१९ एप्रिल २०२०

अन्नपचन प्रक्रिया

🌾सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्‍या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात.

🌾अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात.

🌾या स्त्रावामध्ये विकरे, आम्ल, उत्प्रेरक, यांचा समावेश होते.

🌾या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते.

🌾खाल्लेले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो. अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.  

आँटॅरिओ सरोवर

उत्तर अमेरिका खंडातील पंचमहा सरोवरांपैकी सर्वांत लहान आणि पूर्वेकडील सरोवर. ८५ किमी. रुंद व ३१० किमी. लांबीच्या या अंडाकृती सरोवराचे पृष्ठक्षेत्रफळ १९,४७७ चौ.किमी. असून त्याशिवाय सरावराचे एकूण जलवाहनक्षेत्र ९०,१३० चौ.किमी. आहे. समुद्रसपाटीपासून हे ७५ मी. उंचीवर असून त्याची जास्तीत जास्त खोली २३७ मी. आहे १६१५ मध्ये फ्रेंच समन्वेषक शांप्लँ व त्याच्या सहकाऱ्यांनी या सरोवराचा शोध लावला. १७६३ च्या सुमारास फ्रेंचांकडून याचा ताबा ब्रिटिशांकडे आला. हिमयुगीन घडामोडीत निर्माण झालेली ही सरोवरे आहेत. आँटॅरिओ सरोवराला मिळणारी नायगारा ही प्रमुख नदी असून जेनेसी, ऑस्वीगो व ब्लॅक या दक्षिणेकडून व ट्रेंट ही उत्तरेकडून मिळते. सरोवराच्या अगदी पूर्वेस पाच बेटे असून तेथूनच सेंट लॉरेन्सचा प्रवाह सुरू होतो. किंग्स्टन, टोरँटो, हॅमिल्टन ही या सरोवरावरील कॅनडाची व रॉचेस्टर आणि ऑस्वीगो ही अमेरिकेची प्रमुख बंदरे आहेत. सेंट लॉरेन्स मुखाकडील प्रदेश हिवाळ्यात गोठत असल्याने या सरोवरातून मर्यादित वाहतूक चालते. ईअरी सरोवराशी नायगारा धबधबा टाळून वेलंड कालव्याने व ह्यूरन सरोवराशी ट्रेंट कालव्याने हे जोडलेले आहे. ‘सेंट लॉरेन्स सी वे’  झाल्यापासून वाहतुकीत सुधारणा झाली आहे.

वृत्तपत्र : संस्थापक


◾️ प्रभाकर   :   भाऊ महाजन

◾️ ज्ञानदर्शन  :  भाऊ महाजन

◾️ हिंदू         :   बी राघवाचार्य

◾️ दिनबंधु    : कृष्णराव भालेकर

◾️ तेज         : दिनकरराव जवळकर

☘☘☘🌷🌷☘☘☘🌷🌷☘☘

◾️ निंबधमला : विष्णुशास्त्री चिपळूणकर

◾️ ज्ञानसिंधु   : विरेश्वर छत्रे

◾️ दिनमित्र    : मुकुंदराव पाटील

◾️ इंडिया      : दादाभाई नौरोजी

☘☘☘🌷☘☘☘🌷☘  🌺☘☘

◾️ प्रताप        :    गणेश शंकर विद्यार्थी

◾️इंदूप्रकाश   : विष्णुशास्त्री पंडित

◾️बंगाली      :  एस एन बॅनर्जी

◾️ सुधारक     : गो ग आगरकर

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

स्टेट बँक ऑफ इंडिया

                     भारतीय स्टेट बँक ( एसबीआय ) ही एक भारतीय बहुराष्ट्रीय , सार्वजनिक क्षेत्रातील बँकिंग आणि वित्तीय सेवा वैधानिक संस्था आहे. हे मुंबई, महाराष्ट्रात मुख्यालय असलेले एक सरकारी संस्था आहे .  2018 च्या जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेशनच्या फॉर्च्युन ग्लोबल S०० च्या यादीमध्ये एसबीआय  21 व्या स्थानावर आहे.  Assets एकूण कर्जाच्या चौथ्या भागाच्या हिस्सा असलेल्या मालमत्तेत २% हिस्सा असून ही भारतातील सर्वात मोठी बँक आहे. 
                      इम्पीरियल बँक ऑफ इंडिया मार्फत 1960 मध्ये स्थापन झालेल्या बँक ऑफ कलकत्ता येथून ही बँक खाली येते आणि ती भारतीय उपखंडातील सर्वात जुनी व्यावसायिक बँक बनली . बँक मद्रास ब्रिटिश भारत, इतर दोन "अध्यक्षपद बँका" विलीन कलकत्ता बँक आणि बँक ऑफ मुंबई तयार करण्यासाठी, शाही बँक ऑफ इंडिया वळण 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया झाला,  1955 मध्ये भारतीय सरकारने इम्पीरियल बँक ऑफ इंडियाचा ताबा घेतला आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (भारताची मध्यवर्ती बँक) हिस्सा घेऊन स्टेट बँक ऑफ इंडिया असे नामकरण केले.

शेजारी राष्ट्रांसाठी थेट गुंतवणुकीचे नियम कठोर

- भारताशी सीमा भिडलेल्या चीनसह शेजारी राष्ट्रातून विदेशी गुंतवणुकीला पूर्वमंजुरी घेणे सक्तीचे करणारे पाऊल केंद्र सरकारने शनिवारी टाकले. करोना कहराच्या काळात देशातील कंपन्यांना सावज करून, संधीसाधू ताबा आणि संपादनाच्या व्यवहारांना पायबंद घातला जावा, या उद्देशाने हे निर्देश आले आहेत.

- करोनामुळे विविध क्षेत्रांतील कंपन्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहेत. अशा भारतीय कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक करून त्या ताब्यात घेतल्या जाऊ शकतात. विशेषत: चिनी कंपन्यांकडून हा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, हे लक्षात घेऊन थेट परकीय गुंतवणुकीचे नियम बदलण्यात आले आहेत. यापूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन शेजारील राष्ट्रांसाठी ‘सरकारी परवानगी’चा लागू होता. त्यात आता चीनचाही समावेश आहे.

- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आपल्या म्हणण्याला योग्य प्रतिसाद देऊन थेट गुंतवणुकीचे नियम कठोर केल्याबद्दल केंद्र सरकारचे धन्यवाद, असे ट्वीट राहुल यांनी केले.

▪️निर्णय का?

- गेल्या काही वर्षांत भारताने परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी थेट गुतंवणुकीचे नियम शिथिल केले होते. काही क्षेत्रांमध्ये केंद्र सरकारच्या परवानगीविना परदेशी मालकीच्या कंपन्यांना भारतीय कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक करता येते. पण संरक्षण, दूरसंचार, औषधनिर्मिती, अणुऊर्जा, अवकाश तंत्रज्ञान आदी १७ क्षेत्रांमध्ये केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय थेट गुंतवणूक करता येत नाही.

- करोनामुळे निर्माण झालेल्या आपत्तीच्या काळात संधिसाधूपणा दाखवून भारतीय कंपन्यांचा ताबा घेण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
---------------------------------------------------

सोमवारपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि स्टेशनरीची ऑनलाइन विक्री सुरू.


🎇 देशात टाळेबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात येत्या २० एप्रिलपासून मोबाईल फोन आणि काही इलेक्ट्रिक वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीला सरकारनं परवानगी दिली आहे.

🎇 टाळेबंदीच्या  सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी जारी केल्या, यात ही परवानगी देण्यात आली. यामुळे अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यांसारख्या ऑनलाईन संकेतस्थळांवरून मोबाईल फोन, टीव्ही, फ्रीज, लॅपटॉप आणि अन्य स्टेशनरी वस्तू खरेदी करता येणार आहेत.

🎇 या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं तैनात केलेल्या वाहनांसाठी संबंधित परवानगी घ्यावी असं गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 

   
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांवर ‘रासुका’खाली कारवाई.


उत्तरप्रदेशात करोना विषाणूविरुद्धच्या लढय़ात कर्तव्य बजावणारे पोलीस, तसेच आरोग्य आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.करोनाबाबतच्या आढावा बैठकीत गुरुवारी हे निर्देश देतानाच, हिंसाचारात सहभागी असलेल्यांना मालमत्तेचे नुकसान भरून द्यायला लावावे, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

तर अशा लोकांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये आणि भारतीय दंड संहितेनुसारही कठोर कारवाई करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.तसेच एखादी व्यक्ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी किंवा कायदा व सुव्यवस्थेसाठी धोका आहे अशी अधिकाऱ्यांची खात्री झाल्यास त्याला कुठलाही आरोप न ठेवता 12 महिन्यांपर्यंत कैदेत ठेवण्याचा अधिकार कठोर अशा राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये देण्यात आला आहे.

अर्थमंत्रीचा जागतिक बँक आणि जागतिक नाणेनिधीच्या विकास समितीच्या बैठकीत सहभाग


17 एप्रिल 2020 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नियामक मंडळाच्या मंत्रीस्तरीय विकास समितीच्या 101 व्या पूर्ण सत्रात सहभाग घेतला.

या बैठकीत मुख्यतः कोविड-19 च्या आप्तकालीन परिस्थितीत, जागतिक बँकेचा प्रतिसाद, आणि कोविड19 कर्जविषयक निर्णय, आंतरराष्ट्रीय विकास संघटनेच्या सदस्य देशांना मदत करण्यासाठीचे आंतरराष्ट्रीय निर्णय यावर प्रामुख्याने चर्चा झाली.

*भारत सरकारने उचलेली पाऊले*

केंद्र सरकारने, समाजातील दुर्बल घटकांना मोफत आरोग्य सुविधांसह, 23 अब्ज डॉलर्सचे पैकेज घोषित केले आहे. यात आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत विमा, रोख रक्कम हस्तांतरण, मोफत अन्नधान्य आणि गैस वितरण, आणि बाधित कर्मचाऱ्‍यांना सामाजिक सुरक्षा अशा उपाययोजनांचा समावेश आहे.

या अचानक आलेल्या आर्थिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी, कंपन्यांना, विशेषतः लघू आणि मध्यम उद्योगांना मदत करण्यासाठी,सरकारने, प्राप्तीकर, जीएसटी, अबकारी, वित्तीय सेवा आणि कॉर्पोरेट व्यवहार अशा सर्व ठिकाणी कायदेशीर आणि नियामक बाबींमध्ये सवलती जाहीर केल्या आहेत.

*जागतिक बँक*

जागतिक बॅंक (World Bank) ही एक आंतरराष्ट्रीय वित्त व पतपुरवठा संस्था आहे. संस्थेची स्थापना 1944 साली झाली. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी येथे जागतिक बॅंकेचे मुख्यालय आहे.

संस्थेच्या स्थापनेसाठी ब्रेटन वुडस् सिस्टम समितीच्या जागतिक आर्थिक नियंत्रण शिफारशीं वापरण्यात आल्या होत्या. विकसनशील देश व अविकसित देश यांना विकासासाठी कर्जपुरवठा करणारी संस्था असे याचे स्वरूप आहे.

*आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)*

ब्रेटोन वूड्स परिषदेत जागतिक बँकेसोबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund –IMF) या वित्तीय संस्थेची स्थापना 27 डिसेंबर 1945 रोजी झाली आणि प्रत्यक्ष कामकाज 1 मार्च 1947 रोजी सुरू झाले. त्याचे वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका) येथे मुख्यालय आहे.

देय करावयाची शिल्लक रक्कम भरण्यास येणार्‍या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संकटात व्यवस्थापनाविषयीच्या बाबींमध्ये ही बँक आपली भूमिका बजावते. तसेच जागतिक आर्थिक सहयोग वाढविणे, आर्थिक स्थिरता सुरक्षित करणे, आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करणे, उच्च रोजगार आणि दीर्घकालीन आर्थिक वाढीला चालना देणे आणि दारिद्र्य कमी करणे यादृष्टीने ही बँक कार्य करते.

सर्वाधिक काळ विना मंत्रिमंडळ सरकार चालवणारे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान

♦️..

कोणत्याही मंत्रिमंडळाशिवाय सरकार चालवणारे ते देशातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

हा रेकॉर्ड मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या नावावर झाला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या सरकारला आता २६ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळाची स्थापना करता आली नव्हती.

यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी २५ दिवस मंत्रिमंडळाविना सरकार चालवलं होतं आणि २६ व्या दिवशी मंत्रिमंडळाची स्थापना केली होती. दरम्यान, देशभरात तसंच मध्य प्रदेशात सुरू असलेल्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवराज सिंग चौहान यांना मंत्रिमंडळाची स्थापना करता आली नाही. तसंच कोणत्याही मंत्रिमंडळाशिवाय सरकार चालवणारे ते देशातील पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

शेतमालाची वाहतूक सुलभ करण्यासाठी नवे ‘किसान रथ’ मोबाइल अॅप

🔰 अन्नधान्य (तृणधान्य, भरडधान्ये, कडधान्ये इ.), फळे व भाजीपाला, तेलबिया, मसाले, तंतुमय पिके, फुले, बांबू, लवंग आणि किरकोळ वनोत्पादन, नारळ इत्यादी शेती उत्पादनांच्या वाहतुकीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वाहतूक साधनांची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी “किसान रथ” अॅप तयार केले आहे.

🔰विविध गोष्टींच्या वाहतुकीसाठी वाहतुकीचा योग्य पर्याय कोणता ते शेतकरी आणि व्यापाऱ्यांना समजून घेता येते. या अ‍ॅपवर नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी (शीतगृह सुविधेद्वारे) व्यापाऱ्यांना मदत होते.

🔰कृषी आणि बागायती उत्पादनाच्या प्राथमिक आणि दुय्यम स्तरावरील वाहतुकीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वाहतूक साधनांची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी राष्ट्रीय माहिती केंद्राने (NIC) तयार केलेल्या शेतकऱीस्नेही मोबाईल अ‍ॅपचे अनावरण केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते केले गेले.

🔰शेतातून बाजारापर्यंत, शेतकरी उत्पादक संस्था संकलन केंद्रापर्यंत आणि गोदामापर्यंत शेतमालाची वाहतूक ही प्राथमिक वाहतुकीत समाविष्ट आहे. द्वितीय स्तरावरील वाहतुकीत बाजारातून शेतमालाची राज्यांतर्गत किंवा आंतरराज्यातील बाजारपेठेत, प्रक्रिया केंद्रात, रेल्वे स्थानकात, गोदामात आणि घाऊक व्यापाऱ्यांकडे वाहतूक करणे अभिप्रेत आहे.

🔰बंदीच्या काळात शेतकरी आणि शेतीविषयक कामांची गैरसोय होणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी आणि अखंडीत व्यवसायासाठी कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागाने पुढीलप्रमाणे विविध उपाययोजना केल्या आहेत,

🔰जलद गतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी रेल्वेने 567 विशेष पार्सल गाड्या चालविण्यासाठी 65 मार्ग सुरू केले. या गाड्यांमधून देशभरात 20,653 टन माल वाहतूक झाली आहे.

🔰प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-किसान) योजनेच्या अंतर्गत 24 मार्च 2020 पासून सुरु झालेल्या संचारबंदीच्या कालावधीत आतापर्यंत सुमारे 8.78 कोटी शेतकरी कुटुंबांना 17,551 कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे.प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत सुमारे 88,234.56 मेट्रिक टन डाळ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आली आहे.

भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी


●अशोक =  देवानाम प्रिय प्रियदस्स

●समुद्रगुप्त =  भारताचा नेपोलियन

●चंद्रगुप्त मौर्य  = सॅन्ड्रीकोटेस

●बिंदुसार = अमित्रोकोटेस

● कनिष्क = देवपुत्र

● गौतमीपुत्र सातकर्णी = त्रीसमुद्रतोयपितवाहन

● राजराजा = शिवपाद शिखर

● राजेंद्र प्रथम = गंगाईकोंडचोल

●चंद्रगुप्त द्वितीय = विक्रमादित्य

● कुमार गुप्त = महेंद्रादित्य

● चंद्रगुप्त प्रथम = महाराजाधिराज

● धनानंद = अग्रमिस

● नागार्जुन = भारताचा आईन्स्टाईन

● हर्षवर्धन = शिलादित्य

● पुलकेशी द्वितीय = परमेश्वर

● अश्वघोष = भारताचा कांत, वॉल्टेअर

● बलबन = उगलु खान

● मुहम्मद बिन तुघलक = जुना खान

● गियासुद्दीन तुघलक = गाजी मलिक

● जहांगीर = सलीम

● शेरशाह = शेरखान

● मलिक सरवर = मलिक उस शर्क

● जगत गोसाई = जोधाबाई

● शहाजहान = शहजादा

● औरंगजेब = जिंदा पिर

● बहादुर शहा प्रथम = मुअज्जम

● व्योमेशचंद्र बॅनर्जी = नखशिखांत इंग्रज

● उमाजी नाईक = आद्य क्रांतिकारक

● राजा रणजितसिंग = आधुनिक भारताचा नेपोलियन

● बाळाजी बाजीराव = नानासाहेब

● माधवराव नारायण = सवाई माधवराव

● जवाहरलाल नेहरू = चाचा 

● खानअब्दुल गफारखान = सरहद्द गांधी

● चित्तरंजन दास = देश बंधू

● सुभाष चंद्र बोस = नेताजी

● जयप्रकाश नारायण = लोकनायक

● अण्णाभाऊ साठे = लोकशाहीर

● सरोजिनी नायडू = गानकोकिळा

●के केप्पलन = दक्षिणेकडील गांधीजी

● वीरेशलिंगम पंतलु = दक्षिणेकडील राजा राम मोहन राय

● ई.व्ही.रामास्वामी = पेरियार

● वल्लभभाई पटेल = लोहपुरुष

● छत्रपती शाहू महाराज = राजर्षी

आजची प्रश्न मंजुषा

Q. अमेरिकेतील अलाबामा राज्यातून----------यांची सिनेटर म्हणून निवड झाली आहे?

1)रॉय मुर
2)ग्लेन मार्क
3)स्मिथ डेव
4)डग जोन्स✅✅

Q. खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये प्रभाग हे नियोजन व विकासाचे एकक असल्याने पंचायत समिती सामर्थ्यशाली आहे?

अ. महाराष्ट्र
ब. गुजरात
क. राजस्थान
ड. आंध्रप्रदेश

पर्याय:
1. फक्त अ आणि ब
2. फक्त क आणि ड✅✅
3. फक्त ड
4. वरीलपैकी एकही राज्यात नाही.

Q. पुढील वैशिष्ट्ये कोणत्या शहराची किंवा गावाची आहे ते ओळखा.

अ. येथे भद्रा मारुतीचे पुरातन मंदिर आहे.
ब. येथे औरंगजेब बादशहाची कबर आहे.
क. येथून जवळच म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण आहे.
ड. दर सोमवती अमावस्येला या ठिकाणी मोठी यात्रा भरते.

पर्याय..👇
1] दौलताबाद*l
2] खुलताबाद✅✅
3] वेरूळ
4] अजिंठा

Q. हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित pH (सामू) संकल्पना कोणी मांडली

A) सोन्स
B) अँड सब्ज़सन्स.
C) जॉन लोहनस्ल.
D) सोरेन्सन.✅✅
E) यापैकी नाही.

Q. कृत्रिम बुद्धिमत्तेवर बोलवली जाणारी भारतातली पहिली परिषद ठरणारी ‘RAISE’  याचे संपूर्ण नाव काय आहे?

1]  Responsible AI for Social Empowerment 2020✅✅

2]  Responsible AI for Scientific Empowerment 2020

3]  Rebooting AI for Social Empowerment 2020  

4]  Rebooting AI for Scientific Encouragement 2020  

Q. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?

A) औष्णिक विद्युत ऊर्जा ✅✅
B) आण्विक ऊर्जा 
C) जल विद्युत ऊर्जा
D) यापैकी नाही

Q. सन 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते शहर दशलक्षी शहर नाही

A. नांदेड✅✅
B. कल्याण-डोंबिवली
C. ठाणे
D. नाशिक

Q. भारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 

A) 1961
B) 1974
C) 1985 ✅✅
D) 2010

Q. भारतीय राष्ट्रीय विज्ञान ॲकॅडमी च्या अध्यक्षपदी नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत?

1)उत्कर्ष सिन्हा
2)प्रिती पटेल
3)चंद्रमा शहा ✅✅
4)गीता सिंग

Q. 'लिगसी ऑफ लर्निंग' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली कादंबरी कोणी लिहिली?

(A) सविता छाबरा ✅✅
(B) तवलीन सिंग
(C) भालचंद्र मुणगेकर
(D) सलमान रश्दी

Q. कोणत्या व्यक्तीच्या स्मृतीत मानवी हक्क उल्लंघनाची सत्यता जाणण्याचा हक्क आणि पीडितांचा सन्मान विषयक आंतरराष्ट्रीय दिन पाळतात?

(A) लियू झियाबो
(B) अर्नल्फो रोमेरो ✅✅
(C) मार्टिन एन्नाल्स
(D) नटालिया एस्टेमिरोव्हा

जागतिक हिमोफिलिया दिन: 17 एप्रिल

📗​

- जागतिक हिमोफिलिया महासंघ (WFH) यांच्या नेतृत्वात रक्तस्त्राव विकाराने ग्रसित समुदायाद्वारे 17 एप्रिल 2020 रोजी जागतिक हिमोफिलिया दिन साजरा केला जातो.

▪️उद्दीष्ट: शरीराच्या काही भागांमधून किंवा नाकपूड्यामधून अचानकपणे रक्तस्त्राव होण्याच्या विविध विकारांविषयी जागृती पसरवणे हे या दिवसाचे आहे.

- 2020 या वर्षाची संकल्पना: यंदा हा दिन ‘गेट+इनवॉल्व्ड व्हर्चूयली अँड स्टे सेफ’ या संकल्पनेखाली पाळण्यात आला.  

▪️पार्श्वभूमी

- फ्रँक शॅनाबेल यांच्या जयंतीनिमित्त जागतिक हिमोफिलिया दिन पाळतात. फ्रँक शॅनाबेल हे एक उद्योगपती होते, जे गंभीर हिमोफिलिया घेऊन जन्मले होते.

- जागतिक हिमोफिलिया महासंघ (WFH) याची स्थापना 1963 साली फ्रँक शॅनाबेल यांनी केली होती. संस्थेचे मुख्यालय मॉन्ट्रियल (कॅनडा) येथे आहे.

- जागतिक हिमोफिलिया महासंघ (WFH) कडून रक्तस्त्रावाचा विकार असलेल्या लोकांचे निदान आणि उपचार पद्धती मोठ्या प्रमाणात सुधारण्यासाठी ग्लोबल अलायन्स फॉर प्रोग्रेस (DAP) कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

▪️हिमोफिलिया आजार

- हिमोफिलिया हा अनुवांशिक आजार आहे. हा आजार अनुवांशिकरित्या पालकांकडुन त्यांच्या मुलांना होतो. गुणसुत्रांतल्या दोषांमुळे हा आजार होत असुन आईकडुन मुलाला किंवा मुलाला गर्भावस्थेपासुन होण्याची शक्यता असते.

- हिमोफिलियाचे दोन प्रकार आहेत - हिमोफिलिया A (क्लोटिंग फॅक्टर 8 याच्या कमतरतेमुळे दर 5000 पुरुषांपैकी एकाला होतो) आणि हिमोफिलिया B (क्लोटिंग फॅक्टर 9 याच्या कमतरतेमुळे दर 30000 पुरुषांपैकी एकाला होतो).

-क्लोटिंग फॅक्टरच्या कमतरतेमुळे जखम झाल्यानंतर रक्त गोठण्याची प्रक्रिया मंद असते आणि अधिक काळ उस्फुर्तपणे रक्तस्त्राव होतो.

१८ एप्रिल २०२०

महत्त्वाचे सामान्य ज्ञान

1) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य ?
-- राजस्थान
SMB Preparation
2) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठे राज्य?
-- उत्तरप्रदेश

3) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- गोवा

4) भारतातील लोकसंख्येनुसार सर्वात लहान राज्य?
-- सिक्कीम

5) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा?
-- लेह ( लदाख )

6) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- माही ( पददूचेरी )

7) भारतातील क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश?
-- अंदमान निकोबार

8) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- लक्षद्वीप

9) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश ?
-- दिल्ली

10) भारतातील लोकसंख्यानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- दिबांग व्हॅली ( अरुणाचल प्रदेश )

प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान

🖌दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.

🖌परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.

🖌सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.

🖌प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

🖌परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.

🖌मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.

🖌सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.

📚प्रार्थना समाजाचे कार्य📚

🖌प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.

🖌न्या. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.

🖌ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.

🖌देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🖌अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

🖌प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.

🖌मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.

🖌४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.

🖌मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.

🖌इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.

🖌इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.

🖌प्रार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.

📚प्रार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन📚

🖌प्रार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले. त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...