०७ जानेवारी २०२०

*कर्नाटकच्या NIT येथे ISROचे चौथे शैक्षणिक केंद्र

- अंतराळ क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी एक व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कर्नाटक  राज्यातल्या सुरथकल येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) याच्या परिसरात एक प्रादेशिक शैक्षणिक केंद्र उघडणार आहे.

- त्यासंदर्भात 3 जानेवारीला दोन्ही संस्थांमध्ये एक सामंजस्य करार झाला.

- NIT-सुरथकल इथले केंद्र हे ISROचे चौथे प्रादेशिक शैक्षणिक केंद्र असणार. इतर केंद्रे मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (जयपूर), गुवाहाटी विद्यापीठ आणि कुरुक्षेत्र विद्यापीठ येथे आहेत.

▪️केंद्राविषयी

- या ठिकाणी अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनुप्रयोगांमधील संशोधन आणि विकास कार्ये NIT सह संयुक्तपणे केले जाणार आहे.

- ISRO या केंद्राच्या कामकाजासाठी व प्रशासकीय खर्चासाठी वर्षाकाठी 2 कोटी रुपयांचे वार्षिक अनुदान देणार आहे.

- कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ आणि लक्षद्वीप या राज्यांचा समावेश असलेल्या दक्षिणेकडील प्रदेशात अंतराळ तंत्रज्ञानाच्या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी हे केंद्र मदतनीस म्हणून काम करणार.

- भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या भविष्यातल्या गरजांसंबंधित क्षेत्रांमध्ये प्रगत संशोधन हे केंद्र करणार आहे.

- क्षमता बांधणी, जनजागृती आणि ISROच्या संशोधन व विकास कामांसाठी हे केंद्र एक दूत म्हणून काम करणार आहे.

- या केंद्रामध्ये NITचे प्राध्यापक आणि संशोधक तसेच भेट देणारे वैज्ञानिक आणि ISROचे तज्ज्ञ असणार. एक संयुक्त धोरण व व्यवस्थापन समिती या केंद्राच्या अंतर्गत चालणार्‍या उपक्रमांचे मार्गदर्शन करणार.

- या केंद्राच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पाच्या कालावधी दरम्यान संशोधन पाठ्यवृत्ती (फेलोशिप) देखील दिली जाणार.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पर्यायी उत्तरांतील ‘उद्गारवाचक वाक्य’ ओळखा.

   1) ही मूर्ती खूप सुंदर आहे.    2) कोण म्हणतो ही मुर्ती सुंदर नाही.
   3) किती सुंदर आहे ही मूर्ती    4) ही मूर्ती सुंदर नाही असे नाही.

उत्तर :- 3

2) खाली दिलेल्या वाक्याचे साध्या वर्तमानकाळातील रूप शोधा. – मी आंबा खाईन.

   1) मी आंबा खातो    2) मी आंबा खाल्ला
   3) मी आंबा खात असेन    4) मी आंबा खात होती

उत्तर :- 1

3) खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर पुल्लिंग व स्त्रीलिंग अशा दोन्ही प्रकारे होतो.

   1) संधी    2) बाधी     
   3) वेळ      4) सर्व

उत्तर :- 4

4) गोविंदा इंग्रजीत कच्चा आहे. – अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा.

   1) षष्ठी – अपादान    2) सप्तमी – अधिकरण 
   3) तृतीया – अधिकरण    4) पंचमी – अपादान

उत्तर :- 2

5) ‘वारा सुटला आणि पाऊस गेला’ या वाक्याचा प्रकार कोणता ?

   1) केवल वाक्य    2) संयुक्त वाक्य   
   3) मिश्र वाक्य    4) साधारण वाक्य

उत्तर :- 2

6) ‘अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही’ या वाक्यातील उद्देश कोणते?

   1) अलीकडे    2) तुम्हाला   
   3) मी      4) पत्र

उत्तर :- 3

7) ‘न्यायधिशाकडून दंड करण्यात आला’ या प्रयोगाचे नाव सांगा.

   1) कर्तरी प्रयोग      2) भावे प्रयोग   
   3) समापन कर्मणी प्रयोग    4) नवीन कर्मणी प्रयोग

उत्तर :- 4

8) ‘तोंडी लावणे’ हा सामासिक शब्द समासाचा कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) उपपदतत्पुरुष  2) अलुक तत्पुरुष   
   3) कर्मधारय    4) व्दिगू

उत्तर :- 2

9) कंसातील विरामचिन्हे ओळखा. -  (:)

   1) स्वल्पविराम    2) अपूर्ण विराम   
   3) अर्धविराम    4) यापैकी नाही

उत्तर :- 2

10) खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नव्हे ?

   1) दगड    2) धोंडा     
   3) पाषाण    4) झाड

उत्तर :- 3

विभिन्न गांधी

1) आधुनिक गांधी  - बाबा आम्टे

2) अमेरिकी गांधी  - मार्टिन लूथर किंग

3) बर्मी गांधी  - आंग सान सू की

4) श्रीलंका गांधी  - ए टी अरियाटाने

5) अफ्रीकी गांधी  - केनेथ कोंडा

6) काला गांधी (द.अफ्रीकी गांधी) - नेल्सन मंडेला

7) कीनिया के गांधी। - जोमो केन्याटा

8) इन्डोनेशियाई गांधी  - अहमद सुकर्णो

9) शेखावटी गांधी  - बद्रीमल सोढानी

10) उत्तराखंड के गांधी - इंद्रमल बडोनी

11) बिहारी गांधी  - डॉ.राजेन्द्र प्रसाद

12) राजस्थान गांधी  - गोकुल भट्ट

13) गांधीजी के 5वे पुत्र  - जमनालाल बजाज

14) मालाणी (बाडमेर) के गांधी - वृद्धिचंद जैन

नागरिकत्व कायदा राबविणारे उत्तर प्रदेश ठरलं पहिलं राज्य!

◾️ केंद्र सरकारनं केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी सुरू करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरलं आहे.

📌 पाकिस्तान,
📌 अफगाणिस्तान आणि
📌 बांगलादेश या तीन शेजारी देशांतून आलेल्या

1⃣ हिंदू,
2⃣ शीख,
3⃣ जैन,
4⃣  बौद्ध,
5⃣ पारशी व
6⃣ ख्रिश्चन

स्थलांतरितांना या कायद्यानुसार नागरिकत्व देता यावे

◾️ यासाठी त्यांचा शोध घेण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, असं गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अविनाश अवस्थी यांनी सांगितलं.

◾️केंद्र सरकारने ठरवून दिलेलं हे काम करणं प्रत्येक राज्यावर बंधनकारक आहे आणि जे यास नकार देतील त्यांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो, असं अवस्थी यांनी सांगितलं.

➖➖➖➖

UNICEFचा “जागतिक लोकसंख्या अहवाल”

संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF) यांचा “जागतिक लोकसंख्या अहवाल” प्रसिद्ध करण्यात आला आहे.

- अहवालात असे म्हटले आहे की 2027 सालापर्यंत जगातला सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून भारत चीनला मागे टाकणार.

- UNICEFने यावर ‘वर्ल्ड डेटा लॅब’ बरोबर काम केले. 1 जानेवारी 2020 रोजी जन्मलेल्या बाळांच्या संख्येचा अंदाज UNच्या ‘जागतिक लोकसंख्या अंदाज (2019)’ याच्या अद्ययावत पुनरावृत्तीवर आला आहे.

▪️इतर ठळक बाबी

- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2020 रोजी अंदाजे 67,385 नवजात बाळ भारतात जन्मले जो की एक विक्रम झाला आहे.

- त्या दिवशी जगात जन्मलेल्या अंदाजे 392,078 बाळांपैकी 17% भारतात जन्माला आली. यांपैकी एक चतुर्थांश नवजात बाळ ही दक्षिण आशियामध्ये जन्माला आली आहेत.

- 1 जानेवारी 2020 या दिवशी चीनमध्ये 46 हजार 229 बाळांनी जन्म घेतला. तर नायजेरियात 26 हजार 039, पाकिस्तानात 13 हजार 020, इंडोनेशियात 13 हजार 020, अमेरिकेत 10 हजार 452 बाळांचा जन्म झाला.

- 2020 साली जगातल्या पहिल्या बाळाचा जन्म फिजी देशात झाला.

- 1 जानेवारी 2020 रोजी जागतिक लोकसंख्या अंदाजे 7,621,018,958 वर पोहचली. याचा अर्थ गेल्या वर्षीच्या काळापासून ही अंदाजे वाढ 77,684,873 ने झाली आहे. वाढीचा दर 1.03% असण्याचा अंदाज आहे.

- जानेवारी 2020 मध्ये जगभरात प्रत्येक सेकंदाला 4.3 जन्म आणि 1.9 मृत्यू अपेक्षित आहेत.

- आतापर्यंतच्या दशकात जागतिक लोकसंख्या 8.6 अब्जपर्यंत वेगाने वाढेल अशी संयुक्त राष्ट्रसंघाचा अंदाज आहे. अंदाज असा आहे की 2050 साली हा आकडा 9.8 अब्ज आणि 2100 साली 11.2 अब्जपर्यंत पोहोचेल.

- जवळजवळ निश्चित आहे की जागतिक लोकसंख्या काही वर्षातच 8 अब्जांवर जाणार, जी 1975 सालापासून दुप्पट असणार.

- गेल्या तीन दशकांत जगात नवजात बाळाच्या जगण्याच्या प्रमाणात उल्लेखनीय प्रगती झाली आहे आणि जगभरात वयाच्या पाच वर्षापूर्वी मृत्यूमुखी पडणार्‍यांची  संख्या निम्म्याहून कमी झाली आहे.

- बालमृत्यू ही भारतातली सार्वजनिक आरोग्यासाठीची एक मोठी चिंता आहे आणि जन्माच्या वेळी मृत्यूमुखी पडणार्‍या नवजात बाळांची संख्या जवळजवळ 0.76 दशलक्ष होती आणि सुमारे 3.5 दशलक्ष बाळ अकाली जन्मले.

हॉकीपटू सुनीता लाक्राची निवृत्ती

- गुडघ्याच्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय हॉकी कारकीर्द संपुष्टात

- भारताच्या महिला हॉकी संघाची बचावपटू सुनीता लाक्राने गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती पत्करली आहे.

- भारताच्या महिला हॉकी संघाने २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये रौप्यपदक जिंकले होते. त्या संघात सुनीताचा समावेश होता. २८ वर्षीय सुनीताच्या गुडघ्यावर आणखी एक शस्त्रक्रिया आवश्यक आहे.

- सुनीताने १३९ सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. विशेष म्हणजे या वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे सुनीताचे स्वप्न होते.

-  ‘‘आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्त होत आहे. २०१६मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे त्या वेळेस तीन दशकांनंतर भारताच्या महिला हॉकी संघाला ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा मान मिळाला होता. या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहणार आहेत.

- ‘हॉकी इंडिया’चीही मी आभारी आहे. दुखापतींवर चांगले उपचार मिळण्यापासून प्रत्येक वेळी हॉकी इंडियाकडून चांगले सहकार्य लाभले,’’ असे सुनीताने म्हटले.

- आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीचा निर्णय हा माझ्यासाठी भावुक क्षण आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळणे हा आपल्यासाठी अभिमानास्पद क्षण होता. टोक्यो ऑलिम्पिकसाठीदेखील आपण तयारी करत होतो.

- मात्र गुडघा दुखापतीवर दुसरी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीचा निर्णय घेत आहोत. आपले संघसहकारी, हॉकी इंडिया आणि आपले प्रशिक्षक शोर्ड मरीन यांचे आपण विशेष आभार मानत आहोत. माझ्या कुटुंबीयांच्या प्रोत्साहनाशिवाय हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवास आपण करू शकलो नसतो. - सुनीता लाक्रा

▪️शेतकरी वडिलांकडून नेहमीच प्रोत्साहन

- सुनीता लाक्राचा जन्म ओदिशामधील राजगंजपूर येथे शेतकरी कुटुंबात झाला. वडिलांनी सुनीताला सहाव्याच वर्षी रॉरकेला येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साई) हॉकी प्रशिक्षणासाठी पाठवले.

- वास्तविक लाक्रा यांच्या घरात सर्व मुले व मुली फुटबॉल खेळायचे. मात्र तरीदेखील हा खेळ धोकादायक आहे असे मानणाऱ्या सुनीताच्या वडिलांनी आपल्या मुलीला हॉकीसाठी प्रोत्साहन दिले.

- सुनीताचे तिच्या यशस्वी कारकीर्दीसाठी अभिनंदन. मैदानावर आणि ड्रेसिंग रूममधील आपल्या सोबतच्या आठवणी बऱ्याच आहेत. दशकाहून अधिक काळ आपण एकत्र खेळलो आहोत. लवकरच सुनीता तू बरी हो.

- राणी रामपाल, भारतीय हॉकी कर्णधार

▪️एक नजर कामगिरीवर

- * १३९ सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

- * २०१४मध्ये इन्चॉनमधील एशियाडमध्ये कांस्यपदक

- * २०१८ आशिया चॅम्पियन्स चषक स्पर्धेत भारताचे नेतृत्व- स्पर्धेत भारताला दुसरे स्थान

- * २०१८मध्ये जकार्तामधील एशियाडमध्ये रौप्यपदक
-------------------------------------------------

सहा चेंडूत सहा षटकार

🔰 एका षटकात सलग 6 षटकार (सिक्स) मारण्याची विक्रमी कामगिरी, न्यूझीलंडचा फलंदाज लिओ कार्टरने रविवारी टी -20 क्रिकेटमध्ये केली आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील सातवा फलंदाज ठरला आहे.

🔰 असे ठोकले षटकार : कार्टरने नाईट्स संघाचा फिरकी गोलंदाज अँटोन डेवसिचच्या एका षटकात सलग 6 षटकार ठोकले.

🔰 6 चेंडूत, 6 षटकार ठोकणारे फलंदाज :

▪ गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज)
▪ रवी शास्त्री, युवराज सिंग (भारत)
▪ हर्शल गिब्स (दक्षिण आफ्रिका)
▪ रॉस विटली (इंग्लंड)
▪ हजरतुल्ला जाजाई (अफगाणिस्तान)
▪ लिओ कार्टर (न्यूझीलंड)

🔰 दरम्यान, कार्टरने डोमॅस्टिक टी -20 स्पर्धेत कँटरबरी संघाकडून खेळत ही कामगिरी केली आहे.

14 वैज्ञानिकांना भारत सरकारची ‘स्वर्ण जयंती पाठ्यवृत्ती’ मिळाली

नाविन्यपूर्ण संशोधनाच्या कल्पना असलेल्या प्रकल्पांमध्ये सहभाग आणि संबंधित शाखांमधल्या संशोधन आणि विकास कार्यावर प्रभाव पाडण्याची क्षमता असलेल्या 14 वैज्ञानिकांना 2018-19 या वर्षासाठी भारत सरकारची ‘स्वर्ण जयंती पाठ्यवृत्ती’ (फेलोशिप) देण्यात आली आहे.

▪️पाठ्यवृत्ती मिळविणारे

▪️डॉ. शीतल गंडोत्रा (CSIR-IGIB, दिल्ली)

▪️डॉ. जितेंद्र गिरी (नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जीनोम रिसर्च)

▪️डॉ. राकेश सिंग लैशराम (राजीव गांधी बायोटेक्नॉलॉजी सेंटर, तिरुवनंतपुरम)

▪️डॉ. विशाल राय (IISER, भोपाळ)

▪️डॉ. कनिष्क विश्वास (जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर एडवांस्ड सायंटिफिक रिसर्च, बेंगळुरू)

▪️डॉ. गोपालन राजारामन (IIT मुंबई)

▪️डॉ. अपूर्वा खरे (IISc बेंगळुरू)

▪️डॉ. महेंदर सिंग (IISER, मोहाली)

▪️डॉ. सबिमल घोष (IIT मुंबई)

▪️डॉ. स्मरजित करमाकर (TIFR हैदराबाद)

▪️डॉ. अर्जुन बागची (IIT कानपूर)

▪️डॉ. अनिंद्य दास (IISc बेंगळुरू)

▪️डॉ. योगेश सिम्हान (IISc बेंगळुरू)

▪️डॉ. श्वेता अग्रवाल (IIT चेन्नई)

▪️स्वर्ण जयंती पाठ्यवृत्ती योजना

- देशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारने स्वर्ण जयंती पाठ्यवृत्ती योजना सुरु केली होती. या योजनेच्या अंतर्गत निवडक युवा वैज्ञानिकांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मूलभूत संशोधनासाठी विशेष मदत पुरवली जाते.

- पाठ्यवृत्ती आणि संशोधनासाठी निवडण्यात आलेल्या वैज्ञानिकांना विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून मदत दिली जाते. संशोधनासाठी दरमहा 25 हजार रुपये पाठ्यवृत्तीचा यात समावेश आहे. तसेच वैज्ञानिकांना त्यांच्या वेतनाव्यतिरिक्त 5 वर्षांसाठी वार्षिक 5 लक्ष रुपये एवढे संशोधन अनुदान देखील दिले जाते.
-----------------------------------------------

Current affairs questions

1)107 व्या ‘भारतीय विज्ञान परिषद’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या संकेतस्थळाचे उद्घाटन केले गेले?
(A) I-STEM ✅✅✅
(B) ISTI
(C) VIBHA
(D) विज्ञान प्रसार सायन्स

2)धान खरेदीत शेतकर्‍यांना प्रति क्विंटल 2500 रुपये निश्चितपणे देय करण्यासाठी _ राज्याच्या मुख्यमंत्रीने एक समिती नेमली.
(A) मध्यप्रदेश
(B) छत्तीसगड ✅✅✅
(C) पश्चिम बंगाल
(D) ओडिशा

3)‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2019’ या अहवालानुसार, भारतातली  टक्के जंगलांना वणव्याचा धोका आहे.
(A) 15.6%
(B) 18.65%
(C) 21%
(D) 21.4%✅✅✅

4)कोणत्या राज्यात कासवांसाठी नव्याप्रकारचे एक पुनर्वसन केंद्र उभारले जाणार आहे?
(A) ओडिशा
(B) आंध्रप्रदेश
(C) बिहार ✅✅✅
(D) पश्चिम बंगाल

5)अंतराळ क्षेत्रासाठी एक प्रादेशिक शैक्षणिक केंद्र उभारण्यासाठी ISROने कोणत्या संस्थेबरोबर करार केला?
(A) NIT कर्नाटक ✅✅✅
(B) IIT मद्रास
(C) NIT वरंगल
(D) NIT त्रिची

6)अदानी पोर्ट या कंपनीने _ राज्यात असलेल्या ‘कृष्णपट्टनम बंदर’ यामधील गुंतवणुकीचा 75 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे.
(A) तामिळनाडू
(B) आंध्रप्रदेश ✅✅✅
(C) तेलंगणा
(D) कर्नाटक

7)मणीपुरी मिती समुदायांकडून पाळला जाणारा ‘लाई हराओबा’ नावाच्या धार्मिक विधीला __ येथे सुरुवात झाली.
(A) नागालँड
(B) आसाम
(C) मणीपूर.   ✅✅✅
(D) मिझोरम

8)कोणत्या प्रकल्पासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) भारतीय खगोलशास्त्र संस्था (IIA) सोबत करार केला?
(A) चंद्रयान-3
(B) आदित्य एल-1
(C) नेत्र ✅✅✅
(D) गगनयान

9)‘भितरकनिका राष्ट्रीय उद्यान’ याच्या संदर्भातली खाली दिलेली विधाने विचारात घ्या.

I. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान ओडिशामध्ये आहे आणि ते खार्‍या पाण्यातल्या मगरींसाठी प्रसिद्ध आहे.

II. हे 2002 सालापासून रामसर स्थळ देखील आहे.

III. भितरकनिका राष्ट्रीय उद्यानात नुकत्याच झालेल्या जनगणनेनुसार, सन 2019 मध्ये खार्‍या पाण्यातल्या मगरींच्या संख्येत घट झाली आहे.

वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

(A) केवळ II
(B) केवळ III ✅✅✅
(C) II आणि III
(D) एकही नाही

10)सायबर गुन्ह्यांचा धोका कमी करण्यासाठी कोणते राज्य सरकार ‘सायबर सेफ विमेन’ नावाचा जागृती उपक्रम राबवत आहे?
(A) तेलंगणा
(B) महाराष्ट्र✅✅✅
(C) केरळ
(D) तामिळनाडू

🔸‘FICCI इंडिया स्पोर्ट्स’द्वारे कोणाला 2019 सालाच्या उत्कृष्ट महिला खेळाडूंचा पुरस्कार देण्यात आला आहे?

(A) सायना नेहवाल
(B) पी. व्ही. सिंधू
(C) राणी रामपाल✅✅✅
(D) विनेश फोगट..

🔸स्पेनच्या ‘ला लिगा’ या फुटबॉल लीगचा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?

(A) प्रियंका चोप्रा
(B) रोहित शर्मा
(C) विराट कोहली✅✅✅
(D) ब्रायन लारा

🔸‘स्पेस ऑस्कर 2019’ या कार्यक्रमामधील ‘सामाजिक उद्योजकता आव्हान’ कोणी जिंकले?

(A) अभिलाषा पुरवार✅✅✅
(B) रिकार्डो काब्राल
(C) मॅटस बाकन
(D) नादिनी गॅले

🔸कोणत्या राज्याच्या पोलीसाने पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांना शोधण्यासाठी ‘ट्रॅकीया’ नावाचे सॉफ्टवेअर उपयोगात आणले?

(A) ओडिशा
(B) हरयाणा✅✅✅
(C) तामिळनाडू
(D) आंध्रप्रदेश

🔸पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय गंगा परिषदेची पहिली बैठक ____ येथे झाली.

(A) लखनऊ
(B) कानपूर✅✅✅
(C) नवी दिल्ली
(D) नोएडा

बेन स्टोक्सचा क्षेत्ररक्षणात विक्रम

◾️एका डावात सर्वाधिक वेळा पाच झेल टिपणारा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स हा इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.

◾️दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर त्याने ऑनरिख नॉर्कीएचा झेल टिपला. दुसऱ्या स्लिपमध्ये स्टोक्सने हे पाचही झेल टिपले.

◾️इंग्लंडच्या १०१९ सामन्यांमध्ये एका डावात चार झेल टिपण्याची किमया २३ वेळा घडली आहे.

◾️जागतिक कसोटी सामन्यांमध्ये पाच झेल पकडणारा स्टोक्स हा ११वा खेळाडू आहे.

◾️अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने एका डावात पाच झेल टिपले होते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

साथरोगाची ‘रिअल टाईम’ माहिती मिळणार.

🎆राज्यातील कोणत्याही भागात साथरोगाचे रुग्ण आढळल्यास त्याची ‘रिअल टाईम’ माहिती आरोग्य विभागाला मिळणार आहे.

🎆विविध आजारांच्या माहितीच्या आधारे साथरोगाच्या उद्रेकाचा इशारा देणारी ही संगणकीय प्रणाली राज्यात पुढील महिनाभरात कार्यान्वित होईल. त्यामुळे साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे
शक्य होणार आहे.

🎆एकात्मिक आरोग्य व्यवस्थापन व्यासपीठ (आयएचआयपी) अंतर्गत ही प्रणाली सुरू केली जाणार असून महाराष्ट्र देशातील नववे राज्य ठरले आहे.तसेच केंद्र सरकार व जागतिक आरोग्य संघटनेने संयुक्तपणे ‘आयएचआयपी’ हे व्यासपीठ विकसित केले आहे.

🎆देशात नोव्हेंबर 2018 पासून टप्याटप्याने काही राज्यांमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातही ही प्रणाली सुरू करण्यासाठी काही दिवसांपासून तालुका, जिल्हापातळीवर कर्मचारी, अधिकाºयांचे प्रशिक्षण सुरू होते.

🎆संगणकीय प्रणाली तीन पातळ््यांवर काम करणार आहे. पहिल्या टप्प्यात गाव पातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रुग्णांची माहिती तेथील आरोग्य सेवकांकडून ‘एस’ फॉर्म (संशयित) मध्ये भरली जाईल.

🎆त्यांच्यासाठी मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात तालुका पातळीवरील सरकारी रुग्णालये, आरोग्य

🎆केंद्रांमधील रुग्णांची माहिती (पी फॉर्म) संगणकाद्वारे भरली जाईल. तर तिसऱ्या टप्प्यात सरकारी प्रयोगशाळांमध्ये नमुना तपासणीनंतरच्या निदानाची माहिती (एल फॉर्म) संगणकाद्वारे भरली जाईल. हे तिनही फॉर्म एकमेकांशी जोडण्यात आले आहेत. गावपातळीवर भरलेली माहिती सर्व सरकारी रुग्णालये, प्रयोगशाळांना पाहता येऊ शकते.

इराण-अमेरिका युद्ध झाल्यास भारतालाही बसणार जबर फटका..

➡️अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध झाल्यास भारतालाही त्याचा फटका बसू शकतो. इराणचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूवरुन दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. शुक्रवारी बगदाद विमानतळाजवळ अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला.

➡️भारतावर काय परिणाम होणार?अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध झाल्यास फक्त ऊर्जा पुरवठयावरच परिणाम होणार नाही तर, आखातामध्ये राहणाऱ्या भारतीयांनाही त्याचा फटका बसेल.

➡️सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर तेलाच्या किंमती आधीच चार टक्क्यांनी वाढल्या आहेत. युद्ध भडकल्यास पश्चिम आशियामध्ये वास्तव्याला असलेल्या ८० लाख भारतीयांच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होईल.

➡️एकटया सौदी अरेबियामध्ये तीस लाख भारतीय राहतात. यापूर्वी या भागात झालेल्या युद्धाचा तिथे राहणाऱ्या भारतीयांसह अनेक परदेशी नागरिकांवर परिणाम झाला होता. भारताची मुख्य चिंता काय? भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे, पश्चिम आशियात राहणारे भारतीय तिथून मोठया प्रमाणावर पैसा पाठवतात.

➡️ही रक्कम अब्जावधीच्या घरात आहे. भारतीय अर्थव्यवस्था सध्या अडचणींचा सामना करत असताना दुसऱ्या देशाच्या युद्धामुळे बसणारा फटकाही परवडणारा नाही.

➡️चाबहार बंदरामुळे भारताला इराणमधून अफगाणिस्तानशी संपर्क साधता येणार आहे. तसेच येथून पूर्वेला केवळ ८० किलोमीटर अंतरावर पाकिस्तानच्या किनाऱ्यावर चीन विकसित करत असलेल्या ग्वादर या बंदराला शह देता येणे शक्य होणार आहे.

जी. बबीता रायुडू: SEBI याचे नवे कार्यकारी संचालक..

बाजारपेठेवर नियंत्रण ठेवणारी भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI) यांनी जी. बबिता रायुडू ह्यांची कार्यकारी संचालकपदी निवड केली आहे. 1 जानेवारी 2020 रोजी रायुडू ह्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. रायुडू व्यतिरिक्त SEBIमध्ये आणखी आठ कार्यकारी संचालक कार्यरत आहेत.

रायुडू नव्या पदभारासह कायदेशीर व्यवहार विभाग, अंमलबजावणी विभाग आणि विशेष अंमलबजावणी कक्ष सांभाळणार आहेत.

SEBI विषयी:-

भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI) हे भारतामध्ये समभाग बाजारपेठेमधील सुरक्षा बंध/कर्जरोखे/रोखे/किंवा अन्य उत्पादने यांच्या संदर्भात होणार्‍या व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारे विभाग आहे.

1988 साली या संस्थेची स्थापना झाली आणि ‘SEBI अधिनियम-1992’ अन्वये दि. 30 जानेवारी 1992 रोजी त्याला वैधानिक दर्जा प्राप्त झाला. मुंबईत त्या मंडळाचे मुख्यालय आहे.

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरी 2020

◾️६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेला 3-2 अशा गुणफरकाने पराभूत केले.

◾️ याचबारोबर महाराष्ट्राला यंदा नवा महाराष्ट्र केसरी मिळाला आहे.

◾️ ही लढत पाहण्यासाठी खासदार आणि महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते.

◾️६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये गादी विभागात हर्षवर्धन सदगीर याने तर माती विभागातून शैलेश शेळके याने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

◾️महाराष्ट्र केसरी किताबच्या आखाड्यात हे मल्‍ल एकाच तालमीतील म्हणजे काका पवारांचे पठ्ठे मैदानात होते.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...