१८ ऑक्टोबर २०१९

महाराष्ट्राची विधानपरिदषद

- भारत सरकार कायदा 1935 नुसार 1937 मध्ये विधानपरिषद अस्तित्वात आली.
- परीषदेची पहिली बैठक 20 जुलै 1937 रोजी पुण्याच्या कौन्सिल हाॅलमध्ये पार पडली.
- 1960 पासून हिवाळी अधिवेशन (ऑक्टो नोव्हें) नागपूर येथे होते.
- 1987 मध्ये परीषदेला 50 वर्षे पूर्ण झाली, सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला.
- 2000 पासून 22 जुलै हा दिवस महाराष्ट्र विधानपरिषदेचा वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो.
---------------------------------------
● सदस्य संख्या

- 1937 मध्ये 29, 1957 मध्ये 108 करण्यात आली तर वेगळ्या महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ही सदस्य संख्या 78 करण्यात आली. यापैकी -
30 सदस्य विधानसभा सदस्यांद्वारे
22 सदस्य स्थानिक प्राधिकारी संस्थांद्वारे
07 सदस्य पदवीधर आणि शिक्षकांद्वारे
12 सदस्य राज्यपालांद्वारे निवडले जातात.
- गणपूर्तीसाठी कमीत कमी 10 सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे.
--------------------------------------
● सभापती

- पहिले सभापती: मंगलदास मच्छाराम पक्वासा (22 जुलै 1937 ते 16 ऑगस्ट 1947)
- सध्या: रामराजे प्रतापसिंह नाईक निंबाळकर
- आजपर्यंत एकही महिला सभापती झाली नाही.
----------------------------------------
● उपसभापती

- पहिले उपसभापती: आर. जी. सोमण (22 जुलै 1937 ते 16 ऑक्टोबर 1947)
- पहिल्या महिला उपसभापती: जे. टी. सिपाहिमलानी (19 ऑगस्ट 1955 ते 24 एप्रिल 1962)
- सध्या: नीलम गोर्हे

"प्रेरणा घ्या नावलौकिक केलेल्या व्यक्तींच्या, ज्यांच्या हाती फक्त शुन्य होते..."

🌸 *शेक्सपिअर* 🌸
खाटीकखान्यात नोकरी करत होते. रात्री नाट्यगृहाच्या आवारात घोडागाडी सांभळता सांभळता एका नाटककाराचा जन्म झाला..

🌸 *ग. दि. माडगूळकर* 🌸
मँट्रिक नापास झाल्यावर उदबत्त्या विकल्या. अनवाणी आयुष्य जगले. त्यांनी गीतरामायण रचले

🌸 *सुधिर फडके*🌸
चहा भाजीचा व्यापार करत होते .प्रारंभीच्या काळात त्यांना पोटासाठी वाद्य विकावी लागली .
भटकंतीतून त्यांना सुर शोधला. ते गायक झाले, संगीतकार झाले ....

🌸 *नीळू फुले* 🌸
पुण्याला काँलेमध्ये अकरा वर्षे माळी होते. झाडांची निगराणी करता करता ते राष्ट्रसेवादलाच्या पथकात सामील झाले. नटसम्राट निळू फुले महाराष्ट्राला माहीत झाले...

🌸 *विष्णूपंत छञे* 🌸
घोड्याच्या पागांमध्ये चाबूकस्वार म्हणून तीन रुपये पगारावर नोकरी करत असताना स्वताःच स्वताःचा मार्ग शोधला. भारतातील पहिली ग्रेट सर्कस निर्माण केली ...

🌸 *दारा सिंग* 🌸
पंजाबमधल्या एका सामान्य खेड्यात आखाड्यात कुस्ती खेळत होते. रानात गुरं चरायला जात होते. गुरांना सांभाळता सांभाळता कुस्तीची आवड निर्माण झाली. जगभर कुस्त्या जिंकल्या. चित्रपटात कामे केली.  राज्यसभेत खासदार म्हणून जाताना मनात एकच भावना होती , एका खेडेगावात आखाड्यात कुस्ती खेळणारा मुलगा खासदार झाला...

🌸 *कर्मवीर भाऊराव पाटिल* 🌸
कंदिल आणि नांगराचे विक्रेते होते. कंदिल नांगर विकता विकता त्यांनी रयत शिक्षण संस्था निर्माण केली ....

🌸 *ग्रेटा गार्बो*🌸
गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला. तेराव्या वर्षी गरीबीमुळे शाळा सोडावी लागली. दुकानात सेल्सगर्ल म्हणून नोकरी करत असताना अचानक हाँलीवुडचे दरवाजे उघडले ....

🌸 *चार्ली चँपलिन* 🌸
प्रचंड गरिबी अनुभवली विद्यार्थीदशेत फुले विकण्यापासुन अनेक कामे केली. आपल्या विनोदाने जगभरच्या लोंकाना हसवले...

🌸 *सुशीलकुमार शिंदे* 🌸
सोलापूरला कोर्टात शिपाई होते.
कोर्टाच्या आवारात त्यांनी आयुष्याचा अर्थ शोधला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले....

🌸 *लक्ष्मणनराव किर्लोस्कर* 🌸
दहा वर्षे ड्राईंग टिचर होते. त्यांनी नांगराचा कारखाना निर्माण केला ..

🌸 *यशवंतराव गडाख*🌸
अहमदनगर जिल्ह्यात घोडेगावला शिक्षक होते. मुलांना फळ्यावर मुळाक्षर शिकवता शिकवता त्यांनी शाळेच्या बाहेरचे जग बघितले वयाच्या पंचविशीत सोनाईला मुळा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली ....

🌸 *धिरुभाई अंबानी* 🌸
वडिल प्राथमिक शिक्षक होते. सासरे पोस्टमन होते. भाऊ रेशनिंग आँफिसात नोकरीला होता. स्वताः ते पेट्रोल पंपावर क्लार्क म्हणून तीनशे रुपये पगारावर नोकरी करत होते.
अशा वातावरणात स्वतःचे औद्योगिक साम्राज्य निर्माण केले ....

🌸 *स्टीव्ह जाँब्स*🌸
कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवावे लागले. जगातल्या मोठ्या काँम्प्युटर कंपन्यापैकी एक "अँपल"
ची स्थापना केली....

🌸 *सुनील दत्त* 🌸
रेडिओ सिलोनवर अभिनेत्यांच्या मुलाखती घेत असतानाच चित्रपट सृष्टीत प्रवेश झाला. अभिनेता व राजकारणी म्हणून समृद्ध आयुष्य जगले....

🌸 *जाँनी वाँकर* 🌸
बस कंडक्टर होता. प्रवाशांची तिकीटे फाडता फाडता त्याच्या सिनेमाची तिकिटे लोंकानी घ्यायला सुरुवात केली. एका तिकीटाचा प्रवास दुसऱ्या तिकीटावर स्थीरावला....

"या सर्व मोठ्या माणसांच्या हाती शुन्य होते . त्यांनी अथक परिश्रमाने शुन्यातून विश्व निर्माण केले. अनवाणी आयुष्याला आकार दिला, परिस्थितीशी झगडत संघर्ष करणाऱ्या माणसापुढे आदर्श ठेवला .. 
तुम्हीसुध्दा शुन्य असताना स्वताःचे स्वतंत्र व्यक्तीमत्व निर्माण करु शकता....."

*"आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामकरा नाहीतर..?*
*दुसरा कोणीतरी तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कामाला ठेवेल"..!*

   *धन्यवाद..!!

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे दि:- 18/10/2019 शुक्रवार

1. आयुष्यमान भारत योजना संपूर्ण भारतात कधी लागू करण्यात आली आहे?
-- 25 सप्टेंबर 2018 पासून

2. भगतसिंग कोशारी हे महाराष्ट्र चे कितवे राज्यपाल आहे?
-- 19 वे ( 18 वे विद्यासागर राव )

3. 2000 हजार धावा ( फास्ट धावा )  पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू कोणता ?
-- मिताली राज

4. जल धोरण तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
-- महाराष्ट्र

5. " ऑर्डर ऑफ दि सेट अँड्रूअ अ पोस्टल " हा पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार कोणत्या देशाकडून मिळालेला आहे ?
-- रशिया

6. मैत्री 2019 हा युद्ध सराव कोणत्या दोन देशामध्ये पार पडला ?
-- भारत×थायलंड

7. भारताचे रॉकेट मॅन कोणाला म्हणतात?
-- डॉ.के.वि. सिवन

8. ई - सिगारेट वर बंदी घालणारे प्रथम राज्य कोणते?
-- पंजाब

9. किरण बेदी कोणत्या राज्याच्या राज्यपाल आहेत?
-- पद्दुचेरी

10. कोणत्या राज्याची विधान परिषद 31 ऑक्टोबर 2019 ला बरखास्त करण्यात येणार आहे ?
-- जम्मू काश्मीर ( कलम 370 रद्द )

स्टार्टअप इंडिया योजनेंतर्गत गेल्या चार वर्षात देशभरात १९ हजार ३५१ स्टार्टअप

*⃣ उद्योगांची नोंदणी झाली असून सर्वाधिक ३ हजार ६६१ स्टार्टअप उद्योगांची नोंदणी महाराष्ट्रात झाली.

*⃣ देशातील राज्यांमध्ये स्टार्टअप उद्योगात झालेल्या वैकल्पिक गुंतवणुकीतही या योजनेंतर्गत महाराष्ट्राने आघाडी घेत दुसरा क्रमांक मिळवला आहे.

*⃣ केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्यावतीने १६ जानेवारी २०१६ पासून देशभरात “ स्टार्टअप इंडिया ” योजनेची अंमलबजावणी सुरु झाली.

*⃣ केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग व देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने २४ जून २०१९ रोजी राज्यनिहाय स्टार्टअप उद्योगांची यादी जाहिर करण्यात आली.

*⃣ या यादीत देशातील २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांची आकडेवारी जाहिर करण्यात आली असून ३ हजार ६६१ स्टार्टअप उद्योगासह महाराष्ट्र प्रथम स्थानावर आहे.

*⃣ महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक (२,८४७), दिल्ली (२,५५२) उत्तरप्रदेश (१,५६६) तर १ हजार ८० स्टार्टअपसह तेलंगना पाचव्या स्थानावर आहे.

जम्मू-काश्मीर राज्यातील विधानपरिषद बरखास्त

●जम्मू-काश्मीरला केंद्रशासित दर्जा दिल्यानंतर 31 ऑक्टोबरला जम्मू-विधानपरिषद बरखास्त केली जाणार आहे.

●जम्मू-काश्मीर विधानपरिषदेत 36 सदस्य होते.

🔰 सध्या भारतात 6 राज्यात विधानपरिषद अस्तित्वात
1. उत्तरप्रदेश - 100 सदस्य
2. महाराष्ट्र - 78 सदस्य
3. तेलंगणा - 40 सदस्य
4. कर्नाटक - 75 सदस्य
5. बिहार - 75 सदस्य
6. आंध्रप्रदेश - 58 सदस्य

१७ ऑक्टोबर २०१९

20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे 17/10/2019

1. भारतीय घटनेतील कोणत्या कलमान्वये जम्मू-काश्मीर या घटक राज्यास खास दर्जा देण्यात आला आहे?

 368

 370

 270

 यापैकी नाही

उत्तर : 370

 

2. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील सदस्यसंख्या किती आहे?

 288

 78

 188

 278

उत्तर :78

 

3. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 डॉ. राजेंद्रप्रसाद

 पंडित जवाहरलाल नेहरू

 मदनमोहन मालविय

उत्तर :डॉ. राजेंद्रप्रसाद

 

4. पोलीस पाटलास सध्या खालीलप्रमाणे किती मासिक वेतन मिळते?

 2000/-

 4000/-

 5000/-

 3000/-

उत्तर :3000/-

 

5. खालीलपैकी कोणत्या शब्द संगणकाशी संबंधित नाही?

 डेस्कटॉप

 माऊस

 सेल्फी

 कि-बोर्ड

उत्तर :सेल्फी

 

6. खालीलपैकी कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते?

 पोलीस उपनिरीक्षक

 सहा. पोलीस निरीक्षक

 पोलीस उपअधीक्षक

 सहा. पोलीस आयुक्त

उत्तर :सहा. पोलीस निरीक्षक

 

7. मुंबई लोहमार्ग आयुक्तालयासह महाराष्ट्रात एकूण किती पोलीस आयुक्तालये आहेत?

 दहा

 बारा

 अकरा

 सात

उत्तर :दहा

 

8. ‘वंदे मातरम’ हे गीत-यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीतून घेण्यात आले आहे?

 रविंद्रनाथ टागोर

 बंकिमचंद्र चटर्जी

 शरदचंद्र

 महम्मद इक्बाल

उत्तर :बंकिमचंद्र चटर्जी

 

9. 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली, या फाळणीस कोण जबाबदार होते?

 लॉर्ड कर्झन

 जनरल डायर

 लॉर्ड रिपन

 लॉर्ड डलहौसी

उत्तर :लॉर्ड कर्झन

 

10. कोणत्या वर्षी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला?

 1961

 1947

 1951

 1971

उत्तर :1961

 

11. कोणत्या मराठी संताची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत/

 रामदास

 एकनाथ

 ज्ञानेश्वर

 नामदेव

उत्तर :नामदेव

 

12. ग्रामगीता कोणी लिहिली?

 तुकडोजी महाराज

 संत तुकाराम महाराज

 संत गाडगे महाराज

 संत ज्ञानेश्वर

उत्तर :तुकडोजी महाराज

 

13. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही?

 चिखलदरा

 पचगणी

 पंचमढी

 महाबळेश्वर

उत्तर :पंचमढी

 

14. महाराष्ट्राचा सर्वात नविन जिल्हा कोणता?

 खारघर

 पालघर

 नवघर

 यापैकी नाही

उत्तर :पालघर

 

15. खालीलपैकी कोणती जागा अकोला शहरात नाही?

 राजराजेश्वर मंदिर

 सुंदराबाई खांडेलवाल टावर

 बाबूजी देशमुख वाचनालय

 रेणुका माता मंदिर

उत्तर :रेणुका माता मंदिर

 

16. ‘वत्सगुल्म’ चे नविन नाव काय आहे?

 बार्शिटाकळी

 वाशिम

 बाळापूर

 बोरगांव

उत्तर :वाशिम

 

17. 1,2,3 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरुन जास्तीत जास्त किती तीन अंकी संख्या तयार होतील?

 3

 5  

 15

 6

उत्तर :3

 

18. रोमन अंकात 17 कसे लिहाल?

 VIIX

 XVII

 XIV

 XVII

उत्तर :XVII

 

19. 1 ते 100 पर्यंत संख्येत 2 अंक किती वेळा येतो?

 20

 21

 19

 18

उत्तर :20

 

20. 8×0.08×0.008=?

 0.512

 0.00512

 512

 0.0512

उत्तर :0.00512

संशोधक व त्यांनी लावलेले शोध

क्रं. शोध= संशोधक
1. सापेक्षता सिद्धांत = आईन्स्टाईन
2. गुरुत्वाकर्षण= न्यूटन
3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट= आईन्स्टाईन
4. किरणोत्सारिता हेन्री =बेक्वेरेल
5. क्ष-किरण विल्यम= रॉटजेन
6. डायनामाईट =अल्फ्रेड नोबेल
7. अणुबॉम्ब= ऑटो हान
8. प्ंजा सिद्धांत= मॅक्स प्लॅक
9. विशिष्टगुरुत्व= आर्किमिडीज
10. लेसऱ =टी.एच.मॅमन
11. रेडिअम =मेरी क्युरी व पेरी क्यूरी
12. न्युट्रॉन =जेम्स चॅड्विक
13. इलेक्ट्रॉन= थॉम्पसन
14. प्रोटॉन =रुदरफोर्ड
15. ऑक्सीजन =लॅव्हासिए
16. नायट्रोजन =डॅनियल रुदरफोर्ड
17. कार्बनडाय ऑक्साइड =रॉन हेलमॉड
18. हायड्रोजन =हेन्री कॅव्हेंडिश
19. विमान =राईट बंधू
20. रेडिओ =जी.मार्कोनी
21. टेलिव्हिजन =जॉन बेअर्ड
22. विजेचा दिवा =थाॅमस एडीसन
23. सेफ्टी लॅम्प =हंप्रे डेव्ही
24. डायनामो =मायकेल फॅराडे
25. रिव्होल्व्हर =सॅम्युअल कोल्ट
26. मशीनगन =रिचर्ड गॅटलिंग
27. वाफेचे इंजिन =जेम्स वॅट
28. टेलिफोन =अलेक्झांडर ग्राहम बेल
29. थर्मामीटर = गॅलिलिओ
30. सायकल= मॅक मिलन
31. अणू भट्टी =एन्रीको फर्मी
32. निसर्ग निवडीचा सिद्धांत= चार्ल्स डार्विन
33. अनुवंशिकता सिद्धांत =ग्रेगल मेंडेल
34. पेनिसिलीन = अलेक्झांडर फ्लेमिंग
35. इन्शुलीन = फ्रेडरिक बेंटिंग
36. पोलिओची लस = साल्क
37. देवीची लस = एडवर्ड जेन्नर
38. अॅंटीरॅबिज लस = लुई पाश्चर
39. जीवाणू = लिवेनहाँक
40. रक्तगट = कार्ल लँन्डस्टँनर
41. मलेरियाचे जंतू = रोनाल्ड रॉस
42. क्षयाचे जंतू = रॉबर्ट कॉक
43. रक्ताभिसरण = विल्यम हार्वे
44. हृदयरोपण = डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड
45. डी.एन.ए.जीवनसत्वे = वॅटसन व क्रीक
46 जंतूविरहित शस्त्रक्रिया= जोसेफ लिस्टर
47. होमिओपॅथी = हायेमान

झिंबाब्वे, नेपाळ आयसीसीचे सदस्य.

◾️ आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आयसीसी) झिंबाब्वे आणि नेपाळ यांना आपले सदस्य करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. येथे सोमवारी आयसीसीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला.

◾️ त्यामुळे आता यापुढे झिंबाब्वे आणि नेपाळ हे आयसीसीचे सदस्य म्हणून राहतील. त्याचप्रमाणे महिलांच्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिसामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

◾️ झिंबाब्वे आणि नेपाळ क्रिकेट संघटनांच्या निवडणुकीवेळी संबंधित देशांच्या सत्ताधारी शासनाचा हस्तक्षेप होत असल्याचे दिसून आल्याने गेल्या जुलैमध्ये आयसीसीने झिंबाब्वे आणि नेपाळ यांचे सदस्यत्व रद्द केले होते.

◾️ झिंबाब्वे क्रिकेटला आयसीसीकडून यापुढे पूर्ण पाठिंबा राहील अशी ग्वाही आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी दिली आहे. येत्या जानेवारीत होणाऱया आयसीसीच्या पुरूषांच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झिंबाब्वेचा संघ सहभागी होईल.

जागतिक भूक निर्देशांकात भारताची मोठी घसरण

◾️ जागतिक भूक निर्देशांकात २०१९ मध्ये  भारताचा १०२ वा क्रमांक लागला असून
◾️ २०१८ मध्ये तो ११७ देशांत ९५ व्या स्थानावर होता.

◾️ त्यामुळे आता नेपाळ, पाकिस्तान व बांगलादेश या देशांनंतर भारताचा क्रमांक आहे.

◾️ बेलारूस, युक्रेन, तुर्की, क्युबा व कुवेत या देशांनी वरचे क्रमांक पटकावले आहेत.

जागतिक भूक निर्देशांकाच्या  संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे.

◾️याबाबतचा अहवाल ‘कन्सर्न  वल्र्डवाइड’ ही आयरिश संस्था तसेच वेल्ट हंगर हिल्फी ही जर्मन संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला असून भारताची परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे.

◾️२००० मध्ये भारताचा ११३ देशात ८३ वा क्रमांक होता, तर
◾️आता ११७ देशात तो १०२ वा आहे. यातील भारताचे गुण २००५ मध्ये ३८.९ होते ते २०१० मध्ये ३२ झाले, नंतर २०१० मधील ३२ वरून ते २०१९ मध्ये ३०.३ झाले आहेत.

◾️ घटक

📌कमी पोषण,
📌उंचीच्या तुलनेत कमी वजन,
📌 पाच वर्षांखालील मुलांचे उंचीच्या तुलनेत कमी वजन,
📌मुलांची वाढ खुंटणे,
📌 कुपोषण,
📌बालमृत्यू दर,
📌पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर हे घटक यात विचारात घेतले जातात.

◾️कमी वजनाच्या मुलांचे प्रमाण २००८-२०१२ या काळात १६.५ टक्के होते ते २०१४-२०१८ या काळात २०.८ टक्के  झाले.

◾️६ ते २३ महिने वयोगटातील पुरेसे पोषण मिळणाऱ्या बालकांचे प्रमाण ९.६ टक्के होते.

◾️सगळ्या देशात भारतातील मुले वजनाच्या तुलनेत उंचीच्या निकषात मागे पडली असून त्यांचे प्रमाण २०.८ टक्के आहे.

◾️येमेन, दिजबौती या देशांनीही या निकषात भारताला मागे टाकले आहे.

📌नेपाळ (७३),
📌 श्रीलंका (६६),
📌 बांगलादेश (८८),
📌म्यानमार, (६९),
📌  पाकिस्तान (९४) या देशांची स्थिती भूकेबाबतीत वाईट असली तरी ती भारताइतकी वाईट नाही.

◾️चीनचा क्रमांक २५ वा लागला आहे.

◾️पाच वर्षांखालील बालकांचा मृत्यू दर, वाढ खुंटणे, अपुरे अन्न मिळून कमी पोषण या निकषात भारताची कामगिरी सुधारली आहे.

◾️स्वच्छ भारत योजना भारताने लागू केली असली तरी अजून भारत देश हागणदारी मुक्त झालेला नाही. तेथे उघडय़ावर शौचास जाण्याची पद्धत सुरूच आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आहे, असे अहवालात म्हटले आहे.

Current Affairs Question 17/10/2019

📌 कोणती योजना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM)यासारख्या क्षेत्रात रुची निर्माण करण्यासाठी विद्यार्थिंनींनी महिला मदत करण्याच्या उद्देशाने आहे ?
1)  सुकन्या समृद्धी
2)  CBSE उडान योजना
3)  विज्ञान ज्योती ✅✅✅
4)  बेटी बजाओ बेटी पढाओ

📌 "वज्र प्रहार" हा कोणत्या देशांदरम्यानचा संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आहे ?
1)  भारत आणि फ्रान्स
2)  भारत आणि अमेरिका ✅✅✅
3)  भारत आणि ओमान
4)  भारत आणि थायलंड

📌  ---- स्किल इंडिया रोजगार मेळावा आयोजित करते .
1)  सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय
2)  राष्ट्रीय लघु-उद्योग महामंडळ
3)  राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ ✅✅✅
4)  मनुष्यबळ विकास मंत्रालय

📌 ---- यांनी हाऊ टू अवॉइड ए क्लायमेट डिझास्टर हे शीर्षक असलेले एक नवे पुस्तक लिहिले आहे .
1)  अल्बर्ट बेट्स
2)  क्रिस्टिन ओहलसन
3)  अॅना लापे
4)  बिल गेट्स ✅✅✅

📌   धर्म गार्डियन हा ----- या देशांच्या दरम्यानचा संयुक्त लष्करी सराव आहे .
1)  भारत आणि चीन
2)  भारत अणि श्रीलंका
3)  भारत आणि अमेरिका
4)  भारत आणि जापान ✅✅✅

📌  ---- यांना 2019 सालाचा "नोबेल शांती पुरस्कार"  देण्यात आला .
1)  फिलेमोन यांग
2)  अबी अहमद अली  ✅✅✅
3)  जुहा सिपिला
4)  नरेंद्र मोदी

📌  ---- मध्ये राष्ट्रीय संस्कृती महोत्सव 2019 आयोजित करण्यात आला .
1)  कर्नाटक
2)  ओडिशा
3)  राजस्थान
4)  मध्यप्रदेश ✅✅✅

📌 ----- याने डच ओपन 2019 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले .
1)  किमर कोपेजन्स
2)  लक्ष्य सेन ✅✅✅
3)  मॅट मोरिंग
4)  युसूके आनोडेरा

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालील गाळलेल्या जागी (वाक्यात) योग्य वाक्यप्रकार लिहा.
     ‘लहान मुलांच्या भांडणात मोठया माणसांनी विनाकारण ................... कटाक्षाने टाळावे.’

   1) वडयाचे तेल वांग्यावर काढणे      2) वर्दळीवर येणे
   3) येळकोट करणे        4) रागाच्या आहारी जाणे

उत्तर :- 2

2) ‘भीतीपोटी प्रत्येक गोष्टीस नकार घंटा वाजविणार घाबरट मनुष्य’ – या वाक्यबंधासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा.

   1) शुक्राचार्य    2) शिराळशेट    3) रडतराऊत    4) पाताळयंत्री

उत्तर :- 3

3) पुढील पर्यायातून अचूक शब्द ओळखा.

   1) चतुष्पाद    2) चतु:ष्पाद    3) चतु:पाद    4) चतुश्पाद

उत्तर :- 1

4) अनुनासिकाला काय म्हणतात ?

   1) अनुस्वार    2) शब्द      3) व्यंजन    4) विशेषण

उत्तर :- 1

5) ‘मन्वंतर’ या जोड शब्दाची संधी करा.
   1) मन + अंतर    2) मन्व + अंतर    3) मनु + अंतर    4) मन व अंतर

उत्तर :- 3

6) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
    ‘वानर’ वडावर चढले.

   1) भाववाचक    2) विशेषनाम    3) सामान्यनाम    4) धातुसाधित नाम

उत्तर :- 3

7) ‘काही लक्षात येत नाही’ अधोरेखित शब्दाचा सर्वनाम प्रकार ओळखा.

   1) आत्मवाचक    2) अनिश्चयवाचक    3) प्रश्नार्थक    4) संबंधी

उत्तर :- 2

8) जे शब्द क्रियापदाची व नामाची विशेष माहिती सांगतात त्यांना ................ म्हणतात.

   1) शब्दयोगी अव्यये  2) उभयान्वयी अव्यये  3) विशेषणे    4) शब्दसिध्दी

उत्तर :- 3

9) ‘सांजावले’, ‘मळमळते’, ‘उजाडले’ हे शब्द क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?

   1) संयुक्त क्रियापदे  2) भावकर्तृक क्रियापदे  3) धातुसाधित क्रियापदे  4) सकर्मक क्रियापदे

उत्तर :- 2

10) अचूक वाक्य ओळखा.

   1) सर्वच क्रियाविशेषणे अव्यय असतात.
   2) काही क्रियाविशेषणे विकारीही असतात.
   3) क्रियाविशेषणे ही एकाक्षरी नसतात.
   4) क्रियाविशेषणे ही क्रियेच्या कर्त्याविषयी माहिती देतात.

उत्तर :- 2

महालेखा नियंत्रक म्हणून जे. पी. एस. चावला यांची नव्याने नियुक्ती

⏩वित्त मंत्रालयात व्यय विभागात नवे महालेखा नियंत्रक म्हणून जे पी एस चावला यांनी आज पदभार स्वीकारला.

⏩15 ऑक्टोबर 2019 पासून केंद्र सरकारने चावला यांची नवे महालेखा नियंत्रक म्हणून नियुक्ती केली आहे.

⏩1985 च्या भारतीय नागरी लेखा सेवा अधिकाऱ्यांच्या तुकडीतल्या चावला यांनी दिल्लीतल्या दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून मेकॅनिकल इंजिनियरिंगमधे BE पदवी प्राप्त केली आहे.

⏩34 वर्षांच्या कारकीर्दीत प्रसार भारती, नागरी विकास, हवाई वाहतूक, पर्यटन, कृषी अशा विविध मंत्रालयात वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या केडरवर त्यांनी काम केले आहे.

⏩महालेखा नियंत्रक म्हणून काम करण्यापूर्वी चावला यांनी मुख्य लेखा नियंत्रक, केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळ आणि सीमा शुल्क प्रमुख म्हणून काम केले आहे. GST अर्थात वस्तू आणि सेवा कर लागू करण्याआधी जीएसटी नेटवर्कची लेखा प्रक्रिया आणि कार्यान्वयनाला अंतिम रुप देण्यात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.


जागतिक ब्रिज स्पर्धेत भारताला प्रथमच पदक .

वुहान, चीन येथे झालेल्या जागतिक ब्रिज अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी सीनियर गटात ब्राँझपदकाची कमाई केली.  प्रथमच भारताने या स्पर्धेत पदकाची कमाई करण्याचा पराक्रम केला.

◾️ या सीनियर गटात:- 
📌श्रीधरन, 
📌सुकमल दास, 
📌जितेंद्र सोलानी, 
📌दीपक पोद्दार, 
📌सुब्रत साहा आणि 
📌सुभाष धाक्रस यांचा समावेश होता.

ही ४४वी ब्रिज अजिंक्यपद स्पर्धा होती. 

दोन वर्षांपूर्वी भारताने उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. यावेळी भारतीय संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला होता, पण ब्राँझपदकाच्या झुंजीत नेदरलँड्सला हरवून त्यांनी हे पदक जिंकले.

यावेळी खुला गट, महिला गट, मिश्र गट आणि सीनियर गट अशा चार गटात भारतीय खेळाडू खेळले. या चारही गटासाठी भारत सरकार, क्रीडा प्राधिकरणाने भारतीय खेळाडूंचा संपूर्ण खर्च केला.

आशियातील सर्वात लांब ‘चेनानी-नाशरी’ बोगद्याला श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देणार

◾️केंद्र सरकारने आशियातील सर्वात लांब बोगदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘चेनानी-नाशरी’ बोगद्यास जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. 

◾️केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी यासंदर्भात घोषणा केली. यावेळी गडकरी यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्ग-४४ वर तयार करण्यात आलेला या बोगद्याला आता श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे नाव दिले जाणार आहे.

◾️ ज्यांनी देशासाठी ‘एक निशान, एक विधान व एक प्रधान’ हा मंत्र दिला होता.

◾️जम्मू – श्रीनगर महामार्गावरील रामबन जवळ असलेल्या चेनानी-नाशरी बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते २०१७ मध्ये झाले होते. तर, 

◾️या बोगद्याच्या निर्मिती कार्याची सुरूवात, २३ मे २०११ रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात करण्यात आली होती. 

◾️२०१७ मध्ये याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा राष्ट्राला अर्पण करण्यात आला होता.

◾️ तब्बल १ हजार २०० मीटर उंचीवर व साधारण ९.०२ किलोमीटर लांब असलेल्या या बोगद्यामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील अंतर ४० किलोमीटरने कमी झाले आहे. म्हणजेच प्रवासाचा वेळ साधारण दोन तासांनी वाचत आहे.

◾️दोन लेनचा हा बोगदा आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा बोगदा म्हणून ओळखला जातो.

◾️ हा बोगदा बांधण्यासाठी सात वर्षांचा कालावधी लागला. खराब हवामान असताना जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद केला जातो. 

◾️हा बोगदा मात्र कधीही बंद करावा लागणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

◾️ उधमपूर जिल्ह्यातील चेनानी येथे सुरू होऊन हा बोगदा रामबन जिल्ह्यातील नाशरी येथे बाहेर पडतो. 

◾️या बोगद्याच्या निर्मितीसाठी एकूण १ हजार ५०० अभियंते, भूगर्भतज्ज्ञ आणि कामगारांनी मेहनत घेतली आहे. तर, 

◾️यासाठी एकूण ३ हजार ७२० कोटी रुपये इतका खर्च आला आहे.

◾️ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या बोगद्याची निर्मिती केली आहे.

◾️ बोगद्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी सुमारे १२४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास कंट्रोल रूमकडून तत्काळ वाहतूक पोलिसांना त्यांची माहिती मिळते.

◾️दोन लेनवर २९ क्रॉस पॅसेज देण्यात आले आहेत. प्रत्येक ३०० मीटर अंतरावर एक पॅसेज आहे.

◾️ याचबरोबर बोगद्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणूनही योग्य ती खबरदारी देखील घेण्यात आली आहे. एवढेच नाहीतर आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास बोगद्यात वाहनतळाची देखील व्यवस्थाही करण्यात आली आहे.


१६ ऑक्टोबर २०१९

महत्वपूर्ण चालू घडामोडी सराव प्रश्नावली 16/10/2019


📌कोणत्या केंद्रीय सरकारी रुग्णालयाने ‘कायाकल्प पुरस्कार 2018-19’ जिंकला?

(अ) जवाहरलाल स्नातकोत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था (JIPMER), पुडुचेरी

(ब) वैद्यकीय शिक्षण व संशोधन स्नातकोत्तर संस्था (PGIMER), चंदीगड

(क) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS), दिल्ली✅✅✅

(ड) इंदिरा गांधी प्रादेशिक आरोग्य व वैद्यकीय विज्ञान संस्था (NEIGRIHMS), शिलांग

📌2019 या वर्षी आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिनाची संकल्पना काय होती?

(अ) रिड्यूस डिझास्टर डॅमेज टू क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर अँड डिसरप्शन ऑफ बेसिक सर्व्हिसेस✅✅✅

(ब) रिड्यूसींग डिझास्टर इकनॉमिक लॉसेस

(क) होम सेफ होम

(ड) लिव्ह टू टेल: राईसिंग अवेयरनेस, रिड्यूसींग मोर्टेलिटी

📌_____ येथे भारत आपले पहिले ऑलम्पिक हॉस्पिटॅलिटी हाऊस उभारणार आहे.

(अ) पॅरिस
(ब) बिजींग
(क) टोकियो✅✅✅
(ड) लंडन

📌‘धर्म गार्डियन 2019’ विषयी खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?

I) ‘धर्म गार्डियन’ हा वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे जो 2015 या सालापासून भारतात घेतला जातो.

II) ‘धर्म गार्डियन’ हा भारत, रशिया आणि जापान या देशांच्या दरम्यानचा तिरंगी लष्करी सराव आहे.

(अ) केवळ I
(ब) केवळ II
(क) I आणि II दोन्ही
(ड) यापैकी एकही नाही✅✅✅

📌पृथ्वीच्या वातावरणामधला आयनोस्फीयर या थराचा अभ्यास करण्यासाठी NASAने पाठवविलेल्या उपग्रहाचे नाव काय आहे?

(अ) ICON✅✅✅
(ब) SEO
(क) IONO
(ड) INO

📌भारत आणि _ या देशांच्या नौदलांचा ‘2019 कोऑर्डिनेटेड पेट्रोल (CORPAT)’ नावाचा सागरी सराव आयोजित केला गेला.

(अ) ऑस्ट्रेलिया
(ब) बांग्लादेश✅✅✅
(क) चीन
(ड) मालदीव

📌पृथ्वीवरील कार्बनच्या भूमिकेचा अभ्यास करण्यासाठी आयोजित केल्या गेलेल्या जागतिक संशोधनपर कार्यक्रमाचे नाव काय आहे?

(अ) कार्बन रिसर्च प्रोग्राम
(ब) डीप कार्बन ऑब्जर्व्हेटरी✅✅✅
(क) कार्बन अर्थ प्रोग्राम
(ड) कार्बन फॉर अर्थ

📌कोणते राज्य सरकार राज्यामधील मुलींच्या सक्षमीकरणासाठी कन्याश्री विद्यापीठाची स्थापना करणार आहे?

(अ) केरळ
(ब) पश्चिम बंगाल✅✅✅
(क) ओडिशा
(ड) आसाम

📌कोण WTA टुरवरचे जेतेपद जिंकणारी अमेरिकेची सर्वात तरुण महिला ठरली?

(अ) करोलिना प्लिस्कोवा
(ब) नाओमी ओसाका
(क) अॅशले बार्टी
(ड) कोको गॉफ✅✅✅

📌जागतिक आर्थिक मंचाच्या (WEF) ‘जी-20 ग्लोबल स्मार्ट सिटीज अलायन्स ऑन ___ गव्हर्नन्स’ या युतीमध्ये भारत सामील झाला.

(अ) रोबोटिक्स
(ब) टेक्नॉलॉजी✅✅✅
(क) एज्युकेशन
(ड) हेल्थ

📌 __________ येथे ‘जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2019’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

(अ) रशिया✅✅✅
(ब) न्युझीलँड
(क) भारत
(ड) जर्मनी

📌__________ याने ‘डच ओपन 2019’ बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद जिंकले.

(अ) किमर कोपेजन्स
(ब) लक्ष्य सेन✅✅✅
(क) मॅट मोरिंग
(ड) युसुके ओनोडेरा

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...