०५ ऑक्टोबर २०२२

आयसीसी U-19 विश्वचषक स्पर्धा

वर्ष - यजमान - विजेता - उपविजेता

1988 - ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान

1998 - द. आफ्रिका - इंग्लंड - न्यूझीलंड

2000 - श्रीलंका - भारत - श्रीलंका

2002 - न्यूझीलंड - ऑस्ट्रेलिया - द. आफ्रिका

2004 - बांगलादेश - पाकिस्तान - वेस्ट इंडिज

2006 - श्रीलंका - पाकिस्तान - भारत

2008 -  मलेशिया - भारत - द. आफ्रिका

2010 - न्यूझीलंड - ऑस्ट्रेलिया - पाकिस्तान

2012 - ऑस्ट्रेलिया - भारत - ऑस्ट्रेलिया

2014 - युएई - द. आफ्रिका - पाकिस्तान

2016 - बांगलादेश - वेस्ट इंडिज - भारत

2018 - न्यूझीलंड - भारत - ऑस्ट्रेलिया

2020 - द. आफ्रिका - बांगलादेश - भारत

2022 - वेस्ट इंडिज - भारत - इंग्लंड

लता मंगेशकर यांंच्या जीवनावर आणि कार्यावर लिहिलेली पुस्तके

लता (इसाक मुजावर)

लता : संगीत क्षेत्रातील चंद्रमा (सांज शकुन प्रकाशन)

लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण करणारे ’स्वरयोगिनी’ नावाचे पुस्तक मधुवंती सप्रे यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायिलेल्या चित्रपटगीतांची यादी आहे.

The Voice of a Nation (मूळ लेखिका पद्मा सचदेव; मराठी अनुवाद : 'अक्षय गाणे' जयश्री देसाई)

ऐसा कहाँ से लाऊँ (हिंदी- पद्मा सचदेव)

लतादीदी आणि माझ्या कविता (सुचित्रा कातरकर)

लतादीदी : अजीब दर्शन हैं यह (मूळ लेखक : हरीश भिमाणी-हिंदी); (मराठी अनुवाद : 'लतादीदी' अशोक जैन.)

Lata in her own voice (नसरीन मुन्नी कबीर)

लता मंगेशकर (चरित्र)- राजू भारतन

लता मंगेशकर गंधार स्वरयात्रा (१९४५- १९८९) - संपादन : विश्वास नेरूरकर

गाये लता, गाये लता- डॉ.मंगेश बिच्छू. प्रकाशक- पल्लवी प्रकाशन

हे रत्‍न भारताचे - लता मंगेशकर (लेखक : रेखा चवरे)

मोगरा फुलला (संपादक : रेखा चवरे)

संगीतक्षेत्रातील चंद्रमा (प्रसाद महाडकर, विवेक वैद्य)

सप्तसुरांच्या पलीकडे : लता मंगेशकर (हरीश भिमाणी)

लता मंगेशकर - संगीत लेणे (मोरया प्रकाशन)

मासिकं आणि सुरू करणारे

दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर

इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?उत्तर----------- न्या. रानडे

मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर ----------- दादोबा पांडुरंग

निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे

महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
उत्तर ------------- लोकमान्य टिळक

आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ------------- पंडिता रमाबाई

हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
उत्तर-------------- महात्मा गांधी

भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले

गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर -------------- विनोबा भावे

सेवासदन ची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- रमाबाई रानडे

एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर-------------- न्या. रानडे

परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर------------- दादोबा पांडुरंग

दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर-------------- ग. वा. जोशी

शतपत्रे कोणी लिहली?
उत्तर------------ गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)

ग्रामगीता कोणी लिहली?
उत्तर------------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
__

विज्ञान

आम्लरोधी :

आम्लरोधी ही अशी औषधे आहेत जी अपचन आणि छातीतील जळजळ दूर करण्यासाठी तुमच्या पोटातील आम्लाचा प्रतिकार (तटस्थीकरण) करतात.

आम्लरोधी या बाबतीत मदत करू शकतात: 
अपचन

छातीत जळजळ किंवा आम्ल प्रतिवाह - जठर अन्ननलिका प्रतिवाह रोग (GORD) म्हणूनही ओळखले जाते.

पोटात व्रण
जठराची सूज (पोटाच्या आवरणाची जळजळ) 

Additional Information

प्रतिजैविक: 

ही अशी औषधे आहेत जी जीवाणूंची वाढ नष्ट करतात किंवा कमी करतात. 

प्रतिजैविकांचा वापर जीवाणूजन्य संसर्ग टाळण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी केला जातो.

वेदनाशामक:

वेदनाशामक, ज्याला पिडाहारीदेखील म्हणतात, ही अशी औषधे आहेत जी डोकेदुखीपासून, संधिवात जखमांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना कमी करतात.

शोथरोधी वेदनाशामकांमुळे जळजळ कमी होते, आणि अफूसवृश वेदनाशामक औषधे मेंदूची वेदना समजून घेण्याची पद्धत बदलतात.

जंतुनाशक:

जंतुनाशक हा एक पदार्थ आहे जो सूक्ष्मजीवांची वाढ थांबवतो किंवा कमी करतो.

शस्त्रक्रिया आणि इतर प्रक्रियेदरम्यान संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी ती वारंवार रुग्णालये आणि इतर वैद्यकीय प्रक्रियांमध्ये वापरले जातात.

मिल्क ऑफ मॅग्नेशिआ:

मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड हे मिल्क ऑफ मॅग्नेशिआत आढळते.

पोटाची जास्तीची आम्लता कमी करण्यासाठी हे आम्लरोधी म्हणून वापरले जाते.

भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

संस्था आणि संस्थापक

१८२८:- राजाराम मोहन राय - ब्राह्मो समाज
१८६५:- देवेंद्र नाथ टागोर - आदी ब्राह्मो समाज
१८६५ :- केशवचंद्र सेन -भारतीय ब्राह्मो समाज
१८६७ :- आत्माराम पांडुरंग तर्खडकर - पार्थना समाज
१८७२ :- आनंद मोहन बोस - सार्वजनिक समाज
१८७३ :- महात्मा फुले - सत्यशोधक समाज
१८६७:- टेलीग्राम चॅनलव्हीजेएस ईस्टडी
१८७५ :- स्वामी दयानंद सरस्वती - आर्य समाज
१८८० :- केशव चंद्र सेन - नावविधान समाज
१८८९ :- पंडिता रमाबाई - आर्य महिला समाज
१९०५ :- गोपाळ कृष्ण गोखले - भारत सेवक समाज
१९११ :- शाहू महाराज - सत्यशोधक समाज कोल्हापूर
१९१८ :- शाहू महाराज - आर्य समाज शाखा कोल्हापूर
१९२३ :- विठ्ठल रामजी शिंदे - तरुण ब्राह्मो समाज
१९५५ :- पंजाबराव देशमुख - भारत कृषक समाज

सोसायटी (Society)
१७८४ :- विलियम जोन्स - बंगाल अशियाटिक सोसायटी
१७८९ :- विलियम जोन्स - असियटीक सोसायटी
१८२२ :- जगनाथ शंकर सेठ - बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी
१८३८ :- जगन्नाथ शंकर सेठ - ग्रँट मेडिकल कॉलेज
१८५२ :- भाऊ दाजी लाड - ग्रँट मेडिकल सोसायटी
१८६२ :- सर सय्यद अहमद खान - सायंन्तफिक सोसायटी
१८६३ :- नवाब अब्दुल लतीफ - मोहमदम लिटररी
१८६४ :- सर सय्यद अहमद खान - ट्र्न्स्लशन सोसायटी
१८६५ :- दादाभाई नवरोजी - लंडन इडीयन सोसायटी
१८७५ :- मँडम ब्लावाट्सक्यी कर्नल अल्कोटा - थेओसोफिकल सोसायटी
१८६७:- टेलीग्राम चॅनलव्हीजेएस ईस्टडी
१९०१ :- शाहू महाराज - मराठा एजुकेशन सोसायटी
१९०५ :- श्यामजी क्रष्णा व्रमा -इंडियन होमरुल सोसायटी
१९०६ :- शाहू महाराज - किंग एड्वर्ड मोहमदन एजुकेशन सोसायटी
१९४५ :- बाबासाहेब आंबेडकर - पीपल्स एजुकेशन सोसायटी.

चालू घडामोडी


प्रख्यात इतिहासकार बी. शेख अली यांचे नुकतेच निधन झाले

प्रख्यात इतिहासकार आणि मंगलोर आणि गोवा विद्यापीठांचे पहिले कुलगुरू प्राध्यापक बी. शेख अली यांचे निधन झाले.

1986 मध्ये भारतीय इतिहास काँग्रेसच्या 47 व्या अधिवेशनात ते सरचिटणीस आणि 1985 मध्ये दक्षिण भारत इतिहास काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष होते.

ते राज्योत्सव पुरस्कार प्राप्तकर्ते आहेत आणि त्यांनी इंग्रजीमध्ये एकूण 23 पुस्तके लिहिली आहेत.

लडाखमध्ये राष्ट्राचे पहिले “नाईट स्काय अभयारण्य” स्थापन केले जाणार आहे

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की , लडाखमधील हानले येथे भारतातील पहिले 'रात्रीचे आकाश अभयारण्य' पुढील तीन महिन्यांत उभारले जाणार आहे . 

भारत सरकारचा हा एक अनोखा आणि पहिलाच उपक्रम आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार प्रस्तावित गडद आकाश राखीव हानले, लडाख येथे स्थित असेल आणि भारतातील खगोल-पर्यटनाला चालना देईल.

UP: प्रत्येक घरात आरओ पाणी असणारे भरतौल हे राज्यातील पहिले गाव ठरले आहे

भरतौल हे उत्तर प्रदेशातील पहिले गाव ठरले आहे ज्याने प्रत्येक घराला आरओ पाणी पुरवठा करण्याचा मान मिळवला आहे.

भरतौल हे बरेलीच्या बिथिरी चैनपूर ब्लॉकमध्ये आहे. येथे सुमारे 7,000 लोक आहेत आणि प्रत्येक घराला स्वच्छ आणि सुरक्षित RO पाणी पुरवले जाते. आरओची स्थापना आदर्श ग्रामपंचायत उपक्रमांतर्गत करण्यात आली आहे ज्यामुळे गावाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळू शकते.

आत्तापर्यंत गावात चार आरओ प्लांट बसवण्यात आले असून आणखी आरओचे काम सुरू आहे.

हे आरओ प्लांट मुख्य पुरवठा टाक्यांशी जोडले गेले आहेत जे प्रत्येक घराला शुद्ध पाणी पुरवण्यास मदत करतात.

विज्ञानातील शोध आणि संशोधक

विमान – राईट बंधू
डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
रडार - टेलर व यंग

रेडिओ - जी. मार्कोनी
वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
थर्मामीटर - गॅलिलीयो
हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

विजेचा दिवा - एडिसन
रेफ्रीजरेटर - पार्किन्स
वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
ग्रामोफोन - एडिसन

टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
उत्क्रांतिवाद - डार्विन
भूमिती - युक्लीड

देवीची लस - जेन्नर
अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
अँटी रेबीज -लुई पाश्चर

इलेक्ट्रोन – थॉमसन
हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
न्यूट्रोन – चॅडविक

आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

पोलिस भरती मागदर्शन


उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाला.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी गायन व वादन या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांस गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

रविंद्र नाट्यमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन 2020 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशया पुरस्कार सोहळयाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘स्वर-लता’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेकर यांना तर सन 2021 चा पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक पं.हरीप्रसाद चौरसिया यांना प्रदान करण्यात आले होते.

उषा मंगेशकर यांनी केवळ हिंदी आणि मराठीच नाही तर वेगवेगळ्या प्रांतांतल्या वेगवेगळ्या भाषांमधून गाणी गायिली आहेत.

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीनं संपूर्ण विश्वाला मोहिनी घातली आहे. त्यांच्या बासरीचे सूर ही केवळ त्यांचीच नाही तर सगळ्या हिंदुस्तानची ओळख आहे.

2021 मध्ये विदेशी पर्यटकांसाठी तामिळनाडू आणि महाराष्ट्र ही प्रमुख ठिकाणे आहेत

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या अहवालानुसार , 2021 मध्ये महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक विदेशी पर्यटकांनी भेट दिली , अनुक्रमे 1.26 दशलक्ष आणि 1.23 दशलक्ष. 'इंडिया टुरिझम स्टॅटिस्टिक्स 2022' नावाचा 280 पानांचा अहवाल वायस यांनी प्रसिद्ध केला.

भारताला 2021 मध्ये 677.63 दशलक्ष देशांतर्गत पर्यटक भेटी मिळाल्या, 2020 मध्ये 610.22 दशलक्ष वरून 11.05 टक्क्यांनी वाढ झाली, असे अहवालात म्हटले आहे.

स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार

इंदूरला सलग सहाव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर टॅग मिळाला: स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार

केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण 'स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022' चे निकाल जाहीर झाल्यामुळे इंदूरने सलग सहाव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब पटकावला .

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या श्रेणीत मध्य प्रदेशने प्रथम क्रमांक पटकावला, त्यानंतर छत्तीसगढ आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

सुरत हे दुसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर आहे आणि एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.

100 पेक्षा कमी शहरी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या राज्यांमध्ये त्रिपुराने अव्वल क्रमांक पटकावला आहे.

एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये, महाराष्ट्रातील पाचगणी प्रथम क्रमांकावर आहे, त्यानंतर छत्तीसगडचे पाटण (एनपी) आणि महाराष्ट्राचे कऱ्हाड आहे.

1 लाखांहून अधिक लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये हरिद्वारला सर्वात स्वच्छ गंगा शहर म्हणून घोषित करण्यात आले, त्यानंतर वाराणसी आणि ऋषिकेश यांचा क्रमांक लागतो.

चालू घडामोडी प्रश्न

१) चीनने कोणत्या देशाच्या समुद्रात क्षेप्नाश्त्र हल्ला केला आहे?
(१)रशिया
(२) तैवान
(३) श्रीलंका
(४)भारत
उत्तर:(२) तैवान
 
२)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मागीलअडिच वर्षात १० हजार बालविवाह झाले आहे?
(१) रायगड
(२)नंदुरबार
(३) पुणे
(४) नाशिक
उत्तर:(२) नंदुरबार
 
३)४९ वे होणारे सरन्यायाधीश “उदय लळीत” हे महाराष्ट्रातील मुळचे कोणत्या जिल्ह्यातील आहे?
(१) रायगड
(२) सिंधुदुर्ग
(३) रत्नागिरी
(४)पुणे
उत्तर:(२) सिंधुदुर्ग
 
४) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उंचउडीत “तेजस्विन शंकर” ला कोणते पदक मिळाले आहे?
(१) सुवर्णपदक
(२) रौप्यपदक
(३) कांस्यपदक
(४)यापैकी नाही
उत्तर:(३) कांस्यपदक
 
५)T-२० मध्ये २००० धावा पूर्ण करणारी जगातील पहिली महिला क्रिकेटर कोण बनली आहे?
(१) मिताली राज
(२) स्मृती मानधना
(३) हरमनप्रीत कौर
(४) प्रीती राऊत
उत्तर:(२) स्मृती मानधना
 
६)नुकतेचभारतातील १० स्थळांना “रामसर यादीत” टाकले आहे तर भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे?
(१) ४९
(२) ५४
(३) ६४
(४)७४
उत्तर:(३) ६४
 
७) कोणत्या राज्य सरकारने “चिराग” योजना सुरु केली आहे?
(१) हरियाना
(२) आसाम
(३) गुजरात
(४)पंजाब
उत्तर:(१) हरियाना
 
८)fortune ग्लोबल ने जरी केलेल्या जगातील top ५०० कंपनीमध्ये कोणती कंपनी प्रथम क्रमांकावर आहे?
(१) apple
(२) गुगल
(३) अमेजोन
(४) walmart
उत्तर:(४) walmart
 
९)भारत आणि कोणत्यादेशात ऑक्टोंबर २०२२ मध्ये“युद्ध अभ्यास” युद्धसराव आयोजित होणार आहे?
(१) रशिया
(२) जपान
(३) अमेरिका
(४)चीन
उत्तर:(३) अमेरिका
 
१०) चर्चेत असलेल्या भारतीय पहिल्या महिला स्वतंत्र समुद्र निगराणी मिशन चे प्रमुख(कप्तान) कोण आहे?
(१) शिवांगी
(२) आंचल शर्मा
(३) अपूर्वा गीते
(४)पूजा शेखावत
उत्तर:(२) आंचल शर्मा
 
११) कोणत्या राज्यात “ऑपरेशन मुक्ती’ अभियान सुरु केले आहे?
(१) सिक्कीम
(२) केरळ
(३) ओडिशा
(४)उत्तराखंड
उत्तर:(४) उत्तराखंड
 
१२) युनेस्को ने कोणत्या राज्यातील “लंगत सिंह खगोलीय वेधशाळा” ला जगातील लुप्त वेधशाळेच्या सूचित जोडले आहे?
(१) झारखंड
(२) बिहार
(३) राजस्थान
(४)तेलंगाना
उत्तर:(२) बिहार
 
१३) कोणाला प्रधानमंत्री कार्यालय (PMO) कार्यालयाचे निदेशक म्हणून निवडले आहे?
(१) अनिकेत गोविंद
(२) श्वेता सिंह
(३) समीर चौधरी
(४)प्रियांका सिंह
उत्तर:(२) श्वेता सिंह
 
१४) “डू DIFFRANT : द ANTOLD धोनी” पुस्तकाचे लेखक कोण आहे?
(१) अमितसिन्हा
(२) जॉय भट्टाचार्य
(३) वरील दोन्ही
(४)यापैकी नाही
उत्तर:(३) वरील दोन्ही
 

०४ ऑक्टोबर २०२२

दिनविशेष

  

४ ऑक्टोबर :- घटना

१८२४: मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.

१९२७: गस्टन बोरग्लम याने माऊंट रशमोअर चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.

१९४०: ब्रेनर पास येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.

१९४३: दुसरे महायुद्ध – अमेरिकेने सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.

१९५७: सोविएत रशियाने स्पुटनिक-१ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.

१९५९: सोविएत रशियाच्या ल्युनिक-३ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्‍या भागाची छायाचित्रे घेतली.

१९८३: नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट – २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.

२००६: ज्युलियन असांज यांनी विकिलीक्स सुरू केले.

४ ऑक्टोबर :- जन्म

१८२२: अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष रुदरफोर्ड हेस यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १८९३)

१८८४: भारतीय इतिहासकार आणि लेखक रामचंद्र शुक्ला यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९४१)

१९१३: शास्त्रीय गायिका सरस्वतीबाई राणे यांचा जन्म. (मृत्यू: १० ऑक्टोबर २००६)

१९१३: हैती देशाचे पहिले पंतप्रधान मार्टिअल सेलेस्टीन यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी २०११)

१९१६: अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला यांचा जन्म.

१९२८: अमेरिकन पत्रकार व लेखक ऑल्विन टॉफलर यांचा जन्म.

१९३५: मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक अरुण सरनाईक यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९८४)

१९३७: इंग्लिश लेखिका व अभिनेत्री जॅकी कॉलिन्स यांचा जन्म).

४ ऑक्टोबर :- निधन

१६६९: डच चित्रकार रेंब्राँ यांचे निधन. (जन्म: (जन्म: १५ जुलै १६०६)

१८४७: महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १७९३)

१९०४: स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे रचनाकर फ्रेडेरीक ऑगस्टे बर्थॉल्ड यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १८३४)

१९२१: गायक, नट केशवराव भोसले यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १८९०)

१९४७: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स प्लँक यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८५८)

१९६६: सत्यकथा चे संपादक अनंत अंतरकर यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९११)

१९८२: मराठी कवी सोपानदेव चौधरी यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १९०७)

१९८९: संगीतकार, गायक व नट संगीतभूषण पं. राम मराठे यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १९२४)

१९९३: अभिनेते जॉन कावस यांचे निधन.

२००२: वृत्तपट निवेदक भाई भगत यांचे निधन.

२०१५: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता एडिडा नागेश्वर राव यांचे निधन. (जन्म: २४ एप्रिल १९३४).

एका ओळीत सारांश, 03 ऑक्टोबर 2021


दिनविशेष

2021 साली ‘राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस’ (01 ऑक्टोबर) याची संकल्पना - "रक्त द्या आणि जगाचे विस्पंदन अबाधित ठेवा".

संरक्षण

भारत आणि श्रीलंका यांच्या 'मित्र शक्ती' नामक संयुक्त सैन्य कवायतीची 8 वी आवृत्ती _ येथे 4 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2021 या कालावधीत आयोजित केली जाईल - श्रीलंका.

आंतरराष्ट्रीय

भारत आणि ____ यांच्यात औद्योगिक सुरक्षा करार (ISA) शिखर परिषद 27 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर 2021 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित केली गेली - अमेरिका.

भारतातील महिला उद्योजकांना मदत करण्यासाठी अमेरिकेचा सार्वजनिक-खासगी उपक्रम – महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी अमेरिका-भारत युती.

राष्ट्रीय

'वेटलँड्स ऑफ इंडिया पोर्टल' (http://indianwetlands.in/) हे _ याच्या भागीदारीत पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या "जैवविविधता आणि हवामान संरक्षणासाठी पाणथळ भूमीप्रदेशांचे व्यवस्थापन" प्रकल्पाच्या (वेटलँड्स प्रोजेक्ट) अंतर्गत विकसित केले गेले आहे - जर्मनी (GIZ GmbH).

___ संस्थेने जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज (225 फूट लांब, 150 फूट रुंद आणि 1400 किलो वजनाचा) तयार केला आहे, ज्याचे अनावरण लेह येथे करण्यात आले - खादी आणि ग्रामोद्योग आयोग (KVIC).

नमामी गंगे कार्यक्रमाचे शुभंकर - चाचा चौधरी (कॉमिक पात्र).

व्यक्ती विशेष

चार वर्षांच्या द्वितीय कार्यकाळासाठी नियुक्ती झालेले ‘संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधी’ (UNFPA) याचे कार्यकारी संचालक - नतालिया कानेम (पनामा).

नेपाळमधील धौलागिरी पर्वत (8,167 मीटर उंचीचे जगातील सातव्या क्रमांकाचे शिखर) याच्या शिखरावर यशस्वीरित्या पोहोचल्याने, 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीचा कोणताही पर्वत परिपूरक ऑक्सिजनशिवाय सर करणारे पहिले भारतीय नागरिक - पियाली बसक (महिला).

क्रिडा

पहिल्या महिला क्रिकेटपटू, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5000 धावा आणि 300 बळी घेण्याचे दुहेरी यश प्राप्त केले - एलीस पेरी (ऑस्ट्रेलिया).

राज्य विशेष

_________ सरकार 01 ऑक्टोबर 2021 पासून 'वन्यजीवन आठवडा' राबवित आहे - महाराष्ट्र.

_ राज्याच्या इदायुर मिरची आणि कुट्टीअत्तूर आंबा यांना भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाला - केरळ.

_ राज्याच्या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाला - अलिबाग (महाराष्ट्राचा रायगड जिल्हा).

_ राज्याच्या चिन्नोर तांदळाला भौगोलिक संकेत (GI) टॅग प्राप्त झाला - मध्य प्रदेश.

सामान्य ज्ञान

रिसर्च अँड अनॅलिसिस विंग (RAW) - स्थापना: 21 सप्टेंबर 1968; मुख्यालय: नवी दिल्ली.

आर्थिक गुप्तचर परिषदेची स्थापना - वर्ष 1990.

प्रथम गुन्हे अन्वेषण विभाग (CID) याची स्थापना – वर्ष 1902 (लखनऊ शहरात).

____ या वर्षी गुन्हे अन्वेषण विभाग (CID) विशेष शाखा, CID आणि गुन्हे शाखा (CB-CID) या दोनमध्ये विभागली गेली – वर्ष 1929.

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...