१२ ऑक्टोबर २०२२

महत्वाचे दिनविशेष


0१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन

१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन

०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन

०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन

०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन

०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन

०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन

०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन

०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन

०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस

०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन

०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

नद्या

कृष्णा  -

उगम - महाबळेश्वर
कलांबी-282 कि.मी. (महाराष्ट्र), 1400 कि.मी. (भारत)

मुख्य उपनदया : कोयना, पंचगंगा, घटप्रभा, ताम्रपर्णी, येरळा

राजकिय क्षेत्र : सातारा. सांगली, कोल्हापूर

गोदावारी -

उगम-त्र्यंबकेश्वर

लांबी : 668 कि.मी. (महाराष्ट्र), 1465 कि.मी. (भारत)

गोदावरीला `दक्षिण भारताची गंगा' म्हणतात.

राजकीय क्षेत्र : नाशिक, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा

विदर्भातील वाशीम, यवतमाळ वर्धा इ.

उपनदया : मांजरा, पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती

तापी -

उगम : मुलताई (सातपुडा पर्वत) मध्य प्रदेश

लांबी : 208 कि.मी. (महाराष्ट्र), 724 कि.मी. (भारत )

राजकीय क्षेत्र : अमरावती, अरकोला, बुलढाणा, जळगाव,नंदुरबार, धुळे

उपनदया : चंद्रभागा, भुवनेश्वर, नंद, वान, कापरा, सिन,मोरना, नळगंगा

भारतीय न्यायव्यवस्था


भारतीय न्यायव्यवस्था ही एकेरी न्यायव्यवस्था आहे. ब्रिटिश कालखंडात ब्रिटीशांनी निर्माण केलेल्या रचनेप्रमाणे भारताने न्यायव्यवस्था स्वीकारली आहे. 1935 च्या भारतीय संघराज्यांच्या कायद्याने 26 जानेवारी 1950 रोजी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. भारतीय न्यायव्यवस्थेची रचना पुढील प्रमाणे आहे. शिरोभागी सर्वोच्च न्यायालय त्यानंतर विभागीय पातळीवर खंडपीठे त्यानंतर जिल्हा पातळीवर जिल्हा न्यायालय तर तालुका पातळीवर तालुका न्यायालय.

सर्वोच्च न्यायालय : घटना कलम क्र. 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आहे.

रचना :

1. न्यायाधीशांची संख्या :

सर्वोच्च न्यायालयामध्ये एक मुख्य न्यायाधिश आणि नव्याने तरतूद केल्याप्रमाणे इतर 30 न्यायाधिश असतात. न्यायाधिशांची संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे .

2. न्यायाधिशांची नेमणूक :

सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधिशांची नेमणून राष्ट्रपती स्वतःच्या सहीने करतो. इतर न्यायाधिशांची नेमणूक करताना राष्ट्रपती सरन्यायाधिशांचा सल्ला घेतो.

न्यायाधीशांची पात्रता :

तो भारताचा नागरिक असावा.
त्याने कमीत कमी पाच वर्ष उच्च न्यायालयात न्यायाधिश म्हणून काम केलेले असावे.
कमीत कमीत दहा वर्षापर्यंत एक किंवा जास्त न्यायालयात वकिली केलेली असावी.
राष्ट्रपतीच्या मते तो कायदेपंडित असावा.

कार्यकाल :

वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत तो पदावर राहतो किंवा तत्पूर्वी तो आपल्या स्वाइच्छेने राष्ट्रपतीकडे राजीनामा देतो.

शपथविधी :

घटना कलम क्र. 124/6 नुसार तिसर्‍या परिशिष्टात दिलेल्या नमुन्यानुसार भारताचा राष्ट्रपती शपथ देतो.

पदमुक्ती :

कोणत्याही न्यायाधीशास गैरवर्तन व अकार्यक्षमता या कारणावरून बडतर्फ करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे परंतु असे करण्यापूर्वी संसदेच्या प्रत्येक सभागृहाणे 2/3 बहुमताने तसा ठराव पास करणे आवश्यक आहे.

निवृत्तींनंतर व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे :

सर्वोच्च न्यायालयातील कोणत्याही न्यायाधीशाला सेवानिवृत्तींनंतर भारतातील कोणत्याही न्यायालयात वकिली करता येणार नाही कारण श्रेष्ठ न्यायाधिश जर वकिली करू लागले तर संबंधित न्यायाधीशांवर दबाव येऊ शकतो.

1. प्रारंभीक अधिकार क्षेत्र :

ज्या खटल्यांची सुरवात फक्त सर्वोच्च न्यायालयातच होते त्याला प्रारंभीक अधिकार क्षेत्र असे म्हणतात. पुढीलपैकी खटले फक्त सर्वोच्च न्यायालयातच चालतात. 1. भारत सरकार आणि घटकराज्य सरकार त्यांच्यातील वाद
2. घटकराज्यातील वाद
3. केंद्रसरकार आणि राज्यसरकारचा कायदेविषयक प्रश्न
4. मूलभूत अधिकारांचे संरक्षण इत्यदी.

2. पुनर्निर्णयाचे अधिकार क्षेत्र :

भारतीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला आहे.

3. परमार्षदायी अधिकार :

घटना कलम क्र. 43 नुसार भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक सल्ला सर्वोच्च न्यायालयाकडून घेण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.

4. अभिलेख न्यायालय :

129 व्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे. त्याला त्या न्यायालयाच्या बेअब्रुकरीत शिक्षा करण्याचे अधिकार मिळाले आहेत.

5. मूलभूत अधिकारांचे संरक्षण :

देशातील नागरिकाला मिळालेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला आहे.

विधानपरिषदेबद्दल संपूर्ण माहिती


घटकराज्यांमध्ये व्‍ही गृहदिग्‍य विधि विधान की नसावे याबाबद निर्णयाचा अधिकार भागला आहे. सध्या देशाला सहा राज्यांमध्ये विधानपरिषद आहे त्यात महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, प्रदेश, जम्मू काश्मीर आणि कर्नाटक घटकांचा समावेश आहे.

विधानपरिषदेची रचना :

1956 च्या 7 व्या घटनादुरूस्ती असे ठरवण्यात आले आहे, विधानपरिषदेची सदस्य संख्या कमी असावी आणि 40 पेक्षा जास्त नसावी. सध्या लोकसभा 78 सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. 171/2 नुसार विधानपरिषदेच्या राज्यबाद कायद्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत मूलभूतपणे 5/6 सदस्य निर्वाचित असतात तर 1/6 सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात. विधानपरिषदेतील सर्व सदस्य प्रत्यक्ष त्यांची निवड करून सदस्य नसतात.

विधानपरिषदेच्या सदस्यांची विभागणी :

1/3 विधान सभा सदस्य निवडले जातात.
1/3 स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात.
1/12 शिक्षक सदस्य संघातून सदस्य निवडले जातात.
1/12 पदवीधर विद्यार्थी संघाचे सदस्य निवडले जातात.
1/6 राज्यपाल सदस्य निवडले जातात स्थानिक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा विविध तज्ञ सदस्य असतात.

सदस्यांची पात्रता :

तो भारताचा नागरिक.
त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण उंची.
संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल सहा वर्षांचा असतो.

विधानपरिषदेचा कार्यकाल :

विधानपरिषद हे स्थायी आहे ते कधीही विसर्जित होत नाही. दर वर्षानी 1/3 सदस्य निवृत्त अहवाल आणि समान दोन घडणे त्यांच्या जागी निवडले जातात.

गणसंख्या : १/१०

विचार : दोन प्रश्नांमध्ये सहापेक्षा जास्त अंतर नसावे.

आमदार व उपसभापती :

विधानपरिषदेतून सदस्य सदस्य एका सदस्याची निवड तर निवडणूक तर एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.

११ ऑक्टोबर २०२२

VOCAB

Stature- कद, महत्ता
Moreover- इसके अलावा
Itinerary- यात्राविवरण
Premises- अहाता/भवन
Pretext- बहाना
Lapse- खत्म , त्रुटि
Fore- आगे का
Exemplary- अनुकरणीय
Trim- सुव्यवस्थित, काट छाँट करना
Recur- फिर आना
Forthwith- फौरन
Promulgated- प्रचार करना
Pip- अंतिम समय में पछाड़ देना
Importer- आयातकर्ता
Fragmented- टुकड़े टुकड़े होना
Contradictions- विरोधाभास
Cognizable- संज्ञेय
Nugatory- निरर्थक
Bigamy- द्विविवाह
Testimony- गवाही
Unwittingly- अनजाने में
Parleys- संधि वार्ता करना, संवाद
Lustrate-नहलाकर शुद्ध करना
Emulation- बराबरी की चेष्टा
Proviso- शर्त
Concocted- मनगढ़ंत
Oath- शपथ
Brace- तैयार करना
Spy- जासूस/गुप्तचर
Fortnight- दो सफ्ताह
Evocative- याद ताज़ा करने वाला
Scare- डरना
Lit up- प्रकाशित
Whispered- फुसफुसाया
Cumulative- संचय, जुड़ने वाला
Bereft- दुखी, वंचित
Soar- उड़ान, चढ़ना
Privy- शौचगृह या रहस्यपूर्ण
Hammer- पीटना, परास्त करना
Residual- अवशेष, हथौड़ा
Hovers- आस पास फिरना
Veer- दिशा बदलना
Attribute- विशेषता, श्रेय देना
Respite- विराम
Brass- पीतल
Steeplechaser- घुड़दौड़ प्रतियोगिता का घोड़ा, दौड़ में भाग लेने वाला प्रतियोगी
Plank- तख्ता, पटकना
Trashed- कचरा

_ चंद्राचा दरवाजा ठोठावणारा शेतकऱ्याचा मुलगा,

ISRO प्रमुख के सिवन यांचा प्रेरणादायी प्रवास

  _ ‘चंद्रयान 2’ (Chandrayaan 2) मोहिमेचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करणाऱ्या ‘इस्रो’चे (Indian Space Research Organisation- ISRO) प्रमुख म्हणून के सिवन (K Sivan) यांची ओळख जगाला झाली. तामिळनाडूतील सरकारी शाळेत शिकलेला शेतकऱ्याचा मुलगा ते ‘इस्रो’चं प्रमुखपद असा थक्क करणारा प्रवास कैलासवादीवू सिवन (Kailasavadivoo Sivan) यांनी केला आहे.

_ भारतीय अवकाश संशोधन संघटना अर्थात ‘इस्रो’चे ते अध्यक्ष, तर अवकाश विभागाचे ते सचिव आहेत. विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे ते माजी संचालक आहेत. भारताच्या अंतराळ मोहिमेसाठी क्रायोजेनिक इंजिनचा (cryogenic engines) विकास करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांना ‘रॉकेट मॅन’ (Rocket Man) असंही संबोधलं जातं.

_ सर्वसामान्य कुटुंबातला अभ्यासू मुलगा

के सिवन यांचा जन्म 14 एप्रिल 1957 रोजी तामिळनाडूमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. कैलासवादीवू हे सिवन कुटुंबातील पहिलेच पदवीधर होते. ते लहानपणापासूनच अभ्यासू आणि मेहनती असल्याचं त्यांचे काका सांगतात. सिवन कधीच शिकवणी किंवा क्लासेसना गेले नव्हते.

_ तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातील तारक्कनविलाई या आपल्या मूळ गावातील सरकारी शाळेत सिवन यांचं शिक्षण झालं. विशेष म्हणजे त्यांचं शालेय शिक्षण हे तामिळ माध्यमातूनच झालं. त्यानंतर नागरकोईलमधल्या एसटी हिंदू कॉलेजमधून त्यांनी पदवी संपादन केली.

_ 1980 मध्ये ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून त्यांनी एअरोनॉटिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. तर बंगळुरुतील आयआयएससीमधून एअरोस्पेस इंजिनिअरिंग विषयात 1982 मध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी (मास्टर्स) मिळवली. आयआयटी बॉम्बेमधून 2007 मध्ये त्यांनी एअरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी पूर्ण केली.

_ शिरपेचातील मानाचे तुरे

पोलर सॅटेलाईट लाँच वेहिकल (Polar Satellite Launch Vehicle – PSLV) प्रकल्पासाठी 1982 मध्ये के सिवन यांनी ‘इस्रो’ जॉईन केलं. या प्रकल्पात नियोजन, डिझाइन, एकत्रीकरण आणि विश्लेषण करण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. इस्रोमधील कार्यकाळात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या लीलया पेलल्या.

सिवन यांनी विकसित केलेल्या एका स्ट्रॅटेजीमुळे हवामान किंवा वाऱ्याची स्थिती कशीही असताना, कोणत्याही दिवशी रॉकेट लाँचिंग शक्य होतं. भारताने एकाच पीएसएलव्हीतून 104 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण करण्याचा विक्रम फेब्रुवारी 2017 मध्ये रचला होता. या मोहिमेचे ते प्रमुख होते. सिवन यांच्या नावे विविध जर्नल्समध्ये असंख्य संशोधनं प्रकाशित झाली आहेत.

_ आणि सिवन यांचा बांध फुटला…

चंद्रयान 2 मोहिमेच्या विक्रम लँडरसोबत संपर्क तुटल्यानंतर ‘इस्रो’तील सर्वच शास्त्रज्ञांचा हिरमोड झाला होता. इतक्या वर्षांची मेहनत आणि स्वप्न चंद्राच्या उंबरठ्यापाशी पोहचून धूसर झाल्याने सिवन यांनाही गहिवरुन आलं. सिवन यांना अनावर झालेला हा हुंदका त्यांच्या सच्चेपणाची साक्ष देतो, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

ऑक्टोबर दिनविशेष :-

2 ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन (म.गांधी जयंती)

4 ऑक्टोबर - जागतिक प्राणी दिन

5 ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन

8 ऑक्टोबर  - भारतीय हवाई दल दिन

11 ऑक्टोबर - जागतिक बालिका दिन

15 ऑक्टोबर - वाचन प्रेरणा
दिन / जागतिक विद्यार्थी दिन 

16 ऑक्टोबर - जागतीक अन्न दिन

20 ऑक्टोबर - जागतिक संख्याशास्त्र दिन

21 ऑक्टोबर  - पोलिस स्मृतिदिन

24 ऑक्टोबर - संयुक्त राष्ट्रसंघ दिन

31 ऑक्टोबर - राष्ट्रीय एकात्मता दिन

चालू घडामोडी


अपेक्षा फर्नांडिस ही जागतिक ज्युनियर जलतरण स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली

अपेक्षा फर्नांडिस ही जागतिक ज्युनियर जलतरण स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.  लिमा, पेरू येथे झालेल्या महिलांच्या 200 मीटर बटरफ्लाय स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने आठवे स्थान पटकावले.

17 वर्षीय भारतीय जलतरणपटूने बुधवारी अंतिम फेरीत 2:19.14 अशी वेळ नोंदवली आणि आठ जलतरणपटूंमध्ये शेवटचे स्थान पटकावले.

न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांची NALSA चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) चे पुढील कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  हे पद यापूर्वी भारताचे सरन्यायाधीश U. U. ललित यांच्याकडे होते.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी, न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि त्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले होते.

NALSA मुख्य कार्य : पात्र व्यक्तींना मोफत आणि सक्षम कायदेशीर सेवा प्रदान करण्यासाठी;  वादांचे सौहार्दपूर्ण निराकरण करण्यासाठी लोकअदालती आयोजित करणे आणि ग्रामीण भागात कायदेविषयक जनजागृती शिबिरे आयोजित करणे हे मुख्य कार्य आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (National Legal Services Authority (NALSA).

स्थापना : 9 नोव्हेंबर 1995

चालू घडामोडी

अभिनेते पंकज त्रिपाठी यांना निवडणूक आयोगाने 'राष्ट्रीय आयकॉन' घोषित केले

मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) अभिनेता पंकज त्रिपाठी यांना ECI चे 'नॅशनल आयकॉन' म्हणून घोषित केले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी या अभिनेत्याची देशभरातील कार्यप्रणाली आणि व्यापक आवाहन लक्षात घेऊन या सन्मानासाठी निवड केली होती .

'मतदार जागरूकता कार्यक्रम' वरील कार्यक्रमात, CEC राजीव कुमार यांनी ECI स्टेट आयकॉन पंकज त्रिपाठी, नागरिकांमध्ये मतदान जागृती निर्माण करण्यासाठी ECI सह सहकार्य केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि यापुढे त्यांना ECI साठी राष्ट्रीय आयकॉन म्हणून घोषित केले.

*अजय भादू यांची उपनिवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.*

अजय भादू यांची उपनिवडणूक आयुक्त म्हणून रविवारी केंद्राने केलेल्या वरिष्ठ-स्तरीय नोकरशाही फेरबदलाचा भाग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भादू, 1999 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) गुजरात केडरचे अधिकारी, यांची 24 जुलै 2024 पर्यंत या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रपतींच्या सचिवालयातील सहसचिव म्हणून त्यांची दोन महिन्यांची मुदतवाढ 25 सप्टेंबर रोजी संपली होती. त्यांची जुलै 2020 मध्ये माजी राष्ट्रपती राम नाथ कोविद यांचे सहसचिव म्हणून नियुक्ती झाली होती. यापूर्वी, भादू यांनी गुजरातचे वडोदरा महानगरपालिका आयुक्त म्हणून काम केले होते.

रतन टाटांना ‘सेवा रत्न’ पुरस्कार जाहीर

टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असणाऱ्या ‘सेवा भारती’ संस्थेकडून ‘सेवा रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

समाजसाठी केलेल्या वेगवेगळ्या कामांसाठी टाटा यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे.

रतन टाटांबरोबरच चलासनी बाबू राजेंद्र प्रसाद यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

या दोन्ही नामवंत व्यक्तींना ‘सामजिक विकासासाठी या व्यक्तींनी वेळोवेळी दिलेला निधी आणि योगदान’ यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे असं संस्थेने जारी केलेल्या पत्रकात म्हटल्याचं वृत्त दिलं आहे.

एकूण 24 व्यक्ती आणि संस्थांना समाज कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

हा पुरस्कार उत्तराखंडचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग (निवृत्त) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

तेलंगणामध्ये भारतातील पहिले वनविद्यापीठ सुरू होणार

भारताला लवकरच पहिले वनविद्यापीठ मिळणार आहे.  तेलंगणा विधानसभेने मंगळवारी युनिव्हर्सिटी ऑफ फॉरेस्ट्री (UOF) कायदा 2022 ला मंजुरी दिली.

‘युनिव्हर्सिटी ऑफ फॉरेस्ट्री (UOF) हे देशातील पहिलेच विद्यापीठ असेल.  जगात केवळ रशिया आणि चीनमध्ये वनविद्यापीठे असल्याने, जागतिक स्तरावर, हे वनशास्त्राचे तिसरे विद्यापीठ असेल.

तेलंगणा सरकारने हैदराबादमधील फॉरेस्ट कॉलेज आणि रिसर्च इन्स्टिट्यूट (FCRI) चा पूर्ण विद्यापीठात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. 

एकदा FCRI विद्यापीठात श्रेणीसुधारित झाल्यावर, पीएचडी, डिप्लोमा, आणि नागरी वनीकरण, नर्सरी व्यवस्थापन, कृषी-वनीकरण, आदिवासी जीवनवृद्धी, वन उद्योजकता, क्लायमेट-स्मार्ट फॉरेस्ट्री आणि फॉरेस्ट पार्क्स व्यवस्थापन यासह अतिरिक्त 18 कार्यक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.  .

जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी, विद्यापीठ शिक्षणाचे समन्वय साधण्यासाठी समान संस्थांचे नेटवर्क आणि भागीदारी करेल.  शेतकऱ्यांना व्यापक प्रशिक्षण देऊन विद्यापीठ कृती संशोधनाला चालना देईल.

हवेतील वायूंचे काही उपयोग

नायट्रोजन - सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो.

ऑक्सिजन - ज्वलनासाठी उपयोगी व  सजीवांना श्वसनासाठी आहे.

कार्बन डायॉक्साइड - वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यां मध्ये वापरतात.

अरगॉन - विजेच्या बल्बमध्ये वापर करतात.

हेलिअम - कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो.

निऑन - जाहिरातींसाठीच्या, रस्त्यांवरच्या दिव्यांत वापर केला जातो.

क्रिप्टॉन - फ्लूरोसेन्ट पाईपमध्ये वापर होतो. झेनॉन - फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो.

IDIOMS AND PHRASES

 

To cast about -  योजना आखणे

To cast up -  गणित करणे

To cast out-  नाकारणे

To cast aside-  नाकारणे ,बाद करणे

To come at - शोधून काढणे, प्राप्त करणे

To come in - आत येणे, प्रचारात येणे

To come in for - हिस्सा मिळणे

To come into-  वारसा मिळणे

To come off- अपेक्षित गोष्ट घडून येणे.

To come on-  आगेकूच करणे.

To come out  - प्रकाशित होणे, प्रसिध्द
होणे

To come out with  - उघड करणे, प्रसिध्दी देणे

To come over- एक बाजू बदलून दुसरीकडे जाणे

To come to -:संख्येने भरणे, एकूण होणे

To come up -  उगवणे

To do up  - बांधणे

To do with  - व्यवहार करणे, च्याशी संबंध येणे

To do without- वाचून भागविणे, चालविणे

To draw on -  मोह पाडणे, आकर्षित करणे

To draw in - दिवस लहान होणे

To draw up - कागदपत्रांचा मसुदा तयार करणे

To draw out  - दिवस मोठे होणे

To fall back - मागे फिरणे

To fall in -  रांग करणे

To fall off - अध:पतन होणे

To fall on - हल्ला करणे

To fall to - अचानक सुरूवात करणे

To give out  - उघडकीस आणणे, जाहीर करणे

To give forth - जाहिर करणे

To give over  - थांबणे, क्रिया थांबणे

To go against  - च्या विरुध्द जाणे

To ahead -  प्रगति करणे, आरंभ करणे

To go by  - जवळून जाणे, अनुसरून जाणे

एक शब्दाबद्दल शब्दसमूह

कृतज्ञ : उपकार जाणणारा

असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा

मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा

वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा

गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा

विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता

दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा

कवयित्री : कविता करणारी

तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत

स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू
   पाहणारा

तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा

दानशूर : खूप दानधर्म करणारा

दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा

अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे

गुराखी : गुरे राखणारा

निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा

अंगण : घरापुढील मोकळी जागा

गवंडी : घरे बांधणारा

चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा

शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...