27 November 2022

आजची स्मार्ट प्रश्नमंजुषा

१) पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रिडा स्पर्धा २०२० मध्ये किती वर्षांखालील खेळाडूंना स्थान देण्यात आले होते ?
अ) २५ वर्षांखालील ✅✅
ब) १७ वर्षांखालील
क) २३ वर्षांखालील
ड) २१ वर्षांखालील

२) शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो ?
अ) ५ मार्च
ब) १ मार्च ✅✅
क) ६ मार्च
ड) २ मार्च

३) खालीलपैकी कोणाची केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?
अ) डॉ. राजीव कुमार
ब) सुनील अरोरा
क) सामंत गोयल
ड) विमल जुल्का ✅✅

४) मिताग नावाचे चक्रीवादळ आॅक्टोबर २०१९ मध्ये कोणत्या देशात आले होते ?
अ) तैवान ✅✅
ब) चीन
क) जपान
ड) रशिया

५) मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
अ) जलसंवर्धन
ब) जलसिंचन
क) लसीकरण ✅✅
ड) कृत्रिम पाऊस

1)खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही?

1)वेण्णा

2)कोयना

3)वारणा

4)येरळा ✔️✔️

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

2) लोटेमाळ हे औद्योगिक केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे?

1)लांजा

2) चिपळूण

3)खेड✔️✔️

4)दापोली

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

3) वनसंवर्धन हे अप्रत्यक्षरीत्या......... चे सुद्धा संवर्धन असते?

1)मृदा

2)पाणी

3)प्राणी

4)वरील सर्व ✔️✔️

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

4) दसराज्ञ पुढीलपैकी कोणात  घडले  होते?

1) पुरोहित व विश्वामित्र

2) विश्वामित्र व भरत जमात✔️✔️

3) सुदास व वैशिष्ट

4) पुरू व विश्वामित्र

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

5) तक्षशिला हे शहर कोणत्या दोन नद्या दरम्यान प्रदेशात बसले होते?

1)सिन्धु व झेलम ✔️✔️

2)चिनाब व रावी

3)झेलम व चिनाब

4)रावी व झेलम

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

6) शिवराम जानबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा1910मध्ये आयोजित केली होती, त्यांच्या वर कोणाचा प्रभाव होता?

1)जी. बी. वालन्गकर

2)जोतिबा फुले

3)वरील दोन्ही ✔️✔️

4)वरील पैकी नाही

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈


7)' बंदीस्त वर्ग मध्ये जात होय' ही व्याख्या  कोणी केली?

1)महात्मा गांधी

2)महात्मा फुले

3)सावरकर

4) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर✔️✔️

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

8)कोणत्या संस्थेनी ‘HRMS’ मोबाइल अॅप सादर केले?

A) एअर इंडिया

B) भारतीय रेल्वे✔️✔️

C) मनुष्यबळ व विकास मंत्रालय, भारत सरकार

D) महिला व बाल विकास मंत्रालय

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

9) जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या दलित पँथर या सामाजिक संघटनेच्या सहसंस्थापकाचे नाव काय होते?

1) नामदेव ढसाळ

2) जे. व्ही. पवार

3) अरुण कांबळे

4) राजा ढाले ✔️✔️

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

10) पदार्थाच्या नुकत्याच सापडलेल्या सहाव्या अवस्थेचे नाव काय आहे ?

1)बोस – आईनस्टाईन कंडनसेट✔️✔️

2)फर्मआयोनिक कंडनसेट

3)एरिक – कॅटरले कंडनसेट
  
4)कार्नेल टर्मस् कंडनसेट

🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈

जे. पी 👇

1)खालीलपैकी कोणत्या राज्याने 2020-21 मधील आर्थिक वर्षात ' प्रधानमंत्री आवास योजना -ग्रामीण ’  अंतर्गत मंजूर घरापैकी एकही घर पूर्णत्वास नेलेले नाही?

उत्तर :-👇 
        आसाम

Q : कोणत्या संस्थेने नाग अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी यशस्वीपणे पार पाडली?

(अ) डीआरडीओ✔️✔️

(ब) इसरो

(क) नासा

(ड) यूएसए

Q  : चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत SBI कार्ड शेअर्समध्ये किती टक्के घट झाली आहे?

(अ) सात टक्के

(ब) पाच टक्के

(क) चार टक्के

(ड) आठ टक्के✔️✔️

Q : युनिसेफच्या अहवालानुसार अनेमिया मुक्त भारत कार्यक्रमात कोणत्या राज्याला प्रथम स्थान मिळाले आहे?

(अ) पंजाब

(ब) हरियाणा✔️✔️ 

(क) राजस्थान

(ड) गुजरात

Q :सुमारे पाच दशकांपासून संसद भवनात अन्न पुरवित असलेल्या उत्तर रेल्वेने कोणाची नेमणूक केली व त्यांची जागा घेतली आहे?

(अ) राष्ट्रीय विकास महामंडळ

(ब) भारतीय पर्यटन विकास महामंडळ (आयटीडीसी)✔️✔️

(क) भारतीय विकास महामंडळ

(ड) पर्यटन विकास महामंडळ

Q  :हरियाणा लोकसेवा आयोगाचे नुकतेच नवीन अध्यक्ष कोण बनले?

(अ) नंदकिशोर राव

(ब) आशुतोष गुलाब

(क) रामकुमार शर्मा

(ड) आलोक वर्मा✔️✔️



कोणत्या दिवशी ‘कार्यस्थळी सुरक्षा व आरोग्य यासाठीचा जागतिक दिन’ साजरा करतात?
उत्तर :- २८ एप्रिल

कोणते विधान भारतीय संविधानातील कलम २२३ याचे वर्णन करते?
उत्तर :-  उच्च न्यायालयात प्रभारी मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती

कोणत्या देशाने ‘पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम’ याचा औपचारिकपणे प्रारंभ केला?
उत्तर :- भारत,जपान,ऑस्ट्रेलिया

‘Ct व्हॅल्यू’ या संज्ञेचा अर्थ काय आहे?
उत्तर :- सायकल थ्रेशोल्ड व्हॅल्यू

कोणत्या देशाने अंतराळातील कचरा साफ करण्यासाठी ‘निओ-०१’ नामक एक उपकरण प्रक्षेपित केले?
उत्तर :- चीन

कोणत्या दिवशी कामगार स्मृतिदिन साजरा करतात?
उत्तर :- २८  एप्रिल

कोणत्या राज्यात ‘स्टरलाईट कॉपर प्लांट’ आहे?
उत्तर :-  तामिळनाडू

कोणत्या देशाने "मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह" नामक उपक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :-  सौदी अरब

‘दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सरकार (दुरुस्ती) अधिनियम-२०२१' याची कोणती व्याख्या स्पष्ट करते?
उत्तर :- दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील 'सरकार' याचा अर्थ दिल्लीचे 'नायब राज्यपाल' असेल.

वर्ष २०२१ मध्ये, कोणत्या दिवशी ‘पक्के छत्र नसलेल्या मुलांसाठी आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा करण्यात आला?
उत्तर :- १२ एप्रिल

प्रश्न.  1

ऑस्कर 2021 मध्ये कोणत्या चित्रपटाला 'बेस्ट फिल्म' हा पुरस्कार मिळाला आहे?

A) द  फादर

B) द मॉरितोनियन

C) यंग वूमेन

D) नोमैलेंड✅

प्रश्न .2

सौदी अरेबिया या देशाने नुकतेच किती टन ऑक्सिजन भारताला पाठवण्यात  आले आहे ?

A)45 मेट्रिक टन

B)68 मेट्रिक टन

C)70 मेट्रिक टन

D)80 मेट्रिक टन✅


खालीलपैकी कोणत्या संसदीय समितीला 'सुपर कॅबिनेट ' असे ओळखले जाते?
A)राजकीय व्यवहार समिती ✅

B)संसदीय व्यवहार समिती

C)आर्थिक व्यवहार समिती

D) नियुक्त्या संदर्भातील समिती

प्रश्न . 4
कोणत्या कालखंडात जिल्ह्याला सरकार म्हटले जात असे ?

A)मौर्य

B)गुप्त

C)मोगल✅

D)सलतन

प्रश्न. 5
शरीरातील विविध अवयव व  उतींना जोडण्याचे कार्य कोणत्या ऊती करतात?

A)अभिस्तर ऊती

B)स्नायू ऊती

C)चेता ऊती

D)संयोजी ऊती✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

#  : थेट प्रवाह कार्यवाही ( live stream proceedings) करणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते आहे?

(अ) कोलकाता

(ब) गुजरात✔️✔️

(क) चेन्नई

(ड) दिल्ली

# :  डीएसटी (DST) चा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी विशेष मुखपृष्ठ (a special cover) कोणी जारी केले आहे?

(अ) रविशंकर प्रसाद

(ब) नितीन गडकरी

(क) डॉ. हर्षवर्धन ✔️✔️

(ड) प्रकाश जावडेकर

# : जागतिक त्सुनामी जागृती दिन कधी साजरा केला जातो?

(अ) 4 नोव्हेंबर

(ब) 5 नोव्हेंबर✔️✔️

(क) 3 नोव्हेंबर

(ड) 2 नोव्हेंबर

# : फिशर लोकांच्या चांगल्या उपजीविकेसाठी कोणत्या राज्यात "Parivarthanam" योजना सुरू केली?

(अ) कर्नाटक

(ब) ओडिशा

(क) गोवा

(ड) केरळ✔️✔️
Explanation  : scheme for better livelihood of fisher folk?

#  : कोणत्या देशाला दहशतवाद (State sponsors of Terrorism List) यादीमधून वगळण्यात आले आहे?
(अ) लेबनॉन

(ब) युएई

(क) सुदान✔️✔️

(ड) पाकिस्तान  


#  :देशाचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती दिवस म्हणून साजरा केला जातो?
अ) राष्ट्रीय शिक्षक दिन

ब) राष्ट्रीय शिक्षण दिन ✔️✔️

क) जगातील विद्यार्थी दिन

ड) शिक्षक दिन    

#  :  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते?

अ) 25 वे

ब) 26 वे   

क) 27 वे 

ड) 28 वे✔️    

#  : अलीकडे केरळ सरकारने जेसी डॅनियल पुरस्कार 2020 कोणाला दिला आहे?

(अ) जयराम

(ब) मोहनलाल

(क) हरिहरन✔️✔️

(ड) दिलीप

Answer  : the JC Daniel Award 2020  

#  : अलीकडेच प्रसिद्ध व्यक्ती ‘फराज खान’ यांचे निधन झाले, ते कोण होते?

(अ) अभिनेता

(ब) लेखक✔️✔️

(क) गणितज्ञ

(ड) वैज्ञानिक

#:आंतर संसदीय संघटनेचे (IPU) नुकतेच अध्यक्ष कोण बनले?

(अ) अल्विरो क्लार्क

(ब) जेम्स केन

(क) रॉली फेरिस

(ड) डुआर्ते पाचेको✔️✔️

Answer  : Duarte Pacheco :- (Inter Parliamentary Union)

#: 31  ऑक्टोबर 2020  रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली?

(अ) 150 वी

(ब) 147 वी

(क) 155 वी

(ड) 145 वी✔️✔️

#  : नुकतेच पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड ( Petronet LNG Limited) चे नवीन सीईओ कोण बनले?

(अ) राकेश कुमार सिंह

(ब) अक्षय कुमार सिंग✔️✔️

(क) मनीषसिंग राजपूत

(ड) आकाश प्रीत देवगौडा

#  :कोणत्या टेनिस खेळाडूने नुकतेच पॅरिस मास्टर्स 2020 चे विजेतेपद जिंकले आहे?

(अ) डोमिनिक थीम

(ब) अलेक्झांडर झेवरेव

(क) डॅनियल मेदवेदेव✔️✔️

(ड) जिमी कॉनर्स

Answer  :-  Daniel Medvedev (the title of Paris Masters 2020 )

# : कोणत्या राज्यात, नुकताच भारताचा पहिला सौर आधारित पाणीपुरवठा प्रकल्प सुरू झाला?

(अ) मध्य प्रदेश

(ब) अरुणाचल प्रदेश

(क) हिमाचल प्रदेश✔️✔️

(ड) उत्तर प्रदेश

# : नुकताच अमेरिकेचा 46 वा राष्ट्राध्यक्ष कोण झाला?

(अ) हिलरी क्लिंटन

(ब) मार्टिन जोसेफ   

(क) रॉबिन चार्ल्स

(ड) जो बायडेन ✔️✔️  

# :ऑस्कर नामांकनासाठी कोणती शॉर्ट फिल्म पात्र ठरली आहे?

(अ) गल्ली बॉय

(ब) मर्दानी 2

(क) नटखट✔️✔️

(ड) यापैकी काहीही नाही

#:आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिवस(International Day of Radiology) कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

(अ) November नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर✔️✔️

(क) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर


#  : प्रशासकीय व अर्थसंकल्पीय प्रश्नांसाठी (Administrative and Budgetary Questions) यूएनच्या सल्लागार समितीत कोणाला निवडले गेले आहे?

(अ) विदिशा मैत्र✔️✔️

(ब) स्मृती इराणी

(क) निर्मला सीतारमण

(ड) किरण बेदी

# : जागतिक शहरीकरण दिन (World Urbanism Day) कधी साजरा केला जातो?

(अ) 6 नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर✔️✔️

(क) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर

: राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिन (National Legal Services Day) दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

(अ) 7 नोव्हेंबर

(ब) 8 नोव्हेंबर

(क ) 9 नोव्हेंबर

(ड) 10 नोव्हेंबर

प्रश्नः कोणत्या मंत्रालयाचे विस्तार व नाव बदलून, " बंदर, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालय " करण्यात आले आहे?

(अ) परिवहन मंत्रालय

(ब) नौवहन मंत्रालय✔️✔️

(क) परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

(ड) यापैकी काहीही नाही

  : केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी 3 नोव्हेंबर 2020 रोजी कोणत्या राज्यात साई (SAI) च्या नवीन क्षेत्रीय केंद्राचे उद्घाटन केले?

(अ) बिहार

(ब) हरियाणा

(क) पंजाब✔️✔️

(ड) राजस्थान

1)जागतिक नागरी संरक्षण संघटनेचे सदस्य देश किती आहेत?

1)59✅✅

2)18 निरीक्षक देश

3)56

4)45

2)जागतिक नागरी संरक्षण दिवस कधी असतो?

1)28एप्रिल

2)1जानेवारी

3)18मार्च

4)1मार्च✅✅

3)1मार्च 2021पासून सुरु झालेल्या लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिली लस कोणाला दिली?

1)गृहमंत्री अमित शहा

2)राष्ट्रपती रामनाथ कोविंद

3)उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू

4)पंतप्रधान नरेंद्र मोदि✅✅

पहिला टप्पा =6जानेवारी 2021

4)गोल्डन ग्लोबल पुरस्कार 2021 चा उकृष्ट परदेशी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटला मिळाला?

1)सोल

2)लो सी

3)मीनारी✅✅

4)नोमॅडलँड (93वा ऑस्कर :- सर्वोत्तम चित्रपट:- दिग्दर्शक क्लोई झाओ :- आणि सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार फ्रान्सेस एम सीडॉर्मंड

5)भारतीय शाळकरी विद्यार्थीनी किती लघुग्रहांचा शोध लावला?

1)6

2)8

3)10

4)18✅✅


9)PSLV-C-51 चे वजन किती आहे?

1)1500kg

2)1300kg

3)670kg

4)673kg✅✅ 28February 2021 successfully launched

Hight=44.4miter

8)"जॉन्सन अँड जॉन्सन" च्या एका डोसच्या लशीला कोणत्या देशात मान्यता मिळाली?

1)रशिया

2)भारत

3)अमेरिका✅

4)कॅनडा

10)'ड'प्रथीनयुक्त गहू कोणी विकसित केला?

1)डॉ के. शिवन

2)डॉ आर उमामहेश्वरन

3)चिंतल वेंकट रेड्डी✅✅

4)राजीव मल्होत्रा
___________________________

गणित मैत्री प्रश्नमंजुषा

🎈परश्न १ ला : -  ७८ या त्रिकोणी संख्येचा पाया किती ?

(१) १३

(२) १२✅

(३) ०६

(४) २६


🔸🔹🔹🔸


🎈परश्न २ रा : -  दोन संख्यांचा गुणाकार ४३३५ असून , त्यांचा ल. सा. वि.२५५ आहे.तर त्या संख्यांचा म. सा. वि. किती ?

(१) ३४

(२) १३

(३) १९

(४) १७✅


🔸🔹🔹🔸


 🎈परश्न ३ रा : -  दोन संख्यांचा म. सा. वि. २५ व ल. सा. वि. ३५० आहे , तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?

(१) ४५

(२) १७५

(३) ३५

(४) ५०✅


🔸🔹🔹🔸


 🎈परश्न ४ था : -  तीन अंकी लहानात लहान अशी संख्या कोणती , की जिला ५ , १२ व १५ या संख्यांनी भागल्यास प्रत्येक वेळी ४ उरतात ?

(१) १२०

(२) १२४✅

(३) २४०

(४) १८०


🔸🔹🔹🔸


 🎈परश्न ५ वा  : -  एका संख्येतुन ८ वजा करून ८ ने भागल्यास उत्तर २ येते , तर त्या संख्येतुन ४ वजा करून ५ ने भागल्यास उत्तर काय येईल ?

(१) २

(२) ३

(३) ४✅

(४) ६



🎈परश्न ६ वा  : -  गुरुनाथने १२००० रु.भांडवल गुंतवून एक धंदा सुरू केला . ४ महिन्यानंतर दिनानाथने काही रक्कम गुंतवून भागिदारी स्विकारली . वर्षाअखेर त्या धंद्यात झालेल्या २२०० रु. नफ्यापैकी दिनानाथला १००० रु. मिळाले ; तर दिनानाथने किती रक्कम गुंतवली होती ?

(१) १२००० रु.

(२) १८००० रु.

(३) १५००० रु.✅

(४) १०००० रु.


🔸🔹🔹🔸


🎈परश्न ७ वा  : - एका परीक्षेत ३०% विद्यार्थी गणितात नापास झाले . २०% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व १०% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले , तर दोन विषयाच्या या घेतलेल्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले ?


(१) ४०%

 २) ३०%

(३) ७०%

(४) ६०%✅


🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈


 🎈परश्न ८ वा : -  एका विक्रेत्याने दोन रेडिओ संच प्रत्येकी ४९५ रुपयांस विकले . तेव्हा त्याला एकात खरेदीच्या १०% नफा व दुसर्‍यात १०% तोटा झाला . तर त्या व्यवहारात त्याला एकूण नफा अथवा तोटा किती टक्के झाला ?

 (१) ना नफा ना तोटा

(२) १% नफा

(३) १% तोटा✅

(४) ०.१% तोटा


🔸🔹🔹🔸


🎈परश्न ९ वा  : -   १ मार्च १९९७ रोजी शनिवार होता . तर १ जुलै १९९७ रोजी कोणता वार असेल ?

(१)  बुधवार

(२) गुरुवार

(३) मंगळवार✅

(४) सोमवार


🔸🔹🔹🔸


🎈परश्न १० वा  : - एका चौरसाची बाजु ८ सेमी आहे व दुसर्‍या चौरसाचा कर्ण ८ सेमी आहे , तर दोन चौरसांच्या क्षेत्रफळांमध्ये किती चौ.सेमी चा फरक  असेल ?

(१) १६

(२) ३२✅

(३) ०८

(४) २४

प्रश्नमंजुषा


१. खालीलपैकी कोणत्या समितीचा कार्यविषयक 'पंचायतराज संस्था' हा होता ?

अ) जी. व्ही. के. राव समिती

ब) लळा सुंदरम समिती

क) अशोक मेहता समिती ✅✅

ड) व्ही.कृष्णमेनंन समिती


२) चंद्र पृथ्वीपासून खूप अंतरावर असतांना सूर्यग्रहण झाले तर अशे ग्रहण ..........असेल?

१) खग्रास 

२) खंडग्रास 

३) कंकनाकृती ✅✅

४) यापैकी नाही


३) केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली 'माडिया गोंड'ही जगात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते ?

१) सिंधुदुर्ग

२) चंद्रपूर ✅✅

३) गोंदिया

४) रायगड


४) खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा आपणास मिळणाऱ्या परकीय मदतीत आजही सर्वाधिक हिस्सा आहे ?

१) रशिया 

२) जपान 

३) ब्रिटन 

४)अमेरिका ✅✅


५) 'मुंबई बेट'ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स ..........

१) याने पोर्तुगीजांकडू जिंकून घेतले.

२) याने मोघलांकडून जिंकून घेतले.

३) यांच्यामते इंग्लंडहून सुंदर शहर होते 

४) याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण दिले. ✅✅


६) 'ग्रँड ट्रॅक' हा राष्ट्रीय महामार्ग या दोन शहरांना जोडतो.

१) कोलकत्ता : अमृतसर  ✅✅

२) मुंबई : दिल्ली

३) मुंबई : कोलकत्ता 

४) कोलकत्ता : चेन्नई


७) अग्निकंकण उर्फ 'रिंग ऑफ फायर'खालीलपैकी कोणत्या घटकांशी संबंधीत आहे

अ) भूकंपप्रवण क्षेत्र

ब) ज्वालामुखी उद्रेकाचे क्षेत्र

क) प्रशांत महासागराभोवतीचा भाग


१) फक्त अ,ब व क ✅✅

२) फक्त ब व क

३) फक्त ब व अ

४) अ ते क 


८) 'रिंट ऑफ व्हेबिअस कॉपर्स' व 'रिंट ऑफ मॅडामस' हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधीत आहेत

१) संपत्तीचा हक्क

२) धर्मस्वातंत्र्याचा हक्क

३) स्वातंत्र्याचा हक्क

४) घटनात्मक दाद मागण्याचा हक्क ✅✅


९) खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रीपतीच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधीत आहेत?

१) ३५२,३५६,३६० ✅✅

२) १६३,१६४,१६५

३) ३६७,३६८,३६९

४) ३६९,३७०,३७१



10) भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर,१९४६ रोजी दिल्ली येथे भरले होते.या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले  होते?                                १) डॉ. राजेंद्रप्रसाद

२) हृदयनाथ कुंझरू

३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

४) डॉ. सच्चिदानंद सिन्हा✅✅


११) विधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघाकडून निवडून दिले जाते?

१) एक-पप्ष्टांश 

२) एक-बारांश ✅✅

३) एक-पंचमाश

४) एक-तृतीयांश


१२) दादाभाई नौरोजीनी आपला सुप्रसिद्ध 'वहन सिद्धांत' (Drain Theory) आपल्या ..........ग्रंथात मांडला आहे .

१)पाँव्हार्टी इन इंडिया 

२) पाँव्हार्टी अँड अन् ब्रिटिश रुल इन इंडिया ✅✅

३) पाँव्हार्टी अँड अन् ब्रिटिश रुल 

४) ब्रेन ड्रेन ड्युरिंग ब्रिटिश पिरिअड


१३) गंगा नदी येथे बंगालच्या उपसागरास मिळते तेथे गंगेच्या मुखाशी गाळ साचून ........या नावाने बेट तयार झाले आहे

१) सुंदरबन 

२) प्रयाग 

3) न्यू-मूर ✅✅

४) कोलकात्ता


१४) संगणकामधील फ्लॉपी डिस्क म्हणजे........होय.

१) माहिती एकत्र करणारी यंत्रणा

२) केंद्रीय मेमरी 

३) एक सॉफ्टवेअर 

४) माहिती साठवण्याचे एक साधन ✅✅


१५) 'P'हा 'K'चा भाऊ आहे .'S'हा 'P' चा मुलगा आहे .'T'ही 'K'ची मुलगी आहे .'E'आणि 'K'परस्पर बहिणी आहेत; तर 'E'che 'T'शी नाते काय?

१) आत्या 

२) मावशी ✅✅

३) मामी 

४) बहीण

26 November 2022

'संविधान दिवस' 26 नोव्हेंबर

देशभरात आज 'संविधान दिवस' साजरा केला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली तो हाच दिवस. या निमित्तान देशभात विविध कार्यक्रमांचं आजोयन करण्यात आलं आहे. या निमित्तानं जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

💠 १. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.

💠 २. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?

- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.

💠 ३. कसं लिहीलं गेलं संविधान?

-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

💠 ४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?

-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.

💠 ५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?
-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.

💠६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.

💠 ७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?

- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.

💠 ८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?

-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.

💠 ९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?

- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.

💠 १०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?

-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.

राज्यसेवा प्रश्नसंच

1. कोणत्या राज्याला 28 ऑगस्ट 2018 पासून आणखी सहा महिन्यासाठी "अशांत शेत्र" म्हणून घोषित करण्यात आले आहे?

A) बिहार      

B) आसाम 💬      

C) अरुणाचल प्रदेश        

D) सिक्किम




2. मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसींना 27 टक्के आरक्षण देताना कोणत्या सालच्या जनगणनेचा आधार घेण्यात आला होता?

A) 1931💬      

B) 1971          

C) 1951        

D) 1961


3. यावर्षीचा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार कोणास देण्यात आला आहे?

A) फ्रान्सिस दिब्रिटो                  

B) रामकृष्ण महाराज लहवितकर    

C) किसन महाराज साखरे💬    

D) रामकृष्ण महाराज बोधले


4. जगात सर्वाधिक इंटरनेट ग्राहकांच्या बाबतीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?

A) चीन 💬        

B) ब्राझील          

C) भारत          

D) अमेरिका


5. BIMSTEC या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

A) 1991          

B) 1996        

C) 1997💬      

D) 1998


6. कोणता देश 29व्या " अबू धाबी आंतरराष्ट्रीय पुस्तक " मेळाव्याचा (ADIBF) " सन्माननीय पाहुणा " आहे?

A) बांग्लादेश        

B)  इराण          

C) भारत 💬        

D) पाकिस्तान


7. कोणत्या भारतीयास UN च्या सहाय्यक महासचिव तसेच संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रमाच्या (UNEP) न्यूयॉर्क येथील कार्यालयाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केले गेले आहे?

A) सत्या त्रिपाठी💬        

B) प्रज्ञा झा        

C) शशी थरूर        

D) यापैकी नाही


8. भारतातील किती राज्यांमध्ये सध्या विधानपरिषद अस्तित्वात आहे?

A) पाच          

B) सहा          

C) सात💬        

D) आठ


9. कोणत्या हवाई वाहतूक कंपनीने नुकताच जैवइंधनावर विमान वाहतुकीचा  प्रयोग यशस्वी केला आहे?

A) इंडिगो        

B) स्पाइस जेट 💬    

C) एअर इंडिया        

D) गो एअर


10.  "अटल जी ने कहा" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A) नरेंद्र मोदी      

B) ब्रिजेंद्रा रेही 💬      

C) व्ही एस नाईक        

D) सत्येन्द्र अगरवाल


11. चर्चेत असलेली नाओमी ओसाका ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या देशाची आहे?

A) जपान 💬    

B) अमेरिका      

C) इंग्लंड      

D) सर्बिया


12. "अभयम-181" या नावाचे मोबाईल अॅप हे महिलांना सुरक्षा देण्याच्या हेतूने कोणत्या राज्य सरकारने लॉंच केले आहे?

A) गुजरात💬      

B) महाराष्ट्र      

C) मध्य प्रदेश    

D) तामिळनाडू


13. कम्युनिशंस कम्पॅटिबिलिटी अँड सिक्युरिटी एग्रीमेंट

(COMCASA) हा करार खालील कोणत्या दोन देशात झाला?

A) भारत - फ्रान्स    

B) भारत - जपान      

C) जपान - अमेरिका    

D) भारत - अमेरिका💬


14. रंजन गोगोई हे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश असून ते सर्वोच्च न्यायालयाचे कितवी सरन्यायाधीश आहे?

A) 44      

B) 45      

C) 46💬    

D) 47


15. खालीलपैकी कोणत्या देशाने ' NOPE ' या मंगळ मोहिमेची घोषणा केली आहे?

A) इस्राईल      

B) यूएई 💬      

C) सौदी अरेबिया          

D) इराण


16. नुकताच निवृत्त झालेला क्रिकेटपटू ऍलिस्टर कुक हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

A) दक्षिण आफ्रिका        

B) ऑस्ट्रेलिया      

C) वेस्ट इंडिज      

D) इंग्लंड💬


17. भारतात प्रथमच भरविण्यात आलेल्या 'FIBA 3×3 world tour master' ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

A) बास्केटबॉल 💬      

B) बॉक्सिंग    

C) ब्रिज      

D) बॅटमिंटन


18.  भारताच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये कोणत्या संघाला नमवत ब्राँझ पदक मिळविले?

A) जपान      

B) दक्षिण कोरिया    

C) पाकिस्तान💬    

D) फिलिपिन्स


19. "Moving on, moving forward : A year in office" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

A) व्यंकय्या नायडू 💬    

B) रामनाथ कोविंद    

C) सुमित्रा महाजन    

D) अरुण जेटली


20. नुकतेच निधन झालेले आर्थर परेरा हे कोणत्या खेळाशी संबंधित होते?

A) बुद्धिबळ      

B) बॅटमिंटन      

C) फुटबॉल💬      

D) टेनिस


21. राज्य शासनातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत देण्यात येणारा 2016- 17 चा " तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम " या पुरस्कारात प्रथम क्रमांक कोणत्या ग्रामपंचायतीस मिळाला?

A) शेळगाव गौरी    

B) मन्याचीवाडी      

C) हिवरे बाजार 💬    

D) खाटाव


22. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार यावर्षी कोणास देण्यात आला?

A) विजय भटकर      

B) गिरीश प्रभुणे      

C)सुहास बहुळकर 💬        

D) यापैकी नाही


23. दुसरी "जागतिक हिंदू परिषद" कुठे पार पडली?

A) नवी दिल्ली        

B) लंडन        

C) शिकागो 💬      

D) न्यूयॉर्क



 1. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?

अ) ती प्रौढ मताधिकारावर आधारित न्हवती

ब) ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती.

क) ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या

ड) ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे.

1.अ आणि ब

2. ब आणि क

3. अ आणि ड✅

4  वरील सर्व


2.खालीलपैकी कोणती सेवा अखिल भारतीय सेवा म्हणून गणली जात नाही

1. भारतीय प्रशासकीय सेवा 

2. भारतीय पोलीस सेवा

3. भारतीय विदेश सेवा✅

4. भारतीय वन सेवा


3.घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली?

1. सिमला परिषद

2. कॅबिनेट मशीन✅

3. क्रिप्स योजना

4.यापैकी नाही



4.राज्यपालांची नेमणूक कोण करतात?

1. पंतप्रधान

2. मुख्यमंत्री

3. राष्ट्रपती✅

4. उपराष्ट्रपती


5.खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

1.लोकसभेपेक्षा राज्यसभेला व्यापक अधिकार आहेत

2.राज्यसभेपेक्षा लोकसभेला व्यापक अधिकार आहेत✅

3. राज्यसभेचा कालावधी 6 वर्ष असतो

4. लोकसभा हे स्थायी सभागृह आहे.


6.राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?

1. राष्ट्रपती

2. पंतप्रधान

3 उपराष्ट्रपती✅

4. गृहमंत्री


7.भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यामागील मुख्य संकल्पना म्हणजे ......

1. कल्याणकारी राज्याची निर्मिती✅

2. समाजवादी व निधर्मी समाज रचना

3. व्यक्तीस्वातंत्र्याची हमी

4. मूलभूत हक्कांना बाधा पोहोचविण्यास प्रतिरोध


8.भारतीय राज्यघटनेतील कलम 280 कशाशी संबंधित आहे?

1. भारतीय नियोजन आयोग

2. भारतीय निवडणूक आयोग

3. संघ लोकसेवा आयोग

4. भारतीय वित्त आयोग✅


9.वन हा विषय कोणत्या सुचितील आहे?

1. केंद्र

2. राज्य✅

3. समवर्ती

4. यापैकी सर्व


10.वार्षिक केंद्रीय आर्थिक अंदाजपत्रकाला लोकसभेची मंजुरी न मिळाल्यास ....

1. अंदाजपत्रक दुरुस्त करून फेरसादर केले जाते 

2. राज्यसभेचा अभिप्राय घेण्याकरिता पाठविले जाते 

3. राष्ट्रपतींचे अभिप्रायासाठी पाठविले जाते

4. पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो.


प्रश्न 1 मातृत्व वंदना योजना महाराष्ट्रात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकचा ठरला आहे?

A  कोल्हापूर 

B  सातारा  

C  पुणे 

D  नाशिक 

उत्तर  2


प्रश्न 2  इम्रान खान हे पाकिस्तान या देशाचे 22 वे पंतप्रधान ठरले आहेत त्यांनी जो पक्ष स्थापन केला होता तेहरिक-ए-इन्साफ याची स्थापना पुढील पैकी केव्हा करण्यात आली होती?

A  14 ऑगस्ट 1993

B  16  जुलै  1996

C  22 एप्रिल 1996

D  16 ऑक्टोबर 1998

उत्तर  C


प्रश्न 3  पुढील विधाने अभ्यासा?

अ  इस्रोने 23 नोवेंबर 2018 रोजी तीस उपग्रह अवकाशात सोडले

ब 30 पैकी पंचवीस उपग्रह हे अमेरिकेचे आहेत

क या मोहिमेत भारतासह एकूण दहा देश सहभागी आहेत

वरीलपैकी कोणती विधान/ने सत्य आहे

1  फक्त अ

2  ब आणि  क

3  फक्त  क

4  अ आणि  ब

उत्तर  4


प्र 4  इसरो ने जे 30 उपग्रह सोडले त्यामध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही?

1  अमेरिका

2   जपान

3   स्पेन

4   नेदरलँड

उत्तर  2


प्र  5 हाइपर सपेक्ट्रल इमेजिंग सॅटॅलाइट हा उपग्रह कोणत्या  कोणत्या देशाने विकसित केला आहे?

1  फ्रांस

2  रशिया

3  भारत

4   चीन

उत्तर  3


प्र  6  इंडियन पोस्टल पेमेंट बँक ची सुरुवात प्रायोगिक तत्वावर खालीलपैकी कोणत्या शहरात सुरू करण्यात आली होती?

1   पुणे

2   रांची

3  अलाहाबाद

4   लखनऊ

उत्तर  2


प्र  7   पुढील पैकी कोणती बँक ही ग्राहकांना क्रेडिट कार्ड सेवा पुरवत नाही?

1  बंधन बँक

2  देना बँक

3  महाराष्ट्र ग्रामीण बँक

4  पोस्टल पेमेंट बँक

उत्तर 4


8  वारसा यादीत पुढिलपैकी कोणत्या रेल्वेचा समावेश होत नाही?

1  निलगिरी

2  दार्जिलिंग

3  पठाणकोट

4  कलका

उत्तर  3


प्र  9  नुकतेच भारतीय रेल्वे ने कोणत्या देशाच्या रेल्वे सोबत करारावर हस्ताक्षर केले? 

1  चीन

2  रशिया

3  नेपाळ

4  म्यानमार

उत्तर  3


प्र  10  महाराष्ट्रत पहिला समलिंगी विवाह कोठे पार पडला?

1  नाशिक

2  नागपूर

3  यवतमाळ

4  पुणे

उत्तर  3

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची गौरवगाथा प्रश्न सराव


🔹परश्न १:- 'दलितांचा मुक्तीदाता ' या शब्दात डॉ.आंबेडकरांचा गौरव कोणी केला ?


१) शाहू महाराज ✅✅

२) डॉ.बेव्हरेल निकोल्स

३) जोतिबा फुले

४) यापैकी नाही


🔹परश्न २:-  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओ.बी.सी समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मिती केली ?


१) कलम ३४०✅✅

२) कलम ३४१

३) कलम ३४२

४) कलम ३४३


🔹परश्न ३:-  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली ?


१) भंते संघरत्न

२) भंते प्रज्ञानंद

३) भंते चंद्रमणी महास्थीर ✅✅

४) भंते सद्दतिस्स


🔹परश्न ४:-  विश्वरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला ?


१) १९९२

२) १९८९

३) १९९०✅✅

४) १९९१


🔹परश्न ५:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता ?


१) थॉटस ऑन पाकिस्तान 

२) बुद्ध आणि त्यांचा धम्म ✅✅

३) हू  वेअर शुद्राज

४) दि अनटचेबल्स 


🔹परश्न ६ :-  १९५२ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने डॉ.आबेडकरांना कोणती पदवी बहाल केली ?


१) एम.ए

२) पी.एच.डी

३) एल.एल. डी✅✅

४) डी.एस सी


 🔹परश्न ७ :-  महाडचा क्रांती स्तंभ किती उंच आहे ?


१) ५१ फूट ✅✅

२) ५५ फूट

३) ५७ फूट

४) ५४ फूट



 🔹परश्न ८:- डॉ.आंबेडकर यांनी त्यांच्या तीन गुरू पैकी दुस-या क्रमांकावर कोणाला गुरू मानले ?


१) तथागत गौतम बुद्ध

२) महात्मा ज्योतिबा फुले

३) संत कबीर ✅✅

४) यापैकी नाही


🔹 परश्र ९ :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातरांची घोषणा कधी केली ?


१) १४ ऑक्टोबर १९३५

२) १३ ऑक्टोबर १९५५

३) १४ ऑक्टोबर १९५५

४) १३ ऑक्टोबर १९३५ ✅✅


🔹 परश्न १० :-  जगाच्या शिल्पकारामधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कितवा क्रमांक लागतो ?


१) पहिला

२) दुसरा

३) तिसरा

४) चौथा ✅✅


भारतीय संविधान निर्मितीच्या संविधान सभेत 15 महिलांचा समावेश होता.


1) अँनी मास्करेन

2) बेगम अझिझ रसुल

3) दक्षयानी वेलायुथ

4) दुर्गाबाई देशमुख (मद्रास़)

5) हंसाबेन मेहता

6) पुर्णिमा बँनर्जी

7) रेणुका रे

8) विजयालक्ष्मी पंडीत (सं. प्रांत)

9) सरोजिनी नायडु (बिहाऱ)

10) सुचेता क्रुपलानी

11) कमला चौधरी

12) लीला रे 

13) मालती चौधरी

14) राजकुमारी अम्रुत कौर (मध्य प्रांत)

15) अम्मु स्वामीनाथन 


“डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या”


🔸 डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते. 


🔸 २९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.


🔸 पढील १० समित्यांचे ते सदस्य होते - 


१) ध्वज समिती

२) मुलभूत हक्क उपसमिती

३) अल्पसंख्यांक उपसमिती

४) संघ राज्य घटना समिती

५) घटना सुधारणा उपसमिती

६) नागरिकत्व तदर्थ समिती

७) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती

८) सल्लागार समिती

९) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या       समस्येवरील उपसमिती

१०) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)


🔸 जलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता. 


🔸 दशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.


🔸 मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.

भारताचे संविधान प्रश्नसंच

भारताचे संविधान

भारताचे संविधान
भारतातील सर्वोच्च कायदा

भारताचे संविधान (भारताची राज्यघटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा (legal basis) आहे. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहेत.

भारताचे संविधान
Constitution of India.
भारतीय संविधानाची उद्देशिका
मूळ शीर्षक
भारतीय संविधान
न्यायक्षेत्र
भारत
स्वीकारल्याचा दिनांक
२६ नोव्हेंबर १९४९
अंमलबजावणीचा दिनांक
२६ जानेवारी १९५०
शासनप्रणाली
संघीय, संसदीय, घटनात्मक प्रजासत्ताक
शाखा
तीन (कार्यकारी, विधिमंडळ आणि न्यायपालिका)
वैधानिक संस्था
दोन (राज्यसभा आणि लोकसभा)
कार्यकारी
पंतप्रधान - कनिष्ठ सभागृह संसदेचे जबाबदार नेतृत्व करणारे मंत्रीमंडळ
न्यायपालिका
सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालये आणि जिल्हा न्यायालये
संघराज्य
संघराज्य
निवडणूक गण
होय, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी
अंतर्भूत कलम

एकूण घटनादुरुस्त्या
१०५
शेवटची घटनादुरूस्ती
१५ ऑगस्ट २०२१ (१०५ वी)
दस्तऐवज जतन स्थान
संसद भवन, नवी दिल्ली, भारत
स्वाक्षरीकर्ते
‌ संविधानसभेचे २८४ सदस्य
पुनर्स्थित करा
भारत सरकारचा कायदा १९३५
भारतीय स्वातंत्र्य कायदा १९४७

१९५७ पर्यंतचे भारताचे संविधान (हिंदी)

बाबासाहेब आंबेडकर आणि २०१५ च्या भारतीय टपाल तिकिटावर भारतीय संविधान

घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्यघटनेची प्रत संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना सूपूर्द करतांना, २६ नोव्हेंबर १९४९
देशाच्या कारभारासंबंधी च्या तरतुदीत एकत्रितपणे व सुसूत्रपणे संविधानामध्ये नमूद केलेल्या आहेत संविधान हे देशाच्या राज्यकारभारात संबंधीच्या तरतुदींचा लिखित असा दस्तऐवज आहे जनतेतून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी मधून शासन किंवा सरकार हे स्थापन केले जाते संविधानातील तरतुदीनुसार राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन आहे संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेल्या कायद्यानुसार शासन चालवले जाते संविधानाला विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत तसे केल्यास न्याय मंडळ हे कायदे रद्द करू शकते.

इतिहास संपादन करा
मुख्य लेख: भारताची संविधान सभा

भारतीय संविधानाच्या मसूदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीच्या इतर सदस्यांसमवेत. (बसलेल्यां पैकी डावीकडून) एन. माधवराव, सय्यद सदुल्ला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर (अध्यक्ष), अल्लादी कृष्णास्वामी अय्यर, सर बेनेगल नरसिंह राव. (उभे असलेल्यांपैकी डावीकडून) एस.एन. मुखर्जी, जुगल किशोर खन्ना व केवल कृष्णन् (२९ जानेवारी, इ.स. १९४७
१९५० साली अंमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५ च्या भारत सरकार कायद्यावर आधारित आहे. १९३५ सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६ च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली तर फ्रॅंक अँथनी यांच्या उपाध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहात झाली. ११ डिसेंबर रोजी सर्व सदस्यांच्या सहमतीने डॉ. राजेंद्रप्रसाद यांची अध्यक्षस्थानी तर आशुतोष मुखर्जी यांची उपाध्यक्ष स्थानी निवड करण्यात आली. हे सभागृह आज सेंट्रल हॉल या नावाने परिचित आहे. पहिल्या बैठकीला ९ महिलांसह एकूण २११ सदस्य उपस्थित होते. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी या रूपात काम केले होते.

२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापन झाली. मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती होते. हिचे काम संविधान निर्मिती करणे हे होते. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला. त्यामुळे भारतात २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.[१] नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो.

भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे 1 ते 51पर्यंत

भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे Important Constitutional Articles

संविधानात्मक महत्वाची कलमे Important Articles

लोकशाही प्रशासन असणाऱ्या राष्ट्रांमध्ये लोकांच्या हाती सत्ता एकवटलेली  असते.  लोकशाही प्रशासनामध्ये लोक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. 

अशा लोकांना आपले हक्क व अधिकार माहित असणे गरजेचे असते.  आणि असे हक्क-अधिकार लोकशाही राष्ट्राच्या संविधाना कडून मिळत असतात.  संविधानामध्ये हे अधिकार स्पष्ट करणारी महत्त्वाची कलमे असतात. 

 भारतीय संघराज्याने सुद्धा लोकशाही प्रशासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. म्हणून आपल्या देशात लोकांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. 

भारतीय संघराज्यातील प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे.

अशा प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेले हक्क आणि अधिकार विषयक  संविधानात्मक महत्वाची कलमे  या ठिकाणी पाहणार आहोत.

कलम 1 – संघराज्य या राज्यांचा संघ असेल असे म्हटले आहे 

कलम 2 – मध्ये भारतीय संघात योग्य वाटतील त्या अटी आणि शर्ती वर नवीन राज्यांना समाविष्ट करणे हा अधिकार कलम 2 ने संसदेला दिला 

कलम 3 – मध्ये नवीन राज्याची निर्मिती व विद्यमान राज्याच्या क्षेत्रात सिमात किंवा नावात बदल 

कलम 4 – परिशिष्ट 1 व परिशिष्ट 4 ची दुरुस्ती आणि पूरक अनुषंगिक आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या त्यासंबंधी कलम 2 व कलम 3 अंतर्गत करण्यात आलेले कायदे

राज्यघटनेतील भाग दोन मध्ये कलम 5 ते कलम 11 पर्यंतच्या तरतुदी नागरिकत्वाशी संबंधित आहेत.

कलम 5 – राज्य घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व 

कलम 6 – पाकिस्तान मधून भारतात स्थलांतरित झालेल्या विवाहित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क 

कलम 7 – पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क 

कलम 8 – मूळ भारतीय असणाऱ्या पण भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचे नागरिकत्वाचे हक्क 

कलम 9 – परकीय देशाचे नागरिकत्व स्वेच्छेने संपादन करणाऱ्या व्यक्ती भारताच्या नागरिक नसणे 

कलम 10 – नागरिकत्वाचे हक्क चालू राहणे 

कलम 11 – कायद्याद्वारे संसद नागरिकत्वाच्या याचे नियमन करेल.

भारतीय राज्यघटनेच्या भाग-3 मधील तरतुदी मूलभूत हक्काचे संबंधित असून अमेरिकेच्या घटनेवरून या स्वीकारण्यात आलेल्या आहेत. कलम 12 ते 35 या कलमांचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये होतो.

*समानतेचा हक्क कलम 14 ते 18 

*स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22 

*शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24 

*धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28 

*सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क कलम 29 30 

*घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम 32

कलम 31 – (निरसित)

कलम 33 – सैन्य दलासाठी मूलभूत फक्त संसदेला अधिकार 

कलम 34 – लष्करी कायदा लागू मूलभूत हक्कावर मर्यादा 

कलम 35 – मूलभूत कशासाठी तरतुदी लागू करण्याचा कायदा

भारतीय राज्यघटनेच्या भाग-4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे देण्यात आलेली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे कलम 36 ते 51 पर्यंत आहेत.

कलम 36 – राज्याची व्याख्या

कलम 37 – निर्देशक तत्वाचे उपयोजन

कलम 38 – लोककल्याणाच्या संवर्धनासाठी राज्याने समाजव्यवस्था प्रस्थापित करणे

कलम 39 – राज्याने अनुसरा वयाच्या धोरणाची विवक्षित तत्वे

कलम 39 a – समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य

कलम 40 – ग्रामपंचायतीचे संघटन

कलम 41 – कामाचा शिक्षणाचा आणि युवक शेत बाबतीत लोक सहाय्याचा यांची तरतुदी

कलम 42 – कामाच्या ठिकाणी न्याय व मानवीय परिस्थिती आणि प्रसुती विषयक सहाय्य याची तरतूद

कलम 43 – कामगारांना निर्वाह वेतन इत्यादी

कलम 43 A – औद्योगिक व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग

कलम 43 B – सहकार संस्थांचे प्रवर्तन

कलम 44 -नागरिकांसाठी समान नागरी संहिता 

कलम 45 – 6 वर्षाखालील बालकांची प्रारंभिक बाल्य अवस्थेतील देखभाल व शिक्षणाची तरतूद 

कलम 46 – अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटकांचे शैक्षणिक आणि आर्थिक हित संवर्धन 

कलम 47 – पोषणाचा व जीवनमानाचा स्तर उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्यांचे कर्तव्य 

कलम 48 – कृषी आणि पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था करणे 

कलम 48 A – पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व जीवसृष्टी यांचे रक्षण करणे 

कलम 49 – राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाची स्मारके ठिकाने वास्तू यांचे संरक्षण 

कलम 50 – कार्यकारी यंत्रणेने पासून न्याय यंत्रणेची फारकत

कलम 51 – आंतरराष्ट्रिय शांतता आणि सुरक्षा यांचे संवर्धन.