०५ जुलै २०१९

चालु घडामोडी वन लाईनर्स , ०५ जुलै २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०५ जुलै २०१९ .

✅ देशाच्या पहिल्या पुर्णवेळ अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०१९-२० या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला

● अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सितारमन देशाच्या पहिल्या पुर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत

● माजी क्रिकेटपट्ट ब्रायन लारा यांना डॉ. डी.वाय पाटील विद्यापीठातर्फे डॉक्टरेट पदवीने समान्मित करण्यात आले

● जागतिक बँकेकडून महाराष्ट्राला धरणांच्या देखभाल , दुरुस्तीसाठी ९४० कोटींचा निधी जाहीर

● पोन्जान एथलेटिक्स ग्रां प्री २०१९ स्पर्धा पोलंड येथे आयोजित करण्यात आली

● पोन्जान एथलेटिक्स ग्रां प्री २०१९ स्पर्धेत हिमा दासने २०० मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावले

● पोन्जान एथलेटिक्स ग्रां प्री २०१९ स्पर्धेत वी के विस्मयाने ४०० मीटरमध्ये कांस्यपदक पटकावले

● पोन्जान एथलेटिक्स ग्रां प्री २०१९ स्पर्धेत के एस जीवनने ४०० मीटरमध्ये कांस्यपदक पटकावले

● पोन्जान एथलेटिक्स ग्रां प्री २०१९ स्पर्धेत तजिंदर पाल सिंह तुरने पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात कांस्यपदक पटकावले

● ६६ वी वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद कबड्डी - महिला स्पर्धा पटना येथे आयोजित करण्यात येणार

● भारत , ऑस्ट्रेलिया व इंग्लंड हे संघ २०१९ आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

● ग्रामीण बँकांच्या परीक्षा १३ प्रादेशिक भाषांमधून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे

● पुणे येथे ५ ते ७ जुलैदरम्यान " साखर परिषद २०२० " चे आयोजन करण्यात येणार आहे

● २०१९ किया सुपर लीग स्पर्धेसाठी हरमनप्रीत कौरला लॅकशायर संघाने आपल्या संघात समाविष्ट केले

● कॉमनवेल्थ चेस चॅम्पियनशिप स्पर्धा २०१९ नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली

● उत्तर प्रदेश सरकारने तक्रारींचे निवारण करण्यासाठी टोल फ्री मुख्यमंत्री हेल्पलाइन १०७६ चे अनावरण केले

● त्रिपुरा सरकारला ग्रामीण रस्ते विकासासाठी केंद्र सरकारकडून ३५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर

● कुलभूषण जाधव प्रकरणात १७ जुलैरोजी आंतरराष्ट्रीय न्यायालय आपला निर्णय घोषित करणार

● संयुक्त अरब अमीरातचे परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायद अल नाह्यान ७ जुलैपासून ३ दिवसीय भारत दौऱ्यावर येणार

● कॅलिफोर्निया केशरचना भेदभाव प्रतिबंधित करणारे अमेरिकेतील पहिले राज्य बनले

● पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान २२ जुलै रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार

● दुखापतीमुळे आॅस्ट्रेलियन खेळाडू शॉन मार्श २०१९ आयसीसी विश्वचषक स्पर्धेतून बाहेर

● आयएसएसएफ शॉटगन वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा इटली येथे आयोजित करण्यात आली

● ३० वी जागतिक युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धा २०१९ इटली येथे सुरु झाली

● भारतीय एल्व्हेनिल वॅलरीव्हने ३० व्या जागतिक युनिव्हर्सिटी स्पर्धेत १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्यपदक पटकावले

● जागतिक पॅरा अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स २०१९ स्पर्धा ट्यूनीशियामध्ये आयोजित करण्यात आली

● २०१९ जागतिक पॅरा अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेत अमित सरोहाने गोळा फेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले

● २०१९ जागतिक पॅरा अॅथलेटिक्स ग्रँड प्रिक्स स्पर्धेत धरमवीर सिंहने गोळा फेक प्रकारात रौप्यपदक पटकावले

● महाराष्ट्र ज्युनिअर आंतर-जिल्हा राज्य बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा नागपूर येथे पार पडली

● नागपूर संघाने महाराष्ट्र ज्युनिअर आंतर-जिल्हा राज्य बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

● चार्ल्स मिशेल यांची युरोपियन परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली

● २ री युरोपियन गेम्स स्पर्धा मिन्स्क , बेलारूसमध्ये पार पडली

● २ ऱ्या युरोपियन गेम्स स्पर्धेत रशियाने १०९ पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले

● बीजु जनता पक्षाचे अमर पटनायक , ससमित पात्रा यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली

● मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलाचे प्रमुख अब्दुल्ला शामाल २ दिवसीय अधिकृत भारत दौऱ्यावर आले आहेत

● बंगळुरू येथे २४ सप्टेंबरपासून फिबा महिला आशिया कप २०१९ स्पर्धा आयोजित करण्यात येणार

● लोकसभेने आधार (दुरुस्ती) विधेयक , २०१९ पारीत केले

● ए के मिश्रा यांची अतिरिक्त संचालक म्हणून जम्मु-कश्मीर बॅंकेच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली

● फ्रँक लॅम्पर्ड यांची चेल्सी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली

● कर्नाटक जनता दल (सेक्युलर) चे प्रमुख म्हणून एचके कुमारस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली

● रीबॉकने कैटरीना कैफला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले

● फोक्सवॅगनने अमेरिकेची फुटबॉलपटू अॅलेक्स मॉर्गनला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले

● ग्लोबल स्टार्टअप निर्देशांकामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर : आर्थिक सर्वेक्षण २०१९-२० .

प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे ✅

*🔸 हिंदू नेपोलियन --  स्वामी विवेकानंद*

*🔹 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री*

*🔸 कैद-ए-आजम -- बॅ. जीना

*🔹 शहीद-ए-आलम --  भगतसिंग

*🔸 लोकनायक -- बापूजी अणे

*🔹 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

*🔸 गान कोकिळा -- लता मंगेशकर

*🔹 आंध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम्

*🔸 गरिबांचे कैवारी -- के. कामराज

*🔹 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

*🔸 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

*🔹 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

*🔸 पंजाबचा सिंह --  राजा रणजितसिंग

*🔹 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी

*🔸 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर

*🔹 समर सौदामिनी -- अरुणा आसफअली

*🔸 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

*🔹 शांतीदूत -- पंडित नेहरू

नदया व त्यांचे उगमस्थान:-

🔹नदया व त्यांचे उगमस्थान:-

गंगा =>गंगोत्री ( उत्तराखंड )
यमुना => यमुनोत्री ( उत्तराखंड )
सिंधू => मानसरोवर (तिबेट )

नर्मदा =>मैकल टेकडया , अमरकंटक ( मध्यप्रदेश )
तापी =>सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश )
महानदी =>नागरी शहर( छत्तीसगड )
ब्रम्हपुत्रा =>चेमायुंगडुंग( तिबेट )

सतलज =>कैलास पर्वत( तिबेट )
व्यास => रोहतंग खिंड ( हिमाचल प्रदेश )
गोदावरी =>त्र्यंबकेश्वर , नाशिक
कृष्णा => महाबळेश्वर

कावेरी => ब्रम्हगिरी टेकड्या , कूर्ग ( कर्नाटक )
साबरमती =>उदयपूर , अरावली टेकड्या ( राजस्थान )
रावी =>चंबा ( हिमाचल प्रदेश )
पेन्नर => नंदी टेकड्या , चिकबल्लापूर ( कर्नाटक )
_______________________________

चालु घडामोडी वन लाईनर्स , ०४ जुलै २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०४ जुलै २०१९ .

● राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला

● २०१९ आयसीसी क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडने न्युझीलंडला ११९ धावांनी पराभूत केले

● इंग्लंड संघ २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला

● इंग्लंड संघ तिसर्यांदा आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली

● अवैध कोळासा उत्खनन रोखण्यात अपयश आल्यामुळे मेघालय सरकारवर १०० कोटींचा दंड ठोठावण्यात आला

● भारतीय संघाचा खेळाडू अंबाती रायुडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली

✅ ' हेनले अँड पार्टनर्स ' या संस्थेने पासपोर्ट निर्देशांक २०१९ जारी केला आहे

● हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये सिंगापूर आणि जपान अव्वल क्रमांकावर

● हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये भारत ८६ व्या क्रमांकावर

● हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये चीन ७४ व्या क्रमांकावर

● हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये मालदीव ६२ व्या क्रमांकावर

● हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये बांगलादेश १०१ व्या क्रमांकावर

● हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये नेपाळ १०२ व्या क्रमांकावर

● हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये पाकिस्तान १०६ व्या क्रमांकावर

● हेनले पासपोर्ट निर्देशांक २०१९ मध्ये अफगाणिस्तान १०९ व्या ( शेवटच्या ) क्रमांकावर

● पीतांबरी कंपनीला ' इंडिया एसएमई १०० ' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

सीएमआयईईच्या अहवालानुसार जूनमध्ये बेरोजगारीचा दर वाढून ७.९१ टक्क्यांवर पोहोचला आहे

उद्योगपती बी. के. बिर्ला यांचं निधन , ते ९८ वर्षांचे होते

✅ अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल २०१८-१९ सादर केला

● २०१९-२० साठी देशाचा आर्थिक विकास दर ७% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे

● मागिल आर्थिक वर्षांत (२०१८-१९) आर्थिक विकास दर ६.८ टक्के इतका होता

● आर्थिक पाहणी अहवालात वित्तीय तूट ६.४ वरुन ५.८ आली असल्याची माहिती समोर आली

● भारताला ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं उद्धिष्ट साध्य करण्यासाठी विकास दर ८% असणं गरजेचं आहे

● देशाच्या पहिल्या पुर्णवेळ अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या अर्थसंकल्प सादर करणार आहेत

● पेरुने चिलीला पराभूत करत २०१९ कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

● ब्राझील व पेरु २०१९ कोपा अमेरिका स्पर्धेच्या विजेतेपदासाठी झुंंजणार

● नेदरलँड्सने स्वीडनचा पराभव करत २०१९ फिफा महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

● अमेरिका व नेदरलँड्स २०१९ फिफा महिला विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी झुंंजणार

● २०१९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड संघाकडून ५०० धावा करणारा जो रुट पहिला फलंदाज ठरला आहे

● आयएमएफने पाकिस्तान मध्ये राहणीमान दर्जा उंचावण्यासाठी ६ बिलियन डॉलर्सचे कर्ज मंजूर केले

● केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत-मालदिव दरम्यान फेरी सर्विस कराराला मान्यता दिली

● नेपाळने २० वा इंडियन फिल्म अकॅडमी पुरस्काराचे आयोजन करण्यास नकार दिला

● मकाऊ येथे आयोजित २६ व्या आशियाई ज्युनिअर स्क्वॅश चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ७ पदके जिंकली

● २०१६-२०१८ या ३ वर्षात ३२००० प्राण्यांचा रेल्वे रुळावर मृत्यू झाला

● के केशवूलू यांची आंतरराष्ट्रीय बीज चाचणी संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली

● क्रिस्टीन लागर्ड यांना युरोपियन सेंट्रल बँकचे अध्यक्ष म्हणून नामांकित करण्यात आले

● उर्सुला वॉन डेर लेयने यांना युरोपियन कमिशनचे अध्यक्ष म्हणून नामांकित करण्यात आले

● केंद्रीय मंत्रिमंडळाने सरोगेसी (नियमन) विधेयक २०१९ मंजूर केले

● काम करण्यासाठी भारतातील सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत सॅप लॅब इंडिया अव्वल क्रमांक

● काम करण्यासाठी भारतातील सर्वोत्तम कंपन्यांच्या यादीत उज्ज्वन स्माॅल फायनान्स बॅक ५ व्या क्रमांकावर

● लोकसभेत दंतचिकित्सक (दुरुस्ती) विधेयक , २०१९ पारीत करण्यात आले

● रोम २०२० मध्ये ग्लोबल सीईओ परिषद आयोजित करणार आहे

● ५ जुलैपासून पुण्यात युरोपियन युनियन फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात येणार

● पहिली जागतिक इथेनॉल परिषद (जीईएस) १३ आॅक्टोंबरपासून वाॅशिंग्टन डी सी मध्ये आयोजित करण्यात येणार

● रोहीत शर्मा विश्वचषक स्पर्धेत सर्वात जलद ५ शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे ( १५ सामने )

● डेव्हिड सासोली यांची युरोपियन संसदेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली

● मरेद मॅकगुइनेस यांची युरोपियन संसदेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली .

०३ जुलै २०१९

चालु घडामोडी वन लाईनर्स , ३ जून २०१९ .

चालु घडामोडी वन लाईनर्स ,
३ जून २०१९ .

● अमेरिकेच्या संसदेने भारताला नाटो देशांच्या समान दर्जा देणारे विधेयक मंजुर केले

● २०१९ आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने बांगलादेशवर २८ धावांनी विजय मिळवला

● भारतीय संघ २०१९ आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे

● भारतीय संघाने सातव्यांदा आयसीसी विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली

● आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनला आहे

● एकाच विश्वचषक स्पर्धेमध्ये ४ शतके ठोकणारा रोहित हा पहिला भारतीय ठरला आहे

● आयसीसी २०१९ विश्वचषक स्पर्धेत ५०० धावा पुर्ण करणारा रोहीत शर्मा पहिला भारतीय फलंदाज

● एकाच विश्वचषक स्पर्धेत ५०० धावा पुर्ण करणारा रोहीत शर्मा सचिन तेंडुलकर नंतर दुसरा भारतीय फलंदाज

● एकाच विश्वचषक स्पर्धेत ५०० धावा व ११ विकेट्स घेणारा शाकिब-अल-हसन पहिला खेळाडू ठरला आहे

● २०१९ विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता रोहित अव्वल स्थानी ( ७ सामने : ५४४ धावा )

● सब ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धा राजकोट , गुजरात येथे पार पडली

● ६६ व्या वरिष्ठ गट महिला राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन पटना येथे करण्यात येणार

● येत्या १५ ऑगस्टपासून ' माऊंट अबू ' वर प्लॅस्टिकबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला

● संयुक्त राष्ट्रांच्या पॅलेस्टाईनच्या निर्वासितांसाठी कल्याणकारी कार्यक्रमाला भारत ५० लाख डॉलर्स देणार

● पश्चिम बंगालमधील सवर्णांना नोकरीत १०% आरक्षण मिळणार

● मल्टी क्लास (रँकिंग) सेलिंग चॅम्पियनशिप स्पर्धा हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आली

● विश्वचषक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स मिळवणार्या गोलंदाजाच्या यादीत मोहम्मद शमी तिसऱ्या क्रमांकावर

● गगनयानसाठी भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षित करण्यासाठी इस्रोने रशियन कंपनीसह करार केला

● आरोग्य मंत्रालयाने ई-सिगारेटवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे

● गृहमंत्री अमित शहा आजपासून २ दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत

● मध्यप्रदेश मधील सवर्णांना नोकरीत १०% आरक्षण मिळणार

● राष्ट्रीय रँकिंग टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धा सोनीपत येथे संपन्न

● श्रीलंकेचे पोलिस प्रमुख पुजित जयसुंदरा यांना दहशतवादी हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे अटक करण्यात आली

● श्रीलंकेचे संरक्षण सचिव हेमासिरी फर्नांडो यांना दहशतवादी हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे अटक करण्यात आली

● भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) सीएमडी म्हणून के के पुरवार यांची नियुक्ती करण्यात आली

● ब्राझिलने अर्जेंटिनाला २-० ने पराभूत करत कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

● अमेरिकेने इंग्लंडला ३-२ ने पराभूत करत २०१९ फिफा महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

● पाकिस्तान संघाने आयबीएसएफ स्नूकर वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

● अमेरिकेने बलूचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले

● रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन ४ जुलै रोजी १ दिवसीय अधिकृत इटली दौऱ्यावर जाणार आहेत

● अमेरिकन अर्थतज्ज्ञ डेव्हिड लिपटन यांची आयएमएफचे अंतरिम नेते म्हणून निवड करण्यात आली

● दुबईतील ड्यूटी-फ्री दुकानात आता भारतीय चलन स्वीकारण्यात येणार आहे

● भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे (बीएचईएल) सीएमडी म्हणून नवीन सिंंघल यांची नियुक्ती करण्यात आली

● राजौरीमध्ये ३१२ पंचायतींना तंबाखू मुक्त करण्यासाठी " ऑपरेशन खुमार " सुरु करण्यात आले

● शिगताका मोरी यांची जपान रग्बी फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष म्हणुन नियुक्ती करण्यात आली

● ९ व्या रग्बी वर्ल्ड कपचे आयोजन २० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान जपानमध्ये करण्यात येणार आहे

● ग्लोबल वॉर्मिंगमुळे २०३० पर्यंत भारत ३४ दशलक्ष नोकर्या गमावू शकतो : आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटना

● २०१७-१८ दरम्यान भारताचे एकूण अंदाजे दुधाचे उत्पादन १७६.३५ दशलक्ष टन होते

● ताज्या एफआयएच पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत ऑस्ट्रेलिया संघ अव्वल स्थानावर आहे

● ताज्या एफआयएच पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघ पाचव्या क्रमांकावर आहे

● ताज्या एफआयएच पुरुषांच्या जागतिक क्रमवारीत पाकिस्तान संघ सतराव्या क्रमांकावर आहे

● ताज्या एफआयएच महिलांच्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघ दहाव्या क्रमांकावर आहे

● मध्य प्रदेश सरकार लवकरच " महा आयुष्यमान " योजना सुरू करणार आहे

● थायलंड राष्ट्रीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक म्हणून अकिरा निशिनो यांची नियुक्ती करण्यात आली

● संसदेने होमिओपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती) विधेयक , २०१९ पारीत केले

● लोकसभेने भारतीय मेडिकल कौन्सिल (दुरुस्ती) विधेयक , २०१९ पारीत केले

● एस कृष्णन यांची तमिळनाडूचे अर्थ सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली .

०२ जुलै २०१९

प्रधानमंत्री मोदी के द्वारा घोषित योजना

➡️

👉 प्रधानमंत्री जनधन योजना
28 अगस्त 2014

👉 डिजिटल इंडिया
21 अगस्त 2014

👉 मेक इन इण्डिया
25 सितम्बर 2014

👉 स्वच्छ भारत मिशन
2 अक्टूबर 2014

👉 सांसद आदर्श ग्राम योजना
11 अक्टूबर 2014

👉 श्रमेव जयते -
16 अक्टूबर 2014

👉 जीवन प्रमाण (पेंशन भोगियों के लिए)
10 नवम्बर 2014

👉 मिशन इंद्र धनुष (टीकाकरण)
25 दिसम्बर 2014

👉 नीति (NITI) आयोग -
1 जनवरी 2015

👉 पहल (प्रत्यक्ष हस्तांतरण)
1 जनवरी 2015

👉 हृदय(समृध्द सांस्कृतिक विरासत संरक्षण व कायाकल्प)
21जनवरी 2015

👉 बेटी बचाओ-बेटी पढ़ाओ
22 जनवरी 2015

👉 सुकन्या समृद्धि योजना
22 जनवरी 2015

👉 मृदा स्वास्थय कार्ड
19 फरवरी 2015

👉 प्रधानमंत्री कौशल विकास
20 फरवरी 2015

👉 प्रधानमंत्री जीवन ज्योति
9 मई 2015

👉 प्रधानमंत्री सुरक्षा बीमा
9 मई 2015

👉 अटल पेंशन योजना -
9 मई 2015

👉 उस्ताद(usttad)(अल्पसंख्यक कारीगर)
14 मई 2015

👉 कायाकल्प (जन स्वास्थ)
15 मई 2015

👉 डीडी किसान चैनल -
26 मई 2015

👉 स्मार्ट सिटी मिशन , सबके लिए आवास योजना
25 जून 2015

👉 दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना
25 जुलाई 2015

भारतातील जागतिक वारसा स्थळे

🔺भारतातील जागतिक वारसा स्थळे🔺

❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️

भारताच्या नकाशावर युनेस्कोची जागतिक वारसा स्थाने

★ भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्को द्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत.

◆ ताज महाल

◆ खजुराहो मंदिर

◆ आग्र्‍याचा किल्ला, आग्रा, उत्तर प्रदेश

◆ फत्तेपूर सिक्री, उत्तर प्रदे

◆ जुना गोवा

◆ सांची स्तूप, मध्य प्रदेश

◆ खजुराहोमधील प्राचीन मंदिरे, मध्य प्रदेश

◆ भीमबेटका पाषाण आश्रय, मध्य प्रदेश

◆ चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात

◆ छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र

◆ एलेफंटा केव्ह्ज/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र

◆ अजिंठा लेणी, महाराष्ट्र

◆ वेरूळ लेणी, महाराष्ट्र

◆ चोल राजांची मंदिरे, तमिळनाडू

◆ महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडु

◆ हंपीमधील मंदिरे, कर्नाटक

◆ पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक

◆ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम

◆ मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम

◆ केवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान

◆ कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओरिसा

◆ महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार

◆ भारतातील पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी

आधुनिक भारताचा इतिहास

💎 आधुनिक भारताचा इतिहास 💎

भारतीय राष्ट्रीय चळवळ एका उत्क्रांतीची अभिव्यक्ती दर्शवते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१८८५) च्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवात होते. या चळवळीची तीन टप्प्यांमध्ये विभागणी केली जाते- मवाळ राजकारणाचा काळ (१८८५-१९०५); जहाल राजकारण्यांचा काळ (१९०५-१९२०); गांधी युग (१९२०-१९४७).

१८५७ चा उठाव दडपला गेल्यानंतर भारतीय समाज निपचित पडला होता. या निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे काम दादाभाई नौरोजी, गोपाळ कृष्ण गोखले, व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दिनशॉ वाच्छा, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या भारतीयांनी केले. त्यांनी राष्ट्रीय संघटनेच्या राजकारणाला निश्चित दिशा दिली. या संपूर्ण नेतृत्वाचा विश्वास उदारमतवाद, सांविधानिक मार्ग व क्रांतीपेक्षा उत्क्रांतीतून बदल या तत्त्वांवर होता. म्हणूनच मवाळांनी राजकीय सुधारणांसाठी अर्ज, विनंत्यांचा मार्ग अवलंबला. आíथक निस्सारणाचा सिद्धांत मवाळांचे सर्वात मोठे योगदान ठरते. मवाळांनी भारताच्या वसाहतवादी आíथक शोषणावर प्रकाश टाकून जी जनजागृती घडवून आणली ती राष्ट्रीय चळवळीच्या पुढील टप्प्याची आवश्यक पाश्र्वभूमी ठरते. तद्वतच, या सिद्धांताच्या माध्यमातून मवाळांनी भारताच्या आíथक राष्ट्रवादाचा भक्कम पाया घातला यात शंका नाही.

२०१४ च्या मुख्य परीक्षेमधील ब्रिटिश आíथक धोरणाच्या विविध अंगांच्या विश्लेषणाची अपेक्षा ठेवणारा प्रश्न याच आíथक शोषणाच्या व आíथक राष्ट्रवादाच्या आकलनाची अपेक्षा ठेवतो. या प्रश्नामध्ये ब्रिटिश कालखंडामधील समग्र आíथक धोरण, त्या धोरणाची उत्क्रांती यांचे विश्लेषण केंद्रस्थानी आहे.

लॉर्ड कर्झनने १९०५ साली केलेल्या बंगालच्या फाळणीतून मवाळ राजकारणाच्या मर्यादा तर स्पष्ट केल्याच, पण त्याही पुढे जाऊन ब्रिटिश सत्ता भारताच्या हितासाठी असल्याच्या मवाळांच्या मूलभूत विश्वासाला तडा गेला. म्हणूनच बंगालच्या फाळणीनंतर राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व जहालांच्या हाती येते. अर्थात, १९१५ पर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या संघटनेवर मवाळांचेच वर्चस्व होते. जहालांनी काँग्रेसबाहेर राहून राष्ट्रीय चळवळीचे नेतृत्व केले. राष्ट्रीय चळवळीच्या या दुसऱ्या टप्प्याचा उद्देश ‘स्वराज’ हा होता व चळवळीच्या पद्धती स्वयंभू होत्या. मवाळांच्या पद्धती ब्रिटिश शासनाच्या प्रतिसादावर अवलंबून होत्या. जहालांनी परकीय मालावर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व असहकार या चतु:सूत्रीवर आधारित चळवळींचा मार्ग अवलंबून शासनावर दबाव निर्माण केला. लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, बिपीन चंद्र पाल, अरिबदो घोष यांनी या टप्प्यातील चळवळीचे नेतृत्व केले.

लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर एका युगाचा अस्त होतो. तद्वतच, एका दुसऱ्या युगाची सुरुवात महात्मा गांधींच्या राष्ट्रीय चळवळीतील सहभागाने होते. गांधीयुगामध्ये ‘अिहसक पद्धतीने केलेल्या असहकारातून स्वराज्य’ हा राष्ट्रीय चळवळीचा उद्देश होता. सत्याग्रह, अन्यायाचा उघड व सक्रिय प्रतिकार, अिहसक असहकार, भारतीय समाजाचा सर्वागीण विकास यांतून गांधींनी राष्ट्रीय चळवळीला वेगळी दिशा दिली व तिला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले.

भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या तीन टप्प्यांमधील घटनांचा सखोल अभ्यास आवश्यक ठरतो. मवाळांनी घडवून आणलेल्या राजकीय सुधारणा, वंगभंग चळवळ, होमरूल चळवळ, असहकार चळवळ, स्वराज पार्टी, नेहरू रिपोर्ट, सविनय कायदेभंगाची चळवळ, ‘चलेजाव’ चळवळ, गोलमेज परिषद यांसारख्या घटकांचा यात अंतर्भाव होतो. याव्यतिरिक्त भारतीय राष्ट्रीय चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान महत्त्वाचे ठरते.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...