१६ मे २०२३

महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे

1) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
-------------------------------------------------
2) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
-------------------------------------------------
3) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
-------------------------------------------------
4) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
------------------------------------------------
5) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
-------------------------------------------------
6) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
------------------------------------------------
7) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
------------------------------------------------
8) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
------------------------------------------------
9) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
------------------------------------------------

10) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
------------------------------------------------
11) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-----------------------------------------------
12) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
------------------------------------------------
13) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
------------------------------------------------
14) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
------------------------------------------------
15) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
------------------------------------------------
16) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
------------------------------------------------
17)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
------------------------------------------------
18) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-----------------------------------------------
19) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-----------------------------------------------
20) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
-------------------------------------------------

21) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
-------------------------------------------------
22) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
-------------------------------------------------
23) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
-------------------------------------------------
24) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
-------------------------------------------------
25) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ

━━━━━━━━༺༻━━━━━━━━     

प्रमुख संस्था आणि त्यांचे मुख्यालय

1).  GATT चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - जेनेवा (1947)

2).  G-8 देशांची स्थापना कधी झाली?
उत्तर - 1975

3).  UNCTAD चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर -  जेनेवा(1964)

4).  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - वॉशिंग्टन (1945)

५).  अन्न आणि कृषी संघटना (FAO) कोठे आहे?
उत्तर - रोम (1945)

६).  जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर -  जेनेवा1948

7).  रेडक्रॉसचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर -  जेनेवा (1863)

8).  जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - वॉशिंग्टन (1945)

9).  G-15 देशांचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - जेनेवा (1989)

10).  जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर -  (1995)

11).  नाटो देशांची मुख्यालये कोठे आहेत?
उत्तर - ब्रुसेल्स (1949)

१२).  सार्क देशांचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - काठमांडू (1985)

13).  आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर - मनिला (1966)

14).  आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे?
उत्तर -  हेग (1946)

१५).  इंटरपोल कुठे आहे?

उत्तर - पॅरिस (1923)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   

आजचे महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे

1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- malic ऍसिड✅

२) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- टार्टारिक आम्ल✅

3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:-  लैक्टिक ऍसिड✅

4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅

5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?
उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅

6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- सायट्रिक आम्ल✅

7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅

8) किडनी स्टोनला काय म्हणतात?
उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅

9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?
उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅

10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?
उत्तर:-  केरळ✅

11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:-  गुरुग्राम (हरियाणा)

12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर :- तिरुवनंतपुरम

13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर:- श्री हरिकोटा✅

14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर:-  नवी दिल्ली✅

15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?
उत्तर:- कटक (ओडिशा)✅

16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?
उत्तर :- भारत✅

17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?
उत्तर:- मेजर ध्यानचंद✅

18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?
उत्तर:- हरितगृह वायू✅

19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?
उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅

20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?
उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅

21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?
उत्तर:-  1912 मध्ये✅

22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅

23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- मनिला✅

24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- नैरोबी, केनिया✅

25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- जिनिव्हा.✅

26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅

27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- लंडन✅

28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- व्हिएन्ना✅

29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅

30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- जिनिव्हा✅

31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?
उत्तर:- space-x✅

32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?
उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅

33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?
उत्तर:- PSLV C37✅

34) शिपकिला पास कोठे आहे?
उत्तर:- हिमाचल प्रदेश✅

35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?
उत्तर :-शिपकिला पास✅

36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- सिक्किम✅

37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅

38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- मणिपूर✅

39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?
उत्तर:- मध्य प्रदेश✅

40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?
उत्तर:- ओडिशा✅

41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- कर्नाटक✅

42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- झारखंड✅

43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- महाराष्ट्र✅

44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?
उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅

45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?
उत्तर:- पंचायत शैली✅

46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?
उत्तर:- चारबाग शैली✅

47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?
उत्तर:- हुमायूनची कबर✅

48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?
उत्तर:- द्रविड शैली✅

49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?
उत्तर:- चोल शासक✅

५०) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?
उत्तर:- तंजोर.✅
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे

Q1. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी दिल्लीत किती जिल्हा सैनिक बोर्ड स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे?

(a) 2

(b) 4✅

(c) 8

(d) 6

Q2. खालीलपैकी कोणत्या राज्याने शहरातील 100 प्रवेश क्षमता असलेल्या पहिल्या इंग्रजी माध्यमाच्या सामान्य पदवी महाविद्यालयाचे उद्घाटन केले आहे?

(a) त्रिपुरा✅

(b) नागालँड

(c) आसाम

(d) मणिपूर

Q3. कोणत्या राज्याच्या वन्यजीव मंडळाने दुर्गावती व्याघ्र राखीव नावाने वाघांसाठी नवीन राखीव क्षेत्र ठेवण्यास मान्यता दिली आहे?

(a) उत्तर प्रदेश

(b) गुजरात

(c) राजस्थान

(d) मध्य प्रदेश✅

Q4. खालीलपैकी कोणता देश ग्लोबल यूथ क्लायमेट समिटचे आयोजन करत आहे?

(a) भारत

(b) बांगलादेश✅

(c) ओमान

(d) सिंगापूर

Q5. महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेसने कोणत्या पेमेंट बँकेशी भागीदारी केली आहे, ज्यामुळे मोठ्या ग्राहकांपर्यंत क्रेडिट ऍक्सेस आणखी वाढेल?

(a) एअरटेल पेमेंट बँक

(b) पेटीएम पेमेंट बँक

(c) फिनो पेमेंट्स बँक

(d) इंडिया पोस्ट पेमेंट बँक✅

Q6. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स सुरू केले आहे?

(a) उत्तर प्रदेश

(b) गुजरात✅

(c) राजस्थान

(d) महाराष्ट्र

Q7. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे (ITPO) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

(a) प्रदीप खरोला✅

(b) आर्यमा सुंदरम

(c) आर. वेंकटरामणी

(d) मुकुल रोहतगी

Q8. जागतिक सन्मान दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

(a) ऑक्टोबरचा तिसरा सोमवार

(b) ऑक्टोबरचा तिसरा रविवार

(c) ऑक्टोबरचा तिसरा शनिवार

(d) ऑक्टोबरचा तिसरा बुधवार✅

Q9. ऑक्टोबर 2022 मध्ये खालीलपैकी कोणी मेल्टवॉटर चॅम्पियन्स चेस टूरचे विजेतेपद जिंकले?

(a) इयान नेपोम्नियाची

(b) अलीरेझा फिरोज्जा

(c) मॅग्नस कार्लसन✅

(d) अधिबान बास्करन

Q10. ऑक्टोबर 2022 मध्ये खालीलपैकी कोणाची भारत सरकारमध्ये संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?

(a) राजीव गौबा

(b) प्रवीण के. श्रीवास्तव

(c) सामंत गोयल

(d) अरमाने गिरीधर✅
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   

१५ मे २०२३

राज्यसेवा पूर्व 4 June 2023 बाबतीतत थोडक्यात...

Geography, polity,History, Science, Economics, Environment...हे विषय राज्यसेवा पूर्व साठी (GS Paper _1 )साठी आहेत.

1. काही लोकांना Science थोडासा अवघड वाटतो किंवा काही लोकांना Economics अवघड वाटतो ...प्रत्येकाचा अवघड विषय  वेगवेगळा आहे ...पण एक गोष्ट लक्षात घ्या इथून पुढे तुम्ही एखाद्या विषयास बगल देण्याचा प्रयत्न केल्यास तुम्ही स्पर्धेतून बाहेर पडलाच म्हणून समजा ...त्याच्यामुळे सर्वप्रथम सर्वच विषयांकडे लक्ष द्यायचे आहे.

2. कसरतीवरचा डाव __ इथून पुढे अभ्यास करताना काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करावेच लागेल कारण CSAT Qualify आहे ..त्याच्यामुळे कसरत ही Full Focus GS असणार आहे ...त्यामध्ये GS च्या प्रत्येक विषयांवर मजबूत पकड असणे आवश्यक.

3. अभ्यास पद्धत_ अभ्यास करताना काही गोष्टींवर काम करावेच लागणार आहे .आयोगाच्या मागील 2020 पासूनच्या फक्त राज्यसेवेच्या प्रश्नपञिका .प्रश्नपञिकांवर काम करायचे आहे कारण आपण केलेला अभ्यास आणि आयोग विचारत असलेले प्रश्न यांचा ताळमेळ जुळवून पुढे आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारेल या सर्वाचेच आकलन होत असते.

4. Positive/negative विचार _ दिवसभरात सर्वात जास्त Positive विचार पाहीजेत पण Negative विचार हाल सोडत नाहीत..कोणत्या गोष्टींवर किती वेळ खर्च करायचा हे पटकन समजले पाहीजेत कारण आपण भावी अधिकारी आहोत ...थोडेफार Negative विचार हे महाराष्ट्रात Topper येणाऱ्याला सुद्धा येतात पण अशा व्यक्ती लगेच Positive होतात ...जबरदस्त विचारसरणी पाहीजेत...दिवसभर Positive राहण्यासाठी भरपूर गोष्टींवर प्रत्येक व्यक्ती काम करू शकते eg. केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवणे, नेहमी mains देणाऱ्या लोकांमध्ये राहणे,चांगल्या गोष्टींवर चर्चा करणे,तुमचे मन प्रसन्न होईल अशी कामे करणे ...etc

5. Focus 4 June  _ नुसतं पाट्या टाकण्याचे काम नकोच ..अंतिम यादीत नाव पाहीजे...प्रत्येक विषयाचं micro planning करा ...व्यवस्थित स्वतःच Timetable तयार करा ..हे सर्व स्वतः करा ...माझा मिञ आज पासून polity चा अभ्यास चालू करत आहे मग मी पण आजपासून Polity चा अभ्यास चालू करतो हे असले Planning नको ....Zero पासून Hero बनता आलं पाहीजेत..जे काही करायचं ते स्वतः करायचं मार्गदर्शन करायला भरपूर आहेत...सत्यात उतरवण्यासाठी स्वतःलाच Ground level काम करावे लागते ..हे लिहून ठेवा.

6. अभ्यासावर विश्वास _ केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवणे म्हणजे निम्मी लढाई तुम्ही जिंकलीच म्हणून समजा ..

१२ मे २०२३

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023__ 20 दिवसांवर येवून ठेपली आहे. M

शेवटच्या 20 दिवसांचे नियोजन कसे करावे? असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल.

1. या शेवटच्या 20 दिवसात सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे Revision.
जे आधीच वाचले आहे, underline करून ठेवले आहे, short notes मध्ये लिहून ठेवले आहे. त्याची व्यवस्थित उजळणी करा.

बर्‍याचदा टेस्ट सिरीज मध्ये 2 पैकी एक पर्याय confuse होवून उत्तर चुकत असते, revision कमी पडल्याने असे प्रकार होतात. हे टाळण्यासाठी उजळणी करायलाच हवी.. मागील राज्यसेवा पेपर सोडवायलाच हवे.

2.अजून एक फार महत्वाची गोष्ट म्हणजे आयोगाच्या पाठीमागे आलेल्या प्रश्नचा भरपूर सराव करणे. एक लक्षात घ्या जो जास्तीत जास्त प्रश्न Solve करतो त्याला आयोग काय विचारणार आहे हे ऑटोमॅटिक समजत जात आणि त्या दृष्टीने आपला अभ्यास आपोआप होत जातो.

तुम्हांला गेल्या पुर्व परीक्षेत 90 च्या पेक्षा कमी मार्क्स जरी मिळाले असतील तरी तुम्ही syallbus आणि pyq व्यवस्थित टार्गेट केले तरी तुम्ही सहज 120+ जाऊ शकतात.. त्यामुळे आयोगाचा syllabus आणि PYQ समोर ठेऊनच अभ्यास करा.

3. सोबतच, रोज काही तास csat ला द्या. Csat मधील passages सोडविण्यासाठी किती वेळ लागतो, कोणत्या प्रकाराचा passage अवघड जातोय, कोणते passage शेवटी सोडवायला हवे? Reasoning चे कुठले जास्त वेळ घेतात? याचे विश्लेषण करा.

4. Current affairs करताना फार वाहवत जाऊ नका, दिवसभर इतर अभ्यास करून झाल्यानंतर या भागाला वेळ द्या. मागील papers पाहून चर्चेतील व्यक्ति, दिवंगत व्यक्ती , isro च्या achievements असे जे जे topics महत्वाचे वाटतात, त्यांची लिस्ट तयार करून त्यांचे revision करा..

विनाकारण खूप सारे facts, current issues यात वाहवत जावू नका. त्याऐवजी तेवढाच वेळ polity, geography, science ला दिलात तर खूप output येईल..

5. पुरेशी झोप घ्या. जागरण टाळा. परीक्षेच्या शेड्यूल सोबत मॅच व्हा. (रात्री 10 ते सकाळी 6-7 वाजेपर्यंत झोपण्याचा प्रयत्न करा, किमान 7 तास झोप घ्या )  जागरण करून अभ्यास करायला ही काही बोर्ड परीक्षा नाही, तुम्ही वर्षभर केलेला अभ्यास आठवायला, लॉजिक लावायला मन:स्थिती चांगली असणे आवश्यक आहे.

6. परीक्षा तोंडावर येत असल्याने या स्टेजला टेंशन येणे, हे नॉर्मल आहे. पास होण्याची इच्छा बाळगून अभ्यास करण्याऱ्या जवळपास सर्वांनाच याकाळात टेंशन येत. टेंशन आल म्हणुन जागरण न करता, पास होईल की नाही याचा विचार करत वेळ न घालवता, दिवसभराचा वेळ व्यवस्थित वापरून अभ्यास करावा..

7. आणि, वाचलेल्या सगळ्या गोष्टी लक्ष्यात रहाव्यात, पाहिजे तेव्हा आठवाव्या, असे काही नाही. आपली परीक्षा Objective आहे, तिथे चारपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे. बर्‍याच वेळी पर्याय पाहिले की उत्तर आठवते.. विनाकारण facts आठवण्याचा प्रयत्न केला तरी टेंशन येत असते..

ज्यांनी प्रामाणिक, योग्य दिशेने प्रयत्न केले आहेत, त्यांना नक्कीच यश मिळणार, यात शंका नाही.. ✌️

स्वप्नपूर्तीसाठी झगडणार्‍या सर्वांना मनापासून शुभेच्छा...👍😍

०६ मे २०२३

महत्त्वाचे घाट (खिंड):

पर्वतरांगेतील दोन्ही प्रदेशात जाण्या – येण्याजोगा किवा दळनवळनाचा ‘डोंगररस्ता’ म्हणजे घाट होय.

घाट जिल्हा जोडणारी गावे (मार्ग)

♦️मळशेज घाट ठाणे, पुणेअहमनगर – शहापूर

♦️नाणे घाट ठाणे, पुणेजुन्नर – कल्यान

♦️कुसूर घाट रायगड, पुणेराजगुरूनगर – कर्जत

♦️वरंधा घाट रायगड, पुणेपुणे – महाड

♦️कुरुळ घाट सिंधुदुर्ग, कोल्हापूर कोल्हापूर – वैभववाडी- राजापूर

♦️चंदनापुरी नगर संगमणेर – पुणे

♦️सारसा घाट चंद्रपुर सिरोंचा – चंद्रपुर

♦️बिजासण घाट धुळे धुळे – आग्रा

♦️मांजरसुभा घाट बीड बीड – नगर

♦️अंबेनळी घाट सातारा महाबळेश्वर – कोल्हापूर

♦️ताम्हणी घाट पुणे पुणे – पौदरोड – चिपळूण

♦️धब (कसारा)घाट नाशिक नाशिक – मुंबई

♦️बोर घाट पुणे पुणे – मुंबई

♦️ख्ंबाटकी घाट सातारा पुणे – सातारा

♦️दिवा घाट पुणे पुणे – बारामती

♦️कुंभार्ली घाट सांगली – सातारा कराड – चिपळूण

♦️आंबा घाट कोल्हापूर – रत्नागिरी कोल्हापूर – रत्नागिरी

♦️आंबोली घाट कोल्हापूर कोल्हापूर – सावंतवाडी बेळगाव

♦️फोंडा घाट कोल्हापूर कोल्हापूर – पणजी

२६ एप्रिल २०२३

Combine पूर्व 2023 बद्दल थोडक्यात...

एक गोष्ट लक्षात घ्या  Combine पूर्व 30 एप्रिल रोजी होणारी ही exam शांततेची  आहे असं मला वाटत ... कारण अभ्यास असतो‌‌ त्याचबरोबर प्रश्नपत्रिकांवरती सुद्धा खूप काम केलेलं असतं पण नेमकं पेपर च्या दिवशी एका तासाचं management कूठे तरी कमी पडतं आणि होतं काय तर घाईघाईने सोपे प्रश्न चूकणे,math+ reasoning ला वेळ न पुरने..अशा समस्या निर्माण होतात...

त्याच्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्हाला स्वत:ला जे कोणते Subject सोपे जातात त्या Subject पासून पेपर Solve करण्यास चालू करा ...म्हणजे काय तर सोपे विषय अगोदर घेतल्यास तुमचा Confidence level high होईल आणि जवळपास out off marks मिळतील. बाकी तुम्हाला स्वत:ला ज्या Subject ची थोडीशी Back of the mind कुठेतरी भीती आहे ती भीती देखील दूर होईल आणि अशा विषयांमध्ये देखील तूफान marks मिळतील...

शेवटच्या काळात Factual गोष्टी वारंवार बघा ..‌.या काळात झोप व्यवस्थित घ्या कारण इथून पुढे रात्र दिवस अभ्यास करणे योग्य नाही...अशाने तुमचा मेंदू परीक्षेच्या दिवशी 💯 Confidance ने काम करणे अपेक्षित नाही...त्याच्यामुळे परिपूर्ण झोप या शेवटच्या दिवसात खूप महत्वाची आहे.

एकंदरीत विचार केल्यास ही परीक्षा तुमच्या Confidence ची आहे हे लक्षात ठेवा... शेवटच्या प्रश्नांपर्यत जो Confidance ने लढेल त्याचा विजय 💯 होणार.

खूप खूप शुभेच्छा 💐💐

१९ एप्रिल २०२३

Combine पूर्व 30 एप्रिलच्या दृष्टीकोनातून पुढील 11 ते 12 दिवस....


1. सर्वात महत्वाचे नवीन काहीच वाचू नका.

2. जे अगोदरपासून अभ्यासले आहे तेच पुस्तक (घटक/उपघटक) पुन्हा पुन्हा revise करा.

3. इथून पुढे 30 एप्रिल पर्यंत अभ्यास Selective पाहिजे...(fous point )

4. पाठीमागील पेपर मध्ये केलेल्या चूकांवर काम.

5. Combine group B आणि group C चे 2020,2021 आणि 2022 सतत Solve करा.

6. दररोज दिवसातून 10 वेळस तरी वरील सर्व पेपरचे बारकाईने स्वतः Analysis करा.

7.  Elemination method आणि Logic या दोन्ही गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत.

8. Elemination ने तुमचे प्रश्न बरोबर येण्याची शक्यता असते पण logic ने तुमचा प्रश्न चूकण्याची शक्यता जास्त असते..

9. कोणतीही एखादी method use करताना विचारपूर्वक use करा ... शक्यतो logic वाचण्यात न आलेल्या प्रश्नांनाच  apply करा..(प्रत्येक प्रश्नाला Logic इथे Combine ला जास्त उपयोगी ठरत नाही).

10.आपली exam Combine पूर्व ची आहे... त्याच्यामुळे One liner प्रश्नात marks गेले नाही पाहिजेत.

11. Current घ्या बाबतीत इथून पुढे आयोगाच्या Selective Points वरती Focus करा.

12. इथून पुढे कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त दोन Quick revision अपेक्षित आहेत.(Focus area)

13. जूने लोकं इथून पुढे तुम्हाला खूप काहीही सूचत असतं ( हा शेवटचा Chance आहे..या वेळी तरी होईल का माझं..) एक गोष्ट लक्षात घ्या Mpsc मध्ये फक्त मनगटात धमक लागते ... बाकी माझा तरी इतर कारणांवरती विश्वास नाही..

14. शेवटी आयोगाचा पूर्व चा कोणताही पेपर हा  syllabus आणि exam चा विचार करूनच सेट होत असतो हे इथे लक्षात घ्या.

15. जास्त Form आले म्हणून राज्यसेवा पूर्व सारखा पेपर येणे अपेक्षित आहे का तर कधीच नाही... त्याच्यामुळे आपल्याला एक तास वेळ आणि त्या एका तासाच्या दृष्टिकोनातूनच पेपर सेट होत असतो.

16. म्हणून कितीही अर्ज आले तरी चमकणारे हिरे बोटावर मोजण्याइतकेच असतात.

__ इथून पुढे एकदम शांततेत स्वतःच काम करा Best Luck 💐💐❤️

१८ एप्रिल २०२३

अर्थशास्त्र (Combined व पोलीस भरतीसाठी उपयुक्त)

Q1) पुढीलपैकी कोणते कररोपण भारत सरकारकडून होत नाही ?
1) प्राप्ती कर    
2) उत्पादन शुल्क
3) शेती उत्पन्नावरील कर✅
4) वरीलपैकी कोणताही नाही

Q2) भांडवली निधीमध्ये (महसूलामध्ये) ‘कर्ज आणि इतर जोखीम’ काय दर्शविते ?
1) रिझर्व्ह बँकेकडे असलेले सरकारी “ॲड हॉक” कर्जरोखे
2) नाणे बाजारातील 100 दिवसांचे सरकारी कर्ज रोखे.
3) लोकांना देय असलेली सरकारी देयता✅
4) वरीलपैकी नाही

Q3) मागील काही वर्षात देशातील एकूण सकल उत्पादनाच्या तुलनेत भांडवली खर्चाचा टक्का –
1) सतत घसरला✅  
2) अचल राहिला
3) सातत्याने वाढला
4) कुठलाही स्पष्ट आलेख (trend) नाही.

Q4) सन 2009-2010 मध्ये एकूण महसूलातील केंद्र सरकारच्या महसूली उत्पन्नाचा वाटा  ........................  होता.
1) 75.6 टक्के 
2) 66.3 टक्के
3) 80.6 टक्के ✅
4) वरीलपैकी नाही

Q5) सन 2009-2010 मध्ये भारतातील महसुली तुट किती होती ?
1) जी.डी.पी. च्या 5.1%
2) जी.डी.पी. च्या 2.5%
3) जी.डी.पी. च्या 6.1%   
4) वरीलपैकी नाही✅

Q6) भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ......... साली झाली.
1) 1935✅
2) 1920
3) 1947
4) 1950

Q7) उत्पादनाचे घटक .......... हे आहेत.
1) जमीन, कामगार आणी भांडवल✅
2) व्याज आणि पगार
3) शासकीय आर्थिक धोरणे
4) यांपैकी कोणतेही नाही

Q8) क्षेत्रीय ग्रामीण बँक ....... ह्या वर्षी सुरू करण्यात आली.
1) 1980
2) 1975✅
3) 1985
4) 1990

Q9) विदेशी व्यवहारांसाठी प्रमाणित डीलर कोण निवडत ?
1) सहकारी बँक
2) भारतीय रिझर्व्ह बँक✅
3) परकीय चलन विभाग
4) वरीलपैकी काहीही नाही

Q10) भारतीय 2000 रुपयांच्या नोटवर कोणाची सही आढळते ?
1) भारताचे अर्थमंत्री
2) अर्थमंत्रालयाचे सचिव
3) आर.बी.आय. चे गव्हर्नर✅
4) भारताचे राष्ट्रपती
-------------------------

⭕️Combine पुर्व 2021 इथून पुढील 14 दिवसांचे नियोजन आणि बरंच काही..

आता आपण पुढील 14 दिवसाचे नियोजन काय आणि कस करता येईल याविषयीं सविस्तर चर्चा करू.

1. पुढच्या 14 दिवसात प्रत्येक विषयांचे 1 चांगले Revision आणि शेवटी 1 fast Revision व्हायला हव. बघुयात सविस्तर..

2. साधारणता 14 दिवसांचे नियोजन 2 टप्प्यात केलं तर better राहील. पुढील 10 दिवसात इतिहास, भूगोल, Polity, Economy आणि Science या प्रत्येक विषयाला साधारण 2 दिवस असे 5 विषयांना एकूण 10 दिवस. याप्रमाणे आपली पुढील 10 दिवसात सर्व विषयांची 1 मस्त Revision झाली पाहिजेत.

3.आता तुम्हाला वाटेल आपली पाचच विषयांची Revision झाली. पण एक लक्षात घ्या Current आणि Math Reasoning ला इथून पुढील दिवसांमध्ये वेळ न देता तासांमध्ये वेळ द्या. म्हणजे तुम्ही Dailly 12 तास अभ्यास केला तर किमान 3 तास या विषयांना तुम्ही द्यायला हवेत.
Current आणि Math Reasoning हे Cutoff मध्ये deciding factors असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष नको.

4. आता तुमचे पहिल्या 10 दिवसात पहिले Revision होईल. अजून तुमच्याकडे 4 दिवस आहेत. यामध्ये प्रत्येक विषयच Revision करणं शक्य होणार नाही. त्याऐवजी, तुम्ही तुम्हाला weak वाटणारे विषय किंवा त्यामधील तुम्हाला weak वाटणारे उपघटक निवडून त्याची Revision  करू शकता. उदा. इतिहासात तुम्ही समाजसुधारक, Polity मध्ये Imp articles, सुची, परिशिष्ट्ये इ. वाचू शकता. तसेच Economy मध्ये लोकसंख्येची आकडेवारी तुम्ही पाठ करू शकता.

अशा प्रकारे शेवटच्या 4-5 दिवसात तुम्हाला येत असलेल्या गोष्टी Skip करून ( कारण तुम्हाला येणाऱ्या गोष्टी कधीही येणारच आहेत.)ज्या गोष्टी चुकु शकतात किंवा ज्याची revision करण्याची गरज आहे त्यावरतीच focus करा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त Output मिळेल.

वरील नियोजन जसेच्या तसे follow करावे असे काही नाही त्यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे बदल करू शकता. फक्त सांगण्याचा मुद्दा एवढाच की पुढील 14 दिवसात आपला Comprehensive अभ्यास होणं अपेक्षित आहे.

♦️यासोबतच खालील काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा.

1. Reading तर आपण करणारच आहोत    पण पुढच्या 14 दिवसांनमध्ये तुम्ही आयोगाचे खूप सारे PYQ नक्की बघा. फक्त PYQ Analysis करताना ते स्पष्टीकरण वाचण्यापेक्षा तो प्रश्न कोणत्या उपघटकावर आला आहे, या वर्षी कोणत्या उपघटकावर ते प्रश्न विचारू शकतात, तसेच तो प्रश्न अजून दुसऱ्या कोणत्या मार्गाने solve करता येऊ शकतो का??
अश्या सर्व पद्धतीने PYQ Analysis झालं पाहिजेत.

2. जे घटक तुम्हाला अवघड वाटतात त्या घटकांचे pyq चांगले करा. म्हणजे Reading कमी झालं तरी Marks येतील.

3. आता Revision करताना जास्त Detail मध्ये करण्याची वेळ राहिली नाही so आपला फोकस हा Fact वरती हवा. म्हणजे आपली परीक्षा पण Factual आहे so तो approach कायम डोक्यात असू द्या.

4. तुमचे कमीत कमी 5 Test Papers तरी सोडवून झालं असतील. आता इथून पुढे जास्त Test Papers Solve करण्यात Point नाही पण तरी तुम्हांला Time management साठी शक्य असल्यास अजूनही 3-4 Test Papers सोडवण संयुक्तीक असेल. पण जास्त test Papers च्या पाठीमागे लागण्यात काहीही Point नाही कारण आपल्याला आयोगाला marks पाडायचे आहे test papers ला नाहीत. So फक्त Time management म्हूणन त्या गोष्टींकडे बघा.

5. Combine पुर्व ही अभ्यासाएव्हडीच वेळेच्या आणि झालेल्या अभ्यासाच्या नियोजनाची परीक्षा आहे. So Actual exam मध्ये वेळेच्या नियोजनाचे नियोजन आतापासूनच डोक्यात असू द्या. Actual Paper मध्ये होणाऱ्या Silly mistakes कश्या कमी करता येतील यादृष्टीने पुढील दिवसांमध्ये काम होणं अपेक्षित आहे..

6. तुम्ही सर्वजण नक्कीच परीक्षा पास होणार आहात. जशी जशी परीक्षा जवळ येईल तसा तसा कॉन्फिडन्स वाढला पाहिजेत. स्वतः च्या प्रामाणिक कष्टावरती विश्वास ठेवा यश आपलेच आहे.

सर्वांना खूप खूप शुभेच्छा..

१७ एप्रिल २०२३

चालू घडामोडी प्रश्नसराव

(1)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.

(2)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम .

(3)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- 20 फेब्रुवारी .

(4)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- *तिरंदाजी.

(5)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.

(6)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर .

(7)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.

(8)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- 23 मार्च .

(9)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस .

(10)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार .
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...