२५ एप्रिल २०२०

उन्हाळ्यात करोनाला लगाम!

- सूर्यप्रकाश, उष्णता, आद्र्रता यामुळे करोनाचा विषाणू टिकाव धरू शकत नाही, असे मेरीलँड येथील बायोडिफेन्स अँड काउंटर मेजर यासंस्थने संशोधनाअंती म्हटले असल्याची माहिती ट्रम्प प्रशासनातील आरोग्यविषयक अधिकारी बिल ब्रायन दिली आहे.

- या संशोधनात करण्यात आलेल्या दाव्यानुसार सूर्यप्रकाशात करोनाचा विषाणू टिकू शकत नाही. वैज्ञानिकांच्या मते अतिनील किरणही या विषाणूला मारू शकतात त्यामुळे उन्हाळ्यात हा विषाणू पसरण्याची शक्यता कमी आहे. भारतात कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने करोनाला अटकाव होण्याची आशा त्यामुळे निर्माण झाली आहे. पृष्ठभागावरचे व हवेतील विषाणू सूर्यप्रकाशात मारले जातात. तपमान व आद्र्रतेचाही यात संबंध असतो.

- वाढते तपमान व आद्र्रता या दोन्ही गोष्टी करोनाला मारक असतात.
या शोधनिबंधची शहानिशा अजून तटस्थ तज्ञांकडून झाली नसल्याने तो जाहीर करण्यात आलेला नाही.
ब्रायन यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर जे सादरीकरण केले त्यात असे सांगितले गेले की, हा विषाणू २१ ते २४ अंश सेल्सियस किंवा त्यावरील तपमान व २० टक्के आद्र्रता असेल तर निम्मा होतो.

- थोडक्यात तो क्रियाशील राहत नाही. या तपमान व आद्र्रतेला तो दारांचे हँडल, पोलाद यावरही टिकत नाही. जेव्हा आद्र्रता ८० टक्के असते तेव्हा त्याचा अर्धआयुष्यकाल हा सहा तासांपर्यत खाली येतो म्हणजे तो सहा तासात निम्माच राहतो. हा विषाणू सूर्यप्रकाशात दोन मिनिटातच निष्क्रीय होतो. जेव्हा विषाणू हवेत असतो व तपमान २१ ते २४ अंश सेल्सियस तर आद्र्रता २० टक्के असते तेव्हा त्याचा अर्धआयुष्यकाल एक तास असतो.

-  सूर्यप्रकाशात हवेत असलेला विषाणू ३० सेकंदात निष्क्रिय होतो. त्यामुळे उन्हाळ्यात विषाणूचा प्रसार कमी होतो असे ब्रायन यांनी म्हटले आहे. याचा अर्थ विषाणू नष्ट होतो म्हणजे सामाजिक अंतर पाळण्याची गरज नाही असा घेण्यात येऊ नये.

- भारतात पावसाळ्यात दक्षतेची गरज
शिव नाडर विद्यापाठीच्या गणित विभागाचे सहायक प्राध्यापक समित भट्टाचार्य यांनी सांगितले की, भारतात आता टाळेबंदी उठवल्यानंतर करोना विषाणूचा प्रसार रोखल्याचा आभास निर्माण होईल, त्याचा आलेखही स्थिर येईल, पण नंतर काही महिन्यांनी पुन्हा करोना पुन्हा सक्रिय होईल. आता काही आठवडे किंवा महिने करोना कमी झालेला दिसेल पण नंतर तो पुन्हा उसळी घेईल. सध्या करोना रुग्णांची संख्या वाढत गेली असून ती काही काळ कमी दिसेल. आलेख स्थिर होइलही पण ती स्थिती फसवी असण्याचा धोका अधिक आहे.

- दुसऱ्या संसर्गाची लाट जुलै व ऑगस्टमध्ये सुरू होऊ शकते. बेंगळुरू येथील आयआयएससीचे प्राध्यापक राजेश सुदर्शन यांनी या मताशी सहमती दर्शवली.

कोविड-19 नमुने गोळा करण्यासाठी DRDOने विकसित केली फिरती प्रयोगशाळा

- हैद्राबादमधले ESIC रुग्णालय आणि खाजगी उद्योगांच्या संयुक्त विद्यमाने संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (DRDO) रिसर्च सेंटर इमारत येथील संशोधकांनी एक मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी (MVRDL) विकसित केली आणि त्याला हैदराबादमध्ये तैनात केली आहे.

- 6 महिन्यांचा कालावधी आवश्यक असलेल्या फिरत्या जैव-सुरक्षा श्रेणी-2 आणि श्रेणी-3 प्रयोगशाळांची स्थापना 15 दिवसांच्या विक्रमी कालवधीत पूर्ण केली गेली आहे.

▪️ठळक वैशिष्ट्ये

- या चाचणी सुविधेत दिवसाला 1000 हून अधिक नमुन्यांची चाचणी होऊ शकते ज्यामुळे कोविड-19 विरुद्धच्या लढाईत क्षमता अधिक वृद्धिंगत होणार.

- कोविड-19 ची जलदगतीने चाचणी आणि संबंधित संशोधन आणि विकास कामांना गती देणारी अशाप्रकारची ही पहिलीच फिरती सुविधा आहे.

- ही फिरती प्रयोगशाळा BSL 3 प्रयोगशाळा आणि BSL 2 प्रयोगशाळेचे संयोजन आहे जे उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करण्यासाठी WHO आणि ICMR जैव सुरक्षा मानदंडांनुसार प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे.

-  या प्रणालीमध्ये विद्युत नियंत्रणे, लॅन, टेलिफोन केबलिंग आणि सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

संयुक्त राष्ट्रसंघ ‘इंग्रजी’ आणि ‘स्पॅनिश’ भाषा दिन: 23 एप्रिल


- दरवर्षी 23 एप्रिल या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘इंग्रजी भाषा दिन’ आणि ‘स्पॅनिश भाषा दिन’ पाळला जातो.

▪️पार्श्वभूमी

- संयुक्त राष्ट्रसंघाची 6 भाषांना मान्यता आहे. या सहाही भाषांना समान रूपाने उपयोगात आणण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी प्रत्येकी एक दिन पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषा आहेत –

▪️अरबी (18 डिसेंबर)

▪️फ्रेंच (20 मार्च)

▪️चीनी (20 एप्रिल)

▪️इंग्रजी (23 एप्रिल)

▪️स्पॅनिश (23 एप्रिल)

▪️रशियन (6 जून)

- 23 एप्रिलला प्रसिद्ध विल्यम शेक्सपियर यांचा जन्म आणि मृत्यू झाला. तसेच प्रसिद्ध लेखक मिगुएल डी. सर्वेन्टेस यांची पुण्यतिथी आणि अनेक महान लेखकांची जयंती याच दिवशी येते.

-  त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी 2010 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सार्वजनिक माहिती विभागाने भाषा दिनाची स्थापना केली.

- बहुभाषिक आणि सांस्कृतिक विविधता पाळणे तसेच संघटनेत सर्व सहा अधिकृत भाषेचा समान वापर होण्यास प्रोत्साहन देणे हा भाषा दिनाचा उद्देश आहे.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

चीन सीमेजवळ भारताचा नवा पूल, तोफांसह सैन्य वेगाने करु शकते कूच


- चीनच्या सीमेजवळ अरुणाचल प्रदेशमध्ये सुबानसिरी नदीवर बांधलेला पूल भारताने वाहतुकीसाठी खुला केला आहे. ४० टनापर्यंत भार पेलण्याची या पूलाची क्षमता आहे. त्यामुळे आपातकालीन परिस्थितीत या पूलावरुन तोफा नेता येतील तसेच सैन्य तुकडयांची जलदगतीने तैनाती करणेही शक्य होणार आहे.

- या पूलावरुन पुढच्या काही दिवसात भारत आणि चीनमध्ये शाब्दीक वादावादी होऊ शकते. सीमा भाग हा भारत आणि चीनमध्ये नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. अरुणाचलमधील हा पूल आणि सीमा भागात रस्त्याच्या दर्जामध्ये झालेली सुधारणा यामुळे सैन्याला आता विनाखंड आवश्यक साहित्याचा पुरवठा सुरु राहिल. रणनितीक दृष्टीकोनातून भारतासाठी हा पूल अत्यंत महत्वाचा आहे.

- भारताने शेजारी देशातून होणाऱ्या एफडीआय गुंतवणूकीसंदर्भात नियम अधिक कठोर केल्याने चीन भारतावर नाराज आहे. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर चिनी उद्योगांना भारतीय कंपन्यांचे सहजपणे अधिग्रहण करता येऊ नये, यासाठी एफडीआय नियमात काही बदल करण्यात आले आहेत.

- त्यावर चीनने आपला आक्षेप नोंदवला आहे. अरुणाचल प्रदेशवर चीन नेहमीच आपला दावा सांगत आला आहे. आता या पूलावरुन भारत-चीन संबंध आणखी बिघडू शकतात. भारताने आपले रणनितीक हित लक्षात घेऊनच या पूलाची उभारणी केली आहे. २०१७ साली डोकलामवरुन भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने आले होते.

- त्याच भागामध्ये हा पूल बांधण्यात आला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अजून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
---------------------------------------------------

संयम मोबाईल ॲप’ द्वारे पुण्यातील विलगीकरण केलेल्या रूग्णांवर ठेवले जाणार लक्ष.


- स्मार्ट शहर योजनेअंतर्गत(smart cities mission SCM) पुणे महानगरपालिकेने संयम नावाचे मोबाईल ॲप बनवले असून त्याद्वारे विलगीकरण केलेले रुग्ण घरातच रहात आहेत अथवा घराबाहेर पडत नाहीत, याची खातरजमा केली जाणार आहे.

- पुणे शहर व्यवस्थापनाने तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शहरातील घरगुती विलगीकरण केलेल्या रूग्णांवर निगराणी ठेवणे सुरु केले आहे. त्यासाठी शहरात घरगुती विलगीकरण केलेल्या रूग्णांवर दररोज लक्ष ठेवण्यासाठी  पाच विभागांमधून समर्पितपणे काम करणाऱ्या लोकांची पथके तयार केली आहेत.

- ही पथके परदेशातून प्रवास करून आलेल्या, तसेच कोविड-19 चे उपचार पूर्ण करून घरी पाठवलेल्या रूग्णांवर लक्ष ठेवतील.

- ही पथके या लोकांच्या तब्येतीची अद्ययावत माहिती मिळवतील तसेच त्या रूग्णांच्या सहवासात आलेल्या लोकांची देखील चौकशी करतील.घरगुती विलगीकरण केलेल्या, ज्यांच्यावर शिक्का मारला आहे, असे लोक आपले अन्न ,बिछाने,भांडी, कपडे आणि स्वच्छतागृहे वेगळी ठेवत आहेत किंवा नाही, याचीही खातरजमा करतील.

- संयम मोबाईल ॲप अशा लोकांनी डाऊनलोड केले आहे का,हे देखील पहातील.या मोबाईल ॲपमधे GPS ट्रँकींग बसवले असून घरगुती विलगीकरण केलेले लोक घराबाहेर पडतात का ते कळेल, त्यायोगे शहर आस्थापनेला त्याची माहिती मिळून विभागातील स्थानिक पोलिसांना त्याची वर्दी मिळेल.
---------------------------------------------------

विकास दरात होणार मोठी घट, फिचने दिली चिंता वाढवणारी बातमी

- करोना व्हायरसमुळे आधीच अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. आता फिच या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने चिंतेत भर घालणारी बातमी दिली आहे. फिचने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकास दरात आणखी घट वर्तवली आहे.

- भारताचा आर्थिक विकास दर ०.८ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. तीन आठडयांपूर्वी याच फिचने भारताचा आर्थिक विकास दर दोन टक्के राहिल असे म्हटले होते.

- जागतिक मंदीचे स्वरुप आणखी गंभीर होणार असल्याचा फिचचा अंदाज आहे. २०२० मध्ये चीनची अर्थव्यवस्था ०.७ टक्क्यांनी वाढेल. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेने २०२०-२१ मध्ये भारताचा विकास दर १.९ टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता.

-  त्याच काळात जागतिक बँकेने भारताचा विकासदर १.५ ते ४ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

- २०१९-२० मध्ये ग्राहकांचे खर्च करण्याचे प्रमाण ५.५ टक्के होते. ते घसरुन २०२०-२१ मध्ये ०.३ टक्के होईल असा फिचचा अंदाज आहे. भारतच नव्हे तर अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स, जपान या जगातील सगळयाच प्रमुख देशांच्या अर्थव्यवस्थांना करोना व्हायरसचा मोठा आर्थिक फटका बसेल असा अंदाज आहे.
---------------------------------------------------

२४ एप्रिल २०२०

भूगोल प्रश्नसंच

◾️जैतापूर उर्जा प्रकल्प कोणत्या देशाच्या सहकार्याने राबविला जाणार आहे ?

A) फ्रान्स✅

B) जपान

C) इंग्लंड

D) अमेरिका


◾️1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात _____ जिल्हे होते.

A) 26✅

B) 29

C) 35

D) 23


◾️'मुंबई राज्य' या द्वैभाषीक राज्याची स्थापना _____ रोजी झाली.

A) 1 मे 1960

B)  1 नोव्हे. 1956✅

C) 1 जाने. 1950

D) 15 ऑगष्ट 1947



◾️1 जुलै 1998 रोजी ____ या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.

A) उस्मानाबाद

B)  धुळे ✅

C) परभणी

D) भंडारा

◾️महाराष्ट्राच्या उत्तर सिमेवर कोणती पर्वतरांग आहे ?

A) सातमाळा

B) सातपुडा✅

C)  बालाघाट

D) सह्याद्


◾️खालील पैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे ?

A) वैराट ✅

B) अस्तंभा

C) हनुमान

D)  तौला


◾️कोंकणाचे हवामान _____ असते.

A) कोरडे

B)  विषम

C) सम✅

D) थंड


◾️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते ?

A)  लोणावळा

B) चिखलदरा ✅

C)  महाबळेश्वर

D)  माथेरान



◾️महाराष्ट्र राज्यास ______ कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे.

A) 720✅

B)  730

C) 740

D)  750


◾️_________ ही डोंगररांग कृष्णा व भिमा नद्यांचा जलविभाजक आहे.

A) शंभू महादेव✅

B)  हरिश्चंद्र बालाघाट

C)  सातपुडा

D) सातमाळा अजंठा


◾️महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली____________आहे.

A) भीमा

B) गोदावरी✅

C) कृष्णा

D) वैन गंगा


◾️नैर्ऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ?

A) आवर्त

B) आरोह

C)  प्रतिरोध✅

D) मान्सून पुर्व

◾️खालीलपैकी कोणता जिल्हा तळी व तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ?

A) सिंधुदुर्ग

B) भंडारा✅

C) सातारा

D)  सोलापूर


◾️कोयना धरणातील जलाशय__________  या नावाने ओळखला जाते.

A) शिवसागर ✅

B) वसंत सागर

C) शरद सागर

D) नाथ सागर


◾️महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र _____ या विभागात आहे.

A)  विदर्भ

B)  कोंकण

C) मराठवाडा✅

D)  नाशिक

◾️महाराष्ट्राच्या पठारावर _____ मृदा आढळते.

A) क्षारयुक्त

B) वाळुकामय

C) काळी✅

D) जांभी



◾️महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने ____ जिल्हयात आढळतात.

A)  सोलापूर

B) अहमदनगर✅

C) जालना

D) अमरावती



◾️तीळाच्या लागवडीसाठी _______हा जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे.

A)  सोलापूर

B)  कोल्हापूर

C)  जळगाव✅

D)  औरगाबाद


◾️महाराष्ट्रात _____ येथे खनिज तेल आढळते.

A)  अंकलेश्वर

B)  बॉम्बे हाय✅

C)  दिग्बोई

D) विशाखापट्टण


◾️तारापूर अणुविद्युत केंद्र _______ जिल्हयात आहे.

A)  रायगड

B) ठाणे✅

C) नाशिक

D) पुणे


◾️महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या _____ या जिल्हयात आहे.

A) चंद्रपूर

B) परभाणी

C) गडचिरोली✅

D)  लातूर


◾️महाराष्ट्रात प्रामुख्याने _____ उर्जेचा वापर केला जातो.

A)औष्णिक ✅

B) अणु

C) पवन

D)  नैसर्गिक गैस


◾️पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर ______वसलेले आहे.

A) कराड

B) पंढरपूर

C) औदुंबर

D) ✅ नृसिंहवाडी

महागाई भत्तावाढ स्थगित

केंद्राचा निर्णय; वाचलेल्या १.२० लाख कोटींचा वैद्यकीय सुविधांसाठी वापर
करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींमुळे केंद्र सरकारने गुरुवारी महागाई भत्त्यातील वाढ स्थगित करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी २०२० ते जून २०२१ या दीड वर्षांच्या काळात वाढीव भत्ता स्थगित करण्यात आला आहे. मात्र, विद्यमान १७ टक्के दराने महागाई भत्ता दिला जाईल, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने काढलेल्या सूचनापत्रात नमूद करण्यात आले आहे.
जानेवारी २०२०, जुलै २०२० आणि जानेवारी २०२१ अशी तीन हप्त्यांतील महागाई भत्तावाढ थांबवण्यात आली आहे. २०२०-२१ तसेच, २०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी महागाई भत्त्याची वाढ गोठवल्यामुळे केंद्राचे ३७,३५० कोटी रुपये वाचतील.
आता केंद्राने महागाई भत्त्यातील वाढ गोठवल्यामुळे महाराष्ट्रानेही महागाई भत्त्यातील वाढ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर राज्यांकडूनही त्याचा कित्ता गिरवला जाईल. त्यामुळे राज्यांचे ८२,५६६ कोटी रुपये वाचतील. म्हणजेच एकूण १.२० लाख कोटी रुपयांची बचत होईल. या पैशांचा वापर करोनासंदर्भातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केला जाणार आहे.
दीड वर्षे १७ टक्केच भत्ता लागू
* गेल्या महिन्यात केंद्र सरकारने महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली होती. त्यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी व निवृत्तिधारकांचा महागाई भत्ता २१ टक्के झाला होता. मात्र, ही वाढ लागू होणार नसून आधीचा १७ टक्के महागाई भत्ता दिला जाईल.
* गोठवलेल्या काळातील महागाई भत्त्याची थकबाकीही दिली जाणार नाही. जुलै २०२१ नंतर महागाई भत्तावरील स्थगिती रद्द केली गेल्यानंतर महागाई भत्त्याचे वाढीव दर जाहीर केले जातील, असे आदेशपत्रात नमूद करण्यात आले आहे.
* या निर्णयामुळे ४८.३४ लाख केंद्रीय कर्मचारी व ६५.२६ लाख निवृत्तिधारकांना वाढीव महागाई भत्त्याला मुकावे लागणार आहे.
राज्य सरकारकडून दोन दिवसांत आदेश
मुंबई : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी २०२० ते जून २०२१ दरम्यानचा १८ महिन्यांचा वाढीव महागाई भत्ता गोठविण्यात येणार असून, त्याबाबतचा आदेश दोन दिवसांत जारी करण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील सुमारे २२ लाख अधिकारी- कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे. करोनामुळे राज्य सरकारला महिन्याला सुमारे १६ हजार कोटींचा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे विकासकामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीला कात्री लावतानाच केंद्राचा कित्ता गिरवत महागाई भत्तावाढ रोखण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नव्या निर्णयाचा सुमारे तीन लाख अधिकारी, १९ लाख सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि जिल्हा परिषद कर्मचारी तसेच सात लाख निवृत्तिवेतनधारकांना फटका बसणार आहे.
मुंबईत ४७८ नवे रुग्ण
मुंबईत आणखी ४७८ रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्णांचा एकूण आकडा ४२३२ वर गेला आहे. दिवसभरात ८ रुग्णांचा मृत्यू झाला.
महसूल कर्मचाऱ्यांचे दरमहा एक दिवसाचे वेतन कापणार
करोनामुळे निर्माण झालेल्या आथिर्क कोंडीवर मात करताना दीड वर्षांचा महागाई भत्ता गोठविणाऱ्या के ंद्र सरकारने आता केंद्रीय महसूल कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वर्षभर एक दिवसाचा पगार पंतप्रधान निधीसाठी कापण्याचा निर्णय घेतला आहे.
वित्त मंत्रालयांतर्गत येणाऱ्या महसूल खात्याने कर्मचाऱ्यांच्या मार्च २०२१पर्यंतच्या दर महिन्याच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कापण्याचा निर्णय घेतला. त्याचा फटका प्राप्तिकर, वस्तू आणि सेवाकर, सीमा शुल्क मधील लाखो कर्मचाऱ्यांना बसणार आहे. याबाबतचे आदेश महसूल विभागाने जारी के ले असून पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी वेतन कपात करण्यास कोणाचा आक्षेप असेल तर त्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांकडे तो नोंदवावा, असेही या आदेशात म्हटले आहे.

राज्यसेवा प्रश्नसंच

◾️शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेले मि. ओबामा हे अमेरिकेचे ___ अध्यक्ष आहेत.

A) पहिले

B) दुसरे

C)  तिसरे

D) चौथे✅

◾️पहिल्या मुन मिशनमध्ये चंद्रावर पाण्याचा शोध लावणारा जगातील पहिला देश _ होय.

A) अमेरिका

B) रशिया

C) भारत✅

D) चीन

◾️अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेती पहिली स्त्री  होय.

A) अँग सँन सूखी

B) इलीनर ऑसट्रॉम✅

C) टॉनी माँरीसन

D) अदा इ यानथ

◾️19 वी शष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा _____ येथे संपन्न झाली.

A) मलेशिया

B) ऑस्ट्रेलीया

C) भारत✅

D)  इंग्लंड

◾️अरबी समुद्रात उभारल्या जाणा-या शिवाजी महाराजांच्या पुतळयाची एकूण उंची ___ फुट ठरविण्यात आली आहे.

A) 109   

B) 309✅   

C) 409

D) 209

◾️______ येथे झालेल्या जागतीक शिखर परिषदेमध्ये पृथ्वीचे तापमान नियंत्रीत ठेवण्याचे मुख्य उद्दिष्ठ ठरविण्यात आले.

A)  न्यू जर्सी

B)  नयूयॉर्क

C) कोपनहेगन✅

D)  केपटाऊन

◾️केंद्र सरकारने __ मध्ये वनहवक कायदा संमत केला.

A) जुन 2007

B)  डिसेंबर 2006✅

C)  जानेवारी 2007

D) डिसेंबर 2008

◾️“आय विल, बुई विल अॅण्ड इंडिया विल” हे प्रेरणा दायी घोषवाक्य कोणाचे आहे ?

A) डॉ. मन मोहन सिंग

B) लालकृष्ण अडवाणी

C) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम✅

D) राहुल गांधी

◾️भारतीय मिसाईल पृथ्वी III ची चाचणी कोणत्या ठिकाणी करण्यात आली ?

A) चांदिपूर ✅

B) श्रीहरी कोट्टा

C) चैन्नई

D) बंगलोर

◾️हेजेमोनी और सव्हयूवल या पुस्तकाचे लेखक कोण ?

A) नॉम चॉमस्की✅

B)  एस. पी. हंग्टन

C) फिदेल कास्त्रो

D)  ग्राहम वॉलस

@SB_Academy

◾️भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमाअंतर्गत 6 ते 14 वयोगटांतील मुलामुलींना शिक्षणाचा हक्क प्रदान करण्यात आला ?

A) कलम - 21(अ) ✅

B) कलम - 14

C) कलम - 19

D) कलम - 22

◾️कोणते विद्यापीठ संत गाडगेबाबा विद्यापीठ म्हणून ओळखले जाते ?

A) नागपूर विद्यापीठ

B) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

C) अमरावती विद्यापीठ ✅

D)  सोलापूर विद्यापीठ

◾️जागतिक वन दिन _ दिवशी साजरा केला जातो.

A)  11 मार्च

B)  21 मार्च✅

C)  09 मार्च

D)  24 मार्च

◾️खालीलपैकी कोणती योजना महाराष्ट्राचे सरकार शिक्षणक्षेत्राकरिता राबवीत नाही ?

A) सर्व शिक्षा अभियान   

B) महात्मा फुले शिक्षण हमी योजना   

C)  अहिल्याबाई होळकर योजना   

D) जवाहर योजना✅

◾️भारतीय राष्ट्रीय चळवळीतील खालील घटना क्रमवार पद्धतीने खाली दिलेल्या संकेत (कोडस्) प्रमाणे लावा

(1) गांधी-इरविन करार  

(2) कॅबिनेट मिशन

(3) राजगोपालचारी फॉर्म्युला

(4) पुणे करार

A)  3, 4, 2, 1

B) 1, 4, 3, 2 ✅

C) 4, 2, 1, 3

D)  2, 4, 3, 1

◾️______ हा महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रान्तिकारक होय.

A) वि. दा. सावरकर

B) वासुदेव बळवंत फडके✅

C)  दामोदर चाफेकर

D) अनंत कान्हेरे

◾️भारत आणि चीन यांनी कोणत्या वर्षी पंचशील करारावर सह्या केल्या ?

A) 1951

B) 1952

C) 1954✅

D) 1957

भारतात 'मिश्र अर्थव्यवस्थेचा' पुरस्कार कोणी केला ?

A) लाल बहादूर शास्त्री

B)  इंदिरा गांधी

C)  पंडित जवाहरलाल नेहरू✅

D)  राजीव गांधी

◾️"पॉव्हर्टी अँन्ड अन्-ब्रिटीश रुल इन इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A) दादाभाई नौरोजी✅

B) लाला लजपतरॉय

C) व्ही. डि. सावरकर

D)  लोकमान्य टिळक

◾️पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण, जातीवंत जनवरांची पैदास, फलोद्यान शास्त्र व वनसंरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम _ यांनी मांडल्या.

A) न्यायमूर्ती म. गो. रानडे

B)  महात्मा जोतीबा फुले ✅

C)  महाराज सयाजीराव गायकवाड़

D) छत्रपती शाहू महाराज

◾️सन 1962 मध्ये भारतावर चीनने हल्ला केला तेंव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?

A) व्ही. के कृष्णमेनन✅

B) वाय. बी. चव्हाण

C)  सरदार स्वर्णसिंग

D)  बाबू जगजीवनराम

◾️भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले ?

A) ऑगस्ट 1946

B)  सप्टेंबर 1945

C) ऑगस्ट 1945

D)  सप्टेंबर 1946✅

◾️2001 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रातले साक्षरता प्रमाण __% आहे.

A) 76.88% ✅

B)  88.76%

C) 71.42%

D) 42.71%

◾️कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प _  येथे आहे.

A)  कराड

B) खापरखेड़ा

C)  पारस

D)  शिवसमुद्रम✅

◾️'धवलक्रांती' हा शब्दप्रयोग खालीलपैकी कशाशी संबंधीत आहे ?

A)  पूर नियंत्रण

B)  दुग्धोत्पादन✅

C)   कागद निर्मिती

D) भ्रष्टाचार निर्मुलन

◾️पश्चिम बंगाल मधील कोणते स्थान कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे ?

A) सिंगभूम

B) राणीगंज✅

C) खेत्री

D) झरिया

◾️महाराष्ट्रातील कोणते ठिकाण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे ?

A) महाबलेश्वर✅

B) रत्नागिरी

C) नाशिक

D) नागपुर

◾️खालील कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे ?

A) हिराकूड

B) जायकवाडी✅

C)  कोयना

D)  भाक्रा-नांगल

◾️महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?

A)  सह्यांद्री

B)  सातपूडा✅

C) मेळघाट

D) सातमाळा

◾️सन् 1969 मध्ये 320 में. क्षमतेचे पहिले अणुउर्जा केंद्र  येथे स्थापन झाले .

A) नरोरा 

B) रावत भाटा

C) तारापूर✅

D) कल्पकम

◾️महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी दुस-या क्रमांकाचा जिल्हा कोणता ?

A) अहमदनगर

B) नाशिक

C) पुणे ✅

D) सोलापूर

◾️जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो ?

A)  जिल्हाधिकारी

B)  जिल्हा पोलीस अधिकारी

C) मुख्य कार्यकारी अधिकारी✅

D)  जिल्हा परिषदेचा अध्यक्ष

◾️ग्रामपंचायतीचा दैनंदिन राज्यकारभार ____ पाहतात.

A) सरपंच

B)  ग्रामसेवक ✅

C)  ग्रामसभा

D)  पंच

◾️जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्वाची भूमिका ____ समितीची होय.

A) स्थायी✅

B)  अर्थ

C)  शिक्षण

D)  समाजकल्याण

◾️जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील निर्वाचित आणि पदसिद्ध सदस्यांच्या सर्वसाधारण सभेची बैठक  __ महिन्यातून एकदा होते.

A) चार

B) दोन

C) तीन ✅

D) सहा

◾️_______ हा पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख असतो.

A) विस्तार अधिकारी

B)  मुख्य कार्यकारी अधिकारी

C) मुख्याधिकारी

D) गट विकास अधिकारी✅

◾️स्थानिक कारभारात लोकांचा सहभाव वाढावा यासाठी _ ची स्थापना केली जाते.

A)  स्थायी समिती

B) विषय समिती

C)  प्रभाग समिती ✅

D) शिक्षण समिती

◾️तहसिलदार यांना निलंबीत करण्याचा अधिकार ____ यांना असतो,

A) पंचायत समिती सभापती

B) जिल्हाधिकारी

C) गट विकास अधिकारी

D) राज्यपाल✅

◾️सरपंच किंवा उपसरपंच याची एकदा निवड झाल्यावर त्या दिवसापासून __ कालावधीपर्यंत त्यांच्यावर कोणताही अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही.

A)  6 महिने

B)  12 महिने ✅

C) 3 महिने

D) 9 महिने

◾️एका धातुच्या गोलाचा व्यास 6 सेमी. आहे. हा गोल वितळवून, त्याची एकसमान जाडीची तार तयार केली. जर या तारेची लांबी 36 मी. असेल तर, तीची त्रिज्या काढा.

A) 0.1 मिमी

B)  1 मिमी✅

C)  1 सेमी

D) 0.5 सेमी

◾️EJOT हा शब्द विशिष्ट नियमानुसार लिहिला आहे. पुढील शब्दासाठी हा नियम वापरून या नियमानुसार लिहिलेला शब्द ओळखा.

A) ZUPK✅

B) WTQN

C)  DGJM

D) ACEG

◾️जर C = 6 व 7= 14 असेल तर त्याच नियमाने 4214 चे योग्य शाब्दिक रूपांतर कोणते होईल ?

A)  AGA

B)  GAB

C)  AGB

D)  BAG✅

🔹जगातील सर्वाधिक वेगवान सुपर संगणक कोणता ? (जून 2018 अखेर)

A)  टियान्हे (चीन)   

B) सनवे टायलाईट (चीन)   

C)  समीट (अमेरिका)    ✅

D)  टायटन (अमेरिका)

🔹मौर्य पूर्व काळात भारत _____ म्हणून ओळखला जाई.

A) द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज✅

B) द क्वीन ऑफ द वेस्टर्न सीज

C) द क्वीन ऑफ द सदर्न सीज

D) द क्वीन ऑफ द एरिथ्रियन सी

🔹अकेमेनिड विजया नंतर भारताच्या सीमेवर, विशेषकरुन कंबोज मध्ये ___ हा नवा उद्योग सुरु झाला.

A)  जहाज बांधणी

B) ब्लँकेट बनविणे ✅

C) हातमाग साडया बनविणे

D) भांडी बनविणे

🔹पुढील पैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता ?

A) काशिनाथराव वैद्य✅

B) दिनकरराव जवळकर

C)  माधवराव बागल

D) दादासाहेब सुर्वे

◾️समोरासमोर, हालहाल, एकेक या शब्दांचा प्रकार ओळखा.

A)  पूर्णाभ्यस्त शब्द ✔️

B) अनुकरणवाचक अभ्यस्त शब्द

C) अंशाभ्यस्त शब्द

D)  यापैकी नाही

◾️'ऋणानुबंधाच्या गोष्टी बोलता-बोलता रात्र केव्हा उलटून गेली हे कळलेच नाही'-या वाक्यातील 'ऋणानुबंध' या शब्दाचे अर्थ खाली दिलेले आहेत. त्यातील लागू न पडणारा एक अर्थ निवडा व त्याचा पर्याय लिहा.

A) चालू सुखदु:खांचा पूर्व जन्माशी असलेला संबंध

B) योगायोग

C) ईश्वरी सूत्र

D) अतिशय सूक्ष्म व गुप्त गोष्टी✅

◾️“आम्ही त्या दिवशी सकाळी दहा वाजता साता-यास जाण्याची खटपट केली' या विधानातील कर्म कोणते आहे ?

A) आम्ही

B) सकाळी दहा वाजता

C) त्या दिवशी

D) साता-यास जाण्याची खटपट✅

◾️पुढीलपैकी तेलगू शब्दांचा गट ओळखा.

A)  गुंडी, चप्पल

B) अनरसा, शिकेकाई ✅

C)  थाली, दादर

D) गुडघाहाड


◾️देशातील पहिले डिजीटल खेडे कोणते आहे?

A)  अकोदरा✅

B) रावतभाटा

C) बडोदरा

D)  मानकापूर

◾️वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर ३० से.मी. असून वर्तुळाची त्रिज्या ३४ से.मी. आहे तर त्या जीवेची लांबी काढा?

A)  १६ से.मी.

B)  ३२ से.मी.✅

C)  ४० से. मी.

D)  ६० से.मी.

◾️एका सांकेतिक भाषेत BST = 21920 तसेच  AIR = 1918 तर CAT=?

A) 3121

B) 1321

C) 3120✅

D) 3211

◾️द टर्बुलेट इयर्स’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?

A)  प्रणव मुखर्जी ✅

B) शरद पवार

C) लालकृष्ण आडवाणी

D) बरखा दत्त

◾️जर * म्हणजे / , / म्हणजे + , + म्हणजे – आणि – म्हणजे * तर  20*4/5+4-1 म्हणजे किती?

A) 4

B) 1

C) 6✅

D) 5

◾️सचिन अनिलच्या दाविकडे बसलेला आहे. रमेश अनिलच्या उजवीकडे बसलेला आहे व सचिन सुरेशच्या मध्ये चेतन बसला तर सर्वात डावीकडे कोण बसेल?

A) अनिल

B) सुरेश✅

C) रमेश

D) चेतन

◾️भारतीय राज्याघटनेच्या कलम ७६ मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली?

A) अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया✅

B) कंट्रोलर ऍड ऑडीटर जनरल ऑफ इंडिया

C)  ऑडीटर जनरल ऑफ इंडिया

D)  सर्वोच्य न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

◾️खालील मालिका पूर्ण करा.

ab_da_c_abc_abcd?

A)  cbdd✅

B) abcd

C)  ddcb

D) bcad

◾️धुळे-नागपूर -कोलकाता महामार्ग हा कोणता आशियाई महामार्ग आहे?

A) AH-48

B) AH-45

C) AH-47

D) AH-46✅

◾️खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा?

A) मंगळ

B) राहू✅

C) बुध

D) गुरु

◾️उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबधित आहे?

A) विद्युत✅

B) पाणी

C)  परमाणु

D) कृषी

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...