३० सप्टेंबर २०२२

राष्ट्रीय लॉजिस्टीक्स धोरणाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण.


राष्ट्रीय लॉजिस्टीक्स धोरणाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतंच अनावरण केलं.

माल वाहतूक, साठवणूक आणि पुरवठा यावरील खर्चामध्ये कपात करुन उद्योगांना अधिक बळ देण्याचा या धोरणाचा उद्देश आहे.

त्यामुळे औद्योगिक संकुलं आणि वखार क्षेत्रातील गुंतवणूक वाढेलच पण त्याहीपेक्षा पुढे वाहतूक आणि logistics मध्ये होणारा तोटा हा वैश्विक तोटा आहे.

त्यामुळे वेळ, पैसा आणि नैसर्गिक सम्पत्ती यांचं न भरून येणारं नुकसान होत असतं, ते कमी होण्यास मदत होईल.

Unified regulatory environment मुळे कागदपत्रे आणि क्लिष्टता कमी होईल.

डिजिटायझेशनमुळे ही प्रक्रिया अधिकाधिक मोकळी होईल. लॉजिस्टीक्समधला वेग वाढून सर्वच क्षेत्रात फायदा होईल.

निर्यात-आयातीपासून ते अगदी भाजीच्या वाहतुकीमध्येही फायदा होईल.

ही सकारात्मक पावलं पडत असताना जल वाहतूक हा जो जगातली सर्वात स्वस्त दळणवळणाचा मार्ग मानला जातो त्या क्षेत्रातील प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचं आहे.

जगातल्या पहिल्या पन्नास कंटेनर हाताळणी बंदरांमध्ये भारतातील केवळ 2 बंदरांचा समाविष्ट होतो.

न्हावाशेवा हे बंदर ३५ व्या क्रमांकावर आहे. त्याबाबतीत जयगडसारख्या इतर बंदरांचा विकास लवकरात लवकर करणं गरजेचं आहे.

चीन, द नेदरलॅंड्स, कोरिया यांच्यापेक्षा भारताला समुद्राची नैसर्गिक खोली म्हणजे ड्राफ्ट कमी आहे.

तरीही त्यावर मात करून उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्यातल्या कागदपत्रांच्या कारभारातील येणारा सहजपणा खूप अंशी कंटेनरच्या वाहतुकीची गती वाढवू शकेल.

व्यापारातील स्पर्धात्मकता आणि रस्ते, रेल्वे, समुद्र, आणि विमान वाहतुकीच्या समन्वयामुळे हे धोरण भारतातल्या सगळ्या इंडस्ट्रीज साठी नक्कीच स्वागतार्ह आणि फायदेशीर आहे.

लॉजिस्टीक्स क्षेत्रातील तज्ञ, संग्राम कुलकर्णी यांनी या धोरणाचं स्वागत करताना काही मौलिक सूचनाही केल्या आहेत.

दैनंदिन चालू घडामोडी सराव प्रश्नसंच

01. 'फॉर्च्युन इंडिया रिच लिस्ट 2022' मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनली आहे?
उत्तर- गौतम अदानी

02. 'UNESCO ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज' मध्ये प्रथमच कोणत्या भारतीय शहरांचा समावेश करण्यात आला?
Uttar-त्रिशूर (केरळ), वारंगल (केरळ) आणि निलांबूर (तेलंगणा)

03. विषाणूच्या प्रसारामुळे अमेरिकेतील कोणत्या राज्यात पोलिओवर आणीबाणी घोषित करण्यात आली आहे?
उत्तर- न्यूयॉर्क

04. F-16 फायटर जेट फ्लीटच्या देखभालीसाठी अमेरिकेने कोणत्या देशाला 450 दशलक्ष डॉलर्सची मदत मंजूर केली आहे?
उत्तर -पाकिस्तान

05. अरुणाचल प्रदेश राज्यातील भारतातील सर्वात पूर्वेकडील 'मिलिटरी गॅरिसन' कोणत्या नावाने आहे?
उत्तर -जनरल बिपिन रावत

06. अर्जेंटिना मध्ये शिक्षक दिन सप्टेंबर मध्ये चुंबन दिवस साजरा केला जातो?
उत्तर -11 सप्टेंबर

07. कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचा कर्णधार आरोन फिंचने एकदिवसीय (एकदिवसीय आंतरराष्ट्रीय) सामन्यातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर -ऑस्ट्रेलिया

08. कोणत्या देशाने युरोपीय देशांसाठी $02 अब्ज लष्करी मदत जाहीर केली आहे?
उत्तर -अमेरिका

09. कोणत्या पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतीचे निधन?
उत्तर -द्वारका पीठ (द्वारका शारदा मठ) आणि ज्योतिष पीठ (ज्योतिर्मठ)

10. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 'सिनेमॅटिक' लाँच केले आहे?
उत्तर -गुजरात

ज्योतिर्लिंग      -      ठिकाण

१)सोमनाथ - सोमनाथ( गुजरात)

२)मल्लिकार्जुन - श्रीशैलम( आंध्रप्रदेश)

३)महाकालेश्वर - उज्जैन(म. प्रदेश)

४)अंमलेश्वर - ओंकारमांधाता( म.प्र.)

५) वैद्यनाथ - परळी ( महाराष्ट्र)

६) रामेश्वर - तामिळनाडू

७) औंढा नागनाथ - हिंगोली ( महाराष्ट्र)

८) काशी विश्वेश्वर - वाराणसी (उ.प्रदेश)

९) घृष्णेश्वर - औरंगाबाद( महाराष्ट्र)

१०) केदारेश्वर - केदारनाथ( उत्तराखंड)

११)त्र्यंबकेश्वर - नाशिक ( महाराष्ट्र)

१२) भीमाशंकर - पुणे (महाराष्ट्र)

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षापरिषदेत भारताला कायमस्वरुपी सदस्य मिळावं यासाठी रशियाचा पाठिंबा जाहीर.


 
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षापरिषदेत भारताला कायमस्वरुपी सदस्य मिळावं यासाठी रशियानं आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

अमेरिकेत सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या ७७व्या आमसभेला संबोधित करतांना रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी भारताला पाठिंबा जाहीर करताना म्हटलं की, सुरक्षा परिषदेला व्यापक लोकशाही स्वरुप येण्यासाठी त्यात आफ्रिका, आशिया आणि लॅटीन अमेरिकेतील देशांचा समावेश व्हायला हवा.

विशेषतः भारत आणि ब्राझील हे दोन देश आंतरराष्ट्रीय पातळीवरचे महत्वाचे देश असल्यानं त्यांना परिषदेचं कायमस्वरुपी सदस्यत्व मिळणं गरजेचे.

हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार दिलीप तिर्की यांची ऐतिहासिक निवड.

भारताच्या हॉकी संघाचे माजी कर्णधार आणि 1998 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संघाचे सदस्य दिलीप तिर्की यांची काल हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी एकमतानं निवड करण्यात आली.

इतिहासात प्रथमच एक माजी खेळाडू आणि एक ऑलिम्पिकपटू राष्ट्रीय संघटनेच्या अध्यक्षपदी विराजमान झाला आहे.

44 वर्षीय तिर्की यांनी 15 वर्षांहून अधिक कालावधीच्या कारकीर्दीत बचावपटू म्हणून 412 आंतरराष्ट्रीय सामन्यात सहभाग नोंदवला आहे.

त्यांनी 1996 च्या अटलांटा इथं झालेल्या ऑलिंपिक खेळात, तसंच 2000 साली सिडनी आणि 2004 साली अथेन्स इथं झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

स्वच्छ वायू सर्वेक्षण- राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत(एनसीएपी) शहरांचे मानांकन.


 
गुजरातमध्ये एकता नगर येथे 23-24 सप्टेंबर दरम्यान पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्र्यांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या परिषदेचे उद्घाटन केले.

प्रदूषण नियंत्रण आणि प्रतिबंध यावर आयोजित एका समांतर सत्रामध्ये राज्यांना राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत(एनसीएपी) प्रकाशित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण- शहरांचे मानांकन’ याविषयी माहिती देण्यात आली.

पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंत्रालय स्वच्छ वायू सर्वेक्षण सुरू करणार आहे.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाचा(एनसीएपी) भाग म्हणून 2025-26 पर्यंत वायू प्रदूषणात 40 टक्क्यापर्यंत घट करण्यासाठी शहर कृती योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी देशातील 131 शहरांना मानांकन दिले जाणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य विषयक निष्कर्ष (2018-19) जाहीर.....


नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य), डॉ. विनोद के. पॉल यांनी आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे सचिव राजेश भूषण यांच्या उपस्थितीत, वर्ष 2018-19 साठीचे देशासाठीचे राष्ट्रीय आरोग्य लेखापरीक्षण (NHA) अंदाजांचे निष्कर्ष जारी केले.

2013-14 पासूनचा हा सलग सहावा अहवाल आहे.
या निष्कर्षांमध्ये व्यक्त करण्यात आलेल्या अनेक संकेतांमध्ये, एक महत्वाचा संकेत म्हणजे, देशांत आरोग्य सुविधांवरील खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे, विशेष म्हणजे ही वाढ कायमस्वरूपी असेल, असे दिसते आहे.

वर्ष 2018-19 साठी राष्ट्रीय आरोग्य लेखा अंदाजांनुसार, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात,सरकारने, आरोग्यावरील खर्चात वाढ केल्याचे दिसते आहे. 2013-14 मध्ये जीडीपीच्या 1.15% असलेली हि तरतूद 2018-19 मध्ये 1.28% पर्यंत पोहोचली आहे.
याव्यतिरिक्त, आरोग्यावरील एकूण खर्चामध्ये सरकारच्या आरोग्यावरील खर्चाचा वाटा देखील वाढला आहे. 2018-19 मध्ये, सरकारी खर्चाचा वाटा 40.6% होता, जो 2013-14 मधील 28.6% च्या वाट्यापेक्षा लक्षणीयरित्या अधिक आहे.

सरकारचा 2018-19 वर्षातील आरोग्य खर्च 34.5% पर्यंत वाढला आहे. 2013-14 मध्ये हा खर्च 23.2% इतका होता, असेही यात म्हटले आहे.

केंद्र सरकारचा आरोग्यावरील दरडोई खर्च देखील 74%  नी वाढला आहे. 2013-14 मध्ये 1042 इतका असलेला हा खर्च 2018-19 मध्ये 1815 इतका झाला आहे.

तर नागरिकांचा स्वतःच्या खिशातून होणाऱ्या आरोग्य खर्च मात्र आठ टक्क्यांनी  कमी झाला आहे. 2013-14 मध्ये 2,366 इतका असलेला हा खर्च, सध्या दरडोई 2,155 इतका आहे.

सामाजिक सुरक्षा योजनांवर भर दिल्यामुळे, आरोग्यावरील एकूण खर्चात 6% वरुन 9.6% पर्यंत वाढ झाली आहे.
केंद्र सरकार पुरस्कृत आरोग्य विम्याच्या खर्चात देखील 2013-14 नंतर 167% ची लक्षणीय वाढ झाली आहे.

भारतातील थंड हवेची ठिकाणे

महाराष्ट्र
१.महाबळेश्वर
२. पाचगणी
३. माथेरान

हिमाचल प्रदेश
१.कुलु
२.मनाली
३.शिमला
४. डलहौसी

उत्तराखंड
१.मसुरी
२.नैनिताल

तामिळनाडू
१. उदगमंडलम
२.कोडाईकॅनॉल

राजस्थान
१. माउंट अबू

मध्य प्रदेश
१. पंचमढी

जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :   भौगोलिक उपनाव  -  टोपणनाव

1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन

दैनंदिन चालू घडामोडी सराव प्रश्नसंच

Q.1 जागतिक पत्रकरिता स्वातंत्र्य निर्देशांक 2022 नुसार भारताचा क्रमांक कितवा?
1) १५० वा
2) १६० वा
3) १७० वा
4) १५४ वा
उत्तर 150

Q.2 प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2021 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे?
1) ५३वा
2) ५४वा
3) ५५वा
4) ५६ वा
उत्तर 54 वा

Q.4 अलीकडे स्वदेशी बनावटीच्या...... या युद्धनौकेचे जलअवतरण करण्यात आले?
1) कारागिरी
2) तारागिरी
3) विक्रांत
4) यापैकी नाही
उत्तर तरागिरी

Q.6 सिंगापूर ने भारताची माजी नौदल प्रमुख..... यांना मेरीटोरियस सर्विस मिडल प्रदान केले?
1) सुनील लांबा
2) राकेश सक्सेना
3) राकेश यादव
4) यापैकी नाही
उत्तर सुनील लांबा

Q.7 अटल इनोव्हेशन मिशनला..... वर्षापर्यंत मुदतवाढ मिळाली आहे?
1) 2023
2) 2024
3) 2025
4) 2026
उत्तर 2023

Q.8 राष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला?
1) जम्मू काश्मीर
2) पंजाब
3) ओडिसा
4) बंगळूर
उत्तर जम्मू काश्मीर

Q.9 बिमस्टेक शिखर परिषद 2022 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली?
1) कोलंबो श्रीलंका
2) दिल्ली भारत
3) टोकियो जपान
4) बीजिंग चीन
उत्तर कोलंबो श्रीलंका

Q.10 आंतरराष्ट्रीय भुवैज्ञानिक काँग्रेस परिषद 2022 कोठे आयोजित करण्यात आली?
1) दिल्ली
2) मुंबई
3) बंगळूर
4) कोलकत्ता
उत्तर दिल्ली

अभयारण्य आणि जिल्हे

१) मयुरेश्वर अभयारण्य पुणे

२) सागरेश्वर अभयारण्य सांगली

३) ताम्हिणी अभयारण्य पुणे

४) अनेर अभयारण्य धुळे

५) यावल अभयारण्य जळगाव

६) येडशी अभयारण्य उस्मानाबाद

७) गौताळा अभयारण्य औरंगाबाद

८) टीपेश्वरअभयारण्य यवतमाळ

९)इसापूर अभयारण्य यवतमाळ

१०)मेळघाट अभयारण्य अमरावती

११)काटेपूर्णा अभयारण्य वाशिम

१२)वान अभयारण्य अमरावती

१३)पैनगंगा अभयारण्य नांदेड

संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांचे निधन.

संतसाहित्याचे आणि लोकवाड:मयाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ भारूडकार डॉ. रामचंद्र अनंत देखणे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

देखणे हे पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या कार्यालयात जनसंपर्क अधिकारी होते.

सुमारे 34 वर्षे नोकरी करून ते 2014 मध्ये निवृत्त झाले.

'भारुड वाङमयातील तत्त्वज्ञान - संत एकनाथांच्या संदर्भातील' या त्यांच्या प्रबंधास पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळाली.

या प्रबंधाला डॉ. मु. श्री. कानडे पुरस्कार समितीचाही पुरस्कार मिळाला आहे.

पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती

पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.

उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्‍याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.

उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.

विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्‍या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.

अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.

रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्‍या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.

स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.

वादळांचे प्रकार

धुळीचे किंवा रेतीचे वादळ

घूर्णवात

पावसाचे वादळ

बर्फाचे वादळ

मेघगर्जनेचे वादळ

चक्रीवादळ

जगातील गवताळ प्रदेश

 
पृथ्वीवर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांत निसर्तःच गवताने आच्छादलेली भूमी आहे. अशा प्रदेशांत आढळणार्‍या परिसंस्थांना गवताळ भूमी परिसंस्था म्हणतात.

गवताळ प्रदेशाचे उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय असे दोन प्रमुख प्रकार आहेत.

पृथ्वीवरील एकूण भूक्षेत्रापैकी २४ % भूक्षेत्रावर गवताळ प्रदेश आहेत. एकूण गवताळ क्षेत्रापैकी ७१ % क्षेत्र उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाने व्यापले आहे. ६ % क्षेत्र पर्वतीय गवताळ प्रदेशाचे आहे. 

उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश

-सॅव्हाना (आफ्रिका),
-लानोज व कँपोज (द. अमेरिका)
क्विन्सलँड (ऑस्ट्रेलिया)
द पार्कलँड (आफ्रिका)

समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश

-प्रेअरी (उ. अमेरिका),
-पँपास (द. अमेरिका),
-व्हेल्ड (आफ्रिका),
-स्टेप (यूरेशिया),
-डाऊन्स (ऑस्ट्रेलिया)
-कॅटनबरी (न्यूझीलंड)

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार 2020 या वर्षासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर झाला आहे.

68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा 30 सप्टेंबरला दिल्लीत होणार असून त्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी २०२० च्या दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा आज केली.

५२ व्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले, अभिनेत्री हेमा मालिनी, पूनम ढिल्लो, टी. एस. नागभरणा आणि गायक उदित नारायण यांची समिती नेमण्यात आली होती.

80 पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका

पश्चिम विभागने पटकावले दुलीप करंडकचे जेतेपद.

पश्चिम विभागाने रविवारी दुलीप करंडकाच्या जेतेपदावर अगदी रुबाबात मोहोर उमटवली.

पश्चिम विभागने दक्षिण विभागावर 294 धावांनी विजय मिळवला.

याआधी 2009-10 मध्ये पश्चिम विभागाने दुलीप करंडक जिंकला होता.

तब्बल 12 वर्षांनंतर त्यांनी या स्पर्धेचे जेतेपद.

पश्चिम विभागाचे हे 19 वे विजेतेपद आहे.

पश्चिम विभागाने पहिल्या डावात 270 धावा केल्यानंतर दक्षिण विभागाने पहिल्या डावात 327 धावा करीत 57 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली. यशस्वी जैसवालचे खणखणीत द्विशतक (265 धावा) व सर्फराझ खानचे दमदार शतकाच्या (नाबाद 127 धावा) जोरावर पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात 4 बाद 585 या धावसंख्येवर डाव घोषित केला. विजयासाठी 529 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण विभागाने 234 धावाच केल्या.

२९ सप्टेंबर २०२२

8 ऑक्टोबर संयुक्त पूर्व परीक्षेसाठी महत्त्वाचे चालू घडामोडी मुद्दे

1. राजीव कुमार 25 वे निवडणूक आयुक्त
2. एस. सोमनाथ इस्रोचे नवीन अध्यक्ष
3. लता मंगेशकर
4. शेन वॉर्न
5. ऊर्जीत पटेल
6. एन डी पाटील
7. सिंधुताई सपकाळ
8. गिल्बर्ट होंगबो ILO चे नवीन अध्यक्ष
9. बिरजू महाराज
10. अनिल अवचट
11. शिंजो अबे
12. मनोज पांडे
13. पंडित शिवकुमार
14. के शंकर नारायण
15. सुमन बेरी नीती आयोग उपाध्यक्ष
16. माधुरी पुरी बुच सेबीचे अध्यक्ष
17. शेख मोहम्मद बिन अल झायेद
18. ऑस्कर पुरस्कार 2022
19. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2022
20. जागतिक प्रसार माध्यम स्वतंत्र अहवाल
21. IPL क्रिकेट स्पर्धा 2022
22. जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2021
23. जागतिक आनंद अहवाल 2022
24. 57 वा ज्ञानपीठ पुरस्कार
25. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2022
26. रामसर यादी 2022
27. पद्म पुरस्कार 2022
28. भौगोलिक निर्देशांक 2022
29. NDB चा नवीन सदस्य इजिप्त
30. EOS -4 पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपण
31. जागतिक वारसा स्थळे
32. भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2021
33. लोकशाही निर्देशांक 2021
34. हेनली पारपत्र निर्देशांक 2022
35. जागतिक आरोग्य दिन 2022
36. थेट परकीय गुंतवणूक 2021-22
37. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका
38. उत्तराखंड विधानसभा निवडणुका
39. पंजाब विधानसभा निवडणुका
40. गोवा विधानसभा निवडणुका
41. मणीपुर विधानसभा निवडणूका
42. राज्यातील 28 महानगरपालिका
43. जागतिक वन्य दिवस 2022
44. संरक्षणावर सर्वाधिक खर्च अहवाल
45. संरक्षणावरील सिप्रीचा निर्यात अहवाल
46. संरक्षणावरील सिप्रीचा आयात अहवाल
47. INS वागशिर पाणबुडी जलावरण
48. 75 वी जागतिक आरोग्य सभा
49.UNEP ध्वनी प्रदूषण अहवाल
50. QUAD ची चौथी परिषद
51. गोल्डन ग्लोब पुरस्कार 2022
52. दादासाहेब फाळके आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 
53. 2022 चे संसद रत्न पुरस्कार
54. हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2022
55. मिस युनिव्हर्स व मिस वर्ल्ड स्पर्धा
56. ICC क्रिकेट पुरस्कार 2021
57. आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा अहवाल
58. जागतिक वन अहवाल 2022
59. 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
60. साहित्य अकादमी पुरस्कार 2021
61. पुलित्झर पुरस्कार 2022
62. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी
63. 31वा सरस्वती सन्मान 2021
64. जागतिक अन्न पुरस्कार
65. ग्रॅमी पुरस्कार 2022
66. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022
67. जागतिक गुंतवणूक अहवाल 2022
68. सिक्कीम चे फुलपाखरू ब्ल्यू Duke
69. जागतिक पर्यावरण दिवस
70. पर्यावरण कामगिरी निर्देशांक 2022
71. उबेर कप
72. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2022
73. मिताली राज
74. खेलो इंडिया युवा स्पर्धा 2021
75. विश्व अथलेटिक्स चॅम्पियनशिप
76. एअरटेल पेमेंट बँक
77. श्री. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
78. सानिया मिर्झा
79. निती आयोग निर्यात सज्जता निर्देशांक
80. संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा
81. IIFA awards 2022
82. टाइम्स पर्सन ऑफ द इयर पुरस्कार
83. देवेंद्र झांझरिया पद्मभूषण
84. महारत्न दर्जा कंपन्या
85. राष्ट्रीय जल पुरस्कार
86. भारताच्या 15 व्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु

127 वे घटनादुरुस्ती विधेयक 2021 :



◆ मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना बहाल करणारे 127 वे घटनादुरुस्ती विधेयक 09 ऑगस्ट 2021 रोजी लोकसभेत मांडण्यात आले होते.

◆ 102 व्या घटना दुरुस्ती विधेयकातील काही तरतुदी स्पष्ट करण्यासाठी, तसेच मागासवर्गीयांसंबंधित राज्यांचा अधिकार पूर्ववत करण्यासाठी संसदेत हे विधेयक मांडण्यात आले.

◆ केंद्र आणि प्रत्येक राज्याद्वारे स्वतंत्र ओबीसी यादया तयार केल्या जातात. राज्य घटनेतील कलम 15[4], 15[5] आणि 16[4] राज्याला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांची यादी घोषित करण्याचे स्पष्टपणे अधिकार प्रदान करतात.

◆ राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हे विधेयक 105 वी घटनादुरुस्ती कायदयात रुपांतरीत झाले.

भारत सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली

🟠

🔹भारत सरकारने लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे, जे भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम करतील.

🔸एनडीएचे माजी विद्यार्थी सप्टेंबर 2019 मध्ये पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ बनले आणि 31 मे 2021 रोजी सेवेतून निवृत्त होईपर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.

🔹त्यांनी अनेक नियुक्त्या केल्या आहेत आणि त्यांना बंडखोरीविरोधी कारवायांचा व्यापक अनुभव आहे.


Ksagarfocus

२७ सप्टेंबर २०२२

विधान परिषद असलेले राज्य

♦️ निर्मितीपासूनच विधान परिषद असलेले राज्य :- बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा.

♦️ आंध्रप्रदेश :- 1957 मध्ये निर्माण करण्यात आली. 1985 मध्ये बरखास्त करण्यात आली आणि 2005 मध्ये पुन्हा निर्माण करण्यात आली.

♦️ पंजाब & पश्चिम बंगाल :- 1969 मध्ये विधानपरिषद बरखास्त करण्यात आली.

♦️ तामिळनाडू :- 1986 मध्ये बरखास्त करण्यात आली. 2010 मध्ये निर्मितीचा ठराव पास करण्यात आला. सत्तापालट झाल्याने पुन्हा बरखास्त करण्याचा निर्णय झाला. सध्या संसदेत प्रलंबीत.

♦️ मध्यप्रदेश :- 7व्या घटनादुरुस्तीने (1956) निर्मितीची तरतूद. मात्र राष्ट्रपतीद्वारे अधिसूचना काढण्यात आली नाही.

♦️ सध्या राजस्थान आणि आसाम राज्यात विधानपरिषद निर्मितीची प्रक्रिया चालू आहे.

♦️ ओडिशा विधानसभेने नुकताच विधान परिषद निर्माण करण्याबाबत ठराव मंजूर केला आहे.

👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा

भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प

♦️  इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ

♦️  उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

♦️  काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

♦️  कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
  - हिमाचल प्रदेश

♦️  गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश

♦️  जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान

♦️  जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र

♦️  टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड

♦️  तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड

♦️  तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर

♦️  दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी  - पश्चिम बंगाल

♦️  दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

♦️  नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र

♦️  नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश

♦️  नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

♦️  पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड

♦️  पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक

♦️  फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल

♦️  बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश

♦️  भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

♦️  भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना

♦️  मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश

♦️  रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर

♦️  राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

♦️  सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

♦️  सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात

♦️  हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...