०२ ऑक्टोबर २०२२

महाराष्ट्र पोलिस भरती - महत्वाचे


रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?
    उत्तर--------- स्वामी विवेकानंद

  आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
     उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती

प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
    उत्तर--------- आत्माराम पांडुरंग

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
    उत्तर----------महात्मा फुले

दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?
    उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर

इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?           
    उत्तर----------- न्या. रानडे

मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर ----------- दादोबा पांडुरंग

  निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे

महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?
    उत्तर ------------- लोकमान्य टिळक

आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ------------- पंडिता रमाबाई

हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
    उत्तर-------------- महात्मा गांधी

भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?
    उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले

  गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?
    उत्तर -------------- विनोबा भावे

सेवासदन ची स्थापना कोणी केली?
    उत्तर-------------- रमाबाई रानडे

एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ
    कोणी लिहला?
    उत्तर-------------- न्या. रानडे

परमहंस सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर------------- दादोबा पांडुरंग

  दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?
    उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
    उत्तर-------------- ग. वा. जोशी

  शतपत्रे कोणी लिहली?
    उत्तर------------ गोपाल हरी देशमुख
                               (लोकहितवादी)

  ग्रामगीता कोणी लिहली?
    उत्तर------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कुणी लिहिला.
    उत्तर. ---------- सावित्रीबाई फुले

एकूण शतपत्रांची संख्या किती होती?
    उत्तर --------------  एकूण 108 होती

काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

      परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे

हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
द वॉल : राहुल द्रविड
ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
ब्लॅक पर्ल : पेले
मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
गोल्डन गर्ल : पी टी उषा
आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
जंम्बो : अनिल कुंबळे
युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
टर्मिनेटर : हरभजन सिंह

विविध चालू घडामोडी

हॅट्स ऑफ नादिया..! तालिबान्यांमुळं देश सोडला, ११ भाषा शिकल्या, २०० गोल केले आणि आता बनली डॉक्टर :
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य आहे. तालिबानने महिलांवर विविध निर्बंध लादले आहेत. १९९६-२००२ दरम्यान तालिबानने पहिल्यांदा अफगाणिस्तानवर कब्जा केला. यादरम्यानही त्यांनी महिलांचे शोषण केले. या राजवटीत एक मुलगी अफगाणिस्तान सोडून गेली होती आणि डेन्मार्कला पोहोचली.
डेन्मार्कसाठी ती राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळली. मेहनतीने ती त्या संघाची प्रमुख खेळाडू बनली. आता ती डॉक्टर झाली आहे. नादिया नदीम असे या महिलेचे नाव असून तिची संघर्षगाथा थक्क करणारी आहे..
नादियाचा जन्म अफगाणिस्तानातील हेरात येथे झाला. तिचे वडील अफगाण नॅशनल आर्मीमध्ये जनरल होते, तालिबानने नादियाच्या वडिलांना मारले. वयाच्या ११ व्या वर्षी वडील गमावल्यानंतर नादियाने देश सोडला.
खोट्या ओळखीखाली प्रवास करून अनेक निर्वासितांच्या छावण्या गाठल्या. ती पाकिस्तानातील कराचीला दोन महिने राहिली. यानंतर ती इटलीला पोहोचली, जिथे ती अनेक दिवस भटकत होती.
१२ ते १४ वयोगटासाठी लसीकरणाबाबत समोर आली नवीन माहिती :
भारतात करोना विषाणू विरूद्ध लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. दरम्यान, १२ ते १४ वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या वयोगटातील बालकांच्या लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
या अगोदर १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास मार्चपर्यंत सुरूवात होणार असल्याची माहिती समोर आली होती. शिवाय माध्यमांमधून याबाबत बातम्या देखील झळकल्या होत्या. त्यानंतर आज वृत्ताचे खंडण करण्यात आले असून, अद्याप या बद्दल कोणताही निर्णय झालेला नसल्याचे वृत्त अधिकारीक सुत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेने दिले आहे.
देशात करोना महामारीची तिसरी लाट आलेली आहे. दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठ वाढ दिसून येत आहे. शिवाय, करोनाचाच नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनाचे रूग्ण देखील आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र व राज्य सरकारांकडून अधिक सतर्क होत, विविध उपाय योजनांची अंमलबाजवणी केली जात आहे. याचाच एक भाग म्हणजे १०० टक्के लसीकरणावर भर दिला जात आहे.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे भारताचे नवे उपसेनाप्रमुख; केंद्र सरकारने दिली मान्यता :
भारतीय सुरक्षा दल त्यांच्या नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या नियुक्तीची आतुरतेने वाट पाहत आहेत. जनरल रावत यांच्या निधनाला एक महिना उलटूनही केंद्र सरकार नवीन सीडीएसबाबत निर्णय घेऊ शकलेले नाही.
मात्र, या शोधात सरकारकडून लष्करात नियुक्त्या सुरूच आहेत. केंद्राने पूर्व लष्कराचे कमांडिंग असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना देशाचे पुढील उपसेनाप्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, जनरल पांडे यांची या पदावर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासह जनरल पांडे १ फेब्रुवारीपासून लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांच्या जागी उपलष्कर प्रमुख म्हणून नियुक्त होतील. जनरल मोहंती ३१ जानेवारीला निवृत्त होत आहेत.
तीन राज्यांचे चित्ररथ वगळण्याच्या निर्णयाचा फेरविचार नाही :
यंदाच्या प्रजासत्ताकदिन सोहळ्याच्या दिल्लीतील संचलनात केरळ, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांच चित्ररथ समाविष्ट न करण्याच्या निर्णयाचा फेरविचार केला जाणार नाही, असे संरक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
संचलनासाठी यंदा १२ राज्यांच्या चित्ररथांची निवड करण्यात आली आहे. चित्ररथ वगळण्यात आल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांनी याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली होती.  हा संबंधित राज्यांचा अवमान असल्याची टीका बिगरभाजप नेत्यांनी केली होती.
आसाम - लस न घेतलेल्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेशबंदी :
ओमायक्रॉनसह करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या कारणाने लसीकरण न झालेल्यांना सार्वजनिक ठिकाणी प्रवेश न देण्याचा निर्णय आसाम राज्य सरकारने घेतला असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली. रुग्णालयांसाठी हे आदेश लागू नसल्याचे आसाम सरकारने सांगितले.
करोना प्रतिबंधक लस घेणे अनिवार्य नसल्याचा निर्वाळा नुकताच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर दिला होता. तरीही आसाम सरकारने घेतलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आसाममध्ये आता सार्वजनिक ठिकाणी जाताना लसीकरणाच्या दोन्ही मात्रा झाल्याचे प्रमाणपत्र घेऊन जावे लागणार आहे. प्रमाणपत्र असेल तरच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.

समानार्थी शब्द

झोपाळा - झुला, हिंदोळा, टाळाटाळ
 
झरा - निर्झर, ओहळ, ओढा
 
झगडा - कलह, भांडण, तंटा
 
टका - पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
 
टणक - निबर, कठिण, धट्टाकट्टा
 
टिळा - तिलक, टिळक, ठिपका
 
टूक - कुशलता, युक्ती, टक
 
टाळाटाळ - र्हयगय, दिरंगाई, टगळमंगळ
 
ठराव - नियम, सिद्धांत, निकाल
 
ठळक - स्पष्ट, मोठे, जाड
 
ठाम - पक्का, कायम, दृढ
 
ठिकाण - पत्ता, स्थान, खूण
 
डोके - माथा, मस्तक, शिर
 
डोळा - नेत्र, लोचन, अक्ष, चक्षू
 
डगर - उतरण, टेकडी, ढळ
 
डौल - रुबाब, दिमाख, ऐट
 
ढग - घन, जलद, मेघ, नीरद

ढाळणे - गाळणे, आतणे, अभिषेक करणे
 
ढेकूळ - ढेप, पेंड, भेली
 
ढिलाई - चालढकल, दुर्लक्ष, दिरंगाई,  हयगय
 
ढोंगी - लबाड, भोंदू, दांभिक, फसवा
 
ढोल - नगारा, डंका, पडघम
 
तक्रार - वाद, भांडण, हरकत
 
तट - काठ, किनारा, बाजू, भांडण
 
तत्व - सत्य, तात्पर्य, अंश

रा.गो.भांडारकर


प्राच्यविद्यासंशोधक संस्कृतचे प्रकांड पडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक व कर्ते धर्मसुधारक तथा समाजसुधारक. त्यांचे मुळ आडनाव पत्की; तथापि त्यांचे पूर्वज खजिन्यावर अधिकारी होते म्हणून 'भांडारकर' हे नाव पडले

१८७४ साली लंडन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेत नाशिक शिलालेखासंबंधी त्यांचा निबंध वाचला गेला. १८८५ मध्ये जर्मनीतील गटिंगन विद्यापीठाने त्यांना पीएच्. डी. अर्पण केली. १८८६ साली व्हिएन्ना येथे 'क्राँग्रेस आँफ ओरिएंटॅलिस्टस' भरली, तिला भारतीय प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले. मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये १८७९ पर्यंत ते संस्कृतचे प्राध्यापक होते. मुंबई विद्यापीठचे अधिछात्र व सिंडिकेटचे सदस्य म्हणून कामगिरी बजाविल्यानंतर ते कुलगुरु झाले. १९०४ मध्ये एल्एल्. डी. ही पदवी त्यांना मिळाली. 'रॉयल एशियाटिक सोसायटी', लंडन व मुंबई, 'जर्मन ओरिएंटल सोसायटी', 'अमेरिकन ओरिएंटल सोसायटी'; इटली येथील 'एशियाटिक सोसायटी', सेंट पीटर्झबर्ग येथील 'इंपिरिअल अकॅडमी आँफ सायन्स' इ. जगप्रसिद्ध संस्थांनी भांडारकरांना सदस्यत्व दिले. अनेक संस्कृत हस्तलिखितांसंबंधी त्यांनी संशोधनात्मक लेख लिहिले. प्राचीन भारतीय ज्ञानभांडाराला जागतिक प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळवून दिली.पुणे डेक्कन सोसायटी मधे संस्कृत अध्यापण ही केले.

प्राचीन गृह्यसूत्रादी संस्कारमंत्रांतील जरुर तेवढाच भाग घेऊन उपनयन, लग्नादि गृह्यसंस्कारसमयी उपयोगी पडणारा 'संस्कारविधी' तयार केला. भक्तिपर कविता आणि पदे रचिली. या कामगिरीमुळे भांडारकर हे" प्रार्थनासमाजाचे वैचारिक संस्थापक "मानले जातात.

१९०३ मध्ये व्हाइसरॉयच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे ते सदस्य होते. १९०४-०८ ह्या कालखंडात प्रांतिक लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्येही ते होते. १९११ मध्ये भरलेल्या दिल्ली दरबारप्रसंगी त्यांना 'सर' हा किताब देण्यात आला. त्यांची वृत्ती नेमस्त होती.

अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन (१८८४), वैष्णविझम, शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स (१९१३), ए पीप इनट् द अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया(१९२०), कलेक्टेड वर्क्स ऑफ श्री. आर्. जी. भांडारकर (१९३३),मालती माधव ग्रंथाचे संपादन.

फक्त वि.रा.शिंदे हे एकमेव कर्ते मिशनरी म्हणून प्रार्थनासमाजास मिळाले. भांडारकरांनी त्यांना विलायतेस धर्मशिक्षणार्थ पाठविण्याच्या कामात पुढाकर घेतला होता.

खुप महत्वाचे -
'तुकाराम सोसायटी' (पुणे) मार्फत अभंगांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न झाला. ह्या चर्चेत भांडारकरांचे महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले. भांडारकर कीर्तनेही करीत.

रामकृष्णपंतांनी पुणे येथील 'प्राच्यविद्या संशोधन मंदिरा'स आपल्या ग्रथांचा व संशोधन पत्रिकांचा अनमोल. संग्रह देणगी म्हणून दिल्यामुळे, ही महत्त्वाची संस्था उभी  राहिली. हिच ती पुण्यातील "भांडारकर ईन्सटीट्युट"

०१ ऑक्टोबर २०२२

हेन्ली पासपोर्ट निर्देशांक 2022

पासपोर्टची जागतिक क्रमवारी जारी करणाऱ्या हेन्ली अँड पार्टनर्स या कंपनीने 2022 ची पासपोर्ट क्रमवारी जानेवारी 2022 मध्ये जारी केली.

सध्याची क्रमवारी 2022 च्या पहिल्या तिमाहीसाठी आहे.

क्रमवारीमध्ये पुन्हा एकदा जपान आणि सिंगापूरने अव्वल स्थान पटकावले. या देशांतील नागरिक 192 देशांत व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.

भारताच्या क्रमवारीमध्ये 7 स्थानांची सुधारणा झाली.

2021 मध्ये भारतीय पासपोर्ट 90 व्या स्थानी होता, तो आता 2022 मध्ये 83 व्या स्थानी आहे.

आता भारतीय नागरिक 60 देशांमध्ये व्हिसाशिवाय विदेश दौरा करू शकतात. यावर्षी ओमान आणि आर्मेनिया या देशांमध्ये पासपोर्ट शिवाय भारतीयांना प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे.

पहिले तीन स्थान
1) जपान, सिंगापूर
2) जर्मनी, दक्षिण कोरिया
3)फिनलँड इटली, लक्झेंबर्ग, स्पेन

जर्मन पेन पुरस्कार

भारतीय लेखिका आणि कवयित्री मीना कंदासामीला जर्मन पेन पुरस्कार मिळाला

भारतीय लेखिका आणि कवयित्री मीना कंडासामी यांना जर्मनीच्या डार्मस्टॅडमधील पेन सेंटरने यंदाचा हरमन केस्टेन पुरस्कार जाहीर केला आहे .

हर्मन केस्टेन पारितोषिक अशा व्यक्तींचा सन्मान करतो जे PEN असोसिएशनच्या चार्टरच्या भावनेने, छळलेल्या लेखक आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी उभे राहतात.

जर्मनीतील पेन सेंटर यावर्षी १५ नोव्हेंबर रोजी डर्मस्टॅड येथे होणाऱ्या समारंभात भारतीय लेखकाला हा पुरस्कार प्रदान करेल.

विजेत्याला बक्षीस रक्कम म्हणून €20,000 ($19,996) रक्कम प्राप्त होईल.

कृषी उत्पादन निर्यातदार अहवाल :-

World Agricultural Product Export Report जाहीर करणारी संस्था जागतिक व्यापार संघटना (WTO) 2019 मध्ये कृषी उत्पादनांची सर्वाधिक निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारत नवव्या स्थानी आहे. जागतिक कृषी उत्पादने निर्यातीमध्ये भारताचा 3.1 टक्के वाटा आहे.

युरोपियन युनियनने 16.1 टक्के जागतिक वाट्यासह जगातील सर्वात मोठा कृषी उत्पन्न निर्यातदार म्हणून स्थान मिळवले आहे. युरोपियन युनियनने अमेरिकेला (13.8 टक्के) मागे टाकले.

सर्वाधिक भात निर्यातदार देश :-
1) भारत (33%), 2) थायलंड (201%), 3) व्हिएनाम (12%)

कापूस निर्यातीमध्ये भारत 7.6% जागतिक वाट्यासह तिसऱ्या स्थानी आहे. कापूस आयातीमध्येही भारत 101% जागतिक वाट्यासह चौथ्या स्थानी आहे.

सर्वात जास्त व्यापार झालेले कृषी उत्पादन :- सोयाबीन

स्मिता पाटील पुरस्कार

आलिया भट्टला प्रतिष्ठित “प्रियदर्शनी अकादमीचा स्मिता पाटील स्मृती पुरस्कार”

29 वर्षीय अभिनेत्री आलिया भट्टला प्रतिष्ठित प्रियदर्शनी अकादमी स्मिता पाटील मेमोरियल अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रियदर्शनी अकादमी या प्रमुख ना-नफा, सामाजिक-सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थेच्या 38 व्या वर्धापन दिन समारंभात भारतीय चित्रपटसृष्टीतील तिच्या प्रशंसनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो.

हा सन्मान दरवर्षी उत्कृष्ट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्राप्तकर्त्यांना दिला जातो आणि त्यांच्या अतुलनीय उत्कृष्टतेसाठी आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी जागतिक मान्यता प्रदान केली जाते.

यावर्षी, 19 सप्टेंबर 2022 रोजी नियोजित वेबिनारद्वारे अकादमीच्या पुरस्कार सादरीकरण समारंभात भारत सरकारच्या केंद्रीय मंत्र्यांकडून अपवादात्मक कामगिरी करणाऱ्यांचा अक्षरशः सत्कार करण्यात आला.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी “अमृत ग्रँड चॅलेंज प्रोग्राम- जन केअर” लाँच केले.

आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह (केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान) यांनी “जन केअर” नावाचा “अमृत ग्रँड चॅलेंज कार्यक्रम” सुरू केला.

ग्रँड चॅलेंजचे उद्दीष्ट 75 स्टार्ट-अप आणि उद्योजकांना ओळखणे आहे, जे भारतातील आरोग्यसेवा आव्हानांसाठी नाविन्यपूर्ण कल्पना आणि सोल्यूशन्स घेऊन येतात, जे कमी संसाधन सेटिंग्जमध्ये काम करू शकतात, ज्यामुळे भारतातील आरोग्य सेवा वितरण मजबूत होईल.

योजनेबद्दल IMP मुद्दे :-

बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल (बीआयआरएसी), नॅसकॉम आणि नॅसकॉम फाउंडेशन यांनी संयुक्तपणे देशव्यापी “डिस्कव्हर – डिझाईन – स्केल” कार्यक्रम म्हणून हे आव्हान सुरू केले आहे.

“जन केअर” अमृत चॅलेंज इनोव्हेशन इन टेलीमेडिसिन, डिजिटल हेल्थ, एमहेल्थ विथ बिग डेटा, एआय, ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञानासारख्या स्टार्ट-अप्सना ओळखेल. आव्हान 31 डिसेंबर 2021 रोजी संपेल.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ‘निधी 2.0’ योजना सुरू केली.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 2021 च्या जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान NIDHI 2.0 (हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा राष्ट्रीय एकात्मिक डेटाबेस) योजनेचे उद्घाटन केले आहे.

NIDHI 2.0 डेटाबेसमध्ये केवळ समावेशक युनिट्सच नव्हे तर ट्रॅव्हल एजंट्स, टूर ऑपरेटर आणि इतरांचा समावेश करून अधिक समावेशकता असेल.

NIDHI योजनेबद्दल महत्त्वाचे पॉईंट्स :-

पर्यटन मंत्रालयाद्वारे NIDHI योजना पर्यटन क्षेत्राचे डिजिटायझेशन सुलभ करण्यासाठी आणि आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रासाठी व्यवसाय करण्यास सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी, सर्व निवासस्थानाच्या युनिटला आतिथ्य उद्योगाचा भाग बनण्यासाठी व्यासपीठावर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करून सुरू करण्यात आले.

या प्रसंगाचा एक भाग म्हणून, पर्यटन मंत्रालयाने संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रम (UNEP) आणि द रिस्पॉन्सिबल टूरिझम सोसायटी ऑफ इंडिया (RTSOI) यांच्यात एक परस्पर पर्यटन क्षेत्रात ‘टिकाऊपणाच्या उपक्रमांना’ सक्रियपणे प्रोत्साहन आणि समर्थन देण्यासाठी सामंजस्य करार केला.

24आठवड्यापर्यंतच्या गर्भपातासाठी सर्वोच्च न्यायालयात परवानगी

अविवाहित महिलांनाही 24 व्या आठवड्यापर्यंत गर्भपात करायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी.

सुरक्षित आणि कायदेशीरररित्या गर्भपात करण्यासाठी सर्व महिला पात्र आहेत. त्यासाठी विवाहित आणि अविवाहित महिलांमध्ये कुठलाही भेदभाव करणे असंवैधानिक आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

अविवाहित महिलेनं परस्पर संमतीने ठेवलेल्या शरीरसंबंधांनंतर गर्भधारणा झाली असल्यास तिला गर्भधारणेच्या 20 ते 24 व्या आठवड्यात गर्भपात करण्याची परवानगी मिळेल

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं हा निर्णय दिला

बलात्कारानंतर वैद्यकीयदृष्ट्या गर्भपात करण्याच्या तरतुदीअंतर्गत वैवाहिक संबंधांतून झालेल्या बलात्काराचाही समावेश करता येईल. मात्र त्यासाठी बलात्कार झाल्याचं सिद्ध व्हावं लागेल.

23 आठवडे आणि 5 दिवसांची गर्भवती असलेल्या एका 25 वर्षीय अविवाहित महिलेला दिल्ली उच्च न्यायालयानं गर्भपाताची परवानगी नाकारली होती. त्यामुळ तिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

भारतीय नौदल

भारतीय नौदलाने विशाखापट्टणम येथे 'निस्टार' आणि 'निपुन' या दोन डायव्हिंग सपोर्ट व्हेसल्स लाँच केल्या.

डायव्हिंग सपोर्ट वेसेल्स (DSVs) हे नौदलासाठी हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड, विशाखापट्टणम येथे स्वदेशी डिझाइन आणि बांधले गेले आहेत.

भारतात विकसित झालेली ही त्यांच्या प्रकारची पहिली जहाजे आहेत.  जहाजे 118.4 मीटर लांब, 22.8 मीटर रुंद आहेत आणि त्यांचे विस्थापन 9,350 टन आहे.

लॉन्चिंग सोहळ्याचे प्रमुख पाहुणे नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार होते.

ही जहाजे खोल समुद्रात डायव्हिंग ऑपरेशन आणि पाणबुडी बचाव कार्यासाठी तैनात केली जाऊ शकतात.

ही जहाजे हेलिकॉप्टर चालवण्यास आणि गस्त घालण्यास सक्षम आहेत.  DSVs जटिल डायव्हिंग सपोर्ट सिस्टमसह सुसज्ज आहेत.

'निस्तर' आणि 'निपुण'मध्ये 80 टक्के देशी पदार्थ आहेत.  DSV प्रकल्पामुळे स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्माण झाला आहे.

देशभरात सध्या ४५ जहाजे आणि पाणबुड्यांचे बांधकाम सुरू आहे.
 

PM PRANAM yojna

रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी भारत सरकार PM-PRANAM योजना सुरू करणार..

भारत सरकारने (गोल) रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी पंतप्रधान प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिएंट्स फॉर अॅग्रिकल्चर मॅनेजमेंट स्कीम (PM PRANAM) तयार केली आहे.

पीएम प्रणाम योजना ही पोषक तत्वांचे पर्यायी स्रोत म्हणून सेंद्रिय खते आणि सेंद्रिय खते यांच्यासोबत संतुलित पद्धतीने खतांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा उपक्रम आहे.

रासायनिक खतांसाठी अनुदानाची किंमत कमी करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे, जे 2022-23 मध्ये 2.25 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, 2021-22 मध्ये 1.62 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 39% वाढ झाली आहे.

रसायने आणि खते मंत्रालयाने PM PRANAM प्रस्तावित केले आणि 7 सप्टेंबर 2022 रोजी रब्बी मोहिमेसाठी कृषीवरील राष्ट्रीय परिषदेदरम्यान प्रस्तावित योजनेचे तपशील जाहीर करण्यात आले.

युरिया, डीएपी (डायमोनियम फॉस्फेट), - एमओपी (म्युरेट ऑफ पोटॅश), आणि एनपीके (नायट्रोजन, फॉस्फरस आणि कॅलियम [पोटॅशियम) ही चार खते 2021-22 मध्ये 640.27LMT ची गरज होती, 2021-2017 मध्ये 528.86 लाख मेट्रिक टन. 2021-22 मध्ये 640.27LMT ने वाढ झाली.
 

पोषण रेटिंग तारे लवकरच अन्न पॅकेजिंग लेबलवर दिसतील.

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने फ्रंट-ऑफ-पॅकेज लेबलिंगवरील मसुदा अधिसूचना जारी केली आहे, ज्याने हेल्थ स्टार-रेटिंग सिस्टमवर आधारित "भारतीय पोषण रेटिंग" (INR) प्रस्तावित केले आहे.

20 सप्टेंबर रोजी, सुधारित अन्न सुरक्षा आणि मानके (लेबलिंग आणि डिस्प्ले) विनियम, 2020 चा मसुदा सार्वजनिक करण्यात आला.

पॅकेज केलेले अन्न 1/2 स्टार (किमान निरोगी) ते 5 स्टार (सर्वात आरोग्यदायी) असे रेटिंग देऊन INR चे विहित स्वरूप प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

INR ऊर्जा, संतृप्त चरबी, एकूण साखर, सोडियम आणि सकारात्मक पोषक घटक प्रति 100 ग्रॅम घन अन्न किंवा 100 मिली द्रव पदार्थ यांच्या योगदानावर आधारित निर्धारित केले जाते.

उत्पादनाला नियुक्त केलेला तारा पॅकच्या पुढील भागावर उत्पादनाच्या नावाच्या किंवा ब्रँडच्या नावापुढे प्रदर्शित केला जाईल.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मठ्ठा, लोणी तेल, तूप, वनस्पती तेले आणि चरबी, ताजी आणि गोठलेली फळे आणि भाज्या, ताजे आणि गोठलेले मांस, पोल्ट्री, मासे, मैदा आणि स्वीटनर यासह काही खाद्यपदार्थांना नियमातून सूट देण्यात आली आहे.
 

दैनंदिन चालू घडामोडी सराव प्रश्नसंच         दि. 30 सप्टेंबर २०२२

01. 'फॉर्च्युन इंडिया रिच लिस्ट 2022' मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनली आहे?
गौतम अदानी

02. 'UNESCO ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज' मध्ये प्रथमच कोणत्या भारतीय शहरांचा समावेश करण्यात आला?
त्रिशूर (केरळ), वारंगल (केरळ) आणि निलांबूर (तेलंगणा)

03. विषाणूच्या प्रसारामुळे अमेरिकेतील कोणत्या राज्यात पोलिओवर आणीबाणी घोषित करण्यात आली आहे?
न्यूयॉर्क

04. F-16 फायटर जेट फ्लीटच्या देखभालीसाठी अमेरिकेने कोणत्या देशाला 450 दशलक्ष डॉलर्सची मदत मंजूर केली आहे?
पाकिस्तान

05. अरुणाचल प्रदेश राज्यातील भारतातील सर्वात पूर्वेकडील 'मिलिटरी गॅरिसन' कोणत्या नावाने आहे?
जनरल बिपिन रावत

06. अर्जेंटिना मध्ये शिक्षक दिन सप्टेंबर मध्ये चुंबन दिवस साजरा केला जातो?
11 सप्टेंबर

07. कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार आरोन फिंचने एकदिवसीय (एकदिवसीय आंतरराष्ट्रीय) सामन्यातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे?
ऑस्ट्रेलिया

08. कोणत्या देशाने युरोपीय देशांसाठी $02 अब्ज लष्करी मदत जाहीर केली आहे?
अमेरिका

09. कोणत्या पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतीचे निधन?
द्वारका पीठ (द्वारका शारदा मठ) आणि ज्योतिष पीठ (ज्योतिर्मठ)

10. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 'सिनेमॅटिक' लाँच केले आहे?
गुजरात

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...