२१ नोव्हेंबर २०२२

विज्ञान : विद्युत चुंबकचे नियम व गुणधर्म


1⃣ जडत्व :

▪ जेव्हा एखाद्या स्थिर अवस्थेतील वस्तूवर कोणतेही बाह्यबल प्रयुक्त नसेल तर ती वस्तु स्थिर अवस्थेतच राहते. तसेच गतिमान वस्तु आहे त्याच वेगाने सतत गतिमान राहते.

▪ वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व होय.

2⃣ संतुलित बल :

▪ संतुलित बलामुळे वस्तूची स्थिर अवस्था किंवा गतिमान अवस्था यात बदल घडून येत नाही.

▪ दोन्ही बले संतुलित असतात त्यामुळे वस्तु स्थिर अवस्थेत राहते.

3⃣ असंतुलित बल :

▪ जो पर्यंत वस्तूवर असंतुलित बल प्रयुक्त असते, तोपर्यंत तिचा वेग सतत बदलतो.

▪ वस्तूच्या गतीला त्वरणित करण्यासाठी असंतुलित बल आवश्यक असते.

4⃣ बल :

▪ बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो.

▪ बलामुळे आपण वस्तूला आपण गतिमान करू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू शकतो.

▪ बल ही दोन वस्तूंमधील आंतरक्रिया आहे.

▪ वास्तविक बल दृश्यस्वरूपात नसते पण बलाचे परिणाम आपण पाहू शकतो.

▪ स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तु थांबवण्यासाठी बल आवश्यक असते.

बीटा आणि अल्फा किरण


🔰बीटा किरण🔰

⏩ऋण प्रभारीत कण असतात

⏩बीटा म्हणजेच इलेक्ट्रॉन होय

🔘प्रभार इलेक्ट्रॉन इतका असतो

✍प्रकाशाच्या 99 % वेग असतो

🔘आयनन शक्ती अल्फा पेक्षा कमी व गॅमा किरण पेक्षा 100 पट असते

👉भेदन शक्ती अल्फा पेक्षा जास्त तर गॅमा पेक्षा कमी असते

⏺विद्युत व चुंबकीय क्षेत्र ची दिशा बदलतात

✍नवीन अणुमध्ये अनुअंक 2 ने वाढलेला असतो

🎯अल्फा किरण🎯

🔘धन प्रभारीत व हेलियम अणू असतात

🔘वेग हा प्रकाशाच्या 10% असतो

🔘आयनन शक्ती खूप असते.गॅमा किरणांच्या 10,000 पटं असते

✍भेदन शक्ती मात्र सर्वात कमी असते.गॅमा किरणांच्या 1000 पट कमी असते

✍विद्युत व चुंबकीय क्षेत्र ची दिशा बदलतात

👉अनुअंक 2 ने व अनुवस्तुमानक 4 ने कमी होतो

विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान) आणि आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती

१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर -- नायट्रोजन..

                        आणि

           

🔰 आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती.. 🔰

🔶 मानवी डोक्याचे वजन ?
→   १४०० ग्रॅम.
 
🔶 सामान्य रक्तदाब ?
→   १२०/८० मि. मी. पा-याची उंची.

🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?
→   न्यूरॉन.

🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?
→   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
→   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.

🔶 शरिरातील एकूण रक्त ?
→   ५ ते ६ लीटर.
 
🔶 सर्वात लहान हाड ?
→   स्टेटस ( कानाचे हाड )

🔶 सर्वात मोठे हाड ?
→   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )

🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→   १२० दिवस.

🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ?
→   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.

🔶 पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→   २ ते ५ दिवस.

🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?
→   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.

🔶 हिमोग्लोबिनचे प्रमाण ?
→   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
→   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.

🔶 ह्रदयाचे सामान्य ठोके ?
→   ७२ ते ७५ प्रति मिनिट.

🔶 नाडी दर (पल्स रेट) ?
→   ७२ प्रतिमिनिट.

🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?
→   थायरॉईड ग्रंथी.

🔶 सर्वात मोठा स्नायू ?
→   ग्लुटियस म्याक्सीमस.

🔶 एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?
→   ६३९.

🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?
→   मोनोसाईटस - ३ ते ८%.
→   बेसोफिल्स - ०.५%.
→   लिम्फोसाईटस - २० ते २५%.
→   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.

🔶 शरीराचे तापमान ?
→   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.

🔶 प्रौढांमधील दातांची संख्या ?
→   ३२.

🔶 लहान मुलांमधील दातांची संख्या ?
→   २० दूधाचे दात.

🔶 सर्वात पातळ त्वचा ?
→   पापणी (कंजक्टायव्हा

न्यूटनचे गतीचे नियम

♦️भौतिकशास्त्रामधे न्यूटनचे गतीचे तीन नियम हे अभिजात यांत्रिकीचे मूलभूत नियम आहेत.

♦️हे नियम वस्तू आणि त्या वस्तूवर कार्य करत असणारी बले आणि या बलांमुळे वस्तूची होणारी हालचाल यातील संबंधांचे वर्णन करतात.

हे नियम खालीलप्रमाणे आहेत.

पहिला नियम

♦️: जडत्वीय संदर्भचौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू , जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल, तर स्थिर राहाते किंवा स्थिर गतीने पहिला नियम करत राहाते.

दुसरा नियम: 

बल = वस्तुमान x त्वरण. वस्तूवर कार्य करत असणाऱ्या बलांची सदिश बेरीज ही त्या वस्तूचे वस्तुमान आणि तिचे त्वरण यांच्या गुणाकाराइतकी असते.

तिसरा नियम:

जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते, त्याच वेळी, दुसरी वस्तूदेखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते.

महत्त्वाचे

न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्ताच्या अणि या नियमांच्या साहाय्याने न्यूटनने केपलरचे ग्रहांच्या गतीचे नियम सिद्ध केले.

यामुळे न्यूटनचे नियम फक्त पृथ्वीपुरते मर्यादित नसून सार्वत्रिक आहेत हे स्पष्ट झाले.

तत्त्वतः न्यूटनचे नियम हे फक्त जडत्वीय संदर्भचौकटीतच वैध आहेत.

तसेच ज्या वस्तूवर हे नियम वापरले जातात ती वस्तू बिंदुस्वरूप आहे असे गृहीत धरले जाते.

पृथ्वीचे स्वतः भोवती व सूर्याभोवती परिभ्रमण करण्याचे परिणाम सूक्ष्म असल्याने पृथ्वीला जडत्वीय संदर्भचौकट मानून हे नियम रोजच्या जीवनात वापरता येतात.

मराठी व्याकरण प्रश्न

🟣 मराठी व्याकरण प्रश्न 🟣

1) माझ्याकडून कॉफी घेतली गेली, प्रयोग ओळखा.

   1) कर्मणी प्रयोग      2) भावे प्रयोग   
   3) कर्तरी प्रयोग      4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 1

2) स, ला, ते-स, ला, ना, ते, हे कोणत्या दोन विभक्तींचे प्रकार आहेत ?

   1) प्रथमा व व्दितीया    2) व्दितीया व चतुर्थी 
   3) व्दितीया व तृतीया    4) व्दितीया व सप्तमी

उत्तर :- 2

3) ‘गुलाबाची फुले वेगवेगळया रंगाची असतात’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

   1) केवल वाक्य      2) संयुक्त वाक्य   
   3) मिश्र वाक्य      4) प्रश्नार्थी वाक्य

उत्तर :- 1

4) ‘अशा प्रकारचे अनेक विचार आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणा-याच्या मनात येतील’ या वाक्यातील
     ‘विधेयविस्तार’ ओळखा.

   1) विचार    2) अशा प्रकारचे अनेक
   3) येतील    4) आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणा-याच्या मनात

उत्तर :- 4

5) ‘पुस्तक’ हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात?

   1) नपुंसकलिंग      2) पुल्लिंग   
   3) स्त्रीलिंगी      4) पुल्लिंग व स्त्रीलिंग

उत्तर :- 1


1) माझ्याकडून कॉफी घेतली गेली, प्रयोग ओळखा.

   1) कर्मणी प्रयोग      2) भावे प्रयोग   
   3) कर्तरी प्रयोग      4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 1

2) स, ला, ते-स, ला, ना, ते, हे कोणत्या दोन विभक्तींचे प्रकार आहेत ?

   1) प्रथमा व व्दितीया    2) व्दितीया व चतुर्थी 
   3) व्दितीया व तृतीया    4) व्दितीया व सप्तमी

उत्तर :- 2

3) ‘गुलाबाची फुले वेगवेगळया रंगाची असतात’ ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे ?

   1) केवल वाक्य      2) संयुक्त वाक्य   
   3) मिश्र वाक्य      4) प्रश्नार्थी वाक्य

उत्तर :- 1

4) ‘अशा प्रकारचे अनेक विचार आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणा-याच्या मनात येतील’ या वाक्यातील
     ‘विधेयविस्तार’ ओळखा.

   1) विचार    2) अशा प्रकारचे अनेक
   3) येतील    4) आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणा-याच्या मनात

उत्तर :- 4

5) ‘पुस्तक’ हा शब्द मराठीत कोणत्या लिंगात वापरतात?

   1) नपुंसकलिंग      2) पुल्लिंग   
   3) स्त्रीलिंगी      4) पुल्लिंग व स्त्रीलिंग

उत्तर :- 1.

भारताची राज्यघटना कशी तयार करण्यात आली?

भारताची राज्यघटना कशी तयार करण्यात आली?

प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी जवाहरलाल नेहरू यांना स्वतंत्र भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ दिली, तो 30 जानेवारी 1950चा क्षण.

प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी जवाहरलाल नेहरू यांना स्वतंत्र भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ दिली, तो 30 जानेवारी 1950चा क्षण.

भारत 15 ऑगस्ट 1947ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि 26 जानेवारी 1950 आपली राज्यघटना अंमलात आली. म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक झाला.

याच राज्यघटनेनुसार आजही आपलं सरकार, आपली राज्यव्यवस्था आणि एकूणच राज्यकारभार चालतो.

मग प्रश्न पडतो की 15 ऑगस्ट 1947 पासून 26 जानेवारी 1950 पर्यंत देश कसा चालत होता? तब्बल दोन वर्षं, 5 महिने आणि 11 दिवस भारताची काय परिस्थिती होती?

आपल्यापैकी बहुतांश लोकांचा तर त्या काळी जन्मही झाला नव्हता. मग चला तर पाहूया की त्या दिवसांमध्ये काय काय घडलं होतं. या अशा घटना होत्या ज्यांचा आजही आपल्या जीवनावर परिणाम होतोय.

स्वातंत्र्य मिळालं, पण?

देश स्वतंत्र झाला असला, तरी देश चालवण्यासाठी घटना अजून तयार नव्हती. 9 डिसेंबर 1946 पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या होत्या. 141 दिवसांच्या परिश्रमानंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला. तो दिवस होता 3 नोव्हेंबर 1947. पण हा काही अंतिम मसुदा नव्हता.

प्रजासत्ताक दिनाचं पहिल्यांदा संचलन कधी झालं होतं? वाचा अशा 13 प्रश्नांची उत्तरं
भारताचा राष्ट्रध्वज कसा जन्माला आला?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पुढच्या अडीच वर्षांत घटना समितीची एकूण 12 सत्रं पार पडली. घटनेतील प्रत्येक शब्द तोलून-मापून आणि सर्व विचाराअंती लिहिण्यात आला.

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली, म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

आणि 26 जानेवारी 1950ला ती देशात अंमलात आणली गेली, तेव्हापासून आपण आजपर्यंत आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखले जातो.

ज्या देशात घटनात्मक प्रमुखाची नियुक्ती निवडणुकीत होते, तो देश प्रजासत्ताक असतो.

जो देश स्वतःच स्वतःला चालवतो आणि बाहेरच्या शक्तींवर अवलंबून नसतो, त्याला सार्वभौम म्हणतात.

ब्रिटनमध्ये लोकशाही आहे, पण ते प्रजासत्ताक नाही, कारण त्या देशाची घटनात्मक प्रमुख ही राणी आहे.

राष्ट्रपती आणि पंतप्रधान

15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री दिलेल्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की "नियतीशी आम्ही करार केला होता. त्या करारानुसारच आजची स्वातंत्र्याची पहाट आम्हाला पाहायला मिळाली आहे."

डॉ. राजेंद्र प्रसाद प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करताना

डॉ. राजेंद्र प्रसाद प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करताना

ब्रिटिशांनी जाता-जाता सर्वपक्षीय सरकारकडे सत्ता सुपूर्द केली होती. काँग्रेसचे पंडित नेहरू हे या सरकारचे नेते होते, पण त्यांच्या कॅबिनेटमध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे, पक्षांचे आणि सामाजिक पार्श्वभूमीचे नेते होते.

त्यांच्या समन्वयाने देशाचा कारभार पहिले साधारण अडीच वर्ष चालला. नंतर अर्थातच 1951 साली पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले आणि विविध पक्षांमधले मतभेद, त्यांच्यातला विरोध स्पष्ट झाला.

इंग्रज गेले तरी भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून इथेच थांबले. जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान बनले.

भारतरत्न : नानाजी देशमुख, प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिकांना निवडणुकीवर डोळा ठेवून पुरस्कार?
नानाजी देशमुख आता भारतरत्न: चित्रकूट प्रकल्पाचे निर्माते कोण होते?

नंतर 21 जानेवारी 1948 रोजी सी. राजगोपालचारी म्हणजेच राजाजी हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.

पण 1950मध्ये राज्यघटना तयार झाल्यावर गव्हर्नर जनरल हे पदच रद्द करण्यात आलं आणि त्यानंतर राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतील, असं जाहीर करण्यात आलं. डॉ. राजेंद्र प्रसाद यांची देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली.

संस्थानांचं विलिनीकरण

पण त्याचबरोबर दरम्यान आणखी एक आव्हान होतं. पाकिस्तानमधून येणाऱ्या निर्वासितांचं पुनर्वसन करणं जवळजवळ साडेपाचशे स्वायत्त संस्थानांना भारतात सामील करून घेणं. यापैकी बहुतेक सर्व संस्थानांनी भारतात विलीन होण्याची तयारी दाखवली, पण हैदराबाद, जुनागढ आणि काश्मीरनं नकार दिला.

देशात त्यावेळी 500हून अधिक संस्थांना भारतात सामील करून घेण्याचं काम सरदार पटेलांना केलं.

देशात त्यावेळी 500हून अधिक संस्थांना भारतात सामील करून घेण्याचं काम सरदार पटेलांना केलं.

तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांनंतर तिन्ही संस्थानं भारतात विलीन करून घेण्यात आली. हैदराबादच्या स्वातंत्र्यासाठी तर भारताला लष्कर पाठवावं लागलं होतं हा ज्ञात इतिहास आहे.

आर्थिक सुधारणा

तत्कालीन आर्थिक परिस्थिती देखील बिकट होती. इतिहासकार बिपन चंद्रा त्यांच्या 'इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स'मध्ये सांगतात की इंग्रजांच्या 200 वर्षांच्या कारभारात भारताची अर्थव्यवस्था विदारक झाली होती.

देशांत गरिबी होती, निरक्षरता होती, शेती अत्यंत वाईट परिस्थितीत होती. हे सर्वकाही सुस्थितीत आणण्याचं आव्हान स्वतंत्र भारताच्या शासकांपुढे होतं.

उदाहरणार्थ, 1938-39 साली फक्त 11 टक्के शेतजमिनीवर चांगली बियाणं वापरात होती. स्वातंत्र्याच्या वेळी देशाच्या अर्थव्यवस्थेत एकूण कारखान्यांमधल्या उत्पादनांचं योगदान फक्त 7.5 टक्के होतं. आणि

देशातली जवळजवळ 90% यंत्रं आयात केलेली होती, असं बिपन चंद्र त्यांच्या पुस्तकात नमूद करतात.

1947मध्ये आर्थिक कार्यक्रम समिती स्थापित करण्यात आली होती. पंडित नेहरू त्या समितीचे अध्यक्ष होते.

भारताच्या आर्थिक प्रगतीची दिशा काय असावी, याचं धोरण या समितीनं ठरवलं होतं.

भारतातील उद्योगधंद्यांपैकी 75% उद्योग हे भारतीयांच्या मालकीचे होते.

स्वतंत्र होण्याआधीपासूनच भारतीय उद्योजक युरोपियन व्यापाऱ्यांच्या स्पर्धेत होते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर बिर्ला, टाटा, सिंघानिया, दालमिया, जैन यांचे उद्योग अधिक बळकट झाले आणि भारताच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा उचलला.

मार्च 1950 मध्ये नियोजन समितीची (Planning Commission) स्थापना झाली.

1951ला पंचवार्षिक योजना सुरू झाली. त्याची पायाभरणी 1947 ते 1950 या काळात झाली असं आपण म्हणू शकतो.

भारतीय संविधानाची निर्मिती
भारतात अनेक जाती आणि धर्माचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे, वर्गाचे लोक एकत्र राहतात.

भारतीय लोकशाहीमुळेच वेगवेगळ्या गटांना संसदेत प्रतिनिधित्व मिळालं आहे. भारतीय लोकशाही बळकट करण्याचं श्रेय हे भारतीय स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेची निर्मितीच्या प्रक्रियेलाच द्यावं लागेल. भारतीय संविधान हे अनेक लोकांच्या परिश्रमातून, अभ्यासातून, आणि संशोधनातून निर्माण झालं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे म्हणजेच घटनेच्या मसुदा समितीचे प्रमुख होते. भारतीय संविधानाचं स्वरूप कसं असावं, त्याची चौकट त्यांनी आखली, विविध विषयांवरील तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती, त्यांच्या सूचना ध्यानात घेऊन त्या राज्यघटनेत कशा येतील याचा विचार बाबासाहेबांनी केला. राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांनी जो मोठा वाटा उचलला आहे त्यामुळे त्यांना राज्यघटनेचा शिल्पकार म्हटलं जातं.

डॉ. आंबेडकर

  9 डिसेंबर 1946 रोजी भारताची घटना समिती पहिल्यांदा एकत्र आली आणि त्यांनी भविष्यातल्या भारताची दिशा ठरवली.

डॉ. आंबेडकरांची घटनेच्या मसुदा समितीवर नियुक्ती 28 ऑगस्ट 1947 रोजी झाली. 141 दिवसांच्या परिश्रमानंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला. तो दिवस होता 3 नोव्हेंबर 1947.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुढील अडीच वर्षांत संसदेत घटना समितीची एकूण 12 सत्रं पार पडली. घटनेतील प्रत्येक शब्द तोलून मापून आणि पूर्ण विचारांती लिहिण्यात आला.

9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या सदस्यांची पहिली बैठक झाली होती. त्यानंतर 2 वर्षं, 11 महिने आणि 18 दिवसांच्या परिश्रमानंतर 26 नोव्हेंबर रोजी राज्य घटनेचा मसुदा तयार झाला.

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 ला ती अंमलात आणली गेली. तेव्हापासून आजपर्यंत आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखले जातो.

चलेजाव चळवळ १९४२

नुकतेच ७५ वर्ष पुर्ण

(संकल्प से सिध्दी - घोषणा)

२अधिवेशने-
१-वर्धा -प्रस्ताव संमत
२-गवालिया टँक,मुंबई-सुरु

◾️ठराव मंजुर-८ अॉगस्ट १९४२

◾️कारण-
क्रिप्स वाटाघाडी फिस्कटल्या
जपाण आक्रमण
महागाईचा भडका
महायुध्द

◾️घोषणा-
चले जाव (युसुफ मेहेरअली)
करा अथवा मरा(गांधी)

◾️अटक-(अॉपरेशन झिरो अवर)
गांधी-आगाखाण पॕलेस,पुणे
नेहरु-अल्मोडा
जयप्रकाश नारायण-हजारीबाग कारागृह

◾️असहभागी घटक-
मुस्लीम लीग,
हिंदु महासभा
लिबरल पार्टी
भारतीय कम्युनीस्ट पक्ष

◾️पत्रीसरकार-
महाराष्ट्र - सातारा
उत्तर प्रदेश -बलिया (भारतातील पहिले )
बंगाल -मिदनापुर /तामलुक-(गांधी बुढी-मतंगिणी हाजरा)
बिहार -पुर्णिया

◾️गव्हर्नर -लाॕर्ड लिनलिथगो
INC चे अध्यक्ष-मौलाना आझाद

◾️९ अॉगस्टला गवालिया टॕंक वर झेंडा फडकवणारी महिला-अरुणा असफ अली.

राष्ट्रपती संबंधित कलमे

🟡 राष्ट्रपती संबंधित कलमे 🟡

🔶 52:-भारताचा राष्ट्रपती

🔶 53:-संघराज्य चे कार्यकारी अधिकार

🔶 54:-राष्ट्रपती निवडणूक

🔶 55:-निवडणूक पद्धत

🔶 56:-राष्ट्रपती कार्यकाळ

🔶 57:-पुनर्निवडी साठी पात्रता

🔶 58:-राष्ट्रपती बाबत पात्रता

🔶 59:-पदाच्या अटी

🔶 60:-राष्ट्रपती शपथ

🔶 61:-महाभियोग प्रक्रिया

🔶 62:-निवडणूक घेण्याचा कालावधी

🔶 71:-निवडणूक संबंधित बाबी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

पोलीस भरती - प्रश्नसंच विषय - गणित

१) २७० नंतर पुढील येणाऱ्या १० व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती ?

अ. १५  

ब. १७

क. १९

ड. २१


२) पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ?

अ. ०:२२५  

ब. २२.५

क. ६.२५

ड. ६२.५  


३) १४.३१, १६.४, १३.१३, १२.२४ या संख्येचे मध्यमान किती येईल ?

अ. ४१ वर्ष  

ब. ३३ वर्ष  

क. १२५ वर्ष  

ड. ४५ वर्ष


४) रमेश जवळ ३२ रुपये आहेत. हरिषजवळ रघूच्या चौपट व रमेशपेक्षा ४ रुपये कमी आहेत तर तिघांजवळ मिळून किती रुपये आहेत ?

अ. ६६

ब. ६७

क. ६९

ड. ६८    


५) सहा संख्याची सरासरी ६४.५ आहे. सातवी संख्या ९६ असल्यास सर्व संख्याची सरासरी किती ?

अ. ६६.५

ब. ६८

क. ६८.५

ड. ६९


६) बस भाडे शेकडा २० ने वाढविला. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा १० ने वाढविला. तर मुळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ?

अ. ३५ टक्के  

ब. ३० टक्के  

क. ३१ टक्के  

ड. ३२ टक्के


७) एका परीक्षेमध्ये ७०० पैकी ४५५ विध्यार्थी नापास झाले. तर किती टक्के विध्यार्थी पास झाले ?

अ. ३५

ब. ४०

क. ६५

ड. ६०


८) संख्येचे १५ टक्के ३० आहे, तर त्या संख्येची तिप्पट किती ?

अ. २००

ब. २५०

क. ४००

ड. ६००


९)  दर ५ वर्षांनी दुप्पट होणाऱ्या योजनेत अ गुंतवणूक करतो जर त्याने सन १९९०, १९९५ व २००० मध्ये रु. ५००० गुंतवणूक केली तर त्याला २००५ साली किती रक्कम मिळेल ?

अ. रु. ४००००  

ब. रु. ६००००

क. रु. ९००००

ड. रु. ७००००


१०) मगनसेठने ३० रु. दराने १८ खेळणी आणली. ती सर्व खेळणी त्यांनी ५६० रुपयांस विकली. तर या व्यवहारात किती नफा झाला ?

अ. ३०

ब. ४०

क. २०

ड. ५०


----------------------------------------------------  


उत्तरे : १)  ब  २) क  ३) ब  ४) ब  ५) ड  ६) ड  ७) अ  ८) ड  ९) ड  १०) क


----------------------------------------------------

समाजसुधारक :- स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले

स्रियांच्या पायातील गुलामीच्या बेड्या तोडून स्रियांना चूल आणि मुलाच्या पलीकडचे जीवन दाखवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी. म्हणून जाणून घेऊयात त्यांच्या जीवनाचा प्रवास.

सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 साली त्यांचा जन्म झाला. आई सत्यवती तर वडील खंडोजी नेवसे पाटील हे गावचे पाटील होते. सावित्रीबाईंचे लग्नाच्या वेळी अवघे 9 वर्ष वय तर ज्योतिरावांचे वय 13 होते.

ज्योतिराव मूळचे फुरसुंगीचे. परंतु पेशव्यांनी बक्षीस म्हणून त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन दिली. त्यानंतर ज्योतिरावांच्या वडिलांनी बागेतील फुलाचा व्यवसाय करून त्यांना 'फुले' आडनाव मिळाले.

जातिव्यवस्थेच्या विरोधात जाऊन त्यांनी फुले दाम्पत्यांनी 1 जानेवारी 1848 साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. सावित्रीबाईंनी विवाहानंतर शिक्षण घेतले आणि आधी शिक्षक आणि नंतर मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले.

त्यांचे शिक्षण कार्य पाहून 1852 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला. शिक्षण प्रसार सुरु असताना सनातन्यांनी धर्म बुडाला..जग बुडणार... असा कांगावा करत उच्च वर्णीयांनी त्यांना प्रचंड विरोध केला, त्यांच्या अंगावर शेणही फेकण्यात आले परंतु त्या डगमगल्या नाहीत.

1854 साली त्यांचा ‘काव्यफुले’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. ‘काव्यफुले’ हे नाव अतिशय समर्पक आहे. या नावात गुंफलेला ‘फुले’ हा शब्द एकाचवेळी दोन गोष्टी स्पष्ट करतो.

शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार सुरु असताना त्यांनी पाहिले की लहानपणीच लग्न झालेल्या मुलींना पतीच्या निधनानंतर सती जावे लागे. या जुन्या रूढी परंपरा बंद करण्याचा विडा त्यांनी उचलला होता.

त्यांनी केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांना प्रबोधन करून त्यांचा संप घडविला होता. पुनर्विवाह कायदा होण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. पती महात्मा फुले (1890) यांच्या निधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाची धुरा संभाळली.

1896 च्या दुष्काळात पोटासाठी शरीराची विक्री करणाऱ्या स्रियांची त्यांनी धनदांडग्याच्या तावडीतून सुटका करून सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठवले. अठराव्या शतकात प्लेगच्या साथीने थैमान घातले. पुण्यातील प्लेगबाधितांना इंग्रजांनी एका माळावर दवाखाना सुरु करून उपचार चालू केले.

या दवाखान्यातील प्लेगबाधित रुग्णाची सेवा सावित्रीबाई फुले करू लागल्या, सेवा करत असतानाच त्यांना प्लेगची बाधा झाली आणि अशातच 10 मार्च 1897 साली त्यांचे निधन झाले.

धोंडो केशव कर्वे



जन्म - रत्नागिरी, 18 एप्रिल 1858.

मृत्यू - 9 नोव्हेंबर 1962.

1942 - बनारस विद्यापीठाची डि. लिटू.

1958 - भारतरत्न. जन्मशताब्दी वर्ष.


◽️ कर्वे यांना महर्षि ही पदवी जनतेने दिली.

◾️ सत्री शिक्षण हा यांच्या कार्याचा केंद्रबिंदू.

◽️ विधवविवाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला.


संस्थात्मक योगदान :


📌 1893 - विधवा विवाहोत्तेजक मंडळी.

📌 1 जानेवारी 1899 - अनाथ बालिका आश्रम.

📌 1907 - हिंगणे महिला विद्यालय.

📌 1910 - निष्काम कर्मकठ.

📌 1916 - महिला विद्यापीठ, पुणे.

📌 1916 - महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडल.

📌 1 जानेवारी 1944 - समता संघ.

📌 1945 - पुणे बलअध्यापक मंदिर, शिशुविहार.

📌 1948 - जातींनीर्मुलन संघ.

📌 1918 - पुणे - कन्याशाळा.

📌 1960 - सातारा - बलमनोहर मंदिर.


वैशिष्टे :


📌 मानवी समता - मासिक.

📌 1893 - विधवेशी पुनर्विवाह.

📌 1894 - पुनर्विवाहितांचा मेळावा.

📌 1915 च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष.

📌 1928 - आत्मवृत्त या नावाचे आत्मचरित्र.

जपानमधील महिला विद्यापीठाची माहिती देणार्‍या पुस्तकावरून पहिले महिला विद्यापीठ स्थापन.


🔳 'अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार' - आचार्य अत्रे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...