१६ सप्टेंबर २०१९

चंद्रशेखर आझाद

(जन्म: २३ जुलै १९०६-मृत्यु: २७ फेब्रुवारी १९३१)

चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा

चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतीकारक होते. रामप्रसाद बिस्मिल यांच्या मृत्युनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशन या क्रांतीकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशिएशन या नवीन नावाखाली पुनर्बाधणी केली. त्याचप्रमाणे त्यांना भगतसिंग यांचे गुरु मानले जाते.

जन्म आणि बालपण:
चंद्रशेखर यांचा जन्म २३ जुलै १९०६ ला सध्याच्या अलीराजपुर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी आणि आईचे नाव जगरानी देवी होते. त्यांचे पूर्वज कानपूर जवळच्या बदरखा गावात राहत होते. जगरानी देवी ह्या सीताराम यांच्या तिसर्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरीत झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसीमधील संस्कृत शाळेत गेले. डिसेंबर १९२१ मध्ये महात्मा गांधीनी सुरु केलेल्या असहकार आंदोलनात तेव्हाच्या १५ वर्षे वयाच्या चन्द्रशेखरने सहभाग घेतला. त्यासाठी त्याला अटक सुद्धा झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव आझाद असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते आझाद आडनावाने ओळखले जाऊ लागले.

मृत्यु:
२७ फेब्रुवारी १९३१ ला अलाहाबादमधील अल्फ्रेड पार्क येथे सुखदेव राज या क्रांतीकारकाला भेटायला गेले असताना एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला आणि चंद्रशेखर व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती तीन पोलिसांना मारले मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपत आल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वत:ला मारून घेतले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे ठेवण्यात आले.
---------------------------------------------------------------------

आंतरराष्ट्रीय ओझोन दिन - १६ सप्टेंबर

फ्रीज, एअरकंडिशनर आणि इतर यंत्रणात वापरल्या जाणा-या क्लोरोफ्लुरोकार्बन प्रकारच्या रसायनांमुळे पृथ्वीभोवतालच्या ओझोन वायूच्या ठरला छिद्रे पडत असल्याचे दिसले. यामुळे सूर्यप्रकाशातील अतिनील प्रारण (अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन) पृथ्वीपर्यंत घातक प्रमाणात पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली. या प्रारणाचे प्रमाण वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढून हवामानात मोठे बदल होऊ शकतात. संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकते !

⭕️ मूळ संकल्पना व सुरुवात ⭕️

संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (UNEP) १९९५ सालापासून हा दिवस पाळला जातो. १९७८ साली कॅनडातल्या मॉन्ट्रिअल शहरातील परिषदेमध्ये रसायनांमुळे ओझोनच्या थरावर होणा-या दुष्परिणामांबाबत उपाय करण्यासाठी अनेक देशांनी सहमती दर्शवली. हा करार पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण रसायनांतील बदलांसाठी २०१० आणि २०३० या कालमर्यादा ठरल्या व त्या पाळल्या जात आहेत.

⭕️ अधिक माहिती ⭕️

खरेतर चंगळवादाने सर्व पृथ्वीला संकटात टाकल्याचे हे आणखी एक उदाहरण होय. विकसनशील देशांनी वस्तू वापरण्यापूर्वी त्यांच्या पर्यावरणीय परिणामांचा विचार करावा ही अपेक्षा. तसेच हरितगृह- वायूंच्या प्रमाणावर नियंत्रण आणणारा क्योटो करारही यशस्वी ठरेल अशी आशा आहे. सध्या ऐवजी हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बन आणि हायड्रोफ्लुरोकार्बन चा वापर सुरु झाला आहे. परंतु यावरही २०३० पूर्वी नियंत्रण आणायचे आहे.

​​डीआरडीओकडून मॅन पोर्टेबल अ‍ॅन्टी टँक गाइडेड मिसाइलची यशस्वी चाचणी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) ने बुधवारी आंध्र प्रदेशच्या कुर्नुलमधील फायरिंग रेंजवरून मॅन पोर्टेबल अ‍ॅन्टी टँक गाइडेड मिसाइलची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्र प्रणालीतील ही तिसरी यशस्वी चाचणी होती. याला भारतीय सेनेच्या तिसऱ्या पिढीच्या रणगाडा भेदी क्षेपणास्राच्या आवश्यकतेसाठी विकसित केले गेले जात आहे.

डीआरडीओने ही क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे. या क्षेपणास्राचे वजन इतर क्षेपणास्त्रांच्या तुलनेने अतिशय कमी आहे. या क्षेपणास्राला मॅन पोर्टेबल ट्राइपॉड लाॅंचरद्वारे लाॅंच केले गेले होते. यानंतर त्याने त्याचे लक्ष्य अत्यंत अचुकतेने व आक्रमकतेने भेदले.

या क्षेपणास्राची तिसऱ्यांदा यशस्वी चाचणी झाली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीसाठी ‘डीआरडोओ’चे अभिनंदन केले आहे. सध्या कलम ३७० हटवण्यात आल्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातारण आहे. या पार्श्वभूमीवर ही क्षेपणास्र चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे.

यापूर्वी भारतीय सैन्याने राजस्थानमधील पोखरण येथे ‘नाग’ या क्षेपणास्राची यशस्वी चाचणी घेतली होती. हे क्षेपणास्रदेखील डीआरडीओनेच विकसीत केले होते. आता तिसऱ्या पिढीतील रणगाडा भेदी नाग क्षेपणास्राच्या निर्मितीचे कार्य या वर्षाअखेर सुरू होणार आहे.

अमित पंघलची विजयी सलामी

🥊आशियाई विजेता अमित पंघलने (५२ किलो) जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात यशाने केली.

🥊त्याने तैपेईच्या तु पो वै याच्यावर मात करत विजयी सलामी दिली.

🥊या स्पर्धेत दुसरा मानांकित असलेल्या २३ वर्षीय अमितने प्रतिस्पर्धी वै याच्यावर ५-० अशी सरळ मात केली.

🥊 या विजयामुळे अमितने उपउपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. पहिल्या फेरीत त्याला पुढची चाल मिळाली होती.

🥊आक्रमक खेळाने अमितने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर पहिल्या फेरीपासूनच वर्चस्व गाजविले.

🥊त्या तुलनेत पो वै याने अमितच्या आक्रमकतेला उत्तर देण्याऐवजी त्यापासून लांब पळण्याचाच पर्याय निवडला. त्यामुळे रेफ्रींनी त्याला सातत्याने तसे न करण्याचा इशारा दिला.

🥊गेल्या जागतिक स्पर्धेतही पो वै याची अमितशी झुंज झाली होती.

🥊हॅम्बर्गला झालेल्या त्या स्पर्धेतही अमितच्या आक्रमकतेपुढे पो वैने पळ काढणेच पसंत केले होते.

🥊२०१७च्या जागतिक स्पर्धेत हसनबाय दुस्मातोव्हविरुद्ध पराभूत झालेल्या अमितने यावर्षी जबरदस्त कामगिरी केली आहे.

🥊त्याने वजनी गटही बदलला आहे. आता तो ४९ किलो ऐवजी ५२ किलोत खेळत आहे.

🥊या हंगामाच्या प्रारंभीच त्याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ५२ किलो वजनी गटात सुवर्ण जिंकले. त्याआधी काही महिने त्याने ५२ किलो वजनी गटात खेळणे सुरू केले होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१५ सप्टेंबर २०१९

भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे क्रिकेटवीर कपिल देव झाले 'कुलगुरू'

▪️भारताला 1983 साली वर्ल्ड कप स्पर्धा जिंकूण देणारे कर्णधार कपिल देव यांची हरयाणा स्पोर्ट्स विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून निवड करण्यात आली आहे.
▪️हे देशातील तिसरे क्रीडा विद्यापीठ आहे. या विद्यापीठांमध्ये गुजरात गांधीनगर येथील स्वर्निम गुजरात क्रीडा विद्यापीठ आणि चेन्नईच्या तामीळनाडू फिजिक्स एज्युकेशन व क्रीडा विद्यापीठाचा समावेश आहे. पण, पुर्णतः खेळासाठी असलेले हे पहिलेच विद्यापीठ आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना क्रीडा विषयक करीअरच्या अनेक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये हरयाणा क्रीडा विद्यापीठाचे बील पास करण्यात आले.  ''या विद्यापीठाला राष्ट्रपतींची अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे, परंतु त्यासाठीचे सर्व पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कपिल देव यांची नियुक्ती      करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. याबाबत मी व्यक्तीशः कपिल देव यांच्याशी बोललो आहे आणि त्यांनीही होकार कळवला आहे,''असे अनिल वीज यांनी सांगितले.
▪️कपिल देव यांनी 1975 साली हरयाणाकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांनी पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात सहा विकेट घेत हरयाणाला विजय मिळवून दिला होता.

सक्षम बचत गटांचा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख व्हावी


▪️प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महिला सबळीकरण हे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी महिला बचत गटांना किमान व्याजदर योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासन सुद्धा यासाठी आग्रही असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही चळवळ महिलांच्या आर्थिक उत्थानाची चळवळ बनवा असे, आवाहनही त्यांनी यावेळी केले.
▪️भारत स्वतंत्र झाला तरी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा लढा आणखी बाकी असून महिला बचत गटांमार्फत ५० टक्के समुदायांना आर्थिक संपन्न बनविणे हे या बचत गटाचे अंतिम ध्येय असले पाहिजे, त्यासाठी आवश्यक ती मदत शासनस्तरावरून केली जात आहे. या चळवळीमध्ये माझा गृह जिल्हा असणारा चंद्र्रपूर हा जगाच्या पातळीवर सर्वात उत्तम जिल्हा म्हणून पुढे यावा, यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
▪️प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे महिला सबळीकरण हे स्वप्न आहे. त्यासाठी त्यांनी महिला बचत गटांना किमान व्याजदर योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासन सुद्धा यासाठी आग्रही असून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ही चळवळ महिलांच्या आर्थिक उत्थानाची चळवळ बनवा असे, आवाहनही त्यांनी यावेळी केले.

बांगलादेश नमवत भारताला आशिया चषकाचे जेतेपद

▪️अत्यंत चुरशीच्या सामन्यात अथर्व अंकोलेकरने घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला ५ धावांनी पराभूत करत १९ वर्षांखालील आशिया चषकाचे विजेतेपद मिळवले आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांमध्ये अखेरचा सामना कोलंबो येथे रंगला होता.
▪️आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी १०६ धावांचे आव्हान ठेवले होते. या सामन्यात बांगलादेश सहज विजय मिळवेल, असेच सर्वांना वाटले होते. मात्र, डावखुरा फिरकीपटू अथर्व अंकोलेकरने २८ धावांत टिपलेल्या ५ गड्यांमुळे भारताने जेतेपदावर नाव कोरले. बांगलादेशचा संपूर्ण संघ १०१ धावांवर बाद झाला. अकबर अली (२३) व मृत्यूंजय चौधरी (२१) यांचा अपवाद वगळता बांगलादेशचे अन्य फलंदाज जास्त काळ मैदानावर टिकू शकले नाही. अथर्वला आकाश सिंहने ३, तर विद्याधर पाटील व सुशांत मिश्रा यांनी प्रत्येकी एक गडी बाद करत चांगली साथ दिली.
▪️दरम्यान, १९ वर्षांखालील भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा भारताचा निर्णय चुकीचा ठरला. ८ धावांवर भारताचे ३ फलंदाज बाद झाले. कर्णधार ध्रुव जुरेलने ३३ धावा करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शाश्वत रावतने १९ धावा करत त्याला साथ दिली. करण लालने अखेरच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी केल्यामुळे भारताला शंभरी गाठता आली. करणने ३७ धावा केल्या. अखेर भारताचा संपूर्ण संघ ३२.४ षटकामध्ये १०६ धावाच करू शकला.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेपुढे उष्माघाताचे संकट

🅾टोक्यो : जपानमधील प्रखर उन्हाळ्याच्या मोसमात टोक्यो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ऑलिम्पिकदरम्यान खेळाडूंना तसेच चाहत्यांना उष्माघाताच्या संकटाला सामोरे जावे लागेल, असा इशारा जपानमधील एका नामांकित डॉक्टरने दिला आहे.

🅾जपान मेडिकल असोसिएशनच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य किमियुकी नानाशिमा यांनी म्हटले की, ‘‘उन्हाळ्याच्या मोसमात जपानमधील जनता बाहेर पडण्यास घाबरते, अशा वेळेला ऑलिम्पिक स्पर्धा होत असल्यामुळे जपानमधील डॉक्टरांवर खूप ताण येणार आहे. जगभरातील चाहते या स्पर्धेला हजेरी लावणार असल्यामुळे लोकांना अनेक आजारांचाही सामना करावा लागणार आहे. सुलभ वातावरणात खेळांच्या स्पर्धा आयोजित कराव्यात, असे माझे म्हणणे आहे. पण जपानमधील प्रखर उन्हाळ्यात मोकळ्या मैदानावरील स्पर्धा या चाहत्यांबरोबरच खेळाडूंसाठीही त्रासदायक ठरू शकतात.’’

🅾ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क मिळवताना सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये २४ जुलै ते ९ ऑगस्ट हा कालावधी ऑलिम्पिक तसेच पॅरालिम्पिक खेळांसाठी योग्य असून यादरम्यान वातावरण क्रीडा स्पर्धासाठी पोषक असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत ९३ हजार लोकांना उष्माघातामुळे अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी १५९ जणांचा मृत्यू झाला होता. उष्णतेचा त्रास टाळण्यासाठी १९६४ची टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात खेळवण्यात आली होती.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे?

      ‘विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला’

   1) उत्तीर्ण    2) परीक्षेत    3) झाला      4) विश्वाय

उत्तर :- 4

2) पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते ते सांगा.

      ती मुलगी चांगली गाते.

   1) मुलगी    2) ती      3) गाते      4) चांगली

उत्तर :- 2

3) हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले आहे. – अधोरेखित शब्दांचे विशेषण प्रकार ओळखा.

   1) साधित विशेषण    2) परिणाम दर्शक विशेषण
   3) नामसाधित विशेषण    4) अविकारी विशेषण

उत्तर :- 3

4) ‘मला आता काम करवते’ या वाक्यातील करवते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ?

   1) शक्य क्रियापद  2) प्रयोजक क्रियापद  3) अनियमित क्रियापद  4) साधित क्रियापद

उत्तर :- 1

5) जोडया जुळवा.

   अ) नामसाधित क्रियाविशेषणे    i) निजल्यावर, खेळताना
   ब) विशेषणसाधित क्रियाविशेषणे     ii) दररोज, शास्त्रदृष्टया
   क) धातुसाधित क्रियाविशेषणे    iii) सकाळी, प्रथमत:
   ड) समासघटित क्रियाविशेषणे    iv) मोटयाने, सर्वत्र

  अ  ब  क  ड

         1)  iii  iv  i  ii
         2)  iii  i  iv  ii
         3)  iv  ii  iii  i
         4)  i  iii  iv  ii
उत्तर :- 1

https://t.me/CompleteMarathiGrammar

6) आम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागतो. या वाक्यातील ‘आणि’ हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे ?

   1) विकल्पबोध अव्यय    2) समुच्चबोध अव्यय   
   3) न्यूनत्वबोध अव्यय    4) शब्दयोगी अव्यय

उत्तर :- 2

7) खालीलपैकी किती आश्चर्यकारक केवलप्रयोगी अव्यये आहे.

     ऑ, ओहो, अबब, बापरे, अहाहा, अरेच्या

   1) पाच      2) तीन     
   3) सर्व      4) चार

उत्तर :- 3

8) ‘सुधाने निबंध लिहला असेल’ या वाक्याचा काळ ओळखा.

   1) रीती भविष्यकाळ    2) पूर्ण भविष्यकाळ 
   3) अपूर्ण भविष्यकाळ    4) साधा भविष्यकाळ

उत्तर :- 3

9) ‘बछडा’ या शब्दाचा विरुध्दलिंगी शब्द शोधा.

   1) वाघीण    2) बछडी     
   3) भाटी    4) हंसी

उत्तर :- 2

10) करण म्हणजे ...........................

   1) क्रियेचे साधन किंवा वाहन    2) क्रियेचा आरंभ
   3) क्रियेचे स्थान        4) वरील कोणताही पर्याय योग्य नाही

उत्तर :- 1

साहिबगंज मल्टी मोडल टर्मिनल

◾️पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमध्ये भारताच्या दुसर्‍या मल्टी-मॉडेल टर्मिनलचे उद्घाटन

◾️टर्मिनलची क्षमता वर्षाकाठी 30 लाख टन आहे

◾️पीपीपी मोडमध्ये दुसर्‍या टप्प्यात क्षमता वाढीसाठी 666 कोटी डॉलर्सच्या गुंतवणूकीनंतर ते वार्षिक 54 54..8 लाख टनांपर्यंत वाढेल.

◾️पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 सप्टेंबर, 2019 रोजी झारखंडच्या साहिबगंज येथे बांधले गेलेले दुसरे मल्टी मॉडेल टर्मिनल देशाला समर्पित केले. हे टर्मिनल ₹ 200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले . जल मार्ग विकास प्रकल्प (जेएमव्हीपी) अंतर्गत गंगा नदीवर बनविलेले टर्मिनल पूर्ण करण्यास दोन वर्षे लागली.

◾️नोव्हेंबर 2018 मध्ये पंतप्रधान मोदींनी वाराणसी येथे पहिले मल्टी मॉडेल टर्मिनल समर्पित केले.

🔶प्रकल्पाची प्रारंभ तारीख: 10 नोव्हेंबर, 2016

🔶प्रकल्पाची पूर्ण तारीख: सप्टेंबर, 2019

🔷 जेट्टी: लांबीची 270 एमएक्स रूंदी 25 मीटर बेरिंग आणि मूरिंग सुविधा

◾️साहिबगंज येथील मल्टी-मॉडेल टर्मिनल झारखंड आणि बिहारचे उद्योग जागतिक बाजारपेठेत उघडेल आणि जलमार्गाच्या मार्गाने भारत-नेपाळ मालवाहतूक जोडेल. 

◾️राजमहल परिसरातील स्थानिक खाणींपासून एनडब्ल्यू -१ च्या कडेला असलेल्या विविध औष्णिक उर्जा प्रकल्पांकडे देशांतर्गत कोळशाची वाहतूक करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. कोळसा, दगडी चिप्स, खते, सिमेंट आणि साखर याशिवाय टर्मिनलमधून इतर वस्तूंची वाहतूक केली जाण्याची शक्यता आहे.

◾️मल्टी-मॉडेल टर्मिनलमुळे सुमारे 600 लोकांचे थेट रोजगार आणि प्रदेशातील सुमारे 3000 लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळण्यास मदत होईल. नवीन मल्टि-मोडल टर्मिनलद्वारे साहिबगंज येथे रोड-रेल-नदी वाहतुकीचे अभिसरण, मध्य भागातील हा भाग कोलकाता, हल्दिया आणि पुढे बंगालच्या उपसागरास जोडेल. 

◾️साहिबगंज बांगलादेशमार्गे ईशान्य-राज्यांसह नदी-समुद्र मार्गाने जोडला जाईल. तो टर्मिनलची क्षमता वर्षाकाठी 30 लाख टन आहे. तो एक गुंतवणूक नंतर वार्षिक 54.8 लाख टन वाढू जाईल ₹ पीपीपी मोड अंतर्गत दुसरा टप्पा क्षमतेत वाढ 376 कोटी आहे. दुसर्‍या टप्प्यातील विकास पूर्णपणे खाजगी सवलतीतून केला जाईल. पुढे टर्मिनलच्या अनुषंगाने 5 335 एकर जागेवर फ्रेट गाव देखील प्रस्तावित आहे.

◾️जलमार्ग विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणून एमएमटी बांधल्या जात आहेत. या गंगा नदीचा विस्तार वाराणसी ते हलदिया दरम्यान 1500-2000 टन वजनापर्यंत मोठ्या जहाजांच्या नेव्हिगेशनसाठी करणे आवश्यक आहे. नदी आणि सुरक्षित नेव्हिगेशनसाठी आवश्यक इतर सिस्टम स्थापित करणे.

चंद्र मोहिमांमध्ये अमेरिका २६ तर रशिया १४ वेळा अपयशी

📌चांद्रयान-२ मोहिमेतंर्गत विक्रम लँडरला चंद्रावर उतरवण्यात भले भारताला अपयश आले असेल पण त्याने निराश होण्याचे कारण नाही. कारण अवकाश इतिहासात अपयशामध्ये पुढचे यश दडलेले असते.

📌अमेरिका, रशियासारखे देश अनेक प्रयत्नांनंतर चंद्रावर पोहोचण्यात यशस्वी ठरले आहेत. मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर असताना मार्गावरुन भरकटले.

📌भारतचं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात अपयशी ठरला आहे असे नाही तर अमेरिका, रशिया या देशांना देखील चांद्र मोहिमेत अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुरुवातीच्या काळात चंद्र मोहिमांमध्ये यश मिळण्याचे प्रमाण खूप कमी होते. अमेरिकेला एकूण चंद्र मोहिमांपैकी २६ वेळा तर रशियाला १४ वेळा अपयशाचा सामना करावा लागला.

📌१९५० च्या दशकात चंद्राला स्पर्श करण्याची स्पर्धा सुरु झाली. त्याकाळात अमेरिका आणि रशिया या दोन महासत्ताच त्या स्पर्धेमध्ये होत्या. १९५० च्या दशकात एकूण १४ चंद्र मोहिमा झाल्या. त्यात अमेरिकेला सात पैकी एक तर रशियाला सात पैकी तीन मोहिमांमध्ये यश मिळाले.

📌सर्वप्रथम अमेरिकेने १७ ऑगस्ट १९५८ रोजी चंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला. पण पायोनिअरचे प्रक्षेपण अपयशी ठरले. १९६४ साली अमेरिकेच्या रेंजर ७ मिशनच्यावेळी पहिल्यांदा चंद्राचा जवळून फोटो काढण्यात आला. रशियाची अवकाश संस्था यूएसएसआरच्या लुना ९ मोहिमेत जानेवारी १९६६ मध्ये पहिल्यांदा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात आले. त्यावेळी पहिल्यांदा चंद्राच्या पृष्ठभागाचा फोटो मिळाला.

📌या मिशननंतर पाच महिन्यांनी मे १९६६ मध्ये अमेरिकेने सुद्धा अशाच प्रकारची मोहिम यशस्वी केली. १९६९ साली अमेरिकेचे अपोलो ११ मिशन तर ऐतिहासिक ठरले. त्यावेळी पहिले मानवी पाऊल चंद्रावर पडले.

📌१९५८ ते १९७९ या काळात फक्त अमेरिका आणि रशियाने चंद्र मोहिमा केल्या. या २१ वर्षात दोन्ही देशांनी ९० चंद्र मोहिमा केल्या. १९८० ते ८९ या काळात चंद्रावर जाण्याची ही स्पर्धा थांबली. त्यानंतर जपान, युरोपियन युनियन, चीन, भारत आणि इस्रायलने चंद्रावर जाण्याचा प्रयत्न केला. २००९ ते २०१९ या काळात एकूण दहा चंद्र मोहिमा झाल्या.

चंद्र स्वाऱ्या

◾️गेल्या ६० वर्षांत आतापर्यंत १०९ चांद्रमोहिमा आखल्या गेल्या आहेत. त्यापैकी ६१ यशस्वी, तर ४८ मोहिमा अयशस्वी झाल्या आहेत.

◾️यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अंतराळात माणसानं प्रवेश करण्यापूर्वी एका प्राण्यानं प्रवेश करून माणसांचा मार्ग मोकळा केला होता.

◾️ हा प्राणी कोण होता माहीत आहे, ती होती रशियाच्या रस्त्यांवर फिरणारी एक भटकी कुत्री. तिचं नाव होतं लायका.

◾️रशियानं ३ नोव्हेंबर १९५७मध्ये आपल्या स्फुटनिक-२ यानातून तिला अंतराळात पाठवलं होतं.

◾️ त्यानंतर साधारण १९५०च्या दशकात पहिल्यांदा चंद्रावर स्वारी करायचं, असं माणसानं ठरवलं.

◾️त्या काळात अमेरिका आणि रशिया हीच बलाढ्य आणि पुढारलेली राष्ट्रं होती. साहजिकच त्यांनी चंद्रावर स्वाऱ्या करायला सुरुवात केली.

◾️ त्यानंतर आतापर्यंत १०९ मोहिमा झाल्या आहेत.

    💢 अमेरिका : १९६६ ते १९७२ दरम्यान 💢

◾️नासा ही अमेरिकेची अवकाश संस्था. अपोलो मोहिमेत फेब्रुवारी १९६६ ते डिसेंबर १९७२ या काळात तिनं १९ मोहिमा केल्या.

◾️ त्यापैकी १६ यशस्वी झाल्या.

◾️या मोहिमांमधून नील आर्मस्ट्राँग एल्विन ऑल्ड्रिनसह २४ अंतराळवीरही चंद्रावर जाऊन आले.

  💢 रशिया : १९५९ ते १९७६ दरम्यान💢

◾️रशियानं या १७ वर्षांत २४ चांद्रमोहिमा केल्या.

◾️यातील १५ यशस्वी झाल्या.

◾️लुना-१ ही पहिली मोहीम अयशस्वी झाल्यानंतर १३ सप्टेंबर १९५९ रोजी रशियाने लुना-२ मोहीम आखली. ती यशस्वी झाली. या मोहिमेत रशियानं चंद्रावरून नमुने आणले.

◾️तर नंतरच्या लुना-१७ आणि लुना-२१ मोहिमेत चंद्रावर रोव्हर उतरवण्यात रशियानं यश मिळवलं.

      💢 जपान : १९९० पासून 💢

◾️जपाननं २४ जानेवारी १९९० रोजी 'हितेन' ही पहिली चंद्रस्वारी केली.

◾️चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर काही काळात ऑर्बिटरचा जमिनीपासूनचा संपर्क तुटला.

◾️जपाननं आपली दुसरी मोहीम सेलेन १४ सप्टेंबर २००७ रोजी आखली.

◾️ या अवकाश यानाचे ऑर्बिटर, रिले उपग्रह आणि व्हीएलबीआय उपग्रह असे तीन भाग होते.

        💢 चीन : २००७ पासून 💢

◾️चीननं त्यांच्या चंद्र देवीच्या नावानं म्हणजेच, चँग नावानं चार टप्प्यांमध्ये रोबोटिक चांद्रमोहिमा आखल्या. त्या सर्व यशस्वी ठरल्या आहेत.

◾️चँग-१ आणि चँग-२ या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये ऑर्बिटर पाठवण्यात आले आणि चँग-३ आणि चँग-४ मध्ये लँडर होते.

◾️यात युतू १ आणि युतू २ नावाचे रोव्हरही होते.

💢भारत : २२ ऑक्टोबर २००८ पासून💢

◾️खरंतर २००८च्या आधीपासून भारताचा अंतराळ कार्यक्रम सुरू होता.

◾️भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा १९८४मध्ये अंतराळात जाऊन आले होते. पण चंद्रावर स्वारी २२ ऑक्टोबर २००८ रोजी झाली.

◾️श्रीहरीकोटा येथील पीएसएलव्ही सी-११ भारताचे चांद्रयान घेऊन उडाले.

◾️चंद्राच्या रासायनिक, खनिज आणि प्रकाश-भौमिकी मानचित्रणासाठी चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किमी उंचीवरून चांद्रयान-१ परिभ्रमण करीत होते.

◾️ याच्या अवकाशयानात भारतासह संयुक्त राष्ट्रे, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन आणि बल्गेरियाची ११ उपकरणे होती.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...