०२ सप्टेंबर २०१९

‘फिट इंडिया’


🔰 29 ऑगस्ट 2019 रोजी राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’ अभियानाचा प्रारंभ केला.

🔰 मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून या लोकचळवळीचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली.

🔰 तंत्रज्ञानामुळे आपली शारीरिक क्षमता घटली आहे आणि आपले आरोग्याचे दैनंदिन वेळापत्रक कोलमडून गेले आहेत. आज भारतात जीवनशैलीसंबंधी आजार वाढत आहेत. तरुणांनाही ते जडत आहेत. मधुमेह आणि अतिताण याचे प्रमाण वाढत असून, ते मुलांमध्येही दिसून येत आहे. जीवनशैलीतला थोडासा बदल हे जीवनशैलीचे आजार रोखू शकतो. ‘फिट इंडिया अभियान’ हे जीवनशैलीतले छोटे बदल घडवण्याचा एक प्रयत्न आहे...!!!

प्रधानमंत्री पुरस्कार

🔰 नाशिक येथील योगाचार्य डॉ. विश्वास मंडलिक आणि मुंबई येथील ‘द योग इन्स्टिट्यूट’ ला योगाच्या प्रचार व प्रसारासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी प्रधानमंत्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

डॉ. विश्वास मंडलिक
         
🔰 हटयोग, उपनिषद आणि भगवतगीतेचा अभ्यास व संशोधन करून योगाचार्य डॉ. विश्वास  मंडलिक हे गेल्या ५५ वर्षांपासून योगाभ्यासाचे धडे देत आहेत.

🔰 डॉ. मंडलिक यांनी नाशिक येथे १९७८ मध्ये ‘भारतीय योग विद्या धाम ’ संस्थेची स्थापना केली.

🔰 या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गुरुकुल पद्धतीने योगाचा देश-विदेशात प्रचार व प्रसार केला.

🔰 देशभरात या संस्थेचे एकूण १६० केंद्र तर परदेशात १६ केंद्र आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून ५ लाख लोकांनी योगाचे प्राथमिक प्रशिक्षण घेतले आहे.

🔰 त्यांनी योगाच्या प्रचार व प्रसारासाठी विविध पुस्तकही लिहिली आहेत.

🔰 योगक्षेत्रातील  उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना गौरविण्यात आले. 

द योग इन्स्टिट्यूट

🔰 मुंबईतील सांताक्रुझ भागात १९१८ मध्ये स्वामी योगेंद्र यांनी ‘द योग इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली.

🔰 योग प्रचार व प्रसारासाठी कार्यरत या संस्थेने एक कोटी लोकांना योगाभ्यासासाठी प्रेरित केले.

🔰 या संस्थेने देश-विदेशात ५५ हजारांहून अधिक योग शिक्षक घडविले आहेत.

🔰 संस्थेने योगविषयक माहितीची ५० पेक्षा अधिक प्रकाशने प्रकाशित केली आहेत.

🔰 एनसीईआरटीच्या योगविषयक अभ्यासक्रम निर्मितीत संस्थेचे मोलाचे योगदान राहिले आहे.

🔰 योगाच्या प्रचार-प्रसारातील याच कार्याची दखल घेऊन संस्थेला सन्मानित करण्यात आले..!!

०१ सप्टेंबर २०१९

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगत सिंह कोश्यारी यांची नियुक्ती

⚡ सी. विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी कोश्यारी यांची नियुक्ती

💁‍♂ उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यता आली आहे.

🔻 कोण आहेत भगत सिंह कोश्यारी? :
भगत सिंह कोश्यारी उत्तराखंडचे दिग्गज भाजप नेते आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांनी 1977 मध्ये आणीबाणीच्या वेळी तुरुंगवासही भोगला आहे. उत्तराखंड राज्याची निर्मिती झाली तेव्हा ते भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष बनले.

👉 2001 ते 2007 या कालावधीत ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. 2002 ते 2007 पर्यंत त्यांनी विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम पाहिलं. 2008 ते 2014 पर्यंत ते राज्यसभेत खासदार होते.

💫 *महाराष्ट्रासह एकूण पाच राज्यांना मिळाले नवे राज्यपाल*
1⃣ केरळ : आरिफ मोहम्मद खान
2⃣ राजस्थान : कलराज मिश्र
3⃣ हिमाचल प्रदेश : बंडारू दत्तात्रेय
4⃣ तेलंगणा : तमिलीसाई सुंदरराजन

देशातील राष्ट्रीयीकृत बॅंकांची संख्या आता फक्त बारा

◾️अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दहा राष्ट्रीय बॅंकांचे चार प्रमुख राष्ट्रीय बॅंकांमध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली. यामुळे आता देशात फक्त १२ राष्ट्रीयीकृत बॅंका असतील. या विलीनीकरणामुळे कामगार कपात होणार नसून, कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार नाही. तसेच बचत आणि कर्जवाटप या बॅंकांच्या प्रमुख कामकाजावरही याचा परिणाम होणार नसल्याचा निर्वाळा अर्थमंत्री सीतारामन यांनी दिला.

◾️देशात २७ राष्ट्रीयीकृत बॅंका होत्या. आता या विलीनीकरण प्रक्रियेनंतर फक्त १२ प्रमुख राष्ट्रीयीकृत बॅंका राहतील. यानंतर कोणतेही विलीनीकरण केले जाणार नाही. याशिवाय इंडियन ओव्हरसीज बॅंक, युको बॅंक, बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब अँड सिंध बॅंक या चार बॅंकांच्या कामकाजाचा केंद्रबिंदू विभागीय स्वरूपाचा असल्यामुळे त्यांचा राष्ट्रीय बॅंकेचा दर्जा कायम राखताना कामकाजाच्या प्रादेशिक स्वरूपात बदल न करण्याचे सरकारने ठरविले आहे.

◾️अरुण जेटली यांच्या अर्थमंत्रिपदाच्या काळात बॅंक ऑफ बडोदामध्ये देना बॅंक आणि विजया बॅंकेचे, तर भारतीय स्टेट बॅंकेमध्ये सर्व स्टेट बॅंक समूहांचे विलीनीकरण करण्यात आले होते.

◾️अर्थात, या विलीनीकरण प्रक्रियेमध्ये बॅंक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बॅंक या दोन प्रमुख बॅंकांचे अस्तित्व जैसे थे राखण्याचेही सरकारने ठरविले आहे. या दोन्ही बॅंकांचे देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात असलेले अस्तित्व पाहता त्यांच्या विलीनीकरणाचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. बॅंक ऑफ इंडियाचा ९३ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय आहे, तर सेंट्रल बॅंकेची उलाढाल ४.६८ लाख कोटी रुपये आहे.

◾️अर्थमंत्र्यांनी बॅंक विलीनीकरणाच्या निर्णयाचे समर्थन करताना पाच ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था साकारण्यासाठीचे हे पाऊल असल्याचा दावा केला. निष्क्रिय बॅंकांमध्ये कामकाज वाढेल आणि मोठ्या बॅंकांना अधिक कर्जवाटप शक्‍य होईल. मात्र २५० कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या कर्ज प्रकरणांवर सरकारचे बारकाईने लक्ष राहील, असाही इशारा त्यांनी दिला. बॅंकांचा एनपीए (बुडीत कर्जाचे प्रमाण) ८.६५ लाख कोटी रुपयांवरून ७.९ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आल्याचे सांगितले.

हॅपीनेस इंडेक्समध्ये भारत नवव्या स्थानी: इप्सोस सर्वेक्षण


इप्सोस या मार्केट रिसर्च संस्थेनी त्याचा “ग्लोबल हॅपीनेस सर्व्हे” याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

अहवालाच्या ठळक बाबी

✔️हॅपीनेस इंडेक्सच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 28 जागतिक बाजारपेठांमध्ये भारत नवव्या क्रमांकावर आहे.

✔️यादीत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा (86%) हे अग्रस्थानी असून जगातले सर्वात आनंदी देश ठरले आहेत.

✔️त्यापाठोपाठ, चीन, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, संयुक्त राज्ये अमेरिका, सौदी अरब आणि  जर्मनी या देशांचा क्रम लागतो आहे. नवव्या क्रमांकावर भारत 77 टक्क्यांसह आहे.

✔️अर्जेटिना 34 टक्क्यांसह यादीत शेवटच्या क्रमांकावर म्हणजेच 27 व्या क्रमांकावर आहे. त्याआधी स्पेन आणि रशिया या देशांची नोंद आहे.

✔️विशेष म्हणजे, 2019 साली आनंदीपणाची पातळी कमी झाली. भारतासाठी या पातळीत सहा टक्क्यांची घसरण झाली आहे. सन 2018 मधील 83 टक्क्यांवरून 2019 साली ही पातळी 77 टक्क्यांवर आली आहे.

अहवालानुसार, जेव्हा आनंद हा घटक लक्षात घेतला जातो तेव्हा भारतीय नागरिक चांगली आर्थिक परिस्थिती आणि शारीरिक सुदृढता हे दोन घटक आनंद मानण्याचे सर्वात मुख्य कारणे मानतात. तर वैयक्तिक सुरक्षा आणि सुरक्षितता, मित्र आणि जीवनावर नियंत्रण असल्याची भावना ही भारतीयांची आनंदी राहण्याविषयीचे इतर प्रमुख कारक आहेत, असे नव्या सर्वेक्षणातून आढळून आले आहे.

महिलांच्या बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांपेक्षा दुपटीहून अधिक



🔺 भारतातील २०० प्रकारच्या नोक ऱ्यातील कर्मचारी भरतीची माहिती एका संस्थेकडून घेण्यात आली,

👉 पीटीआय | August 31, 2019

◾️नवी दिल्ली : भारतात महिलांमधील बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत त्यांची शैक्षणिक पात्रता बरोबरीची असूनही दुपटीहून अधिक आहे,असे एका अभ्यासात दिसून आले आहे.
‘जेंडर इनक्लुजन इन हायरिंग इन इंडिया’ या शीर्षकाखाली हार्वर्डचे विद्यार्थी राशेल लेव्हेनसन व लायला ओकेन यांनी संशोधन निबंध सादर केला असून त्यात म्हटले आहे,की  देशात ८.७ टक्के सुशिक्षित स्त्रिया बेरोजगार आहेत; तुलनेने चार टक्के पुरुषांना नोक ऱ्या नाहीत.

महिलांचा निर्णय व त्यांची नोकरी शोधण्याची क्षमता यावर परिणाम करणारे घटक वेगळे असतात. लिंगभेदामुळे उच्च शिक्षित स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत नोक ऱ्या मिळण्यास कठीण जाते. भारतातील २०० प्रकारच्या नोक ऱ्यातील कर्मचारी भरतीची माहिती एका संस्थेकडून घेण्यात आली, त्यात २०१६-२०१७  दरम्यान कर्मचाऱ्यांच्या भरतीचे स्वरूप त्यातून स्पष्ट झाले. २११०४ उमेदवारांनी वेगवेगळ्या कामांसाठी एकूण २८६९९१ अर्ज केले होते. कर्मचारी भरती व्यवस्थापक व कर्मचारी बाजारपेठ तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली असता असे दिसून आले की, अजूनही नोकरी देताना भारतात लिंगभेदाचा परिणाम होत आहे. पात्रता व अनुभव, पर्याय, अर्ज प्रक्रिया यात महिलांना अडचणी आल्याचे दिसून आले. जर भारतातील नोकऱ्यांत महिलांना योग्य स्थान मिळाले तर देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न हे २७ टक्के वाढू शकते.

बहुराष्ट्रीय कंपन्यांत भेदभाव कमी
अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी महिलांना योग्य ते स्थान दिले असून भेदभाव कमी केला आहे. नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या वाढवणे व त्यातून निवड करणे यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे  आहे. उमेदवारांमध्ये विविधता असणे हे लहान, मध्यम व मोठय़ा उद्योगांनाही फायद्याचे आहे,असे मत शॉर्टलिस्टचे सहसंस्थापक सिमॉन देसजार्डिन यांनी व्यक्त केले. कर्मचारी भरती करताना क्षमता मापन, कामाचे अचूक वर्णन, लिंगभाव टाळणारी प्रक्रिया यांचा समावेश करण्याची गरज आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर; 'भोंगा' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

📚राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मराठी चित्रपट

▪️सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - भोंगा

▪️पर्यावरण संवर्धनावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट-पाणी

▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)

▪️सर्वोत्कृष्ट डेब्यू दिग्दर्शक - सुधाकर रेड्डी (नाळ)

▪️सर्वोत्कृष्ट बालकलाकार- श्रीनिवास पोकळे (नाळ)

📚हिंदी चित्रपट

▪️सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट-अंधाधुन

▪️सर्वोत्कृष्ट संगीत-पद्मावत

▪️सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पद्मावत)- अरिजीत सिंह

▪️सर्वोत्कृष्ट अभिनेता- आयुष्मान खुराना (अंधाधुन),विकी कौशल (उरी)

▪️सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन- कृती महेश मिद्या व ज्योती तोमर (पद्मावत चित्रपटातील घूमर गाण्यासाठी)

▪️सर्वोत्कृष्ट साऊंड डिझायनर- उरी

▪️सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट- केजीएफ

▪️सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट- पॅडमॅन

▪️पुरेपूर मनोरंजन करणारा सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट- बधाई हो

▪️सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- सुरेखा सिक्री (बधाई हो)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- आदित्य धर (उरी)

सर्वोत्कृष्ट ॲडाप्टेट स्क्रीनप्ले- अंधाधुन

३१ ऑगस्ट २०१९

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

   1) स्थलवाचक क्रियाविशेषण वाक्य      2) कालवाचक क्रियाविशेषण वाक्य
   3) रीतिवाचक क्रियाविशेषण वाक्य      4) कार्यकारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य

उत्तर :- 2

2) दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
     स्तव
   1) तुलनावाचक      2) हेतुवाचक    3) दिक्वाचक    4) विरोधवाचक

उत्तर :- 2

3) पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ?

    ‘अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश’

   1) परिणामबोधक    2) स्वरूपबोधक    3) कारणबोधक    4) विकल्पबोधक

उत्तर :- 2

4) पुढील शब्द कोणत्या शब्दजातीतील ओळखा. – ‘फक्कड’

   1) उभयान्वयी      2) केवलप्रयोगी    3) सर्वनाम    4) ‍क्रियापद

उत्तर :- 2

5) ‘तो नेहमीच लवकर येतो’ या वाक्यातील काळ ओळखा.

   1) वर्तमानकाळ      2) अपूर्ण वर्तमानकाळ
   3) पूर्ण वर्तमान काळ    4) रीतिवर्तमान काळ

उत्तर :- 4

6) ‘आनंद’ या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा.

   1) हर्ष      2) आनंदीआनंद     
   3) हास्य    4) उत्साह

उत्तर :- 1

7) ‘भव्दजन’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरुध्दार्थी आहे ?

   1) सज्जन    2) दुर्जन     
   3) प्रेमीजन    4) विद्ववत्जन   

उत्तर :- 2

8) ‘स्वत:मध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो.’ या अर्थाची म्हण ओळखा.

   1) खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी    2) उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग
   3) आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला  4) उथळ पाण्याला खळखळाट फार

उत्तर :- 4

9) ‘पाणी सोडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

   1) शेतीला पाणी देणे    2) त्याग करणे   
   3) इतरांना मदत करणे    4) कोंडी फोडणे

उत्तर :- 2

10) ‘मागून जन्मलेला’ या शब्दाला समूहदर्शक शब्द निवडा.

   1) अग्रज    2) अपूर्व     
   3) अनुज    4) अष्टावधानी

उत्तर :- 3 

चालू घडामोडी वन लाइनर्स. 29 ऑगस्ट 2019

✳ जागतिक कौशल्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा रशियामधील केझान येथे होणार आहे

✳ भारतीय संघाने जागतिक कौशल्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 4 पदके जिंकली

✳ बायोमेट्रिक सीफेरर आयडेंटिटी डॉक्युमेंट जारी करण्यासाठी भारत जगातील पहिला देश बनला आहे

✳ सुनील गौर यांना मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये ट्रिब्यूनलचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले

✳ आयपीएस अपर्णा कुमार तेन्झिंग नॉर्गे नॅशनल अ‍ॅडव्हेंचर अवॉर्ड 2019 मानली जातील

✳ तबला उस्ताद गुरु हरमोहन खुंटिया यांना गुरु केळुचरण महापात्रा पुरस्कार, 2019

✳ गुरु दुर्गा चरण रणबीर यांना गुरु केळुचरण महापात्र पुरस्कार, 2019  मध्ये गौरविण्यात येईल

✳ सुनील कोठारी यांना गुरु केळूचरण महापात्रा पुरस्कार, 2019 चा सन्मान देण्यात येईल

✳ लीला वेंकटरमन यांना गुरु केलूचरण महापात्रा पुरस्कार, 2019  चा सन्मानित

✳ अविनाश पसरीचा गुरु केळुचरण महापात्रा पुरस्कार, 2019 चा सन्मानित

✳ यूपीएस मदन हे नवीन महाराष्ट्र निवडणूक आयुक्त होतील

✳ निवडणूक आयोगाने झारखंडसाठी निवडणूक चिन्ह वापरल्यापासून, महाराष्ट्र निवडणुका

✳ उत्तर प्रदेशात सौभाग्य योजनेंतर्गत 12 लाख घरांच्या विद्युतीकरणाला केंद्राने मान्यता दिली

✳ 33.13 कोटी च्या ग्राहक बेससह जिओ भारतातील सर्वात मोठे टेलिकॉम ऑपरेटर बनले

✳ केंद्रीय मंत्रिमंडळाने कोळसा खाण आणि असोसिएटेड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 100% एफडीआय परवानगी दिली आहे

✳ दिल्ली सरकारने सुरक्षेसाठी हिम्मत प्लस अ‍ॅपवर 'क्यूआर कोड स्कीम' सुरू केली

✳ आयआयटी गुवाहाटीने सुरक्षित पेयजलसाठी आरडी ग्रीन इंडिया सह सामंजस्य करार केला

✳ 7 वा सामुदायिक रेडिओ संमेलन नवी दिल्ली येथे प्रारंभ

✳ रशिया गगनयान मिशनसाठी भारतीय अंतराळवीरांची निवड आणि प्रशिक्षण देणार आहे

✳ शालिजा धामी प्रथम महिला फ्लाइट कमांडर ठरली

✳ पवन कपूर यांची यूएईमध्ये पुढची राजदूत म्हणून नियुक्ती

✳ आयएएस प्रमोद अग्रवाल यांची कोल इंडियाचे सीएमडी म्हणून नियुक्ती

✳ नवी दिल्ली येथे पॉवरग्रिडची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित

✳ जम्मू-काश्मीर, लडाख येथून निमलष्करी दलांसाठी ,50.000 तरुणांची भरती करण्याचे केंद्र

✳ मायावती बहुजन समाज पक्षाची पुन्हा निवड झाली (बसपा)

✳ पाकिस्तानने कराचीवर सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी 3 विमान मार्ग बंद केले

✳ आयसीआयसीआय बँक चलन नोट्स मोजण्यासाठी रोबोटिक आर्म्स तैनात करते

✳ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज लडाखला भेट देणार आहेत

✳ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "फिट इंडिया" चळवळ सुरू केली

✳ क्लिंट मॅके वानुआटु क्रिकेटसाठी अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाले

✳ भारत रेटिंगने वित्तीय वर्ष 20 च्या जीडीपीच्या अंदाजात अंदाजे.6.3% टक्क्यांऐवजी 7.3% टक्क्यांची कपात केली

✳ मोबिल इंडियाने बजरंग पुनियाला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून स्वाक्षरी केली

✳ हिमाचल प्रदेशने सिंगापूर कंपनीबरोबर मेगा टाउनशिप करार रद्द केला

✳ पाकिस्तान-चीन संरक्षण सहकार्यासाठी सामंजस्य करार

✳ ढाका, बीजिंग यांनी 500 मेगावॅट नूतनीकरणयोग्य ऊर्जा प्रकल्पांसाठी सामंजस्य करार केला

✳ केंद्रीय मनुष्यबळ आणि विकास मंत्रालयाने "शगुन" अ‍ॅप सुरू केले

✳ रिव्होल्ट आरव्ही 400 आणि रेवोल्ट आरव्ही 300 इलेक्ट्रिक बाइक्स भारतात सुरू झाल्या

✳ शासनाने आउटलेट्स शोधण्यासाठी "जनऔषधि सुगम" अॅप सुरू केला

✳ 2018--19 मध्ये भारताची दुग्ध निर्यात 126% वाढून 1,23,877 दशलक्ष टन झाली

✳ महाराष्ट्र सरकार 51,000 शालेय शिक्षकांना स्पोकन इंग्लिशमध्ये प्रशिक्षण देणार आहे

✳ 30% महाराष्ट्रातील मुले डायबिटीज मुळे स्कूल कॅन्टीन फूड: अभ्यास

✳ अक्षय कुमार यांचे मिशन मंगल महाराष्ट्रात करमुक्त घोषित

✳ महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी महिलांसाठी एमएसआरटीसी बस चालविण्याकरिता निवडलेल्या आदिवासी महिला

✳ डीडीसीए वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अतुल वासन यांना निवडले

✳ श्रीलंकेचा क्रिकेटर अजंठा मेंडिस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला

✳ जमैकन वेगवान गोलंदाज सेसिल राइटने 85 व्या वर्षी सेवानिवृत्तीची घोषणा केली

✳ भुवनेश्वर 2020 फिफा अंडर 17 महिला विश्वचषक स्पर्धेसाठी यजमान शहर म्हणून

✳ हीरो मोटोकॉर्पने 2022 पर्यंत सीपीएलचे प्रायोजकत्व वाढविले

✳ मेरी कोमला एशियाचा सर्वोत्कृष्ट महिला अ‍ॅथलीट पुरस्कार जाहीर

✳ 2 ऑक्टोबर रोजी 6 एकल-वापर प्लास्टिक उत्पादनांवर भारत बंदी घालणार आहे

✳ 22 वी एशियन स्पोर्ट्स प्रेस युनियन (एआयपीएस एशिया) मलेशिया येथे आयोजित

✳ आयएसएल 2019-20: हैदराबाद एफसी सहाव्या सत्रात पुणे शहर एफसीची जागा घेईल

✳ केंद्रीय मंत्रिमंडळाने डिजिटल माध्यमातील 26% एफडीआय मंजूर केला

✳ 2022 पर्यंत 75 नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली

✳ छत्तीसगड सरकारने "नियंतम आय योजना" सुरू केली.

✳ भारत - 31 ऑगस्टपासून कझाकस्त

दहा सरकारी बँकांचे विलीनीकरण:-

• अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलीनीकरण  करण्याचा निर्णय घेतला
• केंद्राच्या या निर्णयानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या आता २७ वरून १२ वर येणार आहे.
• पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या चारही बँकांच्या विलीनीकरणातून अस्तित्वात येणारी बँक देशातील दुसरी सर्वात मोठी बँक ठरणार आहे. कॅनरा बँक आणि सींडिकेट बँक यांचं विलीनीकरण होईल. त्यातून अस्तित्वात येणारी बँक देशातील चौथी सर्वात मोठी बँक असेल

● विलीनीकरण::-
••••••••••••••••••••••

● विलीनीकरण- १ : पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया.

● विलीनीकरण २ : कॅनरा बँक, सींडिकेट बँक

● विलीनीकरण ३: युनियन बँक, आंध्रा बँक आणि कार्पोरेशन बँक (पाचवी सर्वात मोठी बँक अस्तित्वात येईल.

● विलीनीकरण ४ : इंडियन बँक, अलाहाबाद बँक (सातवी सर्वात मोठी बँक अस्तित्वात येईल)

३० ऑगस्ट २०१९

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न 30/8/2019

1) ‘जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा भरपूर पाऊस पडत होता’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

   1) स्थलवाचक क्रियाविशेषण वाक्य      2) कालवाचक क्रियाविशेषण वाक्य
   3) रीतिवाचक क्रियाविशेषण वाक्य      4) कार्यकारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य

उत्तर :- 2

2) दिलेल्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
     स्तव
   1) तुलनावाचक      2) हेतुवाचक    3) दिक्वाचक    4) विरोधवाचक

उत्तर :- 2

3) पुढील वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ?

    ‘अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश’

   1) परिणामबोधक    2) स्वरूपबोधक    3) कारणबोधक    4) विकल्पबोधक

उत्तर :- 2

4) पुढील शब्द कोणत्या शब्दजातीतील ओळखा. – ‘फक्कड’

   1) उभयान्वयी      2) केवलप्रयोगी    3) सर्वनाम    4) ‍क्रियापद

उत्तर :- 2

5) ‘तो नेहमीच लवकर येतो’ या वाक्यातील काळ ओळखा.

   1) वर्तमानकाळ      2) अपूर्ण वर्तमानकाळ
   3) पूर्ण वर्तमान काळ    4) रीतिवर्तमान काळ

उत्तर :- 4

6) ‘आनंद’ या शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द निवडा.

   1) हर्ष      2) आनंदीआनंद     
   3) हास्य    4) उत्साह

उत्तर :- 1

7) ‘भव्दजन’ या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द विरुध्दार्थी आहे ?

   1) सज्जन    2) दुर्जन     
   3) प्रेमीजन    4) विद्ववत्जन   

उत्तर :- 2

8) ‘स्वत:मध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो.’ या अर्थाची म्हण ओळखा.

   1) खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी    2) उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग
   3) आपण हसे लोकाला शेंबूड आपल्या नाकाला  4) उथळ पाण्याला खळखळाट फार

उत्तर :- 4

9) ‘पाणी सोडणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

   1) शेतीला पाणी देणे    2) त्याग करणे   
   3) इतरांना मदत करणे    4) कोंडी फोडणे

उत्तर :- 2

10) ‘मागून जन्मलेला’ या शब्दाला समूहदर्शक शब्द निवडा.

   1) अग्रज    2) अपूर्व     
   3) अनुज    4) अष्टावधानी

उत्तर :- 3 

विश्वनाथ काशिनाथ राजवाडे

जन्म : १२ जुलै १८६३ (रायगड)
निधन : ३१ डिसें. १९२६ (धुळे)

● विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या विचाराने प्रभावित.

● १८९५ रोजी "भाषांतर" नावाचे मासिक सुरू केले.

● मराठ्यांच्या इतिहासाची साधने २२ खंडात प्रकाशीत केले.

● १९१० रोजी 'भारत इतिहास संशोधक मंडळ' पुणे येथे स्थापन केले.

● १९११ रोजी शिवाजी जयंतीनिमित्त टिळकांच्या केसरी वृत्तपत्रामध्ये लेख लिहिला...लेखाद्वारे भारतीय चातुर्वण व्यवस्थेचा पुरस्कार केला.

● या लेखानुसार, भारतीय समाजाची अवनती होण्यामागे मुख्य कारण म्हणजे भारतीयांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे पालन करणे सोडून दिले.

● १९२६ रोजी 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' हा ग्रंथ त्यांनी लिहीला.

● त्यांच्या मृत्यूनंतर ९ जुन १९२७ रोजी त्यांच्या अनुयायांनी धुळे येथे 'राजवाडे संशोधक मंडळाची स्थापना केली'.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...