०२ ऑक्टोबर २०२२

ऑस्ट्रेलियाने ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2022 जिंकला

3 एप्रिल 2022 रोजी न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये इंग्लंडचा 71 धावांनी पराभव करून सातव्या महिला विश्वचषकावर कब्जा केला. 

ऑस्ट्रेलियाने बोर्डावर 356 धावांचा विक्रम नोंदवला . 

ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीने सामन्यात 170 धावा केल्या, जो विश्वचषक फायनलमध्ये कोणत्याही क्रिकेटपटू, पुरुष किंवा महिलांनी केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. 

ती या स्पर्धेत ५०९ धावांसह सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती.

अ‍ॅलिसा हिलीला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू मिळाला. 

इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोनने २१ बादांसह या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या. 

2022 ICC महिला क्रिकेट विश्वचषक ही महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची 12वी आवृत्ती होती. 

व्यवसायावर आधारित जाती

  आजीवक - भिक्षूक

  किर - पुराणातील गंधर्व सारखी  
     गायक जात

  कापडणीस - राजाच्या वस्त्राची
     देखभाल करणारा

  ख्वाजा - मुसलमनातील एक पोटजात

खोत - कोकणातील एक वतनदार

  गुरव - शंकराचे पुजारी

  धोबी - परीट, रजक

  धनगर - शेळ्या,मेंढ्या राखणारी जात

  नंबुद्री - दक्षिणेकडील ब्राम्हणाची एक जात

  भडभुंजा - चुरमुरे, पोहे तयार करणारा

  पाथरवट - दगडफोड करणारा

  मशालजी - मशाल धरणारा

  मालगुजारी - जमीन खंडाने देणारा

  माथाडी - डोक्यावरून ओझे वाहून नेणारा

  मोदी - धान्य दुकानदार

  मलंग - फकिराचा एक पंथ

  माहूत - हत्ती हाकणारा

  सणगर - घोंगड्या विकणारी एक जात

  वडार - दगड फोडणारी एक जात

  बोहरीण - जुने कपडे देऊन नवीन
    भांडे देणारी फेरीवाली बाई

सम संख्यांचे गुणधर्म


सर्व सम संख्यांना 2 ने नि:शेष भाग जातो.

क्रमागत सम संख्यात 2 था फरक असतो.

कोणत्याही नैसर्गिक संख्यांची दुप्पट सम संख्या असते.

दोन किंवा जास्त सम संख्याची बेरीज, गुणाकर, वजाबाकी, ही सम संख्याच असते.

कोणत्याही सम संख्येत एक मिळवल्यास किवा वजा केल्यास विषम संख्या मिळते.

पूर्णांक संख्या ( I) 

धन संख्या, ॠण संख्या व शून्य या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात.

उदा:

-3,-2,-1

0

1,2,3

" 0 "हा मध्यवर्ती बिंदू आहे.

1) सर्वात मोठी ॠणपूर्णांक संख्या = -1
2) सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही.

  पूर्ण संख्या ( W)  

0,1,2,3,--------------या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात.
सर्वात लहान पूर्ण संख्या - 0
सर्वात मोठा पूर्ण संख्या सांगता येत नाही.

नैसर्गिक संख्या ( N)

1,2,3,4,------------या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात.
ह्या संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात म्हणून यांना मोजसंख्या म्हणतात.
नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्या येते.
नैसर्गिक संख्यांचा गुणाकर नैसर्गिक संख्या येतो.
सर्वात लहान नैसर्गिक संख्या - 1

भारतातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर असणारे व्यक्ति.

पी के चामलिंग : सिक्कीम : २४.५ वर्ष
जयोती बसु : प. बंगाल : २३.४ वर्ष
जी अपांग : अरुणाचल : २२.८ वर्ष
लाल थानहवला : मिझोरम : २१.१ वर्ष
वीरभद्र सिंह : हिमाचल : २१.१ वर्ष
नवीन पटनायक : ओरिसा : २०.८ वर्ष (मुख्यमंत्री पदावर आहेत)
माणिक सरकार : त्रिपुरा : २० वर्ष
एम करुणानिधी : तमिळनाडू : १९ वर्ष
वाय एस परमार : हिमाचल : १८ वर्ष
एम एल सुखडिया : राजस्थान : १६.६ वर्ष
परतापसिंह राणे : गोवा : १५.१० वर्ष
एस सी जमीर : नागालँड : १५.५ वर्ष
तरुण गोगोई : आसाम : १५ वर्ष
शिला दीक्षित : दिल्ली : १५ वर्ष
ओ आय सिंह : मणिपूर : १५ वर्ष
रमण सिंह : छत्तीसगढ : १५ वर्ष

एस के सिन्हा : बिहार : १४.१० वर्ष

ज जयललिता : तमिळनाडू : १४.५ वर्ष
वी संगमा : मेघालय : १४.५ वर्ष
नितीश कुमार : बिहार : १४.३ वर्ष (मुख्यमंत्री पदावर आहेत) .

भारतीय शहरांची टोपणनावे

१. गोल्डन (सुवर्ण) सिटी – अमृतसर

२. भारताचे मैनचेस्टर – अहमदाबाद

३. सात बेटांचे शहर – मुंबई

४. स्पेस सिटी – बँगलोर

५. भारताचे बगीचा (गार्डन) शहर – बँगलोर

६. भारताची सिलिकॉन वैली – बँगलोर

७. भारताचे इलेक्ट्रॉनिक शहर – बँगलोर

८. अरबी समुद्राची राणी – कोचीन

९. गुलाबी शहर – जयपुर

१०. भारताचे प्रवेशद्वार – मुंबई

११. ट्विन सिटी – हैद्राबाद, सिकंदराबाद

१२. सणांचे शहर – मदुरई

१३. दख्खनची राणी – पुणे

१४. इमारतींचे शहर – कोलकाता

१५. दक्षिण गंगा – गोदावरी

१६. दक्षिणेकडील मैनचेस्टर – कोयम्बटूर

१७. सोयाबीनचा प्रदेश – मध्य प्रदेश

१८. नवाबांचे शहर – लखनऊ

१९. पूर्वेकडील वेनिस – कोचीन

२०. बंगालचे अश्रू – दामोदर नदी

२१. बिहारचे अश्रू – कोसी नदी

२२. निळा पर्वत – नीलगिरी

२३. पर्वतांची राणी – मसूरी (उत्तराखंड)

२४. पवित्र नदी – गंगा

२५. भारताचे हॉलीवुड – मुंबई

२६. किल्ल्यांचे शहर – कोलकाता

२७. पाच नद्यांचे राज्य – पंजाब

२८. तलावांचे शहर – श्रीनगर

२९. भारताचे पोलादी शहर – जमशेदपुर (टाटानगर)

३०. मंदिरांचे शहर – वाराणसी

३१. उत्तरेकडील मैनचेस्टर – कानपूर

३२. भारताचे स्वर्ग – जम्मू आणि काश्मीर

३३. मसाल्यांचे राज्य – केरळ

३४. भारताचे स्विट्ज़रलैंड – काश्मीर

३५. भारताचे बॉस्टन – अहमदाबाद

इतिहासातील घटना

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना.....

भारतात रेल्वे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली?
   - लॉर्ड हार्डींग्ज पहिला

इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कोणते?
   - बॉम्बे हेराॅल्ड.

भारतातील पहिली जातीय संघटना कोणती?
   - मुस्लिम लीग

टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?
   - 1780 ची पाल्लुतुरची लढाई

भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी?
   - लॉर्ड कॅनिंग

निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला?
   - बंगाल प्रांतात

1858 च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री?
   - लॉर्ड स्टैनले

1857 च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये?
   - 34 वी एन. आय. रजिमेंट

इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते?
   - कलकत्ता विद्यालय

मानवी शरीर प्राथमिक माहिती


1 मानवी डोके वजन: - 1400 ग्रॅम असते.

2 सामान्य रक्तदाब: - 120/80 मि. मी.

3 शरीरातील सर्वात मोठे स्नायू: - न्यूरॉन

4 रक्तामध्ये एकूण रक्त: - 5 ते 6 लिटर

5 सर्वात लहान हाड: - स्थिती (कान हाड)

6 सर्वात मोठी हाड: -फिमर / थाई बोन

7 लाल रक्तपेशींचे आयुष्यः - 120 दिवस.

8 पांढरे रक्त पेशी: 5000 ते 10000 प्रति सें.मी. सेमी

9. पांढऱ्या रक्त पेशींचे आयुष्यः - 2 ते 5 दिवस.

10 रक्तातील प्लेटलेटचे माउंटः -2 लाख ते 4 मिलियन क्यूबिक सेंटीमीटर

11. सामान्य हृदयगती: - 72 ते 75 मिनिटे प्रति मिनिट

12. पल्स दर (नाडीचा दर): - 72 प्रति मिनिट.

13 सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: - थायरॉईड ग्रंथी.

14 सर्वात मोठे स्नायू - ग्लुटियस मायक्मीस

15 एकूण सेल प्रकारांची संख्या - 63 9

16 प्रौढांमध्ये दातांची संख्या - 32

17 मुलांमध्ये दातांची संख्या - 20 दात ते दुध.

18. सर्वात पातळ त्वचा - पापणी

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे

.         

शिखराचे नाव - उंची(मीटर)  -जिल्हे🔹

कळसूबाई -  1646 - नगर

साल्हेर - 1567  - नाशिक

महाबळेश्वर - 1438 - सातारा

हरिश्चंद्रगड  - 1424 -  नगर

सप्तशृंगी - 1416 - नाशिक

तोरणा - 1404  - पुणे

राजगड -  1376 -  पुणे

रायेश्वर - 1337-  पुणे

शिंगी - 1293 - रायगड

नाणेघाट -  1264  -  पुणे

त्र्यंबकेश्वर -  1304 - नाशिक

बैराट - 1177 - अमरावती

चिखलदरा - 1115  - अमरावती

महाराष्ट्र पोलिस भरती - महत्वाचे


रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
    उत्तर--------- स्वामी विवेकानंद

  आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
     उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती

प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
    उत्तर--------- आत्माराम पांडुरंग

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
    उत्तर----------महात्मा फुले

दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
    उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर

इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?           
    उत्तर----------- न्या. रानडे

मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर ----------- दादोबा पांडुरंग

  निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे

महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
    उत्तर ------------- लोकमान्य टिळक

आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ------------- पंडिता रमाबाई

हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
    उत्तर-------------- महात्मा गांधी

भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले

  गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
    उत्तर -------------- विनोबा भावे

सेवासदन ची स्थापना कोणी केली?
    उत्तर-------------- रमाबाई रानडे

एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ
    कोणी लिहला?
    उत्तर-------------- न्या. रानडे

परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर------------- दादोबा पांडुरंग

  दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
    उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर-------------- ग. वा. जोशी

  शतपत्रे कोणी लिहली?
    उत्तर------------ गोपाल हरी देशमुख
                               (लोकहितवादी)

  ग्रामगीता कोणी लिहली?
    उत्तर------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला.
    उत्तर. ---------- सावित्रीबाई फुले

एकूण शतपत्रांची संख्या किती होती?
    उत्तर --------------  एकूण 108 होती

काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

      परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे

हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
द वॉल : राहुल द्रविड
ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
ब्लॅक पर्ल : पेले
मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
गोल्डन गर्ल : पी टी उषा
आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
जंम्बो : अनिल कुंबळे
युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
टर्मिनेटर : हरभजन सिंह

विविध चालू घडामोडी

हॅट्स ऑफ नादिया..! तालिबान्यांमुळं देश सोडला, ११ भाषा शिकल्या, २०० गोल केले आणि आता बनली डॉक्टर :
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य आहे. तालिबानने महिलांवर विविध निर्बंध लादले आहेत. १९९६-२००२ दरम्यान तालिबानने पहिल्यांदा अफगाणिस्तानवर कब्जा केला. यादरम्यानही त्यांनी महिलांचे शोषण केले. या राजवटीत एक मुलगी अफगाणिस्तान सोडून गेली होती आणि डेन्मार्कला पोहोचली.
डेन्मार्कसाठी ती राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळली. मेहनतीने ती त्या संघाची प्रमुख खेळाडू बनली. आता ती डॉक्टर झाली आहे. नादिया नदीम असे या महिलेचे नाव असून तिची संघर्षगाथा थक्क करणारी आहे..
नादियाचा जन्म अफगाणिस्तानातील हेरात येथे झाला. तिचे वडील अफगाण नॅशनल आर्मीमध्ये जनरल होते, तालिबानने नादियाच्या वडिलांना मारले. वयाच्या ११ व्या वर्षी वडील गमावल्यानंतर नादियाने देश सोडला.
खोट्या ओळखीखाली प्रवास करून अनेक निर्वासितांच्या छावण्या गाठल्या. ती पाकिस्तानातील कराचीला दोन महिने राहिली. यानंतर ती इटलीला पोहोचली, जिथे ती अनेक दिवस भटकत होती.
१२ ते १४ वयोगटासाठी लसीकरणाबाबत समोर आली नवीन माहिती :
भारतात करोना विषाणू विरूद्ध लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. दरम्यान, १२ ते १४ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
या अगोदर १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास मार्चपर्यंत सुरूवात होणार असल्याची माहिती समोर आली होती. शिवाय माध्यमांमधून याबाबत बातम्या देखील झळकल्या होत्या. त्यानंतर आज वृत्ताचे खंडण करण्यात आले असून, अद्याप या बद्दल कोणताही निर्णय झालेला नसल्याचे वृत्त अधिकारीक सुत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
देशात करोना महामारीची तिसरी लाट आलेली आहे. दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठ वाढ दिसून येत आहे. शिवाय, करोनाचाच नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनाचे रूग्ण देखील आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र व राज्य सरकारांकडून अधिक सतर्क होत, विविध उपाय योजनांची अंमलबाजवणी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणजे १०० टक्के लसीकरणावर भर दिला जात आहे.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे भारताचे नवे उपसेनाप्रमुख; केंद्र सरकारने दिली मान्यता :
भारतीय सुरक्षा दल त्यांच्या नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या नियुक्तीची आतुरतेने वाट पाहत आहेत. जनरल रावत यांच्या निधनाला एक महिना उलटूनही केंद्र सरकार नवीन सीडीएसबाबत निर्णय घेऊ शकलेले नाही.
मात्र, या शोधात सरकारकडून लष्करात नियुक्त्या सुरूच आहेत. केंद्राने पूर्व लष्कराचे कमांडिंग असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना देशाचे पुढील उपसेनाप्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, जनरल पांडे यांची या पदावर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासह जनरल पांडे १ फेब्रुवारीपासून लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांच्या जागी उपलष्कर प्रमुख म्हणून नियुक्त होतील. जनरल मोहंती ३१ जानेवारीला निवृत्त होत आहेत.
तीन राज्यांचे चित्ररथ वगळण्याच्या निर्णयाचा फेरविचार नाही :
यंदाच्या प्रजासत्ताकदिन सोहळ्याच्या दिल्लीतील संचलनात केरळ, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांच चित्ररथ समाविष्ट न करण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला जाणार नाही, असे संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
संचलनासाठी यंदा १२ राज्यांच्या चित्ररथांची निवड करण्यात आली आहे. चित्ररथ वगळण्यात आल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनी याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती.  हा संबंधित राज्यांचा अवमान असल्याची टीका बिगरभाजप नेत्यांनी केली होती.
आसाम - लस न घेतलेल्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी :
ओमायक्रॉनसह करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या कारणाने लसीकरण न झालेल्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश न देण्याचा निर्णय आसाम राज्य सरकारने घेतला असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली. रुग्णालयांसाठी हे आदेश लागू नसल्याचे आसाम सरकारने सांगितले.
करोना प्रतिबंधक लस घेणे अनिवार्य नसल्याचा निर्वाळा नुकताच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर दिला होता. तरीही आसाम सरकारने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आसाममध्ये आता सार्वजनिक ठिकाणी जाताना लसीकरणाच्या दोन्ही मात्रा झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन जावे लागणार आहे. प्रमाणपत्र असेल तरच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

समानार्थी शब्द

झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
 
झरा - निर्झर, ओहळ, ओढा
 
झगडा - कलह, भांडण, तंटा
 
टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
 
टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
 
टिळा - तिलक, टिळक, ठिपका
 
टूक - कुशलता, युक्ती, टक
 
टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
 
ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
 
ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
 
ठाम - पक्का, कायम, दृढ
 
ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
 
डोके - माथा, मस्तक, शिर
 
डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
 
डगर - उतरण, टेकडी, ढळ
 
डौल - रुबाब, दिमाख, ऐट
 
ढग - घन, जलद, मेघ, नीरद

ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
 
ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
 
ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई,  हयगय
 
ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
 
ढोल - नगारा, डंका, पडघम
 
तक्रार - वाद, भांडण, हरकत
 
तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
 
तत्व - सत्य, तात्पर्य, अंश

रा.गो.भांडारकर


प्राच्यविद्यासंशोधक संस्कृतचे प्रकांड पडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक व कर्ते धर्मसुधारक तथा समाजसुधारक. त्यांचे मुळ आडनाव पत्की; तथापि त्यांचे पूर्वज खजिन्यावर अधिकारी होते म्हणून 'भांडारकर' हे नाव पडले

१८७४ साली लंडन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेत नाशिक शिलालेखासंबंधी त्यांचा निबंध वाचला गेला. १८८५ मध्ये जर्मनीतील गटिंगन विद्यापीठाने त्यांना पीएच्. डी. अर्पण केली. १८८६ साली व्हिएन्ना येथे 'क्राँग्रेस आँफ ओरिएंटॅलिस्टस' भरली, तिला भारतीय प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले. मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये १८७९ पर्यंत ते संस्कृतचे प्राध्यापक होते. मुंबई विद्यापीठचे अधिछात्र व सिंडिकेटचे सदस्य म्हणून कामगिरी बजाविल्यानंतर ते कुलगुरु झाले. १९०४ मध्ये एल्एल्. डी. ही पदवी त्यांना मिळाली. 'रॉयल एशियाटिक सोसायटी', लंडन व मुंबई, 'जर्मन ओरिएंटल सोसायटी', 'अमेरिकन ओरिएंटल सोसायटी'; इटली येथील 'एशियाटिक सोसायटी', सेंट पीटर्झबर्ग येथील 'इंपिरिअल अकॅडमी आँफ सायन्स' इ. जगप्रसिद्ध संस्थांनी भांडारकरांना सदस्यत्व दिले. अनेक संस्कृत हस्तलिखितांसंबंधी त्यांनी संशोधनात्मक लेख लिहिले. प्राचीन भारतीय ज्ञानभांडाराला जागतिक प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळवून दिली.पुणे डेक्कन सोसायटी मधे संस्कृत अध्यापण ही केले.

प्राचीन गृह्यसूत्रादी संस्कारमंत्रांतील जरुर तेवढाच भाग घेऊन उपनयन, लग्नादि गृह्यसंस्कारसमयी उपयोगी पडणारा 'संस्कारविधी' तयार केला. भक्तिपर कविता आणि पदे रचिली. या कामगिरीमुळे भांडारकर हे" प्रार्थनासमाजाचे वैचारिक संस्थापक "मानले जातात.

१९०३ मध्ये व्हाइसरॉयच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे ते सदस्य होते. १९०४-०८ ह्या कालखंडात प्रांतिक लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्येही ते होते. १९११ मध्ये भरलेल्या दिल्ली दरबारप्रसंगी त्यांना 'सर' हा किताब देण्यात आला. त्यांची वृत्ती नेमस्त होती.

अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन (१८८४), वैष्णविझम, शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स (१९१३), ए पीप इनट् द अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया(१९२०), कलेक्टेड वर्क्स ऑफ श्री. आर्. जी. भांडारकर (१९३३),मालती माधव ग्रंथाचे संपादन.

फक्त वि.रा.शिंदे हे एकमेव कर्ते मिशनरी म्हणून प्रार्थनासमाजास मिळाले. भांडारकरांनी त्यांना विलायतेस धर्मशिक्षणार्थ पाठविण्याच्या कामात पुढाकर घेतला होता.

खुप महत्वाचे -
'तुकाराम सोसायटी' (पुणे) मार्फत अभंगांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न झाला. ह्या चर्चेत भांडारकरांचे महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले. भांडारकर कीर्तनेही करीत.

रामकृष्णपंतांनी पुणे येथील 'प्राच्यविद्या संशोधन मंदिरा'स आपल्या ग्रथांचा व संशोधन पत्रिकांचा अनमोल. संग्रह देणगी म्हणून दिल्यामुळे, ही महत्त्वाची संस्था उभी  राहिली. हिच ती पुण्यातील "भांडारकर ईन्सटीट्युट"

०१ ऑक्टोबर २०२२

हेन्ली पासपोर्ट निर्देशांक 2022

पासपोर्टची जागतिक क्रमवारी जारी करणाऱ्या हेन्ली अँड पार्टनर्स या कंपनीने 2022 ची पासपोर्ट क्रमवारी जानेवारी 2022 मध्ये जारी केली.

सध्याची क्रमवारी 2022 च्या पहिल्या तिमाहीसाठी आहे.

क्रमवारीमध्ये पुन्हा एकदा जपान आणि सिंगापूरने अव्वल स्थान पटकावले. या देशांतील नागरिक 192 देशांत व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.

भारताच्या क्रमवारीमध्ये 7 स्थानांची सुधारणा झाली.

2021 मध्ये भारतीय पासपोर्ट 90 व्या स्थानी होता, तो आता 2022 मध्ये 83 व्या स्थानी आहे.

आता भारतीय नागरिक 60 देशांमध्ये व्हिसाशिवाय विदेश दौरा करू शकतात. यावर्षी ओमान आणि आर्मेनिया या देशांमध्ये पासपोर्ट शिवाय भारतीयांना प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे.

पहिले तीन स्थान
1) जपान, सिंगापूर
2) जर्मनी, दक्षिण कोरिया
3)फिनलँड इटली, लक्झेंबर्ग, स्पेन

जर्मन पेन पुरस्कार

भारतीय लेखिका आणि कवयित्री मीना कंदासामीला जर्मन पेन पुरस्कार मिळाला

भारतीय लेखिका आणि कवयित्री मीना कंडासामी यांना जर्मनीच्या डार्मस्टॅडमधील पेन सेंटरने यंदाचा हरमन केस्टेन पुरस्कार जाहीर केला आहे .

हर्मन केस्टेन पारितोषिक अशा व्यक्तींचा सन्मान करतो जे PEN असोसिएशनच्या चार्टरच्या भावनेने, छळलेल्या लेखक आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी उभे राहतात.

जर्मनीतील पेन सेंटर यावर्षी १५ नोव्हेंबर रोजी डर्मस्टॅड येथे होणाऱ्या समारंभात भारतीय लेखकाला हा पुरस्कार प्रदान करेल.

विजेत्याला बक्षीस रक्कम म्हणून €20,000 ($19,996) रक्कम प्राप्त होईल.

कृषी उत्पादन निर्यातदार अहवाल :-

World Agricultural Product Export Report जाहीर करणारी संस्था जागतिक व्यापार संघटना (WTO) 2019 मध्ये कृषी उत्पादनांची सर्वाधिक निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारत नवव्या स्थानी आहे. जागतिक कृषी उत्पादने निर्यातीमध्ये भारताचा 3.1 टक्के वाटा आहे.

युरोपियन युनियनने 16.1 टक्के जागतिक वाट्यासह जगातील सर्वात मोठा कृषी उत्पन्न निर्यातदार म्हणून स्थान मिळवले आहे. युरोपियन युनियनने अमेरिकेला (13.8 टक्के) मागे टाकले.

सर्वाधिक भात निर्यातदार देश :-
1) भारत (33%), 2) थायलंड (201%), 3) व्हिएनाम (12%)

कापूस निर्यातीमध्ये भारत 7.6% जागतिक वाट्यासह तिसऱ्या स्थानी आहे. कापूस आयातीमध्येही भारत 101% जागतिक वाट्यासह चौथ्या स्थानी आहे.

सर्वात जास्त व्यापार झालेले कृषी उत्पादन :- सोयाबीन

स्मिता पाटील पुरस्कार

आलिया भट्टला प्रतिष्ठित “प्रियदर्शनी अकादमीचा स्मिता पाटील स्मृती पुरस्कार”

29 वर्षीय अभिनेत्री आलिया भट्टला प्रतिष्ठित प्रियदर्शनी अकादमी स्मिता पाटील मेमोरियल अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रियदर्शनी अकादमी या प्रमुख ना-नफा, सामाजिक-सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थेच्या 38 व्या वर्धापन दिन समारंभात भारतीय चित्रपटसृष्टीतील तिच्या प्रशंसनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो.

हा सन्मान दरवर्षी उत्कृष्ट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्राप्तकर्त्यांना दिला जातो आणि त्यांच्या अतुलनीय उत्कृष्टतेसाठी आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी जागतिक मान्यता प्रदान केली जाते.

यावर्षी, 19 सप्टेंबर 2022 रोजी नियोजित वेबिनारद्वारे अकादमीच्या पुरस्कार सादरीकरण समारंभात भारत सरकारच्या केंद्रीय मंत्र्यांकडून अपवादात्मक कामगिरी करणाऱ्यांचा अक्षरशः सत्कार करण्यात आला.

Latest post

ठळक बातम्या.१२ मार्च २०२५.

१. नियतकालिक कामगार शक्ती सर्वेक्षण (PLFS) २०२४  - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केला. - सध्याच्या साप्ताहिक स्थितीतील...