१५ मार्च २०२४

पोलीस भरती सराव १०० महत्त्वाचे प्रश्न

१) भीमा नदीचा …. लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे.

= ४५१ कि.मी

२)…. या जातीचा ससा महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो.

= लिपस निग्रीकोलीस

३) महाराष्ट्राचा आकार अनियमित असला तरी काहीसा …. सारखा आहे.

= काटकोन त्रिकोण

४) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आकर्षण वाटणारे पीक …..

= ऊस

५) राज्यात …. या जिल्ह्यांमध्ये अभ्रकाचे साठे आढळतात.

= सिंधुदुर्ग, चंद्रपूर व नागपूर

६) चद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते?

= वैनगंगा

७) महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवरून कोणती नदी वाहते?

= इंद्रावती

८) राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा’ म्हणून पुणे जिल्ह्याचा, तर ‘सर्वाधिक घनतेचा जिल्हा’ म्हणून …. जिल्ह्याचा उल्लेख करावा लागतो.

=मुंबई उपनगर

९) रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती?

= शुक्र

१०) केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी राज्यातील किती शहरांची निवड केली गेली आहे ?

= १०
११) ….. ही पश्चिम किनारपट्टीवरील सर्वांत मोठी खाडी आहे.

= धरमतर

१२) कसारा घाट’ म्हणजेच …..

= थळघाट

१३) सन १९६० मध्ये …. या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्याने तो दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो.

= १ मे

१४).…. या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते.

= १ नोव्हेंबर, १९५६

१५) सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन होत असतानाच मूळच्या द्वैभाषिक राज्यातून ….हेही स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.

= गुजरात

१६) महाराष्ट्रातील दक्षिण-उत्तर पसरलेल्या ……….पर्वतरांगेस ‘पश्चिम घाट’ असेही म्हणतात.

= सह्य

१७) ….. या महाराष्ट्राच्या उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते.

= नागपूर

१८) नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर …. येथे बांधण्यात आलेल्या धरणातून नाशिक शहरास पाणीपुरवठा होतो.

= गंगापूर

१९) अजिंठ्याचे डोंगर, हरिश्चंद्र डोंगररांगा, बालाघाट डोंगररांगा व महादेव डोंगररांगा या वास्तविक ….. या पर्वताच्याच उपरांगा होत.

= सह्य

२०) राज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न काढले जाते?

= कृष्णा

२१) जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश महाराष्ट्राला …. पर्यंत पाणी टंचाई मुक्त करण्याचा आहे.

= सन २०१९

२२) भारतातील एकूण साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक कारखाने महाराष्ट्रात आहेत. किती टक्के?

= ३६ टक्के

२३) सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार राज्यातील सर्वांत कमी लोकसंख्येचा जिल्हा’ म्हणून …. या जिल्ह्याचा निर्दश करावा लागेल.

= सिंधुदुर्ग

२४) भौगोलिक निकटत्वामुळे मराठीच्या …. या उपभाषेवर किंवा बोलीवर काहीसा गुजरातीचाही ठसा आढळतो.

= खानदेशी

२५) सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत अनुसूचित जातींचे प्रमाण ११.८ टक्के इतके, तर अनुसूचित जमातींचे प्रमाण …. टक्के इतके आहे.

= ९.४

२६) दुग्ध उत्पादनात राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो?

= सातवा

२७) सन २०१७ च्या वनस्थिती अहवालानुसार राज्यातील भौगोलिक क्षेत्राशी बनव्याप्त क्षेत्राचे प्रमाण …. इतके आहे.

= १६.४७ टक्के

२८) सन २०१७ च्या वनस्थिती अहवालानुसार भारतातील एकूण क्षेत्राच्या अवघे …. इतके वनक्षेत्र महाराष्ट्रात आहे.

= ७.१६ टक्के

२९) महाबळेश्वर परिसरातील कृष्णा, कोयना व सावित्री यांच्या उगम प्रदेशातील वने प्रकारची आहेत.

= उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

३०) सह्याद्रीच्या पूर्वाभिमुख उतारावर कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात ?

= शुष्क पानझडी वृक्षांची वने

३१) …. पर्वताला महाराष्ट्राचा प्रमुख जलदुभाजक म्हटले जाते.

= सह्य

३२) राज्यातील उत्तरेकडील बोर्डी-तलासरीपासून दक्षिणेकडील …. पर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो.

= रेडी-बांदा

३३) कोकण किनारा ‘रिया’ प्रकारचा असून या किनाऱ्यावर …. जवळ ‘सागरी गुहा’ आढळतात.

= मालवण

३४) सह्य पर्वताची एकूण लांबी सुमारे १,६०० कि. मी. असून त्यांपैकी सुमारे …. लांबीचा भाग महाराष्ट्रात आहे.

= ६४० कि. मी.

३५) उत्तरेस सातमाळा-अजिंठ्याचे डोंगर व दक्षिणेस हरिश्चंद्र-बालाघाटचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात …. चे खोरे पसरलेले आहे.

= गोदावरी

३६) उत्तरेला हरिश्चंद्र-बालाघाटचे डोंगर व दक्षिणेला महादेवाचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात …. नदीचे खोरे पसरलेले आहे.

= भीमा

३७) पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे उगम पावणारी भीमा नदी कर्नाटक राज्यात रायचूर जिल्ह्यात येथे कृष्णेस मिळते.

= कुरुगड्डी

३८) गोदावरी नदीची एकूण लांबी सुमारे १,४६५ कि. मी. असून त्यांपैकी सुमारे …. लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे.

= ७३२ कि. मी.

३९) केंद्र स्तरावरील सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे?

= आमदार आदर्श ग्राम योजना

४०) तापी नदी महाराष्ट्रातील …….या जिल्ह्यांतून वाहत जाते.

= जळगाव, नंदुरबार व धुळे

४१) वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या …. या धरणातूनही मुंबईला पाणीपुरवठा होतो.

= मोडकसागर

४२) …. ही पर्वतराग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेस अनेक ठिकाणी छेदून वा स्पर्शून गेलेली आहे.

= सातपुडा

४३) डिसेंबर, २०१८ अखेर राज्यात एकूण दूरध्वनी जोडण्यांची संख्या …. इतकी होती.

= ४५.१० लाख

४४) हि राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी दक्षिणेची गंगा’ तसेच ‘वृद्धगंगा’ म्हणून ओळखली जाते.

= गोदावरी

४५) महाराष्ट्राला प्रामुख्याने अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैत्रत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. हा पाऊस साधारणतः …. या कालखंडातपडत असतो.

= जुन ते सप्टेंबर

४६) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस …, पसरलेला आहे.

= अरबी समुद्र

४७) खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील …. हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे.

= विदर्भ

४८) सह्य पर्वताची किंवा पश्चिम घाटाची निर्मिती …. मुळे झाली आहे.

= प्रस्तरभंग

४९) राज्यातील किनारपट्टीच्या कोकण भागात …. प्रकारचा पाऊस पडतो.

= प्रतिरोध

५०) सागाची झाडे …. प्रकारच्या अरण्यात आढळतात.

= पानझडी वृक्षांची अरण्ये

५१) महाराष्ट्रात लाकूड-कटाईचे कारखाने (सॉ-मिल्स) …. या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर आहेत.

= चंद्रपूर, गडचिरोली व अमरावती

५२) महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात ….

= माडिया-गोंड

५३) राज्यातील …. या विभागात सर्वांत कमी वने आढळतात.

= मराठवाडा

५४) महाराष्ट्र पठारावरील …. या सर्वांत मोठ्या डोंगररांगेने कृष्णा व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत.

= महादेव डोंगररांग

५५) हरिश्चंद्र-बालाघाट’ या डोंगररांगेमुळे …. या नद्यांची खोरी एकमेकांपासून अलग झाली आहेत.

= गोदावरी व भीमा

56) ‘गाविलगड’ व ‘नर्नाळा’ हे प्रसिद्ध किल्ले …. या पर्वतावर वसले आहेत.

= सातपुडा

57) अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांच्या सीमेवर, सह्य पर्वतावर वसलेले ‘कळसूबाई’ हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वतशिखर असून त्याची उंची …. इतकी आहे.

= १,६४६ मीटर

58) अरुंद अशा कोकण किनारपट्टीची रुंदी …. नदीच्या खोऱ्यात वाढलेली आहे.

= उल्हास

59) ….. या जिल्ह्यांना पूर्वी ‘खानदेश’ म्हणून ओळखले जाई.

= धुळे, नंदुरबार व जळगाव

६०) बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ या नदीच्या काठी वसले आहे.

= दहिसर

६१) नाशिकहून ठाणे जिल्ह्यात उतरताना …. हा घाट पार करावा लागतो.

= कसारा

६२)’कस्तुरी’ मांजर राज्यात …. जिल्ह्यांत आढळते.
= रायगड व रत्नागिरी

६३) गांधीजींनी घालून दिलेले आदर्श व त्यांची तत्त्वे यांच्या माध्यमातून विकास साधण्याची उद्दिष्टे असलेली ‘वर्धा योजना’ ….या वर्षीच्या गांधी जयंतीपासून वर्धा जिल्ह्यात राबविली जात आहे.

= १९८३

६४) एकोणिसाव्या पशुगणनेनुसार देशातील एकूण पशुधनात राज्याचा कितवा क्रमांक लागतो?

= सहावा

६५)संजय गांधी निराधार अनुदान’ योजनेअन्वये पात्र व्यक्तीस दरमहा …. इतके आर्थिक साहाय्य देण्यात येते.

= रुपये ६००/

६६) महाराष्ट्रातील…. या भागाचा उल्लेख यादवकालीन शिलालेखात ‘सेऊन देश’ असा केला गेला आहे.

= खानदेश (धुळे, नंदुरबार, जळगाव)

६७) केंद्र शासनाने ‘अतिमागास’ म्हणून जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील जमाती ….

= चंद्रपूर : माडिया-गोंड; यवतमाळ
नांदेड : कोलाम ; ठाणे, रायगड : कातकरी

६८) …. हे दोन महाराष्ट्राचे प्रमुख स्वाभाविक विभाग होत.

= कोकण व पठार (देश)

६९) कोकण किनारपट्टीत सापडणाऱ्या ‘जांभा’ या प्रकारच्या मातीत …. यांचे प्रमाण अधिक असते.

= लोह व जस्त

७०) महाराष्ट्राची सीमा खालील सहा राज्यांना भिडलेली आहे

= गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़,
तेलंगाणा, कर्नाटक व गोवा

७१) पूर्णा, वर्धा, पैनगंगा व वैनगंगा या …. भागातील प्रमुख नद्या होत.

= विदर्भ

७२) ‘अहिराणी’ ही मराठीची उपभाषा किंवा बोलीभाषा प्रामुख्याने …. या जिल्ह्यांत बोलली जाते.

= धुळे, नंदुरबार, जळगाव

७३) रोशा’ जातीचे गवत राज्यात …. या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते.

= धुळे, नंदुरबार व जळगाव

७४) ‘कन्हान’, ‘वर्धा’ आणि ‘खोबरागडी’ या …. नदीच्या उपनद्या होत.

= वैनगंगा

७५) एकूण लोकसंख्येशी असलेले नागरी लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महाराष्ट्राचा (४५.२२ टक्के) क्रमांक देशात तिसरा लागतो; तर …. या राज्याचा क्रमांक पहिला लागतो.

= तमिळनाडू (४८.४० टक्के)

७६) …. या नदीच्या खोऱ्यास ‘संतांची भूमी’ म्हणून संबोधले जाते.

= गोदावरी

७७) राज्यातील …. या जिल्ह्यांमध्ये बांबूची वने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

= चंद्रपूर व गडचिरोली

७८) विड्या तयार करण्यासाठी तेंदूची (टेंभुर्णीची) पाने वापरतात. तेंदूची झाडे ….या जिल्ह्यातील वनांमध्ये विपुल प्रमाणात आढळतात.

= नागपूर, गोंदिया व भंडारा

७९) परकीय चलन मिळवून देणारा ‘हापूस’ जातीचा आंबा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो.

= रत्नागिरी व सिंधुदुर्ग

८०) राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले दोन जिल्हे …. हे होत.

= सातारा व सांगली

८१) ‘काटेपूर्णा’ व ‘नळगंगा’ या …. नदीच्या उपनद्या होत.

= पूर्णा

८२) सावंतवाडीहून बेळगावला जाताना लागणारा घाट …..

= आंबोली

८३) ‘पूर्णा’ व ‘गिरणा’ या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

= तापी

८४) महाराष्ट्रात ……येथे रासायनिक द्रवांचे कारखाने आहेत.

= पनवेल व अंबरनाथ

८५) ‘पेंच ‘ प्रकल्पात महाराष्ट्राचे सहकारी राज्ये ….

= मध्य प्रदेश

८६) ….या विदर्भातील प्रमुख नद्या होत .

= वर्धा व वैनगंगा

८७) महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर लागणार घाट …..

= आंबेनळी

८८) महाराष्ट्रातील …..हे विभाग कापूस उत्पादनात अग्रेसर आहेत.

= खान्देश व विदर्भ

८९) गिरणा ,पांझरा व बुराई या …च्या उपनद्या होत.

= तापी

९०) सातारा ,सांगली ,कोल्हापूर हि शहरे …….खोऱ्यात वसली आहेत .

= भीमा

९१) राज्यात काडीपेटी तयार करण्याचे कारखाने ….येथे आहेत .

= मुंबई ,नागपूर ,अंबरनाथ

९२) मराठीच्या ..या बोलीस किंवा उपभाषेस अहिरांची भाषा म्हणून ‘अहिराणी ‘असेही म्हणतात.

= खान्देशी

९३) तापी नदीची एकूण लांबी ७२४ कि .मी.असून तापीचा सुमारे ….चा प्रवाह राज्यातून गेला आहे.

= २२८ कि .मी .

९४) येरळा ,वारणा व पंचगंगा या ….नदीच्या उपनद्या वा तिला येऊन मिळणाऱ्या नद्या होत.

= कृष्णा

९५) राज्यातील उत्तरेकडील बोर्डी-तलासरीपासून दक्षिणेकडील …. पर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो.

= रेडी-बांदा

९६)राज्यात एकूण ……जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत.

= ३१

९७) लोकआयुक्ताची नेमणूक कोण करतात ?

= राज्यपाल

९८) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस …, पसरलेला आहे.

= अरबी समुद्र

९९) ‘लोकआयुक्त ‘ हे पद राज्यात आस्तित्वात आले .

= २५ ओक्टोम्बर ,१७७२

१००) महाबळेश्वर परिसरातील कृष्णा, कोयना व सावित्री यांच्या उगम प्रदेशातील वने प्रकारची आहेत.

= उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

प्रशासकीय विभाग



● भौगोलिक विभागाचे नाव : कोकण 

● मुख्यालय : मुंबई

● विभागाअंतर्गत जिल्हे : पालघर, ठाणे, मुंबई नगर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग


प्रशासकीय विभागाचे नाव : पुणे


● भौगोलिक विभागाचे नाव : पश्चिम महाराष्ट्र

● मुख्यालय : पुणे 

● विभागाअंतर्गत जिल्हे : पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर


प्रशासकीय विभागाचे नाव : नाशिक


● भौगोलिक विभागाचे नाव : उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश

● मुख्यालय : नाशिक

● विभागाअंतर्गत जिल्हे : नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव


प्रशासकीय विभागाचे नाव : औरंगाबाद


● भौगोलिक विभागाचे नाव : मराठवाडा

● मुख्यालय : औरंगाबाद

● विभागाअंतर्गत जिल्हे : औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद


प्रशासकीय विभागाचे नाव : अमरावती


● भौगोलिक विभागाचे नाव : विदर्भ 

● मुख्यालय : अमरावती

● विभागाअंतर्गत जिल्हे : अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम


प्रशासकीय विभागाचे नाव : नागपूर


● भौगोलिक विभागाचे नाव : विदर्भ 

● मुख्यालय : नागपूर 

● विभागाअंतर्गत जिल्हे : नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली

महाराष्ट्रातील हवामान



महाराष्ट्रातील हवामान विशिष्टपूर्ण आहे. याचे कारण त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्रात मान्सून वाऱ्यामुळे पाऊस मिळतो.


महाराष्ट्राच्या हवामानाचे स्वरूप -


कोकण -

कोकणचे हवामान उष्ण, दमट, सम, प्रकारचे आहे. कोकणची सखल किनारपट्टी अरबी समुद्रास अगदी जवळ असल्याने वर्षभर वर्षभर तो प्रदेश फार उष्नही व फार थंडही नसतो.


सह्यान्द्री -

समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतशी हवा थंड होते. म्हणून सह्यान्द्रीच्या घाटमाथ्यावर उन्हाळ्यत देखील तेथील हवामान थंड असते. हिवाळ्यात मात्र कडाक्याची थंडी असते. म्हणून या भागातील हवामान थंड व आद्र असते.


महाराष्ट्र पठार -

महाराष्ट्राच्या पठारावर उष्ण,विषम,व कोरडे आहे. या भागात मार्च ते मे या काळात बरीच उष्णता असते. म्हणजेच उन्ह्याळातील व हिवाळ्यातील तापमानातच बरीच तफावत असल्याने पठारावरील हवामान हे विषम आहे.


महाराष्ट्रातील ऋतू -

महाराष्ट्रात साधारणपणे उन्हाळा-मार्च ते मे, पावसाळा -जून ते सप्टेम्बर, हिवाळा - ऑक्टोबर ते फेब्रूअरी, हे तीन मुख्य ऋतू आहेत.


उन्हाळा -

२१ मार्चनंतर उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास प्रारंभ होतो तसेच दिनमानाच्या कालही वाढते.

महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान सुमारे १६' ते २२' दरम्यान असल्याने या काळात तापमानात वाढत जाते. कोकण किनार पट्टीत अरबी समुद्राच्या सानिध्यामुळे खरे व मतलई वारे यांचा फायदा मिळतो. तर दख्खनचे पठार हे सह्यन्द्री पर्वतामुळे

अरबी समुद्रापासून अलग झालेले असते. यामुळे कोकण व पठार यावरील बरीच तफावत आहे.


कोकणामध्ये दैनिक कमाल तापमान कक्षा ३०' ते ३३' सें च्या दरम्यान असते. मराठवाड्यात ३० ते ३५ सें तापमान असते. तर विदर्भामध्ये ४२ ते ४३ सें च्या आसपास असते.


हवेचा दाब व वारे -

उन्हाळ्यात असे तापमान वाढत गेल्यास साहजिकच हवेचा दाब कमी कमी होत जातो. आणि कोकण किनारपट्टीत समभार रेषा समांतर होत जातात. एप्रिल मे महिन्यात जसजसा उन्हाळा कडक होत जातो तसतसा समभार रेषा जवळजवळ येऊ लागतात आणि वायुभार उतार तीव्र होत जातो. अरबी समुद्रावरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात. आणि वायुभर उतार तीव्र होत जातो. अरबी समूद्रवरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात व किनारपट्टीवर दुपारच्या कडक उन्हानंतर आरोह प्रकारचा पाऊस पडतो. तर मराठवाडा आणि विदर्भात उन्हाळ्याच्या शेवटच्या कालखंडात धुळीची वादळे निर्माण होतात.


पर्जन्य -

हिवाळ्यामध्ये वायव्य भारतात तयार झालेल्या जास्त दाबाचा पट्टा सूर्य कर्कवृत्ताकडे असल्याने हळूहळू दक्षिणेकडे सरकतो. एप्रिल महिन्यात हा जास्त दाबाचा पट्टा भारताच्या दक्षिण भागात असतो. व त्याचा बराचसा प्रदेश सागरावारही असतो. वायव्य भारतात दाबाचा प्रदेश असतो. परंतु तो अजूनही कमजोरच असतो. दाबाच्या प्रदेशाकडून

जास्त दाबाच्या प्रदेशाकडून लागतात. ते एप्रिल व मी महिन्यात महाराष्ट्रच्याही भागावरून वाहत जाऊन पाऊस देतात. यावेळेस आंब्याचा बहर असतो. म्हणून या पावसाला आंबेसरी

असे म्हणतात.


महाराष्ट्र मान्सूनची संकल्पना -


सर्वसाधारणपणे मान्सूनचे आगमन हि अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. उन्हाळ्यात भूभाग

व जलभाग तापणे हे मान्सून चे तंत्र आहे. हे भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य आहे. सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात जो पाऊस पडतो. त्यापैकी सुमारे ८५% पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळते. पावसाळ्यात चार महिन्याच्या कालावधीत कोकण आणि सह्यन्द्री पर्वतरांगेत भरपूर पाऊस पडतो. त्यामानाने मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडतो. महाराष्ट्राच्या पूर्व भागात अजून पावसाचे प्रमाण वाढत जाते. त्याचे कारण विदर्भ हा प्रदेश बंगालच्या उपसागरावरील मान्सून वाऱ्याच्या शाखेत येतो त्या भागात आगस्ट आणि सप्टेंबर या दरम्यान पाऊस पडतो.

कोकणात २५० ते ३०० सें मी पाऊस पडतो. घाठ्माठ्यावरील आंबोली येथे सर्वात जास्त

म्हणजे ७०७ से मी पूस कोसळतो. तर महाबळेश्वरला ५९४ एवढा पाऊस पडतो. माथेरानच्या पठारावर पावसाचे प्रमाण ४९३ से मी आहे. सह्यांद्रीच्या पूर्वेकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या भागाकडे ५० ते ६० सें मी पाऊस पडतो. तसेच हा प्रदेश अनिश्चित स्वरूपाचे आहे. म्हणून या भागाला अवर्षणग्रस्त प्रदेश म्हटले जाते.

मराठवाड्यात ६० ते ८० सें मी एवढे पर्जन्य आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण वाढत जाते. विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेस पावसाचे प्रमाण वाढत जाते. पश्चिम विदर्भात ७५ ते ९० सें मी पाऊस पडतो. तर पूर्व विदर्भात ९० ते १५० से मी इतका पाऊस पडतो. विदर्भातील गाविलगडच्या डोंगरात पावसाचे प्रमाण वाढत जाते. तेथील थंड हवेच्या चिखलदरा या ठिकाणी १५० सें मी एवढा पाऊस पडतो.


ऑक्टोंबर संक्रमणाचा महिना -

या महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश असतो. आणि हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण भरपूर असल्याने उकाडा अनुभवास येतो.


हिवाळा -

मान्सून संपल्यावर वाऱ्याचा काळ संपल्यावर नोवेंबरपासून खऱ्या अर्थाने हिवाळा चालू होतो. हिवाळ्यात सरासरी मासिक तापमानाचा विचार केला तर असे आढळते कि बऱ्याचशा रेषा पश्चिम पूर्व दिशेने असून त्या एकमेकास समांतर आहेत. हिवाळ्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडतो.


महाराष्ट्रात हिवाळ्यात संपूर्ण खानदेश, नाशिक जिल्हा, बराचसा अहमदनगर पुण्यातील जुन्नर घोडेगाव,राजगुरुनगर, शिरूर,पुणे,हवेली, तालुके. विदर्भात अमरावती जिल्ह्याच्या धारणी,चिखलदरा, तसेच वरुड नागपूर भंडारा, चंद्रपूर या भागात किमान तापमान १० सें ते १२.५ सें एवढे असते. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात म्हणजे दक्षिण महाराष्ट्र बऱ्याच प्रमाणात मराठवाडा व पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भात नागपूर जिल्ह्याचा दक्षिण भाग वर्धा, गोंदिया, भंडारा,चंद्रपूरच्या उत्तर भागात किमान तापमान १२.५ व १५ सें दरम्यान आहे.


महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण -


जास्त पर्जन्याचा प्रदेश - महाराष्ट्रातील कोकण आणि सह्यान्द्री डोंगरावर आणि डोंगराच्या पायथाचा प्रदेश या भागात ३०० ते ६०० इतका पाऊस पडतो. मध्यम पर्जन्याचा प्रदेश- सह्यान्द्रीच्या भागात, तर नाशिक,पुणे,सातारा,सांगली, या जिल्ह्याचा पश्चिम भाग गोंदिया, गडचिरोली, या भागात ३०० ते २०० से मी पाऊस पडतो. मध्यम ते कमी पर्जन्याचा प्रदेश - चन्द्रपूर, यवतमाळ,वर्धा, या भागात मध्यम पर्जन्य पडते. तर मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्याचा भागात तसेच पश्चिम विदर्भातील सर्व जिल्हे या भागात कमी पर्जन्य होते.

भारतातील विविध वृत्तपत्रे व संपादक


🔰 दर्पण : बाळशास्त्री जांभेकर 

🔰 दिग्दर्शन (मासिक) : बाळशास्त्री जांभेकर

🔰 परभाकर (साप्ताहिक) : भाऊ महाराज

🔰 हितेच्छू (साप्ताहिक) : लोकहितवादी 

🔰 काळ (साप्ताहिक) : शी.म.परांजपे 

🔰 सवराज्य पत्र (साप्ताहिक) शी.म.परांजपे

🔰 कसरी : लोकमान्य टिळक

🔰 मराठा (इंग्रजी साप्ताहिक) : लोकमान्य टिळक

🔰 दिंनबंधू (साप्ताहिक) : कृष्णाराव भालेकर 

🔰 समाज स्वास्थ (मासिक) : रघुनाथ धोंडो कर्वे 

🔰 विध्यर्थी (मासिक) : साने गुरुजी

🔰 कॉग्रेस (साप्ताहिक) : साने गुरुजी

🔰 साधना (साप्ताहिक) : साने गुरुजी

🔰 शालापत्रक : कृष्णशास्त्री चिपळूणकर

🔰 उपासना (साप्ताहिक) : वी.रा.शिंदे

🔰 सबोध पत्रिका : प्रार्थना समाज

🔰 महाराष्ट्र धर्म (मासिक) : आचार्य विनोबा भावे

🔰 मानवी समता : महर्षी धो. के. कर्वे 

🔰 सधारक (साप्ताहिक) : आगरकर

🔰 बहिष्कृत भारत (पाक्षिक) : डॉ. बाबासाहेब

🔰 मकनायक (पाक्षिक) : डॉ. बाबासाहेब 

🔰 जनता (प्रबुध्द भारत) : डॉ. बाबासाहेब 

🔰 समता : डॉ. बाबासाहेब 

🔰 मानवता: डॉ. बाबासाहेब 

🔰 बहिष्कृत मेळा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔰 सार्वजनिक सभा : न्या. म गो रानडे

🔰 इदुप्रकाश : म गो रानडे

🔰 हिंदुस्थान गदर (साप्ताहिक) : लाला हरदयाळ

🔰 शरद्धा (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद

🔰 विजय (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद

🔰 अर्जुन (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद

🔰 सदधर्म प्रचार (साप्ताहिक) : स्वामी श्रद्धानंद

🔰 वदे मातरम : अरविंद घोष

🔰 पिपल्स : लाला लजपतराय

🔰 नशनल हेरॉल्ड : पंडित जवाहरलाल नेहरू

🔰 फॉरवर्ड (मासिक) : सुभाषचंद्र बोस

🔰 इडियन सोशॉलिस्ट : श्यामजी कृष्ण वर्मा

🔰 रास्त गोफ्तर : दादाभाई नौरोजी

🔰 वहाईस ऑफ इंडिया : दादाभाई नौरोजी

🔰 बगाली : सुरेंद्र नाथ बनर्जी

🔰 इन्डीपेन्डस इंडिया : मानवेंद्रनाथ रॉय

🔰 द व्हेगाड : मानवेंद्रनाथ रॉय

🔰 उद्बोधक (बंगाली) : स्वामी विवेकानंद

🔰 परबुद्ध भारत (इंग्रजी) : स्वामी विवेकानंद

🔰 नवजीवन (गुजराती साप्ताहिक) : महात्मा गांधी

🔰 हरिजन : महात्मा गांधी

🔰 यग इंडिया : महात्मा गांधी

🔰 इडियन ओपीनियन : महात्मा गांधी

🔰 सत्याग्रह : महात्मा गांधी

🔰 मिरत उल अखबार : राजा राममोहन रॉय

🔰 समाचार चंडिका : राजा राममोहन रॉय

🔰 बगॉल हेरॉल्ड : राजा राममोहन रॉय

🔰 कवारी : भास्कर जाधव

🔰 भाषांतर (मासिक) : वि. का. राजवाडे

🔰 मराठवाडा : सदाशिव विश्वनाथ पाठक

🔰 महाराष्ट्र केशरी : डॉ. पंजाबराव देशमुख

🔰 अखंड भारत : भाई महादेवराव बागल

🔰 शतपत्रे : गोपाळ हरी देशमुख

🔰 टाईम्स ऑफ इंडिया : रॉबर्त नाईट

🔰 हितवाद : गोपाळ कृष्णा गोखले

🔰 यगांतर : भूपेंद्र दत्त

🔰 अमृत बझार पत्रिका : मोतीलाल घोष

🔰 सलभ समाचार : केशवचंद्र सेन

🔰 नटिव्ह ओपिनियन :  वि. ना. मंडलिक 

🔰 विचारलहरी : कृष्णशास्त्री चिपळूणकर

🔰 हिंदु पंच : कृष्णशास्त्री चिपळूणकर

🔰 भाला : भास्कर बळवंत भोपटकर

🔰 सदेश : अच्युत बळवंत कोल्हटकर

🔰 तरुण मराठा : दिनकरराव जवळकर  .

🔰 लबर किसान गँझेट : एम सिंगारवेलु

🔰 दि सोशालिस्ट : श्रीपाद डांगे

🔰 करांती : श्रीपाद डांगे

🔰 नयु इंडिया : अँनी बेझेंट 

🔰 कॉमन व्हील : अँनी बेझेंट 

🔰 जञान सिंधु : तात्या छत्रे 

🔰 गदर : लाला हरदयाल 

🔰 बामबोधिनी : उमेशचंद्र दत्ता 

🔰 बगाली : सुरेंद्रनाथ बँनर्जी 

🔰 अबलाबांधव : द्वारकानाथ गांगुली

🔰 भारती : द्वीजेंद्रनाथ टागोर 

🔰 वसुमती : हेमचंद्र घोष 

🔰 सदेश : कोल्हटकर 

🔰 आत्मोद्वार : एस एन चौधरी 

🔰 भारत : काकासाहेब कर्वे

🔰 सवक : एल एन मेढे 

🔰 दलित भारत : धनाजी बिराडे 

🔰 लीडर : पं. मदनमोहन मालवीय 

🔰 अल-हिलाल : अब्दुल कलाम आझाद 

🔰 परबोधन : केशव ठाकरे 

🔰 नवयुग : आचार्य अत्रे 

🔰 परभात : भालचंद्र कोठारी

भूगोल प्रश्नसंच

◾️ महाराष्ट्रच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ? 

1) सह्याद्री 

2) सातपुडा ✅

3) मेळघाट 

4) सातमाळा




◾️ मांजरा पठार कुठल्या भागात आहे ? 

1) मराठवाडा ✅

2) पश्चिम महाराष्ट्र 

3) विदर्भ 

4) खानदेश




◾️ भामरागड टेकडया खालीलपैकी कुठे स्थित आहेत  ? 

1) औरंगाबाद 

2) गडचिरोली ✅

3) चंद्रपूर 

4) नंदुरबार 




◾️ खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे. 

1) वैराट ✅

2) अस्तंभा 

3) हनुमान 

4) जळगाव




◾️खालील पैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?

 A)  लातूर✅

 B)  मुंबई उपनगर 

 C)  उस्मानाबाद

 D) जालना



◾️खालील पैकी कोणत्या एका गटातील नद्या पश्चिमधाटात उगम पावून पश्चिमेकडे जातात ? 

 A)  तापी, सावित्री, काळू

 B) सावित्री, काळू, उल्हास✅

 C) काळू, गिरना, कुंडळिका

 D)  सावित्री, उल्हास, गोदावरी



◾️खालील पैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाही ? 

 A)  नवेगाव

 B)  गुगामाळ 

 C)  पेंच

 D)  वरील पैकी कोणतेही नाही✅



◾️महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता ?

 A)  नाशीक जिल्हा

 B) पुणे जिल्हा 

 C) चंद्रपूर जिल्हा

 D)  यापैकी नाही✅



◾️खालील पैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ? 

 A)  सांगली

 B)  सातारा

 C) रायगड✅

 D) रत्नागिरी


◾️गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वत रांगेने वेगळी झाली आहे ? 

 A) सातमाळा

 B) अजिंठा 

 C)  हरीश्चंद्र-बालाघाट✅

 D) गावीलगड

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या




गोदावरी- वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पुर्णा, इंद्रावती, मांजरा पुर्णा व गिरणा, प्राणहिता ,पैनगंगा , दुधना


तापी - गिरणा, पुर्णा, बोरी, अनेर , पाझरा


कृष्णा - कोयना , वेरळा, पारणा, पंचगंगा, वेण्णा


भिमा -  इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कर्हा, मुठा, नीरा


पैनगंगा -  कन्हान, वर्धा व पैनगंगा


पुर्णा -  काटेरुर्णा व नळगंगा


सिंधफणा  - बिंदुसरा


मांजरा -  तेरणा , कारंजी, घटणी, तेरू


कोकणातील नद्या


 उल्हास , तेरेखोल, कुंडलिका, शास्त्री, वशिष्ठी , काळ, कर्ली, जगबुडवी


तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम


1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके

2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके

3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके

4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके

5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके

6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके




🔰महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे :


1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके


2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके


3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके.



🔰कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे) :


1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा


2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास


3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल


4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव


5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल



💦 महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने) :-


🔰नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी):


1.गोदावरी - 69000

2. भीमा - 46184

3. वर्धा - 46182

4. वैनगंगा - 38000

5. तापी - 31200

6. कृष्णा - 28700



🔰लांबीनुसार(किमी) : 


1. गोदावरी - 668

2. पैनगंगा - 495

3. वर्धा - 455

4. भीमा - 451

5. वैनगंगा - 295

6. कृष्णा - 282

7. तापी - 208 


🔰 पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी) :


1. कृष्णा - 769

2. वैनगंगा - 719

3. गोदावरी - 404

4. भीमा - 309

5. तापी - 229


कोकणातील विविध प्रकृतीक भुरुपे



1. खाडी : भारतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी म्हणतात.


ठाणे : दाटीवरे, डहाणू, वसई, मनोरी, व ठाणे


मुंबई उपनगर : मालाड, माहीम


मुंबई : माहीम


रायगड : पनवे, उरण, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट


रत्नागिरी : दाभोळ, जयगड, विजयदुर्ग


सिंधुदुर्ग : देवगड, कालवली, कर्ली, तेरेखोल


2. पुळनी : समुद्र किनार्‍याजवळ सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे उथळ कींनार्‍यावर तयार होणार्‍या वाळूच्या पट्टयाना 'पुळन' असे म्हणतात.


मुंबई उपनगर : जिहू बीच


मुंबई शहर


दादर, गिरगाव


रत्नागिरी : गणपतीपुळे, हर्न, गुहागर


सिंधुदुर्ग : मालवनजवळ तरकर्ली, शिरोड, दापोली, उमादा


रायगड : अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन


3. वाळूचे दांडे : सागरी लाटांमुळे उथळ कींनार्‍यावर 'वाळूचे दांडे' तयार होतात.


खरदांडा(रायगड)


4. बेटे : मुंबई : मुंबई बेट


रायगड : धारपूरी (एलिफंटा केव्ह)


अलिबाग : खांदेरी, उंदेरी


सिंधुदुर्ग : कुरटे (सिंधुदुर्ग किल्ला)


मुंबई उपनगर : साष्टी, अंजदिव


5. बंदरे : महाराष्ट्राच्या किनारपट्टीला लहानमोठे 49 बंदरे आहेत.


मुंबई = मुंबई, ठाणे = अलिबाग, न्हावाशेवा(JNPT),


रत्नागिरी = हर्न, जयगड = रत्नागिरी ,


सिंधुदुर्ग = मालवण, वेंगुले, रेड्डी


6. खनिजे : बॉक्साईट = ठाणे,


म्यंगेणीज = सिंधदुर्ग,


क्रोंमाईत = सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लोह व


जिप्सम = रत्नागिरी


7. नद्या : ठाणे : दमनगंगा, सूर्या, तानसा, वैतरणा, काळू, पिंजाल, भारसाई, उल्हास, मुरबाडी,


मध्य प्रदेश : पताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री


दक्षिण कोकण : काजवी, मुचकुंदी, वाघोटने, शुक, गड, कर्ली, तेरेखोल.


जास्त लांबी- वैतरणा, व उल्हास मुखाजवळ प्रवाह किनार्‍यास समांतर. कारण, 'डोंगरांच्या रांगा'


8. किल्ले : जिल्हे डोंगरी किल्ले व सागरी किल्ले


ठाणे वसूली, माहुली, भंडारगड, पळसगड अर्नाळा


रायगड कर्नाळा, शिवथर, माळांगगड, रायगड जंजिरा


रत्नागिरी जयगड, फत्तेगड, पुर्नगड, कानकदुर्ग सुवर्नदुर्ग


सिंधुदुर्ग रांगना, देवगड, भगवंतगड, मनोहारगड, सिंधुदुर्ग विजयदुर्ग


भारतगड, पधगड सजैकोत

काय आहे गल्फा प्रवाह?



📌उत्तर अटलांटिक महासागरातील जगप्रसिद्ध उबदार सागरी प्रवाह. १४९२ मध्ये कोलंबसच्या व १५१३ मध्ये पॉन्से द लेऑन या स्पॅनिश नाविकाच्या लक्षात तो आला होता. तो मेक्सिकोच्या आखातातून येतो, या समजुतीमुळे बेंजामिन फ्रँक्लिनने त्याला गल्फ स्ट्रीम हे नाव दिले.*

📌परंतु फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीपासून न्यू फाउंडलंडच्या आग्‍नेयीकडील ग्रँड बँक्सपर्यंत त्याची खास वैशिष्ट्ये दिसून येत असल्यामुळे, एवढ्या भागातच त्याचे हे नाव योग्य आहे. फ्लॉरिडा सामुद्रधुनीपासून नॉर्वेजियन समुद्रापर्यंतच्या प्रवाहास हे नाव अजूनही दिले जाते.
दक्षिण अमेरिकेच्या सेंट रॉक भूशिराजवळ दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाच्या दोन शाखा होतात.

📌तयांपैकी उत्तरेकडील शाखा दक्षिण व मध्य अमेरिकेच्या किनाऱ्याकिनाऱ्याने कॅरिबियन समुद्रात आल्यावर तिला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची वेस्ट इंडीजच्या दक्षिणेकडील शाखा मिळते. मग तो प्रवाह मेक्सिकोच्या आखातात जाऊन तेथून फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडतो.

📌तयाला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची अँटिलीस प्रवाह ही शाखा मिळते व मग खरा गल्फ प्रवाह सुरू होतो. येथे त्याचे तापमान २०० से. ते २४०से.; रुंदी सु.१०० किमी.; खोली. सु. ८०० मी.; वेग ताशी ६·५ किमी.; क्षारता उच्च व रंग गर्द निळा असून तो दर सेकंदास २·६ कोटी घ. मी. पाणी वाहून नेतो
पृथ्वीच्या परिवलनामुळे मिळणाऱ्या कोरिऑलिस प्रेरणेमुळे तो उजवीकडे वळू लागतो

📌अमेरिकेच्या आग्‍नेय किनाऱ्याला समांतर मार्गाने हॅटरस भूशिरापर्यंत गेल्यावर तो अधिक रूंद व संथ होतो, त्यात लहान लहान भोवरे दिसतात, खोली ४ ते ५ हजार मी. होते व तो सेंकदाला ८·२ कोटी घ.मी.पाणी वाहून नेतो. ग्रँड बँक्सकडे गेल्यावर त्याला लॅब्रॅडॉर हा थंड प्रवाह मिळतो. त्याचे काही फाटे गल्फ प्रवाह व किनारा यांच्या दरम्यान शिरतात आणि गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे किनार्‍यापासून दूर गेल्यामुळे तळाचे थंड पाणी वर येते. यामुळे किनारा व गल्फ प्रवाह यांच्यामध्ये थंड पाण्याची एक भिंतच उभी राहते.

📌गल्फ प्रवाहाच्या उजवीकडे न दक्षिणेस सारगॅसो समुद्राचे पाणीही उच्च क्षारतेचे व उबदार असते.
गल्फ प्रवाहात व उत्तर अटलांटिक प्रवाहचक्राच्या मध्यभागीच्या सारगॅसो समुद्रात सारगॅसो या विशिष्ट सागरी वनस्पतीची चकंदळे तरंगत असतात.

*📌गल्फ प्रवाहाच्या उजव्या बाजूच्या पाण्याची पातळी डावीकडील पातळीपेक्षा सु. ८० सेंमी. उंच असते. ग्रँड बँक्सजवळ उष्ण प्रवाहावरील आर्द्र हवा, थंड प्रवाहावरील थंड हवेत मिसळून बाष्पांचे सांद्रीभवन होते व दाट धुके पडते.*

📌 त तेथील मासेमारी नौकांस धोक्याचे असते. सु. ४०० उ. अक्षांश व ५०० प. रेखांश येथे गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे ईशान्येकडे जाऊन पश्चिमी वाऱ्यांमुळे वाहणाऱ्याउत्तर अटलांटिक प्रवाहात मिसळून जातो.
पुढे हा प्रवाह यूरोपच्या पश्चिम किनार्‍यापर्यंत गेल्यावर त्याच्या दोन शाखा होतात.

📌 दक्षिणेकडील शाखा आयबेरियन द्विपकल्प, वायव्य आफ्रिका यांच्याजवळून थंड कानेरी प्रवाह म्हणून उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाला मिळते.
उत्तरेकडील शाखा ब्रिटिश बेटे व नॉर्वे यांच्या किनाऱ्यांजवळून जाऊन पुढे आर्क्टिक महासागरात नाहीशी होते. तिचे तपमान अझोर्सच्या उत्तरेस १५·५० से. होते.

📌या प्रवाहामुळे कॅनडाचे हॅलिफॅक्स, रशियाचे मुरमान्स्क व ब्रिटिश बेटे आणि नॉर्वे यांची बंदरे हिवाळ्यात न गोठता खुली राहतात. गल्फ प्रवाहामुळे पश्चिम व वायव्य युरोपचे हवामान अधिक उबदार होते, असे समजले जाते.

📌तथापि हा परिणाम प्रवाहापेक्षा त्याने वेढलेल्या उबदार जलसंचयाचा आहे असे आता दिसून आले आहे; किंबहूना प्रवाह जेव्हा अधिक पाणी वाहून नेत असतो, तेव्हा यूरोपात तपमान थोडे कमीच होते असे आढळले आहे.
अमेरिकेहून यूरोपकडे जाणाऱ्या नौकांस गल्फ प्रवाहाचा फायदा मिळून वेळ व जळण यांची बचत होते. परंतु उलट बाजूने येणाऱ्या नौका मात्र हा प्रवाह टाळतात.

 📌गल्फ प्रवाह, त्याच्या समुद्रपृष्ठावरील व खोल पाण्यातील लहानमोठ्या शाखा, खालून वाहणारा प्रतिप्रवाह, सागरतळावरील निक्षेपांवर होणारा परिणाम इत्यादींचे संशोधन आधुनिक पद्धतींनी चालूच आहे.

जगातील सर्वात उंच 10 शिखरे

🔵(1)......माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) 

🔹8848 मीटर उंच.


🔵(2)..... माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) 

🔹8611 मीटर उंच.


🔵(3).... कांचनगंगा (भारत ) 

🔹8586 मीटर उंच.


🔵(4)...... ल्होत्से (नेपाळ)

🔹8516 मीटर उंच.


🔵(5)...... मकालू (नेपाळ)

🔹8463 मीटर उंच 


🔵(6).......चो ओयू (नेपाळ) 

🔹8201 मीटर उंच.


🔵(7).......धौलागिरी (नेपाळ) 

🔹8167 मीटर उंच.


🔵(8).......मानसलू (पश्चिम नेपाळ) 

🔹8163 मीटर उंच


🔵(9).....नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर) 

🔹8125 मीटर उंच.


🔵(10).....अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ)

 🔹8091 मीटर उंच.


🔵(11).....गशेरब्रु( हिमालय)

🔹8068 मीटर उंच.


🔵(12).....ब्रॉड पिक (बाल्टिस्तान)

 🔹8051 मीटर उंच.


🔵(13)...... गशेरब्रूम --2

🔹(हिमालय) 8035 मीटर उंच


🔵(14)..... शिशापंग्मा (तिबेट)

🔹8027 मीटर उंच.


🔴जगातील 8 हजाराहून उंच अशी 14 हिमशिखरे आहेत ही सर्व शिखरे सर करणारे आज जगात केवळ 27 गिर्यारोहक आहेत.


प्लासीची लढाई : 23 जून 1757


◾️बगालचा नबाब सिराजउद्दौला व ईस्ट इंडिया कंपनी यांत 23 जून 1757 रोजी बंगालमधील हुगळी (भागीरथी) नदीकाठी प्लासी (पलास) या गावाजवळ झालेली ऐतिहासिक महत्त्वाची लढाई.


◾️ इग्रजांना बंगालमध्ये फ्रेंचांचे वर्चस्व नष्ट करून आपली सत्ता दृढमूल करावयाची होती. 


◾️तयात सिराजउद्दौला हा मोठा अडसर होता. म्हणून त्यांनी काहीतरी निमित्त शोधून सिराजउद्दौलावर हे युद्ध लादले.


◾️अलीवर्दीखान याचा नातू (मुलीचा मुलगा) वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तो बंगालचा (ओरिसा, बंगाल व बिहारचा सुभेदार) नबाब झाला.


◾️अधारकोठडी नंतर रॉबर्ट क्लाइव्ह व ॲडमिरल चार्ल्स वॉट्सन यांनी तयारी करून कलकत्ता काबीज केले.


◾️सिराजउद्दौलाचा सरसेनापती मीर जाफर यास बंगालचा नबाब बनविण्याचे अभिवचन दिले.


◾️ तयाबद्दल त्याच्याकडून काही रक्कम स्वतःस व काही कंपनीस घेण्याचे ठरले. शिवाय राय दुर्लभराम व मीर मादन या दुसऱ्या सेनापतींनाही फितूर करण्याचा प्रयत्न झाला.


◾️इग्रजांच्या बाजूने ३,००० सैनिक व आठ तोफा होत्या आणि नेतृत्व क्लाइव्हकडे होते. शिवाय सर आयर कुट वगैरे काही चांगले लढवय्ये होते, तर सिराजउद्दौलाकडे ६०,००० सैन्य, ५३ मोठ्या तोफा आणि सेंट फ्रेअसच्या हाताखाली फ्रेंचांचा तोफखाना होता. सैन्याचे नेतृत्व मीर जाफरकडे होते. 


◾️मीर मादन हा केवळ एकच निष्ठावान सेनापती सिराजच्या बाजूने विश्वासाने लढला पण तो मारला गेला


◾️इग्रजांचे फक्त ६५ सैनिक मारले गेले.


◾️इग्रजांनी मीर जाफरला घेऊन मुर्शिदाबाद ही सिराजची राजधानी जिंकली आणि मीर जाफरला नबाब केले.


◾️या विजयामुळे पुढे क्लाइव्हला काही उच्च पदे-बंगालचे गव्हर्नरपद व सरदारकी-मिळाली. 


◾️तयामुळे साहजिकच इंग्रज बंगालचे अप्रत्यक्ष रीत्या राज्यकर्ते बनले. 


◾️यांतून पुढे भारतभर इंग्रजांना आपल्या सत्तेचा विस्तार करणे सोपे झाले.


प्रश्न उत्तरे

 ✅ महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर - कळसुबाई (1646 मी.) ता - अकोले, जि- अहमदनगर.


✅महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


✅महाराष्ट्राची राजधानी - मुंबई 

     ● उपराजधानी  - नागपूर.


✅महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36.


✅ महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे.


✅ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा - नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.


✅ महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


✅ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे 


✅ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


✅ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


✅महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


✅महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


✅महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


✅ महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


✅महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


✅ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


✅महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


✅महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, ता - पन्हाळा.


✅ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जि - वर्धा.


✅  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि - अहमदनगर.


✅  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


✅भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


✅  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


✅महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


✅भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


✅ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


✅पढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


✅गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


 ✅ नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


✅गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


✅ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


✅औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


✅पणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


✅  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


✅ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


✅ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


✅विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.


✅  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


✅ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


✅ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


✅ सत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.


✅ सत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


✅ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.


✅ सत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


✅ बरह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


✅  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


✅ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


✅ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.


✅पणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


✅ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


🌺  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


🌺 मबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


🌺यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


🌺 महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


🌺नशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


🌺महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


🌺शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


🌺महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


🌺शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


🌺 जञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.


🌺तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.


🌺भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प - तुर्भे या ठिकाणी आहे.


🌺रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

महत्वाचे


🛶(१) सागर म्हणजे काय ?*

---  जमिनीने पूर्णः किंवा अंशतः वेढलेल्या 

     खा-या पाण्याचा जलभाग म्हणजे सागर 

     किंवा समुद्र होय. 


🛶(२) महासागर म्हणजे काय  ?*

---  दोन खंडांदरम्यान पसरलेला खा-या 

     पाण्याचा विस्तीर्ण (मोठा) साठा म्हणजे 

     महासागर होय. 


🛶(३) उपसागर म्हणजे काय  ?*

---  सर्वसाधारणपणे जमिनीने तीन बाजूंनी 

     वेढला गेलेला सागराचा लहान भाग म्हणजे 

    उपसागर होय. उदा. बंगालचा उपसागर. 


🛶(४) आखात म्हणजे काय  ?*

---  जमिनीत घुसलेला सागराचा अरुंद भाग,

     म्हणजे आखात होय. 


🛶(५) सरोवर म्हणजे काय  ?*

---  भूपृष्ठावरील सखल भागात नैसर्गिकरीत्या 

    तयार झालेला जलाशय म्हणजे सरोवर 

    होय. 


🛶(६) जलावरण म्हणजे काय  ?*

---  पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेला भाग, 

     म्हणजे जलावरण होय. 


🛶(७) खाडी म्हणजे काय  ?*

---  समुद्राचे पाणी नदीच्या मुखातून जेथेपर्यंत 

     नदीत शिरते, त्या नदीच्या भागाला खाडी 

     म्हणतात. 


🛶(८) सागरी मैदान म्हणजे काय  ?*

---  सागरतळाचा सपाट व सखल भाग 

     म्हणजे सागरी मैदान होय. 


🛶(९) गर्ता म्हणजे काय  ?*

---  सागरातील अरुंद व अतिखोल भागास 

    गर्ता म्हणतात. 


🛶(१०) सागरी डोह म्हणजे काय  ?*

---  सागरतळावर काही ठिकाणी खोल,अरुंद 

      आणि तीव्र उतारांची सागरी भूरूपे

      आढळतात. त्यातील कमी खोलीच्या 

      अरुंद व तीव्र उतारांची सागरी भूरूपे 

      म्हणजे सागरी डोह होय. 

महाराष्ट्राविषयी माहिती


▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.

▪️महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.

▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई  उपराजधानी  - नागपूर.

▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.

▪️ महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.

▪️ महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.

▪️  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.

▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.

▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.

▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.

▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.

▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.

▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.

▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे

▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.

▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.

▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.

▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.

▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.

▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.

▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.

▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.

▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.

▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.

▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.

▪️  प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.

▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.

▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.

▪️  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.

▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.

▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.

▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.

▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.

▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.

▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.

▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.

▪️संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.

▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.

▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.

▪️ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.

▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.

▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.

▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.

▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.

▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.

▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात

▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.

▪️ महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आहे.

▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.

▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.

▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.

▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.

▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.

▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.

▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.

▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.

*▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.*

▪️रायगड जिल्ह्यात- *कातकरी* , ठाणे जिल्ह्यात- *वारली* , यवतमाळ जिल्ह्यात- *कोलाम* या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

सागरी प्रवाह



सागरी प्रवाह म्हणजे निश्चित दिशेने होणारी सागरजलाची हालचाल. समुद्र व महासागरातील पाणी स्थिर नसून त्यात भरती-ओहोटी,सागरी लाटा व सागरी प्रवाह अशा तीन प्रकारच्या हालचाली होत असतात. त्यांपैकी सागरी प्रवाह ही प्रमुख हालचाल आहे. सागरी प्रवाह मार्गाने पाणी एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे वाहत असते. तसेच सागरी प्रवाहांमुळे सागरपृष्ठापासून सागरतळापर्यंत अभिसरण चालू राहते. वाऱ्याची सागरजलाशी होणारी घर्षणक्रिया, वेगवेगळ्या जलस्तरांधील घर्षणक्रिया, पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणारी कोरिऑलिस प्रेरणा (भूवलनोत्पन्न प्रेरणा), सागरजलाचे तापमान, लवणता व घनतेतील तफावत इ. वेगवेगळ्या नैसर्गिक प्रेरणांवर सागरी प्रवाहांची निर्मिती, त्यांची दिशा व आकार अवलंबून असतो. खंडांचे आकार व त्यांची सापेक्ष स्थाने, प्रवाळशैलभित्ती व प्रवाळबेटे, स्थानिक वारे या घटकांचाही सागरी प्रवाहांवर प्रभाव पडत असतो. या वेगवेगळ्या घटकांमधील भिन्नतेमुळे काही प्रवाह मोठे, काही लहान, काही कायमस्वरूपी, काही हंगामी, काही अधिक गती असणारे तर काही मंद गतीने वाहणारे आढळतात.


वाऱ्याचे घर्षणकार्य व दाबातील फरकाद्वारे कार्य करणारी गुरुत्वीय प्रेरणा ही सागरी प्रवाह निर्मितीची मूळ कारणे आहेत. सागरपृष्ठाशी वाऱ्याकडून होणारे घर्षण आणि उभ्या व आडव्या दिशांत असणारा पाण्याच्या घनतेतील किंवा गुरुत्वातील फरक यांमुळे पाणी वाहण्यास सुरुवात होते. सागरी प्रवाहाचे पृष्ठीय प्रवाह, घनतेतील फरकाने निर्माण झालेले प्रवाह, खोल सागरातील प्रवाह असे प्रकार पाडता येतात. समुद्राच्या पृष्ठभागावरून मोठ्या प्रमाणात दीर्घकाळ व एकसारखा वारा वाहत असल्यास त्याच्या घर्षण कार्यामुळे काही ऊर्जा पाण्यात संक्रमित झाल्यामुळे सागरपृष्ठावरील पाणी प्रवाहित होते. यालाच ‘पृष्ठीय प्रवाह’ असे म्हणतात. वाऱ्याचा प्रभाव सामान्यपणे सागरातील १००–२०० मी. खोलीपर्यंतच्या पाण्यावर होतो. असे असले तरी वाऱ्याच्या घर्षण कार्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रवाहांचा विस्तार १,००० मी. किंवा त्यापेक्षाही अधिक खोलीपर्यंत आढळतो. स्थूलमानाने असे प्रवाह प्रचलित वाऱ्याच्या दिशेला अनुसरून वाहत असले, तरी ते अगदी बरोबर वाऱ्याच्या दिशेने वाहत नाहीत. पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणाऱ्या कोरिऑलिस प्रेरणेमुळे सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात आपल्या मूळ दिशेच्या उजवीकडे, तर दक्षिण गोलार्धात मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. सागरी प्रवाहांचे हे विचलन वाऱ्याच्या दिशेपासून साधारणतः ४५० नी होते. कोरिऑलिस प्रेरणेमुळेच सागरी प्रवाह उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या दिशेला अनुसरून, तर दक्षिण गोलार्धात घड्याळाच्या काट्याच्या विरुद्घ दिशेने वाहतात. याच प्रेरणेमुळे खंडांच्या पश्चिम किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या प्रवाहांच्या विरुद्घ दिशेने खंडांच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाह वाहतात. वाऱ्यापेक्षा प्रवाहांचे विचलन अधिक होत असले, तरी वाऱ्यापेक्षा त्यांचा वेग कमी असतो. वारे आणि कोरिऑलिस प्रेरणा यांमुळे नियमन होत असणाऱ्या अटलांटिक, पॅसिफिक व हिंदी महासागरातील प्रवाहांचा विस्तृत भोवऱ्यासारखा (गोलाकार) एक विशिष्ट आकृतिबंध तयार होतो. ध्रुवीय प्रदेश वगळता विषुववृत्ताच्या उत्तर आणि दक्षिण भागांत पृष्ठीय सागरी प्रवाह गोलाकार वाहतात.


व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावामुळे अटलांटिक, पॅसिफिक व हिंदी महासागरांच्या विषुववृत्तीय भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे उत्तर विषुववृत्तीय (उत्तर गोलार्ध) व दक्षिण विषुववृत्तीय (दक्षिण गोलार्ध) असे दोन सागरपृष्ठीय प्रवाह आहेत. सागरजलात समपातळी राखण्याच्या गुरुत्वाकर्षणीय प्रेरणेमुळे या दोन मोठ्या प्रवाहांच्या दरम्यान त्यांच्या विरुद्घ दिशेने म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारे विषुववृत्तीय प्रतिप्रवाह आढळतात. या प्रवाहांची व्याप्ती कमी आहे. उत्तर हिंदी महासागर वगळता अटलांटिक व पॅसिफिकमधील दोन्ही विषुववृत्तीय प्रवाह महासागरांच्या पश्चिम भागातून खंडांच्या किनाऱ्याजवळून ध्रुवीय प्रदेशाकडे वाहू लागतात. उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळील या प्रवाहाला गल्फ प्रवाह, दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाहाला ब्राझील,आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाहाला मोझँबीक व अगुल्हास, ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाहाला पूर्व ऑस्ट्रेलिया तर आशियाच्या पूर्व किनाऱ्यावरील प्रवाहाला कुरोसिवो या नावाने संबोधले जाते.


खंडांच्या पूर्व किनाऱ्याजवळून वाहणारे हे प्रवाह मध्य कटिबंधात आल्यावर पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे दिशा बदलून पूर्वेकडे खुल्या महासागराकडे वाहू लागतात. या ठिकाणी त्यांचा वेग मंदावलेला असतो; त्यामुळे त्यांना सामान्यपणे प्रवाहांऐवजी ड्रिफ्ट्स असे संबोधले जाते. उत्तर गोलार्धात अशा मंद गतीने वाहणाऱ्या प्रवाहांमध्ये उत्तर अटलांटिक, उत्तर पॅसिफिक या मुख्य प्रवाहांचा आणि त्यांच्या नॉर्वेजियन व अलास्का या शाखांचा समावेश होतो. गल्फ प्रवाह उत्तर अटलांटिक प्रवाहात, तर कुरोसिवो प्रवाह उत्तर पॅसिफिक प्रवाहात मिसळतो. कुरोसिवो, उत्तर पॅसिफिक, गल्फ, उत्तर अटलांटिक व नॉर्वेजियन प्रवाह उबदार पाणी आर्क्टिक महासागराकडे वाहून नेतात. हे सागरी प्रवाह पुन्हा आपली दिशा बदलून खंडांच्या पश्चिम किनाऱ्याने विषुववृत्ताकडे वाहू लागतात. अटलांटिकमध्ये त्यांना कानेरी (उत्तर गोलार्ध) व बेंग्वेला (दक्षिण गोलार्ध) या नावांनी, पॅसिफिकमध्ये कॅलिफोर्निया (उत्तर गोलार्ध) व पेरू किंवा हंबोल्ट (दक्षिण गोलार्ध) ह्या नावांनी, तर हिंदी महासागरात पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रवाह या नावाने ते ओळखले जातात. हे सर्व सागरी प्रवाह पुन्हा तीनही महासागरांमधील उत्तर किंवा दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहांना मिळतात. अशा प्रकारे हे प्रवाह गोलाकार चक्र पूर्ण करतात. गोलाकार फिरणाऱ्या या प्रवाहांच्या केंद्रस्थानी तुलनेने शांत सागरी भाग आढळतात. उदा.,उत्तर अटलांटिकमध्ये गल्फ प्रवाहाच्या उजवीकडे (पूर्वेस) व दक्षिणेस असलेला सारगॅसो समुद्र. या समुद्राचे पाणी उच्च क्षारतेचे व उबदार असते.


गल्फ-उत्तर अटलांटिक प्रवाह यूरोपच्या पश्चिम किनाऱ्याजवळ आल्यावर तेथे त्याच्या कानेरी व नॉर्वेजियन अशा दोन शाखा होतात. दक्षिणेकडे जाणारी शाखा कानेरी या नावाने ओळखली जाते. उत्तरेकडे जाणारी नॉर्वेजियन शाखा ब्रिटिश बेटे, नॉर्वे यांच्या किनाऱ्याजवळून वाहत जाऊन आर्क्टिक महासागरात विलीन होते. आर्क्टिक महासागराकडून उत्तर अटलांटिकमध्ये येणाऱ्या पूर्व ग्रीनलंड व लॅब्रॅडॉर या थंड प्रवाहांचा न्यू फाउंडलंड बेटाजवळ गल्फ या उष्ण प्रवाहाशी, तर आर्क्टिक महासागराकडूनच उत्तर पॅसिफिकमध्ये येणाऱ्या ओयाशियो (ओखोट्स्क किंवा कॅमचॅटका) या थंड प्रवाहाचा जपानच्या किनाऱ्याजवळ कुरोसिवो या उष्ण प्रवाहाशी संयोग होतो. दक्षिण गोलार्धात साधारण याच अक्षांशाच्या दरम्यान बहुतेक सर्वत्र महासागरी भाग असून तेथे या विषुववृत्तीय प्रवाहांचा संयोग ‘वेस्ट विंड ड्रिफ्ट’ या विस्तृत प्रवाहाशी होतो. तेथे या प्रवाहांना वैयक्तिक नावे नाहीत. पृष्ठीय प्रवाहांपैकी गल्फ, कुरोसिवो व अगुल्हास हे तीनही प्रवाह अधिक वेगवान व प्रभावी आहेत. त्यांचा वेग दर ताशी ६ किमी. असतो. ब्राझील व पूर्व ऑस्ट्रेलियन प्रवाह त्यामानाने संथ आहेत. हिंदी महासागराच्या उत्तर भागात ऋतुमानानुसार वाहणाऱ्या मोसमी वाऱ्यांमुळे तेथील सागरी प्रवाहांत बदल घडून येतात. पृष्ठीय प्रवाहांच्याखालून वेगवेगळ्या खोलीवर विरुद्घ दिशेने वाहणारे वेगवेगळे उपपृष्ठीय प्रवाह आढळतात. उदा., पॅसिफिकमधील क्रॉमवेल, अटलांटिकमधील गल्फप्रतिप्रवाह.


सागरजलाच्या लवणतेतील भिन्नतेनुसार घनतेतही भिन्नता निर्माण होते. अधिक लवणता असलेल्या पाण्याची घनता अधिक असते. पाण्याचे भिन्नघनतेचे थर एकमेकांजवळ आल्याने किंवा सागरपृष्ठावर उतार निर्माण झाल्याने अथवा या दोन्हींमुळे क्षितिजसमांतर दिशेत दाबामध्ये फरक निर्माण होऊनगुरुत्वप्रचलित प्रवाह निर्माण होतात. जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीत या दोन्ही प्रकारच्या प्रेरणा कार्य करतात. भूमध्य समुद्राचे जड पाणी पूर्वेकडील भागातखाली दाबले जाऊन निर्माण झालेला खोल सागरी प्रवाह खालच्या थरातून पश्चिमेस अटलांटिक महासागराकडे जातो. याउलट अटलांटिकमहासागरातील कमी क्षारतेचे हलके पाणी पृष्ठभागावरून पूर्वेस भूमध्य समुद्राकडे येते. तांबडा समुद्र, इराणचे आखात आणि हिंदी महासागर यांदरम्यानतसेच बाल्टिक समुद्रात असेच सागरी प्रवाह आढळतात. बाल्टिक समुद्रातील प्रवाहाच्या बाबतीत मात्र आत येणारे पाणी जड म्हणून खालच्या थरातून येतेव हलके पाणी वरच्या थरातून बाहेर जाते.


सागरी प्रवाह निर्मितीवर लवणतेबरोबरच तापमानाचाही परिणाम होतो. कमी अक्षवृत्तीय प्रदेशात जास्त तापमानामुळे सामान्यपणे पाण्याची पातळीकिंचित अधिक राहते. त्यामुळे कमी अक्षवृत्तीय (विषुववृत्तीय) प्रदेशाकडून उच्च अक्षवृत्तीय प्रदेशाकडे पाण्याचे प्रवाह वाहत जातात. हवेचा दाब जास्तअसलेल्या भागात पाण्याची पातळी कमी राहते, तर हवेचा दाब कमी असल्यास पाण्याची पातळी वाढते. त्यामुळे जास्त पातळीच्या प्रदेशाकडून कमीपातळी असलेल्या जलभागाकडे सागरी प्रवाह वाहू लागतात.

मोठ्या महासागरी गोलाकार प्रवाहांशिवाय लहानलहान विस्ताराचे अनेक प्रवाह काही समुद्र किंवा महासागराच्या बंदिस्त भागांत आढळतात.त्यांच्या अभिसरण प्रक्रियेवर कोरिऑलिस प्रेरणेपेक्षा सागरी भागाकडे वाहत येणाऱ्या पाण्याच्या दिशेचा परिणाम होतो. असे सागरी प्रवाह टास्मानियासमुद्रात आढळतात.


खोल सागरी भागातील अभिसरण प्रामुख्याने तापमान व लवणता यांच्यातील फरकावर अवलंबून असते.ही परिस्थिती प्रामुख्याने थंड प्रदेशात आढळते. सागरी पाण्याच्या तापण्यातील असमानता ही विशेषतः खोल सागरी भागातील पाण्याच्या हालचालीचे प्रमुख कारण आहे. ध्रुवीय प्रदेशात मुख्यतःहिवाळ्यात अतिथंड, अधिक लवणता व घनता असलेले पाणी पृष्ठभागापासून खूप खाली दाबले जाते. जादा घनतेमुळे पृष्ठभागावरील पाणी ज्या ठिकाणीखाली जाऊ लागते, तेथून उभ्या दिशेतील अभिसरणाला सुरुवात होते. महासागरातील उभी अभिसरण क्रिया विशेष जोरदार नसली, तरी महत्त्वाचीअसते; कारण त्यामुळे खोल सागरी पाणी पृष्ठभागावर येते व पृष्ठभागावरील पाणी खाली जाते. खाली दाबले गेलेले जड पाणी खालच्या थरातून अतिशय मंद गतीने विषुववृत्तीय प्रदेशाकडे वाहू लागते. त्याच वेळी उष्णकटिबंधातील उबदार व कमी घनतेचे पाणी सागरपृष्ठावरून ध्रुवीय प्रदेशाकडे वाहू लागते. अशा अभिसरणाची प्रमुख दोन उगमस्थाने आहेत :


वेडेल समुद्र हे पहिले उगमस्थान. वेडेल समुद्रात सर्वमहासागरांमधील जड पाणी खाली जाऊन ‘अंटार्क्टिका तळ जलराशी’ बनते. हिमाच्छादित अंटार्क्टिकाच्या किनाऱ्याजवळ या प्रवाहाचे पाणी ‘वेस्ट विंड ड्रिफ्ट्’ या नावाने अटलांटिक, हिंदी व पॅसिफिक महासागरांच्या तळावरून विषुववृत्ताच्या बरेच उत्तरेला वाहत जाते. हा जगातील सर्वांत मोठा तसेच संपूर्ण पृथ्वीला वळसा घालणारा प्रवाह आहे. दक्षिण गोलार्धातील इतर प्रवाहांवर या प्रवाहाचा विशेष प्रभाव पडतो. हा सागरी प्रवाह अतिखोल, थंड व तुलनेने मंद गतीचा परंतु प्रचंड प्रमाणात (गल्फ प्रवाहाच्या सु.दुप्पट) पाणी वाहून नेणारा आहे. पेरू,बेंग्वेला प्रवाह याच अंटार्क्टिक प्रवाहाचे पाणी वाहून आणत असल्याने ते थंड प्रवाह आहेत.


आइसलँड व ग्रीनलंड यांच्या मधील इर्मिंजर समुद्र आणि ग्रीनलंड व लॅब्रॅडॉर यांच्यामधील सागरी प्रदेश हे अभिसरणाचे दुसरे उगमस्थान आहे. हिवाळ्यात या भागातील थंड व जड पाणी खाली दाबले जाऊन ‘अटलांटिक गभीर जलराशी’ बनते. आर्क्टिक महासागरात यातील पाणी गोलाकार फिरते. सायबीरियन किनारा पार करून पुढे आल्यानंतर उत्तर अटलांटिकमध्ये ते पाणी ग्रीनलंड बेटाभोवती गोलाकार फिरते. आर्क्टिकभोवती सलग खुला महासागर नसल्याने तेथे प्रभावी परिध्रुवीय प्रवाह आढळत नाहीत. तेथे दक्षिणेकडे वाहणारे कमी व्याप्तीचे थंड प्रवाह आहेत. उदा., रशियाच्या पूर्व किनाऱ्याजवळून वाहणारा ओयाशियो प्रवाह, उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळून वाहणारा कॅलिफोर्निया प्रवाह, ग्रीनलंड बेटाभोवती वाहणारे लॅब्रॅडॉर व पूर्व ग्रीनलंड प्रवाह.


▪️सागरी प्रवाहाची वैशिष्ट्ये

सागरी प्रवाहांची वैशिष्ट्ये अतिशय गुंतागुंतीची व सातत्याने बदलणारी आढळतात. काही प्रमुख व सर्वसाधारण वैशिष्ट्ये याप्रमाणे सांगता येतील : 


१) सागरी प्रवाह किनाऱ्याच्या अगदी जवळून वाहत नाहीत. त्यांचा विस्तार सामान्यपणे सागरमग्न खंडभूमीच्या सीमेपर्यंत आढळतो. 

२) उत्तर गोलार्धातील उत्तर पॅसिफिक व उत्तर अटलांटिकमध्ये मुख्य प्रवाह घड्याळकाट्याच्या दिशेला अनुसरून गोलाकार वाहतात. महासागरांच्या पश्चिम भागात ते उत्तरेकडे, तर पूर्व भागात ते दक्षिणेकडे वाहतात. दक्षिण गोलार्धात याच्या उलट परिस्थिती असते. 

३) दोन्ही गोलार्धातील गोलाकार भोवरे (जायरेट) एकसारख्या आकाराचे नाहीत. 

४) दोन गोलाकार भोवऱ्यांच्या मध्ये विषुववृत्तीय प्रतिप्रवाह आढळतात.

५)खंडांच्या दक्षिण भागांत प्रवाह पश्चिम-पूर्व दिशेत वाहतात. 

६) सागरी प्रवाहांचा सर्वाधिक वेग महासागरांच्या पश्चिम भागात आढळतो. उदा., गल्फआणि कुरोसिवो प्रवाहांचा वेग दरताशी ६ किमी. असतो.

७) सागरी प्रवाहांचा वेग जरी कमी असला, तरी त्यांबरोबर वाहून नेले जाणारे पाणी प्रचंडप्रमाणात असते. उदा., फ्लॉरिडा सामुद्रधुनीतून प्रतिसेकंद सु. २५ द. ल. टन पाणी वाहत असते. न्यूयॉर्कच्या अपतट भागातून वाहणाऱ्या गल्फ प्रवाहातूनयाच्या जवळजवळ दुप्पट पाणी वाहत असते.

८) जगातील सर्वांत मोठा प्रवाह अंटार्क्टिका खंडाभोवतीचा असून त्यातून प्रतिसेकंद सु. १०० द. ल. टनपाणी वाहत असते.


▪️सागरी प्रवाहांचे परिणाम


अठराव्या शतकापासून मार्गनिर्देशनासाठी सागरी सफरी निघू लागल्या. तेव्हापासून सागरी सफरींच्या दृष्टीने सागरीप्रवाहांचा अभ्यास होऊ लागला. त्यानंतर हवा व हवामानावर होणाऱ्या परिणामांच्या दृष्टीने सागरी प्रवाहांचा अभ्यास केला जाऊ लागला. सागरी प्रवाहांच्याअभ्यासावरून त्यांच्या वेगवेगळ्या परिणामांची माहिती उपलब्ध झाली. शुष्कता, भारी वर्षण, दाट धुकेयुक्त हवा हे अपतट सागरी प्रवाहाचे काही परिणामदिसून येतात. ज्या भागातून उष्ण किंवा थंड प्रवाह सातत्याने मोठ्या प्रमाणात वाहत असतात, तेथील किनारी प्रदेशाच्या हवामानावर त्या प्रवाहाचापरिणाम होतो. पश्चिम यूरोप, दक्षिण अलास्का व जपानच्या किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या उष्ण प्रवाहांमुळे तेथील थंडीची तीव्रता कमी होऊन हवामानउबदार बनले; अन्यथा तेथील हवामान तीव्र व असह्य स्वरूपाचे राहिले असते. गल्फ प्रवाहामुळे कॅनडाचे हॅलिफॅक्स, रशियाचे मुरमान्स्क, ग्रेट ब्रिटन वनॉर्वेमधील बंदरे हिवाळ्यात न गोठता सागरी वाहतुकीसाठी खुली राहतात. अशाच प्रकारे जपान व उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याचे हवामानहिवाळ्यात उबदार राखले जाते. उबदार पाणी व उबदार हवामानामुळे बाष्पीभवन अधिक होऊन लगतच्या किनारी प्रदेशातील वृष्टिमान वाढते. याउलटदक्षिण गोलार्धात पेरू व बेंग्वेला हे थंड सागरी प्रवाह दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा व आफ्रिकेच्या नैर्ऋत्य किनाऱ्याजवळून वाहत असल्याने तेथे दाटधुके निर्माण होते व हवामान थंड राहते; परंतु वृष्टी होत नाही. परिणामतः पेरू, चिली व नैर्ऋत्य आफ्रिका (नामिबिया) येथे ओसाड वाळवंटी प्रदेशांचीनिर्मिती झाली आहे.


सागरी प्रवाह व वातावरणीय अभिसरण क्रिया यांचा परस्परांवर परिणाम होत असतो. उदा., पश्चिम पॅसिफिकवरील आवर्ती उबदार व आर्द्र वाऱ्यांचेअभिसारी प्रवाह पूर्वेकडे स्थलांतरित होतात, तेव्हा पूर्व पॅसिफिकमधील पाणी उबदार बनून एल् निनो परिणाम जाणवू लागतात. त्याचे तेथील हवा वहवामानावर गंभीर परिणाम दिसून येतात. ऑस्ट्रेलियात अवर्षण, कॅलिफोर्नियात वादळ तर उत्तर अमेरिकेच्या मध्यवर्ती भागातील हिवाळे उबदारराहतात. पेरू व चिलीच्या मत्स्योद्योगावरही त्याचा विपरीत परिणाम होतो.


सागरी प्रवाहांबरोबर ध्रुवीय प्रदेशाकडून हिमनग वाहत येतात. असे हिमनग सागरी वाहतूक मार्गावर आले, तर जहाजांना ते फार धोकादायकठरतात. सागरी प्रवाह सागरी जीवांना पोषक ठरतात. उष्ण व थंड प्रवाह जेथे एकत्र येतात, तेथे प्लवक या माशांच्या मूलभूत खाद्याची विपुल प्रमाणात वाढहोते. त्यांवर माशांची चांगली पैदास होऊन असे प्रदेश प्रसिद्घ मत्स्यक्षेत्रे बनली आहेत. उदा., अटलांटिक व पॅसिफिक महासागरांचे वायव्य व ईशान्य भाग,दक्षिण अमेरिकेचा पश्चिम किनारा. ह्या समृद्घ मत्स्यक्षेत्रांच्या निर्मितीमागील वेगवेगळ्या कारणांपैकी उष्ण व थंड सागरी प्रवाहांचा संयोग हे एक महत्त्वाचेकारण आहे. सागरी प्रवाह नसते, तर समुद्र व महासागरांतील पाणी संचित राहिले असते. अशा पाण्यात सजीवांना आवश्यक खाद्याचा पुरवठा झालानसता. परिणामतः सागरी जीवसृष्टी व तेथील परिसंस्था मर्यादित राहिल्या असत्या.

गोदावरी नदी [ भारतातील प्रमुख नदी ]



१) भारतातील आणि महाराष्ट्रातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे. 


२) गोदावरी नदी खोरे राज्यातील प्रथम क्रमांकाचे खोरे असून गोदावरी नदीने महाराष्ट्राचे (४९ %) क्षेत्र व्यापलेले आहे. 


३) गोदावरी नदीला ‘दक्षिणेतील गंगा’, ‘संतांची भूमी’, ‘वृद्धगंगा’ या नावाने ओळखतात. 


४) नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी येथे झाला. 


५) नदीची एकूण लांबी = १४५० कि.मी. 


६) महाराष्ट्रातील प्रवाहाची लांबी = ६६८ कि.मी. 


७) नदीचा प्रवास = महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश 


८) प्रवाहाची दिशा = पश्चिमेकडून पूर्वेकडे 


९) नदीच्या उपनद्या = मांजरा, दारणा, मुळा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, सिंधफणा, प्रवरा, इंद्रावती, इरई, प्राणहिता, कादवा, दुधना, दक्षिणपूर्णा, कुंडलिका 


१०) गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा व दक्षिण विदर्भातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते. 


११) गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण (पहिले मातीचे धरण), औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण (राज्यातील सर्वात मोठे बहुउद्देशीय धरण), नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण, धर्माबाद (जिल्हा नांदेड) येथील बाभळी धरण आहेत. 


१२) जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयाला “नाथसागर” असे म्हणतात.

 

१३) नाथसागरातील जलाशयापासून पैठण येथे “म्हैसूरच्या वृंदावन गार्डन” च्या धर्तीवर ज्ञानेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात आली. 


१४) प्राणहिता ही गोदावरीची प्रमुख उपनदी असून गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे ह्या नद्यांचा संगम होतो. 


१५) गोदावरी नदी आंध्रप्रदेश राज्यातील राजमहेंद्री ह्या शहराजवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते.

पथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार


1. व्दिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.


 


2. भूशीर - व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.


 


3. खंडांतर्गत समुद्र - मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.


 


4. बेट - एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.


 


5. समुद्रधुनी - काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.


 


6. संयोगभूमी - दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.


 


 


7. आखात - उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.


 


8. खाडी - आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.


 


9. समुद्र किंवा सागर - महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.


उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र

 


10. उपसागर - खार्‍या पाण्याच्या ज्या जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर

वाचा :- महाराष्ट्र जिल्हावार-पर्वत, डोंगर, टेकड्या, डोंगररांगा



💢 जिल्हा ➡️➡️ पर्वत डोंगर टेकड्या डोंगररांगा 💢


🎇मबई मुंबई उपनगर - ⛰⛰पाली, अंटोप हिल, शिवडी,खंबाला, मलबार हिल.


🎇 रायगड - ⛰⛰रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सह्यण्द्री,


🎇 धळे - ⛰⛰धानोरा, व गाळण्याचे डोंगर.


🎇नाशिक - ⛰⛰सह्यान्द्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर,वणी,चांदवड,सातमाळा,


🎇 पणे -⛰⛰ सह्यान्द्री,हरिश्चंद्र,शिंगी,तसुबाई,पुरंदर,ताम्हिनी,अंबाला,


🎇 सांगली -⛰⛰ आष्टा,होणाई,शुकाचार्य,कामलभैरव, बेलगबाद, आडवा,मुचींडी,दंडोबा.


🎇 सोलापूर -⛰⛰ महादेव,बालाघाट, शुकाचार्य,


🎇 जालना - ⛰⛰अजिंठ्याची रांग,जाबुवंत,


🎇 हिंगोली - ⛰⛰अजिंठ्याची रांग, हिंगोलीचे पठार.


🎇 लातूर - ⛰⛰बालाघाटचे डोंगर,


🎇 बीड -  ⛰⛰बालाघाटचे डोंगर


🎇 अकोला - ⛰⛰गाविलगड,अजिंठाचे


🎇 अमरावती -⛰⛰ सातपुडा, गाविलगडच्या रांगा,पोहऱ्याचे व चिरोडीचे डोंगर.


🎇 वर्धा - ⛰⛰रावनदेव, गरमासुर, मालेगाव, नांदगाव, ब्राह्मणगाव टेकड्या.


🎇 भडारा - ⛰⛰अबागडचे डोंगर, गायखुरी व भिमसेन टेकड्या,


🎇 चद्रपूर -⛰⛰ परजागड व चांदूरगडचे, चिमूर व मुल टेकड्या.


🎇 ठाणे -  ⛰⛰सह्यान्द्री


🎇 जळगाव -⛰⛰ सातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली, हस्तीचे डोंगर.


🎇 नदुरबार -⛰⛰ सातपुडा व तोरणमाळचे डोंगर.


🎇 अहमदनगर -⛰⛰ सह्यान्द्री,कळसुबाई,अदुला,बाळेश्वर,हरिश्चंद्र डोंगर,


🎇 सातारा -⛰⛰ सह्यान्द्री,परळी,बनमौली,महादेव, यावतेश्वेर, मेंढोशी, आगाशिव, औध,


🎇 कोल्हापूर - ⛰⛰सह्यान्द्री, पन्हाळा, उत्त्तर व दक्षिण, दुधगंगा, चिकोडी रांग.


🎇 औरंगाबाद - ⛰⛰अजिंठा, सातमाळा, सुरपलायान,


🎇 परभणी - ⛰⛰उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट रांग.


🎇 नांदेड - ⛰⛰सातमाळा, निर्मल,मुदखेड,बलाघाटचे डोंगर,


🎇 उस्मानाबद -⛰⛰ बालाघाट, तुळजापूर, व नळदुर्ग डोंगर


🎇 यवतमाळ - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या.


🎇 बलढाणा - ⛰⛰अजिंठ्यचे डोंगर.


🎇वाशीम - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर


🎇 नागपूर - ⛰⛰सतपुड्याचे डोंगर, गरमसूर,महादागड, पिल्कापर टेकड्या,


🎇 गोदिया -⛰⛰ नवेगाव, प्रतापगड, चिंचगड, व दरकेसाचे डोंगर.


🎇 गडचिरोली -⛰⛰ चरोळी,टिपागड,सिर्कोडा,सुरजागड,भामरागड,चिकियाला डोंगर.


आजची प्रश्नमंजुषा

 ' सरदार सरोवर ' हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर -- नर्मदा

-------------------------------------------------------

 ' आग्रा ' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ?

उत्तर -- यमुना

-----------------------------------------------------

' शिवाजी सागर ' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?

उत्तर -- कोयना

------------------------------------------------------

' संजय गांधी ' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

उत्तर -- बोरिवली ( मुंबई )

-----------------------------------------------------

महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- चंद्रपुर

------------------------------------------------------

महाराष्ट्र राज्याच्या सागरी किना-याची लांबी किती आहे ?

उत्तर -- ७२० कि. मी.

------------------------------------------------------

 शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- पुणे

-------------------------------------------------------

 ' भंडारदरा ' धरण कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर -- प्रवरा

------------------------------------------------------

पालघर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र कोणते आहे ?

उत्तर -- सातपाटी

-------------------------------------------------------

' बिहू ' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

उत्तर -- आसाम

-----------------------------------------------------

 अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- धुळे 

--------------------------------------------------- 

महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?

उत्तर -- साल्हेर

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे


📌 महाराष्ट्र पठार निर्मिती ही   🌋जवालामुखीच्या  उद्रेकामुळे झालीआहे


📌 गरम पाण्याचे झरे हे ज्वालामुखी उद्रेकाचे पुरावे देतात


📌 यातूनच सहयाद्री पर्वतरांग तयार झाली जी प्रमुख पश्चिम वाहिनी आणि पुर्व वहिनी नद्यांची जलविभाजक बनली.


📌 महाराष्ट्र मध्ये सह्याद्री ची उंची ही उत्तरे कडून दक्षिणेकडे कमी कामी होत जाते


🔰 महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखरे 🔰


  🎇 कळसुबाई  1,646 मी अहमदनगर


  🎇 साल्हेर 1,567 मी नाशिक


  🎇 महाबळेश्वर 1,438 मी सातारा


  🎇 हरिश्चंद्रगड 1,424 मी अहमदनगर

  

  🎇 सप्तश्रृंगी 1,416 मी नंदुरबार


  🎇 तोरणा 1,404 मी पुणे 


  Trick 👇👇

🏆 कसा मी हसतो अत्रे तिला विचारतो 🏆


  🌸 क  = कळसुबाई

  🌸 सा  = साल्हेर

  🌸 मी  = महाबळेश्वर

  🌸 हा   = हरिश्चंद्रगड

  🌸 स   =सप्तश्रृंगी

  🌸 तो   = तोरणा

  🌸 अ  =  अस्तंभा

  🌸  तर  =  त्र्यंबकेश्वर

  🌸 तिला =  तौला

  🌸 वि    = विराट

  🌸 चा    = चिखलदरा

१४ मार्च २०२४

राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नसंच

 🔰खालील विधाने विचारात घ्या:

अ) भारतात सर्वात जास्त काल इंग्रजांनी शासन केले.

ब) पोर्तुगीजांनी भारतातून सर्वप्रथम आपली सत्ता मागे घेतली.

क) पोर्तुगीजांनी आपली पहिली वसाहत गोवा इथे स्थापन केली.

ड) ब्रिटीश खलाशी वास्को-द-गामा १४९८ मध्ये भारतात आला.


१) फक्त अ,ब, क योग्य

२) फक्त क योग्य 📚✍️

३) सर्व अयोग्य

४) सर्व योग्य


🔰कोणत्या वर्षी भारत सरकारने जागतीक व्यापार संघनेशी करार केला आहे ? आणि जागतीक व्यापार संघटना (डब्ल्यु. टी. ओ.) कधी अस्तित्वात आली. 

 A) 1981-1982  

 B) 1994-1995  ✅

 C) 1996-1997  

 D) 1998-1998  


🔰 भारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली ?

 M) मार्च 1950 ✅

 P) एप्रिल 1950 

 K) मार्च 1951 

 H) मार्च 1949 


 

🔰 _____ उत्तर-पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. 

 A) भुवनेश्वर 

 B) हाजीपूर  

 C)  गुहाटी 

 D) गोरखपुर ✅


🔰दवितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील __ परिसरात दाट लोकवस्ती आढळते.* 

 A) लातूर - उस्मानाबाद 

 B) जलगाव - भुसावल 

 C) पंढरपूर - सोलापूर 

 D) पिंपरी -चिंचवड✅



 1) कोणत्याही वस्तूचे वजन पृथ्वीवर ------------ असते ? 

a) पृथ्वीवर सर्व ठिकाणी सारखेच

 असते

b) विषवृत्तावर सर्वाधिक असते

c) ध्रुवावर कमीत कमी असते

d) ध्रुवावर अधिकतम असते👈👈



 2) महाराष्ट्रातील खालील ठिकाणे वार्षिक पर्जन्याच्या उतरत्या क्रमाने लावा? 

a) आंबोली,गगनबावडा, महाबळेश्वर,माथेरान

b) आंबोली, माथेरान, महाबळेश्वर,गगनबावडा

C) आंबोली,महाबळेश्वर, गगनबावडा,माथेरान 👈👈

d) आंबोली, गगनबावडा, माथेरान, महाबळेश्वर


 3) महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानाचा विचार करा

a) सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे पर्जन्याचे प्रमाण घटत जाते

b) गोदावरी,भीमा व कृष्णा खोऱ्यांच्या दक्षिणोत्तर पट्ट्यामध्ये अवर्षणग्रस्त प्रदेश आहे

1) a चूक b बरोबर

2) a बरोबर b चूक

3) दोन्ही चूक 

4) दोन्ही बरोबर👈👈


 4) मादाम क्युरी यांनी दोन नोबेल पुरस्कार कोणत्या क्षेत्रांमध्ये मिळवले होते? 

a) भौतिक व रसायन शास्त्र  👈👈

b) रसायन व चिकित्सा शास्त्र

C) भौतिक व चिकित्सा 

d) शांती आणि रसायन शास्त्र


 5) खालील विधानाचा विचार करा

A)  रोशनी योजना ही नक्षलग्रस्त भागासाठी आहे

B) ही योजना फक्त 18 ते 35 वयोगटातील तरुण व तरुणीसाठी आहे

1) a बरोबर b चूक

2) a चूक b बरोबर

3) दोन्ही बरोबर👈👈

4) दोन्ही चूक


6) ----------- व--------  खोऱ्यात तांबडी व पिवळसर मृदा आढळते 

a) तापी व नर्मदा

b) कृष्णा व भीमा

c)गोदावरी व पुरणा

d) वर्धा व वैनगंगा👈👈


 7) सह्याद्रीमधील शिखराचा उंचीनुसार उतरता क्रम लावा 


a) कळसुबाई, महाबळेश्वर, हरीशचंद्रगड,साल्हेर

b) कळसुबाई, साल्हेर, हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर

c) कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड 👈👈

d) कळसुबाई, हरिश्चंद्रगड, महाबळेश्वर, साल्हेर


 *8) राजस्थान मधील मजूर किसान शक्ती संघटना ही स्वयसेवी संस्था कोणत्या समाज सेविकेचा आहे?* 

१) प्रतिभा शिंदे 

2) अरुणा रॉय👈👈

3) पारोमिता गोस्वामी

4) तृप्ती देसाई


 9)वर दिलेले छायाचित्र कोणत्या साहित्यिकांचे आहे?                                                                                           1) कुसुमाग्रज  

 2) पु. ल. देशपांडे   👈👈 

3) वि.वा शिरवाडकर  

 4) बि गूप्ते



 10) खाली दिलेल्या विधानांचा योगय विचार करा

a) भारतातील सर्वात मोठे नदीपात्र ब्रम्हपुत्रेचे आहे

b) उगम मानस सरोवर येथे होतो

c) ब्रम्हपुत्रेची एकूण लांबी 2850 km आहे 

d) भारतातील तिची लांबी 550 km आहे    

1)  A b c बरोबर

2) फक्त c d बरोबर

3) फक्त a b बरोबर👈👈

4) सर्व बरोबर


11) दिलेल्या खालील विधानांचा विचार करा 

  A) पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणी युनाईटेड बँक यांचे विलनीकरण अर्थमंत्री निर्मला सिताराम यांच्या कार्यकाळात झाले

  B) विलनीकरनानंतर पंजाब नॅशनल बँक सार्वजनीक क्षेत्रातील 2 नंबर मोठी बँक झाली आहे


1 )  a बरोबर  b चूक

2 ) a चुक b बरोबर

3 ) दोन्ही बरोबर 👈👈

4 ) दोन्ही चुक


12) खालील विधानांचा विचार करा

  a) पंतप्रधान उज्वला योजना ही सरकारणे 1 मे 2015 रोजी सूरु केली होती

  b) यो योजनेचे घोष वाक्य – स्वच्छ इंधन, बेहतर जिवन हे होते

1)  a बरोबर b चुक

2)  a चुक b बरोबर 👈👈

3) दोन्ही बरोबर

4) दोन्ही चुक


 13) 7 जुन 2018 रोजी दक्षीन आफ्रीकेतिल पिटरमॅरिटझ् बर्ग रेल्वे स्टेशनवर वर्णव्देशातून महात्मा गांधी यांना रेल्वेमधून उतरुन दिलेल्या ऐतिहासीक घटनेस किती वर्ष पूर्ण झाले

1) 125 👈👈

 2) 130

 3) 100

4) 120


 14) भारताची इस्त्रो ही संस्था सन 2022 मध्ये कोणती अंतराळ मोहीम राबविनार आहे

  1) चांद्रयान 2

  2) गगनयान  👈👈

  3) मंगळयान 2 

 4) चांद्रयान 3


*15) लोकबिरादारी प्रकल्प हा हेमलकसा ता. भामरागड जि. गडचिरोली आदिवासींच्या सर्वांगीन विकासासाठी 23 डिसेंबर 1973 रोजी कोणी सूरु केला.**


बाबा आमटे

शब्दसिद्धी व त्याचे प्रकार


शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच

'शब्दसिद्धी' असे म्हणतात.


⭕️शब्दांचे खालील प्रकार पडतात👇


🌀 तत्सम शब्द👉


जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द ' असे म्हणतात.


💠उदा.

राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध.


🌀 तदभव शब्द 👉


जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना 'तदभव शब्द' असे म्हणतात.


💠उदा.

घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय.


🌀दशी/देशीज शब्द👉


महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.


💠उदा.

झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर.


🌀 परभाषीय शब्द :👉


संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ' परभाषीय शब्द' असे म्हणतात.


🌀1) तुर्की शब्द:-


💠कालगी, बंदूक, कजाग


🌀2) इंग्रजी शब्द:-


टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी.


🌀 3) पोर्तुगीज शब्द:-


बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस.


🌀4) फारशी शब्द:-


💠रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना हप्ता.


🌀 5) अरबी शब्द:-


अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल.



🌀6) कानडी शब्द:-


हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे.


🌀7) गुजराती शब्द:-


सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट.


🌀8) हिन्दी शब्द:-


बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर, इमली.


🌀 9) तेलगू शब्द:-


ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी.


🌀10) तामिळ शब्द:-


चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा.

गोवा मुक्ती लढा



🔺पोर्तुगालने  आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश हाती सोपवण्यास नकार दिला. तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांना संघर्ष करावा लागला.


🔺पोर्तुगीज शासनाविरुध्द जनतेत जागृती घडवून आणण्याचे कार्य प्रथम डॉ. टी. बी. कुन्हा यांनी केले.


🔺आपल्या लिखाणातून त्यांनी पोर्तुगिजांच्या शोषक कारभारावर कोरडे ओढले.


🔺पोर्तुगिजांविरुध्द लढा देण्यासाठी लोकांना संघटित करण्याच्या हेतूने त्यांनी गोवा काँग्रेस समिती स्थापन केली.


🔺1946 साली गोवा मुक्तीसाठी डॉ. राममनोहर लोहिया यांनी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली. याच सुमारास गुजरातमधील दादरा व नगरहवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी आझाद गोमांतक दलाची स्थापना करण्यात आली होती.


🔺2 ऑगस्ट, 1954 रोजी या दलाच्या तरूणांनी सशस्त्र हल्ला करून दादरा व नगरहवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला.


🔺या हल्ल्यात विश्वनाथ लवंदे, नानासाहेब काजरेकर, सुधीर फडके इत्यादींनी भाग घेतला होता.


🔺1954 सालापासून गोवा मुक्ती चळवळीला विशेष गती मिळाली. गोवा मुक्ती समिती स्थापन करण्यात आली.


🔺 या समितीने सत्याग्रहींच्या अनेक तुकडया गोव्यात पाठवल्या. त्यात सेनापती बापट, महादेवशास्त्री जोशी व त्यांच्या पत्नी सुधाताई तसेच सुधीर फडके, नानासाहेब गोरे इत्यादी नामवंतांनी भाग घेतला.


🔺भारत सरकार पोर्तुगालशी सामोपचाराने वाटाघाटी करत होते. परंतु त्याला प्रतिसाद मिळेना. अखेरीस डिसेंबर 1861 मध्ये भारताचे सैन्य गोव्यात शिरले.


🔺काही दिवसांतच पोर्तुगीज लष्कराने शरणागती पत्करली.


· गोवा मुक्त झाला.


· भारताच्या भूमीवरून साम्राज्यवादाचे पूर्णपणे उच्चाटन झाले.

मार्गदर्शक तत्त्वे

मार्गदर्शक तत्त्वे | Directive Principles of State Policy (DPSP) margdarshak tatve


मूलभूत हक्क दिल्याने जनतेचे कल्याण होत नाही तर त्यासाठी आवश्यक परिस्थिती राज्याने निर्माण करणे अपेक्षित आहे. मूलभूत हक्क उपभोगण्यासाठी राजकीय परिस्थिती अनुकूल असेल, सरकारी अनुकूलता मूलभूत हक्कावर परिणाम करत असते. directive principles of state policy/ margdarshak tatve


शासकीय ध्येयधोरणे सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने असली पाहिजेत. समाजात समतेचे अधिष्ठान साकारण्यासाठी आणि कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सरकारला धोरणकर्त्यांना काही मार्गदर्शक तत्त्वांची गरज असते. ही गरज घटनाकारांनी ओळखून सरकारसाठी मार्गदर्शक तत्वांचा अंतर्भाव घटनेमध्ये केलेला आहे.


संविधानाच्या चौथ्या भागात मार्गदर्शक तत्त्वांचे विवेचन करण्यात आले आहे यातील कलम 36 ते कलम 51 मध्ये राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे.


मार्गदर्शक तत्त्वांची पार्श्वभूमी – 


1928 च्या नेहरू अहवालामध्ये काही मुलभूत हक्क  समाविष्ट करण्यात आले होते. तेज बहादुर सप्रू समितीच्या(1945) अहवालामध्ये न्यायप्रविष्ट व गैरन्यायप्रविष्ट अशा दोन प्रकारात मूलभूत हक्कांचे विभाजन करण्यात आले होते.


संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार सर बी. एन. राव यांनी वैयक्तिक हक्क दोन गटात विभागण्यात यावे, न्यायप्रविष्ट असलेले व न्यायप्रविष्ट नसलेले असे असतील असे म्हटले. न्यायप्रविष्ट नसलेले हक्क राज्य संस्थेसाठी नैतिक तत्त्वे म्हणून कार्य करतील. त्यांचा सल्ला मसुदा समितीने स्वीकारला.


घटनेच्या भाग 3 मध्ये न्यायप्रविष्ट मूलभूत हक्क तर भाग 4 मध्ये गैर न्यायप्रविष्ट मार्गदर्शक तत्त्वे / margdarshak tatve / directive principles of state policy/ margdarshak tatve समाविष्ट करण्यात आली.


भारताच्या घटनाकारांनी आयर्लंडच्या तत्त्वांचा आदर्श घेऊन मार्गदर्शक तत्त्वांची तरतूद केली आहे सरकारवर नैतिक दबाव राखण्यासाठी भारताच्या घटनेत या तत्त्वांचा समावेश केला आहे.


मार्गदर्शक तत्त्वांची वैशिष्ट्ये –



 राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे margdarshak tatve ही राज्यसंस्थेची मार्गदर्शन करणारी म्हणून निर्माण केली गेली आहेत.


कलम 36 मध्ये राज्यसंस्था या शब्दाची व्याख्या देण्यात आलेली आहे ती भाग 3 मध्ये दिल्याप्रमाणेच आहे. मार्गदर्शक तत्वे 1935 च्या कायद्यातील सूचनांचे साधने याप्रमाणेच आहेत. 1935 च्या कायद्यात या सूचना ब्रिटिश सरकारने भारतातील गव्हर्नर जनरल आणि प्रांतिक गव्हर्नरांनी पालन करण्यासाठी देण्यात आल्या होत्या. मात्र त्या सूचना होत्या तर भारताच्या घटनेत असणारी ही तत्त्वे मार्गदर्शक margdarshak tatve आहेत.


मार्गदर्शक तत्वे अंमलबजावणी योग्य नाहीत म्हणजे जर यातील हक्क नागरिकांना मिळाले नाहीत तर न्यायालयात दाद मागता येत नाही. राज्यकारभार चालविण्यासाठी दिशा देणारी ही मार्गदर्शक तत्वे directive principles of state polic / margdarshak tatve अतिशय महत्त्वाची मूल्ये आहेत.


भारत एक कल्याणकारी राज्य व्हावे येथे समाज व आर्थिक सामाजिक राजकीय न्यायावर आधारित समाज साकारावा सामाजिक विषमता नष्ट व्हावी व्यक्ती व्यक्ती गटांना समान संधी समान दर्जा प्राप्त व्हावा ही यात धोरणा मागची भूमिका होती. मार्गदर्शक तत्वे margdarshak tatve न्यायप्रविष्ट नसली तरी एखाद्या कायद्याची घटनात्मक तपासताना या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेता येतो.


मार्गदर्शक तत्त्वे / margdarshak tatve –


कलम 36 – व्याख्या – राज्यसंस्था – राज्यसंस्था या शब्द लेकाची व्याख्या भाग-3 मधील कलम 12 मध्ये दिलेल्या व्याख्येप्रमाणे असेल.


कलम 12 – भारतीय संविधानाच्या कलम 12 नुसार राज्य म्हणजे भारताच्या संसद, कार्यकारी मंडळ, प्रत्येक घटक राज्यांची विधिमंडळे, शासन स्थानिक आणि स्थानिक शासन संस्था तसेच भारताच्या भूप्रदेशातील व भारताच्या शासनाच्या अधिकार क्षेत्रातील इतर अधिकारी संस्था होय.


कलम 37 – या भागात असलेली तत्त्वे लागू करणे – भारतीय संविधानाच्या भाग-4 मधील ही मार्गदर्शक तत्त्वे न्यायप्रविष्ट नसतील पण ही तत्वे शासकीय व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत आहेत आणि कायदे करताना ही तत्त्वे लागू करणे हे राज्यसंस्थेचे कर्तव्य असेल.


कलम 38 – राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे. सामाजिक आर्थिक राजकीय न्यायावर आधारित समाजातील सर्व घटकांच्या मध्ये आपुलकी प्रेम राहील व एक समतेची भावना निर्माण होईल, आणि आदर्श अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करून लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील.


कलम – 39 – राज्याने अनुसरावयाच्या धोरणांची तत्वे 


a)स्त्री-पुरुषांना उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क सारखाच असावा


b) समाजाच्या भौतिक साधन संपत्तीची मालकी व नियंत्रण सामूहिक हिताला उपकारक होईल अशी असावी.


c) संपत्ती व उत्पादन साधने यांचे केंद्रीकरण होऊ नये.


d) स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन मिळावे.


e) स्त्री व पुरुष कामगारांच्या आरोग्य व ताकद आणि बालकांचे कोळी वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये नागरिकांना आर्थिक गरजेपोटी वय व ताकत यांना न पेलणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पाडू नये.


f) बालकांना मुक्त वातावरणात आपला विकास साधण्याची संधी व सुविधा उपलब्ध करून दिली जावी शोषणापासून व नैतिक व भौतिक उपेक्षेचे पासून संरक्षण करावे.


कलम 39(A) – समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य. राज्य समाजामध्ये न्यायिक समानता ठेवण्याचा प्रयत्न करेल. आर्थिक किंवा अन्य असमर्थता मुळे कोणत्याही नागरिकाला न्याय मिळण्याची ची संधी नाकारली जाऊ नये कायदेविषयक मोफत सहाय्य राज्य उपलब्ध करून देईल.


कलम 40 – ग्रामपंचायतीचे संघटन राज्य हे ग्रामपंचायतीचे संघटन करण्यासाठी उपाययोजना करेल स्व शासनाचे घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक ते अधिकार व प्राधिकार बहाल करील.


कलम 41- कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ट बाबतीत सार्वजनिक सहाय्याचा अधिकार. राज्य हे आपल्या आर्थिक क्षमतेच्या मर्यादेत राहून कामाचा शिक्षणाचा आणि बेकारी वार्धक्य आजार व अपंगता स्थितीत सार्वजनिक सहाय्याचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी तरतूद करेल.


कलम 42 – कामाची न्याय व मानवीय स्थिती व प्रसूती सहाय्यासाठी तरतूद राज्य हे कामाची न्याय व मानवीय स्थिती निर्माण करण्यासाठी व विषयक सहाय्य साठी मदत करेल.


कलम 43 – कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी. राज्य यथायोग्य मार्गाने सर्व कामगारांना काम निर्वाह वेतन समुचित जीवनमान आणि विरंगुळा व सामाजिक व सांस्कृतिक संधीची पूर्ण उपयोग यांची शाश्‍वती देणारी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि विशेषता ग्रामीण क्षेत्रांमध्ये वैयक्तिक किंवा सहकारी तत्त्वावर कुटिरोद्योग यांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करील.


कलम 43(A)- उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग. राज्य कोणत्याही उद्योगात गुंतलेले उपक्रम आस्थापना संघटना यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांना सहभागी होता यावे यासाठी यथायोग्य कायद्याने किंवा अन्य मार्गांनी उपाययोजना करील.


कलम 43(B)- सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन. 97 वी घटनादुरुस्ती 2011 नुसार हे कलम मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाविष्ट करण्यात आले. राज्य सहकारी सोसायट्यांची स्वतंत्र निर्मिती, स्वायत्त कार्यपद्धती, लोकशाही नियंत्रण, व्यवसायिक व्यवस्थापन यास प्रोत्साहन साठी प्रयत्न करील.


कलम 44 – नागरिकांना एकृप नागरिक संहिता. नागरिकांना भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र एकृप नागरिक संहिता लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. (Uniform Civil Code)


कलम 45 – 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणाची तरतूद. बालकांचे वय सहा वर्षाची होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करेल.


कलम 46 – अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन. राज्य जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषतः अनुसूचित जाती जमाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील सामाजिक व अन्य प्रकारचे शोषण यापासून त्यांचे रक्षण करील.


कलम 47 – पोषण मान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्तव्य. पोषण मान, राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य आहे. मादक पेय, आरोग्यास अपायकारक अशी द्रव्य यांचे औषधीय प्रयोजना खेरीज सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील.


कलम 48 – कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन.कृषी व पशुसंवर्धन यांचे आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने संघटन करण्यासाठी राज्य प्रयत्नशील राहील. विशेषतः गाई व वासरे आणि इतर दुभती व ओढ कामाची जनावरे यांच्या जातीचे जतन व सुधारणा करणे आणि त्यांच्या कत्तली मनाई करणे याकरिता उपाययोजना करील.


कलम 48 (A) – पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्य जीवांचे रक्षण करणे.देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्य जीवांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील असेल.


कलम 49 – राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके व स्थाने आणि वास्तू यांचे संरक्षण.संसदीय कायद्याद्वारे किंवा त्या खालील राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून घोषित झालेले कलात्मक किंवा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे स्मारक किंवा स्थान किंवा वास्तू यांचे यथास्थिती लूट, विद्रुपण, नाश, स्थानांतरण, विल्हेवाट किंवा निर्यात यापासून संरक्षण करणे ही राज्यांची जबाबदारी असेल.


कलम 50 – न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे.राज्याच्या लोकसेवा मध्ये न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवण्याकरता राज्य उपाययोजना करेल.


कलम 51 – आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन.राज्य हे


a) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करण्यासाठी,


b) राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मान पूर्ण संबंध राखण्यासाठी,


c) संघटित जन समाजांच्या आपापसातील व्यवहारांमध्ये आंतरराष्ट्रीय कायदा व तहांची बंधने या प्रती आदर भावना जोपासण्यासाठी,


d) आंतरराष्ट्रीय तंटे ला वादात द्वारे सोडविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, प्रयत्नशील राहील.


नवीन मार्गदर्शक तत्त्वे – margdarshak tatve –


1) 42 वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये चार नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश करण्यात आला. कलम 39(f),कलम 39(A), कलम 43(A), कलम 48(A).


2) 44 व्या घटनादुरुस्तीने 1978 मध्ये कलम 38(2) हे तत्त्व समाविष्ट करण्यात आले.


3) 86 व्या घटनादुरुस्तीने 2002 मध्ये कलम 45 ची वाक्यरचना बदलली राज्य 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व शिक्षणासाठी तरतूद करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. याच घटनादुरुस्तीने कलम 21 ए हे कलम घटनेत समाविष्ट करून प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क बनविला.


भारतीय राज्यघटनेच्या  मार्गदर्शक तत्त्वे ---


1) कलम 365 भाग-16 – सेवा व पदे यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांचे हक्क.संघराज्य किंवा घटक राज्यांच्या कारभाराशी संबंधित सेवांमध्ये व पदावर नियुक्ती करताना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांमधील व्यक्तींच्या हक्क मागण्या प्रशासकीय कार्यक्षमता राखण्याची सुसंगत असेल.


2) कलम 350(A) प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणच्या सोई.


3) कलम 351 भाग 17 – हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शन. हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे आणि ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगात आणता येईल अशा रीतीने तिचा विकास करणे हे राज्याचे कर्तव्य असेल.


सामान्य विज्ञान इयत्ता 9 वी



सर्व वस्तु द्रव्यांच्या बनलेल्या असतात. ज्याला वस्तुमान असते व जे जागा व्यापले त्याला द्रव्य म्हणतात.

द्रव्याच्या भौतिक स्थितीवर आधारित स्थायू, द्रव व वायु हे प्रकार आहेत तर रसायनिक घटनेवर आधारित मूलद्रव्य, संयुग व मिश्रण हे प्रकार आहेत.

अयनायू (plasma) ही द्रव्याची चौथी अवस्था अतिउच्च तापमानाला असते.

अनेक स्थायूंचा आकार बाह्य बल लावल्यावर सुद्धा कायम असतो. ठराविक आकार व आकारमान असणार्याआ स्थायूंच्या या गुणधर्माला दृढता (rigidity) असे म्हणतात.

ऑक्सीजन, नायट्रोजन, हायड्रोजन हे वायु धातूंच्या टाक्यामध्ये ठासून भरता येतात.

स्थायूंमध्ये आंतररेंविय बल अतिशय प्रभावी असते.

द्रवांमधील आंतररेंविय बल मध्यम असते तर वायूंमध्ये आंतर रेंविय बल क्षीण असते.

अलीकडील काळात विज्ञानमध्ये रासायनिक पदार्थ या ऐवजी ‘पदार्थ’ हा शब्द प्रयोग करतात.

आधुनिक रसायनशास्त्राचा जनक लॅव्हाझिए याने मूलद्रव्याची व्याख्या मांडली.

दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने बनवलेल्या पदार्थ  म्हणजे संयुग.

लॅव्हाझिएने ऑक्सीजनचा शोध व नामकरण केले.

लोह व गंधक तापल्यावर एक नवा पदार्थ तयार होतो. त्याचे नाव आयर्न स्ल्फाईड असे आहे.

दूध हे पाणी, दुग्धशर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने व इतर काही नैसर्गिक पदार्थाचे मिश्रण आहे.

मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू, अधातू व धातुसदृश असे केले जाते.

सुमारे ऐंशी मूलद्रव्ये धातू आहेत.

सिलिकॉन, सेलेनियम, अर्सेनिक ही धातूसदृशांची काही उदाहरणे आहेत.

एक द्रव व एक अथवा अधिक स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला ‘निलंबन’ असे म्हणतात.

पचन विकारांवर वापरले जाणारे मिल्क ऑफ मॅग्नेशिया हेही एक कलिल आहे.


संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते.

एकक वस्तुमानात एकक त्वरण निर्माण करणार्‍या बलास एकक बल असे म्हणतात.

MKS पद्धतीने 1kg वस्तूमान 1 m/s2 त्वरण निर्माण करणार्‍या बलास एक न्यूटन बल असे म्हणतात.

एखाद्या वस्तुमानावरील कार्यरत बल हे त्या वस्तूच्या वस्तुमानास व तिच्यावरील परिणामी त्वरण सामानुपाती असते.

प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. उदा. रॉकेट किंवा अग्निबाण.

दोन वस्तूंची टक्कर झाली तर या वस्तूंचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगाइतकाच असतो.

निसर्गात आढळणार्यां आणि परस्परांपासून भिन्न असणार्याए सर्व बलांचे चार मुख्य प्रकार आहेत. १) गुरुत्वबल, २) विधूत चुंबकीय बल, ३) केंद्राकीय बल, ४) क्षीण बल, सर्वांसाठी न्यूटन (N) हे एकक वापरले जाते.

न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.

प्रयुक्त आकर्षणबलास ‘गुरुत्वबल’ म्हणतात.

पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते.

विश्वातील कोणत्याही दोन वस्तू कोठेही असल्या तरी त्यांच्यात परस्परांना आकर्षणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते. हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानूपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या वस्तानुपाती असते.

G चे मूल्य सर्व वस्तूंसाठी सारखेच आहे. म्हणून G ला ‘विश्वगुरुत्व स्थिरांक’ म्हणतात.

G चे मूल्य 6.67×10-11 Nm2/kg2 आहे.

पृथ्वीचे वस्तुमान M=6×1024kg आहे. सरासरी त्रिज्या R=6400 km आहे.

एखाधा वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने ओढते त्याला वस्तूचे वजन म्हणतात.

वस्तूचे वजन हे तिच्यावर कार्यरत पृथ्वीचे गुरुत्वबल होय.



दुसर्‍या प्रकारात हायड्रोकार्बनमधील किमान दोन कार्बन अणू एकमेकांशी बहुबंधाने जोडलेले असतात.

बहुबंधामधील कार्बन अणू हे त्या रेणुमधील इतर कार्बन अणूंपेक्षा वेगळे असतात.

मिथेन हा सर्वात साधी संरचना असलेला हायड्रोकार्बन असून त्याच्या रेणूत केवळ एकच कार्बन अणू असतो.

इंधन खाणी, कोळसा खाणी, गोबर गॅस व बायोगॅस मध्ये दलदलीच्या पृष्ठभागावर मिथेन असतो.

ज्वलनशीलतेमुळे मिथेनचा इंधन म्हणून वापर केला जातो.

हायड्रोजन व अॅसिटिलीन वायूंचे औधोगिक उत्पादन मिथेनपासून मिळते.

इथेन हा संतृप्त हायड्रोकार्बन आहे.

इथिलीनचे मोठया प्रमाणावर आधौगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटाच्या किन्वण प्रक्रियेने मिळविले जाते.

इथिलीनचे मोठया प्रमाणावर आधौगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटांच्या किन्वन प्रक्रियेने मिळविले जाते.

पॉलिथिन हे इथिलीन पासून बनविले जाते.

अॅसीटिलीन हा असंतृप्त हायड्रोकार्बन आहे.

ऑक्सिअॅसिटिलीन च्या ज्योतीचे तापमान नैसर्गिक वायू किंवा हायड्रोजन वायूंच्या जोतीपेक्षा जास्त असते.

PVC या बहुवारिकाच्या उत्पादनासाठी लागणार्याग कार्बन संयुगाच्या आधौगिक उत्पादनासाठी अॅसिटीलीन वापरला जातो.

सजीवांमधील रुपिकीय आणि कार्यरूपी विचरणास ‘जीवनसृष्टीची विविधता’ असे म्हणतात.

वर्गीकरण म्हणजे सुनियोजित पद्धतीने विविध समुहामध्ये केलेली रचना. या समुहांना वर्गेकक (Taxa) असे म्हणतात.

वर्गीकरणामधील पदानुक्रमात वर्गेककांचा स्तर पुढील प्रमाणे असतो. जाती, प्रजाती, कुल, गण, वर्ग, विभाग, संघ.

वनस्पतीमधील सर्वात उच्च स्तरीय वर्गेककास ‘विभाग’ म्हणतात. तर प्राण्यातील सर्वोच्च स्तरास संघ (phylum) म्हणतात.


हेलिअम (He), नियॅान (Ne), आरगॅान (Ar) यांच्या सारखे निष्क्रिय वायू किंवा राजवायू मुक्त अवस्थेत आढळून येतात.

हायड्रोजन(H), ऑक्सिजन(O), क्लोरीन(CI), सोडियम (Na), मॅग्नेशिअम (Mg) इ. मूलद्रव्ये रेणू किंवा संयुगाच्या रुपात आढळतात.

राजवायूंच्या बाहयतम कक्षेत आठ इलेक्ट्रॉन असून त्यांच्या बाहयतम कक्षा पुर्णपणे भरलेल्या आहेत. त्या कक्षांना अष्टक म्हणतात.

राजवायूंव्यतिरिक्त इतर सर्व मूलद्रव्यांच्या बाहयतम कक्षा अपूर्ण असतात.

रासायनिक बदलात धातूंची इलेक्ट्रॉन देण्याची तर आधातूंची इलेक्ट्रॉन घेण्याची अथवा भागीदारी करण्याची प्रवृत्ती असते.

ऋणभारीत इलेक्ट्रॉन दिल्यामुळे धनप्रभारीत आयन तयार होतो. त्याला कॅटायन असे म्हणतात.

इलेक्ट्रॉन दिल्यानंतर सोडीयमच्या इलेक्ट्रॉनी संरूपणात बदल होऊन तो निऑन (Ne) या निकटतम निष्क्रिय वायूंचे स्थायी इलेक्ट्रॉनी संरूपन प्राप्त करतो.

ऋणप्रभारित आयनास अॅनायन (Anion) असे म्हणतात.

रेणूंमध्ये अणूंना एकत्र धरून ठेवण्यास जी आकर्षण शक्ती जबाबदार असते त्या आकर्षण शक्तीला रासायनिक बंध म्हणतात.

एका अणूपासून दुसर्या  अणुकडे इलेक्ट्रॉनच्या स्थानांतरणामुळे तयार होणार्या) रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विधुत संयुज बंध म्हणतात.

Na व C1 स्वतंत्रपणे धोकादायक असले तरी त्यांचे संयुग मीठ (NaC1) सुरक्षित आहे.

सारख्याच किंवा एका मूलद्रव्यापासून तयार होणारी संयुगे दोन आणूमधील देवघेवीमुळे तयार होत नाहीत, तर संयोग पावणार्याद अणूमध्ये होणार्‍या N इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळे तयार होतात. या बांधाला ‘सहसंयुज बंध’ असे म्हणतात.

जेव्हा रेणुमधील दोन अणूमध्ये एकाच इलेक्ट्रॉन जोडीची भागीदारी होऊन बंध तयार होतो. त्या बांधाला एकेरी बंध असे म्हणतात.

मिथेन रेणुमध्ये C-H असे चार एकेरी बंध असतात.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर



जन्म - 14 एप्रिल 1891 महू, मध्यप्रदेश.

मृत्यू - 6 डिसेंबर 1956, मुंबई.


 त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते.

तसेच दलितांचा मुक्तिदाता म्हणून आंबेडकरांना संबोधले जाते.

1990 - 91 मरणोत्तर भारतरत्न हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सामाजिक न्यायवर्ष म्हणून साजरे केले जाते.

हिंदू कोड बिल मांडल्यामुळे त्यांना 'आधुनिक मनू' म्हटले जाते.

सामाजिक समता हा यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिन्दु होता.

आंबेडकर हे 1947 - 51 नेहरू मंत्रिमंडळात कायदेमंत्री होते.


संस्थात्मक योगदान :


1924 - बहिष्कृत हितकारिणीची स्थापना.

1924 - बहिष्कृत मेळा. नागपूरहुन रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची घोषणा.

20 मार्च 1927 - महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह.

25 डिसेंबर 1927 - मनुस्मृती दहन.

2 मार्च 1930 - नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह (1935 मध्ये मंदिर खुले)

24 सप्टेंबर 1932 - पुणे करार, अस्पृश्यांसाठी कायदे मंडळात 148 जागा राखीव.

1933 - मुखेड येथे धार्मिक ग्रंथाचे पारायण.

ऑगस्ट 1936 - स्वातंत्र् मजुर पक्षाची स्थापना.

1937 - बाळासाहेब खरे सरकारात विरोधी पक्ष नेते.

1942 - नागपूर येथे All India Scheduled Castes Federation ची स्थापना. यांसाठी आप्पा दुराई यांनी मदत केली.

मे - 1946 : Peoples Education Society स्थापना.

20 जुलै 1946 - सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई. मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद.


आंबेडकरांचे लेखन :


The Problem Of Rupee

1916 - Cast In India

1930 - जनता वृत्तपत्र (1956 साली जनताचे नाव प्रबुद्ध भारत केले.)

1946 - The Untouchables

1956 - Thoughts on pakisthan.

1957 - बुद्ध आणि धम्म, हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1957 मध्ये प्रकाशित.

'मुकनायक' ची सुरुवात संत तुकाराम यांच्या तर 'बहिकृत भारत'ची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांनी होत असे.

1920 - मुकनायक.

1927 - समता.

1946 - Who Were Shudras?


वैशिष्ट्ये :


गौतम बुद्ध, महात्मा फुले, कबीर हे तीन गुरु.

1920 - च्या माणगाव परिषदेचे अध्यक्षपद.

1930, 31-32 या तीनही गोलमेज परिषदांत अस्पृशांचे प्रतिनिधित्व.

1935 - येवला (नाशिक) या ठिकाणी धर्मांतर घोषणा. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही,अशी घोषणा.

शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा, हा संदेश दिला.

29 ऑगस्ट 1947; मसुदा समितीचे अध्यक्ष.

1948 - हिंदू कोडबिल संसदेत मांडले.

14 ऑक्टोबर 1956 धंर्मांतर. नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. चंद्रमणी महास्थावीर यांनी दीक्षा दिली.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...