०७ नोव्हेंबर २०२२

संगणक या विषयावर सर्वात महत्वाचे प्रश्न


Q :  खालीलपैकी कोणाला कॉम्प्यूटरचा पीतामह म्हटले जाते?
(अ) हरमन गोलेरिथ
(ब) चार्ल्स बेबेज ✅✅
(क) बेल्स पास्कल
(ड) जोसेफ जॅकवर्ड

Q :  संगणकांच्या विकासात अधिकांश कोणाचे योगदान  मोलाचे आहे?
(अ) हरमन गोलेरिथ
(ब) चार्ल्स बेबेज
(क) सॅबल्स पास्कल
(ड) वाँन न्यूमन✔️✔️

Q :  सर्व प्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला? 
(अ) इ.स 1946 ✔️✔️
(ब) इ.स 1950
(क) इ.स1960
(ड) इ.स 1965

Q :  संगणकाच्या भौतिक (ज्या भागाला आपण स्पर्श करू शकतो) रचनेला काय म्हणतात?
(अ) सॉफ्टवेयर
(ब) हार्डवेयर ✔️✔️
(क) फर्मवेयर
(ड) वरील सर्व

Q :  संगणकाच्या ऑपरेशनमध्ये वापरल्या जाणार्‍या प्रोग्राम आणि संगणकाच्या कार्यांशी संबंधित इतर लिखित सामग्रीला म्हणतात
(अ) सॉफ्टवेअर✔️✔️
(ब) हार्डवेअर
(क) नेटवर्क
(ड) फर्मवेअर

Q : संगणकाला नियंत्रित करणाऱ्या भागाला काय म्हणतात?
(अ) प्रिंटर
(ब) की बोर्ड
(क) सीपीयू✔️✔️
(ड) हार्ड डिस्क

Q : खालीलपैकी कोणते हार्डवेयर डिवाइस आहे, ज्याला कॉम्पुटरचा मेंदू म्हटले जाते?
(अ) RAM
(ब) CPU✔️✔️
(क) ALU
(ड) ROM

Q : ___________ हा संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग आहे?
(अ) हार्ड डिस्क
(ब) CPU✔️✔️
(क) NIC
(ड) मदर बोर्ड

Q : संगणक हार्डवेअर जे मोठ्या प्रमाणात डेटा साठवू शकतो त्याला__________ म्हणतात?
(अ) हार्ड डिस्क✔️✔️
(ब) चिप
(क) व्हॅक्युम  ट्यूब
(ड) यापैकी  नाही

Q : खालीलपैकी कोणी पहिल्या डिजिटल संगणकाच्या ब्लू प्रिंटच्या विकासासाठी सर्वाधिक योगदान दिले?
(अ) हरमन गोलेरीथ
(ब) चार्ल्स बेबेज✔️✔️
(क) बेल्स पास्कल
(ड) विलियम बुरोस

विज्ञान आणि काही महत्वाचे प्रश्न


● व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?

उत्तर : बेरी-बेरी

● दुधामध्ये कोणत्या व्हिटॅमिनचा समावेश नसतो?

उत्तर : व्हिटॅमिन सी

● कोणत्या व्हिटॅमिनच्या कमीमुळे रक्तामध्ये गाठी जमा होत नाही?

उत्तर : व्हिटॅमिन के

● व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?

उत्तर : वंध्यत्व

● व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव काय आहे?

उत्तर  :  एस्कॉर्बिक अ‍ॅसिड

● मिठाचे रासायनिक नाव काय आहे?

उत्तर  : NaCl

● हसणार्‍या वायूचे रासायनिक नाव काय आहे?

उत्तर  :  नायट्रस ऑक्साईड ( एन 2 ओ )

● ब्रास कोणत्या दोन धातूंचे मिश्रण आहे?

उत्तर  :  तांबे आणि जस्त

वेगवेगळे आजार

💊 RBC ची कमतरता कारण...
👉 अॅनिमिना

💊 व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे...
👉रिकेट्स

💊 व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे....
👉स्कर्वी

💊 कॅल्शियम आणि पास्पोरसची कमतरता.  ..
👉रिकेट्स

💊पार्किन्सन हा आजार आहे....
👉मेंदू

💊बेरी बेरी रोगामुळे होतो...
👉मिळलेल्या तांदळाचा वापर

💊 व्हिटॅमिन बी 1 (थायामिन) च्या तलावामुळे...
👉बेरी बेरी

💊 मधुमेह म्हणजे स्राव कमी होणे....
👉इन्सुलिन

💊स्मृतीभ्रंश हा रोगाशी संबंधित आहे....
👉स्मरणशक्ती कमी होणे

💊मलेरिया हा आजार होतो.  ...
👉प्लीहा

💊स्नायूंचा आणि मज्जातंतूचा विकार हा सरोवरामुळे होतो....
👉व्हिटॅमिन ई

💊अ जीवनसत्वाचा तलाव यामुळे....
👉दृष्टी अंधत्व

💊 व्हिटॅमिन डी च्या तलावामुळे.  ...
👉रिकेट्स

💊 व्हिटॅमिन K च्या तलावामुळे....
👉 हिमोफिलिया

💊 व्हिटॅमिन ई च्या तलावामुळे....
👉 वंध्यत्व

💊रक्त तयार करण्यास सक्षम जीवनसत्व आहे....
👉 व्हिटॅमिन सी

💊 लिंबूवर्गीय फळ हे जीवनसत्वाचा समृद्ध स्रोत मानले जाते....
👉 व्हिटॅमिन सी

💊एकमात्र जीवनसत्व जे मानवी शरीरात साठवले जाऊ शकत नाही ते आहे....
👉 व्हिटॅमिन सी

💊 एकमात्र जीवनसत्व जे चरबीयुक्त नाही....
👉व्हिटॅमिन सी

💊 सामान्यतः मानवी मूत्रातून उत्सर्जित होणारे जीवनसत्व म्हणजे....
👉 व्हिटॅमिन सी
💊💊💊💊💊

मानवी शरीर प्राथमिक माहिती

1 मानवी डोके वजन: - 1400 ग्रॅम असते.


2 सामान्य रक्तदाब: - 120/80 मि. मी.


3 शरीरातील सर्वात मोठे स्नायू: - न्यूरॉन


4 रक्तामध्ये एकूण रक्त: - 5 ते 6 लिटर


5 सर्वात लहान हाड: - स्थिती (कान हाड)


6 सर्वात मोठी हाड: -फिमर / थाई बोन


7 लाल रक्तपेशींचे आयुष्यः - 120 दिवस.


8 पांढरे रक्त पेशी: 5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी


9. पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्यः - 2 ते 5 दिवस.


10 रक्तातील प्लेटलेटचे माउंटः -2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर


11. सामान्य हृदयगती: - 72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट


12. पल्स दर (नाडीचा दर): - 72 प्रति मिनिट.


13 सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: - थायरॉईड ग्रंथी.


14 सर्वात मोठे स्नायू - ग्लुटियस मायक्मीस


15 एकूण सेल प्रकारांची संख्या - 63 9


16 प्रौढांमध्ये दातांची संख्या - 32


17 मुलांमध्ये दातांची संख्या - 20 दात ते दुध.


18. सर्वात पातळ त्वचा - पापणी


लोकसभा सविस्तर माहिती , लोकसभेचा कार्यकाल, लोकसभेची रचना,लोकसभा सदस्यत्वासाठी पात्रता ,लोकसभा निवडणूक पद्धती, सभापतींची कार्ये आणि अधिकार :

लोकसभा माहिती

:लोकसभेच्या सभागृहात लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, म्हणून त्याला लोकसभा म्हणतात.लोकसभा हे संसदेचे प्रथम व कनिष्ठ सभागृह आहे.

इंग्लड आणि कॅनडाच्या कॉमन्स सभागृहाच्या धरतीवर भारतीय लोकसभेची निर्मिती केलेली आहे.

लोकसभा सविस्तर माहिती

लोकसभा माहिती :

लोकसभेचा कार्यकाल
लोकसभेचा कार्यकाल (कलम ८३(२) नुसार सर्वसाधारण स्थितीत पाच वर्षे असतो.पण कधीतरी आणीबाणीच्या काळात संसद कायदा करून हा कार्यकाल एकावेळी जास्तीत जास्त एक वर्षासाठी वाढवू शकते.आणीबाणीचा काळ संपल्यावर ६ महिन्यांच्या आत पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात.

लोकसभेची रचना
कलम ८१ नुसार लोकसभेची सदस्यसंख्या कमाल ५५० इतकी निश्चित करण्यात आली आहे. अँग्लो इंडियन समाजाचे २ प्रतिनिधी राष्ट्रपतींनी निवडल्यास ही सदस्य संख्या कमाल ५५२ इतकी होऊ शकते. यामध्ये घटक राज्यांचे ५३० व केंद्रशासित प्रदेशांचे २० सदस्य असतात.केंद्रशासित प्रदेशांचे १३ सदस्य व २ राष्ट्रपतीनियुक्त अँग्लोइंडियन सदस्य आहेत. कलम ३३१ नुसार अँग्लोइंडियन जमातीस पुरेसे प्रतिनिधित्त्व न मिळाल्यास राष्ट्रपती या जमातीतून दोन सदस्यांची नेमणूक करू शकतात.
१६ व्या लोकसभेतील स्थिती : ५४५ लोकसभा सदस्यांमध्ये, घटक राज्यांचे ५३० सदस्य असतात.

लोकसभा सदस्यत्वासाठी पात्रता

लोकसभा सदस्यत्वासाठी पात्रता (कलम ८४) नुसार :

१) लोकसभा सदस्यत्वासाठी उमेदवार भारताचा नागरिक असावा.
२) त्याचे वय किमान २५ वर्षे असावे. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटींची त्याने पूर्तता करावी.
३) राखीव क्षेत्रातील उमेदवार हा त्याच जाती-जमातीचा असला पाहिजे.
४) त्याचे नाव कोणत्याही संसदीय मतदारसंघात मतदार म्हणून नोंदविलेले असावे.

आरक्षण

लोकसभेत अनु. जातींसाठी ८४ व अनु. जमातींसाठी ४७ अशा एकूण १३१ जागा (१८.४२%) राखीव असतात.

लोकसभा निवडणूक पद्धती
लोकसभा निवडणूक पद्धती खालीलप्रमाणे असते:

लोकसभेचे सदस्य १८ वर्षांवरील प्रौढ मतदारांकडून मतदान करून प्रत्यक्षरित्या निवडून दिले जातात.
हे सदस्य एकसदस्यीय मतदारसंघातून निवडले जातात.
ही निवडणूक गुप्त मतदान पद्धती व साध्या बहुमताने होते.
लोकसभेसाठी कोणत्याही राज्यातील मतदारसंघातून निवडणूक लढविता येते.

सदस्याचा राजीनामा

लोकसभा सदस्य आपला राजीनामा (स्वतःच्या सहीनिशी) स्वीकृतीसाठी लोकसभा अध्यक्षांकडे पाठवितो. लोकसभा सदस्य यांनी पक्षांतर केल्यास सदस्याचे सदस्यत्व रद्द होऊ शकते.

लोकसभेचे सभापती व उपसभापती
निवड :(कलम १३) नुसार लोकसभेचे निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एका सदस्याची सभापती (Speaker) व एकाची उपसभापती (Dy. Speaker) म्हणून निवड करतात.

कार्यकाल : सभापती व उपसभापती यांचा कार्यकाल लोकसभेच्या कार्यकालाइतकाच म्हणजे पाच वर्षे असतो .

राजीनामा : लोकसभेच्या सभापतीस आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असल्यास त्याला तो सादर करावा लागतो. उपसभापती आपला राजीनामा सभापतींकडे सादर करतो.

सभापतींची कार्ये आणि अधिकार :

सदस्यास मातृभाषेतून प्रश्न विचारण्यास परवानगी देणे

सभासदांना प्रश्न विचारण्यास परवानगी देणे अथवा नाकारणे.

प्रवर समितीच्या (Select Committee) अध्यक्षाची नियुक्ती करणे.

अधिवेशनास आवश्यक गणसंख्या नसल्यास ते तहकूब करणे.

कोणतेही विधेयक मतास टाकणे, त्यावर सदस्यांचे मत आजमावणे व निर्णय जाहीर करणे.

महत्त्वाचे अधिकार : . एखादे विधेयक, धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरविणे.सभापती कोणत्याही मतदानात पहिल्या फेरीत भाग घेऊ शकत नाही. परंतु एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास तो निर्णायक मत (Casting Vote) देऊ शकतो.लोकसभेने संमत (अगर असंमत) केलेले प्रत्येक विधेयक सभापतीच्या स्वाक्षरीशिवाय राज्यसभा वा राष्ट्रपतींकडे जात नाही.

लोकसभेचे अधिकार आणि कार्ये
१) कायदेविषयक अधिकार : केंद्रसूची व समवर्ती सूचीतील विषयांवर कायदे करणारे विधेयक प्रथम लोकसभेत किंवा राज्यसभेत चर्चेला येऊ शकते.
भारतात कायद्यांची निर्मिती करणारी संसद ही सर्वोच्च संस्था आहे.

२) आर्थिक अधिकार :१) धनविधेयक: कलम १०९(१) : कोणतेही धनविधेयक प्रथम लोकसभेतच मांडावे लागते. कलम १०९(२) : धन विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतरच राज्यसभेच्या संमतीसाठी पाठविण्यात येते. राज्यसभेने त्यावर १४ दिवसांत निर्णय घेणे बंधनकारक असते. राज्यसभेने धन विधेयक १४ दिवसांत संमत नाही केले तरी ते लोकसभेच्या संमतीमुळे दोन्ही सभागृहांनी संमत केले असे मानले जाते. धनविधेयकाबाबतीत राज्यसभेने सुचविलेल्या दुरुस्त्या मान्य करणे अथवा पूर्णतः नाकारण्याचा अधिकार लोकसभेस आहे.

३) अंदाजपत्रकास मंजुरी : वार्षिक अंदाजपत्रक प्रथम लोकसभेतच मांडण्यात येते. लोकसभेची अंदाजपत्रकास मजुरी म्हणजे संसदेची मंजुरी मानली जाते.लोकसभेने अंदाजपत्रक फेटाळल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. अनुदानांसंबंधी लोकसभेला सर्वाधिकार आहेत. यावरून लोकसभेचे आर्थिक महत्त्व स्पष्ट होते.

४) कार्यकारी अधिकार (Executive Powers): कलम ७५ (३) : मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला
जबाबदार असते व लोकसभेचा विश्वास असेपर्यंतच ते अधिकारपदावर असते.

लोकसभा आणि राज्यसभा या दोघांमध्ये काय फरक आहे?

लोकसभा आणि राज्यसभा या दोघांमधील फरक – Difference between Lok Sabha and Rajya


लोकसभा आणि राज्यसभा या दोघांमधील फरक
आपल्या भारताच्या संविधानामध्ये संसदेचे एकुण दोन गृह असलेले आपणास दिसुन येतात.ज्यात एकाचे नाव आहे लोकसभा आणि दुसरयाचे नाव आहे राज्यसभा.

लोकसभा हे जनतेचे घर असते म्हणुन आपण त्यास जनता दरबार तसेच जनतेचे घर असे देखील म्हणत असतो.

लोकसभेला लोकांचे,जनतेचे घर म्हटले जाण्याचे महत्वाचे कारण हे असते की यात आपणास सर्वसामान्य जनता समाविष्ट असलेली दिसुन येत असते.

आणि याचठिकाणी आपण राज्यसभेस संसदेचे वरील घर तसेच गृह असे म्हणत असतो.

आजच्या लेखात आपण लोकसभा म्हणजे काय असते? तसेच राज्यसभा म्हणजे काय असते आणि दोघांमध्ये कोणता साम्य आणि भेद असतो इत्यादी महत्वाच्या बाबींविषयी माहीती जाणुन घेणार आहोत.


लोकसभेला आपण सर्वसामान्य जनतेचे घर असे म्हणत असतो.लोकसभा हे एक कनिष्ठ गृह असते

राज्सभेविषयी सांगावयाचे म्हटले तर राज्यसभा ही राज्याची एक परिषद असते.याचसोबत राज्यसभेला कनिष्ठ गृह असे देखील म्हटले जाते.

निवड

लोकसभेत जे सदस्य निवडले जातात त्यांची निवड सर्वसामान्य जनता करत असते.

आणि राज्यसभेत सभासदांची निवड करण्यासाठी राज्यसभेत नेमल्या गेलेल्या सभासदांना पाचारण केले जाते.

कार्यकाळ लोकसभेचा कार्यकाळ म्हणजे कार्य करण्याचा कालावधी हा कमीत कमी पाच वर्ष इतका असतो.म्हणजेच लोकसभेत पाच वर्षांनी सर्व खासदार निवृत्त होत असतात

राज्यसभेत उमेदवाराचा कार्यकाल सहा वर्ष असतो आणि राज्यसभेच्या मेंबरला दोन वर्षानंतर निवृत्ती देखील घेता येते.आणि मग नवीन सभासदाची निवड येथे करतात.

सदस्य संख्या

लोकसभेच्या सभासदांची कमाल संख्या 552 असते

राज्यसभेतील सभासदांची संख्या जास्तीत जास्त 250 असते.

वयोमार्यादा तर याचठिकाणी लोकसभेचा सभासद बनण्यासाठी आपली वयोमर्यादा कमीत कमी 25 असावी लागते राज्यसभेचा सभासद बनायला आपली वयोमर्यादा 30 असावी लागते.

अध्यक्ष लोकसभेत होत असलेल्या बैठक तसेच मिटींगचा अध्यक्ष हा लोकसभेचा अध्यक्ष हाच असतो पण याचठिकाणी राज्यसभेची जी बैठक भरवली जात असते तिचे अध्यक्षपद उपराष्टपतीकडे दिले जात असते.
विधेयक मर्यादा लोकसभेत धन विधेयक सादर करतात

राज्यसभेस धन विधेयक सादर करण्याचा कोणताही हक्क दिला जात नाही.

मतदान अधिकार पण लोकसभेत सर्व लोक मतदान करत असतात.

राज्यसभेत प्रत्येक राज्याचे आमदार मतदान करत असतात

तरतूद कलम

भारतीय संविधानाच्या कलम 81 नुसार लोकसभेची तरतुद करण्यात आली आहे

तर भारतीय संविधानाच्या कलम 80 नुसार राज्यसभेची तरतुद करण्यात आली आहे.

महाराष्टामधुन लोकसभेमध्ये किती खासदारांची निवड केली जाते?

संपुर्ण महाराष्टातुन लोकसभेत फक्त 48 खासदार निवडले जात असतात.


महाराष्टातुन राज्यसभेत किती सभासद पाठवले जात असतात?

महाराष्टातुन राज्यसभेत 19 सभासदांना पाठवले जात असते.

पोलीस भरती सराव प्रश्नसंच विषय अंकगणित


*१) २७० नंतर पुढील येणाऱ्या १० व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती ?*
अ. १५ 
ब. १७
क. १९
ड. २१

*२) पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ?*
अ. ०:२२५ 
ब. २२.५
क. ६.२५
ड. ६२.५ 

*३) १४.३१, १६.४, १३.१३, १२.२४ या संख्येचे मध्यमान किती येईल ?*
अ. ४१ वर्ष 
ब. ३३ वर्ष 
क. १२५ वर्ष 
ड. ४५ वर्ष

*४) रमेश जवळ ३२ रुपये आहेत. हरिषजवळ रघूच्या चौपट व रमेशपेक्षा ४ रुपये कमी आहेत तर तिघांजवळ मिळून किती रुपये आहेत ?*
अ. ६६
ब. ६७
क. ६९
ड. ६८   

*५) सहा संख्याची सरासरी ६४.५ आहे. सातवी संख्या ९६ असल्यास सर्व संख्याची सरासरी किती ?*
अ. ६६.५
ब. ६८
क. ६८.५
ड. ६९

*६) बस भाडे शेकडा २० ने वाढविला. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा १० ने वाढविला. तर मुळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ?*
अ. ३५ टक्के 
ब. ३० टक्के 
क. ३१ टक्के 
ड. ३२ टक्के

*७) एका परीक्षेमध्ये ७०० पैकी ४५५ विध्यार्थी नापास झाले. तर किती टक्के विध्यार्थी पास झाले ?*
अ. ३५
ब. ४०
क. ६५
ड. ६०

*८) संख्येचे १५ टक्के ३० आहे, तर त्या संख्येची तिप्पट किती ?*   
अ. २००
ब. २५०
क. ४००
ड. ६००

*९)  दर ५ वर्षांनी दुप्पट होणाऱ्या योजनेत अ गुंतवणूक करतो जर त्याने सन १९९०, १९९५ व २००० मध्ये रु. ५००० गुंतवणूक केली तर त्याला २००५ साली किती रक्कम मिळेल ?*
अ. रु. ४०००० 
ब. रु. ६००००
क. रु. ९००००
ड. रु. ७००००

*१०) मगनसेठने ३० रु. दराने १८ खेळणी आणली. ती सर्व खेळणी त्यांनी ५६० रुपयांस विकली. तर या व्यवहारात किती नफा झाला ?*
अ. ३०
ब. ४०
क. २०
ड. ५०

---------------------------------------------------- 

उत्तरे : १)  ब  २) क  ३) ब  ४) ब  ५) ड  ६) ड  ७) अ  ८) ड  ९) ड  १०) क

----------------------------------------------------

पोलीस भरती - प्रश्नसंच
      विषय - बुध्दीमत्ता
----------------------------------

१) एका घनाची बाजू ८ सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ?
अ. ६४ चौ. से. मी. 
ब.  ५१२ घ. से. मी. 
क.  ६४  घ. से. मी. 
ड.  ४८ घ. से. मी. 

२) ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज ९०अंश असते त्या कोनांना परस्परांचे ----- आहेत असे म्हणतात ?
अ. पूरक कोन 
ब. विरुद्ध कोन
क. सरळ कोन
ड. कोटीकोन

३) १४ से. मी. लांबी व ८ से. मी. रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती ?
अ. ११२ चौ. से. मी. 
ब. १०० चौ. से. मी.  
क. १२१ चौ. से. मी.   
ड. १११ चौ. से. मी. 

४)    AZ, BY, CX, ?
अ. DW
ब. EV
क. EF
ड. JO

५) ---- हे प्राथमिक किंवा मूळ रंग होत ?
अ. निळा, हिरवा, लाल
ब. निळा, पिवळा, पांढरा  
क. पांढरा, काळा, लाल 
ड. हिरवा, पांढरा, केशरी

६) खालीलपैकी दिलेले शब्दकोशामध्ये (डिक्शनरी) कोणत्या क्रमाने येतील ?
१ Internet २) Income ३) India ४) Import .....
अ. २३१४
ब.  ४२३१
क.  १२३४
ड.  ४३२१

७) ८, ९, १३, २२, ३८, ६३ ?
अ. ८९
ब.  १०९
क.  ९९
ड.  ७९

८) घड्याळीतील तास काटा व मिनिटकाटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो ?
अ. सहा वाजता  
ब. बारा वाजता 
क. साडेतीन वाजता  
ड. नऊ वाजता

९) खालील पर्यायामध्ये काही नवे दिली आहेत. त्यातील विसंगत नावे ओळखा ?  
अ. इंद्रकुमार गुजराल
ब. लालबहादूर शास्त्री 
क. एच. डी. देवेगौडा 
ड. डॉ. राजेंद्र प्रसाद

१०) खालील गटात न बसणारा शब्द कोणता ?
अ. उप जिल्हाधिकारी
ब.  पोलीस उपअधीक्षक
क. विक्रीकर अधिकारी 
ड.  जिल्हापरिषद अध्यक्ष

--------------------------------

उत्तरे : १) ब.  २) ड.  ३)अ. ४) अ.   ५) अ. ६)  ब.  ४२३१  ७) क ९९  ८) ड.  ९)  ड. १०) ड.
--------------------------------

पोलीस भरती - सराव  प्रश्नसंच
      विषय - अंकगणित
----------------------------------
*१) १ ते १७ या संख्याची बेरीज किती ?*
अ ) १४४ ब ) १६२ क ) १७१ ड ) १५३

*२)मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या व लहानात लहान ४ अंकी संख्या यातील फरक किती ?*
अ ) ९०,०००  ब ) ९८, ९९९  क) ९,००० ड ) ९०,००१
*३)  राहुल शंभर पायऱ्या चढून एका मंदिरात जातो . वर जाताना त्याने प्रत्येक  पायरीवर  तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले सोबत न्यावी लागतील ?*
अ ) ४,५००  ब ) ५,००० क ) ५०५० ड ) ५,५००

*४) १०.५ + १.०५ + १०५ = ?*
अ ) ११६.५५ ब ) ३१५ क ) ११७ ड ) ११६.५

*५) अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला ८ ने भागल्यास बाकी ४ उरते , १२ ने भागल्यास बाकी ८ उरते व १५ ने भागल्यावर बाकी ११ उरते ?*

अ ) ११६ ब  ) ५६  क ) १७६ ड ) २३६

*६) खालील दिलेल्या कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात जास्त आहे ?*
अ ) २     ब )  ५     क ) ९      ड ) १५
     ---          ---          ---           ---
      ७           ८           १२           १८
*७) एका नावेत सरासरी ३० Kg वजनाची मुले बसली आहेत . नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन ३१ Kg आहे . तर नावाड्याचे वजन किती ?*
अ ) ६१ ब ) ६२ क ) ५९ ड ) ५१

*८) एका वस्तूची किंमत २५% ने कमी झाल्याने ती वस्तू आता २७० रुपयास मिळते तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?*
अ ) ३६० ब ) ४८० क ) ५४० ड ) ४००

*९) एकाच प्रकारचे २५ टेबल काही रकमेस विकल्यामुळे ४०% नफा झाला , तर प्रत्येक टेबलवर शेकडा नफा किती ?*
अ ) २०% ब ) ४०% क ) ५/६ % ड ) सांगता येत नाही

*१०) साडेचार किलो ग्रॅम बेसनाच्या दीडशे ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील ?*
अ ) २५ ब ) ३० क ) ३५ ड ) २०

उत्तर : १- ड  २- ब ३- क ४-अ  ५- अ  ६-ड  ७-अ  ८- अ  ९- ब  १०-ब

चिंतामण विनायक वैद्य


भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य (जन्म : कल्याण, १८ ऑक्टोबर, इ.स. १८६१ - कल्याण, २० एप्रिल, इ.स. १९३८) हे संस्कृत भाषेतील विद्वान होत. ते एक थोर ज्ञानोपासक, महाभारत-रामायणाचे संशोधक - मीमांसक व चतुरस्र ग्रंथकार होते. यांनी अनेक माहितीप्रचुर पुस्तके लिहिली. संस्कृत भाषेच्या व्यासंगामुळे त्यांनी रामायण-महाभारतासारख्या पौराणिक इतिहासाच्या अनेक अपरिचित भागांवर प्रकाश टाकला.

चिंतामणराव वैद्यांचे वडील विनायकराव हे कल्याणला वकिली करीत. चिंतामणरावांचे शिक्षण कल्याण तसेच मुंबईच्या एल्‍फिन्स्टन स्कूल व एल्‍फिन्स्टन कॉलेजात झाले. इ.स. १८८२त एम.ए. आणि १८८४मध्ये एल्‌एल.बी. झाल्यानंतर त्यांनी काही काळ कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथे मुनसफ म्हणून व नंतर ठाण्याच्या कोर्टात वकील म्हणून काम केले. त्यानंतर ते उज्जैन येथे न्यायाधीश पदावर रुजू झाले. पुढे १८९५मध्ये ग्वाल्हेर संस्थानच्या सरन्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. सेवानिवृत्तीनंतर ते १९०५ सालापासून लोकमान्य टिळकांचे सहकारी म्हणून काम करू लागले. राष्ट्रीय शिक्षणाचे काम त्यांनी आस्थेने व निष्ठेने केले. कोलकाता, सुरत आदी काँग्रेस अधिवेशनांना ते टिळकांबरोबर गेले. टिळकांच्या पश्चात वैद्यांनी महात्मा गांधीजींचा मार्ग अनुसरला. वेगवेगळ्या समित्यांवर काम करणे, अहवाल लिहिणे ही कामे त्यांनी गांधींच्या मार्गदर्शनाखाली केली.

कार्य
संपादन करा
वैद्य हे पुणे येथे टिळक महाविद्यालयात व्याख्याते होते

लेखन
संपादन करा
चि.वि. वैद्यांनी १८८९ ते १९३४ या काळात सुमारे ५०,००० पृष्ठे इतके लेखन इंग्रजी-मराठीत केले. त्यांचे स्फुटलेखन केसरी, विविधज्ञानविस्तार, इंदुप्रकाश, नेटिव्ह ओपिनियन आदी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले. यांपैकी फारच थोडे लेखन ग्रंथरूपात आले. त्यांचे एकूण २९ ग्रंथ प्रकाशित झाले, पैकी ९ ग्रंथ इंग्रजीत आणि २० मराठीत होते.

रामायण-महाभारतावरील लेखन
संपादन करा
चिं.वि. वैद्यांच्या ’महाभारत ए क्रिटिसिझम या इंग्रजी ग्रंथावर लोकमान्य टिळकांनी केसरीतून सलग आठ अग्रलेख लिहून परीक्षण केले व ग्रंथांची मौलिकता दाखविली. त्यानंतर टिळकांनी आणखी एक अग्रलेख लिहून रिडल ऑफ रामायण या ग्रंथाचे परीक्षण केले. रामायण व महाभारत ही कल्पित काव्ये नसून ते इतिहासाचे ग्रंथ आहेत, या आपल्या विश्वासाला वैद्यांकडून व्यासंगपूर्ण समप्रमाण पुष्टी मिळाल्याबद्दल लोकमान्यांनी आपल्या अग्रलेखात (६ जुलै१९०६) समाधान व्यक्त केले आहे. वैद्यांनी महाभारताच्या संदर्भात एपिक इंडिया व श्रीकृष्ण चरित्र हे ग्रंथ लिहिले.

हिंदू आणि अन्य धार्मिक कल्पनांविषयीचे लेखन
संपादन करा
मानवधर्मसार व हिंदू धर्माची तत्त्वे या दोन पुस्तिकांतून वैद्यांचे हिंदुधर्मविषयक विचार व्यक्त झाले आहेत. त्यांच्या या पुस्तकांतून ईश्वर, सैतान, स्वर्ग आणि नरक, ग्रंथप्रामाण्य, चमत्कार, मूर्तिपूजा, आश्रमव्यवस्था इ. विषयांसंबंधी चिकित्सा केलेली आहे.

चिंतामणराव वैद्यांचे इतिहासविषक लेखन
संपादन करा
वैद्यांनी प्राचीन व मध्ययुगीन भारतीय इतिहासावर विविधांगी व प्रचंड संशोधन करून ग्रंथलेखन केले. त्यांपैकी ‘हिस्टरी ऑफ मिडिव्हल हिंदु इंडिया’ या ग्रंथाचे तीन खंड त्यांनी प्रथम इंग्रजीत लिहिले. आणि त्यानंतर त्याचा तीन-खंडी मराठी अनुवाद ‘मध्ययुगीन भारत’ या नावाने प्रसिद्ध केला. याशिवाय ‘गझनीच्या महमूदाच्या स्वाऱ्या’ आणि ‘शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा स्वराज’ हे त्यांचे दोन अन्य इतिहासविषक ग्रंथ होत.

प्रकाशित साहित्य
संपादन करा
अबलोन्नतिलेखमाला (१९०६)
एपिक इंडिया (१९०७)
ए हिस्टरी ऑफ संस्कृत लिटरेचर (१९२६)
गझनीच्या महमूदाच्या स्वाऱ्या (१९२६)
चिं.वि. वैद्यांचे ऐतिहासिक निबंध (१९३१)
दुर्दैवी रंगू (कादंबरी, १९१४)
मध्ययुगीन भारत (तीन खंड, १९२५)
महाभारत ए क्रिटिसिझम (१९०४)
महाभारत कथासार
महाभारताचा उपसंहार (१९१८)
महाभारताचे खंड - सभापर्व, विराटपर्व, उद्योगपर्व (१९३३-३५)
मानवधर्मसार - संक्षिप्त मनुस्मृति (१९०९)
रामायण कथासार
रिडल ऑफ रामायण (१९०६)
शिवाजी द फाउंडर ऑफ मराठा स्वराज (१९३१)
श्रीकृष्ण चरित्र (१९१६)
संयोगिता (नाटक, १९३४)
संस्कृत वाङमयाचा इतिहास - मूळ संस्कृत वैदिक ग्रंथांचा इतिहास
संस्कृत वाङ्‌मयाचा त्रोटक इतिहास (१९२२)
संक्षिप्त महाभारत (१९०५)
हिंदू धर्माची तत्त्वे (१९३१)
हिस्टरी ऑफ मीडिएव्हल हिंदू इंडिया (इंग्लिश) (History of Mediaeval Hindu India, ३ खंड, १९२१, १९२४ व १९२६)
चिं.वि. वैद्यांचे झालेले सन्मान आणि त्यांनी भूषविलेली पदे
संपादन करा
महाभारताचा तर्कशुद्ध सखोल प्रगाढ अभ्यास करून, महाभारताची सर्वंकष मीमांसा करणारा आद्य भाष्यकार म्हणून लोकमान्यांनी चिं.वि. वैद्यांना `भारताचार्य' ही पदवी दिली.
१९०८ साली पुणे येथे भरलेल्या सहाव्या मराठी साहित्य (ग्रंथकार) संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
भारत इतिहास संशोधन मंडळाचे सुरुवातीपासून (१९१०) आजीव सदस्य व पुढे अध्यक्ष (१९२६–३६) झाले.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे पहिले कुलगुरुपद त्यांनी भूषविले (१९२२–३४) व पुढे ते त्याचे कुलपती (१९३४–३८) झाले.
वैदिक संशोधन मंडळाच्या स्थापनेत ना. श्री. सोनटक्के यांना त्यांनी बहुमोल सहकार्य केले.
टिळक विद्यापीठ आणि वैदिक संशोधन संस्थेत ते शिकवीत असत.

ज्ञानाची भूक शमविण्यासाठी पोटाची भूक मारून टाकली. विद्यार्थी जीवनातील बाबासाहेबांचा हा महान आदर्श आहे.

इंग्लंडमध्ये विद्यार्जन करताना आपणाला कोणत्या परिस्थितीत दिवस काढावे लागले व किती कष्ट सोसावे लागले याबद्दलच्या स्वतःच्या आठवणी सांगताना बाबासाहेब त्या जितक्या उत्साहाने व खुमासदारपणे एकावेळी सांगतात तितक्याच उत्साहाने व खुमासदारपणे दुसऱ्यावेळी त्याच आठवणी सांगत असतात. एकच गोष्ट अनेकवेळा सांगितली तरी ती सांगण्याच्या त्यांच्या पध्दतीत यत्किंचितही बदल होत नाही. सांगण्याची तऱ्हा प्रत्येकवेळी सारखीच असते. त्यांच्या तोंडून अशा गोष्टी अनेक वेळा ऐकणाऱ्याला त्यांच्या या सांगण्याच्या एकाच पध्दतीची गंमत व कुतूहल वाटते.


इंग्लडमध्ये ते शिकत असताना तेथील ब्रिटिश म्युझियममध्ये वाचण्यासाठी ते जात असत. त्या लायब्ररीचा एक असा दंडक अाहे की, लायब्ररीत कुणी खाद्यपदार्थ आणून खाता कामा नये. बाबासाहेब सकाळी एक कप चहा व एक टोस्ट खाऊन त्या लायब्ररीत ८ वाजता जात असत. ते संध्याकाळी ८ वाजता लायब्ररी बंद होईपर्यंत सतत वाचीत बसत. लायब्ररी बंद झाली की मग घरी जात. दुपारी जेवण वगैरे करण्यास बाहेर हाॅटेलात जाण्याची त्यांची ऐपत नव्हती.


कारण हाॅटेलात जेवणे म्हणजे अतिखर्चाचे. तेवढ्या पैशांची त्यांच्याजवळ तरतूद असण्याची काहीच शक्यता नव्हती. दुपारी भूक लागेल म्हणून ते घरुन येतानाच सँडविचचे दोन तुकडे कागदात गुंडाळून खिशात घालून आणीत. लायब्ररीमधल्या माणसाची नजर चुकवून ते सँडविच दुपारच्या वेळी तेथेच खात व वाचन चालू ठेवीत. असे काही दिवस लोटल्यावर एकदा त्यांना अशाप्रकारे दुपारी सँडविच खाताना लायब्ररी अटेन्डन्टने पाहिले. तो तडक त्यांच्याकडे घाईघाईने आला व त्याने हटकले (विचारले), “हे काय करीत आहात तुम्ही?” बाबासाहेबांना त्या माणसाला काय उत्तर द्यावे हे सुचेना. ते किंचित गोंधळले. पण त्यांनी आपली खरी परिस्थिती सांगितली. ते म्हणाले,


“मी शिष्यवृत्ती घेऊन येथे शिकण्यासाठी आलो असल्यामुळे दुपारी हाॅटेलात जाऊन जेवण घेण्याइतके पैसे माझ्याजवळ पैसे नसतात. त्यामुळे मी घरूनच दोन सँडविच आणून त्यावर दुपारची वेळ निभावून नेतो.” त्यांचे हे स्पष्टीकरण ऐकून त्या अधिकाऱ्याला जरी त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली तरी त्यांना तशाप्रकारे लायब्ररीत सँडविच खाण्याची तो परवानगी देऊ शकत नव्हता. त्यांनी बाबासाहेबांना चक्क सांगितले.


“छे छे, येथे कोणताही खाद्यपदार्थ आणता कामा नये. येथे एक तुकडा जर नकळत जमिनीवर पडून राहिला तर रात्री शेकडो उंदीर धावून येतील आणि या लायब्ररीतील हजारो पुस्तकांचा फडशा उडवतील. म्हणून येथे तुम्ही उद्यापासून कसल्याही प्रकारचा खाद्यपदार्थ आणता कामा नये. नाहीतर मी तुमच्याविरुध्द मुख्य लायब्ररीयनकडे तक्रार करून तुम्हांला येथे येण्याचे बंद करीन.”


बाबासाहेबांनी त्याला सांगितले, “उद्यापासून मी काहीही आणणार नाही.” आणि त्या दिवसापासून बाबासाहेबांनी दुपारी खाण्याकरिता काहीही सोबत आणण्याचे बंद केले. दुपारी काहीही न खाता ते आपले वाचन सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सतत लायब्ररीत बसून करू लागले. 
केवढा तरी कष्टाळू व निश्चयी स्वभाव! त्यांनी ज्ञानाची भूक शमविण्यासाठी पोटाची भूक मारून टाकली. विद्यार्थी जीवनातील बाबासाहेबांचा हा महान आदर्श आहे.


महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

👉मूळ आडनाव – गोऱ्हे

👉जन्म – 11 एप्रिल 1827

👉मृत्यू – 28 नोव्हेंबर 1890

👉1869 – स्वतः कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.

👉1852 – पुणे, विश्रामबाग वाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.

👉21 मे 1888 – वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.

👉युक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक.

✅महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन परिचय

👉आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिबा फूले यांना ओळखले जाते.

👉फुले यांचे घराने मूळचे सातार्‍यापासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.

✅महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षण:-

👉फुले यांच्या काळात ब्राम्हनेत्तर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता.

👉गोविंदरावांणी इ. स. 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले. परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयांना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे म्हणणे होते. अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838 हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.

👉चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कालावधिपर्यंत महात्मा फुलेंचे शिक्षण थांबले. इ. स. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा गोविंदरावांनी स्कॉटिश कमिशनर यांच्या ईग्रजी शाळेत घातले.

✅विवाह:-

👉महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.

✅संस्थात्मक योगदान:-

👉3 ऑगस्ट 1848– पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.

👉4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.

👉1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.

👉1855 – प्रौढांसाठी रात्र शाळा.

👉1863 – बालहत्या प्रतिबंधक गृह.

👉1877 – दुष्काळपिडीत विद्यार्थ्यांसाठी धनकवडी येथे कॅम्प.

👉10 सप्टेंबर 1853 – महार, मांग इ. लोकांस विद्या शिकवणारी संस्था.

👉24 सप्टेंबर 1873 – सत्यशोधक समाजाची स्थापना.

👉व्हिक्टोरिया अनाथ आश्रमाची स्थापना.

👉1880 – म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.

✅महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :

👉1855 – ‘तृतीय रत्न‘ नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).

👉1868 – ‘ब्राम्हणांचे कसब‘

👉1873 – ‘गुलामगिरी‘ हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केला.

👉1873 – अस्पृश्यता निवारणाचा पहिला कायदा.

👉1 जानेवारी 1877 – ‘दीनबंधू‘ मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.

👉1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळले.

👉1883 – शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.

👉1885 – इशारा सत्सार “The Essense Of Truth” सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. या ग्रंथास विश्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.

👉अस्पृश्यांची कैफियत.

👉शिवाजी महाराजांचा पोवाडा.

✅महात्मा ज्योतिबा फुले यांची वैशिष्ट्ये:-

👉थॉमस पेनच्या “The Rights Of Man” या पुस्तकाचा प्रभाव.

👉1864 – पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.

👉1868 – अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.

👉1879 – रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला.

👉2 मार्च 1882 – हंटर कमिशन पुढे साक्ष.

👉ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.

👉उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.

👉सत्यशोधक समाजाचे ब्रीद – ‘सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी‘

👉सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला..

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...