१७ ऑक्टोबर २०२२

चालू घडामोडी

अदानी समूहाला 6 सर्कलमध्ये दूरसंचार सेवा देण्यासाठी दूरसंचार विभागाकडून परवाना मिळाला आहे.

अदानी समूहाची उपकंपनी असलेल्या अदानी डेटा नेटवर्क्सला आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू आणि मुंबई या विभागातील दूरसंचार मंत्रालयाने (DOT) 6 मंडळांमध्ये सेवा उपलब्ध करून देण्यासाठी युनिफाइड परवाना मंजूर केला आहे.

अदानी डेटा नेटवर्क्सने 26GHz बँडमधील 400MHz स्पेक्ट्रमसाठी 212 कोटी रुपये खर्च केले आहेत.

गुजरात आणि मुंबईमध्ये कंपनीकडे 5G स्पेक्ट्रमचे 100 MHz आणि आंध्र प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 50 MHz आहे.

भारत सरकार (गोल) ने भारताच्या पहिल्या 5G स्पेक्ट्रम लिलावातून विक्रमी 1,50,173 कोटी रुपये (~ 1.5 लाख कोटी) कमावले, एकूण स्पेक्ट्रमच्या 71% विक्रीसह.

अलीकडील संबंधित बातम्या

सप्टेंबर 2022 मध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने 29 ऑगस्ट 2022 रोजी सलग तिसर्‍या वर्षी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तिची 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) 2022 आयोजित केली आणि RIL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) मुकेश अंबानी यांनी ही बैठक घेतली. कार्यक्रमात घोषणा देण्यात आल्या. भारतात 5G सेवा सुरू करण्यासाठी त्यांनी आपल्या मुख्य भाषणात 2 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली.

अदानी ग्रुप बद्दल

संस्थापक आणि अध्यक्ष - गौतम अदानी मुख्यालय - अहमदाबाद, गुजरात
  

चालू घडामोडी


IRDAI ने एचडीएफसी लाईफमध्ये एक्साइड लाइफचे विलीनीकरण मंजूर केले

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (एचडीएफसी लाईफ) मध्ये एक्साइड लाइफच्या विलीनीकरणासाठी अंतिम मंजुरी दिली आहे.

जानेवारी 2022 मध्ये एचडीएफसी लाइफने दक्षिण भारतीय बाजारपेठेत आपला ठसा वाढवण्यासाठी एक्साइड लाइफ इन्शुरन्स कंपनीमधील 100% भागभांडवल तिच्या मूळ कंपनी एक्साइड इंडस्ट्रीजकडून 6,687 कोटी रुपयांना विकत घेतले.

एक्साईड इंडस्ट्रीजने एचडीएफसी लाइफमधील 4.12% हिस्सा विकत घेतला आणि त्याचा जीवन विमा व्यवसाय एचडीएफसी लाइफकडे हस्तांतरित केला.

RBI ने 8 NBFC ची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द केली

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने भारतातील आठ नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांचे (NBFC) नोंदणी प्रमाणपत्र (CoR) रद्द केले.

चार NBFCs अश्विनी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड, RM सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड, Amity Finance Pvt Ltd आणि Matrix Merchandise Ltd ने RBI कडे त्यांची नोंदणी प्रमाणपत्रे सरेंडर केली आहेत.

चार NBFC; SRM प्रॉपर्टीज अँड फायनान्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, नॉर्थ ईस्ट रीजन फिनसर्व्हिसेस लिमिटेड, सौजानवी फायनान्स लिमिटेड आणि ओपल फायनान्स लिमिटेड यांनी त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र RBI कडे सादर केले आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 च्या कलम 45 - 1 च्या खंड (अ) नुसार, या कंपन्या बिगर बँकिंग वित्तीय संस्थेच्या व्यवसायात व्यवहार करणार नाहीत.

मराठी व्याकरण-समानार्थी शब्द

कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत
कठीण = अवघड
कविता = काव्य, पद्य
करमणूक = मनोरंजन
कठोर = निर्दय
कनक = सोने
कटी = कंबर
कमळ = पंकज, अंबुज, नलिनी, अळत, पद्म, सरोज, अंभोज, अरविंद, राजीव, अब्ज
कपाळ = ललाट, भाल, कपोल, निढळ, अलिक
कष्ट = श्रम, मेहनत
कंजूष = कृपण
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी
कान = श्रवण
कावळा = काक, एकाक्ष, वायस
कालांतराने = दिसामासा
काष्ठ = लाकूड
कासव = कूर्म, कामट, कमठ, कच्छप, कच्छ
किल्ला = गड, दुर्ग
किमया = जादू
कार्य = काम
कार्यक्षम = कुशल, दक्ष, निपुण, हुशार
कारागृह = कैदखाना, तुरुंग
कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज 
कुत्रा = श्वान
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
कोळिष्टक = जळमट
खण = कप्पा 
खल = नीच, दुष्ट, दुर्जन
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी, विहंग, व्दिज, अंडज, शकुन्त
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती
खाटा करणे = आंबवणे
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम
खोड्या = चेष्टा, मस्करी

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

 

1) ‘देवघर’ या शब्दाचे लिंग कोणते?

   1) स्त्रीलिंग    2) पुल्लींग   
   3) नपुंसकलिंग    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

2) सर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही.

   1) पंचमी    2) संबोधन   
   3) सप्तमी    4) षष्ठी

उत्तर :- 2

3) अबब ! केवढा हा उंचच उंच कडा. – वाक्याचा प्रकार सांगा.

   1) विधानार्थी    2) प्रश्नार्थी   
   3) उद्गारवाची    4) होकारार्थी

उत्तर :- 3

4) “हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते.”
     वरील वाक्यातील विधेय विस्तारक कोणते  ?

   1) हवा कोंदट असल्यास      2) मनुष्याची
   3) प्रकृती        4) बिघडते
उत्तर :- 1

5) पुढील पर्यायातू ‘भावे प्रयोग’ ओळखा.

   1) रामाने रावणास मारला      2) रामाकडून रावण मारला गेला
   3) राम रावणास मारील      4) रामाने रावणास मारले

उत्तर :- 4

6) पुढीलपैकी कोणता सामासिक शब्द समाहार व्दंव्द समासात आढळत नाही?

   1) केरकचरा    2) नीलकंठ   
   3) घरदार    4) मीठभाकर

उत्तर :- 2

7) दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल ?

   1) संयोग चिन्ह    2) अपूर्ण विराम   
   3) स्वल्पविराम    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

8) पुढीलपैकी कोणता शब्द ‘साधित’ शब्द नाही ?

   1) भांडखोर    2) बेजबाबदार   
   3) थोरवी    4) इमारत

उत्तर :- 4

9) ‘बांगडी फुटणे’ या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा.

   अ) पराभूत होणे    ब) काळोख होणे   
   क) वैधव्य येणे    ड) भांडण होणे
   1) अ फक्त बरोबर बाकी सर्व चूक    2) ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक
   3) क फक्त बरोबर बाकी सर्व चूक    4) ड फक्त बरोबर बाकी सर्व चूक

उत्तर :- 3

10) ‘तटिनी’ कुणाला म्हणतात  ?

   1) ताटातुटीला      2) नदीला   
   3) अटीतटी करणा-याला    4) तरटांनी बांधलेल्या झोपडीला

उत्तर :- 2

१६ ऑक्टोबर २०२२

कायमधारा पध्दत


   प्रायोगिक स्वरूपात :- इ.स. 1790
   कायम स्वरूपात :- इ.स. 1793
   ठिकाण :- बंगालa, बिहार, ओडिसा, उत्तर मद्रास, वाराणसी
   प्रमाण :- भारतातील एकूण शेतजमीनीच्या 19%
   महसूल वाटणी :- शासन, जमीनदार व शेतकरी
   संकल्पना :- लॉर्ड कॉर्नवॉलिस
   गव्हर्नर :- लॉर्ड कॉर्नवॉलिस
   प्रभाव :- सर जॉन शोअर
   इतर नावे - जहागिरदारी पध्दत, मालगुजारी पध्दत, बिसवेदारी पध्दत.
वॉरन हेस्टिंग याने जमीन महसुल वसुल करण्याच्या अधिकारांचे लिलाव करण्याची पध्दत स्विकारली होती. मात्र ही व्यवस्था काही उपयोगात ठरली नाही. यामुळे हेस्टिंग्जच्या या पध्दतीतील दुष्परिणाम दूर करण्यासाठी कॉर्नवॉलिसने 1789 मध्ये सर जॉन शोअरच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. सर जाॅन शोअर समितीच्या शिफारशी नुसार, कायमधारा पध्दत लॉर्ड कॉर्नवॉलिस याने बंगाल प्रांतात इ.स. 
1790 ला 10 वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर लागू केली होती, परंतू नंतर 1793 मध्ये कॉर्नवॉलिसने ही व्यवस्था कायमस्वरूपासाठी लागू केली. म्हणूनच या व्यवस्थेला कायमधारा पध्दत असे म्हणतात.
कायमधारा पध्दतीत जमीनीचा मालक जमीनदार असून प्रत्यक्ष शेतकरी हा भुदास असतो.
या पध्दतीत शेतसारा हा रोख स्वरूपात गोळा केला जात असल्याने या पध्दतीत व्यापारवादाची तत्वेदिसतात.
या व्यवस्थेत संपूर्ण जमिनीचे महसुल गोळा करण्याची जबाबदारी ही संपुर्णपणे जमिनादारांवरच सोपविण्यात आली.
शेतकऱ्यांकडून मिळालेल्या महसुलांपैकी विशिष्ट रक्कम ही जमिनदाराने ब्रिटीशांना महसुल रूपात देणे आवश्यक होते.
या व्यवस्थेनुसार जमिनदार व शेतकरी यांच्यात करारनाम्याची तरतूद होती जेणे करुन जमीनदाराला शेतकऱ्यांकडून ठराविक रक्कम महसूल रुपात मिळेल. परंतू तसे प्रत्यक्षात न झाल्यामुळे जमिनदार शेतकऱ्यांकडून कितीही महसुल वसुल करु शकत होता व ती जास्तीची रक्कम ही ब्रिटीशांना देण्याची 
गरजही नव्हती.
1799 मध्ये तर महसूलाची रक्कम वेळेत न मिळाल्यास जमिनदारास शेतकऱ्याची जमीन, अवजारे किंवा जनावरे जप्त करण्याचा अधिकार मिळाला व यासाठी त्यास न्यायालयाच्या परवानगीची गरज देखील नव्हती.
या व्यवस्थेचे खास वैशिष्ट्य म्हणजे जमीन महसुलाची रक्कम ही कायमची ठरविण्यात आली. यानुसार 89 टक्के सरकारला व 11 टक्के जमीनदारांना असे जमीन महसूलाच्या रकमेचे दोन भाग करण्यात आले होती.
शेतसारा हा 30 ते 40 वर्षेस्थिर असेल.यात वाढ करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळाला नाही.
या कायमधारा पध्दतीचे लाभार्थी हे केवळ जमिनदारच बनत असे.
या व्यवस्थेवर सर जॉन शोअर याचा प्रभाव होता.
जॉन शोअर समितीच्या शिफारसीनुसार या समितीत जेम्स ग्रँट आणि जोनार्थन डंकन हे इतर सदस्य होते.
ही पध्दत सुरूवातीला केवळ बंगाल प्रांतामध्ये लागु करण्यात आली हाेती. 
तिचा विस्तार पुढे बिहार, ओडिसा, उत्तर मद्रास, वाराणसी या भागांमध्ये करण्यात आला.
भारतातील एकुण शेतजमिनीच्या 19 % क्षेत्रफळावर ही पध्दत अस्तित्वात होती.
विल्यम बेंटिकने आपल्या 1829 च्या भाषणात कायमधारा पध्दतीचे फायदे स्पष्ट केले होते.

इतिहास प्रसिद्ध

   
” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले

‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन

“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता

राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम

“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह

“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.

” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.

” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष

” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन

” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी

” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी

” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय

‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी

“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर

“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार

” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
– गारेट ब्रिटीश इतिहासकार.

” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु

क्रांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.

“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.

” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.

“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे

“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.

“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक

इंग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक

खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना

1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स.

राष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) :


इ.स. 1905 बनारसच्या अधिवेशनात अध्यक्ष नामदार गोखल्यांनी ब्रिटिश सामज्यांतर्गत स्वराज्याचे ध्येय ठरवले.
इ.स. 1906 कोलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष दादाभाई नौरोजीनी ‘स्वराज्य’ हे अंतिम उद्दिष्ट असल्याचे सांगितले. राष्ट्रीय सभेच्या व्यासपिठावरून ‘स्वराज्य’ या ध्येयाची प्रथमच घोषणा. याच अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव मंजूर करण्यात आला.
1907 च्या सुरत अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यात फूट पडून काँग्रेसचे विभाजन झाले.
व्हाईसरॉय कर्झनच्या राजीनाम्यानंतर लॉर्ड मिंटो व्हाईसरॉय बनला.
भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाईसरॉय म्हणून रिपनला ओळखतात.
हार्डिंगने ब्रिटिशांची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला हलवली.

भारतमंत्री मॉन्टेंग्यूच्या रोपोर्टनूसार व्हाईसरॉय चेम्सफोर्डने प्रांतात वैध प्रशासनाचा (व्दिदल शासनपद्धती) प्रारंभ केला.
1919 ला पंजाब प्रांतात व्हाईसरॉय चेम्सफोर्डने रॉलेक्ट अॅक्ट लागू केला.
13 एप्रिल 1919 रोजी जालीयनवाला बाग हत्याकांड घडले.
लखनौ अधिवेशन (1916): या अधिवेशनात काँग्रेस 1907 नंतर सांधली गेली. या अधिवेशनाचे अध्यक्ष बाबू अंबिकाचरण मुजूमदार. या अधिवेशनात 1909 च्या मॉर्ले मिंटो कायद्याव्दारे मुस्लिमांना दिलेल्या स्वतंत्र मतदार संघाची तरतूद काँग्रेसने मान्य केली.
होमरूल चळवळ म्हणजे आपल्या देशाचा कारभार करण्याचा अधिकार आपणास मिळणे होय.
होमरूल चळवळ प्रथम आयर्लंडमध्ये सुरू केली होती.

होमरूल चळवळ प्रथम आयर्लंडमध्ये सुरू केली होती.
होमरूल चळवळ भारतात सुरू करण्याचे श्रेय आयरिश विदुषी अॅनी बेझेंटकडे जाते.
1 सप्टेंबर 1916 पासून मद्रास प्रांतात अॅनी बेझंट यांनी होमरूल चळवळ सुरू केली.
एप्रिल 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी बेळगाव येथे स्वतंत्रपणे होमरूल चळवळीसाठी संघटना स्थापन केली.

इ.स. 1795 :- खर्ड्याची लढाई


सदरील लढाई ही पेशवे व हैद्राबादचा निजाम यांच्यात फेब्रुवारी-मार्च 1795 साली महाराष्ट्रातील 
अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा (ता. जामखेड) येथे झालेली एक निर्णायक लढाई होती.
मराठा साम्राज्यवादी विस्तार करू इच्छिणाऱ्या नाना फडणवीसने हैद्राबादच्या निजामाकडे थकलेल्या चौथाईची मागणी केली होती. निजामाचा मंत्री मुशिर मुल्कने सदरील मागणी फेटाळून लावताच पेशवा, दौलतराव शिंदे (मादजी शिंदेचा 
वारस), तुकोजी होळकर व दुसरा रघुजी भोसले यांच्या संयुक्त फौजांनी मार्च 1795 मध्ये निजामाच्या प्रदेशावर आक्रमण केले. 
यावेळी निजामाने ब्रिटिशांकडे मदत मागितली असता ब्रिटिशांनी सदरील मदत नाकारली. परीणामी उघड्या मैदानावर मराठ्यांना तोंड देण्याचे सामर्थ्य निजामाकडे नसल्याने निजामाने खर्डा येथील किल्ल्याचा आश्रय घेतला. या किल्याला लगेचच मराठ्यांनी वेढा घातला व या किल्याला होणारा पाणी पुरवठा व अन्न पुरवठा खंडीत करुन किल्ल्या भोवती तोफा रचल्या.
अखेर भयग्रस्त निजामाने 13 मार्च 1795 साली तहाची याचना करून लढाईतून माघार घेतली व या तहाने सदरील लढाईची सांगता झाली. या लढाईत पराभुत झाल्यावर निजामानेही इंग्रजांची साथ सोडून दिली.
              या तहातील अटींनुसार, 
निजामाने मराठ्यांना 5 कोटी रुपये, थकलेल्या चौथाई देण्याचे मान्य केले.
स्वत:च्या ताब्यातील प्रदेशांपैकी एक तृतीअंश प्रदेश मराठ्यांचा स्वाधीन केला.
दौलताबादचा किल्ला तसेच त्याच्या भोवतालचा प्रदेश पेशव्याला देण्यात आला.
तसेच वऱ्हाडचा प्रदेश नागपूरच्या भोसल्यांना देण्यात आला.

महाराष्ट्राचा इतिहास मौर्य ते यादव इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०:


मौर्य साम्राज्याचा काळ :
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.

सातवाहन साम्राज्याचा काळ :
सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.

वाकाटकांचा काळ :
वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.

कलाचुरींचा काळ :

वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.

बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ :
वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.

वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ :
वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.

यादवांचा काळ :
महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...