१२ एप्रिल २०२०

General Knowledge

▪️ “माय एन्काऊंटर्स इन पार्लीमेंट” हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर : भालचंद्र मुणगेकर

▪️ भारतातल्या गुगल क्लाऊड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोण आहे?
उत्तर : करण बाजवा

▪️ सिंगापूरमध्ये होणाऱ्या ‘जागतिक शहरे शिखर परिषद-2020’ याचा विषय काय आहे?
उत्तर : लिवेबल अँड सस्टेनेबल सिटीज: अ‍ॅडॉप्टिंग टू ए डिसरप्टेड वर्ल्ड

▪️ कोणत्या कंपनीच्या सहकार्याने "इनोव्हेट फॉर अॅक्सेसीबल इंडिया’ ह्या उपक्रमाचा आरंभ करण्यात आला?
उत्तर : मायक्रोसॉफ्ट

▪️ 'इनव्हिन्सिबल - ए ट्रिब्यूट टू मनोहर पर्रीकर' शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : तरुण विजय

▪️ ‘रोड सेफ्टी मीडिया फेलोशिप अवॉर्ड 2019’ कुणाला देण्यात आला?
उत्तर : प्राची साळवे

▪️ ‘विमान (दुरुस्ती) विधेयक-2020’मध्ये कोणत्या संस्थेला वैधानिक संस्थेचा दर्जा देण्यात आला आहे?
उत्तर : नागरी उड्डयण महासंचालनालय आणि नागरी उड्डयण सुरक्षा विभाग

▪️ कोणत्या ठिकाणी ‘2020 उन्हाळी ऑलम्पिक’ आयोजित करण्याचे नियोजित आहे?
उत्तर : टोकियो, जापान

▪️ “आफ्रिकन लायन” हा कोणत्या दोन देशांदरम्यानचा संयुक्त लष्करी सराव आहे?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका आणि मोरोक्को

▪️ कोणत्या ठिकाणांदरम्यान नवी सागरी रोपॅक्स फेरी सेवा सुरू करण्यात आली आहे?
उत्तर : मुंबई आणि मांडवा

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना


🖌 भारतातील कयदेमंडळाच्या निवडणूक लढविनारया पहिल्या महिला?
- कमलादेवी(मद्रास)

🖌 देशातील कयदेमंडळाच्या सदस्या बनणारया पहील्या माहीला?
- डाॅ. मुथ्हुलक्ष्मी रेड्डी

🖌 कांग्रेसच्या वार्षिक अधिवेशनातिल सर्वात तरुण अध्यक्ष?
- अब्दुल कलम आझाद

🖌 तुरुंगात असतानाच कयदेमंडळावर निवडून येणारे एकमेव भारतीय?
- सुभाषचंद्र बोस

🖌 तुरुंगात असतानाच कांग्रेसचे अध्यक्ष झालेले पहिले व्यक्ती?
- चित्तरंजन दास

🖌 भारतीयांनी भारतीयांसाठी घटना तयार करण्याचा केलेला पहिला प्रयोग?
- नेहरु अहवाल

🖌 सर्वप्रथम कांग्रेस ची पक्ष घटना बनविण्याची मागणी कोणी केली?
- लोकमान्य टिळक

🖌 अखिल भारतिय महिला परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा?
- महाराणी चिमबाईसाहेब गायकवाड.

📚Ref. : "आधुनिक भारताच्या इतिहासाची आवर्तसारणी", लेखक - अॅड. वरद देशपांडे, प्रकाशन - बी पब्लीकेशन.

यंदा उन्हाळ्याची सुटी स्थगित करण्याचा दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय .


⚜दिल्ली उच्च न्यायालयाने यंदा १ ते ३० जून या कालावधीतील उन्हाळ्याची सुटी स्थगित करण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. करोनाच्या फैलावामुळे देशात संचारबंदी जारी करण्यात आल्याने प्रलंबित कामकाजाची भरपाई करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

⚜त्याचप्रमाणे दिल्ली उच्च न्यायालयाने अन्य संबंधित न्यायालयांच्या उन्हाळ्याच्या सुटीलाही स्थगिती दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. एन. पटेल आणि अन्य न्यायाधीशांनी हा निर्णय घेतला आहे.

⚜देशात संचारबंदी जारी करण्यात आल्याने याचिकाकर्त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च न्यायालयात १६ मार्चपासून केवळ तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी घेतली जात आहे.

रघुराम राजन आंतरराष्ट्रीय l नाणेनिधीच्या सल्लागारपदी

🦚आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालीना जॉर्जिवा यांनी ही घोषणा केली आहे.

🦚कोरोनाच्या प्रभावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदीचं सावट आहे. येत्या काळात हे सावट आणखी गडद होऊ शकतं. अशा परिस्थितीत काय उपाययोजना करायला हव्यात यासाठी रघुराम राजन यांच्यासह जगभरातील ११ अर्थतज्ज्ञांची सल्लागार समिती बनवण्यात आली आहे.

🦚कोरोनामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अनेक मोठमोठे उद्योग बंद आहेत. त्याचे परिणाम जागतिक पातळीवरही होत आहेत. भविष्यात जगात मोठ्या मंदीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी आतापासूनच उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

▪️ NASSCOM संस्थेचे नवे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : प्रवीण राव

▪️ कोणत्या कंपनीने 07 एप्रिल 2020 रोजी खासगी क्षेत्रातल्या इंडसइंड बँकेमधला 0.85 टक्के हिस्सा खरेदी केला?
उत्तर : UBS प्रिन्सिपल कॅपिटल एशिया

▪️ ‘17 वर्ष वयोगटातील महिलांचा FIFA विश्वचषक’ स्पर्धा कोणत्या देशात घेण्याचे नियोजित होते?
उत्तर : भारत

▪️ ब्रह्म कांचीबोटला कोण होते?
उत्तर : पत्रकार

▪️ फलंदाज आणि यष्टीरक्षक राहिलेले जॅक एडवर्ड्स कोणत्या देशाचे होते?
उत्तर : न्युझीलँड

▪️ कोणते पोर्ट ट्रस्ट ‘सक्तीची अनिश्चित परिस्थिती’ घोषित करणार पहिला सरकारी बंदर ठरला?
उत्तर : कोलकाता पोर्ट ट्रस्ट

▪️ कोबे ब्रायंट यांना कोणत्या देशातल्या नेस्मिथ मेमोरियल बास्केटबॉल हॉल ऑफ फेममध्ये मरणोत्तर सामील करण्यात आले आहे?
उत्तर : अमेरिका

▪️ दरवर्षी 07 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. 2020 या वर्षाची संकल्पना काय आहे?
उत्तर : सपोर्ट नर्स आणि मिडवाईव्ह्ज

▪️ क्रिकेटमध्ये वापरली जाणारी DLS पद्धत कोणी तयार केली?
उत्तर : टोनी लुईस

▪️ नौदलाचे कोणत्या डॉकयार्डमधील कर्मचार्‍यांनी ‘पोर्टेबल मल्टी-फीड ऑक्सीजन मॅनिफोल्ड’ यंत्रणा विकसित केली?
उत्तर : विशाखापट्टणम

--------------------------------------------------------

चालू घडामोडी प्रश्नसंच

Q. अमेरिकेतील अलाबामा राज्यातून----------यांची सिनेटर म्हणून निवड झाली आहे?

1)रॉय मुर
2)ग्लेन मार्क
3)स्मिथ डेव
4)डग जोन्स✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये प्रभाग हे नियोजन व विकासाचे एकक असल्याने पंचायत समिती सामर्थ्यशाली आहे?

अ. महाराष्ट्र
ब. गुजरात
क. राजस्थान
ड. आंध्रप्रदेश

पर्याय:
1. फक्त अ आणि ब
2. फक्त क आणि ड✅✅
3. फक्त ड
4. वरीलपैकी एकही राज्यात नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. पुढील वैशिष्ट्ये कोणत्या शहराची किंवा गावाची आहे ते ओळखा.

अ. येथे भद्रा मारुतीचे पुरातन मंदिर आहे.
ब. येथे औरंगजेब बादशहाची कबर आहे.
क. येथून जवळच म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण आहे.
ड. दर सोमवती अमावस्येला या ठिकाणी मोठी यात्रा भरते.

पर्याय..👇
1] दौलताबाद*l
2] खुलताबाद✅✅
3] वेरूळ
4] अजिंठा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित pH (सामू) संकल्पना कोणी मांडली

A) सोन्स
B) अँड सब्ज़सन्स.
C) जॉन लोहनस्ल.
D) सोरेन्सन.✅✅
E) यापैकी नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. कृत्रिम बुद्धिमत्तेवर बोलवली जाणारी भारतातली पहिली परिषद ठरणारी ‘RAISE’  याचे संपूर्ण नाव काय आहे?

1]  Responsible AI for Social Empowerment 2020✅✅

2]  Responsible AI for Scientific Empowerment 2020

3]  Rebooting AI for Social Empowerment 2020  

4]  Rebooting AI for Scientific Encouragement 2020  

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?

A) औष्णिक विद्युत ऊर्जा ✅✅
B) आण्विक ऊर्जा 
C) जल विद्युत ऊर्जा
D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. सन 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते शहर दशलक्षी शहर नाही

A. नांदेड✅✅
B. कल्याण-डोंबिवली
C. ठाणे
D. नाशिक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. भारतामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 

A) 1961
B) 1974
C) 1985 ✅✅
D) 2010

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. भारतीय राष्ट्रीय विज्ञान ॲकॅडमी च्या अध्यक्षपदी नेमणूक होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत?

1)उत्कर्ष सिन्हा
2)प्रिती पटेल
3)चंद्रमा शहा ✅✅
4)गीता सिंग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. 'लिगसी ऑफ लर्निंग' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेली कादंबरी कोणी लिहिली?

(A) सविता छाबरा ✅✅
(B) तवलीन सिंग
(C) भालचंद्र मुणगेकर
(D) सलमान रश्दी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Q. कोणत्या व्यक्तीच्या स्मृतीत मानवी हक्क उल्लंघनाची सत्यता जाणण्याचा हक्क आणि पीडितांचा सन्मान विषयक आंतरराष्ट्रीय दिन पाळतात?

(A) लियू झियाबो
(B) अर्नल्फो रोमेरो ✅✅
(C) मार्टिन एन्नाल्स
(D) नटालिया एस्टेमिरोव्हा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

समानार्थी शब्द

परिश्रम = कष्ट, मेहनत   
पती = नवरा, वर 
पत्र = टपाल 
पहाट = उषा  
परीक्षा = कसोटी 
पर्वा = चिंता, काळजी 
पर्वत = डोंगर, गिरी, अचल, शैल, अद्री 
पक्षी = पाखरू, खग, विहंग, व्दिज, अंडज
पाडा = आदीवासींची १०-१५ घरांची वस्ती
प्रकाश = उजेड 
प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन
प्रवासी = वाटसरू, पांथस्थ, मार्गिक
प्रजा = लोक 
प्रत - नक्कल
पत्नी = बायको, अम्बुला, अस्तुरी, अर्धागी, भार्या, कांता, दारा, जाया, सहधर्मचारिणी
प्रदेश = प्रांत 
प्रवास = यात्रा    
प्राण = जीव 
पान = पत्र, पत्ता, पर्ण 
प्रासाद = वाडा 
पाखरू = पक्षी
पाऊल = पाय, चरण
पाऊलवाट = पायवाट
प्रार्थना = स्तवन 
प्रामाणिकपणा = इमानदारी
प्रारंभ = सुरुवात, आरंभ  
प्रेम = प्रीती, माया, जिव्हाळा
प्रोत्साहन = उत्तेजन
पोपट = राघू, शुक
पाऊस = वर्षा, पर्जन्य 
पाणी = जल, नीर, तोय, उदक, जीवन, सलिल, पय, अंबू, अंभ, वारी 
पिशवी = थैली 
पुस्तक = ग्रंथ
पुतळा = प्रतिमा, बाहुले
पुरातन = प्राचीन 
पुंजा = पूजन
पृथ्वी = धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा, धरा, भुमी, धरित्री, मही, अवनी, भू, क्षमा, उरबी, कुंभिनी, मेदिनी, विश्वंभरा, क्षिती  
फलक = फळा   
फांदी शाखा 
फूल = पुष्प, सुमन, कुसुम

लॉकडाउन हटवण्यात घाई केली तर घातक परिणाम होतील, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

🅾करोनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचे निर्बंध उठवण्यास घाई केली तर त्याचे घातक परिणाम होतील असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आला आहे. लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यामुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झालेले असतानाही जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम यांनी देशाच्या प्रमुखांना योग्य उपाययोजना करत लॉकडाउन सुरु ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

🅾लॉकडाउनचे निर्बंध हटवण्यात घाई केली तर त्याचे घातक परिणाम भोगावे लागतील असं टेड्रोस एडहानोम याचं म्हणणं आहे. जिनेवामधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. काही ठिकाणी करोनाचा फैलाव वाढत असल्याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की, जर योग्य काळजी घेतली नाही तर खूप मोठा धोका आहे.

🅾“लॉकडाऊन हटवावं अशी सगळ्यांसारखीच आमचीदेखील इच्छा आहे. पण घाईघाईत लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेतला तर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होईल. योग्य पद्धतीने करोनाचा सामना करण्याची गरज आहे अन्यथा त्याचे घातक परिणाम होतील,” असं टेड्रोस एडहानोम यांनी म्हटलं आहे.

राज्यावर अर्थसंकट २०१९-२० मध्ये अपेक्षित महसुलापेक्षा सुमारे ३५ हजार कोटींचा फटका बसला आहे.

🔰विषाणूमुळे तब्बल ३५ हजार कोटींचा तोटा; महसुलात मोठी घट
करोनाच्या साथीमुळे टाळेबंदी जाहीर झाल्याने उद्योग-व्यापार उदीम, घरांची खरेदी-विक्री असे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने राज्य सरकारच्या तिजोरीला करोनाचे चटके बसले असून मार्च २०१९ च्या तुलनेत यंदा मार्च मध्ये जवळपास २५ हजार कोटींचा फटका बसला. आर्थिक वर्षांचा विचार करता २०१९-२० मध्ये अपेक्षित महसुलापेक्षा सुमारे ३५ हजार कोटींचा फटका बसला आहे.
गेल्या आर्थिक वर्षांचा जमा-खर्चाचा तपशील आता मंत्रालयात मांडण्यात येत आहे. त्यानुसार महसुलात मोठी घट झाली आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीवरील मूल्यवर्धित कराच्या माध्यमातून ३८ हजार ६६ कोटी रुपयांची अपेक्षा होती. पण त्यात ४३६ कोटी रुपये कमी मिळाले.मुळात अर्थव्यवस्थेत थोडी मंदी असल्याने वस्तू व सेवा कराची वसुली कमी राहिली. त्यात करोनाच्या साथीमुळे आणखी फटका बसला. करोनामुळे टाळेबंदी जाहीर झाल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले. त्याचा मोठा परिणाम मार्चमधील महसुलावर झाला.
परिस्थिती काय?

🔰 मार्च २०१९ मध्ये राज्य सरकारच्या तिजोरीत सुमारे ४२ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता.

🔰 यंदा उद्योग-व्यापार घरांची खरेदी-विक्री, उत्पादन शुल्क, इंधनावरील कर अशा सर्वच आघाडय़ांवरील महसूल आटला आणि मार्च २०२० मध्ये राज्याच्या तिजोरीला अवघे १७ हजार कोटी रुपये मिळाले.

🔰 म्हणजेच सुमारे २५ हजार कोटींचा फटका एकटय़ा मार्च महिन्यात आपल्याला बसला आहे. सरत्या आर्थिक वर्षांचा विचार केला तर सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा फटका बसला, अशी माहिती अर्थ विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
सारी अनिश्चितता.. वस्तू व सेवा करातून राज्याला २०१९-२० मध्ये १ लाख ३ हजार ७६० कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित होता. प्रत्यक्षात त्यातून ८२ हजार ५९० कोटी रुपये मिळाले. हा २१ हजार १७० कोटी रुपयांचा फटका बसला. अर्थात केंद्र सरकारकडून त्याची भरपाई अपेक्षित असली तरी ती कधी मिळेल हे याची सद्यस्थितीत खात्री देता येत नाही.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

🔰1) पुढील वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणता?
     ‘बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ती गाडी शिगोशिग भरली होती.’

▪️1) ती गाडी  
▪️ 2) शिगोशिग   
▪️3) भरली होती  
▪️ 4) बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ✅

🔰2) ‘आजी दृष्ट काढते’ वाक्यातील प्रयोग ओळखा.

◾️ 1) कर्मणी प्रयोग  
◾️ 2) कर्तरी प्रयोग    ✅
◾️ 3) भावे प्रयोग  
◾️ 4) शक्यकर्मणी प्रयोग

🔰3) ‘चक्रपाणी’ या सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा.

▪️ 1) मध्यमपद लोपी समास    
▪️ 2) समाहार व्दंव्द
▪️ 3) इतरेतर व्दंव्द      
▪️ 4) कोणताही नाही✅

🔰4) विरामचिन्हांचा वापर करताना ‘संयोगचिन्हाचा वापर करण्यात येतो.’

▪️अ) दोन शब्द जोडताना       
▪️ब) संबोधनाकरिता वापर केला जातो▪️क) दुस-याचे मत अप्रत्यक्षपणे सांगण्यासाठी  
▪️ ड) ओळीच्या शेवटी शब्द अपूरा राहिल्यास

▪️1) ब बरोबर
▪️2) ब, ड बरोबर
▪️3) क     
▪️4) अ, ड बरोबर ✅

🔰5) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी ! (अलंकार ओळखा.)

▪️1) श्लेष अलंकार   
▪️2) यमक अलंकार  
▪️ 3) अतिशयोक्ती अलंकार
▪️4) उपमा अलंकार ✅

🔰6) सिध्द शब्द ओळखा.
  
▪️1) येऊन  
▪️2) ये      ✅
▪️3) येवो    
▪️4) येणार

🔰7) ‘चला पानावर बसा’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.

▪️1) व्यागार्थ  
▪️ 2) लक्षार्थ    ✅
▪️3) वाच्यार्थ   
▪️4) संकेतार्थ

🔰8) ‘पाणी’ या शब्दाच्या समानार्थी शब्द शोधा :

▪️1) जल      ✅
▪️2) जलद    
▪️3) ढग     
▪️4) क्षार

🔰9) ‘अवरोहण’ या शब्दाला विरुध्दार्थी शब्द निवडा.

▪️1) उन्नत   
▪️2) अवनत  
▪️ 3) आरोहण    ✅
▪️4) प्रारंभ

🔰10) ‘फायदा असेपर्यंत सारे गोळा होतात.’ – हा अर्थ स्पष्ट करणारी योग्य म्हण निवडा.

▪️1) हात ओला तर मित्र भला    ✅
▪️2) मूल होईना सवत साहीना
▪️3) मनास मानेल तोच सौदा  
▪️ 4) फुले वेचली तेथे गोव-या वेचू नये

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

🔰खालील विधाने विचारात घ्या:

अ) भारतात सर्वात जास्त काल इंग्रजांनी शासन केले.
ब) पोर्तुगीजांनी भारतातून सर्वप्रथम आपली सत्ता मागे घेतली.
क) पोर्तुगीजांनी आपली पहिली वसाहत गोवा इथे स्थापन केली.
ड) ब्रिटीश खलाशी वास्को-द-गामा १४९८ मध्ये भारतात आला.

१) फक्त अ,ब, क योग्य
२) फक्त क योग्य 📚✍️
३) सर्व अयोग्य
४) सर्व योग्य

🔰कोणत्या वर्षी भारत सरकारने जागतीक व्यापार संघनेशी करार केला आहे ? आणि जागतीक व्यापार संघटना (डब्ल्यु. टी. ओ.) कधी अस्तित्वात आली. 

A) 1981-1982 
B) 1994-1995  ✅
C) 1996-1997 
D) 1998-1998 

🔰 भारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली ?

M) मार्च 1950 ✅
P) एप्रिल 1950
K) मार्च 1951
H) मार्च 1949

🔰 _________ उत्तर-पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे.

A) भुवनेश्वर
B) हाजीपूर 
C)  गुहाटी
D) गोरखपुर ✅

🔰द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील __ परिसरात दाट लोकवस्ती आढळते.*

A) लातूर - उस्मानाबाद
B) जलगाव - भुसावल
C) पंढरपूर - सोलापूर
D) पिंपरी -चिंचवड✅

🔰 मानव विकास निर्देशांक यांची जनक खालीलपैकी कोण आहे

१.  दादाभाई नवरोजी
२.  मॉरीस डी मॉरीस
३. जेके मेहता
४.  वरीलपैकी एकही नाही✅✅
(स्पष्टीकरण:-
जनक मेहबूब उल हक)

🔰 कोणती दारिद्र्य सर्व देशात आढळते?

१.  सापेक्ष दारिद्र्य✅✅
३. निरपेक्ष दारिद्र्य
२. नागरी दारिद्र्य
४.  शहरी दारिद्र्य

🔰 कोणता रोग हा एकदा होऊन गेला की पुन्हा होत नाही बहुदा पुन्हा होत नाही

१.  कॉलरा
२. विषम ज्वर
३. खरुज
४. इसब
५. वरीलपैकी एकही नाही✅✅

🔰 चारकोल म्हणजे काय ?

१. लोणारी कोळसा ✅✅
२. दगडी कोळसा
३. कच्चा कोळसा
४. खाणीतील कोळसा

🔰 एक किलोग्रॅम लाकडा पासून सुमारे किती जुल एवढी ऊर्जा मिळते?

1.  १७००✅✅
2 १८००
३. १५००
4. १२००

🔰 पेलागा हा रोग............ या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो ?

१. क
२. ई
३. ड
४. वरीलपैकी एकही नाही✅✅
(स्पष्टीकरण:-
पेला ग्ररोग्य  ब या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो)

महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व तेथील महत्त्वाची स्थळे


◆प्रवरा नदी व मुळा नदी  -  नेवासे, अहमदनगर

◆मुळा व मुठा नदी - पुणे

◆गोदावरी व प्राणहिता  -  सिंगेचा, गडचिरोली

◆तापी व पूर्णानदी - श्रीक्षेत्र चांगदेव तिर्थक्षेत्र, जळगाव

◆कृष्णा व वेष्णानदी -  माहुली, सातारा

◆तापी व पांजरानदी - मूडवद, धुळे

◆कृष्णा व पंचगंगा - नरसोबाची वाडी, सांगली

◆कृष्णा व कोयना -  कराड, सातारा

◆गोदावरी व प्रवरा  - टोके, अहमदनगर

◆कृष्णा व येरळ -  ब्रम्हनाळ, सांगली

आणीबाणी

   " 21 महिन्यांच्या कालावधीत 1975 पासून 1977 पंतप्रधान तेव्हा संदर्भित इंदिरा गांधी एक होती तात्काळ राज्य देशभरातील घोषित केले. अधिकृतपणे अध्यक्ष जारी फकरुद्दीन अली अहमद लेख 352 अंतर्गत राज्यघटना कारण प्रचलित "अंतर्गत दंगल" च्या, आणीबाणी लागू 26 जून 1975 त्याच्या मागे होईपर्यंत जानेवारी 1977 अधिकार पंतप्रधान यावर बहाल करण्यासाठी होता राज्य डिक्री , निवडणुका स्थगित करण्यास आणि नागरी स्वातंत्र्यांना आळा घालण्याची मुभा. आणीबाणीच्या बराच काळ गांधींचे बहुतेक राजकीय विरोधक तुरुंगात होते आणि पत्रकार होतेसेन्सर . पंतप्रधान मानवाचे पुत्र संजय गांधी यांच्या नेतृत्वात जबरदस्ती जन-नसबंदी मोहिमेसह इतर अनेक मानवाधिकार उल्लंघनांची नोंद झाली . आणीबाणी हा स्वतंत्र भारताच्या इतिहासाचा सर्वात वादग्रस्त कालखंड आहे .

आणीबाणी लागू करण्याचा अंतिम निर्णय इंदिरा गांधींनी मांडला होता, त्यावर राष्ट्रपतींनी सहमती दर्शविली होती आणि त्यानंतर मंत्रिमंडळ आणि संसदेने (जुलै ते ऑगस्ट 1975 पर्यंत) मंजूर केले होते, तेथे निकटवर्ती अंतर्गत व बाह्य धोके असल्याच्या युक्तिवादावर आधारित होते.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आणीबाणी (भारत)

आणीबाणी (Emergency) हा भारताच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता. ह्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली.

 राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविधानातील कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली जी २५ जून १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. इंदिरा गांधींच्या जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली. रा.स्व. संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. पण संघ अणिबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभा राहिला.

मार्च १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. ह्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला व जनता पक्षाचे मोरारजी देसाई भारताचे पहिले कॉंग्रेसेतर पंतप्रधान बनले. इंदिरा गांधींना आपल्या रायबरेली ह्या त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये हार पत्कारावी लागली.

आणीबाणी ही स्वतंत्र भारताच्या इतिहासामधील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक मानली जाते.

घटनाक्रम

१९७५

१२ जून : निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून इंदिरा गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोषी ठरविले. गांधी यांनी १९७१च्या निवडणुकीत सरकारी अधिकारी आणि यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांना सहा वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.

२२ जून : जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक विरोधीपक्षातील नेत्यांनी आणीबाणीच्या विरोधात दिल्लीत रामलीला मैदानात मोठ्या सभेचे आयोजन केले.

२४ जून : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घालत स्थगिती दिली. तसेच, संसदेचे सदस्य रहण्यास इंदिरा गांधींना परवानगी दिली. मात्र संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ नये असे स्पष्ट केले.

२५ जून : देशात आणीबाणी लागू केल्याची घोषणा करण्यात आली. विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात आली, त्याचवेळी महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांची वीज सेवा खंडित करण्यात आली.

३० जून : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात येत असल्याची अधिसूचना काढण्यात आली. आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणार्‍यांना थेट अटक करण्यास सुरुवात झाली.

१ जुलै : आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी २० कलमी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.

५ जुलै : जमात ए इस्लामी, आनंद मार्ग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी २६ संघटनांवर बंदी घालण्यात आली.

२३ जुलै : आणीबाणीला राज्यसभेची मंजुरी.

२४ जुलै : लोकसभेतही आणीबाणीच्या बाजूने मतदान.

५ ऑगस्ट : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात आला.

१९७६

२१ मे : न्यायालयाचा हस्तक्षेप थांबविण्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली.

२५ ऑगस्ट : विवाहाचे वय वाढविण्याची तरदूत असलेले विधेयक मांडण्यात आले.

३ नोव्हेंबर : घटना दुरुस्ती विधेयकाला लोकसभेची मंजुरी.

१ सप्टेंबर : लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्तीची नसबंदी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात.

१९७७

१८ जानेवारी : लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा.

२० जानेवारी : लोकसभा विसर्जित करण्यात आली.

२४ जानेवारी : मोरारजी देसाई यांची जनता पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

११ फेब्रुवारी : राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांचे निधन.

२१ मार्च : आणीबाणी मागे घेण्यात आली.

२२ मार्च : जनता पक्षाला निवडणुकीत बहुमत.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...