब्सच्या यादीनुसार जगातील सर्वात श्रीमंत २५ लोकांच्या नेट वर्थचंही विश्लेषण करण्यात आलं आहे. तसंच त्यांच्या गेल्या पाच वर्षातील नेट वर्थमधील वार्षिक वाढीच्या सरासरीच्या आधारावर हा अहवाल लागू केला आहे.
---------------------------------------------------

देशांतर्गत विमान सेवा

🔰टाळेबंदीमुळे जवळपास दोन महिन्यांपासून बंद  असलेली देशांतर्गत विमान सेवा सोमवारपासून सुरू होणार असून मुंबई विमानतळावरूनही दररोज  50 विमानांची ये-जा होणार आहे.
मात्र, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी विमान प्रवाशांबाबत स्वत:ची नियमावली व अटी  घातल्याने या सेवेबाबत प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

🔰केंद्र सरकारने 25 मेपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्याची घोषणा केल्यापासूनच महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांनी त्याला विरोध केला आहे.तर महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर, पुणे आणि औरंगाबाद ही विमानतळांची शहरे ही लाल क्षेत्रांत  असल्याने तसेच मुंबईत प्रवासी वाहतूक बंद असल्याने प्रवासी विमान सेवा सुरू करू नये, अशी आग्रही मागणी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती.

🔰देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसंदर्भात केंद्र सरकारने रविवारी नियमावली जाहीर केली आहे. मात्र, त्याच वेळी अलगीकरणासंदर्भात राज्यांना स्वतंत्र नियमावली आखण्याची परवानगी देण्यात आली आहे.तसेच विविध राज्य सरकारांनीही त्यानुसार नियमावली जाहीर केली आहे. मात्र, या नियमावलींमध्ये एकवाक्यता नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.

मंदीत ‘ॲमेझॉन’ देणार नोकरीची संधी; भारतात ५०,००० लोकांना मिळणार रोजगार.

🔰करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांसमोर बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर होत असतानाच भारतातील आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असणाऱ्या ॲमेझॉनने देशात ५० हजार नोकऱ्यांची संधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे.

🔰लॉकडाउनच्या काळामध्ये घरपोच डिलेव्हरीची मागणी वाढल्याने कंपनीने कंत्राटी कामगारांची आवश्यकता असल्याचे म्हटलं आहे. ऑनलाइन माध्यमातून मोठ्याप्रमाणात खरेदी होत असून या गोष्टींची डिलेव्हरी करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जाणार असल्याचे कंपनीने शुक्रवारी (२२ मे २०२०) स्पष्ट केलं. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

🔰मागणी आणि पुरवठा साखळीमधील वेगवेगळ्या स्तरामधील नोकऱ्या उपलब्ध असल्याचे ॲमेझॉनने स्पष्ट केलं आहे. या ५० हजार नोकऱ्यांमध्ये अगदी फुलफीलमेंट सेंटर्स म्हणजेच वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी शहरामध्ये उभारण्यात आलेल्या केंद्रांमधील नोकऱ्यांपासून ते डिलेव्हरी करण्यापर्यंत अनेक नोकऱ्यांचा समावेश आहे.

🔰लॉकडाउनच्या कालावधीमध्ये म्हणजेच २५ मार्चपासून १७ मेपर्यंत देशामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांना वस्तुंची डिलेव्हरी करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा आणि किरणामालाच्या वस्तू वगळता इतर वस्तूंच्या डिलेव्हरीवर घालण्यात आलेली बंदी केंद्र सरकारने नुकतीच उठवली आहे. देशभरामध्ये अत्यावश्यक वस्तूंबरोबरच इतर वस्तूंची डिलेव्हरी करण्याची परवानगीही ई-कॉमर्स कंपन्यांना देण्यात आली आहे. त्यानंतर ई-कॉमर्स साईटवरुन वस्तूंच्या ऑर्डरची संख्या वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षांची घोषणा 1 जून नंतरच.


🔰लॉकडाऊन दरम्यान कर्मचारी भरती आयोगाने म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशनने भरती परीक्षांबाबत नवीन परिपत्रक जारी केले आहे.

🔰देशातील कोविड – 19 विषाणूच्या संक्रमणाने उद्भवलेल्या स्थितीचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतला आहे की 1 जून 2020 रोजी पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर आयोग भरती परीक्षांच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल असे पत्रकात म्हटले आहे.

🔰तर अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या या परिपत्रकात परीक्षांच्या तारखेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.तसेच आयोगाने कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एग्झाम (CHSL), ज्युनियर इंजीनियर (JE), स्टेनोग्राफर ग्रेड सी व डी साठी हे परिपत्रक काढले  आहे.

प्रधानमंत्री महिला सशक्तीकरण.

🅾 प्रधानमंत्री महिला सशक्तीकरण योजनाच्या अंतर्गत महिला शक्ती केंद्रे स्थापन करण्याची उपाययोजना सन २०१७ ते २०२० या कालावधीमध्ये पथदर्शी तत्वावर राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण महिलांचे सबलीकरण घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. महिलासाठीच्या शासकीय योजनांचा लाभ तसेच आरोग्य व स्वछताविषयक मदत व मार्गदर्शन यांच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये हक्क आणि अधिकार याबाबत जागृती निर्माण करणे. हा या योजनेचा उद्देश आहे.

🧩योजनेच्या ठळक तरतुदी व वैशिष्ट्ये

🅾योजनेअंतर्गत राज्यस्तरावर महिलांसाठी राज्य संशोधन केंद्र संबंधित राज्य सरकारच्या अधिपत्याखाली विविध योजनांचा अभ्यास करून तांत्रिक साहाय्य व सल्ला उपलब्द करून देईल.

🅾जिल्हास्तरीय महिला केंद्रे ही महिलाविषयक विविध योजनांची माहिती गोळा करून राज्य स्तरावर आणि जनतेस उपलब्द करून देतील. ही केंद्रे तालुका ग्राम पातळी आणि राज्य पातळी यामध्ये दुव्याचे कार्य करतील.

🅾महिला शक्ती केंद्रे ही तालुका पातळीवर कार्य करतील व गाव पातळीवर सेवा उपलब्द करून देतील. गाव पातळीवर सेवा उपलब्द करून देण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका, ANM, सामान्य सेवा केंद्रे,

🅾महिला स्वयंसहायता समूह, बँक मित्र, शिक्षा मित्र, न्याय मित्र, महिला ओकप्रतिनिधी, महिला पोलीस स्वयंसेविका या गाव पातळीवर विविध शासकीय/अशासकीय कार्यामध्ये कार्यरत व्यक्तींची मदत घेण्यात येईल.

🅾महाविद्यायातील NSS/NCC कॅडेट्स तसेच इतर स्वयंसेवक विद्यार्थ्यांना सहा महिन्याची समूह सेवा देता येईल. हा कालावधी २०० तास पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना समूह सेवा प्रमाणपत्र देण्यात येईल.

🅾अशा प्रकारे जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांना समूह सेवेमध्ये उपयोजित करून त्यांच्यामध्ये जबाबदार नागरिकांचे गुण निर्माण करण्यासही यातून हातभार लागणार आहे.

🅾 ग्रामीण महिलांना ग्रामसभा तसेच पंचायत राज संस्थांमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक माहिती तसेच संसाधने उपलब्द करून देण्यात येतील.

🅾 विविध शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ घेणे, त्यामध्ये सहभागी होणे, यासाठी मुलांना प्रोत्साहन देण्यात येईल.

🅾 विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे बनवून घेण्यासाठी ग्रामीण महिलांना साहाय्य करण्यात येईल.

🅾 बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या अंमलबजावणीमध्ये मदत करण्यात येईल. महिलांच्या तक्रारी, तक्रार नोंदविणे तसेच त्याबाबतचा पाठपुरवठा यामध्ये साहाय्य करणे.

🅾महिलांना एकत्र येण्यास, सामूहिक कार्ये करण्यास, समूह बनवण्यास प्रोत्साहन देणे व त्या माध्यमातून त्यांची क्षमता बांधणी व विकास घडविणे यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

🅾 योजनेच्या अंमलबजावणीची प्रगती दर्शविण्यासाठी तसेच शंकाचे व समस्यांचे निराकरण करणे, आणि तक्रारी नोंदविणे यासाठी संकेतस्थळ उपलब्द करून देण्यात येणार आहे.

🅾 ही योजना नीती आयोगाच्या अहवालानुसार देशातील सर्वात मागास राहिलेल्या ११५ जिल्ह्यामध्ये पथदर्शी तत्वावर राबविण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचे नंदुरबार, जळगाव, गडचिरोली व नांदेड या चार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.

🅾प्रत्येक जिल्ह्यातील कमाल, ८ तालुके, याप्रमाणे ९२० तालुक्यामध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. या अंमलबजावणीमध्ये प्राप्त झालेल्या अनुभवावरून देशातील उर्वरित जिल्ह्यामध्ये विस्ताराबाबत निर्णय घेण्यात येईल.

 🅾यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून ६०:४० या प्रमाणात निधी उपलब्द करून देण्यात येईल. ईशान्येकडील राज्ये व विशेष दर्जा प्राप्त राज्यामध्ये निधीचा हिस्सा ९०:१० याप्रमाणे असेल. 

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...