२१ फेब्रुवारी २०२०

दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा 2020 जाहीर

◾️ चित्रपट आणि टेलिव्हीजन साठी प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.

        🌸 🔰 विजेत्यांची यादी 🔰🌸

🏆 सर्वोत्कृष्ट चित्रपट: सुपर 30

🏆 सर्वोत्कृष्ट अभिनेताः हृतिक रोशन

🏆 मोस्ट प्रामिसिंग अॅक्टरः सुदीप

🏆 सर्वोत्कृष्ट टेलिव्हीजन अभिनेताः धीरज धूपर

🏆 सर्वोत्कृष्ट टेलिव्हीजन अभिनेत्रीः दिव्यांका त्रिपाठी

🏆 मोस्ट फेव्हरेट टेलिव्हीजन अभिनेताः हर्षद चोपडा

🏆 मोस्ट फेव्हरेट टीव्ही. मालिका जोडीः श्रीती झा आणि शब्बीर अहलूवालिया (कुमकुम भाग्य)

🏆 सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम (बेस्ट रियालिटी शोः) बिग बॉस 13

🏆 सर्वोत्कृष्ट टीव्ही मालिकाः कुमकुम भाग्य

🏆 सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरमान मलिक

सिनेमा क्षेत्रात असामान्य कामगिरीबद्दल कलावंतांना दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे.

📌दादासाहेब फाळके यांच्या जन्मशब्तादीपासून ❣भारत सरकारतर्फे हा पुरस्कार दिला जातो.

महत्त्वाचे प्रश्नसंच


भावनगर ( गुजरात ) येथील वाल्वादार राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिध्द आहे ?

A. लांडगे
B. हत्ती
C. गवे
D. काळवीट
Ans. लांडगे

Ques. समाज स्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू केले ?

A. र.धो.कर्वे
B. महात्मा फूले
C. छत्रपती शाहू महाराज
D. धोंडो केशव कर्वे
Ans. र.धो.कर्वे

: Ques. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली ?

A. विठ्ठल रामजी शिंदे
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. धोंडो केशव कर्वे
D. महात्मा ज्योतीबा फूले
Ans. विठ्ठल रामजी शिंदे

Ques. बॉम्बे नेटिव एज्युकेशन सोसायटी ची स्थापना कोणी केली ?

A. बाळशास्त्री जांभेकर
B. जगन्नाथ शंकरशेठे
C. डॉ. भाऊ दाजी लाड
D. दादोबा पांडुरंग
Ans. जगन्नाथ शंकरशेठे

Ques. गोपाळ हरि देशमुख यांनी लोकहितवादी या नावाने...........या साप्ताहिकातून लिखाण केले ?

A. प्रभाकर
B. दर्पण
C. सुधारक
D. दिनमित्र
Ans. प्रभाकर

Ques. बॉम्बे असोसिएशन ची स्थापना..............यांनी केली.

A. डॉ. पंजाबराव देशमुख
B. डॉ. भाऊ दाजी लाड
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. अप्पाशास्त्री खाडिलकर
Ans. डॉ. भाऊ दाजी लाड

: Ques. सत्यशोधक समाजाची स्थापना...........यांनी केली.

A. महात्मा ज्योतिबा फूले
B. राजा राममोहन रॉय
C. स्वामी दयानंद सरस्वती
D. न्यायमूर्ती रानाडे
Ans. महात्मा ज्योतिबा फूले

Ques. खालीलपैकी कोणत्या महामार्गवर खंबाटकी घाट लागतो

A. मुंबई-पुणे
B. मुंबई-गोवा
C. मुंबई-आग्रा
D. पुणे-बेंगळूरू
Ans. पुणे-बेंगळूरू

Ques. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्याच्या संगमावर आहे ?

A. कराड
B. कोल्हापूर
C. नरसोबाची वाडी
D. सातारा
Ans. नरसोबाची वाडी

Ques. महाराष्ट्रातील पहिल्या बंडखोर विचारवंत ज्यांनी 'स्त्री-पुरूष तुलना' नावाचा ग्रंथ लिहिला त्यांचे नाव काय?

A. रमाबाई रानडे
B. ताराबाई शिंदे
C. सावित्रीबाई फुले
D. पंडिता रमाबाई
Ans. ताराबाई शिंदे

: Ques. महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती आहे?

A. नर्मदा
B. तापी
C. भीमा
D. गोदावरी
Ans. गोदावरी

. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरु केलेले नव्हते ?

A. सुधारक
B. जनता
C. समता
D. प्रबुध्द भारत
Ans. सुधारक

💝💝💝💝💝:
⚛⚛ "थॉट्स ऑन पाकिस्तान'' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A. सर सय्यद अहमद खान

B. बॅ. महमद अली जीना

C. मौलाना अब्दुल करीम आझाद

D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅

⚛⚛ लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?

A. प्रभाकर✅

B. समता

C. सुलभ समाचार

D. बहिष्कृत भारत

⚛⚛ महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

A. 8 सप्टेंबर, 1873

B. 10 ऑक्टोबर, 1873

C. 14 सप्टेंबर, 1873 ✅

D. 15 ऑगस्ट, 1873

⚛⚛ सर विल्यम ली वॉर्नरने ‘‘घाणेरडा नीग्रो'' असे कोणाला म्हंटले?

A. कुंजबिहारी बोस✅

B. विरेंद्रकुमार घोष

C. अरविंदो घोष

D. हेमचंद्र दास

⚛⚛ 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?

A. महात्मा फुले

B. गणेश वासुदेव जोशी

C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D. जगन्नाथ शंकर शेठ✅

⚛⚛ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?

A) भारत आणि म्यानमार

B) भारत आणि नेपाळ

C) भारत आणि बांग्लादेश

D) भारत आणि थायलँड

उत्तर :- A) भारत आणि म्यानमार

स्पष्टीकरण: ईशान्य भारतात सक्रिय असलेल्या बंडखोर गटांच्या म्यानमारच्या सीमेवरील शिबिरांना नष्ट करण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि म्यानमार ऑपरेशन सनराइझ नावाने एक संयुक्त मोहीम राबववित आहे.

⚛⚛कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?
A) नेपाळ
B) म्यानमार
C) इंडोनेशिया
D) इराक
उत्तर :- B) म्यानमार
स्पष्टीकरण: भारत आणि म्यानमारने संयुक्तपणे कलादन प्रकल्प सुरू केला आहे. कलादन प्रकल्प म्यानमारमधील सिट्टवे बंदराला भारत-म्यानमार सीमेशी जोडते. जळमार्गे मालवाहतुकीसाठी बहुउद्देशीय व्यासपीठ तयार करण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला गेला आहे.

⚛⚛राज्यघटना कलम.......नुसार संपूर्ण देशासाठी वार्षिक अंदाजपञक तयार केले जाते?
A-कलम 110
B-कलम 111
C-कलम 112
D- कलम 113
उत्तर :- C-कलम 112

⚛⚛कोणत्या भारतीय समाजसुधारकाचा हस्तीदंती अर्ध पुतळा ब्रिटनमध्ये त्यांच्या 180 व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून बसविण्यात आला?

(1)लाला हरदयाळ
(2)राजाराम मोहन रॉय✅✅
(3)पं. मदनमोहन मालविय
(3)यापैकी नाही

⚛⚛'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?

डॉ.एस.एन.सेन
वि.डी.सावरकर
अशोक मेहता✅✅
अशोक कोठारी

(1) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?

दोदाबेटा
कळसुबाई✅✅✅
साल्हेर
मलयगिरी

(2)निलगिरी पर्वतातील उंच शिखर .. आहे.

1)माकुर्णी

2)दोडाबेटा✅✅

3) अन्ना मलाई

4) उदकमडलम

⚛⚛संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली?

 १) 24 ऑक्टोबर 1 9 45✅✅✅
२) 25 ऑक्टोबर 1 9 45  
३) 24 ऑक्टोबर 1 9 54  
४) 25 ऑक्टोबर 1 9 54  

⚛⚛संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत किती देशांचा समावेश होतो?

     1) 192   
     2) 190 
     3) 194
     4) 193  
उत्तर :पर्याय : ४

⚛⚛दक्षिण आणि उत्तर सह्याद्री _______नावाच्या खिंडीमुळे वेगळे झाले आहेत

1.    पालघाट
2.    बालघाट
3.    दोडाबेट्टा
4.    अनयमुडी  

⏩⏩उत्तर :पर्याय : १

⚛⚛श्रीशैलम  जवळ ________नदीने केलेली  घळई प्रसिद्ध आहे

1.    गोदावरी  
2.    कृष्णा 
3.    नर्मदा 
4.    वैनगंगा  

⏩⏩उत्तर :पर्याय : २

⚛⚛_______ही तापीची प्रमुख उपनदी आहे 

1.    महानदी
2.    पूर्णा  
3.    मांजरा 
4.    इंद्रावती  

⏩⏩उत्तर :पर्याय : २

मेसी, हॅमिल्टनला लॉरेयो पुरस्कार

- सहा वेळा ‘फिफा’चा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणारा मेसी हा या पुरस्कारासाठी उपस्थित राहू शकला नाही.

- महिलांमध्ये सिमोन बाइल्स तिसऱ्यांदा सर्वोत्तम खेळाडूची मानकरी

- ब्रिटनचा फॉम्र्युला-वन ड्रायव्हर लुइस हॅमिल्टन आणि महान फुटबॉलपटू लिओनेल मेसी यांनी यंदाच्या वर्षांतील सर्वोत्तम क्रीडापटूसाठी दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या लॉरेयो पुरस्कारावर संयुक्तपणे नाव कोरले आहे. २० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच समान मते मिळाल्यामुळे दोघांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

- सहा वेळा ‘फिफा’चा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणारा मेसी हा या पुरस्कारासाठी उपस्थित राहू शकला नाही. या दोघांनी गोल्फपटू टायगर वुड्स, केनियाचा धावपटू इलिड किपचोग, टेनिसपटू राफेल नदाल आणि मोटोजीपी विजेता मार्क मार्केझ यांच्यावर मात करत हा पुरस्कार पटकावला.

- २०१९च्या जागतिक स्पर्धेत पाच सुवर्णपदके मिळवणारी अमेरिकेची जिम्नॅस्ट सिमोन बाइल्स हिने सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार पटकावला. गेल्या चार वर्षांतील तिचा हा तिसरा पुरस्कार ठरला. याआधी तिने २०१७ आणि २०१९मध्ये सर्वोत्तम महिला खेळाडूच्या पुरस्कारावर नाव कोरले होते. तिने जमैकाची धावपटू शेली अ‍ॅन-फ्रेसर-प्राइस, टेनिसपटू नाओमी ओसाका, अमेरिकेची अ‍ॅथलीट अ‍ॅलिसन फेलिक्स यांचे आव्हान मोडीत काढले.

- दक्षिण आफ्रिकेच्या रग्बी संघाने जर्गेन क्लॉप यांच्या लिव्हरपूल आणि अमेरिकेच्या महिला फुटबॉल संघावर मात करत लॉरेओ जागतिक सांघिक पुरस्कारावर मोहोर उमटवली. दक्षिण आफ्रिका रग्बी संघाने २०१९मध्ये विश्वविजेतेपदावर नाव कोरले होते.

🔹 सचिनला सर्वोत्तम क्षणासाठीचा पुरस्कार

- भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने घरच्या मैदानावर आपल्या संघाला २०११चा विश्वचषक जिंकून देण्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. गेल्या २० वर्षांतील हाच लॉरेयो सर्वोत्तम क्रीडाक्षण ठरला आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळालेल्या सचिनला या पुरस्कारासाठी सर्वाधिक मते मिळाली आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याच्याकडून सचिनने हा पुरस्कार स्वीकारला. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली वानखेडे स्टेडियमवर भारताला विश्वचषक जिंकून दिल्यानंतर सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर उचलून मैदानात फेरी मारली होती. हा क्षण चाहत्यांच्या मनावर कोरला गेला आहे.

- हा पुरस्कार माझ्यासाठी संस्मरणीय आहे. या पुरस्काराचा आनंद मी शब्दांत सांगू शकत नाही. संपूर्ण देशासाठी खचितच आनंद साजरा करण्याचा क्षण मिळाला आहे. त्यामुळेच क्रिकेट या खेळात किती ताकद आहे, याचा अंदाज आला असेल. २२ वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर मी पहिल्यांदाच विश्वचषक उंचावला होता. तो माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण होता.
  – सचिन तेंडुलकर
————————————————--

जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग

🚦ट्रान्स सैबेरियन रेल्वे
: मॉस्कोपासून प्याँगयाँगपर्यंचा हा मार्ग जगातील सर्वात लांब रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो. याची लांबी सुमारे १० हजार २१४ किमी आहे.

🚦द कॅनेडियन, कॅनडा
: कॅनडामधील टोरँटो ते व्हँकुव्हर या शहरांना जोडणारा हा रेल्वेमार्ग ४४६५ किमी लांब आहे. या मार्गावरील प्रवास पूर्ण करण्यासाठी तीन दिवस लागतात.

🚦चीन
: शांघाई ते ल्हासा हा चीनमधील रेल्वेमार्ग 4372 किलोमीटर लांब आहे.

🚦कॅलिफोर्निया, सायफर
: एमेरविले ते शिकागोदरम्यान 3923 किलोमीटरचा रेल्वेप्रवास पूर्ण करण्यासाठी ५१ तास लागतात.

🚦इंडियन पॅसिफिक, ऑस्ट्रेलिया : सिडनी ते पर्थ मार्गावरील 4351
किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ६५ तास लागतात.

🚦विवेक एक्स्प्रेस
: आसाममधील दिब्रुगड ते कन्याकुमारी या मार्गावरील 4237 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी या एक्सप्रेसला ८२ तास लागतात.

पोलीस भरती प्रश्नसंच

🔰…..हे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे.

अ) सत्यमेव जयते
ब) वंदे मातरम्
क) सदरक्षणाय खलनिग्रहणाय✅✅
ड) जय हिंद

🔰🔰....... हा दिवस देशात पोलिस दिन म्हणून साजरा केला जातो.

अ) २ ऑक्टोबर  
ब) २१ ऑक्टोबर✅✅✅
क) १ नोव्हेंबर
ड) ३१ ऑक्टोबर

✅✅१८३५ मध्ये लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली लॉ कमिशनने …...च्या निर्मितीस प्रारंभ केला.

अ) इंडियन पीनल कोड🔰🔰🔰
ब) मुंबई पोलिस अधिनियम
क) इंडियन एव्हीडंस अॅक्ट
ड) यांपैकी नाही.

♻️♻️१८६१ मध्ये ........ यांनी भारतीय दंडविधान (Indian Penal Code) लागू केला.

अ) लॉर्ड मॅकॉले

ब) लॉर्ड रॉयल

क) लॉर्ड कॅनिंग✅✅✅

ड) रॉबर्ट क्लाईव्ह

🔰🔰कायद्यानुसार IPC मध्ये ........कलमे आहेत.

अ) ३३३

ब) ४४५

क) ३११

ड) ५११✅✅✅✅

🔰🔰भारतीय पुराव्याचा कायदा (Indian Evidance Act) ....... सा लागू झाला.

अ) १८३५

क) १८७२✅♻️♻️✅

ब) १८६१

ड) १८८०

♻️♻️....... हे पहिले पोलिस महासंचालक होत.

अ) ग. वा. मावळंकर

ब) बाळासाहेब खेर

क) शिवाजी देशमुख

ड) कृष्णराव मेढेकर✅✅✅

🔰🔰महाराष्ट्रात साधारणतः ........ लोकसंख्येमागे एक पोलिस स्टेशन

आहे.

अ) ५०,०००

ब) १ लाख✅♻️✅✅

क) ७५ हजार

ड) १.५ लाख

♻️♻️...... हे महाराष्ट्र पोलिसांकडून प्रकाशित होणारे मासिक होय.

अ) केसरी

ब) दक्षता✅♻️✅✅

क) किरण

ड) सावधान

♻️♻️महाराष्ट्रात Dy SP व PSI या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलिस अॅकॅडमी ........ येथे आहे.

अ) मुंबई

ब) लातूर  

क) पुणे

ड) नाशिक✅♻️✅✅✅

२० फेब्रुवारी २०२०

20/02/2020 प्रश्नसंच


◆ माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते ‘रिलेंटलेस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. हे पुस्तक ____ ह्यांचे आत्मचरित्र आहे.
(A) प्रणब मुखर्जी
(B) यशवंत सिन्हा✅✅
(C) जानकी बल्लभ पटनायक
(D) इंदर कुमार गुजराल

◆ टेक महिंद्रा या कंपनीने कोणत्या शहरात ‘गूगल क्लाउड सेंटर ऑफ एक्सलन्स’ उभारले?
(A) बेंगळुरू
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) हैदराबाद✅

◆ कोणत्या शहरात ‘द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट’ (TERI) या संस्थेच्या वतीने ‘जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद’ आयोजित केली गेली?
(A) मुंबई
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली✅✅
(D) चंदीगड

◆ कोणता देश शस्त्रास्त्रांच्या उत्पादनात जगातला दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश ठरला?
(A) रशिया
(B) फ्रान्स
(C) चीन✅✅
(D)  अमेरिका====पहिल्या क्रमांकावर

◆ कोणत्या शहरात भारतीय रेल्वेनी भारताचा पहिला सरकारी ‘कचर्‍यापासून वीजनिर्मिती’ प्रकल्प कार्यरत केला?
(A) नवी दिल्ली
(B) भुवनेश्वर✅✅
(C) गोरखपूर
(D) कानपूर

♻️♻️
केवडिया सफारी पार्क _____ या राज्यात आहे.
(A) मध्यप्रदेश
(B) गुजरात✅✅
(C) राजस्थान
(D) हिमाचल प्रदेश

♻️♻️
_____ या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन’ साजरा केला जातो.
(A) 18 फेब्रुवारी
(B) 19 फेब्रुवारी
(C) 20 फेब्रुवारी
(D) 21 फेब्रुवारी✅✅✅

♻️✅♻️
कोणत्या संस्थेला दिवंगत मनोहर पर्रीकर ह्यांचे नाव देण्यात आले आहे?
(A) संरक्षण अभ्यास व विश्लेषण संस्था✅✅✅
(B) संरक्षण संशोधन व विकास संस्था
(C) संरक्षण गुप्तचर संस्था
(D) दिलेल्यापैकी एकही नाही

✅♻️✅
2020 टोकियो ऑलम्पिकचे अधिकृत बोधवाक्य काय आहे?
(A) युनायटेड बाय इमोशन👍✅✅
(B) युनायटेड बाय स्पोर्ट्स
(C) युनायटेड ऑफ स्पिरिट
(D) युनायटेड ऑफ पर्पज

✅✅
भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI) याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. SEBI ही एक घटनात्मक संस्था आहे.

2. ही भारतातल्या रोखे, समभाग व्यापार बाजारपेठांवर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे.

दिलेल्यापैकी अचूक उत्तर ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)✅✅✅✅
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

♻️♻️♻️
_______ राज्य सरकारने नवी ‘समरक्षने’ योजना लागू केली.
(A) केरळ
(B) कर्नाटक✅✅✅✅
(C) तामिळनाडू
(D) तेलंगणा

✅✅
भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष आणि भारत सरकारचे वित्त वर्ष एकच करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
(A) बिमल जालान समिती🔰🔰🔰
(B) केळकर समिती
(C) श्रीधर समिती
(D) रघुराम राजन समिती

🔰🔰🔰
‘ब्ल्यु ऑरिजिन प्रोग्राम’ __________ याच्या संदर्भात आहे.
(A) मासे आधारित अर्थव्यवस्थेला चालना देणे
(B) अंटार्क्टिक प्रदेशामध्ये शोधकार्यासाठी NASAचे अभियान
(C) समुद्रकिनारपट्टी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जागतिक महासागर आयोग
(D) अंतराळाचा प्रवास🔰✅✅✅

♻️🔰
भारतीय सीमा निर्धारण आयोग याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. 42व्या सुधारणा कायद्याने 2000 सालापर्यंत मतदारसंघांची सीमा निर्धारण प्रक्रिया थांबवली होती.

2. भारतात सीमा निर्धारण आयोग चार वेळा गठित केले गेले आहेत.

दिलेल्यापैकी अचूक विधान ओळखा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही✅♻️✅✅
(D) ना (1), ना (2)

जानेवारी 2020 चा घाऊक किंमत निर्देशांक.


 
सर्व वस्तूंसाठीच्या घाऊक किंमत निर्देशांकात जानेवारी 2020 मध्ये आधीच्या महिन्याच्या तुलनेत 0.1 टक्के वाढ होऊन तो 122.8 वरून 122.9 (तात्पुरती आकडेवारी)वर पोहोचला.

चलनफुगवटा....

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा वार्षिक दर जानेवारी 2020 मध्ये 3.1 टक्के राहिला. आधीच्या महिन्यात तो 2.59 टक्के(तात्पुरती आकडेवारी)  आणि जानेवारी 2019 मध्ये तो 2.76 टक्के होता.

प्राथमिक वस्तू...

या गटाच्या निर्देशांकात 1.1 टक्क्याने घसरण होऊन तो 147.2 (तात्पुरती आकडेवारी) झाला. त्या आधीच्या महिन्यात तो 148.8 होता.

अन्न घटकाच्या निर्देशांकात आधीच्या महिन्याच्या तुलनेत 1 टक्क्याने घसरण होऊन तो 160.8 झाला.

‘खाद्येतर’ घटकाच्या निर्देशांकात 1.4 टक्के घसरण होऊन तो 132.1 पर्यंत खाली आला.

‘खनिजे’ घटकाच्या निर्देशांक 7.2 टक्के घट होऊन तो 142.6 झाला.

‘कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू’ घटकाच्या निर्देशांकात 2.7 टक्के वाढ हाऊन तो आधीच्या महिन्याच्या 88.3 झाला.

इंधन आणि वीज

या गटाच्या निर्देशांकात 1.4 टक्के वाढ होऊन तो 102.7 राहिला.

उत्पादित वस्तू
या गटाच्या निर्देशांकात 0.4 टक्के वाढ होऊन ते 118.5 झाला.

अन्नधान्य आधारित घाऊक किंमत निर्देशांक..

अन्नधान्य आधारित घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर घसरून जानेवारी 2020 मध्ये तो 10.12 टक्के झाला. डिसेंबर 2019 मध्ये तो 11.05 टक्के होता.

पद्मविभूषण पुरस्कार जिंकणारी मेरी कॉम पहिली महिला खेळाडू

🔹 तरनजितसिंग संधू यांची अमेरिकेत भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या श्रीलंकेमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कार्यरत आहेत.

🔸 पश्चिम बंगाल सीएएविरूद्ध ठराव संमत करणारे चौथे राज्य ठरले.हिवाळी अधिवेशनात संसदेने नागरिकत्व दुरुस्ती कायदा संमत केला. परंतु बरीच राज्ये या कायद्याला विरोध करीत आहेत. या कायद्याच्या विरोधात पहिला ठराव संमत करणारे केरळ हे पहिले राज्य ठरले. केरळनंतर पंजाब, राजस्थान पश्चिम बंगाल असा क्रम लागतो.

🔹कोलकत्ता येथे हुगळी नदीवर भारताची पहिली अंडरवॉटर मेट्रो बांधली जात आहे

🔸 ओडिशाच्या कोणार्क येथे राष्ट्रीय पर्यटन परिषद आयोजित करण्यात आली आहे

जगातील पहिले योग विद्यापीठ

- भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ अमेरिकेत चालू वर्षात संशोधनासह स्वतःचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणार आहे. या अभ्यासक्रमासाठी एप्रिलपासून प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती विद्यापीठ अधिकाऱयांनी दिली आहे.
- विवेकानंद योग विद्यापीठ 50 लाख डॉलर्सच्या अर्थसंकल्पासह लॉस एंजिलिस शहरात उभारण्यात आले आहे.
- केस वेस्टर्न विद्यापीठातील प्राध्यापक श्रीनाथ यांना योग विद्यापीठाशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर भारतीय योगगुरु एच.आर. नागेंद्र याचे अध्यक्ष असतील. अभ्यासक्रम ऑगस्ट 2020 पासून सुरू होणार आहे.
- विद्यापीठाने योगवर आधारित उच्चशिक्षण उपलब्ध करण्यासाठी नोव्हेंबर 2019 मध्ये ब्युरो फॉर प्रायव्हेट पोस्टसेकंड्री एज्युकेशन, कॅलिफोर्नियाकडून अधिकृत मान्यता प्राप्त केल्याच्या तीन महिन्यांमध्येच ही घोषणा केली आहे.
-  ‘वायु’ची संकल्पना नासाचे माजी वैज्ञानिक नागेंद्र यांचीच आहे. नागेंद्र हे मागील 4 दशकांपासून योगप्रसार तसेच त्याच्या शिक्षणासाठी कार्यरत आहेत.
- भारतात 2002 मध्ये पहिले योग विद्यापीठ स्थापन करण्यात आले होते. त्यानंतरच नागेंद्र यांनी योगवर आधारित उच्चशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला होता.
- विद्यापीठामुळे अमेरिकेतील हजारो योगशिक्षकांना मदत मिळणार असल्याचे विधान विद्यापीठाच्या संचालक मंडळाचे सदस्य प्रेम भंडारी यांनी केले आहे

विठ्ठल रामजी शिंदे ऊर्फ महर्षी शिंदे

( जमखिंडी, २३ एप्रिल, इ.स. १८७३ - २ जानेवारी, इ.स. १९४४) हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते.

जीवनसंपादन

शिंदे यांनी पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एल्एल.बी. परीक्षेकरिता मुंबईला गेले.तेथे ते प्रार्थना समाजातदाखल झाले. १८ ऒक्य़ोबर, इ.स. १९०६ रोजी महर्षी शिंदे यांनी ‘'डिप्रेस्ड क्लास मिशन’' या संस्थेची स्थापना केली. त्यांनी इ.स. १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरवली.

🌺 लेखन 🌺

शिंदे यांनी वेगवेगळ्या कालखंडात रोजनिशी लिहिली. पहिल्यांदा १८९८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना, मग १९०१-३ या काळात इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेत असताना, व त्यानंतर कायदेभंग सहभागाबद्दल शिक्षा झाल्यानंतर १९३० साली येरवडा तुरुंगात असताना त्यांनी रोजनिशींचे लेखन केले आहे. याशिवाय १९२८ साली शिंदे यांनी 'ब्राह्मसमाज शतसांवत्सरी सफर' नावाची रोजनिशी लिहिली आहे. या चारही रोजनिशीत महर्षी शिंदे यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.

पहिल्या तीन रोजनिशींचे संपादन १९७९ साली गो. मा. पवार यांचे असून 'ब्राह्मसमाज शतसांवत्सरी सफर' या नावाच्या चौथ्या रोजनिशीचे संपादन रणधीर शिंदे यांचे आहे.

वि.रा. शिंदे यांच्या आत्मपर लिखाणाचे अनेक खंड प्रकाशित झाले आहेत. पहिल्या खंडात ’भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन आणि चिंतन’ हे लेखन आहे. दुसर्‍या खंडात महर्षी श‌िंदे यांच्या चार रोजनिशींचा समावेश असून, 'माझ्या आठवणी व अनुभव' हे पावणे ४०० पानी आत्मचरित्र व काही प्रवासवर्णने आहेत.

आत्मचरित्र

'माझ्या आठवणी व अनुभव' नावाचे हे आत्मचरित्र तीन भागांत विभागले असून पहिल्या भागात त्यांनी आपला जीवनवृत्तान्त सांगितला आहे. तर उर्वरित भागात शिंदे यांच्या ब्राह्मसमाज, प्रार्थना समाज, डिप्रेस्ड क्लासेस मिशन या सामाजिक व राजकीय कार्याचे विवेचन आहे. लहानपणी त्यांच्या घरी अनेकजण येत. त्यात साधू, रामदासी, संन्यासी व सिद्ध येत. त्यांचे लहानपणाचे अनुभव मोठे हृदयस्पर्शी आहेत. आपल्या वाड्यात सर्व शाळासोबती कसे जमत असत व त्यातून धांगडधिंग्याचा जिमखाना कसा बनत असे, हे ते सांगतात. शेतकरी चळवळी व परिषदांचे वृत्तान्त या आत्मनिवेदनात आहेत

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...