09 January 2024

MPSC Combine Syllabus 2024

1) इतिहास – आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास.

2) भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.

3) अर्थव्यवस्था –

  • भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
  • शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.

4) चालू घडामोडी – जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.

5) राज्यशास्त्र

6) सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).

7) अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी

8) बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

MPSC Group B & Group C Combine Mains Syllabus 2023

MPSC Combine Mains : Paper 1

पेपर क्रमांक – 1 (मराठी, इंग्रजी या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.)

1) मराठी : सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

2) इंग्रजी : Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

MPSC Combine Mains : Paper 2

पेपर क्रमांक – 2 (सामान्य क्षमता चाचणी या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.)

1) सामान्य बुध्दिमापन व आकलन : उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

2) चालू घडामोडी : जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.

3) अंकगणित व सांख्यिकी

4) माहितीचा अधिकार अधिनियम 2005 (as updated) व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

5) भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादी :

घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधी समित्या इत्यादी

6) आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास :

सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी

7) भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल :

महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक (Physical) भूगोल, मुख्य प्राकृतिक (Physiographic) विभाग, हवामान शास्त्र (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भुरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population) व त्याचे उगम (Source) आणि इष्टस्थानावरील (Destination) परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.

पर्यावरण – मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य / राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संघटना / संस्था इत्यादी.

8) सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :

  • अ) भौतिकशास्त्र (Physics)
  • ब) रसायनशास्त्र (Chemistry)
  • क) प्राणीशास्त्र (Zoology)
  • ड) वनस्पतीशास्त्र (Botany)
  • इ) दूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन (Remote Sensing, | Aerial and drone photography, Geographic Information System (GIS) and it’s application etc.)
  • फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (Information and communication technology.)

9) अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र :

समग्रलक्षी अर्थशास्त्र

  • १.१ समग्रलक्षी अर्थशास्त्र
  • १.२ वृद्धी आणि विकास
  • १.३ सार्वजनिक वित्त
  • १.४ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल

भारतीय अर्थव्यवस्था

  • २.१ भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा
  • २.२ भारतीय शेती व ग्रामीण विकास
  • २.३ सहकार
  • २.४ मौद्रिक व वित्तीय क्षेत्र
  • २.५ सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था
  • २.६ उद्योग व सेवा क्षेत्र
  • २.७ पायाभूत सुविधा विकास
  • २.८ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल
  • २.९ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

मार्गदर्शक तत्वे आणि घटनादुरुस्त्या

मार्गदर्शक तत्वांमध्ये आजपर्यंत एकूण 5 घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.


A) 42 वी घटनादुरुस्ती 1976 : 

42 व्या घटनादुरुस्तीने एकूण 4 दुरुस्त्या करण्यात आल्या. त्या पुढीलप्रमाणे - 

1) कलम 39f - "बालकांना व युवकांना" शोषणापासून संरक्षण ठेऊन आरोग्य पूर्ण विकासाची संधी उपलब्ध  करून द्यावी.

2) 39A - राज्य," सामान्य न्याय व निःशुल्क कायदे सहाय्य" समान संधीच्या तत्वावर न्यायास प्रोत्साहन देईल व  आर्थिक बाबीमुळे नागरिकाला न्याय मिळण्याची संधी नाकारली जाऊ नये यासाठी मोफत कायदे विषयक सहाय्य देईल

3) 43A - औद्योगिक व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग वाढवण्यासाठी राज्य कायद्याने उपाययोजना करेल.

4) 48A - पर्यावरण संरक्षण व संवर्धन आणि वन्य व वन्यजीवांचे रक्षण करणे.


B) 44 वी घटनादुरुस्ती 1978 : 

या घटनादुरुस्ती नुसार 1 च कलम समाविष्ट करण्यात आले. तो पुढीलप्रमाणे- 

1) कलम 38(2) - राज्य, उत्पन्न, दर्जा, संधी यांच्या बाबतीतील विषमता कमी करेल.


C)97 वी घटनादुरुस्ती 2011 : 

या घटनादुरुस्ती नुसार 1 च कलम समाविष्ट करण्यात आले.तो पुढीलप्रमाणे - 

1) कलम 43B - राज्य, "सहकारी सोसायट्यांच्या निर्मिती व व्यवस्थापन" यास प्रोत्साहन देईल.


D) 7 वी घटना दुरुस्ती 1956 :

या घटनादुरुस्ती नुसार कलम 49 मध्ये "कायद्याने घोषित ऐतिहासिक" असा बदल केला गेला.


E) 86 वी घटनादुरुस्ती 2002 :

या घटनादुरुस्ती नुसार नवीन कलम समाविष्ट केलेले नसून फक्त कलमात बदल करण्यात आला. तो पुढीलप्रमाणे - 

1) कलम 45 मध्ये पूर्वी 6 ते 14 वयोगटातील मुलांना राज्य हे निःशुल्क शिक्षण देईल अशी तरतूद होती मात्र 86 व्या घटनादुरुस्ती नुसार 0 ते 6 वयोगटातील मूलांच्या शिक्षणाची व बालसंगोपन करण्याची जबाबदारी राज्याची असेल अशी तरतूद आहे.

भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी

🔶 भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते. 


🔶 भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.


📚 संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश📚


▪️ मूलभूत हक्क : अमेरिका

▪️ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

▪️ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

▪️ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

▪️ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

▪️ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

▪️ संघराज्य पद्धत : कॅनडा

▪️ शेष अधिकार : कॅनडा'

▪️ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

▪️ कायदा निर्मिती : इंग्लंड

▪️ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

▪️ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

मार्गदर्शक तत्वे

भाग 4 : – राज्याचे मार्गदर्शक तत्वे  (कलम 36 ते 51 )

राज्याचे मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंडकडून घेतले. राज्याने कसे वागावे हे यामध्ये सांगितलेले आहे. आयर्लंडने हे स्पेन कडून घेतले आहे.

मार्गदर्शक तत्वांच्या विरोधात व्यक्तीला न्यायालयात दाद मागता येत नाही.


मार्गदर्शक तत्वे आयर्लंड या देशाकडून घेण्यात आलेले आहे व हे भारतीय संविधानाच्या भाग ४ मध्ये कलम 36 ते 51 मध्ये देण्यात आलेले आहे.


हे तत्व सामाजिक न्याय घटनेशी निगडित आहे व कार्यपालिकेत कार्य करण्यासाठी हे तत्व मार्गदर्शन देतात.


कलम 36 :-

यात राज्याची व्याख्या करण्यात आलेली आहे व ही तीच व्याख्या आहे जी कलम 12 मध्ये देण्यात आलेली आहे.
यामध्ये कल्याणकारी राज्याची निर्मिती चा उल्लेख केला आहे. आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करणे, प्रास्ताविकेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुतेचे आदर्श साध्य करणे.

कलम 37:- मार्गदर्शक तत्वांना न्यायालयीन कक्षाच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. जर मार्गदर्शक तत्व मिळाले नाही तर तुम्ही कोर्टमधे जाऊ शकत नाही.

कलम 38: – कल्याणकारी राज्याची व्याख्या

ज्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय दिला जाईल व यात वाढ करण्याचे प्रयत्न केले जातील.

कलम 39 -1 :- राज्य (सरकार) सर्व व्यक्तींना जीवनउपयोगी किंवा जीवनाकरिता सर्व साधन उपलब्ध करून देईल.

कलम 39 -2: – राज्य समान कार्यासाठी समान वेतन देईल.

कलम 39 -3:- राज्य आर्थिक शोषणाच्या विरुद्ध अधिकार करून देईल.

कलम 39 -4:- यानुसार पालक अल्पवयीन व्यक्ती यांचे शोषणाचे संरक्षण करेल. व त्यांना स्वतंत्र आयुष्य जगण्याचे संधी उपलब्ध करून देईल. तसेच आरोग्य सुविधाकरिता कार्य योजना लागू करेल. (पोलिओ, अंगणवाडी)

कलम 39 -5:- समान न्याय व निःशुल्क न्यायव्यवस्था

कलम 39 -6:- यानुसार आर्थिक व्यवस्था राज्य निर्माण करेल म्हणजे खूप गरीब आणि खूप श्रीमंत होणार नाही म्हणजे समाजवादी न्यायव्यवस्था निर्माण करायची आहे.

कलम 40:- गांधीवादी तत्व (73वी घ. दु. 1992)

राज्य पंचायत राज निर्माण करण्याचे प्रयन्त करेल. पहिली ग्रामपंचायत 2 Oct 1959 रोजी नागौर जिल्हा राजस्थानमध्ये स्थापन करण्यात आली.

कलम 41:- शिक्षण रोजगार (कामाचा, शिक्षणाचा व विशिष्ठ बाबींचा सार्वजनिक सहाय्याचा अधिकार )

राज्य हे आपले आर्थिक क्षमतेच्या मर्यादित राहून कामाचा, शिक्षणाचा आणि बेकारी, आजार व विकलांगतेच्या स्थितीत सार्वजनिक साहाय्य हक्क उपलब्ध करून देणार.

बरेचश्या राज्यात या अंतर्गतच बेरोजगारी भत्ता, निराधार योजना, जीवनदायी योजना, ज्येष्ठ नागरिक योजना इत्यादी लागू केले आहे.

कलम 42:- Maternity Leave

कामाची परिस्थिती आणि मातृत्व साहाय्य याबाबतीत न्याय्य आणि सहृदयी व्यवस्था.
राज्य महिलांच्या प्रसूतीच्या वेळी विविध आरोग्य सुविधा निर्माण करून देईल.

उदा:- जसे की आर्थिक साहाय्य्य, वैद्यकीय साहाय्य्य

कलम 43:- कामगारांना निर्वाह वेतन

राज्य सर्व कामगारांना योग्य रीतीने निर्वाह वेतन देण्याची परिस्थिती निर्माण करेल.

कलम 43A:- 42 वी घ. दु. 1976 अनुसार संविधानात टाकण्यात आली. उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग

कलम 43B:- राज्य सहकारी सोसायटींकरिता प्रोत्साहन देण्यास प्रयन्तशील असेल. 97 वी घ. दु. 2011 अनुसार यांचा समावेश करण्यात आला.

कलम 44:- आचारसंहिता (Uniform Civil Code) लागू करण्याचा प्रयत्न राज्यांनी नेहमी करावा. नागरिकांना एकरूप नागरी संहिता. वैयक्तिक कायदे एकत्र करून सर्व नागरिकांना समान वागणूक प्रस्थापित करणे. संपूर्ण भारतीय राज्यक्षेत्रात सर्व नागरिकांना एकरूप नागरी संहिता प्राप्त करून देण्यासाठी राज्यसंस्था प्रयन्तशील राहील. 

कलम 45:- 6 वर्षाखालील बालकांचे संगोपन व त्यांच्या शिक्षणाची तरतूद.
राज्य ६ वर्षाखालील बालकांचे संगोपन व त्यांच्या शिक्षणाची तरतूद करेल.

पूर्वीच्या कलम ४५ ची तरतूद खालीलप्रमाणे होती.
राज्यसंस्था घटनेचा अंमल सुरु झाल्यापासून १० वर्षाच्या आत १४ वर्षाखालील बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी प्रयन्तशील राहील. हे एकच असे कलम आहे ज्याला कालमर्यादा दिली होती.

कलम 46:- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन सरकार करेल.
राज्यसंस्था दुर्बल घटकांचे विशेषतः अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे विशेष काळजीपूर्वक हितसंवर्धन करेल.
राज्यसंस्था त्यांचे सामाजिक अन्याय व इतर सर्व प्रकारच्या शोषणापासून संरंक्षण करेल.

कलम 47:- पोषणमान व राहणीमान उंचावणे, दारूबंदी आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचे कर्त्यव्य असेल.
नागरिकांचे पोषणमान, राहणीमान तसेच सार्वजनिक आरोग्य सुधारणे. ह्या गोष्टी राज्यसंस्थेच्या प्राथमिक कर्तव्यांपैकी एक असल्याचे मानले जाईल.
विशेषतः मादक पेय तसेच आरोग्यास घातक असलेले अंमली पेये यांच्यावर बंदी आणण्यासाठी राज्यसंस्था प्रयन्तशील राहील.

अपवाद : औषधी तयार करण्यास वापरली जाणारी पेये.

कलम 48:- कृषी व पशुसंवर्धन यांचे संघटन (गौहत्या)

याअंतर्गतच गाई व वासरे व इतर जनावरे यांच्या जातीचे जतन व सुधारणा करने व त्यांच्या कत्तलला मनाई करणे याकरिता उपाययोजना करेल.

कलम 48 (A) :- राज्य पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यांचा विकास त्याचबरोबर वने, नैसर्गिक संसाधने जशे नद्या, तलाव, समुद्र व त्यामधील असणारे जीव यांचे संरक्षण करेल व त्यांच्या वाढीसाठी योग्य प्रणाल्या विकसित करेल.

टीप :- ही कलम 42 वी घ. दु. 1976 मध्ये संविधानात टाकण्यात आली.

कलम 49:- राष्ट्रीय महत्वाचे संस्थाने, वास्तू, स्मारक यांचे संरंक्षण राज्य करेल. संसदीय कायद्याअंतर्गत राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचे म्हणून घोषित केले कलात्मक व ऐतिहासिक महत्वाची असणारे स्मारके, ठिकाणे व वस्तूंची लूट, विद्रुपीकरण, नाश, स्थानांतरण, विल्हेवाट आणि निर्यातीपासून संरक्षण करण्याची राज्यसंस्थेची जबाबदारी असेल .

कलम 50:- राज्य न्यायपालिका आणि कार्यपालिका यांचे पृथ्थकरण करेल.
लोकसेवामध्ये न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळी ठेवण्याकरिता राज्यसंस्था प्रयन्तशील राहील.
मात्र सध्या राज्यसंस्थेअंतर्गत कार्यकारी दंडाधिकारी, कलेक्टर, प्रांत तहसीलदार, यांचा समावेश होतो.

कलम 51:- राज्य आंतरराष्ट्रीय शांतता आणि संरक्षण करण्याचा प्रयन्त करेल.

राज्यसंस्था खालील बाबींसाठी प्रोत्साहन देईल.
अ. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन
ब. राष्ट्रराष्ट्रांमध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्वक संबंध राखणे
क. एकमेकांमध्ये व्यवहार करतांना आंतरराष्ट्रीय कायदा व तहांचा आदर करणे. 

प्रश्न मंजुषा

♻️♻️महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.

1) ६

२) ४

३) ५

४) ९

उत्तर :१


♻️♻️खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते?

१) लोणावळा २) चिखलदरा ३) महाबळेश्वर ४) माथेरान

उत्तर : २



♻️♻️ खालीलपैकी कुठल्या जिल्हयाचा चांदोली राष्ट्रीय उदयानामध्ये समावेश होत नाही ?

१) सांगली २) सातारा

३) रायगड ४) रत्नागिरी

उत्तर : ३


महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्हगात अजिंग वेरुळ लेणी आहेत ?

१) पुणे

२) अहमदनगर

3) औरंगावाद

४) लातूर

उतर : ३


पश्चिम महाराष्ट्रातील.. .जिल्ह्यामध्ये बॉक्शाईटचे शाठे आढळतात.

1) नाशिक

2) पुणे

3) कोल्हापूर

4) सोतापूर

उतर:3



देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा......याततून जातो.

1) गगनबावडा

2) कुंडी

3) कोळंबा

4) वरंध

उतर: 2


महाराष्ट्रातील सर्वात कमी वनाखाली क्षेत्र.------. या विभागाचे आहे.

1) विदर्भ

2) कोकण

3) मराठवाडा✅✅

4) नाशिक


महाराष्ट्रातीत सर्वात जास्त लांबीची नदी कोणती?

1) भीमा

2) गोदावरी

3) क्रष्णा

4) वर्धा

उतर: २



भाषेचे एकूण किती प्रकार आहेत.(S.R.PF-7 दौंड 2018)

1) 04

2) 03

3) 02✅✅

4) 05


भाषा म्हणजे काय?

1) बोलणे

2) विचार व्यक्त करण्याचे साधन✅✅

3) लिहिणे

4) संभाषणाची कला


पुढीलपैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही?(S.R.P.F-11 सोलापूर 2018)

1) य्

2) र्

3) अ✅✅

4) व्


विचार, भावना, अनुभव व कल्पना व्यक्त करण्याचे साधन...... होय.(नाशिक ग्रा. - 2018)

1) हातवारे

2) लिपी

3) भाषा✅✅

4) संवाद


खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

१) असहकार चळबळ-१९२४✅✅

२) सविनय कारदेभंग - १९३०

३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३

४) चलेजाब चळवळ -१९४२



गोपाळ हरी देशमुखांनी 'लोकहितवादी' या नावाने

या साप्ताहिकातून लिखाण केले ?

१) दर्पण

२) सुधाकर

३) दिनमित्र

४) प्रभाकर✅✅


वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी

कोणाला मिळालेला नाही?

1) बॉब डीलन

2) बेंट होमस्ट्राम

3) जॉन बारडींग ✅✅

4) योशिमोरी ओसुरी


उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?

1) नामदेव ढसाळ

2) लक्ष्मण माने ✅✅

3) केशव मेश्राम

4 ) नरेंद्र जाध


मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण ?

1) शिवाजीराव भोसले

2) रणजित देसाई

3) विश्वास पाटिल

4)शिवाजी सावंत✅✅


खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

१) असहकार चळबळ-१९२४✅✅

२) सविनय कारदेभंग - १९३०

३) स्वराज्य पक्षाची स्थापना - १९२३

४) चलेजाब चळवळ -१९४२


वर्ष 2016चा नोबेल पुरस्कार खालीलपैंकी

कोणाला मिळालेला नाही?

1) बॉब डीलन

2) बेंट होमस्ट्राम

3) जॉन बारडींग ✅✅

4) योशिमोरी ओसुरी


71 व्या प्रजासत्ताक कार्यक्रमाचे अतिथी हे .... देशाचे

प्रमुख राष्ट्राध्यक्ष होते.

1. अमेरिका

2. फ्रान्स

3. ब्राझील✅✅

4. ऑस्ट्रेलिया


♻️♻️ भारतात आधुनिक शिक्षणाचा पाया पुढीलपैकी कोणी घातला ?

1) इच

2) इंग्रज✅✅

3) पोर्तुगीज

4) फ्रेंच


♻️♻️ जगात सर्वात पहिले बजेट कोणत्या देशाने मांडले ?

1) अमेरिका

2) इंग्लंड✅✅

3) फ्रांन्स

4) रशिया


♻️♻️दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

1) सुषमा स्वराज✅✅

2) सुचेता कृपलानी

3) शिला दिक्षीत

4) मिरा कुमार


♻️♻️1936 चे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन......येथे झाले .

1) बेळगाव

2) फैजपूर✅✅

3) वर्धा

4) नागपूर


♻️♻️माजुली हे बेट कोणत्या राज्यात आहे ?


1) आसाम✅✅

2) अरूणालच प्रदेश

3) मध्यप्रदेश

4) उत्तराखंड


♻️♻️सियाल या शिलावरणाच्या उपथरात काय असते ?

1) सिलीका व अॅल्युमिनिअम✅✅

2) सिलिका व मॅग्नेशियम

3) सिलीका व फेरस

4) फेरस व निकेल


♻️♻️भारतात कर्कवृत्त....राज्यातून जाते.

1) पाच

2) सात

3) सहा

4) आठ✅✅


♻️♻️जिल्ह्यातील खजिना व स्टॅप यावर कोणाचे नियंत्रण असते ?

1) विभागीय आयुक्त

2) महालेखापाल

3) वित्त लेखा अधिकारी

4) जिल्हाधिकारी✅✅


♻️♻️19 जुलै 1969 रोजी किती बकेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?

1) 11

2) 14✅✅

3) 9

4) 8


सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कुणी केली?

1) केशवचंद्र सेन

2) स्वामी दयानंद

3) अॅनी बेझंट✅✅

4)स्वामी विवेकानंद


मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?

1) अलिगड

2)ढाका✅✅

3) इस्लामाबाद

4)अलाहाबाद


सायमन कमिशनची स्थापना कशाकरिता

करण्यात आली होती?

1) माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायद्याने केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.✅✅✅

2) पुणे कराराच्या प्रभावाचे मूल्यमापन

करण्यासाठी.

3) मो्ले-मिंटो कायद्याने केलेल्या

सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी.

4) वरीलपैकी कशासाठीही नाही.


महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी 1918 मध्ये सारा बंदीची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरू केली?

1) पुणे

2)गोरखपुर

3) खेडा✅✅

4)सोलापुर


चालू घडामोडी :- 08 जानेवारी 2024

◆ श्रीकांत शिंदे, अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार तर सुप्रिया सुळे(16 व्या लोकसभेसाठी) यांना 'संसद महारत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ सोळाव्या लोकसभेसाठी सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस), श्रीरंग बारणे (शिवसेना), भर्तृहरि महताब (बिजू जनता दल) यांना 'संसद महारत्न' पुरस्कार देण्यात येणार असल्याचे पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्रियदर्शनी राहुल यांनी सांगितले.

◆ सतराव्या लोकसभेसाठी 'संसद महारत्न' पुरस्कार एन. के. प्रेमचंद्रन (आरएसपी), अधीररंजन चौधरी (काँग्रेस), विद्युत महातो आणि हीना गावित (भाजप) यांना जाहीर झाले आहेत.

◆ भारताचे आदित्य एल 1 यान पोहचलेल्या लांग्रेज पॉइंट चे पृथ्वी पासून अंतर 15 लाख किलोमीटर आहे.

◆ भारतीय ऑलम्पिक संघटनेच्या सीईओ पदी रघुराम अय्यर यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ रॉयल कॅरिबियन ने तयार केलेली "आयकॉन ऑफ दी सिज" जगातील सर्वात मोठी क्रुझ ठरली आहे.

◆ देशातील पहिले बीच गेम्स 2024 चे आयोजन "घोघला बीच, दीव व दमण' बीचवर करण्यात आले आहे.

◆ प्राईम फाउंडेशन चेन्नई कडून देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार यंदा देशातील 5 खासदाराना जाहीर झाला आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील "डॉ. अमोल कोल्हे आणि श्रीकांत शिंदे" खासदारांना यावर्षीचा संसदरत्न खासदार पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना तिसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ भारतात अहमदाबाद येथे अंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी या राजकीय पक्षाने बहिष्कार घातला आहे.

◆ केंद्र सरकारच्या फार्मर आयडी या पथदर्शी उपक्रमात महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याची निवड झाली आहे.

◆ ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी शशी सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट मध्ये 3000 धावा पूर्ण करणारी स्मृती मानधना ही दुसरी भारतीय महिला क्रिकेट खेळाडू ठरली आहे.

◆ भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नविन प्रवक्ता पदी रणधीर जैस्वाल यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ इंद्रमणी पांडे(3 वर्षासाठी) या भारतीय अधिकाऱ्याने नुकताच बिमस्टेक च्या सरचिटणीस पदाचा पदभार स्वीकारला आहे.

◆ 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून झाले आहे.

◆ 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार हे आहेत.

◆ सफरचंदाची चोरी रोखण्यासाठी हिमाचल प्रदेश या राज्यात ॲपल ऑन व्हील्स हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

◆ आयर्लंड च्या सिलियन मर्फी ला Oppenheimer चित्रपटात केलेल्या मुख्य भूमिकेसाठी मिळाला गोल्डन ग्लोब सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

08 January 2024

चालू घडामोडी :- 07 जानेवारी 2024

◆ रॉकफेलर फाउंडेशनचे अध्यक्ष आणि माजी यूएस एड प्रमुख डॉ. राजीव शाह यांचा फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला.

◆ पी. संतोष यांची ‘नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी’ (NARCL) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ 'प्रोफेसर एड्रियन मायकल क्रूझ' यांना त्यांच्या अंतराळ सेवेतील योगदानाबद्दल 'ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ Adidas कंपनी कर्नाटक राज्यात आपले 'ग्लोबल कॉम्पिटन्स सेंटर' (GCC) स्थापन करणार आहे.

◆ पश्चिम बंगाल राज्य सरकारने ‘पोइला बैशाख’ हा राज्य दिन म्हणून घोषित केला आहे.

◆ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी ‘तुर डाळ खरेदी पोर्टल’ सुरू केले आहे.

◆ गोवा राज्यात 10व्या शतकातील कन्नड आणि संस्कृत भाषेत लिहिलेला 'कदंब शिलालेख' सापडला आहे.

◆ वरिष्ठ IAS अधिकारी 'श्री विकास शील' यांनी 'Asia Development Bank' (ADB) चे कार्यकारी संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

◆ भारताचा महान फलंदाज 'विराट कोहली' याला 'प्युबर्टी ॲथलीट ऑफ द इयर 2023' साठी नामांकन मिळाले आहे.

◆ वरिष्ठ IFS अधिकारी 'इंद्रमणी पांडे' यांनी BIMSTEC चे महासचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे.

◆ ‘नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड लिमिटेड’ (NIIFL) द्वारे ‘संजीव अग्रवाल’ यांची नवीन सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ ‘शशी सिंग’ यांची ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोसिएशन (AIRIA) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

आजचे महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

🔖 प्रश्न - खालीलपैकी कोणत्या भारतीय चित्रपटाला IMDB मध्ये २०२३ या वर्षातील पहिल्या क्रमांकाचे ranking मिळाले आहे?

ANS - 12th fail या चित्रपटाला

🔖 प्रश्न - ICC कसोटी क्रिकेट रँकिंग मध्ये भारताला मागे टाकून कोणत्या संघाने प्रथम स्थान पटकावले आहे?

ANS - ऑस्ट्रेलिया

🔖 प्रश्न - विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे?

ANS - पृथ्वी विज्ञान योजनेला

🔖 प्रश्न - केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या महानगरपालिकेला फाईव्ह स्टार रँकिंग मिळाले आहे?

ANS - पुणे महानगर पालिकेला

🔖 प्रश्न - कच्चा तेलाच्या खरेदीसाठी भारताने कोणत्या देशासोबत ५ वर्षासाठी करार केला आहे?

ANS - गयाना

🔖 प्रश्न - भारताच्या राष्ट्रिय महामार्गाची एकुण लांबी किती किलोमीटर एवढी झाली आहे?

ANS - १,४६,१४५

🔖 प्रश्न - National sampal survey NSO ने दिलेल्या माहितीनूसार भारताची चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राची वाढ किती टक्के राहण्याचा अंदाज आहे?

ANS - १.८ टक्के

🔖 प्रश्न - अरबी समुद्रात अपहरण झालेले MV लीला नोरफोक हे कोणत्या देशाचे जहाज आहे?

ANS - लायेबेरिया

🔖 प्रश्न - नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभंकर चिन्ह म्हणुन कोणत्या प्रण्याची निवड करण्यात आली आहे?

ANS - शेकरू

🔖 प्रश्न - केंद्र सरकारच्या २४ तास पाणी पुरवठा करणाऱ्या नल से जल या योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहराचा सामावेश झाला आहे?

ANS - छत्रपती संभाजीनगर चा

🔖 प्रश्न - राष्ट्रीय खेल प्रोत्सहान पुरस्कार २०२३ कोणत्या युनिव्हर्सिटी ला देण्यात आला आहे?

ANS - जैन युनिव्हर्सिटी बंगळुरू

📢

07 January 2024

चालू घडामोडी :- 06 जानेवारी 2024

◆ 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या बोधचिन्ह आणि शुभंकर चिन्हाचे अनावरण शुक्रवारी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून करण्यात आले.

◆ पश्चिम बंगालने मध, तांदूळ आणि टांगेल, साड्यांसाठी GI टॅग मिळवले.

◆ पीयूष गोयल यांनी इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी ट्रेड शोचे उद्घाटन केले.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थान इंटरनॅशनल सेंटर, जयपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या 2023 परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

◆ काँग्रेसने 'भारत न्याय यात्रा'चे नाव बदलून 'भारत जोडो न्याय यात्रा' केले. काँग्रेसने 14 जानेवारीपासून मणिपूर ते मुंबई अशी 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू केली आहे.

◆ 9 ते 13 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय पॅरा अथेलेटीक्स स्पर्धा पणजी येथे होणार आहेत.

◆ 12th Fail या भारतीय चित्रपटाला IMDB मध्ये 2023 या वर्षातील पहिल्या क्रमांकाचे ranking मिळाले आहे.

◆ ब्लुंमबर्ग बिलिनेयर इंडेक्स नुसार गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

◆ भारतीय उद्योगपती गौतम अदानी श्रीमंताच्या जागतिक यादीत 12व्या क्रमांकावर आहेत.

◆ ईलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

◆ ICC कसोटी क्रिकेट रँकिंग मध्ये भारताला मागे टाकून ऑस्ट्रेलिया या संघाने प्रथम स्थान पटकावले आहे.

◆ विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने "पृथ्वी विज्ञान" या नव्या योजनेला मंजूरी दिली आहे.

◆ केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्यातील पुणे महानगर पालिकेला फाईव्ह स्टार रँकिंग मिळाले आहे.

◆ अरबी समुद्रात अपहरण झालेले MV लीला नोरफोक हे लायेबेरिया या देशाचे जहाज आहे.

◆ नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभंकर चिन्ह म्हणुन शेकरू प्रण्याची निवड करण्यात आली आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे 12 ते 16 जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ "विकसित भारत 2047" या संकल्पनेवर आधारित नाशिक येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

◆ नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या शुभंकर चिन्ह म्हणुन शेकरू चे अनावरण "अनुराग ठाकूर आणि एकनाथ शिंदे" यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात 16 वर्षांनी राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे.

◆ ICC च्या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपट्टला मिळणाऱ्या सर गारफील्ड सोबर्स करंडक पुरस्कारासाठी विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या दोन भारतीय खेळाडूंना नामांकन मिळाले आहे.

◆ केंद्र सरकारच्या 24 तास पाणी पुरवठा करणाऱ्या नल से जल या योजनेत महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर या शहराचा सामावेश झाला आहे.

◆ राष्ट्रीय खेल प्रोत्सहान पुरस्कार 2023 "जैन युनिव्हर्सिटी बंगळुरू युनिव्हर्सिटी" ला देण्यात आला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

06 January 2024

राज्यघटना प्रश्नसंच

1). देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ..... होय ?

1) राज्य विधिमंडळ  

2) कार्यकारी मंडळ    

*3) संसद ✅*

4) न्यायमंडळ


2).   योग्य विधान ओळखा?

 1)कुरबुडे हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे

 2) पानवठ हा पूल कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल आहे


1)1 बरोबर 

2) 2 बरोबर 

*3) दोन्ही बरोबर ✅*

4) दोन्ही चूक


 3).....…याला सहकाराचा जनक मानतात?

*1)रॉबर्ट ओवेन*✅

2)रॉबर्ट हूक

3)मायकेल ओवेन

4)यापैकी नाही


4).आपल्या कुठल्या पुस्तकात गांधीनी क्रांतिकारकांची 'वाट चुकलेले देशभक्त' अशी संभावना केली ? 

1)हिंद स्वराज संघ

2)हिंदुस्‍थान स्‍वराज्‍य संघ

*3)हिंद स्वराज✅*.

4)यापैकी नाही


 5).भारतातून .....हे वृत्त जाते?

*1)कर्कवृत्त*✅

2)मकरवृत्त

3)विषुववृत्त

4)कोणतेही जात नाही


 6).महाराष्ट्र शासन कोणत्या शहरात 'भाषा भवन' बांधत आहे? 

1)औरंगाबाद

2)नाशिक

3)पुणे

*4)मुंबई✅*


 7).भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे? 

1)नागपूर

*2)आर्वी✅*

3)अहमदाबाद

4)चंद्रपूर


 8).अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

1)सरस्वती

2)यमुना

*3)शरयू*✅

4)घंडक


9).भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? 

 *1) सरदार वल्लभभाई पटेल✅*

 2)जी. बी. पंत

 3) जी. एल. नंदा

 4)लाल बहादूर शास्त्री


 10).लोकसभेचे पिता ..... यांना म्हणतात? 

 1)अनंतसांणम

 2) झिकीर हुसैन

 3) बासमम

 *4) मावळणकर*✅

पठाराची स्थानिक नावे


खानापूरचे पठार – सांगली


पाचगणीचे पठार – सातारा


औंधचे पठार – सातारा


सासवडचे पठार – पुणे


मालेगावचे पठार – नाशिक


अहमदनगरचे पठार – नगर


तोरणमाळचे पठार – नंदुरबार


तळेगावचे पठार – वर्धा


गाविलगडचे पठार – अमरावती


बुलढाण्याचे पठार – बुलढाणा


यवतमाळचे पठार – यवतमाळ


कान्हूरचे पठार – अहमदनगर


कास पठार – सातारा


मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद


काठी धडगाव पठार – नंदुरबार


जतचे पठार – सांगली


आर्वी पठार – वर्धा, नागपुर


चिखलदरा पठार – अमरावती.


▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

महाराष्ट्र जिल्हावार-पर्वत, डोंगर, टेकड्या, डोंगररांगा

💢 जिल्हा ➡️➡️ पर्वत डोंगर टेकड्या डोंगररांगा 💢


🎇मुंबई मुंबई उपनगर - ⛰⛰पाली, अंटोप हिल, शिवडी,खंबाला, मलबार हिल.


🎇 रायगड - ⛰⛰रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सह्यण्द्री,


🎇 धुळे - ⛰⛰धानोरा, व गाळण्याचे डोंगर.


🎇नाशिक - ⛰⛰सह्यान्द्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर,वणी,चांदवड,सातमाळा,


🎇 पुणे -⛰⛰ सह्यान्द्री,हरिश्चंद्र,शिंगी,तसुबाई,पुरंदर,ताम्हिनी,अंबाला,


🎇 सांगली -⛰⛰ आष्टा,होणाई,शुकाचार्य,कामलभैरव, बेलगबाद, आडवा,मुचींडी,दंडोबा.


🎇 सोलापूर -⛰⛰ महादेव,बालाघाट, शुकाचार्य,


🎇 जालना - ⛰⛰अजिंठ्याची रांग,जाबुवंत,


🎇 हिंगोली - ⛰⛰अजिंठ्याची रांग, हिंगोलीचे पठार.


🎇 लातूर - ⛰⛰बालाघाटचे डोंगर,


🎇 बीड -  ⛰⛰बालाघाटचे डोंगर


🎇 अकोला - ⛰⛰गाविलगड,अजिंठाचे


🎇 अमरावती -⛰⛰ सातपुडा, गाविलगडच्या रांगा,पोहऱ्याचे व चिरोडीचे डोंगर.


🎇 वर्धा - ⛰⛰रावनदेव, गरमासुर, मालेगाव, नांदगाव, ब्राह्मणगाव टेकड्या.


🎇 भंडारा - ⛰⛰अबागडचे डोंगर, गायखुरी व भिमसेन टेकड्या,


🎇 चंद्रपूर -⛰⛰ परजागड व चांदूरगडचे, चिमूर व मुल टेकड्या.


🎇 ठाणे -  ⛰⛰सह्यान्द्री


🎇 जळगाव -⛰⛰ सातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली, हस्तीचे डोंगर.


🎇 नंदुरबार -⛰⛰ सातपुडा व तोरणमाळचे डोंगर.


🎇 अहमदनगर -⛰⛰ सह्यान्द्री,कळसुबाई,अदुला,बाळेश्वर,हरिश्चंद्र डोंगर,


🎇 सातारा -⛰⛰ सह्यान्द्री,परळी,बनमौली,महादेव, यावतेश्वेर, मेंढोशी, आगाशिव, औध,


🎇 कोल्हापूर - ⛰⛰सह्यान्द्री, पन्हाळा, उत्त्तर व दक्षिण, दुधगंगा, चिकोडी रांग.


🎇 औरंगाबाद - ⛰⛰अजिंठा, सातमाळा, सुरपलायान,


🎇 परभणी - ⛰⛰उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट रांग.


🎇 नांदेड - ⛰⛰सातमाळा, निर्मल,मुदखेड,बलाघाटचे डोंगर,


🎇 उस्मानाबद -⛰⛰ बालाघाट, तुळजापूर, व नळदुर्ग डोंगर


🎇 यवतमाळ - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या.


🎇 बुलढाणा - ⛰⛰अजिंठ्यचे डोंगर.


🎇वाशीम - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर


🎇 नागपूर - ⛰⛰सतपुड्याचे डोंगर, गरमसूर,महादागड, पिल्कापर टेकड्या,


🎇 गोदिया -⛰⛰ नवेगाव, प्रतापगड, चिंचगड, व दरकेसाचे डोंगर.


🎇 गडचिरोली -⛰⛰ चरोळी,टिपागड,सिर्कोडा,सुरजागड,भामरागड,चिकियाला डोंगर.


प्रश्न सराव


 देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते.
1. गुजरात
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र

भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

  भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले.
1.दिल्ली
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ

 ............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान
3. सिक्किम
4. गुजरात

 महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो.
1.02
2.06
3.07
4.05
कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

 अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व

 भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल?
1.  ग्वाल्हेर
2. इंदौर
3.  दिल्ली
4.  या पैकी नाही

 मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले?
1. अमर शेख
2. अण्णाभाऊ साठे
3. प्र. के.अत्रे
4. द.ना.गव्हाणकर

 पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती?
1. धुळे -गाळणा डोंगर
2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4. हिंगोली -हिंगोली डोंगर

अ. सर्वच बरोबर 
ब. 1, 2बरोबर
क. 3, 4बरोबर
ड. सर्वच चूक

  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?
1. महाराष्ट्र 
2. तामिळनाडु
3. आंध्रप्रदेश
4. पश्चिमप्रदेश

  सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात?
1. नर्मदा व तापी
2. तापी व गोदावरी
3. कृष्णा व गोदावरी
4. कृष्णा व पंचगंगा

 कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो.
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

 खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता.
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र

 भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले.
1. चेन्नई
2. कोलकत्ता
3. चंदिगड
4. मुंबई

 मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे.
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद
4. नांदेड

 नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे.
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा

*पाकिस्तान' हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला*
*1) बँरिस्टर जीना*
*2) सर सय्यद अहमद*
*3) मुहम्मद इकबाल*
*4) रहमत खान*✅
*खालील पैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता*
*1) दामोदर चाफेकर*
*2) विनायक सावरकर*
*3) अरविंद घोष*
*4) भगतसिंग*✅
:
*दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता..........असते.*
1)80%
2)90%
3)100%✔✔
4)1000%
*:
*दुर्बिणीसारख्या प्रकाशकीय उपकरणातील क्षेत्राभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते?*
1)वस्तूभिंग
2)संयुक्त नेत्रभिंग✔✔✔
3)विशालक
4)वरीलपैकी एकही नाही
:
*कोंडा न काढलेल्या धान्यातून लोह व .............मिळते.*
1)जीवनसत्व
2)कॅल्शियम✔✔✔
3)मॅग्नेशियम
4)लोह
:
*19 ऑगस्ट हा दिवस............दिन म्हणून साजरा केला जातो.*
1)जागतिक मानसिक आरोग्य दिन
2)जागतिक पशु दिन
3)आंतरराष्ट्रीय ऊर्जा दिन
4)यापैकी नाही✔✔✔
*
*19 ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो*
[
*1986 साली स्थापन झालेले सत्येंद्रनाथ बोस राष्ट्रीय मूल विज्ञान केंद्राचे मुख्यालय.........या ठिकाणी आहे.*
1)कोलकाता✔✔✔
2)वाराणसी
3)नार्वे
4)बेंगळुरू
:
*वैज्ञानिक संशोधनाच्या संघटन व निर्देशनासाठी वैज्ञानिक संशोधन व प्राकृतिक संसाधनाशी संबंधित मंत्रालयाची स्थापना करणारा............हा जगातील पहिला देश आहे.*
1)अमेरिका
2)जर्मनी
3)नार्वे
4)भारत✔✔✔:


*...........या भारतीय शास्त्रज्ञाने क्रिस्टलोग्राफीच्या क्षेत्रामध्येही महत्वपूर्ण संशोधन केले.*
1)चंद्रशेखर व्यंकटरमण✔✔
2)जगदिश्चंद्र बोस
3)मेघनाद साहा
4) पी सी रे
:
*वस्तूमधील गुरुत्वबल हे त्याच्या.........असते.*
1)वस्तुमानाशी व्यस्तानुपाती
2)आकारमानाशि व्यस्तानुपाती
3)अंतराच्या वर्गाशी समानुपाती
4)वस्तुमानाशी समानूपाती✔✔
*:
*उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली असता...........*
1)त्याचे तापमान कमी होते
2)त्याचे तापमान वाढत जाते
3)त्याच्या तापमानात बदल होत नाही✔✔✔
4)यापैकी नाही:

महत्वाचे प्रश्नसंच

 पाकिस्तान' हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला

1) बँरिस्टर जीना

2) सर सय्यद अहमद

3) मुहम्मद इकबाल

4) रहमत खान✅


खालील पैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता

1) दामोदर चाफेकर

2) विनायक सावरकर

3) अरविंद घोष

4) भगतसिंग✅

:

दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता..........असते.

1)80%

2)90%

3)100%✔️✔️

4)1000%

:

दुर्बिणीसारख्या प्रकाशकीय उपकरणातील क्षेत्राभिंग व नेत्रभिंग यांच्या जोडणीतून काय आकारते?

1)वस्तूभिंग

2)संयुक्त नेत्रभिंग✔️✔️✔️

3)विशालक

4)वरीलपैकी एकही नाही

:

कोंडा न काढलेल्या धान्यातून लोह व .............मिळते.

1)जीवनसत्व

2)कॅल्शियम✔️✔️✔️

3)मॅग्नेशियम

4)लोह

:

19 ऑगस्ट हा दिवस............दिन म्हणून साजरा केला जातो.

1)जागतिक मानसिक आरोग्य दिन

2)जागतिक पशु दिन

3)आंतरराष्ट्रीय ऊर्जा दिन

4)यापैकी नाही✔️✔️✔️


19 ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो


1986 साली स्थापन झालेले सत्येंद्रनाथ बोस राष्ट्रीय मूल विज्ञान केंद्राचे मुख्यालय.........या ठिकाणी आहे.

1)कोलकाता✔️✔️✔️

2)वाराणसी

3)नार्वे

4)बेंगळुरू

:

वैज्ञानिक संशोधनाच्या संघटन व निर्देशनासाठी वैज्ञानिक संशोधन व प्राकृतिक संसाधनाशी संबंधित मंत्रालयाची स्थापना करणारा............हा जगातील पहिला देश आहे.*

1)अमेरिका

2)जर्मनी

3)नार्वे

4)भारत✔️✔️✔️:


...........या भारतीय शास्त्रज्ञाने क्रिस्टलोग्राफीच्या क्षेत्रामध्येही महत्वपूर्ण संशोधन केले.*

1)चंद्रशेखर व्यंकटरमण✔️✔️

2)जगदिश्चंद्र बोस

3)मेघनाद साहा

4) पी सी रे

:

वस्तूमधील गुरुत्वबल हे त्याच्या.........असते.

1)वस्तुमानाशी व्यस्तानुपाती

2)आकारमानाशि व्यस्तानुपाती

3)अंतराच्या वर्गाशी समानुपाती

4)वस्तुमानाशी समानूपाती✔️✔️


उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली असता...........

1)त्याचे तापमान कमी होते

2)त्याचे तापमान वाढत जाते

3)त्याच्या तापमानात बदल होत नाही✔️✔️✔️

4)यापैकी नाही:


टेस्ट ट्यूब बेबी technique चा विकास........या शास्त्रज्ञांनी केला.

1)मॅक्स डेलब्रक आणि सॉलव्हेडर

2)दुवे ख्रिश्चन आणि जॉर्ज एमिल

3)रॉबर्ट एडवर्ड आणि सेपटो✔️✔️✔️

4)यापैकी नाही


Latest post

2025 चालू घडामोडी

1) जागतिक ऍथलेटिक्सने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत जगातील नंबर एकचा भालाफेकपटू कोण ठरला आहे ? ✅ नीरज चोप्रा 2) नीरज चोप्रा किती गुणसंख्या...