०३ एप्रिल २०२३

combine रणनीती..

नमस्कार मित्रांनो,

आज आपण शेवटच्या 90 दिवसांमध्ये संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी आणि 60 गुण कसे मिळवावेत याबाबत चर्चा करूयात..

♦️ 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल पाहता आता सुरक्षित गुण किती असतील याबाबत कोणीच निश्चित सांगू शकत नाही. पहिल्या उत्तरतालिका नुसार किमान 60 गुण मिळवले तरच मुख्य परीक्षेला असण्याची खात्री राहणार आहे. सर्वांनी पूर्व परीक्षेला ठरवून 60 गुणांच्या वर स्कोर करण्याची आवश्यकता आहे.

♦️ इतिहास -

मागील संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर पाहता असे लक्षात येते की नेहमीच त्रास देणाऱ्या इतिहास या विषयाने विद्यार्थी मित्रांना भरपूर मदत केलेली आहे. 15 पैकी 14 गुण मिळवणारे बरेच विद्यार्थी मी स्वतः पाहिलेले आहेत त्यामुळे यंदा इतिहासामध्ये, जर पेपरचा दर्जा मागील प्रमाणेच राहिला तर, किमान 12 गुण मिळवणे अनिवार्य राहणार आहे. इतिहासाचे तयारी करण्यासाठी कोणतेही एकच आपण वापरू शकता. इतिहासामध्ये ज्ञान मिळवणे मर्यादीत असल्याने लॉजिक डेव्हलपमेंट आणि एलिमिनेशन टेक्निक्स खूप काम करतात.त्याबाबत आपण आवर्जून विचार करावा

♦️भूगोल-

बाबतीत,15 पैकी किमान 10 गुण मिळाले तर आपण पूर्व परीक्षा सहजासहजी पास होऊ शकतो.भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी सौदी सर किंवा खातीब सर किंवा दीपस्तंभ प्रकाशन यांचे पैकी कोणतेही एक महाराष्ट्राच्या भूगोल साठी वापरावे आणि भारताच्या भूगोलासाठी सौदी सरांचे पुस्तक वापरावे.

♦️पॉलिटी-

या विषयांमध्ये पूर्वी 10 पैकी 10 गुण मिळतात मात्र अभ्यासक्रमाचा आवाका व त्या तुलनेमध्ये कमी गुणांचा भारांक आणि आयोगाची प्रश्न विचारण्याची वाढत असलेली खोली पाहता सध्या आपणास 10 पैकी 7 ते 8 गुण मिळवणे आवश्यक असते. लक्ष्मीकांत सरांचे अथवा  कोळंबे सरांचे पुस्तक आपण यासाठी वापरू शकतो तसेच पंचायत राज या घटकावर येणाऱ्या 2 ते 3 प्रश्नांसाठी किशोर लवटे सरांचे पंचायत राज हे पुस्तक उपयुक्त ठरते. त्याचे वारंवार वाचन केले पाहिजे. शॉर्ट नोट्स बनवल्या पाहिजेत व त्याची वारंवार उजळणी झाली पाहिजे तरच प्रचंड डेटा आपल्या लक्षात राहू शकतो.

♦️अर्थशास्त्र-

येणाऱ्या प्रश्नांची काठिण्य पातळी सध्या कमी होत आहे म्हणजेच केवळ सर्वसामान्य अभ्यासावर आपण 15 पैकी 10 ते 12 गुण मिळवू शकतो. यासाठी देसले सर किंवा कोळंबे सर पैकी कोणतेही एक पुस्तक वाचण्यास पुरेसे ठरते. अर्थशास्त्राचे आयोगाचे मागील काही वर्षांचे प्रश्न पाहिल्यास आयोग कोणत्या घटकांवर किती आणि कसे प्रश्न विचारतो हे लक्षात येऊ शकते त्यामुळे पूर्वीच्या प्रश्नांना बिलकुल दुर्लक्षित करू नये.

♦️विज्ञान -

हा घटक सर्वसामान्यपणे सर्वच जनतेला किचकट वाटणारा विषय आहे तसेच प्रश्नांचा दर्जा मध्ये आयोगाने सातत्य राखलेले नाही. त्यामुळे कधी अभ्यास करून कमी मार्क तर कधी अभ्यास न करता ही सरासरी मार्क मिळतात मात्र तरीही स्टेट बोर्ड इयत्ता 7 ते 10 वी च्या पुस्तकांवर आपली कमांड असायला हवी किंवा सचिन भस्के सरांच्या पुस्तकाच्या किमान 3 ते 4 उजळण्या व्हायला हव्यात. लक्षात ठेवा की जर विज्ञान विषय अवघड आला तर तो सर्वांसाठी अवघड असेल आणि सोपा ला करतो सर्वांसाठीच सोपा असेल त्यामुळे या विषयावर ती मेरीट ठरण्याची शक्यता फार कमी असते.

♦️चालू घडामोडी-

हा पूर्व परीक्षांमधील सर्वांत अनिश्चित विषय मला वाटतो.यासाठी आयोग नक्की कोणता source वापरतो हे निश्चित समजत नाही. मात्र असे असले तरीही 15 पैकी 8 प्रश्न प्रयत्नपूर्वक अभ्यास केल्याने सुटू शकतात. परिक्रमा हे मासिक किंवा अभिनव अथवा सिंपलिफाईड प्रकाशनाचे वार्षिकी यातून बऱ्याच अंशी घटना कव्हर होतात. त्या पुस्तकांच्या 2 ते 3 उजळण्या केल्यास किमान 7 ते 8 गुण पडण्यास हरकत नाही.

♦️गणित बुद्धिमत्ता -

हा विषय पूर्व परीक्षांमधील मार्क देणारा विषय म्हणून ओळखला जातो मात्र काही विद्यार्थ्यांना हा विषय की  किचकट जातो मात्र दररोज सराव केल्यास या विषयाची भीती मनातून निघू शकते. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका पहा व आयोगाने कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आहेत यावरून बाजारात सापडणारे कोणतेही एक पुस्तक घेऊन त्यातून दररोज दोन ते अडीच तास सराव अपेक्षित आहे.

♦️अशाप्रकारे एकंदरीत आपण 60 गुणांची गोळाबेरीज परीक्षेपूर्वी जमा केली आणि त्यानुसार विषयांना वेळ वाटून दिला आणि उजळणी केली तर निश्‍चितपणे आपण संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये 60 पेक्षा जास्त गुण मिळवू शकतो. जितके जास्त गुण असतील तितकी पूर्व परीक्षा पास होण्याची खात्री अधिक असेल व त्यामुळे पूर्व परीक्षेचा निकाल पर्यंतचा वेळ वाट पाहण्यात जाणार नाही.
त्यामुळे वरील प्रमाणे अभ्यास करून अथवा आपल्या सोयीनुसार त्यामध्ये बदल करून 60 प्लस गुण मिळवणे आवश्यक ठरते.

❇️ तुमच्या अभ्यासासाठी अनेक अनेक शुभेच्छा.

👉The Achievers Mentorship.

Combine पूर्व ची घोडदौड...

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,

✳️ आज आपण कम्बाईन पूर्व परीक्षेसंदर्भात सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.

✳️ प्रत्येकाच्या अभ्यासानुसार प्रत्येकाचे स्ट्रॉंगपॉईंट आणि विक पॉईन्ट असतात.
त्यानुसार आपण कुठल्या विषयांमध्ये स्ट्रॉंग आहोत किंवा कुठल्या विषयांमध्ये विक आहोत हे ओळखून आपले स्वतःचे रणनीती असली पाहिजे.
कारण जेव्हा तुम्ही स्वतः नियोजन करताना ते नक्कीच यशस्वी होण्याचे मार्ग असतात.
बस झाले आता सल्ले, बस झाले आता व्हिडिओ पाहून, बस झाले आता फुकटचे सल्ले घेऊन, जरा स्वतःचे डोकं वापरा.
  स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा.
जर तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल तर निश्चितच मार्क्स येणार.
जो प्रामाणिकपणे करणार नाही त्याचं पुढं काय होतं हे सर्वांनाच ठाऊक आहे.

✳️ त्यामुळे तुम्ही तुमचे स्वतःचे नियोजन करा.
माझ्या माहितीप्रमाणे,
पुढील विषय मार्क मिळवून देणारे आहेत
जसे की राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल आणि विज्ञान.
इतिहासाविषयी पण आपण बोलणार आहोत
आणि शेवटचा उरतो करंट अफेयर्स आणि  गणित आणि बुद्धिमत्ता.

1. राज्यशास्त्र-

राज्यशास्त्र असा विषय, की सर्वजण म्हणतात यामध्ये खूप मार्क मिळतात खूप सोपा आहे
पण मित्रांनो यामध्ये खुप काही गोष्टी फॅक्च्युअल प्लस कन्सेप्ट तुमच्या जोपर्यंत क्लियर होत नाहीत तोपर्यंत मार्क येत नाहीत.
राज्यशास्त्र च्या बाबतीत लक्ष्मीकांत सरांचे पुस्तक एक संजीवनी ठरते.
एवढं मोठं पुस्तक पाहून बर्‍याच जणांना घाम फुटतो.
मग काही जणांना अडचण वाटते
त्यांच्यासाठी रंजन कोळंबे सरांचे हे पुस्तक आहे.
यामध्ये खूप पाठांतराचा भाग असल्यामुळे
कन्फ्युजन वाढण्याचे चान्सेस खूप असतात
उदाहरणार्थ आणीबाणीला घ्या
राष्ट्रपती च्या ऐवजी संसद किंवा संसदेच्या ऐवजी राज्य सरकार किंवा राज्य सरकारच्या ऐवजी राज्यपाल अशी शाब्दिक गफलत केली जाते.
ह्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे
जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित कराल
निश्चितच मार्क मध्ये वाढ होईल.

2.भूगोल-

कम्बाईन पूर्व साठी साधारणता महाराष्ट्राच्या भूगोल वर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात.
हा एक सोपा विषय आणि तुलनेने सर्वात जास्त म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा विषय असं बघून आपण पाहिलं पाहिजे.
स्टेट बोर्डाची पुस्तके पाचवी ते बारावी पर्यंत
आणि सोबत सौदी सरांचे किंवा कुठंलेही एक पुस्तक व्यवस्थित पाठ केले पाहिजेत.
ह्या गोष्टी जरी व्यवस्थित केल्या तर निश्चितपणे 15 पैकी तुम्हाला तेरा ते 11-12 मार्क पडू शकतात.

3.अर्थशास्त्र-

यासंदर्भात देसले सरांचं किंवा कोळंबे सरांचे कुठले एक पुस्तक व्यवस्थित रित्या करणे गरजेचे आहे.
अर्थशास्त्राच्या संदर्भात अनिकेत सरांनी मागील एक पोस्ट शेअर केली होती
ती पुन्हा चाळी तर निश्चितच फायदा होईल.

4.विज्ञान-

इथं score करायला बऱ्याच लोकांना जड जाते.
साधारणता सायन्स बॅकग्राऊंड विद्यार्थी यामध्ये लीड घेऊ शकता, पण बाकीच्यांनी पण घाबरायचं कारण नाही.
कारण विज्ञाना मधले काही ठराविक टॉपिक केले तर निश्चित मार्का मध्ये वाढ होऊ शकते.
जसे की प्राण्यांचे वर्गीकरण etc..
बायलॉजी या विषयावर एक साधारणत जास्तीत जास्त प्रश्नांचा कल दिसतो.
तुलनेने फिजिक्स आणि केमिस्ट्री यावर कमी प्रश्न असतात.
त्या पद्धतीने तुमचं नियोजन असायला हवं.
इथं प्रश्न solving वर जास्त काम करा..

5. इतिहास-

सध्याचा ट्रेंड पाहता इतिहासावर तुलनेने सोपे प्रश्न विचारले जात आहेत.
पण याचा अर्थ असा नव्हे की इतिहास सोपा आहे.
तुम्हांला ठराविक टॉपिक व्यवस्थित रित्या करावे लागतात तर आणि तरच त्यामध्ये मार्गामध्ये वाढ होऊ शकते. अन्यथा सोपे प्रश्नांमध्ये पण तुमची गफलत होऊ शकते.
इतिहासाच्या संदर्भात राम सरांनी एक पीडीएफ शेअर केलेली आहे की कठारे सरांचे पुस्तक कशा संदर्भात कशा पद्धतीने वाचावे.
त्या पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर निश्चित इतिहासामध्ये मार्क मिळू शकतात.

6. चालू घडामोडी-

यासंदर्भात एक वार्षीकी पुस्तक किंवा मग परिक्रमा.
वारंवार रिव्हिजन करणे.
आणि पाठांतर करणे.
कारण चालू घडामोडी हा असा विषय आहे
दोन ते तीन वेळा रिविजन केल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो.

अश्या रीतीने प्रत्येक विषयावर startegy आखली तर नक्कीच तुम्ही 60+ मार्क्स घेऊ शकतात..

सर्वाना शुभेच्छा.!

राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या.

💥संयुक्त पूर्व फोकस (Combine Focus)

▪️371 :-  महाराष्ट्र
👉 विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना करणे.

▪️371 :- गुजरात
👉 सौराष्ट्र व कच्छसाठी स्वंतत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.

▪️371(A) :- नागालँड
   13 (घटनादुरुस्ती ) 1962
👉 नागाहिल्स व ट्युएनसांग प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी करणे.

▪️371(B) :- आसाम
(22(घटनादुरुस्ती) 1969 हे कलम समाविष्ठ).
👉 आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.

▪️371(B) :- :-मणिपूर
(27 (घटनादुरुस्ती) 1971 ने समाविष्ठ)
👉 राज्यातील डोंगराळ प्रदेशाच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.

▪️371(F) :-  सिक्कीम
(36 घटनादुरुस्ती) 1975 ने समाविष्ठ)
👉  शांतता व जनतेच्या विविध गटांच्या सामाजिक आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी तरतुदी.

▪️371(H) :-अरुणाचल प्रदेश
(55(घटनादुरुस्ती) 1986 ने समाविष्ट)
👉 राज्यातील कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी.

▪️371(D) &(E) :- आंध्रप्रदेश व तेलंगणासाठी विशेष तरतुदी

▪️371(G) :- मिझोरमसाठी
👉 (53 घटनादुरुस्ती 1986 ने समाविष्ठ)

▪️371(I) :-गोव्यासाठी विशेष तरतुदी
👉 (56 घटनादुरुस्ती 1987 ने समाविष्ठ)

▪️371(j) :-कर्नाटक - हैद्राबाद प्रदेशासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.
👉 (98 घटनादुरुस्ती 2012 ने समाविष्ट.

🔵 ट्रिक - NAMA ने SIMI चे नाव  ARUNA व GOKARNA ठेवले😄
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
N- Nagaland( 371-A)
A- Assam( 371-B)
M - Manipur(371-C)
A  - Andhra Pradesh  ( 371-D, (E)
SI-Sikkim( 371-F)
MI- Mizoram (371-G)
ARUNA - Arunachal Pradesh( 371-H)
GO- Goa (371-I)
KARNA- Karnataka (371-J)

एमपीएससी  मंत्र : दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा – अर्थशास्त्र

मागील लेखामध्ये दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेच्या भूगोल घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली. या लेखामध्ये अर्थव्यवस्था या घटकाच्या तयारीबाबत चर्चा करण्यात येत आहे. या घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहित करण्यात आला आहे.

अ) भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.

ब) शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.

या उपघटकांची तयारी करताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते पाहू.

*  राष्ट्रीय उत्पन्न, परकीय व्यापार, मुद्रा, बँकिंग आणि राजकोषीय नीती.

*  राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. सकल देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी), सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीएनपी) यातील फरक समजून घेणे व त्याबाबतची अद्ययावत आकडेवारी माहीत असणे आवश्यक आहे.

*  भारताच्या परकीय व्यापारातील महत्त्वाचे भागीदार देश, सर्वात जास्त आयात / निर्यात होणारे देश किंवा संघटना, आयातीमधील व निर्यातीमधील सर्वाधिक मूल्य / वाटा असणाऱ्या वस्तू या बाबी सारणी पद्धतीत मांडून त्याचा अभ्यास करता येईल. यातील महत्त्वाच्या बाबींची मागील वर्षांच्या आकडेवारीशी तुलना करता आल्यास उत्तम.

*  चलनविषयक मूलभूत संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. त्या आधारे रिझव्‍‌र्ह बँक, तिचे अधिकार, कार्ये, विविध दर यांचा आढावा घ्यावा.

*  बँकिंगविषयक विविध व्याजदर, बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडी यांचा आढावा घ्यायला हवा.

*  राजकोषविषयक संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. राजकोषीय तूट, आधिक्य, त्यांचा अर्थ, कारणे, परिणाम या बाबी परीक्षेत विचारल्या जात नाहीत पण त्या समजून घेतल्याशिवाय आत्मविश्वासाने पेपर सोडविणे सोपे होणार नाही.

*  शेती, उद्योग

*  शेती क्षेत्र याचा अर्थ प्राथमिक क्षेत्र असा घेऊन अभ्यास करायचा आहे. कृषी, पशुपालन, मत्स्यव्यवसाय या सर्व बाबींचा समावेश अभ्यासामध्ये करायला हवा.

* या क्षेत्रातील वृद्धीचे ट्रेंड, कमी उत्पादकतेची कारणे, उत्पादनास चालना देणाऱ्या विविध योजना यांचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे.

* आर्थिक विकासामध्ये आर्थिक पाहणी अहवाल, अर्थसंकल्प, विविध आर्थिक निर्देशांक व अहवाल, पायाभूत सुविधा व इतर अर्थविषयक योजना आणि असल्यास नवे कायदे वा तरतुदी यांचा समावेश होतो. या सर्व बाबी चालू घडामोडींचाच एक भाग आहेत.

*  महत्त्वाचे उद्योग व त्यांच्यासाठी प्रसिद्ध शहरे / क्षेत्रे, महारत्न, नवरत्न, मिनीरत्न कंपन्या, सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण धोरण, खासगी उद्योगांचे प्रकार, उद्योग क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीच्या मर्यादा यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.

*  प्राथमिक व उद्योग क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा, आयात व निर्यातीमधील वाटा माहीत असायला हवा.

*  दारिद्रय़ व बेरोजगारी

*  दारिद्रय़ अभ्यासासाठी नेमलेल्या समित्यांच्या अहवालातील मुख्य शिफारशी माहीत असायला हव्यात.

* रोजगारविषयक संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. रोजगारविषयक निर्देशांक व ठळक अद्ययावत आकडेवारी नेमकेपणाने माहीत असायला हवी.

*    राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेची दारिद्रय़विषयक अहवाल व आकडेवारी अद्ययावत करून घ्यावी.

* पंचवार्षिक तसेच इतर योजनांत दारिद्रय़ निर्मूलनासाठी राबवलेले कार्यक्रम त्याची उद्दिष्टय़े आणि परिणाम यांचा आढावा घ्यावा.

* रोजगारनिर्मितीसाठीच्या तसेच स्वयंरोजगाराबाबतच्या महत्त्वाच्या योजना व त्यातील तरतुदी माहीत करून घ्याव्यात.

* कौशल्य विकासासाठीच्या योजना व त्यातील तरतुदी माहीत करून घ्याव्यात.

* अशा योजनांमधील तरतुदी, लाभार्थ्यांचे निकष, उद्दिष्टे यांचा अभ्यास आवश्यक आहे.

* लोकसंख्या अभ्यास

* सन २०११च्या जनगणनेच्या आकडेवारीमधून एकूण लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, साक्षरता, लिंग गुणोत्तर, बाल लिंग गुणोत्तर, नागरी व ग्रामीण लोकसंख्या, नागरीकरण अशा घटकांची सारणी पद्धतीत मांडणी करून त्याची टिप्पणे काढून अभ्यास करणे सोपे व व्यवहार्य ठरेल.

* वरील सर्व मुद्दय़ांची सन २०११ व सन २००१मधील आकडेवारी / माहितीशी तुलना करणारी सारणी तयार करता आल्यास तोही उपयुक्त ठरेल.

* राष्ट्रीय लोकसंख्या धोरण, धोरणाची उद्दिष्टय़े, दीर्घकालीन आणि अल्पकालीन ध्येय. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग – रचना, उद्दिष्टय़े, कार्यपद्धती हे घटक वस्तुनिष्ठ तयारीमध्ये समाविष्ट करावेत.

* जन्मदर, मृत्यूदर, जननदर, जन्मावेळचे आरोग्यमान यांबाबत ठळक बाबी व आकडेवारीचा आढावा घ्यावा.

*  शासकीय अर्थव्यवस्था

* अर्थसंकल्प मुद्दय़ामध्ये याबाबतची कायदेशीर प्रक्रिया, अर्थसंकल्पातील तूट/आधिक्य व त्याचे परिणाम, यातील संकल्पना समजून घ्यायला हव्यात. त्या त्या वर्षांतील अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदी, योजना यांचा अभ्यास गरजेचा आहे.

* महसुली उत्पन्न, करांचे प्रकार व त्यांचा एकूण महसुलातील वाटा माहीत असायला हवेत.

* लेखा व लेखापरीक्षण याबाबत भारताचे नियंत्रक व लेखापरीक्षक यांचे अधिकार व कार्ये समजून घ्यावीत.

* अनुषांगिक तयारी

* व्यापार सुलभता/ दारिद्रय़/ भूक/ लिंगभाव असमानता/ मानव विकास हे जागतिक निर्देशांक व त्यातील भारताची कामगिरी याचा आढावा घ्यायला हवा. याबाबत विशिष्ट उल्लेखनीय मुद्दे माहीत असावेत.

* पंचवार्षिक योजनांमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी आखलेल्या धोरणांचा थोडक्यात आढावा घ्यावा व त्याचे यशापयश लक्षात घ्यावे.

My Strategy : संयुक्त पूर्व परीक्षा

1) पेपर सोडवत असतांना जे जे प्रश्न sure येत असतील ते लगेच Answersheet वर गोल करून घ्या, ह्यामुळे तुमचे 5 मिनिटे वाचतात व त्याचा शेवटी गणिते सोडवताना उपयोग होतो.

शेवटी गोल काळे करण्यामुळे गोंधळात ते चुकतात आणि वेळ वाया जातो.


2) Avoid YZ Questions : काही प्रश्न हे निव्वळ तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी दिलेले असतात ,असे काही प्रश्न इतिहास,विज्ञान व गणितात असतात ते Skip करत चला.


3) Attempt किती ठेवावा ? : ज्यांना STI/ASO द्यायचा आहे त्यांनी जरूर Attempt 90+ ठेवावा. PSI फोकस असणाऱ्यांनी 85-90 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.


4) आज आणि उद्या महत्वाचे चार्ट/कलमे/आकडेवारी/गणिते सूत्र/current topics बघून घ्यावे


5) Be Positive: काही जणांना पेपर सोडविताना घबराट होते, कृपया मनात आत्मविश्वास बाळगा ,पेपर सुरू होण्याच्या आधी 10 मिनिटे डोळे लावून आपल्या प्रेरणस्थानाचे स्मरण करा.


6) लक्षात ठेवा तुमची लढाई ही "स्व" ची "स्वतःशी" आहे 


7) Avoid Silly Mistakes: प्रश्न नीट वाचत चला ,गोल काळे करतांना आधी option वर टिक करूनच गोल काळे करा,चूक /अचूक इ. शब्दाला underline करून option select करा.


8) केंद्रावर पोहोचल्यावर मित्रांना भेटून फालतू गप्पा करायच्या टाळून ,चालू घडामोडी वाचण्यावर भर दिला तर उत्तम.

संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

🛑इतिहास

1) महाराष्ट्रातील समाजसुधारक
2) क्रांतिकारी चळवळ
3) सामाजिक व सांस्कृतिक बदल
4) क्रांतिकारकांचे कार्य
5) ब्रिटिश गव्हर्नर व व्हाइसरॉय
6) 1857 चा उठाव व भारत
7) सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी
8) मवाळ व जहाल कालखंड
9) गांधीयुग व सत्याग्रह पर्व
10) सशस्त्र क्रांतिकारी चळवळी
11) भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे शेवटचे पर्व
12) ब्रिटिश सत्तेचे प्रारंभीचे स्वरूप
13) समाजसुधारक - महाराष्ट्र
14) राष्ट्रवादाचा उदय व राष्ट्रीय चळवळ
15) प्रारंभिक राष्ट्रीय संघटना
16) महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळ
17) महाराष्ट्रातील सामाजिक चळवळ
18) महाराष्ट्र राज्यनिर्मिती व मराठवाडा मुक्तीसंग्राम
19) काँग्रेस व अधिवेशने

🛑भूगोल

1) महाराष्ट्रातील नदया
2)महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल
3) महाराष्ट्रातील वने
4) महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती
5) मृदा व जलसिंचन
6) पर्यटन व वाहतूक
7) महाराष्ट्रातील उद्योगधंदे
8) आर्थिक भूगोल
9) महाराष्ट्रातील हवामान

🛑अर्थशास्त्र

1) Reserve Bank Of India
2) राष्ट्रीय उत्पन्न
3) गरिबी व बेरोजगारी
4) गरीबीचे निर्देशांक व अंदाज
5) अर्थव्यवस्थेतील मूलभूत संकल्पना व भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये
6) दारिद्र्य व बेरोजगारी
7) आर्थिक विकास व मानव विकास, शाश्वत विकास
8) आर्थिक नियोजन
9) दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती योजना
10) भारताची लोकसंख्य
11) भारतीय भांडवल बाजार
12) सार्वजनिक वित्त
13) भारतीय चलन व्यवस्था व किंमती
14) भारतातील आर्थिक सुधारणा
15) भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार
16) भारतीय कर रचना

🛑राज्यशास्त्र

1) भारतीय घटनेचा प्राथमिक अभ्यास
2) राज्य विधानमंडळ
3) केंद्रशासित प्रदेश
4) विशेष राज्य दर्जा ( कलम 370 व 35 A )
5) राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास
6) संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र
7) नागरिकत्व
8) मूलभूत हक्क
9) मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये
10) घटनादुरुस्ती व आणिबाणीविषयक तरतुदी
11) राष्ट्रपती व राज्यपाल, उपराष्ट्रपती
12) पंतप्रधान व मुख्यमंत्री
13) महान्यायवादी व महाधिवक्ता
14) संसद
15) सर्वोच्च व उच्च न्यायालय
16) कनिष्ठ न्यायव्यवस्था
17) केंद्र - राज्य संबंध व आंतरराष्ट्रीय संबंध
18) घटनात्मक व बिगर घटनात्मक संस्था

🛑विज्ञान

1)भौतिकशास्त्र
2)जीवशास्त्र
3)रसायनशास्त्र
4)आरोग्यशास्त्र

🛑अंकगणित व बुद्धिमत्ता

1) कॅलेंडर + घड्याळ
2) नातेसंबंध + ठोकळा
3) दिशाज्ञान + रांगेतील गणित
सांकेतिक भाषा + असमानता तुलना
5) तर्क व अनुमान / तर्क आणि निष्कर्ष
6) खरे - खोटे + समिकरण
7) नळ व टाकी + चलन
8) अंतर वेळ वेग + बोट आणि प्रवाह - भाग
10) काळ - काम
11) शेकडेवारी
12) नफा - तोटा
13) सरळ - चक्रवाढ व्याज
14) गुणोत्तर प्रमाण
15) वयवारी + भागेदारी

🛑चालू घडामोडी

1) राजकीय घडामोडी
2) अंतरिक्ष घडामोडी
3) आर्थिक घडामोडी
4) महत्वाचे अहवाल व निर्देशांक
5) कृषी व पर्यावरण घडामोडी
6) आरोग्य विषयक घडामोडी
7) संरक्षण घडामोडी
8) विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी
9) प्रमुख नेमणुका व निधन वार्ता
10) पुरस्कार
11) राष्ट्रीय घडामोडी
12) आंतरराष्ट्रीय घडामोडी
13) आंतरराष्ट्रीय संस्था आणि करार
14) संमेलने , दिनविशेष , पुस्तके
15) शासकीय योजना , समित्या

दष्टिक्षेपात राज्यघटनेची महत्त्वाची परिशिष्टे.

❇️परिशिष्ट क्रमांक - 2 


♦️वतन भत्ते व विशेष अधिकार याबाबतच्या तरतुदी


1)राष्ट्रपती  २. राज्यपाल

३. लोकसभेचा सभापती व उपसभापती

४. राज्यसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष

५. राज्यातील विधानसभांचे सभापती व उपसभापती

६. राज्यातील विधानपरिषदांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष

७. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

८. उच्च न्यायालयांचे न्यायाधीश

९. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक


❇️ परिशिष्ट क्रमांक - 3 


♦️(शपथ किंवा 

वचननाम्याची प्रारूपे)


१. केंद्रीय मंत्री

२. संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार

३. संसद सदस्य

४. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

५. भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक

६. राज्यातील मंत्री

७ .विधिमंडळांच्या निवडणुकीतील उमेदवार

८. राज्य विधिमंडळ सदस्य

९. उच्च न्यायालयांचे न्यायाधीश.


❇️परिशिष्ट क्र- 8 (भाषा 344 व 351)


♦️घटनेने मान्यता दिलेल्या भाषा. 


सुरुवातीला या भाषा १४ इतक्या होत्या. सध्या या परिशिष्टात २२ भाषा आहेत. त्या पुढीलप्रमाणे आसामी, बंगाली, बोडो, डोगरी (डोगरी), गुजराती, हिंदी, कन्नड, 6. काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलुगु व उर्दू. २१ वी घटनादुरुस्ती अधिनियम, १९६७ अन्वये सिंधी, ७१ वी घटनादुरुस्ती अधिनियम, १९९२ अन्वये कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी, ९२ वी घटना दुरुस्ती अधिनियम, २००३ अन्वये बोडो, डोग्री, मैथिली व संथाली या भाषांचा समावेश आठव्या परिशिष्टात करण्यात आला. ९६ वी घटनादुरुस्ती अधिनियम,२०११ अन्वये ओरिया भाषास उड़िया असे नाव देण्यात आले.


राज्यसेवा व संयुक्त पूर्व दोन्ही परीक्षांसाठी उपयुक्त घटक आहे.प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही वरील टॉपिक व्यवस्थित वाचून घ्या.


संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नसंच

 पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?

1) बोस – आईनस्टाईन कंडनसेट ☑️

2) फर्मआयोनिक कंडनसेट

3) एरिक – कॅटरले कंडनसेट      

4) कार्नेल टर्मस् कंडनसेट



. धातूंचे क्षरण थांबविण्यासाठी खालील पध्दतींपैकी अयोग्य पध्दत कोणती ?

अ) गॅल्व्हॉनायझिंग – लोखंड/स्टील यांवर जस्ताचा थर लावणे.

ब) टायनिंग – कथिलचा थर लावणे (कलई करणे).

क) ॲनोडायझिंग – विद्युत अपघटनाव्दारे तांबे किंवा ॲल्युमिनीअमवर ऑक्साईडचा पातळ थर लावणे.

1) फक्त अ    

2) फक्त ब ☑️

3) फक्त क    

4) वरीलपैकी एकही नाही


  खालीलपैकी कोणते क्षार हे डी.एन.ए. मध्ये असतात. ?

अ) एडीनीन – A  

ब) गुआनीन – G    

क) थायमिन – T    

ड) साइटोसीन – C

1) अ, ब    

2) अ, ब, क ☑️

3) ब, क, ड    

4) अ, ब, क, ड



  वस्तुमान आणि आकारमान यांचे गुणोत्तर म्हणजे कोणती भौतिक राशी होय ?

1) चाल    

2) घनता      

3) जडत्व    

4) त्वरण ☑️


 खालीलपैकी कोणता मूलद्रव्य पहिल्या महायुध्दात हत्यार म्हणून वापरण्यात आला होता. ?

1) मिथेन ☑️

2) क्लोरीन    

3) फ्लोरीन    

4) आयोडीन

इतिहास : सराव प्रश्नसंच 📚

१) भारतात सती प्रथा बंद आंदोलन कोणी सुरु केले?*

A. जगन्नाथ शंकरशेठ✅

B. राजा राममोहन रॉय 

C. ईश्वरचंद्र विघासागर

D. केशवचंद्र सेन


२) इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले होते?

A. शिवराज परांजपे 

B. सेनापती बापट

C. महंमद इकबाल

D. महात्मा गांधी✅


३) ज्ञानेश्रर महाराजांनी भगवदगीतेवर कोणता ग्रंथ लिहिला?

A. भावार्थदिपिका 

B. अमॄतानुभव

C. ज्ञानेश्वरी✅

D. हरिपाठ


४) इ.स १३५० मध्ये संत नामदेवांनी कोठे समाधी घेतली?

A. देहू 

B. आळंदी

C. पैठण

D. पंढरपूर✅


५) दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?

A. रामदास स्वामी✅ 

B. चांगदेव

C. संत तुकाराम

D. संत सावता माळी


६) शाळेत शिक्षण घेत असतानाच मराठी व्याकरणाचे पुस्तक लिहिणारे?

A. विष्णूशास्त्री पंडित 

B. लोकहितवादी

C. दादोबा पांडुरंग तर्खडकर✅

D. बाळशास्त्री जांभेकर


७) महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठाने एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?

A. बनारस विद्यापीठ 

B. पुणे विद्यापीठ

C. श्रीमती ना.दा.ठाकरसी महिला विद्यापीठ

D. मुंबर्इ विद्यापीठ✅


८) १९५० मध्ये जगदंब कुष्ठ निवासाची स्थापना कोणी केली?

A.डॉ. शिवाजीराव पटवर्धन✅ 

B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

C. बाबा आमटे

D. छत्रपती शाहू महाराज


९) ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत कोण होते?

A. सत रामदास 

B. संत नामदेव✅

C. संत तुकाराम

D. संत एकनाथ


१०) स्थानिक स्वराज्य संस्थाचा कायदा कोणी केला?

A. रिपन✅

B. लिटन

C. डफरीन 

D. कॉर्नवॉलिस.


शिक्षण हा समाज क्रांतीचा पाया आहे, असे कोण म्हणाले???

A】 कर्मवीर भाऊराव पाटिल🎂🎁

B】 अण्णाभाऊ साठे

C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D】 पेरियार रामास्वामी



🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


शाक्य दंडपाणी आणि यशोधरा यांचे नाते काय???

A】 सासरा - सुन

B】 मित्र - मैत्रीण

C】 भाऊ - बहिण

D】 बाप - मुलगी🎂



🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


भागवत गीता म्हणजे दूसरे तिसरे काही नसून बौद्धांच्या धर्म ग्रंथातील चोरी आहे असे कोणी म्हटले???

A】 प्रबोधनकार ठाकरे

B】 अण्णाभाऊ साठे

C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर🎂

D】 शाहू महाराज

 

🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁



विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांचे एम.ए चे शिक्षण केंव्हा पूर्ण झाले???

A】 १९१४

B】 १९१५🎂

C】 १९१६ 

D】 १९१७


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


भगवान बुध्द यांनी प्रथम किती लोकांना धम्मदीक्षा दिली???

A】 पाच🎂

B】 दोन

C】 सात

D】 तीन


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


मुक्ता साळवे ही कोणाची विद्यार्थिनी होती???

A】राष्ट्रपिता फुले

B】 केळूसकर गुरूजी

C】 सावित्रीआई फुले🎂

D】 फातिमा शेख


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


१०४】 शहाजी राजे यांच्या वडिलांचे नाव काय???

A】 रामजी

B】 संताजी

C】 लहुजी

D】 मालोजी🎂


🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁🎂🎁


पुणे करार केंव्हा झाला???

 24 सप्टेंबर 1932


🎁🎂


इतिहासातील काही महत्त्वपूर्ण तथ्य.


●निष्काम कर्ममठ (1910) महर्षी धो.के.कर्वे


●निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे यांना संबोधतात.


●हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले यांना संबोधतात.


●महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील यांना संबोधतात.


●हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय यांना संबोधतात.


●महाराष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले यांना संबोधतात.


●अहिल्याश्रम (1923) वि.रा.शिंदे


●पवनार आश्रम ,वर्धा (1921) विनोबा भावे


●अनाथ बालिका आश्रम (1899) महर्षि धो.के.कर्वे


●विक्टोरीया अनाथाश्रम (1869) महात्मा फुले


●विक्टोरीया मराठा बोर्डींग (1901) शाहू महाराज


●सेवा समिती (1910) हृदयनाथ कुंझर


●पूना सेवा सदन (1884) रमाबाई रानडे


●शारदा सदन मुंबई (1889 ) पंडिता रमाबाई


●मुक्ती सदन केडगाव (1898) पंडिता रमाबाई 


●कृपा सदन, प्रीती सदन —पंडिता रमाबाई


●केसरी — लोकमान्य टिळक


●महाराष्ट्र केसरी — पंजाबराव देशमुख


●महाराष्ट्र धर्म —विनोबा भावे


●अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) पंजाबराव देशमुख


●पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) साने गुरुजी


●नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — (नेतृत्व) बाबासाहेब आंबेडकर


●पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —(नेतृत्व) एस.एम.जोशी


●कुसाबाई शी पुनर्विवाह 1874 रोजी  विष्णू शास्त्री पंडित यांनी केला.


●गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) महर्षी धो.के.कर्वे यांनी केला.


●स्वत:च्या मुलीचा पुनर्विवाह  रा.गो.भांडारकर यांनी केला.


●विधवा विवाह उत्तेजक मंडळी  (1893)महर्षी धो.के.कर्वे


●पुनर्विवाह उत्तेजक मंडळी (1865) न्या.म.गो.रानडे


●विधवा विवाह पुस्तक — विष्णू शास्त्री पंडित 


●विधवा विवाहाचा कायदा व पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता (1917) शाहू महाराज यांनी दिली.


●आंतर जातीय विवाहास मान्यता देणारा  कायदा (1918)  शाहू महाराज यांनी केला.


कर्मवीर भाऊराव पाटील


बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवणारे आधुनिक भगीरथ आणि वटवृक्ष-रूप धारण केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक!


रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहीरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.



पुढील काळात ते सातार्‍यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मद्वान्नामास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदी मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातीधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.



दिनांक ४ ऑक्टोबर, १९१९ रोजी कर्मवीरांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. संस्थेची काही उद्दिष्टे होती -


मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.

मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना शक्यतो मोफत शिक्षण देणे.

निरनिराळ्या जातीधर्मातील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.

अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.

संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.

सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान, उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.

बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल, तेव्हा संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.

ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी आयुष्यभर अमाप कष्ट केले. केवळ क्रमिक शिक्षण नव्हे तर, समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.



सातार्‍यात त्यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांना आपल्या पत्नीचे दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. १६ जून, १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली सातार्‍यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.



भाऊरावांनी देशातलं ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वानुसार चालणारे पहिले ‘फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. १९४७ साली कर्मवीरांनी सातार्‍यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर १९५४ साली कर्‍हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली.  शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची वानवा पडू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावानं ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे कर्मवीरांच्या डोळ्यासामेर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.



१९५९ साली त्यांना पुणे विद्यापीठाकडून ‘डी.लिट्’ पदवी बहाल करण्यात आली. भारत सरकारनेही ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला. श्री. ह. रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृती भवन - यांच्या माध्यमातून कर्मवीरांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या -शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणार्‍या- आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, १९५९ रोजी मालवली.

MPSC, पोलीस भरती,आर्मी भरती उपयुक्त

 ................ हा उत्तर अमेरिक आणि दक्षिण अमेरिक यांना जोडणारा महामार्ग आहे.

⚪️ टरान्स कॅनेडियन हायवे

⚫️ गरँड ट्रंक महामार्ग  

🔴 पन अमेरिकन महामार्ग  ✔️

🔵 सटुअर्ट महामार्ग


भारतात कोणत्या साली भोपाळ दुर्घटना झाली?

⚪️१९८०

⚫️१९१५

🔴१९४७

🔵१९८४✔️


रक्तागोठाण्यासाठी कोणत्या जीवनास्सात्वाचा उपयोग होतो?

⚪️ क✔️

⚫️ अ 

🔴 ड

🔵 ब



तांबे व जस्त यांच्या मिश्रीणातून कोणता धातू तयार होतो?

⚪️ टिन

⚫️ पितळ✔️

🔴 शिसे

🔵 पारा



डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केव्हा केला?

⚪️ जलै १९५१

⚫️ म १९५३

🔴 म १९५५

🔵 ऑक्टोबर १९५६✔️


५०० मिली /१०० × ४ = किती टन ?

⚪️ ०.००२२

⚫️ ०.२२

🔴 २.२०

🔵 ०.०२२✔️


लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कुणी दिली?

⚪️ सरेंद्रनाथ बॅनर्जी

⚫️ दादाभाई नवरोजी 

🔴 फिरोशहा मेहता 

🔵 गोपाळ कृष्ण गोखले✔️



भारतीय राज्यघटनेच्या ................ कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेत आहे?

⚪️१९ ते २२✔️

⚫️३१ ते ३५

🔴२२ ते २४

🔵३१ ते ५१


कोणत्या घटना दुरुतीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?

⚪️३२ साव्या

⚫️३९ साव्या

🔴४२ साव्या✔️

🔵४४ साव्या


स्वातंत्र्याच्या कोणत्या शहराची प्रथमच नियोजनबध्द रचना करण्यात आली?

⚪️चदीगड  ✔️

⚫️नवी दिल्ली

🔴नवी मुंबई

🔵अमृतस


खाली दिलेल्या राशींपैकी अदिश राशी .................... आहे 

⚪️ विस्थापन 

⚫️ चाल☑️

🔴 गती

🔵 तवरण 


वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?

⚪️ ऑक्सिजन

⚫️ हड्रोजन

🔴 कार्बन डायऑक्साईड☑️

🔵 नायट्रोजन



न्यूटनचा दुसरा नियमफ ----------- चे मापन देतो?

⚪️सवेग☑️

⚫️बल

🔴तवरण

🔵घडण


कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवितात?

⚪️अल्फा

⚫️बिटा

🔴गमा☑️

🔵कष-किरण


रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?

⚪️मलॅनिन

⚫️इन्शुलिन☑️

🔴यकृत

🔵कल्शियाम


 मायका चा वापर कोणत्या कारणांसाठी करतात?

⚪️रग तयार करणे

⚫️विद्युत रोधक म्हणून☑️

🔴विद्युत सुवाहक म्हणून 

🔵वरील सर्व कारणांसाठी 


धान्यसाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

⚪️सोडियम क्लोरेट☑️

⚫️मायका

🔴मोरचुद

🔵कॉपर टिन


बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने .................. असते.

⚪️मोठी

⚫️लहान☑️

🔴दप्पट

🔵तिप्पट


वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले, तर तिचे त्वरण ........................

⚪️तितकेच राहते

⚫️निमपट होत

🔴चौपट होते

🔵दप्पट होते ☑️


ध्वनीचे प्रसारण ..................... मधून होत नाही .

⚪️सथायू ☑️

⚫️दरव

🔴वायू

🔵निर्वात प्रदेश 


न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकाणात ---------- राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते.
⚪️राष्ट्रवादी 
⚫️समाजवादी 
🔴अर्थवादी
🔵सनदशीर✅

वसईचा तह कोणात झाला?
⚪️टीपू सुलतान - इंग्रज
⚫️दसरा बाजीराव पेशवे - इंग्रज✅
🔴रघुनाथ पेशवे - इंग्रज
🔵पशवे - पोर्तुगीज


खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये गांधीजींचा सहभाग नव्हता?
⚪️ बार्डोली सत्याग्रह ✅
⚫️चफारण्य सत्याग्रह 
🔴काळ्या कायाघाचा निषेध 
🔵खडा सत्यांग्रह 

बाबू गेनूने कोणत्या ठिकाणी आत्मबलीदान दिले?
⚪️नदुरबार 
⚫️मबई✅
🔴पणे
🔵सातारा

सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये श्री. नाराण धर्मपालन योगम या संस्थेची स्थापना कोणी केली?
⚪️नारायण स्वामी 
⚫️नारायण गुरु✅
🔴दयानंद सरस्वती
🔵राधाकृष्णन 

दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?
⚪️रामदास✅
⚫️चांगदेव
🔴सत तुकाराम
🔵सत सावता माळी


गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते कोण होते?
⚪️सरदार वल्लभभाई पटेल
⚫️अरुणा असफअली 
🔴राम मनोहर लोहिया ✅
🔵नानासाहेब गोरे

मिठाच्या सत्याग्रहात प्रसिध्दीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
⚪️मबई
⚫️रत्नागिरी 
🔴सिंधुदुर्ग ✅
🔵ठाणे

कॉग्रेसचे १९३६ चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले?
⚪️फजपूर✅
⚫️आवडी
🔴मद्रास
🔵रामनगर

संत तुकारामांचा जन्म कोठे झाला?
⚪️दहू✅
⚫️आळंदी
🔴जांब
🔵पठण


इतिहासप्रसिद्ध वक्तव्ये


·        " वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी "

 - भारतमंत्री मोर्ले


·        'सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग' असे कॉंग्रेसचे वर्णन 

- लॉर्ड डफरीन


·        "हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे"

- भारतमंत्री बर्कनहेड


·        स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे " लढाऊ हिंदू धर्म" असे वर्णन

- भगिनी निवेदिता


·        राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल 'मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक' असीप्रशांश 

– बेंथम


·        "मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहरा इतकेच धनसंपन्न होते" 

- लॉर्ड क्लाइव्ह


·        "प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे."

--अश्विनीकुमार दत्त.


·        " भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ." असे कॉंग्रेसचेवर्णन 

- अश्विनीकुमार दत्त.


·        " कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे" 

- अरविंद घोष


·        " आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ"

 - लॉर्ड एल्गिन


·        " टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे "

- सुरेंद्रनाथ बनर्जी


·        " बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजेआमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे." 

- सुरेंद्रनाथ बनर्जी



·        " कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकूनघेतले पाहिजेत." 

– लाला लजपतराय


·        ‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ 

– गोखले


·        ' रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी '

- लोकमान्य टिळक


·        " आम्हाला न्याय हवा आहे भिक नको"

- दादाभाई नौरोजी


·        "बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तरफिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते."

- आचार्य जावडेकर


·        "लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली" 

- डॉ. मुजुमदार


·        " कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार." 

- गारेट ब्रिटीशइतिहासकार.


·        " अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत." 

- लॉर्ड मॉनटेग्यु


·        क्रांतीकारकांना 'वाट चुकलेले तरुण' असे अनी बेझंट यांनी संबोधले.


·        "गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीनेसांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनचपळ काढतात."

- चित्तरंजन दास.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...