केंद्रीय गृहराज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांच्याद्वारे लोकसभेत विधेयक
दिव-दमण आणि दादरा नगर हवेली दोन्ही केंद्रशासित प्रदेश 35 किमीच्या अंतरावर
दोन्हीसाठी सध्या स्वतंत्र सचिवालय आहेत.
दमण-दिव आणि दादरा-नगर हवेली दोन्हीचे भारतात विलनिकरण - 1961 साली
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
केंद्रीय गृहराज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांच्याद्वारे लोकसभेत विधेयक
दिव-दमण आणि दादरा नगर हवेली दोन्ही केंद्रशासित प्रदेश 35 किमीच्या अंतरावर
दोन्हीसाठी सध्या स्वतंत्र सचिवालय आहेत.
दमण-दिव आणि दादरा-नगर हवेली दोन्हीचे भारतात विलनिकरण - 1961 साली
1) विरुध्दार्थी अर्थ लिहा. – ‘अग्रज’
1) वंशज 2) पूर्वज 3) मनोज 4) अनुज
उत्तर :- 4
2) रिकाम्या जागी योग्य म्हण लिहा.
काय नाही आजच्या वर्तमानपत्रात ? लेख, अग्रलेख, वृत्तांत आणि सारे काही. तरी कशाचा प्रभाव मात्र नाही. यालाच म्हणतात,
‘......................’
1) बडा घर अन् पोकळ वासा 2) एक ना धड भाराभार चिंध्या
3) गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता 4) मियाँ मूठभर दाढी हातभर
उत्तर :- 2
3) ‘अल्लाची गाय’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.
1) अतिशय धूर्त 2) अतिशय श्रीमंत
3) अतिशय गरीब 4) अतिशय भाग्यवान
उत्तर :- 3
4) ‘हालअपेष्टा सहन करण्याचा गुण’ या शब्दसमूहाबद्दल समूहदर्शक शब्द कोणता ?
1) स्थितप्रज्ञता 2) हिंमत
3) तितिक्षा 4) शौर्य
उत्तर :- 3
5) खालीलपैकी शुध्द शब्द कोणते ?
1) चिंचा, खिंड, टिंब 2) चींच, खींड, टिंब
3) चिंच, खिंड, टिंब 4) चींच, खींड, टींब
उत्तर :- 3
6) मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण मानले जातात?
1) 48 2) 14 3) 34 4) 12
उत्तर :- 2
7) ‘तट्टीका’ या संधीचा विग्रह करा.
1) तत: + टीका 2) त् + ट् + ई + का
3) तत् + टीका 4) त्रा + टीका
उत्तर :- 3
8) योग्य विधाने निवडा.
अ) मूळ शब्दाला व्याकरणात प्रकृती असे म्हणतात.
ब) प्रकृतीला प्रत्यय लागून जे रूप तयार होते त्याला विकृती असे म्हणतात.
1) फक्त ब योग्य 2) फक्त अ योग्य
3) दोन्ही अयोग्य 4) दोन्ही योग्य
उत्तर :- 4
9) ‘गर्जेल तो करीत काय’ या वाक्याचे संबंधी सर्वनाम (अध्याह्यत) ओळखा.
1) गर्जेल 2) तो 3) जो 4) काय
उत्तर :- 3
10) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा विशेषण प्रकार ओळखा.
तिला बनारसी साडी शोभून दिसते.
1) नामसाधित विशेषण 2) सार्वजनिक विशेषण
3) समासघटित विशेषण 4) संबंध विशेषण
उत्तर :- 1
टाटा स्टील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या अतिजलद (ब्लिट्झ) प्रकाराच्या नऊ लढतींपैकी अखेरच्या पाच लढतींमध्ये फक्त एक गुण कमावणाऱ्या भारताच्या विश्वनाथन आनंदला प्रतिष्ठेच्या ग्रँड चेस टूर स्पर्धेसाठी पात्र होण्यात अपयश आले.
मॅग्नस कार्लसनने मात्र वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर एकूण विक्रमी २७ गुणांसह जेतेपदावर नाव कोरले. वर्षांच्या पूर्वार्धात अबिदजान (आयव्हरी कोस्ट) येथे झालेल्या स्पर्धेत कार्लसनने २६.५ गुण मिळवले होते. तो विक्रम कार्लसनने मोडीत काढला. अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने २३ गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर वेस्ली सो (अमेरिका) आणि अनिश गिरी (नेदरलँड्स) या दोघांनी प्रत्येकी १८.५ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.
भारताच्या आनंदला १६ गुणांसह सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर पी. हरिकृष्णा आणि विदित गुजराथी यांना प्रत्येकी १४.५ गुणांसह आठवे स्थान मिळाले. आनंदला पात्रतेसाठी दीड गुण कमी पडले. लंडन येथे होणाऱ्या ग्रँड चेस टूर स्पर्धेसाठी कार्लसन, डिंग लिरेन, अरोनिय, मॅक्झिमे व्हॅचिएर-लॅग्रॅव्ह पात्र ठरले आहेत.
⭐️ केंद्रशासित प्रदेश म्हणजे काय ? : भारतात 28 राज्यांसह 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. हे प्रदेश कोणत्याही राज्याचा भाग नसून त्यांचे प्रशासन थेट केंद्र सरकारद्वारे केले जाते. भारताचे राष्ट्रपती प्रत्येक केंद्रशासित प्रदेशासाठी प्रचालकाची नेमणूक करतात.
▪ अंदमान आणि निकोबार
▪ चंदीगड
▪ दमण आणि दीव
▪ दादरा आणि नगर हवेली
▪ दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेश
▪ पुडुचेरी
▪ लक्षद्वीप
▪ जम्मू-काश्मीर
▪ लडाख
📚 विज्ञान :- विविध एकके आणि त्यांचा वापर
💁♂ विज्ञान तसेच इतर शास्त्रशाखांमध्ये अनेक गोष्टींचे मापन करण्यासाठी वेगवेगळी एकक पद्धती वापरली जाते, त्याविषयी जाणून घेऊयात...
▪ प्रकाशवर्ष : तारे व ग्रह यांच्यातील अंतर मोजण्याचे एकक
▪ नॉट : सागरी जहाजांची गती मोजण्याचे एकक
▪ बार : वायुदाब मोजण्याचे एकक
▪ फॅदम : समुद्राची खोली मोजण्याचे एकक
▪ कॅलरी : उष्णता मोजण्याचे एकक
▪ हँड : घोड्याची उंची मोजण्याचे एकक
▪ अँगस्ट्रॉंम : प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचे एकक
▪ मायक्रोन : लांबीचे वैज्ञानिक एकक
▪ पौंड : वजन मोजण्याचे एकक
▪ अॅम्पीअर : विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक
1) ‘ग्लोबल टेररिझम इंडेक्स’ कोणत्या संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे?
उत्तर : इंस्टीट्यूट फॉर इकनॉमिक्स अँड पीस
2) ‘जागतिक तत्वज्ञान दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : नोव्हेंबर महिन्याचा तिसरा गुरुवार
3) यावर्षी ‘इंडिया फॉर ह्युमॅनिटी - जयपूर फूट’ कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका
4) "अरुंधती सुवर्ण योजना" कोणत्या राज्यसरकारद्वारे लागू केली जाणार आहे?
उत्तर : आसाम सरकार
5) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनी कोणत्या व्यक्तीला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले?
उत्तर : किरण मजुमदार-शॉ
6) नॅशनल इंटेलिजेंस ग्रिड प्रकल्प कधीपासून कार्यरत केला जाणार आहे?
उत्तर : 31 डिसेंबर 2020
7) राष्ट्रीय सोवा रिग्पा संस्था (NISR) याची स्थापना कोठे होणार आहे?
उत्तर : लडाख
8) ‘मिस्टर युनिव्हर्स 2019’ हा किताब कोणी जिंकला?
उत्तर : चित्रेश नतेसन
9) "डेस्टिनेशन नॉर्थ ईस्ट" महोत्सवाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : वाराणसी
10) ऑक्सफोर्ड डिक्शनरीने कोणत्या शब्दाची 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून निवड केली?
उत्तर : Climate Emergency
यापुढे माजी पंतप्रधान व त्यांच्या परिवाराला मिळणार 5 वर्षे SPG सुरक्षा व्यवस्था; केंद्र सरकारचे संसदेत बिल
▪ दिल्ली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला; अटक केलेल्या 3 आरोपींचे आयसिसशी संबंध असल्याची शक्यता
▪ प्रदूषणामुळे दिल्लीची अवस्था नरकापेक्षा वाईट; केंद्र व दिल्ली सरकारला सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत सुनावले.
▪ सिंचन घोटाळ्यांच्या 32 पैकी 9 प्रकरणाची चौकशी बंद करण्याचे एसीबी अप्पर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांचे आदेश
▪ देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला मुख्यमंत्री पदाचा पदभार; यानंतर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर केली पहिली स्वाक्षरी
▪ आमच्या 162 आमदारांची हॉटेल ग्रँड हयातमध्ये आजच परेड; परेड पाहण्यासाठी संजय राऊतांचे राज्यपालांना ट्विटरवरून आवाहन
▪ फेडरल बँकेत नोकरीसाठी रोबोट घेणार इंटरव्ह्यू ; फेडरिक्रूट नावाच्या रोबोची घेतली जाणार मदत
▪ बॅडमिंटनपटू साईना नेहवालची आगामी प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या पाचव्या मोसमातून माघार; ट्विटव्दारे जाहीर केला निर्णय
▪ अभिनेत्री कंगना रानौत उतरणार चित्रपट निर्मिती क्षेत्रात; राम मंदिर मुद्यावर 'अपराजित अयोध्या' नामक चित्रपट बनवणार
▪ महाराष्ट्र राज्यातील सत्तापेच कायम; आज सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या निर्णयाकडे राजकीय पक्षांसह सर्व देशाचे लक्ष
▪ संविधान दिनानिमित्त राष्ट्रपती कोविंद संसदेला करणार संबोधित; विरोधी पक्षांचा कार्यक्रमावर बहिष्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ करणार आंदोलन
▪ 27 नोव्हेंबर रोजी ISRO रचणार इतिहास; सत्तावीस मिनिटांमध्ये लॉन्च करणार 14 उपग्रह
▪ नाराजी नाट्यानंतर राज्यसभेतील मार्शलचा ड्रेसकोड बदलला, आता दिसणार जोधपुरी सुटात
▪ महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली मान्यता
▪ नेव्हीसील प्रकरण योग्य प्रकारे न हाताळल्याने अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी नौदल प्रमुख रिचर्ड स्पेन्सर यांना पदावरून हटवले
▪ अत्याधुनिक पद्धतीच्या गावठाण मोजणीचा एक कोटी 20 लाख घरमालकांना फायदा : राज्यातील 38 हजार 700 खेडय़ांमध्ये मोजणी
▪ One Plus कंपनीला भारतात 5 वर्ष पुर्ण; वनप्लस च्या दोन फोनवर मिळवा तब्बल 3 ते 5 हजार रुपयांपर्यंतची आकर्षक सूट
▪ डे-नाईट कसोटीच्या चौथ्या व पाचव्या दिवसाच्या तिकिटांचे पैसे बंगाल क्रिकेट संघटना (कॅब) चाहत्यांना परत करणार
▪ 14 वर्षांनंतर 'बंटी और बबली'चा येणार सीक्वल, मुख्य भूमिकेत अभिषेक बच्चनऐवजी दिसणार सैफ अली खान
नोमुरा ग्लोबल मार्केट रिसर्च या संस्थेनी ‘नोमुरा खाद्य असुरक्षितता निर्देशांक’ (NFVI) प्रसिद्ध केला आहे. खाद्यपदार्थाच्या किंमतींमध्ये होणार्या मोठ्या प्रमाणातल्या बदलांच्या आधारावर हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे. शीर्ष स्थान म्हणजे सुपरिस्थिती तर तळाशी म्हणजे वाईट परिस्थिती आहे.
दरडोई देशाची GDP; कुटुंबाच्या वापरामध्ये अन्नाचा वाटा; आणि खाद्याची निव्वळ आयात या तीन घटकांवर हा निर्देशांक तयार करण्यात आला आहे.
दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) कमी असेल, वापरामध्ये अन्नाचा वाटा अधिक असेल आणि खाद्यपदार्थांची निव्वळ आयात सर्वोच्च असल्यास देशातल्या खाद्यपदार्थाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असते.
🌼👌ठळक बाबी👇👇
🔸110 देशांमध्ये भारत 44 व्या स्थानी आहे.
🔸येत्या काही महिन्यांमध्ये जगातल्या 50 देशांमध्ये खाद्यपदार्थाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे, बहुधा उदयोन्मुख देशांमध्ये ही परिस्थिती येऊ शकते. या 50 देशांची एकत्रित लोकसंख्या जगातली जवळजवळ 60 टक्के आहे.
🔸खाद्यपदार्थाच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे ऑक्टोबर 2019 मध्ये भारताची किरकोळ महागाई 16 महिन्यांच्या उच्चांकावर गेली, जी 4.6 टक्के होती. खाद्यपदार्थाच्या महागाईचा दर सुमारे 8 टक्क्यांनी वाढला आहे, जो सरसरीच्या दुप्पट आहे. डाळी (महागाई दर 12%) आणि भाज्या (महागाई दर 26%) आणि मासे व मांस (महागाई दर 10%) अश्या आवश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या.
🔸हवामानाचे आघात (कमी पुरवठा), कच्च्या तेलाचे वाढलेले दर (वाहतुकीचे खर्च वाढला) आणि अमेरिकन डॉलरच्या मुल्यामधली घसरण (कमी आयात) हे असुरक्षिततेमागील तीन संभाव्य कारक दिसून आली आहेत.
दिनांक 27 नोव्हेंबर 2019 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी 1625 किलो वजनाच्या ‘कार्टोसॅट-3’ उपग्रहाचे प्रक्षेपण करून इतिहास रचला आहे.
PSLV C-47 या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. हे 102 वे उड्डाण आहे.
“कार्टोसॅट” ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) पृथ्वीच्या निरीक्षणासाठी बनविलेल्या उपग्रहांची मालिका आहे. ‘कार्टोसॅट-3’ हे कार्टोसॅट मालिकेतले सातवे उपग्रह आहे.
पृथ्वीची छायाचित्रे काढण्यासाठी, तसेच नकाशा निर्मितीसाठी ‘कार्टोसॅट-3’ उपग्रहाचा उपयोग होणार आहे.
उपग्रह अंतराळात पाच वर्षे कार्यरत राहणार आहे. उपग्रहामध्ये हाय-रिझोल्युशनची छायाचित्रे घेण्याची क्षमता आहे. याचा उपयोग नगर नियोजन, पायाभूत सुविधा विकास, किनारपट्टी विकासात होणार आहे.
अलीकडेच मलेशिया या देशातल्या शेवटच्या सुमात्रीयन गेंड्याचा मृत्यू झाला असून आता या देशात ही प्रजाती अस्तित्वात नाही.
शेवटच्या गेंड्याचे नाव ‘इमान’ असे होते, ती एक मादा होती. तिचा 23 नोव्हेंबर 2019 रोजी आजाराने मृत्यू झाला.
सुमात्रीयन गेंडा ही गेंड्याची आकाराने सर्वात छोटी असलेली प्रजाती आहे.
ही केसाळ आणि दोन शिंगी गेंड्याची प्रजाती शेवटची असून एका अंदाजानुसार जगात केवळ 80 गेंडे शिल्लक आहेत.
आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (International Union for Conservation of Nature -IUCN) या संस्थेनी सुमात्रीयन गेंड्याच्या प्रजातीला नामशेष असे दर्शवत त्याला त्याच्या ‘रेड लिस्ट’ मध्ये ठेवलेले आहे.
1) खालीलपैकी कोणती दोन नामे तिन्ही लिंगामध्ये आढळते.
अ) हरीण ब) पोर क) नेत्र ड) मूल
1) अ आणि ब 2) क आणि ड
3) ब आणि ड 4) अ आणि क
उत्तर :- 3
2) पर्यायी उत्तरांत ‘चतुर्थी विभक्तीचे अपादन कारकार्थ’ असलेले वाक्य कोणते ?
1) मी नदीच्या काठाने गेलो 2) तो घरातून बाहेर पडला
3) तू रामाला पुस्तक दे 4) तो दिवसाचा चालतो
उत्तर :- 3
3) तू जबाबदारीने काम केले नाहीस – पुढील पर्यायातून होकारार्थी वाक्य निवडा.
1) तू जबाबदारीने काम करतोस 2) तू बेजबाबदाराने काम केलेस
3) तू जबाबदारी ओळखली नाहीस 4) तू जबाबदारीने काम करणारा आहेस
उत्तर :- 2
4) ‘माझ्या नणंदेच्या सासूने तिला उभ्या वर्षात एकदाही माहेरी पाठविली नाही’ या वाक्यातील विधेय ओळखा.
1) नणंद 2) उभ्या वर्षात एकदाही माहेरी
3) पाठविली नाही 4) सासूने
उत्तर :- 3
5) कर्मणीप्रयोगात कर्ता
........................... विभक्तीत असतो.
1) तृतीया 2) प्रथमा
3) चतुर्थी 4) पंचमी
उत्तर :- 1
6) ‘गडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे.’ वरील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो?
1) सामासिक शब्द 2) अभ्यस्त शब्द
3) तत्सम शब्द 4) तद्भव शब्द
उत्तर :- 1
7) योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा..
1) सोड, मला ! तो जोराने ओरडला 2) ‘सोड मला’, तो जोराने ओरडला
3) “सोड मला !” तो जोराने ओरडला 4) “सोड मला”, तो जोराने ओरडला
उत्तर :- 2
8) देशी शब्द शोधा.
1) धडधड 2) धोंडा
3) धाक 4) धोरण
उत्तर :- 2
9) ‘अभिधा शक्तीचे’ उदाहरण असलेले वाक्य पर्यायी उत्तरांतील कोणते आहे ?
1) काय गाढव आहे ! 2) मला फार भूक लागली
3) शेजारच्या गावी आम्ही नदीवरून जातो 4) ‘मुलांनो, आता दिवे लागणीची वेळ झाली.’
उत्तर :- 2
10) ‘अचूक’ या शब्दाला समानार्थी पर्यायी शब्द शोधा.
1) अगम्य 2) नेमका
3) अचानक 4) नीट
उत्तर :- 2
📍 कोणती महिला पायलट भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट बनली आहेत?
(A) भावना कांत
(B) अवनी चतुर्वेदी
(C) मोहना सिंग
(D) लेफ्टनंट शिवांगी✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 ऑक्सफोर्ड डिक्शनरीने कोणत्या शब्दाची 'वर्ड ऑफ द इयर' म्हणून निवड केली?
(A) Climate Emergency✅✅
(B) Climate Resilient
(C) Climate Activist
(D) Action for Environment
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSS) याच्या 76 व्या फेरीतून केलेल्या सर्वेक्षणानुसार, ग्रामीण भागात ____ घरांमध्ये स्नानगृह आहे.
(A) 54 टक्के
(B) 45.1 टक्के
(C) 46 टक्के
(D) 50.3 टक्के✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 कोणता राज्य क्रिकेट संघ त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाडूंसाठी करार पद्धतिची घोषणा करणारा पहिला राज्य क्रिकेट संघ ठरला?
(A) उत्तरप्रदेश
(B) कर्नाटक
(C) महाराष्ट्र
(D) उत्तराखंड✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 ____ वी राज्यपाल आणि उपराज्यपालांची परिषद दिल्लीत राष्ट्रपती भवनात संपन्न झाली.
(A) 49
(B) 50✅✅
(C) 45
(D) 51
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) याने आधुनिक औषधीसोबत आयुर्वेद तत्त्वांना एकात्मिक करण्यासाठी _____ सोबत सामंजस्य करार केला.
(A) कॉर्नेल विद्यापीठ
(B) हार्वर्ड विद्यापीठ
(C) वेस्टर्न युनिव्हर्सिटी ऑफ कॅनबेरा
(D) वेस्टर्न सिडनी युनिव्हर्सिटी✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 ___ वी ‘डिफेन्स पेंशनर्स अदालत’ याचे उद्घाटन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते झाले.
(A) 170
(B) 172✅✅
(C) 169
(D) 173
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📍 भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार, ___ एवढा भारताचा परकीय चलन साठा आहे.
(A) 448.249 अब्ज डॉलर
(B) 450 अब्ज डॉलर
(C) 480.969 अब्ज डॉलर
(D) 400.5 अब्ज डॉलर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌺💐चंदीगड हे रॉकेलच्या वापरापासून मुक्त झालेले देशातले पहिले शहर आहे. केंद्र सरकार 2020 सालापर्यंत रॉकेलला दिले जाणारे अनुदान पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गांधीनगर हा रॉकेलच्या वापरापासून मुक्त झालेला गुजरात राज्यातला पहिला जिल्हा ठरला आहे. 2018 सालापर्यंत देशातली 8 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश रॉकेलच्या वापरापासून मुक्त झाली आहेत, त्यात पुडुचेरी, दमन व दीव, दादरा नगर हवेली, आंध्रप्रदेश, चंडीगड, दिल्ली, पंजाब आणि हरियाणा यांचा समावेश आहे.
🌺💐आंध्रप्रदेशात स्वर्णमुखी नदीकाठी चाललेल्या उत्खननादरम्यान भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) या संस्थेला जवळपास 2000 वर्षापूर्वी बांधलेले सागरी व्यापार केंद्र सापडले आहे. येथे विटांनी बांधलेली एक रचना, भगवान विष्णूचे शिल्प, तुटलेले टेराकोटा पाईप आढळले.
💐🌺 दोहा (कतार) येथे जागतिक क्रिडा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये 800 मीटर हेप्टाथलॉन या शर्यतीचे सुवर्णपदक कोणी जिंकले?
अ) कटारिना जॉनसन थॉम्पसन✅✅✅
ब) व्हेरेना प्रीनर
क) नाफिसातौ थियाम
ड) लॉरा मुइर
स्पष्टीकरण : प्र.०१) दोहा (कतार) येथे जागतिक क्रिडा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये 800 मीटर हेप्टाथलॉन या शर्यतीचे सुवर्णपदक कटारिना जॉनसन थॉम्पसन यांनी जिंकले.
🌺💐 भारत आणि कझाकस्तान या देशांचा “KAZIND-2019” नावाचा लष्करी सराव _ येथे आयोजित करण्यात आला आहे.
अ) राजस्थान
ब) उत्तराखंड✅✅✅
क) हिमाचल प्रदेश
ड) केरळ
स्पष्टीकरण : भारत आणि कझाकस्तान या देशांचा “KAZIND-2019” नावाचा लष्करी सराव उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आला आहे.
🌺🌸चीनच्या “DF-41” संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ) “DF-41” म्हणजे डॉन्कफेन्क-41 होय.
ब) “DF-41” हे पृथ्वीवरचे सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असल्याचे मानले जाते.
अ) केवळ अ ✅✅✅
ब) केवळ ब
क) केवळ अ आणि ब
ड) सर्व बरोबर आहेत
स्पष्टीकरण : केवळ अ हे चुकीचे आहे. ब हे बरोबर आहे. ब) “DF-41” हे पृथ्वीवरचे सर्वात शक्तिशाली आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असल्याचे मानले जाते.
🌺💐भारताच्या मदतीने कोणत्या देशात उभारण्यात आलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा 8 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला?
अ) मंगोलिया✅✅✅
ब) कंबोडिया
क) लाओस
ड) व्हिएतनाम
स्पष्टीकरण : भारताच्या मदतीने मंगोलिया या देशात उभारण्यात आलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा 8 ऑक्टोबर रोजी पेट्रोलियम व नैसर्गिक वायू आणि पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला
🌺💐 उत्सवाच्या वेळी वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोणत्या संस्थेने ‘हरित फटाके’ विकसित केले?
अ) IIT कानपूर
ब) CSIR✅✅✅
क) IISc बेंगळुरू
ड) IIT खडगपूर
स्पष्टीकरण : उत्सवाच्या वेळी वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी CSIR संस्थेने ‘हरित फटाके’ विकसित केले.
🌺💐 भारताने कोणत्या शेजारच्या देशात कोस्टल सर्व्हिलन्स रडार यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे?
अ) श्रीलंका
ब) बांग्लादेश✅✅✅
क) मालदीव
ड) पाकिस्तान
स्पष्टीकरण : भारताने शेजारच्या बांग्लादेश या देशात कोस्टल सर्व्हिलन्स रडार यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
🌺💐 संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी आर्थिक मदत चार पट वाढविण्यास मान्यता दिली. हा निधी _ अंतर्गत देण्यात येणार.
अ) आर्मी बॅटल कॅज्युएलिटीज
वेलफेयर फंड✅✅✅
ब) राष्ट्रीय संरक्षण कोष
क) लष्कर केंद्रीय कल्याण कोष
ड) यापैकी नाही
स्पष्टीकरण : संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी युद्धात मृत्यूमुखी पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी आर्थिक मदत चार पट वाढविण्यास मान्यता दिली. हा निधी आर्मी बॅटल कॅज्युएलिटीज वेलफेयर फंड अंतर्गत देण्यात येणार.
🌺💐 21 ऑक्टोबर 2019 रोजी _ सर्व महिला असलेल्यांचा स्पेसवॉक आयोजित करणार आहे.
अ) युरोपियन स्पेस एजन्सी (ESA)
ब) जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी (JAXA)
क) NASA (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन)✅✅✅
ड) ISA (इस्त्राएल स्पेस एजन्सी)
स्पष्टीकरण : ) 21 ऑक्टोबर 2019 रोजी NASA (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन) सर्व महिला असलेल्यांचा स्पेसवॉक आयोजित करणार आहे.
🌺💐 UNESCO ने आदिवासी लोकांसाठीचे राजदूत म्हणून यांची नेमणूक केली.
अ) कॅमेरून डायझ
ब) युना किम
क) मिली बॉबी ब्राउन
ड) यलिट्झा एपारीसिओ✅✅✅
स्पष्टीकरण : UNESCO ने आदिवासी लोकांसाठीचे राजदूत म्हणून यांची नेमणूक केली. - यलिट्झा एपारीसिओ
🌺💐 जागतिक अधिवास दिन _ या दिवशी साजरा केला जातो.
अ) 7 ऑक्टोबर✅✅✅
ब) 9 ऑक्टोबर
क) 6 ऑक्टोबर
ड) 8 ऑक्टोबर
खालील विधाने विचारात घ्या? अ पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...