१७ ऑक्टोबर २०२२

ग्रामपंचायत


सरपंच किंवा उपसरपंच यांच्या निवडीबाबत काही विवाद निर्माण झाल्यास 15 दिवसाच्या आत सदरहू विवाद जिल्हाधिकार्‍याकडे सोपविता येतो. तसेच जिल्हाधिकार्‍याने दिलेल्या निर्णयावर निर्णय दिलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे अपिल करता येते.
सरपंच किंवा उपसरपंचावरील अविश्वासाच्या ठरावाची बैठक तहसीलदार बोलावितो व तोच त्या बैठकीचा अध्यक्ष असतो.
सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो.
ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनास आहे.
जर एखाद्या ग्रामपंचायतीमधील एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा अधिक पदे रिक्त असतील तर राज्यशास्त्र ग्रामपंचायत बरखास्त करू शकते.
सरपंच, उपसरपंच व पंचास अकार्यक्षता, गैरवर्तन, कर्तव्य पार पाडण्यास असमर्थता इत्यादी कारणाने पदावरून दूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस आहे.

नवीन ग्रामपंचायत निर्माण करण्याचा अधिकार विभागीय आयुक्ताला असतो.
ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा कमी आहे. अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी जिल्हा परिषद करते आणि ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा जास्त आहे अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी लेखापाल, स्थानिक लोकनिधी मार्फत होते.
ज्या खेड्यातील अनुसूचीत जाती-जमातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 60% पेक्षा जास्त असते अशा गावातील सरपंच हा अनुसूचित जाती जमातीमधील असतो.
ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा दरमहा मानधन लोकसंख्येनुसार 750, 1125 व 1500 रु. मिळते, या मानधनाच्या 75% रक्कम राज्यशासन देते.

ग्रामपंचायत


महाराष्ट्रात 1 जून 1959 पासून ‘मुंबई ग्रामपंचायत अधिनियम’ लागू करण्यात आला.
ग्रामपंचायतीचा अध्यक्ष हा सरपंच असतो.
सरपंचाची निवड निवडून आलेल्या सदस्यामधून केली जाते तसेच त्यातूनच एकाची उपसरपंच म्हणून निवड केली जाते.
सरपंच व उपसरपंच निवडीची बैठक तहसीलदार बोलवितो व तोच त्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवितो.
ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण झालेले असावे लागते.
ग्रामपंचायतीची निवडणूक दर 5 वर्षांनी होते म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कालावधी 5 वर्षाचा असतो.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहण्यास अनामत रक्कम – 500 रु. राखीव जागेसाठी – 100 रु.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या शिफारशीनुसार राज्यशासन ग्रामपंचायतीचा कार्यकाल 6 महीने वाढवू शकते.
ग्रामपंचायतीच्या बैठका महिन्यापासून एक म्हणजेच वर्षातून 12 बोलवाव्या लागतात.
ग्रामपंचायतीच्या पंचास व उपसरपंचास सरपंचाकडे राजीनामा द्यावा लागतो तर सरपंच पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा देतो.
सरपंचावर अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी एकूण सदस्याच्या 1/3 सदस्यांनी लेखी मागणी करावी लागते तर तो ठराव पास होण्यासाठी एकूण सदस्यांच्या 2/3 सदस्यांनी तो ठराव पास करावा लागतो.
महिला सरपंचावर अविश्वास ठराव पास होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते.
एकदा अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास दुसरा अविश्वास ठराव कमीत कमी 1 वर्षे आणता येत नाही.

ग्रामपंचायत


भारतीय घटनेच्या कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात ‘मुंबई ग्रामपंचयात अधिनियम 1958’ उपकलम 5 नुसार ग्रामपंचायतीची निर्मिती झाली आहे.
स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधीत गावची लोकसंख्या कमीतकमी 600 असली पाहिजे.
जर एखाद्या गावाची लोकसंख्या 600 पेक्षा कमी असेल तर दोन किंवा तीन गावे मिळून गट ग्रामपंचायत स्थापन करण्यात येते.
ग्रामपंचायतीच्या सदस्यांना पंच म्हणतात.
ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते.
महाराष्ट्रात ग्रामपंचायत सदस्यसंख्या 7 ते 17 अशी आहे.
ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार (सदस्यसंख्या निश्चित करण्याचा अधिकार) जिल्हाधिकार्‍यास असतो.

महराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या पंचाची संख्या लोकसंख्येवरून ठरविण्यात येते ती खालीलप्रमाणे

लोकसंख्या  –  पंचाची संख्या
600 ते 1500   –  7
1501 ते 3000   – 9
3001 ते 4500  – 11
4501 ते 6000  – 13
6001 ते 7500  – 15
7501 ते पेक्षा जास्त  -17

ग्रामपंचायतीमध्ये महिलासाठी 50% जागा राखीव असतात.
ग्रामपंचायतीमध्ये इतर मागासवर्गीयासाठी 27% जागा राखीव असतात.
ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातीच्या लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात ही संख्या निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍याला असतो.
संबंधीत गावातील सहकारी सोसायटीचा अध्यक्ष ग्रामपंचायतीचा सहयोगी सभासद असतो.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक खर्च मर्यादा


स्थानिक स्वराज्य संस्थाचे नाव  –   खर्च रुपये
महानगरपालिका  –  1,00,000 रु.
जिल्हा परिषद    – 60,000 रु.
नगरपरिषद     – 45,000 रु.
पंचयात समिती   – 40,000 रु.
ग्रामपंचायत   -7,500 रु.

ग्रामसभा

ग्रामसभेत संबंधित खेड्यातील सर्व प्रौढ (18 वर्षे वयावरील) स्त्री-पुरुष नागरिकांचा/मतदारांचा समावेश होतो.
ग्रामसभेच्या वर्षातून किमान चार बैठका व्हाव्यात अशी सूचना केंद्रसरकारने अलिकडेच सर्व राज्यांना केली आहे. त्या बैठका पुढील वेळी व्हाव्यात.
–26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन), 15 ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन), 1 मे (महाराष्ट्र दिन), 2 ऑक्टोंबर (गांधी जयंती) आणि दोन बैठका स्त्रियांच्या व्हाव्यात.
ग्रामसभा बोलविण्यासाठी 7 दिवस अगोदर नोटिस द्यावी लागते.

ग्रामसभा बोलविण्याचा अधिकार सरपंचला असतो. सरपंच गैरहजर असल्यास उपसरपंच बैठक बोलविलो.
ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवितो. सरपंचाच्या गैरहजेरीत उपसरपंच अध्यक्षस्थान भूषवितो.
ग्रामसभेच्या बैठका वेळेवर बोलविल्या जातात किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यावर सोपविली आहे.
सरपंच व उपसरपंच यांच्या अनुपस्थितीत ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान वरील पंच भूषवितो.
ग्रामसभेची गणसंख्या – एकुण मतदारच्या 15% किंवा 100 यापैकी जी कमी असेल ती संख्या.
ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या पंचाची निवड करते.

७४ वी  घटना दुरुस्ती ( १९९२-९३ ) :

             नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरवात ब्रिटिश कालखंडामध्ये झाली. ( १६८७ ) नागरी स्थानिक संस्थांना पंचायतराज संस्थेप्रमाणेच घटनात्मक दर्जा देण्यात यावा हि मागणी समोर आली. या दृष्टीकोनातून सर्वप्रथम १९८९ ला राजीव गांधी यांनी नगरपालिका संबंधी ६५ वे घटनादुरुस्ती विधेयक तयार केले होते.  परंतु त्यांना अपयश आले. त्यानंतर व्ही. पी. सिंग व चनशेखर यांनी प्रयत्न केले. परंतु अपयश आले. १९९१ ला पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना नागरी स्थानिक संस्थाना घटनात्मक दर्जा देण्यासाठी त्यांनी १९९२ ला ७४ वे घटनादुरुस्ती विध्येयक तयार केले.

– २२ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर लोकसभेत बहुमत सिद्ध.

– २३ डिसेंबर १९९२ ला या विधयेकावर राज्यसभेत बहुमत सिद्ध

– २० एप्रिल १९९३ रोजी ७४ व्या घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.

– ३१ मे १९९४ पर्यंत ह्या शिफारशी सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारक करण्यात आले.

– राज्य घटनेच्या कलम २४३ ( P ) ते २४३ ( ZG ) मध्ये तरतूद करण्यात आली. व भारतीय राज्य घटनेला १२ वे परिशिष्ट जोडण्यात आले. व त्या मध्ये एकूण १८ विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

लक्षात ठेवा

           

२१ मार्च व २३ सप्टेंबर या दोन दिवशी संपातस्थिती निर्माण होते. म्हणून या दोन दिवसांना ..... असे म्हणतात.
- संपातदिन

ज्या वेळी पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या स्थितीस .... असे म्हणतात.
- अयनस्थिती

२१ मार्च या संपातदिनाला उत्तर गोलार्धात ..... म्हणून ओळखले जाते.
- वसंत संपात

२३ सप्टेंबर या संपातदिनाला उत्तर गोलार्धात .... म्हणून ओळखले जाते.
- शरद संपात

पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो ?
- चार मिनिटे

पृथ्वीवरील दोन स्थानांमधील रेखावृत्तीय अंशात्मक अंतरास .... मिनिटांनी गुणले असता त्या दोन ठिकाणातील स्थानिक वेळेतील फरक समजू शकतो.
- चार

विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस २३°३०' अक्षवृत्ता पर्यंतच्या प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात. त्यामुळे त्या भागात तापमान जास्त असते. या पट्ट्यास काय म्हणतात?
- उष्ण पट्टा

पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती फिरत असल्याने तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते. जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते तेव्हा त्या स्थितीस .... म्हणून ओळखले जाते.
- उपसूर्य स्थिती

चमकणाऱ्या विजेमुळे हवेतील काही ऑक्सिजनचे .... वायूत रूपांतर होते..
- ओझोन

आपल्या आकाशगंगेचा व्यास किमान .... लाख प्रकाशवर्षे असावा.
- एक

पोलीस भरती सराव प्रश्न

Q1.भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये कोणत्या राज्यातील आदिवासी भागांच्या संदर्भात विशेष प्रशासकीय तरतुदी आहेत?
उत्तर :- आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम

Q2. कर्कवृत्त कोणत्या देशातून जात नाही?
उत्तर :- नेपाळ

Q3. अन्न आणि कृषी संघटना (FAO) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर :-  रोम, इटली

Q4. ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक सुवर्णपदके कोणाकडे आहेत?
उत्तर :- लारिसा लॅटिनिना

Q5. खालीलपैकी कोणता स्त्रोत मौर्य साम्राज्याच्या नगर प्रशासनाची तपशीलवार माहिती देतो?
उत्तर :- मेगास्थनीज इंडिका

Q6. मीराबाई चानू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर :- भारतोलन

Q7. भारताच्या 2011 च्या जनगणनेचे बोधवाक्य खालीलपैकी कोणते होते?उत्तर :- आपली जनगणना, आपले भविष्य

Q8. भारतातील वनक्षेत्राची टक्केवारी अंदाजे किती टक्के आहे?
उत्तर :-  24%

Q9. __च्या नमुन्यासाठी लीड क्रोमेटची चाचणी घेतली जाते.
उत्तर :- हळद पावडर

Q10. भारताच्या राज्यघटनेत ____ मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे.
उत्तर :- राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे

विज्ञान


हृदय स्नायू (Cardiac Muscles) :

हृदय स्नायू अनैच्छिक स्नायूंचा (Involuntary Muscles) प्रकार असून त्यांच्या कार्यावर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येत नाही.

हृदयाचे कार्य स्वायत्त चेतासंस्थेमार्फत नियंत्रित केले जाते त्या प्रक्रियेला सायन्स मोड असे म्हणतात.

आपल्या शरीरातील सर्वात कार्यक्षम स्नायू म्हणून हृदय स्नायूंना ओळखले जाते.

हृदयाचे स्नायू हृदयाच्या आकुंचन – प्रसारणाचे कार्य घडवून आणतात.

संघ : पोरीफेरा

शरीरावर असंख्य छिद्रे असतात.

त्यांना ऑस्टिया म्हणतात.

सर्व प्रकारच्या स्पंजाचा या संघात समावेश होतो.

प्रचलन न करणारे , आधात्रीशी सलग्न व असममीत प्राणी

उदा. सायकॅन , युस्पॉजिया

भारतातील महत्वाची थंड हवेची ठिकाणे

जम्मू काश्मीर.......... गुलमर्ग

गुजरात.................. सापुतारा

प.बंगाल...............दार्जिलिंग

राजस्थान............... माउंट अबू

पंचमढी................. मध्यप्रदेश

हिमाचल प्रदेश......... धर्मशाला

हिमाचल प्रदेश......... डलहौसी

हिमाचल प्रदेश......... मनाली

उत्तराखंड............... अल्मोढा

उत्तराखंड............... मसुरी

केरळ..................... मन्नार

महाराष्ट्र.................. महाबळेश्वर

महाराष्ट्र.................. माथेरान

महाराष्ट्र.................. लोणावळा

तामिळनाडू............. उटी

तामिळनाडू............. कोडाईकॅनॉल

तामिळनाडू............. कुन्नुर

कर्नाटक................. नंदाहिल्स

महिला आशिया चषक टी२० क्रिकेट विजेतेपद सातव्यांदा भारताकडे.


 
महिलांची टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा भारतानं सातव्यांदा जिंकली आहे. बांगलादेशात सिल्हेट येथे काल झालेल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर ६९ चेंडू आणि ८ गडी राखून विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा डाव ९ बाद ६५ धावसंख्येवर आटोपला. भारताच्या रेणुका सिंगनं केवळ ५ धावात ३ बळी घेतले.

हे आव्हान सहज पार करताना भारतानं केवळ ८ षटकं आणि ३ चेंडूत २ बाद ७१ धावा करत प्रतिस्पर्ध्यावर सहज विजय मिळवला.

मात्र, भारताची भरवशाची खेळाडू स्मृती मनधानानं २५ चेंडूत नाबाद ५१ तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाबाद ११ धावा करत भारतानं विजयाचं लक्ष्य सहज गाठण्यात मोलाची भूमिका बजावली.

  रेणुका सिंगला सामनावीर

दीप्ती शर्माला मालिकावीर (मालिकेत ९४ धावा आणि १३ बळी)

केंद्रीय क्रीडा मंत्री :- अनुराग ठाकूर.

2022 नोबेल शांतता पुरस्कार

2022 नोबेल शांतता पुरस्कार : बेलारुसच्या अॅलेस बिलियात्स्की तसेच रशिया & युक्रेनच्या मानवाधिकार संघटनेला जाहीर.

2022 साठीचा नोबेल शांतता पुरस्कार मानवधिकार हक्कांसाठी लढणारे वकिल बेलारुसचे ह्युमन अॅक्टिव्हीस्ट अॅलेस बिलियात्स्की (Ales Bialiatski) & रशियन मानवाधिकार संघटना मेमोरियल आणि युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या दोन संस्थांना देण्यात आला आहे. 

Nobel Peace Prize अर्थात नोबेल शांतता पुरस्कार हा अशा व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो जे त्यांच्या देशातील समाजातील गरजूंचे प्रतिनिधित्व करतात. तसंच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याच्या प्रचार करत शांततेची शिकवण जगाला देतात.

कोणत्याही दोन गटातील संघर्ष रोखण्यासाठी आणि मानवी हक्कांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना दिला जातो.

गेल्या वर्षी (2021)रशियाचे दिमित्री मुराटोव्ह आणि फिलीपिन्सच्या मारिया रेसा या पत्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी
   

कसा आहे नोबेल पुरस्काराचा इतिहास?

नोबेल पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो.

स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात.

अल्फ्रेड नोबेल यांनी मृत्यू आधी आपल्या संपत्तीचा मोठा हिस्सा एका ट्रस्टला दान केला होता.

त्यांची इच्छा होती की या पैशांच्या व्याजातून दरवर्षी विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जावा.

अल्फ्रेड नोबेल यांची संपत्ती स्वीडिश बँकेत जमा आहे. या संपत्तीच्या व्याजातून दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जातात.

पहिल्या नोबेल शांती पुरस्कार 1901 मध्ये देण्यात आला होता.

चालू घडामोडी


पंतप्रधानांनी उना येथे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचे उद्घाटन केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेशातील उना येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT) चे उद्घाटन केले .

यावेळी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, मुख्यमंत्री जयराम ठाकूर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान मोदींनी भारताच्या चौथ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे उद्घाटन केले .

नायक रॉजर बिन्नी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची जागा घेणार

भारताचा 1983 च्या विश्वचषकाचा नायक, रॉजर बिन्नी हे सौरव गांगुलीच्या जागी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष बनणार आहेत .

18 ऑक्टोबर रोजी मुंबईत बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असताना बिन्नी पदभार स्वीकारतील.

जय शाह हे बीसीसीआयचे सचिव म्हणून कायम राहतील, जे बोर्डातील सर्वात प्रभावशाली पद आहे.

राजीव शुक्ला हे बोर्डाच्या उपाध्यक्षपदीही कायम राहणार आहेत.

महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे

1) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले

2) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

3) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी

4) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर

5) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी

6) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील

7) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला

8) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी

9) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल

10) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार

11) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी

12) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी

13) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर

14) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा

15) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी

16) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन

17)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा

18) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन

19) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस

20) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग

21) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी

22) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण

23) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ

24) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग

25) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ

Google Cloud

Google Cloud ला सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसोबत भागीदारी करण्यासाठी Meity ला होकार मिळाला

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (Meity) Google क्लाउडला सरकारी संस्थांसाठी दुपारी १२:३९ मी

Google Cloud ला सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसोबत भागीदारी करण्यासाठी Meity ला होकार मिळाला

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (Meity) Google क्लाउडला सरकारी संस्थांसाठी आव्हानात्मक समस्या सोडवण्यासाठी क्लाउड तंत्रज्ञान वापरण्यासाठी अधिकृत केले आहे.

अ‍ॅक्रिडिएशनसह, Google आता भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांसोबत भारताच्या डिजिटल परिवर्तन उपक्रमांमध्ये, विशेषतः महाराज प्रकल्पात सक्रिय सहभागी होण्याच्या स्थितीत आहे. महाराज प्रकल्पाचे उद्दिष्ट एक बहु-स्तरीय, राष्ट्रीय क्लाउड-शेअरिंग फाउंडेशन तयार करणे आहे जे सर्वांसाठी परवडणारे, सुरक्षित डेटा स्टोरेज प्रदान करते. सुरक्षित आणि समस्या सोडवण्यासाठी क्लाउड तंत्रज्ञान वापरण्यासाठी अधिकृत केले आहे.

अ‍ॅक्रिडिएशनसह, Google आता भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांसोबत भारताच्या डिजिटल परिवर्तन उपक्रमांमध्ये, विशेषतः महाराज प्रकल्पात सक्रिय सहभागी होण्याच्या स्थितीत आहे. महाराज प्रकल्पाचे उद्दिष्ट एक बहु-स्तरीय, राष्ट्रीय क्लाउड-शेअरिंग फाउंडेशन तयार करणे आहे जे सर्वांसाठी परवडणारे, सुरक्षित डेटा स्टोरेज प्रदान करते.

आधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञान भारतातील मेघ प्रदेशांद्वारे प्रदान केले जातील, जे या बदलासाठी उत्प्रेरक म्हणून काम करतील.
 

सौर उर्जा प्रकल्प

CIL ने RVUNL सोबत राजस्थान मध्ये 1190 MW सौर उर्जा प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार केला

13 ऑक्टोबर 2022 रोजी, कोल इंडिया लिमिटेड (CIL) ने राजस्थान राज्य विद्युत उत्पदान निगम लिमिटेड (RVUNL) सोबत 5,400 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आणि राजस्थानमधील बिकानेर येथे 1190 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला.

आर के शर्मा, RVUNL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि रेड्डी, सीआयएलचे तांत्रिक संचालक, केंद्रीय कोळसा मंत्री, प्रल्हाद जोशी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर  स्वाक्षरी केली.

राजस्थान सरकारने सोलार पार्कसाठी ४,८४६ हेक्टर जमीन दिली आहे.

CIL चा सोलर प्लांट 2,000 मेगावाट (MW) सोलर पार्क मध्ये स्थापित केला जाणार आहे जो RVUNL द्वारे विकसित केला जात आहे.

2000 MW पैकी RVUNL 810 MW क्षमतेचा स्वतःचा सौर ऊर्जा प्रकल्प जोडेल आणि उर्वरित 1,190 CIL द्वारे स्थापित केले जातील.
 

चालू घडामोडी


मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हस्ते डॉ. अमर पटनायक यांच्या 'पँडेमिक डिसप्शन अँड ओडिशा लेसनन्स इन गव्हर्नन्स' या पुस्तकाचे प्रकाशन

12 ऑक्टोबर 2022 रोजी, ओडिशाचे मुख्यमंत्री (मुख्यमंत्री), नवीन पटनायक यांनी ओडिशाचे राज्यसभा सदस्य (एमपी) डॉ. अमर पटनायक यांनी लिहिलेल्या 'पँडेमिक डिसप्शन अँड ओडिशाचे धडे इन गव्हर्नन्स' या पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक विटास्ता पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेडने प्रकाशित केले आहे.

हे पुस्तक 2020-21 आणि 2021-2022 या महामारीच्या वर्षांमध्ये भारतात उदयास आलेल्या संबंधित समकालीन समस्यांवरील विविध निबंधांचा संग्रह आहे.

यात डेटा गोपनीयता आणि नागरिकांच्या गोपनीयतेचा अधिकार, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित समस्या आणि या आपत्ती कमी करण्यासाठी ओडिशाच्या प्रयत्नांचा उदय झाल्याची नोंद करण्यात आली.
 

एनएसडीएलने ई-कॉम प्लॅटफॉर्म ONDC मध्ये 5.6% रु. 10 कोटींमध्ये विकत घेतले

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) ने डिजिटल कॉमर्स प्लॅटफॉर्म ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ONDC) मध्ये 5.6% हिस्सा विकत घेतला.

NSDL ने 10 लाख शेअर्स खरेदी करण्यासाठी रु. 10 कोटी गुंतवले जे 5.6% इक्विटी स्टेक मध्ये रूपांतरित होते.

हा धोरणात्मक करार भारतातील डिजिटल ई-कॉमर्स इकोसिस्टम मजबूत करेल.

ONDC ला वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग (DPIIT) द्वारे प्रोत्साहन दिले जाते.

विविध वस्तूंचे विक्रेते आणि खरेदीदारांना एकत्र आणणारे डिजिटल प्लॅटफॉर्म प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...