२१ फेब्रुवारी २०२३

गाडगे महाराज




गाडगे महाराज (जन्म: फेब्रुवारी २३, १८७६- मृत्यु: २० डिंसेंबर १९५६ ) हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

बालपण :
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते.
डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.

सामाजिक सुधारणा :
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकर्‍यांना शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.

महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.

अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे नामकरण करण्यात आलेले आहे.
"संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश "
गाडगेबाबा प्रबोधन काव्य
भुकेलेल्यांना = अन्न
तहानलेल्यांना = पाणी
उघड्यानागड्यांना = वस्त्र
गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
बेघरांना = आसरा
अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
बेकारांना = रोजगार
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
दुःखी व निराशांना = हिंमत
गोरगरिबांना = शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !!

संक्षिप्त चरित्र :-
गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.
ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले.
१९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.
१९२५- मुर्तिजापूर येथे गोरक्षण कार्य केले आणि धर्मशाळा व विद्यालय बांधले.
१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.
"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
१९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डे यांनी गायले.[१]
आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'
१९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
१९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.
गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
डॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत.
२० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.

गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराज यांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते.

गाडगेबाबा आणि बाबासाहेब आंबेडकर :
१४ जुलै १९४१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. बाबांचा निरोप मिळताच त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्‍या बाबांनी बाबासाहेबांकडून २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक मिनिट महत्त्वाचे आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."
तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.

गाडगेबाबांचे विचार :
एकदा गाडगेबाबा रस्त्याने जात असताना...समोर एक व्यक्ती दगडाची पूजा करत असताना त्यांना दिसली. त्याने दगडावर हार चढविला. दुधाने अंघोळ घातली. इतक्यात एक कुत्रा आला आणि मागील पाय वर करून त्या दगडावर मूत्र विसर्जन करू लागला. ती व्यक्ती चिडली. त्याला कुत्र्याचा फार राग आला. तो कुत्र्याला मारण्यासाठी हातात दगड घेऊन धावू लागला. तेव्हा गाडगेबाबा म्हणाले, " बिचार्‍या गरीब मुक्या जनावरांना त्रास का देता ?

त्याला हे कुठं माहीत आहे की, माणसांचा देव दगड असतो म्हणून ?"
पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरून येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखून टिळकांनी बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकांचे अथणीला झालेले भाषण बाबांना ठाऊक होते.. स्टेजवर येताच बाबांनी टिळकांच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही हयातभर तुमची कापडं धुतली, इस्त्री केली. तवा आम्ही कसे मार्गदर्शन करू? महाराज काय बी करा पण आम्हालाबी ब्राह्मण करा."

गाडगे महाराज यांच्यावरील पुस्तके :
The Wandering Saint (वसंत शिरवाडकर) - श्री गाडगे बाबा प्रकाशन समिती, मुंबई
आपले संत (एस.ए. कुलकर्णी) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९३)
कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे) -लोकवाड्मय गृह, मुंबई (१९९२)
गाडगेबाबा (वसंत पोतदार) -अक्षर प्रकाशन, मुंबई (१९९९)
गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी) - विजयश्री प्रकाशन, अमरावती (१९९३)
गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार) -योगेश प्रकाशन, पुणे (१९९३)
दिव्याला गाडगे महाराज (गो. भट) -नवलवय मुद्रणालय, अहमदाबाद (१९८२)
मानवता के पुजारी संत श्री गाडगे बाबा (स्यमंत सुधाकर) -गाडगेबाबा प्रकाशन समिती, मुंबई (१९९०)
मुलांचे गाडगेबाबा (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला कोल्हापूर (१९९२)
लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
लोकोत्तर गाडगेबाबा जीवन आणि कार्य (द.ता. भोसले) -ग्रंथाली, मुंबई (२००७)
श्री. संत गाडगे महाराज (मधुकर केचे) -साकेत प्रकाशन, औरंगाबाद (२००४)
श्री. संत गाडगे महाराज (गो.नी. दांडेकर) -मॅजेस्टिक, प्रकाशन मुंबई (१९९५)
श्री. संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पा.बा. कवडे) -अण्णासाहेब कोरपे चॉरिटेबल ट्रस्ट, अकोला (१९९४)
श्री. गाडगे महाराज गौरव ग्रंथ (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)
श्री. गाडगे महाराज शेवटचे कीर्तन (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९५)
श्री. गाडगेबाबांचे विचार (रा.तु. भगत) -लोकशिक्षण संस्कार माला, कोल्हापूर (१९९६)
श्री. गाडगेबाबांची पत्रे (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९१)
श्री. संत गाडगेबाबा विचार धन (ह.रा. हिवरे) -नारायणराव अमृतराव लभडे प्रकाशन (१९९९)
संत गाडगे महाराज (डॉ. श्याम दयार्णव कोपर्डेकर) - (१९९६)
संत गाडगे बाबांच्या आठवणी (रा.तु. भगत) -चैतन्य प्रकाशन, कोल्हापूर (१९९२)

संकीर्ण :
डेबू हा चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.
देवकीनंदन गोपाळा हाही चित्रपट गाडगे महाराजांच्या जीवनावर आहे.

पुरस्कार :
गाडगेबाबा यांच्या नावाने ग्राम स्वच्छता अभियान चालवले जाते. त्यांच्या नावाने काही पुरस्कारही देण्यात येतात.
१. महाराष्ट्र सरकारतर्फे गाडगेबाबा निर्मल ग्राम पुरस्कार
२. पिंपरी शहर लॉन्ड्री संघटनेचे (अ) राष्ट्रसंत गाडगेबाबा सामाजिक जाणीव पुरस्कार.(ब) राष्ट्रसंत गाडगेबाबा युवा समाजभूषण पुरस्कार.

२० फेब्रुवारी २०२३

राज्यसेवा परीक्षा जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत


    सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.


🟣1. सत्व – अ  


शास्त्रीय नांव – रेटीनॉल  

उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा

स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस


🟣2. सत्व – ब1


शास्त्रीय नांव – थायमिन  

उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – बेरीबेरी

स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,


🟣3. सत्व – ब2


शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  

उपयोग – चयापचय क्रियेकरिता

अभावी होणारे आजार – पेलाग्रा

स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे


🟣4. सत्व – ब3


शास्त्रीय नांव – नायसीन

उपयोग – त्वचा व केस

अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे

स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी


🟣5. सत्व – ब6  


शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  

उपयोग – रक्त संवर्धनाकरिता

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत व पालेभाज्या


🟣6. सत्व – ब10  


शास्त्रीय नांव – फॉलीक  

उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत


🟣7. सत्व – क  


शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  

उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि


🟣8. सत्व – ड  


शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  

उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे


🟣9. सत्व – इ  


शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल

उपयोग – योग्य प्रजननासाठी  

अभावी होणारे आजार – वांझपणा

स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या


🟣10. सत्व – के 

 

शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  

उपयोग – रक्त गोठण्यास मदत

अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही

स्त्रोत – पालेभाज्या व कोबी

विज्ञान प्रश्नसंच.

 खाली दिलेल्या राशींपैकी अदिश राशी .................... आहे 

⚪️ विस्थापन 
⚫️ चाल☑️
 गती
 त्वरण 
_________________________________

 वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?

⚪️ ऑक्सिजन
⚫️ हॅड्रोजन
 कार्बन डायऑक्साईड☑️
 नायट्रोजन
_________________________________

 न्यूटनचा दुसरा नियमफ ----------- चे मापन देतो?

⚪️संवेग☑️
⚫️बल
त्वरण
घडण

 कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवितात?

⚪️अल्फा
⚫️बिटा
गॅमा☑️
क्ष-किरण
_________________________________

 रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?

⚪️मेलॅनिन
⚫️इन्शुलिन☑️
यकृत
कॅल्शियाम
_________________________________

  मायका चा वापर कोणत्या कारणांसाठी करतात?

⚪️रंग तयार करणे
⚫️विद्युत रोधक म्हणून☑️
विद्युत सुवाहक म्हणून 
वरील सर्व कारणांसाठी 
_________________________________

 धान्यसाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

⚪️सोडियम क्लोरेट☑️
⚫️मायका
मोरचुद
कॉपर टिन
_________________________________

 बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने .................. असते.

⚪️मोठी
⚫️लहान☑️
दुप्पट
तिप्पट
_________________________________

 वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले, तर तिचे त्वरण ........................

⚪️तितकेच राहते
⚫️निमपट होत
चौपट होते
दुप्पट होते ☑️
_________________________________

 ध्वनीचे प्रसारण ..................... मधून होत नाही .
⚪️स्थायू 
⚫️द्रव
वायू
निर्वात प्रदेश ☑️
_____________________________________

जिल्हापरिषद.

🧩जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती:

🅾जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.

🧩रचना :-

🅾प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.

🧩सभासद संख्या -

🅾प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.

🧩सभासदांची निवडणूक -

🅾प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.

🧩पात्रता (सभासदांची) -

🅾जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. 1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.

🧩आरक्षण :

🅾1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

🅾तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.

🧩कार्यकाल :

🅾5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.

🧩अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड :

🅾जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.

🧩कार्यकाल :

🅾अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.

🧩राजीनामा :

1. अध्यक्ष - विभागीय आयुक्ताकडे
2. उपाध्यक्ष - जिल्हा परिषद अध्यक्षाकडे

🧩मानधन :

1. अध्यक्ष - 20,000/-
अविश्वासाचा ठराव - अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.
सचिव - जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.

🧩बैठक :

🅾जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.

🅾मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) : प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.

🦋 🦋 🦋  🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋  🦋

mPassport Police App: पासपोर्टसाठी पोलीस पडताळणी फक्त 5 दिवसात.



🔸कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींसाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या कॉन्सुलर, पासपोर्ट आणि व्हिसा विभागाद्वारे विकसित केलेले “mPassport पोलिस अॅप, दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेच्या कर्मचार्‍यांना 350 टॅब्लेटसह आणले जात आहे . 


🔹हे कर्मचारी पासपोर्ट अर्जदारांच्या पूर्ववर्तींच्या पडताळणीसाठी जबाबदार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने विकसित केलेल्या आणि नवी दिल्लीत आणलेल्या नवीन अॅपमुळे पासपोर्ट अर्जदारांच्या पोलिस पडताळणीसाठीचा वेळ पाच दिवसांपर्यंत कमी होईल आणि प्रक्रियेचा गैरवापर होण्याची शक्यता कमी होईल. 


🔸नवी डिजिटल सेवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलिसांच्या 76 व्या स्थापना दिवस परेडमध्ये सुरू केली.




▪️प्रसिद्ध यक्षगान गायक आणि पटकथा लेखक बलिपा नारायण भागवत यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. 


▪️त्यांनी गायनाच्या एका अनोख्या शैलीत प्रभुत्व मिळवले होते, त्यामुळे चाहत्यांनी याला ‘बलिपा स्टाईल’ असे नाव दिले आहे. 


▪️आवाजाने समृद्ध असलेल्या भागवतांनी 30 हून अधिक यक्षगान ‘प्रसंग’ (लिप्या) लिहिल्या आहेत.


कोल्लम जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीसाठी 2021-22 ची स्वराज ट्रॉफी जिंकली.

  



▪️कोल्लम जिल्हा पंचायतीने 2021-22 आर्थिक वर्षासाठी राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीची स्वराज ट्रॉफी जिंकली आहे. 


▪️या क्रमवारीत कन्नूर जिल्हा पंचायत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


▪️कोल्लम जिल्हा, भारताच्या केरळ राज्यातील १४ जिल्ह्यांपैकी एक आहे. 


▪️जिल्ह्यामध्ये केरळच्या नैसर्गिक गुणधर्मांचा क्रॉस-सेक्शन आहे.


१९ फेब्रुवारी २०२३

चँडलर सुशासन निर्देशांक



◆ सिंगापूर येथील Chandler Institute of Governance या खाजगी संस्थेने 'चॅडलर सुशासन निर्देशांक' (Chandler Good Government Index) एप्रिल 2021 मध्ये जाहीर केला. 


◆ या निर्देशांकानुसार भारत 104 देशांमध्ये 49 व्या स्थानावर आहे.


◆ हा निर्देशांक सात घटकांवर आधारित आहे. त्यामध्ये नेतृत्व व दूरदृष्टी, मजबूत कायदे व धोरणे, मजबूत संस्था, आर्थिक कारभार, आकर्षक बाजारपेठ, जागतिक प्रभाव व प्रतिष्ठा आणि लोकांना विकास करण्यास सहाय्य या बाबींचा समावेश आहे.


➤ सर्वोत्तम कामगिरी करणारे देश :- 

1) फिनलँड, 2) स्वित्झर्लंड, 3) सिंगापूर, 4) नेदरलँड्स, 5) डेन्मार्क


➤ दक्षिण आशियाई देशांची कामगिरी :- 

श्रीलंका :- 74, पाकिस्तान :- 90, नेपाळ :- 92

2022 मध्ये बेंगळुरूच्या रहदारीने वाहन चालविण्याचे जगातील दुसरे स्थान बनवले आहे

.



◆ टॉमटॉमच्या भौगोलिक स्थान तंत्रज्ञानातील तज्ञांच्या ताज्या अहवालानुसार, 2022 मध्ये बेंगळुरूच्या रहदारीने वाहन चालवण्याचे जगातील दुसरे सर्वात हळू ठिकाण बनवले आहे. 


◆ भारतातील सिलिकॉन व्हॅलीमधील वाहतुकीची समस्या कोणापासूनही लपलेली नाही. 10 किमी अंतर कापण्यासाठी सरासरी अर्धा तास लागतील. 


◆ लंडन हे जगातील सर्वात हळू वाहन चालवणारे शहर आहे. जिथे लोकांना 10 किलोमीटर जाण्यासाठी 36 मिनिटे आणि 20 सेकंद लागतात.


आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक अहवाल 2021 नुसार भारत 121 वा

  


◆ अमेरिकन कंझर्व्हेटिव्ह थिंक टँक असलेल्या 'हेरिटेज फाऊंडेशन'ने अलीकडेच आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक 2021(Economic Freedom Index 2021) जाहीर केला.


◆ जुलै 2019 ते जून 2020 या कालावधीसाठी 184 देश विचारात घेऊन हा अहवाल बनविण्यात आला आहे.


➤ भारत या निर्देशांकानुसार 121 व्या स्थानावर आहे.


➤ या निर्देशांकानुसार अव्वल देश :-

1) सिंगापूर, 2) न्यूझिलंड, 3) ऑस्ट्रेलिया

4) स्वित्झर्लंड, 5) आयर्लंड


◆ या निर्देशांकात कायद्याचे राज्य, सरकारची व्याप्ती आकार, नियामक कार्यक्षमता आणि बाजारपेठेचा खुलेपणा या चार विभागांतर्गत 12 निर्देशक आहेत.

━━━━━━━━━━━━━━━━━━━

चालू घडामोडी : 18 फेब्रुवारी 2023


◆ AICTE आणि BPRD यांनी संयुक्तपणे KAVACH-2023 लाँच केले.


◆ कराची पोलिस प्रमुखांच्या मुख्यालयावर सुरक्षा दलांनी नियंत्रण मिळवले तेव्हा तेहरीक-ए-तालिबानचे पाच अतिरेकी जड शस्त्रांसह ठार झाले.


◆ सीमावर्ती गावांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारने 4,800 कोटी रुपयांच्या योजनेला मान्यता दिली.


◆ स्पॅनिश सरकारने युरोपमध्ये प्रथमच 'मासिक पाळीची रजा' देणारा कायदा संमत केला.


◆ वितीय वर्ष 2024 मध्ये भारताचा GDP 6.2% दराने वाढण्याची शक्यता आहे, असे मॉर्गन स्टॅनलेने सांगितले.


◆ टाटा मोटर्सचे व्ही. पी. राजन अंबा यांची Jaguar Land Rover India चे MD म्हणून नियुक्ती करण्यात आली.


◆ बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशननंतर राजीनामा दिला.


◆ कोल्लम जिल्ह्याने सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायतीसाठी 2021-22 ची स्वराज ट्रॉफी जिंकली.


◆ इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डॅम (ICED) च्या विकासासाठी केंद्रीय जल आयोगाने (CWC) IIT रुरकी सोबत करार केला आहे.


◆ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अधिकृतपणे IPL 2023 चे वेळापत्रक जाहीर केले.


◆ बीईएल भारतीय तिरंगी सेवांसाठी इस्रायलच्या LORA बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची निर्मिती करणार आहे.


◆ रशिया-चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा संयुक्त लष्करी सराव सुरू झाला.


◆ जगातील पहिल्या क्लाउड-बिल्ट प्रात्यक्षिक उपग्रह JANUS-1 ला प्रक्षेपित करण्यात आले.


◆ गुगलच्या मूळ अल्फाबेटने भारतात जवळपास 500 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.


◆ Velocity ने ई-कॉमर्स मालकांना व्यवसाय माहिती सोप्या पद्धतीने सादर करून त्यांना मदत करण्यासाठी चॅटबॉट लाँच केले.


◆ इंटेलने व्यावसायिक निर्मात्यांसाठी 'सेफायर रॅपिड्स' प्रोसेसर लाँच केले.


◆ प्रसिद्ध यक्षगान गायक आणि पटकथा लेखक बलिपा नारायण भागवत यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.


◆ जागतिक पॅंगोलिन दिवस 18 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.


◆ मिर्झापूर अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे निधन झाले.


◆ mPassport Police App सत्यापन वेळ 5 दिवसांपर्यंत कमी करेल.



चालू घडामोडी प्रश्नसराव


Q.1) नुकतेच ट्रीज बियॉन्ड फॉरेस्ट्स उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे?

✅ आसाम


Q.2) अलीकडेच कोणत्या कंपनी युरोपमध्ये सौर आणि पवन प्रकल्प उभारण्यासाठी नवीन गुंतवणूक करणार आहे?

✅ Apple


Q.3) कोणत्या माजी क्रिकेटपटूची अंधांच्या T20 विश्वचषकाचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली?

✅ युवराज सिंग


Q.4) भारत सरकारने CCI च्या कार्यकारी अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

✅ संगीता वर्मा


Q.5) संयुक्त राष्ट्रांच्या हवाई वाहतूक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

✅ शेफाली जुनेजा


Q.6) हवामान पारदर्शकतेच्या नवीन अहवालानुसार, भारताला सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) किती उत्पन्नाचा तोटा सहन करावा लागला आहे?

✅ 5.4%


Q.7) FIPRESCI ने कोणत्या चित्रपटातला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून घोषित केले?

✅ ‘पाथेर पांचाली’


Q.8) "फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

✅ डॉ बिमल जालान


Q.9) दरवर्षी संयुक्त राष्ट्र कोणता दिवस जागतिक विकास माहिती दिन म्हणून साजरा करते?

✅ 24 ऑक्टोबर


Q.10) भारतीय सैन्याने 27 ऑक्टोबर रोजी कितवा पायदळ दिवस साजरा केला?

✅ 76 वा

UIDAI ने आधारशी संबंधित प्रश्नांसाठी AI चॅटबॉट 'आधार मित्र' लाँच केले


🔹युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने फेब्रुवारी 2023 मध्ये, लोकांना आधार कार्डशी संबंधित त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी एक नवीन चॅटबॉट 'आधार मित्र' लाँच केला.


🔸हे आर्टिफिशियल इंटेलिजेंस/मशीन लर्निंग (AI/ML)- आधारित चॅटबॉट आहे आणि इतर गोष्टींबरोबरच आधार नोंदणी क्रमांक, पीव्हीसी कार्ड ऑर्डर स्थिती आणि तक्रारीची स्थिती यासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात.

जगातील पहिल्या क्लाउड-बिल्ट डेमो सॅटेलाइटचे यशस्वी प्रक्षेपण झाले



🔹अँटारिस कंपनीच्या एंड-टू-एंड क्लाउड प्लॅटफॉर्मचा वापर करून संपूर्णपणे कल्पना केलेला, डिझाइन केलेला आणि तयार केलेला जगातील पहिला उपग्रह, JANUS-1 यशस्वीरित्या कक्षेत पोहोचला आहे.


🔸JANUS-1 नुकतेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) नवीन मिनी रॉकेट SSLV-D2 वर प्रक्षेपित करण्यात आले.


🔹JANUS-1 साठी संपूर्ण असेंब्ली, इंटिग्रेशन आणि चाचणी भारतीय फर्म अनंत टेक्नॉलॉजीज, बेंगळुरू यांनी केली होती.

AICTE आणि BPRD यांनी संयुक्तपणे KAVACH-2023 लाँच केले.



▪️ भारताच्या सायबर-तयारीत प्रगती करत, KAVACH-2023, 21 व्या शतकातील सायबर सुरक्षा आणि सायबर क्राइम आव्हानांना तोंड देण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना आणि तांत्रिक उपाय ओळखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील हॅकाथॉन सुरू करण्यात आली. 


📚 KAVACH-2023 हे 


📌 अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE), 


📌 ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (BPRD) आणि 


📌 भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र 


▪️यांनी संयुक्तपणे विकसित केलेले एक प्रकारचे राष्ट्रीय हॅकाथॉन आहे.


❣️

१८ फेब्रुवारी २०२३

37 वा APEDA स्थापना दिवस - 13 फेब्रुवारी 2023



🍱🥗वाणिज्य आणि व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गत कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (APEDA) ने 13 फेब्रुवारी 2023 रोजी भारतभर 37 वा APEDA स्थापना दिन साजरा केला.


💮🏮1986 मध्ये स्थापन झालेल्या APEDA ने आपल्या 37 वर्षांच्या यशस्वी प्रवासात कृषी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी अभूतपूर्व यश मिळविले आहे.


APEDA चा वाढीचा इतिहास- 1986 ते 2023: 

🌟🪅. APEDA च्या सक्रिय हस्तक्षेपामुळे, कृषी उत्पादनांची निर्यात 1987-88 मध्ये US$ 0.6 अब्ज वरून एप्रिल- डिसेंबर 2022-23 पर्यंत US$ 19.69 बिलियन पर्यंत वाढली आणि 200 पेक्षा जास्त. देशांची निर्यात बास्केट विस्तारली.


💮🌼APEDA 2021-22 मध्ये USD 24.77 अब्ज किमतीच्या कृषी उत्पादनांची निर्यात करणार आहे.


💠🏮चालू आर्थिक वर्षासाठी (2022-2023), APEDA ला दिलेले लक्ष्य US$ 23.56 अब्ज आहे, डिसेंबर 2022 पर्यंत, 84% (US$ 19.69 अब्ज) साध्य झाले आहे आणि उर्वरित उद्दिष्ट अपेक्षित वेळेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. कालावधी आहे.

पंतप्रधान मोदींचा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र दौरा



🗺🌆पंतप्रधान (PM) नरेंद्र मोदी यांनी 10 फेब्रुवारी 2023 रोजी विविध उपक्रम सुरू करण्यासाठी उत्तर प्रदेश (UP) आणि महाराष्ट्राला भेट दिली.


🎀📯पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 फेब्रुवारी 2023 रोजी यूपीमध्ये उत्तर प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट (UPGIS) 2023 चे उद्घाटन केले.


❄️🪩10 फेब्रुवारी 2023 रोजी, पंतप्रधानांनी महाराष्ट्राला भेट दिली आणि मुंबई, महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CMST) येथे दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.


🌟🌀मुंबई- सोलापूर वंदे भारत आणि मुंबई- साईनगर शिर्डी वंदे भारत या दोन ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CMST) – शिर्डी आणि CMST – सोलापूर दरम्यान लोकप्रिय पर्यटन मार्गावर धावतील.


💮🌼12 फेब्रुवारी 2023 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानला भेट दिली आणि राजस्थानमधील दौसा येथून दिल्ली- मुंबई एक्सप्रेसवेच्या 246 किलोमीटर (किमी) दिल्ली- दौसा- लालसोट विभागाचे उद्घाटन केले.


🗾🪩हा दिल्ली- मुंबई एक्सप्रेसवे भारतातील सर्वात लांब एक्सप्रेसवे असेल, ज्याची लांबी 1,386 किमी असेल.

PMC आणि TGBL भागीदारी पुण्यात भारतातील पहिला घनकचरा ते हायड्रोजन प्रकल्प उभारणार आहे🪩♋️



❇️🏞पुणे महानगरपालिकेने (PMC) The GreenBillions Limited (TGBL) सह भागीदारी करून 350 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह पुणे, महाराष्ट्रातील हडपसर औद्योगिक वसाहत येथे भारतातील पहिला घनकचरा ते हायड्रोजन प्रकल्प उभारला आहे.


💸⛓TGBL स्टोरेज सुविधा आणि लॉजिस्टिक सपोर्ट तयार करण्यासाठी अतिरिक्त 82 कोटी रुपये खर्च करेल. 


📝🧮 हा प्लांट उभारण्यासाठी TGBL ने PMC सोबत 30 वर्षांचा करार केला आहे.


❣️उद्दिष्ट:✅


💹🌀कचरा ते हायड्रोजन उत्पादनाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता दर्शवा.


💠♻️पुण्यातील घनकचरा ते हायड्रोजन प्लांट बद्दल:✅

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL), माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या (MIB) अंतर्गत एक मिनी रत्न उपक्रम, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार आणि TGBL, Veriate Pune Waste to Energy Pvt Ltd ची पूर्ण मालकीची उपकंपनी प्रदान करेल, एक नगरपालिका नसलेली पुण्यातील नफा संस्था. पुनर्नवीनीकरण केलेल्या कचऱ्याचे हायड्रोजनमध्ये रूपांतर करण्याचा प्रकल्प राबवेल.

नमामि गंगे मिशन-II




 नमामि गंगे मिशन-II 2026 पर्यंत 22,500 कोटीच्या अर्थसंकल्पीय खर्चासह मंजूर करण्यात आला.


नमामि गंगे मिशन-II 2026 पर्यंत 22,500 कोटीच्या अर्थसंकल्पीय खर्चासह मंजूर करण्यात आला.


नमामि गंगे कार्यक्रम जून 2014 पासून 31 मार्च 2021 पर्यंत 20,000 कोटी रुपयांच्या बजेटसह गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सुरू करण्यात आला. 


भारत सरकारने नमामि गंगे मिशन-II ला 2026 पर्यंत 22,500 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय परिव्ययासह विद्यमान दायित्वे (रु. 11,225 कोटी) आणि नवीन प्रकल्प/हस्तक्षेप (रु. 11,275 कोटी) मंजूर केले आह

भारतीय-अमेरिकन नील मोहन यांची YouTube चे नवीन CEO नियुक्ती करण्यात आली आहे



🔹YouTube मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) Susan Wojcicki यांनी 16 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांच्या पदावरून पायउतार केले आणि त्यांची जागा नील मोहन घेतील.


🔸त्या पूर्वी Google मध्ये जाहिरात उत्पादनांसाठी वरिष्ठ उपाध्यक्ष होत्या आणि 2014 मध्ये YouTube च्या CEO झाल्या.


🔹मोहन, स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट, 2008 मध्ये Google मध्ये सामील झाला आणि तो YouTube वर मुख्य उत्पादन अधिकारी आहे, जिथे तो YouTube Shorts आणि संगीत तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

भारतातील पहिला कचरा ते हायड्रोजन प्रकल्प पुण्यात उभारला जाणार आहे




🔹भारत सरकार पुण्यात 430 कोटी रुपये खर्चून पहिला कचरा ते हायड्रोजन प्रकल्प उभारणार आहे.


🔸ग्रीन बिलियन लिमिटेड या खाजगी कंपनीद्वारे हा प्लांट बांधण्यात येणार आहे.

कंपनीने पुणे महापालिकेसोबत 30 वर्षांसाठी करार केला आहे.


🔹प्लांटचे उद्दिष्ट दररोज 350 टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे आहे. यातून दररोज दहा टन हायड्रोजन तयार होईल.


भारतीय लष्कराला जगातील पहिली पूर्णपणे कार्यरत 'SWARM' ड्रोन प्रणाली मिळाली आहे



🔹न्यूस्पेस रिसर्च कंपनीने फेब्रुवारी 2023 मध्ये भारतीय लष्कराला 'SWARM' ड्रोन दिले आहेत.


🔸हे SWARM ड्रोन कार्यान्वित करणारी लष्कराला जगातील पहिली सशस्त्र सेना बनवते.


🔹100 ड्रोनचा थवा शत्रूच्या प्रदेशात किमान 50 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर मारा करण्यास सक्षम आहे.


🔸हे ड्रोन विशिष्ट वजनाचे बॉम्ब वाहून नेण्यास सक्षम आहेत आणि आर्मर्ड कॉलम्ससारख्या लक्ष्यांवर मारा करू शकतात.

स्पेनने युरोपमध्ये सर्वप्रथम 'मासिक पाळी रजा' कायदा मंजूर केला




🔹स्पॅनिश सरकार मासिक पाळीच्या तीव्र वेदनांनी ग्रस्त महिलांना सशुल्क वैद्यकीय रजा मंजूर करणारा कायदा मंजूर केला – कोणत्याही युरोपियन देशासाठी हा पहिला कायदा.


🔸अशा सुविधा सध्या जपान, इंडोनेशिया आणि झांबियासारख्या देशांमध्ये उपलब्ध आहेत.


🔹कायदा मासिक वेदना अनुभवणाऱ्या कर्मचार्‍यांना आवश्यक तेवढा वेळ परवानगी देतो.


🔸राज्य सामाजिक सुरक्षा यंत्रणा आजारी रजेची भरपाई करेल.


शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे.


◆ राज्याच्या विधिमंडळात आणि संसदेतील बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट हीच ‘खरी शिवसेना’ असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने 17 फेब्रुवारी 2023 रोजी दिला.


◆ आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले. त्यामुळे पक्षातील फुटीनंतर आठ महिन्यांनी उद्धव ठाकरे यांना ‘शिवसेना’ गमवावी लागली आहे.


◆ केंद्रीय निवडणूक आयोगाने हंगामी आदेशामध्ये शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षनाव आणि ‘ढाल-तलवार’ या निवडणूक चिन्हाचे वाटप केले होते.

मात्र, शुक्रवारी आयोगाने अंतिम निकाल देताना, शिंदे गटाचे हंगामी पक्षनाव आणि निवडणूक चिन्ह तातडीने गोठवण्यात आल्याचे स्पष्ट केले.


◆ तसेच शिवसेनेच्या 2018च्या घटनेमध्ये, लोकप्रतिनिधी कायदा व पक्षांतर्गत लोकशाहीसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वानुसार दुरुस्ती करावी, असाही आदेश आयोगाने दिला आहे.

शुबमन गिल ठरला ICC ‘प्लेअर ऑफ द मंथ’



◆ भारताचा नवा स्टार फलंदाज शुबमन गिल याने जानेवारी महिन्याचा ICC "प्लेयर ऑफ द मंथ" जिंकला आहे.


◆ त्याने भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि न्यूझीलंडचा डेव्हन कॉनवे यांना मागे टाकत हे विजेतेपद पटकावले आहे. जानेवारी महिन्यात गिलने चमकदार कामगिरी केली.


◆ त्याने ODI मध्ये द्विशतक तसेच T20I मध्ये शतक झळकावले आणि आता तो महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू बनला आहे.


◆ एकदिवसीय क्रिकेटमधील आणखी एका चांगल्या कामगिरीनंतर गिलने ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’चा पुरस्कार पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. गिलने जानेवारीत 567 धावा केल्या, ज्यात तीन शतकांपेक्षा जास्त धावा केल्या होत्या.


◆ शुबमन गिल व्यतिरिक्त, भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि न्यूझीलंडचा यष्टिरक्षक डेव्हॉन कॉनवे हे प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराचे दावेदार होते.


जलदूत ॲप


◆ ग्रामीण विकास मंत्रालयाने भूजल पातळी अधिक चांगल्या पद्धतीने टिपण्यासाठी जलदूत ॲप आणि जलदूत ॲप ई-ब्रोशरचे सप्टेंबर 2022 मध्ये अनावरण केले. 


➤ हे ॲप ग्रामीण विकास मंत्रालय आणि पंचायती राज यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.


◆ गावातील निवडक 2-3 विहिरींची पाणी पातळी

कॅप्चर करण्यासाठी देशभरात हे ॲप वापरले जाईल. 


◆ जलदूत द्वारे इनपुट केला जाणारा नियमित डेटा नॅशनल वॉटर इन्फॉर्मेटिक्स सेंटर (NWIC) च्या डेटाबेससह एकत्रित केला जाईल.


◆ हे ॲप देशभरातील पाण्याच्या तक्त्यांचे निरीक्षण करण्यास सुलभता प्रदान करेल. परिणामी हा डेटा ग्रामपंचायत विकास योजना आणि महात्मा गांधी नरेगा योजनांसाठी वापरला जाऊ शकतो.


One Liner Questions


1. भारत का राष्ट्रगीत किसने लिखा है ?

Ans ➺  बंकिमचन्द्र चटर्जी


2. संयुक्त राष्ट्र संघ की स्थापना कब हुई ?

Ans ➺  24 अक्टूबर 1945 में 


3. भारत में रेल का आरम्भ कब हुआ था ?

Ans ➺  1853 में 


4. भारत में पहली बार मेट्रो रेल सेवा किस नगर में आरम्भ की गई थी ?

Ans ➺  कोलकाता


5. भारत में पहली रेल कहाँ से कहाँ तक चली थी ?

Ans ➺  बम्बई (वर्तमान मुंबई) से थाने तक


6.  दिल्ली स्थित महात्मा गाँधी की समाधि का नाम क्या है ?

Ans ➺  राजघाट


7. अंतरिक्ष यात्री को बाह्य आकाश कैसा दिखायी देता है ?

Ans ➺   काला


8. प्रथम भारतीय अंतरिक्ष यात्री कौन थे ?

Ans ➺  स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा, 1984 में


9. भारत की प्रथम महिला मुख्यमंत्री कौन थी ?

Ans ➺  श्रीमती सुचेता कृपलानी


10. हरियाणा के पहले मुख्यमंत्री कौन थे ?

Ans ➺  पं. भगवत दयाल शर्मा


11. मानव शरीर की किस ग्रन्थि को 'मास्टर ग्रन्थि' कहा जाता है ?

Ans ➺   पीयूष ग्रन्थि


12. किसने दूरबीन का आविष्कार किया था ?

Ans ➺  गैलीलियो गैलिली ने


13. पेस मेकर का सम्बंध शरीर के किस अंग से होता है ?

Ans ➺   हृदय


14. रेडियोऐक्टिवता की खोज किसने किया था ?

Ans ➺   हेनरी बेकरल ने


15. राष्ट्रगान गाने की अवधि कितनी होती है ?

Ans ➺   52 सेकंड 


16. हमारा राष्ट्रीय पंचांग कौन-सा है ?

Ans ➺   शक संवत 


17. कार्बन का सर्वाधिक शुद्ध रूप कौन-सा होता  है ?

Ans ➺   हीरा


18. एक्स-रे का आविष्कार किसने किया था ?

Ans ➺   रांटजन


19. किस धातु का प्रयोग मानव द्वारा सबसे पहले किया गया था ?

Ans ➺   तांबा


20. महात्मा गाँधी को राष्ट्रपिता सबसे पहले किसने कहा था ?

Ans ➺   नेताजी सुभाष चन्द्र बोस ने

Imp इन्फॉर्मशन देत आहे. सर्वांनी नक्की वेळ काढून वाचा.

1) प्रश्न -  भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत ?

उत्तर : द्रौपदीजी मुर्मु (15 व्या)



2) प्रश्न - भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत ? 

उत्तर : जगदीपजी धनखड (14 वे) 



3) प्रश्न - भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत ?

उत्तर : नरेंद्रजी दामोदरदास मोदी (15 वे)



4) प्रश्न - भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत ?

उत्तर : अमितजी शहा (29 वे)



5) प्रश्न - भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत ?

उत्तर : राजनाथजी सिंग (27 वे)



6) प्रश्न - सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत ?

उत्तर :  ओम प्रकाश बिर्लाजी (17 वे  )



7) प्रश्न - भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत ?

उत्तर :निर्मलाजी सीतारमन (23 वे) 



8) प्रश्न - सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश कोण आहेत ? 

उत्तर : धनंजयजी वाय.चंद्रचूड (50वे)



9) प्रश्न - रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

उत्तर :  शक्तीकांतजी दास (25 वे)



10) प्रश्न - भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?

उत्तर :अनिल चव्हाण ( 2 रे) १ ले -  बिपिंजी रावत 



11) प्रश्न - भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर : अजित डोवाल



12) प्रश्न - भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर : दत्ता पडसलगीकर



13) प्रश्न - सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

उत्तर : अश्र्विन कुमार वैष्णव 



14) प्रश्न - भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर : राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8



15) प्रश्न - सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर : राजीव कुमार



16) प्रश्न - महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर : यु.पी.एस.मदान



17) प्रश्न - सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

उत्तर : गुजरात मधील ( कच्छ ) जिल्हा



18) प्रश्न - भारताचे थलसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर : मनोज पांडे ( 29 वे)



19) प्रश्न - भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :  विवेक राम चौधरी 



20) प्रश्न - भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :आर. हरिकुमार


मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर

⭕️ राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे 


✅ मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी विभागाच्या सन 2022च्या पुरस्कारांची घोषणा केली.

यात विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासह इतर सहा पुरस्कारांचा समावेश आहे.


🏆विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रा. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

प्रा. नलगे यांनी कथा कादंबरी, एकांकिका, चित्रपट लेखन इत्यादी विविध प्रकारात लेखन केले. त्यांच्या प्रकाशित ग्रंथाची संख्या 90 आहे.



🏆श्री. पु. भागवत पुरस्कार पुरस्कार ग्रंथाली प्रकाशनला जाहीर झाला आहे. 3 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.



🏆डॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. विठ्ठल वाघ यांना जाहीर करण्यात आला. 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. 



🏆तर कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कारासाठी द. ता. भोसले यांची निवड झाली आहे. रोख 2 लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.



🏆डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (संस्थेसाठी) महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांना जाहीर झाला आहे. 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.



🏆तर कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (संस्थेसाठी) कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी यांना जाहीर झाला आहे. 2 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.




Velocity ने लॉन्च केला भारतातील पहिला AI असिस्टंट ‘Lexi’


सध्या जगभरात फक्त टेक्नॉलॉजी क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात OpenAI ChatGpt ची चर्चा सुरु आहे. OpenAI ने मायक्रोसॉफ्टच्या मदतीने विकसित केलेल्या ChatGpt चॅटबॉट आणि त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी Google ने देखील आपले Bard चॅटबॉट लॉन्च केला आहे. यामध्ये भारतात देखील देशातील पहिला इंटिग्रेटेड चॅटबॉट लॉन्च केला आहे.


भारतीय वित्तीय कंपनी Velocity ने देशातील पहिला ChatGPT इंटिग्रेटेड चॅटबॉट लॉन्च केला आहे. या कंपनीने या चॅटबॉटचे नाव Lexi असे ठेवले आहे. Velocity ने AI चा फायदा घेऊन सध्याच्या अ‍ॅनालिटिक्स टूल व्हेलॉसिटी इनसाइट्ससह ते एकत्रित करण्यात आले आहे. Velocity Insights वापरणारे भारतीय ई-कॉमर्स ब्रँड मेटा मालकीच्या WhatsApp वर दैनंदिन व्यावसायिक रिपोर्ट मिळवू शकतात. हे ई-कॉमर्स साइट्सना त्यांची व्यवसाय कार्ये विकसित करण्यास मदत करणार आहे.


या प्रसंगी बोलताना Velocity चे सीईओ अभिरूप मेढेकर म्हणाले की, चॅटजीपीटी लॉन्च झाल्यापासून त्यांच्या उत्पादन टीम यावर विचार करत आहेत की चॅटजीपीटीचा फायदा कसा घेता येईल. Velocity चे ग्राहक पहिल्यापासूनच दैनंदिन इनसाईट्सचा वापर करतात. म्हणूनच आम्ही त्याच इंटरफेससह ChatGPT समाकलित केले आहे.





स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स IQAir नुसार मुंबईने भारतातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीला मागे टाकले आहे.


◾️मुंबई AQI - 163

◾️दिल्ली AQI  - 155


👇जगातील सर्वात प्रदूषित शहरं  कोणती? 


1. लाहोर (पाकिस्तान) 

2. मुंबई (भारत) 

3. काबूल (अफगाणिस्तान) 

4. काओशुंग (तैवान)

5. बिश्केक (किर्गिस्तान)

6. अक्रा (घाना)

7. क्राको (पोलॅंड)

8. दोहा (कतार)

9. अस्ताना (कझाकिस्तान)

10. सॅंटियागो (चिली)


१७ फेब्रुवारी २०२३

भारत-जपान किकने चौथा “धर्म गार्डियन” 2023 संयुक्त प्रशिक्षण सराव सुरू केला.




◆ भारत आणि जपानने 17 फेब्रुवारी ते 2 मार्च 2023 या कालावधीत जपानच्या शिगा प्रांतातील कॅम्प इमाझू येथे ‘धर्म गार्डियन’ हा सराव सुरू केला आहे. 


◆ भारतीय लष्कराची तुकडी 12 फेब्रुवारी 2023 रोजी सरावाच्या ठिकाणी पोहोचली.


━━━━━━━━━━━━━━━━━━━

इंडियन ओव्हरसीज बँकेने इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी योजना सुरू केली.




◆ सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँकेने नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने ई-बीजी (इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी) योजना जारी करण्याची सुविधा सुरू केली आहे.


◆ ई-बीजी हे शहर-मुख्यालय असलेल्या बँकेद्वारे जारी केलेले साधन आहे ज्यामध्ये बँक अर्जदाराच्या काही कृती/कामगिरीची पूर्तता न झाल्यास विशिष्ट रकमेची हमी देण्याचे वचन देते.



◆ पुरातत्व खात्याने आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्यास परवानगी दिली आहे.


◆आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये शिवजयंती साजरी करता येईल, असं पुरातत्व खात्याकडून सांगण्यात आलं आहे.


◆ महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन यांनी आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, त्यांना वारंवार परवानगी नाकारण्यात आली होती.


5व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022 मध्ये महाराष्ट्राने पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले.



◆ खेलो इंडिया युथ गेम्सच्या पाचव्या आवृत्तीचा समारोप 11 फेब्रुवारी रोजी झाला. 


◆ खेलो इंडिया युथ गेम्स :- 2022 मध्ये, 56 सुवर्ण, 55 रौप्य आणि 50 कांस्य पदकांसह एकूण 161 पदके मिळवून महाराष्ट्र एकंदरीत चॅम्पियन. 


◆ दुसरीकडे, हरियाणा 41 सुवर्ण, 32 रौप्य आणि 55 कांस्य अशी एकूण 128 पदके मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. 


◆ यजमान मध्य प्रदेशने 39 सुवर्णांसह 96 पदकांसह तिसरे स्थान पटकावले.


मराठी भाषा विभागाचे पुरस्कार २०२२




➤ मराठी भाषा विभागाने सन 2022 चे पुरस्कार जाहीर केले असून याबाबतची अधिकृत घोषणा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी 15 फेब्रुवारी 2023 रोजी पत्रकार परिषदेत केली.


◆ विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार :- प्रा.चंद्रकुमार नलगे

◆ श्री. पु. भागवत पुरस्कार : ग्रंथाली प्रकाशन

◆ डॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (व्यक्तींसाठी) :- डॉ. विठ्ठल वाघ

◆ डॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार (संस्थेसाठी) :- महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे

◆ कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (व्यक्तींसाठी) :- डॉ. द. ता. भोसले

◆ कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार (संस्थेसाठी) :- कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी


━━━━━━━━━━━━━━━━━

चालू घडामोडी :- 16 फेब्रुवारी 2023


◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय आदि महोत्सवाचे उद्घाटन झाले.


◆ पर्यटन मंत्रालयाने प्रसाद योजनेअंतर्गत चार तीर्थक्षेत्रांची निवड केली.


◆ 18 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून महत्त्वाकांक्षी चित्ता पुनर्प्रदर्शन कार्यक्रमांतर्गत 12 चित्ते आणली जातील.


◆ जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास लवकर पायउतार होणार आहेत.


◆ रिजर्व्ह बँकेने पेमेंट एग्रीगेटर परवान्यासाठी 32 संस्थांना तत्वतः मान्यता दिली.


◆ Rolls-Royce या ब्रिटीश अभियांत्रिकी कंपनीने घोषित केले की त्यांना 68 ट्रेंट XWB-97 इंजिनांसाठी एअर इंडियाकडून ऑर्डर प्राप्त झाली आहे.


◆ भारतीय PSU रिफायनर्स 2030 पर्यंत वार्षिक 137,000 टन ग्रीन हायड्रोजन सुविधा स्थापित करतील.


◆ BHIM-UPI व्यवहारात सर्वाधिक टक्केवारी मिळवल्याबद्दल कर्नाटक बँकेला 'प्रथिस्त पुरस्कार' मिळाला.


◆ सुभाष चंद्रन यांना 'समुद्रशिला'साठी केरळचा अकबर कक्कट्टील पुरस्कार मिळाला.


◆ सौरऊर्जेवर चालणारे ड्रोन SURAJ चे अनावरण झाले.


◆ एचएएलला स्वदेशी विकसित 'ब्लॅक बॉक्स'साठी डीजीसीएकडून मंजुरी मिळाली.


◆ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'iDEX इन्व्हेस्टर हब' (iIH) लाँच केले.


◆ भारत आणि अमेरिकन सैन्याने संयुक्त सराव तरकश सुरु झाला.


◆ भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून मुंबईने दिल्लीला मागे टाकले.


◆ डॉ. मनसुख मांडविया यांनी उत्तर प्रदेशातील आओनला आणि फुलपूर येथे इफको नॅनो युरिया लिक्विड प्लांटचे उद्घाटन केले.


◆ 2022 मध्ये बेंगळुरूच्या रहदारीने वाहन चालविण्याचे जगातील दुसरे स्थान बनवले आहे.

भारतीय वंशाचे नील मोहन बनले YouTube चे नवे CEO


" सुझन डायन वोजिकी " यांनी नुकताच  आपल्या CEO पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भारतीय वंशाचे " नील मोहन " यांची YouTube चे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे 


💁‍♀ नील मोहन यांच्या विषयी :-

--------------------------

◾️  नील मोहन यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

◾️ नील यांनी ग्लोरिफाइड टेक्निकल सपोर्टसह त्यांच्या करिअरची सुरुवात केली.

◾️ त्यांनी एक्सेंचरमध्ये वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम केले आहे.

◾️ पुढे त्यांनी " Double Click Inc " मध्ये नोकरी केली. नील मोहन यांनी या कंपनीत ग्लोबल क्लायंट सर्व्हिसेसचे संचालक म्हणून 3 वर्षे 5 महिने काम केले. 


◾️ याशिवाय सुमारे अडीच वर्षे व्हाइस प्रेसिडेंट बिझनेस ऑपरेशनची जबाबदारी त्यांनी सांभाळली.


◾️ याआधी नील मोहन हे " यूट्यूबचे सीपीओ " होते.


◾️ 2008 पासून ते गुगल सोबत काम करत आहेत.

भूगोल प्रश्न

1. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पवणारी नदी कोणती? 

✅ - कृष्णा. 


2. वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?

✅  - कृष्णा


3. पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? 

✅ - कृष्णा. 


4.  मुळा-मुठा नदीचा संगम कोठे झाला?

✅  - पुणे.


5. कृष्णा व वारणा नदीचा नदीचा संगम कोठे झाला? 

✅ - हरीपुर.


7.  कृष्णा-पंचगंगा नदीचा संगम कोठे झाला? 

✅ - नरसोबाची वाडी. 


8.  इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले स्थळ कोणते?

✅ - देहु. 


9. शिवाजी सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?

✅  - कोयना. 


10. पुणे शहराला कोणत्या धरणातून पानी पुरवठा होतो?

✅  - खडकवासला. 


11. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे? 

✅ - मुठा.


12. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे? 

✅ - राधानगरी. 


13.  चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? 

✅ - वारणा. 


15. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? 

✅ - नीरा.


16. कोयना धरणासाठी प्रसिद्ध असलेले हेळवाक कोणत्या जिल्हयात आहे? 

✅ - सातारा. 


17.  उजणी धरण कोणत्या नदीवर आहे? 

✅ - भीमा. 


18. दुघगंगा योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो?

✅  - कोल्हापूर.


19. भीमा सिंचन योजनेपासून कोणत्या जिल्ह्यास पानी मिळते?

✅  - पुणे. 


20. मुळशी धरण कोणत्या जिल्हयात आहे? 

✅ - पुणे. 


१. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी 

नदी कोणती ? :- गोदावरी


२. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या किती आहे ? :- २८८


३. सूर्यकुलात सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह कोणता ? :- गुरु 


४. कोणत्या नदीला आसामचे दुखाश्रु म्हणून संबोधले जाते ? :- ब्रह्मपुत्रा 


५. हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व कोणी केले ? :- स्वामी रामानंद तीर्थ 


६. हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे ? :- शक्ती 


७. महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक कोण ?:- वासुदेव बळवंत फडके 


८.महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ? :- यशवंतराव चव्हाण 


९.कोणत्या राज्याने फणस या फळाला राज्यफळाचा दर्जा दिला आहे ? :- केरळ 


१०. शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे ? :- कावेरी 

चालू घडामोडी : 17 फेब्रुवारी 2023

▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय आदि महोत्सवाचे उद्घाटन झाले.


▪️पर्यटन मंत्रालयाने प्रसाद योजनेअंतर्गत चार तीर्थक्षेत्रांची निवड केली.


▪️18 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतून महत्त्वाकांक्षी चित्ता पुनर्प्रदर्शन कार्यक्रमांतर्गत 12 चित्ते आणली जातील.


▪️जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास लवकर पायउतार होणार आहेत.


▪️रिजर्व्ह बँकेने पेमेंट एग्रीगेटर परवान्यासाठी 32 संस्थांना तत्वतः मान्यता दिली.


▪️Rolls-Royce या ब्रिटीश अभियांत्रिकी कंपनीने घोषित केले की त्यांना 68 ट्रेंट XWB-97 इंजिनांसाठी एअर इंडियाकडून ऑर्डर प्राप्त झाली आहे.


▪️भारतीय PSU रिफायनर्स 2030 पर्यंत वार्षिक 137,000 टन ग्रीन हायड्रोजन सुविधा स्थापित करतील.


▪️BHIM-UPI व्यवहारात सर्वाधिक टक्केवारी मिळवल्याबद्दल कर्नाटक बँकेला 'प्रथिस्त पुरस्कार' मिळाला.


▪️सुभाष चंद्रन यांना 'समुद्रशिला'साठी केरळचा अकबर कक्कट्टील पुरस्कार मिळाला.


काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे



     ★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★


◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद

◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर

◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर

◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह

◆ द वॉल : राहुल द्रविड 

◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट

◆ ब्लॅक पर्ल : पेले

◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ

◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास

◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर

◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा

◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा

◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी

◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली

◆ जंम्बो : अनिल कुंबळे

◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल

◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह 


१६ फेब्रुवारी २०२३

आजार

 🦠  विषाणूमुळे होणारे आजार ➖ 

👉 कावीळ, इन्फ्लुएंझा, गोवर, डेंग्यू, रेबिज, जापनीज मेंदूज्वर, एड्स, अतिसार, चिकुनगुन्या, सर्दी, देवी, कांजण्या, गालफुगी, जर्मन गोवर.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🪳  जीवाणूमुळे होणारे आजार ➖

👉 हगवण, घटसर्प, डांग्या, खोकला, प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, धनुर्वात, विषमज्वर (टायफाईड), मेंदूज्वर, कुष्ठरोग, क्षयरोग.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦗 कीटकांद्वारे पसरणारे (डासांमार्फत) आजार ➖

👉 जापनीज मेंदूज्वर, चिकनगुनिया, हत्तीरोग (फायलोरिया),हिवताप (मलेरिया), प्लेग, डेंग्यू.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌪 हवेमार्फत पसरणारे आजार ➖

👉 क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, ॲथ्रक्स, पोलिओ.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🦠 कवकांमुळे (Fungus) होणारे आजार ➖ 

👉 रिंगवर्म, मदूरा फूट, ॲथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

♻️ आनुवंशिक आजार ➖ 

👉 हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम.

महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प


❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-


◆ खोपोली - रायगड              

◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड                              

◆ कोयना - सातारा                

◆ तिल्लारी - कोल्हापूर          

◆ पेंच - नागपूर                      

◆ जायकवाडी - औरंगाबाद

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


❇️ महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प :-

              

◆ तारापुर - ठाणे                    

◆ जैतापुर - रत्नागिरी              

◆ उमरेड - नागपूर(नियोजित)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


❇️ महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प :-

                   

◆ जमसांडे - सिंधुदुर्ग             

◆ चाळकेवाडी - सातारा           

◆ ठोसेघर - सातारा               

◆ वनकुसवडे - सातारा           

◆ ब्रह्मनवेल - धुळे                 

◆ शाहजापूर - अहमदनगर

━━━━━━━━━━━━━━━━━━━

UNDP आणि महासागर क्लीनअप यांनी महासागरातील प्लास्टिक प्रदूषण दूर करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली




🎆🌠युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) आणि 'द ओशन क्लीनअप' यांनी जगातील महासागर आणि नद्यांमधील प्लास्टिक प्रदूषण दूर करण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.


🌹❣️महत्त्वाचे मुद्दे:👉


🎀♣️ प्रभावी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रणाली विकसित करून आणि एकूण प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने धोरणे आणि वर्तनातील बदलांना प्रोत्साहन देऊन सागरी परिसंस्थेतील प्लास्टिकची गळती कमी करणे हे भागीदारीचे उद्दिष्ट आहे.


⬛️🪩 हे सागरी प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी नद्यांमध्ये इंटरसेप्शन तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीला गती देईल.


🎆🏞 प्लास्टिक प्रदूषणामुळे जगातील महासागर तसेच अन्न आणि उत्पन्नासाठी सागरी संसाधनांवर अवलंबून असलेल्या अब्जावधी लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.


रिन्यू पॉवर त्याचे नवीन रीब्रँडिंग आणि डीकार्बोनायझेशन फोकस अनावरण करते


🟣🔘ReNew Power ने स्वतःचे ReNew म्हणून रीब्रँड करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आणि शुद्ध प्ले रिन्युएबल स्वतंत्र उर्जा उत्पादकाकडून डीकार्बोनायझेशन सोल्यूशन्सच्या एंड- टू- एंड प्रदात्याकडे संक्रमण करण्यासाठी नवीन ब्रँड ओळख असलेला नवीन कंपनी लोगो सादर केला.


🔴🔹ग्रीन हायड्रोजन, एनर्जी स्टोरेज, कार्बन मार्केट्स आणि सोलर मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या आगामी डिकार्बोनायझेशन सोल्यूशन्सच्या विकासाचे नेतृत्व करून एंटरप्राइजेसचे निव्वळ- शून्य संक्रमण उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी रिन्यू तयार आहे.


☑️⚫️ हरित ऊर्जेतील संक्रमणाला गती देण्यासाठी आणि भारतातील B2B (बिझनेस- टू- बिझनेस) मार्केटच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी रिन्यू डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.


👁‍🗨🔵उद्योगाच्या अंदाजानुसार, जसे विद्युतीकरण आणि जीवनमान वाढेल, 2050 पर्यंत जगातील विजेचा वापर कदाचित तिप्पट होईल.


🌀🌟शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) गाठण्यासाठी आणि जागतिक हवामान कृती मजबूत करण्यासाठी डी- कार्बोनायझेशन महत्त्वपूर्ण असेल.

नीति आयोगाचा एसडीजी इंडिया इंडेक्स 2020-21


◆ जून 2021 मध्ये नीति आयोगाने एसडीजी इंडिया इंडेक्स 2020-21 आणि डॅशबोर्ड प्रसिद्ध केला.


◆ अहवालाचे नाव :- "Partnerships in the Decade of Action"

➤ सुरुवात :- 2018

➤ अहवालाची आवृत्ती :- तिसरी

➤ संयुक्त राष्ट्रांच्या सहकार्याने विकसित.


➤ उद्दिष्ट :- डेटा-आधारित मूल्यांकनद्वारे देशाच्या शाश्वत विकास उद्दीष्टांबाबत केलेल्या प्रगतीचे परीक्षण करणे.


◆ उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्पर्धात्मक भावना वाढवणे.


◆ उद्दिष्ट क्रमांक 17 च्या गुणात्मक मूल्यांकनासह 2020-21 चा निर्देशांक 16 उद्दिष्टांबाबत 115 निर्देशकांचे मोजमाप करतो.


➤ SDGs बाबत केलेली प्रगती 0 ते 100 या मोजपट्टीवर मोजली जाते आणि त्यानुसार 4 प्रकारांत वर्गीकरण :-

1) Aspirant (0-49), 2) Performer (50-64)

3) Front-Runner (65-99), 4) Achiever (100)


भारत-पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा :-



◆ शत्रूंशी लढणाऱ्या जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये त्यांच्या पुतळ्याकडे पाहून दररोज मिळावीत तसेच शिवरायांचे शौर्य स्मरून शत्रूंसोबत लढण्याचे बळ मिळावे, यासाठी पुणेकर संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट भारत-पाकिस्तानच्या सीमेवर उभारण्यात येणार आहे.


◆ काश्मीरच्या किरण आणि तगधर-टिटवाल खोऱ्यात दोन ठिकाणी नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिकृती स्थापन करण्यात येणार आहे.


◆ काश्मीर मधील कुपवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सागर दत्तात्रय डोईफोडे यांच्या पुढाकाराने मूर्ती साकारण्यात येणार आहे.


◆ छत्रपती शिवाजी महाराज अटकेपार स्मारक समितीचे प्रमुख अभयराज शिरोळे आणि आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव यांनी या उपक्रमासाठी नियोजन केले आहे.


━━━━━━━━━━━━━━━━━━━

एअर इंडिया 34 अब्ज डॉलर्समध्ये 220 बोईंग विमाने खरेदी करणार आहे.



◆ युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष जो बिडेन यांनी बोईंगकडून 220 हून अधिक विमाने खरेदी करण्याच्या एअर इंडियाच्या निर्णयाचे स्वागत केले. 


◆ एअर इंडिया बोईंगकडून USD 34 बिलियनमध्ये तब्बल 220 विमाने खरेदी करेल, आणखी 70 विमाने विकत घेण्याच्या पर्यायासह एकूण व्यवहार मूल्य USD 45.9 अब्ज पर्यंत नेले जाईल.


भारतीय लष्कराला ‘जगातील पहिली’ पूर्णपणे कार्यरत SWARM ड्रोन प्रणाली मिळाली.



◆ न्यूस्पेस रिसर्च, बेंगळुरू-आधारित स्टार्ट-अपने भारतीय सैन्याला SWARM ड्रोन दिले आहेत, त्यामुळे या उच्च-घनतेच्या SWARM ड्रोन्सचे संचालन करणारी लष्कर जगातील पहिली मोठी सशस्त्र सेना बनली आहे. 


◆ ही डिलिव्हरी कदाचित लष्करी ऍप्लिकेशन्ससाठी जगातील पहिले ऑपरेशनल हाय डेन्सिटी स्वॉर्मिंग UAS (मानवरहित एरियल सिस्टीम) इंडक्शन असू शकते, विशेषत: जगभरात ड्रोन संशोधन अद्याप कार्यान्वित होणे बाकी आहे.


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दुसरी ग्लोबल हॅकाथॉन “HARBINGER 2023” जाहीर केली.



◆ रिझर्व्ह बँकेने 'समावेशक डिजिटल सेवा' या थीमसह 'हार्बिंगर 2023 - इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन' या दुसऱ्या जागतिक हॅकाथॉनची घोषणा केली.

 

◆ हॅकाथॉनसाठी नोंदणी 22 फेब्रुवारी 2023 पासून सुरू होत आहे. यात भारतातील आणि यूएस, यूके, स्वीडन, सिंगापूर, फिलीपिन्स आणि इस्रायलसह इतर 22 देशांमधून 363 प्रस्ताव सादर करण्यात आले होते.

परीक्षेसाठी महत्वाचे


◾️ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक



◾️  ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच



◾️  ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक



◾️  ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच



◾️ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच



◾️  पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी



◾️  पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती



◾️ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी



◾️  पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO



◾️  सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती



◾️  सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी



◾️  जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO



◾️  जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष



◾️  जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO



◾️  जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष



◾️  जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO



◾️  जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री



◾️  जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी



◾️  जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री



◾️  जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी



◾️  नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी



◾️  नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष



◾️  नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी



◾️  महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त



◾️  महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर



◾️  महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त




चालु घडामोडी :- 15 फेब्रुवारी 2023

♻️ नमामि गंगे मिशन - II 2026 पर्यंत 22,500 कोटीच्या अर्थसंकल्पीय खर्चासह मंजूर. (NGM I - जून 2014 पासून 31 मार्च 2021 पर्यंत 20,000 कोटी)


♻️ NCSM द्वारे राजस्थान मधील कोटा येथे विज्ञान केंद्र आणि तारांगण बांधले जाणार आहे.


♻️ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हरियाणा पोलिसांना प्रेसिडंटस कलर प्रदान केला.


♻️ रिझर्व्ह बँकेने ‘समावेशक डिजिटल सेवा’ या थीमसह ‘हार्बिंगर 2023 – इनोव्हेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ या दुसऱ्या जागतिक हॅकाथॉनची घोषणा केली.


♻️ Paytm Payments Banks Limited (PPBL) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) LITE लाँच केले आहे.


♻️ एअर इंडिया 34 अब्ज डॉलर्समध्ये 220 बोईंग विमाने खरेदी करणार आहे.


♻️ IIT इंदूरच्या विद्यार्थ्यांना इजिप्तच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ग्लोबल बेस्ट M-GOV पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


♻️ भारतीय लष्कराला ‘जगातील पहिली’ पूर्णपणे कार्यरत SWARM ड्रोन प्रणाली मिळाली.


♻️ बेकायदेशीर खाणकाम रोखण्यासाठी कोळसा मंत्रालयाने ‘खानन प्रहारी’ मोबाईल अँप लाँच केले.


♻️ प्रख्यात भारतीय चित्रकार ललिता लाजमी यांचे निधन.


♻️ ज्येष्ठ अभिनेते जावेद खान अमरोही यांचे निधन.


लक्षात ठेवा



🔸१)पृथ्वीपृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थरास .... असे म्हणतात.

-तपांबर


🔹२)तापस्तब्धीच्या वर असलेल्या १३ ते ५० कि. मी. जाडीच्या थरात हवेची हालचाल होत नाही.या थरास कोणते नाव आहे?

-स्थितांबर


🔸३)तपांबराच्या वरच्या भागातील सुमारे ३ कि. मी. जाडीच्या थरात तापमान स्थिर असते. या थरास कोणती संज्ञा आहे ?

- तापस्तब्धी


🔹४) स्थितांबर व आयनांबर यांच्या दरम्यान असलेल्या वातावरणाच्या थरास कोणत्या नावाने ओळखले जाते ?

- मध्यांबर


🔸५) मध्यांबराच्या वर असलेल्या ८० ते ५०० कि. मी. जाडीच्या .... या थराचा संदेशवहनासाठी उपयोग होतो.

- आयनांबर


🔸१) वातावरणातील सर्वांत उंचीवरील .... या थरात हायड्रोजनसारखे हलके वायू आढळतात. 

- बाह्यांवर


🔹२) .... या ग्रहाभोवती असलेल्या विरळ वातावरणात हायड्रोजन, हेलिअम नायट्रोजन व मिथेन हे वायू आढळून आले आहेत.

- गुरू


🔸३) .... या ग्रहांभोवती असलेल्या वातावरणाच्या विरळ थरात कार्बन-डाय-ऑक्साइड या वायूचे अस्तित्व आढळून आले आहे.

- मंगळ व शुक्र


🔹४) सूर्यमालेतील ज्ञात ग्रहांपैकी .... हा सूर्यापासून सर्वाधिक अंतरावर असलेला ग्रह होय. 

- नेपच्यून (वरुण)


🔸५) जर्मन शास्त्रज्ञ.... यांनी 'युरेनस' किंवा 'प्रजापती' या ग्रहाचा शोध लावला.

- सर विल्यम हर्शल


🔸१) २९ मार्च, १८५७ रोजी मंगल पांडे या हिंदी शिपायाने मेजर ह्यूसनवर झाडलेल्या पहिल्या गोळीने क्रांतीची ठिणगी पडली. ही घटना कोठे घडली?

- बराकपूरच्या छावणीत


🔹२) 'बराकपूर' हे ठिकाण सध्याच्या .... या राज्यात येते.

- पश्चिम बंगाल


🔸३) १८ एप्रिल, १८५९ रोजी तात्या टोपेंना .... येथे जाहीररीत्या फाशी दिली गेली.

- शिप्री


🔹४) “If the 'Sindhia' joins the Mutiny, I shall have to pack off tomorrow. " हे उद्गार कोणी काढले होते ?

- लॉर्ड कॅनिंग


🔸५) इस्लाम धर्मतत्त्वात गुलामगिरीला थारा नाही हे स्पष्ट करून देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या 'वहाबी' चळवळीचे प्रणेते म्हणजे ....

- सय्यद अहमदवरेलवी


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने LHMC येथे 'सायकल फॉर हेल्थ' सायक्लेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे



🔹केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 14 फेब्रुवारी 2023 रोजी नवी दिल्लीतील लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये 'सायकल फॉर हेल्थ' या सायकलथॉनचे आयोजन केले होते.


🔸नोव्हेंबर 2022 मध्ये सुरू झालेल्या 'स्वस्थ मन, स्वस्थ घर' या वर्षभर चाललेल्या मोहिमेचा एक भाग म्हणून याचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा उद्देश निरोगी जीवनाविषयी जागरूकता वाढवणे आणि वाढवणे आहे.


🔹या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया देखील सहभागी झाले होते.


पीएम श्री योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतला आहे



🔹महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 14 फेब्रुवारी 23 रोजी राज्यात प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (पीएम श्री) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.


🔹पहिल्या टप्प्यात 856 शाळा अपग्रेड केल्या जाणार आहेत.


🔸प्रत्येक शाळेला 5 वर्षांसाठी 1 कोटी 88 लाख रुपये दिले जातील.


🔹यासाठी केंद्र आणि राज्याचा वाटा ५ वर्षांसाठी ६०:४० असेल.


🔸या शाळा प्रामुख्याने 6 खांबांवर अपग्रेड केल्या जाणार आहेत.

अनधिकृत खाणकाम रोखण्यासाठी केंद्र सरकारने 'खानन प्रहारी' आणि CMSMS लाँच केले


🔸अनधिकृत कोळसा खाण उपक्रमांची तक्रार करण्यासाठी सरकारने 'खानन प्रहारी' हे मोबाइल अॅप आणि वेब अॅप कोळसा खाण सर्वेक्षण आणि व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे. 


🔹बेकायदेशीर खाणकामाला आळा घालण्यासाठी आणि अंतराळ तंत्रज्ञानाच्या वापरावर सरकारचा ई-गव्हर्नन्स उपक्रम म्हणून पारदर्शक कारवाई करण्यासाठी हे सुरू करण्यात आले.


🔸जानेवारी 2023 पर्यंत, अॅप्सवर 462 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.


राष्ट्रपतीपदाचे महत्व


🟢भारतीय संसदीय शासन पद्धतीमध्ये लोकसभा, राज्यसभा, आणि राष्ट्रपती मिळून संसद तयार झालेली आहे.

🔵 त्यामुळे राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य घटक म्हणून ओळखला जातो.

⚫️भारतीय घटना कलम 52 मध्ये भारताला एक राष्ट्रपती असेल असा स्पष्ट उल्लेख केले आहे.

🔴राष्ट्रपती भारतीय संविधानामध्ये अतिशय महत्वाचे स्थान आहे.

🟢राष्ट्रपती हे पद देशाचे सर्वात श्रेष्ठ अधिकारपद आहे. 

🔵राष्ट्रपतीचे घटनात्मक स्थान अतिशय उच्च दर्जाचे आहे. 

⚫️घटनेने राष्ट्रपतीला सर्वोच्च पद देऊन त्याला व्यापक प्रमाणावर अधिकार दिले आहे.

🔴राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख असल्याने त्याला अनेक प्रकारची कार्ये पार पडावी लागतात.

🟢 अनेक प्रकारचे अधिकार राष्ट्रपतीला प्राप्त होतात.

🔵भारतीय शासन व्यवस्थेने दोन प्रमुख आहेत एक नामधारी प्रमुख तर एक वास्तविक प्रमुख आहे.

⚫️ राष्ट्रपती हा नामधारी व प्रंतप्रधान हा वास्तविक शासनप्रमुख आहे.

🔴राष्ट्रपती स्वेच्छेने आपल्या अधिकाराच्या जोरावर आणीबाणी जाहीर करू शकतो.

🔵राष्ट्रपती स्वअधिकाराच्या जोरावर गुन्हेगाराला दयरा दाखवून त्याची शिक्षा स्थगित करू शकतो किंवा कमी करू शकतो.




❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

नकाराधिकार (Veto Power)


आधुनिक राष्ट्रांमध्ये राष्ट्राध्यक्षांना प्राप्त असलेल्या नकाराधिकार यांचे चार प्रकार पडतात...

1) पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार

2) गुणात्मक नकाराधिकार

3) निलंबनात्मक नकाराधिकार

4) पॉकेट नकराधिकर


1) पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार-

याचा अर्थ संसदेने संमत केलेल्या विधेयकाला संमती पूर्णपणे रोखून धरणे असा होतो.


2) गुणात्मक नकाराधिकार-

याचा अर्थ राष्ट्राध्यक्षांनी संसदेकडे पुनर विचारार्थ पाठवलेल्या विधेयकास संसदेने पूर्वीपेक्षा अधिक बहुमताने पारित केल्यास राष्ट्राध्यक्षांना त्यासंबंधी द्यावीच लागेल.


3) निलंबनात्मक नकाराधिकार-

याचा अर्थ राष्ट्राध्यक्षांनी संसदेकडे पुनर्विचार पाठवलेल्या विधेयकास संशोधने पुन्हा साध्या बहुमताने पारित केले तरी राष्ट्राध्यक्षांना त्यास संमती द्यावी लागेल.


4) पॉकेट नकाराधिकार-

याचा अर्थ संसदेने पारित केलेल्या विधेयकावर कोणताही निर्णय न घेता ते तसेच पडून देणे.


👉🏻वरील चार प्रकारांपैकी भारतीय राष्ट्रपतींना गुणात्मक नकाराधिकार उपलब्ध नाही.

(अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांना मात्र प्राप्त आहे)

महाराष्ट्राविषयी माहिती


▪️  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (1646 मी.) ता. अकोले, जि - अहमदनगर.


▪️महाराष्ट्राला 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


▪️महाराष्ट्राची राजधानी - मुंबई


▪️उपराजधानी - नागपूर.


▪️महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - 36


▪️महाराष्ट्राने भारताचा 9.7 टक्के भाग व्यापलेला आहे.


▪️महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.


▪️महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे.


▪️ विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


▪️विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


▪️महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


▪️महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


▪️महाराष्ट्रातील 100 टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


▪️महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


▪️महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


▪️भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


▪️महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


▪️पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


▪️प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


▪️जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


▪️औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


▪️पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


▪️महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


▪️कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


▪️कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.


▪️विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


▪️महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


▪️विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


▪️संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि - बुलढाणा येथे आहे.


▪️ संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि - अमरावती येथे आहे.


▪️ संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


▪️ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि - नाशिक.


▪️पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


▪️कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


▪️आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


▪️ मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


▪️नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


▪️महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


▪️ ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.


▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.


▪️भारतातील पहिला पेट्रोरसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.


▪️रायगड जिल्ह्यात - कातकरी, ठाणे जिल्ह्यात - वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...