१३ मार्च २०२४

महाराष्ट्राचा भूगोल


🔅 महाराष्ट्राची निर्मिती – १ मे १९६०

🔅 महाराष्ट्राचे क्षेत्रफळ – ३,०७,७१३ चौ.किमी.


🔰 महाराष्ट्राची लोकसंख्या (२०११ नुसार) – ११,२३,७२,९७२

🔰 महाराष्ट्राची राजधानी – मुंबई

🔰 महाराष्ट्राची उपराजधानी – नागपूर

🔰 महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी - पुणे

🔰 महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी - कोल्हापूर

🔰 महाराष्ट्राचा आकार – त्रिकोणाकृती


🌊 महाराष्ट्राला लागून असलेला समुद्रकिनारा – ७२० कि.मी. 


🔅 महाराष्ट्रातील जिल्हे – ३६

🔅 महाराष्ट्रातील तालुके – ३५८

🔅 महाराष्ट्रातील महानगरपालिका – २७

🔅 महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा – ३४


⚜️ महाराष्ट्रातील महसूल विभाग (प्रशासकीय) महाराष्ट्रातील 

    प्रादेशिक विभाग – ५

⚜️  महाराष्ट्रातील कृषी हवामान विभाग – १

 

🔰  महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार – १५८’ उत्तर ते २२ उत्तर

🔰  महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार – ७२६ पुर्व ८९’ पूर्व रेखांश


🔰 महाराष्ट्राचे स्थान – उत्तर – पूर्व गोलाधार्त आहे.

🥉 कषेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतात क्रमांक – तिसरा


🔅 कषेत्रफळानुसार महाराष्ट्राची टक्केवारी – ९.३६%

🥈 भारताच्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्राचा भारतात 

     क्रमांक – दुसरा


🔅 भारताच्या लोकसंख्येनुसार महाराष्ट्राची टक्केवारी – ९.२८%

⚜️ मबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यात जिल्हा 

     परिषदा नाहीत.

⚜️ मबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका नाही.


⬆️ महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेले राज्य – मध्यप्रदेश

⬇️ महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेले राज्य – गोवा व कर्नाटक

➡️ महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेले राज्य – छत्तीसगड 

↘️ महाराष्ट्रच्या आग्नेयेला असलेले राज्य – तेलंगणा

↖️ महाराष्ट्राच्या वायव्येला असलेले राज्य – गुजरात, दादरा, नगर हवेली.


⏫  महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडील जिल्हा – नंदुरबार

⏬ महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडील जिल्हा – सिंधुदुर्ग

⏩ महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील जिल्हा – गडचिरोली

⏪ महाराष्ट्राच्या अतिपश्चिमेकडील जिल्हा – पालघर


🌊 सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा – ठाणे (२५km)

🌊 सर्वात जास्त समुद्रकिनारा - रत्नागिरी (२३७km)


🔰 महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा – नंदूरबार



1⃣ महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा – सिंधुदुर्ग

2⃣ महाराष्ट्रातील दुसरा पर्यटन जिल्हा – औरंगाबाद

3⃣ महाराष्ट्रातील तिसरा पर्यटन जिल्हा – नागपूर


🐿 महाराष्ट्राचा राज्यप्राणी - शेकरूखार

🕊 महाराष्ट्राचा राज्यपक्षी - हरियाल

🌼 महाराष्ट्राचे राज्यपूल – ताम्हन/जाराल

🦋  महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरा - ब्ल्यू मॉरमोन

🍋 महाराष्ट्राचे राज्य वृक्ष - आंबा


📚 महाराष्ट्राची राजभाषा – मराठी

🔰 महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा मध्यप्रदेश राज्याची लागून आहे.

🔰 महाराष्ट्राला सर्वात कमी सीमा गोवा राज्याची लागून आहे.


🔅 विदर्भाचे काश्मीर व नंदनवन – चिखलदरा

🔅महाराष्ट्राचे नंदनवन- महाबळेश्वर


🌧  महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे 

      ठिकाण – आंबोली (सिंधुदुर्ग)

⛈ महाराष्ट्रातील सर्वात जास्त दिवस पाऊस पडणारे 

     ठिकाण – गगनबावडा (कोल्हापूर)

☁️ महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण 

    - दहीवड व म्हसवड (सातारा)

🌧 महाराष्ट्रा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य 

     जास्त पडतो.

🌦 उन्हाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसाला किनारी भागात 

     आंबेसरी / आमसरी असे म्हणतात.

⛈ उन्हाळ्यामध्ये पडणाऱ्या पावसाला पठारी भागात अवकाळी

    किंवा वळवाचा पाऊस असे म्हणतात.

 🔅 हवामान संक्रामणाचा महिना – ऑक्टोबर

⛈ महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस जूलै महिन्यात पडतो.

🏔 समुद्रासपाटीपासून उंच जावे तसे तापमान कमी होत जाते..


🔅 महाराष्ट्रात सर्वात जास्त आढळणारी मृदा – काळी मृदा

🔅 काळ्या मृदेची निर्मिती बेसाल्ट खडकापासून होते

🔅 टिटॅनी फेरस मॅकोटाईट या घटकामुळे काळ्या मृदेला 

      काळा रंग येतो

🔅 काळ्या मृदेला रेगूर / रेगूड / कापसाची काळी मृदा 

     असेही म्हणतात

🔅 कापूस हे रेगूर मृदेतील अतिशय महत्त्वाचे पिक आहे.


🔰 मदा व जलसंधारण आयुक्तालय – औरंगाबाद

🔰 महाराष्ट्राचे वनांखालील एकूण क्षेत्र – २०.१२%

🔰 महाराष्ट्र राज्य वनविभागाचे मुख्यालय – नागपूर

🌳 महाराष्ट्रातील सर्वात जास्त वने असणारा जिल्हा – गडचिरोली

🌵महाराष्ट्रातील सर्वात कमी वने असणारा जिल्हा – लातूर

 

🔅 पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३४ क्षेत्र वनांखाली असणे आवश्यक आहे.


भारतीय संविधानाचे भाग


* •    भाग १ -* कलमे १-४ केंद्र आणि शासनाविषयी

------------------------------------------------

*•    भाग २ -* कलमे ५-११ नागरिकत्व

------------------------------------------------

*•    भाग ३ -* कलमे १२-३५ मूलभूत हक्क

•    कलमे १४-१८ समानतेचा हक्क,

•    कलमे १९-२२ स्वातंत्र्याचा हक्क,

•    कलमे २३-२४ शोषणाविरुद्धचा हक्क,

•    कलमे २५-२८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क,

•    कलमे २९-३१ सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क,

•    कलमे ३२-३५ सांविधानिक परिहाराचा हक्क.

------------------------------------------------

*•    भाग ४ -*

•  सरकारी कामकाजाविषयीकची सांविधानिक कलमे ३६ - ५१ 

•  कलम 40 -ग्रामपंचायतीचे संघटन 

•  कलम 41 - काम करण्याचा, शिक्षणाचा, गरजूंना सरकारी मदत मिळण्याचा अधिकार 

•  भाग ४(ऎ) कलम ५१ अ - प्रत्येक भारतीय नागरिकाचि मूलभूत कर्तव्ये. 

------------------------------------------------

*•  भाग ५ -*

•  प्रकरण १ - कलमे ५२-७८ 

•  कलमे ५२-७३ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत, 

•  कलमे ७४-७५ मंत्रीमंडळविषयक 

•  कलम ७६ भारताचे मुख्य ऍटर्नी, 

•  कलमे ७७-७८ सरकारच्या व्यवहाराबाबत 

•  प्रकरण २ - कलमे ७९-१२२ संसदेबाबत. 

•  कलमे ७९-८८ संसदेच्या संविधानाबाबत, 

•  कलमे ८९-९८ संसदेच्या आधिकारांबाबत, 

•  कलमे ९९-१०० 

•  कलमे १०१-१०४ सदस्यत्व रद्द करण्याबाबत 

•  कलमे १०५-१०६ संसद व खासदारांचे आधिकार आणि विशेषाधिकार यांच्या बाबत, 

•  कलमे १०७-१११ (law making process) 

•  कलमे ११२-११७ आर्थिक बाबींबाबत, 

•  कलमे ११८-१२२ 

•  प्रकरण ३ - कलम १२३ 

•  कलम १२३ संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींच्या आदेशाबाबत 

•  प्रकरण ४ - कलमे १२४-१४७ 

•  कलमे १२४-१४७ सर्वोच्च न्यायालयची रचना आणि संविधान याबाबत 

•  प्रकरण ५ - कलमे १४८-१५१ भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचेबाबत. 

•  कलमे १४८ - १५१ कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे आधिकार व कर्तव्ये यांबाबत 

------------------------------------------------ 

*भाग ६*- राज्यांच्याच्या बाबतची कलमे. 

•  प्रकरण १ - कलम १५२ भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या 

•  कलम १५२ - भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या - जम्मु आणि काश्मीर वगळून 

•  प्रकरण २ - कलमे १५३-१६७ कार्यांबाबत 

•  कलमे १५३-१६२ राज्यपालाच्या बाबत, 

•  कलमे १६३-१६४ मंत्रीमंडळावर, 

•  कलम १६५ राज्याच्या ऍड्व्होकेट-जनरल यांच्याबाबत. 

•  कलमे १६६-१६७ सरकारच्या व्यवहारिक गरजांबाबत. 

•  प्रकरण ३ - कलमे १६८ - २१२ राज्यांच्या शासनाशी निगडित. 

•  कलमे १६८ - १७७ सामान्य माहिती 

•  कलमे १७८ - १८७ राराज्यांच्या शासनाचे आधिकार 

•  कलमे १८८ - १८९ कार्यकलापाविषयी 

•  कलमे १९० - १९३ सदस्यत्व रद्द करण्याबाबत 

•  कलमे १९४ - १९५ विधीमंडळ सदस्यांचे आधिकार, सवलती, कायदेशीर संरक्षणे 

•  कलमे १९६ - २०१ कार्यकलापाविषयी 

•  कलमे २०२ - २०७ अर्थिक विषयासंबधी 

•  कलमे २०८ - २१२ इतर सामान्य विषयासंबधी 

•  प्रकरण ४ - कलम २१३ राज्यपालच्या आधिकाराबाबत 

•  कलम २१३ - राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयके. 

•  प्रकरण ५ - कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्चन्यायालयांच्या बाबत. 

•  कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्चन्यायालयांच्या बाबत. 

•  प्रकरण ६ - कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत. 

•  कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत 

------------------------------------------------

*•  भाग ७*- राज्यांच्या बाबतील कलमे. 

•  कलम २३८ - 

------------------------------------------------

*•  भाग ८* - केंद्रशासित प्रदेशांशी निगडीत कलमे 

•  कलमे २३९ - २४२ मंत्रीमंडळ रचना आणि उच्चन्यायालयांच्या बाबत 

------------------------------------------------

*•  भाग ९* - पंचायती पद्धतीबाबतची कलमे 

•  कलमे २४३ - २४३ ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धतीबाबत 

------------------------------------------------

*•  भाग ९ऎ*- नगरपालिकांबाबतची कलमे. 

•  कलमे २४३पी - २४३ झेड नगरपालिकांबाबत 

------------------------------------------------

*•  भाग १० - *

•  कलमे २४४ - २४४ऎ 

------------------------------------------------

*•  भाग ११* - केंद्र आणि राज्यांच्या संबंधांविषयी 

•  प्रकरण १ - कलमे २४५ - २५५ शासनाच्या आधिकारांच्या वितरणाविषयी 

•  कलमे २४५ - २५५ शासनाच्या आधिकारांच्या वितरणाविषयी 

•  प्रकरण २ - कलमे २५६ - २६३ 

•  कलमे २५६ - २६१ - सामान्य 

•  कलमे २६२ - पाण्याचा विवादाबाबत. 

•  कलमे २६३ - राज्यांचे परस्पर संबंध. 

------------------------------------------------

*•  भाग १२* - संपत्ती, मालमत्ता व दिवाणी दावे यांबाबत 

•  प्रकरण १ - कलमे २६४ - २९१ संपत्तीच्या बाबत 

•  कलमे २६४ - २६७ सामान्य 

•  कलमे २६८ - २८१ 

•  कलमे २८२ - २९१ इतर 

•  प्रकरण २ - कलमे २९२ - २९३ 

•कलमे २९२ - २९३ 

•  प्रकरण ३ - कलमे २९४ - ३०० 

•  कलमे २९४ - ३०० 

•  प्रकरण ४ - कलम ३००ऎ मालमत्तेच्या आधिकाराविषयक 

•  कलम ३००ऎ - 

------------------------------------------------

*•  भाग १३*- भारताच्या व्यापार आणि वाणिज्यविषयक कलमे 

•  कलमे ३०१ - ३०५ 

•  कलम ३०६ - 

•  कलम ३०७ - 

------------------------------------------------

*•  भाग १४ - *

•  प्रकरण ५ - कलमे ३०८ - ३१४ 

•  कलमे ३०८ - ३१३ 

•  कलम ३१४ - 

•  प्रकरण २ - कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम 

•  कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम 

--------------------------------------.........

*•  भाग १४ऎ* - आयोग च्या बाबत कलमे 

•  कलमे ३२३ऎ - ३२३बी 

---------------------------------------------

*•  भाग १५*- निवडणूक विषयक कलमे 

•  कलमे ३२४ - ३२९ निवडणूक विषयक कलमे 

•  कलम ३२९ ऎ - 

----------------------------------------------

*•  भाग १६* - 

•  कलमे ३३० -३४२ 

-------------------------------------------

*•  भाग १७*- अधिकृत भाषॆबाबतची कलमे 

•  प्रकरण १ - कलमे ३४३ - ३४४ केंद्र भाषॆबाबत 

•  कलमे ३४३ - ३४४ केंद्राच्या अधिकृत भाषॆबाबत 

•  प्रकरण २ - कलमे ३४५ - ३४७ प्रांतीय भाषॆबाबत 

•  कलमे ३४५ -३४७ प्रांतीय भाषॆबाबत 

•  प्रकरण ३ - कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादी 

•  कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादि 

•  प्रकरण ४ - कलमे ३५० - ३५१ विशेष निर्देश 

•  कलम ३५० - 

•  कलम ३५० ऎ - 

•  कलम ३५०बि - भाषिक अल्पसंख्यांकाविषयीचे कलम 

•  कलम ३५१ - हिंदी भाषॆविषयीक कलम 

-----------------------------------------------

*•  भाग १८ - आणीबाणी* परिस्थितीबाबतची कलमे 

•  कलमे ३५२ - ३५९ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे 

•  कलम ३५९ऎ - 

•  कलम ३६० - आर्थिक आणीबाणी

---------------------------------------------- 

*•  भाग १९ - इतर विषय*

•  कलमे ३६१ - ३६१ऎ - इतर विषय 

•  कलम ३६२ - 

•  कलमे ३६३ - ३६७ - इतर 

-----------------------------:-::-------------

*•  भाग २० -*

•  कलम ३६८ - घटनादुरुस्ती

---------------------------------------------

*•  भाग २१ -* 

•  कलमे ३६९ -३७८ऎ 

•  कलमे ३७९ - ३९१ - 

•  कलम ३९२ - आणीबाणीच्या परिस्थितीतील राष्ट्रपतींचे हक्क 

महानगरपालिका बद्दल संपूर्ण माहिती.


🅾3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात महानगरपालिका अस्तित्वात येऊ शकते.

🅾 महानगरपालिकेच्या निवडणुका दर पाच वर्षानी होतात.

🅾महानगरपालिकेच्या निवडून आलेल्या सदस्यापैकी एक महापौर तर एक उपमहापौर निवडला जातो.

🅾महापौराचा कालावधी 2.5 वर्षाचा असतो.

🅾 महानगर पालिकेतील निवडून आलेल्या सदस्यांना 'नगरसेवक' म्हणतात.

🅾महापौरास शहरातील प्रथम नागरिक असे संबोधतात.

🅾 महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त असतो.

🅾 आयुक्त हा भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ सनदी अधिकारी असतो.

🅾 महानगरपालिका आयुक्ताची नेमणूक राज्यसरकार तीन वर्षासाठी करते.

🅾महानगरपालिकेचे अंदाजपत्रक महानगरपालिका आयुक्त तयार करतो.

🅾महानगरपालिकेच्या बैठकांना हजर राहण्याचा अधिकार आयुक्तांना असतो.

🅾 सध्या महाराष्ट्रात 26 महानगरपालिका आहेत.

🅾 पिंपरी चिंचवड ही महानगरपालिका देशातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील श्रीमंत महानगरपालिका गणली जाते.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

युपीएससी परीक्षा म्हणजे नेमके काय ???

संघ लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आय.ए.एस.,आय.पी.एस.,आय.एफ.एस. यांसारख्या किमान १६ प्रकारच्या पदांसाठी परीक्षा घेतली जाते. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रीय तरुण मागे पडतात. याबाबत बऱ्याच वेळा चर्चा होताना दिसते. मात्र वस्तुस्थिती अशी आहे, की गेल्या काही वर्षांपासून संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांची संख्या आता वाढण्यास सुरुवात झाली आहे. २०११ मध्ये संघ लोकसेवा आयोगाने आपल्या परीक्षाप्रणालीत मोठा बदल केला. २०११ पूर्वी परीक्षार्थीला सामान्य अध्ययन पेपरबरोबर एक ऐच्छिक विषयाचा पेपर द्यावा लागत असे. २०११ मध्ये हा पूर्वपरीक्षांचे ऐच्छिक पेपर काढून टाकण्यात आला व त्यासाठी सी सॅटचा पेपर ठेवण्यात आला म्हणजे आता पूर्वपरीक्षेत पेपर १ (२०० गुण) आणि पेपर २ (२०० गुण) हे दोन वेगवेगळे पेपर असतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचा व संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षांचा अभ्यासक्रम तंतोतंत सारखा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना या दोन परीक्षांसाठी स्वतंत्र अभ्यास करावा लागत नाही. एम.पी.एस.सी व यू.पी.एस.सी या दोन्ही परीक्षांची तयारी बरोबरच सुरू केली तर या परीक्षांमध्ये यश मिळविणे सोपे होते.

१) अभ्यासाची सुरुवात :  पदवी परीक्षेचा अभ्यास करीत असतानाच   या परीक्षेची तयारी सुरू केल्यास फायदेशीर ठरते. मात्र काही कारणांमुळे या काळात अभ्यास करणे शक्य झाले नसल्यास  निराश होण्याचे कारण नाही. पदवीनंतर किमान एक वर्ष काही न करता फक्त या परीक्षेची तयारी करावी.

२) तयारी करताना सर्वप्रथम इ. ५ वी ते १० वी पर्यंत एन.सी.आर.टी.ची पुस्तके व्यवस्थित दोन ते तीन वेळेला वाचून टाकावीत. हा तयारीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.

३) अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वपूर्ण पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. आधुनिक भारताच्या इतिहासासाठी बिपिनचंद्र, स्वातंत्र्योत्तर भारत – बिपिनचंद्र, भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, भारताचा भूगोल – माजिद हुसन,  जिऑग्री थ्रु मॅप – के. सिद्धार्थ, विज्ञान आणि तंत्रज्ञान – विझार्ड पब्लिकेशन तसेच अर्थशात्रासाठी सर्वप्रथम अर्थशात्राच्या संकल्पना समजून दत्ता आणि सुंदरम किंवा रमेशसिंग यांची पुस्तके वाचावीत. मूलभूत पुस्तकांचेच वाचन तीन ते चार वेळा केल्यास जास्त फायदा होतो.

४) यूपीएससी  व एमपीएससी या दोन्ही परीक्षांच्या पूर्वपरीक्षेसाठी सी सॅट पेपर २ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे किंबहुना आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र होणार किंवा नाही, हे ठरविणारा हा पेपर आहे. या पेपरच्या बाबतीत मोठा विरोधाभास दिसून येतो. तो म्हणजे जे विद्यार्थी विज्ञान शाखेतील, इंजिनीअरिंग शाखेतील आहेत, त्यांना या पेपरची तयारी करणे सोपे जाते. या पेपरमध्ये हे विद्यार्थी सहजतेने पास होताना दिसतात. मात्र जे विद्यार्थी कला, वाणिज्य शाखेतील आहे, त्यांना या पेपरची तयारी करणे अवघड जाते. या पेपरच्या संदर्भात त्यांच्या मनात मोठा न्यूनगंड दिसतो म्हणून अशा विद्यार्थ्यांनी वर्षांच्या सुरुवातीपासूनच दिवसांतील काही वेळ या पेपरच्या तयारीस दिल्यास हा पेपर त्यांच्यासाठी देखील सोपा होऊ शकतो. ज्यांच्या मनात गणिताबद्दल भीती बसलेली आहे, त्यांनी हे लक्षात ठेवावे, की सी-सॅट पेपर २ म्हणजे गणिताचा पेपर नव्हे. मात्र गणित, बुद्धिमत्ता यांचे योग्य नियोजन व तयारी केल्यास ती तयारी या पेपरसाठी उपयोगी ठरते.

६) २०१३ च्या मुख्य परीक्षेत जे विद्यार्थी नियमित वृत्तपत्रांचे वाचन करत होते; तसेच ज्यांना आपल्या अवती-भोवती घडणाऱ्या घटनांबद्दल योग्य ज्ञान होते, त्यांनाच मुख्य परीक्षेचे पेपर सोपे गेले.(२०१३ मध्ये मुख्य परीक्षेसाठी संघ लोकसेवा आयोगाने बदल केला होता तो आपण पुढील भागात पाहणार आहोत.), या परीक्षेत सामान्य अध्ययनाच्या पेपर मध्ये (मुख्य) अडीचशे गुणांसाठी २५ प्रश्न विचारलेले होते. प्रत्येक प्रश्न १० गुणांसाठी होता व १० गुणांसाठी २०० शब्दांची शब्दमर्यादा दिलेली होती म्हणजेच थोडक्यात तीन तासांत ५ हजार शब्द लिहावयाचे होते. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी लिखाणाचा सराव मोठय़ा प्रमाणात करावा. हस्ताक्षर मात्र वाचनीय असावे.

७) परीक्षा मराठी माध्यमातून की इंग्रजी माध्यमातून द्यावी: मुख्य परीक्षा व मुलाखत आपण मराठी माध्यमात देऊ शकतो. फक्त एक इंग्रजीचा अनिवार्य ३०० गुणांचा पेपर इंग्रजीत लिहायचा असतो. या पेपरचे गुण अंतिम गुणांमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत. मात्र हा पेपर पास होणे आवश्यक असते. मुख्य परीक्षा ही मराठी माध्यामातून द्यावी की इंग्रजी माध्यमातून द्यावी हा एक नेहमीचा प्रश्न आहे.

जे विद्यार्थी विज्ञान शाखेतील आहेत व ज्यांना इंग्रजी बोलताना थोडी अडचण येते, ते मात्र शेवटपर्यंत गोंधळात असतात की पेपर मराठी माध्यमातून लिहावा की इंग्रजी माध्यमातून. जर मराठी माध्यमातून पेपर लिहिणार असेल, तर अभ्यास साहित्य मराठीतून वाचावे की इंग्रजीतून वाचावे येथून प्रश्नांना सुरुवात होते. खरंतर माध्यमाचा प्रश्न पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर येणार असतो.   जे विद्यार्थी कला, वाणिज्य शाखेतील आहेत व ज्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपण मराठी माध्यमातून पेपर लिहिणार असाल, तर मुख्य परीक्षेतील विज्ञान संदर्भात घटकांची तयारी करताना तो घटक मराठीत सांगणे अवघड जाते.  आता मराठी भाषेतून चांगली पुस्तके उपलब्ध झालेली आहेत. थोडक्यात पेपर मराठीतून किंवा इंग्रजीतून लिहावा याबाबत जास्त खल न करता सर्वप्रथम अभ्यासक्रम समजून त्यातील प्रत्येक उपघटकांवर आपली व्यवस्थित पकड निर्माण करावी. एकदा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हे ठरविणे जास्त सोपे होते की माध्यम कोणते निवडावे.

यूपीएससी (पूर्वपरीक्षा)- तयारी यूपीएससीची

प्रथम एमपीएससीची तयारी करून यूपीएससीची तयारी करावी की फक्त यूपीएससीची तयारी करावी? स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मनात हा संभ्रम असतो.


प्रथम एमपीएससीची तयारी करून यूपीएससीची तयारी करावी की फक्त यूपीएससीची तयारी करावी? 


स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मनात हा संभ्रम असतो. या प्रश्नाचे प्रत्येक तज्ज्ञाचे उत्तर वेगवेगळे असू शकेल. काहींच्या मते, यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त यूपीएससीची तयारी करावी. त्यांनी एमपीएससीची तयारी करण्यामध्ये वेळ वाया घालवू नये. व्यावहारिक पातळीवर बोलायचे झाले तर या दोन्ही परीक्षा परस्परांना पूरक आहेत. एमपीएससीची तयारी जर यूपीएससीच्या दृष्टिकोनातून केली तर दोन्ही पदांच्या परीक्षेसाठी तयारी होते. जर एखाद्या परीक्षेत अपयशी झालात तर दुसऱ्या परीक्षेच्या माध्यमाद्वारे पर्याय 


उपलब्ध असतो.


दर वर्षी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसतात. तुलनेने जागांची संख्या कमी असल्याने खूप चांगला अभ्यास करूनही यश प्राप्त होईलच, याची शाश्वती नसते. अशा वेळी दोन्ही परीक्षांची तयारी करत असाल तर दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतात. ज्यांना यूपीएससीची तयारी करायची आहे त्यांनी यूपीएससीच्या दृष्टिकोनातून एमपीएससीची तयारी करावी. अभ्यासक्रमाचे सखोल विश्लेषण केले तर लक्षात येईल की, दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच आहे. फक्त यूपीएससीसाठी एका वैकल्पिक विषयाचा अभ्यास करावा लागतो.


यूपीएससी पूर्वपरीक्षेची तयारी : कशी? केव्हापासून?


खरेतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी पदवी परीक्षेच्या प्रथम वर्षांपासूनच सुरुवात करावी. पदवी मिळेपर्यंत या परीक्षेसाठी अभ्यासाव्या लागणाऱ्या पुस्तकांचे वाचन होणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची तयारीदेखील या काळात पूर्ण करता येईल. उदा. काही विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व नसेल तर या तीन वर्षांच्या काळात इंग्रजीच्या लेखन-वाचनाचा सराव करून त्यावर प्रभुत्व मिळवता येईल. जे विद्यार्थी लिखाणात मागे आहेत, त्यांना लेखनावर काम करता येईल. या परीक्षेसाठी अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. ते या कालावधीत पूर्ण होऊ शकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘एनसीईआरटी’ची पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके वाचून काढता येतील. थोडक्यात, या कालावधीत अभ्यासाची पूर्वतयारी केली तर पदवी मिळेपर्यंत जवळपास ८० टक्के अभ्यास आरामात पूर्ण होईल आणि यश मिळण्याची शक्यता वाढेल.


मात्र बऱ्याचदा या परीक्षेची माहिती विद्यार्थ्यांना उशिरा कळते. त्यामुळे अनेकांची या परीक्षेची तयारी पदवीनंतर सुरू होते. या वेळी निराश न होता, ‘जब जागे तब सबेरा’ या नियमानुसार अभ्यासाला सुरुवात करावी.


* ज्यांना तयारीला सुरुवात करायची आहे त्यांनी सर्वप्रथम पाचवी ते दहावीपर्यंतची ‘एनसीईआरटी’ची पुस्तके सविस्तर वाचावीत. हा तयारीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे.


* यानंतर अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वाच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. 

🔶 प्रचिन भारताचा इतिहास- र स शर्मा 

🔶 मध्यकालीन भारत- सतीश चंद्र 

🔶 जागाच इतिहास- जान माधुर के सागर आनुवाद मराठी 

🔶 सामाजिक समस्या- राम आहूजा हिंदी में 

🔶 Ethics GS- माधवी कवि, Unique Academy 

🔶 आंतरिक सुरक्षा- Tata magro हिंदी में 

🔶 आंतराठिय संबंध- डाँ शोलौद देवळणकर 

🔷 NCERT Geography, 6,7,9,11 

🔷 NCERT History- 6.7,12

🔷 आधुनिक भारताच्या इतिहास- बिपिनचंद्र, 

🔷 स्वातंत्र्योत्तर भारत- बिपिनचंद्र, 

🔷 भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, 

🔷 भारताचा भूगोल- माजिद हुसन, 

🔷 जिऑग्री थ्रू मॅप- के. सिद्धार्थ, 

🔷 विज्ञान आणि तंत्रज्ञान- विझार्ड पब्लिकेशन तसेच 


अर्थशास्त्रासाठी सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी दत्ता आणि सुंदरम किंवा रमेश सिंग यांची पुस्तके वाचावीत.


* वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा वर उल्लेख केलेल्या मूलभूत पुस्तकांचे सखोल वाचन तीन ते चार वेळा केल्यास परीक्षार्थीना अधिक फायदा होईल. परीक्षेसंबंधी उपलब्ध असलेले सर्व अभ्याससाहित्य वाचणे आवाक्याच्या पलीकडचे ठरेल. गेल्या दोन वर्षांचे मुख्य परीक्षेचे पेपर पाहिल्यास सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे ज्यांना यूपीएससीची तयारी करायची असेल त्यांनी लिखाणाचा अधिकाधिक सराव करावा.


नोकरी करून यूूपीएससी परीक्षेचा अभ्यास करायला जमेल का?


नोकरी करून यूपीएससी परीक्षा द्यायची असेल तर लक्षात ठेवायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही स्पर्धापरीक्षा आहे. संपूर्ण देशभरातून या परीक्षेला सुमारे १०-१२ लाख विद्यार्थी बसतात. शक्य असल्यास या परीक्षेच्या तयारीसाठी एक वर्ष पूर्णवेळ अभ्यास करणे आवश्यक आहे. 


👉 योग्य मार्गदर्शकाची आवश्यक आहे,

परमुख राजवंश आणि संस्थापक

▪️ हर्यक वंश                    - बिम्बिसार


▪️ नन्द वंश                      - महापदम नन्द


▪️ मौर्य साम्राज्य              - चन्द्रगुप्त मौर्य


▪️ गप्त वंश                      - श्रीगुप्त


▪️ पाल वंश                      - गोपाल


▪️ पल्लव वंश                   - सिंहविष्णु


▪️ राष्ट्रकूट वंश                  - दन्तिदुर्ग


▪️ चालुक्य-वातापी वंश     - पुलकेशिन प्रथम


▪️ चालुक्य-कल्याणी वंश  - तैलप-द्वितीय


▪️ चोल वंश                      - विजयालय


▪️ सन वंश                       - सामन्तसेन


▪️ गर्जर प्रतिहार वंश         - हरिश्चंद्र/नागभट्ट


▪️ चौहान वंश                  - वासुदेव


▪️ चदेल वंश                    - नन्नुक


▪️ गलाम वंश                  - कुतुबुद्दीन ऐबक


▪️ खिलजी वंश  - जलालुद्दीन फिरोज ख़िलजी


▪️ तगलक वंश                - गयासुद्दीन तुगलक


▪️ सयद वंश                    - खिज्र खान


▪️ लोदी वंश                    - बहलोल लोदी


▪️ विजयनगर साम्राज्य     - हरिहर / बुक्का


▪️ बहमनी साम्राज्य          - हसन गंगू


▪️ मगल वंश                    - बाबर

१२ मार्च २०२४

भारताच्या बचाव मोहिमा

1] ऑपरेशन गंगा :- युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
2] ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
3] ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
4] ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन.
5] ऑपरेशन कावेरी :- सुदान मधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
6] ऑपरेशन अजय :- इस्राएल मधून भारतीयांना परत आणण्यासाठी.
7] ऑपरेशन राहत :- येमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणले.

नारायण मेघाजी लोखंडे

नारायण मेघाजी लोखंडे (१८४८-१८९७)
जन्म: ८ फेब्रुवारी १८४८
मृत्यू : ९ फेब्रुवारी १८९७ प्लेगमुळे (ठाणे)

✍मूळ गाव : कव्हेरसर ता. सासवड जि. पुणे फुलमाळी शेतकरी कुटूंब पत्नी गोपिकाबाई, मुलगा गोपीनाथ
✍अतिशय गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

✍सुरूवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात नोकरी केली. नंतर मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली.
मांडवी येथे नोकरी करत असताना तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले. त्यांना आठवड्याची सुट्टी नसे परिणामी त्यांनी नोकरी सोडून स्वतः कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले.
✍१८७३ लोखंडे हे सत्यशोधक समाजाचे निष्ठावंत सहकारी.
✍१८७५ मुंबईतील कापडगिरणीच्या कामगारांच्या आंदोलनामुळे ब्रिटीश सरकारने कामगारांच्या स्थितीचा व त्यात सुधारणा करण्यासाठी आयोग नेमला.
✍१८८० दीनबंधू सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र मुंबईमध्ये पुन्हा सुरू केले.
१८८१ इंग्रज सरकारला कारखाना कायद्यात सुधारणा करणे भाग पाडले. चार भरपगारी महिन्यातून सुट्ट्या कामगारांना मिळू लागल्या.
✍१८८३ टिळक व आगरकरांची बर्वे प्रकरणात सुटका झाल्यावर त्यांचा सत्कार केला.
✍१८८४ दुसरा कामगार कायदा आयोग नेमण्यात आला. या अयोगामुळे कामगारांच्या स्थितीत सुधारणा घडल्या नाहीत.
✍सप्टेंबर १८८४ पहिली मोठी कामगार परिषद मुंबई येथे भरवली. (५५०० कामगारांचे लेखी निवेदन पाठवले.)
✍️ १८९० मुंबई गिरणी कामगार संघ नावाची देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. (बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन)
१० जून १८९० पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली.
✍१८९१ कामगार कायदा संमत करून त्यात लोखंडे यांच्या काही सूचनांचा समावेश केला.
✍१८९१ ब्रिटीश सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन (J. P. Justice of Pience) हा किताब दिला.
✍ १८९३-९४ मुंबईतील हिंदू-मुस्लीम दंगल मिटवण्यात मोठी भूमिका त्यामुळे सरकारने रावबहादूर ही पदवी बहाल केली.
✍ते निर्भिड वक्ते, झुंझार लेखक, संपादक, मुद्रक होते.
✍लोखंडे हे महात्मा फुलेंच्या सत्याशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते.
भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळख.
✍• प्लेग ग्रस्तांसाठी मराठा हॉस्पिटल काढले.
पंचदर्पण हे पुस्तक व गुराखी हे दैनिक काढले.
✍ सक्तीचे शिक्षण, दारूबंदी, विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांच्या समस्या यांना दीनबंधूतून वाचा फोडली
✍. • मृत्यू ९ फेब्रुवारी १८९७ (प्लेगमुळे ठाणे)

११ मार्च २०२४

CAA 2019: महत्त्वाचे मुद्दे

Citizenship Amendment Act 2019
नागरिकत्व (सुधारणा) कायदा 2019

- नागरिकत्व कायदा, 1955 भारतीय नागरिकत्व संपादन, निर्धार आणि समाप्तीची तरतूद करतो. भारताचे नागरिकत्व जन्माने (कलम-3), वंशाद्वारे (कलम 4), नोंदणीद्वारे (कलम 5) किंवा नैसर्गिकीकरण (कलम 6) किंवा प्रदेश समाविष्ट करून (कलम 7) मिळवता येते. पात्र झाल्यावर कोणताही परदेशी नागरिक नोंदणी करून किंवा त्याच्या देशाचा किंवा त्याच्या समुदायाचा विचार न करता नागरिकत्व मिळवू शकतो.

- CAA भारतीय नागरिकांना लागू होत नाही. ते पूर्णपणे प्रभावित नाहीत. हे तीन शेजारील देशांमध्ये त्यांच्या धर्माच्या आधारावर छळ सहन केलेल्या विशिष्ट परदेशी लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याचा प्रयत्न करते.

- गेल्या सहा वर्षांत अंदाजे 2830 पाकिस्तानी नागरिकांना, 912 अफगाणी नागरिकांना आणि 172 बांगलादेशी नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. त्यापैकी शेकडो लोक या तिन्ही देशांतील बहुसंख्य समुदायातील आहेत. अशा स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळत राहते आणि त्यांनी नोंदणी किंवा नैसर्गिकीकरणासाठी कायद्यात आधीच प्रदान केलेल्या पात्रतेच्या अटी पूर्ण केल्यास ते मिळत राहतील. 2014 मध्ये दोन्ही देशांमधील सीमा करारानंतर बांगलादेशातील 50 हून अधिक एन्क्लेव्ह भारतीय हद्दीत समाविष्ट केल्यानंतर सुमारे 14,864 बांगलादेशी नागरिकांनाही भारतीय नागरिकत्व देण्यात आले.

- सीएए राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत क्षेत्रे आणि इनर लाइन परमिट सिस्टीममध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रांना वगळून ईशान्य प्रदेशातील आदिवासी आणि स्थानिक लोकांच्या हिताचे रक्षण करते. या भागात राहणारे असे स्थलांतरित भारतीय नागरिकांसाठी अर्ज करू शकणार नाहीत. त्यामुळे स्वदेशी लोकसंख्येवर विदेशी लोकांचा ओघ येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. CAA 31 डिसेंबर 2014 ची कट-ऑफ तारीख प्रदान करते. त्यामुळे असे स्थलांतरित गेल्या अनेक वर्षांपासून भारतात आहेत.

- CAA परदेशातील कोणत्याही धार्मिक समुदायाला लक्ष्य करत नाही. हे केवळ काही स्थलांतरितांसाठी एक यंत्रणा प्रदान करते.

- नागरिकत्व (सुधारणा) कायदा, 2019 (CAA) तीन विशिष्ट देशांतील सहा अल्पसंख्याक समुदायातील स्थलांतरित/परदेशींना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास सक्षम करते जे त्यांच्या धर्माच्या कारणास्तव छळामुळे भारतात आले आहेत. हे कोणत्याही विद्यमान कायदेशीर तरतुदीत सुधारणा करत नाही ज्यामुळे कोणत्याही वर्ग, पंथ, धर्म, श्रेणी इत्यादी कोणत्याही परदेशी व्यक्तीला नोंदणी किंवा नैसर्गिकरण पद्धतींद्वारे भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो. अशा परदेशी व्यक्तीने किमान कायदेशीर आवश्यकता पूर्ण केल्यानंतर नागरिकत्वासाठी अर्ज करण्यास पात्र बनले पाहिजे.

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

Q.1) प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थलापती यांनी कोणत्या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला?
उत्तर - तमिझगा वेत्री कळघम (TVK)

Q.2) नुकतेच वित्त आयोगाच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - डॉ राजाध्यक्ष

Q.3) सलग सहा वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या अर्थमंत्री कोण ठरल्या आहेत?
उत्तर – निर्मला सीतारामन

Q.4) खेलो इंडिया विंटर गेम 2024 च्या शुभंनकराला काय नाव देण्यात आले आहे?
उत्तर – शीन-ए-शी

Q.5) ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलद्वारे प्रकाशित करप्शन परप्शन इंडेक्स 2023 मध्ये भारत किती वाजता आली आहे?
उत्तर – 93 व्या

Q.6) अलीकडेच प्रकाशित भारतातील हिमबिट्या स्थितीबाबतच्या अहवालानुसार भारतातील हिम बिबट्यांची संख्या किती आहे?
उत्तर – 718

Q.7) भारत ऊर्जा सप्ताहाची दुसरी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे?
उत्तर – गोवा

Q.8) अलीकडेच राष्ट्रपती द्रोपती मर्मु यांनी राज्यसभा सदस्य म्हणून कोणाला नामनिर्देशित केले आहे?
उत्तर – सतनाम सिंग संधू

Q.9) महाराष्ट्राचे उदय विश्वनाथ देशपांडे यांना 2024 चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे तर ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
उत्तर – मल्लखांब

Q.10) मेघालय खेळांच्या 5व्या आवृत्तीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
उत्तर – द्रोपती मुर्मु

Q.11) सुलतान इब्राहिम इस्कंदर हे कोणत्या देशाची 17वे राजा बनले आहेत?
उत्तर – मलेशिया

Q.12) नुकतेच प्रकाशित करण्यात आलेल्या ‘एक समंदर, मेरे अंदर’ या कवितासंग्रहाचे लेखक कोण आहेत?
उत्तर – संजीव कुमार जोशी

Q.13) जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा करण्यात येतो?
उत्तर – 2 फेब्रुवारी

Q.14) भारतीय तटरक्षक दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर – 1 फेब्रुवारी

Q.15) अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डावरील बंदी उठवली आहे?
उत्तर –  श्रीलंका

प्रश्न – नुकताच ‘जागतिक कर्करोग दिन’ 2024 कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – ४ फेब्रुवारी

प्रश्न – कोरोमंडल खतावर अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 5.92 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे?
उत्तर - तामिळनाडू

प्रश्न – NCPCR ने नुकतेच मुलांचे पुनर्संचयित करण्यासाठी आणि त्यांना परत आणण्यासाठी कोणत्या पोर्टलचे अनावरण केले आहे?
उत्तर – घर आणि ट्रॅक चाइल्ड

प्रश्न – अलीकडेच, आर्थिक वर्ष 2024-25 साठी सार्वभौम सुवर्ण रोखे जारी करण्याची रक्कम किती करण्यात आली आहे?
उत्तर - 3500

प्रश्न – कोणत्या देशाने अलीकडेच भारताला ३१ प्रिडेटर ड्रोन विकण्याची परवानगी दिली आहे?
उत्तर अमेरीका

प्रश्न – पूर्व क्षेत्र कृषी मेळा 2024 नुकताच कुठे सुरू झाला?
उत्तर - झारखंड

प्रश्न – अलीकडेच जरी रितू बहरी यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - उत्तराखंड

प्रश्न – माहिती आणि प्रसारण सचिव म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - संजय जाजू

प्रश्न – नुकताच केरळमधील शंकर स्मृती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर – ईश्वरी प्रसाद नंबूदिरी

प्रश्न – नुकताच आंतरराष्ट्रीय डार्विन दिवस कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – १२ फेब्रुवारी

प्रश्न – अलीकडेच, कोणत्या राज्याने देशात प्रथमच सेमीकंडक्टर धोरण लागू केले आहे?
उत्तर - उत्तर प्रदेश

प्रश्न – सुत्तूर यात्रा महोत्सव 2024 नुकताच कोठे सुरू झाला?
उत्तर - कर्नाटक

प्रश्न – अलीकडेच श्रीलंका आणि कोणत्या देशाने अक्षरशः UPI सेवा सुरू केली आहे?
उत्तर - मॉरिशस

प्रश्न – कोणत्या IIT ने अलीकडेच प्रगत आरोग्य सेवेसाठी स्वास्थ प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे?
उत्तर - IIT गुवाहाटी

प्रश्न – अलीकडेच अलेक्झांडर स्टबने कोणत्या देशाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे?
उत्तर - फिनलंड

प्रश्न – अलीकडेच कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने 'जादुई उपायांवर' बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे?
उत्तर - आसाम

प्रश्न – अलीकडेच पीपी नंबियार पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - एस सोमनाथ

चालू घडामोडी :- 10 मार्च 2024

◆ 10 मार्च रोजी भारतात ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल स्थापना दिवस’ साजरा केला जाणार आहे.

◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 12 मार्च रोजी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

◆ ‘देवेंद्र झझारिया’ भारतीय पॅरालिम्पिक समितीचे (PCI) नवे अध्यक्ष बनले आहेत.

◆ इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये 700 बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.

◆ रमेश सिंग अरोरा हे पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील पहिले शीख मंत्री बनले आहेत.

◆ केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बेंगळुरूमध्ये भारतातील सर्वात वेगवान 'मल्टीप्रोटोकॉल लेबल स्विचिंग राउटर' लाँच केले आहे.

◆ भारत आणि बांगलादेश दरम्यान 54 वी महासंचालक स्तरावरील परिषद झाली.

◆ हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी 'शहीद राजा हसन खान मेवाती' यांच्या 15 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले.

◆ पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सहअध्यक्ष असिफ अली झरदारी यांची पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी(14वे राष्ट्राध्यक्ष) निवड करण्यात आली.

◆ असिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे दोनवेळा राष्ट्राध्यक्ष होणारे ते बिगर लष्करी नेते आहेत.

◆ 2020-21 साठी देण्यात येणारा शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक पुण्यातील जनसेवा फाउंडेशनला जाहीर करण्यात आला आहे.

◆ सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ या पक्षाला सत्ता स्थापन करता आली नाही.

◆ जगभरातील 112 देशांतील सौंदर्यवतींनी हजेरी लावलेल्या व मुंबईत रंगलेल्या 'मिस वर्ल्ड 2024' स्पर्धेत चेक रिपब्लिकच्या 'क्रिस्तिना पिझकोव्हा' ठरली 'मिस वर्ल्ड'ची मानकरी.

◆ 71व्या 'मिस वर्ल्ड' स्पर्धेत लेबनॉनच्या यास्मिना झेतौन हिने द्वितीय स्थान पटकावले.

◆ 28 वर्षांनी भारतात झालेल्या या स्पर्धेत भारताच्या सिन्नी शेट्टी हिने भारताचे प्रतिनिधित्व केले.

◆ भारताने आतापर्यंत सहा वेळा 'मिस वर्ल्ड' ही स्पर्धा जिंकलेली आहे.

◆ 13 हजार फूट उंचीवरील जागतील सर्वाधिक लांबीच्या "सेला" बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 मार्च 2024 रोजी अरुणाचल प्रदेशात केले.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

नवरत्न दर्जा प्राप्त उद्योग (ऑक्टोबर 2023 पर्यंत)

1) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL)
2) कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
3) इंजिनियर्स इंडिया लिमिटेड
4) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
5) महानगर टेलिफोन निगम लिमिटेड
6) नॅशनल ल्युमिनियम कंपनी लिमिटेड
7) नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड
8) एनएमडीसी लिमिटेड
9) नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड
10) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड
11) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
12) रेल विकास निगम लिमिटेड
13) ओएनजीसी विदेश लिमिटेड
14) राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड
15) इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड (IRCON)
16) RITES लिमिटेड

नवरत्न दर्जा :- 1997 पासून नवरत्न दर्जा दिला जातो.

यासाठी खालील निकष पूर्ण करावे लागता :-
1] कंपनीला मिनीरत्न (श्रेणी-1) दर्जा असावा.
2] गेल्या पाच वर्षांपैकी तीन वर्षांमध्ये मेमोरँडम ऑफ अंडरस्टैंडिंग सिस्टम अंतर्गत 'उत्कृष्ट' किंवा 'अतिशय चांगले' रेटिंग प्राप्त केलेले असावे.
3] त्या कंपनीच्या संचालक मंडळावर 4 स्वतंत्र संचालक असावे.
4] पुढील सहा निवडलेल्या कामगिरी निकषांमध्ये 60 किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त होणे गरजेचे असते.
a] निव्वळ मूल्याशी निव्वळ नफ्याचे प्रमाण
b] एकूण उत्पादन खर्चापैकी एकूण मनुष्यबळ खर्च
c] नफ्याचे वापरलेल्या भांडवलाशी प्रमाण
d] नफ्याचे उलाढालीशी प्रमाण
e] प्रती शेअर प्राप्ती
f] अंतर-क्षेत्रीय प्रगती

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...